That headmaster step in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | ते मुख्याध्यापक पाऊल

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

ते मुख्याध्यापक पाऊल

मनोगत

ते मुख्याध्यापक पदाचं पाऊल नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही कादंबरी वास्तवीक घटनेवर आधारीत असून या कादंबरीतून मी एका मुख्याध्यापकाला मुख्याध्यापक पद मिळवितांना कोणता त्रास झाला. त्याचं चित्रण रंगवलं आहे.
शाळा.......त्या शाळेचा मुख्याध्यापक मरण पावताच त्या शाळेचा संचालक तीव्रतेनं कसा पुढे आला? तसेच त्यानं कोणता खेळखंडोबा केला? त्याचं वर्णन यात आहे.
एक कायम स्वरुपाचं मुख्याध्यापक पद. परंतू ते पद कायम स्वरुपाचं असलं तरी संस्थाचालक त्यावर कायमस्वरुपाचं पद भरत नव्हता. तो खेळखंडोबाच करीत होता. शेवटी त्या पदाचा दावेदार असलेल्या मंगेशनं न्यायालयात तो खटला दाखल केला. या खटल्यात तो यशस्वी झाला का की त्याला पराभव पत्करावा लागला. ते वाचण्यासाठी माझी ही कादंबरी वाचा.
ही माझी छप्पनवी पुस्तक असून एकोणतीसावी कादंबरी आहे. आवडल्यास एक फोन अवश्य करा ही विनंती.
आपला अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

ते मुख्याध्यापक पदाचं पाऊल (कादंबरी)

तो एकतीस डिसेंबर हळूहळू जवळ येत होता. तशी मंगेशच्या मनात धडकी भरत होती. त्याला त्या एकतीस डिसेंबरची धडकी वाटत होती. जसं जुनं वर्ष जावं आणि नवीन वर्ष यावं असं गणित त्याच्याही आयुष्यात होतं.
तो एकतीस डिसेंबर.......त्यानंतर नवीन वर्ष कसं कसं निघेल आयुष्यात आणि कसं नाही असं त्याला वाटत होतं. त्याचं कारणही तसंच होतं.
मंगेश प्रभारी मुख्याध्यापक होता. त्यातच त्या शाळेतील मुख्याध्यापक मरण पावल्यानं त्याला नाईलाजानं मुख्याध्यापक बनावं लागलं होतं. परंतू ते पद पुढे उजळणा-या एकतीस डिसेंबरपर्यंतच होतं.
मंगेश मुख्याध्यापक बनला खरा. परंतू त्याला मुख्याध्यापक बनण्यात सारस्य वाटत नव्हतं. त्याला तसं पाहता ते पद आवडतही नव्हतं. कारण ते पद घेतांना जबाबदारी वाढली होती. तसं पाहता ती शाळा काही चांगली नव्हती. त्या शाळेचा संस्थाचालक हा काही चांगला नव्हता.
मंगेशच्या वरची चारही शिक्षक मंडळी. ती शिक्षक मंडळी जेष्ठ होती. त्यातच त्या शिक्षकमंडळीपैकी चारही जेष्ठ होती. योगायोगानं ते पद मुख्याध्यापकाच्या निधनानंतर त्यांच्याकडेच जाणार होतं. परंतू ती जेष्ठ मंडळी ते पद घ्यायला तयार नव्हते. म्हणूनच ते पद त्याचेकडे आलं. त्याचं कारणंही तसंच होतं. जेष्ठ शिक्षकांना माहित होतं की जो दिवंगत मुख्याध्यापक मरण पावला, त्याचं काम सुरळीत नव्हतं. तसेच त्याच्या कामात घोळही होता. तसेच त्या शाळेतील संस्थाचालकही पाहिजे त्याप्रमाणात चांगला नव्हता. त्याला पेलवणं सहज सोपं काम नव्हतं.
मंगेशच्या वर असणारी चारही शिक्षकमंडळी...... त्या मंडळींमध्ये चारही महिला शिक्षीका होत्या. त्यातच त्यांचं वय झालेलं. त्यांच्याकडून धावपळ जमत नव्हती. तसंच शिक्षणक्षेत्रही धावपळीचंच होतं. केव्हा कुणाचा फोन येईल आणि केव्हा बोलावणार याचा काही नेम नव्हता. त्यामुळं ती जेष्ठ मंडळी त्या मुख्याध्यापक पदाला नकार देत होते. काय करावं सुचत नव्हतं.
तो नियतीचा दिवस.........मुख्याध्यापक मरण पावला होता. त्यानं जसे कर्म केले होते. तशी नियतीनं त्याला शिक्षा दिली होती. त्यातच त्याला झालेला अपघात विचारणीय होता.
मुख्याध्यापक मरण पावला. तशी संस्थाचालकाची चांदी झाली. त्यातच संस्थाचालक शाळेत यायला लागला. तसेच धमक्याही द्यायला लागला.
संस्थाचालक धमक्या देत होता. 'तुमचं वेतन कसं निघतं तेच पाहतो.' 'दोन वर्ष जरी वेतन झालं नाही, तरी मला काहीच फरक पडणार नाही.' 'तुम्ही फक्त सही करावी. एक अक्षरही वाचायची वा लिहायची गरज नाही.' 'तुम्ही अतिरिक्त शिक्षक आहात.' 'तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घ्या.' इत्यादी प्रकारचं त्याचं बोलणं. त्या बोलण्यावर सर्व शिक्षक घाबरलेले.......त्यातच त्यांना वाटत होतं की दिवंगत मुख्याध्यापक बरा होता. ज्याचे काळात संस्थाचालक शाळेत पायही ठेवायला तयार नव्हता.
दिवंगत मुख्याध्यापक क्रुरकर्मा होता. तो कोणाच्या जीवाची पर्वा करीत नव्हता. त्यातच तो मुख्याध्यापक ते शिक्षक शाळेत हजर राहूनही त्यांचे वेतन बंद करायचा. त्यातच त्यांना उपासमारही सहन करावी लागायची. त्यासाठी त्याला सुचनाही द्यायचा नाही. असं हलाखीचं जीवन त्या त्या शिक्षकाला काढावं लागत होतं. तो संस्थाचालकांचंही ऐकत नव्हता. त्यातच आज तो मृत्यू पावल्यानंतर संस्थाचालकाला जोर आला होता. त्याच्या मरणाचाच फायदा घेवून संस्थाचालक आग ओकत होता.
उन्मत झालेला संस्थाचालक. त्यातच त्याला चढलेला जोर. तसंच त्याच्या स्वभावातून निघणारी ती विषारी शब्दाची गरळ. सर्वच घाबरलेले........मंगेश ते सर्व पाहात होता. त्याचा त्रास केवळ शिक्षकांनाच नव्हता तर तो मंगेशलाही होता. कारण मंगेश त्या शाळेतील साधारण शिक्षक होता.
मंगेश एक साधारण शिक्षक. तो दिवंगत मुख्याध्यापकाच्या छळाचा बळी ठरला होता. त्याला दिवंगत मुख्याध्यापकाशी लढता लढता जास्त अनुभव आला होता. त्यातच तो आता संस्थाचालक असो वा शिक्षणाधिकारी. कोणाचाच अन्याय सहन करु शकत नव्हता नव्हे तर आता त्याच्यात लढण्याचं बळ आलं होतं.
शिक्षणव्यवस्था डोलायमान होती. सर्व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी भ्रष्ट. पैसा खाणारे. काय करावं सुचत नव्हतं. अशातच संस्थाचालकानं एका जेष्ठ शिक्षीकेला विश्वासात न घेता त्या शिक्षीकेच्या नावानं मुख्याध्यापक पद आणलं. जे तिला पसंत नव्हतं.
सर्व शिक्षक वेतन नसल्यानं शिक्षक आमदाराकडं गेले. त्यांनी शिक्षकाला आश्वासन दिलं की की तुमच्या म्हणण्यानुसार मी जो सेवाजेष्ठ शिक्षक असेल, त्याला पदभार मिळवून देणार. परंतू एक अट आहे. ती म्हणजे सेवाजेष्ठ शिक्षकांपैकी ज्याला ज्याला तो पदभार नको. त्यांनी त्यांनी लिहून द्यावं की मी पदभार स्विकारत नाही.
शिक्षक आमदार बोलून गेले. त्यांचं सर्वांना पटलं. त्यातच सर्व जेष्ठ शिक्षकांनी लिहून दिलं की मला ते पद नको आणि तो पदभारही नको. तसा मंगेशचा क्रमांक आला. मंगेशनं पदभार घेण्यास होकार दर्शवला. त्यातच मंगेशला पदभार मिळाला.
मंगेश मुख्याध्यापक बनला होता. त्यानं पदभार स्विकारला होता. परंतू ते पद मंगेशनं स्विकारणं त्या शाळेतील संस्थाचालकाला नको होतं. कारण तो अनुसूचित जातीचा होता. तसं पाहता शाळा धर्मनिरपेक्ष असते. तिथे जातीभेद नसतो.

