Corona returns in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | कोरोना रिटर्न

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

कोरोना रिटर्न

कोरोना रिटर्न


तो ओसाड रस्ता आज अगदी भयाण वाटत होता त्यांचे आज अश्रू सुुकलेले होते. कधी न पाहिले तेवढेे मृतदेह आज अनुभवायला मिळत होते. अख्ख्या देशात कोरोनाचं सावट निर्माण झालं होतं. मृत्यूही आज स्वस्त झाला होता. कधी ऑक्सीजन लीक होवून तर कधी रुग्णालयाला आग लागून तर कधी रस्तेे अपघातात लोकं मरण पावत होते.
स्मशानात पाहिलं असता कधी नसेल पाहिली एवढी मुदड्यांची रांगच रांग होती. लोकांनी आजपर्यंत फक्त राशनची रांग पाहिलेली होती.
नुकत्याच शाळा सुरु झाल्या होत्या. शाळा सुरु व्हायला एक महिनाही झाला नव्हता. कोरोना हलक्या प्रमाणात सुरु होताच. तो संपेल अशी चिन्ह दिसत होती. तोच कोरोना नवं रुप बदलवून आला. त्यानं आपलं नावही बदलवलं होतं. त्यातच त्यानं आपले गुणधर्मही बदलवले होते.
कोरोना आता झपाट्यानं वाढू लागला होता. त्यातच मृत्यू संख्या वाढू लागली होती. संभाव्य घातपात होण्याची चिन्ह दिसत होती. तोच सरकारला चिंता पडली की हे असंच जर सुरु राहिलं तर उद्या हाच कोरोना महामारीच्या रुपात परावर्तीत होईल. त्यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.
शाळा बंद झाल्या होत्या. त्याचप्रमाणे महाविद्यालयही बंद झाले होते. आता उरल्या होत्या परीक्षा. त्याही सरकारनं बंद केल्या होत्या. विद्यार्थ्यांना हायसं वाटलं. पण पालकांचं काय? पालक चिंतेत होते. कारण त्यांच्या मुलांचं होणारं अभ्यासाचं नुकसान कधी भरुन निघणारं नव्हतं. अशातच अभयला एक फोन आला एका पालकाचा. पालक म्हणत होता की त्याच्या पाल्याचं अतोनात नुकसान होत आहे. ते नुकसान कधी भरुन निघणारं नाही. तेव्हा अभयनं त्याच्या मुलाला शिकवायला घरी यावं.
कोरोनाची गंभीर परीस्थीती. घराघरात रुग्णसंख्या होती. त्यातच रुग्णालयात बेड नव्हते. सगळीकडे हाहाकार माजला होता. त्यातच असा पालकाचा फोन. अभयला चिंता वाटायला लागली की आता करावे काय, बोलावे काय? तसा त्यानं वेळ मारुन नेलाही. पण या कोरोनामुळं होत असलेल्या नुकसानाची चिंता त्याला सतावत होती.
कोरोना आज घराघरात शिरलेला होता. असं वाटत होतं की हा कोरोना वसुंधरेवरील भार कमी करायला निघालाय की काय? वसुंधरा नाराज झालेली दिसत आहे. वसुंधरेवर पाप वाढल्याचं दिसत आहे.
कोरोनाच्या कार्यकालाचा विचार करतांना असं आढळत होतं की एखादा मरतुकडा व्यक्ती हा जीवंत दिसत आहे व कोणी धिप्पाड देहाचा असेल तर त्याला कोरोना हा लुळापांगळा करीत आहे. त्यातच कोरोना हा विदर्भात पाय पसरत होता.
आज कोरोनापुढं सामान्य माणसांनी हार झालेली असून आज या कोरोनानं सरकारला जाग आणलेली होती. त्यातच सरकारही मदत करीत असल्याचे जाणवत होते. पण सरकारला लोकं सहकार्य करीत नसल्याचे जाणवत होते.
कोरोनावर केवळ राजकारण सुरु असलेलं दिसत होतं. मी हे केलं, मी ते केलं म्हणत प्रत्येकाचे काम केवळ श्रेय लाटण्याचं असून प्रत्येकजण आपली स्वतःचीच पाठ थोपटत असलेले दिसत होते. जी कामं नगरसेवकानं करायची असतात. ती कामं शहरी भागात नगरसेवक न करता आम जनताच आजच्या या कोरोना परीस्थीतीत मदतीसाठी पुढे येत असल्यासारखी दिसत होती. स्थानिक स्तरावर अशीच परिस्थीती आज दिसत असून यात नगरसेवकाचे दुर्लक्ष झाल्याचंही जाणवत होतं. तसंच गावखेड्यातून सरपंच ग्रामसेवकांनी आपलं काम बरोबर न केल्यानं आज कोरोना वाढत असलेला दिसत होता. आज स्थानिक स्तरावर अशीच परिस्थीती असल्यानं आज प्रत्येकांना कोरोना संकटाकडे जावं लागत होतं.
कोरोनाच्या पाश्वभुमीवर असं मत मांडतांना काही लोकांना असं वाटू शकते की यात सरपंच, नगरसेवकाचं काय चुकलं.
महत्वाचं म्हणजे पुर्ण गाव हा सरपंच व ग्रामसेवकावर आधारीत असून शहरी भागात नगरसेवकावर आधारीत होता. त्यातच दर पंधरा दिवसानं प्रत्येक विभाग सानिटायझर केल्या गेला तर हा व्हायरस वस्तीवस्तीत गावागावात टिकणार नाही वा त्याचे प्रमाण कमी होईल. त्यातच रुग्णसंख्याही कमी होईल. असं अभयला वाटत होतं. पण आजकाल निवडून येणारे हे प्रतिनिधी अशा कामाला शुल्लक काम समजून अशा गोष्टीकडं दुर्लक्ष करत. त्यामुळं कोरोना वाढणार नाही तर काय?
पुर्वी गावागावात पावसाळ्यात एक पावडरची फवारणी केली जायची. त्या फवारणीचा उद्देश होता की गावात पावसाळ्यात पाणी गोळा असल्यास त्या पाण्यात वाढणा-या परजीवांपासून कोणत्याही प्रकारचे रोग गावात होवू नये. त्यातच साथी येवू नये. तसेच हिवताप व मलेरियाच्याही गोळ्या वाटल्या जायच्या. त्यामुळं नक्कीच हिवताप वा साथीचे रोग येणे बंद झाले होते. त्यातच अशाच प्रकारे दरवर्षी पोलिओ लसही लहान बाळांना पाजण्यात आल्यानं त्यानुसार पोलिओही बंद झाला होता. हेच तत्व इतरही रोगाबाबत घडलं. त्यामुळं त्या साथी आता कालबाह्य झाल्या होत्या. मात्र अलिकडल्या काही वर्षाच्या काळात ना अशी पावसाळ्यात फवारणी केली जात होती. ना निर्बंध पाळले जात होते. कधी नगरसेवक आपल्या वस्तीत फेरफटका मारत होते. ना कधी गावस्तरावर सरपंच. ते फक्त जिथं राहात, तेथीलच भागाचा विकास करीत असत. बरेचसे नगरसेवक तर असे असत की जे दुस-या भागातून स्थलांतरीत झालेले असत. ते तर थोपविण्यात आलेले असत. त्यांना ते ज्या भागातून निवडून आले, त्या भागाबद्दल काहीच सोयरसुतक नव्हतं. सरपंच उपसरपंचाबाबतही तेच होतं.
ज्यावेळी गटग्रामपंचायत असते. त्या गटग्रामपंचायतीबाबत सरपंच एका गावचा तर उपसरपंच दुस-या गावाचा. मग ताळमेळ जुळत नव्हता. त्यातच फवारणी होत नव्हती..
स्थानिक स्तरावर असलेले नगरसेवक व सरपंच ग्रामसेवक हे जेवढे तत्पर असतील, तेवढेच साथीचे रोग तत्पर नसतात. ते जोर करीत नाही वा नागासारखे मुंडके वर काढत नाही. जर त्यांनी व्यवस्थीत काळजी घेवून गावाला योग्य सोयी पुरवल्या तर........ परंतू असे होत नव्हते. हे स्थानिक प्रशासन स्थानिक भागात फेरफटकाच मारत नव्हते. त्यातच डास मारण्यासाठी फवारण्या करीत नव्हते. त्यातच वर्षातून एखाद्या वेळी धुळवडीची गाडी यायचीे. ती मुख्य रस्त्यानच फिरायची. ती गल्लीगल्लीत फिरत नव्हती. त्यातच डास मरत नव्हते. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ असतांना स्थानीक स्तरावर दर पंधरा दिवसानं परिसर सानिटायझर होत नव्हता. सरकार आदेश काढत असे.
सरकारला वाटतं की आपलं सरकार बदनाम होवू नये. पण स्थानिक पातळीवर हेव्यादाव्याचं व पक्षाचं राजकारण चालतं. हे विरोधी पक्षातील नेतेच सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र स्थानिक स्तरावर योजतात. हे नेतेच पक्षीय राजकारण खेळतात. मग कोरोना वाढणार नाही तर काय? असं अभयला वाटत होतं.
कोरोना ही जागतिक महामारी होती. ती महामारी अशाच प्रकारच्या पक्षीय राजकारणाचा फायदा घेत डोके वर काढत होती. कोरोनासारख्या या महाभयंकर आजारात असं पक्षीय राजकारण नको. सर्व स्थानिक स्तरावरील राजनीतीक पार्ट्यांनी आपले हेवेदावे दूर करुन एकत्र येण्याची गरज आहे. राजकारण करण्याची गरज नाही. तेव्हाच ख-या अर्थानं कोरोनाला दूर नाही तर हद्दपार नक्कीच करता येईल. ज्याप्रमाणे मतदानात गल्लीगल्लीतील प्रत्येक माणसांना बुथवर आणून मतदान केलं जातं. अगदी तसंच आज गल्लीगल्लीतील लोकांच्या घराघरात जावून त्याचं घर कोरोनाच्या पाश्वभुमीवर सानिटाईज करणं आवश्यक आहे. त्यांची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यातच त्यांना औषध पुरवणंही आवश्यक आहे. जर असे केले नाही आणि घराघरात सानिटायझर फवारले नाही आणि रुग्णांची कोरोना तपासणी घरी जावून केली गेली नाही आणि जर विभागवार बुथ लावून जरी कोणाला तपासणी करायला या जरी म्हटलं तरी कोणी येणार नाही व कोरोना महामारी कधीच संपणार नाही. कारण सामान्य जनता एवढी घाबरली आहे की ती कोरोना तपासणी करुन घेवून दहशतीनं मरणं पसंत करीत नाही. ती जनता मरणं पसंत करतात, पण तपासणी करीत नाही. म्हणून कोरोनाच्या या पाश्वभुमीवर स्थानिक प्रशासनानं सक्रीय राहून हव्या त्या उपाययोजना कराव्यात. पक्षीय राजकारण बाजूला सारुन व एकत्र येवून. जेणेकरुन कोरोना संपविता येवू शकेल. तसेच कोरोना स्थानिक स्तरावरुनच संपेल असेही अभयला वाटत होते. तो लोकांना याबाबतच माहिती देत होता.
अभय एक शिक्षक होता. त्याचबरोबर तो समाजसेवकही होता. तसाच एक साहित्यकारही. त्यानं आजपर्यंत कोरोनाच्या जनजागृतीसाठी कित्येक लेख वर्तमानपत्रातून लिहिले होते. पण लोकं ऐकणार तेव्हा ना. लोकंही ऐकायला तयार नव्हते. मृतांचा आकडा जरा फुगल्यासारखा वाढत होता. तो इतका वाढत होता की भल्याभल्यांच्या छातीत धडकी भरत होती. त्यातच काही फेक व्हिडीओही व्हाट्सअपच्या माध्यमातून फिरत असत. ते पाहिलं की अजून मोठ्या प्रमाणात छातीत धडकी भरायची. त्यातच रुग्णालयात बेड नसल्यानं व रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च येत असल्यानं फार मोठी चिंता लोकांना सतावत होती. आता करायचे काय असंही लोकांना वाटायचं. त्यातच कोणाला साधा सर्दी खोकला झालाच तर तो भीतीनंच कोरोनाची तपासणी न करता अटैकनं मरत असे. असे कितीतरी लोकं या साथीत मरण पावले होते. कोरोना मृत्यूस्थळी तांडव करीत होता.
कोरोना व्हायरस पुुन्हा परतून आला आणि त्यानंं पुर्ण जगाला थक्क करुन सोडलं. त्यातच मृत्यूची संख्ख्याही वाढली.
ते मृत्यू......आबालवृद्धासह सर्वजण मरत होते आज. आज या मरणाचा विचार केल्यास या मरणानं एखादं गावंही सोडलं नसेल कदाचित एवढी भयानक स्थिती आज उत्पन्न झाली होती. लोकांनी आजपर्यंत ब-याच रांगा पाहिलेल्या होत्या. राशनच्या रांगा, बिल भरण्याच्या रांगा. पण स्मशानात आजपर्यंंत तरी मुदड्यांसाठी लावलेल्या रांगा कधी पाहिलेल्या आठवत नव्हत्या. एवढी भयानक परिस्थीती आज शहरात निर्माण झाली होती. रोजच एका एका वस्तीतून पाच पाच लोकं मरत असलेले दिसत होते.
दिल्ली असो की नागपूर असो. मरणानं कोणाला सोडलेलं नव्हतं. काही कोरोनानं मरत असतील कदाचित. पण काही तर असेही विविध आजारानं मरत होते. आकडे वाढत होते. त्यानुसार मरणाची भीतीही वाढत होती. ऑक्सीजन सिलेंडर कमी पडत होते आणि इंजेक्शन तर कामच करीत नाही. असे लोकं बोलत होते. त्यातही इंजेक्शन मध्ये काळाबाजार दिसत होता.
मुख्य म्हणजे मृत्यू आज कोरोनाच्या रुपानं तांडव करीत होता. एका एका घरचे दोन दोन तर कधी तीन तीन जीवं जात होते. पण यात दुर्भाग्य असं की ते जीव जात असले तरी त्या मुदड्यांना हातही लावता येत नव्हता. ही वैषम्यपुुर्ण गोष्ट होती.
या कोरोनाच्या पाश्वभुमीवर असेच काही व्हिडीओ व्हाट्सअपवर येत होते. त्यात काल दिल्लीतील घटनेवर आलेला व्हिडीओ. दिल्लीत मृतदेहाची रांग लागली आहे. अशा प्रकारचा व्हिडीओ तर दुसरा एक व्हिडीओ होता. तो म्हणजेे लाकडाच्या शरण रचलेल्या म्हणजे मृतदेहाची सोय लावण्यासाठी आधीच स्मशानात रचलेल्या चितेचा.
या प्रसंगावरुन लोकं मात्र वेगवेगळ्या प्रकारचं बोलत होते. एक म्हणजे प्रेताच्या रांगा पाहून सरकारलाच दोषी धरणारा व्हिडीओ. तर दुसरं म्हणजे रचनेली लाकडं पाहूनही सरकारलाच दोषी धरत. सोयी केल्या तरी सोयी का केल्या आणि नाही सोयी केल्या तरी का सोयी केल्या नाही असं लोकं बोलायची. सरकारलाही काय करावं ते कळत नव्हतं आणि म्हणूनच सरकारही हतबल झालं होतं या कोरोनासमोर. त्यांनाही वाटत होतं की काय करावे.
सरकारला प्रश्न पडला होता की काय करावे. कारण सरकार हे जनतेचे माय बाप होते. ज्याप्रमाणे घरी मायबापाला चिंता असते की काय करावे. तशीच चिंता ही सरकारलाही होती. त्यामुळं सरकारला आपण समजून घेण्याची गरज आहे. परंतू आपण सरकारला समजून न घेता केवळ सरकारच्या कोणत्याही निर्णयावर ताशेरे ओढू नये असं अभयला वाटत होतं.
आज कोरोनापुढं मृत्यू तांडव करीत होता. मृत्यूला असं वाटत असेल की किती नामी संधी मिळाली. पण यात मृत्यूचा फायदा काय? सरकारही प्रयत्नशील होतं आपल्या कार्यात. थोड्याफार चुका होतातच. त्यासाठी सरकारचं चुकतेच असं नव्हतं.
आज या रांगा पाहता असं जाणवत होतं की कदाचित मृत्यू आपल्यावर रागावला तर नाही. कारण अशा या कोरोनाच्या येण्यामागं आम्हीच जबाबदार होतो ना. आम्हीच कोणत्याही स्वरुपाची खबरदारी घेतलेली नसेल, म्हणूनच आमच्या बाबतीत असं घडत होतं.
महत्वाचं म्हणजे आम्ही जी पर्यावरणाची कुचंंबना केली. जंगलं तोडली. प्रदुषण केलं. हवेच पाण्याचं आणि एकंदरीत वातावरणाचं संतुलन बिघडवलं. त्यामुळं आमच्यासमोर आज मृत्यू तांडव करीत होता. तरीही आम्ही आजही सुधारलो नसून हाच मृत्यू उद्या आमच्या न सुधारण्यानं असाच तांडव करीत ही मनुष्यवस्ती नष्ट करेल असं वाटत होते. त्यासाठी आतापासूनच जे काही उरलेले होते. त्यांनी सावध होण्याची गरज होती. पण लोकं ऐकतील तेव्हा ना.
सध्या कोरोना आजार सुसाट वेगानं धावत सुटला होता.त्याला असे वाटत होते की त्याला रोखणारं कोणी नाही. तसं पाहता कोरोनाचं बरोबरही होतं. त्याला आम्ही औषधी निघाली तरी रोखायला सक्षम ठरत असलेले दिसत होतो. एवढी महाभयंकर परिस्थिती एकंदर देशाची झाली होती.
आज कोरोना व्हायरस इंजेक्शनलाही घाबरायला तयार नव्हता. आज इंजेक्शन घेतल्यानंतरही बरेच लोक मरतांंना दिसत होते. रेमडेसीवरबाबत काळाबाजार होतांना दिसत होता. त्यातच ऑक्सीजनबाबतही तेच हाल दिसत होते.
कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य रोग असून तो रोग एका व्यक्तीपासून दुस-यांना पसरत होता. त्यातच मृत्यूचं एवढं प्रमाण वाढलेलं दिसत होतं की ज्या गावात एकेक वर्षपर्यंत लोकं मरण पाहात नव्हते, त्या त्या गावात आज रोजची माणसं मरत होती. त्यातच काही लोकं गाव सोडून ते शेतात राहायला गेले होते. एवढी दहशत कोरोनानं पसरवली होती. आज कोरोना परीवारावर हावी झाला असून प्रत्येक घरातील एक एक व्यक्ती आज आजारी दिसत होता.
आज कोरोना परीवारावरही स्वार झाला होता. परीवाराला लाजीरवाणी गोष्ट आज कोरोना करीत असलेला दिसत होता. त्याचे कारणही तसेच होते. माणूस जेव्हा मरतो. तेव्हा त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला पाच माणसं तरी लागतात. अशावेळी जर एखाद्या माणसाचा मृत्यू कोरोनानं झाला असल्यास त्या मृतदेहाची विल्हेवाट लावाायला नाईलाजानं नातेसंबंधातील माणसांना जावंच लागते. त्यातच कोरोनानं ज्या माणसाचा बळी घेतलेला होता. तोच कोरोना आता त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर स्वार झालेला दिसत होता.
मृतदेह.........मृत्यू जरी कोरोनानं झाला असला तरी नातेवाईकांना नाईलाजानं तरी त्या मृतदेहाजवळ जावंच लागतं. त्यातच कोरोनाबाधीत मृतदेह हा काही तो माझा जवळचा नातेवाईक आहे हे पाहात नव्हता. तो त्या माणसांना जवळ करुन अखेरचा जवळ करुन टाकत होता.
महत्वाचं म्हणजे कोरोना हा असा व्हायरस होता की तो नातेसंबंध पाळत नव्हता. म्हणून नातेसंबंधातील मयतीतही जाणे टाळा असं कोरोना सांगत होता. कारण माणूस एकटा जन्म घेतो व एकटाच जातो हे कोरोनाला माहित होते. पण तो हे विसरला की माणूस एकटा जरी जन्म घेत असला तरी त्याला लहानाचं मोठं करणारा समाज महत्वाचा आहे. जरी त्याठिकाणी त्या एकाच गृहस्थाचा मृत्यू झालाही असेल तरी मृत्यूनंतरही त्याला जाळण्यासाठी स्मशानापर्यंत समाजच नेत असतो. म्हणून कोरोनानं तेवढा तरी विचार करायला हवा होता की निदान मृत्यूच्यावेळी हजर असलेल्या पाच लोकांना तरी असं छळूू नये. हं, विवाह सोहळ्यात वा वास्तूपुजन वा वाढदिवसाला जर जास्त संख्येनं लोकं येत असतील तर ठीक आहे.
कोरोनाचं म्हणणं नी मानणं ठीक होतं. पण ज्या ठिकाणी मृत्यू होत. होता. ती मृत व्यक्ती जर एकदम जवळच्या नातेसंबंधातील असेल तर कोरोना असो की मग काहीही असो. त्या व्यक्तींना जावंच लागते त्या माणसाच्या मयतीला. मग आपलं काहीही होवो असा विचार करुन ते जवळचे, रक्ताच्या नातेसंबंधातील लोकं जात व कोरोनाचा आजार घेवून बसत. हेच वास्तविक सत्य आज घराघरातून दिसत होते. कोरोना परीवारावरही स्वार झाला आहे असेच दिसत होते.
आज मृतदेहाची विल्हेवाट लावायला जे पाच लोकं येत. त्या पाच लोकांना कोरोना छळत होता. नव्हे तर हा कोरोना त्या पाच लोकांचेही बळी घेत होता. असे होत असल्यानं पुुढे जावून त्या कोरोनामुळं मृतदेहांना हात लावायलाही कोणी हात लावणार नाही. मृतदेह सडत राहतील व कोरोनाला चांगले वाटेल. असा विचार करतांना हास्यास्पद वाटत नव्हतं. कारण कोरोना हा परीवारावर स्वार झाला होता.
कोरोना व्हायरस आला आणि त्या व्हायरसनं नाकी नव आणलं. त्यातच कोरोना एवढा वाढत आहे की त्याचेवर कसं नियंत्रण आणावं ह्यासाठी उपाय शोधायला कठीण जात होते. त्यातच लोकं प्रशासनाचं ऐकत नसून अगदी बिनधास्त तोंडाला मास्क न लावता फिरत होते. त्यामुळं कोरोना अगदी नियंत्रणाबाहेर गेला होता.
कोरोनाबाबतीत सांगायचं झाल्यास एक गोष्ट ही नक्की सांगता येईल की कोरोना जरी झपाट्यानं वाढत असला तरी त्याचेवर नियंत्रण आणणे कठीण झाले होते. कारण जो जन्म घेतो तो मरतो हा साधा नियम. त्यानुसार कोरोनानं जन्म जर घेतला तर तो कधी ना कधी नष्ट होणारच. पण त्याला कसं नष्ट करायचं ते आपल्यावर होतं. अर्थात आपण कसं वागतो. कसं कोरोनासमक्ष प्रदर्शीत होतो. पण लोकं सहकार्य करतील तेव्हा ना.
कोरोना कसा वाढतो याबाबतीत एका वर्तमानपत्रातील एक प्रसंग सांगतो. दि. २०/०४/२०२१ च्या दै. नवराष्ट्रच्या पेज नंबर १० वरील एक प्रसंग. हा प्रसंग मन हेलावून सोडणारा प्रसंग होता. कोरोना वाढत असतांनाच हा कोरोना वाढू नये म्हणून सरकार निर्बंध लावत असे. लग्नसोहळ्याला पंचवीस व अंत्यविधीला वीस लोकांची उपस्थिती असावी. परंतू ही घटना पुण्यासारख्या ठिकाणची. ज्या शहराला सांस्कृतीक माहेरघर म्हणतात. त्या ठिकाणी एक सत्तर वर्षाचा म्हातारा तोही अल्पशा आजारानं मरण पावला होता. त्यातच त्याची अंत्ययात्रा काढली आणि अंत्ययात्रेला जवळपास शंभर लोकं होते. त्यातच एक अंधश्रद्धा म्हणजे मृताचे पाय धुवून ते पाणी मृताच्या नातेवाईकांनी प्राशन केले.
किती किळसवाणा प्रकार. किती मोठी अंधश्रद्धा. आज देश जगाचं प्रतिनिधीत्व करीत असतांना तसेच पाश्चात्य विचारसरणीचा वापर करीत असतांना या देशात असली अंधश्रद्धा चालते की आजही मृताचे नातेवाईक मृतांच्या पायाचं पाणी पितात. खरंच यामुळं कोणतेही आजार वाढतील की बंद होतील. ही विचार करणारी बाब होती. तसं पाहिल्यास कोणताही जीव हा मरण पावताच त्याच्या शरीराचं विघटन करण्यासाठी त्यात शेकडोंच्या संख्येनं निरुपजीवी अर्थात परजीवी विषाणू व जीवाणू शरीरात तयार होतात. जे हवेत मिसळून ते इतरांच्या शरीरात गेले की इतरांना आजारी करतात. असे असतांना त्या मृतांचे पाय धुवून पाणी पिण्याचा हा किळसवाणा प्रकार.......खरंच या कोरोनाच्या पाश्वभुमीवर मांडतांना आश्चर्यचकीत करणारी घटना वाटत होती.
आज देशात कोरोनाचे सावट असतांना असेच पाय धुवून पाणी पिणारे कितीतरी लोकं या देशात असतील की ज्यामुळे हा कोरोना वाढत होता. आज विवाह सोहळ्याला पंचवीस लोकांची परवानगी असतांना कितातरी विवाहसोहळे असे होते की ज्यात चारशे ते पाचशे लोकांपेक्षा जास्त लोकं येत व कोरोनाचे पाजिटिव्ह होत. तसेच मरणदेह असे असत की ज्या मरणात वीस लोकांची परवानगी असतांना शंभराच्या वर लोकं येत व कोरोनाचे पाजिटिव्ह होत. हा कोरोना वाढत असतांना कितीतरी लोकं असे होते की जे वाढदिवस करत. वास्तूपुजन करत. नव्हे तर नवकन्याही करत. कितीतरी लोकं असे होते की ते आजही किराणा दुकानात जाणूनबुजूनन गर्दी करत. एकमेकांना धक्के मारत. हात बोट लावत. कितीतरी अशी मंडळी होती की ज्यांना आवश्यकता नसेल तरीही ते विनाकारण बाहेर पडत. मग कोरोना वाढणार नाही तर काय?
किती भयानक अंधश्रद्धा. मृतांच्या पायाचं पाणी पिणे. तरीही सरकारनं या अंधश्रद्धेपोटीच लोकांनी मंदीर, मज्जीद तसेच धार्मीक ठिकाणी गर्दी करु नये म्हणून धार्मीक ठिकाणं बंद केली होती.
महत्वाचं म्हणजे पोलिस तरी कुठं कुठं पाहणार. हं, पोलिसांनी लाठीचार्ज केला तर आपलाच आक्रोश. सरकारनं काही कारवाई केली तरी आपलाच आक्रोश. मात्र कोरोना वाढत असतांनाही लोकांना चिंता नव्हती. आपल्यालाही कोरोना होवू शकतो व आपण मरु शकतो. याचीही कोणाला चिंता नव्हती. त्यामुळं आज 'ठीक आहे, मरा ना' असे म्हणण्याची वेळ आली होती. पण कोरोना वाहक बनून दुस-याचा जीव कशाला धोक्यात घालता? असेही म्हणण्याची वेळ आली होती. आज आकडे बोलत होते. ते आकडे एवढे बोलत होते की कोरोना नियंत्रणाबाहेर झालाय हे स्पष्ट दिसत होते. जरा सावध व्हा असंही कोरोना सांगत होता.
अरे बाबांनो, जरा सावध व्हा. कोरोना नियंत्रणाबाहेर झालाय. आज गल्लीगल्लीत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. आपण वेळीच सावध झालो नाही तर कोणताच देव वा अल्ला वा कोणतीही महाशक्ती आपल्याला वाचवायला येणार नाही. लग्नसोहळे, वाढदिवस वा वास्तूपुजन नंतरही करता येईल. जीवंत असलो तर सारंच करता येईल. पण जीवंतच नसलो तर काय करणार. विशेष सांगायचं म्हणजे गल्ली असो की अजून कोणतंही स्थळ असो. गर्दी करणे टाळा. मृत माणसे मरण पावलीच तर वीसपेक्षाही कमी लोकं गोळा व्हा आणि त्यानंतर स्वतःची स्वच्छता करुन घ्या. जेणेकरुन कोरोनाला रोखता येईल आणि विशेष सांगायचं म्हणजे कृपया मृत माणसांच्या पायाचं पाय धुवूून पाणी पिण्या सारख्या इतर कोणत्याही जीवघेण्या अंधश्रद्धा पाळू नका. जेणेकरुन उद्या पश्चातापाशिवाय काहीच मिळणार नाही व कोरोनाही नियंत्रणाबाहेर जाईल. हे लक्षात ठेवा. असं अभय वारंवार लोकांना सांगत होता. कोरोनाचा कहर सुरुच होता. त्यामुळं कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं दि.१५/०३/२०२१ पासून लाकडाऊन लावलं तरीही कोरोना थांबायला तयार नव्हता. त्यातच प्रशासन आणखी कंबर कसत होतं. या लाकडाऊननुसार सरकारनं विवाहावरही बंदी घातली होती. तसेच कोणत्याही चारचाकी गाडीत केवळ चालक व एकच प्रवासी जाण्याचं बंधन होतं. त्यातच काही लोकांनी आपले विवाह पुढे ढकलले होते. काहींनी थांंबवले होते. मात्र अभयच्याच घराजवळ एका मुलाचा विवाह होता.
अभयला वाटत होतं की लोकं ऐकत नाही. त्यामुळं हा कोरोना कधीच जाणार नाही. तेव्हा दोनचार माणसात विवाह सोहळा उरकून टाकलेला बरा. त्यातच त्यानं त्या शेजारच्याला सल्ला दिला की त्यानंं विवाह करावा. त्यानुसार त्या शेजारच्यानं आपला विवाह चारपाच लोकांत उरकवला होता. पण दुर्दैव असं की त्या शेजारच्यांच्या सासरच्या माणसांनी लाकडाऊनमध्ये चारपाचशे लोकं बोलवीत विवाह केला होता. सुदैव असं की तिथे कोणीही कोरोनाबाधीत नव्हता. नाहीतर त्या विवाहात जेही उपस्थीत होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाली असती.
कोरोना महामारीवर उपाय काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत होते आणि आव्हान करीत होते की घरातच राहा. बाहेर पडू नका. गर्दी टाळा. सानिटायझर वापरा. काळजी घ्या.
सरकारच्या आदेशाची पायमल्ली न करता काही लोकं घरातच होते. सानिटायझरही वापरत होते. तसेच तोंडाला मास्क लावत नव्हते. तसेच स्वतःचीही काळजी घेत होते. तरीही त्यांच्या घरी कोरोना दस्तक देत होता.
कोरोनाचा हा कहर थांबता थांबत नव्हता. जरी काळजी घेतली तरी कोरोना हा त्या लोकांचं अंगणच नाही तर संपूर्ण पररीसर घेरत होता. यातच काहींची तरुण तरुण मुलं तर काहींचे मायबापही मृत्यूमुखी पडत होते. एवढा कोरोना जबरदस्त होता.
दररोजचे आकडे पाहता कोरोना वाढत आहे. असेच दिसत होते. स्मशानघाटाचे निरीक्षण केले असता आज स्मशानघाट हाऊसफुल असून आज स्मशानघाटातही मुदडे जाळायला रांग लावावी लागत होती. त्यातच स्मशानघाटाचंच चित्र तर ज्या घरी कोरोनानं माणसं मरत होती. त्या ठिकाणी कार्पोरेशनच्या गाड्या जावून ती माणसं त्या कोरोनानं मरणा-या माणसाला उचलत व कच-यासारखे गाडीत टाकून त्या प्रेताची विल्हेवाट लावली जात होती.
आज जो तो कोरोनानं दहशतीत होता. केव्हा कोणाला काय होईल हे काही सांगता येणं कठीण झालं होतं. कोण केव्हा मृत्यूच्या दारात जाईल तेही सांगता येणे कठीण होते. यातच काही काही लोकं हे सरकारनं लाकडाऊन लावलं तरी शुल्लक शुल्लक कारणासाठी बाहेर पडत होते आणि परीसरात गर्दी करीत होते व कोरोनाचा फैलाव करीत होते. ते तोंडालाही मास्क लावत नव्हते. त्यातच काही लोकं जे मास्क जुने झाले. ते मास्क कुठेही फेकून देत होते. त्या मास्कला जाळत नव्हते. त्यातच त्या मास्कमध्ये कोरोनाचे जंतू असल्यानं ते जंतू प्रसरत होते. काही लोकं स्मशानात मुदडे तर जाळत. शिवाय त्या मुदड्याचे जे कपडे असत. ते कपडे जाळत नसून तेही सैरावैरा कुठेही फेकून देत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत होता. हे मास्क धोकादायक आहेत. असे लोकांना वाटत नव्हते. काही लोकं फक्त आपला स्वास्थ पाहात होते. ते इतर लोकांचा विचार करीत नव्हते.
महत्वाचं म्हणजे मास्क हे असे कुठेही फेकून देवू नये. तसेच कोरोनानं मृत्यू पावलेल्या मुदड्याचे कपडे हे कुठेही फेकून न देता तेही जाळून त्याची विल्हेवाट लावावी. तसेच सरकारचे आदेश पाळावे व कुठेही फिरु नये. त्यामुळं कोरोनाच काय कोरोनाचा बापही थांबेल ही शक्यता नाकारता येत नाही. असं मत आवर्जून अभय प्रकट करीत होता.
गरीबांना कोरोना होवू नये म्हणून सरकारचा विचार होता की लाकडाऊन लावावे. कारण आता कोरोना वाढत चालला होता.

