way in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | मार्ग

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

मार्ग

मार्ग कादंबरी-अंकुश शिंगाडे

मुलं किंवा मुली जन्माला घालणं हा प्रत्येक स्री पुरुषांचाच नाही तर जीवसृष्टीचा मूलभूत हक्क आहे नव्हे तर अधिकारच. त्यातच या प्रजोत्पादनाच्या कार्यात ज्याप्रमाणे योग्य वयात आल्यावर पशूपक्षी व सुष्टीतील घटक आपल्या हातून मुलांना जन्म देतात. त्यांना मोठे करतात व ती लहानाची मोठी झाली की त्यांच्यावर अधिकार न गाजवता त्यांना त्याच्या स्वतःवर आत्मनिर्भर करुन सोडून देतात. ते जीव मग कोठेही जावो. त्यांची पर्वा करीत नाहीत. मग एखाद्यावेळी त्यांना कमीजास्त झाले तरी वा ते मृत्यू पावले तरी त्यांना बरेचदा शोक नसतोच. कारण त्यांना बुद्धी ही कमी आहे. पण मानवाचं वेगळं आहे. या माणसाला बुद्धी आहे. त्यानुसार तो विचार करीत असतो. त्याला काय करावे काय नको असं वाटायला लागतं. त्यातूनच जेव्हा ते वयात येतात. त्यावेळी ते विवाह करतात. मुलंही पैदा करतात आणि त्यांना मोठेही करतात. त्यातच त्यांना बुद्धी असल्यानं त्या जन्माला घातलेल्या वंशजांनी आपल्याला पोसावं अशी अपेक्षा बाळगून ते मार्गक्रमण करीत असतात.
ही जीवनाची साखळी आहे. एक जीव, त्याच्यापासून दुसरा नवीन जीव. त्याच्यापासून परत दुसरा जीव. त्यांनी मुलं पैदा करतांना व मोठी करतांना त्यांनी आपल्याला पोसावं ही अपेक्षा. पण कधीकधी भ्रमनिराश होत असते मन. कारण या साखळीत मोठी झालेली ही मनुष्याची पिल्लं मायबापांना पोसतीलच असं नसतं.
काही लोकं ही मुलांचा हव्यास करीत असतात. आम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं हवीत असं ते मानत असतात. कारण ती मुलं मोठी झाली की आपल्याला पोसतील. एकानं नाही पोसलं तर दुसरा पोसेल. कोणी ना कोणी पोसेल ही अपेक्षा. त्यातच मुलगी म्हटलं की पराया धन. ती पोसणारच नाही ही भावना. मग मुलगी झालीच की तिचा गर्भातच जीवघेणा खेळ सुरु होतो. त्यातच मुलीपेक्षा मुलांना जास्त पसंती दिली जाते. त्याची कारणंही तशीच आहेत. खरं तर मुलं हवी तरी कशाला? असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
मुले आधारवड म्हणून हवी असतात. खरं तर लोकांना मुलं ही आधारवड म्हणूनच हवी. कारण तरुणपणातील ठीक आहे. पण जेव्हा म्हातारपण येतं. तेव्हा मात्र त्यांना पोसावं म्हणून लोकांना मुलं हवी असतात. त्यांना वाटत असते की ही मुलं म्हातारपणात आमची सेवा करतील. आमचा आधारस्तंभ बनतील. वंश चालवतील. परंतू तसे होत नाही. काही मुलं ही आधारस्तंभ बनण्यासाठी मायबापाचे कर्दनकाळ बनतात व ते कोणत्या ना कोणत्या कारणावरुन मायबापाचा जीवही घेतात. विशेषतः आपल्या गरजा पूर्ण करीत असतांना.
तो मध्यंतरीचा काळ. मुलांकडे मुलीच्या दृष्टीकोणातून जास्त पसंती होती. मुलाला वंशाचा दिवा समजण्यात येत असे. परंतू आता जो काळ बदलला आहे. त्या बदलत्या काळानुसार मुलाला वंशाचा दिवा समजत नाही तर मुलीलाही लोकं पसंती दाखवत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आज मायबापाच्या म्हातारपणी मायबापाचा वंशाचा दिवा वा आधारवड बनण्याऐवजी मुले आपल्या सासूच्या घरी जात असतात. ते मायबापाची सेवा करीत नाही. उलट मुलगी ही आपल्या मायबापाचा आधारवड बनते. मायबापाची सेवाही करते. ती आपल्या पतीच्याच घरी राहात नाही तर आपल्या मातापित्यालाही वेळोवेळी मदत करते.
आताचा काळ असा आहे की मुलगा आणि मुलगी असा लोकं भेदाभेद करीत नाहीत. ते असा भेदभाव न करता मुलगी असो वा मुलगा जन्म झाला की एकसमान प्रेम करतात. पण काही लोकं आजही असे प्रेम करीत नाहीत. ती मुलगी कितीही सेवा करीत असेल मायबापाची तरी मुलगाच बरा असता असे मानतात, तसं म्हणूनही दाखवतात. मुलगी झाली की शोक मनवतात.
मुलं ही असावीत. मुलं जन्माला घालणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पशूपक्षालाही मुलं जन्माला घालता येतात नव्हे तर ती घालत असतात. मग या ठिकाणी हा माणूस आहे. त्यालाही मुलं जन्माला घालण्याचा अधिकार तेवढाच. तेव्हा आजच्या काळातील परिस्थीती लक्षात घेता मुलं जन्माला घालणे गरजेचे आहे.
मुख्यत्वे सांगायचे झाल्यास मायबाप विवाह होताच मुलं जन्माला घालतात. तरुणपण हे चांगलं आनंदात जात असते. पण जेव्हा ते म्हातारे होतात आणि त्यांच्या मुलांचे विवाह होतात आणि ती मुलं जेव्हा मायबापाची सेवा करीत नाही. तेव्हा मात्र त्यांना चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. त्यांना वाटायला लागतं की आपण मुलं ही जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं.
आज लोकं मुलं जन्माला घालतात. पण त्यांची अवस्था ही पशूपक्षांच्या मुलांसारखी आहे. ती मुलं शिकतात. मोठी होतात. विवाहबद्ध होतात व पशूपक्ष्यांच्या मुलांसारखी उडून गेल्यासारखी वागत असतात. ती देशात शिकतात व विदेशात कामाला लागतात. मग हळूहळू त्यांना मुलं होतात. ती आपली पत्नी व मुलांमध्ये रमतात. त्यातच आपल्याला जन्म देणारे कसे आहेत. हे सारं काही विसरतात. मायबाप मरतातही. त्यांना माहितीही होतं. पण आपल्याला वेळ नाही वा आपल्याला माहितच नाही असा विचार करुन ते मयतीतही येत नाही. शेवटी त्यांना जेव्हा आठवण येते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
सर्वसामान्य लोकांचं ठीक आहे. मुलं हवीत. आपली आधारवड बनावी म्हणून. पण जी मुलं अशी संकटांच्या वेळी वा म्हातारपणी सेवाच करीत नसतील तर अशी मुलं कोणत्या कामाची? त्यापेक्षा आपण वांझ असतो तर बरं झालं असतं असं काही लोकांना वाटायला लागतं.
त्यांचंही बरोबरच असते. कारण सर्वात जास्त मुलांची गरज पडते. ती म्हातारपणीच. ज्यावेळी हातपाय थकलेले असतात. पायात चालण्याचं वा उभं राहण्याचं बळ नसतं. कँल्शीअम कमी असल्यानं हाडं ठिसूळ झालेली असतात. आजारपण पाचवीला रुजलेलं असतं. रुग्णालयात वारंवार भरती व्हावं लागतं. अशावेळी गणगोताचा मेळा जर आपल्या भोवताल उभा असेल तर सारंच काही मिळविल्याचं समाधान आपल्याला मिळत असतं. तसंच प्रत्येक मुलांनी आज वागण्याची गरज आहे.
म्हातारपण मिळावं. पण गणगोताचा मेळा आपल्या भोवताल मिळत असेल तर......जर मिळत नसेल तर उगाच म्हातारपण मिळू नये. नाहीतर मुले हवी कशाला असे म्हणण्याची वेळ येईल ही शक्यता नाकारता येणार नाही.
अर्जून असाच व्यक्ती की ज्याला एक मुलगी होती. जी मुलगी त्याला देव देव करता झाली होती. जी मुलगी होताबरोबर तिला समस्या आली होती.
मुलीचं नाव सुकन्या होतं. सुकन्या जेव्हा गर्भात होती. तेव्हा मला मुलगाच हवा असं अर्जूनला वाटत होतं. परंतू ज्यावेळी त्याला मुलगी झाली. तेव्हा मात्र त्याच्या मुलीला सुकन्याला समस्या आली होती.
समस्या गंभीर स्वरुपाची होती. तिची आतडी ही छातीमध्ये गेली होती. ताबडतोब ऑपरेशन करणं आवश्यक होतं. त्यातच तिला श्वासही घेण्यात अडचणी येत होत्या.
अर्जून एक शिक्षक होता. त्याला सरकारी नोकरी होती. त्यातच त्यानं ब-याच हालअपेष्टा भोगून नोकरी मिळवली होती. तसं त्याचं शिकवणंही चांगलं होतं.
त्याला मुलगा हवा होता. तशी त्याची इच्छा होती. त्याचं कारणही तसंच होतं. त्याची अख्खी पिढी मुलांना वंशाचा दिवा मानत होते. मुलींचा भेदभावच होता. तेच संस्कार रुजले होते त्याच्या मनात. अगदी खोलवरच रुजले होते ते कुजले संस्कार.
मुलगी झाली डॉक्टरांनी सांगीतलं. तसा मुलगा हवा होता. परंतू मुलगी झाली. तसं त्याला थोडंसं वाईट वाटलं. पण पाडवा गोड करावा. म्हणून तोही आनंदी झाला. नंतर पाहू असा विचार करीत. मुलगी झाली. तसा थोडाफार आनंद झाला.
अर्जून ज्याप्रमाणे एक शिक्षक होता. तसा तो एक प्रसिद्ध वक्ताही होता. आज महिलादिन होता. आज महिला दिनीच त्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते.
आज महिलादिन होता. महिलादिनाच्या निमित्यानं त्याचा एके ठिकाणी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला तो हजेरी लावण्यासाठी गेला. तिथे कार्यक्रमात दोनतीन तास निघून गेले होते. कारण तो कार्यक्रम दोनतीन तास चालला होता.
दोनतीन तास झाले होते. कार्यक्रम संपला होता. तसा अर्जून कार्यक्रमातून परत आला. तसा तो त्या कम-यात गेला. ज्या कम-यात त्याची मुलगी व त्याची पत्नी होती.
अर्जूननं पत्नीकडं लक्ष दिलं. तसं मुलीकडं लक्ष दिलं. तसा तो आपल्या पत्नीशी संवाद साधू लागला. तोच संवाद साधता साधता त्याचं लक्ष आपल्या मुलीकडं गेलं. मुलीच्या शरीराचा रंग बदलला होता. तसं पाहता मुलीच्या शरीराचा रंग गुलाबी नव्हता तर तो हिरवा पिवळा झाला होता. त्यातच ती जोरानं श्वासही घेत होती.
अर्जूनच्या मनात शंका निर्माण झाली. त्यातच अर्जूनला वाटलं की ती काही नार्मल नाही. तिला काहीतरी शरीरात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यातच त्यानं डॉक्टरांना बोलावलं.
डॉक्टरसाहेब आले होते. त्यांनी सांगीतलं की मुलीला काहीही झालेलं नाही. ती सामान्य आहे. तसा अर्जून निश्चींत झाला.
अर्जून निश्चिंत झाला खरा. पण त्याची मुलगी काही सामान्य नव्हती. तिचा श्वास अजून वाढतच चालला होता. तसे रात्रीचे दहा अकरा वाजले होते. परत त्यानं डॉक्टरांना बोलावलं. तसं आणखी तपासायला सांगीतलं. तसं डॉक्टरांनी तिला नेलं व तिची तपासणी केली. परंतू त्या ठिकाणी अत्याधुनीक साधनं नसल्यानं त्या डॉक्टरांना पुर्णपणे तपासता आलं नाही. त्यातच तिला आय सी यू मध्ये ठेवण्यात आलं.
रात्रीचे दोन वाजले होते. मुलीचे श्वास घेणे तीव्रपणे सुरु झाले होते. तसे डॉक्टर म्हणाले,
"आपलं बरोबर आहे. आपल्या मुलीला कुत्रीम श्वास देण्याची गरज आहे. तेव्हा तिला चांगल्या रुग्णालयात भर्ती करावं लागेल."
आता मात्र अर्जूनचे धाबे दणाणले. कारण तो काळ. तो हाडाचा शिक्षक जरी असला तरी त्या काळात शिक्षकांचा पगार पाहिजे तेवढा नव्हता. त्यांच्या घरी उपवासाचे फाके पडत होते. जवळ जेवढा पैसा होता. तो दिलीवरीमध्ये खर्च झाला होता. ती दिलीवरी त्यानं खाजगी इस्पीतळात केली होती. आपल्या पत्नीला कोणत्याही स्वरुपाचा त्रास होवू नये यासाठी. शेवटी आता मुलीचा खर्च.
आधीच मुलगी नको असं मानणारा अर्जून. त्याच्या मुलीला आरोग्याची समस्या निर्माण झाल्यानं तो आणखी बेचैन झाला. कारण आता त्याला आपल्या मुलीसाठी आणखी खर्च करावा लागणार असे वाटत होते. तसा त्याचा एक नातेवाईक म्हणाला,
"घर गहाण ठेव आणि जो पैसा येईल. त्यानं उपचार कर."
नातेवाईकानं म्हटलेली गोष्ट त्याला पटली नाही. तसं त्याला वाटलं. कदाचित आपण घर गहाण ठेवून मुलीचा उपचार केला आणि समजा मुलगी मरणच पावली तर पैसाही जाणार आणि मुलगीही. नाही, आपण तिचा उपचार सरकारी रुग्णालयातच करायचा.
अर्जूननं ठरवलं होतं की आपण तिचा उपचार सरकारी रुग्णालयात करावा. तसं त्यानं आपल्या नातेवाईकाचं न ऐकता आपल्या मुलीला सरकारी रुग्णालयात नेलं.

************************************************************************

ते सरकारी रुग्णालय. अगदी सुसज्ज असं होतं. त्याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा होत्या. मनुष्यबळंही होतं. पण त्या रुग्णालयातील लोकं हे आळशी झाले होते.
तो रात्रीचा प्रहर........साधारणतः तीन वाजता अँबुलन्सनं अर्जून आपल्या मुलीला घेवून सरकारी रुग्णालयात पोहोचला. तशी मुलगी त्याला आवडत नसली तरी ती मुलगी वाचावी याचा लळा त्याच्या मनात लागला होता. त्याच्यातील माणुसकी जागी झाली होती. परंतू त्या सरकारी रुग्णालयात त्याच्या माणूसकीला कुठलीही किंमत नव्हती.
आज भ्रष्टाचार चरणसीमेला आहे. तो वाढण्याची कारणे म्हणजे लोभ आणि स्वार्थ हा होय. तसेच त्यावर सरकारचे नियंत्रण नसणे. आज सरकारी राशनचे दुकान असो वा साधा टैक्स लावण्याचं ठिकाण असो. पैसे दिल्याशिवाय आपले कामच होत नाही. त्यातच ज्यांच्याजवळ पैसे नाहीत देण्यासाठी. त्यांची कामं ही रेंगाळत होत असतात.
मुख्य म्हणजे त्यांची कामं ही रेंगाळत होत असतात असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आज अशी कामं करीत असतांना त्या यंत्रणेचा भोंगळ कारभार दृष्टीस पडत असतो.
आज हा भ्रष्टाचार राशन दुकानात दिसतो तो असा की जेवढे किलो धान्य एका ग्राहकासाठी येतो. तेवढे किलो धान्य त्यांना मिळत असेलच असे नाही. हा भ्रष्टाचारच. टैक्स लावण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार असा की टैक्स जर लावायचा असेल साहेबांना काही पैसे द्यावे लागतात.
भ्रष्टाचार हा जागोजागी दिसत आहे. शेतक-यांना मिळणारी बियाणे ही सरकारी यंत्रणेतून मिळत असतांना त्यात सातबारा जोडावा लागत असतो. परंतू हा सातबारा मिळविण्यासाठीही भ्रष्टाचार होत असतो. साधा सातबारा देण्यासाठी तलाठी हे काही पैसे घेत असतात. ते पैसे शेतक-यांना परवडणारे नसतातच. कारण अलिकडे पैसे नसल्यानं शेतकरी आत्महत्या घडत आहेत.
भ्रष्टाचार हा सरकारी रुग्णालयातही आहे. सरकारी रुग्णालयात एकदा भरती झाल्यानंतर तो व्यक्ती परत येईलच घरी.याचा काही नेम नसतो. कारण हाच भोंगळ कारभार. सरकारी रुग्णालयात आजारी व्यक्तींना जेव्हा जेव्हा एखादी सोय अति आवश्यक असते. तेव्हा तेव्हा त्याला ती सोय ताबडतोब मिळत नसल्यानं वा लवकर उपलब्ध होत नसल्यानं रुग्ण मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त सरकारी रुग्णालयात जास्त असते. त्यामुळं की काय खाजगी रुग्णालयाची संख्या वाढत चालली आहे. त्यातच उपचार करणारेही सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगी रुग्णालयांना जास्त पसंती देत असतात. कोरोनाच्या काळातही तेच चित्र दिसलं. कोरोना काळात सरकारी रुग्णालयात जे भरती झाले. त्यांना ताबडतोब सोय उपलब्ध न झाल्यानं ते मरण पावले. मात्र ज्यांच्याजवळ पैसा होता. त्यांनी खाजगी इस्पीतळात उपचार केला. ते सुधारले. मात्र त्यांना पाण्यासारखा पैसा ओतावा लागला.
आज जिथं पाहिलं तिथं गरीबांचं मरणच मरण आहे. ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे. ती मंडळी हवी ती हौसमौज करीत असतात. तर ज्यांच्याजवळ पैसा नाही. ती मंडळी मात्र श्रीमंतांचा त्रासही सहन करीत असतात. आज हीच गरीब सामान्य मंडळी कशीबशी पैसा गोळा करुन एक लहानशी जागा विकत घेतात. त्यावर छोटसं मकान बनवतात. परंतू ही जागा घेतांना पुढं त्यांना भुमाफियांच्या त्रासाला समोरे जावे लागते. भुमाफिया हे त्या व्यक्तींना जागा तर विकतात. मात्र सर्व नियम प्लाट टाकतांना आपल्या बाजूचे बनवितात. त्याची कल्पना ही त्या प्लाटधारकांना नसते. मग एखाद्या वेळी गरीबी मुळे पैशाचा भरणा न झाल्यास प्लाट डीफाल्टर केलं जातं. मग त्यांची पोलिसस्टेशनला तक्रार केल्यास त्यांच्याजवळ पुरेसे पैसे असल्यानं ते पोलिसांना अगदी मैनेज करतात व आपली सुटकाही करुन घेतात. हेच बिल्डरच्या बाबतीतही घडतं.
बिल्डर हा भुमाफियाचा भाऊच. त्याला मोठा भाऊ म्हटलं तरी चालेल. हा मोठा भाऊ गाळे करुन पार्ट्यांना विकतो. त्यात ज्या महाभागांना गाळे विकतो. त्या महाभागांना करारनामा लिहूनही देतो. त्यातच त्या गाळ्याचा मेटेनन्सखर्चही प्रत्येक माणसांकडून प्रतिमाह घेत असतो. करारात असते की ह्या गाळ्यांना कधी काळी काही कमीजास्त झाल्यास त्यांना भरपाई करण्यात येईल वा त्यांना त्या गाळ्यांची दुरुस्ती होईपर्यंत त्याची कुठतरी सोय करुन देण्यात येईल. मग गाळे दुरुस्त होताच त्यांना परत त्याच गाळ्यात स्थलांतरीत करण्यात येईल. परंतू ज्यावेळी गाळे तुटतात. त्यावेळी करारानुसार बिल्डर गाळेधारकांची सोय करुन देत नाही. शेवटी गाळेधारकांचं प्रकरण पोलिसांकडे जातं.
पोलिसही या गाळेधारकांची विनंती मान्य करीत नाही. कारण ते दबेल असतात बिल्डरचे. एरवी बिल्डर मनमानी पैसा पोलिसांना देत असतो ना. महत्वाचं सांगायचं झाल्यास बिल्डिरकडून लोकांची फसवणूक होत असली तरी पोलीसांचा त्यास पाठिंबा असल्यानं गाळेधारकांचं काहीच चालत नाही. शेवटी ते प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ होतं. पण न्यायालयातही वेळकाढू धोरण असल्यानं खटले वर्षोगणती चालतात. शेवटी गाळेधारकांच्या कित्येक पिढ्या जातात खटले लढता लढता. शेवटी त्रासून हे खटले सोडून देतात गाळेधारक. हीच अवस्था किरायेदाराची व घरमालकाची आहे.
अलिकडे किरायेदार व घरमालक यांच्या प्रकरणावर आधारीत असलेल्या कायद्यात संसदेत बदल करण्यात आलेला आहे. त्याचं कारणंही तसंच. कारण किरायेदार व घरमालकांची प्रकरणं न्यायालयात न्यायप्रविष्ट असून वेळकाढू धोरणानं चालत अाहेत. कित्येक घरं ही किरायेदारानं मारलेली आहेत. अर्थात कित्येक घरावर किरायेदारानं ताबा केलेला आहे.
एखादा घरमालक हा एक एक रुपया गोळा करुन पैसा गोळा करतो. त्यात तो एक लहानशी जागा विकत घेतो. त्यावर एक लहानसं घर बांधतो. त्यात तो राहतो व उरलेले काही कमरे आपल्या संसाराला आर्थीक सहाय्य व्हावं म्हणून किरायानं देतो. परंतू काही दिवसानं तोच किरायेदार घरमालक बनण्याची स्वप्न पाहतो. तो किराया तर देतच नाही. उलट वीजेचं शुल्क, नळाचं शुल्कही देणं बंद करतो. त्यातच घरमालक परेशान होत असतो.
घरमालक या किरायेदाराकडून परेशान होतो. तो त्याला वारंवार निघायला सांगतो. परंतू तो निघत नाही. घरमालक त्याचे सामानही फेकू शकत नाही वा खालीही करु शकत नाही. त्यातच कमरा खाली करायचा असेल तर एवढे एवढे पैसे द्यावे लागतील असेही किरायेदार म्हणत असतो. अन् सामान....... सामान फेकलं तर तो पोलिसात जातो. तक्रार करतो व बिचा-या गरीब घरमालकावर कारवाई होते. त्यातच प्रकरण न्यायप्रविष्ट होते व खटले न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं लांब चालत असतात. तोपर्यंत किरायेदाराचं किराया देणं बंद असतं. त्याला फुकटमध्ये जागा वापरायला मिळत असते. आपलंच मकान व आपणच चोर अशी अवस्था घरमालकाची होत असते. या मकान आणि घरमालकाच्या प्रकरणात कधी कधी जीवही जात असतात. मकान मालक जर जबर असेल तर तो किरायेदाराचा जीव घेतो आणि किरायेदार जर जबर असेल तर तो मकान मालकांचा जीव घेत असतो. यासाठी ठोस कायदे करण्याची गरज होती. ती गरज अलिकडे बनलेल्या कायद्यानं दूर होईल असे वाटते.
सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार अलिकडे जोमात वाढला. त्याला कारणंही तसंच घडलं. त्यांना माहित आहे की समजा त्यांच्याविरोधात तुटपुंज्या पैशासाठी कोणीही पोलिसस्टेशनला जाणार नाही. गेलाच तर त्याला पोलिसांना सादर करायला योग्य पुरावे मिळणार नाही. अन् मिळालेच तर पैशाच्या व ओळखीच्या जोरावर दाबून टाकू प्रकरणं अन् तशीेही प्रकरणं दबली नाहीत तर न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं न्यायच मिळू देणार नाही आणि समजा पुराव्याअभावी वेळकाढू धोरणानं आपण जिंकलोच तर उद्या ज्यानं आपल्यावर खटला टाकला. त्यालाच मानहानी दाव्यातंर्गत न्यायालयात खिचू. यामुळं यानंतर कोणीही आपल्या वाट्याला जाणार नाही.
सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार असाच वाढला. काही काही प्रकरणात भ्रष्टाचार झाला. प्रकरणं पोलिसात गेली. पोलिसांनी तक्रार करणा-यालाच झापले. त्यातच तक्रारकर्ता चूप न बसल्यानं प्रकरणं न्यायप्रविष्टही झाली. त्यातच न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं ती प्रकरणं अशीच न्यायालयात प्रलंबीत राहिली. त्यातच पुराव्याअभावी त्या प्रकरणांचा निकालही लागला. मग काय उलटा चोर कोतवाल को दाटेसारखं मानहानीची प्रकरणं. कोण वाट्याला जाईल सरकारी यंत्रणेच्या. मग सरकारी यंत्रणा शिरजोर आणि मुजोर होणार नाही तर काय?
हेच सत्र सुरु आहे आज. आज चोर चोरी करीत असून तोच स्वतः साव असल्याचं आवर्जून सांगतो. त्याचा गाजावाजाही होतो. त्याची इज्जतही होते. त्याची साधी चौकशी करीत नाही कोणी. मग सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार वाढणार नाही तर काय? आज हा भ्रष्टाचार केवळ सरकारी कार्यालयातच नाही तर त्याची झळ खाजगी क्षेत्रालाही लागलेली आहे. परंतू खाजगी क्षेत्रात मालकमौजा काम असल्यानं तिथं इमानदारीनं काही अंशी काम होत असतं. परंतू सरकारी क्षेत्रात तसे होत नाही. म्हणूनच आज लोक खाजगी क्षेत्रावर विश्वास करुन खाजगी क्षेत्र वाढत आहेत. सरकारी क्षेत्रावरील लोकांचा विश्वास कमी होत आहे आणि लोकांना माहित आहे की सरकारी क्षेत्रातील कामे करायचीच असतील तर भ्रष्टाचार केल्याशिवाय होवू शकत नाही. म्हणून भ्रष्टाचारही वाढत आहे.
विशेष सांगायचं म्हणजे आज लोकं जागृत झाले असले तरी सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार संपवायला मार्ग नाही. मोबाइल माध्यम आलं तरी त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यातच बिल्डर असो की किरायेदार, भुमाफिया असो की साधा तलाठी कोणीच या सरकारी यंत्रणेच्या प्रभावाने व न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं घाबरायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी सर्व देशातील सरकारी क्षेत्र खाजगी होतील व देशही विकला जाईल हे विसरता कामा नये. अन् जेव्हा हे सर्व क्षेत्र सरकारी न राहता खाजगी होईल. तेव्हा गरीबांना किंमत राहणार नाही. पैसाच चालेल आणि पैसाच बोलेल.

