Bappa Rawal in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | बाप्पा रावल

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

बाप्पा रावल

बाप्पा रावल (कादंबरी)

संस्कृती......एखाद्या व्यक्तीसमुहाची प्रवृत्ती, मुल्ये, ध्येये, प्रथा प्रघात इत्यादी सामाईक बाबी यांची एकत्रीत गुंफन. ती गुंफन इस पू १०,००० वर्षापुर्वी गोबुस्तान व अझरबैजानच्या संस्कृतीचा अभ्यास केल्यास दिसून येते. त्याला मानवी ज्ञान, समजूती व वर्तणूक याची जोड दिली आहे. मनुष्यप्राणी व त्याच्या भोवतालचा परीसर मिळून निसर्ग बनतो.
भारतीय संस्कृती ही बहूआयामी संस्कृती आहे. ज्यामध्ये भारताचा महान इतिहास, भुगोल आणि विज्ञान दडलेला आहे. ही संस्कृती सिंधू प्रदेशापासून सुरु झाली व त्यात पुढे वैदिक संस्कृतीनं भर टाकली. पुढे ही संस्कृती अधिक विकसीत होत जावून त्यातून बौद्ध, जैन संस्कृत्या विकसीत झाल्या. त्यातच या संस्कृत्यांनी पुढे जावून धर्माचे स्वरुप घेतले.
या सर्व संस्कृत्यावर केवळ भारतीय आचारविचारांचाच प्रभाव पडला नाही तर इतर देशातीलही आचार विचारांचा प्रभाव पडला. त्यातच त्या त्या देशांच्या प्रथा, परंपरा, रिती रिवाज यांचाही प्रभाव पडला. आज या संस्कृतीत शिख, फारशी, ख्रिश्ती संस्कृत्याही सहभागी झाल्या आहेत.
भारत हा उपमहाद्विपांचा समुह होता. भारतीय संस्कृती ही कर्म प्रदान संस्कृती आहे. ज्यावेळी मोहेंजोदाडोचं उत्खनन झालं, त्यावेळी माहिती पडलं की ही संस्कृती मेसोपोटेमिया व मिश्रच्या संस्कृतीपेक्षा महान आणि समकालीन आहे. मेसोपोटेमिया संस्कृतीत सुमेरियन, असीरियन बेबिलोनियन आणि खाल्दीच्या संस्कृतीचा समावेश करण्यात आला तर मिश्र संस्कृतीत युनान, रोम आणि इराणच्या संस्कृतीचा समावेश झाला.यात कित्येक संस्कृत्या आज नष्ट झालेल्या आहेत. परंतू आजही भारतीय संस्कृती ही जीवंत आहे.
आज सुमेरियन, ग्रीक, इजिप्शियन, सिंधू-सरस्वती, बेबिलोनियन, मायन, इंकास ह्या संस्कृतींचा शोध लावून त्यांचा अभ्यास केला गेला आहे. पारंपारिक अभ्यासवर्ग सुमेरियन संस्कृतीला सर्वात प्राचीन मनात आलेला आहे आणि त्या संस्कृतीसाठी इ.स.पू ३५०० हे वर्ष नमूद केलेलं आहे. इजिप्शियन संस्कृतीसाठी इ.स.पू ३१०० हे वर्ष निश्चित केले गेले आहे तसेच सिंधू संस्कृती इ.स.पू २६०० ह्या वर्षी घडली अशी समजूत आहे. प्राचीन ग्रीक संस्कृती इ.स.पू ३००० एवढी जुनी आहे असं मानलं जात. सुमेरियन संस्कृतीत तयार झालेली पहिली वसाहत इ.स.पू ५३०० एवढी जुनी आहे तर नाईल खोऱ्यात स्थायिक झालेल्या जमातीने इ.स पू ५३०० च्या जवळपास शेती करण्यास सुरुवात केली असे मानले जाते. सिंधू संस्कृतीतील 'मृदीय नवपाषण अवस्था', इ.स.पू ५५०० एवढी मागे नेता येईल आणि ह्याच संस्कृतीतील खाद्य उत्पन्न करणाऱ्या युगाची सुरुवात ही इ.स.पू ७००० इतकी प्राचीन ठरते. महाभारत संस्कृती ही एक सुस्थापित संस्कृती होती आणि ह्या संस्कृतीत रथ, घोडे, हत्ती, उंट, विस्फोटक आणि इतर शस्त्रांचा समावेश होता. ह्या संस्कृतीतील समाज हा जातींवर आधारलेला समाज होता आणि ह्या समाजात प्रस्थापित धार्मिक विधी, प्रगत दृक खगोलशास्त्र, राजवाडे आणि नौका, कापूस आणि रेशीम ह्यांच्या पासून तयार केलेले कपडे आणि प्रगत खनिजशास्त्र सोने, चांदी,तांबे लोखंड ह्या साऱ्यांचा समावेश होता आणि हे सारे इ.स.पू ५५६१ च्या आधी होते.
महाभारत संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृती आहे. सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या काही स्थळांवर झालेल्या पुरातत्व संशोधनात इ.स.पू ७००० सालापर्यंतचा काळ उलगडतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वत:चा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.
संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे. घरे, कपडे इ. स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य-अयोग्य, पाप-पुण्य, इत्यादी. संकल्पना तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी गोष्टी या परंपरागत असतात. या गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही, तो समूहाने त्या करत असतो.
हिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.
१. ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.
२. आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.
३. पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्त्वव आहे.
४. चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .
५. प्रतीक संकल्पना- स्वस्तिक, कमळ, कलश ,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत.
आज इतिहासाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की आज भारतीय धर्म हा इतर धर्मापेक्षा जुना धर्म आहे. ज्यात हिंदू, बौद्ध, जैन, शिख हे धर्म मोडतात. आज जरी या धर्माची आकडेवारी पाहिली तर आज ह्या धर्माची लोकसंख्या कमी झालेली आहे. आज हिंदू व बौद्ध धर्म हे जगात अनुक्रमे तिस-या व चवथ्या क्रमांकावर आहेत. भारतात मात्र हे धर्म जास्त प्रमाणात असून हिंदू धर्म ८०.४ प्रतिशत तर मुस्लीम धर्म १३.४ प्रतिशत आहे. महत्वपूर्ण गोष्ट ही की भारतात एकेकाळी एकही मुस्लीम नव्हता. पण आज त्याची संख्या वाढत चाललेली आहे. कारण भारत हा सहिष्णू स्वभावाचा देश आहे.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून या देशात आज खिश्चन, यहूदी,फारशी व इतर धर्मातील लोकंही शांततेनं निवास करतात. आज भारतात केवळ धर्मच नाही तर जातीही निवास करतात. तसेच क्लेशही धर्म आणि जातीच्याच आधारे होतात. आज या भारतात जातीनुसार मुख्य रुपात चार गटात वर्गवारी झालेली दिसून येते. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र. त्या त्या वर्गानुसार आज त्या त्या वर्गात विभिन्न जातीचा समावेश केल्या गेला आहे.
या देशात गाईला विशेष महत्व असून गाईच्या दुधापासून बनलेले वेगवेगळे पदार्थ या देशात वापरले जातात. तसेच गोहत्या अपराध मानतात.

********************************************

अरबी लोकं हे पश्चिम आशिया खंडात राहात होते. त्यांची भाषा व संस्कृती वेगवेगळी होती. इस पूर्व नवव्या शतकात एक अक्कादी भाषेचा शिलालेख सापडला. त्या शिलालेखात असीरियाई साम्राज्याच्या करकर युद्धात सीरीयाला जिंकल्याचं वर्णन आहे. यामध्ये असीरीयाचा राजा शल्मानसेर तृतीय याने जो माल लुटला होता. त्यात अरबांच्या एकहजार उंटांचा समावेश होता. त्यात त्यानं गिन्दबूचा पराभव केला होता. जो अरबांचा सरदार होता.
यारब........अरबी भाषा बोलणारा पहिला व्यक्ती. अरबी लोकं हे मेसोपोटेमियाच्या पश्चिम भागात वसलेले होते. ते बुद्धिजीवी होते. त्यातीलच एक बुद्धिजीवी अल हमदानी, त्याचं म्हणणं होतं की त्यांना अरब न म्हणता गरब म्हणावं. ज्याचा अर्थ पश्चिम असा होतो. परंतू कालांतरानं त्याचा अपभ्रंश अरब असा झाला. तसेच एक प्राचीन अरब इतिहासकार अल मसूदी म्हणतो की सुरुवातीला हा शब्द अराबाह वादी च्या लोकांसाठी होता. परंतू नंतर तो शब्द सर्वश्रूत झाला. आता पुष्कळ मंडळी हे अरबांना मुस्लीम समजत असून त्यांच्यासारखे मानत असतात. परंतू सत्य परीस्थीती पाहता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.पुष्कळसे अरब हे ईसाई आहेत तर काही मंडळी ही यहूदी आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लीम पुर्वी या भारतात पंधरा धर्म अस्तित्वात होते. जे हिंदूत्वाशी जुळले होते.
सुरुवातीला लोकं जंगलात राहात होते. आपली गुजराणही जंगलातच करीत होते. काही धर्म असेही होते की जे निसर्ग, पुर्वज व काही काल्पनिक देवीदेवतांची पुजा करीत होते. प्रत्येक टोळीचा वेगळा देव असायचा. परंतू जसजशी प्रगती झाली, तसतसा धर्म विकसीत होत गेला. नियम बनवले गेले.
धर्माच्या या कल्पनेत सर्वात पहिला धर्म येतो, तो वैदिक धर्म. कोणी म्हणतात की बाकी सर्व धर्म होते. परंतू वैदिक धर्म अजिबात नव्हताच. परंतू वैदिक धर्म हा इस पुर्व वीसहजार वर्षापुर्वी अस्तित्वात आला. परंतू त्याला साजेसं नाव नव्हतं. कोणी त्याला आर्य धर्म म्हणत तर कोणी त्याला सनातन धर्म म्हणत. हा धर्म आर्याच्या आगमणानंतर भारतात अस्तित्वात आला असावा. मात्र त्यापुर्वी भारतात आदिवासी टोळ्या होत्या. ज्यांना धर्म म्हणजे काय, तेही समजत नव्हतं.
या ठिकाणी पुर्वी आदिवासीच्या अनेक टोळ्या अस्तित्वात होत्या. जे फक्त आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांशी भांडत नव्हे तर युद्धही करीत असत. परंतू ज्यावेळी आर्य भारतात आले, त्यावेळी येथे असलेल्या या शूर आदिवासी टोळ्यांवर आर्यांना सहज विजय प्राप्त करता येत नव्हता. त्यामुळं की काय, त्यांनी भारतात आल्यावर या आदिवासी लोकांना मुर्ख बनवलं व या आदिवासी टोळ्या मुर्ख बनत गेल्या. त्या टोळ्या मग जे आर्यांनी सांगीतलं, तसं तसं करीत गेल्या.
आर्यांनी त्यांना देवादिकांच्या कल्पना सांगीतल्या. देव असतो, त्याबरोबर भूतही असतो हेही सांगातलं. त्यातूनच भीती निर्माण झाले. याच भीतीतून रितीरिवाज, प्रथा परंपरा, नियम निर्माण झाले. त्या नियमात पुढे स्वार्थपणा आला व नियमातही भेदभाव निर्माण झाला.
नियमांचे दोन प्रकार पाडण्यात आले. आपल्या फायद्याचे नियम व गैरफायद्याचे नियम. गैरफायद्याचे नियम हे आदिवासींना प्रदान करण्यात आले व फायद्याचे नियम हे आपल्यासाठी. याच नियमांच्या गैरव्यवहारातून पुढे आर्यांनी आदिवासींना गुलाम केले. हाच आर्यधर्म होय. त्यावेळी या भारतात कोणीच दलित, कोणीच क्षत्रीय, कोणीच ब्राम्हण व कोणीच वैश्य नव्हते. फक्त आदिवासी व आर्य असे दोनच गट होते. हे चार वर्णगट आर्यांनीच आपल्या स्वार्थासाठी निर्माण केले असावे.
या आर्यांनी जे नियम त्यावेळी स्थापन केले. त्या नियमातूनच पुढे धर्म स्थापन झाला. अर्थात त्या नियमांना धर्माचे स्वरुप प्राप्त झाले. हाच सनातन धर्म होय. यालाच पुढे हिंदू धर्म मानल्या गेले.
ह्या श्रेणीत दुसरा धर्म येतो जैन. हा देखील प्राचीन धर्म आहे. असं मानतात की रामायण काळात राजा जनक हा जैन धर्माचा अनुयायी होता. तसेच महाभारत काळात नेमिनाथ हा जैन धर्माचा तिर्थकार होता. जैन धर्मात एकुण चोवीस तिर्थकार झालेले आहेत.
तिसरा धर्म म्हणून जगात यजीदी धर्म मानला जात होता. हा धर्म ६७६३ वर्षापासून अस्तित्वात होता. अर्थात येशू ख्रिस्ताच्या इस पुर्व ४७४८ वर्षापुर्वी. या धर्माला हिंदू धर्माची एक शाखाच मानले जाते होते.
चवथ्या क्रमांकाचा धर्म म्हणून यहूदी धर्माला महत्वपूर्ण स्थान होते. इस्राईलचा राजधर्म यहूदी होता. हा चमत्कारी धर्म असून या धर्माच्या स्थापनेचा काळ हा इस पुर्व दोनहजार मानला जातो. याचा आरंभ प्राफेट अब्राहम याने केलेला असून प्राफेट मुसा याने या धर्माला नवीनतम स्वरुप प्रदान केलं. तसेच या धर्माला नावही दिलं.या प्राफेचच्या यहूदी धर्मावरुनच पुढे मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्म तयार झालेले आहेत असे इतिहासकार मानतात.
पाचव्या क्रमांकाचा धर्म हा पेगन धर्म. हा धर्म रोम, अरबच्या भागात जास्त वाढला होता. या धर्माला जर्मनी मध्ये जास्त महत्व प्राप्त झालं होतं. हा धर्म ख्रिश्चन धर्मापुर्वी अस्तित्वात होता.याच धर्माच्या वेळी युरोपात यजीदी, सबाईन व यहूदी धर्म अस्तित्वात होते. परंतू इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या अस्तित्वानंतर हा धर्म पूर्णतः नष्ट झाला.
सहाव्या क्रमांकावर जरथुस्र धर्म होता. ज्याला आता फारसी धर्म म्हटलं जातं. या धर्माची स्थापना इराणमध्ये झाली. ती जरथुस्र नावाच्या व्यक्तीनं केली. हा प्राचीन इराणचा राजधर्म होता. तसेच हा धर्म इस पुर्व १७०० ते १५०० मध्ये अस्तित्वात होता. ज्यावेळी राजा सुदास हिंदूस्थानात राज्य करीत होता. ज्या हिंदूस्थानाचं नाव तेव्हा आर्यावर्त होतं.
ज्यावेळी राजा सुदास आर्यावर्तामध्ये राज्य करीत होता. त्याचवेळी हजरत इब्राहीम हा आपल्या धर्माचा प्रसार व प्रचार करीत होता. त्यावेळी इराणमध्ये पारसी, ग्नोस्तिसिस्म, याज्दानिस्म अहल हक्क प्रचलनमध्ये होते. आता त्याची जागा शिया आणि सुन्नीनं घेतली आहे. जे मुस्लीम धर्माला मानतात.
सातव्या क्रमांकावर वूडू नावाचा धर्म होता.हा धर्म आफ्रिका व कैरेबियात अस्तित्वात होता. या धर्माला सहाहजार पेक्षाही जास्त जुना धर्म समजण्यात येतो. परंतू ज्यावेळी ख्रिश्चन व मुस्लीम धर्म वाढीस लागला. तेव्हा हा धर्म लयास गेला.
आठव्या क्रमांकावर त्यावेळी बौद्ध धर्म होता. हा भारतातील प्राचीन धर्म. याची स्थापना तथागत गौतम बुद्ध यांनी केली. ह्या धर्म स्थापनेचा कार्यकाळ हा इसपुर्व ५६३ ते इस पुर्व ४८३ समजला जातो. हा धर्म तथागताच्या महापरीनिर्वाणानंतरही जगातच वाढतच गेला. त्याचं मुळ कारण या धर्मातील अहिंसावादी दृष्टिकोण.
नवव्या क्रमांकावर कंफ्यूशियस नावाचा धर्म होता. याचा जनक कंफ्यूसियसचा जन्म हा इसपुर्व २८ आगष्ट ५५१ मध्ये झाला. तसाच तो चीनच्या शानडोंगच्या क्यूफू शहरात झाला. तसं पाहता हा धर्म चीनमध्ये जास्त प्रमाणात वाढू लागला होता.
दहाव्या क्रमांकावर शिंतो हा धर्म होता. हा धर्म मुख्यतः जपानमध्ये होता. ह्या धर्मात जी तत्वे होती. त्यातील बरीचशी तत्वे ही बौद्ध धर्मातून घेतलेली होती. हा धर्म इस पुर्व तिस-या शताब्दीपासून तर इस आठव्या शताब्दीपर्यंत टिकला. ह्या धर्माची मान्यता होती की जपानचा राजपरीवार हा सुर्यदेवी अमातिरासू ओमिकामी पासून उत्पन्न झाला आहे.या देवीचे निवासस्थान हे पर्वत, नद्या, डोंगर, पठार,झाडं, पशू पक्षी तसेच चंद्र आणि सुर्याच्या उजेडात आहे.
अकराव्या क्रमांकावर ताओ धर्म होता.इस पुर्वच्या दुस-या शताब्दीपासून या धर्माची सुरुवात झाली. या धर्माच्या पुष्कळ शाखाही होत्या. परंतू तो नंतर दोन भागात विभागल्या गेला.पहिला अनचनताओ पंथ आणि दुसरा चडयीताओ पंथ.
बाराव्या क्रमांकावर नार्डीक नावाचा धर्म होता. हा धर्म पुर्वी युरोपीय देशात प्रचलीत होता. या धर्मातील लोक हे ओडिनी नावाच्या देवतेला मानत असत.
तेराव्या क्रमांकावर युनानी धर्म होता. त्याला ग्रीक धर्मही म्हणत. हा धर्म त्यावेळी ग्रीस तसेच आजूबाजूच्या परीसरात प्रचलीत होता. ही मंडळी जिझस, हरक्युलस आणि अपोलो देवीदेवतांना जास्त मानत असत.
रोमन हा चौदाव्या क्रमांकावरील धर्म. संपूर्ण रोमन साम्राज्यात हा धर्म प्रचलीत होता. मुख्यत्वे हा धर्म इटली, फान्स आणि जर्मनीमध्ये प्रचलीत होता.
पंधराव्या क्रमांकावर रशियन धर्म होता. दहाव्या शताब्दीच्या शेवटपर्यंत या धर्माचा प्रभाव टिकला. हा धर्म हिंदी आणि पारसी धर्माशी मिळताजुळता होता. ह्या धर्मातील मंडळी अग्नी, सुर्य, पर्वत, वायू आणि वृक्षाला जास्त मानत असत. तसेच पावसाळ्यात कडाडणा-या वीजेलाही ते मानत असत. या वीज देवतेचं नाव 'पेरुन' ठेवलं होतं. कोणत्याही शुभ कामाचे वेळी ह्या पेरुन नावाच्या देवतेला साक्षी मानून शपथ घेतली जात असे. या पेरुन देवतेचीच पुजा मुख्य पुजा मानली जात असे. ही मंडळी ज्याप्रमाणे पेरुन देवतेला मानत. तसेच ते रोग आणि स्वारोग या नावाच्याही देवतेला मानत असत.
प्राचीन काळ........ह्या काळात बरेचसे धर्म हे सुर्याला जास्त मानत असत. त्याशिवाय ते होर्स, यारीला, दाझबोग याही देवतेला मानत. चमत्काराला अनन्यसाधारण महत्व होतं. सुर्याव्यतिरीक्त रुसच्या भागात बिरीगीन्या, दीवा, जीवा, लादा, मकोश आणि मरेना ह्यादेखील देवतांना मानत असत.
प्राचीनकाळात ही मरेना देवी मृत्यूची देवता होती. आताही कधी कधी रशियात खोदकामाचे वेळी या रशियातील पुरातन देवी देवतांच्या लाकडाच्या तसेच दगडाच्या मुर्त्या सापडतात. काही मुर्त्यात अनेक डोके सापडतात तर काही मुर्त्यात अनेक हात. अर्थात एका वाक्यात सांगायचं झाल्यास रुसच्या प्राचीन देवीदेवतात व हिंदू धर्मातीत देवीदेवतात खुप मोठ्या प्रमाणात साधर्म्य आहे.
आज बरेचसे धर्म हे कालबाह्य झाले. त्याची काही कारणंही आहे. पहिलं महत्वपूर्ण कारण म्हणजे सतत होणारं युद्ध.या युद्धानंतर जिंकणारा राजा हा प्रजेवर अनन्वीत अत्याचार करीत असे. तसेच जबरदस्तीनं धर्मांतरणाची प्रक्रिया राबवीत असे. त्यातच आपल्याला फालतूचा त्रास नको म्हणून लोकांनी ते ते धर्म स्विकारले.,आपले धर्म सोडले. पर्यायानं सांगायचं झाल्यास स्वतंत्र्यतेचा अभाव असल्यानं बरेचसे धर्म समाप्त झाले. आज सामान्य माणसांना त्यांचं नावही माहित नाहीत.
आज हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध व जैन हे प्रमुख धर्म जर सोडले तर बाकी धर्माची संख्या कमी झालेली आहे. ते धर्म प्राचीन धर्मासारखे केव्हा लयास जातील ते सांगता येत नाही. धर्म लयास केव्हा जातात? जेव्हा त्या धर्मातील लोकांची संख्या कमी कमी होत जाते.
हिंदू धर्म टिकला. त्याचं कारण या धर्मात अतिशय जीवट माणसं आहेत. जे मरण पत्करतात. पण धर्मांतरण करीत नाही. याचा परीणाम बाकीच्या लोकांवर होतो व ते त्यापासून बोध घेवून आपला धर्म परीवर्तन करीत नाहीत. म्हणूनच आजही हा धर्म मुस्लीमांच्या एवढ्या अत्याचारानंतरही टिकला.
मुस्लीम धर्मही टिकला. त्याचं कारण म्हणजे त्यांची बळजबरी. ह्या लोकांनी आपला धर्म शत्राच्या धाकावर बळजबरी करुन आपला धर्म वाढवला नव्हे तर मुलं म्हणजे अल्लाची देण म्हणत मुलं निर्माण करुन आपला धर्म वाढवला. आज अफगानिस्तानच्या परीस्थीतीवरुन किंवा कालच्या संभाजी व पृथ्वीराज चव्हाणच्या इतिहासावरुन हेच दिसून येते. महाराज पृथ्वीराज चव्हाण आणि संभाजी महाराजांनी प्रसंगी प्राण दिले. परंतू धर्म बदलविला नाही.
बौद्धही धर्म टिकला. त्याचं कारण म्हणजे बौद्ध धर्मात असलेली शांततावादी तत्वे. जगाला क्रांतीची नाही तर शांतीची गरज आहे असं तथागत बुद्ध प्रतिपादन करतात. ब-याचशा लोकांना आज शांतताच आवडते. युद्ध, लढाई, भांडण, झगडे आवडत नाही. म्हणून आज बौद्ध धर्म टिकतो आहे.
ख्रिश्चन धर्मही आज टिकून आहे नव्हे तर त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. ते एकच देव मानत असून ते धर्माला वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळं हा धर्म टिकून आहे.
जैन धर्म हा देखील आज आपलं अस्तित्व टिकवून आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचा जीवटपणा. कोणीही इतर धर्माच्या आश्वासनाला बळी पडत नाहीत.
प्रत्येकजण आपला धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. कोणी भुलथापा देतात. कोणी बळजबरीनं धर्म वाढवतात. तर कोणी जनसंख्या पैदा करुन. पण ऐन त्या प्रकारेन धर्म वाढवितातच.
धर्म वाढवावा. तो वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. रास्त मार्गानं प्रयत्न करावा. मुलं पैदा करावी. हे सारंच ठीक आहे. पण बळजबरी करायला नको. खुन, कापाकापी, बलत्कार व्हायला नको. जे आज सत्ता हस्तगत करण्यासाठी अफगानिस्तानात होत आहे. नव्हे तर काल भारतात धर्म वाढविण्यासाठी घडलं. धर्म वाढविण्यातही पुरेशी स्वतंत्र्यता हवी.
***************************************