********************************************

शाळा ही धर्मनिरपेक्ष असावी तसेच जातीविरहीतही असावी असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. कारण वर्गखोल्यात वेगवेगळ्या जातीची व धर्माची मुलं असतात. कोणी मुसलमान असतो. कोणी हिंदू असतो तर कोणी ख्रिश्चन. तसेच कोणी ब्राम्हण असतो. कोणी चांभार, महार तर कोणी हलबा कोष्टी. परंतू शाळेच्या वर्गखोल्यात सर्वांना समान न्याय मिळायला हवा. सर्वांना समान हक्कानं वागवायला हवं. परंतू तसे होत नाही. याला कारण आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या........ शिक्षकांच्या नियुक्त्याच मुळात जातीविरहीत आणि धर्मनिरपेक्ष व्हायला हव्यात. परंतू असे होत नाही.
पुरातन काळातही तसंच झालं. गुरु द्रोणाचार्यकडे एकलव्य शिकायला आला तेव्हा गुरु द्रोणाचार्यने त्याला शिकविण्यास नकार दिला. त्याचं कारण होते त्याचा समाज. एकलव्य भिल्ल जातीचा होता. त्यातच त्या ठिकाणी केवळ क्षत्रीय राजकुमारांना शिकायची परवानगी होती. तरीही एकलव्य लपून चोरुन शिकलाच. शेवटी तेही गुरु द्रोणांना पचलं नाही. जेव्हा एकलव्यानं सांगीतलं की त्याचा गुरु द्रोण आहे. तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठाच कापून घेतला.मतितार्थ असा होता की भिल्ल जातीतील व्यक्ती क्षत्रीय जातीतील व्यक्तींपेक्षा मोठा होवू नये.
महारथी दानशूर कर्णाबाबतही असाच प्रकार घडला. परशूराम महारथी कर्णाला विद्या शिकवायला तयार होते. परंतू ती विद्या केवळ ब्राम्हणांनीच शिकावं असं त्यांना वाटत होतं. क्षत्रीयांनी नाही. कारण त्यांनी आपल्या परशूने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली होती. त्यातच कर्ण जेव्हा परशुरामाकडे शिकायला आले. तेव्हा त्यांनी ते क्षत्रीय असल्याचे सांगीतले नाही. परंतू एकदा परशुराम विश्राम करीत असतांना त्या विश्रामाचे वेळी एक किडा कर्णाच्या पायाला चावला. पाय रक्तबंबाळ झालं. त्यावेळी कर्णानं वेदना सहन केल्या. परंतू पायाची हालचाल केली नाही. कारण होतं गुरु परशुरामाच्या झोपेत बाधा उत्पन्न होईल. त्यातच परशुराम जेव्हा झोपेतून उठले. तेव्हा त्यांनी ओळखलं की हा व्यक्ती क्षत्रीयच आहे. त्यांनी ते ओळखताच कर्णाला शाप दिला की ऐनवेळी तुझी विद्या तुझ्या कामात येणार नाही. त्यानुसार शेवटच्या घटकेला कर्णाची विद्या कर्णाच्या कामात आली नाही.
महत्वाची गोष्ट म्हणजे विद्या ही जीत व धर्माची गुलाम नसावी. परंतू पुर्वीच्या काळी केवळ ब्राम्हणांनाच शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले जर झाले नसते तर आजही शिक्षणाचा अधिकार स्रीयांना आणि अस्पृश्यांना मिळाला नसता.
शिक्षण हे जातविरहीत व धर्मनिरपेक्ष असावे. तसेच ते ज्यामध्ये मिळते ते विद्यामंदीरही जातविरहीत व धर्मनिरपेक्ष असावे. परंतू असे वर्तमानकाळातही होत नाही. होतांना दिसत नाही. आजही मुस्लिमांच्या मदरसामध्ये हिंदू मुलांची संख्या दिसत नाही. तसेच हिंदूंच्या शाळेत मुस्लिमांची संख्या हिंदूंच्या बरोबरीनं दिसत नाही. महार चांभारांची मुले दिसतात. परंतू यामध्ये महार शिक्षणात आघाडीवर असतात. ती जात जर सोडली तर चांभार आणि इतर अनुसूचित जातीची मुले आजही शाळेत दिसत नाहीत.
महारथी कर्णाला विद्या शिकवायला तयार होते. परंतू ती विद्या केवळ ब्राम्हणांनीच शिकावं असं त्यांना वाटत होतं. क्षत्रीयांनी नाही. कारण त्यांनी आपल्या परशूने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली होती. त्यातच कर्ण जेव्हा परशुरामाकडे शिकायला आले. तेव्हा त्यांनी ते क्षत्रीय असल्याचे सांगीतले नाही. परंतू एकदा परशुराम विश्राम करीत असतांना त्या विश्रामाचे वेळी एक किडा कर्णाच्या पायाला चावला. पाय रक्तबंबाळ झालं. त्यावेळी कर्णानं वेदना सहन केल्या. परंतू पायाची हालचाल केली नाही. कारण होतं गुरु परशुरामाच्या झोपेत बाधा उत्पन्न होईल. त्यातच परशुराम जेव्हा झोपेतून उठले. तेव्हा त्यांनी ओळखलं की हा व्यक्ती क्षत्रीयच आहे. त्यांनी ते ओळखताच कर्णाला शाप दिला की ऐनवेळी तुझी विद्या तुझ्या कामात येणार नाही. त्यानुसार शेवटच्या घटकेला कर्णाची विद्या कर्णाच्या कामात आली नाही.
महत्वाची गोष्ट म्हणजे विद्या ही जीत व धर्माची गुलाम नसावी. परंतू पुर्वीच्या काळी केवळ ब्राम्हणांनाच शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले जर झाले नसते तर आजही शिक्षणाचा अधिकार स्रीयांना आणि अस्पृश्यांना मिळाला नसता.
शिक्षण हे जातविरहीत व धर्मनिरपेक्ष असावे. तसेच ते ज्यामध्ये मिळते ते विद्यामंदीरही जातविरहीत व धर्मनिरपेक्ष असावे. परंतू असे वर्तमानकाळातही होत नाही. होतांना दिसत नाही. आजही मुस्लिमांच्या मदरसामध्ये हिंदू मुलांची संख्या दिसत नाही. तसेच हिंदूंच्या शाळेत मुस्लिमांची संख्या हिंदूंच्या बरोबरीनं दिसत नाही. महार चांभारांची मुले दिसतात. परंतू यामध्ये महार शिक्षणात आघाडीवर असतात. ती जात जर सोडली तर चांभार आणि इतर अनुसूचित जातीची मुले आजही शाळेत उच्च शिक्षण घेतांना दिसत नाहीत. आजही या मुलांना वर्गात बसतांना लाजीरवाणं वाटतं. जेव्हा इतर मुलं चिडवतात. परंतू ते लहान वय. त्या कोवळ्या वयात या मुलांना ठोस उत्तर देता येत नसल्यानं ते अवेळीच शाळा सोडतात.
हे विद्यार्थ्यांबाबत झालं. एकीकडं प्रत्यक्ष याबाबतीत जिथे सरकारच जातपडताळणी सारखा मुद्दा उपस्थीत ठेवून मुलांच्या नावासमोर जाती लावायला लावतात अन् दुसरीकडे कोणाची जात काढू नये म्हणतात. एकीकडे सरकारच जातीच्या आधारावर काही विद्यार्थ्यांना आरक्षीत करतात तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांवर अन्याय करतात. विशेष सांगायचं म्हणजे शिष्यवृत्तीसारख्या योजना ह्या सरसकट विद्यार्थ्यांना द्यायला हव्यात. कारण प्रत्येक जण हा विद्यार्थी असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावसंच वाटते. परंतू जेव्हा काहीच जातीच्या विद्यार्थ्यांना शाळेत असतांना विशेष योजना मिळतात द्रोणाचार्याच्या शिक्षण काळानुसार. तेव्हा विद्यार्थ्यात जातीभेद तयार होतो. एकमेकांविषयी प्रेमभाव राहात नाही.
ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर असा अन्याय होतो. तसाच अन्याय शिक्षक नियुक्ती व पदोन्नतीवरही होतो. पदोन्नती देतांना सेवाजेष्ठता सुत्र पाळायला हवे. परंतू जातीसुत्र पाळलं जातं. हा माझ्या जातीचा. मग तो सेवाजेष्ठ जरी नसेल, त्याचेमध्ये गुणक्षमता जरी नसेल, निर्णयक्षमता जरी नसेल तरी त्याला दे पदोन्नती. याच सुत्रानुसार शाळेत पदोन्नत्या दिल्या जातात. शिक्षणविभागात पैसे मोजले जातात अशा पदोन्नत्यासाठी. त्यातच इतर जातीवर अन्याय केला जातो.
विद्यार्थ्यांवर संस्कार टाकणा-या शाळा.......त्या शाळेत पदोन्नत्यासाठी जातीचे जर निकष लागत असतील तर त्या शाळेत विद्यार्थ्यांना कसे वागवले जात असेल याचा विचार न केलेला बरा. यावरुन असे वाटते की आम्ही कालच्याच त्या द्रोणाचार्याच्या जगात व परशुरामाच्याच काळात जगत आहोत. आजच्या संविधानाच्या काळात नाही. निदान शाळा तरी धर्मनिरपेक्ष व जातीविरहीत असाव्यात. जेणेकरुन प्रत्येक विद्यार्थ्यांत शिकण्यासाठी आनंद वाटेल. उत्साह निर्माण होईल त्याच्यात व तोही उच्चशिक्षण घेवू शकेल यात शंका नाही.

**************************************************
तो संचालक दररोज शाळेत कुलूपच लावून ठेवीत असे. त्यातच ते शिक्षक आपली शाळा आहे. आपली नोकरी आहे. आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून दररोज शाळेत येत असत. त्यातच ते पाण्यातही भिजत असत.
शाळेच्या आजुबाजूला काही घरं होती. शाळेला कुलूप असायचं. त्यातच ते शिक्षक पाण्यात भिजलेले. त्या आजुबाजूच्या लोकांना दया यायची. ते दया दाखवीत. परंतू संस्थाचालकाला दया येत नव्हती. तो मात्र शिक्षकांना सतावत असे.
मंगेशच्या मनात रोजच चिड निर्माण होत होती. त्याला संस्थाचालकाचा भयंकर राग येत होता. तसा तो त्याची तक्रार शिक्षण विभागाला करीत होता. परंतू शिक्षण विभाग त्या पत्रांची दखल घेत नव्हतं. शिक्षण विभाग त्याला पोलिस स्टेशनला तक्रार करायला लावत होतं
पोलिसस्टेशन.......पोलिसस्टेशनला तक्रार करणे सोपे होते. परंतू तो प्रभारी मुख्याध्यापक. त्याला विचार यायचा की आपण प्रभारी मुख्याध्यापक. आपण जर त्या संस्थाचालकाची तक्रार पोलिसस्टेशनला टाकली आणि उद्या आपले पद गेले तर उद्या संस्थाचालक आपल्याला भयंकर त्रास देईल. त्यातच आपलं अघटीत होईल हा हेतू गृहीत धरुन तो गप्प होता.
तो शिक्षणविभाग मोठा धुर्त विभाग होता. त्यातच त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार हा कायमस्वरुपी दिला नव्हता. त्यामुळं या संस्थाचालकाशी कसं लढायचं हा प्रश्नच होता. काय करावं सुचत नव्हतं. त्यातच तो गप्प राहिला.

अलिकडे अनेक संस्था निघाल्या होत्या. संस्थेचा सुळसुळाट सुटला असून एकाच नावाच्या कितीतरी संस्था आज दिसत होत्या. त्यातच त्या संस्थांचा व्यवहारही दिसत होता. या संस्थांना महापुरुषांचे तर नाव होते. परंतू त्या संस्थांमधून भ्रष्टाचार होत होता. चो-याही होत असत. मारपीट होत असे. घोटाळे होत असत. अशा गोष्टी घडत असत की ज्या गोष्टी महापुरुषांच्या विचारात नसत.
मंगेशला वाटत असे, महापुरुष असे असतात की ज्यांनी स्वतःचा स्वार्थ न पाहता आपला देह झिजवला. स्वार्थ पाहिला नाही. लोभ केला नाही आणि एक स्वाध्वात्मक जीवन व्यथीत केले.
काही संस्थांना डॉक्टर बाबासाहेबांचे नाव आहे. कशासाठी नाव दिलं असा विचार केला तर आपल्या संस्थांना लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून. त्यातच अनेक संस्थांना महात्मा फुलेचं नाव आहे. त्यांच्या विचारांची ही संस्था असेल असं लोकांना वाटावं म्हणून. परंतू मुळात जेव्हा अंतरंगाचा विचार होतो. तेव्हा असं जाणवतं की ह्या संस्थांना नाव तर महापुरुषांचं आहे. परंतू इथे व्यवहार महापुरुषांच्या विचारानुसार केला जात नाही.
अलिकडेच नाही तर पुर्वीपासूनच संस्था जिथे असेल, तिथे व्यवहार आला. जिथे एखाद्या वेळी व्यापक प्रमाणात व्यवहार करायचा असेल, तर अनेक व्यक्ती एकत्र येवून संस्था स्थापन करीत असतात. त्यातच त्या संस्थेअंतर्गत आपला कारभार चालवीत असतात.
आज अशा अनेक संस्था उदयाला आल्या. त्या उदयास येतांना त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयास (जिथे संस्थांची नोंदणी होते) आपण काय काय काम करणार, आपले व्यवहार कसे असणार या सर्व गोष्टी संस्थेअंतर्गत लिहून दिल्या जातात. परंतू ज्यावेळी संस्थांची नोंदणी होते. ती संस्थांची नोंदणी झाल्यावर व्यवहार बदलतो. मग काय प्रत्येक संस्थेतील पदाधिका-यात स्वार्थ शिरतो आणि हा स्वार्थ शिरला की त्या संस्था बदनाम होतात. परंतू त्या संस्था जरी बदनाम होत असल्या तरी त्या बंद होत नाहीत. कारण त्या सार्वजनीक मालमत्तेत येत असतात.
अलिकडचा संस्थेबाबतचा विचार केला तर ब-याच संस्थेत पारदर्शक व्यवहार चालत नाही. अशा संस्था तर बंदच करायला हव्यात. पण असे होत नाही. कारण त्या सार्वजनीक मालमत्ता अाहेत. आज अशा संस्था व्यापार करीत असून असा व्यापार की ज्यात घोटाळेच घोटाळे दिसून येतात.
आज अशा ब-याच संस्था आहेत की ज्या संस्थांना महापुरुषांचे नाव आहे. कोणी बाबासाहेबांचं नाव वापरतं. कुणी महात्मा फुलेंचं. कोणी जिजावू तर कोणी शिवाजींचं. कोणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तर कोणी गाडगेमहाराजाचं. परंतू त्या त्या संस्थेला कितीही चांगल्या महापुरुषाचं नाव असलं तरी तरी त्या संस्थेचं वागणं हे त्या महापुरुषांच्या विचारसरणीला मिळतंजुळतं नसतं. अर्थातच त्या त्या संस्थांचं वागणं नाव मोठं दर्शन खोटं असंच असतं. तसेच ते वागणं त्या त्या महापुरुषांच्या विचारसरणीला लाजवेल असं असतं.
त्या अनेक संस्था. त्यातच त्या अनेक संस्थांना अनेक महापुरुषांची नावं. त्यातच त्या त्या महापुरुषांच्या चांगल्या चांगल्या विचारसरण्या. अशा विचारसरण्या की ज्या विचारसरण्यात राष्ट्रउभारणीचं तत्व आहे. परंतू अशा संस्थांमधून राष्ट्रउन्नतीचं ब्रीद साकार होत नाही. त्या महापुरुषांचे विचार राबवले जात नाही. त्यातच त्या त्या संस्थात त्या त्या महापुरुषांच्या विपरीत विचारसरण्या राबवल्या जातात. तसेच त्या त्या संस्थात राबवल्या जाणा-या अशा विपरीत विचारसरण्यांचा जर विचार केला तर असे नक्कीच वाटायला लागते की हा निव्वळ त्या त्या महापुरुषांचा अपमानच होय.
विशेष सांगायचं म्हणजे महापुरुषांची नावे संस्थाचालकांनी आपल्या आपल्या संस्थेला द्यावीत. देवू नयेत असे म्हणत नाही. परंतू ते नाव देतांना विचार करुन द्यावे. कारण त्या महापुरुषांच्या तत्वानुसार जर संस्था वागत नसेल. संस्थाचालक वागत नसेल तर असे नाव देण्याला काहीच अर्थ नाही. हा अपमान होतो. हे तेवढंच खरं आहे. वेगवेगळ्या संस्था असाव्यात. कारण संस्था स्थापन करण्याचा कायद्यानुसार सर्वांना अधिकार आहे. परंतू जर त्या संस्थेला नाव महापुरुषांचे असेल आणि त्या संस्थांमधून भ्रष्टाचार होत असेल तर त्या संस्थेस महापुरुषांचे नाव देण्याला अर्थ नाही. म्हणून महापुरुषांचे आपल्या संस्थेला नाव देण्यापुर्वी थोडा विचार करावा. जेणेकरुन महापुरुषांचा अपमान होणार नाही. संस्था केवळ महापुरुषाचे नाव लावत असे. त्याप्रमाणे लागत नसे.