आज भ्रष्टाचार चरणसीमेला आहे. तो वाढण्याची कारणे म्हणजे लोभ आणि स्वार्थ हा होय. तसेच त्यावर सरकारचे नियंत्रण नसणे. आज सरकारी राशनचे दुकान असो वा साधा टैक्स लावण्याचं ठिकाण असो. पैसे दिल्याशिवाय आपले कामच होत नाही. त्यातच ज्यांच्याजवळ पैसे नाहीत देण्यासाठी. त्यांची कामं ही रेंगाळत होत असतात.
मुख्य म्हणजे त्यांची कामं ही रेंगाळत होत असतात असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आज अशी कामं करीत असतांना त्या यंत्रणेचा भोंगळ कारभार दृष्टीस पडत असतो.
आज हा भ्रष्टाचार राशन दुकानात दिसतो तो असा की जेवढे किलो धान्य एका ग्राहकासाठी येतो. तेवढे किलो धान्य त्यांना मिळत असेलच असे नाही. हा भ्रष्टाचारच. टैक्स लावण्यासाठी होत असलेला भ्रष्टाचार असा की टैक्स जर लावायचा असेल साहेबांना काही पैसे द्यावे लागतात.
भ्रष्टाचार हा जागोजागी दिसत आहे. शेतक-यांना मिळणारी बियाणे ही सरकारी यंत्रणेतून मिळत असतांना त्यात सातबारा जोडावा लागत असतो. परंतू हा सातबारा मिळविण्यासाठीही भ्रष्टाचार होत असतो. साधा सातबारा देण्यासाठी तलाठी हे काही पैसे घेत असतात. ते पैसे शेतक-यांना परवडणारे नसतातच. कारण अलिकडे पैसे नसल्यानं शेतकरी आत्महत्या घडत आहेत.
भ्रष्टाचार हा सरकारी रुग्णालयातही आहे. सरकारी रुग्णालयात एकदा भरती झाल्यानंतर तो व्यक्ती परत येईलच घरी.याचा काही नेम नसतो. कारण हाच भोंगळ कारभार. सरकारी रुग्णालयात आजारी व्यक्तींना जेव्हा जेव्हा एखादी सोय अति आवश्यक असते. तेव्हा तेव्हा त्याला ती सोय ताबडतोब मिळत नसल्यानं वा लवकर उपलब्ध होत नसल्यानं रुग्ण मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त सरकारी रुग्णालयात जास्त असते. त्यामुळं की काय खाजगी रुग्णालयाची संख्या वाढत चालली आहे. त्यातच उपचार करणारेही सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगी रुग्णालयांना जास्त पसंती देत असतात. कोरोनाच्या काळातही तेच चित्र दिसलं. कोरोना काळात सरकारी रुग्णालयात जे भरती झाले. त्यांना ताबडतोब सोय उपलब्ध न झाल्यानं ते मरण पावले. मात्र ज्यांच्याजवळ पैसा होता. त्यांनी खाजगी इस्पीतळात उपचार केला. ते सुधारले. मात्र त्यांना पाण्यासारखा पैसा ओतावा लागला.
आज जिथं पाहिलं तिथं गरीबांचं मरणच मरण आहे. ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे. ती मंडळी हवी ती हौसमौज करीत असतात. तर ज्यांच्याजवळ पैसा नाही. ती मंडळी मात्र श्रीमंतांचा त्रासही सहन करीत असतात. आज हीच गरीब सामान्य मंडळी कशीबशी पैसा गोळा करुन एक लहानशी जागा विकत घेतात. त्यावर छोटसं मकान बनवतात. परंतू ही जागा घेतांना पुढं त्यांना भुमाफियांच्या त्रासाला समोरे जावे लागते. भुमाफिया हे त्या व्यक्तींना जागा तर विकतात. मात्र सर्व नियम प्लाट टाकतांना आपल्या बाजूचे बनवितात. त्याची कल्पना ही त्या प्लाटधारकांना नसते. मग एखाद्या वेळी गरीबी मुळे पैशाचा भरणा न झाल्यास प्लाट डीफाल्टर केलं जातं. मग त्यांची पोलिसस्टेशनला तक्रार केल्यास त्यांच्याजवळ पुरेसे पैसे असल्यानं ते पोलिसांना अगदी मैनेज करतात व आपली सुटकाही करुन घेतात. हेच बिल्डरच्या बाबतीतही घडतं.
बिल्डर हा भुमाफियाचा भाऊच. त्याला मोठा भाऊ म्हटलं तरी चालेल. हा मोठा भाऊ गाळे करुन पार्ट्यांना विकतो. त्यात ज्या महाभागांना गाळे विकतो. त्या महाभागांना करारनामा लिहूनही देतो. त्यातच त्या गाळ्याचा मेटेनन्सखर्चही प्रत्येक माणसांकडून प्रतिमाह घेत असतो. करारात असते की ह्या गाळ्यांना कधी काळी काही कमीजास्त झाल्यास त्यांना भरपाई करण्यात येईल वा त्यांना त्या गाळ्यांची दुरुस्ती होईपर्यंत त्याची कुठतरी सोय करुन देण्यात येईल. मग गाळे दुरुस्त होताच त्यांना परत त्याच गाळ्यात स्थलांतरीत करण्यात येईल. परंतू ज्यावेळी गाळे तुटतात. त्यावेळी करारानुसार बिल्डर गाळेधारकांची सोय करुन देत नाही. शेवटी गाळेधारकांचं प्रकरण पोलिसांकडे जातं.
पोलिसही या गाळेधारकांची विनंती मान्य करीत नाही. कारण ते दबेल असतात बिल्डरचे. एरवी बिल्डर मनमानी पैसा पोलिसांना देत असतो ना. महत्वाचं सांगायचं झाल्यास बिल्डिरकडून लोकांची फसवणूक होत असली तरी पोलीसांचा त्यास पाठिंबा असल्यानं गाळेधारकांचं काहीच चालत नाही. शेवटी ते प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ होतं. पण न्यायालयातही वेळकाढू धोरण असल्यानं खटले वर्षोगणती चालतात. शेवटी गाळेधारकांच्या कित्येक पिढ्या जातात खटले लढता लढता. शेवटी त्रासून हे खटले सोडून देतात गाळेधारक. हीच अवस्था किरायेदाराची व घरमालकाची अाहे.
अलिकडे किरायेदार व घरमालक यांच्या प्रकरणावर आधारीत असलेल्या कायद्यात संसदेत बदल करण्यात आलेला आहे. त्याचं कारणंही तसंच. कारण किरायेदार व घरमालकांची प्रकरणं न्यायालयात न्यायप्रविष्ट असून वेळकाढू धोरणानं चालत अाहेत. कित्येक घरं ही किरायेदारानं मारलेली आहेत. अर्थात कित्येक घरावर किरायेदारानं ताबा केलेला आहे.
एखादा घरमालक हा एक एक रुपया गोळा करुन पैसा गोळा करतो. त्यात तो एक लहानशी जागा विकत घेतो. त्यावर एक लहानसं घर बांधतो. त्यात तो राहतो व उरलेले काही कमरे आपल्या संसाराला आर्थीक सहाय्य व्हावं म्हणून किरायानं देतो. परंतू काही दिवसानं तोच किरायेदार घरमालक बनण्याची स्वप्न पाहतो. तो किराया तर देतच नाही. उलट वीजेचं शुल्क, नळाचं शुल्कही देणं बंद करतो. त्यातच घरमालक परेशान होत असतो.
घरमालक या किरायेदाराकडून परेशान होतो. तो त्याला वारंवार निघायला सांगतो. परंतू तो निघत नाही. घरमालक त्याचे सामानही फेकू शकत नाही वा खालीही करु शकत नाही. त्यातच कमरा खाली करायचा असेल तर एवढे एवढे पैसे द्यावे लागतील असेही किरायेदार म्हणत असतो. अन् सामान....... सामान फेकलं तर तो पोलिसात जातो. तक्रार करतो व बिचा-या गरीब घरमालकावर कारवाई होते. त्यातच प्रकरण न्यायप्रविष्ट होते व खटले न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं लांब चालत असतात. तोपर्यंत किरायेदाराचं किराया देणं बंद असतं. त्याला फुकटमध्ये जागा वापरायला मिळत असते. आपलंच मकान व आपणच चोर अशी अवस्था घरमालकाची होत असते. या मकान आणि घरमालकाच्या प्रकरणात कधी कधी जीवही जात असतात. मकान मालक जर जबर असेल तर तो किरायेदाराचा जीव घेतो आणि किरायेदार जर जबर असेल तर तो मकान मालकांचा जीव घेत असतो. यासाठी ठोस कायदे करण्याची गरज होती. ती गरज अलिकडे बनलेल्या कायद्यानं दूर होईल असे वाटते.
सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार अलिकडे जोमात वाढला. त्याला कारणंही तसंच घडलं. त्यांना माहित आहे की समजा त्यांच्याविरोधात तुटपुंज्या पैशासाठी कोणीही पोलिसस्टेशनला जाणार नाही. गेलाच तर त्याला पोलिसांना सादर करायला योग्य पुरावे मिळणार नाही. अन् मिळालेच तर पैशाच्या व ओळखीच्या जोरावर दाबून टाकू प्रकरणं अन् तशीेही प्रकरणं दबली नाहीत तर न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं न्यायच मिळू देणार नाही आणि समजा पुराव्याअभावी वेळकाढू धोरणानं आपण जिंकलोच तर उद्या ज्यानं आपल्यावर खटला टाकला. त्यालाच मानहानी दाव्यातंर्गत न्यायालयात खिचू. यामुळं यानंतर कोणीही आपल्या वाट्याला जाणार नाही.
सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार असाच वाढला. काही काही प्रकरणात भ्रष्टाचार झाला. प्रकरणं पोलिसात गेली. पोलिसांनी तक्रार करणा-यालाच झापले. त्यातच तक्रारकर्ता चूप न बसल्यानं प्रकरणं न्यायप्रविष्टही झाली. त्यातच न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं ती प्रकरणं अशीच न्यायालयात प्रलंबीत राहिली. त्यातच पुराव्याअभावी त्या प्रकरणांचा निकालही लागला. मग काय उलटा चोर कोतवाल को दाटेसारखं मानहानीची प्रकरणं. कोण वाट्याला जाईल सरकारी यंत्रणेच्या. मग सरकारी यंत्रणा शिरजोर आणि मुजोर होणार नाही तर काय?
हेच सत्र सुरु आहे आज. आज चोर चोरी करीत असून तोच स्वतः साव असल्याचं आवर्जून सांगतो. त्याचा गाजावाजाही होतो. त्याची इज्जतही होते. त्याची साधी चौकशी करीत नाही कोणी. मग सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार वाढणार नाही तर काय? आज हा भ्रष्टाचार केवळ सरकारी कार्यालयातच नाही तर त्याची झळ खाजगी क्षेत्रालाही लागलेली आहे. परंतू खाजगी क्षेत्रात मालकमौजा काम असल्यानं तिथं इमानदारीनं काही अंशी काम होत असतं. परंतू सरकारी क्षेत्रात तसे होत नाही. म्हणूनच आज लोक खाजगी क्षेत्रावर विश्वास करुन खाजगी क्षेत्र वाढत आहेत. सरकारी क्षेत्रावरील लोकांचा विश्वास कमी होत आहे आणि लोकांना माहित आहे की सरकारी क्षेत्रातील कामे करायचीच असतील तर भ्रष्टाचार केल्याशिवाय होवू शकत नाही. म्हणून भ्रष्टाचारही वाढत आहे.
विशेष सांगायचं म्हणजे आज लोकं जागृत झाले असले तरी सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार संपवायला मार्ग नाही. मोबाइल माध्यम आलं तरी त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्यातच बिल्डर असो की किरायेदार, भुमाफिया असो की साधा तलाठी कोणीच या सरकारी यंत्रणेच्या प्रभावाने व न्यायालयाच्या वेळकाढू धोरणानं घाबरायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी सर्व देशातील सरकारी क्षेत्र खाजगी होतील व देशही विकला जाईल हे विसरता कामा नये. अन् जेव्हा हे सर्व क्षेत्र सरकारी न राहता खाजगी होईल. तेव्हा गरीबांना किंमत राहणार नाही. पैसाच चालेल आणि पैसाच बोलेल.
तीन वाजले होते. अर्जून आपल्या मुलीला घेवून रुग्णालयात पोहोचला होता. जे सरकारी रुग्णालय होतं. तसं पाहता तिला ताबडतोब उपचाराची गरज होती.
ते सरकारी रुग्णालय. त्या ठिकाणी डॉक्टर मंडळी होती. ती जागी होती. त्यांनी ताबडतोब सुकन्याला तपासलं. तसं त्यांनी तिचा एक्स्रा काढायला लावला. तसं एका चिठ्ठीवरही लिहून दिलं.
ते सरकारी रुग्णालय. ती डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी घेवून अर्जून क्ष किरण कार्यालयाजवळ गेला. त्या ठिकाणी तसा फलक होता आणि त्या फलकावर लिहिलं होतं चोवीस तास अहर्निश सेवा. दरवाजा लावला होता. तसा अर्जूननं दरवाजा ठोठावला.
अर्जूननं दरवाजा ठोठावला खरा. पण आतून काही आवाज आला नाही. तसा अर्जूननं आणखी जोरात दरवाजा ठोकला. त्याचबरोबर एक व्यक्ती दरवाजाजवळ दरवाजा ठोठावताच आला. ओरडला आणि म्हणाला,
"रात्रीच्या वेळी कार्यालय बंद असतं. सकाळी सहाला उघडेल. तोपर्यंत झोपू द्या."
अर्जून विचार करीत होता की जिथं चोवीस घंटे अहर्निश सेवा लिहिली आहे. जे सरकारी रुग्णालय आहे. तिथं रात्रीच्या वेळी चक्क कर्मचारी झोपतात. त्यांना रुग्णांची काहीही पर्वा नाही. याच गोष्टीचं आश्चर्य अर्जूनला वाटत होतं. कारण अर्जूनला सकन्याची काळजी वाटत होती. त्याला वाटत होतं की त्याची बाळी सुकन्या जगेल की नाही.
एक एक क्षण मोठा कठीण जात होता. क्ष किरण विभाग अजूनही उघडायचा होता. तसं पाहता त्या क्ष किरण विभागातील अधिका-यानं सांगीतल्यानुसार पुन्हा दरवाजा ठोकता येत नव्हता. तशी भीतीही वाटत होती की हे डॉक्टर आपल्या मुलीला मारुन टाकणार तर नाही. त्याचं कारणंही तसंच घडलं होतं. त्याचे बरेचसे नातेवाईक व त्याचे बाबा याच रुग्णालयात मरण पावले होते. तेही अशाच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं.
चोवीस तास अहर्निश सेवा. असं एक वाक्य. ते वाक्य पेट्रोल पंप किंवा आकस्मीक ठिकाणी हे वाक्य लिहिलेलं असतं. आकस्मीक ठिकाणं कोणती? तर देशातील पोलिस स्टेशन, अग्नीशमन विभाग, सैनिक छावणी तसेच रुग्णालये. या सर्वातही काहीकाही ठिकाणी लिहिलेलं असतं हे वाक्य. त्याचा अर्थ असा असतो की ती सेवा त्या कर्मचा-यांना चोवीस तास सतत करावी लागते डोळ्यात तेल घालून. कारण तशी सेवा त्यांनी केली नाही तर देशातील नागरीकांवर संकट येत असते. कधीकधी न्यायालयेही अशा आकस्मीक गोष्टीसाठी अर्ध्या रात्री उघडली जातात.
आग लागणे ही नैसर्गीक घटना. जर एखाद्या ठिकाणी आग लागलीच आणि त्या आगीच्या वेळी चोवीस तास सेवा देणा-या अग्नीशमन दलांने जर तशी सेवा आग लागण्याच्या वेळी दिली नाही तर आग आटोक्यात येणार नाही व ज्या ठिकाणी आग लागली. त्या ठिकाणासह आग पसरत जावून ती आग त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या भागालाही नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या प्रकारचं वाक्य लिहिलेलं असतं. पोलिसस्टेशनचंही तसंच आहे. गुन्हे काय सांगून घडत नाहीत. एखाद्या वेळी ऐन मध्यरात्री अचानक पोलिस स्टेशनला फोन वाजतो की देशात आतंकवादी शिरलेत आणि सर्व यंत्रणा जागी होते. यावेळी जर चोवीस तास अहर्निश सेवा घडली नाही तर हे आतंकवादी ज्या शहरात शिरले. त्या शहराला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.
ज्याप्रमाणे देशातील नागरीकांच्या भवितव्याचा विचार करतांना पोलिस यंत्रणा आणि अग्नीशमन यंत्रणा काम करीत असतात. त्याचप्रमाणे देशाचे रक्षण करणारे सैनिकही देशाच्या सीमेवर चोवीस तास अगदी डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. तो काळ आता गेला की रात्रीला युद्ध होत नाही.
पुर्वी युद्धाचे विशेष नियम होते. शत्रूच्या हातात शस्र असेल तरच त्याच्यावर वार करणे हा नियम होता. तसेच सायंकाळी सुर्य मावळला तर युद्ध बंद होत असे. पण ते नियम या देशावर सातव्या शतकात आक्रमण करणा-या यवनांनी मोडीस काढले. त्या यवनांनी सातव्या शतकात रात्रीच्या प्रहराला देवल बंदरावर हल्ला करुन सिंधचा राजा दाहिरच्या पुत्रावर हल्ला करुन त्याला जंगलात पळावयास भाग पाडले होते. तसेच बाराव्या शतकात पृथ्वीराज चव्हानवर मोहम्मद घोरीनं रात्रीच्याच वेळी हल्ला चढवला होता आणि त्याला पकडून कैद करुन नेले होते. तिच कृती नव्हे तर पुनरावृत्ती शिवाजी महाराजांनी केली. पुण्याच्या लाल महालात शायीस्तेखान लपून बसला असता त्याच्या महालावर रात्रीच्याच वेळी शिवरायांनी हल्ला केला होता. बरं झालं खान पळाला म्हणून नाहीतर त्याचा त्या रात्रीच्या प्रहरात जीवच गेला असता. तो पळाला म्हणून बोटावर निभावलं. चारच बोटं कापली गेली. म्हणूनच आता युद्धाचे नियम बदलले. आता युद्ध केव्हा होईल याचा नेम नाही. चोवीस तासात केव्हाही. म्हणूनच सैनिकांना चोवीस तास डोळ्यात तेल घालून अगदी जपावं लागतं देशाला. ते चोवीस तास सतत पहारा देतात. म्हणूनच आम्ही सुखानं घरी झोपतो आहोत. हेच कार्य रुग्णालयही करीत असतं.
रुग्णालयातही केव्हा कोणत्या वेळी कोणत्या प्रकारचा रुग्ण येईल याचा काही नेम नसतो. त्यामुळं त्यांनाही चोवीस तास सेवा द्यावी लागते. जर त्यांनी चोवीस तास सेवा दिली नाही तर रुग्णांचा जीवही जावू शकतो.
देशात रुग्णांच्या सेवेसाठी व सर्वसामान्य गरीब लोकांना उपचार घेता यावा म्हणून सरकारी रुग्णालये उघडली गेली. त्यातच ती रुग्णालये चोवीस तास सेवा देत होती. पण काही कालांतरानं ही सरकारी रुग्णालये अशा प्रकारची सेवा देत नसल्यानं लोकांचा सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला. त्यातच पैसा वाढल्यानं लोकांनी सरकारी रुग्णालयात व्यवस्थीत उपचार होत नाही म्हणून खाजगी रुग्णालयात जावू लागले. तसेच सरकारी रुग्णालयातील डॉक्टरही अशा खाजगी रुग्णालयात आपली सेवा देवू लागले. तसेच पैसा कमविण्यासाठी ते मोठं रुग्णालय उघडून पैसा कमवू लागले. अशा खाजगी रुग्णालयात उपचार करतांना ते रुग्णालय मालिकमौजा असल्यानं चोवीस तास अहर्निश सेवा देवू लागले. परंतू सरकारी रुग्णालयातील कर्मचारी हे अशा प्रकारच्या अहर्निश सेवेची टाळाटाळ करु लागले. अर्थातच शेवटी जीव वाचावा यासाठी लोकांनी साहजिकच कर्ज काढून आपल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात नेवून उपचार करणे सुरु केले. त्यामुळं साहजिकच खाजगी रुग्णालयाचं महत्व वाढलं.
आज या सर्व सरकारी यंत्रणा. या यंत्रणांनी चोवीस तास अहर्निश सेवा देण्याचे काम करायलाच हवे. कारण तो त्यांचा पेशा आहे आणि त्या सेवेचं त्यांना वेतनही मिळतं. जर अशी सेवा करायची इच्छा नसेल तर तो पेशा सोडून दिलेला बरा. परंतू अशी सेवा करायची सोडून जर त्यांनी आपल्या ड्युटीच्या काळात झोपा काढल्या तर कुठंतरी देशाचं अहितच होईल. देश काही झोपा काढण्याचा पैसा देत नाही.
ही रुग्णालये किंवा या सर्व सेवा देशातील सर्व लोकांच्या पैशातून चालतात. जनता जी कराच्या रुपात सरकारला पैसा देत असते. तो कर कुठंतरी या सेवा करणा-या लोकांच्या वेतनाचा हिस्सा बनतो. मग असा कर देणा-या व्यक्तींमध्ये केवळ श्रीमंत व्यक्तींचाच समावेश असतो असे नाही. त्यात गरीब सर्वसामान्य लोकांचाही समावेश असतो. म्हणून अशा सेवा देतांना हा श्रीमंत आहे. चला तत्परतेन याचं काम करुया असं कोणत्याही चोवीस तास सेवा देणा-या कर्मचा-यानं म्हणू नये. ज्याला वेतन सरकार देतं किंवा हा गरीब आपल्याला काय देणार असं म्हणून त्याची हेळसांड करु नये. कारण तोही तेवढाच कर देतो श्रीमंतांएवढाच. कर देतांना भेदभाव नसतोच. परंतू हे जरी खरं असलं तरी देशातील या सर्वच यंत्रणा ह्या सेवा देतांना कधीकधी गरीब श्रीमंत असा भेदभाव करतांना आढळतात. त्यांना चोवीस तास अहर्निश सेवा देत नाहीत. त्यांची हेळसांड करतात. जणू त्यांची वागणूक पाहून असं वाटते की या सर्वसामान्य गरीब माणसांनी गरीबीत जन्म घेवून फार मोठा गुन्हा केलेला असावा. आज बरेचसे चोवीस तास सेवा करणारे कर्मचारी रात्रपाळीत नोकरी करीत असतांना तो त्यांचा पेशा असतांनाही स्वतः मात्र झोपा काढतात. विशेषतः सरकारी रुग्णालयात अशी गत दिसून येते. त्यातच रुग्ण मरतही असतात. कर्मचा-यांचं काय जातं. काहीच जात नाही. मरणारा माणूस मरुन जातो. ज्यांच्या घरचा कमविता जीव जातो. त्याला फरक पडतो. इतरांना कोणताच फरक पडत नाही. यातूनही गुन्हेगार निर्माण होवू शकतात. जो व्यक्ती मरतो. तो व्यक्ती जर महत्वाचा असेल तर त्यांच्या वंशजांच्या मनात असुया निर्माण होवून ते मानसिक विकृत बनू शकतात. त्याच मानसिक विकृतीतून पुढे ते डॉक्टर, परीचारीका किंवा रुग्णालय कर्मचारी यांना जीवे मारतही सुटू शकतात. पोलिसस्टेशनचेही तसेच आहे. तिथेही जर गरीबांचं न ऐकता खटला नोंदवून घेतला गेला नाही तर उद्या याच गरीबातून गुन्हेगार निर्माण होवू शकतात. जे पोलिसस्टेशनलाच नाही तर देशातील अंतर्गत सुरक्षा ठेवण्यास घातक ठरु शकतात. त्यांच्यातही मानसिक विकृती निर्माण होवून तेही पोलिस कर्मचा-यांना जीवे मारत सुटू शकतात. अग्नीशमनमध्येही तेच आहे. जर एखाद्या गरीबाचं घर जळलं आणि त्याला आकस्मीक तातडीची मदत या दलाकडून झाली नाही तरही मानसिक विकृतीचे रुग्ण. ते रुग्ण नव्हे तर गुन्हेगारच असतात. तसेच देशाची सेवा करणारे सैनिक जर चोवीस तास अहर्निश सेवा करीत नसतील तर देशावर शत्रू राष्ट्राकडून वारंवार हमले होतील व एक ना एक दिवस कोणताही देश गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
विशेष सांगायचं म्हणजे ज्या काही देशात चोवीस तास अहर्निश राबणा-या सेवा आहेत. त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे आळस न बाळगता करायलाच हवं. त्या जर तशा सेवा करीत नसतील तर देशात अंतर्गत गुन्हेगारी निर्माण होवू शकते हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या ड्युटीच्या वेळा रात्रपाळीच्या असतात. त्यांनी दिवसा चांगली झोप काढून रात्री आपल्या ड्युटीदरम्यान जागता पहारा द्यावा. झोपा काढू नयेत. जेणेकरुन नागरीकांची सेवा तर होईल. तसेच नागरीकांनाही आपल्या देशातील या चोवीस तास अहर्निश सेवेबद्दल आणि कर्मचा-याबद्दल अभिमान वाटेल यात तिळमात्र शंका नाही.