बाप्पा रावल हा असाच व्यक्ती. तो न्यायप्रिय होता. त्यालाही धर्म आवडायचा लोकांचे धर्माला वाढविणेही आवडायचे. पण त्यात जी बळजबरी होत होती. ती काही त्यांनाही आवडत नव्हती. त्यामुळं की काय, दाहिरच्या मृत्यूनंतर जी धर्म वाढविण्याची मोहम्मद बिन कासीमनं मोहिम आखली. त्या मोहिमेला विरोध करीत बाप्पा रावल लढला आणि शुरवीर असल्यामुळं त्याला विजय संपादन करता आलं.
बाप्पा रावलचा अरबाच्या धर्माला विरोध नव्हता. आपल्या धर्माचा पाहिजे तेवढा बाऊही नव्हता. पण अरबानं जी धर्म वाढविण्यासाठी रणनीती वापरली होती. त्या रणनीतीला विरोध होता. तसेच त्याला मोहम्मद बिन कासीमच्या युद्धाचा विरोध नव्हता. परंतू त्यानं युद्ध जिंकण्यासाठी जी रणनीती वापरली होती अर्थात भारतीय युद्धाचे जे नियम तोडले होते. त्या नियमांचा विरोध होता. त्याला माहित होते की ज्ञानमतच्या मदतीनं मोहम्मद बिन कासीम याने रात्रीला युद्ध करण्याचा भारतात नियम नसूनही त्यानं रात्रीला जे युद्ध केलं होतं. ते युद्ध बाप्पाला पटत नव्हतं. त्यात जी सिंधची दुर्गती झाली होती. ती दुर्गती बाप्पाला पटत नव्हती. त्यामुळंच त्यानं सिंधचा बदला काढण्यासाठी तो अरबांशी लढला नव्हे तर गजनीपर्यंत व खुरासानपर्यंत त्यानं हिंदूस्थानाची जरब बसवली होती.
ते पावसाळ्याचे दिवस होते. सेना धावत होती आपल्या मातृभुमीसाठी. जी मातृभुमी त्यांना वाचवायची होती. नव्हे तर त्यांना आपल्या धन्याची स्वामीभक्ती करायची नव्हती तर मातृभुमीचं रक्षण करायचं होतं.
देश.......देश सर्वांनाच प्रिय असतो. तसा देश सर्वांनाच प्रिय होता. तसा इतिहासच या भुमीत घडला होता. देश........सर्वांनाच प्रिय असतो. आम्हालाही आहे. त्यामुळे आम्ही आमची इंच इंच भुमीही कोणाला देवू शकत नाही.
आमच्या शालेय अभ्यासक्रमात सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. याच बांधवांना वाचविण्या नव्हे तर त्यांचं शिल रक्षण करण्यासाठी आम्ही लढत असतो. तसेच सीमेवर सैन्य ही ठेवत असतो. तरीही चीनसारखे काही देश आमच्या देशाच्या सीमारेषा चोरतात नव्हे तर आमचे नकाशेही चोरतात. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आज अरुणाचल प्रदेश हा आमचा असला तरी तो कुरापती चीन त्याला आपल्या नकाशात दाखवत असतो. याच चीननं हिंदी चीनी भाईभाई म्हणत जे १९६२ ला युद्ध केलं. त्या युद्धात भारताचा काही भाग बळकावला.
पाकिस्तानही तसंच करण्याचा प्रयत्न करतो. नेहमी काश्मीर वाद चिघळतच राहतो. विनाकारण नेहमी भारतावर आतंकवादी हमले होत असतात. यात पाकिस्तानचा हात असतो. परंतू पाकिस्तान मी नाही त्या गावचा म्हणत त्या वादापासून कोसो दूर आहे हेच दाखवत असतो. ह्या वर्तमानात घडणा-या घटना आहेत.
पुर्वीही असेच सीमारेषेचे वाद होते. पुर्वी अखंड असा भारत देश नव्हता. संस्थानीक होते आणि संस्थानं होती. राजे महाराजे हे प्रत्येक राज्याचे पालक होते. ते पालक आपल्या राज्याचं रक्षण करीत. तसेच असं रक्षण करता करता त्यांच्या मनात लालसा निर्माण झालीच तर ते साम्राज्यविस्तार करीत. अर्थात आजूबाजूच्या प्रदेशात दुर्बळ राजे असले तर त्यांना जिंकून त्यांचे प्रदेश आपल्या राज्यास जोडून घेत असत.
भारतात सुरुवातीपासून बरेच राजे झाले. त्यात समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, हर्षवर्धन, पुरु, दाहिर, पृथ्वीराज यासह अनेक राजे होवून गेले. ते न्यायी राजे होते. तसेच या राज्यांनी प्रजेच्या हितासाठी न्यायदानाचे कार्य केले.
राजा दाहिर आणि पृथ्वीराज यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. पण परकीय यौवनांचं राज्य स्विकारलं नाही. पुढे जेव्हा या भारतात मोगली सत्ता स्थापन झाली. त्यावेळी मोगल सम्राट अकबर हा सहिष्णू वृत्तीचा होवून गेलं. तसं पाहिल्यास मुघल सत्ताधीश हे हिंदूंचा राग करणारेच होते. परंतू अकबराने तसं काही केलं नाही. त्यानं राजपूत कन्या जोधाबाईशी विवाह केला व शेवटपर्यंत बिरबलाच्या सल्ल्यानं चालले. महत्वपूर्ण गोष्ट अशी की ते हिंदूंशी सहिष्णू भावनेनेच वागले.
आज सीमावादाचा हा संबंध अजूनही भेडसावत आहे. परंतू आज साम्राज्यविस्तार करता येत नाही. कारण आज संविधानीक राज्यव्यवस्था आहे. जी राज्यव्यवस्था फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगात कार्यरत आहे. समजा एखाद्यानं एखाद्याच्या प्रदेशावर आक्रमण केलंच तर त्याचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जातो. मग तिथं खटले प्रलंबीतच असतात. तिथंही तारीखवर तारीख चालत असते. वरुन वेगळी डोकेदुखी लागते. म्हणून कोणीही साम्राज्यविस्तारवादी धोरणाचा उदोउदो करीत नाहीत. यातच एखाद्यानं साम्राज्यविस्तारात भुमी देण्यास नकार दिलाच तर सगळं जगच त्या देशाला वाळीत टाकत असतं. नव्हे तर सहकार्य करीत नाहीत.
सिंधचा राजा दाहिर मरण पावला होता. त्याला यवनी शहंशाह मोहम्मद बिन कासीमनं ठार केलं होतं. तसा राजा दाहिरला मोहम्मद बिन कासीमनं ठार केल्यानंतर सिंधचं जनमत खवळलं.
बाप्पा रावल........बाप्पा रावल हा सिसौदिया वंशाचा राजा होता. तो लहानपणापासूनच शुरवीर व हुशार होता.
बाप्पा रावल ज्यावेळी तीन वर्षाचा होता. तेव्हा त्याच्या आईला असहाय वाटत होतं. तेव्हा भील समुदायानं त्यांना केलेली मदत प्रशंसनीय आहे. जर या भील समुदायानं त्यांना मदत केली नसती, तर कदाचित बाप्पा रावलला कोणीही ओळखू शकले नसते.
बाप्पा रावलचं बालपण हे भील जातीत गेलं. लहानपणापासून भील समुदायांमध्ये वावरतांना त्याच्या अंगी काटकपणा येवून गेला होता. भील जाती ही आधीपासूनच काटक होती. तसेच ती मंडळी कोणालाही घाबरत नसत.
लहानपणापासूनच भील जातीचे लोकं शिकार करायचे. त्या शिकारीत ते मोठमोठ्या हिंस्र प्राण्यांना ठार करायचे. त्यातच त्यांना ठार करण्यात त्यांचं कौशल्य पणास लागत असे. त्या प्राण्यांना शिकारीच्या निमित्यानं का होईना, ठार करण्याची प्रथा व परंपरा त्या भील लोकांमध्ये असल्यानं लहानपणापासूनच बाप्पा रावलमध्ये शुरवीरतेचे गुण आले होते.
बाप्पा रावलचा जन्म इस ७१३ मध्ये झाला. कोणी कोणी त्याचा जन्म इ स ७१२ असं सांगतात. जणू राजा दाहिरचा पुनर्जन्म वाटावा असा त्यांचा जन्म आहे. कारण राजा दाहिरला इ स ७१२ मध्ये मोहम्मद बिन कासीमनं मारुन टाकलं होतं आणि त्याच्या दुस-याच वर्षी त्याचा जन्म झालेला असल्याची इतिहासात नोंद आहे. ज्या राजा दाहिरची इच्छा होती की अरबानं सिंधला जिंकू नये. तो सिंध जिंकून आपल्या घशात घातल्यानंतर अरबांनी आपला मोर्चा मेवाड, चितौड इकडे वळवला. तेव्हा त्या अरबांचा बाप्पा रावलच्या नेतृत्वात भील्लांनी जोरदार प्रतिकार केला व अरबांना मेवाड, चितोडच नाही, तर सिंधमधूनही हाकलून लावले.
इतिहासकार म्हणतात की बाप्पा रावल हा पोलादी पुरुष होता. अर्थात तो पोलादाप्रमाणे होता. त्याच्या तलवारीचं वजन बत्तीस मन होतं. तसेच त्याची उंचीही नऊ फुट होती. तसाच तो धिप्पाड देहाचाही होता असं म्हटलं आहे. तो जेव्हा रणमैदानात उभा राहात असे, तेव्हा भल्याभल्यांची हादरत असे. असंही म्हटलं जातं की त्यानं शंभर विवाह केलेले असून त्यात पसतीस राण्या ह्या केवळ मुस्लीम समाजाच्या होत्या. बाप्पा रावलच्या भीतीपायी मुस्लीम शासकांनी आपल्या मुलींचा विवाह हा बाप्पा रावलशी करुन दिला असावा असंही इतिहासकार मानतात.
बाप्पा रावल लहानपणापासूनच पुष्कळ शक्तीशाली होते. ते जेव्हा लहान होते. तेव्हाचा प्रसंग. बाप्पा भील समुदायांमध्ये वावरत असतांना तो ज्या गायींना चारत असे. त्यातील एक गाय ही अधिक दूध देत होती. त्यातच ती गाय जेव्हा सायंकाळी घरी परतत असे. तेव्हा तिच्या स्तनांमध्ये दूध राहात नसे. त्यातच बाप्पाला आश्चर्य वाटत असे. त्यानं सत्यता जाणून घेण्याचा विचार केला.
त्या दूधाचे रहस्य जाणून घेतांना बाप्पा एक दिवस त्या गायीच्या मागं मागं चालू लागले. तोच ती गाय एका निर्जन स्थळी पोहोचली.
तिथे बाप्पा रावलला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात एक शिवलिंग दिसलं. त्यातच त्या शिवलिंगावर ती गाय आपल्या दूधातून धारा सोडत असल्याचे प्रत्ययास येत होते. बाप्पाला ते पाहून आश्चर्य वाटलं. तसं त्यानं इकडंतिकडं पाहिलं. त्याला एक व्यक्ती दिसला. त्या व्यक्तीनं संनस्थ कपडे अंगावर परीधान केले होते. तो वैरागी वाटत होता. तसेच त्या व्यक्तीच्या चेह-यावर अलौकीक तेज होतं. तसा तो व्यक्ती तरुण वाटत होता. त्या व्यक्तीनही तोच चमत्कार पाहिला होता. तसं त्यानं त्या व्यक्तीला विचारलं.
"हा चमत्कार काय आहे आणि हा आश्रम कोणाचा आहे?"
बाप्पाचा अबोध प्रश्न. तो व्यक्ती अगदी काही बोलला नाही. तो मौन धारण करुन होता. तोच थोड्या दूर अंतरावर काही माणसं उभी होती. त्यांची नजर बाप्पावर पडली. तोच त्यातील एका व्यक्तीनं बाप्पाला इशा-यानच बोलवलं. बाप्पा जवळ जाताच तो म्हणाला,
"कोण रं तू आन् हिकडं कायले आला?"
"मी अपराजीत."
"कुठं रायतो?"
"त्या भील जातीसमुदायाच्या आडोशाले रायतो."
"हो का? आन् हितं कायले आला?"
"गाईले न्याले. माह्यी गाय हाये हे."
"हे तुह्यी गाय?"
"हो, माह्यीच गाय."
"खरं सांगतोस."
"हो, खरंच की. हे माह्यीच गाय हाये."
"मग बेटा, तू खरंच भाग्यवान हायेस का हे तुही गाय हाये."
"म्हणजे?
"अरं हे गाय माहीत हाये का तुले? कशी हाय ते?"
"म्हणजे?"
"आरं, हे पुण्यवान गाय हाये."
"कशी?"
"आरं, ही गाय रोज हितं येते आन् ह्या शिवलिंगावर रोज आपल्या दूधाच्या धारा सोडते."
"म्हणजे?"
"आरं, तुले कसं सांगू.........अभिषेक करते अभिषेक."
बाप्पा रावल. तसं त्याला ती मंडळी काय बोलत आहेत हे काही समजत नव्हतं. परंतू तो गप्प होता. तशी ती बातमी त्या तेजस्वी माणसांच्या कानावर पडली. तसं त्या तेजस्वी माणसानं बाप्पाला बोलावलं पाठीवर हात ठेवत विचारलं.
"बाळा, ही गाय तुह्यीच नं?"
"हो, माह्यीच गाय हाये."
"छान गाय हाये. अन् तू कोठं रायतोस?"
"त्या भील जातीत."
"एक विचारु?"
"विचारा."
"तू आमच्याकडं रायशीन बेटा. तुले आमी शिक्षण शिकवू. तलवार, भाला सगळं काही शिकवू."
"ठीक हाये. पण माह्यी माय? ते कोठं राईन?"
"तिले बी घेवून येवू इकडं. मग तं झालं."
"ठीक हाये."
"तर मग इचार तुह्या आईले."
"ठीक हाये."
"ये मग."
बाप्पा रावलनं आपल्या गाईचं दोरखंड धरलं आणि तो ती अंधारलेली वाट चालू लागला. तसे त्याच्या मनात असंख्य विचार होते.
घर आलं होतं. तशी रात्र फार झाली होती. तशी दारातच उभी असलेली आई, त्या आईनं विचारलं,
"बाळ,कुठं होता एवढा वेळ?"
"आई त्याची लंबी कहानी हाय."
"हो का? सांग बरं कोणती कहानी हाय ती?"
"तेथं एक तपस्वी हाय. लय गुणाचा हाय. तसाच तेथं एक पिंड हाय. मालुम हाये का तुले, आपली गाय रोज त्या पिंडीवर दूधाचा अभिषेक करते."
"हो का?"
"हो आई."
"आई, तो तपस्वी तं म्हणाला की तू सोता आन् तुह्यी आई आन् ही गोमाता इथं घेवून ये."
"हो का रे."
"यावर तुह्यं का मत हाये?"
ती विचार करु लागली. तशी ती म्हणाली,
"जावू जावू."
दोन तीन दिवस झाले होते. तसा तो आईला घेवून त्या ऋषीच्या आश्रमात गेला. तसा त्या ऋषीला आईचा परीचय करुन दिला.
तो ऋषी म्हणाला,
"तुम्ही महान लोकं आहात की तुमच्यामुळं या ठिकाणच्या पिंडीवर अमृत सांडतं. तुम्ही महान आहात की ही या पिंडीवर अभिषेक करणारी गाय तुमच्याकडं आहे."
आईनं होकारार्थी मान हलवली. तसा तो ऋषी म्हणाला,
"मी एक विनंती करु. माझं ऐकाल काय?"
"बोला जी."
"आपण इथंच येवून राहा म्हणजे आम्हाला तुमची सेवा करता येईल."
"म्हणजे?"
"आई, तुम्ही महान आहात की ज्यांच्याकडे अशी गोमाता आहे. जी गोमाता अंतर्यामी आहे. नाहीतर एवढ्या गाई आहेत. त्यांना कळत नाही की या पिंडीवर अभिषेक करावं. ऐकाल ना माझं?"
तिनं ते सर्व ऐकलं. तशी ती विचार करु लागली. तशी ती म्हणाली,
"मी विचार करीन आणि नंतर सांगेन."
थोड्या वेळाचा अवकाश. ती तिथून निघाली. ती थेट आपल्या घरी. ती आता दररोज विचार करीत होती. तिला सुचत नव्हतं. तशी रोजच तिची गाय त्या पिंडीवर दूधाचा अभिषेक करीत होती. तसे बाप्पाच्या आईचेही तीव्र होत चालले होते.
पावसाळा सुरु होता. श्रावण महिना लागला होता. बाहेर टिपटिप पाऊस पडत होता. काळेकुट्ट मेघ आकाशात दिसत होते. तसा कधीकधी वीजेचा कडकडाटही ऐकू येत होता. त्यातच पावसाच्या धाराही येत होत्या.
घर आलं होतं. तशी रात्र फार झाली होती. तशी दारातच उभी असलेली आई, त्या आईनं विचारलं,
"बाळ,कुठं होता एवढा वेळ?"
"आई त्याची लंबी कहानी हाय."
"हो का? सांग बरं कोणती कहानी हाय ती?"
"तेथं एक तपस्वी हाय. लय गुणाचा हाय. तसाच तेथं एक पिंड हाय. मालुम हाये का तुले, आपली गाय रोज त्या पिंडीवर दूधाचा अभिषेक करते."
"हो का?"
"हो आई."
"आई, तो तपस्वी तं म्हणाला की तू सोता आन् तुह्यी आई अान् ही गोमाता इथं घेवून ये."
"हो का रे."
"यावर तुह्यं का मत हाये?"
ती विचार करु लागली. तशी ती म्हणाली,
"जावू जावू."
दोन तीन दिवस झाले होते. तसा तो आईला घेवून त्या ऋषीच्या आश्रमात गेला. तसा त्या ऋषीला आईचा परीचय करुन दिला.
तो ऋषी म्हणाला,
"तुम्ही महान लोकं आहात की तुमच्यामुळं या ठिकाणच्या पिंडीवर अमृत सांडतं. तुम्ही महान आहात की ही या पिंडीवर अभिषेक करणारी गाय तुमच्याकडं आहे."
आईनं होकारार्थी मान हलवली. तसा तो ऋषी म्हणाला,
"मी एक विनंती करु. माझं ऐकाल काय?"
"बोला जी."
"आपण इथंच येवून राहा म्हणजे आम्हाला तुमची सेवा करता येईल."
"म्हणजे?"
"आई, तुम्ही महान आहात की ज्यांच्याकडे अशी गोमाता आहे. जी गोमाता अंतर्यामी आहे. नाहीतर एवढ्या गाई आहेत. त्यांना कळत नाही की या पिंडीवर अभिषेक करावं. ऐकाल ना माझं?"
तिनं ते सर्व ऐकलं. तशी ती विचार करु लागली. तशी ती म्हणाली,
"मी विचार करीन आणि नंतर सांगेन."
थोड्या वेळाचा अवकाश. ती तिथून निघाली. ती थेट आपल्या घरी. ती आता दररोज विचार करीत होती. तिला सुचत नव्हतं. तशी रोजच तिची गाय त्या पिंडीवर दूधाचा अभिषेक करीत होती. तसे बाप्पाच्या आईचेही विचार तीव्र होत चालले होते.
आज बाप्पाच्या आईनं निर्णय घेतला होता. आपण आपल्या मुलाला घेवून त्या ऋषीच्या आश्रमात जावं. ज्या आश्रमातील पिंडीवर आपली गाय दुधाचा अभिषेक करते. तशी कल्पना तिनं आपल्या मुलालाही सांगीतली व मुलाच्या इच्छेनुसार त्याची आई भिल्लवाड्यातून त्या ऋषीच्या आश्रमात राहायला आली.
बाप्पाची आई भिल्ल आश्रमातून जशी हारीत ऋषीच्या आश्रमात राहायला आली. तशी ती त्या ऋषीच्या आश्रमात सेवाही करु लागली. बाप्पाही न चुकता हारीत ऋषीच्या आश्रमात कार्य करु लागला. नित्यनेमानं तो शिवपिंडीची सेवाही करु लागला. रोज सकाळी उठणे, स्वतःची अंघोळ आटोपविणे, त्यातच स्वअंघोळीनंतर शिवपिंडीला धुणे, त्या पिंडीला सजवणे, अक्षद, बेलपत्र तसेच हारफुलं वाहणे इत्यादी गोष्टी तो करु लागला. हे सर्व करण्यात त्याला अतिशय आनंद वाटत असे नव्हे तर तो त्या दिवसापासून पिंडीचा नव्हे तर शिवाचा भक्त बनला होता.
आज त्यांची रोजची दिनचर्या हारीत ऋषीही पाहात होते. ती दिनचर्या पाहून ते आनंदित झाले होते. त्यातच हारीत ऋषीनं ठरवलं की बाप्पाला युद्धकला शिकवायची.
हारीत ऋषीनं युद्धकला शिकवायचा विचार करताच बाप्पा रावललाही आनंद झाला. ते मनोमन खुश झाले व युद्धकला शिकण्यासाठी तयार झाले.
बाप्पा रावलचं नाव लहानपणी कालभोज असंही होतं. त्याची जी गाय होती, ती गाय शिवलिंगावर दूधाचा अभिषेक करीत असल्यानं कालभोजला एकवेळ उपाशीही राहावं लागत होतं.
कालाभोज पुढे बाप्पा रावल म्हणून प्रसिद्ध झाले असले तरी त्यामागे इतिहास आहे. ते जेव्हा हारीत ऋषीच्या आश्रमात शिक्षा ग्रहण करीत होते, त्या शिक्षेत त्याला हारीत ऋषींनी भाला चालवणे, तलवार चालवणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालवणे यासारख्या कृती होत्या. त्यातच हारीत ऋषीचा आश्रम हा डोंगरद-यात कड्याकपारीत असल्यानं ती पहाडी चढणे, उतरणे, शिकार करणे तसेच खाण्यासाठी कंदमुळे गोळा करणे यासारख्या कृती बाप्पा रावल करीत असे. त्यातच त्या विद्या शिकतांना बाप्पा रावल जास्त मेहनत करीत असे. त्यातूनच त्याची भूक फार वाढली होती. त्यातच तो जेवनही जास्त करीत असे.