*******************************************
कोरोना कमी झाला होता. त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होवू नये शाळा सुरु करण्यात आल्या. पण काय आश्चर्य, विद्यार्थी वय छोटं असल्यानं व विद्यार्थ्यांना कितीही सांगून त्यांनी सुरक्षीतता न बाळगल्यानं त्यांना जरी कोरोना झाला नसला तरी ते कोरोनाचे वाहक ठरले होते. त्यातच कोरोना एवढा वाढला की पुन्हा लाकडाऊन लागलं व शाळा बंद झाल्या. कोरोना कमी व्हावा यासाठी आता लाकडाऊनचा विचार सरकार करीत असलेले दिसत होते.
कोरोना देशात येवून दिड वर्ष झाला. कोरोना आखुडते पाऊल घ्यायला तयारच नव्हता. म्हणून की काय लाकडाऊन. लाकडाऊन विद्यार्थ्यासाठी वा धनिकांसाठी नाही तर गरीबांचा विचार करुन. त्याचं कारण असं होतं की समजा धनिकांना कोरोना झालाच, तर ते पैसा खर्च करुन आपल्यावर उपचार करु शकतील. पण गरीब मंडळी.........ज्यांच्याजवळ पोट भरायला पुरेसे पैसे नाहीत. ती पैशाअभावी उपचार कसा करतील अशी सरकारला चिंता होती. त्यातच देशाची लोकसंख्या अफाट असल्यानं सरकारी रुग्णालयात देशाची लोकसंख्या विचारात घेता तेवढ्या प्रमाणात पुरेशा सोयी नव्हत्या. मनुष्यसाधन नव्हते. लसी उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या लसी फारशा प्रभावी नव्हत्या.
गरीब मंडळींना कोरोना झालाच तर त्यांच्यासाठी पुरेशी सोय सरकार करीत असले तरी समजा एखादा कर्तबगार व्यक्ती कोरोना संक्रमणानं मरणच पावला तर जवळ पैसा नसल्यानं गरीबांनी जगावं कसं हाही प्रश्न सरकारला पडलेला होता.
लाकडाऊन लावायचा. काही लोकं म्हणत लावायचा तर काही लोकं म्हणत नाही लावायचा. ज्यांच्या घरी आपलं पोट भरायला समस्या होती, ते म्हणत लाकडाऊन लावू नका आणि ज्यांचं पोट भरलेलं होतं. ते म्हणत की लाकडाऊन लावावे. ज्यांना पोट भरायला भरपूर पैसा आहे. लाकडाऊन लावू नये म्हणणा-या मंडळींमध्ये सर्व प्रकारचे मजूर समाविष्ट होते. जे काबाजकष्ट करत. कोणी भाजीबाजारात काम करत. कोणी बांधकाम व्यवसायात तर कोणी छोट्या मोठ्या कारखान्यात. याउलट जे लाकडाऊनची मागणी करत होते, त्यामध्ये सर्व प्रकारचे सरकारी कर्मचारी येत. कारण या कर्मचा-यापैकी काही कर्मचा-यांजवळ बक्कळ पैसा होता. त्यांना लाकडाऊनचा कोणताही फरक पडत नव्हता. कारण लाकडाऊन काळातही त्यांचं वेतन सुरुच होतं. त्या वेतनात थोडीशीही कटूता नव्हती. पण मजूर वर्ग जर घरी बसला तर त्यांचं वेतन हे मुळात या लाकडाऊन काळात बंद होणार होतं. म्हणून त्यांना जास्त चिंता होती.
कर्मचा-यांचा विचार केल्यास असे कर्मचारी की ज्यांच्याजवळ भ्रष्टाचारी मार्गानं कमविलेला पैसा असतो. त्यांना काय फरक पडणार होता बरे! पण गरीब वर्गाला लाकडाऊन लावला तरी फरक पडत होता. नाही लावला तरी फरक पडत होता. त्याचं विश्लेषण मुळात पुढीलप्रमाणे करता येईल.
समजा लाकडाऊन लागलंच तर सर्व प्रकारची मजूरांची कामं बंद होणार होती. त्यामुळं ज्या मजूर मंडळीकडे कामावर गेल्यावरच चूल पेटू शकते. त्यांची चूल पेटणे शक्य नव्हते. त्यातच त्यांच्या घरी उपाशी राहण्याची वेळ येवू शकत होती. याउलट समजा लाकडाऊन नाही लावल्यास हा कोरोना त्यांच्या रुपात वाढू शकत होता, नव्हे तर तो कोरोना संपर्कात आल्यानं त्यांनाही होवू शकत होता, त्यातच त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नसल्यानं घरचा कर्तबगार व्यक्तीही दगावू शकत होता. पर्यायानं सांगायचं झाल्यास लाकडाऊनच्या सुरु आणि बंदचा विचार करतांना सरकारजवळ विचार करायला मार्गच नव्हता. एकंदर त्यांच्याजवळ संभ्रम निर्माण करणारी स्थिती निर्माण झाली होती. सरकारलाही काय करावे सुचेनासे झाले होतेे. तसेच ज्या देशात सत्तर टक्के गरीबी आहे. जी गरीबी आज कमी झालेली नाही, जी गरीबी या वाढत्या लोकसंख्येमुळं आली, ज्या लोकांनी देशाच्या लोकसंख्येचा प्रश्न लक्षात न घेता एकापेक्षा जास्त मुलं पैदा केली, अजूनही करीत होते. अशांचं पोट कसं भागवायचं? अशांचाही जीव कसा वाचवायचा? याबाबतही सरकारजवळ मोठा विचार असून सरकारलाही चिंता लागली होतीे. मुळात या देशात जनतेनंच मुलं पैदा करुन संकट निर्माण केलेले असून आता लाकडाऊन लावायचे की नाही लावायचे ही संभ्रमाची स्थिती सरकारपुढे निर्माण झाली होती, त्यातच लाकडाऊन लावलं तरी जनता ओरडणार आणि लाकडाऊन नाही लावला तरी जनता ओरडणार. त्यामुळं काय करावं हे सरकारलाही कळेनासे झालेे होते. यात सरकारचा दोष जरी नसला, तरी सरकार हे लोकांचे मायबाप होते. त्यातच मतदानानं सरकार निवडून येत असल्यानं सरकारची स्थिती इकडे आड आणि तिकडं विहिर अशी झालेली होती. कदाचित सरकारनं लाकडाऊन लावेलाही कोरोनाला हरविण्यासाठी. ती सरकारचीच नाही तर आपली स्वतःची गरज होतीे. तेव्हा आपण आपलं मताचं राजकारण न करता केवळ कोरोनाला हरविण्यासाठी सरकारला नावबोटं न ठेवता सरकारला सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारचे दुषणं लावू नये. तसेच त्यातच आपले भलेही आहे. असं मत अभय मांडत होता.
सामान्य नागरीकांनी कोरोनास पत्र लिहिले होते. पण कोरोना काही माणूस होता की जो या सामान्य नागरीकांचं ऐकेल. तरीही ते पत्र. त्यात लिहिलं होतं,
हे कोरोना,
तू आता दिड वर्षाचा झालाय. आता तर तुला बोलताही येतंय. दुडूदुडू चालताही येतंय. तू एवढासा असूनही उदंडसारखा वागतोस. कितीही तुला सांगीतलं तरी.......पण जावू दे. तुला नाही कळणार आम्ही सांगणार ते.
हे कोरोना, तू अगदी गर्भात होता, तेव्हापासूनच तुझ्या क्लृप्त्या सुरु होत्या. तुला वाटत होतं की मी या गर्भातून केव्हा केव्हा बाहेर पडतो आणि केव्हा केव्हा कहर माजवतो. तू तसं स्वप्नही पाहिलं होतं. ते तुझं स्वप्न साकारही झालं कोरोना. कारण तू जन्म घेतल्यापासून नुसता कहरच ओततोय.
आम्हाला माहित आहे की तू हे तंत्रज्ञान अगदी गर्भात शिकला आहेस. कसा कहर माजवायचा? लोकांना कसं मारायचं? धास्तीत कसं भरवायचं? हे सारं काही. त्यानुसार तू वागतोस. पण तू हे तंत्रज्ञान गर्भात जरी शिकला असला तरी तू अभिमन्यू सारखा वाग. तसं वागायला का झालं तुला? तुला माहित आहे, अभिमन्यूही होता गर्भात. त्यानंही चक्रव्यूह भेदण्याची गोष्ट गर्भातूनच ऐकली होती. त्यानुसार त्याला चक्रव्युह भेदता येत होतं. अगदी तुझ्यासारखं. ती एक चांगली कला. त्या कलेचा वापर त्यानं विधायक कार्यासाठी केला. विघातक नाही. ज्यावेळी गुरु द्रोणानं चक्रव्युहची रचना केली, त्यावेळी ते चक्रव्युह भेद जाणणारा अर्जून तिथं नव्हता. त्यामुळं अभिमन्यूला त्या चक्रव्युहात अडकावं लागलं. हे लक्षात ठेव तू. कारण तूही जे शिकला आहेस, ते गर्भातच. तुझ्याजवळंही अर्धच ज्ञान आहे चक्रव्युहात प्रवेश करण्याचं. बाहेर पडण्याचं ज्ञान तुझ्याजवळ नाही.
हे लक्षात घे कोरोना की आमचं मानवी शरीर हे तुझ्यासाठी चक्रव्युह आहे. तुला उडता तर येत नाही. जर तुझ्या संपर्कात कोणी आला तरच तू त्याला लगट करतो अगदी शैतानासारखा. ज्यावेळी तू आमच्या शरीरात जातोस. त्यावेळी तुला आम्ही स्पर्शच केला नाही तर तू पडून राहशील नाही का मानवी शरीराच्या चक्रव्युहात. मग समजा आम्ही ते शरीर त्याच्या मृत्यूनंतर नष्ट केलं, तर कोण मरेल अभिमन्यूसारखा? तुच ना. कारण तू आता तेवढा हुशार नाहीस. लहान आहेस ना. तुला कळत नाही रे तेवढं. माहित आहे, मी तुला खरं खरं सांगतो. अरे हा माणूस महाहुशार प्राणी आहे रे कोरोना. हा केव्हा काय करेल ते सांगता येत नाही. तू जरी वेगवेगळे रुपं जरी बदलवीत असलास ना. तरी हा माणूस खुप हुशार आहे. हा त्यावरही उपाय काढेलच. तुला माहित नसेल कोरोना. आम्ही तुझ्या माहितीसाठी सांगतोय. अरे या मानवानं पृथ्वीला कैद केलं. या ठिकाणी होणा-या नैसर्गीक घटनांना पुर्वी देव म्हणून संबोधायचे. आता तसं नाही. या ठिकाणी चंद्र सुर्याला देव मानायचे. आता तसं नाही. आता चंद्र म्हणजे दगडाचा पर्वत तर सुर्य म्हणजे आगीचा गोळा हे मानवानं सिद्ध केलंय. अरे ज्या मानवापेक्षा महाभयंकर असलेल्या विशालकाय हत्ती, वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांना काबूत केलं. तो मनुष्यप्राणी किती हुशार असेल बरा. याची तू कल्पनाही केलेली नाहीस. अरे ज्याला भुकंप कुठे, केव्हा, किती रिश्टल स्केलचा येणार हे माहित असतं. ज्याला केव्हा, कुठे, कसं वादळ येणार हे माहित असतं. ज्याला समुद्रात केव्हा त्सुनामी येणार हे माहित असतं. त्या मानवाला तू कमजोर समजू नकोस. तू जर जास्त कहर ओतलास ना, तर हा माणूस ताबडतोब तुझ्यावर व्हँक्सीन काढेल व तुला नेस्तनाबूत करेल रे कोरोना. तेव्हा तू काय ठरवायचं ते ठरव.
कोरोना तू अगदी सिकंदरासारखा जग पादाक्रांत करायला पाहात आहेस. बरोबर आहे तुझं. पण सिकंदराला जसा पुरु भेटला का नाही भारतात. तसेच आजही कित्येक पुरु याच भारतात आहेत बरं. तुझ्यासारख्या सिकंदराला हरविण्यासाठी हे लक्षात घे. अरे, आता ते सर्व कौरव संपले. अन् कंसाची फौजही संपली. मात्र क्रिष्ण संपला नाही. तो जीवंत आहे अजून. प्रत्येक माणसाच्या रोमारोमात, श्वासातही बरं का? अरे ज्या कंसाला संपवायला आणि त्याच्या फौजेला संपवायला एकटा क्रिष्ण पुरला. तू हेही लक्षात घ्यायला हवं की आज प्रत्येकाच्या प्रत्येक श्वासात आणि रोमारोमात क्रिष्ण आहे. तेव्हा तू हा कहर माजविण्याऐवजी माघार घे. बंद कर तुझा कहर. म्हणजे तूही जीवंत राहशील अन् आम्हीही जीवंत राहू. तूही खुश राहा. आम्हालाही खुशीत राहू दे.
हे कोरोना, तू सामान्य माणसांकडं पाहा रे. आम्हाला तर त्यांची दया येते. किवही येते. माहित आहे तुला? ते जर रोजच कामाला गेले नाही तर त्यांच्या घरी चूलच पेटत नाही. उपाशी राहा लागते त्यांना. अन् माहित आहे तुला तुझ्यामुळं सतत लाकडाऊन लावावं लागत असल्यानं बिचा-यांना घरीच राहा लागते. मग विचार कर की ते किती दिवस उपासात काढत असतील. माहित आहे कोरोना, सरकारचं ठीक आहे, त्यांच्या काय बापाचं जाते. अरे ते पेट्रोलच्या माध्यमातून आपला खर्च काढतात. वीज बिल, नळ बिल तसेच सरकारी कर्मचा-यांची वेतनं, आमदार, खासदार, मंत्र्यांची वेतनं सगळं बरोबर आहे. पण सामान्य माणसाचं वीज बिल तरी कमी होतं का? नळ बिल तरी. नाही ना. अरे श्रीमंत माणसांचं ठीक आहे. तू त्याच्या घरी गेला तरी ते आपल्याजवळचा लाखो रुपये लावून सरकारी रुग्णालयात उपचार तरी करु शकतील. पण सामान्य माणूस कसा उपचार करणार रे. कृपया पाहूणा म्हणून सामान्यांकडं तरी फटकू नकोस. कारण पोटाची खळगी भागवितांना कर्ज झालं रे त्यांच्या घरी. वरुन तू जर पाहूणा म्हणून गेला तर त्यांच्या नाकी नव येवू शकेल. बरं तूझं काही खरं नाही भाऊ. तू तर ज्याच्या घरी पाहूणा म्हणून जातोस, त्याच्याच घरच्या माणसांना परतही नेतोस. सोडून मागतोस. हे असं वागणं बरोबर नाही कोरोना तुझं. निदान त्यांची तरी दया घे रे तू. तू त्यांच्या घरी जावूच नको. बिचा-यांची किव घे रे. अन् हे लक्षात ठेव तुझी अवस्था सध्या तरी अभिमन्यूसारखीच आहे. तू जर कहर ओतलास ना, तर हा माणूस तुला जिंदा गाडायलाही मागेपुढे पाहणार नाही. सध्या हा माणूस गप्प तरी आहे. विचार करीत आहे तुला रोकण्यासाठी काय करता येईल याचा.
अरे कोरोना, लहान लहान बाळाकडं तरी पाहा रे. त्यांचं बिचा-यांचं किती नुकसान होत आहे माहित आहे तुला. ते खेळण्यात गुंग आहेत. त्यांना स्वातंत्र्य मिळालं हे पाहून तू तरी खुश होत असशील. पण माहित आहे, त्यांचं किती शैक्षणीक नुकसान होत आहे ते. अरे, ते पोरं सगळं विसरलेत. साधी बेरीज, वजाबाकी अन् पाढेही विसरलेत ते. ते येत नाही त्यांना. अन् माहित आहे. लोकं याबद्दल आता तुला शिव्या देवू लागले अाहेत. शापही देवू लागले आहेत. तुला काहीबाही बोलू लागले आहेत. माहित आहे शापवाणी किती लागते ते. पुराणात जावून पाहा. निव्वळ शापानं अहिल्याची शिळा बनली होती अन् निव्वळ शापानं पंडू राजाला मृत्यू आला होता.
हे कोरोना, विदेशी लोकांचं जावू दे. पण भारताचा इतिहास पाहा. भारतात शिवरायांनी बलाढ्य अफजलखानाला ठार केलं होतं. खानाची फौज अफाट होती तरीही.......अरे ज्याला इंग्रजही घाबरत असत. ज्याला औरंगजेब घाबरत असे. असा शिवरायांचा हा देश. युक्तीनं आदिलशहाशी लढणारा शिवराय. अशी युक्तीनं लढणा-यां लोकांची आमच्या देशात कमी नाही. लढणारा सक्षम असा गट आहे आमच्या देशात. तुला नक्कीच पराभूत करणारी माणसं आहेत आमच्या देशात. अरे, आम्ही जर ठरवलं असतं ना की तुला गर्भातून पडल्याबरोबर मारायचं. तर तेही करु शकलो असतो आम्ही. पण आम्ही दयाळू आहोत तसेच सहनशीलही........आम्ही तसं महापाप करीत नाही. आम्ही विनाकारण कोणालाही त्रास देत नाही. मारणं तर दूरच राहिलं. पण आम्हाला जो त्रास देतो, त्याला नेस्तनाबूत करायलाही आम्ही मागपूढं पाहात नाही. तेव्हा हे लक्षात घे की तुला हा कहर थांबवायचा आहे. शांत बसायचं आहे. तुला बरंच मोठं व्हायचं आहे. अजून तू बराच लहान आहेस.
अरे कोरोना, हा खोडकरपणा सोडून चांगल्या रुपात ये आमच्याजवळ. आम्ही तुझं स्वागतच करु. ज्याप्रमाणे दुधाचं रुपांतर दह्यात करतांना जीवाणू कामात येतात. तशाच काही पदार्थाला चव आणतांना व्हायरसही कामात येतात. तसाच तूही ये मित्र बनून. अरे तेव्हा तर आम्ही तुला अंगाखांद्यावरच घेवू. पण तू जर असा हट्टीपणा सोडला नाही ना. तर आम्हीच तुला वाटही दाखवू. अरे माहित आहे का तुला? मोठमोठे राजमहाल मिटले रे. सध्या संविधानाचं राज्य आलं आहे ना. लोकांचं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं राज्य आलं आहे. अरे ज्याप्रमाणे एखाद्या नदीला पूर येतो आणि त्या नदीतील पाण्यात ताठ असलेली मोठमोठी झाडं पडतात व नदीत वाहात जात मिटतात. तशी तुझी अवस्था होवू नये म्हणून सांगतोय तुला. माहित आह, या पुराच्या पाण्यात शेवाळ टिकून राहातं. कारण त्याचं खोड ताठ नसतं. लवचिकता त्याच्या अंगी असते. तसा लवचिकपणा आण तू आपल्या अंगी. तरच तू टिकून राहशील आणि हं शेवटचं सांगतोय. दुस-याला मदत करण्याचा मार्ग पत्कर. त्यात तुझंच भलं होईल. लोकं तुझं नाव घेतील. तुझं नाव होईल जगात. पण जर का तू आपला हेका नाही सोडला ना. तर एक वेळ अशी येईल की तुलाच मिटावं लागेल. तुझं नामोनिशानही राहणार नाही या जगात. पाहा, त्यावर विचार कर. बाकी मी तरी तुला काय सांगणार जास्तीचं. तू स्वतःच जास्त हुशार आहेस. विचारीही आहेस. तू चांगला विचार कर यावर आणि निर्णय घे. अन् ठरव की तुला चांगलं बनायचं की वाईट. शेवटी एकच लिहितो की जेव्हा मरायची वेळ येते ना. तेव्हा कोणीच वाचवणार नाही तुला. आता तुझा निर्णय आहे. जर चांगले कामं करशील तर तुला लोकं क्रिष्ण म्हणून पुजतील अन् वाईट कामं करशील तर तुझी दुर्गती रावणासारखी होईल. दरवर्षी रावणाचे जसे पुतळे बनवून जाळतात ना. तसं तुला प्रत्येकजण प्रत्येकवेळी जाळेल. हेही लक्षात घे तू. माहित आहे, चांगल्या विचाराचेच लोकं पुजले जातात. त्यांचाच उदोउदो होतो. वाईट विचारांच्या माणसांचा उदोउदो होत नाही हे लक्षात घे. बाकी काय लिहू तू स्वतः समजदार आहेस. शहाणा आहेस. हा कहर सोडून दे. आतातरी निघून जा आमच्या देशातून. आम्ही देशवासी समजदार आहोत. तुला मोठ्या मनानं माफ करु. तुला मोठ्या मनानं रवाना करु. इंग्रजांना जसं बाहेर काढलं, तसंही करणार नाही. चलेजाव, असहकार, सत्याग्रह, भारत छोडो यासारखं काहीच करणार नाही. पण तू जर नाही ऐकला तर हे सर्व आम्हा भारतीयांना करावंच लागेल. मग भुमीगत व्हावं लागलं तरी चालेल. हेच तुला अखेरचं सांगणं आहे.
तुझाच शुभचिंतक
एक सामान्य नागरीक