************************************************************************************************
पाहता पाहता सकाळचे सहा वाजले होते. क्ष किरण विभाग अद्यापही उघडला नव्हता. तसा अर्जून सतरा वेळा त्या ठिकाणी जावून चक्कर मारतच होता. आतापर्यंत अर्जूनच्या दहाएक चकरा होवून गेल्या होत्या. तसा तो विभाग केव्हा उघडतो केव्हा नाही असं त्याला होवून गेलं होतं.
सकाळचे सात वाजले होते. तो क्ष किरण विभाग आता उघडला होता. जसा तो विभाग उघडला. तसा अर्जून मगापासून जी तो विभाग उघडायची वाट पाहात होता. तो निश्चींत झाला. त्यानं आपल्या मुलीला त्या ठिकाणी नेलं. तिची तपासणी केली. त्यातच इसीजी काढलं गेलं. ते डॉक्टरांना दाखवण्यात आलं व त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुकन्याला एका वार्डात दाखल करण्यात आलं.
************************************************************************************************
तो रुग्णालयाचा हाल भरलेला होता. त्या ठिकाणी सुकन्याला पाठविण्यात आलं. पण सुकन्या लहानसं तान्ह बाळ. त्या तान्ह्या बाळाला जंतूसंसर्ग होण्याची जास्त भीती होती. त्यामुळं वार्डातील डॉक्टरांनी तिला आय सी यु मध्ये ठेवावं अशी सुचना केली होती. त्यानुसार सुकन्याला आय सी यु मध्ये ठेवण्यात आले होते. ते आय सी यु........त्याठिकाणी इतर लोकांना परवानगी नव्हती.
रुग्णाच्या रोगाचे निदान करणे आणि त्यावर वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचार करणे यांसाठी उभारलेली, योग्य कर्मचारी वर्गाची व साधनसामग्रीची तरतूद असलेली संस्था म्हणजे रुग्णालय होय. रुग्णालयात उपचार काळात काही रुग्णांची निवासाची सोय करणे आवश्यक असते. आरोग्य तपासणी व प्रसूती यांसारख्या आरोग्य व शारीरिक स्वास्थ टिकविण्याशी संबंधित असलेल्या बाबींचीही रुग्णालयात व्यवस्था असावी लागते. जेथे रुग्ण प्रत्येक भेटीनंतर घरी परत जातो असे चिकित्सालय वा दवाखाना यांच्यात व रुग्णालयात फरक करणे जरूरीचे आहे. त्याचप्रमाणे वृद्धदुखण्यातून उठलेले रुग्ण गरीब व्यक्ती यांच्याकरिता चालविण्यात येणारा व वैद्यकीय सेवा थोडी वा मुळीच पुरविली जात नाही असा आश्रम आणि रुग्णालय यांत भेद करणे आवश्यक आहे.
रुग्णालयाचा इंग्रजी प्रतिशब्द ‘हॉस्पिटल’ हा लॅटिन भाषेतील hospitium (याचा अर्थ जिथे पाहुण्यांचे वा अतिथींचे स्वागत होते अशी जागा) या शब्दावरून व hospitalis या विशेषणावरून आलेला आहे. हॉस्पिस, हॉपिताल, हॉटेल,स्पिटल व होस्टेल ही संबंधित शब्दरूपे आहेत. आधुनिक इंग्रजी भाषेत हॉस्पिटल हा शब्द ‘घर’ (होम) असे सूचित करण्यावर भर देण्यात येतो. हॉटेल हा शब्द पथिकाश्रम वा खानावळ या अर्थाने वापरला जातो. फ्रेंच भाषेतील ‘हॉतेल द्यू’ ही संज्ञा मात्र सार्वजनिक रुग्णालय या अर्थाने वापरली जाते.
अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून रुग्णालय ही सामान्यतः कारागृहापेक्षा थोडीशी बरी अशी जागा होती आणि कित्येकांना मृत्युगृहाइतकी त्याची भीती वाटत असे. विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास अतिप्रगत वैद्यकीय तंत्रे वापरून रुग्णांची शक्य तेवढी उत्तम परिचर्या करणारी रुग्णालये ही जटिल संस्था बनली आहेत.
बरीचशी रुग्णालये आता तिहेरी कार्य करतात.
रुग्णांचे संगोपन करण्यात वैद्यकीय व्यवसायाला मदत व पाठबळ देणे, आरोग्य सेवा व्यवसायांत प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, रोगाचे कारण व त्यावरील उपाय शोधण्यासाठी वैद्यकीय संशोधनाच्या सुविधा पुरविणे. अशा प्रकारे वैद्यकीय संगोपन, अध्यापन व संशोधन ही तीन कार्ये रुग्णालयाची मूलभूत तत्त्वे बनलेली आहेत. इतिहास
रुग्णाची काळजी घेणे ही समाजजीवनातील एक मूलभूत गरज आहे सर्व समाजांत आजारपणाला तोंड देण्याकरिता काही ना काही व्यवस्था अस्तित्वात असल्याचे आढळते. ही मूलभूत गरज असल्याचे आढळते. ही मूलभूत गरज असल्याचे तिचा लोकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाशी नेहमीच जवळचा संबंध जोडलेला गेलेला आहे. मानवाने जेव्हा प्रथम समाजव्यवस्था स्थापन केली, तेव्हाच रुग्णांच्या एकत्रीकरणाकरिता व त्यांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था असलेल्या जागा उभारण्यात आल्याचा काही पुरावा अस्तित्वात आहे. वैद्यकीय उपचारांचा नेहमी धार्मिक सेवेशी संबंध जोडण्यात आलेला आहे. प्रारंभीचे धर्मगुरू वैद्याचे वा औषधे देणाऱ्या माणसाचेही काम करीत असत. इ.स.पू. ४,००० इतक्या जुन्या काळात ख्रिश्चनपूर्व धर्मात काही देवदेवतांचा रोगमुक्तीशी संबंध असल्याचे मानले जात होते. सॅटर्न, ॲस्क्लेपिअस वा हायजिया या देवतांची मंदिरे वैद्यकीय शाळा व उपचाराखलील किंवा निरीक्षणाखालील रुग्णांसाठी विश्रांतिस्थाने म्हणून वापरली जात. ग्रीस, ईजिप्त, बॉबिलोनिया व भारतातही अशी मंदिरे अस्तित्वात होती, असे ऐतिहासिक नोंदीवरून दिसून येते. देशव्यापी रुग्णालयांची व्यवस्था असलेला भारत हा पहिलाच देश असावा इ.स. ४०२ च्या सुमारास फाहियान या चिनी प्रवाशांनी भारताला भेट दिली व येथे अनेक ठिकाणी रुग्णालये आढळल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
श्रीलंकेतून इ. स. पू. ४३२ च्या सुमारास रुग्णालये होती असे निश्चितपणे माहित आहे व त्याहीपूर्वी बुद्ध काळात भारतात रुग्णालये होती असे निश्चितपणे माहित आहे व त्याहीपूर्वी बुद्ध काळात भारतात रुग्णालये स्थापन करण्यात आलेली होती. सम्राट अशोक (इ.स. पू. तिसरे शतक) यांनी बांधलेल्या १८ रुग्णालयांत आधुनिक रुग्णालयांसारखी काही लक्षणे आढळतात. या रुग्णालयात आधुनिक रुग्णालयांसारखी काही लक्षणे आढळतात. या रुग्णालयात स्वच्छतेवर भर देण्यात येई. रुग्णांवर दयाबुद्धीने उपचार करण्यात येत व आहार चिकित्सा प्रचारात होती.
ख्रिस्ती धर्माच्या आरंभामुळे रुग्णालयांच्या स्थापनेस मोठी चालना मिळाली व रुग्णालये ही चर्च संघटनेची अभिन्न भाग बनली. इ. स. ३३५ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटीन यांनी काढलेल्या हुकूमनाम्यानुसार रोम, कॉन्स्टँटिनोपल, एफेसस व रोमन साम्राज्यातील इतर भागांत रुग्णालये विकसित करण्यात आली. इ.स. ३६९ मध्ये सीझारीआ येथे सेंट बेसिल यांनी रुग्णालय स्थापन केले. रोममध्ये पश्चिम युरोपातील पहिल्या सार्वजनिक धर्मादाय रुग्णालयाची स्थापना फॅबिओला या ख्रिश्चन स्त्रीने चौथ्या शतकात केली. या शतकापावेतो रोमन साम्राज्यातील ख्रिश्चन चर्च सदस्यांनी कुष्ठ रोगी, अपंग, अंध आणि गरीब यांच्याशी रुग्णालये स्थापन केली होती. फ्रान्समधील लीआँ येथील हॉतेल द्यू ५४२ साली व पॅरिस येथील हॉतेल द्यू ६६० मध्ये सुरू झाले. या रुग्णालयांत रुग्णांच्या शारीरिक व्याधी बऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाकडे अधिक लक्ष दिले जाई. मठवासी त्यांच्यातील आजाऱ्याची ज्या प्रकारे काळजी घेत तो अनभिज्ञ लोकांपुढे आदर्श निर्माण झाला. मठांमध्ये रुग्णशाळा असे व तेथे रुग्णांना उपचारासाठी नेण्यात येई. मठात औषधालय व बऱ्याचदा औषधी वनस्पितयुक्त बाग असे. मठांनी तेथील आजारी मठवासीयांखेरीज यात्रेकरू व इतर प्रवाशांसाठीही आपले दरवाजे खुले ठेवले होते. आठव्या ते बाराव्या शतकापर्यंत या मठ संस्थाच यूरोपातील रुग्णालीय सेवा पुरविणाऱ्या एकमेव संस्था होत्या.
रुग्णांकरिता सामाजिक मदतीची कल्पना मध्ययुगीन काळात उत्तम प्रकारे रुजली होती. पाश्चिमात्य ख्रिश्चन देशांतून ही कल्पना जेवढी प्रबळ होती. तेवढीच पौर्वात्य मुसलमानी देशांतही होती. स्पेन, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया या भागांत अरबी साम्राच्यातील ३४ रुग्णालये होती. त्यांपैकी दमास्कम (११६०) व कैरो (१२७६) येथील रुग्णालये सर्वांत मोठी व उत्तम व्यवस्था असलेली होती. कैरो येथील रुग्णालये सर्वांत मोठी व उत्तम व्यवस्था असलेली होती. कैरो येथील रुग्णालयात ज्वर रुग्ण, जखमी रुग्ण, नेत्ररोगाचे रुग्ण यांच्याकरिता व महत्त्वाच्या रोगांकरिता स्वतंत्र विभाग होते. तेथे पुरुष व स्त्री परिचारिकाही काम करीत. यांशिवाय व्याख्यानासाठी खोल्या, मोठे ग्रंथालय, स्वयंपाकगृहे, अनाथ अर्भकगृह व प्रार्थनागृह यांचीही व्यवस्था होती. ही बहुतेक रुग्णालये ख्रिश्चन धर्मीयांनी सुरू केलेली होती. मुसलमानांनी तो तो प्रदेश पादाक्रांत केल्यामुळे तो ताब्यात घेऊन नंतर त्यात अधिक सुधारणा केल्या.
मध्ययुगात रुग्णालयांच्या स्थापनेतही धार्मिक प्रभावाचे वर्चस्व चालूच राहिले. अकराव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेल्या धर्मयुद्धाच्या (क्रूसेड्‌सच्या) काळात रुग्णालयांच्या स्थापनेचा वेग वाढला. धर्मयोद्धयांचा पराभव होण्यास शत्रूपेक्षा साथीचे व इतर रोग अधिक कारणीभूत ठरले. वाहतुकीच्या मार्गावर लष्करी रुग्णालये स्थापन झाली. सेंट जॉन पंथाच्या नाइटस हॉस्पिटॅलर्स या गटाने पवित्र भूमीत (पॅलेस्टाइनमध्ये) २,००० रुग्णांची सोय असलेले रुग्णालय स्थापन केले. मध्ययुगीन काळात वैद्य व शस्त्रक्रियाविशारद यांचे कार्यक्षेत्र रुग्णालयांपासून अलगच होते. इ स ११३३ मध्ये लंडन येथे सेंट बार्‌थॉलोम्यू रुग्णालय स्थापन झाले. त्या वेळीही वैद्य, औषधे तयार करून विकणारे व शस्त्रक्रियाविशारद आपापल्या घरी वा कार्यालयात आपला व्यवसाय करीत. अगदी अनाथ व मरणोन्मुख रुग्णालयाचा आश्रय घेत. प्रबोधन काळात (सोळाव्या-सतराव्या शतकांत) रोगमुक्तीतील वैज्ञानिक बाजूवर भर देण्यात आला. धर्मसुधारणेच्या काळात (सोळाव्या शतकात) आठव्या हेन्रींनी लंडनच्या सेंट बार्‌थॉलोम्यू रुग्णालयाला वर्षांसन नेमून दिल्यावर रुग्णालयांना धर्मातीत आधार मिळण्यास प्रारंभ झाला. मध्ययुगीन काळात बहुतेक सर्व रुग्णालये मठांशी संलग्न होती व फारच थोडी शहरवासियांनी बांधलेली होती. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस लंडन वगळता इंग्लंडमध्ये इतरत्र एकही रुग्णालय नव्हते. १७१९ मध्ये काही शहरवासी व वैद्य यांनी मिळून धर्मादाय संस्था स्थापन करून वेस्टमिन्स्टर रुग्णालयाचा प्रारंभ केला. त्यानंतर गाय (१७२४), सेंट जॉर्ज (१७३३), लंडन (१७४०) वगैरे लंडनमधील बहुतेक मोठी सर्वसाधारण रुग्णालये १७६० पर्यंत स्थापन झाली.
अठराव्या शतकात मिडलसेक्स रुग्णालय देवीच्या रुग्णांसाठी, लॉक रुग्णालय गुप्तरोगांसाठी, सेंट ल्युक रुग्णालय मानसिक रोगांसाठी विशेष रुग्णालये स्थापन झाली. या नव्या विचारसरणीचा ब्रिटनमधील इतर भागांतही प्रसार झाला. अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटनमधील बहुतेक लहानमोठ्या शहरांत रुग्णालये निघालेली होती. ब्रिटनबरोबर यूरोपातही रुग्णालयांची वाढ झाली. १८३० मध्ये एकट्या पॅरिसमध्ये ३० रुग्णालये होती व त्यांत २०,००० रुग्णशय्या होत्या. हॉतेल द्यू या सर्वांत जुन्या रुग्णालयात १,००० रुग्णशय्या होत्या. जर्मन भाषिक प्रदेशांतही रुग्णालयांची संख्या वाढली. यूरोपातील खंडीय भागातील बहुतेक रुग्णालये सरकारी मालकीची होती.

************************************************************************************************

ते रूग्णालय........ त्या ठिकाणी अर्जूनची मुलगी सुकन्या भरती होती. ती वीतभर असल्यानं तिला ज्याप्रमाणे शिक्यावर लोणी टांगतात. तसं टांगलेलं होतं. तसंच तिला सलाईनच्या सुया लावलेल्या होत्या.
ते लहानसं मुल. तो पहिला दिवस होता. डॉक्टर सलाईन लावण्यासाठी तिला सुया टोचत होते. त्यातच ती पहिली सुई....... डॉक्टरनं पहिली सुई टोचली. पण नस काही मिळाली नाही. त्यातच डॉक्टरनं दुसरी सुई टोचली. ती सुई टोचताच नस सापडली. डॉक्टरनं बँडेस बांधलं आणि सांगीतलं.
" ह्या सुईची काळजी घ्या. सुई जर थांबली वा तिला व्यत्यय आलाच तर दुसरी सुई लागणार नाही. हे बाळ अगदी लहान आहे. ती फारशी मोठी नाही. तेव्हा विशेष काळजी घ्यायला हवी."
डॉक्टरांची सुचना शिरोधार्य मानून अर्जून तिची काळजी घेवू लागला. तरीही सुया ब्रेक होत असत. ते पाहून डॉक्टर अर्जूनवर रागावत असे. मात्र सुकन्याला आईचं दूध नसल्यानं तिला सुई लावावीच लागत असे. त्यातच त्या सुईमधून सुकन्याला जेवन आणि पाणी मिळत असे.
ती सुई........डॉक्टर कोणताही विचार न करता सुकन्याला कचकन टोचत असे. तो पहिला दिवस होता. अशीच डॉक्टरनं सुकन्याला सुई टोचली. तशी ती सुई टोचतांना पाहताक्षणी अर्जूनला चक्करही आला होता. पण नंतर त्यानं स्वतःला सावरलं. मनात विचार केला की हे अर्जून, हे सुयांचं चक्र तुला रोजच पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत तुझी मुलगी सुधारत नाही. तू मुख्य म्हणजे आपलं नातं विसर. विसर की ही तुझी मुलगी आहे. ही एक पेशंट आहे असा विचार कर. तसा विचार केल्यानं की काय त्यादिवशीपासून अर्जूनला चक्कर आला नाही वा कोणतंही अघटीत घडलं नाही.
सुकन्याच्या सुया नेहमीच ब्रेक होत होत्या. त्यातच अर्जूननं आपलं मन पक्कं केलं होतं. तरीही त्याला थोडंस दुःख व्हायचंच. कारण त्याच्या मनात आपल्या मुलीला वाचविण्यात प्रेम निर्माण झालं होतं. ते प्रेम आज वृद्धींगत होत चाललं होतं. आज बापाची ती अवस्था त्या लहानग्या बाळीला समजत होती की काय, कुणास ठाऊक. ती बाळीही आपल्या वर्तनातून जणू अर्जूनला बळच देत होती. तो प्रसंग होता. ज्यावेळी अर्जून सुकन्याची सुई ब्रेक होताच तिला सुई लावायला नेत असे. त्या ठिकाणी बाकीचीही लेकरं असायची. त्यांच्याही सुया ब्रेक झालेल्याच असायच्या. ज्यावेळी डॉक्टर त्या मुलांना सुया लावत. ती मुलं सुई शरीरातून आतमध्ये जाताच वेदनेनं रडत असत. पण सुकन्या अर्जूनला जणू बळ देत होती की काय, डॉक्टर तिला सलाईनसाठी सुई टोचत असे. परंतू तोंडातून किंचीतही रडण्याचा स्वर अर्जूनला ऐकायला येत नव्हता. त्या गोष्टीचं डॉक्टरही आश्चर्य करीत असे.
दिवसाचे चोवीस तास. सुया नेहमीच ब्रेक होत. त्यातच सुई ब्रेक झाली की डॉक्टर अर्जूनवर ओरडत असे. त्यातच आपल्या मुलीला त्रास होत असेल असा विचार बाप बनलेल्या अर्जूनला येत होता. त्यातच ती शिक्यावर जसं लोणी ठेवतात. तशी जमीनीपासून वर ठेवलेली मुलगी. ती थोडीफार हातपाय हालवायचीच. त्यातच सुई ब्रेक व्हायची. शिवाय ती वर शिक्यावर लहानशा अंथरुणावर झोपून असायची. ती पडण्याचीही भीती. त्यामुळं अर्जूनलाही भीती वाटायची. त्यातच त्यानं ठरवलं आता आपल्या मुलीच्या सुईला जपायचं. शक्यतोवर ती सुई ब्रेक होवू द्यायची नाही.
अर्जूननं जे ठरवलं होतं मनात की सुई ब्रेक होवू द्यायची नाही. त्यासाठी तो तासन् तास उभा राहायचा आपल्या मुलीच्या सुईचा एक भाग धरुन. त्याला झोपही यायची. पण त्यानं ठरवलं की आपण झोपायचं नाही. आपलं बाळ जगलं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आपल्या झोपेचा त्याग करायला हवा.
अर्जून झोपत नव्हता. दिवस दिवसभर. तो तासन तास उभा राहायचा मुलीजवळ. भूक तहान विसरायचा. त्याला कधी डुलकीही यायची. कधी प्रातःविधीही लागायची. पण तरीही तो ते सगळं विसरायचा आपल्या मुलीसाठी. त्याला आपल्या पत्नीचा रागही यायचा. वाटायचं की ती जर असती तर कदाचित त्याला मदत झाली असती. पण ती येणार तरी कशी? ती तर ओली बाळंतीण होती.
आज सहा दिवस झाले होते. अर्जूननं आपल्या पत्नीला बोलावले होते. ती ओली बाळंतीण होती. तिलाही आरामाची गरज होती. पण अर्जून तरी काय करणार. त्याला पत्नीची गरज होती. आज पाच दिवसपर्यंत तो झोपला नव्हता. त्याला झोप लागली नव्हती. कारण तो आपल्या मुलीच्या आजारानं त्रस्त होता.
सहा दिवस झाले होते. अर्जूनला आज आपल्या पत्नीचा राग येत होता. त्याचं कारणही तसंच होतं.
पहिल्याच दिवशी आई व बाळाला ज्या विधात्यानं जन्म दिला. त्या विधात्यानं वेगळं केलं होतं बाळाला आईपासून. अर्जूनला तर बाळी डोळ्यासमोर सतत होती. परंतू ज्या मातेनं सुकन्याला जन्म दिला. ती माता आपल्या बाळीपासून सहा दिवसापासून वंचित होती.
इकडे सुकन्या भरती होती तर तिकडे दुस-या रुग्णालयात त्याची पत्नी भरती होती. त्यातच तिलाही बाळीला भेटावसं वाटत होतं. पण ती ओली बाळंतीण.
तिला तीन दिवसानं सुटी झाली होती. तसं पाहता तिलाही सख्त आरामाची गरज होती.
आज विधाता रुसला होता. त्यानं तिला आराम करु दिला नाही. आज सहाव्या दिवशी तिला राहावंसं वाटत नव्हतं. तशी ती बाळीला पाहायला रुग्णालयात आली. त्यातच तिला जावंसं वाटत नसल्यानं ती त्या रुग्णालयातच थांबली.
तिचं नाव सानित्रा होतं. ज्या काळात सानित्राला सुख हवं होतं. तिला मालिश हवं होतं. तिला गरम पदार्थ खाणे गरजेचे होते. तसेच तिला गरम पाण्यानं अंघोळ हवी होती. एवढंच नाही तर वातावरणही गरमावट हवं होतं आणि पलंगावर झोपणं हवं होतं. त्या काळात सानित्राला आय सी यूच्या थंड वातावरणात राहावं लागलं. झोपायला पलंग मिळाला नाही. तर खाली झोपावं लागलं. त्यातच वेळेवर खायलाही मिळत नव्हतं. खायला जे मिळत होतं, ते रुग्णालयातील पदार्थ होते. ज्यात जखम चिघळविणा-या पदार्थांचा समावेश होता.
सानित्राला तिच्या नातेवाईकानं रुग्णालयात आणलं. परंतू सानित्रा आपल्या नातेवाईकासोबत घरी गेली नाही. तशी इच्छा तिची तर नव्हती. तिच्या पतीचीही नव्हती. आज अर्जूनला बरं वाटत होतं. कारण त्याची पत्नी आली होती.,आता त्याला वाटत होतं की आपण आळीपाळीनं आपल्या मुलीला सांभाळू. समजा त्याला प्रातःविधीला जायचे असेल तर तो जावू शकेल. त्यावेळी त्याची पत्नी जावू शकेल. तसेच तिही जावू शकेल.
ते रुग्णालयाचे दिवस आज अर्जूनला छळत होते. त्याला आपल्या आयुष्याचे जुने दिवस आठवत होते. त्यातच त्याला आपल्या पत्नीची काळजी वाटत होती.
आज त्याला त्याच्या पत्नीची चिंता सतावत होती. आज त्याची पत्नी त्याची जोडीदार बनली असली तरी तिला पलंगपोस मिळत नसल्यानं तिला खाली जमीनीवर त्या थंड्या फरशीवर एसीच्या हवेत झोपावे लागत असल्यानं लोकं हळहळ व्यक्त करीत होते. रुग्णालयाच्या हालमधील पलंग जर दिला तर त्या नवजात शिशूला जंतूसंसर्ग होण्याची समस्या निर्माण होण्याचा संभाव्य धोका होता.