***********************************************************************************************

बाप्पा रावलचा जन्म हा मेवाडच्या नागदा प्रांतात झाला होता. काही इतिहासकार त्याला क्षत्रीय वंशी मानतात. त्याचा जन्म इस ७१२ मध्ये झाला. ज्यावर्षी सिंधच्या राजा दाहिरला मोहम्मद बिन कासीमनं धोकेबाजीनं ठार केलं. त्यानंतर अलोरवर मोहम्मद बिन कासीमनं ताबा मिळवीत मोहम्मद बिन कासीम पुढं सरकत होता.
दाहिरला एक मुलगाही होता. त्याचं नाव जयसेन होतं. ज्यावेळी अलोरमध्ये राजा दाहिरचा पराभव झाला. तेव्हा साहजिकच या अलोरवर मोहम्मद बिन कासीमचा झालेला कब्जा...... त्यातच राजा दाहिरची एक राणी महाराणी लाडी ही आपला पुत्र जयसेनसोबत चितौडला आली. त्यावेळी चितौडला मौर्य शासकाचं राज्य होतं. त्याच मौर्य शासनकर्त्याच्या सैन्यात बाप्पा रावल हा सेनापतीही होता. बाप्पा रावलची शुरवीरता पाहून मौर्य वंशाच्या शासकांनी बाप्पाला आपल्या सैन्यात प्रवेश दिला नव्हे तर त्यानं अल्पावधीत केलेले पराक्रम पाहून बाप्पाला सेनापतीही बनवलं.
ज्यावेळी अलोरचं राज्य मोहम्मद बिन कासीमनं बळकावलं. त्यावेळी मदत मागण्यासाठी आलेल्या दाहिर राजपुत्र जयसेन व महाराणी लाडीला मौर्य शासकांनी निराश केलं नाही. त्यांनी आपला सेनापती बाप्पा रावलला त्यांच्या मदतीसाठी पाठवले.
बाप्पा रावल हे शूर होते. त्यातच इस ७१२ मध्ये ज्यावेळी मोहम्मदनं सिंध जिंकला. त्यावेळी मोहम्मदला वाटलं की आपण पूर्ण हिंदूस्थानलाच आता नेस्तनाबूत करु. त्यासाठी त्याने मेवाडलाही लक्ष्य बनवलं होतं.
************************************
बाप्पा रावलला हारीत ऋषीनं शिकवलं. त्यानुसार त्याची शिक्षा पूर्ण झाली होती. त्यातच बाप्पा रावल मौर्य शासकांचा सेनापतीही बनला होता. कारण त्याचेवर भगवान शंकराची कृपा होती असं इतिहासकार मानतात.
एकदा हारीत ऋषीनं पाहिलं की मौर्य शासक मानसिंह हा उदास आणि निराश आहे. त्याचं कारणही तसंच होतं. तो अरबी आक्रमणानं त्रस्त होता. बरंचसं धन अरबी आक्रमण थोपवून धरण्यात खर्च झालं होतं.
हारीत ऋषीला वाटलं की अशानं राज्याचं नुकसान होवून हे राज्य आपोआपच सिंध ज्याप्रमाणे अरबानं गिळंकृत केला. तसाच अरबांच्या घशात जाईल व अरब आक्रमणकारी ह्या चितौडलाही आपल्या घशात टाकतील. म्हणून ते ऋषीतुल्य विचार करु लागले. मेवाडला कसं वाचवायचं.
एक दिवस विचार करता करता त्यांना आठवलं की राज्यात एका ठिकाणी गुप्त धन आहे. ते मौर्य शासकाला मिळवून द्यावं. जेणेकरुन मौर्य राजकर्त्यांची उदासीनता दूर होईल व मौर्य राजवंशच नाही तर अख्खा मेवाडही वाचवता येईल. कारण अरबांच्या आक्रमणात ध्वस्त झालेलं राज्याचं धन अरबांना प्रत्युत्तर देण्यास पुरेल एवढं नव्हतं.
असाच विचार करुन एकदा हारीत ऋषींनी मौर्य शासक मानमोरीला गुप्त संदेश पाठवला आणि त्यात म्हटलं की एका ठिकाणी गुप्त खजिना आहे. तो खोदून काढावा. त्या खजिन्याचा वापर सैन्य बांधणीसाठी होईल.
मौर्य शासक मानमोरी हा उदासलेला होता. परंतू तो संदेश ऐकताच त्याच्यामध्ये नवा उत्साह संचारला. जशी विरश्री संचारते. त्यानं हारीत ऋषीनं पाठविलेल्या संदेशानुसार त्या खजीन्याचा शोध घेतला. त्यातच त्या खजीन्याच्या शोधातून अंदाजे पंधरा करोड स्वर्णमुद्रा प्राप्त झाल्या. ज्या स्वर्ण मुद्रातून मौर्य शासकांनी बाप्पाला अरबाविरुद्ध आक्रमण करण्यासाठी पाठवले.
अरब सेनेचा होत असलेला पराभव पाहून अरब शासकांनी सिंधच्या दाहिरचा जसा शरणागती पत्करता पत्करता पराभव केला. तशी पराभवाची छाया दिसताच अरब सेनाकर्ते वाटाघाटीच्या गोष्टी करु लागले. त्यातच मौर्य शासक मानमोरीही वाटाघाटीच्या गोष्टी करु लागले. बाप्पा मात्र ते सगळं पाहात होता. त्याला त्या अरबांच्या वाटाघाटी बरोबर वाटल्या नाही. त्यातच त्याला सिंधचा इतिहास आठवला. सिंधमध्ये मोहम्मद बिन कासीमनं पंधरा वेळा आक्रमणं केली होती व पंधराही वेळा राजा दाहिरनं मोहम्मद बिन कासीमला धुळ चारली होती. त्यातच सोळाव्या आक्रमणाच्या वेळी राजा दाहिरला मोहम्मद बिन कासीमनं धोक्यानं हारवलं व राजा दाहिरला ठार केलं होतं. हे बाप्पा रावलला माहित होतं. त्यातच मौर्य शासक मानमोरी हा करीत असलेल्या वाटाघाटीच्या गोष्टी आवडल्या नाहीत. कदाचित त्यालाही वाटलं की हे अरबी शासक आज वाटाघाटी करतील व उद्या पुन्हा या हिंदुस्थान धरणीवर येतील आणि परत आम्हा हिंदुस्थान वासीयांचा पराभव करतील व राजा दाहिरसारखेच आम्हालाही हलाल करतील.
बाप्पा रावलनं असा विचार करुन मौर्य शासक मानमोरीची हत्या केली. त्यातच चितौडचा किल्ला हस्तगत केला. तसेच बहात्तर हजार सेनेचं विशाल संघटन तयार केलं.
बाप्पा रावल हे शिवभक्त होते. ते हारीत ऋषीच्या छत्रछायेत वाढले. हारीत ऋषींनीच त्याला अनेक विद्याही शिकवल्या. त्यातच ते त्या ऋषीच्या मार्गदर्शनानं एवढे तरबेज झाले की त्यांच्यासमोर अरबांचे वीरचे वीर टिकले नाहीत.
राजा दाहिर मृत्यू पावताच खलिफाचं शासन सिंधवर सुरु झालं होतं. त्यातच महाराणी लाडी व जयसेन मदत मागायला बाप्पा रावलकडे आले होते. त्यातच अरबांनी भीनमाल आणि मंडोरच्या गुर्जर प्रतिहारावर तसेच मेवाडच्या मौर्य व गहलोतावर आक्रमणं केलीत. त्यावेळी सैनिकांनी महत्वपूर्ण भूमिका अदा केली. त्यांनी केवळ चांगली भुमिकाच अदा केली नाही तर त्यांनी आपआपल्या सीमेचं रक्षणही केलं. यातच बाप्पा रावल जेव्हा सेनापती पदावरुन राजपदाकडे आला, तेव्हा त्या ठिकाणी असलेला हिंदू आणि बौद्ध धम्म धुळीस मिळणार होता. कारण अरबांनी सिंधनंतर हळूहळू संपूर्ण हिंदूस्थानात पाय रोवणे सुरु केले होते.
ज्यावेळी अरबांनी सोळाव्या आक्रमणानंतर सिंध जिंकला. त्यावेळी अरबांची महत्वाकांक्षा वाढली होती. त्यांना असं वाटत होतं की आपण अख्खा हिंदूस्थान जिंकू शकू नव्हे तर आपला धर्मही जबरदस्तीनं का होईना या हिंदुस्थानात पसरवू शकू. परंतू येथील बाप्पा रावलसारख्या शुरवीर राजांपुढे अरबांची महत्वाकांक्षा टिकली नाही. त्यांनी त्या काळात जे शौर्य दाखवले, त्या शौर्यानेच अरबही घाबरले व त्यांनी पुढील काळात हिंदूस्थानावर आक्रमण तर केले. परंतू जास्त करुन धर्मपरीवर्तनाच्या भानगडीत पडले नाही.
इसवी सन ७२३ ची गोष्ट. बाप्पा रावल याचवेळी गादीवर आले असे इतिहासकार मानतात. त्यावेळी त्यांचं वय अवघं दहा वर्ष होतं. परंतू बाप्पाचं व्यक्तीमत्व हे दांडगं होतं. त्यांची नऊ फूट उंची असल्यानं त्या दहा वर्षाच्या काळातही ते धिप्पाड देहाचे वाटत असत.
हारीत ऋषीच्या मार्गदर्शनातून बाप्पानं मानमोरीवर विजय मिळवला. पण पुढला मार्ग काही सहज सोपा नव्हता.
इस्लाम धर्म...... इस्लाम धर्माची स्थापना झाल्यानंतर अरबी लोकांनी फारसवर आक्रमण करुन फारसला जिंकलं. ज्याला आधुनिक काळात इराण असं म्हणतात. त्यानंतर त्यांनी अफगानिस्तानवर स्वा-या केल्या व अफगानिस्तानलाही नेस्तनाबूत केलं. अरबांनी अफगानिस्तान नंतर सिंध जिंकल्यावर आपली स्वारी ज्यावेळी इतर भारतीय भुभागाकडे वळवली. त्या स्वा-यांना रोखण्यासाठी बाप्पा रावल मेवाडमध्ये एक तटबंदी म्हणून उभे राहिले. त्यातच बाप्पा रावलनं जैसलमेर व अजमेर सारख्या छोट्या राज्यांना आपल्यासोबत मिळवले. त्यातच त्यांची बलशाली शक्ती तयार झाली.
बाप्पा रावलनं कित्येक वेळा अरबांना हारवलं. तसेच सिंधच्या पश्चीमी तटावरच त्यांनी राहावं यासाठी त्यांना बाध्य केलं. ज्याला आज बलुचिस्तान म्हणतात.
ते केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी गजनीवरही आक्रमण केलं व गजनीच्या खलिफालाही नेस्तनाबूत करुन त्याचा शासक सलीमला हारवलं. त्यानंतर त्यांनी गजनीत आपला एक प्रतिनिधीही नियुक्त केला. त्यानंतर बाप्पा रावल हे चितौडला परत आले.
चितौडला काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी आजूबाजूचा प्रदेशही जिंकला. त्यानंतर त्यांनी आपले विशाल साम्राज्य निर्माण केले. ज्यात गांधार, इराण, खुरासान, तुराणचे साम्राज्य सामील होते.
बाप्पा रावल हे सिसौदिया वंशाचे होते. ते पुर्णपणे शक्तीशाली होते. ते हारीत ऋषीच्या आश्रमात राहिल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते. त्यातच हारीत ऋषींनी व त्यांच्या शिष्यांनी त्याला वेद विद्या शिकविल्याने ते सर्व गोष्टीत गुणसंपन्न झाले होते.
त्यांनी सिंधनंतर भारतात आलेल्या अरबांना अफगानिस्तान पर्यंत खदेडून लावलं होतं. त्यातच बाप्पा रावलनं आपले सैन्यतळ रावळपिंडी भागात ठेवला होता. त्या ठिकाणावरुनच ते अरबांवर जास्त लक्ष ठेवीत असत. त्यामुळे की काय, बाप्पा रावलच्या या नावावरुनच रावलपिंडी शहराचं नाव रावळपिंडी असं पडलं.
बाप्पा रावलला वाटत असे की आपल्याला यथोचित शिवशंकराचाच आशिर्वाद असावा. कारण त्यांची गाय बालपणावर दूग्ध अभिषेक करीत असे.
बाप्पा रावल हे मेवाडच्या राजगादीवर बसण्यापुर्वी त्या मेवाडमध्ये अनेक राजवंश झाले. परंतू बाप्पा रावलचं व्यक्तीमत्व हे त्या राजवंशापैकी निराळं आहे.
बाप्पा रावलनं असं कार्य केलं की जे कार्य करण्यास मोरी हे असमर्थ ठरले.
बाप्पा रावलच्या बापाचे नाव नागादित्य होते. तसेच ते गहलोत वंशाचे आठवे शासक होत.
रावलपिंडी.......रावलपिंडीला पुर्वी गजनीचा प्रदेश म्हणत असत. त्यावेळी कराचीचे नामकरण ब्राम्हणाबाद असे होते. मात्र बाप्पानं याच गजनीच्या प्रदेशात सैन्यतळ स्थापन केलं. त्याचं कारण म्हणजे अरबांच्या हालचालीवर नजर ठेवणे.
ते अरबांच्या हालचालीवर एवढ्या सुक्ष्मरित्या लक्ष ठेवत की भले भले मुस्लीम शासक त्यांना घाबरत असत. त्यातच त्यांच्या वीरतेला घाबरुन ब-याचशा मुस्लीम शासकांनी आपल्या मुली त्याला दिल्या अर्थात आपल्या मुलींचे विवाह बाप्पा रावलशी लावून दिले.
बाप्पाचे वडील हे एक राजा होते ईडर प्रांतातील. परंतू त्यांची हत्या झाल्यानंतर त्याच्या पत्नीनं म्हणजेच बाप्पाच्या आईनं बाप्पाला नागर जातीतील कमलावती वंशजाजवळ नेलं. ज्या कमलावतीचे वंशज गुहील राजवंशचे पुरोहित होते. त्यातच त्या भागात भील जातीचा आतंक होता. त्यातच त्या भील जातीच्या आतंकाला घाबरुन कमलावतीच्या वंशजांनी बाप्पाला भांडेर नावाच्या स्थानी आणलं. त्यावेळी बाप्पाचं वय तीन वर्षाचं होतं. या ठिकाणी बाप्पा गायी चारायचं काम करीत असे. त्यानंतर बाप्पा नागदा आले. त्या नागदामध्ये बाप्पा ब्राम्हणांच्या गायी चारायला लागले.
बाप्पा रावलचा जन्म हा ईडरमध्ये झाला. ते गुहिल राजपुत वंशाचे संस्थापक होते. ज्याला सिसोदिया राजवंश देखील म्हणतात.
बाप्पा जेव्हा तीन वर्षाचे होते, तेव्हा त्यांची आईला असहाय आणि दुर्बल वाटत होते. त्यातच तशा वेळी भील समुदायानं त्यांच्यावर कोणताही अतिप्रसंग येवू न देता त्या दोघांची मदत केली. त्यातच त्यांना सुरक्षीत ठिकाणीही ठेवलं.
बाप्पा रावलचं बालपण हे भील जातीसमुदायात व हारीत ऋषीच्याच आश्रमात गेलं. तसं पाहता लहानपणापासून त्यांचं बालपण हे धकाधकीचं गेलं. बाप्पा रावलनं दुःख सहन करता करता ते बालपण व्यथीत केल्यानं बाप्पा रावलनं पुढील काळात सिसोदिया वंशाची मुहूर्तमेढ रोवली.