******************************************

मंगेश कधीकधी एकटा बसायचा. तेव्हा त्याला ती त्याची लहानपणीची जीवनशैली आठवत असे. त्याला एक पत्नी होती. तिचं नाव पदमा होतं. तो तिला कधीकधी आपले अनुभव सांगत असे. तसेच आजच्याही परीस्थितीवर भाष्य करीत असे. शाळा आदर्श कशा असाव्यात याचा वार्तालाप तो पत्नीशी करीत असे.
आम्ही लहान होतो. तेव्हा आम्हीही शाळा शिकत होतो. त्यावेळी शाळा शिकतांना आम्हाला आनंद वाटायचा. कारण आम्हाला पाठ्यपुस्तकात असणा-या चांगल्या चांगल्या कथा वाचायला मिळायच्या. ज्या कथा संस्कारीत असायच्या. त्या कथा आजही आठवतात. आजही त्या कविता आठवतात. त्या आठवल्या की मन अगदी रमणीय झाल्यासारखं वाटतं आजही. आम्हाला त्यावेळी ज्या शिक्षीका व शिक्षक शिकवायचे. त्यांचा धाक असायचा. कधी कधी ते रागावत. छडीनेही मारत कधीकधी. पण त्यांच्या रागात खरं प्रेम असायचं. ते प्रेम आज दिसत नाही. कारण ते इमानदारीचं आणि निःस्वार्थीपणाचं प्रेम होतं.
आम्हाला आजही आठवतो तो सानेगुरुजींच्या कथेतील श्याम. ज्याचं अंग पुसल्यावरही त्यानं आईला कुरकूर केली. माझ्या तळव्याला माती लागू नये म्हणून तू तळवे पुसून दे. तसं आईनं श्यामचे तळवे पुसले आणि म्हटलं, 'बेटा, जसा तळव्यांना घाण लागू नये, म्हणून तळवे पुसून घेतले. तसा मनाला घाण लागू नये म्हणून मनही स्वच्छ करुन घेत चल.' ती आई त्याला तसं का म्हणायची ते त्यावेळी कळत नव्हतं. आज कळत होतं.
एकदा तर श्याम लपून बसला होता. पोहायला जायला आई पाठवतेय म्हणून. पोहणे श्यामला आवडत नव्हते. त्याला वाटायचं की मी बुडून मरेल. तेव्हा आईनं वळ येतपर्यंत चांगलं झोडपलं श्यामला. मग नाईलाजानं श्याम पोहायला गेला व पोहणे शिकला. सायंकाळी घरी येताच आईनं त्याच्या वळाला तेल लावून दिलं. तेव्हा श्याम म्हणाला, 'आई, मारलं कशाला?' त्यावर आई म्हणाली, ' माझा श्याम भित्रा बनावा असं वाटते का तुला? तुझ्या आईला, तुझा श्याम भित्रा म्हटल्यावर चालेल का?' श्याम काय समजायचं ते समजला. तसाच श्यामचा दुसरा प्रसंग सांगतो. श्यामनं मुक्या कळ्या तोडल्या. त्यावर आई म्हणाली,
' श्याम मुक्या कळ्या तोडू नयेत. त्यांनाही जीव असतो.'
हे छोटे छोटे प्रसंग. त्यावेळच्या अभ्यासक्रमात होते. आजही आनंदी आनंद गडे ही कविता आठवतेय. अन् आजही चवथीतील आज ये अंगणा पाहूणा गोजीरा ही कविता आठवतेय. आजही शाळेच्या मैदानावर शिकवले जाणारे खेळ आठवतात. त्यातच शाळेच्या मैदानावर बसून सामुहिक शिकवले जाणारे हम होंगे कामयाब तसेच बलसागर भारत होवो हे गीत आठवतात. ते गीत आमचे पाठांतर होते त्या वयात. अगदी घरी दारीही आमचे मित्र ते गीत गुणगुणायचे. तसेच पेपर सोडवायचा असला की इकडे तिकडे न पाहता स्वतःचा पेपरही आम्ही सोडवत होतो. कोणतीच पेपरफुटी नाही वा कोणताच पेपरचा घोटाळा नाही. आजही दुसरीला असलेली आटपाट नगर होतं ही कथा आठवते. सगळ्या संस्काराच्या कथा. आज अशा संस्काराच्या कथा पाठ्यपुस्तकात दिसत नाहीत. कारण आज मात्र तसं नाही. हळूहळू काळ बदलला आहे.
आजचा अभ्यासक्रम मोबाइल, स्मार्टफोनच्या काळातील आहे. विद्यार्थ्यांना साधे बे चे पाढे पाठ नसतात. काल वाचलेले धडे आज आठवत नाही. पाठांतराला पुरेसा वेळच नाही विद्यार्थ्यांजवळ. शाळेतून घरी आले की सरळ मोबाईलवर खेळ खेळण्यात विद्यार्थी व्यस्त होतात. शिक्षकही शाळेत तसेच घरीही मोबाईलच बघत बसतात.
सध्या कोरोनाचा काळ. या काळात शासनानं विद्यार्थ्यांना शिकवायला मोबाईलला परवानगी दिली. परंतू किती शिक्षकांनी आणि किती वेळ मोबाईलचा वापर करुन शिकवले? हे स्पष्टपणे सांगता येणे कठीण आहे. किंबहूना शिक्षकही शाळेत मोबाईलवर आपल्या मित्रांचे मेसेज पाहण्यात वा मोबाईलवर खेळ खेळण्यात व्यस्त असतीलच हे नाकारता येत नाही. याचं कारण आजचं वातावरण. आज संस्थाचालकच असे असतात की ज्यांना नातेवाईक आवडतात. नातेवाईकांसाठीच शाळा उघडली म्हणतात. नात्यातील लोकांनाच बढत्या देतात. इतरांचे हक्क हिरावतात. स्वतः निवडणूक लढवून विधानसभेतील जागा बळकावतात आणि मग अभ्यासक्रमही आपल्या मतानुसार अभ्यासक्रम मंडळाकडून तयार करुन घेतात. आज त्यांचाच संसदेत वरदहस्त असल्यानं ते कोणत्याही शाळेला मान्यता देतात. मान्यता तिही पैशानं. मग त्या शाळेची स्वतंत्र्य इमारत आहे की नाही? त्या शाळेला स्वतंत्र्य मैदान आहे की नाही? त्या शाळेत शौचालयाची पुरेशी व्यवस्था आहे की नाही? त्या शाळेत पुरेशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे की नाही? या सर्व गोष्टींचा विचारच होत नाही. सरळसरळ मान्यता. तरी कधी एखादं पिल्लू पटपडताळणीच्या रुपानं येतं आणि शाळेची मान्यता दिसते. शिक्षकांचे वेतनही दिसते. पण शाळाच दिसत नाही. मग शिकविलेला अभ्यासक्रम दिसणार कुठून?
विशेष सांगायचं म्हणजे आज काही काही शाळेत खेळायला मैदानच नाही. शाळेत मैदानावर कधी हम होंगे कामयाब वा बलसागर भारत होवो ही गीतं शिकवली जात नाहीत. कधी वर्गात बे चे पाढे घेतले जात नाहीत. काही काही शिक्षकांनाच बे चे पाढे नीट म्हणता येत नाहीत. साधं राष्ट्रगीतं राष्ट्रीय गीतं पाठ नाहीत. मग ते गीतं विद्यार्थ्यांना कुठून येणार! परंतू तरीही ते शिक्षक चालतात. त्या शिक्षकांना पुरस्कार मिळतात. तोही आदर्श शिक्षकाचा. कारण ते शिक्षक संस्थाचालकांच्या अगदी जवळचे असतात.
आज खरा आदर्श शिक्षक चालत नाही. त्याची बदनामी केली जाते. त्याचेवर ताशेरे ओढले जातात. कारण आज संचालक मुजोर आहेत. या मुजोर सस्थांचालकापुढं शिक्षणाधिकारीही हार मानत असून मुख्याध्यापक लाचार सारखा वागतांना दिसतो. मग त्या शाळेतून विद्यार्थीच कुठून आणि कसे दर्जेदार तयार होणार? सर्व पिढी आज गारद होत आहे एकंदर अशा वातावरणातून. कारण आज प्रत्येक शाळेत स्पर्धाच होत नाहीत.
शाळेतून जर सक्षम पिढी घडवायची असेल तर खालील सुचना पाळणे अति आवश्यक आहे.
१) मुख्याध्यापकाच्या नियुक्तीवर विशेष भर द्यावा. मुख्याध्यापक हा गुणसंपन्न असावा. प्रतिभाशाली असावा तसेच तो अजीबात न्यायाधीश वा नातसंबंधातील नसावा.कारण ज्या जहाजाचा कप्तान चांगला गुणसंपन्न असेल, ते जहाज कधीच बुडत नाही.
२) मान्यता देतांना शाळेला मैदान आहे की? पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहे का? शाळेला शौचालय आहे का? हे पाहावे.
३)शिक्षकांची नियुक्ती ही गुणतत्वावर व्हावी. त्यांच्यासाठी वेगळी अशी परीक्षा असावी. प्रत्येक शाळेत शिक्षक हे अशा परीक्षेतूनच निवडलेले पाठवावे.
४)मुख्याध्यापक वा शिक्षक हे नात्यातील नसावेत. त्यानंच शाळा लयास जात असते.
५)प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा व्हाव्यात नव्हे तर घेतल्या जाव्यात. यावर विशेष भर दिला जायला हवा.
६)पुढील काळात सांस्कृतीक कार्यक्रम, सहल प्रयोजन तसेच क्रिडामहोत्सव कधी शिबीर आयोजन प्रत्येक शाळेला अनिवार्य करावं. ते उपक्रम का राबवले नाही त्याचे सकारण स्पष्टीकरण मागवावे.
७)शिक्षणाधिका-यांनी संस्थाचालकाचे अजीबात ऐकू नये. त्यांनी मुख्याध्यापकाची नियुक्ती करतांना नातेसंबंधांचा विचार करु नये. फक्त गुणात्मक तक्ता पाहावा.
८)अभ्यासक्रम तयार करतांना विशेष समिती असावी. अशी समिती की ज्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याचा कालसापेक्ष अनुभव असावा. अभ्यासक्रम हा संस्कारावर व मनोरंजनावर आधारीत असावा. जेणेकरुन तो वाचन झाल्यावर वा वाचताच विद्यार्थ्यांत शिक्षणाबद्दल रुची निर्माण होईल. तो शाळेतील शिक्षकांच्या वा मुख्याध्यापकाच्या वा संस्थाचालकाच्या मनमर्जीचा नसावा.
अलिकडे असंच घडत चाललेलं आहे. अभ्यासक्रम ही काही कुणाची धरोहर नाही. तरीही जी समिती असते. त्या समितीत असेही तज्ञ असतात की जी तज्ञ मंडळी ही अर्धी अधिक संस्थाचालकांची मांडलिक असतात. अशा शिक्षकांच्या हातून अभ्यासक्रम मुळातच गुलामगीरी शिकविणारा तयार होवू शकतो यात शंका नाही. तो राबविणारे हातही म्हणजेच संस्थाचालक वा शिक्षणाधिकारीही भ्रष्टाचार करणारे असू शकतात यात शंका नाही. मग जी पिढी घडणार. ती पिढीच कशी काय भ्रष्टाचार मुक्त वा भ्रष्टाचार विरहित तयार होईल? हा प्रश्न आहे. मुळात या सर्व बाबीत सुधारणा करावी लागेल. तेव्हाच वर्गखोल्यातून भ्रष्टाचार मुक्त पिढी घडेल. कारण शाळेच्या वर्गखोल्यातूनच देशाचं भवितव्य घडत असते. जसा राजा तशी प्रजा याप्रमाणे जशा शाळा तसे नागरीक. आदर्श नागरीक तयार करण्यासाठी आदर्श शाळाही असायला हव्या. त्या शाळा भ्रष्टाचाराने लिप्त नसाव्यात हे म्हणणे तेवढेच खरे आहे. प्रत्येक शाळा आदर्श बनावी. तसेच प्रत्येक शिक्षक आदर्श असावा. त्यातच प्रत्येक संचालक आणि अधिकारी वर्गानंही आदर्श बनावं. कारण शाळा हे निरागस मुलांचं भवितव्य घडविण्याचं केंद्र आहे. सानेगुरुजींनी म्हटलंच आहे की मुलं ही देवाघरची फुलं. जर आपण अशा देवाघरच्या फुलांवर योग्य फुंकर न घालता, त्यांच्यावर संस्कार करीत असतांना भ्रष्टाचार लिप्ततेनं वागलो, तर विधाताही आपल्याला कधी माफ करणार नाही. एक ना एक दिवस तो आपल्याकडून आपल्या वागणूकीवर अंकुश लावेलच ही शक्यता नाकारता येत नाही. आपण त्या मुलांवर योग्य संस्कार टाकावेत. त्यासाठी प्रयत्न करावा. त्यातच आपलं हित आहे. तसेच सरकारनं अभ्यासक्रमही तयार करतांना अशा आदर्श संस्काराचा तयार करावा. जेणेकरुन विद्यार्थी रुपी या कोवळ्या कळ्यांचं उद्या आदर्श नागरीकरुपी विकसीत फुलात रुपांतर होईल. तसेच ती शाळाच नाही तर तो देशही नावारुपाला येईल. ही शक्यता नाकारता येत नाही.