***********************************************

कोरोना व्हायरस आला व लोकांच्या उरावर बसला. तो काही जाण्याची इच्छाच करीत नव्हता. असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नव्हता. कारण कोरोनानं लोकांच्या मनात भीतीयुुक्त वातावरण तयार केलं होतं.
कोरोना येवून दिड वर्ष झाला होता. त्याचेवर औषधीही निघाली. सर्वत्र लसीकरण होत होतं. तरी कोरोना आता नव्या रुपात आलाय असंच वाटत होतं. कोरोनाच्या या पाश्वभुमीवर कोरोनाचा कहर व लाकडाऊनचा जहर असे म्हणायची वेळ आली होती.
लाकडाऊन म्हणजे लोकांना उपासाने मारण्याचे एक साधन बनले होते. कारण मागे जेव्हा लाकडाऊन लागलं होतं. त्यावेळी देशाची स्थिती अशीच होती.
मागे लाकडाऊन जेव्हा लागलं होतं. त्यावेळी लोकांंनी घरात स्वतःला बंदीस्त केलं होतं. जोही कोणी बाहेर दिसत असे. त्याला पोलिस मंडळी लाठीने मारत असत. त्यामुळं कोणीही बाहेर पडायला धजत नव्हता. त्यातच काही दिवस उपासातही काढावे लागले होते. शिवाय लाकडाऊन संपल्यावर सरकारनंही लोकांना सोडलं नाही. त्यांनी मनमानीप्रमाणे लोकांच्या हाताला काम नसूनही वीज बिल व नळाचं बिल पाठवलं. त्यातच ज्यांनी कुणी कर्ज उचललं होतंं. त्यात थोडीशीही सवलत दिली नव्हतं. बँकांनी पुरेशी सवलत न देता आपले पैसे वसूल केले. त्यात सरकारनंही हात वर केले. ही अवस्था सरकारमुळं झाली असली तरी त्यास आम्ही जबाबदार नाही असं सरकारचं म्हणणं होतं. आजही तसंच म्हणणं. म्हणून कोरोना कहर जरी ओतत असला तरी तो सामान्य लोकांना कहर वाटत नव्हतं. तसेच लाकडाऊन या कोरोनावर मात करण्याचा उत्तम पर्याय असला तरी तो लोकांना पटत नव्हता. अगदी हा लाकडाऊन लोकांंना आज जहरच वाटत होता.
आज तशी वेळ नाही की लाकडाऊनमध्ये लोकं घरी बसतील. कारण आता लोकांना माहित आहे की आम्ही जरी घरी बसलो तरी सरकार आम्हाला सोडणार नाही. पुरेशी सवलत देणार नाही. वीज बिलाचे व नळाचे शुल्क कमी करणार नाही. कर्जाच्या हप्त्यातही पुरेेशी सवलत देणार नाही. एवढंच नाही तर आमची लेकरंही सरकार पोसणार नाही. वेळ पडल्यास आत्महत्येची वेळ येवू शकते. म्हणूनच कितीही लाकडाऊन लागो वा तो कितीही कडक असो. असं अभयला वाटत होतं. लोकं रस्त्यावर पडू लागले होते. त्यांच्या मनातून कोरोनाची भीती थोडीशी कमी झाली होती. जरी कोरोना रुग्णांंची संख्या वाढत असली........जरी पोलिसांच्या लाठ्या पडत असल्या तरी रस्त्या रस्त्यावर आपल्याला भीडच दिसत होती.
या कोरोनाच्या महामारीत देशाजवळ पैसा नव्हता. मुद्राफितीचे दर कमी झालेले होते. बँका डबघाईला आल्या होत्या. आपलेच पैसे आपल्याला द्यायला बँका कुचराई दाखवत होत्या. पेट्रोल तसेच सिलेंडरचे दर आसमानात चढले होते. त्यातच पुर्वी जेवढे दिवस सिलेंडर चालायचा. तेवढे दिवस आता सिलेंडर चालतांना दिसत नव्हता.
एकंदर सांगायचं झाल्यास कोरोना कितीही आग ओकत असला आणि लाकडाऊन कितीही त्यावर अमृत असलं तरी ते जहरच वाटत असून लोकं ते अमृत पचवायला तयार नव्हते. त्याला जहरच समजत होते. त्यांना आता आपल्या मृत्यूची पर्वा उरलेली नव्हते. ते विचार करीत होते की एक ना एक दिवस जायचेच आहे पृथ्वीतलावरुन. त्यात काय एवढं घाबरायचं. म्हणूनच ते बाहेर पडत होते आणि कोरोनाही एक पाऊल पुढेच चालत होता, पाय सिकुडता न घेता.......

अलिकडे कोरोनाची लाट पुन्हा परतून आली होती. हा कोरोना काही भागात अजुनही कहरच ओतत होता. याच कोरोनाच्या पाश्वभुमीवर लोकं विचार करु लागले होते की कोरोना वाढत कसा चाललाय.
कोरोनाबाबत विचार केल्यास लोकांमध्ये आजही दहशत होती. त्यामुळं काही लोकं आजही गर्दीच्या ठिकाणी जायला घाबत. मास्क बांधत. सानिटायझरही लावत. एवढंच नाही तर हातही स्वच्छ धुत. कोरोना होवू नये म्हणून फार काळजी घेत. तरीही कोरोना वाढतच होता. त्यामुळं जास्त प्रमाणात चिंता वाटायला लागलेली असून हा कोरोना नक्कीच जग संपवेल काय असेही वाटायला लागले होते.
कोरोना वाढण्याची कारणं शोधत असतांना नेमकं एक कारणही पुढं होतं, ते म्हणजे जागोजागी थुंकणं. या थुंकण्यावर सरकारनं प्रतिबिंबही लावलेले होतं. तरीही लोकं थुंकतच. थुंकतांना आपण कुठे थुंकतो हे काही पाहात नव्हते. अशामुळे ज्याला कोरोना होता, असा व्यक्ती थुंकल्यानं त्यांच्या थुंकीत असंख्य रोगाचे विषाणू असत. जे आजार पसरवत. त्यामुळं कोरोना हाही पसरायला मार्ग मोकळा होता.
अलिकडे लोकं खर्रे बिनधास्त खायला लागले होते. त्यातच त्या ख-र्यात जी थुंक येते, ती थुंक लोकं कुठेही थुंकतात. तसेच तंबाखूही खाण्याचे प्रमाण जास्त होते. त्या तंबाखातून येणारी थुंकही खाणारी व्यक्ती कुठेही थुंकते. यामुळं समस्या निर्माण होते. अलिकडे काही महाभाग हे गाड्या चालवीत असतांना मागे कोण येत आहे हे न पाहता थुंकत. ती थुंक मागे येणा-यांच्या तोंडावर जात असे. त्यातच तोंड उघडं जर असेल तर ती थुंक तोंडाच्या आत जात असे. या थुंकीत जर कोरोनाचे जंतू असतील तर कोरोना नक्कीच पसरत असे. म्हणून सरकार सांगत असे की मास्क वापरा. पण मास्क न लावता बिनधास्त फिरणारे काही महाभाग होते. कोरोना पसरणार नाही तर काय?
या थुंकीबाबत विचार केल्यास पुर्वीच्या काळी लोकं पान खायचे. त्यांना खर्रा समजत नव्हता. त्यातही त्यांना थुंकीनं आजार पसरतो हे देखील पाहिजे त्या प्रमाणात समजत नव्हतं. त्यामुळं की काय, ते पान खावून थुंकायचे. त्यामुळे आजार वाढायचा व साथीच्या साथी यायच्या. तेव्हा तंत्रज्ञानाचा पाहिजे त्या प्रमाणात शोध लागला नव्हता. काही तांत्रीक, मांत्रीक लोकं त्या आजारावर काही जडीबुटी द्यायचे. ह्या जड्याबुट्या आजारावर नसायच्या. ह्या जड्याबुट्या माणसाच्या रोगप्रतिकारशक्ती वाढविणा-या असायच्या. मग माणसाच्या शरीरात या जड्याबुट्यांनी रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हायची. त्यामुळं आपोआपच तो रोग हद्दपार व्हायचा. याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे एका जंगलात दोन शेर राहू शकत नाही, अगदी तोच प्रकार जंतूबाबत व्हायचा. प्रतिकारशक्ती निर्माण होताच जंतू त्या शरीराला अपाय करण्याऐवजी त्यांच्या शरीरातून निघून जायचे. ते जंतू थुंकीवाटेच निघून जायचे. कारण पुर्वी औषधांचा तेवढा शोध लागलेला नव्हता.
आज औषधांचा शोध लागला होता. लोकं औषधी घेत होते. जी औषधी आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीच नष्ट करते.
अभयला वाटत होतं की आपण फास्टफुड खातो. जे फास्टफुड आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीच नष्ट करते. तसेच एखाद्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती असेल. तर तो आपल्या प्रतिकारशक्तीचा उपयोग करुन जंतूंना थुंकीद्वारे बाहेर फेकतो. त्याला काय माहित असतं की त्याच्या थुंकीत असंख्य आजाराचे जंतू आहेत. कारण प्रत्येकच माणूस तेवढा शिकलेला नाही. तसेच जे शिकलेले आहेत. तेही आपल्याला काय करायचं असं समजून बिनधास्तपणे थुंकतात. काही महाभागही मास्क तर लावतातच. पण खर्रे तोंडात भरलेले असतात. ते मास्क खाली सरकवून कुठेही थुंकतात. ज्या थुंकीत जंतू असतात.
मुख्यतः अशाच थुंकीमुळं कोरोना पसरायला वाव मिळत असून सरकारनं अशा थुंकणा-यावर जास्तीत जास्त दंड लावायला हवेत. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होवू नये. कोरोना हद्दपार व्हावा. कारण कोरोनामुळंच जनजीवन विस्कळीत झाले असून कोरोना वाढत आहे. पण संपण्याची चिन्ह दिसत नाहीत.
मागे ज्यावेळी कडक लाकडावून होतं, त्यावेळी काही पानठेले बंद होते. दुकानं बरीचशी बंद होती. त्यातच लोकांनी खर्रे किंवा तंबाखूजन्य पदार्थ घरोघरी नेवून विकले. त्यातच काही लोकं घरात असली तरी काही लोकं रस्त्यानं फिरत होती. ती थुंकतही होती. पोलिसांचा सक्त पहारा होता. पण पोलिस थुंकणा-या व्यक्तीला कुठंपर्यंत पाहणार.
महत्वाचं म्हणजे थुंकणा-या व्यक्तीला स्वतः समजायला हवं की आपण कसं थुंकावं. थुंकण्यानं आजार वाढतो. हा आजार आपल्याच भावा बहिणींना, मातापित्यांना होतो. कारण या देशात आपलेच भाऊबहिण, मातापिता निवास करतात. त्यांनाही हा आजार होवू शकतो असा विचार प्रत्येकांनी करायला हवा. असंही अभयला वाटत होते. त्यामुळं खर्रे खावे, पानही खावे, खायला मनाई नाही. पण खातांना थोडासा विचार करावा की थुंकावे कसे. थुंकल्यास काय होईल. कदाचित एखाद्याच्या थुंकीनं कोरोना होईल. तो कोरोना आपल्याच घरी होईल. ज्यामुळे आपल्याला पश्चातापाला सामोरे जावे लागेल. म्हणून थुंकण्यापुर्वी सावधान राहा. कोरोना कोणत्या रुपात घरात प्रवेश करेल ते सांगता येत नाही. असं अभय सांगत होता.