बाप्पा रावलनं अवघ्या वीस वर्षाच्या आयुष्यात म्हणजे इ स ७३४ मध्ये मानमोरीला ठार केलं. त्यावेळी तो काळ अत्यंत धामधुमीचा होता. त्यानंतर इस ७३५ मध्ये त्यांनी हज्जाजच्या फौजेला खडेदून लावलं.
बाप्पा रावल हे न्यायप्रिय शासक होते. ते स्वतःला राजा समजत नव्हते तर ते शिव भगवानालाच राजा समजत होते. ते शिव भगवानच्या रुपानं एकलिंगाला खरं शासक मानत असत. ते स्वतःला शिवाचा प्रतिनिधी मानत असत. त्यामुळं की काय, त्यांनी वीस वर्षाच्या शासनकालानंतर संन्यास घेतला होता. तसं पाहता ते आपला मुलगा संग्रामसिंह यांच्या हातात सत्ता देवून शिवाच्या उपासनेसाठी अरण्यात निघून गेले.
चितोड......चितोडवर अधिकार करणं काही सहज सोपं काम नव्हतं. ज्यावेळी बाप्पा रावल मेवाडच्या गादीवर बसले. त्यापुर्वी मेवाडने पुष्कळ वीर राजे लोकांना दिलेही असतील. परंतू बाप्पा रावलसारखा वीर नाही मेवाडमध्ये त्याचे जन्मापुर्वी दुसरा कोणी झाला असेल.

**************************************

राणी लाडी व जयसेनानं मदत मागताच बाप्पा रावल त्याच्यासोबत चालू लागले. सोबत सैन्याचा फौजफाटा होताच. त्यातच बाप्पा रावल हे सेनापती असल्यानं व त्यांच्यात जोश असल्यानं ते सिंध जिंकण्यासाठी चालत असतांना त्यांच्यासोबत त्यांचे सैनिकही सिंध जिंकण्यासाठी चालत होते. तसा पावसाळा लागला होता.
सिंधचा राजा दाहिरला मारल्यानंतर मोहम्मद बिन कासीमनं अलोरवर ताबा मिळवला होता. त्यातच त्यानं सैन्याचं केंद्रही अलोरच्या आसपासच बनवलं होतं. त्यात कारणंही होतं. त्याला त्या ठिकाणी सैन्याचं तळ ठेवून केवळ सिंधच नाही तर सिंधच्या आजुबाजूस असलेल्या भागावर त्याला आपली नजर ठेवता येत होती. नव्हे तर भविष्यात त्याला अखंड हिंदुस्थानवर ताबा करण्याचं त्याचं स्वप्न होतं. तसेच ज्यावेळी त्यानं सिंध जिंकला होता. त्यावेळेपासून जबरदस्तीनं तो हिंदूंचं धर्मांतरण करण्याच्या पाठीमागे लागला होता.
त्यानं राजधानी बनवली तेव्हापासून हिंदूंचं धर्मावरुन शोषण सुरु होतं. गाईच्या कत्तली सुरु होत्या. त्यातच गाईच्या कत्तली करणं मेवाडच्या बाप्पा रावलला न आवडणारी गोष्ट होती. तसं पाहता बाप्पाची गाय ही शिवपिंडीवर दूध अभिषेक करीत होती हे बाप्पाला माहित होतं.
सिंधमध्ये गाय कापली जाणं बाप्पाला न आवडणारी व चीड आणणारी गोष्ट होती. त्यामुळे की काय, बाप्पानं अरबांना या देशातूनच हाकलून देण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यानं आपल्या सैन्याला चेतवलं व मायभुमीबद्दल ज्योत त्यांच्या मनात निर्माण केली.

*********************************************

मुसलमान जगातील एक प्रमुख धर्म होता. या धर्माची संख्या आज वाढतांना दिसत आहे. त्याचे कारणंही तसेच आहे. त्यांच्यामधील अशिक्षीतता व अंधविश्वास हे त्यांची लोकसंख्या वाढण्याला कारणीभूत आहे. मुलं ही अल्लाची देण म्हणत ती जमात अगदी स्रियांना मशीन समजत मुलं जन्माला घालतात. त्यातच त्यांना स्रीयांनी नटणं, नेलपालिश लावणं वा भडकावू कपडे घालणं आवडत नाही. स्रीयांनी बंधनातच राहावे तसेच पुरुषांच्या समोर जावू नये या सा-याच गोष्टीवर त्यांची बंधनं. त्यातच तिचं सौंदर्य कोणी पाहू नये म्हणून बुरख्यांची पद्धत. हेच घडत आहे अफगानिस्तानात. आज अफगानिस्तानात तालिबान्यांचा जय जरी असला तरी तो केवळ धाक आहे म्हणून. तलवारी आणि चाकूच्या धाकावर मुस्लिम तालिबानी धर्म जरी वाढला असला तरी त्याला खरं खतपाणी मिळालं, ते म्हणजे महिलांचं अशिक्षीतपण व त्यांची आवाज न उठविण्याची पद्धत आणि त्या बिचा-या महिला आवाज तरी का उठवतील. कारण त्यांना माहित आहे की आम्ही जर आवाज उठवला तर उद्या आमच्याच धर्मातील लोक आमची दुर्गती करतील. हे साधं अफगानिस्तानात घडलेल्या एका नेलपालिशच्या तोडलेल्या हातावरुन लक्षात येते. आज अफगानिस्तान मध्ये मुळात महिलांना जास्त ओलिस ठेवले जात आहे.
आज अफगानिस्तान मध्ये लहान मुलांच्या हातात बंधूक देणे ठिक आहे. पण महिलांवर शाब्दीक बलात्कार करणे काही बरोबर नाही. त्यांचा गुन्हा नसतांना त्यांचे विनाकारण हात तोडणे बरोबर नाही. इस्लाम काही हे सांगत नाही.
इस्लाम हा एकेश्वरवादी धर्म आहे. इस्लामचे दोन मुख्य प्रवाह आहेत. एक सुन्नी व दुसरा शिया. सुन्नीच्या मतानुसार राजनीतीचा उत्तराधिकारी हा शूरा अर्थात विचारमंथन करुन व योग्य निर्णय घेवून तयार करावा. जे हजरत मुहम्मद च्या मृत्यूनंतर घडलं. हजरत मुहम्मद च्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी हा त्याचा ससूर अबू बक्र बनला होता हे इतिहास सांगतो. तसेच दुसरा इतिहास सांगतो की हजरत मुहम्मदाने आपला जावई अली इब्न अबी तालिब याला उत्तराधिकारी नेमून दिलं होतं. या धर्माचा पहिला नियम म्हणजे विश्वास. ते अल्लाहवर विश्वास ठेवतात. जे काही करेल, तो अल्लाच करेल. दुसरा नियम आहे तो म्हणजे प्रार्थना. तिसरा नियम आहे, तो म्हणजे दान. चवथा नियम आहे, तो म्हणजे उपवास. पाचवा नियम आहे तो म्हणजे तिर्थयात्रा. असे असतांना ते राजगादी बळकविण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग का अनुसरण करतात ते कळत नाही. कारण कोणत्याही जन्मास आलेला जीव हा अल्लाची देण असतांना अल्लावर विश्वास ठेवून मुस्लीम धर्माने कोणत्याही जीवाची हत्या करु नये वा कोणत्याही महिलांना असमानतेने वागवू नये. विशेष सांगायचं म्हणजे राज्य करण्याची लालसा अजिबात या धर्माने बाळगू नये. तसं मुहम्मद पैगंबर सांगतातच.व्यतिरीक्त तिसरा नियम जाकत अर्थात दान असल्यानं रक्तदान, अवयवदान, जीवदान हे जिव्हाळ्याचे व महत्वपूर्ण विषय असतांना जित्या प्राणीमात्राचाच नाही तर माणसाचा तरी त्यांनी बळी का घ्यावा! शिवाय प्राणीमात्राचा आणि माणसांचा बळी तर सोडा, व्यतिरिक्त दुस-या नियमानुसार त्या प्राण्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
मुस्लीम हा पवित्र धर्म असून ते चवथ्या नियमानुसार उपवास वा रोजा ठेवतात. रमजानचा महिना त्यांच्यासाठी पवित्र असा महिना आहे. या महिण्यात ते सकाळपासून तर सायंकाळपर्यंत जेवन, पेय,धुम्रपान, संभोग व जीवहत्या करीत नाही. संपूर्ण लक्ष हे चिंतन व अल्लाह भक्तीवर केंद्रीत करतात. असे असतांना याच रमजानच्या महिण्यात म्हणजे दिनांक पंधरा आगष्टला अफगानिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतलाच कसा! त्यांनी जीवहत्या केलीच कशी! याबाबत विचार येतो. महत्वपूर्ण गोष्ट ही की तालिबानी हे खरे मुस्लीम की खोटे हा प्रश्न उत्पन्न होतो.
मुस्लीम धर्मात कुराणाला फार महत्व आहे. तालिबानीदेखील कुराणाला मानतातच. शिवाय कुराण हा धर्मग्रंथ हा इतरांचा आदर करा असे सांगतो. तिथे मज्जीदमध्ये प्रवेश करतांना एकमेकांचा आदर करत प्रवेश करावा. जूते वापरु नये. कुराणाची टर उडवू नये असे सांगीतले जाते. आलोचनाही करु नये. एकमेकांना मदत करावी. असेही सांगीतले जाते. असे असतांना अफगानिस्तानात असे का घडले असावे असा विचार येतो.
मुख्य म्हणजे मुस्लीम समुदाय हा वरीलप्रकारच्या विचारसरणीचा असून त्याचे ध्येय धोरण त्या धर्मातील विचारसरणीनुसार पवित्र असे आहेत. असे असतांना अफगानिस्तान मध्ये तालिबानी हस्तकांची क्रुरता दिसून येते. या क्रुरतेचा विचार केल्यास तालिबानी लोक हे जरी अफगानिस्तान मध्ये आधारस्तंभ बनू पाहात असले तरी ते कदापिही शक्य होणार नाही. अन् आज ते जरी आधारस्तंभ बनलेही तरी उद्या तेच आधारस्तंभ केव्हा धराशायी होतील हे आता सांगता येत नाही.
मुस्लीम धर्म वाढत चालला होता त्यावेळेला. कारण मोहम्मद बिन कासीमनं सिंध जिंकला होता. तसं पाहता मोहम्मद बिन कासीमनं सिंध जिंकल्यावर आपला आत्मविश्वास वाढवला होता आणि त्याच आत्मविश्वासाच्या बळावर तो अफगानिस्तानात असलेल्या हिंदूवर अत्याचार करीत होता नव्हे तर अत्याचार करुन त्यांच्याकडून इस्लाम कबूल करवीत होता.
बाप्पा रावलच्या हे जेव्हा लक्षात आलं. तेव्हा त्याला वाटलं की या देशात असलेली पुरातन संस्कृती उद्या चालून नष्ट होईल. जी पुरातन संस्कृती ही अहिंसावादी आहे. इथे यापुर्वी कधीही क्रांती झालेली नाही.
अफगानिस्तान मध्ये पुर्वी हिंदू धर्म जास्त प्रमाणात होता. इथे असलेल्या गांधारमधून त्या काळी भारतात गांधारीला आणलं होतं. हस्तीनापूरच्या दरबारातील भीष्माचार्य यांनी याच देशातील कंदाहारची राजकन्या आपल्या भावाचा आंधळा पुत्र धृतराष्ट्रसाठी मागीतली होती. जी मुळात हिंदू होती.
मोहम्मद बिन कासीम अफगानिस्तान मार्गे भारतात येण्यापुर्वी इथे हिंदू संस्कृती वास करीत होती. कंदाहारचं मुळ नाव गांधार असं होतं. इस साडेपाच हजार सालापुर्वी याच गांधारवर राजा सुबल राज्य करीत होता. ज्याला एक मेव मुलगी होती. जिचं नाव गांधारी होतं.
गांधारीला शकूनी नावाचा भाऊही होता. राजा सुबलच्या मृत्यूनंतर अफगानिस्तानचा सर्व राजपाट शकूनीच्या हाती आला. परंतू त्याने राज्याची लालसा न बाळगता आपले राज्य आपल्या मुलाच्या हाती सोपवून तो भारतात आपल्या बहिणीसोबत आला. तो बहिणीसोबत राहूही लागला. परंतू त्याच्या मनात बदल्याचा असंतोष धुमसत होता.
बदला........गांधारीचा ज्यावेळी विवाह तय झाला. तेव्हा असे म्हणतात की भिष्मानं गांधारीचा पती हा आंधळा असल्याचं सांगीतलं नव्हतं. परंतू प्रत्यक्षात जेव्हा विवाह झाला. त्यावेळी कळलं की आपला जावई महाराज धृतराष्ट्र हा आंधळा आहे.
धृतराष्ट्र हा आंधळा असल्याचं शकूनीला कळताच त्याला भयंकर राग आला. परंतू आता वेळ गेलेली होती. राग जाहिर करता येत नव्हता. त्यामुळं त्यानं प्रतिज्ञा केली की मी कौरवांनाच नाही तर संपूर्ण हस्तीनापूरचा वंश नष्ट करीन. कारण हस्तीनापूरनं आम्हाला धोका दिलेला आहे.
शकूनीचं बहिणीवर अतिशय प्रेम होतं. त्या प्रेमासाठीच तो हस्तीनापूरला राजपाट सोडून आला. त्यानं अगदी लहानपणापासूनच आपल्या भाच्यांच्या मनात क्लेषभावच नाही तर विष पेरलं. त्यात शेवटी त्याच्यासह सर्व कौरवांचा अंत झाला.
आपले काही मुलं मारले गेल्यानंतर गांधारी खुप संतापली. तिला भयंकर राग आला व ती शाप देत सुटली. तेव्हा तिनं सर्वात पहिला शाप दिला. तो आपला भाऊ शकूनीला. कारण ती आपले काळजाचे तुकडे नष्ट होताच शाप देत सुटली होती. ती म्हणाली, 'माझे पुत्र मारणा-या हे भ्राता, ज्याप्रमाणे तुझ्या बोलण्यातून माझ्या मुलांच्या मनात विष पेरले गेले. वाटल्यास तू माझ्या मुलांमध्ये चांगले संस्कार पेरु शकत होतास. कारण तू डोळस होतास. परंतू तू तसे केले नाहीस. तेव्हा माझाही शाप तुला आहे की ज्याप्रमाणे तू माझ्या मुलांमध्ये कुसंस्कार टाकून त्यांचा अंत केला. त्याप्रमाणे एकवेळ अशी येईल की तुझ्याही राज्यात असा कलह नेहमीच होत राहिल.'
गांधारीचा तोच शाप. आजही अफगानिस्तान धगधगत आहे.कधी मोहम्मद बिन कासीम या अफगानिस्तानातील लोकांवर अत्याचार करतो तर कधी तालिबानी. असे वाटते की आजही अफगानिस्तान गांधारीच्या शापाने की काय अजूनपर्यंत विकासाच्या टप्प्यावर पोहोचलेला नाही.