**********************************************

महाराष्ट्रात सध्या ओमीक्राॅनची दस्तक होती. परंतू संस्थाचालकांनी त्याला अजुनही किल्ली दिली नव्हती शाळेची. काय करावं सुचत नव्हतं. त्यातच मंगेशनं शिक्षण अधिकारी वर्गाला एक पत्र लिहिलं. पत्रात लिहिलं की सध्या महाराष्ट्रात शाळा सुरु झालेल्या आहेत. प्रथम आठवी त्यानंतर पहिली ते चवथीच्या शाळा. पण ह्या शाळा सुरु करतांना कोरोनाचा भाऊ ओमीक्रान आला आहे हे सर्वांना माहित आहे. तो वाढणार आहे हेही माहित आहे. तरीही शाळा सुरु झाल्या. कारण शाळा केव्हापर्यंत सुरु करायच्या नाहीत. केव्हापर्यंत थांबावे यासाठी कधी ना कधी जबाबदारी घ्यावीच लागेल या उदात्त हेतूनं सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला. त्यातच कोरोनाचा भाऊ ओमीक्रान वाढला व नाईलाजानं शाळा बंद कराव्या लागल्या. आज मुंबई, पुण्यात शाळा बंद आहेत.
मागील वर्षीही असंच झालं. ऐन हिवाळ्यातच शाळा सुरु झाल्या होत्या. त्यातच कोरोना पंधरा दिवसात एवढा वाढला की त्या कोरोनानं शाळा बंद झाल्यानंतरही तीन महिण्यापर्यंत एवढे बळी घेतले की म्हशानात जागाही नव्हत्या चिता पेटवायला. रांग लागत होती. ही गोष्ट काल्पनीक नाही तर सत्य आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न केला तर याला जबाबदार आपणच आहोत.
आज कोरोना आहे. तो मंदीरातील गर्दीतून वाढत नाही. खानावळीतून वाढत नाहीत. वाहनाच्या गर्दीतून वाढत नाही. परंतू शाळेतून वाढतो. याला जबाबदार आहे शाळा. इतर ठिकाणी आपण आपल्या मुलाबाळासोबत असतो. आपण मायबाप या नात्यानं आपल्या बाळाची सर्वतोपरी काळजी घेतो. परंतू शाळेत आपल्या मुलांची तशी काळजी घेतली जात असेल हे काही सांगता येत नाही. कारण अशाही काही शाळा या पृथ्वीवर आहेत की ज्या शाळेतील संस्थाचालक हे हेकेखोर आहेत. ते पैशासाठी शिक्षकांना त्रास तर देतातच. त्यांचा त्रास विद्यार्थ्यांनाही होत असतो.
शाळेचा प्रशासकीय घटक असतो तो म्हणजे मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाला पुर्ण अधिकार असतात. तोच सर्व शाळेतील कारभार चालवतो. पाहतो. कारण तोच शाळेचा सचिव असतो. शाळेला अनुदान मुख्याध्यापकामार्फत मिळत असतं. हे जरी खरं असलं तरी काही काही शाळेत मुख्याध्यापक वर्गाला केवळ रबरस्टँप म्हणून वापरले जाते. त्यातच त्या शाळेत त्या मुख्याध्यापकाला तो शाळेच्या दृष्टिकोणातून सर्वकष असला तरी पुरेसे अधिकार नसतात. तसं पाहता त्याला पुर्ण स्वरुपात अधिकार असले तरी तो ते अधिकार पुर्ण स्वरुपात वापरत नाही. तो संस्थाचालकाला सर्वेसर्वा समजतो. जो संस्थाचालक प्रशासकीय प्रमुख नसतो.
हाच संस्थाचालक चांगल्या विचारांचा असेल तर तो मुख्याध्यापकाला सहकार्य करतो. काही संस्थाचालक असे सहकार्य करीत नाहीत. कारण त्या त्या शाळेत एकंदर शिक्षकांच्या वेतनावर काही टक्केवारीनुसार अनुदान मिळतं. तरीही तो संस्थाचालक शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम मागतो. अशी रक्कम शिक्षकांकडून न मिळाल्यास तो त्याचे शाळेतील मुख्याध्यापकाला तो पैसा वसूल करायला लावतो. परंतू जेव्हा या गोष्टी घडून येत नाहीत. तेव्हा मात्र संस्थाचालक बावचळतो व तो त्या मुख्याध्यापकालाच सहकार्य करीत नाही. प्रसंगी त्रासही देत असतो. कारण त्याला त्या शाळेत गोंधळच निर्माण करायचा असतो. पुन्हा असं की तो स्वतःला शाळेचा मालकच समजतो.
संस्थाचालक हा शाळेचा मालक नसतोच. हं जागा त्याची असते. परंतू त्या जागेचा तो किराया घेतो.शाळा ही चालवायची असेल तर त्याला एक संस्था स्थापन करावी लागते. जी संस्था सार्वजनीक विश्वस्त मालमत्ता असते. ती काही एकट्या संस्थाचालकाची नसते. ज्यावेळी नोंदणी होते. त्यावेळीच लिहून द्यावं लागतं की मी माझी जागा संस्थेसाठी देत आहे. त्या संस्थेला त्या संस्थाचालकाला स्वतःच्या मर्जीनं हटवता येत नाही.
शाळा आणि कोरोनाचा संबंध असा की ज्या संस्थेतील शाळेत संस्थाचालकाला असा शिक्षकांच्या वेतनातून पैसा मिळत नाही. त्या ठिकाणी त्याला शाळेत सोय करण्यासाठी पुरेसे शाळेसाठी अनुदान मिळत असूनही तो त्या शाळेत पुरेशा व्यवस्था करीत नाही. काही काही शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसते. काही काही शाळेत शौचालयेही नाहीत. त्यातच विद्यार्थ्यांचे जेवन झाल्यावर त्यांना शाळेत हात धुवायला जागा नाही. त्यातच काही काही शाळेत तर विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्थाही नाही.
कोरोनाचे निर्बंध व नियम लक्षात घेवून शाळा ह्या भरवायच्या असतांना काही काही संस्थाचालक मुख्याध्यापकामार्फत शिक्षकांकडून त्यांच्या वेतनातील पैसा येत नसल्यानं त्या मुख्याध्यापकाचा गोंधळ प्रशासनाला दिसावा म्हणून शाळेची व्यवस्था लावण्यासाठी पुरेसे सहकार्य करीत नाहीत. कोरोनाचे निर्बंध लक्षात घेवून शाळा ही दोन पाळीत भरवायची असूनदेखील असे संस्थाचालक शाळा एकाच पाळीत भरवायचा तोंडी आदेश देतात. त्यातच पुरेसे अंतर ठेवून विद्यार्थी बसायची व्यवस्था होण्याऐवजी विद्यार्थ्यांना दाटीदाटीनं बसवावं लागतं. मग विद्यार्थी दाटीदाटीनं बसतात. मग कोरोना वाढणार नाही तर काय?
एक अशीही शाळा आहे की ज्या शाळेत संस्थाचालकाने आपल्या हेकेखोर प्रवृत्तीमुळे शाळेची किल्लीच मुख्याध्यापकाला दिलेली नाही. त्या शाळेत तो संस्थाचालक दुपारी येतो व दुपारी एका पाळीत शाळा भरवतो. ज्या ठिकाणी पुरेशी विद्यार्थी बसायला जागा नाही. विद्यार्थी दाटीदाटीनं बसतात. त्या शाळेतील मुख्याध्यापकाला विचारले असता त्यानं सांगीतलं की साहेब, मला माझी नोकरी टिकवायची आहे. मी जर संस्थाचालकाच्या विरोधात गेलो की मला संस्थाचालक शाळेतून काढून फेकेल. माझे वेतन बंद होणार. मग मला कोण तारणार.
अशा ब-याचशा शाळा आहेत की ज्या शाळेत मुख्याध्यापक असेच लाचार असतात. ते संस्थाचालकाला घाबरत असतात. ते त्याला काढून फेकतील अशी त्यांना भीती असते. त्यातच त्यांचे वेतनही बंद होणार अशीही भीती असते.
आज अशी बरीचशी प्रकरणे घडली आहेत की ज्या शाळेतील मुख्याध्यापक असा रबरस्टँप बनून राहात नाही. त्या त्या शाळेत मुख्याध्यापकाला असेच संस्थाचालकाने काढून फेकलेले आहे. निलंबीतही केलेले आहे.
संस्थाचालक असा असतो की जो कायद्याचा आधार घेवून कोणावरही खटला टाकत असतो. जो शिक्षण विभागातील कर्मचारी असेल. असे शिक्षण विभागातील कर्मचारी की ज्यांना स्वतःच्या पदाची पर्वा असते. ते संस्थाचालकाच्या वाट्याला जात नाहीत.
संस्थाचालक असे खटले लढतो. कारण त्याचेजवळ भरपूर पैसे असतात. त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून असा पैसा मिळतो नव्हे तर तो वसूल करतो. तो चांगल्या मार्गानं कमविलेला पैसा नसतो. तो पैसा गेलाही कोर्ट कचे-या लढतांना. तरी त्याला त्याची पर्वा नसते. परंतू असे कर्मचारी कोर्ट कचे-या लढत नाहीत. त्यामुळं ते संस्थाचालकांना घाबरतात.
ओमीक्रानबाबत सांगायचं झाल्यास संस्थाचालकांनाही ओमीक्रानची भीती वाटत असते. तो घरातून बाहेर पडत नाही. परंतू त्यांच्या संस्थेतील कर्मचारी वर्गाला सतत ओमीक्रानच्या संपर्कात यावं लागतं. संस्थेअंतर्गत असलेली शाळा. त्या शाळेची वेळ ही सकाळ दुपार नसल्यानं सदरच्या शाळेतून ओमीक्रान वाढू शकतो. मागील वर्षीही अशा प्रकारच्या शाळेत विद्यार्थी दाटीवाटीनं बसल्यानं कोरोना वाढला आणि यावर्षीही संस्थाचालकाच्या गैरमर्जी तसेच गैरवर्तणुकीनं वागण्यामुळं कोरोना वाढू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यातच खरं कारण म्हणजे मागील वर्षीसारखाच कोरोना कदाचित म्हशानघाटासमोर लोकांना पुन्हा एकदा प्रेतासाठी रांग तर लावावी लागणार नाही अशीही भीती नाकारता येत नाही. त्यासाठी नागरीकांनी जागरुक राहायला हव. पालकांनीही जागरुक राहायला हवं. संचालकांनीही आपला हेकेखोरपणा सोडावा. तसेच विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षेसाठी शाळा दोन्ही पाळीत भरवावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नियंत्रणासाठी दूरदूर बसवता येईल. कोरोना पसरु नये म्हणून काळजी घेता येईल. परंतू संस्थाचालकाला असे करायचे नाही. कारण त्यांना संबंधीत शाळेतील शिक्षक वर्गावर दबाव ठेवायचा आहे. तसेच त्यांना मुख्याध्यापकांना बदनाम करायचे आहे. मुख्याध्यापकही असे संस्थाचालकाच्या विरोधात जावू शकत नाही. कारण त्याला माहित आहे की तो जर संस्थाचालकाच्या विरोधात गेला तर त्याला संस्थाचालक नेस्तनाबूत करेल. परंतू त्यांना हे कळायला हवं की संस्थाचालक त्याला नेस्तनाबूत करेल तेव्हा करेल. परंतू ह्या छोट्या शाळेतील कळ्यांची जर व्यवस्थीत काळजी घ्यायला मुख्याध्यापक सक्षम ठरला नाही तर उद्या हाच कोरोना त्या मुख्याध्यापकाला सोडणार नाही. तसेच जो संस्थाचालक अशा मुक्या कळ्यांना त्रास देत अाहे. त्याच संस्थाचालकांना उद्या हाच कोरोना नक्कीच त्रास देईल असे वाटते. म्हणून आता तरी संस्थाचालकांनी सुधरायला हवं. तेव्हाच संस्थाचालकांनाही कोरोना चांगला ठेवेल. विद्यार्थ्यांनाही कोरोनाची भीती वाटणार नाही आणि म्हशानातही प्रेताच्या रांगा लागणार नाही. हे तेवढंच सत्य आहे.
माननीय साहेब, माझीही शाळा अशीच आहे. तेव्हा आपणास विनंती की हा अंधार तुर्तास तरी दूर करून द्यावा.