****************************************************************************************

कोरोना व्हायरस आला आणि त्यानं सर्वांना छळायला सुरुवात केली. त्यातच चांगली चांगली माणसं मरण पावली. जी माणसं सद् वर्तनी होती. त्यांचा गुन्हा काय असं वाटून कोणीही हळहळत होतं. पण त्यावर उपाय नव्हता.
त्यांचा गुन्हा काय असा विचार करतांना एक गोष्ट नक्की आठवते, ती म्हणजे कोंबड्या बक-याचा बळी.
माणसं ही मांसप्रिय असून आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कोंबड्या बक-याची हत्या करतात आणि आवडीनं खातात. त्यातच कोणी झिंगे, मासोळी, खेकडे तसेच तत्सम प्रकारचे जीवं खातात. काही ठिकाणी रेडे व गाईदेखील मारुन खातात.
मी लेखक म्हणून ज्यावेळी गाईवर लेख लिहा आणि म्हटलं की गाय वाचविणे गरजेचे आहे. त्यावर एक प्रतिक्रिया होती. ती म्हणजे तुम्हाला गाय प्रिय आहे तर आपल्या घरी पाळा. तिचं मुत्रही पित चला. शेणही खात चला. गाय गोमाता. त्यातच तिला वाचविण्याचा दिलेला संदेश. त्यातच लोकांचे असे उद्धट बोलणे. आता जर लोकांना सांगीतलं की कोंबड्या बक-यांचं मांस खावू नका. तर म्हणतील मांस नका खावू तुम्ही. तुम्ही त्यांची विष्ठा खा. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. कारण त्यांचा जीव असा कोंबड्या बक-यासारखा कोणी तडपवू तडपवू घेत नाही ना. त्यांना तशा वेदना होत नाही ना. त्यांचा जीव असा जात नाही ना.
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लहानपणी डुकरं पकडणारी टोळी यायची. ती डुकरं पकडायची आणि त्या डुकराचं कधी एक कान कापायची. तर कधी एखादा अवयव. त्या डुकराच्या जीवंतपणीच. ते डुकर खुप ओरडायचं. कारण त्याला भयंकर वेदना होत. समजा आपलाच एखादा अवयव आपल्याला बेशुद्ध न करता कापला तर आपल्याला किती वेदना होतात. तीच वेदना प्राणीमात्रालाही होते. तसेच आपल्या परीवारातील एखादा व्यक्ती मरण पावल्यास ज्याप्रमाणे आपल्याला बरं वाटत नाही. तसंच प्राण्यांनाही बरं वाटत नाही. परंतू आपण त्यांचा विचार करीत नाही. त्यांचा गुन्हा काय? हा महत्वाचा मुद्दा. आपण पाहतो की जी झाडं आपल्या फळं, फुलं व ऑक्सीजन देतात. औषधी देतात नव्हे तर घर बांधण्यासाठी लाकुड. त्यांनाच आपण कापतो. बदल्यात एक झाड लावत नाही. अहो, जी झाडं आपलं पर्यावरण संतूलन राखतात. त्या झाडांना मोठं व्हायला किती वेळ लागतो. त्यांना मोठे होतांना किती त्रास होतो. जनावरे सुद्धा त्यांना खावून त्यांची वाढ खुंटवितात. त्यांचाही गुन्हा काय?
ज्यावेळी आपण एखाद्या वेळी रुग्णालयाला भेट देतो. तेव्हा आपल्याला चित्र दिसतं की त्या रुग्णालयात असे असे रुग्ण दिसतात की जे दिसायलाच नको. पण ही निसर्गाची किमया. आज नवजात शिशूंचा जेव्हा जन्म होतो. तेव्हा त्या नवजात शिशूंपैकी ब-याच शिशूंना शौचालयाच्या जागाच नसतात. मग डॉक्टर मंडळी खरं तर त्यांनाच विधाता म्हणावं. कारण ते त्या नवजात शिशूंच्या शौचालयाच्या जागेवर शस्रक्रिया करुन ती जागा गुद्वाराला जोडतात. आज बरीचशी अपत्य अशी जन्मतात की त्यांना जन्मतः डोळे वा एखादा अवयवच नसतो. तसेच ब-याच मुलांच्या आतड्या छातीमध्ये गेलेल्या असतात. काही मुले तर व्यंग घेवूनच जन्माला येत असतात.
विशेष म्हणजे ही मुलं जन्माला तर येतात तरी. व्यंग घेवून येत असली तरीही. परंतू काही मुलं अशी असतात की ती मुलं जन्मच घेत नाही. अर्थात जन्म घेण्याआधी गर्भातच मरत असतात. खरं तर त्यांचा गुन्हा कोणता असतो. कोणताच नसतो. तरीही असं होते. त्याचं कारण काय असावं. वरवर विचार केल्यास. त्याला कारण कोणतंच दिसत नाही.
काही मुलं श्रीमंतांच्या घरी जन्म घेतात. तर काही मुलं गरीबीत खितपत पडलेले असतात. त्याचं कारण काय? तर याचं कारण पाप होय. आपण जे पाप करतो. त्याची शिक्षा म्हणून आपल्याला असे भोग पाहावयास मिळत असते.
पाप म्हणजे कर्म. आपले चांगले वाईट कर्म. आपले चांगले कर्म हे चांगले फळ देत असतात व वाईट कर्म हे वाईटच फळ देत असतात. आपले चांगले कर्मच आपला जन्म हा सुखकारक वा क्लेषदायक व्याधीमध्ये परावर्तीत करीत असतात. तसेच हा जन्म आपल्या कर्मानुसार गरीब श्रीमंतीमध्येही होत असतो. हे भोग हे आपल्या कर्मानुसारच आपल्याला भोगावेच लागतात. त्यामुळं सहजच नवजात शिशूही गर्भातून बाहेर पडण्यापुर्वीही मरतो. तेव्हा असे वाटते की विधाता हाच आपल्याला पापाची शिक्षा देतो. मात्र याला काही लोकं मानत नाहीत. काही लोकं तर त्यांच्या मनानुसार विधात्यालाही मानत नाहीत.
आता आपण विचार केला की विधाता हा असा भेदभाव का करतो? तर विधाता हा आपल्या कर्मानुसार पापपुण्याचा हिशोब ठेवतोच. विधात्यानं सर्वांना अमरत्वाचे वरदान दिलेले नाही. जर तसे झाले असते तर सर्वच अमर झाले असते व आज सृष्टीवर अनाचार माजला असता. तसा अनाचार माजू नये म्हणून त्यांचा गुन्हा काय असा दृष्टिकोण आपल्या मनात ठेवून आपले वागणे सुधरवावे. आपल्या वागण्यात परोपकार आणावा. जेणेकरुन आपल्याला आपल्या कर्माची शिक्षा मिळणार नाही. त्याचे परीणाम भोगावे लागणार नाही. तसेच आपले कर्म आपण सुधरविले की गर्भात कोणीही मरणार नाही. कोणाची आतडी छातीत जाणार नाही. कोणाचाच जन्म हा विणा गुद्दारानं होणार नाही. महत्वाचं म्हणजे आपण कळत नकळत जे गुन्हे करतो वा कर्म करतो. त्याचीच शिक्षा आपल्याला भेटून त्या शिक्षेचं रुपांतर वेदनेत होतं. व्याधीतही होत असतं आणि त्याचा परीणाम व्यवहारावरही होतं हे तेवढंच सत्य आहे. काही लोकं या गोष्टीला मानत नाहीत. ते कर्म अकर्म याचा विचारच करीत नाही. ते परिवर्तनशील विचारानुसार चालत असतात. त्यांना कर्म अकर्म ह्या भाकडकथा वाटत असतात. पण हे जरी बरोबर असलं तरी कर्म अकर्माचा फरक व्यवहारावर पडतो. आपले व्यवहार जसे चांगले असले तर जसा समाज आपल्याला चांगला संबोधतो. अगदी तोच दृष्टिकोण निसर्गही आपल्याशी वागतांना बाळगतो. आपण आपले कर्म वाईट ठेवले. विनाकारण झाडं तोडली. विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास दिला. विनाकारण निसर्गात जन्मलेली जीवं मारुन खाल्ली तर त्याचा परीणाम शिक्षेच्या स्वरुपात आपल्याला मिळतो. तीच आपली अधोगती होय. आपण निसर्गाला जो त्रास देतो. जे निसर्गाचं लेणं असते. त्यामुळं तोच निसर्ग बदल्याच्या स्वरुपात आपल्याशी वागतो. मग आपले नवजात शिशूच गर्भात मरतात वा त्यांना वा आपल्याला व्याधी होतात असे नाही तर पृथ्वीवर कोरोनासारखेही आजार निर्माण होतात. वृद्धींगत होतात व आपलेच जवळचे लोकं नेतात. ज्या लोकांत चांगल्या वाईट लोकांचाही समावेश होतो. जे चांगले लोक देशाचे आधारस्तंभ वाटतात. पण निसर्गापुढं ते निसर्गाचे गुन्हेगारच असतात. आपल्याला वाटते की त्यांचा गुन्हा काय? आपल्याला वाटते की जे नवजात शिशू गर्भात मरतात. त्यांचे गुन्हे काय? आपल्याला वाटते आमचा उपवर तरणेताठ मुलगा मरण पावला त्याचा गुन्हा काय? परंतू ही सगळी मंडळी आपली असतात. जी आपली असतात. त्यांचा आपल्याला गुन्हा कधी दिसतच नाही. बाळ कितीही वाईट असेल तरी तो त्याच्या मातेला चांगलाच वाटतो. तसे ज्या सृष्टीच्या जीवजंतूला आपण मारुन खातो ना. ते सृष्टीचे जीवजंतू त्या सृष्टीला नव्हे तर निसर्गाला आपले वाटत असते. जेव्हा ते जीवजंतू तुम्ही हिरावता. तेव्हा निसर्ग दुखावतो. त्यालाही वेदना होतात. मग काय तोच बदला घेण्यासाठी एखाद्या आजाराच्या रुपानं जन्म घेतो. ज्याला कोणी कोरोना म्हणू शकतात. कोणी चिकनगुनीया, कोणी नागीण तर कोणी स्पँनीश फ्लू. कोणी प्लेगही म्हणू शकतात. तसेच कोणी भुस्खलन म्हणू शकतात. तर कोणी भुकंप, कोणी पूर तर कोणी महामारीही संबोधू शकतात. महत्वाचं म्हणजे आपल्याला काही होवूच शकत नाही असा विचार करुन निसर्गाच्या वाट्याला कोणीही जावू नका. नाहीतर ह्या निसर्गाला कधी राग जर आला ना. तर तो एक दिवस अशी पलटी मारेल की आपल्याला विचार करायला वेळच मिळणार नाही. सगळं जागचं जागीच राहील यात शंका नाही. हाच निसर्ग आपला देव आहे. आपला माता पिता भाऊ बहिण सारं काही आहे. शक्यतोवर पाप करु नका. निसर्गाची हानी करु नका. पावसाळा लागला आहे. तेव्हा सर्वांनी एकतरी झाड लावा. अंगणात पसरात कुठंही लावा. पण एकतरी झाड नक्की लावा एवढंच सांगणं आहे. तसेच त्या झाडाचं योग्य जतन करा एवढंच शेवटचं सांगणं आहे. तसेच त्यांचा गुन्हा काय असा दृष्टिकोण मनात ठेवून आपण निसर्गाच्या या चक्रातील सर्वच जीवाबाबत वागावं. जेणेकरुन निसर्ग खुश होईल व तो आपली अधोगती वा दुर्गती करणार नाही. हे आपण लक्षात घ्यावे. तेव्हाच आपलं कल्याण होईल व कोरोनासारखी महामारीही येणार नाही. तसेच निसर्गाचं संतूलनही बरोबर राहून कोणताच नवजात शिशू गर्भात मरणार नाही. नवजात शिशूला व्याधीही येणार नाही. वेदनाही होणार नाही. तसेच कोणताच जीव उपवर होता बरोबर मरणार नाही. हे तेवढंच खरं आहे.

आज अर्जूनच्या मुलीला त्रास होता. त्याचं कारणंही तसंच असेल. त्यानं जे मुलगी जन्मापुर्वी पाप केले असेल वा वाईट कर्म केले असेल किंवा कळत नकळत त्याच्या पत्नीनं मुलगी जन्मापुर्वी जे काही वाईट कर्म केले असेल वा पाप केले असेल. त्यांच्या पापाची शिक्षा म्हणून त्याच्या मुलीला ते भोगमान आले होते.
सुकन्या आपल्या बापाला बळ देत होती. जेव्हा जेव्हा डॉक्टर तिला सलाईन लावण्यासाठी सुया टोचत. तेव्हा इतरांची मुलं रडायची. पण सुकन्या काही रडायची नाही. ते पाहून अर्जूनमध्ये आणखी बळ येत असे. तो आणखी ताजातवाना होवून सुकन्याच्या बरे होण्याची वाट पाहात असे.

************************************************************************
सकाळी रुग्णालयात फळं आणि नाश्ता मिळायचा. त्यातच दूधही. परंतू सुकन्या ही नवजात शिशू असल्यानं तिला काहीच मिळत नव्हतं. त्यातच पहिला दिवस असाच उपवासात काढावा लागला होता. शेवटी रुग्णालय प्रशासनाला दया आली व त्यांनी अर्जूनला जेवन देणं सुरु केलं. त्यातही इतर लोकांना वाटून उरलेलं जेवन. त्यात जेवन कमी मिळत असल्यानं पोट भरायचं नाही.
भूक अपार लागलेली. त्यातच नाश्ता त्या रुग्णालयाच्या खाली बाजूला मिळायचा. पण अर्जूनला जाता येत नव्हते. कारण त्यांची मुलगी. तिला कोण पाहणार. पाहायला कोणीच नव्हतं तिथं. अशातच एक कुटूंब तिथं आलं. त्यांच्या मुलालाही समस्या होती. पण कोण कुणाचे मुल पाहणार. ना ओळख ना पाळख आणि तरीही आपल्या मुलीच्या देखरेखीसाठी आपल्यालाच राहावं लागेल. शेवटी दोन तीन दिवस तसेच काढावे लागले.
तीन दिवस झाले होते. आता त्या बाजूच्या परीवाराची ओळख झाली होती. परंतू त्यांच्या देखरेखीत मुलगी सोडून जाता येत नव्हते. कारण परीचारीका आवर्जून सांगत होती की मांजरीपासून व मुलं चोरणा-या टोळीपासून मुलांना वाचवावं. त्यामुळं डोळ्यात तेल घालून जपावं लागत होतं मुलीला. अर्जून तसा जपतच होता.
ते सहा दिवसानंतरचे दिवस. मनात मुलीचं दुःख होतं. परंतू सानित्रा आल्यानं ते दुःख काहीसं कमी झालं होतं. एक एक दिवस कठीण वाटत असला तरी तो चांगला जात होता.

अशातच पंधरा दिवस निघून गेले होते. सुया ब्रेकच होत होत्या. त्यावर डॉक्टर साहेब ओरडतच असत. त्यातच परीचारीकाही. ते जेव्हा ओरडत तेव्हा मात्र त्यांचा अतिशय राग यायचा. पण रागावर ताबा ठेवून अर्जून जगत होता. विधात्यालाही प्रार्थना करीतच होता.
आज पंधरा दिवस झाले होते. अर्जून एक शिक्षक होता. तो आज पंधरा दिवसपर्यंत आपल्या ड्युटीवर गेला नव्हता. त्यातच विद्यार्थ्यांचंही नुकसान होतच होतं. ते होत असलेलं नुकसान अर्जूनला दिसत होतं. पण तो तरी काय करणार. त्याचेकडे उपाय नव्हता. अशातच एक दिवस त्याचा मुख्याध्यापक त्याला भेटायला रुग्णालयात आला.
अर्जून मुख्याध्यापक साहेबांचा तसा आदर करायचा. तशी ही समस्या त्या मुख्याध्यापकामुळेच आली होती. त्याचं कारणंही तसंच होतं. त्याचा इतिहास होता.
सानित्रा आणि तिचा पती अर्जून एकाच शाळेत नोकरी करीत होते. अशातच त्यांचं प्रेम निर्माण झालं व त्या प्रेमाचं रुपांतर विवाहात झालं. दोन वर्ष व्यवस्थीत गेले. तसा किरकोळ मुख्याध्यापकाचा त्रास होताच. पण तो त्रास गौण होता.
ज्यावेळी सानित्रा गरोदर राहिली. त्यावेळचा प्रसंग. दोघंही एकाच शाळेत. अर्जूननं मुख्याध्यापकाला विनंती केली की त्यानं या वर्षी दोघांनाही एकाच वेळेची नोकरी द्यावी. जेणेकरुन त्याच्या पत्नीला पुरेसा आराम होईल. तसं पाहता घरची परिस्थीती बेताचीच होती. त्यामुळं घरी यायला एकच साधन होतं. त्याच्या पत्नीजवळ गाडी नव्हती. तसं पाहता गतवर्षीही त्याच मुख्याध्यापकानं दोघांनाही एक शिपनध्ये नोकरी ठेवली नव्हती. पण त्या वर्षी ती दुपारी पाय तुडवत ती घरी जायची. कारण घर पाच किलोमीटरवर होतं. त्यावर्षीचं ठीक होतं की ती पायदळ घरी गेली. परंतू यावर्षी गरोदरपणाचा काळ. जास्त पायी चालणं जमतच नव्हतं. यावर्षीही त्याच मुख्याध्यापकानं सानित्रा आणि अर्जूनची ड्युटीवेळ दोन शिपमध्ये लावली नसल्यानं सकाळी सानित्रा शाळेत येत होती तर दुपारी तो. त्यातच सानित्राला पाच सहा वर्ष झाले असले तरी तिला अजिबात वेतन नव्हतं. तोही नुकताच नोकरीवर लागला होता. त्यानं नोकरीला लागतांना पुरेसं डोनेशन दिलं नसल्यानं त्याच्या वेतनातून काही पैसा हा कटत होता. तसं पाहता मनात आस असल्यानं तो आपल्या पत्नीला फुकटामध्ये शाळेत राबायला नेत होता.
गरोदरपणाच्या काळात सानित्रा सकाळी उठत होती. प्रातःविधी व स्नानविधी केल्यानंतर ती स्वयंपाक करीत होती. त्यातच स्वतःचा जेवनाचा डबा बांधून ती ड्युटीवर जात असे तिही सकाळी साडे सहाला. त्यातच सकाळी साडे सहाला शाळेत पोहोचलं नाही तर मुख्याध्यापक ओरडत असे. तिला त्रास देत असे. त्याला काय वाटत होतं कुणास ठाऊक.
आपली पत्नी घरी जावू शकत नाही व त्यावर काही पर्याय नाही असा विचार करुन अर्जूननं त्यावर पर्याय शोधला. तिला तिची मैत्रीण मधुराच्या घरी ठेवू लागला. जी मैत्रीण तिच्याच वर्गात शिकली होती आणि ती ज्या ठिकाणी शाळा होती. त्याच ठिकाणी राहात होती.
अर्जूननं आपल्या समस्येवर उपाय काढला. परंतू यात सानित्राला भयंकर त्रास सहन करावा लागला. ती सकाळी चार वाजता झोपेतून उठत होती. सर्व घरची कामं करीत होती. त्यातच साडेसहाला नोकरीवर हजर होत होती. दुपारी साडे बाराला सुटी झाल्यावर आपल्या मैत्रीणच्या घरी थांबत होती. तिथेच दुपारचं जेवन करीत होती. त्यातच दुपारी तिला पुरेसा आरामही मिळत नव्हता. त्यातच अर्जूनही सकाळी साडेदहाला शाळेत जात असे. सायंकाळी त्याला साडेपाचला सुटी होत असे. तेव्हा तो आपल्या पत्नीला घेऊन घरी येत असे. घरीही तिला पुरेसा आराम नव्हताच. घरी आल्यावर परत स्वयंपाक करीत असे. भांडे कपडे सारं काही. त्यातच ड्युटी ठिकाणाहून यायचे रस्तेही खराबच होते. ते गोटाळ दगडाचे रस्ते. गाडी कितीही हळू चालवली तरीपण सानित्राला त्रास होणार नाही कशावरुन?
सततची धावपळ........त्यातच नोकरी मिळेल अशी आस. सानित्रानं ते सगळं सहन केलं. तिलाही वाटलं की पुढं आपल्या पोटाला भाकर मिळेल. आपली नोकरी जेव्हा कायम स्वरुपाची होईल. त्यासाठीच ती एवढा त्रास सहन करायची.
आता सानित्राचे झाले झाले दिवस होते. तसं पाहता सातवा महिना कोणत्याही स्रीचा साजरा झाल्यावर तिला पूर्ण स्वरुपाचा आराम हवा असतो. त्यासाठीच नव-या मुलीला गरोदर राहिल्यावर सासरमध्ये तिला आराम मिळणार नाही म्हणून मायबाप तिला माहेरी नेतात. त्याचं कारण म्हणजे बाळाला कोणत्याही स्वरुपाचा त्रास होवू नये व पहिली दिलीवरी तरी चांगली सुखकारक व्हावी.
सानित्राला सात महिने झाले होते. सातवा महिना पार पडला होता. आनंदानं तो साजराही झाला होता. त्यातच त्यान मुख्याध्यापकाला विनंती केली की
त्याच्या पत्नीला गरोदरपणाच्या सुट्ट्या द्याव्या. पण मुख्याध्यापक त्यावर म्हणत होता की सुट्ट्या हव्या आहेत तर कायम सोडून द्यावी शाळा.
नोकरीची आस. आपल्या पोटाची भाकर बनेल असं सानित्रालाच नाही तर अर्जूनलाही वाटत होतं. त्यातच त्याला त्यावर मार्ग सापडत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. अशातच त्यानं मुख्याध्यापकाच्या अरेरावीपणावर सहनशीलताच दाखवली. सुट्ट्यांची आवश्यकता असुनही सुट्ट्या घेतल्याच नाही.
साडे आठ महिने झाले होते. त्यातच दिलीवरी केव्हाही होईल असे वाटत होते. मुख्याध्यापक सुट्ट्या देवू इच्छीत नव्हता. त्यातच आपण एवढंही सहन करु नये असं अर्जूनला वाटलं. अर्जूनचा बांध तुटला व त्यानं ठरवलं आता काहीही होवो, आपण सुट्ट्या घ्यायच्याच. शेवटी त्यानं मुख्याध्यापकाचं न ऐकता सुट्ट्या घेतल्या व केवळ सुट्ट्या घेतल्यानंतर अवघ्या पाच दिवसात दिलीवरी झाली. त्यातच सानित्राला समस्या निर्माण झाली नाही. पण मुलीला फार मोठी समस्या आली होती. तिही मुख्याध्यापकाच्या अरेरावीपणामुळं.
आज पंधरा दिवसानंतर मुख्याध्यापक रुग्णालयात आले. त्यांनी हालहवाल विचारलं. त्यातच म्हटलं की आपली मुलगीच पाहाल काय? ती जगणार तरी आहे का? तिकडे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. ते कधी भरुन निघणारं नाही.
मुख्याध्यापक बोलून गेले खरे. पण त्याचा अर्जूनला भयंकर राग आला. तसा राग अर्जूनच्या जागी कोणी असता तर त्यालाही आला असता. तो राग येणे साहजिकच होते. पण उपाय नव्हता. ही वेळ राग करण्याची नव्हती. रागाचं मग पाहू असं अर्जूनला वाटत होतं. त्यातच त्यानं रागाचा आवंढा गिळला व त्या शैतानी मेंदूच्या मुख्याध्यापकाला होकार दिला. तसा दुस-या दिवशीपासून तो नोकरीवर हजर झाला.
ते उन्हाळ्याचे दिवस होते. सुर्य आपलं उन्हं बरसवत होता. अशातच शाळा सकाळ पाळीत सुरु झाली होती. आता दररोज सकाळी सहाला तो नोकरीवर जात असे. तसेच दुपारी तो रुग्णालयात परत येत असे. त्यातच असाच तो एक दिवस उजळला.
अर्जून रुग्णालयात शाळेतून परत आला. त्यानं पाहिलं. मुलीचं सलाईन निघालं होतं. सानित्रानं आपलं रुपडं रडकुलं केलं होतं. तसं तिनं सामानंही बांधलं. तसं ते पाहून अर्जून म्हणाला,
"सुकन्याला सलाईन नाही लावलं आहे. का बरं?"
तसं ते ऐकताच सानित्रानं डोळ्यातून अश्रू टपकवले. म्हणाली,
"आपली बाळी आता जगणार नाही."
"कोण म्हणतंय?"
"डॉक्टर म्हणाले."
"काय म्हणाले डॉक्टर?"
"डॉक्टर म्हणाले की सुई लावतांना नस सापडतच नाही. त्यांनी तीनवेळा सुई टोचायचा प्रयत्नही केला. परंतू सुई लागतच नाही. डॉक्टर ओरडत होते माझ्यावर. म्हणत होते की तुम्ही बाळीची बरोबर काळजीच घेत नाही. आता मरुन जावू द्या तुमच्या मुलीला. मी काय करणार."
"बरं." अर्जून म्हणाला व तोही चूप बसला. त्यालाही तशी डॉक्टर ओरडण्याचीच भीती वाटत होती.
दुपारचे तीन वाजले होते. तो मंगळवार होता. मंगळवार त्यांच्या जीवनात सुख देवून आला नाही असं त्यांना वाटत होतं. शेवटी ते चूप बसले होते. त्यांनी पूर्ण सामान बांधून घेतलं होतं. तशी ते वाट पाहात होते मुलीच्या मरणाची. आज जवळपास वीस दिवस झाले होते.
दुपारचे तीन वाजले होते. तशी एक परीचारीका तिथं आली. खरं तर ती देवदूत बनूनच आली होती. ती म्हणाली,
"का बरं असे हिरमिसून बसलाय?"
"काय करणार. डॉक्टर म्हणाले सुई लागत नाही. त्यांनी तीनवेळा प्रयत्नही केलाय. पण काही उपयोग झाला नाही. आता ते म्हणतात की मी सुई लावत नाही. मरुन जावू तुमच्या मुलीला. मग मला सांगा की जिथं मुलीला सलाईन लागत नाही. तिथं मुलगी वाचणार कशी? मुलीला दूधंही पाजता येत नाही. नाहीतर वाचली असती. आता तिच्या पोटात काहीच जाणार नाही तर प्रश्न उभा राहिल की नाही." अर्जून म्हणाला.
त्या देवदूत बनून आलेल्या परीचारीकेनं ते अर्जूनचं बोलणं ऐकलं. तिलाही कसनसं वाटायला लागलं. त्यातच थोडा विचार करुन ती म्हणाली.
"हे बघा. मी लावून पाहते तिला सुई. प्रयत्न करते. लागते का म्हणून पाहू. पण कोणाला सांगाल नको बरं?"
"ठीक आहे." अर्जून भावनातिरेकानं म्हणाला.
"मी एक इंजेक्शन लिहून देते. तो आणा लवकर. नाहीतर मग डॉक्टर येतील. ते यायच्या आत आणा."
"बरं." अर्जून म्हणाला.
त्या परीचारीकेनं सुई आणायला सांगीतली. तोच क्षणाचाही विलंब न करता अर्जूननं सुई विकत आणली. तसं पाहता ते परीचारीकेला सांगीतलं आणि तद्वतच ती आली. तिनं ती सुई लावण्याचा प्रयत्न केला. परंतू ती सुई लागली नाही. ती ब्रेक झाली. तशी ती म्हणाली,
"ही देखील सुई ब्रेक झाली. आता काय करायचं?"
ती विचार करु लागली. तसा अर्जून तिच्याकडे केविलवाणे व आशाळभूत नजरेनं पाहात होता. तोच ती म्हणाली,
"पुन्हा एकदा प्रयत्न करते. पाहू फायदा होतो का ते. माझ्या कपाटात एक सुई आहे. ती लावून बघते."
"बरं." अर्जून म्हणाला. तशी ती परीचारीका निघून गेली. थोड्या वेळानं ती पुन्हा परत आली. तिनं आपल्या हातात सुई आणली होती. परत ती प्रयत्न करु लागली. तोच एक चमत्कार झाला. ती सुई लागली. तशी ती म्हणाली,
"हे बघा. ही सुई देवकृपेनं लागली आहे. आता हिला तरी ब्रेक होवू देवू नका. जपा हिला आणि हो कोणाला सांगू नका माझं नाव. नाहीतर ओरडतील."
"होय. नाही सांगत. तुम्ही जे केलं ते उपकार आम्ही विसरु शकणार नाही कधीच."