********************************************
अफगानिस्तान हा पुर्वीपासूनच अत्याचारींचा बालेकिल्ला राहिला आहे. पुर्वीचे इराण, इराकचे सौदागर याच अफगानिस्तानातील काबूल, कंदाहार मार्गे भारतात येत. भारताला लुटत असत आणि येथील लुटलेला माल आपल्या देशात लुटून याच मार्गानं नेत. त्यावेळी ते आपल्या सोबत तो माल वाहून आणण्यासाठी गुलाम आणत नसत तर ते गुलाम याच अफगानिस्तान मधील लोकांवर अत्याचार करुन त्यांना गुलाम बनवून त्यांच्या अंगावर ओझं देवून या भारतातील माल ने आण करीत असत.
बगदाद तसं पाहता ही व्यापारी पेठ होती. पुढे व्यापारी बनलेली ही सौदी अरेबियाची तसेच इराण, इराकची माणसं अफगानिस्तानमध्ये स्थिरावली. त्यातच ती अफगानिस्तानची राज्यकर्तेही बनली.
अफगानिस्तान हा पुर्वीपासूनच स्वतंत्र्य असा देश नाही. तो भारताचा एक भाग होता. कारण तसा उल्लेख इतिहासात नाही. खिस्तपुर्व ज्यावेळी सिंकदराचं आक्रमण झालं, त्यावेळी याच अफगानिस्तानमध्ये फारस हखामनी शाह यांचं शासन होतं. त्यानंतर या भागात बौद्ध धम्म अस्तित्वात होता. परंतू अफगानिस्तान हा स्वतंत्र्य देश म्हणून इस सतराशेपर्यंत तरी अस्तित्वात नव्हता.
अफगानिस्तान हा भारताचा एक भाग होता. तसं पाहता इंग्रज जेव्हा भारतात आले. तेव्हा त्यांनी अफगानिस्तान चा भारतातून कारभार पाहतांना एक सीमारेखा आखली. त्या रेषेला ड्युरंड लाईन म्हणतात. ही घटना १८९६ मध्ये घडली. त्यानुसार अफगानिस्तान हे स्वतंत्र्य राज्य म्हणून अस्तित्वात आले.
अफगानिस्तान हे १८९६ मध्ये स्वतंत्र्य राज्य म्हणून अस्तित्वात आले असले तरी त्यानंतरही त्या प्रदेशावर ब्रिटीश हुकूमत होतीच. अर्थात अफगानिस्तान ब्रिटीशांचा गुलाम होता.
अहमदशाह अब्दालीनं पहिल्यांदा अफगानिस्तानवर एकाधिकारशाही निर्माण केल्यानंतर अफगानिस्तान मधील लोकांना स्वातंत्र्याची जाणीव झाली.
अफगानिस्तानची जुनी नावे आर्याना, आर्यानुम्र वीजू पख्तिया, खुरासान, पश्तूनख्वाह आणि रोह अशी आहेत. ते पुर्वी हिंदू राष्ट्र होते. त्यानंतर मौर्य शासन काळात बौद्ध धम्म तिथं प्रस्थापित झाला. पुढे याच ठिकाणी मुस्लीम शासनही. या ठिकाणी जरी सुसंपन्नता नसली तरी इथूनच सरळ सरळ मार्ग इजिप्त आणि तत्सम देशाकडे निघत असल्यानं अफगानिस्तान हे इतर देशाचे लक्ष ठरले होते.
छत्रपती शिवरायांचा सरनौबत नेतोजी पालकर याला जबरदस्तीनं मुसलमान बनवून औरंगजेबानं त्याला याच अफगानिस्तानात ठेवलं होतं. १९१९ ला अफगानिस्तान स्वतंत्र्य झालं. त्यानंतर १९३३ पर्यंत अफगानिस्तानचा राज्याची घडी बसविण्यात वेळ गेला. त्यानंतर जाहिर शाहचं शासन आलं. जाहिर शाहने १९३३ पासून १९७३ पर्यंत चांगलं शासन केलं. त्यापुर्वी त्याच्या जीजाचं शासन होतं. जाहिर शाह हा कम्युनिस्ट पार्टीचा असून जेव्हापर्यंत त्याची सत्ता होती. तेव्हापर्यंत सगळं व्यवस्थीत होतं. परंतू त्याची सत्ता १९७३ ला जाताच मुजाहिदीनचं (तालिबान) राज्य आलं.
अमेरीका..... एक बलाढ्य देश. तो महाशक्तीची स्वप्न पाहात होता. त्याला कुठंतरी रशिया तोडायचाच होता. त्याची एक नजर रशियावर तर दुसरी नजर अफगानिस्तानवर होती. त्यातच त्यानं तालिबानला सोवियतला तोडण्यासाठी मदत केली. त्यात सोवियतमध्ये असलेली कम्युनिस्ट सत्ता तुटली. अमेरिकेचं काम झालं. त्यातच अमेरीकेनं हळूहळू तालिबानला विरोध करणं सुरु केलं. त्यातच मुजाहिदीन चिडूनच होता.
फेब्रुवारी २००७ पर्यंत अफगानिस्तानात लोकतांत्रिक सरकार होती. त्यातच अफगानिस्तानची सीमा भारताला लागून असल्यानं तसेच अमेरीकन सैन्य अफगानिस्तान मध्ये असल्यानं तालिबान दबून होते. परंतू ते संधी पाहात होते. अमेरिकन सैन्याच्या निघून जाण्याची. जसे अमेरीकेने अफगानिस्तान मधून सैन्य हलवले. तालिबाननं अफगानिस्तानची सत्ता हातात घेतली. मग काय, त्यांना जे जे विरोध करत होते. त्यांना तालिबान मारत सुटले. मग तो मार्ग क्रुराचा का असेना. त्यात कोणाचा दोष का असेना. निर्दोष नागरीक आज अफगानिस्तानमध्ये बेवारसपणे मरत आहेत. एक भारत सोडला तर आजूबाजूचे देशही येथील लोकांना मदत करायला पुढे येत नाही. त्यांना वाटत आहे की कदाचित आपल्यालाच पुढे तालिबान अफगानिस्तान सारखं मारुन टाकतील.
अफगानिस्तान अख्खा ताब्यात आला असला तरी आजही पंजशीर नावाचा एक प्रांत असा आहे की तो तालिबानला अजुनही ताब्यात घेता आला नाही. याच प्रदेशावर सोविएट संघाने व तालिबानने यापुर्वीही ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू ते त्यात यशस्वी झाले नव्हते.
ज्यादिवशी भारताचा स्वातंत्र्यदिन होता. त्यावेळी अफगानिस्तान मध्ये तालिबानी सत्ता ताब्यात घेत होते. परंतू पंजशीरमध्ये तिनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि तेथील उपराष्ट्रपती अजहर मसूदनं यांनी सांगीतलं की अजुनही अफगानिस्तान सरकार पराभवी झालेले नाही. त्यांच्या धमणीत अजुनही अफगाणी रक्त शिल्लक आहे.
तालिबाननं यापुर्वी म्हणजे १९९६ मध्ये सत्ता हातात घेतली होती. त्यावेळीही त्यांनी कडक निर्बंध लावले होते. लहान लहान मुलांच्या हातात बंधूका दिल्या होत्या. शिक्षणाचा लवलेश नव्हता. महिलांना बुरखा वापरल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हते. त्यांनी नेलपालिश लावणे वा लिपस्टिक लावणे, सारासर गुन्हे समजले जाई. त्यातच या तालिबानाच्या मोरक्यानं १९९९ मध्ये भारतीय विमान हायजैक केलं. ते विमान अफगानिस्तान मध्ये नेलं. त्यात अनेक राष्ट्राचे नागरीक होते. शेवटी अमेरिकेच्या मदतीने २००१ मध्ये या अफगानिस्तान वर हल्ला केला गेला. त्यानंतर तालिबान सत्तेतून बाहेर झालं.
आज अमेरिकेनं आपले सैन्य माघारी बोलावले होते. तोच तालिबाननं अफगानिस्तानातील सत्ता हातात घेतली. परंतू त्यांचं अत्याचार करणे पाहून तालिबानची सत्ता बरी नाही असं मत साहजिकच लोकांच्या नजरेत निर्माण होत आहे. त्यामुळं की काय, अफगाण नागरीकांना अजुनही तालिबानवर विश्वास नाही.
खरं तर तालिबाननं सुधरायला हवं. ठीक आहे, सत्ता तालिबाननं हातात घेतली. परंतू जुनं ते सोडून द्यावं व नवीन विचार अंगीकारुन तालिबानं लहान मुलांच्या हाती बंधूका देवू नये. महिलांना सुरक्षितता प्रदान करावी. तसेच कोणत्याही अफगानिस्तान नागरीकांवर अत्याचार करु नये. जेणेकरुन पुढील काळात हर अफगानिस्तान नागरीकच नाही तर इतर देशातील लोक तालिबानकडे चांगल्या नजरेनं पाहतील.
सध्या अफगानिस्तान धगधगत आहे.काल असाच एक व्हाट्सअपवर व्हिडीओ आला. व्हिडीओ महिलेचा होता. ती महिला...... त्या महिलेनं नेलपालिश लावला होता. परंतू तिनं नेलपालिश का लावला म्हणून तालिबान्यांनी तिचा हात तोडला. ते एवढे करुनच थांबले नाहीत तर त्या महिलेचा घावाचा हात उकळत्या पाण्यात बुडवला. यावरुन कल्पना येते की अफगानिस्तान मध्ये काय चाललेले आहे.
खरंच अफगानिस्तान मध्ये असलं तालिबान्याचं कृत्य. विचार करायला भाग पाडणारं दृश्य. सर्व जगानं याचा विचार करण्याची गरज आहे. अफगानिस्तान खचला आहे. त्याला मदतीची गरज आहे. तालिबान्यांनी अमेरीकेला ३१ सप्टेंबरपर्यंत सैन्य काढण्यासाठी मुदत दिली आहे. ते खरंही आहे. परंतू अमेरिकेनं सैन्य काढू नये अफगानिस्तानमधून.व्यतिरिक्त सर्व जगानं तालिबानला लक्ष करुन त्यावर आक्रमण करावं. जेणेकरुन तालिबानी दबेल व पुन्हा ते मुंडकं वर करणार नाही. हे तेवढंच खरं आहे.
***********************************************