****************************************************
मंगेशनं प्रेम होतं आपल्या देशातील संस्कृतीवर. त्याला अभिमान वाटत होता आपल्या देशातील संस्कृतीवर. त्याला जे वाटत असे. तसा तो लोकांना सांगत असे त्या संस्कृती संदर्भात.
पदव्या.......पदव्या अवश्य घ्याव्यात. पण आपली संस्कृती जोपासावी असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आज लोकं पदव्या घेतात. पण संस्कृत्या विसरतात.
शिक्षण तत्ववेत्ते महात्मा फुले यांनी स्रियांना शिक्षणासाठी शाळा उपलब्ध करुन दिली. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यात स्रियासाठी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. तसेच ज्यावेळी एक इंग्लिश व्यक्ती ड्यूक ऑफ कॅनाॅट भारतात आला. त्यावेळी त्याला भेटायला सभागृहात जातांना ते अगदी साध्या म्हणजे शेतकरी वेषात गेले. त्याचं कारण होतं आपली संस्कृती. खरं तर आपल्याला आपल्या संस्कृतीचा गर्वच असायला पाहिजे. पण तो गर्व आपल्याला नसतो.
आपली संस्कृती ही अतिप्राचीन असून महान अशी आहे. या संस्कृतीत महिलांना विशेष करुन नवश्रृंगार दिलेला असून त्यात कपाळाला कुंकू, भागाला मळवट, डोक्यावर पदर (सेव), हातात बांगड्या, पायाला जोडवे, त्यातच गळ्यात मंगळसुत्र असून जी स्री या साजश्रृंगारापैकी एखादा जरी श्रृंगार करुन नसेल, तिला भारतीय प्राचीन संस्कृती स्री मानत नव्हती तर तिला एका देवदासीची उपमा देत होती. त्यात कारणही होतं. ते म्हणजे महिलांनी आपला साजश्रृंगार करुन राहावे. वडीलधारी मंडळींचा आदर करावा. जेणेकरुन त्या संस्कृतीतील स्रिया विवाहानंतर टिकतील. वडीलधारी मंडळींचा आदर करतील. ही संस्कृतीतील स्रीया शास्रोक्तही करीत असत. जसे गार्गी मैत्रेयीनं शास्रोक्त केला होता.
प्राचीन भारतीय संस्कृतीतील स्रीयांनाच अशा साजश्रृंगाराचं बंधन होतं असे नाही तर त्या काळातील पुरुषांनाही तसं बंधन होतं. ते पुरुष शेवटपर्यंत वडीलधारी मंडळींच्या आज्ञेत वावरत असत. वडीलधारी मंडळींच्या विरोधात जात नसत. ते उच्च शिक्षण शिकत. परंतू त्या शिक्षणाचा त्यांनी कधी गर्व बाळगला नाही.
आज काळ बदलला. या काळातील मंडळी पाश्चात्याच्या संपर्कात आली. त्यातच या बदलत्या काळानुसार आजची संस्कृतीही बदलली. या बदलत्या काळात महिला शिकल्या. कोणी डॉक्टर, इंजीनियर बनल्या. त्यातच पदर गेला डोक्यावरील. तसेच गळ्यातील मंगळसुत्र संपलं. त्याची जागा सोनसाखळीनं घेतली. कपाळाचा कुंकू गेला. हातातील बांगड्याही तसेच पायातील जोडवेही. ही संस्कृती आजच्या एकंदर परीस्थीतीवरुन त्या काळातील स्रियांना पुरुषांनी गुलाम बनवले होते असं मानायला लागली. कारण आजच्या संस्कृतीचं मानणं होतं की त्या काळातील स्रियाच फक्त गळ्यात मंगळसुत्र घालत होत्या. पुरुष नाहीत. स्रियाच कपाळावर कुंकू लावत होत्या. पुरुष नाही. स्रियाच हातात बांगड्या घालत होत्या. पुरुष नाही. परंतू आजची संस्कृती हे विसरली की त्याही काळात पुरुष कानात मोठमोठे कर्णफुल घालायचे. गळ्यात त-हेत-हेचे दागीणे घालायचे. कपाळावर अष्टगंधाचा टिळा राहायचा.पाय आणि हातात तसेच भुजेतही कडे राहायचे. मग पुरुषांचा तो अवतार........ते कशाचं प्रतिक होतं. आजही अजिंठा वेरुळच्या भित्तीचित्रावरुन तशी कल्पना येते. ज्याप्रमाणे स्रिया आपला साजश्रृंगार परीधान करायच्या, त्याप्रमाणे पुरुषही साजश्रृंगार करीत असत.
आज पुरुषप्रधानच संस्कृती आहे. परंतू या संस्कृतीला पाश्चात्य संस्कृतीची झालर आहे. ती पाश्चात्य संस्कृती. ज्या संस्कृतीतील स्रियांच्या आणि पुरुषांच्या अंगावर पुरेसे कपडे दिसत नाही. ज्या संस्कृतीतील स्रियांच्या कपाळावर कुंकू दिसत नाही. ज्या संस्कृतीतील स्रियांच्या हातातही बांगड्या दिसत नाहीत. तसेच मंगळसुत्राऐवजी सोनसाखळी दिसते. परंतू त्यात कारण आहे.
समशीतोष्ण कटिबंधाचा भाग जर धरला तर त्या भागात दमट वातावरण असतं. त्या भागात दमट वातावरणामुळं अंगावर कपडे सहन होत नाही. म्हणून ते अर्ध्या कपड्यात वा वेषभुषेत दिसतात. त्यांच्याकडील वातावरणानुसार त्यांचं वागणं बरोबर आहे. परंतू आपल्याकडील वातावरण तसं नाही. त्यामुळं आपली संस्कृतीही कमी कपड्यातील नाही.
महत्वाचं म्हणजे माणसानं शिकावं. मोठमोठ्या पदव्या घ्याव्यात. कोणी डॉक्टर इंजीनीयर बनावं. त्याचबरोबर स्रियांनीही शिकावं. डॉक्टर, इंजीनियर बनावं. परंतू आपली संस्कृती विसरु नये. तिचा सन्मान करावा. त्यातच त्या संस्कृतीनुसार चालावे. कारण आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटायलाच हवा. ज्यावेळी आपण आपल्या संस्कृतीचा आदर करु. सन्मान करु. तेव्हाच इतर देशही आपला आदर करतील आपला सन्मान करतील. महत्वपूर्ण गोष्ट ही की आपण आपली संस्कृती विसरुन इतरांच्या संस्कृतीचं अनुकरण करण्याऐवजी आपल्या संस्कृतीचे इतर अनुकरण कसे करतील याचा विचार आपण प्रत्येकांनी करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण आपली संस्कृती महान बनवू. विदेशी संस्कृती सोडून आपल्याच संस्कृतीच्या नियमानुसार वागू. हे जेव्हा इतरांना दिसेल. तेव्हा तेही आपले अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही आणि एक महत्वाचं सांगतो की आपल्याला जगाला हेच शिकवायचे आहे.