*********************************************

अशातच होळी हा सण आला. होळी.......हिंदूचाच नाही तर सर्वांचा सण. या होळीत लोकं ज्याप्रमाणे रंग खेळतात. त्याप्रमाणे एकमेकांच्या घरी जावून गुलालही उधळतात. एकमेकांच्या घरची पुरणपोळी खातात. त्यातच एकमेकांच्या घरी जावून नाश्ताही करतात. पर्यायानं सांगायचं म्हणजे होळी हा सण आनंदानं साजरा करतात.
या वर्षी ज्याप्रमाणे होळी होती. त्याचप्रमाणे या होळीच्या महापर्वावर कोरोनाचेही सावट आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असून तो लगट करणाराही रोग होता. त्यातच कोरोनाचं संक्रमण एकमेकांना हात लावताच होतांना दिसत असल्यानं लोकांमध्ये भयंकर घाबरटपणाचं वातावरण होतं. काही लोकं जरी चक्क बाहेर पडत असले तरी काही लोकं जास्त करुन घराच्या बाहेर पडत नव्हते. तसेच ज्याप्रमाणे लोकं घरी गुलाल लावायचे, तसा गुलाल यावर्षी लावता येत नव्हते. कारण यावर्षी कोरोना पुन्हा परतलेला दिसत होता.
कोरोनाच्या या महामारीत कोरोनाला हरवायला सगळं प्रशासन जरी लागलं असलं, तसेच ते प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न जरी करीत असले तरी कोरोना हारतांना दिसत नव्हता. कारण कोरोना आता दिड वर्षाचा झाला होता. तो आता मागं हटायलाच तयार नव्हता.
होळी हा सण सर्वांसाठीच आनंदाचा सण आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मग तो कोरोना का असेना. महत्वपूर्ण गोष्ट अशी की होळी हा सण आपण कशासाठी साजरा करतो? असा विचार केल्यास राग, लोभ, मध, मत्सर याला जाळण्यासाठी साजरा करतो. परंतू काही लोकं होळी साजरा करतांना आपल्या मनात लोभ, मध, मत्सर ठेवतात. त्यातच होळीच्या दिवशी शत्रूत्व काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. विशेषतः ज्यांच्या मनात आज शत्रूत्व काढण्याचा विचार आहे, त्यांच्यासाठी या वर्षी होळी हा आनंदाचा सण आहे. काहीच करायची गरज नाही. फक्त रंग लावायची गरज आहे. तेही कोरोना रोग्यांना सांगून. कोरोना रोग्यांना सांगीतलं की रोगाचा प्रसार. बदलाही पूर्ण करता येतो. हे जरी बरोबर असलं तरी कोरोना हा शत्रूलाही होवू नये असं प्रत्येकांनी वागायला हवं. होळीच्या या पर्वावर अभयला अगदी तसंच वाटत होतं.
कोरोना महामारीनं होळीवरही ग्रहण आणलेलं होतं. धास्ती मनात होती. कोरोना मुळंं सगळे लोकं त्रस्त होते. त्यातच होळी खेळतांना यावर्षी कोणीही गर्दी करु नये. त्यातच कोणीही कोणाला गुलाल लावू नये, तर फक्त नमस्कार घ्यावा. कारण होळीचा गुलाल लावतांना एखादा जंतू जर आपल्या हातावर असेल तर तो जंतू या गुलाल लावण्याच्या रुपानं ज्याला आपण गुलाल लावला त्याच्या अंगावर जावू शकतो. त्यातच तो जंतू हळूवार त्याच्या शरीरातही प्रवेश करु शकतो. हे विसरता कामा नये. होळी खरंच आनंदाचा क्षण आहे दरवर्षीसारखा. पण दरवर्षीसारखी यावर्षी कोणीही होळी खेळू नका. जेणेकरुन कोरोनामुळं त्यांच्या घरचा दिवा विझेल. तसेच पुरणपोळी किंवा चने किंवा नाश्ता खायला कोणीही जावू नये. आपल्याच घरी नाश्ता बनवून परीवारासह त्याचा आश्वाद घ्यावा.
होळी अवश्य पेटवा. पेटवायला मनाई नाही. पण त्यातून पर्यावरणाचा -हास होईल अशी होळी पेटवू नका. त्यातच होळी पेटवतांना व लाकडं विकत घेतांना जे लाकुड झाड कापून बनवलेलं आहे. अशा कापलेल्या लाकडाची होळी पेटवू नका. त्यातच होळी पेटवतांनाही सुरक्षीत अंतर पाळा. तसेच होळीच्या जळत्या लाकडाची जशी राख तयार होते. तशीच राख आपल्या मनातील राग, लोभ, द्वेष, मद, मत्सराचीही करायची आहे. ते विकार आपल्या मनातून काढून टाकायचे आहेत. होळीच्या निमित्यानं आपल्या मनातून शत्रूत्वपणाची भावना व बदल्याची भावनाही नष्ट करायची आहे. शिवाय ज्या कोरोनाला आपण घाबरतो ना, त्या कोरोनाचीही भीती आपल्या मनातून काढून टाकायची आहे. ज्याप्रमाणे हिरण्यकक्षपूच्या आदेशाने भत्त प्रल्हाद न घाबरता आपली आत्या होलिकाच्या गोदीत बसला होता. असे जेव्हा तुम्ही कराल, तेव्हाच कोरोना जळून राख होईल. पुन्हा तो परत येणार नाही. परत यायला मागपुढं पाहिल. व्यतिरिक्त दारुच्या पाण्यालाही या होळीत स्पर्श करु नका. कारण दारुच्या एका घोटासोबतही कोरोना तुमच्या शरीरात प्रवेश करु शकतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास होळी खेळा. पण होळीच्या या आनंदाच्या पर्वात जर तुम्ही वरील नियम पाळले नाहीत, तर हिच होळी तुमच्या आनंदी जीवनाला संपवायला कमी करणार नाही. मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. हे निश्चीतच लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. असंही लोकांना अभय सांगत होता.

***********************************************

'खरंच कोरोना आहे तरी काहो? मला तर वाटतं सगळं राजकारणच आहे बा' एके ठिकाणी एका भोळ्या भाबड्या अनाडी स्रीचा ऐकायला आलेला प्रश्न. तसं पाहिल्यास बरीचशी मंडळी ही कोरोनाचे वाढते आकडे लक्षात घेत नाहीत आणि उलट सुलट प्रश्न करतात. त्यातच ही अनाडी मंडळी. दोन चार वर्ग शिकलेली. त्यांना थोडीफार शिकलेली माणसं जे सांगतील, तेच ते वदणार. मग कोरोना का असेना, त्यांना तो गंभीर वाटतच नाही.
आज कोरोना पुन्हा परतला होता. तो जास्त जोर काढू लागला होता. त्यात रुग्णांची संख्या वाढतच होता. काही जण थोडासा सर्दी, खोकला व ताप दिसलाच तर ते तपासणीही करुन घेत होते तर काहीजण संभ्रमामुळे तपासणी करीत नव्हते. त्यामुळं आकडेही बरोबर कळायला मार्ग नव्हता.
कोरोनाचे आजचे आकडे जर पाहिले तर आकडे बोलत होते. साध्या नागपूरचा आलेख जर पाहिला तर कोरोना शिगेला पोहोचल्याचे आकडे दिसत होते. त्यातच मृत्यूचे प्रमाणही वाढतच होते. दि. ३१/०३/२०२० चा नागपूरच्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा ५८ होता. तो आकडा हळूहळू वाढत जावून ११३ वर पोहोचला होता.
कोरोनाच्या मृत्यूचा आकडा पाहता बाधीत कमी व मृत्यूच जास्त अशी कोरोनाच्या पाश्वभुमीवर विचार केल्यास एकंदर परिस्थीती पाहायला मिळत होती. दि.२३ पासून दर दिवसाला आकडे वाढतच गेले होते. ही झाली नागपूरची परिस्थीती. राज्यातील परिस्थीती काही अंशी बरीच वेगळी होती. काहीजण याला राजकारण समजत होते. ते म्हणत की महाराष्ट्रात सत्ता दुस-या पक्षाची आहे ना. म्हणून असे आकडे फूगत आहेत. तसेच काहीजण म्हणत की कुंभमेळ्यात गर्दी करणे वा बंगालमध्ये निवडणूक घेतांना गर्दी होणे यानं कोरोनाचा प्रसार होत नाही काय? याबाबत सांगतांना लोकांचं म्हणणंही स्वाभावीक होतं. परंतू एक मात्र निश्चीत की हा व्हायरस अशा गोष्टीवर लक्षच देत नव्हता.
कोरोना व्हायरसबाबत सांगायचं झाल्यास ज्याप्रमाणे माणसाला अधिवासासाठी जे क्षेत्र चांगलं वाटते, त्या ठिकाणीच माणूस अधिवास करतो. मग त्या ठिकाणी पुरेशा सोयी असल्या तरी चालेल. जसे पुर्वीच्या काळच्या संस्कृत्या ह्या नदीकाठीच वसल्या. कारण त्या ठिकाणी पाण्याची सोय होती. तसेच नदीतून मिळणारे मासे आणि नदीबाजूतील वनात मिळणारी कंदमुळे खावून माणूस जगू लागला नव्हे तर जगला. अगदी तिच परिस्थीती कोरोना व्हायरसलाही लागू होती. ज्या ठिकाणी त्याला पोषक वातावरण मिळतं, त्या ठिकाणी तो वाढायला लागला होता. मग तो महाराष्ट्र का असेना, तो पाहात नव्हता की इथं कोणाचं सरकार आहे.
शहर असो वा राज्य, राज्य असो वा देश. कोरोना हा कोणाला ओळखत नाही. तो अमक्या पार्टीचा, तो तमक्या पार्टीचा असा भेदभाव त्याचेजवळ नाही. बस तो हे पाहतो की कोण तोंडाला रुमाल बांधून नाही. कोण काळजी घेत नाही. कोण मुजोर आहे. कोणत्या ठिकाणी जास्त खर्रे खातात. कोणत्या ठिकाणी जास्त थुंकतात. त्यातच महाराष्ट्रात खर्रे खावून थुंकणा-यांचं प्रमाण कमी नव्हते. म्हणूनच कोरोना वाढत चाललाय. असे खर्रे खावून थुंकणारे महाभाग. त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असेलही कदाचित. पण तेच कोरोनाचे वाहक ठरतात. त्यांच्यापासूनच कोरोना वाढत चाललाय. त्यामुळं खरंच कोरोना आहे तरी काहो? हे त्यांनी म्हणण्याची गरज नाही.
आज मागासवर्गीय भागात जर कोरोनाच्या पाश्वभुमीवर घरोघरी जावून सर्वेक्षण केलं तर आकडे अाणखी फुगलेले दिसतील. कारण त्यांना भीती आहे की जर कोरोना आढळलाच तर आपण इलाजच करु शकणार नाही. ते मरणं पसंद करतात. पण कोरोना तपासणी करुन घेत नाहीत. त्यातच समजा एखाद्या वेळी प्रकृती खालावलीच तर ते दवाखान्यातही न जाता केवळ गावठी इलाज करतात. काढे बनवतात व त्यातून सुधारतात.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की जे आकडे आज बोलत होते. ते आकडे ज्या भागात सुशिक्षीत लोक राहतात. त्या भागातील आकडे बोलत होते. परंतू ज्या भागात झोपडपट्ट्या व मागासलेला भाग होते. त्या भागातील आकडे बोलत नव्हते. म्हणून कोरोना कुठे जास्त आहे आणि कुठे कमी हे कळत नव्हते.
आज संपूर्ण देशातील राज्याची परिस्थीती पाहता केरळ व महाराष्ट्र हे जास्त सुशिक्षीत व पुढारलेली राज्ये आहेत. त्या भागात आकडे हे बोलणारच. कारण सुशिक्षीतपणा. ही सुशिक्षीत मंडळी नीट कोरोनाची तपासणी करुन घेत असल्यानं आकडे दिसत होते. बाकी राज्यात अशी परिस्थीती नसेल. यात राजकारण नव्हते. खरंच कोरोना आहे. त्यामुळे कोणीही बिनधास्त वागण्याची गरज नव्हती.
एकट्या महाराष्ट्राची परिस्थीती पाहता, परिस्थीती फारच गंभीर होती. अशीच परिस्थीती इतरही राज्यात होती. कारण आमची गैरवर्तणूक.........आमची जर गैरवर्तणूक अशीच असली तर तो काळ जास्त दूर नाही की ज्या दिवशी संपूर्ण देशच नाही तर जगही नष्ट झालेलं दिसेल. असे वाटत होते. कारण पुढे परिस्थीती फारच गंभीर येणार होती. आज जे आकडे आपल्याला दिसत होते. ते आकडे बोलणारे जरी असले तरी त्याची गंभीरता आपल्याला जाणवत नव्हती. कारण आपल्या घरी कोरोना नव्हता ना. कोरोना बाजूच्या घरी होता. आज राज्यातील परिस्थीती गंभीर असूनही राज्यात गल्लीगल्लीत धुमधडाक्यात जास्त संख्येनं विवाह सोहळे होत होते. पार्ट्या होत होत्या. कुणाचे वाढदिवस होत होते. आलिशान मंडप टाकले जात होते. मिळवणूकाही निघत होत्या. निव्वळ गर्दीचं वातावरण. काय करतो कोरोना म्हणत सगळेच गर्दी करत. कोरोना वाढणार नाहीतर काय,
विशेषतः सांगायचं झाल्यास जे आकडे आज दिसत, ते आकडे हे अजूनही खरे नव्हते. हे स्वतःहून तपासणी करुन घेणा-यांचे आकडे होते. जर गल्लीगल्लीत तपासणी झालीच तर आकडे कितीतरी पटीनं वाढू शकतात. असे अभयला वाटत होते. पण आपल्याला कोणती गरज आहे तपासणी करुन घ्यायची असं वागत शहर पालिकाही त्यावर कानाडोळा करीत होती. तसेच लोकं दहशतीत असल्यानं ते असं मरण पसंत करत. पण कोरोनाची तपासणी करुन कोरोना आहे असं सिद्ध झाल्यास कोरोनाच्या दहशतीनं मरणं पसंत करीत नसत. म्हणून आजूबाजूला अशा तपासण्या न केल्यानं कोरोना दिसत नसल्यानं सामान्य माणसांना खरंच कोरोना आहे तरी काहो? असे प्रश्न पडत होते. तसेच ते कोरोनाला न घाबरुन बिनधास्त फिरत होते. गर्दी करीत होते. तसेच कोरोनाचे वाहक बनून कोरोना वाढवीत होते. जरी कोरोनाबाबत जनजागृती झाली असली तरी.......
कोरोना आजही संपू शकत होता. पराभूत होवू शकत होता. आपण आपल्या मनात ठाणलं तर. पण मला काय करायचं असे म्हणत लोकं जे बिनधास्त वावरत होते ना. ते लोकांचे वावरणे बरे नसले तरी लोकांना ते समजत नव्हते. त्यामुळं कोरोना संपायचं नावच घेत नव्हता आणि त्यातच हे निव्वळ राजकारण आहे असं म्हणण्याची नाही तर मानण्याची पाळी आली होती.
कोरोनाच्याबाबतीत सांगायचं झाल्यास आज रुग्णालयात बेड शिल्लक नव्हते. खाजगी रुग्णालयेही हाऊसफुल होती. तरीही लोकं केवळ याला राजकारण मानत. तरीही लोकं खरंच कोरोना आहे तरी काहो म्हणत. ही गोष्ट आश्चर्य करणारी होती. त्यामुळं आम्ही याबाबतीत किती मागे आहो असं वाटत होतं व आमच्या सुशिक्षीतपणाची किवही येत होती. त्यातच कोरोनाचे आकडे फुगत असले तरी आम्हाला त्याची काही चिंता नव्हती. आम्ही चिंता करीत नव्हतो. त्यामुळं आम्हाला अभय प्राप्त झालं होतं. पण लक्षात ठेवा हेच आमचं अभयपण उद्या आमचाच जीव घ्यायला मागंपुढं पाहणार नाही. त्यासाठी तो दिवस काही जास्त दूर नव्हता. ज्या दिवशी कोरोनाच्या यादीत आमच्याही घरचा जीव दिसेल. आम्हीही दिसू. म्हणूनच आजपासूनच कोरोना बाबतीत काळजी घेतलेली बरी. निदान आपल्या शेजा-यांपर्यंत आपल्या घरापर्यंत कोरोनाला यायला जागाच मिळणार नाही. असंही अभय वारंवार लोकांना सांगून समजावीत होता.

कोरोना महागुुरु आहे. सगळं शिकवतो आहे. असं अभय सांगत होता. कोरोना आला आणि सर्वांना भीती दाखवत बसला होता. त्यातच या रोगाचा उपाय नसल्यानं सगळे दहशतीत होते. त्यामुळं भीतीनं का होईना, लोकं कोरोनाबाबतीतील नियम पाळायला लागले होते. त्यामुुळं की काय, कोरोना महागुरु ठरला होता. तसं पाहिल्यास त्या सवयी चांगल्या सवयी होत्या.
कोरोनानं लावलेल्या सवयी खालीलप्रमाणे होत्या.
१) कुुठेही थुंकू नका. कारण थुंकल्याने रोगजंतूचा प्रसार होतो. मग ते कोणत्याच रोगाचे जंतू का असेना. हे कोरोनानं शिकवलं. कारण पूर्वी खर्रा व पान खाणारी माणसं कुठंही थुंकत असत.
२) मास्क वापरा, हातरुमाल वापरा. तोंडाला मास्क वापरा तसेच शिंकतांना हातरुमाल वापरा. हे कोरोना सांगत होता. कारण शिंकतांना आपल्या तोंडातून हजारो रोगाचे जंतू बाहेर पडत. यातच काही लोकं पूर्वी तोंडावर रुमाल न घेता शिंकत असत.
३) पूर्वी काही लोकं बाहेरुन आले तर हातपाय धुत नसत. लहान मुलं तर विशेषतः हातपाय स्वच्छ धुत नसत. हातपाय स्वच्छ धुवा. तसेच बाहेरुन आल्यास हातपाय स्वच्छ धुवा. हेही कोरोनानं शिकवलं. कारण आता माणसे बाहेरुन आले की हातपाय स्वच्छ धुत.
४) स्वच्छता ठेवा. घरी, दारी व बाहेर स्वच्छता बाळगा. परीसरही स्वच्छ ठेवा. परीसर स्वच्छ असेल तर देश स्वच्छ राहिल हे कोरोनानं शिकवलं. त्यामुळं आता देश स्वच्छ ठेवा म्हणण्याची गरज नव्हती. तसेच सर्व स्वच्छता अभियान वापरण्याची गरज नव्हती. आता मात्र तसा कचरा जागोजागी पडलेला दिसत नव्हता. पूर्वी मात्र असा कचरा जागोजागी दिसत होता.
५) दररोज अंघोळ करा. कपडे स्वच्छ ठेवा.कोरोनानं सांगीतलं की दररोज अंघोळ करा. नाही करणार तर मी तुमच्यावर हावी होणार. त्यामुळं साहजिकच लोकं आता दररोज अंघोळ करायला लागले. पूर्वी लोकं अशी दररोज अंघोळ करीत नव्हते. तसेच काही लोकं अस्वच्छच कपडे वापरायचे.
ह्या चांगल्या चांगल्या सवयी कोरोनानं लावल्या. अशा सवयी मागील काही रोगानं लावलेल्या नव्हत्या.
इ स १७२० मध्ये या देशात प्लेग आला. या प्लेगनं लाखो लोकांचे जीव घेतले. त्यामध्ये एकट्या फ्रान्स शहरानं एक लक्ष लोकं गमावले होते. तेही मार्सिले नावाच्या फ्रान्समधील शहरात. त्यानंतर इ स १८२० मध्ये हैजा नावाचा रोग आला. याही रोगानं असंच थैमान घातलं. या हैजानं एकट्या जावा देशात एक लाख लोकं मरण पावली. त्यातच इतरही देशात लाखाच्या वर लोकं मरण पावले. त्यात इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड या देशाचा समावेश आहे. त्यानंतर १९२० मध्ये स्पैनिश फ्लू आला. या रोगानं जगातील दोन ते पाच करोड लोकं मृत्यूमुखी पडले होते. आता मात्र २०२० यावेळी कोरोना आला. याही महामारीत करोडो लोक मृत्यूच्या जवळ गेले होते. त्यातच अजून मरत होते. अर्थात सांगायचं झाल्यास कोरोना महामारीनं लोकांना ज्या काही वाईट सवयी लागल्या होत्या, त्या नष्ट केल्या होत्या.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की ह्या महामा--या दर शंभर वर्षांनी येत व आपला कहर माजवत. काही दिवस यांचे कहराचेच असतात. मग ह्या महामा-या शंभर वर्षासाठी निघून जातात. पण खरं सांगायचं झाल्यास या महामा-या जगणं शिकवतात. पण कालांतरानं काही लोकं ते शिकलेलं जगणं विसरतात. पुन्हा जैसे थे स्थितीनं वागतात. मग काय, पुन्हा शंभर वर्ष झाले की पुन्हा महामारी येते व पुन्हा त्या दिवसांची आठवण करुन देते की तुम्ही त्यावेळी कशी काळजी घेतली होती. तशी काळजी घ्या. नाहीतर पुन्हा संपूर्ण जग नष्ट होवू शकते. त्यातच लोकं अशी महामारी आलीच तर दक्षता घेतात व अतिदक्षतेनं वागून जग वाचवायला मदत करतात. म्हणून अशा महामा-या. आल्या तरी जग टिकून होते.
कोरोना महामारी आली. हीदेखील महामारी जाईलच कधी न् कधी. पण या महामारीनं नवं जगणंं शिकवलं होतं लोकांना. त्याप्रमाणे लोकांनी तसं वागायला हवं. त्यांनी स्वच्छता ठेवायला हवी. हातपाय आतासारखेच दररोज स्वच्छ धुवायला हवेत. तसेच कुठेही थुंकू नये. खर्रे पान खावू नये. दररोज अंघोळ करावी. स्वच्छ कपडे घालावेत. तसेच घराच्या स्वच्छतेसोबत परीसराचीही स्वच्छता करावी. तसेच हीच सवय लावून ठेवावी. जेणेकरुन आपल्या शरीरास दुसरा कोरोना शिवणार नाही. तसेच शंभर वर्षानंतर कोरोनासारखा दुसरा आजार कोणालाही शिवणार नाही.