************************************************************************

सायंकाळ झाली होती. तसा डॉक्टर सुकन्याला तपासायला आला. तसं त्यानं सुकन्याला सुई लागलेली पाहिलं. तसा तो म्हणाला,
"कोणं लावली सुई?"
"..........." अर्जून आणि सानित्रा काहीच बोलले नाही. तोच तो म्हणाला,
"मला माहित आहे कोणी लावली सुई ते. मला सिस्टरनं सगळं सांगीतलं. महत्वाचं म्हणजे सुई लागली ना. सुई लागणं महत्वाचं. ती मग कोणीही लावो. आता काळजी घ्या."
नवीन डॉक्टर. जुने डॉक्टर गेले होते. त्या जागी नवीन डॉक्टर आले होते. ते डॉक्टर समजूतीच्या सुरात बोलत होते. त्यावर अर्जून काहीच बोलला नाही. तसे डॉक्टर निघून गेले.
ती परीचारीका देवदूतच होती की तिच्यामुळं सुकन्याच्या जीवनात बहर आला. ती विधात्याचीच कृपा होती की त्यानंतर आठ बारा दिवसपर्यंत सुकन्याच्या सुया ब्रेक झाल्या नाहीत. तसेच तिच्या एकुणएक नसाही खुलल्या.
एक महिना झाला होता. सुकन्याच्या नसा खुलल्या होत्या. आता बराच अवधी झाला होता. तसा अर्जून डॉक्टरांना म्हणत होता की ऑपरेशन लवकर करा. सुकन्याला काहीही होवो.मी सगळं सहन करायला तयार आहे. पण डॉक्टर काही केल्या तिचं ऑपरेशन करायला तयार नव्हते. तिकडं विद्यार्थ्यांचंही नुकसान होत होतं. जेवणाचीही आबाळ होत होती. पत्नीचं आणि आपलं पोट कसं भागवावं? हाही प्रश्न त्याच्यासमोर होता.
एक महिना झाला होता. परंतू ऑपरेशनची कोणतीच आशा पुढं दिसत नव्हती. त्यातच शाळा आणि रुग्णालय अशी सारखी अर्जूनची त्रेधातिरपीट उडत होती. त्यातच मुख्याध्यापक ती मुलगी काही जगत नाही. तिचा नाद सोडा असेही म्हणत होते. तसेच अर्जूनला 'म्हणून काय मारुन टाकावे काय' असे वाटत होते.
सुकन्याच्या जगण्याबद्दल अर्जून आशावादी होता. तो जसा निराशावादी होता तसाच तो आशावादीही बनला होता. सुकन्याच्या सोबत सोबत असणारे सर्वजण काळाच्या ओघात मरण पावले होते. पण ती अजूनही जीवंत होती. तशी ती आस दाखवत होती. तिच तिची आस पाहून अर्जूनच्याही मनात तिला जगविण्याची आस निर्माण होत होती. आता तर तो तिच्यावर प्रेम करु लागला होता. ती मुलगी असली तरी. आपल्याला मुलगा हवा मुलगी नको म्हणणारा अर्जून आज मुलीच्या जन्माने स्वतःला कृतकृत समजत होता.

भावना सर्वांनाच असते. समस्त प्राणीमात्रापासून तर अगदी लहान लहान परजीवीपर्यंत सर्वांनाच भावना असते. त्या भावनेचा वापर करुन प्रत्येक सजीव जगत असतो आपलं जीवन. ही भावना जोपासत असतांना कधी आपल्या मनात लोभ निर्माण होतो तर कधी राग तर कधी क्लेशही, कधी द्वेषही निर्माण होत असतो. भावना ह्या सृष्टीमध्ये जो जो सजीव घटक आहे, त्या सर्वांमध्ये निर्माण होत असते.
ज्याला भावना नाही त्याची गणती वेड्यात होते. त्याला लोकं इज्जत मान मरातब देत नाहीत आणि त्याचा पदोपदी छळ करीत असतात. असा छळ जर चांगल्या माणसांचा झाला तर त्यातून गुन्हेगार तयार होतात व गुन्हेगारी निर्माण होत असते.
सध्या मान्सूनचं आगमण झालं आहे. त्याचबरोबर शेतकरी पेरणी करायला सरसावलाय. तो आपल्या रक्ताचं पाणी करुन आपल्या शेतात पीक पेरेल. कारण त्याच्यात चांगली भावना असते. ती परोपकारी भावना की ज्या भावनेनं अख्खं जग त्याला पोसता येईल. ती भावना की ज्या भावनेनं त्याला त्याचं कुटूंबही पोसता येईल. त्यासाठी जवळ पैसा नसला तर तो कर्ज घेईल आणि आपल्या शेतात पीक पेरेल.
शेतात पीक पेरलं की झालं असं त्याचं गणित नाही. ते पीक पेरल्यानंतर त्या पीकाचं संगोपन करण्याचीही गोष्ट तो करीत असतो. समजा तो घटक वेळेवर आपल्या शेतातील किडीचं नियंत्रण करु शकला नाही वा वेळेवर आपल्या शेतातील तणाचं नियंत्रण करु शकला नाही. त्यावर तणनाशक वा किड नाशक फवारु शकला नाही तर उभ्या पीकाचं त्याला नुकसान शोषावं लागते. ते नुकसान जर झालं तर त्या शेतक-याची परीस्थीती हवालदील होते. तसेच अशा परीस्थीतीवर नियंत्रण करता आलं तर पुढे अवकाळी पाऊस अर्थात निसर्गानंही त्याला मदत करायला हवी.
ज्यावेळी शेतात पीक पेरलं जातं, त्यावेळी शेतकरीराजा सुखावतो. त्यातच तो दुःखीही होतो. कारण त्याला त्याचवेळी वाटते की मला हे जे मी पीक पेरलं. ते पीक शेवटपर्यंत टिकेल काय? शेवटी उत्पादन मिळेल काय? मग तो आपल्या मनात आशावादी भावना तयार करतो. परंतू सर्वात पहिला त्याला सामना करावा लागतो तो ते बी उगवलं की नाही याचा. ज्यावेळी तो बी पेरतो, त्यावेळी असा महाभयंकर पाऊस येतो की त्या पावसात ते ही सडतं आणि ते बी उगवत नाही. तसेच जे ही पेरतो, ते बी कधी कधी त्याची उगवणक्षमता कमी असल्यानं उगवतच नाही. त्यानंतर किड आणि तण. त्यावरही नियंत्रण मिळवलं तरी पुढं त्या पीकांना रानडुकरं व नीलगाईसारखे जनावरं ध्वस्त करतात. तसेच ज्यावेळी उभं पीक हातात येतं, त्यावेळीही पाऊस आला तर पुन्हा हातात आलेलं उभं पीक नष्ट होतं. एवढंही होवून पीक निघालं तर त्याला कर्जवसूल करणा-या बँका (सावकार) त्या शेतक-यांना छळत असतात. त्यातच त्यांनी छळलं नाही तर दलाल तरी छळत असतात. ते मालाला भाव देत नाही. भाव पाडून माल खरेदी करतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास ज्यावेळी हा शेतकरी शेतात लावण्यासाठी माल घेतो, त्यावेळी ज्या धान्याचा दर जेवढा असतो. तेवढाही दर धान्य निघाल्यावर नसतो. जो माल तो विकत घेतो, तो माल त्याला विकतांना अगदी निम्म्यापेक्षाही कमी दराने विकावा लागतो हे सत्य आहे. तेव्हा त्याची भावना ही बिघडते. त्याच्या मनात भयंकर चीड निर्माण होते. तो माल निर्माण करतांना त्याला किती संकटं झेलावी लागतात हे त्याचं त्यालाच माहित असतं. प्रसंगी त्याला ते पीक निर्माण करतांना पापही करावे लागतात. पाप अर्थात मनात इच्छा नसतांनाही किडींना मारावे लागते.
पूर, अवर्षण हे शेतक-यांवरील संकटं. कधी वीज पडूनही शेतकरी मरतात तर कधी सापासारखे इतर प्राण्यांचा दंश होवून देखील शेतकरी मरतो. पण ज्यावेळी भाव मिळत नाही तेव्हा तिथंच त्याची भावना मरते. त्याच्या भावनेची हत्या होत असते.
महत्वाचं म्हणजे शेतकरी पीक शेतात पेरतांना फक्त आपलाच विचार करीत नाही. तो जगाचा विचार करतो. परंतू आपण त्याचा विचार करीत नाही. त्यानं जर म्हटलं एखादा रुपया जास्त द्या तर आपण देत नाही. आपण रेस्टारेंटमधील वेटरला दोन रुपये जास्त देतो. पण शेतक-याला देत नाही. ही शोकांतिका आहे. आज खरा विचार केला तर ते आहेत म्हणून आपण आहोत. म्हणून खरं तर त्यांना दोन पैसे जास्त द्यायला हवेत.
सरकारनंही याच गोष्टीचा विचार करावा. आज मृग नक्षत्र लागला आहे. शेतकरी पेरणी करणार आहे. त्यासाठी तो खते, बी बियाणे तसेच त्याला लागणारी तणनाशके व किडनाशके विकत घेणार आहेत.
पेट्रोल व डीझलचे भाव वाढले आहेत. खाद्यतेलाचेही भाव वाढले आहे. जीवनावश्यक वस्तूही त्याचबरोबर वाढल्या आहेत. तसेच बियाण्यांचेही व खत व किडनाशक तणनाशकांचेही भाव वाढले आहे. मजूरीही वाढली आहे. तेव्हा सरकारला एकच विनंती आहे की जीवनावश्यक वस्तूंचे भाव नक्की वाढवा. मजूरीही वाढवा. ते वाढवायला मनाई नाही. पण बियाणे, खते, किडनाशके तसेच तणनाशकांचे भाव वाढवू नका. विचार करा की शेतकरी आहेत म्हणून आपण सारेच आहोत. ते जर नसतील तर आपणही नसू. आज महागाई चरणसीमेवर आहे. तसेच चरणसीमेवर खते बी बियाणे व खते, किडनाशक तणनाशकं आहेत. ते विकत घेणं सहजासहजी शक्य नाही. कारण कोरोनाच्या प्रभावानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांजवळ पैसाच नाही. दोन चार शेतकरी जर सोडले तर शेतक-यांजवळही पैसा नाही. तेव्हा सरकारनं यावर विचार करुन निदान त्या वस्तू तरी कमी दरात शेतक-यांना द्याव्यात. जेणेकरुन सर्व शेतक-यांना आपली शेती पेरता येईल व आपल्या शेतात भरघोष उत्पादन घेता येईल. सरकारनं लोकांच्या भावनेचा विचार करावा. त्यांनाही भावना आहेतच. शेतकरी सुखी तर आपण सुखी.तसेच आपला देशही सुखी. नाहीतर आपला देशही दुःखी व्हायला वेळ लागणार नाही. यात दुमत नाहीच.

मानवी शरीराचेही तसेच आहे. आपण ज्याप्रमाणे शेतक-यांचा विचार करतो. तसाच विचार आपल्याला आपलाही करता यावा. ज्याप्रमाणे शेतक-यांना भावभावना आहेत. त्याप्रमाणे आपल्यालाही भावभावना आहेत. 'निदान खते, बियाणे,किडनाशक व तणनाशक तरी स्वस्त करा'
अर्जून एक दिवस वर्तमानपत्र वाचत होता. त्यात छापून आलेला तो लेख. लेख शेतक-यांच्या भावनेवर लिहिलेला होता. त्या वर्तमानपत्रानं शेतक-यांबद्दल खरं तेच लिहिलं होतं. तसा अर्जून विचार करीत होता की जशी शेतक-यांची परीस्थीती आहे. तशीच या रुग्णालयात येणा-या बहुतेक सर्वांचीच आहे. या सर्वांनी कोणतं पाप केलं असेल की या रुग्णालयाचं तोंड पाहावं लागलं. प्रत्येकाची समस्या निराळीच. ज्या कधी समस्या ऐकल्या नव्हत्या. त्या त्या समस्या आज पाहायला मिळत होत्या. त्यांनाही भावभावना होत्या. त्यांनाही वाटत असावं खाजगी रुग्णालयात उपचार करावा. परंतू जवळ पुरेसा पैसा नसल्यानं ते या सरकारी रुग्णालयात आले होते. ज्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर व्यवस्थीत बोलत नव्हते. वेळेवर सेवा द्यायला येत नव्हते. पण ते तरी काय करणार. कारण रुग्णसंख्या कितीतरी जास्त होती. त्यामानानं वेळ कमी होता त्यांना. तसेच काही काही कर्मचारी तर निव्वळ आळशी बनले होते.
आज एक महिना झाला होता. तरी डॉक्टर ऑपरेशन करीत नव्हते. डॉक्टरांना वाटत होतं की ऑपरेशन नक्कीच करता येईल सुकन्येचं. पण ते ऑपरेशन सहन करण्याची शक्ती सुकन्यात यायला हवी.
आज एक महिना झाला होता. तसा तो नवीन डॉक्टर. हा डॉक्टर समजदार होता. त्याला अर्जूननं म्हटलं की त्याला एक महिना झाला आहे. तो परेशान आहे. त्याला मुलं शिकवायला जावं लागतं. त्या विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं. त्याला धावपळ करावी लागते. ती धावपळ जरा जास्त होते. ती धावपळ सहन होत नाही. माझ्या मुलीचं काहीही होवो. मी स्वीकारायला तयार आहे.
पण डॉक्टर ते. त्यांना कोणाचा जीव जाणं बरोबर वाटत नव्हतं. त्यासाठी की काय, ते डॉक्टर सुकन्याचं ऑपरेशन करीत नव्हते. त्यांना सुकन्याला जगवायचं होतं. नवं जीवन तिला द्यायचं होतं.नव्हे तर सुकन्याचं नाव समृद्धी करायचं होतं.
एक दिवस डॉक्टर अचानक म्हणाले,
"आज सायंकाळी आम्ही तुमच्या मुलीचं ऑपरेशन करणार. रक्ताच्या एक दोन बाटल्यांची व्यवस्था करा.
रक्तदान हे श्रेष्ठ दान होतं. तशी जनजागृती झाली नव्हती. अर्जूनला विचार आला. रक्त........ कसं जमवायचं रक्त. रक्त तर जमवावंच लागेल. नाही जमलं तर आपल्या मुलीचं ऑपरेशन होणार नाही. आपण रक्त द्यायचं. पण देणार कसं. कधी दिलं नाही. काय होणार रक्त दिल्यावर. धावपळ होईल का आपल्यानं. काय होईल कसं होईल. कोण देईल. कोणी देईल काय? सारेच प्रश्न त्याला सतावत होते.
एकदाचा तो प्रसंग. बरेच वर्ष झाले होते त्या गोष्टीला. तो रक्तदानाला आला होता याच रुग्णालयात. पण वजन कमी व वय कमी भरल्यानं त्याचं रक्तदान करणं निव्वळ स्वप्न उरलं होतं.
अर्जूननं एकदोन मित्रांना विचारुन पाहिलं. त्याचा एक मित्र होता. त्याचं म्हणणं होतं की त्यानं कुठंतरी रक्तदान केलं. त्याचं कार्ड आहे. परंतू वेळेवर त्यानं धोका दिला होता. त्यानं कार्ड कुणाला तरी दिलं असल्याचं सांगीतलं. तसेच त्यालाही रक्त दान करण्याला तीन महिने व्हायचेच आहे. शेवटी निर्णय घेतला, आपणच रक्त द्यायचं आपल्या मुलीला. पहिल्यांदा रक्त. आपण आपल्या मुलीला रक्त नाही देणार तर कोण देईल. असा विचार करुन तो दुपारी रुग्णालयात आला. त्यानं पोटभर जेवन केलं व तो रक्तपेढीत गेला.
रक्तपेढीत त्यानं रक्तदानाचा अर्ज भरला व रक्ताची जाच होवून त्याचं रक्त गोळा केलं गेलं.
रक्तदान........तेही पहिल्यावेळीच आणि तेही आपल्या मुलीला. मनात फार भीती होती. पण रक्त दिल्यानंतर ती भीती कमी झाली होती. काहीच झालं नव्हतं. काहीच वाटत नव्हतं. तशी सायंकाळ उगवली. डॉक्टरांनी रक्तदानाचं कार्ड गोळा केलं. त्यानंतर एक फार्मवर सानित्रा व अर्जूनची सहीही घेतली. त्याचबरोबर सायंकाळी मुलीला ऑपरेशन थिएटरला आणायला लावलं.
सुकन्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं. परंतू कोणतं कारण घडलं माहित नाही. तिचं आज ऑपरेशन झालं नाही. तसा अर्जून हिरमुसला झाला. तसा तो महिण्याभरापासून परेशान होता. काय करावे हे त्याला समजत नव्हते. पण काय करणार तो. आताही ऑपरेशन कँन्शल!
अर्जूनला दैवाचा भयंकर राग येत होता. दैवं असं की त्या दैवानं त्याला नीट जगताही येत नव्हतं. ते दैव त्याला बालपणापासूनच छळत होतं. बालपणातच दुधाचे ओठ सुकले नव्हते, तेव्हा मायबाप हिरावून नेले होते. विवाह करतांनाही कोणी नातेवाईकांनी मदत न केल्यानं त्याला प्रेमविवाह करावा लागला होता. त्यातच आता मुलगीही दिली ती अशी की जिला जन्मतःच समस्या उत्पन्न झाली.
मुख्याध्यापकही असा मिळाला होता की त्यानं आता मुलीच्या भरतीवेळी सुट्टी मंजूर केली नव्हती. त्यातच त्याची पत्नी जेव्हा गरोदर होती, तेव्हाही सुट्टी मंजूर केली नव्हती.
आज विचार करीत होता अर्जून. त्याला वाटत होतं की केव्हा होईल ऑपरेशन. ती रात्र त्याची सतत उद्विग्नतेत गेली होती. असाच दुसरा दिवस उजळला.
दुसरा दिवस. या दिवशीही सुकन्याचं ऑपरेशन होईलच याची शाश्वती नव्हती. तशी दुपार झाली.
दुपारचे तीन वाजले होते. डॉक्टरांना का वाटलं तर माहित नाही. म्हणाले,
"सुकन्याला ऑपरेशन थिएटर मध्ये आणून ठेवा. वेळ मिळाल्यास ऑपरेशन करु."
डॉक्टरांनी ती वाणी बोलताच अर्जूननं आपल्या मुलीला सायंकाळी साडेचार वाजता आपरेशन थिएटर मध्ये नेलं. आजही त्याला विश्वास नव्हता की त्याच्या मुलीचं ऑपरेशन होईल. पण आश्चर्य असं की तिचं आज ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन यशस्वीही झालं होतं. मात्र ती बेशुद्ध होती. डॉक्टरांनी सांगीतलं होतं.
"ऑपरेशन यशस्वी झालंय. मात्र तिला सकाळी सकाळी होश येईल. तोपर्यंत काळजी घ्यायला हवी."
************************************************************************
ऑपरेशन थिएटर मधील तो आय सी यू कमरा. त्या ठिकाणी कोणालाही आतमध्ये येण्याची परवानगी नव्हती. पण सुकन्या लहान होती. ती एवढी लहान की तिला डॉक्टरांना सांभाळणं कठीण जाणार होतं. जेव्हा का होशमध्ये येईल. त्यामुळं की काय, तिला सांभाळायला अर्जूनलाच सांगीतलं होतं डॉक्टरांनी. तो आय सी यू कमरा की ज्यामध्ये वर्षोगणतीपासून रुग्ण होते. ते बेशुद्धावस्थेतच होते ब-याच दिवसापासून. त्यांचंही ऑपरेशन झालं होतं. पण अद्यापही त्यांना होश आलेला नव्हता. हार्टबीट मशीन त्यांच्या ह्रृदयाचे ठोके मोजीत होती. त्या मशीनमधील संगणकाच्या पटलावर त्यांचे ठोके दिसत असल्यानं ते जीवंत असल्याचं जाणवत होतं.
अर्जून आपल्या पत्नीसह आय सी यू मध्ये आपल्या मुलीला सांभाळत होता. त्याची मुलगी त्या लहानशा बिछाण्यावर गोल गोल फिरत होती. तिला होश नव्हता, तरीही ती कशी फिरत असावी. याचं आश्चर्य वाटत होतं. तशी सुई ब्रेक होईल याचा धोका होता. तसं डाक्टरांनी सांगीतलं होतंच की सुई ब्रेक होवू देवू नका. कारण सुई ब्रेक जर झाली तर तिला होश नसल्यानं तिला लावता येणार नाही. तसं पाहता डॉक्टरही आश्चर्यचकीत होते की मुलगी गोल गोल फिरत आहे.
सकाळ झाली होती. तसे डॉक्टर सुकन्याची तपासणी करायला आले. त्यांनी अर्जूनला विचारलं. त्यानं सांगीतलं की मुलगी रात्रभर गोल गोल फिरत होती. तसा अर्जून त्याव्यतिरिक्त काहीच बोलला नाही. तसे डॉक्टर म्हणाले,
"तुम्ही मुलीच्या लघवीकडेही लक्ष दिलं नाही. मुलीला रात्रभर असंच ठेवलं. म्हणूनच तर मुलगी गोल गोल फिरत असेल."
आता अर्जूनला मुलीच्या गोल गोल फिरण्याचं कारण कळलं होतं. तसं आज त्यानं मुलीच्या लघवीकडं लक्ष दिलं नव्हतं. त्यानं फक्त तिच्या सुईकडंच लक्ष दिलं होतं.