**********************************************

एकतीस डिसेंबर संपणार होता. नुकतेच आठ दिवस राहिले होते. अशातच संस्थाचालकानं आपल्या एका वरीष्ठ स्नुषेच्या नावानं मुख्याध्यापक पदाचा आदेश काढला व मंगेशलाही एक पत्र देवून त्या पत्रानुसार सांगीतलं की तू ते पद सोडावं. तसा मंगेशला विचार आला. काय करावं सुचेनासं झालं. त्याला वाटलं की दिवंगत मुख्याध्यापकाच्या मृत्यूनंतर मी सर्व कारभार व्यवस्थीत केला. त्यावेळी अस्ताव्यस्त पसरलेला कारभार सांभाळला. जशी राज्याची विस्कटलेली घडी एखाद्या राज्याला नीट करतांना जसा कस लागावा तसा कस आज मला लागला. इथेही सात आठ वर्षापासून रखडलेली कामं मी पुर्ण केली. अन् आज सर्व कामं व्यवस्थीत झाल्यावर संस्थाचालकानं आपल्या स्नुषेला मुख्याध्यापक पद द्यावं. तसा तो फारच दुःखी झाला. परंतू त्यानं ते दुःख आपल्या चेह-यावर दाखवलं नाही. तो अतिशय आनंदाने आपल्याकडील दस्ताऐवज द्यायला तयार होता.
ते मुख्याध्यापक पद प्राप्त होताच सदरची त्या संस्थाचालकाच्या नात्यात असलेली त्याची स्नुषा खुश नव्हती. त्याचं कारणही तसंच होतं. तिच्या पायानं चालणं होत नव्हतं. तिचे पाय गुडघ्यातून गेले होते. ती शाळेतच तर कशीतरी येत होती.
आज शाळेत येतांना तिला जसा कस लागत होता. तसं तिला वाटत होतं की आपण जर मुख्याध्यापक पद स्विकारलं तर उद्या आपल्याला अशी कितीतरी धावपळ करावी लागेल. त्यातच आपल्या गुडघ्यानं अशी धावपळ करणे शक्य होणार नाही. त्यातच तिला ते पद प्राप्त होताच तिनं ते पद स्पष्टपणे नाकारलं. त्यातच पुन्हा वेतन रखडलं.
गत सहा महिण्यापुर्वीही संस्थाचालकानं एका शिक्षीकेचं पद आणलं होतं. परंतू तिनंही ते स्पष्टपणे नाकारलं होतं. त्याच प्रक्रियेत तीन महिने वेतन रखडलं होतं. यावेळीही संस्थाचालकानं तेच केलं होतं. तसं पाहता तो शाळेची चाबी देतच नव्हता.
संस्थाचालकाची इच्छा होती की माझ्या शाळेतील शिक्षकांचे वेतन होवू नये. ते वेतन रखडावे. तसं ते वेतन रखडवतांना संस्थाचालकाला मजा वाटत होती.
आज रखडलेलं वेतन. त्याला माहित होतं की इतर शिक्षक हे शाळेचे मुख्याध्यापक पद घेवू शकत नाहीत. ते पद मंगेशलाच द्यावं लागेल. परंतू तो ते पद मंगेशला द्यायला तयार तयार नव्हता.
त्याच्या स्नुषेच्या पद नाकारल्यानं पुन्हा पद खोळबलं. कामंही रखडली. वेतनही रखडले. काय करावं सुचेनासं झालं. अशातच पुन्हा एकदा सर्व शिक्षक एक झाले. त्यांनी एकमत करुन एक पत्र पुन्हा शिक्षणविभागाला लिहिलं की सदर पद हे मंगेशला देण्यात यावं.
शिक्षकांना माहित होतं की त्या शिकवीत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक हा चांगल्या विचारांचा असून त्या शाळेतील संस्थाचालक हा लहरी स्वभावाचा आहे. तो लहरी स्वभावाचा संस्थाचालक, त्याला मंगेशच सांभाळू शकतो. बाकी कोणी नाही. हे इतर शिक्षकांना माहित होतं. त्यामुळं त्यांनी संस्थाचालकाच्या विरोधात शिक्षणविभागाला मंगेशच्या नावाची शिफारस केली व शिक्षणविभागाच्या निर्णयानुसार पुन्हा मंगेशला मुख्याध्यापक बनवायचे ठरवले गेले.

************************************************

काही काही लोकं असे असतात की ते फक्त बोलतात. करीत काहीच नाही. ते विशेषतः पंडीत नेहरु, महात्मा गांधी व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांबद्दल बोलत असतात. जे तिनही व्यक्ती महान होवून गेले. ज्यांची बरोबरी आपण करु शकत नाही.
आपला प्राचीन भारत. या भारतात आपलेच काही लोकं हे कुरघोडीचे होते. सत्ता संपत्ती प्राप्तीसाठी त्यांनी आजपर्यंत अशा कुरघोडी केल्या.
इसवी सनाच्या सातव्या शतकात ज्ञानमत यांनी सत्ताप्राप्तीसाठी मोहम्मद बिन कासीमशी संगनमत केलं व सिंधचा राजा दाहिरला ठार मारायला लावलं. बदल्यात मोहम्मद बिन कासीमनं ज्ञानमतला राजा बनवलं नाही. सत्ता प्राप्त होताच मारुन टाकलं. तिच पुनरावृत्ती घडली पृथ्वीराज चव्हानच्या काळात. राजा जयचंदाला दिल्लीचं राज्य हवं होतं. त्यामुळं त्यांनी मोहम्मद घोरीशी संगनमत केलं. बदल्यात जेव्हा मोहम्मद घोरीनं पृथ्वीराजवर विजय मिळवला. बदल्यात जयचंदला काय मिळालं. काहीच नाही. उलट मृत्यू पत्करावा लागला. इंग्रजांच्या काळातही तसंच घडलं. मिरजाफर मिरकासीमचं शत्रुत्व तसेच रघूनाथराव व नारायणरावांचं वैरत्व. त्यातून इंग्रज यशस्वी झाले आणि अख्खा देश इंग्रजांचा गुलाम झाला. आपण पारतंत्र्य अनुभवलं व भोगलंही. तरीही आपण सुधारलो नाही. आपण अाजही असंच वाचाळ बोलत असतो. वागतही असतो. मग आपण हा विचारच करीत नाही की आपण कोणाबद्दल असे आचरण करतो. त्यांची खरंच आपण बरोबरी करु शकतो काय. आज देशात असे कितीतरी वीर होवून गेले की ज्यांच्याशी आपली तुलनाच होवू शकत नाही. लोकमान्य टिळक पासून तर पुढे नुकत्याच निधन पावलेल्या सिंधूताई सपकाळपर्यंतच्या लोकांना आपण नावं ठेवत असतो. त्यात आपण डॉक्टर बाबासाहेबांनाही सोडलेलं नाही.
पंडीत नेहरुंबद्दल सांगायचं झाल्यास आज पंडीत नेहरू होवून गेले. त्यांनी पंतप्रधान पद भुषवलं. ते ज्यावेळी पंतप्रधान बनले. त्यावेळी देश भयंकर स्वरुपात आर्थीक विवंचनेत होता. देशाची तिजोरी ही रिक्त झाली होती. त्यातच इंग्रजांनी या देशातील पैसा आपल्या देशात नेला होता. त्यामुळं पदभार स्विकारतांना पंडीत नेहरुंपुढं मोठं संकट निर्माण होतं. त्यांनी पदभार स्विकारुन ते पद सार्थक ठरवलं. त्यांनी पंतप्रधान पद स्विकारताच वेगवेगळ्या योजना राबवल्या व देशाला आर्थीक संकटातून उभारलं.
आज त्या पंडीत नेहरुंनाच काहीबाही बोलणारे बरेच आहेत. जे बोलतात, त्यांचं काहीच कर्तृत्व नाही. परंतू उचलली जीभ लावली टाळूला अशागत ते वाचाळ बोलत असतात. दुसरं एक व्यक्तीमत्व महात्मा गांधी. गांधीवर पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला दिल्याचा ठपका ठेवून गांधीजीच्या महानपणावर ताशेरे ओढले जातात. परंतू एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जिथे आपण आपल्या घरचे चार लोकं एकत्र करु शकत नाहीत. तिथे अख्खा देश एकत्र करु शकतो काय? महात्मा गांधींनी ते केलं. एवढंच नाही तर आफ्रिकेतून भारतात परतताच त्यानं ज्या एका व्यक्तीच्या अंगावर कपडे बघितले नाही. त्या व्यक्तीच्या परीचर्येवरुन त्यांनी आपल्या राजसी वस्राचा त्याग केला व जीवनभर कपडेच वापरले नाही. काय कमी होते त्यांच्या घरी. परंतू त्यांनी त्या सर्व गोष्टीचा त्याग केला.
तिसरं महान व्यक्तीमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी केवळ अस्पृश्य समाजच नाही तर सर्व समाजासाठी कार्य केलं. ज्यांनी बालपणातच अस्पृश्यतेच्या झळा सोसल्या आणि ठरवलं की मी माझ्या अस्पृश्य बांधवांना अशा अस्पृश्यतेच्या कचाट्यातून बाहेर काढील. त्यासाठी त्यांनी अहोरात्र परीश्रम केले. आपल्या जवळचा पैसा आपल्या परीवाराच्या प्रकृतीला लावला नाही. तो पैसा चवदार तळ्याच्या खटल्याला लावला. खटला जिंकण्यासाठी. त्यातूनच खटला जिंकल्यावर अस्पृश्यांना प्यायला पाणी मोकळं झालं. परंतू या दरम्यान औषध न मिळाल्यानं त्यांचा मुलगा राजरत्न व त्यांची पत्नी रमा मरण पावली. पुढे याच बाबासाहेबांना रक्तदाबाचा व मधूमेहाचा त्रास सुरु झाल्यानं ते आजारी असायचे. त्यावेळी त्यांच्या आजारपणात सवितानं सांभाळलं.
हे देशाचे नायकच आहेत. या देशाचे नायक हे तीनच नाही तर अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांना लोकं आज शिव्या हासडतात. काही बाही बोलतात. तसं पाहता त्यांना तसा बोलण्याचा अधिकार नाही. परंतू तरीही ते बोलतात. विचार करीत नाही की आपण या लोकांची इंचभरही बरोबरी करु शकतो काय. तरीही बोलतात.
काल परवाचीच गोष्ट. मी सिंधूताईवर लेख लिहिला. तो व्हाट्सअपवर टाकला. तेव्हा एक प्रतिक्रिया आली. ती सिंधूताई एवढी महान होती का की आपण तिच्याबद्दल लेख लिहिला. मी विचारलं असं का वाईट होतं तिच्या वागण्यात. तसा तो व्यक्ती म्हणाला, ' ती महिलांना गुलाम समजत होती.' मला ते समजलं नाही व मी म्हटलं, 'अर्थात.' त्यावर तो म्हणाला, 'ती स्रियांना कुंकू लावा. डोक्यावर पदर ठेवा. मंगळसुत्र घाला. असे म्हणत होती. ह्या गुलाम करणा-या गोष्टी. तसंच आरक्षण बंद करा म्हणत होती.'
आता यामध्ये सिंधूताईचं चांगलं कार्यच लोकांना दिसलं नाही. आपण एका अनाथ व्यक्तींला पालवू शकत नाही. तिनं शेकडो अनाथांना पालवले. याचा विसरच पडतो अनेकांना. अन् डोक्यावर पदर घ्या. कुंकू लावा म्हणणे काय वाईट आहे. ते स्रीचं सौभाग्य नाही का? याचाच अर्थ असा की उद्या माणसानं कसं वागावं कसं नाही हे यांच्याकडूनच शिकावं. स्रियांनी कुंकू लावू नये. डोक्यावर पदर घेवू नये. कारण ती गुलाम. असं लोकांचं म्हणणं. मग स्रियांनी केसंही विंचरु नयेत. कारण तिही गोष्ट गुलाम करणारी नाही का? चांगल्या राहणीमानाची गुलाम.
लोकं असेच बोलतात. लोकांना इतर लोकांतील चांगले गुण दिसतच नाहीत. वाईटच दिसतात. जे गुण घ्यायला नको आणि हं, तो व्यक्ती काहीही बोलत असेल. आपण तिकडं लक्ष देवूच नये आणि लक्षच द्यायचं असेल तर त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांवर भाष्य करावे. वाईट गुणांवर नाही. तसेच चांगले गुण घ्यावे. वाईट गुण घेवू नये म्हणजे झालं.
आज देशात असे कर्ते सुधारक कमी आहेत. बोलकेच सुधारक आहेत. जे फक्त बोली बोलू शकतात. पण त्याप्रमाणे कार्य करु शकत नाही. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, पंडीत नेहरु यांनी त्या त्या काळात त्या त्या परीस्थीतीनुसार निर्णय घेतले. ते निर्णय त्या त्या परीस्थीतीनुसार त्यांना बरे वाटले. कदाचित त्यांचं चुकलंही असेल त्या त्या परीस्थीतीनुसार त्या त्या वातावरणात. परंतू आज त्या चुकांना आपण चूक ठरवू शकत नाही. अशा काही चुका आपल्या अंगलटही आल्या. ज्यामुळं आपल्याला भोगमान भोगावे लागले. भोगावे लागत आहेत. परंतू त्यावेळी त्यांना त्या चुका वाटल्या नाहीत.
खरं तर आपण असं बोलण्यापेक्षा प्रथम त्या त्या पदस्थानी जाण्याची गरज आहे. आपल्या जगण्यातून त्यांनी जे कार्य केले. तसेच एखादे कार्य करुन दाखवावे. मगच बोलावे. याचाच अर्थ असा की आधी करावे मगच बोलावे. नाही तर तुमच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. अशी मुर्खासारखी वायफळ बडबड करु नये.