*म्हातारपण छळत असतं. कधी आजारानं, कधी मुलाच्या आठवणीनं, कधी नातवंडाच्या आठवणीनं तर कधी घोर नैराश्येनं. कारण पाखरं मोठी झालेली असतात. ती उडून गेलेली असतात.*
सध्या कोरोनाचं सत्र सुरु होतं. त्यातच मरण स्वस्त झालं होतं. आज मरण म्हटलं तर काहीच वाटत नव्हतं. त्यातच मरणाची भीतीही नष्ट झाली होती. कोरोनाच्या या रहाटगाडग्यात लोकं मुंग्यांसारखे मरत असले तरी मरणाला किंमत उरलेली नव्हती. काही लोकं तर अगदी सहजपणेे आत्महत्याही करतांना दिसत होते.
कोरोनानं झालेले मृत्यू.......त्या कोरोनायुक्त माणसाला प्लास्टीक कपड्यात गुंडाळून चक्क दवाखान्यातूनच स्मशानघाटात नेत. त्यातच आप्तांनाही त्या स्मशानघाटात परवानगी नसायची. फक्त पाचच जवळचे नातेवाईक मृताजवळ येत. तेही दुरुनच त्या प्रेताला पाहात. सगळं शरण रुग्णालयातील माणसंच रचत आणि प्रेताला अग्नी देत. त्यातच ते नातेवाईक मोठमोठ्याने टाहो फोडत. तेही अख्ख्या स्मशानघाटात. जेणेकरुन स्मशानघाटातील मुदडे खडबडून जागे व्हावे. तसेच गोंधळून जावेत ही अवस्था. मग काय चार दोन दिवस विलाप आणि त्यानंतर सगळं विसरत मरणारा माणूस माझा कोणीच नव्हता. असं लोकांचं वागणं. त्या माणसानं केलेलं कर्तृत्व कितीही चांगलं असेल, तरी त्याला त्याच्या मरणानंतर शिव्या देणारेही भरपूर सापडतात. म्हणतात की त्यानं आमच्यासाठी काय कमवून ठेवलं? काहीजण तर भिंतीवर फोटोही लावत नाहीत. कारण त्यांना तसे फोटो लावण्याची लाज वाटते.
आज मरणाला किंमतच उरली नाही असे प्रकर्षानं जाणवत होतं. कारण ज्यावेळी मृत शरीर जळत असायचं. तेव्हाही काही लोकं हे राजेशाही थाटात बसलेले असायचे. जसे ते राजे व बाकीची त्यांची प्रजा. काहीजण विचार करीत असत की आम्हाला उद्या खीरपोळी वा जेवन मिळेल. नाव असतं मृतात्म्याच्या आत्म्याला शांती मिळते कोणाला काही चारलं तर........पण खरंच तो माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा कोणी पाहतो का? जीवंतपणीच तो काय ते पाहात असतो, खातही असतो. पण आमचा समाज हा मरणाला किंमत नाही असाच त्याच्या जीवंतपणी त्याच्याशी वागणूक करीत असतो. काही तर चक्क आपल्या वागण्यातून त्या मृतात्म्यांना जीवंतपणीच आत्महत्या करायला लावतात नव्हे तर भाग पाडतात.
आज जेव्हा व्यक्ती म्हातारा होतो. त्याच्यानं जेव्हा काम जमत नाही. तेव्हा तो सरकारी नोकरी असेल, तर त्यातून निवृत्त होतो. मग काय, तो निवृत्त झाला की त्याची पेन्शन सुरु होते. किती तर अगदी अल्प. अर्थात ज्या काळात त्याला पैशाची जास्त गरज असते. त्यावेळी एक आधार म्हणून पेन्शन. तिही अत्यल्प. याच काळात पैसा तर कमी मिळत असतो. उलट सेवा करायलाही कोणी राहात नाही. दोन चार मुले असतात. तिही पाखरासारखी उडून दूर गेलेली असतात. ती काही आपल्याला जन्म देणा-या जन्मदात्यांची सेवा करीत नाही. त्यांना फक्त त्यांची पत्नी हवी असते. बाकी कोणी हवं नसतं. कधी या म्हाता-यांनी एखाद्यावेळी काही म्हटल्यास त्याची रवानगी थेट वृद्धाश्रमात होत असते. याचवेळी आजार वाढीस लागतात.
जेव्हा म्हातारपण येतं, तेव्हा पैसा कमी व आजार जास्त असतात. त्यातच मुले व सुना काही म्हणतील म्हणून आपले आजार, त्या आजारातून होणा-या वेदना म्हातारी मंडळी सतत लपवीत असतात. त्या वेदना सहन करीत जगत असतात. त्यातच काहींना तर पेन्शनही नसते.
वृद्धाश्रम वृद्धांसाठी चांगलं असतं. खायला प्यायला मिळतं. औषधपाणीही वेळेवर मिळतं. पण........ती एक कैदच असते त्या म्हाता-यांसाठी. आपण जन्म दिला. लहानाचं मोठं केलं. उन्हातून सावलीत नेलं. शिकवलं. आताा नोकरी लागली. पंख फुटले असे सारेच म्हणत असतात. नातवंडाचीही आठवण सा-यांनाच येत असते. संसाराचा सारिपाट सा-यांनाच आठवत असतो. असं आठवता आठवता तेही आठवतं की मीही तरुण होतो. तेव्हा मी काय पाप केलं. तेच पाप आठवतांना आठवतं की माझा बाप माझीही याच वृद्धाश्रमात आठवण करीत असेल. म्हणत असेल. माझा मुलगा कसा असेल. मला वृद्धाश्रमात ठेवले. मला आता नातवंडं व सुन बघता आली असती. मीही नातवंडासोबत खेळलो असतो. पण मी तसा वागल्यामुळं माझा बाप याच वृद्धाश्रमात तडकाफडकी मेलेला असेल एक शाप देत की तूही म्हातारा होशील आणि तुझीही रवानगी तुझा मुलगा वृद्धाश्रमात जेव्हा करेल ना. तेव्हा तुला वृद्धावस्थेचा अर्थ कळेल. हे जेव्हा आठवतं, तेव्हा मरणाला किंमत उरत नाही. ते मरण स्वस्त झाल्यासारखं वाटतं. भीती नष्ट होते. वाटतं की आता मरण आलं तरी चालेल. पण आता मुलाची नातवंडांची काळजी करायची नाही. चिंता करायची नाही.
आज आम्हाला मायबाप नको झाले आहेत. त्यांची मालमत्ता मात्र हवी आहे. आम्ही जे रोपटं लावू. तेच रोपटं उद्या मोठं होणार. त्या रोपट्यातून तेच उगवणार, जे आम्ही लावलंय. दुसरं काही उगवणार नाही. आम्ही आमच्या मायबापासोबत जो व्यवहार आज करु. तोच व्यवहार उद्या आमची मुलही आमच्याशी करणार. आम्ही समाजासोबत जो व्यवहार करु. तोच व्यवहार समाजही आमच्याशी करणारच. कारण मरण स्वस्त आहे. आम्ही आमचं जसं आचरण ठेवू. तसंच आचरण आमच्या मुलांनी आमच्यासोबत ठेवल्यास त्यात गैर काय मानता येईल बरे. पण आम्ही केवळ आमचा आमच्यापुरता विचार करतो. मागचा पुढचा कधीच विचार करीत नाही. म्हणूनच आम्ही फसतो. आम्हाला दुःख होतं. ज्या दुःखावर इलाजच नसतो.
विशेषतः सांगायचं झाल्यास माणसानं मरणाचा विचारच करु नये. मरण एक ना एक दिवस येणारच आहे. मरण स्वस्त झालेले आहेच. पण आपण मरणारच आहो असे समजून आपले आचरण वाईट ठेवू नये. ते चांगले ठेवावे. आपले कोणी नाव घेवो अगर न घेवो. निदान आपल्या समाजाची सेवा नाही केली तरी चालेल. पण आपल्या मायबापाची सेवा करावी. आपण जर आपल्या मायबापाची सेवा करु तर आपलीही मुलं आपलीही सेवा करतील हे तितकच खरं आहे. कारण आपली लहान मुलं हे आपल्या कर्तृत्वाचे निरीक्षण करीत असतात. आपण जसं वागत असतो आपल्या मायबापाशी. तशीच ती आपल्या म्हातारपणी आपल्याशी वागत असतात. म्हातारपण सर्वांनाच नाही. कोणी अकालीही मरत असतो. पण असं जर आपलं पाप असेल तर म्हातारपण नक्कीच येतं व तेच म्हातारपण आपल्याला सारखं छळत असतं यात शंका नाही.