************************************************************************************************

दुपारचे तीन वाजले होते. तसा सुकन्याला होशही आला होता. तोच डॉक्टरांनी तिला वार्डात हलवलं. त्यातच दररोज तिची प्रकृती चांगली व्हायला लागली होती. काही दिवसातच सुकन्याला सुट्टीही झाली रुग्णालयातून.
सुकन्याला रुग्णालयातून सुट्टी झाली होती. तिचं ऑपरेशन झालं होतं. त्यातच तिचं ऑपरेशन झाल्यानं ती घरी आल्यावर रडत होती. तसा रुग्णालयात त्रास दिला नव्हता. अशातच जुलै महिना सुरु झाला होता.
जुलै महिना सुरु झाला होता. सुकन्याला तीन महिने झाले होते. त्यातच शाळा सुरु झाल्यानं आशेमुळं पुन्हा मुलीकडं न पाहता अर्जूननं सानित्राला शाळेत नेणं सुरु केलं होतं. त्यातच सानित्राला तिचे आजोबा सांभाळत होते. परंतू तिचं रडणं सुरुच होतं.
यावर्षी मुख्याध्यापकाला काय वाटलं माहित नाही पण शाळा मात्र दोघांचीही एकाच शिपमध्ये होती. परंतू त्यांचं त्रास देणं आज सुरुच होतं. आता मात्र तो त्रास सहन होत नव्हता. शाळा संचालक वेतन देत नव्हता सानित्राला. तसेच सुकन्यालाही त्रास होताच. शेवटी वर्षभर नोकरी केल्यानं मुख्याध्यापक व संस्था चालक यांच्या त्रासानं शाळा सोडून द्यावी लागली कायमची. आता काय सानित्रा घरीच राहात होती. घरचं वातावरण चांगलं होतं. आता मुख्याध्यापकाचा त्रास नव्हता सानित्राला.
सानित्रानं शाळा सोडली खरी. पण तिला फार वाईट वाटत होतं. तिला घरी करमत नव्हतं. त्यातच तिला नोकरीची आस असल्यानं व ती पुर्ण न झाल्यानं तिला बरं वाटत नव्हतं. तशी एक दिवस ती म्हणाली की मी काँन्व्हेंटला ड्युटी करायला जातेय. परंतू त्यावर अर्जूननं नकार दिला. त्याला वाटत होतं की सर्व संस्थापक हे एकाच माळेचे मणी असतात. त्यापेक्षा सानित्रानं घरीच बसावं. तिनं जास्तीच्या वेतनाचा विचार करु नये.नंतरचं नंतर पाहू. शेवटी तोही विचार सानित्राचा फसला. त्यातच तिला करमत नव्हतं. त्यामुळं की काय, ती घरी जास्त चिडचिड करु लागली होती. शेवटी त्यावर अर्जूननं उपाय काढला. घरी एक किराण्याचं दुकान थाटलं.
ते दुकानही चालत नव्हतं. पण उपाय नव्हता. अर्जूनला मुलीची काळजी होती. त्याला वाटत होतं की सानित्राची करमणूक व्हावी. त्याचबरोबर मुलगीही सांभाळता यावी.
किराण्याचं दुकान........ते दुकान चालत नव्हतं. पण त्या दुकानावर जेही ग्राहक येत होते, त्यांच्यामुळे कंटाळवाणेपणा नाहिसा झाला होता. आता तिला थोडंकाही का असेना करमत होतं. त्यातच आता पाहिजे त्या प्रमाणात शाळेची आठवण येत नव्हती.
सुकन्या आता मोठी होवू लागली होती. तसा अर्जून तिची काळजी घेवू लागला होता. त्यातच घर व शाळा अर्जून व्यवस्थीत सांभाळू लागला होता. परंतू ज्या शाळेत इमानीइतबारे सानित्रानं नोकरी केली. त्या शाळेत आता फुकटात नोकरी करणारी एक शिक्षीका आता अर्जूनमुळं शाळा संचालकाला उपलब्ध नसल्यानं मुख्याध्यापक आता अर्जूनला त्रास देवू लागला. तो एवढा त्रास देवू लागला की तो त्रास अर्जूनला सहन होत नव्हता.
अर्जूननं सानित्राला घरी बसवलं होतं. त्यातच ती लहानग्या सुकन्याची काळजी घेत होती. त्यातच ती दुकानही सांभाळत होती. आता तिला करमत होतं. कारण लहान लहान मुलं खावू घ्यायला येत होती.
आज सुकन्या लहानाची मोठी होत होती. त्यातच सुकन्यावर चांगले संस्कार टाकणे आवश्यक होते. त्यातच ते दोघंही चांगले संस्कार करीत होते. त्यातच त्याला वाटायचं की सुकन्यानं खरं बोलावं. कारण खरे बोलण्याचं फळ त्याला माहित होतं. खरं बोलण्यानं आपल्या व्यक्तीमत्वात ताठरपणा व स्वाभिमान येतो. हेही त्याला माहित होतं.
खोटं बोलण्याची सवय मायबापच लावतात असं त्याचं म्हणणं होतं. त्याचे गंभीर परिणामही शेवटी मायबापालाच भोगावे लागतात असेही तो मानत होता.
'मुले ही देवाघरची फुले' असं सानेगुरुजींनी म्हटलं. तर कोणी म्हणतात की लहान मुलं ही मेणाच्या गोळ्यासारखी असतात. ज्याप्रमाणे मेणाच्या गोळ्याला वाकवून जसा म्हटलं तसा आकार देता येतो. अगदी तसंच लहान मुलांना त्यांच्यावर संस्काराची फुंकर घालून त्याला हवे तसे संस्कार देता येतात. तरीही काही मुलं हे चक्क खोटं बोलत असतात.
लहान मुलं अगदी खरी बोलतात असं सर्वजण मानतात. समजतातही. अगदी खरं आहे. त्यामुळं त्यांची साक्षही न्यायालयात खरी मानली जाते. परंतू ते चुकीचं आहे. लहान लहान मुले एवढी खोटं बोलतात की आपला विश्वासच बसत नाही. आपण त्यांना विचारलं की तुझे वडील कुठं गेले तर चक्क सांगतात की ते गावाला गेले. परंतू थोड्या वेळानं घरातून आवाज येतो की बोला, काय काम आहे. आता सांगा यावरुन काय वाटतं? मुलं खरं बोलतात की खोटं? कोण शिकवतं त्यांना असं बोलायला? तर त्याचं उत्तर आहे की हे असं बोलायला मायबापच शिकवीत असतात. हे झालं घरच्या बाबतीत. मुलांना घरी त्याचे मायबापच खोटं बोलायला सांगतात. सांगीतलं जातं की कोणी आलाच तर त्याला पप्पा घरी नाहीत म्हणून सांगायचं. त्यानुसार ते खोटं बोलू लागतात. हळूहळू त्यामध्ये वाढ होवू लागते.
बाहेरचं जगही त्यांच्यासाठी खरं बोला असंच आहे. पण बाहेरचं जगही त्याला खरं बोलू देत नाही. तेही त्याला खोटंच बोलायला लावत असते.
म्हणतात की मुलं ही एखादा प्रसंग पाहिला की तो विसरत नाहीत. पण ते तसा प्रसंग विसरत जरी नसले तरी खोटं नक्कीच बोलत असतात हे तेवढंच खरं आहे.
शाळेत जेव्हा मुले येत असतात, जेव्हा शिक्षकांसमोर तिही मुलं चक्क खोटं बोलत असल्याचा प्रत्यय येत असतो. त्यांना विचारलं की अमुक विद्यार्थी कुठं गेला तर ते चक्कं सांगतात की तो गावाला गेला आणि तोच विद्यार्थी घरी जावून पाहिल्यास घरीच असतो. हे बरेचदा शिक्षकांना प्रत्ययास येत असते.
परीसरातही खेळ खेळतांना ही मुलं चक्क खोटं बोलत असतात. माझ्या एवढ्या धावा झाल्या. मी एवढे कंचे जिंकले. प्रत्यक्षात ते तेवढे कंचे त्यानं जिंकलेले नसतात. एवढंच नाही तर क्रिकेटचे खेळ खेळतांनाही याच खोटे बोलण्यातून त्यांच्या मनात चिडखोरपणा येतो. फलंदाजी करतांनाही ही मुले अापला प्रथम क्रमांक लावण्यासाठी शुल्लक प्रसंगी खोटं बोलत असतात.
खोटं बोलण्यालाही इतिहास आहे. आपला शेजारी असलेला पाकिस्तान नेहमीच खोटं बोलत असतो. तो तर तक्षशिला हे विद्यापीठ पाकिस्तानातच होतं म्हणतो तसेच चाणक्य आणि पाणिनी आमचं भूषण आहे असं मानतो. हे खोटं बोलणं नाही काय? आजपासून २७०० वर्षापुर्वी तक्षशिला पाकिस्तानात होती व त्यात १६ देशाचे विद्यार्थी ६४ भाषामध्ये ज्ञान प्राप्त करीत होते तसेच चाणक्य आणि पाणिनी हे पाकिस्तानचे पुत्र होते. असं पाकिस्ताननं म्हणताच यावरुन एकदा त्यांनी असं म्हटल्यावर वातावरण चांगलं तापलं होतं. कारण आर्य चाणक्याचा जन्मच मुळात पाटलीपुत्रचा, ज्याला आपण आता पाटणा म्हणतो. जे बिहारमध्ये आहे.
पुर्वीच्या काळात भारतीय राजे महाराजे खरं तेच बोलत असत. ते फितूरांना शिक्षा देत. त्याचं कारणही तसंच होतं. फितूर मंडळी ही चक्क खोटं नाटं बोलून राज्याला धोके करीत असत. त्यामुळं राज्य बुडीस निघत असे. राज्यातील काही लोकं संधीसाधू व स्वार्थसाधू भुमीका घेवून आपल्याला राजपाट मिळावा म्हणून चक्क खोटं बोलत असत.
आताचा काळ जर पाहिला तर कामधंद्याचं युग आहे. कोणी कामं करणार नाही तर पोट भरणार नाही. त्यातच धंद्यामध्ये एखाद्यानं विचार केला की आपण खरं बोलून धंदा करावा. तर त्याचा धंदा लवकर बुडेल. तेव्हा व्यवहारीक नफा कमविण्यासाठी खोटं बोलावंच लागतं. तसं पाहता खोटं बोलण्यामध्ये पुरुषांचं नाव आहे. पण काही महिलाही चक्क खोटं बोलत असतात. त्याची काही कारणंही आहेत.
१)कोणतंही नातं हे दिर्घकाळ टिकवायचं असेल तर जोडीदाराला सा-याच गोष्टी माहिती करुन द्यायच्या नसतात. म्हणून त्या महिलांना खोटं बोलावं लागतं. आयुष्याची तडजोड करण्यासाठी.
२)मुलं ही रागीट असतात. त्यांच्या रागावर त्यांचं नियंत्रण असावं म्हणून मुली खोटं बोलत असतात.
३)काही नाते असे असतात की त्यात गैरसमज निर्माण होत असतो. हा गैरसमज निर्माण होवू नये म्हणून मुली खोट्या बोलत असतात.
४)जीवनात चुका होतच असतात. अशीच एखादी चूक झाली की पती काही म्हणेल, रागावेल या भावनेने मुली चक्क खोट्या बोलत असतात.
५)प्रेमीकांना आपले प्रेम टिकविण्यासाठी खोटं बोलावंच लागतं.
विशेष सांगायचं म्हणजे कोणी खोटं जरी बोलत असेल तरी तो खोटं बोलत आहे हे सहजासहजी ओळखता येत नाही. ते कधीकधी त्यांच्या हावभावावरुन ओळखता येत असते. त्या व्यक्तींचे डोळे, चेह-याचे हावभाव हालचालीचे निरीक्षण तसेच बोलण्याची पद्धत पाहून तो खोटं बोलत आहे की खरं हे ओळखता येते.
महत्वाची गोष्ट अशी की माणसानं खोटं बोलू नये. त्याचे परीणामही चांगलेच निघत असतात. परंतू आजचा काळ आहे की प्रत्येक माणूस हा खोटं बोलत असतो. त्याला कारण अाहे त्याचे मायबाप.
मुलांच्या जीवन जगण्याची सुरुवात घरापासून होते. अशावेळी घरात जर मायबाप खोटे बोलत नसतील तर त्याचा परीणाम मुलांवर होतो. तेही मग सहजासहजी खोटे बोलत नाहीत. परंतू ज्या घरात स्वतः मायबाप खोटं बोलतात. ते पाहून त्यांची मुलं ही खोटी बोलत असतात.
खोटंबोल........ शक्यतोवर खोटं बोलू नये. त्याचे परीणाम गंभीर होत असतात. आयुष्य चांगलं जगता यावं असं जर वाटत असेल तर अगदी खरं बोलावं. एक अर्धसत्य बोलण्यानं धर्मराज युद्धीष्ठराचा अंगठा स्वर्गात गेला नाही. हा इतिहास आहे. त्यामुळं शक्यतोवर खोटं बोलू नये. त्यासाठी मायबापांनीही खोटं बोलू नये हे तेवढंच सत्य आहे.
मुख्याध्यापकाचा त्रास अर्जूनचा स्वाभिमान हेरावून नेत होता. मुख्याध्यापक आता अधिकच अर्जूनचा राग करीत होता. त्याला काय वाटत होतं कुणास ठाऊक. त्यातच कोणताच मार्ग अर्जूनला सापडत नव्हता. अशातच एक दिवस त्याला एका शिक्षकाचा फोन आला. मुख्याध्यापक अपघातात गेलेत.
अर्जूनला मनस्वी दुःख झालं. त्यातच त्याला थोडा आनंदही झाला. कारण तो आता मुख्याध्यापकाच्या त्रासातून मुक्त झाला होता. जो मुख्याध्यापक त्याला अनन्वीत त्रास देत होता. रस्ते अपघात एक भीषण समस्या झाली होती. रस्त्यावर गाड्या किड्या मुंग्यासारख्या चालत होत्या. त्यातच लोकही किड्यामुंग्यांसारखी मरत होती. दररोज वर्तमानपत्र उघडलं तर एक ना एक बातमी वर्तमानपत्रात झळकलेली दिसत असे, ती म्हणजे अमुक अमुक ठिकाणी अपघात झालाय. ते वाचलं की अंगावर काटा उभा राहात असे. अपघात कुणाचाही होवो, थोडीफार भीती वाटणारच.

******************************************************

आज लोकसंख्या एवढी वाढली आहे की त्या लोकसंख्येवर आळा घालता येणे सहज शक्य नाही. अशातच ही वाढती लोकसंख्या आपले सुख मिळविण्याचे साधनं शोधत असते. त्यातच असे साधनं शोधत असतांना ते कुठेही जायला यायला साधनं विकत घेत असतात.
हाच हेतू अंगीकारुन लोकांनी प्रवासासाठी स्वतःची साधनं विकत घेतली. त्यातच कंपन्यांनी गाड्या या किस्तवार देणं सुरु केल्यानं प्रत्येकांच्या घरी गाड्या पोहोचल्या. त्यातच थोडेसे गाड्या शिकलेले तरुण तरुणी अगदी अल्पवयात रस्त्यावरुन गाड्या चालवितात. तेही भरधाव. ते मायबापांना ऐकतच नाही. मायबापही त्यांना बिनधास्त गाड्या देत असतात. त्यांना आपली पाल्ये गाडी कशी चालवितात हे माहित नसतं. त्यातच ते गाडी चालवितांना एका बाजूनं न चालवता अगदी मध्यभागातून गाड्या चालवित असतात. त्यातच त्याच मध्यभागातून जड वाहनेही भरधाव चालत असतात. त्या जड गाड्यावर असलेले चालक हे अगदी झोप लागू नये वा थकवा वाटू नये, म्हणून नशा करुन गाड्या चालवित असतात. त्यातच अशा तरुणाईच्या आड्या तेढ्या गाड्या चालविताच त्या जड वाहन चालवित असलेल्या चालकांचे नियंत्रण सुटते व अपघात घडतो.
मुख्यतः अपघात घडतांना जर दोघे बसले असतील आणि ते आपापसात बोलत असतील तर हमखास होतो. कारण बोलतांना मेंदूची तीन भागात विभागणी होत असते. एक म्हणजे समोर पाहणे दुसरं म्हणजे कानानं आवाज ऐकणे व तीन म्हणजे गोष्टी करणे. त्यातच गोष्टी करता करता आपला ताळमेळ सुटतो व अपघात घडतो.
साधारणतः आपला मेंदू हा एकाचवेळी तीन विचार करु शकतो किंवा तीन कार्य करु शकतो. पण त्याला चवथं कार्य जमत नाही. त्यातच हे वाहनस्वार गाडी चालवितांना स्वतःला महाहुशार समजून खर्रयाचे तोबारेही तोंडात भरुन चालत असतात. त्यातच गोष्टी करता करता त्यांचं ते चघळणंही सुरुच असते. त्यातच थुंकणंही. त्याच चवथ्या कार्याची सुसूत्रता जुळली न गेल्यानं अपघात होतो.
काही काही लोकांचा अपघात तर मोबाइल वापरल्यानंही होत असतो. ते मोबाईल कानाला लावून बोलत असतात. एक लक्ष समोर पाहण्यात असते. दुसरं आजूबाजूंच्या गाड्यांचे आवाज ऐकण्यात तिसरं लक्ष मोबाईलचा आवाज ऐकण्यात व चवथं लक्ष ते ऐकून बोलण्यात. अशावेळी ताळमेळ बिघडतो व अपघात होतो.
तरुण वयातील मुलांच तर बोलूच नये. त्यातच तरुण मुलीही. त्या तर आपल्याला काहीच होवू शकत नाही वा आपण महिला असल्याने आपला गुन्हा जरी असला तरी आपल्याला कोणीच काही म्हणू शकणार नाही असा विचार करुन त्या बिनधास्त गाड्या चालवित असतात. त्यातच एखाद्या वेळी गाडी टकरावतेच. त्यातच त्या तरुणींचा गुन्हा असला तरी लोकं सहानुभूती वजा पुरुषांनाच खोटे ठरवितात. यातच त्या तरुणींची महत्वाकांक्षा वाढते व त्या त्यानंतरही आपल्या चालविण्यात सुधार न करता पुन्हा अगदी तशाच पद्धतीनं गाड्या चालवित असतात. त्याची परियंती पुढे त्यांचा मोठ्या स्वरुपात अपघात होण्यामध्ये होते. त्यांचा असा विचार करुन अगदी सुसाट वेगाने कट मारुन गाड्या चालवणे हे त्यांचे त्यांच्याच जीवावर बेतते. दुस-याच्या नाही हे तेवढंच सत्य आहे.
अपघात होतच असतात. आपली चूक असो वा नसो, त्यासाठी आपण पुरेशी आपलीच सुरक्षा करुन घ्यायला हवी. त्यासाठी पुरेसं डोक्याला मार लागू नये म्हणून मेंदू सुरक्षा कवच वापरायला हवं. तेही चांगल्या प्रतीचं. परंतू आपण ते न वापरता अगदी आडवळणानं जातो. पोलिसांची चैलन करण्याची आपल्याला भीती वाटते. पोलिसांनी पकडू नये म्हणून आडवळण. परंतू अपघात आडवळणावर होणार नाही कशावरुन. तो काय सांगून येतो काय, मी अमुक ठिकाणी होणार नाही. तू याच रस्त्यानं जा. अशातच आपण आडवळणानं जाताच आपल्याला अपघात होतो. चूक कधीकधी आपलीच असते.
रस्ते अपघातात कधीकधी चूका आपल्याच असतात. पण आपण कधीच आपली चूक मानत नाही. त्यातच आपला अहंकार वाढतो. तो अहंकार एवढा वाढतो की त्यानंतर आपण कशी गाडी चालवतो, ते आपल्यालाही कळत नाही. कारण रस्त्यावरुन गाड्या चालवितांना आपण स्वतःला शेरच समजत असतो. मग अपघात होणार नाही तर काय? तसंही पाहता लोकसंख्या वाढलीच आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या काळात रस्त्यावरुन अगदी मुंग्यांची रांग चालल्यागत वाहने धावत असतात.
रस्ते अपघातात अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं कर्म. आपले जर कर्म वाईट असेल किंवा आपण कोणाचे मन जर दुखावलेले असेल तर तो व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात शिव्या शाप देतच असतो. कधी तोंडातून बोलून दाखवतो, ' जा कुत्र्याच्या मौतीनं मरशील.' 'जा जेव्हा मरशील तेव्हा तोंडात पाणीही पडणार नाही. तेव्हाच असं अपघाताचं मरण येतं. त्यावेळी जर कोणी अचानक गेलेलं असेल तर तोंडात पाणीही पडत नाही. तसेच कोणी म्हणतात की 'मरशील तर तुझा चेहराही लोकांना दिसणार नाही. अगदी तसंच घडतं. कधी कधी चेहराही दिसत नाही.
कधी कधी आपलाच गुन्हा असतो. पण तो आपण प्रत्यक्षात न स्विकारता दुस-याला दोष देवून म्हणतो की ' जा कुत्र्याच्या मौतीनं मरशील' किंवा कोणता शाप देतो. परंतू यामध्ये ज्यांचा गुन्हाच नसतो, त्याला ती शापवाणी लागत नाही. ती शापवाणी आपल्यालाच लागते. त्यांचे परीणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून कोणाबद्दल काहीही अपशब्द बोलू नये. तसेच कुणाला शापही देवू नये. तुम्ही शाप देणारे कोण? कोणीच नाही. तेव्हा असा शाप कोणीही कोणाला देवू नये. जेणेकरुन तो शाप अापल्यालाच लागेल व आपलेच नुकसान होईल. रस्ते अपघातही आपल्याच ब-यावाईट कर्मानुसार घडत असतात. आपले कर्म जर चांगले असतील तर आपला रस्ता अपघात होणारच नाही. मरण तर केव्हा ना केव्हा येणारच आहे. मरणानं कोणाला सोडलेलं नाही. तेव्हा आपण आपले कर्म चांगले ठेवावे. जेणेकरुन त्यानुसार चांगले मरण येईल. आजुबाजूला आपले चार नातेवाईक बसलेले असतील. ते आपल्या मरणावर शोक व्यक्त करीत असतील. कोणी पाणी पाजतील, कोणी गुलाबजल. त्यावेळी खरंच आपल्याला वाटेल की आपण पुण्यवान होतो की आपल्याला असं मरण मिळत आहे. तेव्हा मरतांनाही आपलं ह्रृदय सदगद होईल. हे तेवढंच सत्य आहे. आपल्याला मरण असं रस्ते अपघातातून व्हायला नको. प्रत्येकानं गाड्या घ्या. ती आपली गरज आहे. परंतू गाड्या घेतल्यानंतर सावकाश व हळू चालवा. हेल्मेट वापरा. तसेच मोबाईलवर बोलत वा कोणाशी गोष्टी सांगत गाड्या चालवू नये. कारण गोष्टी नंतरही सांगता येईल किंवा गोष्टी करायच्याच आहेत तर थोडंसं थांबून कराव्यात. जर वाचलो तर आणखी गोष्टी करता येईल किंवा अर्जंट फोन आल्यास थोडंसं थांबून बोलावं. वाचलो तर बरंच बोलता येईल. तसेच आपले कर्मही चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा. विनाकारण कोणाचा जीव घेवू नये वा कोणाला विनाकारण त्रास देवू नये. साध्या मुंग्यामाकोड्यांनाही नाही. तसेच आपली सुरक्षा आपणच करावी. कारण रस्ते अपघात ही एक भीषण समस्या आहे. जी समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यावर अनुबंध लावता येईल.
****************************************************************************************