*********************************************

मंगेश वायफळ बोलत नव्हता. तो चांगलेच बोलत होता. त्याला असं वायफळ बोलण्याऐवजी कोणत्याही गोष्टी करुन दाखवणं आवडत होतं. नवनवीन उपक्रम करण्यात त्याला आनंद वाटत होता. तसेच त्याला चांगल्याच गोष्टी कराव्याशा वाटत होत्या.
शिक्षण, न्यायदान आणि रुग्णालयातील उपचार ह्या गोष्टी माणसाच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टी आहेत. परंतू ह्या गोष्टींनाच अलिकडे जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्या जेव्हा निःशुल्क होतील. तेव्हाच देश ख-या अर्थानं सुजलाम सुफलाम होवू शकेल.
शिक्षण ही आवश्यक गरज आहे. ज्या धर्मात आणि जातीत शिक्षणाचा अभाव असतो. त्या जाती मागासलेल्या जाती म्हणून ओळखल्या जातात. ती मंडळी एकंदर सर्वच गोष्टी अज्ञानानं करीत असतात. जसे विवाह.
विवाह करतांना काही काही जातीत विवाह लवकर करतात हे त्यांचं अज्ञान असतं. मुलीही विवाहाला तयार होतात स्वतःच्या मनानं विचार न करता. हेही त्या मुलींचं अज्ञान असतं. मुलगाही विवाहाला तयार होतो स्वतःच्या कामधंद्याचा विचार न करता. हेही त्याचं अज्ञानच असतं. कारण आपला समाज हा ती मुलं मुली व्यवस्थीत विचार करण्यायोग्य होण्यापुर्वीच विवाह करुन टाकतात. मग अशा मुलांवर आपली पत्नी पोसायची जवाबदारी येते.,अशावेळी ती मुलं मिळेल ती कामं करीत असतात.
मुलांचे विवाह होताच आपली पत्नी पोसण्यासाठी ते मिळेल ती कामं तर करतातच. व्यतिरीक्त पुढं प्रजोत्पादन करतांनाही केवळ आणि केवळ अज्ञानामुळं मुलं कितीतरी जास्त प्रमाणात जन्माला घालतात. त्यातच त्या मुलांना पुढं व्यवस्थीत शिक्षण मिळत नाही. घालायला व्यवस्थीत कपडेही मिळत नाही. तसेच खायला पुरेसे अन्नही मिळत नाही. त्यातच यावेळी थोडं वय वाढलेलं असतं. अशा वाढलेल्या वयानंतर पती पत्नीत संमजसपणा येतो. कळायला लागतं की शिक्षण म्हणजे काय? त्या शिक्षणाची गरज काय? आपल्या काय चुका झाल्या? त्याचा परीणाम काय झाला? परंतू चूक ती चूकच. ती आता सुधारता येत नाही. कारण वेळ निघून गेलेली असते. त्यातच वडीलधारी मंडळींनी आपल्यासोबत दगलबाजी केल्याची भावना आपल्या मनात जोर धरु लागते. विचारांची कालवाकालव होते. त्यातच पश्चाताप व त्या पश्चातापातून काही मंडळी बोध घेतात. ती मंडळी प्रसंगी कितीही मुलं असली तरी त्यांना शिकवतात. त्यांचे विवाह उशीरा करतात. तसेच त्यांना सर्वात मोठं फुल, एकच मुल अशी भावना शिकवतात. हेच खरं शिक्षण असतं. अनुभवातून आलेलं.
काही काही मंडळींना पश्चाताप तर होतो. परंतू ते त्यातून मार्ग काढत नाहीत. काय करावं ते कळत नाही. एकमेकांवर दोषारोपण सुरु असतं पती पत्नीचं. विचारांची कालवाकालव होते व त्याची परियंती आत्महत्येत होते. खास करुन पुरुष. मग ती मुलं व तो संसाराचा गाडा पती पत्नीमधून उरलेल्या एका व्यक्तीला चालवावा लागतो. त्यातच ते तरुणपण असतं. शारिरीक भावनाही जुळलेली असते. शेवटी तो पुरुष असेल तर त्याला मुलींना फिरवणं वा फसवणं आवडत नाही. मुलीही अशा मिळत नाही. शेवटी अशी पोटची मुलं असतांनाही तो दुसरा विवाह उरकवतो. मग काय सारंच बिघडतं. दुसरी विवाहानंतर येणारी मुलगी ही त्यांच्या त्या बाळाला शिकवेलच असं नाही. पुरेसे अन्न देईलच असे नाही. ती मुलं बेवारस उकिरड्यावर जशी कुत्री जगतात. तशी जगत असतात. हीच बेवारस मुलं पुढे जावून जेव्हा समझदार होतात. तेव्हा आपली जीवनसंगीनी मिळविल्यावर तिला दुःख देत नाहीत.
अशा आत्महत्येतून पुरुष जर मरण पावला तर उरलेली स्री ही आपल्या सर्वस्वाचा त्याग करते. काही काही दुसरा विवाह देखील करीत नाही. त्या मोलमजूरी करुन आपलं पोट व आपल्या मुलांचं पोट पालवते. परंतू शारिरीकता तिलाही लागलेली असते. ती दुसरा विवाहही करु इच्छीते. परंतू आपली पुरुषप्रधान संस्कृती. तिला नाव बोटं ठेवणारच. त्यातच तिला जर मुलं असतील तर तिच्याशी कोणताच पुरुष विवाह करायला तयार नसतो. फक्त त्यांना ती हवी असते तिची मुलं नाही.
तिलाही आकर्षण असतं लैंगीकतेचं. शेवटी ती काय करणार. मग ती लपूनचोरुन आपल्या कामवासना पुर्ण करीत असते. परंतू ती कामनासना असते. केव्हापर्यंत लपणार. शेवटी सर्व समाजाला माहित होते. लोकं नावबोटं ठेवतात. शेवटी तिच्यासमोर पर्याय नसतो. त्यामुळं की काय, ती राजरोषपणे आपला देह समाजाची पर्वा न करता विकत असते. कशासाठी तर आपल्या पोटासाठी. आपल्या लेकरासाठी. कारण तिला आपलं कर्तव्य पार पाडायचं असतं. त्याचबरोबर आपली शारिरीक तृप्तीही पुर्ण करायची असते.
महत्वपूर्ण वस्तुस्थिती ही की यात तिचं काय चुकतं? तिला दुषणे लावण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? तरीही तिलाच दोषी मानलं जातं. परंतू यात तिला दोषी मानू नये. दोषी असतात तिचे वडीलधारी. जे तिच्या समंजस होण्यापुर्वी तिचा विवाह एका असमंजस पुरुषांची लावून देतात.
शिक्षण........अशी बरीचशी गरीब कुटूंब आहेत. अशी कुटूंब केवळ ग्रामीणच भागात नाही तर ती शहरातही बहुसंख्य प्रमाणात आहेत की ज्यांना मुलांना शिक्षणच देता येत नाही. ज्यांना परीश्रम कितीही केलं तरी आपल्या मुलांना नीट पालवता येत नाही आणि पुरेसं अन्न देता येत असलं तरी शिक्षण? प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण शिक्षणाला पै पै पैसा लागतो. हा पैसाच अशा लोकांच्या गरीबीचं कारण ठरते.
शिक्षण वाघिणीचं दुध आहे असं म्हणतात. ते प्यायल्यावर व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहात नाही. हे खरं आहे. परंतू शिक्षण घ्यावं कसं? ही एक समस्याच आहे.
अलिकडे आरक्षण आहे. आरक्षणानं उच्च शिक्षण शिकवता येतं. पण हे आरक्षण कुणासाठी. विशिष्ट अशा वर्गासाठी. सर्वसामान्य लोकांसाठी नाही. आरक्षणाची या लोकांनाही गरज आहे. जी मंडळी आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी शिक्षण निःशुल्कच असावं. तसंही पाहता शिक्षण हे निःशुल्कच असावं. कारण त्या शिक्षणातून सामाजीक विकास होत असतो. काहीतरी नवनिर्मीती करता येते. एक नवा बदलाव करता येतो. ज्या बदलावातून देशाचा विकास होत असतो. परंतू शिक्षण निःशुल्क होणार नाही. कारण राजकारण्यांना या शिक्षणातूनच भरमसाठ पैसा कमवता येतो.,आज उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर विनापैशानं घेता येत नाही. कारण पुढील तांत्रीक उच्चशिक्षणावर राजव्यवस्थेची मालकी आहे. डॉक्टर, इंजीनियर बनायचे असल्यास भरमसाठ पैसा ओतावा लागतो. जो पैसा लाखोच्या घरात आहे. असे मोठमोठे तंत्रशिक्षण शिकविणा-या संस्था या किंबहूना सरकारी नाही. दोनचार अपवादात्मक संस्था सोडल्या तर बाकी सर्व शिक्षणसंस्था ह्या श्रीमंतांच्या मालकीच्या आहेत. त्यातूनच शिक्षणाचा बाजार मांडला जातो. त्यामुळं की काय, लोकांनी आपली मानसिकता बदलली आहे. तेही मुलांना साधं प्रार्थमीक शिक्षण देवू शकत नाही. द्यायला पुढं येत नाही. कारण त्यांना माहित आहे की शिक्षणाचा उपयोगच नाही. पुढे शिक्षण घ्यायला भरपूर पैसा लागतो. त्यामुळं आजच अज्ञानी असलेलं बरं. त्यामुळच की काय ते शिकत नाही. तसेच बालविवाहाला प्राधान्य देतात व पुढे त्यानंतर उद्भवणा-या सा-या समस्याही झेलत बसतात. शोषत राहतात. एखाद्या शोषीतांसारख्या.
दुसरी महत्वाची गरज आहे ती म्हणजे न्याय. आपले संविधान न्याय समता बंधूता यावर आधारलेली आहे. परंतू खरंच आपल्या देशात न्याय सर्वांना निःशुल्क आहे काय? याचं उत्तर नाही असंच आहे. ज्यांचेजवळ अमाप पैसा. त्यांना न्याय हा विकत घेता येतो असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण एखाद्या गरीब व्यक्तीवर अन्याय झाल्यास तो न्यायालयात दाद मागू शकत नाही. खटला चालवू शकत नाही. कारण खटला चालवायला वकील जरी निःशुल्क मिळत असला तरी यायला जायला पुरेसा पैसा लागतो. त्यातच सरकारी वकीलही कळसुत्री बाहूले असल्यासारखा प्रतिवादींच्या वकीलांच्या हो ला हो मिळवीत असतो. कारण वकील बनत असतांना लाखोच्या घरात पैसा मोजावा लागतो. तो पैसा कुठून निघणार. तो पैसा कमविण्यासाठी तो वकील प्रतिवादीच्या वकीलाशी जुळवून घेत असतो. त्यामुळं गरीब माणसं ही असा अत्याचार सहन करतात. परंतू ते न्यायालयात खटले दाखल करीत नाही वा स्वतःवर अत्याचार होनूनही न्याय मागू शकत नाहीत.
तिसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे उपचार. आज सर्वांना आरोग्य लागलं आहे. व्याधींनी हा गरीब हा श्रीमंत असा भेद केलेला नाही. त्यातच डॉक्टरकीचं शिक्षण घेत असतांना खाजगी संस्थेत लाखो रुपये मोजावे लागतात. मग डॉक्टर ही रुग्णांवर उपचार करतांना केवळ पैसा कमविणे हाच उद्देश ठेवतात. ते गरीबांचा उपचार करीत नाही.
महत्वपूर्ण गोष्ट ही की डॉक्टर, इंजीनियर वकील या देशातीलच नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ उपयोगिता पदं. निदान त्याच्या प्राप्तीसाठी तरी एवढा पैसा लागू नये. ते एवढा पैसा घेतात. जो पैसा सर्वसामान्यांना झेपत नाही. परंतू ते तरी काय करणार. त्यांना ते शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ पैसा मोजावाच लागतो. म्हणून ती मंडळी आपला पैसा काढण्यासाठी असा पैसा काम करतांना घेतात.
मुळात शिक्षण हे निःशुल्क असावं. ते मग डॉक्टरकीचं असो की इंजीनियरचं वकीलकीचं असो की मास्तरकीचं. ते जेव्हा निःशुल्क होईल. तेव्हाच ख-या अर्थानं देश सुधारेल. देशाला सुजलाम सुफलाम बनवता येईल. तसेच सर्वांना शिक्षण तर घेता येईलच. तसेच शिक्षणाचे महत्व तर वाढेलच. व्यतिरीक्त योग्य न्यायही मिळवता येईल त्याचबरोबर वेगवेगळ्या व्याधीवर उपचारही. हे तेवढंच खरं आहे.