महाभारत काल समाप्त झाला होता. त्यानंतर हळूहळू हस्तानापुरमधील काही मंडळी गांधारमध्ये येवू लागली होती. त्यातच ती तिथे काही दिवस राहिली. पुढं याच अफगानिस्तान मध्ये बौद्ध धम्माचा प्रसार झाला व येथील काही लोक बौद्ध बनले. पुढे काही दिवस इथे बौद्ध व हिंदू शांततेनं निवास करीत राहिले. पण काळाच्या गर्तेनुसार व गांधारीच्या शापानं की काय, येथे वसलेले हे हस्तीनापूरातील नव्हे तर अफगानिस्तानातील काही लोकं मुस्लीम आणि हिंदूच्या सततच्या लढायानं त्रस्त होवून ते सौदी अरेब व इराकला स्थलांतरीत झाले व तेथेच ते निवास करु लागले.
अफगानिस्तानात बौद्ध धम्माचा प्रसार झाला. हळूहळू हिंदू धर्म कमी झाला. त्यातच भगवान शिवाची पुजाही कमी होवू लागली. त्यातच काही मौर्य वंशीयांनी तेथे राज्य केले. त्यातच ज्यावेळी अकराव्या शतकात मोहम्मद गजनीनं जेव्हा अफगानिस्तान मध्ये आक्रमण केलं. तेव्हा या ठिकाणच्या काही लोकांना त्यानं जबरदस्तीनं मुस्लीम बनवलं. त्यापुर्वीही मुसलमान बनविण्याची सुरुवात अफगानिस्तान मध्ये मोहम्मद बिन कासीमच्या काळापासून झालीच होती. यावेळी मात्र गांधारचं नाव मोहम्मद गजनीनं बदलवून कंदाहार केलं होतं.
गांधार.......या गांधारला पुर्वी केशरची शेती केल्या जात होती असा इतिहासात उल्लेख आहे. गांधारचा मुळात अर्थ गंध होत असून या केशरच्या शेतीवरुनच गांधारचं नाव गांधार असं पडलं. असं मानतात की भगवान शिवाचं एक नाव गांधार आहे. असं म्हणतात की पुर्वीच्या काळी याच अफगानिस्तान मध्ये भगवान शिवाच्या भक्ताचा निवास होता.
अफगानिस्तान हा पुर्वीपासूनच रेशम मार्ग व मानव प्रवास मार्ग राहिलेला आहे. या भुमीवर कुशाण, हफ्थलिट, समानी, गजनवी, मोहम्मद घोरी, मुगल सल्तनत, दुर्राणी तसेच अनेक सा-या साम्राज्यांनी राज्य केलं. प्राचीन काळात फारस आणि शक शासकांनीही याच अफगानिस्तानात राज्य केले. त्यात सिकंदर, दारा प्रथम, तुर्क, बाबर, नादिर शहा हे प्रमुख होत.
साधारणतः या अफगानिस्तान मधूनच आर्य भारतात आले असे इतिहास सांगतो. इस पुर्व सातशेच्या शतकात गांधार हे महाजनपद होतं. त्यातच या अफगानिस्तानला इस पुर्व पाचशेच्या शतकात फारस शासक हखामनी याने जिंकून घेतलं. त्यानंतर शकांनी. त्यानंतर इस पूर्व २३० च्या आसपास या ठिकाणी मौर्यांनी आपलं शासन केलेलं आहे असेहीे, इतिहास सांगतो. त्यानंतर पर्शीयन व ससानी शासक आले. हेच शेवटचे इरानी शासक होत. त्यानंतर हा भाग अरबांनी जिंकला.,अरबांनी इस सातशे सात मध्ये या भागातील खुरासानमध्ये आपला अधिकार निर्माण केला. त्यानंतर इस नवशे सत्यांऐंशी मध्ये या भागाला गजनीनं जिंकलं.
इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत कार्यरत असणारे हिंदू व बौद्ध राजे........हे हिंदू व बौद्ध राजे अफगानिस्तान मध्ये वेगवेगळ्या भागात आपलं साम्राज्य टिकवून होते. परंतू सातव्या शतकातील मोहम्मद बिन कासीमच्या सिंधच्या आक्रमणानंतर म्हणजेच सन आठशे त्रेचाळीस नंतर कल्लार नामक राजा हा या भागातील शेवटचा हिंदू राजा ठरला. त्यापुर्वी रणथल उर्फ रुतविल, स्पालपती आणि लगतुरमान हे हिंदू व बौद्ध राजे याच गांधारला होवून गेले. या ठिकाणी असलेल्या हिंदू राजांना काबूलशाह तसेच महाराज धर्मपती म्हणून गणल्या जाई. त्या राजांमध्ये कल्लार, सामंतदेव, भीम, अष्टपाल, जयपाल, आनंदपाल, त्रिलोचनपाल, भीमपाल इत्यादींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागतील. या राजांनीच अरबी डाकूंना अंदाजे साडेतिनशे सालपर्यंत जोरदार टक्कर दिली. त्यातच त्यांनी या अरबांना इस सातशेच्या शतकापर्यंत सिंधू नदीच्या पार शिरु दिलं नाही. पुढे सिंध जरी मोहम्मद बिन कासीमच्या हातातही आलं असेल, तरी सरासरी अफगानिस्तान हा हिंदू आणि बौद्धांचाच राहिलेला आहे.
सिकंदर आक्रमणाच्या वेळी अफगानिस्तान हा भारताचा एक अविभाज्य भाग होता. विश्वाच्या प्राचीन ग्रंथात म्हणजे ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख असून या ग्रंथात अफगान नद्यांचाही उल्लेख आहे.,दाशराज्ञ युद्धामध्ये पख्तून म्हणजे पुरुचे सहयोगी होत असे सांगीतले जाते.
ज्या नद्यांना आज अफगानमध्ये आमू, काबूल, कुर्रम, रंगा, गोमल, हरिरुद म्हणून ओळखले जाते. त्याच नद्यांना भारतीय लोक पुर्वी वक्षू, कुभा, कुरम, रसा, गोमती, हर्यू सर्यू असे म्हणत असत. ज्या स्थानाला काबूल, बल्ख, वाखान, बगराम, पामीर, बदख्शां, पेशावर, स्वात, चारसद्दा म्हणतात. त्याला पुर्वी कुभा, गंधार, बाल्हिक, वोक्काण, कपिशा, मेरु, कम्बोज, पुरुषपूर, सुवास्तू, पुष्कलावती म्हणत असत.
चीनी इतिहासकार म्हणतात की या अफगाणमध्ये जे बौद्ध भिख्खू होते, त्यांनीच भारतीय बौद्ध ग्रंथांचा अनुवाद चीनी भाषेत केला. तसेच बौद्ध ग्रंथ महायान याची सुरुवात याच अफगानिस्तानातून झाली. अफगानिस्तान मध्ये जो बगराम नावाचा जो हवाई अड्डा आहे. तीच बौद्ध सम्राट कुशाणांची राजधानी राहिलेली असून तिचं पुर्वीचं नाव कपीसी असं आहे.
अफगानिस्तान मध्ये आजही बौद्ध अवशेष मिळतात. तसेच हिंदूंचेही अवशेष मिळतात. तसेच फारशी इतिहासकारांनी अफगानिस्तान बाबत लिहिले आहे की हिंदू आणि बौद्ध राजे हे सहिष्णुतेचे पुजारी असून या ठिकाणी सर्व धर्माचे व जातीचे लोकं अगदी गुण्यागोविंदानं राहतात. आज ते सर्व त्या काळातील हिंदू तसेच बौद्ध वंशीय लोक धाकाने का होईना, मुस्लीम बनलेले आहेत. त्यांनी आपला धर्म बदलवला आहे. त्या ठिकाणी असलेले पुरातन अवशेष अर्थात मंदिर, स्तूप, विहार नष्ट केले गेले आहे. तरीही आजही काही भागात जसे बामियान, जलालाबाद, बगराम, काबूल, बल्खमध्ये अनेक ठिकाणी मुर्ती, स्तूप आणि मंदिराचे अवशेष मिळतात.काबूलमध्ये असलेला आसामाई मंदिर हा दोनहजार साल पुराना आहे.हे मंदिर पहाडालाच कोरुन बनवले असल्याने ते तोडता येणे शक्य नाही. तसेच बामियान येथील जगप्रसिद्ध बुद्ध मुर्त्याही अंदाजे नष्ट केल्या की काय अशी शंका येते.
कंबोजवर अर्जूनानं स्वारी केली होती असा उल्लेख महाभारतात मिळतो. तसेच कर्णानेही राजपूर जिंकून कंबोज जिंकला असे उल्लेख मिळतात. मौर्यकालात या ठिकाणी कंबोज हे गणराज्य होतं. इथे झालेल्या आठशे सत्तरच्या दशकातील जबरन धर्मांतरणच्या कारणाने आज अफगानिस्तान मध्ये केवळ मुस्लीमच दिसतात. बौद्ध व हिंदू नाहीच्या बरोबर आहेत. जे एकेकाळी बहुसंख्य प्रमाणात होते. तिथे एकही मुस्लीम नव्हता.
आज अफगानिस्तान मुस्लीममय झाला आहे. तालिबाननं पंजशीर जिंकलं. परंतू या पंजशीरमध्ये जी प्राणाची शर्थ अफगानिस्तानं लावली. ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी तालिबानच्या ठिकाणावर हवाई हमले केले. यात तालिबानला फारच नुकसान झालं असं रिपोर्ट सांगतं. आता कोणी म्हणतात की तालिबानी खोटं बोलत आहेत. तर कोणी अफगानिस्तान सरकार खोटं बोलत आहेत असं म्हणतात. पंजशीर घाटीचे नागरीक तर दाव्यानं सांगतात की तालिबानी खोटं बोलतात. आजही युद्ध सुरुच आहे. याला पाकिस्तान मदत करीत असून अफगानिस्तानातील लोकं पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत आहेत.
तालिबाननं पंजशीरवर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. आता नेमकं खरं तालिबान्यांचं की अफगानिस्तान सरकारचं ते सांगता येत नाही.
पंजशीर हा खरं तर घाटीचा प्रांत असून या प्रांतावर सहज विजय मिळविणे शक्य नाही. शेर अहमद शाह मसूद यांचा बालेकिल्ला असलेला पंजशीर. या पंजशीरमध्ये त्याचा मुलगा अहमद मसूद सक्रीय झाला आहे.त्यातच अफगानिस्तानचा उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनीही त्याला पाठींबा दिला आहे. मात्र अफगानिस्तानात तालिबानी अफगानिस्तान जिंकल्यांचा दावा करीत असून आता अफगानिस्तान मध्ये तालिबानी सरकार बसते की काय याकडे जगाचे लक्ष लागले आहे. मात्र तालिबाननं सरकार समजा स्थापन केलंच तर त्यांनी कोणाचं न ऐकता केवळ स्वतःचं मन परिवर्तन करुन शांततामय सत्ता गाजवावी. एवढीच तेथील लोकांची मागणी असेल. कारण तालिबानी सरकार राहो की अजून कोणते. त्यात लोकांचा दोष नाही. लोकांना फक्त शिक्षण, रोजगार, तसेच दोन वेळचं पोटभर जेवन मिळावं. त्यातच ते धन्यता मानतील. मग तालिबान सत्ता का बसेना.
पंजशीर.......काबूलपासून १५० किमी अंतरावर असलेला पंजशीरचा भुभाग. उत्तरेकडील भुभागामध्ये वसलेला पंजशीर हा हिंदूकुशच्या डोंगराजवळ आहे. पंजशीरचा उत्तर भाग हा पर्वतरांगेनं घेरलेला आहे. दक्षिणेत कुहेस्थानच्या डोंगरद-या आहेत. वर्षभर हा भाग बर्फाच्छादित असतो. अशाप्रकारच्या पर्वताच्या वेढ्यामुळे हा भाग दुर्गम राहिलेला आहे.
मध्यपुर्व काळात ह्या प्रदेशात चांदीच्या खाणी होत्या. तसेच तिथं पाचूच्याही खाणी सापडतात. हे जरी असलं तरी या भागात जायला एक अरुंद पायवाट आहे. ही पायवाट डोंगररांगा आणि नदीला वळणे देत जाते. त्यावेळेस त्याही भागात बाप्पा रावलचं शासन होतं.