अर्जूननं जसं मुख्याध्यापक गेल्याचं ऐकलं. त्याला त्याचा गतकाळ आठवला. गतकाळात मुख्याध्यापक जीवंत असतांना त्याला उपासमारीचा सामना करावा लागला होता.
एकदाचा तो प्रसंग त्याला आठवला. त्या प्रसंगानुसार मुख्याध्यापकासोबत एकदा त्याचं भांडण झालं होतं. त्यातच ते भांडण एवढं विकोपाला आलं की त्यात मुख्याध्यापकानं अर्जूनच्या अंगावर हात उचलला होता. त्यातच अर्जूनला तो राग सहन न झाल्यानं त्यानं मुख्याध्यापकावर खटला दाखल केला होता. त्याची परियंती अशी झाली की मुख्याध्यापकानं अर्जूनचं वेतन बंद केलं होतं. त्याला ते सर्व आठवत होतं.
अर्जूनचे वेतन बंद झाले खरे. पण यात अर्जूनची काहीएक चूक नव्हती. अर्जूनच्या अंगावर मुख्याध्यापकानंच हात उचलला होता व आज अर्जूनचे वेतनही त्यानंच बंद केले होते. त्यातच एका वर्षात अर्जूनला खटल्यामध्ये पराभव स्विकारावा लागला. त्याचं कारण म्हणजे पैसा.
अर्जूनजवळ एवढा पैसा नव्हता की तो आपलं घर दोन वर्ष चालवू शकेल. त्यातच त्याला नोकरीही करावी लागत होती. मग नोकरी करुन इतर कामं तो कशी करणार. त्यातच त्याला पुन्हा दुसरी केस टाकावी लागली होती. ती म्हणजे वेतनाची. ही वेतनाची केस तो जिंकला होता. पण त्याला मारहानीची केस हारावी लागली होती.
आता वेतनही सुरु झालं होतं. सगळं बरोबर होतं. परंतू मुख्याध्यापकानं त्याला सोडलं नाही. त्यातच मुख्याध्यापकानं त्याच्या एक वर्षानंतर अर्जूनवर परत खटला दाखल केला आणि न्यायाधीशांना त्यात विनवणी केली की अर्जूननं मुख्याध्यापकावर खोटी तक्रार टाकली. साक्षीदारानंही खोटी साक्ष दाखल केली. तसेच पोलिसांनीही खोटी चौकशी केली.
अर्जून हा आधीच परेशान होता त्या मुख्याध्यापकामुळे. त्यातच आता परत बदल्याच्या भावनेची तक्रार. त्यामध्ये मुख्याध्यापकाचा फायदाच होता. तो मुख्याध्यापक अशीच दहशत पसरवून इतर शिक्षकांकडून मनमानीपणानं पैसा वसूल करीत होता. त्याचं षडयंत्रच होतं, तसा पैसा कमविण्याचं.
उलटा चोर कोतवाल को दाटे अशी ती केस. त्यातच मुख्याध्यापकानं उलटी केलेली केस. न्यायाधीशांना कुठं माहित होतं, त्यात कितपत सत्यता आहे. त्यांना तर पुरावा हवा होता. तो पुरावा, ज्या पुराव्यानं अर्जूनला निर्दोष सोडता येणार होते. त्यासोबतच साक्षीदारालाही. साक्षीदाराची काहीही चूक नव्हती. तरीही त्यालाही या प्रकरणात गोवलं गेलं होतं.
दोन वर्ष तर मोठे वाईटच गेले होते. त्यातच आता परत हे दुखणं अर्जूनच्या मस्तकी आलं होतं. काय करावं सुचत नव्हतं. तसेच या दुखण्यातून मुख्याध्यापकाच्या हातून सुटणं कठीण होतं. काय करावं सुचत नव्हतं. तसा तो दैवाला व विधात्याला प्रार्थना करीत होता. कारण त्यानं त्याची तक्रार ब-याच ठिकाणी केली होती. पण काहीच उपाय निघत नव्हता. अधिका-यांनीही पैशाच्या पेलानं त्यावर उपाय काढणे बंद केले होते. शेवटी विधात्यानंच उपाय काढला. तोही कायमचा आणि मजबूत उपाय होता.
आज ती बातमी. बातमी खरी होती. सायंकाळी सात वाजता रुग्णालयातून प्रेत मिळालं. त्यातच सायंकाळी सातला प्रेत मिळताच मयतही झाली आणि अर्जूननं सुटकेचा श्वास सोडला. तो अपघात का असेना. पण विधात्याच्या दरबारात खरा न्याय झाला होता. जो न्याय अर्जूनला न्यायाधीश महोदयानं दोन वर्षापुर्वी दिला नव्हता.

माणूस जीवंत असतो. तेव्हा त्याला किती मोह माया असते. त्याला किती राग येतो. किती अहंकार असतो. आपले षंडरिपू जे आहेत. त्या सर्व षडरिपूंची जोपासणा करतो माणूस. तोही जीवंत असतांना. मरणानंतर काय मिळवत असतो तो. तर काहीच नाही असंही म्हणता येईल.
बळवंत त्याचं नाव. तो खुप अहंकारी होता. नशीबानं नातेवाईकांची शाळा म्हणून त्याला मुख्याध्यापक बनवलं. त्यालाही मुख्याध्यापक बनतांना त्याला कोणतीच तारेवरची कसरत करावी लागली नाही. ते पद त्याला काही न करता आपोआपच मिळालं होतं.
माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला सहजासहजी जर एखादी वस्तू मिळत असेल, तर त्या गोष्टीचं त्याला पाहिजे त्या प्रमाणात महत्व वाटत नाही. अगदी तीच गोष्ट बळवंतच्याही बाबतीत लागू होत होती.
बळवंत नातेवाईकाची शाळा म्हणून मुख्याध्यापक बनला होता. पण त्याला ते पद काहीही न करता असंच मिळालं असल्यानं त्याला त्या पदाचं महत्व वाटत नव्हतं. त्यातच त्याच्या मनात अहंकार वाढीस लागला. त्यातूनच लोभही निर्माण झाला.
बळवंत हा मुख्याध्यापक असल्यानं त्याला सरकारवरुन मुख्याध्यापक म्हणून जास्त वेतन मिळत होतं. परंतू त्याच पैशाचा त्याला लोभ चढला. त्यातच तो लोभ एवढा चढला की बळवंत आता शिक्षकांना त्रास देवू लागला. कारण त्याचं त्यात उद्दीष्ट्य वेगळं होतं.
बळवंतचं उद्दीष्ट्य होतं अति पैसा कमविणे. त्यातच तो शिक्षकांना त्रास देवू लागला. त्यातूनच कंटाळून काही शिक्षकांनी त्याला देण म्हणून देणगी सुरु केली. अशातच जे शिक्षक घाबरलेले, त्यांनी देणगी सुरु केली. परंतू जे शिक्षक घाबरले नव्हते. त्यांनी बळवंतला देण दिली नाही. उलट देणगी त्यानं घेवू नये व असा फुकटचा पैसा कमवू नये. असे सांगीतले. तसेच त्याचे परीणामही वाईटच निघतील असे सांगीतले.
इतर शिक्षकांनी बोललेले ते वाक्य. मुख्याध्यापक म्हणून अहंकार बाळगून असलेल्या बळवंतच्या मनात खुपलं. त्याचा राग अनावर झाला. त्यातच एक अर्जून नावाचा शिक्षकही पिसल्या जावू लागला.
अर्जून साध्या भोळ्या स्वभावाचा प्राथमिक विभागाचा शिक्षक होता. तो इमानदारीनं मुलं शिकवीत होता. परंतू त्याच्याकडूनही बळवंतनं देण म्हणून काही पैसा मागीतला. परंतू त्यानं तो द्यायला नकार दिला. त्यातच तू असा पैसा का देत नाही म्हणत अर्जूनशी मारामारी झाली होती बळवंतची. खटला न्यायालयात सुरु होता.
खटल्यावर खटले. अर्जूनच्या नाकी नव आले होते. तरीही तो खटला लढतच होता. बळवंत मात्र 'न्यायालयात पैसा लागतो खटल्याला. द्या नाहीतर पाहून घेईल' असे म्हणत इतर शिक्षकांकडून पैसा वसूल करु लागला. इतर शिक्षकही आपल्यावर असे खटले चालू नये म्हणून त्या बळवंतला विनाकारण पैसा देत. त्यातच त्याला शापही देत. पण बळवंत काही शापवाणीला मानत नव्हता. तो फक्त पैसा एके पैसा. पैसाच देव आहे. पैसाच सगळं काही करतो असं मानत होता.
बळवंतचं पाप करणं कोणीही पाहात नव्हतं. पाहू शकत नव्हता. त्या पापावर सर्वजण पांघरुणच घालत होते. मात्र ते पाप एकच व्यक्ती पाहात होता. तो म्हणजे विधाता. विधात्याला सगळं दिसत होतं. त्यामुळं तो चूप नव्हता. तो हिशोब लिहित होता बळवंतच्या पापाचा.
आज विधात्याचा हिशोब पूर्ण झाला होता. विधात्यानं बळवंतचं पाप मापदंडात मोजलं होतं. तसं पाहता बळवंत घरातून बाहेर पडला. तसं घरातून बाहेर पडताक्षणी बळवंतला त्याच्या पत्नीनं टोकलं देखील. परंतू बळवंत पत्नीचं न ऐकता दोन चाकी गाडीनं घरातून बाहेर पडला. तो मुख्य रस्त्यावर आला. तसं पाहता बळवंतनं रस्त्याची कल्पना होतीच.
तो सिमेंटचा रस्ता. तो रस्ता आज धोकादायक बनला होता. त्या रस्त्यानं नेहमी गाड्यांची वर्दळ राहात असे. तसं पाहता आज बळवंतच्या गाडीचा वेग नेहमीपेक्षा जास्तच होता.
बळवंतच्या पापाचा घडा भरला होता. त्याच्या गाडीची गती जास्त होती. तोच पुढे चौफुली रस्ता आला.
या चौफुली रस्त्यावर वाहने चालतच होती. परंतू ती वाहने हे गतीरोधकाचे नियम पाळत चालत होती. त्यातच या चौकात समोरुन एक चारचाकी गाडी आली.
बळवंत गाडी चालवत होता. त्याच्या गाडीवर मागील बाजूस एक व्यक्ती बसला होता. त्याच्या गोष्टी सुरु होत्या. त्यातच त्या गोष्टीत पुढून येणारी ती गाडी दिसलीच नाही. तोच ती गाडी आणि त्यातच तो काळ या दोघांची सुसूत्रता जुळली आणि बळवंतची गाडी त्या चारचाकी गाडीवर धडकली. तसा वेग जास्तच.
बळवंतची गाडी धडकली खरी. तसा गाडीचा वेग जास्त असल्यानं बळवंत गाडीवरुन त्या सिमेंटच्या रस्त्यावर फेकला गेला. त्यातच त्याचं डोकं त्या सिमेंटच्या रस्त्याला टकरावलं. त्यातच ते फुटलं. मेंदूला जबरदस्त इजा झाली. तसं कोणीतरी म्हणालं,
'यांना डॉक्टरकडे घेवून चला.'
अपघात झाला होता. झालेला अपघात पाहायला बघ्यांची गर्दी जमली होती. सगळेजण डॉक्टरकडे घेवून चला म्हणत होते. परंतू कोणीही त्यांना उचलून न्यायला तयार नव्हता. त्यातच वेळ निघून जाऊ लागला. शेवटी पाच पंधरा मिनीटानं कोणीतरी त्यांना उचललं व रुग्णालयाकडे रवाना केले गेले. रुग्णालय आलं होतं. त्यातच डॉक्टरांनी रुग्णाला तपासलं.
डॉक्टरांनी रुग्णाला तपासलं खरं. त्यातच डॉक्टरांनी बळवंतला मृत घोषीत केलं.
बळवंत मरण पावला होता. ती गोष्ट सर्वांना माहित झाली होती. तशी ती गोष्ट अर्जूनलाही माहित झाली होती. बळवंत मरण पावताच अर्जून बळवंतबद्दल विचार करीत होता.
'काय मिळवलं?' अर्जूनला सहजच विचार आला. बळवंत मरण पावला खरा. पण त्यानं काहीच मिळवलं नव्हतं. त्याच्या मुलांची विवाहाची वय झाली होती. पण विवाह झाले नव्हते. नातवंड अंगाखांद्यावर खेळली नव्हती. निवृत्त होवून दोन वर्ष परीवारासोबत सुखानं मजेत घालवता आली नव्हती. तसेच मुलांनाही कोणत्याही स्वरुपाचे कामधंदे मिळालेले नव्हते. त्यातच गडगंज संपत्ती असूनही त्याला परीवारासमोर सुखानं मरता आले नव्हते. अकस्मात मृत्यू आल्यानं त्याच्या मुखात दोन थेंब गुलाबपाणी गेलं नव्हतं वा साधं पाणीही त्याला नशीब झालं नव्हतं. आज अर्जून विचार करीत होता की त्यानं हे सर्व कशासाठी केलंय.
बळवंतनं पाप करुन गडगंज संपत्ती गोळा केली. पण पारड्यात काय मिळालं? ती मालमत्ता......ज्या मालमत्तेवर त्याला सुखही उपभोगता आलं नाही. ज्या मालमत्तेनं फक्त त्याचा परीवार सुखी झाला. परंतू मुखात पाणी पडलं नाही. खरं तर बळवंतनं मरतांना आपली मालमत्ताही सोबत नेली नाही.
आज मरणानंतर त्याचा परीवार सुखात होता. तो साधी बळवंतची आठवणही काढत नव्हता. मुलं हवालदील असल्यानं बळवंतनं एवढं कमवलं तरी त्याला शिव्याशापच देत होती. पत्नी म्हणत होती. काय दिलं. फक्त पैसा..... ज्या पैशानं सुख मिळत नाही. ज्या पैशानं विवाह जुळत नाही. ज्या पैशानं मुलांना नोकरी लागत नाही. मुलंही तोच विचार करीत होते.
बळवंतला काही काही माणसं चांगली म्हणतही असतील. पण काही माणसं तर त्याला दोषच देत होती. ते सगळं बळवंतचा आत्मा वरुन पाहात होता. त्या दोषारोपणानं बळवंतचा आत्मा त्राही त्राही होत होता. तो आत्मा संतापत होता. ते दृश्य पाहून. म्हणत होता हरघडी की मी हे सर्व केलं परीवाराच्या सुखासाठी. पण आज माझा परीवारच मला जिथे दोष देत आहे. तिथे मी काय मिळवलं. काहीच नाही. त्यापेक्षा मी चांगुलपणानं वागलो असतो तर बरं झालं असतं.
बळवंत मरण पावला होता. पण त्याची आठवण आज अर्जूनला येत होती. ती आठवण त्याला त्रस्त करीत होती.

************************************************************************
अर्जून एक प्राथमिक शिक्षक होता. त्याचा शिकविण्याचा संबंध लहान लहान मुलांशीच येत होता. तो जिकीरीनं शिकवीत होता.
प्राथमिक शिक्षक........लोकांचा गैरसमज होता की हे प्राथमिक शिक्षक काय? शेंबड्या मुलांना शिकविणारे. त्या मुलांना काय शिकविणं कठीण आहे काय? कोणीही शिकवू शकतो. तसं कोणी कोणी शहाणपण करुन अर्जूनला त्याबद्दल म्हणत असे. तसा अर्जूनला त्या म्हणणा-याबद्दल रागच येत असे. परंतू तो चूप राहात असे. तो तसं पाहिल्यास विद्यार्थ्यांना बरोबर शिकवित होता. तरीही मुलं पूर्णतः शिकत नव्हते. परंतू प्राथमिक शिक्षक हाच राष्ट्र उभारणीतील कणा होता.