खरंच अशानं कोरोना संपेल काय? असा प्रश्न पडत होता. कारण कोणताच मुलगा आज मायबापाची सेवा करीत नव्हता. वाटत होतं की हा कोरोना अशा मुलांना पापाची शिक्षा देत आहे. जे मायबापांना पोषत नाहीत.
कोरोना अशाच धडाडीनं वाढत होता. त्याचा महास्फोट होत होता. औषधी निघाली होती. लोकं भीतीनं औषध घेत होते. कोणी लसीही टोचून घेत होते. पण कोरोना काही संपायचं कामंच करीत नव्हता. तो उलट जास्त प्रमाणात वाढतांना दिसत होता.
कोरोना वाढण्याची चिन्ह पाहून सरकारही चिंतेत पडले होते. कोरोनाला हरवायचे कसे? कोरोनाला संपवायचे कसे? असे प्रश्न सरकारपुढे आ वासून उभे ठाकले होते. सरकार विचार करीत होते. त्यातच सरकार विरोधी पक्षांना सोबत घेवून लाकडाऊन लावण्याचे प्रयत्न करीत होते आणि अचानक लाकडाऊनही लागले होते.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी. विरोधी पक्षांना सोबत घेवून सरकारनं लाकडाऊन दि. १५/०३/२०२१ ला लावलं. तसेच त्या लाकडाऊनला कडकडीत लाकडाऊन संबोधलं. त्यातच व्यापा-यांनी परीस्थीती लक्षात न घेता सायंकाळी आंदोलन केलं. त्यातच विरोधी पक्षाचं स्टेटमेंटस सकाळी सकाळी वर्तमानपत्रात वाचायला मिळालं. आम्ही दोन दिवसाचं लाकडाऊन म्हणत होतो. आपण पाच दिवसाचं का आणि कसं लावलं.
झालं........सगळं पालथ्या घड्यावर पाणी. कसा संपणार कोरोना? अन् याला लाकडाऊन तरी म्हणता येईल काय? तर याचं उत्तर नाही असंच होतं.
कोरोनाच्या पाश्वभुमीवर कोरोना का वाढतोय. त्याची कारणं लक्षात घेणे गरजेच होते.
१) सरकारनं लाकडाऊनची घोषणा केली. त्यातच अंमलबजावणीही. पोलिसयंत्रणा थकलेली असूनही कामाला लागली. परंतू ते तरी काय करणार. लोकं ऐकतील तेव्हा ना. लोकं ऐकायलाच तयार नव्हते. त्यातच प्रवासाला परवानगी असल्यानं लोकं बिनधास्त गावोगावी फिरत. त्यातूनच कोरोना वाढत चालला होता.
२) सरकार सांगत होतं की विवाहसोहळ्यांत पन्नास लोकांना परवानगी. परंतू यामध्येही लोकं ऐकायला तयार नव्हते. ते पोलिसस्टेशनमधून पन्नास लोकांची तर परवानगी काढतच. पण प्रत्येक ठिकाणी पोलिस कसे लक्ष देणार. एखाद्या वेळी पोलिस ग्रस्त घालायला आलेही. तरी त्यांना व्यवस्थीत मैनेज करुन विवाह सोहळ्यातील कार्यकर्ते बाजू जुळवून घेत. त्यातच जिथं पन्नास लोकांची परवानगी असायची. तिथं पाचशेच्या वर लोकं बोलावत. ज्या सोहळ्यात लोकं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असत. जे इतर कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले असत. पण त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असल्यानं त्यांना कोरोना जरी जाणवत नसला तरी त्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांची प्रतिकारशक्ती ही सक्षम राहायचीच असे नाही. कोरोना असाच पसरुन वाढत होता.
३) शाळेमध्ये कामकाजासाठी शासनानं पंचवीस किंवा पन्नास टक्के उपस्थीतीची अट टाकलेली असली तरी काही काही खाजगी संस्थांचे मुख्याध्यापक आणि संचालक जाणूनबुजून शिक्षकांना त्रास देण्यासाठी शाळा ठेवत. या शाळेत वेगवेगळ्या ठिकाणावरुन शिक्षक येत. हे शिक्षक अशा बाधीत क्षेत्रातून येत की जी क्षेत्र प्रतिबंधीत आहे. त्यातूनच कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यातच शासनानं या शाळेत काही धान्य पाठवलं व किटंही पाठवल्यात. ज्यांचं वाटप विद्यार्थ्यांना करायचे होते. त्यासाठी शाळेत संचालक व मुख्याध्यापक यांनी शिक्षकांना बोलावले होते. कडक लाकडाऊन असतांनाही. त्यातच ज्या पालकांच्या घरी किंवा परीसरात कोरोना बाधीत होते. तेही पालक ती किट आणि ते धान्य घ्यायला येत असून ते शिक्षकांच्या संपर्कात येत असल्यानं कोरोना वाढत होता. कारण कोरोना हा एकापासून दुस-यांना होणारा संसर्गजन्य रोग होता.
४) ज्याप्रमाणे शिक्षकांमार्फत कोरोनाचा प्रसार होत होता. तसाच प्रसार कार्यालयामार्फतही होत होता. तिथंही पंचवीस टक्केची उपस्थीतीची अट असली तरी तिथंही भरपूर प्रमाणात कर्मचारी बोलावण्यात येत असल्यानं आज ती क्षेत्र कोरोना बाधीत झालेली होती.
५) संपूर्ण प्रमाणातील लाकडाऊन सरकारनं जाहिर केलेलं असलं तरी आज सरकारनं जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु ठेवलेली होती. त्यातच प्रवासाला बंदी नसल्यानं लोकं बिनधास्त प्रवास करीत होते नव्हे तर यासाठी जीवनावश्यक वस्तूसाठी बाहेर पडलो अशी पुष्टी जोडत होते. त्यातच सरकार फक्त जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सुरु ठेवा म्हणत असले तरी लोकं ऐकायला तयार नव्हते. पोलिस आले की पोलिसांना मैनेज करुन बाकीची मंडळी इतरही दुकान बिनधास्त सुरु ठेवत होती. मग कोरोना वाढणार नाही तर काय? असे म्हणायची पाळी आली होती. यावर उपाय असा काढता येवू शकत होता. आज डाव्या बाजूतील दुकाने सुरु ठेवा. उद्या उजव्या किंवा वारानुसार त्या त्या प्रकारची दुकानं सुरु ठेवायला पाहिजे होती. म्हणजे लाकडाऊन लागल्यानंतर जे सायंकाळी व्यापा-यांचं आंदोलन झालं होतं. ते झालं नसतं.
६) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असूनही लोकं बिनधास्त जागोजागी थुंकत होते. ह्या थुंकण्यातूनही कोरोनाचा प्रसार होत होता. सरकार याबाबतही जनजागृती करीत होते. पण लोकं त्यावरही कानाडोळा करीत असून लोकांना हा कोरोना म्हणजे गंमत वाटायला लागली होती.
७) सरकार मास्क लावा. सुरक्षीत अंतर पाळा. सानिटायझर वापरा असं वारंवार सांगत होते. पण लोकं ऐकतील तेव्हा ना. लोकं बिनधास्त तोंडाला काही न लावता रस्त्यावर फिरत होते. ते अतिशय गर्दी करुन फिरत होते.
आज लाकडाऊन लागलं असलं तरी रस्त्यावरचं निरीक्षण करुन दिसणारी गर्दी पाहिली असता असं नक्कीच तोंडातून सहजपणे निघत होतं की याला लाकडाऊन म्हणता येईल काय? जी मंडळी खरंच इमानदार आहेत. ती मंडळी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या होणा-या नुकसानीचा धसका न घेता आपली दुकानं बंद ठेवत. ते रस्त्यावर फिरत नव्हते. पण बाकीच्यांचं काय?
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज रस्त्यावरची रहदारीची गर्दी पाहता ती एवढी दिसत होती की शहरात लाकडाऊन जरी लागलं असलं तरी लाकडाऊन नाहीच असं वाटत होतं. कोरोनाला हरविण्यासाठी लाकडाऊन हा जरी पर्याय असला तरी लोकं लाकडाऊनला कंटाळले होते. त्यामुळेच की काय, लोकं रस्त्यावर गर्दी करीत होते आणि कोरोना दिवसेंदिवस वाढत होता रौद्र रुप घेवून. हे जर असंच सुरु राहिलं तर उद्या कोरोना एवढा वाढेल आणि घराघरातून प्रेते दिसतील. ज्या प्रेतांना हात लावायलाही कुणी नसेल. म्हणून काही लोकं सावधान व्हा असंही सांगत होते. रस्त्यावर जास्त फिरु नका. गर्दी वाढवू नका. मास्क वापरा. सानिटायझर वापरा. शक्यतोवर घरातच राहा आणि मुख्य म्हणजे सरकारचे आदेश पाळा. त्याशिवाय कोरोनाला हरवता येणार नाही. त्याला माघारीही पाठवता येणार नाही. तसेच काही दिवसानं लोकं मृत्यूमुखी पडतील. त्यात आपणही असू. आपले सगेसंबंधीही असतील. हे नाकारता येणार नाही. असं अभयला वारंवार वाटत होतं.
अभय एक सर्वसाधारण कुटूंबातील मुलगा होता. आज तो शिक्षक होता. पण शिक्षक असूनही जे समाजसेवेचं बाळकडू त्याच्या आईवडीलानं त्याला पाजलं होतं. त्यामुळं की काय, तो कोरोना रुग्णांची सेवाही करीत होता.
त्याचे आईवडील........अशाच प्रकारच्या गंभीर आजारानं हिरावले होते. त्यामुळे त्यानं आजाराचा धसका घेतला होता. त्याला वाटत होतं की कुणीही आजारानं मरु नये.
कोरोना सुरु होता. त्यामुळं तो कोरोना संसर्गजन्य रोग असूनही तो लोकांमध्ये मिसळत होता. नव्हे तर त्यांना हातही लावत होता.
कोरोनानं मयतीतही हाहाकार माजवला होता. कोरोना आला होता व धास्तीत लोकांंना पाडून काम करीत होता. त्याची दहशत एवढी होती की ती मयतीतही पसरलेली होती. आज कोरोना वस्तीतही वाढलेला असून हा कोरोना घराघरात शिरलेला होता. तो एक संसर्गजन्य रोग होता. तसेच हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी त्याला ज्याप्रमाणे काही लोकं घाबरत तर काही लोकं घाबरत नव्हते. त्याचा एक प्रसंग असा होता. एका घरी एक व्यक्ती मृत झाला होता. पण मृत होण्यापुर्वी त्याला ऑक्सीजन लावलेलं होतं. ते ऑक्सीजन डॉक्टर लावून गेले होते. मात्र कोरोना तपासणी झाली नव्हती. त्यातच तो व्यक्ती मृत झाला. जेव्हा तो व्यक्ती मृत झाला. तेव्हा तर लोकांना भीतीच वाटायला लागली की आता हा व्यक्ती कोरोनानं मरण पावला. आता काय करायचं.
मृतदेह जागेवरच पडला होता. पण त्या मृतदेहाला हात लावायला कोणी तयार नव्हतं. त्याची स्वतःची मुलं....... ज्या मुलांना त्यानं लहानाचा मोठा केला, त्यासाठी कोणताही भेदभाव बाळगला नाही. अगदी तेही हात लावत नव्हते. तसेच जिनं एवढे दिवस त्याच्यासोबत संसार केला. तिही त्याची पत्नी त्याला हात लावायला तयार नव्हती. कारण होतं आपल्याला कोरोना होणार. शेवटी लोकांनी नगरसेवकाला फोन लावला आणि सुचना केली की त्यांनी गाडी पाठवावी. पण नगरसेवकानं सांगीतलं की त्याची कोरोना पाजिटिव्हची रिपोर्ट आणा. मग गाडी पाठवतो. पण कोणी त्याची तपासणीही करायला तयार नव्हते. साधारणतः दहा अकरा वाजून गेले होते. तेव्हा नगरसेवकानं साधी भेटंही त्या स्थळी दिली नाही. त्यातच मदत करणं दूरच. शेेवटी काय, त्याच परीसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर ती घटना गेली. तो दोन कार्यकर्ते घेवून तिथं पोहोचला. त्यातच त्यानं त्या प्रेताला उचललं आणि ते प्रेत जाळायला घेवून गेला. तेव्हा त्या प्रेताला मुखाग्नी मिळाली. कारण साधी महानगरपालिकाची गाडीही त्या प्रेताची विल्हेवाट लावायला आली नव्हती.
काही लोकं सामाजिक कार्यकर्ता आहो असं लोकांना सांगत. पण ते त्यांचं निव्वळ बोलणं असायचं. यातच सामाजिक कार्यकर्त्यामधून नगरसेवक बनत. हे नगरसेवक जर अशा कोरोनापीडीत लोकांना मदत करीत नसतील तर ते कोणत्या कामाचे?
ही सामाजिक कार्यकर्त्याची समाजसेवा. हे सगळं बरोबर आहे. पण ते सामाजिकपण केवळ त्यांच्या बोलण्यातून दिसू नये. तर त्याच्या कृतीतून दिसावं. कोरोना व्हायरसच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक बाब लक्षात घेण्यासारखी होती ती ही की तो आजार संसर्गजन्य होता. याचा अर्थ असा नाही की मृतदेहाला हात लावू नये.
सामाजिक कार्यकर्त्याचं सामाजिकपण तेव्हा दिसतं, जेव्हा तो बोलका सुधारक बनत नाही तर कर्ता सुधारक बनतो. ज्यावेळी पुण्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सावित्रीबाई फुुलेंनी प्लेग संसर्गजन्य रोग असूनही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांना वाचविण्याचे कार्य केले होते. त्यातच तिलाही प्लेग झाला व तिचा मृत्यू झाला.
आज कोरोना रिटर्न स्वरुपात परत आला होता. सर्वांना आज कापरे भरते होते. सगळे दहशतीत होते. त्यातच आज बरेचसे लोकं मरतही होते. पण जर त्या लोकांना कोरोना आहे म्हणून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली नाही तर कोरोना किती पसरेल. हे लक्षात घेण्याची गरज होती. परंतू महत्वाचं म्हणजे कोरोना जरी संसर्गजन्य आजार असला तरी त्या आजाराला कोणी घाबरु नये. जर त्याला घाबरलं तर उद्या तोच रोग आपल्या जीवावर हावी होईल नव्हे तर हा रोग हा त्या मृतदेहापाठोपाठ आपलाही जीव घेईल ही शक्यता नाकारता येत नव्हती.
अभय मुळात समाज सेवक होता. त्याला सामाजिकतेची जाणीव होती. त्याला कोरोना माहित होता. त्यालाही कोरोनाच्या या सत्रात अंगात भीतीच वाटत होती. पण तरीही तो समाजसेवा करीतच होता.
अभय शिक्षक होता. तो आजूबाजूची परिस्थीती पाहात होता. आजूबाजूला एवढ्या प्रमाणात माणसे मरत होती की त्यांना जाळायला स्मशानात जागाही नव्हती. त्यावर उपचार जरी निघाले असले तरी लोकं काही बरे होत नव्हते. व्हाट्सअपवर याचे व्हिडीओ येत असत. कधी मृतांच्या जाण्यानं लोकं तळपत असलेले दिसत होते. तर कधी लाकडाऊनच्या नावानं लोकं शिव्या मारत असलेले दिसत होते. अशातच त्याला त्याचं बालपण आठवत होतं.
बालपणी त्याला थोडासा जरी ताप आला तर त्याची आई कडूनिंबाची पानं आणायची. ती त्या पानांचा रस काढायची व त्याला द्यायची. तो पाल्याचा रस त्याला प्यावासा वाटत नसे. पण दोन मोठ्या बहिणी हातपाय धरुन बसायच्या आणि आई तोंड मुठभर फाडून तोंडात औषध घावायची. त्यातच नाक दाबून ठेवायची. तसा तो जोरजोरात ओरडायचा. रस पिवून झाला की त्या दोन्ही बहिणी त्याला सोडायच्या. त्यानंतर तो ओकारी काढायचा. पण पोटात गेलेला तो रस त्या ओकारीनं संपुर्ण पोटातून निघत नव्हता. मात्र असा दोनतीन दिवस रस प्यायल्यावर ताप कधीचाच दूर पळालेला असायचा. कधीकधी आई हाच कडूनिंबाचा पाला जखमेवरही लावायची. त्यातच काही दिवसात जखम दुरुस्त व्हायची. आज मात्र या कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात हा कडूनिंबाचा रसही काम करीत नव्हता.
व्हाट्सअपवर व्हिडीओ येत असत. त्यात कोणी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं कोरोना जातो तर कोणी मीठाचं पाणी प्यायल्याने कोरोना जातो तर कोणी काढा प्यायल्यानं कोरोना जातो असे म्हणत होते. पण कोरोना काही जायला तयार नव्हता.
सरकारनं प्रमाणीत केलेली औषध निघाली होती. सर्वत्र लसीकरण सुरु होतं. पण तरीही हा कोरोना संपण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. त्याचं कारणंही तसंच होतं. ते सर्व व्हाट्सअपच्या माध्यमातून दिसत होतं. व्हाट्सअपवर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात सीरींजमध्ये औषध तर भरलेली दिसत होती. पण ती टोचमारी परीचारीका त्या रुग्णाला फक्त इंजेक्शन देत होती. ती औषध त्यात प्रविष्ट करीत नव्हती. यात हा फेकू व्हिडीओ होता की नाही हे ठाऊक नव्हते. पण हा व्हिडीओ नक्कीच विचार करायला लावत होता. तसेच याच प्रकारच्या व्हिडीओतील प्रकारामुळं आज कोरोना जायला तयार नव्हता. त्यातच कोणी कोणी तर अशाच प्रकारचे जीवंत माणसांचे कोरोना किटनं वेष्ठीत केलेले व स्मशानात नेलेले व्हिडीओ पोस्ट करीत होते.
अभय जेव्हा लहान होता. तेव्हाचा प्रसंग. गावात अशीच एकदा साथ आली होती. तेव्हा गावात बरेचसे लोकं मरत होते. तेव्हा तो अगदी लहान असतांनाच त्याची आजी लोकांना काढा देत होती. त्या काढ्यात ती दोन चार लवंगा, तुळशीचे दोनचार पानं, एक कलमीचा तुकडा, दोन चार मीरे, एक चमच हळद व गुळ टाकून ते मिश्रण त्याची आजी ते पाणी खुप उकळवीत असे व ते पाणी लोकांना काढा म्हणून देत असे. त्यातच त्या काढ्याच्या सेवनानं ते रोगी पटापट दुरुस्त होत असत.
आज अभयलाही वाटत होतं की आपण कोरोना रुग्णावर उपचार करावे. अभय आज तसा विचार करीत होता. त्यातच त्यानं कोरोना रुग्णांची सेवा काढा बनविण्याची विधी शोधून काढली. त्याचबरोबर तो आपले स्वतःचे पैसे खर्च करुन काढा बनवून लोकांना देवू लागला. त्यातच लोकांना त्याच्या औषधाचाही फायदा होत असल्यानं लोकांची त्याच्याकडे गर्दी वाढू लागली. लोकं आवर्जून त्याच्याकडे येवून औषधी घेवू लागले. कोणी आशिर्वाद देवू लागले तर कोणी पैसेही.
स्वाती अशीच त्याला या प्रवासात मिळालेली मुलगी. ती रुपानं पाहिजे तेवढी सुंदर नव्हती. मात्र तिला त्याची सेवा आवडली. ती आवडण्याचं कारणंही तसंच होतं.
एकदा स्वातीला कोरोना झाला होता. ती आणि तिचे मायबाप परेशान होते. अशावेळी तिला कोणीतरी सांगीतलं की अभय नावाचा एक व्यक्ती काढा देतो. ज्या काढ्यानं झालेला कोरोना परत जातो. प्रतिकारशक्तीही वाढते. रुग्ण हळूहळू बरा होतो. त्यातच ऑक्सीजन आणि रेमडीसीवर घेण्याची गरज भासत नाही.
स्वाती ही खुपच त्रासली होती या कोरोनानं. ती तसं पाहता घरातच राहात होती. तरी तिला कोरोना झाला होता. त्याचं कारणंही तसंच होतं. तिच्या मैत्रीणीच्या घरी लग्न होतं. ते लग्न म्हणजे मैत्रीणीचंच लग्न. स्वातीची तशी लग्नाला जाण्याची इच्छा नव्हती. पण मैत्रीणीचा विवाह. मनात आनंद होताच. त्यातच मैत्रीणीनं म्हटलं की काही कोरोना वैगेरे नाही. ही अफवा आहे. सारे राजकारण आहे आणि ती जर नाही आली तर आजपासून ती बोलणार नाही तिच्याशी अजिबात. त्यामुळं की काय मैत्रीणीच्या नाते तोडण्याच्या धमकीनं स्वाती तिच्या विवाहाला गेली.
विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यातच स्वाती त्या विवाहात कोणाच्या तरी संपर्कात आली. मग काय, दोनचार दिवस झाले होते. अचानक स्वातीला ताप जाणवू लागला. त्यातच खोकला आणि सर्दीही. तिचं डोकंही दुखू लागलं.
स्वातीला ताप येताच तिनं औषधी घेण्यासाठी ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरनं औषधी दिली.
आज आठ दिवस झाले होते. ताप उतरत नव्हता. खोकलाही कमी होण्याची लक्षणं दिसेनात. सर्दीही वाढतच होती. त्यातच डॉक्टरनं सांगीतलं की तू कोरोनाची तपासणी करुन पाहा.
स्वातीनं कोरोनाची तपासणी केली. त्यातच अहवाल आला की तिला कोरोना झालाय. मग काय, ती घाबरली आता काय करायचे.
ती विचार करु लागली की मायबापाला सांगावं. निदान मायबाप आपला इलाज करतील. तसेच सतर्कही होतील.
तिनं मायबापाला सांगीतलं. त्याचबरोबर मायबाप घाबरले. पण मायबापच ते. त्यांनी स्वातीला उपचारासाठी इकडे तिकडे नेवून पाहिलं. पण रुग्णालय गच्च भरलेली होती. तिला रुग्णालयात बेडच मिळेनात. त्यातच स्वातीची व मायबापाची चिंता वाढायला लागली.
ऑक्सीजन तपासणी केली गेली. त्यातच ऑक्सीजन लावण्याची वेळ आली. डॉक्टरांनी चक्क सांगीतलं की जर ऑक्सीजन नाही लावलं तर ही मुलगी तुमच्या हाती लागणार नाही. आता तर घोर निराशा झाली. काय करावं सुचेनासं झालेलं. शेवटी ती आजारी असतांना दोनचार दिवस गेले. तिनं मैत्रीणीला फोन लावला. सांगीतलं की तिला तिच्या विवाहापासून कोरोना झालाय. काय करावे सुचत नाही. तुला भेटायची इच्छा आहे अखेरची. त्यावर मैत्रीण म्हणाली की सध्या तुला कोरोना आहे. तेव्हापर्यंत तरी तिनं भेटायला येवू नये. कोरोना सुधारल्यावर यावं.
स्वातीला मैत्रीणीनं बोललेलं वाक्य. तिला फार वाईट वाटलं. ती मैत्रीणीच्या विवाहाला गेली. म्हणूनच तिला कोरोना झाला. याचं तिला अतीव दुःख झालं. त्यातच तिची ओळख तिच्या मनात खरी एक मैत्रीण म्हणून होती. ते स्वप्न सारंच भंगलं. ती खुपच निराश झाली.
ती मृत्यूशय्येवरच होती जणू. अशावेळी कोणीतरी अभयचा नंबर दिला. ती बोलली अभयशी. त्यातच तिनं लगेच संपर्क साधून अभयची औषधी सुरु केली.
अभयच्या काढ्याचा परिणाम की काय? लवकरच तिला हळूहळू बरं वाटायला लागलं होतं. अभयही तरुण झाला होता. तोही आज वयात आला होता. त्याचं ते वयात येणं एक प्रकारे तिला भाववून गेलं. त्यातच तिचा कोरोना बरा होताच ती त्याच्या प्रेमात पडली. हळूहळू ते प्रेम वाढत गेलं. तशी ती पुर्ण स्वस्थ झाली.
स्वाती पूर्णतः बरी होताच तिला वाटायला लागलं की आपणही कोरोना रुग्णांची सेवा करावी. त्यासाठी आपण अभयला त्याच्या कार्यात मदत करावी. जेणेकरुन त्याला रोग्यांना लवकरात लवकर बरे करता येईल. तिला वाटायचं की कोरोनानं लुटीचे केंद्रबिंदू बनू नये. कारण आज कोरोनानं सर्वच श्रेत्रात लुट माजवली आहे.
आज पेट्रोल डिझलचा जागतिक स्तरावर भडका उडाला असून त्याचे भाव आसमंतात आहेत. त्यातच एखादा चिल्लर ग्राहक पेट्रोल पंपावर गेलाच तर त्याला पेट्रोल पंपवाले एका लिटरमागे सगळं सेट करुन पाऊण लिटरच पेट्रोल देतात. त्यातच पुर्ण स्वरुपाचं पेट्रोल न देता काही युुनिट पेट्रोल कमी देतात. अशी पेट्रोल मध्ये लुट आहे. खाद्य तेलातही तशीच लुट आहे. या खाद्यतेलातच नाही तर पुर्ण खाद्य वस्तूत ग्राहकांना दुकानदार वस्तू देतांना एकतर जास्त पैशानं वस्तू देतात. तसेच वजनमापीचे आकडे सेट करुन वस्तू विकत असतात.
इतर वस्तूंमध्येही अशीच लुट आहे. साधं सिमेंटचं पोतं घ्यायचं झाल्यास आज त्याची किंमत चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. ठीक आहे तंबाखूजन्य वस्तू वाढवल्या. त्या शरीराला घातक आहेत. मादक पदार्थ वाढवले. दारु वाढवली. पण त्यातही सांगायची गोष्ट अशी की अशा तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन हे सामान्य लोकंच जास्त प्रमाणात करीत असतात.
सामान्य लोकंच नाही तर इतरही लोकांच्या खाण्याच्या वस्तू आज वाढल्या आहेत. गहू, तांदूळ,, ज्वारी, बाजरीचेही दर काही कमी नाही. नेहमी वापरात असलेल्या वस्तूंचेही भाव वाढले आहेत. यातही काही शंका नाही.
या भाववाढीचे कारण सांगतांना उत्पादक लोकं सांगतात की आमचे कारखाने बंद आहेत. जगायचं आहे. कसं जगणार. कोणी सांगतात की लाकडाऊन असल्यानं काम करणारे मजूर हे गावाला गेले. कोणी म्हणतात की केवळ पंचवीस टक्के लोकांच्या भरवशावर उत्पादन करावं लागतात. कोणी म्हणतात त्यांना जास्त वेतन देवून काम करवून घ्यावं लागतं. कोणी तर म्हणतात की आम्हाला उत्पादन करणं परवडत नसल्यानं आम्ही कारखाने बंद ठेवले.
आहारातील महत्वाचा पदार्थ जो प्रत्येक गृहीणींना आवश्यक असतो. तो पदार्थ म्हणजे तेल. तेलात स्निग्धतेचं प्रमाण जास्त असल्यानं तेलाचा वापर. त्यातच तेल वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादन. विदर्भाचा विचार केल्या गेला तर यास विदर्भात सोयाबीन पिकलंच नाही. ते पिकलं नाही. त्या वस्तूंचे दर वाढणारच.
हे झालं वस्तूंच्या वाढत्या दराबाबत. आज औषधीचे दरही वाढलेले आहेत. रेमडीसीवरचा काळाबाजार सुरु आहे. त्यातच रेमडीसीवरच नाही तर ऑक्सीजनचाही तुटवडा आहे. सगळा काळाबाजार. या सर्व गोष्टींची झळ मात्र सामान्य लोकांनाच पोहोचत असून त्यांचे गंभीर परिणाम हे सामान्य लोकांनाच सोसावे लागत आहे. सरकार तरस जि एस टी च्या माध्यमातून तसेच पेट्रोल डिझलचे दर वाढवून कमाई करीत असून सगळी मंडळी ही कोरोनाचे नाव पुढं करुन लुटत आहेत.
महत्वाचं म्हणजे महागाई अशी वाढली असती तर काही फरक पडला नसता. पण कोरोनाच्या नावावर आजस मुळ वस्तूंचे दर मुळ रुपात असून जेव्हा जास्त भाव सांगून लुटलं जातं. तेव्हा मात्र लुटीला जास्त महत्व येतं व त्या वस्तूंचे दर माणसाला विचार करायला लावतात.
आज कोरोनानं विध्वंस करणं सुरु केलेलं असतांना कोरोनानं महागाईचं केंद्र बनू नये. कारण आज सगळीकडं लाकडाऊन लागलेलं असून या लाकडाऊननं लोकांना कामधंदे ठेवलेले नाहीत. त्यातच ते घरी बसलेले असून महागाई वाढल्यानं महागाईचा फटका सामान्य ग्राहकांना पडलेला आहे. त्यामुळं की काय लोकांना या महागाईनं मोडून टाकलेलं स आहे. त्यातच हा कोरोनाचा आजार. या आजारालाही जास्तीत जास्त पैसा लागतो. अशावेळी संभाव्य लक्षण जरी दिसलं तरी लोकं घाबरतात. त्यातच समजा लक्षण दिसलंच तर लोकं एवढे घाबरतात की त्यांना अटैक येतो व ते मरतात. कारण कोरोनाच्या या महामारीत लाकडाऊन असल्यानं व काम नसल्यानं तसेच जवळ पैसा नसल्यानं लोकं घाबरणं साहजिकच आहे. त्यातच अशा भेदरलेल्या अवस्थेत हार्टअटैक येणंही साहजिकच आहे.
अशी सामान्य माणसांची अवस्था. आज सर्वच क्षेत्रात महागाईनं आघाडी घेतलेली असून त्याचा फटकाही सामान्य माणसांना पडत चाललेला आहे हे विसरता येत नाही. सरकार मात्र ठाम आहे आपल्या निर्णयावर. ते तर दोन महिण्याचं राशन देणार आहे आणि काही तुटपुंजे पैसे. पण तेवढ्यानं काही लोकांचं घर भागते काय? कारण आज महागाई व लाकडाऊन ह्या दोन गोष्टीनं लोकांचं कंबरडे मोडलेले असून त्या दोन गोष्टी या एकाच ष नाण्याच्या दोन बाजू ठरलेल्या आहेत. हे असेच जर सुरु राहिले तर उद्या लोकं कोरोनानं नाही तर उपासानं मरण्याचं प्रमाण वाढलेलं असेल. ही शक्यता नाकारता येत नाही.
तिला तसं वाटणं साहजिकच होतं. कारण कोरोनानं तशीच परिस्थीती आज निर्माण केली होती. त्यामुळं लोकांवर महागाई आणि लाकडाऊनचा फटका नक्कीच बसला होता.
कोरोना जोरात सुरु होता. पण त्याचबरोबर कोरोना दुरुस्त झालेल्या स्वातीचंही प्रेम कोरोनासह वाढायला लागलं होतं. कारण तिला वाटत होतं की तिचा जीव जो वाचला. तो जीव त्याच्याचमुळं वाचला. त्यामुळं ती उपकाराची परतफेड म्हणून ती त्याचेवर प्रेम करीत होती. जीव ओवाळून टाकत होती.
आज तिचं जे प्रेम होतं. ते प्रेम कोरोनापाठोपाठ वाढत होतं. आज तिचं ते प्रेम घरातील सर्वांना माहित झालं होतं. तिचं ते आज वाढणारं प्रेम. ती त्या प्रेमाला वृद्धींगत करु पाहात होती. त्यातच तिचं ते प्रेम घरातील लोकांना माहित झालं. त्यातच त्या घरातील लोकांनी त्याला याबाबत विचारणा केली. त्यानंही होकार दिला व विवाह ठरला.
वैशाख महिना सुरु झाला होता. हा महिना म्हणजे विवाहाचा महिना. या महिण्यात दरवर्षी विवाहाची वर्दळ असे. त्यातच या महिण्यात लोकांना काम मिळत असे.
या महिण्यात विवाहासाठी आवश्यक असणा-या मंडप डेकोरेशनला चांगले सुगीचे दिवस असत. त्यातच जेवन बनविणारेही ब-यापैकी कमवून जात.
विवाहाच्या माध्यमातून सर्वच जातींना व व्यावसायीकांना पुर्वीच्या काळी काम मिळत असे. जसे चप्पल बनविणारे चप्पलधारक, परडेे बनविणारे बुरड, वाजा वाजविणारे मांग, मडके बनविणारे कुंंभार, सोन्याचे दागीणे बनविणारे सोनार, तेल काढणारे तेली, धान्य पिकविणारे कुणबी, भाजीपाला पिकविणारे माळी, कपडे बनविणारे कोष्टी, कपडे शिवणारे शिंपी, पत्रावळी लावणारे महार, कपडे धुणारे धोबी, नवरदेवाची दाढी कटींग करणारे न्हावी, किराणा विकणारे वाणी इत्यादी या सर्व लोकांचा उपयोग करुन घेतला जाई. पण कालांतरानं जसा काळ बदलला. तसं काही लोकांचं कामंही बदललं. आता झाडांंच्या पानाचा मंडप बंद झाला. आता कपड्याचा मंडप आला. त्यातच काही लोकं विवाहाला सभागृह करतात. आता जेवन गावातील ढिवर बनवीत नाहीत. तर आता आचारी बनवितात. आताही विवाहात नवरदेव व नवरीची तसेच इतर नातेवाईकाची चप्पल चांभार बनवितात. तसेच आताच्या विवाहात पुढे राहून वाजा वाजविणारे मांग, मंगळमाथण्या देणारे कुंभार, घोडेवाले, फुलं विकणारी मंडळी, किराणा दुकान चालविणारे दुकानदार, लाईट लावणारे लाईटमैन, डी जे वाजविणारे डीजे धारक तसेच बांगडी व्यावसायिक या सर्वांची या महिण्यात चांदी होती. त्यातच यावर्षी कोरोना आल्यानं या सर्व व्यावसायिकांच्या पोटाला फटका बसत होता.
आज मुख्य नुकसान मंडप डेकोरेशन वाल्यांचा होत असून त्याचेसोबतच नुकसान वाजा वाजविणारे वाजंत्री, घोडा चालविणारे घोडेवाले, जेवन बनविणारे आचारी, तसेच सभागृह वाल्यांचे कोरोनामुळं नुकसान होत होतेे. ह्या परंपरा जरी असल्या तरी कोरोनानं या प्रथा परंपरा बंद केल्या होत्या.
आज कोरोना वाढत चाललेला होता. मुख्य म्हणजे हा वैशाख महिना हा विवाहाचा महिना जरी असला तरी या कोरोनामुळं या सर्वांचं काम बंद होतं. त्यातच विचार करण्यालायक गोष्ट ही की कोरोनाचा या व्यावसायिकांना फटका बसला असून हे व्यावसायिकही हवालदील झाले होते.
तिची इच्छा होती की तिचाही विवाह हा तिच्या मैत्रीणीसारखाच व्हावा. पण कसा होणार. कोरोना सुरु होता. त्यातच या कोरोनाच्या सत्रात सरकारनं लाकडाऊन लावलं होतं.. कोणीही घराबाहेर पडू शकत नव्हते. त्यातच विवाह करायचा झाल्यास फक्त पंचवीसच लोकांना परवानगी होती. म्हणून की काय, स्वातीचे मायबाप तिला विवाहाला परवानगी देत नव्हते.
स्वाती मायबापाची एकुलती एक मुलगी. तिला वाटत होतं की आपला विवाह चांगल्या थाटामाटात व्हावा. पण ती तरी काय करणार. रोगी वाढत होते. त्याचबरोबर तिला मैत्रीणीच्या विवाहात तिला कोरोना झाल्यानं तिला विवाह थाटामाटात करावासा वाटत नव्हता. पण तिच्या मायबापाची इच्छा होती की विवाह हा थाटामाटात करु. परंतू विवाह हा रोखायचा हा केव्हापर्यंत. कोरोना काही आताच जाणार नव्हता. अशातच स्वातीच्या जिद्दीनं विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.
स्वातीचा विवाह थाटामाटात पार पडला खरा. परंतू पहिल्या दिवसापासूनच स्वातीचं अभयशी पटेनासं झालं. त्याचं कारणही तसंच होतं.
अभय हा सेवाकर्ता बनला होता. आता त्याचेघरी कोरोनावर मात करण्यासाठी औषधीचा काढा घेण्यासाठी दुरदुरुन लोकं येत होते. त्यातच ही सेवा रात्रंदिवस चालत असे. ही सेवा करणं स्वाती आपल्या डोळ्यानं पाहात होती. ती हेही पाहात होती की अभय तिला पुरेसा वेळ देवू शकत नाही. त्यातच तो शिक्षक जरी असला तरी खाजगी शिक्षक असल्यानं त्याच्याजवळ पुरेसा पैसा नसल्यानं त्यानं स्वातीला पुरेसे सोन्याचे दागीणे बनवले नव्हते. तसेच पुरेशा कपड्यातही जास्त पैसे टाकले नव्हते. त्याला वाटत होतं की हा असा पैसा खर्च करण्यापेक्षा हा असला पैसा कोरोना रुग्णांना बरा करण्यासाठी वापरावा.