*************************************

बाप्पा रावल यांनी जैसलमेर व अजमेर यासारख्या छोट्या छोट्या राज्यांना आपल्या सोबत मिळवलं व स्वतःची मोठी महाशक्ती तयार केली. त्यानं अरबांना कित्येक वेळा पराभवाची धूळ चारली. एवढंच नाहीतर बाप्पा रावलनं गजनीवरही आक्रमण केलं. तसेच तेथील शासक सलीमलाही हारवलं. एवढंच नाहीतर त्यांनी आपला एक प्रतिनिधी गजनीमध्ये नियुक्त केला.
चितौड ही बाप्पा रावलनं आपली राजधानी बनवली होती. त्यातच त्यांनी गांधार, खुरासान, तुरान, इराण या भागाला सुद्धा जिंकलं. बाप्पा रावलच्या कर्तबगारीमुळं त्याच्या मृत्यूनंतर चारशे वर्षपर्यंत कोणत्याच शासकांनी भारतावर आक्रमण करण्यासाठी हिंमत केली नाही.
किमान चारशे वर्षानंतर मोहम्मद घोरी भारतातावर आक्रमण करण्यासाठी आला आणि त्यानं जयचंदाच्या मदतीनं पृथ्वीराज चौहानचा पराभव केला व त्याला गजनीला नेलं.
बाप्पा रावल हा काही स्रियांचा विरोधक नव्हता. तो त्यांना सन्मानच देत असे. त्यानं गजनीचा सुलतान मोहम्मद सलीमला हरवून गजनीचं राज्य ताब्यात घेतलं. त्याचबरोबर त्यानं त्याच्या पुत्रीशी विवाह केला आणि तिला सन्मानानं राणी बननलं. एवढंच नाहीतर तिला आपल्या राजमहालात अग्रगण्य स्थानही दिलं.
बाप्पा रावलला शंभर पत्नी होत्या. ज्यामध्ये पसतीस मुस्लीम होत्या आणि बाकीच्या इतर धर्माच्या. कोणी म्हणतात की बाप्पा रावलच्या भयानं त्याला आपली मुलगी देत. परंतू तसं काही नसून आपल्या राज्याला वारस नाही. आता या बाप्पाचे प्रतिनिधी आपल्यावर अत्याचार करतील व आपल्याला पदभ्रष्ट करतील याची त्या राण्यांना कल्पना होती. तसं पाहता बाप्पा हे स्रियांची अब्रू राखणा-यापैकी असल्याने त्या बाप्पाशी विवाह करायला राजी झाल्या होत्या. मग त्या मुस्लीम का असेना.
त्या वेळच्या शासकांपैकी सर्वच शासक हे चांगल्या स्वभावाचे नव्हते. ते राज्यात एखादी सुंदर कन्या दिसली की तिच्यावर जबरदस्ती करणारे होते. हा इतिहास तथाकथीत सर्व राज्यांना माहित होता. शिवाय मोहम्मद बिन कासीमनं येथील दाहिर राजाच्या मुलींना आपल्या राज्यात पाठवलं होतं व त्यातच त्यांचा हलाला करणार होता. परंतू दाहिर कन्येनी आपल्या शिलाचं हनन होवू न देता स्वतः आत्ममरण पत्करलं होतं. हे त्यावेळी संबंधीत राज्यांना माहित होतं. त्यातच बाप्पा रावलच्या आदरयुक्त स्वभावामुळे त्या वेळी त्या राण्यांनी त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा जाहिर केली आणि त्या विवाहबद्धही झाल्या ही शक्यता नाकारता येत नाही.
बाप्पा रावल यांच्यावर हारित ऋषीचे संस्कार पडले होते. जे सात्वीक वृत्तीचे होते. ते सात्वीक वृत्तीचे असल्याने त्यांचे बाप्पावर झालेले योग्य संस्कार हे वाखाणण्याजोगे होते. त्याच वृत्तीचा त्यांना फायदाही झाला आणि बाप्पा रावल हे सदाचारी बनले. त्यांना शंभर राण्या असूनही ते त्या राण्यांमध्ये रमले नाही. केवळ देशप्रेमाचे रणशिंग फुंकून या देशातील अनेक लोकांवर जे मोहम्मद बिन कासीमच नाही तर त्याच्या इतर अधिकारी वर्गानं जो अत्याचार केला आणि जबरन या देशातील हिंदू आणि बौद्ध लोकांना धर्मांतरण करण्याचा जो रक्तरंजीत इतिहास घडवला. त्याचाच बदला घेण्यासाठी बाप्पा रावल पुढे सरसावले. त्यांनी गांधार, खुरासान हे प्रांत जिंकले. त्याचं कारण होतं की त्या प्रांतातून अरबी भारतात येवू नये. त्यांना तेथेच रोखता यावे. तसं पाहता बाप्पाला त्या भागात जास्त दिवस नियंत्रण ठेवता आलं नाही. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे तो भाग दूर होता शिवाय प्रवासाची आज आहे तशी साधने नव्हते. प्रतिनिधी विश्वासू होते. परंतू एकटा व्यक्ती कुठे कुठे लक्ष पुरविणार. तेच झाले बाप्पासोबत. शिवाय बाप्पानं आपली सत्ता गांधार, खुरासान, गजनी पर्यटक नेली असली तरी त्यांनी फार काळ राज्य केलं नाही. ऐन पसतीस वर्षाच्या ऐन उमेदीच्या काळात बाप्पानं संन्यास घेतला व ते जंगलात गेले व शिवाची भक्ती करीत बसले असा इतिहास सांगतो.
अलोर जिंकताच मोहम्मद बिन कासीमची महत्वाकांक्षा वाढली. त्यातच खलिफाची मोहम्मद बिन कासीमशी पटेना. त्यानं मोहम्मद बिन कासीमनंतर त्याचा सेनापती जुनैदला अलोर (सिंध) जिंकल्यावर बाकी उरलेल्या हिंदूस्थानावर ताबा मिळविण्यासाठी पाठवलं.
जुनैद मोहम्मद बिन कासीमनंतर हिंदूस्थानात आला. त्याचीही महत्वाकांक्षा वाढली होती. परंतू सिंधचा पराभव येथील काही राजांना माहित होताच तसेच मोहम्मद बिन कासीमनं राजा दाहिरच्या मुलींना खलिफाकडे पाठवताच त्यांनी केलेलं आत्मबलिदान येथील राजे विसरले नव्हते. शिवाय राजा दाहिरचा अंत अरबांनी कसा दारुण केला हेही येथील राजांना माहित होतं. ज्या दाहिरनं मोहम्मद बिन कासीमला पंधरा वेळा स्वारी करुन माफ केलं. त्या राजा दाहिरचा पहिल्यांदा पराभव होताच त्याच्या संपूर्ण परीवाराचे केलेले हाल येथील राजांनी ओळखले होते. त्यामुळं की काय, ते सर्व एकत्र आले. त्यांनी संघटन बनवलं व त्या संघटनाचा सेनापती बाप्पा रावलला बनवले. बाप्पा रावलनेही विश्वासाला तडा जावू न देता त्या अरबी आक्रमणाचा योग्य प्रतिकार केला व जुनैदचे आक्रमण परतावून लावले.
इस ७२३ मध्ये अल जुनैद खलिफाचा प्रतिनिधी बनून भारतावर आक्रमण करण्यासाठी आला होता. त्यातच त्यावेळी भारतात या अरबांचा प्रतिकार करण्यासाठी एकत्रीकरणाची चळवळ सुरु झाली होती. त्यानं गुजरात, जैसलमेर, जोधपूर या शहरांना निशाणा बनवला. परंतू बाप्पाच्या नेतृत्वात सेनेने भीनमाल मधून प्रस्थान केले व जुनैदच्या सेनेचा ब्राम्हणाबाद येथे पराभव केला. त्यानंतर अलोरलाही जिंकलं. पराजीत झालेला जुनैद काश्मीरला पळाला. परंतू तेथेही काश्मीर सम्राट कार्कोट वंशाच्या ललितादित्य मुक्तापीडनं त्याला पराभवाचाच रस्ता दाखवला. (काश्मीरचा इतिहास राजतरंगीनी) अशाप्रकारे बाप्पा रावल व ललितादित्याच्या प्रतिकाराने जुनैदला सिंधू नदी तटावर शरणागती पत्करावी लावली व तेथे त्याने अल मंसूर नावाची राजधानी बनवली व तेथेच तो स्थायी झाला.
इस ७३१ मध्ये अल हकीमला सिंधची राजधानी अल मंसूरचा राज्यपाल बनवलं गेलं. जुनैदनंतर त्यानंही भीनमाल व अन्हिलवाड हल्लीचे गुजरात वर आक्रमण केलं. यावेळी बाप्पा रावलच्या नेतृत्वात अल हकीमचा पराभव झाला. त्यातच ही हार एवढी मोठी होती की त्यापुढे कितीतरी वर्षपर्यंत इस्लामी सेना भारतावर आक्रमण करण्यासाठी आली नाही वा तसा प्रयत्नही केला नाही. कच्छेला, सैंधव, सौराष्ट्र, कावोटक, मौर्य आणि गुर्जर या सर्व सेना मिळून त्यांनी इस्लामी सेनेला दिलेली शिकस्त. यामुळे की काय, कितीतरी वर्षपर्यंत अरबांना हिंदूस्थानवर आक्रमण करण्यासाठी दबून राहावं लागलं.
अल हकीमच्या मृत्यूनंत अरबांनी भारतावर हमले करणं बंद केलं. यानंतर गुर्जर प्रतिहार उत्तर भारतातील प्रमुख शक्ती बनल्या नव्हे तर त्यांचं साम्राज्य गंगा नदीपासून तर सिंधू नदीपर्यंत पसरलं गेलं. मात्र नागदाचं शासन स्वतंत्र्य रुपात बाप्पाजवळच राहिलं.
देबलच्या आसपासच्या प्रदेशात अरबांचं शासन होतं. परंतू दाहिर पुत्र जयसेन आपली आई राणी लाडीदेवी हिला घेवून चितोडला आली. जिथे बाप्पा रावल सेनापती होते. जिथे मौर्य साम्राज्य होतं. त्या मौर्य शासकानं जयसेन व राणी लाडीची मदत करण्यासाठी बाप्पाला पाठवलं. त्यात बाप्पाने आपल्या नेतृत्वात सोळा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सिंधला अरबमुक्त केलं.
बाप्पा रावल हे खरं तर देशभक्त होते. त्यांनी पाहिलं की इथं आलेला मोहम्मद बिन कासीम संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेचे धर्मांतरण करीत आहे. त्यामुळं इथे जी पुर्वापार चालत आलेली हिंदू व बौद्ध संस्कृती कायमची लयास जाईल.
बाप्पा रावलला तसं वाटणं साहजिकच होतं. कारण मोहम्मद बिन कासीमनं सिंध जिंकताच ज्या बौद्धांच्या मदतीनं सिंध जिंकला होता. त्यांनाही सोडलं नव्हतं. मंदिरापाठोपाठ कित्येक विहारं, स्तूप त्यानं नष्ट केली होती. एवढंच नाही तर बहुल हिंदूस्थानातील असंख्य लोकांवर अत्याचार करुन त्यांना मुस्लीम बनवणं ही गोष्ट बाप्पा रावलला आवडली नाही. त्याला केवळ हिंदूच आवडत नव्हते तर बौद्ध धर्मीय लोकंही आवडत होते. त्याचं कारण होतं मौर्य राजवंश.
चितोड हे मौर्य राजवंशाच्या हातात होतं. त्यावेळी तिथे बौद्ध लोकं भारी संख्येनं निवास करीत होते. तसेच काही अंशी हिंदूही निवास करीत होते. परंतू हारित ऋषीच्या संस्कारात वाढलेले बाप्पा हे दयाळू होते. त्यांनी मौर्य शासक मानमौरीची हत्या केली. त्याचं कारणंही तसंच होतं. मानमौरी हा सक्षम राजा नव्हता. जर असा अकार्यक्षम राजा सत्तेवर राहिल्यास उद्या आपले हे राज्य अरबी सेना जिंकून टाकेल व सिंधच्या जनतेची जशी गत झाली. तशी आपलीही गत होईल हे ओळखून बाप्पानं मानमौरीला ठार केलं. परंतू तेथील जनतेचं जबरदस्तीनं धर्मांतरण केलं नाही. तसं पाहता त्यावेळी चितोडमध्ये बौद्ध मंडळी जास्तच होती. परंतू तिकडे लक्ष न देता बाप्पा कासीमनंतर जुनैद व अल हकीमशी लढत राहिला. पुढे अलहकीमच्या मृत्यूनंतर जेव्हा खलिफानं बाप्पा रावलसोबत तह केला. त्यानंतरही बाप्पानं राज्य न करता संन्यास घेतला आणि ते वनात जावून बसले. तिथं त्यांनी भगवान शिवाची प्रतिस्थापना केली व त्या पाषाणीय शिवाची वयाच्या सत्यान्नव वर्षापर्यंत सेवा केली. ते संसारात परत आले नाही. ती शिवाची पुजा करण्यासाठी त्याचं बालपण खुणावत होतं. ज्या बालपणात त्याच्या घरची गाय रोज हारित ऋषीच्या आश्रमात जावून शिवपिंडीवर अभिषेक करीत होती.
बाप्पा रावलचे साम्राज्य फारच वाढले होते. त्याला ते शिवाचीच देण समजायचे. त्यासाठीच त्यांनी जन्मभर शिवाची पुजा अर्चना करण्याचा विडा उचलला होता. त्यासाठीच ते वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षीच संनस्थ झाले.
बाप्पा रावलनं आपल्या जीवनकालात बांधकामाला विशेष प्राधान्य दिले. त्यांची धर्मकार्यात जास्त रुची होती. जरा कुठेही धर्मावर कोण्या मुस्लीमांकडून आघात झाला की बाप्पा तिथं धावून जात असत. त्यांनी उदयपूरच्या उत्तरेस कैलासपुरी इथे भव्यदिव्य एकलिंगजी महाराजच्या मंदिराचे निर्माण केले. ज्याच्या जवळच हारित ऋषीचा आश्रम आहे. त्यांनी केवळ एकलिंग मंदिरच बांधलं नाही तर त्या मंदिरामागच्या ठिकाणी आदि वराह मंदिर देखील बनवले.
त्यांनी गजनी, ब्राम्हणाबाद, रावलपिंडी या भागात आपले प्रतिनिधी ठेवून इतर भागावर कडक नजर ठेवायला लावली. गजनीला तर त्यानं आपल्या भावाच्याच मुलाला प्रमुख बनवून गजनीतील कारभार सोपवला. त्यातच सलीम राजाची मुलगी माईया हिच्याशी विवाह करुन तिला भारतात आणलं. हे सर्व करण्यासाठी त्यांना सर्व हिंदूस्थानातील लहानमोठ्या साम्राज्याचं एकीकरण करावं लागलं. केवळ अरबच नाही तर परकीय सत्तेच्या विरोधात एकत्र केलेलं हे संघटन म्हणजे हिंदूस्थानातील पहिलं संघटन होतं. त्याचा जबर धक्का अरबांनी घेतला. या एकत्रीकरणामुळंच की काय पुढे चारशे वर्षपर्यंत म्हणजेच बाप्पाच्या मृत्यूनंतर तिनशे वर्षपर्यंत अरबी मंडळी भारतावर स्वारी करण्यासाठी फिरकले नाहीत. कारण बाप्पाच्या मृत्यूनंतरही बरेच वर्षपर्यंत गुर्जर, प्रतिहार, जाट, राजपूत, कच्छेला, सैंधव, सौराष्ट्र, कर्कोटक, मौर्य एकता टिकली. त्यांच्या एकतेमुळे भारत अकराशे ते बाराशेच्या शतकापर्यंत एकसंघ राहिला.
बाप्पानं काही सिक्केही चलनात आणले होते. एका सिक्क्यात डाव्या बाजूला त्रिशूल व उजव्या बाजूला शिवलिंग होतं. त्यालाच लागून एक नंदी शिवलिंगाकडे तोंड करुन बसलेला तसेच त्याखाली नमस्कार करणा-या एका व्यक्तीचं चित्र. याच चित्राच्या बाजूला बोप्प लिहिलेला मजकूर. मागच्या बाजूला सुर्य आणि छत्रचं चिन्ह. जे प्रमाण त्याच्या सुर्यवंशी होण्याचं प्रतिक मानलं जातं. त्याखाली उजव्या बाजूला तोंड असलेली एक गाय उभ्या अवस्थेत होती. त्या गाईचे दूध पिणारा वासरुही त्या सिक्क्यात कोरलेला आहे.
इस ७५३ चा तो काळ.शत्रू चूप बसला होता. अंतर्गत शत्रू होते. पण त्या अंतर्गत शत्रूंशी लढून काही उपयोग नव्हता. कारण बाप्पा ओळखून होते की आपण जर अंतर्गत शत्रूंशी लढलो तर याचा फायदा ते परकीय अरब घेतील. आपलं संघटन तुटेल आणि परकीय शत्रू आपल्यावर चाल चालून येईल व आपली गत सिंधसारखीच होईल. आपण कोणाचं मन दुखवू नये. नाहीतर त्याचाही परिणाम आपल्या राज्य टिकविण्यावर होईल. मह ज्याप्रमाणे सिंधमध्ये ज्ञानबुद्धने मोहम्मद बिन कासीमशी हातमिळवणी करुन बदला घेतला. तसा बदला आपल्याही राज्यातील लोकं घेतील. यासाठीच की काय आपण संन्यास घेतलेला बरा. असा विचार करुन इस ७५३ मध्ये बाप्पानं आपल्या मुलांच्या हातात सत्ता सोपवली व ते जंगलात गेले.
ते नागदाचं जंगल. ज्या नागदात त्यांचा जन्म झाला होता. त्याच नागदातील जंगलात त्यांनी एक कुटी तयार केली होती. जंगलात दररोज शिवाची आराधना करीत बाप्पा जीवन जगत होते. आपली कामं आपणच करुन सर्व भारतीय लोकांचा बाप्पा आज अगदी एका पांढ-या वस्रात जीवन जगत होता. ज्याने अफगानिस्तानपर्यंतचा भाग जिंकला. त्या बाप्पाचे ते जीवन आज अगदी साधेपणाचे होते.
***********************************************
ते वस्रात गुंडाळलेलं त्या बाप्पाचं पार्थीव. त्या पार्थीवाभोवती सर्व राण्या टाहो फोडून रडत होत्या. त्यात हिंदू राण्या होत्या. तशाच मुस्लीमही राण्या होत्या. असं वाटत होतं की बाप्पा रावल हा त्यांना देवापरसही प्रिय असावा.
त्या राण्यांचंही बरोबर होतं. कारण त्या राण्यांना बाप्पानं त्यांच्या कार्यकाळात अगदी सन्मानानं वागवलं होतं. त्यांना कोणताच त्रास होवू दिला नव्हता. तसंच त्यांचं सतीपण जपलं होतं.
बहुतेक सर्व राज्याचा आधारस्तंभ आज वस्रात गुंडाळलेला होता. आज त्या राण्यांना मागचे दिवस आठवत होते. कित्येक राण्यांची त्यांच्या कुवारपणी बाप्पानं त्यांच्यावर होणा-या अत्याचारापासून सुटका केली होती नव्हे तर बाप्पानं मरतांना आपल्यासोबत काहीही नेलं नव्हतं. सर्व देवून गेले होते ते.
आज ते मरण पावले असले तरी त्यांच्या पार्थीव चेह-यावरुन ते मरण पावले असावे असं वाटत नव्हतं. तो चेहरा आजही अगदी ताजातवाना वाटत होता. जणू ते मरण पावले नसून झोपले असावे असं वाटत होतं.
आज त्या राण्यांना ते दिवस आठवत होते. ते पावसाळ्याचे दिवसही आठवत होते. ती सेनाही आठवत होती. जी सेना एवढा पाऊस कोसळूनही आपल्या मातृभुमीसाठी धावली होती. बाप्पानं त्या सेनेच्या मनात मातृभुमीचं स्फुर्लिंग कोरलं होतं.
ती सेनाच नाही तर संबंधीत बहुतेक भारतातील लहानमोठ्या राजेरजवाड्यांच्या मनात बाप्पानं अरबांचं षडयंत्र बिंबवलं होतं. अरब भविष्यात काय करु शकतात हेही सांगीतलं होतं. त्यासाठीच त्यांनी सर्व लहानमोठ्या राज्यांचं एकत्रीकरण केलं होतं.
आज अफगानिस्तानमध्ये डोकावून पाहिलं तर हेच दिसून येते. ज्या अफगानिस्तानात बाप्पाची साडेसातशेच्या शतकात सत्ता होती. ज्या अफगानिस्तानात आतापावेतो बौद्ध आणि हिंदू समाज जास्त संख्येनं अस्तित्वात होता. तिथे आता मुस्लीम मंडळी जास्त आहेत. बौद्ध आणि हिंदू समाज आपोआपच कमी झालेला आहे.
ते पार्थीव........आज बाप्पा रावलला सत्यान्नव वर्ष झाले होते. अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत जगले होते बाप्पा रावल. ज्या नागदामध्ये त्यांनी जन्म घेतला होता. त्याच नागदामध्ये बाप्पानं आपली प्राणज्योत मालवली होती. तिथंच त्यांचं समाधीस्थळ उभारण्यात आलं.
बाप्पा रावलनं चितोडमध्ये मौर्य वंशाला समाप्त करुन गुहिल वंश स्थापन केला. परंतू तेथील नागरीकांच्या भावनांना जरासाही धक्का लागू दिला नाही. त्यांना एवढी ताकद होती की ते एकाचवेळी दोन म्हशीच्या माना कापतील. त्यातच त्यांची उंची नऊ फुट होती. त्यांच्या जवळ सैन्यशक्ती बारा लक्ष होती. त्यांच्या तलवारीचं वजन बत्तीस किलो होतं.