लहान लहान मुलं. जेव्हा ती लहान लहान असतात. त्यांना कळतही नसतं काय करायचं. ती मुलं अगदी बाल्यावस्थेतच शाळेच्या सिढ्या चढत असतात. ते ज्या काळात येतात. त्या काळात ते अक्षरशः रडत असतात. त्याच रडण्यानं त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात असतात तर कधी नाकातून शेंबूडही वाहात असतं. ज्यावेळी ते शिक्षकांसमोर येतात. त्यावेळी अगदी कोणालाही किळस येईल असे प्रकार घडतात.
ह्या अगदी कोमल वयात जी मुलं शाळेत येतात. त्यांना व्यवस्थीत सवयीही लागलेल्या नसतात. कधी कधी तर ते वर्गातच शौच करुन ठेवतात. कधी वांतीही करतात. मग ते सगळं स्वच्छ करणं शिक्षकालाच करावं लागतं. कारण शिपाहीदेखील कधी कधी उपयोगाचा नसतो.
प्राथमिक शिक्षक हा राष्ट्र उभारणीचा कणा आहे असे म्हटल्यास अातिशयोक्ती होणार नाही. कारण ज्यांना किंबहूना कोणत्याच सवयी नसतात. त्यांना त्यांचं शेंबूड पुसण्यापासून तर त्यांना शौचास कुठे जावे, केव्हा आणि कसे जावे? तसेच लघवी लागली तर शिक्षकांशी कसे बोलावे? अापल्या कोणत्या बोटांचा इशा-यासाठी कसा वापर करावा? किती व कोणते बोटं केव्हा दाखवावे? यासोबतच त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक प्रयत्न करीत असतात. त्यांना लिहायला वाचायला शिकवितात. तसेच त्यांच्या अंगात जे सुप्त गुण असतात. तेही वाढविण्यासाठी झटतात.
खरं तर त्यांना लिहायला वाचायला शिकविणं तारेवरची कसरतच असते. तसेच उदाहरणं शिकवणंही........कारण ते क्षणातच विसरत असतात. त्यामुळं वेगवेगळे प्रयोग करुन त्या मुलांच्या लक्षात कसे राहील यासाठी हे प्राथमिक शिक्षक प्रयत्न करीत असतात.
कोणताच प्राथमिक शिक्षक हा कामचूकार नसतो. तो आपल्या मुलांवर ज्याप्रमाणे प्रेम करतो. त्याचप्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांवर प्रेम करतो. बदल्यात काय मिळतं? फक्त वेतन.......जे वेतन म्हणजे त्यांचं विद्यार्थी वर्गावरील प्रेम नसतं. जे वेतन त्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्यासाठी पुरेपुर नसतं. खरं तर त्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकांची अपेक्षा असते की त्या मुलांनी त्या शिक्षकांना विसरु नये. त्या विद्यार्थ्यांनी कधी एखाद्यावेळी शाळेत येवून बोलावं. नतमस्तक व्हावं. एवढंच नाही तर त्यांचा विद्यार्थी भविष्यात खुप खुप शिकावा. खुप पुढे जावा. जेणेकरुन त्या शिक्षकाला आनंद वाटेल. परंतू आज त्या विद्यार्थ्यांकडं पाहून अशा प्राथमिक शिक्षकांनाही विचार येतो की आपण फक्त विद्यार्थ्यांना वेतन मिळतं म्हणून शिकवायचं. कारण मुलं भविष्यात आपल्याला कधी विचारत नाही. कधी उच्च पदावर गेलेही तरी आपलं साधं नावंही घेत नाहीत. त्यामुळं विद्यार्थी जसे वागतात. तसे आज शिक्षक वागू लागले आहेत. ते फक्त वेतनापुरतेच शिकवू लागले आहेत.
प्राथमिक शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रउभारणीचं बीज तयार होत असतं. तोच विद्यार्थ्यांमध्ये त्यानं कसं वागावं, कसं नाही याचं बीजारोपण करीत असतो. त्याला सवय लागते ती चांगल्या संस्काराची. पुढं ती मुलं मोठी झालीच तर त्यांच्यात आलेले चांगले संस्कार...... हे चांगले संस्कार कधी मिटत नाही. एक उदाहरण देतो. एका चौथीच्या वर्गात एक शिक्षक शिकवीत असतांना सुट्टी झाल्यावर एक मुलगा शाळेतील पडलेले लोखंडाचे तुकडे दप्तरात भरुन पळून जात असतांना दुस-या मुलानं सांगीतलं. शिवाय त्याला पकडूनही आणलं. तसं पाहता आता मारण्याची शिक्षा करता येत नाही. पुर्वी तसं मारता येत होतं. त्या शिक्षकानं त्याला चांगलं झोडपलं. पुढं तो चौथी पास होवून दुसरीकड गेला. तो खुप शिकला. मोठा ऑफिसर झाला आणि एकदा तो मुलगा त्या शिक्षकाला भेटायला आला. पायावर नतमस्तक झाला. म्हणाला,
"ओळखलं सर."
शिक्षकानं ओळखलं नसल्यानं नकार दिला. तेव्हा त्यानं परीचय देत म्हटलं,
"मी अमूक अमूक तुमच्या हातून शिकून गेलेला विद्यार्थी. तुम्ही जर मला त्या वेळी मारलं नसतं तर आज मी ऑफिसर झालो नसतो."
त्याचं बरोबर होतं. कारण संस्कार काही दुकानात मिळत नाही. संस्कार मायबाप शिकवितात. पण त्यासोबतच त्यांच्या आदर्श संस्काराला वाढवतो तो प्राथमिक शिक्षक. त्या विद्यार्थ्याला समझदारी आल्यावर त्याला कोणीही ज्ञानामृत पाजू शकतील. पण ज्यावेळी ते पहिल्या वर्गात वा नर्सरीत येतात. तेव्हा ते अबोध असतात. त्यांना किंचीतही समझदारी नसते. त्यावेळी त्याला समझदार बनविणे, त्यात संस्कार टाकणे हे शिक्षकाचे काम. शिक्षक त्यावेळी हेच काम करीत असतो. म्हणूनच ज्यावेळी याच विद्यार्थ्यांमधून कोणी राष्ट्रनिर्माते बनत असतात. जे राष्ट्रजोडणीचं काम करीत असतात.
प्राथमिक शिक्षक हा राष्ट्रनिर्मीतीचा आधारस्तंभ आहे. तोच जर नसेल तर आदर्श राष्ट्र ही संकल्पनाच मुळात फोल ठरेल. मोठेपणी आपण आपली महत्वाकांक्षा वाढवू शकतो. पण जी महत्वाकांक्षा मनात भरवायची असते ना. ती महत्वाकांक्षा मोठेपणी भरवता येत नाही. त्यासाठी प्राथमिक शिक्षकच हवा असतो. हा प्राथमिक शिक्षक शाळेतच मिळेल असं नाही. तो घरी, दारी, परीसरात कुठेही मिळू शकतो. कारण मायकेल फैरेडे, थामस अल्वा एडीसन ह्यासारखी इतर मंडळी ही काही कोण्या शाळेत जावून शिकली नाहीत. ती मंडळी अशाच घरी दारी व परीसरात असलेल्या प्राथमिक शिक्षकांकडूनच घडली असेच म्हणता येईल.
मुळात आज प्राथमिक शिक्षक हा राष्ट्रउभारणीचा आधारस्तंभ असला आणि लहान मुलं शिकवणं ही तारेवरची कसरत असली तरी आज देशातील इतर लोकं या शिक्षकांकडे हिनदृष्टीनं पाहतांना दिसतात. ते तसं बोलूनही दाखवतात की हे काय, शेंबड्या मुलांना शिकविणारे मुलं. त्यावेळी असा अपमान झालेला वाटतो. तसंच लहान मुलांना शिकवितांना काय, त्यांना तर कोणीही शिकवू शकतो. असंही काही लोकं म्हणतात. पण ते फक्त बोलणं असतं. जावं त्याच्या वंशा तेव्हा कळे. बोलणं सोपं असतं. परंतू जेव्हापर्यंत या प्राथमिक मुलांना आपण प्रत्यक्ष शिकवित नाही. तेव्हापर्यंत आपल्याला त्या घटकांना शिकवणं म्हणजे नेमकं काय असतं ते कळत नाही. म्हणून गोष्टी सांगूच नये.
आज प्राथमिक शिक्षक जर नसता तर पिढीच्या पिढी घडली नसती. संस्कार फुलले नसते. अन् ते जर नसते तर आदर्श राष्ट्राची संकल्पनाही फोल ठरली असती. म्हणूनच इतर शिक्षकांपाठोपाठ प्राथमिक विभागाच्याही शिक्षकाला सन्मान द्यायला हवा. जेणेकरुन तो आपले कार्य जोमाने करु शकेल.
आज वाचनाचा प्रभाव कमी झाला होता. त्यातच मुलं जास्त वाचन करीत नसत. ते मोबाइल वर तासन् तास बसत असत. वाचनाबद्दल अर्जूनला वैषम्य वाटत असे. वाचनातील निर्माण झालेली निराशता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तसं एकदा शाळेत एक समारंभ झाला. त्यात त्यानं समारंभ प्रसंगी वाचनाबद्दल काही मौलिक विचार मांडले होते. ते पुढीलप्रमाणे होते.
'वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आज वाचनाची आवड कमी झालेली असून मुलं सारखं टिव्ही, मोबाइल पाहतात. ते बरे नाही.
अलिकडे पाहिलं तर वाचन संस्कृती लोप पावत चाललेली दिसत आहे. वाचनाचा अर्थच मुळात लोकांच्या मनातून अदूश्य होत चाललेला आहे. सगळी लहानसान मंडळी ही मुळात वाचन करायलाच तयार नाहीत. त्या मंडळींकडे पाहिलं तर असं वाटायला लागतं की खरंच जग कुठे चाललेले आहे.
आज आपण वाचनाबद्दल विचार केल्यास जेवढेही महापुरुष झाले. ते वाचनातूनच समोर आलेले आहेत. त्यात महात्मा फुले असो वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गोपाळ गणेश आगरकर असो वा महात्मा गांधी. पु ल देशपांडे असो की आचार्य अत्रे असो. अशी बरीच नावं घेता येतील की जी वाचनातून महान ठरलीत. म्हणून वाचन व्हायला हवं. मग ते मोबाईलमधून असो की कागदावरुन.
वाचन करायचं झाल्यास ते कागदावरुनच व्हायला हवं. त्याचे बरेच फायदे आहेत. चांगलं वाचन हे कागदावरुनच होते असं नाही. परंतू फायद्याचा विचार केल्यास चांगलं वाचन करण्यासाठी कागद हाच महत्वाचा घटक आहे. कागदावर वाचन केल्यानं पाहिजे त्या प्रमाणात डोळ्यांना क्षति पोहोचत नाही. तसेच शरीराचंही आरोग्य उत्तम राखण्यास मदत होत असते.
वाचनाचा मुळात अर्थ होतो, तो म्हणजे कोणत्याही भाषेतील लिखीत मजकूराला समजणे. वाचनाचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे सुस्वर वाचन. याला प्रकटवाचनही म्हणतात. दुसरा आहे मौन वाचन. मनातल्या मनात वाचणे. प्रकटवाचन म्हणजे तोंडानं आवाज करीत वाचणे तसेच मौन वाचन म्हणजे तोंडानं आवाज न करता वाचणे होय.
वाचन करण्याचे काही फायदेही आहेत.
१) वाचनानं आपली वाणी सुधारते.
२)वाचनानं आपली भाषा सुधारते.
३)वाचनानं आपलं ज्ञान वाढते व ज्ञानानं आपलं महत्व वाढते.
४)वाचनानं अज्ञात भागाची ओळखही होते.
५)वाचनानं ऐतिहासीक घटनांची माहिती होते. वर्तमान समस्यांवर गंभीर विचार करता येतो. तसेच भविष्याचा वेधही घेता येतो.
६)वाचनानं नवनिर्मीती करता येते.
७)वाचनानं आपल्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण होते. तसेच आपल्या मनातील भीतीही दूर होते.
८)वाचनानं वेगवेगळी माहिती मिळवता येते.
मुळात वाचन ही एक कला आहे. पुर्वीही वाचनाला महत्व होतं. हे वाचन ताम्रपत्रातून तसेच झाडाच्या सालीतून तसेच पानाद्वारे केला जात असे. ह्याचे पुरावे मोहेंजोदाडो व हडप्पाच्या उत्खननात मिळाले. तसेच मोहेंजोदाडो व हडप्पाच्या संस्कृतीनं भांड्यावर केलेली कला हेही त्या काळात वाचन उपलब्ध होतं ह्याची साक्ष देत आहे. हे वाचन त्या काळात उपलब्ध होतं हे केवळ मोहेंजोदाडो किंवा अजिंठा वेरुळच्याच लेणीवरुन आढळून येत नाही तर इतरही देशातील संस्कृतीच्या उत्खननातून दिसून येते. त्यात मेसोपोटेमिया, बँबिलोनीयन,ग्रीक व रोमन यांचाही समावेश होतो. टैगीस आणि युफ्रेटिश नदीच्या किना-यालगत झालेल्या उत्खननात असेच काही अवशेष सापडले आहेत. त्यावरुन त्या काळात वाचन संस्कृती अस्तीत्वात होती.
काही लोकं कागदाचा शोध न लागल्यानं भींतीवरही लिहित असत. त्याचे पुरावे हे अजिंठा वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्यात सापडतात. पण वाचन हे सार्वकालिक नसल्यानं एक विशिष्ट वर्गच वाचन करायचा. त्यानुसार तो वर्ग स्वतःला ज्ञानी समजायचा. त्याला ज्ञान असल्यानं राजे महाराजे त्याची इज्जत करीत असत. तसेच राज्यकारभार करण्यासाठी त्या वर्गीकडून सल्लेही घेत. कालांतरानं काळ बदलला. या बदलत्या काळानुसार कागदाचा शोध लागला व लेखन कागदावर होवू लागलं. या काळात बखरीच्या बखरी कागदावर लिहिल्या गेल्या. बावीस फुट लांबीच्या असलेल्या कागदावर पुरंदरचा तह लिहिला गेला. हे राजस्थानात उपलब्ध असलेल्या शिवाजीच्या ऐतिहासीक पुराव्यावरुन आपल्याला दिसतं.
कागदाचा शोध लागण्यापुर्वी लोकं ज्या झाडाच्या साली, भींती, बांबू वापरत होते. त्या वस्तू ह्या कुठेही सहज नेता येणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी नेण्यासाठी सोपा पर्याय शोधण्याचा विचार केला. त्यात चीनला प्रथम स्थान द्यावं लागेल. कारण चीनच्या हान वंशाचा राजा होटिश याने भर दरबारात आपल्या अधिका-यांना आदेश दिला की त्यांनी कागदाचा शोध लावावा. त्यानुसार त्याच्याच दरबारातील अधिकारी त्साई लून याने जंगलातील झाडांच्या अवयवाचा वापर करुन कागद बनवला. तोच पहिला कागद होय. भारतात या कागद व्यवसायाची सुरुवात मोहम्मद तुघलकाच्या काळात झाली असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण मोहम्मद तुघलकाच्याच काळातच भारतात कागद व्यवसाय भरभराटीला आला. पुढे भारतात हा कागद सर्वदूर पोहोचला.
आज कागदाचाही वापर कमी झाला आहे. लोकांनी टिव्ही, मोबाइल, संगणकाचा वापर करणे सुरु केले आहे. तासन् तास लोकं इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्यानं मोबाइल पुढं बसलेले दिसतात. जणू ते एक व्यसनच असावं.
लोकं आज कागदावर लिहिलेले मजकूर फारसे वाचत नाहीत. कथा, कादंब-या आज कालबाह्य झालेल्या गोष्टी वाटतात. कारण त्यातून ज्ञान जरी मिळत असेल तरी त्या गोष्टी वाचायला वेळ बराच लागत असल्यानं लोकं त्या वाचत नाही. लोकांना मोबाईलद्वारे फक्त एकदोन मिनिटात संपणारं संभाषण हवं. ते व्हिडीओतून असं संभाषण ऐकतात. त्यातच लोकांचा कल चांगल्या गोष्टी वाचण्याकडे नाही तर वाईट गोष्टी शिकण्याकडे जास्त कल आहे. त्यातच या वाईट गोष्टीतून लोकं वाईट कृत्यही करतांना दिसतात. चांगले संस्कार आज उरलेले दिसत नाहीत.
आज मुलांचा विचार केल्यास ते सतत मोबाइलवर ऑनलाइन असतात. त्यातच या मोबाईलच्या माध्यमातून निघणा-या रेडीओलहरीनं मुलांच्या डोळ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर परीणाम होतांना दिसतो. आज त्यातून लहानलहान मुलांचे डोळे अधू झालेले दिसत आहेत. तसेच ही लहान मुलं या मोबाइल वर दिवसभर खेळ खेळण्यात गर्क झालेली दिसत आहेत. ती मुलं एवढी गर्क झालेली दिसतात की ती केव्हा आत्महत्या करतात याचं त्यांना भानही नसतं. तसेच केवळ लहानच मुलं नाही तर मोठी माणसंही मोबाईलवर तासन् तास बसतात. काय करतात तर खेळ खेळतात आणि त्या खेळात एवढे गर्क होतात की त्यांची कामं रखडतात.
आज वाचन संस्कृती लयास गेल्याचा परीणाम असा होत आहे की संपूर्ण पिढी गारद होईल. वाचन न केल्यानं लोकांमध्ये अज्ञानता पसरलेली आहे. लोकं खरं ज्ञान मिळविण्याऐवजी व शांततेनं वागण्याऐवजी सतत मोबाइल वर राहिल्यानं डोक्याची लाहीलाही करतात. त्यातूनच चिडचिडपणा वाढलेला असून आज त्यातून विकृतीपणाही वाढीस लागला आहे. आज दररोज प्रकाशीत होणा-या दैनिकातून बातम्या छापून येतात. अमूक ठिकाणी खुन झाला. बलत्कार झाला. मुलानं आईला ठार केलं. बापाला ठार केलं. बहिणीची इज्जत लुटली. अपहरण झालं. हा सगळा वाचन संस्कृती लयास गेल्याचा परीणामच.
लोकांनी वाचन करायला हवं. काय वाचायचं आणि काय नाही ते ठरवायला हवं. चांगली पुस्तकं घरी बाळगायला हवी. चांगल्या गुणांचा आपल्या मनात भरणा करायला हवा. मोबाईलवर वाचन करण्यापेक्षा कागदावरचं वाचन व्हायला हवं. कथा कादंब-या वाचायला हव्या. तसेच लेखकांनीही चांगल्या पुस्तका निर्माण करायला हव्यात. बिभत्स स्वरुपाची नाहीत. आज चित्रपटनिर्मात्यांनीही बिभत्स स्वरुपाची दृश्य दाखवू नयेत. मारामारी व हिंसकतेची दृश्य कथानकातून दूर करावीत. जेणेकरुन पाहणा-या माणसांमध्ये संस्कार होतील. तसेच मायबाप व शिक्षकांनीही मुलांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांना मोबाइलद्वारे वाचन शिकवू नये. पुस्तकातील चांगल्या गोष्टी वाचन करणे शिकवावे. जेणेकरुन विद्यार्थ्यात डोळ्यांचे आजार निर्माण होणार नाही. तसेच चांगल्या मुल्यांची लहान मुलात लहानपणापासूनच रुजवणूक होईल. तसेच त्याला आपल्या मनात चांगल्या गोष्टींची साठवणूक करता येईल. त्यासाठी घरी चांगली पुस्तकं ठेवणं गरजेचे आहे.
लहान मुलांना गोष्टी जास्त आवडतात. तेव्हा ही वाचनाची सवय लागावी म्हणून प्रत्येक घरी एकतरी गोष्टीचं पुस्तक असावं. जेणेकरुन केव्हाही आणि कधीही वाचन करता येईल.हे तेवढंच खरं आहे.'
अर्जूनचं बरोबर होतं. कारण लहानगी मुलंही वाचन न करता मोबाईलमध्ये गर्क दिसत होती. ती मुलं आपल्या पुढील आयुष्याच्या चांगल्या संस्काराची विल्हेवाट लावत होती. त्यांचं भविष्य ते स्वतः खराब करीत होती.
आज मैदानात, परीसरात खेळणे महाग झाले होते. मुलं कोणताच खेळ खेळतांना दिसत नव्हते. विठीदांडू, चक्करबिल्ला, लघोरी, कंचे हे केव्हाचेच हद्दपार झाले होते. आज तसं पाहता सर्व मुलं बहुतेक प्रमाणात घरी बसून टिव्ही किंवा मोबाईल हाताळतांना दिसतात. जे मोठ्या मंडळींना जमत नाही. ते लहान लहान मुलांना चांगलं कळतं. एवढी ती मुलं त्या मोबाईल खेळात पारंगत झालेली आपल्या निदर्शनास येत आहेत. आज मोबाइलवरचं जेवढं लहान मुलांना कळतं, तेवढं मोठ्या माणसांनाही कळत नाही.
आदर्श शाळा असाव्यात. असं प्रत्येकांना वाटते. त्यासाठी आदर्श शिक्षक असावेत हेही महत्वाचं आहे. आता आमच्या शाळा आदर्श शाळा नाही का? आम्ही आदर्श शिक्षक नाही काय? असे प्रत्येकजण म्हणेल. तसेच आदर्श शिक्षक व आदर्श शाळा म्हणजे नेमकं काय? असाही प्रश्न प्रत्येकजण उपस्थीत करेल व प्रत्येकांच्या मनात सांशकता निर्माण होईल.
शिक्षक म्हटलं तर तो आदर्शवानच असतो. एकदोन अपवाद जर सोडले तर प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांप्रती आदर्शवादीच भुमिका बाळगून असतो. तो आपल्या विद्यार्थ्यांप्रती प्रामाणिक राहून प्रसंगी आपली स्वतःची मुलं नाही शिकली तरी त्याचं त्याला दुःख वाटत नाही. पण त्याच्या वर्गातील मुलं ही जर चांगली शिकली. ती चांगल्या हुद्द्यावर गेली तर त्याला आनंद वाटतो. तो जो आनंद होतो. त्याचं मोजमाप करता येत नाही. त्यावेळी तो शिक्षक स्वतःला आदर्श शिक्षक समजू शकतो.
शाळा आदर्श केव्हा बनते? जेव्हा एखाद्या शाळेतील बरेच विद्यार्थी हे चांगल्या हुद्यावर जातात. तेव्हा त्या शाळेला आदर्श म्हणता येईल. मग चार दोन खडे जसे तांदळात असतात. तसे खडे विद्यार्थ्यातही असतातच. याला अपवाद नाही.
आदर्श शाळा व आदर्श शिक्षक या संकल्पना मुळात आज फोल ठरत चालल्या आहेत. आज सरकारी शाळा ओस पडत चालल्या आहेत. तर खासगी काँन्व्हेंटच्या शाळा वाढत चाललेल्या आहेत. लोकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढत चाललेला असून सरकारी शाळेत इंग्रजीचं शिक्षण जरी असलं, तरी ते विद्यार्थ्यांना पचनी पडत नाही. आज काँन्व्हेंटच्या शाळेत पालकांना प्रवेशासाठी रांग लावावी लागते तर सरकारी शाळेत शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भटकंती करावी लागते असे चित्र दिसत आहे. तसं पाहिलं तर कुटूंबनियोजनानं हम दो हमारे दो म्हणत मुलं पैदा करण्यास अवरोध आल्याने आज सरकारी शाळा ओस पडलेल्या आहेत.
सरकारी शाळा ओस पडण्यामागं सरकारचं धोरणंही काही अंशी कारणीभूत ठरत चाललेलं आहे. त्यांनी एका वस्तीत एक शाळा मंजूर करण्याऐवजी एकाच वस्तीत जवळजवळ चारपाच शाळा अनुदान तत्वावर दिलेल्या आहेत. त्यातही सरकारी शाळेत पाहिजे तेवढी शिस्त मुलांना दिसत नसल्यानं पालकांचा ओंढा खाजगीकरणाकडं वळला आहे. त्यातच काँन्व्हेंटच्या शाळेत कमी पैशात शिक्षक मिळत असल्याने एकाच वर्गाला दोन दोन शिक्षक असतात. ते शिक्षक चालक मालक सारखे वर्गाला शिकवीत असतात.
आदर्श शाळेची संकल्पना ओस पडण्यामागे मुख्य कारण आहे. ते म्हणजे संचालकांची व मुख्याध्यापकांची अरेरावी. हे संचालक व मुख्याध्यापक शिक्षकांवर अनन्वीत अत्याचार करीत असतात. त्या अत्याचार करण्यामागे त्यांची भुमिका असते. ती म्हणजे पैसा कमविणे. ती मंडळी शिक्षकांकडून देण म्हणून पैसा मागत असतात. जे पैसे देतात. त्यांच्यावर अत्याचार केला जात नाही. जे देत नाहीत असा पैसा. त्यांच्यावर अत्याचार केला जातो. त्यांच्यावर विनाकारण लांच्छन लावलं जाते की त्यांना शिकवता येत नाही. मग असे खोटे आरोप व ते अत्याचार होतांना पाहून शिक्षकांच्याही मनात न्युनगंड तयार होतो. त्या शिक्षकांना वाटते की मी चांगलेही काम केले. तरी मला या शाळेत कोणी चांगले म्हणत नाही. माझ्या चांगल्या कार्याचा गौरव होत नाही. शेवटी ते आदर्शवाद सोडतात. याचाच परीणाम विद्यार्थ्यांच्या शिकविण्यावर होतो व त्याचाच परीणाम हा विद्यार्थी न मिळण्यावरही होतो.
शिक्षक जर आदर्शवादी असतील तर शाळाही आदर्शवादी बनतात. पण तेच आदर्शवादी नसतील तर शाळेच्या आदर्शाचं काय! शाळा आदर्श बनूच शकणार नाहीत.
आज ब-याच शाळेतील शिक्षक हे व्यसनी आहेत. शाळा सुटली की बारमध्ये मजा मारणारे आहेत. सरकारनं गुटख्यावर बंदी घातलेली असतांनाही गुटखा खाणारे आहेत. विड्या ओढणारे आहेत. तसेच खर्रेही खाणारे आहेत. त्यांनाही मोबाइलचं व्यसन असून त्या मोबाइल वर ते रमीचे खेळ खेळत असतात. मग कशा बनतील आदर्श शाळा? ज्या ठिकाणी सुख असते. त्या ठिकाणचे शिक्षक व्यसनी व ज्या ठिकाणी सुख नसते, त्या ठिकाणचे शिक्षक न्यायासाठी कोर्टाच्या पाय-या चढत असतात. कशा बनतील आदर्श शाळा? म्हणूनच आज काँन्व्हेंटचं प्रस्त वाढलं आहे.
शाळा केवळ आदर्श शिक्षकानंच चांगली बनत नाही. तर त्या शाळेचं सौंदर्यही तसं असावं लागतं. एखादी मुलगी जर सोळा श्रृंगारानं नटली, तर तिच्याकडे सर्वांना पाहावेसे वाटते आणि तीच जर ओबडधोबड अवस्थेत राहात असेल, तर ती आवडत नाही. शाळेचंही तेच आहे. शाळेलाही सोळा श्रृंगारानं नटवायला हवं. जेणेकरुन विद्यार्थ्यांना शाळेत रमता येईल. शाळा त्यांना आवडेल हवीहवीशी वाटेल. आपली वाटेल.
शाळा सोळा श्रृंगारानं नटवणं म्हणजे काय? हा प्रश्न प्रत्येकांना सतावणारा प्रश्न आहे. शाळा सोळा श्रृंगारानं नटवणं म्हणजे शाळेत पुरेशा सोयी करणे. आज ब-याच शाळा अशा आहेत की ज्या शाळेत पुरेशी झाडं नाहीत. पुरेशा शौचालयाच्या सोई नाहीत. पुरेशी रंगरंगोटी नाही. रंगरंगोटी आहे. पण चित्र काढलेले नाहीत. धडाचं कार्यालय नाही. खेळाच्या सुविधा नाही. अभ्यासक्रम बरोबर शिकवला जात नाही. खेळ बरोबर शिकवला जात नाही. संगणकाचे वर्ग होत नाहीत. इतर व्यवसायीक पाठ्यक्रम शिकवले जात नाही. स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम वा इतर कोणतेही सांस्कृतीक कार्यक्रम होत नाहीत. सहली जात नाही.
शाळेत गाण्याच्या स्पर्धा होत नाही. कथाकथन होत नाही. वादविवाद स्पर्धा तर नाहीच नाही. प्रश्नमंजूषाही होत नाही. कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण हे विषय पाहण्यापुरतेच आहेत. खोखो, लंगडी, कबड्डी, लघोरी तसेच चक्करबिल्ला, कंचे, धावणी या स्पर्धा घेतल्या जात नाहीत. अन् समजा कंचे खेळण्याच्या शाळेत स्पर्धा घेतल्यात तर पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यांना ते खेळ आता त्यांच्या मुलांना खेळू देण्यात वैषम्यता वाटते. परंतू खरं सांगायचं झाल्यास विद्यार्थ्यांना तेच खेळ आवडतात. ते खेळ एवढे आवडतात की मुलं त्यात गर्क होवून जात असतात. हे पालकांनाही माहित आहे. पण ते आपल्या पाल्यांबद्दल तसा विचारच मनात आणत नाही.
पालकांना आवडते मुलांचे मोबाईलवर बसणे, संगणक विद्यार्थ्यांना हाताळता येणे. तसेच शाळेची रंगरंगोटी केली आहे का? शाळेला जर पुरेसा पेंट मारुन त्या शाळेच्या भींतीवर पुरेशी नैसर्गीक चित्र काढली असतील. कार्यालय व्यवस्थीत असेल. कार्यालयात पालकांचा सन्मान होत असेल तर त्या शाळेला आदर्श मानलं जातं. मग त्या शाळेत बरोबर शिकवलं जातं की नाही. ते काही पालक पाहात नाहीत. ते प्रसंगी आपला पाल्य हुशार व्हावा. त्याला पाठ्यपुस्तकातील सर्वच भाग यावा. म्हणून बाहेर खाजगी शिकवणी वर्ग लावून देतात. हे तेवढंच खरं आहे.
आज स्पर्धात्मक काळ आहे. स्पर्धा वाढली आहे. कोणीही ज्याप्रमाणे माणसाच्या अंतरंगात शिरुन कोणी त्या माणसाची कल्पना करीत नाही. त्यांच्या फक्त पोशाखावरुन त्याची कल्पना करतात. अगदी तशीच गोष्ट शाळेबाबतही घडत असलेली आज निदर्शनास येत आहे. लोकं शाळेच्या बाबतीतही मुलांचा प्रवेश करतांना वरवरच पाहतात. शाळेची रंगरंगोटी नेमकी कशी? त्यानुसारच शाळेत मुलांना टाकतात. म्हणून आज शाळा जर टिकवायच्या असेल तर संचालकांनी सुधरायला हवं. त्यांनी कोणत्याही शिक्षकांना त्रास देवू नये. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. तसेच शाळेत रंगरंगोटी करावी. झाडंही लावावीत नव्हे तर पुरेशा सोयी कराव्यात. जेणेकरुन पालकांना शाळा आवडेल. विद्यार्थ्यांनाही शाळेत करमेल. तसेच पालतांनीही विद्यार्थ्यांना शाळेत टाकतांना शाळेच्या अंतरंगात शिरावं. निव्वळ शाळेचा भपकेबाजपणा पाहू नये. तेव्हाच आदर्श शाळा व आदर्श शिक्षकांची संकल्पना साकार होईल व ज्यावेळी प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थी आदर्श होईल. तेव्हाच आदर्श राष्ट्राचीही संकल्पना साकार व्हायला वेळ लागणार नाही.