स्वाती ही संकुचित बुद्धीची होती. तिला ही समाजसेवा वैगेरे आता काही आवडत नव्हतं. तिला आता वाटत होतं की आपला पती आपल्या जवळच बसावा. तसेच त्याला जर अशी औषधी करायची असेल तर त्या औषधीचे पुरेसे पैसे घ्यावे. आलेल्या पैशातून तिला महागड्या साड्या व सोन्याचे दागदागीणे बनवून द्यावे. परंतू अभय ती गोष्ट मानायला तयार नव्हता. त्यातच या एका गोष्टीवरुनच त्याचे पत्नीशी खटके उडत होते. अभयला वाटत होतं की आपण फुल ना फुलाची पाकळी कोरोनाशी लढलं पाहिजे. अशा कोरोनाच्या साथीत लोकांना मदत केली पाहिजे. हा शोध किंवा ह्या काढ्यानं रुग्ण सुधारणं ही जी देणगी मला मिळालेली आहे. ती देणगी मला परमेशानच दिलेली असावी. त्यामुळं ही सेवा करण्याची संधी आपण गमावू नये.
स्वातीचे उडणारे हे अभयशी खटके........ ती हे देखील विसरली होती की त्याच्याच त्या काढ्यानं तिला सुधारलंय. तसेच ती हेही विसरली होती की या रुग्ण सुधारण्यात कोणतीतरी एखादी स्वाती असेल. जीचा जीव वाचेल. परंतू तिचा मेंदू उलटा विचार करीत असल्यानं तिला वाटायचं की कदाचित उद्या आपला पती हा कोणत्यातरी दुस-याच स्वातीच्या प्रेमात पडेल. मग आपला पती आपल्यावर प्रेमच करणार नाही. मात्र अभयला वाटत होतं की या त्याच्या काढ्यानं त्याचे रुग्ण सुधरतात. ते पाहून त्याला बरं वाटत होतं. पैसा जरी पुरेसा मिळत नसला तरी समाधान कितीतरी जास्त प्रमाणात त्याला मिळत होतं.
स्वातीला अभयचं हे कार्य आवडत नव्हतं. त्यातच ती अभयची एकुणएक गोष्ट एक अक्षरही न गाळता आपल्या आईला सांगत होती. त्यातच ती तिची आईही तिला समजविण्याऐवजी तिला भडकवीत होती. नव्हे तर आपल्याच मुलीचा संसार तोडत होती.
दररोजच स्वाती आणि अभयचे त्या समाजसेवेच्या मुद्द्याववरुन वाद होत असत. तिला वाटत होतं की अभयनं असं फुकटचं काम करु नये. हे फालतू काम आहे. तो एक शिक्षक असल्यानं त्यानं फक्त शाळा शिकविण्याचं काम करावं. ही समाजसेेवा करणं त्याचं काम नाही. ते डॉक्टरांना करु द्यावं. तो काही डॉक्टर नाही की त्या कोरोना रुग्णांची सेवा करेल. जो जन्म घेतो तो मरणारच असं तिला वाटत होतं. त्यातच ज्यांचं ज्यांचं पुरलं असेल. तो तो मरणारच. असं तिला वाटत होतं. त्यामुळं त्यानं फालतूच कोरोना रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करु नये.
तिला वाटत होतं की एखाद्या वेळी कोरोना रुग्णांना वाचनता वाचवता हा कोरोनाच आपल्याला होवून जाईल.
ती नेहमी नेहमी त्याला समजावीत होती. पण त्याला वाटत होतं की त्याला जी त्याची पत्नी स्वाती, पत्नी म्हणून मिळाली ती त्याच्या कोरोनाच्या औषधी देण्याचाच परीपाक आहे. जर त्यानं कोरोनाचा काढा लोकांना दिला नसता आणि त्या काढ्यानं कोरोना रुग्ण सुधारले नसते तर ती स्वाती ती औषध घ्यायला आली नसती. त्यातच ज्या स्वातीला कोरोना झाल्यानंतर या काढ्यानं सुधरवलं. त्यामुळं ती त्याला मिळाली. त्यातच हे कार्य करतांना त्याला वाटायचं की त्याच्या हातून अशा कितीतरी स्वाती सुधाराव्यात.
त्याला वाटत होतं की एखाद्याला कोरोना झाल्यास व त्याला रुग्णालयात नेल्यास रुग्णालयात लाखोंच्या घरात पैसा लागतो. त्यातच असे लाखो रुपये गरीबांजवळ नसतात. ज्यामुळं त्यांना घरीच तडफडून मरण्याशिवाय उपाय नसतो. तो अशाच गरीब कोरोनाग्रस्तांना मदत करीत होता.
स्वाती त्याची पत्नी बनली असली तरी तिची व तिच्या मायबापाची लग्नाआधी अशी कोणतीच अट नव्हती की त्यानं आपली सेवा बंद करावी. त्यातच त्यांचे उडणारे वारंवार खटके......त्यातच त्या खटक्यावर तिच्या मायबापाचे नमक टाकणं यामुळं की काय आता स्वातीचं त्याच्याशी पटेनासं झालं होतं.
अभय काही तिचं ऐकत नाही म्हणून की काय एकदा असंच कडाक्याचं त्याचं तिच्याशी भांडण झालं. त्यातच ती त्याला सोडून त्याच्या घरुन निघून माहेरी गेली. आता अभय एकाकी झाला.
अभय आता एकाकी झाला होता. दिवसभर त्याला काही वाटत नव्हतं. पण रात्रीला त्याला एकटेपण सतावत होतं. त्याला स्वातीची आठवण यायची. अन्नही बरोबर धकायचं नाही. त्यातच बरीच रात्र होईस्तोवर झोपही त्याला येत नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. त्यातच स्वातीला फोन केल्यास ती एकच प्रश्न विचारायची. त्यानं कोरोनाबाबतची समाजसेवा बंद केली काय? अभय तिच्या त्या प्रश्नावर विचार करायचा. त्याला वाटायचं की खरंच समाजसेवा हीच इश्वरी सेवा आहे.
आज सामाजिक क्षेत्रात वावरतांना आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तो सामना करीत असतांना आपल्याला अनेक समस्या येत असतात. कुणी नावंही ठेवत असतात. त्यावेळी जर अशी समस्या आलीच, तर आपण निराश होतो व तोडगा न काढता ते काम सोडून देतो.
समाजात अशी स्वातीसारखी माणसं भरपूर असतात. जी एकमेकांचे पाय खेचत असतात. त्यांना आपणही पुढे गेलेले आवडत नाही. तसेच दुसराही पुढे जात असेल तर तेही आवडत नाही नव्हे तर जो अशी समाजसेवा करतो. त्याचंही मन तोडण्याचं काम करीत असतात. पण काही माणसं निश्चीतच चांगली असतात. ती अशा होतकरु माणसांनी पुढं जावं म्हणून मार्गदर्शनाचं बळही देतात.
देश विदेशात अशीच काही माणसं आहेत की जी प्रसिद्धीचा हव्यास करीत नाही तर आपलं कार्य करीत असतात. ते लोकांच्या कोणत्याच चांगल्या वाईट प्रतिक्रियेवर खचत नाहीत वा फुलून जात नाहीत, वाटल्यास त्यांना संत म्हणून गौरविता येईल. पण काही ढोंगी नक्कीच असतात की जे बगळ्यासारखे निपचीत डोळे लावून असतात. मग जसा मासा जवळ आलाच, तर तेच डोळे उघडून जसा बगळा आपले भक्ष टिपतो. तसेच समाजातील हे लोकंही स्वार्थ दिसलाच तर ढोंगीपणा बाजूला ठेवून तुटून पडतात.
समाजात अनेक प्रकारची माणसं राहतात. काही समाजातील मंडळी ही मुळातच धनवान असतात. अब्जोनं पैसा असतो. पण सेवा करायला जो पिंड लागतो. तो पिंड त्यांच्यात नसतो. ते समाजसेवा तर सोडा. साधी सेवाही करीत नाहीत. करुही देत नाही. काही मंडळी ही गरीब असतात. ते समाजसेवा करतांना गरीबीचं कारण समोर आणत असतात तर काही गरीबीतून धनवान बनलेले असतात. पण त्यांच्यात स्वार्थ शिरलेला असतो. त्यामुळं ती मंडळी सेवा करायला पुढे येत नाहीत.
सेवेच्या दृष्टीकोणातून विचार केल्यास काही मंडळी ही मुळात श्रीमंत असली तरी ती सेवा करतात. त्यात मागे पडत नाहीत तर काही मंडळी ही गरीबीतून वर आलेली असतात. त्यांनी गरीबीच्या कळा शोषलेल्या असतात. त्यांना वाटते की मी जशा दारीद्रयात असतांना कळा शोषल्या, त्या इतरांना शोषाव्या लागू नये. म्हणून ते मदत करीत असतात. आपल्यासारख्याच इतरही गरीबांना वर उचलण्याचं काम ही मंडळी करीत असतात तर काही मंडळी जी गरीब असतात. ती गरीब असली तरी सेवेच्या दृष्टिकोणातून उदार असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास नल दमयंतीचं देता येईल.
नल दमयंतीची कथा. पोटात अन्नाचा कण नसतांना कुठूनतरी रस्त्यावर त्यांना अर्धी पोळी मिळते. ते समप्रमाणात वाटून ती पोळी खाणार, तोच एक श्वान येतो. शेपूट हालवीत असतो. त्यावेळी पोटात तीव्र भूक असतांनाही नल दमयंती ती पोळी त्या श्वानाला देतात. महत्वाचं म्हणजे समाजसेवा ही अशी स्वतः उपाशी राहून करु नये. पण समाजसेवेसाठी हे उदाहरण नक्कीच बोध म्हणून घेता येईल. हे झालं गरीब नलराजाचं उदाहरण. तसेच कर्णाचंही उदाहरण आहे की ज्याने दानात स्वतःला आवश्यकता असतांना स्वतःची कवचकुंडलं दान दिलीत. आता श्रीमंतांचं उदाहरण.
श्रीमंतांमध्ये छत्रपती शाहू महाराज किंवा सयाजी गायकवाड यांनी जी लोकांना मदत केली, ती वाखाणण्याजोगी होती. तसेच म.गांधी व पंडीत जवाहरलाल नेहरुंजवळ काय कमी होतं की त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी प्राण न्योछावर केले. पंडीत नेहरुंचे कपडे धुवायला पैरीसला जायचे. एवढी संपत्ती होती तर म.गांधीचे वडील पोरबंदरचे दिवाण होते. तरीही त्यांनी पंचा धारण केला.
मुळातच सेवा करण्यासाठी गरीब श्रीमंत हा भागच लागत नाही तर सेवेसाठी मुळात सेवेचा पिंड असावा लागतो. जो लहानपणापासून प्राप्त होत असतो. आपले मायबाप,आजी आजोबा जर आपल्यासमोर कोणाची मदत करीत असतील तर ते गुण आपल्यात बरोबर येतात. ही समाजसेवा शिकवायची गरज नाही.
जर कोणी इश्वर आहे असं मानत असेल तर त्याचेसाठी सेवा ही इश्वरी सेवा आहे. मग ती कोणतीही सेवा असो आणि सेवा करायलाच हवी. समाजातील दीन, दुबळ्या, लाचार, अंगू पंगू, म्हाता-या माणसांची ती सेवा. यातच आता गरीब लाचार अंगू पंगू कोरोना रुग्णांची सेवा.
समाजात काही मंडळी ही निःस्वार्थ सेवा करतात. काही काही संस्थाही. एक नागपूरचं उदाहरण. नागपूरमध्ये अशीच एक नागरीक सेवा समिती आहे.
या समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर असून त्यांच्या दवाखान्यात काही लोकं आजारी पडल्यास जायची. त्यांना आपल्या आजारपणाबद्दल तर सांगायचीच. त्यासोबत घरच्या समस्याही सांगायची. कुणाचा पती मृत पावलेला असायचा. त्यातच मुली उपवर असायच्या. विवाहाचा प्रश्नही असायचा. कोणाजवळ औषधी घ्यायला पैसे नसायचे. कोणाजवळ मुलांना वह्या पुस्तकाला पैसे नसायचे तर कुणाचं क्रिटीकल ऑपरेशन करायचं असायचं. बहुतःश समस्यांनी ग्रासलेली मंडळी. ते ऐकलं की त्या डॉक्टरला वेदना होत. मग यावर डॉक्टर साहेब आपल्यापरीनं जी जमेल ती मदत करायचे. हे वस्तीतील लोकांना माहित झालं.
एकदा वस्तीत अशीच एका राजकीय नेत्यांच्या सहवासात बैठक झाली. त्या बैठकीत त्या राजकीय नेत्याला डॉक्टराच्या कार्याची माहिती दिली. तेव्हा त्या नेत्यानं म्हटलं,
"ही अशी सेवा करुन काही उपयोग नाही. तुम्ही काही लोकं जमवा. एक समिती स्थापन करा.तिला रजिस्टर्ड करा. मग अशाप्रकारचं कार्य करा. तुमचं कार्य निव्वळ वस्तीपुरतं मर्यादित राहू देवू नका. त्या कार्याला सार्वजनिक करा. जेणेकरुन इतरांना प्रेरणा मिळेल. तुमच्यासारखी मंडळी अशी भरपूर आहेत. पण त्यांना मार्ग सापडत नाही. त्यांना तुमच्या रुपानं मार्गही मिळेल."
तो राजकीय नेता आज मरण पावला. पण त्याच्या त्या बोलण्यातून डॉक्टर साहेबांनी काही लोकं गोळा केले. एक समिती बनवली. सर्वांना पदवाटप केले. ती समिती रजिस्टर्ड केली व त्या अंतर्गत त्यांनी आपलं कार्य नव्या जोमानं सुरु केलं. या समीतीत काही पत्रकार आहेत. काही पोलिस आहेत. काही औषधी विकणारे आहेत.काही डॉक्टर आहेत. काही वकील तर काही इंजिनियरही. आजही ही समिती गोरगरीबांना मदत करते. विवाह लावून देते. गुणवंतांचा सत्कार करते. क्रिटीकल ऑपरेशनही करते. आणखी ती काय काय करते ते न सांगीतलेलं बरं.
समाजात अशाच काही समित्या आहेत. ज्या समित्या दीन, दुबळ्या, गोरगरीबांना मदत करतात. पण त्यांच्या कार्याची कोणी दखल घेत नाहीत. ह्या समित्याही आपलं कार्य निःशुल्क, निःस्वार्थ करतात. कोणी त्यांचा उदोउदो न केला तरी चालेल. ही नागरीक सेवा समिती त्यातीलच आहे. या समितीला प्रसिद्धीची गरज वाटतांना दिसत नाही. पण समाजात अशीही काही मंडळी असतात की त्यांचं काही कार्य नसतं. तरीही ते पैशाच्या जोरावर स्वतःला पुरस्कार लावून घेतात. व्हाट्सअप अाणि फेसबूक तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपले तशा कार्यक्रमाचे फोटो काढून अपलोड केले जातात. नाहकच स्वतःचा उदोउदो असतो. पण खोटं जास्त काळ टिकत नाही. त्याप्रमाणे अशा संस्था टिकत नाहीत.
समाजसेवा ही एक सेवाच आहे. सेवा करायला हवी. त्याचा कोणी उदोउदो केलाच पाहिजे या उद्देशाने समाजसेवा करु नये. तसेच समाजसेवेला गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव चालत नाही. श्रीमंतापेक्षा गरीबच लोकं जास्त समाजसेवा करतात. कारण त्यांच्यात माणूसकी असते. ती माणूसकी श्रीमंत मंडळीत पाहिजे त्या प्रमाणात नसते. काहींमध्ये नक्कीच असते. ते तशी मदत करतातही. पण उदोउदो करण्यासाठी नाही तर आपण समाजाचा एक घटक आहोत म्हणून. आपलेही समाजाप्रती एक कर्तव्य आहे, हा उद्देश गृहीत धरुन.
माणसाला जन्म एकदाच मिळतो. त्या जन्माचं काहीतरी सार्थक करावे असं आपल्याला वाटायला हवं. माणूस जन्मतो आणि मरतो. त्याला काही अर्थ नाही. समाजसेवा करायला हवी. आपल्या जन्माचं सार्थक करायला हवं. पण हा मानवाला एकदाचा मिळालेला जन्म केव्हा सार्थक होईल. जेव्हा आपण ही सेवा करु. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना आपण आपले समजू. तेव्हाच खरी सेवा घडेल. हीच खरी समाजसेवा असेल. तसेच हीच इश्वरी सेवा असेल यात काही दुमत नाही.
माझं हे कोरोनाग्रस्तांना मदत करण्याचं कार्य म्हणजे एक इश्नरी कार्य आहे. पण हे स्वातीला कोण आणि कसं सांगणार.
अभयच्या मनात येणारे असे विचार. त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. तो बराच दुःखी व्हायचा. कधीकधी त्याला वाटायचं की आपण कोरोनाग्रस्तांना मदत करणं सोडून आपण आपली पत्नीच पाहावी.
समाजसेवेचा त्याचा पिंड.........त्यातच त्याच्या पत्नीचं दुःख. त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याचं मन उदासल्यासारखं वाटत होतं. त्यातच त्याला घरही खायला धावत होतं. काही करावसं वाटत नव्हतं.
आज शाळाही सुरु नव्हत्या. जेणेकरुन त्याला करमेल. त्यातच तो एक दिवस वर्तमानपत्र वाचत बसला असतांना बसला असतांना त्याला एक बातमी वाचायला मिळाली. बातमी अशी होती की सरकारनं सर्व मुलांना वरच्या वर्गात बढोतरी दिली. तसा त्याच्या मनात विचार आला की विद्यार्थ्यांना बढोतरी तर मिळाली. पण गुणवत्तेचं काय? य अभय विचार करीत होता. तसं त्याला आठवलं.
कोरोना व्हायरस आला आणि वर्षभर लोकांना घाबरवून सोडत राहिला. तो संपलाच नाही. कारण संक्रमीतांचे आकडे हे गगणाला भिडणारे होते. त्यातच या कोरोनाच्या संक्रमणाची भीती असल्यानं सरकारनं विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याकडे लक्षच दिलं नाही. पण जेव्हा हे संक्रमीतांचे प्रमाण कमी झाले. ते पाहता सरकारनं क्रमाक्रमानं विद्यार्थीवर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार केला. त्यातच सरकारनं आधी नववी ते बारावी व नंतर पंधरा दिवसांनी पाचवी ते आठवी शाळा सुरु केल्या.
सरकारनं ज्यावेळी नववी ते बारावीचं शिक्षण सुरु केलं. त्यावेळी कोरोनानं त्या विद्यार्थ्यात तेवढा धुमाकूळ घातला नाही. कारण त्या विद्यार्थ्यांचं वय हे मोठं होतं. ती मुलं समजदार वयातील होती. परंतू ज्यावेळी सरकारनं पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु केल्या. तेव्हा पाचवी ते सहावी वर्गात गेलेल्या मुलांचं वय हे अतिशय लहान असल्यानं व त्यांना खबरदारीचं मुल्य बरोबर कळत नसल्यानं कोरोना त्यांच्याच माध्यमातून परत आला. जणू रिटर्न आल्यासारखा. सरकारला वाटत होतं की आता शाळा सुरु होताच हळूहळू कोरोना संपेल. पण ते सरकारचं स्वप्नच राहिलं. कोरोनानं आपली गती एवढी पकडली की शाळा या कोरोनापुढं टिकाव धरु शकल्या नाहीत. त्या नाईलाजानं बंद कराव्याच लागल्या. त्यातच परत युटर्न रुपात आलेला कोरोना हा हळूहळू वाढतच चालला होता.
कोरोना वाढत चाललेला आहे. हे पाहून सरकारनं शाळा सुरुच केल्या नाहीत. त्यातच सरकारनं शाळा बंदच ठेवल्या. मग सरकारनं विचार केला की शाळा तर वर्षभर बंदच होत्या. त्यातच मोबाईलवर जरी ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिकविणं असलं तरी गरीब मुलांजवळ मोबाईल नव्हते. कुठे नेट काम करीत नसल्यानं पुर्ण मुले शिकली नाहीत. त्यातच काही पालकही गरीबच होते. या सर्वांचा विचार करुन सरकारनं विद्यार्थी वर्गाला सरसकट वर्गोन्नती देण्याचं ठरवलं. त्यात गुणवत्तेला पाहिलं नाही. परंतू ते सरकारचं पाऊल बरोबर असलं तरी सर्वांनाच ते पाऊल बरोबर वाटलं नाही. त्यातच सरकारला धारेवर धरीत काही लोकं विद्यार्थी पास. पण गुणवत्तेचं काय? असे कारण पुढे करु लागले. सरकारला धारेवर धरु लागले.
महत्वाचं म्हणजे कोरोना व्हायरसच्या या परीस्थीतीत कोरोनाचा धुमाकूळ सुरु असतांना गुणवत्तेला काही लोकांनी का पाहावं? महत्वाचा आहे जीव. तो वाचला की सारंच संकट टळलं. राहिली गुणवत्ता. ती गुणवत्ता शाळेतच मिळते असं नाही. ती गुणवत्ता निसर्ग आणि परीसरातही मिळते. हा निसर्ग विद्यार्थी शाळेत जरी गेला नाही, तरी त्याला बरोबर ज्ञान देत असतो. कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या निसर्गातून मिळत असतात. माणूस हा आईच्या गर्भातच शिकत असतो. जसा अभिमन्यू. त्यानं तर आईच्या गर्भातच चक्रव्युहातून बाहेर कसे पडावे हे शिकले. तसा तो आईच्या गर्भातून बाहेर पडल्यावर बाहेरील वातावरणाशी कसं जुळवून घ्यावं हे शिकतो. ते आई देखील शिकवीत नाही. श्वास घेणे. शौच करणे, भूक लागल्यास ओरडणे(रडणे). या सा-या गोष्टी निसर्ग शिकवतो. तसेच आणखी ब-याच गोष्टी निसर्ग शिकवतो. जसे. वस्तू खारट की अळणी आहे. वारा थंड आहे की गरम. झाड हिरवं आहे की पिवळं. साप काळा आहे गव्हा-या. कुत्रा भुंकत आहे की गाय हंबरत आहे. कारली कडू आहेत की गोड. अगरबत्ती लावली आहे की नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचेच्या माध्यमातून शिकता येतात. म्हणून त्या पाच अवयवांना ज्ञानेंद्रीये म्हणतात. हेच तत्व गुणवत्तेबाबत लागू पडतं.
परीसर हा आपला गुरु असून आजही शहरी भागातील विद्यार्थ्यांना नांगर, वखर माहित नाही. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील ब-याच गोष्टी माहित नसतात. ते सर्व चित्रातून सांगावं लागतं. हे सर्व त्या त्या भागात राहणा--या विद्यार्थ्यांना माहित असलं तरी इतरांना त्या गोष्टी माहित व्हाव्यात. म्हणून शाळा हे माध्यम आहे. आज मोबाइल घराघरात पोहोचलेला असून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कोणत्याच शाळेची गरज वाटत नाही. शाळेला केवळ प्रमाणपत्र वाटपाचं केंद्र बनावं हे आज कोरोना सिद्ध करीत आहे. कारण मोबाईलवर एका क्लीकवर सगळं मिळतं. आज संसारोपयोगी ब-याच गोष्टी विद्यार्थ्यांना शाळेत मिळत नाही. त्या त्याचे मित्र शिकवतात. तसेच ब-याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपला परीसर आपल्याला शिकवून जातो. म्हणून कोणीही पालकांनी असा विचार करु नये की शाळा बंद आहेत. म्हणून माझा मुलगा शिकला नाही. तो गुणवत्तेनं ढेपाळला.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की गुणवत्तेनं तो ढेपाळला नाही. तर तो चिकित्सक बुद्धीमत्तेचा बनला. संकटात कोरोनाशी कसे दोन हात करावेत हे तो शिकला असून पुढे कोणत्याही स्वरुपाचं संकट आलंच तर तो त्यासाठी सक्षम बनलेला आहे. म्हणून कोणीही या कोरोना कार्यकाळात विद्यार्थी विकास झाला नाही वा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं असं समजू नये. त्यातच अभयला वाटलं की असं जर घडलं तर तो विद्यार्थ्यांना अपमान वाटेल व तो निराश होवून वाममार्गाला लागेल. त्यामुळं तो पालकांना सुचना करु पाहात होता. तो औषधी देत असतांना आवर्जून म्हणत असे की आपल्या पाल्याची या कोरोनाच्या कार्यकाळात हवी तेव्हा स्तुती करा. त्याच्या पाठीवरुन हळूवार हात फिरवा. प्रेमाची फुंकर घाला. जेणेकरुन निखा-यावर जशी फुंकर मारताच जी धुळ निघून जाते. तशीच धुळ विद्यार्थी वर्गाच्या आळसावर प्रशंसेची फुंकर मारताच त्याच्या अंगातील असलेला आळस निघून जाईल व तो नवं काही शिकण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरुन त्याची गुणवत्ताही तळपवून निघेल. धारधार तळपत्या तलवारीसारखी.
विद्यार्थी वर्गाबद्दल अभयच्या मनात आस्था होती. पालकवर्ग म्हणत असे की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यालाही कधीकधी तसंच वाटायचं. पण जेव्हा तो त्यावर सखोल विचार करीत असे. तेव्हा मात्र त्याला ते नुकसान झालेलं आहे असं वाटत नव्हतं. गुणवत्ता काय पुढंही पुर्ण करुन घेता येईल. आज जीव वाचवणं गरजेचं असं त्याला वाटत असे. अभयला वाटत होतं की कोरोना संपणार. कारण जो जन्म घेतो. तोच कधी ना कधी मरणारच आहे.
मुख्य म्हणजे कोरोना आला आणि सर्वांच्या मनात भीतीमय वातावरण निर्माण करीत वाटचाल करता झाला. त्यातच या कोरोनानं अनेकांचे बळी घेतले आणि तो घेतच आहे. तो चीनमधून आला असला तरी आजही अख्खं जग त्याच्यामुळं धास्तावलं आहे. तसा तो फारच आग ओकत असल्याचे दिसते. कोरोनावर औषधी कंपनींनी औषधीही काढली आहे. पण कोरोना त्या औषधालाही घाबरायला खाली नाही. ज्याप्रमाणे आज आपण कोरोनावर औषध काढली. त्यालाच प्रतिबंध म्हणून कोरोनानं आपलं रूप बदलवलं व तो नवीन स्वरुपात खुलेआम वावरतो आहे. कोणाला न भीता. त्यामुळं तो न संपण्याची चिन्ह दिसत आहेत.
माणसे पाप करीत होते. कोणी कोणाला विनाकारण लुटत होते. कोणी कोणाचे गळे दाबत होते. कोणी बलत्कार करीत होते. कोणी कोणाच्या मालमत्ता दाबत होते. कोणी कोणाची जीवही घेत होते. महत्वाचं म्हणजे हे पाप करतांना माणसे नातेसंबंधही पाहात नव्हते. पाप करतांना माणसाला पुढला संभाव्य धोकाही दिसत नव्हता. तो आंधळा झाला होता. काही तर म्हणत होते. हे पापपुण्य म्हणजे काय? काहीही पाप नसतं. पुण्यही नसतं. आजही असे काही महाभाग पापच करीत आहेत. ते कोणाला घाबरत नाही. कारण त्यांना आजही वाटतं की हे पाप कोणाला दिसत नाही. आजही असं पाप घडतं.
पाप हे घडत होतं. जे माणसाला दिसत नव्हतं. ते निसर्गाला दिसत होतं. अलिकडं देव नाही असे मानणारे बरेच लोक आहेत. ते देव मानत नाहीत. त्यामुळं त्यांच्यामध्ये भीती नावाची गोष्टच नाही. पण जे पाप......आपलं पाप........जे आपल्याला दिसत नाही, ते पाप निसर्ग पाहात असतो, त्याला ते सगळं दिसतं. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो. कोणी त्याला अल्ला म्हणतात, कोणी देवही संबोधतात. ह्याच निसर्गानं कोरोना नावाचा आपला एक दूत पृथ्वीवर पाठवलाय. जे पृथ्वीवर पापाचं वजन झालं आहे, त्या पापाची छाटणी करायला नव्हे तर ते पाप संपवायला. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. पण गव्हाबरोबर सोंडाही भरडल्या जातो ना. तशीच आज काही पुण्यवानही या कोरोनाच्या कहरात मरत आहेत.
मृतकांची संख्या वाढत आहे. सगळे सुरक्षा बाळगून आहेत. काही तर चक्क संदूकात सीलबंद असल्यागत घरातच राहून काळजी घेत आहेत. कोणी काचेच्या महालात. जिथे हवेला शिरायलाही जागा नाही. अशीही कोरोनाच्या धास्तीनं जागा नव्हे तर पूरक वातावरण काहींनी आपल्या सभोवती संरक्षक भिंत म्हणून तयार केली आहे. पण कोरोना काही त्यांचं ऐकतो काय, तो त्याही व्यक्तीपर्यंत जात आहे आणि त्याला बाधीत करीत आहे. कारण तो पापाचा भागीदार आहे. तशी एक दंतकथा प्रचलीत आहे.
एक राजा होता. त्याला एका ज्योतीषानं सांगीतलं की तू आजपासून सातव्या दिवशी एक साप चावून मरणार. मग काय राजा घाबरला. त्यानं आपल्याला मृत्यू येवू नये, म्हणून आपल्याभोवती संरक्षक काचेची भिंत बांधली. जिथं हवेलाही प्रवेश नव्हता. कोणी विनामंजूरीनं त्याच्या कम-यात प्रवेश करु शकत नव्हता. त्यातच त्याचं जेवनही तपासून त्याला दिलं जात होतं. पण निसर्ग तो........त्या राजाचे पाप पुर्ण झाले होते की काय, आज सातवा दिवस होता. तपासणारे थकले होते. त्यांना त्या राजाबद्दल हसू वाटायचं. त्यातच एक लहानशी अळी बोराच्या आतमध्ये शिरली. तपासणा-यानं बारकाईनं तपासलं नाही व ती अळी आतमध्ये गेली. मग काय, राजानं बोराला स्पर्श केला. ते बोर खाण्यासाठी त्याला फोडलं तर ती अळी बाहेर पडली. ती मोठी झाली. ती एवढी मोठी झाली की तिचा आकार सापासारखा दिसू लागला. तिनं राजाला दंश केला व राजा मरण पावला.
अशीच एक कथा महाभारतातही आहे. आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार. तसा कंस स्वगत म्हणाला,
"आठवा ना. वेळ आहे. तो जन्म घेईल तेव्हा पाहू. तोपर्यंत अभय देतो देवकीला." त्यातच दुसरी आकाशवाणी.
"तो देवकीचा आठवा पुत्र पहिल्या लेकराच्या रुपानं जन्माला आला तर........" आता कंस घाबरला. काय करावे सुचेनासे झाले. शेवटी त्यानं देवकेला कारागृहात टाकलं व तिचे सहाही लेकरं मारले.
महत्वपूर्ण गोष्ट ही की कोणी कितीही संदूकात सीलबंद जरी राहिला तरी कोरोना त्याचेजवळ पोहोचणार नाही कशावरुन? किती प्रमाणात तुम्ही काळजी घ्याल. असे म्हणत काही माणसं बिनधास्त फिरत आहेत. असाच एक व्हिडीओ व्हाट्सअपवर गाजत आहे. कोणी खर्रा खाल्ला म्हणून मास्क वापरला नाही असं म्हणत आहे. तर कोणी चेह-यावरचा मेकअप मिटतो म्हणून मास्क वापरला नाही असे म्हणत आहे. कोणी मिशी वाकडी होते म्हणून मास्क वापरला नाही असे म्हणत आहे. कोणी पायी चालत आहो ना, गाडीवर मास्क वापरावा असे म्हणत आहे. परंतू मला हे म्हणायचे आहे की कोरोना दस्तक देवो की न देवो. कदाचित कोरोना त्या तरुणांना शिवतही नसेल कदाचित. कारण त्यांचं मन निरोगी असेल, त्यांच्यात प्रतिकार शक्ती जास्त असेल, पण त्यांच्यारुपानं जो कोरोना इतरांमध्ये पसरतो ना. ते बरोबर नाही.
आज सरकार लाकडाऊन लावतं. कशासाठी? तर कोरोना संपावा म्हणून. तरीही मजूर वर्ग बिनधास्त बाहेर पडत आहे. त्या वर्गाला वाटते की आपल्याला कोरोना काय, कोणताही आजार शिवणार नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण त्यांची प्रतिकार शक्ती जास्त आहे. त्यांनी बहुतःश पापही केलेलं नसतं. कोणाची मनंही दुखावली नसतात. म्हणून कोरोना शक्यतोवर त्यांना शिवणारच नाही. पण ह्या कोरोनाचे ते नक्कीच वाहकही ठरु शकतात. त्यांच्याच शरीरावरुन ते कोरोनाचे जंतू पसरु शकतात हे काही नाकारता येत नाही.
विशेषतः कोरोना कोणाला छळतो. कारखान्याचे जे मालक असतात. ते मालक आपल्या मजूरांवर अत्याचार करीत असतात. ते मात्र एसीच्या कम-यात असतात. घरात काम करणा-या मोलकरणीवर घरातील लोकं अत्याचार करतात. ते स्वतः एसीत असतात. सरकारी कार्यालयात कर्मचा-यावर अधिकारी अत्याचार करीत असतात. मात्र ते स्वतः एसीत बसतात. सरकारी योजनेची घोषणा करणारे मंत्री शेतकरी, श्रमीकावर अत्याचार करतात, ते स्वतः एसीत फिरतात. तसेच लहानशा प्रमाणपत्रासाठी दररोज शाळेत येणा-या चिमुरड्या मुलांवर शाळेत जाण्यासाठी तगादा लावणारे पालक तसेच शाळेत येण्यासाठी तगादा लावणारे शिक्षक, जे मुलांचं स्वातंत्र्य हिरावतात. कोरोना त्या मुलांना होत नाही. त्याच्या पालकांना व शिक्षकांना होतो. कारण याच घटकांकडून या निरागस मनावर अत्याचार होतो.
कोरोना संपणारच. कधीतरी संपणारच. कारण जो जन्म घेतो, तो मरणारच. अर्थात कधीतरी संपणारच. हा निसर्गनियम आहे. तेव्हा महत्वाची गोष्ट ही लक्षात घेण्याजोगी आहे की आपण आजपर्यंत जेही काही केलं, ते सर्व विसरुन जावे. चांगले वागावे. आपले विचार चांगले बनवावे. षडविकार आपल्यातून काढून टाकावे. दुस-याबद्दल चांगली भावना ठेवावी. दयाभाव ठेवावा. आदर बाळगावा. दुस-या व्यक्तीबद्दल चांगूलपणा बाळगावा. तो शत्रू का असेना. तसेच माणूसकी बाळगावी. मास्क वापरावा. जेवनापुर्वी हात स्वच्छ धुवावे. कोणीही अत्याचार करु नये. अत्याचाराचा भावच मनात आणू नये. निंदानालस्ती करु नये. मनात भीती, राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर ठेवू नये. असे जर तुम्ही वागले तर कोरोना हरेल व तो आल्यापावली निघून जाईल. पण हे प्रत्येकानं करण्याची गरज आहे, एकानं नाही. कारण कोरोना व्हायरस हा एक निसर्गदत्त जंतू आहे. या जंतूला जेवढे तुम्ही घाबराल, तेवढा हा सतावणारच आहे. त्यासाठी औषध म्हणजे स्वतःच्या मनात चांगूलपणा आणून तो चांगूलपणा आत्मसात करण्याची गरज आहे. आपण पाहात आहोत की कोरोना औषध निघाल्या. तरी कोरोना संपायचं नावच घेत नाही. तो अजून वाढत आहे. कधी नव रुप घेवून येत आहे. तर कधी त्याच रुपात कहरचा वर्षाव करीत आहे. मात्र आपण आता कसं वागावं हे आपल्यावरच अवलंबून आहे. हे तेवढंच खरं आहे.
दिवसामागून दिवस जात होते. कोरोना काही संपण्याची चिन्हच दिसत नव्हती. त्यातच त्याला स्वातीची आठवण आली. स्वाती कशी असेल असंही त्याला वाटलं.
तशी त्याची एक जुनी आठवण ताजी झाली. त्या आठवणीनुसार ती त्याच्या बाहूपाशात असलेली दिसली.
ती एक बाग होती. त्या बागेत ते दोघंही बसलेले होते. एकमेकांच्या पाठीवर पाठ ठेवून ते दोघंही बसले होते. त्यातच त्या बागेत बसलेले असतांना त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सुरु होत्या.
ती सायंकाळची वेळ होती. गार वारा सुटला होता. त्याचबरोबर तिचे केस उडत होते. तो मात्र तिच्या चेह-यावरुन हात फिरवत होता. त्याचबरोबर तिचे केसं सवारत होता.
आज ते केसं जरी आठवत असले तरी तेही एक स्वप्नच होतं. कारण कोरोनाच्या या महामारीत बागा बंद होत्या. त्यामुळं बाग बगीचे फिरणं बंद होते.त्यातच आता ते स्वप्न असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यातच त्याच्या मनात विचार आला की ती कशी असेल.