**********************
बाप्पा रावलनं पहिला विवाह नागेंद्रनगरच्या राजकुमारीशी केलं. तो प्रेमविवाह होता. तसाच तो लपूनछपून केलेला विवाह असल्यानं कित्येक वर्ष त्याला जंगलात लपून राहावे लागले. नागेंद्र राजाचे सैनिक त्याला शोधू लागले. परंतू त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर ते आपल्या आईच्या सल्ल्यानुसार चितोडला आले.
चितोडला येताच तो राजा मानमौरीच्या सैन्यात सहभागी झाला. त्यातच एकदा चितोडवर अरबांचं आक्रमण झालं. त्यात बाप्पानं आपली कर्तबगारी दाखवली. त्याची कर्तबगारी पाहून मौर्य शासक राजा मानसिंह खुश झाला व मानसिंहनं त्याला सामंत बनवलं.
सामंतपदी असतांना त्यानं अशी काही कामं केली की सगळे सामंत त्याच्या अधीन झाले.वेळेच्या प्रहरात त्याची स्थिती मजबूत झाली. त्यातच ती वेळ आली. त्या वेळेनुसार त्यानं मानमौरीला पायउतार केलं.
मानसिंहनं आपलं शासन इस ७१४ ते ७२८ पर्यंत चालवलं. ज्यावेळी बाप्पा रावल सामंत बनले, त्यावेळी त्यांचं वय अवघं पंधरा सालाचं होतं आणि ज्यावेळी ते राजा बनले त्यावेळी त्यांचं वय एकोणवीस वर्षाचं. अतिशय कमी वयात बाप्पा रावल राजा बनले होते.
बाप्पा रावलनं अंदाजे पंचवीस वर्ष चितोडवर शासन केलं. त्यात त्यांनी कंदाहार, काश्मीर, इराक, इराण, तुराण या राज्यांना पराजीत करुन आपल्या वशमध्ये केलं. त्या राज्यातील राजकुमारींशी त्यांनी विवाह केला. ज्यांची संख्या पसतीस होती. ज्या धर्माने मुस्लीम होत्या. त्या सर्व पसतीस राण्यांपासून त्यांना एकशे तीन मुलं झाली. ज्या त्याच्या पुत्रांना नौशेरा पठाण म्हटलं जातं.तसेच सर्व हिंदू राण्यांपासून त्याला अठ्यांन्नव मुलं झाली.
बाप्पा रावलच्या शासनकाळात अरबांच्या अनेक प्रयत्नानेही त्यांना राजस्थानातच नाही तर हिंदूस्थानातील कोणत्याच कोप-यात प्रवेश करता आलेला नाही. त्यांची ही विरता पाहून त्याला लोकांनी बाप्पा, राजगुरु,चम्कवैे, सुर्य इत्यादी उपाध्या दिल्या होत्या.
बाप्पा रावल आपल्या शक्तीसामर्थ्यानं प्रसिद्ध होते. त्यांचं धोतर पसतीस हात लांब तसेच दुपट्टा सोळा हात लांब होता. असे म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात सोन्याचे सिक्के चलनात होते. तसेच त्यांच्या कार्यकाळात तांब्याचेही सिक्के चलनात होते. ज्यांचं वजन साडे सत्तावीस रत्ती होतं. त्या सिक्क्यावर श्री बोध लिहिलेलं दिसतं.
बाप्पा रावल हे गुहिल वंशाचे होते.गुहिल वंशाला सुर्यवंशी शाखेचे मानत असून शिलादित्यचा मुलगा गुहादित्य. ज्याने गुहिल वंश स्थापन केला. त्याच गुहिल वंशाला पुढे चालविण्याचं काम बाप्पा रावल यांनी केलं.
नागदा....... ही गुहादित्यची राजधानी. ती राजधानी इस ५८४ मध्ये गुहादित्यनं स्थापन केली. हे राजे स्वतःला रामाचे वंशज समजत असत. त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे जवळपास १९१ वर्षानंतर म्हणजे इस ७१२ मध्ये बाप्पा रावलचा जन्म झाला. बाप्पा रावल एक असा शासक की ज्याने मुस्लीम बेगमांशी विवाह केला.
मानमौरी........बाप्पा रावल यांचा मामा होता. त्याची बहिण ही नागादित्य वंशज महेंद्र द्वितीय राजाला दिली होती. नागादित्य महेंद्र द्वितीय हा ईडर नामक राज्याचा राजा होता. परंतू तो वाईट विचारांचा असल्यानं त्याचा जो त्रास भील जातीला झाला. त्यामुळं की काय, त्याची भील जातीनं हत्या केली. त्यातच त्याची पत्नी त्याच्या चितेवर सती गेली. परंतू तिनं एक काम केलं. आपला तीन वर्षाचा मुलगा कालभोज अर्थात बाप्पाला, त्याची रक्षा आणि पालणपोषणाच्या उद्देशानं ताराला सोपवला. जी जातीनं ब्राम्हण होती. तसेच विधवाही होती. तिनं बाप्पाचं अतिशय चांगल्या प्रकारे पालणपोषण केलं.
तारा.......तारा फारच बुद्धीमान स्री होती. तिनं विचार केला की या भील मुलांसोबत खेळतांना एखाद्या वेळी ती भील बालकं बाप्पा रावलला ओळखतील व त्याच्यावर नागादित्यचा मुलगा असल्याचा संशय व्यक्त करतील आणि बाप्पाची हत्या करतील. त्यापुर्वी ते स्थान सोडायला हवे.,असा विचार करुन तिनं ते स्थान सोडलं व ती नागदाला आली. नागदाला येताच तिला एका बाम्हण परीवारानं शरण दिलं. त्यातच तो त्या ब्राम्हणाच्या मुलांसोबत गाय चारु लागला.
एक दिवस विधवा ब्राम्हण स्री ताराला एका सापानं दंश केला. ती मृत्यूच्या अगदी जवळ होती. तेव्हा तिनं बाप्पाला सत्य सांगण्याचा निश्चय केला. त्यानुसार तिनं त्याला सत्य सांगीतलं आणि सांगीतलं की माझ्या मृत्यूनंतर त्यानं आपल्या मामाजवळ चितोडला जावं.
आपली पालनकर्ती आई ताराच्या मृत्यु नंतर बाप्पा रावल चितोडला आपल्या मामाकडे राहायला आला. त्यानं आपला परीचय चितोडच्या शासकाला दिला. त्यावर त्याचा मामा खुश झाला व त्याला आपल्या सेनेत महत्वपूर्ण स्थान दिलं.
बाप्पानं जेव्हा गजनी जिंकलं आणि तेथील राजा सलीमला हारवलं व त्याची पुत्री माईयाशी विवाह करुन तो जेव्हा हिंदूस्थानात परत आला. तेव्हा परत येतांना त्यानं अख्ख्या गजनीची धनसंपदा लुटून आणली होती. ती धनसंपदा हिंदूस्थानात आणून ती धनसंपदा त्यानं आपल्या हिंदूस्थानातील गरीबांना दानामध्ये वाटून टाकली होती. त्यामुळेच पुढे बाप्पाला बाप्पा म्हणून नामाउपाधी मिळाली. त्यापुर्वी त्याला कालाभोज म्हणत असत. याचा परीणाम म्हणून बाप्पाचाच नाहीतर अख्ख्या हिंदूस्थानचा द्वेष गजनीमध्ये होवू लागला होता. ती धग धगधगत होती. परंतू बाप्पासमोर कोणाचे काहीही न चालत असल्याने बदल्याची आग मनातच शांत ठेवून गजनी जगत होतं.
बाप्पा रावलच्या मृत्यूनंतर या हिंदूस्थानला नेस्तनाबूत करण्याची स्वप्न पाहणारा गजनी समुदायातील एक धुरंधर मोहम्मद गजनी बाप्पाच्या मृत्यूनंतर दोनशे वर्षानं भारतात आला आणि त्यानंही भारताला लुटून येथील धनसंपदा आपल्या देशात नेली आणि बाप्पाच्या कृत्याचा बदला घेतला. त्याचवेळी त्यानं सोमनाथचं हेमाडपंथी मंदिरही लुटलं होतं. केवळ गजनी समुदाय एवढंच करुन थांबला नाही तर बाराव्या शतकात याच भारतात येवून गुर्जर व राजपूतामध्ये भांडणं लावून येथील पृथ्वीराज चव्हाणला अत्यंत शितापीनं हारवलं व त्याला गजनीत नेवून त्याचे डोळे काढून त्याचे हालहाल केले. हा इतिहास आहे.
इस ७२३ च्या सुमारास बाप्पा राजगादीवर आले. त्यावेळी त्याचा राज्यभिषेक त्याच्या एका भील मित्राने आपल्या रक्ताचा टिळा लावून केला. तेव्हापासून ती मेवाडच्या राजांसाठी एक परंपराच बनली. ती म्हणजे ब-याच वर्षापर्यंत मेवाडच्या राजगादीवर बसणा-या राजांचा अभिषेक कोणीतरी भील आपल्या रक्ताचा टिळा लावून करतो. बाप्पा रावल जेव्हा लहानाचे मोठे झाले. तेव्हा त्यांना कळलं की त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याला ब्राम्हण आई तारानंच लहानाचं मोठं केलं होतं नव्हे तर ब्राम्हण समाजानंच त्याला मदत केली होती. त्यामुळं उपकाराची परतफेड म्हणून तो ब्राम्हण समाजाचा सन्मान करु लागला. याचा अर्थ असा नाही की तो बौद्ध किंवा इतर धर्मीयांचा द्वेष करेल. त्याचा मामा मानमौरी हा बौद्धच होता. त्याचा मामा बौद्ध असल्यानं त्याच्या मनात बौद्ध धर्माबद्दल आत्मीयता असणं साहजीक आहे. त्यानं आपला मामा मानमौरीची हत्या नक्की केली. परंतू ती जर केली नसती आणि बाप्पानं सत्ता हस्तगत केली नसती तर त्यावेळी मोहम्मद बिन कासीमला रोखता आले नसते व आज भारतही अफगानिस्तान सारखा मुस्लीममय झाला असता.
बाप्पा रावल आज स्मशानभुमीत दफन झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर काही राण्या सती गेल्या. काही जीवंत राहिल्या.सतीप्रथा वाईटच होती. परंतू आपल्या पतीच्या प्रेमासाठी नव्हे तर ती प्रथा वाईट असली तरी एक परंपरा असल्यामुळे काही त्याच्या पत्नींना सती जावं लागलं. वर्षामागून वर्ष निघून गेलीत. बाप्पा रावलची भीती सर्वांनाच वाटत होती. कारण आजही सर्व राज्याची एकता हिंदूस्थानात टिकली होती. हिंदूस्थानातील राजे हे धावू धावू यमसदनी पोहोचवताच. ते पळूही देत नाहीत. ही भीती बाप्पा रावलच्या रुपानं बाकी इतर देशात निर्माण झाली होती. कारण बाप्पानं अरबांना हिंदूस्थानातून हाकलून लावतांना धावू धावू मारलं होतं.बरोबर पळूही दिलं नव्हतं. असा हा बाप्पा रावल. त्यानं केवळ सिंधच्या राजाचा बदलाच घेतला नाही तर आपला धाकही कित्येक वर्षपर्यंत बसवला. हे केवळ बाप्पालाच जमलं. दुस-या त्यापुर्वीच्या आणि त्यानंतरच्या कोणत्याच राजांना जमलं नाही.
काळ हळूहळू सरकत गेला. तसा बाप्पा रावलही मनाच्या गाभा-यातून उतरत गेला. आज बाप्पा रावलला बरीचशी मंडळी ओळखत नाहीत. तो हिंदूस्थानातील होता की अजून कुठला हेही काहींना माहित नाही. तो आपल्या भारताचा असून देखील आपल्याला आपल्या इतिहासात दिसत नाही. मग आपल्याला बाप्पा रावल कुठून माहित होणार! ही शोकांतिका आहे. राजा दाहिर आणि राजा बाप्पा रावल हे सातव्या शतकातील भारताचे महानायकच आहेत. हवं तर त्यांचा अभ्यास भारतीय इतिहासात व्हायला हवा. आपण सिकंदर वाचतो. मोहम्मद गजनी वाचतो. सर्व मोगल राजे अभ्यासतो. मग बाप्पा रावल किंवा राजा दाहिर का नाही अभ्यासत. हा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास त्यांच्यावर हिंदू राजे असल्याचा ठपका पडतो. परंतू ते केवळ हिंदूच राजे नव्हते तर त्यांच्याही राज्यात इतरही धर्माचे लोकं होते. ते इतरही धर्माला आपल्या धर्माएवढेच स्थान देत होते. तेव्हाच तर ते धर्म आजही अस्तित्वात आहेत. सन्मानाने उभे आहेत हे कोणीही विसरु नये.
ब्रिटिश राजवटीने ६१ वर्षांत सात वेळा भारताची फाळणी केली.
१) अफगाणिस्तान १८७६ मध्ये भारतापासून वेगळे झाले.
२) १९०४ मध्ये नेपाळ
३) १९०६ मध्ये भूतान
४) १९०७ मध्ये तिबेट
५) १९३५ मध्ये श्रीलंका
६) म्यानमार (बर्मा) १९३७ मध्ये आणि ...
७) १९४७ मध्ये पाकिस्तान
पुर्वी अखंड भारत हिमालया पासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता. १८५७ मध्ये भारताचे क्षेत्रफळ ८३ लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या ३३ लाख चौरस किमी आहे. वर्ष १८५७ ते १९४७ या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.
पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भारताचे आणखी काही भाग पुढीलप्रमाणे आहेत.
१) श्रीलंका
ब्रिटीशांनी १९३५ मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली. श्रीलंकेचे जुने नाव 'सिंहलदीप' होते. सिंहलदीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले. सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव 'तामपर्णी' होते. सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.
२) अफगाणिस्तान
अफगाणिस्तानचे प्राचीन नाव पाली भाषेत उपगणस्थान होते आणि अफगाणिस्तान हा एक बौद्ध देश होता. तो भारताचा एक भाग होता. १८७६ ​​मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला. करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.
३) म्यानमार (बर्मा)
म्यानमारचे (बर्मा) प्राचीन पाली शब्दात होते.
१९३७ मध्ये म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली. प्राचीन काळी बौद्ध राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.
४) नेपाळ
नेपाळ प्राचीन काळात *देवघर* म्हणून ओळखले जात असे. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. ते शहर नेपाळमध्ये आहे. १९०४ मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले. काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे. नेपाळमध्ये ८१ टक्के बौद्ध आणि ९% हिंदू आहेत. सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.
१९५१ मध्ये नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.
५)थायलंड
थायलंडला १३९३ पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले. आजही या देशात अनेक विहार व स्तूप आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये शेकडो बुद्धाची विहार आहेत.
६) कंबोडिया
कंबोडियाचे पाली नाव कंबोज पासून आले आहे,
हा अखंड भारताचा भाग होता. भारतीय वंशाच्या कौंडिन्य शाक्य वंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले. येथील लोक बुद्ध यांची पूजा करायचे. त्यांची राष्ट्रभाषा पाली होती.
कंबोडियामध्ये आजही चेत, विशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.
जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान बुद्धाला समर्पित आहे, हे बौध्द राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.
अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.
७)व्हिएतनाम
व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.
अनेक बौद्ध विहार आजही इथे सापडतात. लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ बौद्ध होते.
८) मलेशिया
मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते. हा एक पाली शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे. मलय देशात बुद्ध धर्म पाळला जात होता. बुद्धाच्या मूर्तीची पूजा करण्यात यायची. येथील मुख्य लिपी पाली होती आणि पाली ही मुख्य भाषा होती.
९)इंडोनेशिया
इंडोनेशियाचे प्राचीन नाव पाली शब्दात दीपंतर भारत आहे. इंडोनेशियाच्या अग्रगण्य संस्थांची नावे किंवा मोटो अजूनही पालीमध्ये आहेत.
१०)तिबेट
तिबेटचे प्राचीन नाव पाली या "त्रिविष्ठम" नावाने होते आणी ते दोन भागांमध्ये विभागले गेले होते. १९०७ मध्ये चिनी आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या करारानंतर एक भाग चीनला आणि दुसरा भाग लामाला देण्यात आला. १९५४ मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिबेटला चीनचा एक भाग म्हणून स्वीकारले जेणेकरून चिनी लोकांना एकता दाखवता येईल. पुढे चिनी राजवटीने तो भाग सुद्धा बळजबरीने ताब्यात घेतला.
११)भूतान
१९०६ मध्ये ब्रिटिशांनी भूतानला भारतापासून वेगळे केले आणि एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली.
भूतान हा पाली शब्द भू-उत्थान या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ उंच जमीन आहे.
१२)पाकिस्तान
१४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आला. मोहम्मद अली जिना १९४० पासून धर्माच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी करत होते जे नंतर पाकिस्तान बनले. १९७१ मध्ये भारताच्या सहकार्याने पाकिस्तानचे पुन्हा विभाजन झाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला. जे पाकिस्तान आणि बांगलादेश पुर्वीच्या भारताचेच भाग होते.
आजही आपण सुधारलो नाही. आजही आपण केवळ धर्माच्या नावावर भांडणं करीत असतो. त्यातच ज्या परकीय सत्तांनी आपल्या भारतात येवून आपल्यावर राज्य केलं. जबरदस्तीनं आपलं धर्मांतरण केलं नव्हे तर आपल्या स्थापत्याचेही नुकसान केले. त्यातच त्यांनी आपला धर्म या भारतात पसरवला. आज विचार करावा की या देशात किती मंदिरं होती. किती स्तूपं होती अन् किती विहारं होती. आज त्या स्तूपाच्या जागेवर त्यांनी त्यांचे स्थापत्य तयार केले आणि आपण लढत राहिलो ते आपापसातच. ते राज्य करुन गेले आपल्यावर जबरदस्तीनं आणि आपल्याला त्यांनी नेलं का आपल्याबरोबर? तर याचं उत्तर नाही असंच असेल. जे आले होते. ते मुठभर आले. कोणी भुलथापा देवून, कोणी युद्ध करुन, कोणी आपल्याच आयाबहिणींना फसवून तर कोणी धाक दाखवून आपला मुळचा धर्म बदलवला आणि आपल्याच देशात आपल्यावर सत्ता केली. आपण अति खोलात जावून विचार केला तर आपल्याला हे जाणवते की ज्या भारतात ज्या ज्या धर्मांनी जन्म घेतला. त्या त्या धर्मातील मंडळी आजही भांडणं करीत आहेत. एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. पुर्वी आपल्यावर अत्याचार केला असेही म्हणत आहेत. मग खरंच हे अत्याचार इतर धर्मात जावून दूर होवू शकतील काय? याचंही उत्तर नाही असंच येईल. आज आपल्या भारतात जे आपण राहात आहोत. त्यात दोनचार जर सोडले तर रुपांतरीत झालेले धर्मातील लोकं राहात आहोत. ऐतिहासिक दृष्ट्या मागे वळून जर पाहिले तर आपल्याला असे दिसेल की आपल्या कुळातील आपल्या पिढ्यांचा धर्म जो होता. तो आज आपला नाही. का? तर बळजबरीनं इतर लोकांनी आपल्या कुळातील काही लोकांचा धर्म बदलवल्या गेला.
आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की याच धर्माचा आधार घेवून इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. त्या इंग्रजांनी या देशात हिंदू मुसलमान अशी भांडणं लावली. आज इंग्रजांनी जे कृत्य केलं, तेच कृत्य मुस्लीमांनीही या देशात आल्यावर केलं. ज्यावेळी अरब भारतात आले, त्यावेळी या देशात असलेल्या मुळच्या हिंदू आणि बौद्धांचे भांडण लावले. त्यातच सिंधला प्रवेश करण्यापुर्वी अरब सेनापती मोहम्मद बिन कासीमनं सिंधच्या देवल किल्ल्यावरील सेनापती ज्ञानमत, जो बौद्ध धर्मीय होता. त्याला राजा बनविण्याचं आमीष दिलं. त्यामुळंच सेनापती पदावर विराजमान असलेल्या ज्ञानमतने आपल्या काही सहका-यांना सोबतीला घेवून मोहम्मद बिन कासीमला मदत केली. बदल्यात काय मिळालं? मोहम्मद बिन कासीमनं त्याला व त्याच्या सहका-यांनाही ठार केलं. त्यातच बौद्ध स्तूप आणि विहारं पाडली. तसेच मंदिरंदेखील पाडली. जी मंदिरं आणि विहारं राजा कनिष्क आणि सम्राट अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधली गेली होती.
आता या देशाचा विचार केल्यास तेच कृत्य आर्यांचं ज्यावेळी आगमण झालं, त्यावेळीही घडलं. त्यावेळीही आर्यांनी येथे असलेल्या द्रविड (मुळचे आदिवासी) संस्कृतीचा विनाश केला. त्यांच्या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना गुलाम केले आणि आपल्या मनाप्रमाणे वागायला लावले.
परीवर्तनाला काळ रोखू शकत नाही. आज एका राजांचं राज्य असतं. पुढं दुसरा बसतोच. हा इतिहास आहे. आज जो राजा असतो. तो आपल्या मनमर्जीनं लोकांना वागायला लावतो. आपलं स्थापत्य तयार करतो. दुस-या राजाचे स्थापत्य तोडतो. हाही इतिहासच. तेव्हा आपल्या पुर्वजांनी काय केलं याची पुनरावृत्ती करण्याऐवजी तो इतिहास विसरुन आपण काय करायचं याकडं लक्ष देणं गरजेचं आहे.
बाप्पा रावलची लढाई ही सत्तेसाठी नव्हती. त्यांना वाटत होतं, परकीय शत्रूवर जरब बसवावी. जेणेकरुन त्यानं वारंवार युद्ध करु नये. युद्धात निरपराध लोकांचा बळी जातो. ज्यांचा काहीच गुन्हा नसतो तेही मारले जातात नव्हे तर मरतात. त्यासाठीच त्यानं खुरासान, काबूल, कंदाहार व गजनीपर्यंत धडक मारली होती. त्याच्या अखंड कार्यकाळात तसेच संन्यास घेतल्यानंतरही आणि पुढे मरणानंतरही जवळपास चारशे वर्षपर्यंत शत्रू या भारतात पाहिजे त्या प्रमाणात फिरकला नाही.
बाप्पा रावलच्या मनात लोभ नव्हता. लालसा नव्हती. फक्त देशभक्ती होती. मग ती बौद्ध असो की जैन असो की हिंदू प्रजा का असेना. ती सुखी राहिली पाहिजे अनेक वर्षापर्यंत. एवढंच बाप्पाला वाटत होतं. म्हणूनच त्याच्या या कृत्यामुळं जनतेनच त्यांना त्या काळात बाप्पा ही पदवी बहाल केली व बाप्पा, कालाभोजवरुन बाप्पा बनले. जर बाप्पा रावलला लोभ वा लालसा असती तर पुढं आणखी काही काळपर्यंत त्यांनी राज्य केलं असतं. अवघ्या एकोणचाळीसच्या वयात त्यांनी संन्यास घेतला नसता.
बाप्पा रावलचे नाव कोणी घेवो अगर न घेवो. पण आजही त्यांनी वसवलेलं रावळपिंडी शहर त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देते नव्हे तर त्यांची नागदा येथील समाधी त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देते. अशा या महान देशभक्त असलेल्या बाप्पा रावलला आम्ही जरी ओळखत नसलो तरी आजही बाप्पा शब्दावरुन आम्ही त्यांची कळत नकळत आठवण करतोच.
बाप्पा रावल अनंतात विलीन झाले होते. त्यांचा हिंदू धर्मात जन्म झाला होता. परंतू त्यांना मुस्लीम समाजही तेवढाच मानत होता. जैनही मानत होता आणि बौद्धही. काळाच्या ओघात जेव्हा धर्माधर्मात स्वार्थ वाढला. कलहही वाढला. तेव्हा कोणी त्यांना हिंदूचा बाप्पा रावल बनवले तर कोणी मुसलमानांचा. बौद्ध आणि जैन धर्मांनी त्या गोष्टीत फारसे लक्षच घातले नाही. सर्वांनी राजकारण केलं. तसंच साध्या पाठ्यपुस्तकातही त्यांना स्थान दिलं नाही ही शोकांतिका आहे आणि ती सदोदित राहिल असंच आज पदोपदी वाटतं. प्रत्येकाला अनादीकालापर्यंत वाटत राहिल. इतिहास आहे तोपर्यंत...........कारण बाप्पा रावल हे अमर असून ते नाव इतिहासाच्या पानावरुन कधीही न पुसलं जाणारं नाव आहे.