*************************************************

स्वातीलाही अभयची आठवण येत होती. पण ती स्वाती केवळ आपल्या आईच्या मतानुसार चालत होती. तिला अभयच्या घरी जावंसं वाटत होतं. पण तिची आई समोर यायची. तशी तिला तिच्या आईची भीतीही वाटत होती.
आज तिच्या आईनं तिची जिंदगी खराब केली होती. तिच्या आईच्या मतानुसार अभय हा कोरोनाचा काढा देणं बंद करेल असं तिला सांगत होती. तसेच हा काढा देण्याची समाजसेवा केव्हापर्यंत चालणार. जेव्हापर्यंत कोरोना असेल. मग तर माफी मागून नाक घासत येईल अभय. असंही आपल्या मुलीला तिची आई सांगत होती.
दिवसेंदिवस ती सुकत चालली होती. तिचे ओठ सुकत चालले होते. तिची कांती निस्तेज झालेली दिसत होती. त्यातच तिला कधीकधी त्याची अतीव आठवण यायची.
आज दोघांनाही एकमेकांची आठवण येत होती. पण केवळ तिच्या आईमुळं ते दोघंही एकत्र येवू शकत नव्हते. त्यांच्या एकत्र येण्यात अभयची समाजसेवा आड येत होती तर स्वातीचा हेकेखोरपणाही आड येत होता.
अभय दिवसेंदिवस त्या गोष्टीवर विचार करीत होता. त्याला वाटत होतं की स्वातीनं परत यावं. तो स्वातीला समजावेल की उद्या कोरोना जाईल. तो काही सदोदित पाठीमागं राहणार नाही. कारण आता देशानं त्यावर संशोधन केलेलं असून कोरोनावर औषधी शोधून काढल्या आहेत. डॉक्टर कोरोना होवू नये म्हणून प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रतिरोधक लसीही देत आहे. त्यामुळं स्वातीनं या कोरोना काढ्याचा बाऊ करु नये. तसेच स्वातीला वाटत होते की त्यानं तिला न्यायला यावं. परंतू त्याला तिला न्यायला जातांना वैषम्यता वाटत होती. त्याला वाटत होतं की ती जर स्वतः गेली आहे तर तिनं स्वतःच परत यावं. तो तसा तिच्याशी बोलतही होता फोनवर. पण ते तिला पटत नव्हतं.