***********************************************

शिक्षणाबद्दलची आस्था मंगेशला स्वस्थ बसू देत नव्हती. संस्थाचालकानं अजूनपर्यंत त्याला पुरेसा रेकॉर्ड दिला नव्हता. त्यासाठीच तो झुंज देत होता संस्थाचालकाशी. त्यातच त्या शाळेतील काही शिक्षक त्याच्यासोबत नव्हते.
मंगेश ज्या शाळेत काम करायचा. त्याच शाळेत संस्थाचालकाचे चार नातेवाईक होते. त्या चार नातेवाईकांपैकी तीन स्नुषा होत्या. त्यातच एक भावाची पत्नी होती. जो भाऊ सावत्र होता. त्याचीच कृपा की ती शाळा अनुदानावर आली होती. बदल्यात संस्थाचालक आपल्या भावाला नोकरी देणार होता. परंतू त्याला ते निव्वळ आश्वासन तो बेचैनच होता. अशातच त्या गृहस्थाची नेहमी शाळेत भांडणं होत. भांडणातून क्लेषता निर्माण होत असे. ती भांडणं चांगल्यासाठी होत असत. त्याला काय माहित होते की त्याचाच सख्खा भाऊ त्याला सावत्र समजतो आहे.
त्यानं शाळेला मदत करुन एक उपकारच केले होते. नोकरी मिळेल या हेतूनं त्यानं उपकार केले होते. परंतू संस्थाचालकाने उपकाराच्या बदल्यात त्याला काहीही दिलं नसल्यानं झालेली घालमेल व विचारांचा गोंधळ यामुळे की काय, एक दिवस गावावरुन बाईकनं येत असतांना त्याचा अपघात झाला. या अपघातात तो मरण पावला. त्यावेळी पुन्हा संस्थाचालकाच्या तोंडून शब्द फुटले की मी तुझ्या मुलाला नोकरीला लावील.
निव्वळ आश्वासन. तसं पाहता संस्थाचालकाला नातेवाईक कोणीच नसतात. त्यांचा नातेवाईक म्हणजे पैसा. पैशासाठी ते इमानदारीही विकून टाकतात. त्यातच त्या बेईमानीनं ते पैसा कमवीत असतात. जर त्यांच्या बेईमानी करण्यात जो कोणी आड येत असेल, तो त्याला चालत नाही.
संस्थाचालकाचा भाऊ मग तो सावत्र का असेना, इमानदार होता. त्याला संस्थाचालकाच्या बेईमानीपणाच्या गोष्टी पटत नव्हत्या. त्यातच निव्वळ आश्वासनानं गोंधळलेला भाऊ शेवटी गावावरुन येतांना झालेला अपघात. त्यामुळं की काय, तो मरण पावला खरा. परंतू त्याच्या मरणानंतर त्याला दिलेले व त्याच्या पत्नीला दिलेले आश्वासनंही त्यानं पाळले नाही. त्यानं त्याच्या भावाला दिलेल्या आश्वासनानुसार ते पुर्ण करण्यासाठी भावाच्या मुलाला अध्यापकीय पदवी घ्यायला बाध्य केले. भावाच्या मुलानं अध्यापकीय पदवी तर घेतली. परंतू पुढे त्याला नोकरी दिली नाही. त्यामुळं की काय, त्या मुलाची आई संस्थाचालकावर नाराज होती.
मंगेशच्या बाजूला तीच खंबीरपणे उभी होती. ती नात्यात होती संस्थाचालकाच्या. परंतू संस्थाचालकानं तिच्याशी केलेली दगाबाजी तिला माहित होती. वास्तविक पाहता संस्थाचालकानं आपल्या पतीशी व आपल्याशी केलेल्या आश्वासनानुसार आपल्या मुलाला नोकरी द्यायला हवी असे तिला वाटत असल्यानं व ते आश्वासन पुर्ण न झाल्यानं तिनं आपली दिशा बदलवली होती. त्यातच संस्थाचालकानं त्या मुलाच्या जागी त्या आपल्याच सख्ख्या मोठ्या भावाच्या मुलाच्या पत्नीला नोकरीला लावले होते.
ती स्नुषा जेष्ठ शिक्षीका होती. वास्तविकता अशी होती की तीच खरी मुख्याध्यापक पदाची दावेदार होती. तिला ते माहितही होते. परंतू तिनं दावेदारपण नाकारलं. मुख्याध्यापक पद हे अतिशय जोखमीचं पद होतं. संस्थाचालक सर्व शिक्षकांना धमक्या द्यायचा की त्यांनी काहीही मजकूर न वाचता केवळ सह्या करायच्या. त्यामुळं उद्या अशा सह्या केल्यानं फसले गेले तर उद्या कोणीही वाचविणार नाही हे सर्वांना माहित होतं. शिक्षणक्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करतांना चुका होतच असतात हे सर्वांना माहित होतं. त्यातच मुख्याध्यापक जबाबदार घटक असतो हेही सर्वांना माहित होतं. संस्थाचालक हा काही या जबाबदारीत नव्हता. तो संस्था तर काढू शकत होता. परंतू त्याला सरकारी काम तसेच अनुदानासाठी त्याला मुख्याध्यापकावर अवलंबून राहावे लागत असे. तेच सरकारी अनुदान लाटण्यासाठी तो मुख्याध्यापकाला बाध्य करीत असे. बदल्यात काहीही देत नसे. यातूनच मुख्याध्यापक फसला जात होता हे सर्वांनाच माहित होते. म्हणूनच की काय, या शाळेत मुख्याध्यापक बनायला कोणीही पुढे येत नव्हता.
संस्थाचालकाचा भावाचा एक जावईही याच शाळेत होता. तोही मंगेशच्या बाजूनं होता. त्याला नेहमी वाटायचे की संस्थाचालकानं एक सभा घ्यावी व त्या सभेत त्यानं सेवाजेष्ठतेनुसार सर्वांचं मत लक्षात घ्यावं. त्यानुसार त्यानं या शाळेत मुख्याध्यापकाचं पद द्यावं. परंतू संस्थाचालक तसं काहीच करीत नव्हता.
तो शिक्षक सेवाजेष्ठ नव्हता. परंतू त्यालाही वाटत असेल की संस्थाचालकानं त्याला मुख्याध्यापक बनवावं. म्हणून तो चर्चेच्या गोष्टी करीत होता. जी गोष्ट सहज शक्य नव्हती.
त्याच मुख्याध्यापक बनण्यामागं व त्या शर्यतीमध्ये आणखी एक शिक्षीका होती. ती मंगेशपेक्षा ज्युनीअर होती. मुख्याध्यापकीय शर्यतीमध्ये तिलाही संस्थाचालकानं आश्वासन दिलं होतं की तिला तो मुख्याध्यापक बनविणार. परंतू सत्य वेगळंच होतं.
ती संस्थाचालकाची सुन. ती ज्युनीअर शिक्षीका. त्यातच संस्थाचालकानं तिला दिलेलं मुख्याध्यापक पदाचं आकर्षण. आश्वासनच होतं ते. कारण ते नंतर लक्षात आलं होतं. जेव्हा संस्थामहोदयानं दुस-या रेजींगवेळी आपल्या भावाच्या पत्नीचा मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव आणला.
तिला मुख्याध्यापक पद न देण्यामागं एक कारण होतं. संस्थाचालकाची ती स्नुषा. मंगेशची ज्युनीअर होती. तिचा पती एका शाळेत मुख्याध्यापक होता. तो ज्या शाळेत मुख्याध्यापक होता. त्या शाळेचा संस्थाचालक हा थोडा चालाख होता. तिला मुख्याध्यापक पद दिल्यास या संस्थाचालकाची शाळा तिच्या सहकार्यानं तो मुख्याध्यापक हस्तगत करेल असे या संस्थाचालकाला वाटत होते. म्हणून की काय हा संस्थाचालक तिला मुख्याध्यापक बनवू पाहात नव्हता. मात्र तिनं सोबत राहावं म्हणून त्यानं तिला मुख्याध्यापक पदाचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनामुळं ती मंगेशच्या विरोधात होती.
मुख्याध्यापकाच्या शर्यतीत आणखी एक शिक्षीका होती. तिही संस्थाचालकाची स्नुषाच होती. त्याच्या मोठ्या भावाच्या मुलाची पत्नी. तिला संस्थाचालकानं शिक्षक प्रतिनिधी बनवले होते व तिला सांगीतलं होतं की भ्यायचं नाही. हे आपले नोकर आहेत.
संस्थाचालकानं तिला म्हटल्यानुसार ती केवळ शाळेची स्वतःला मालक समजत होती. त्यातच ती मालक असल्यासारखी मंगेश मुख्याध्यापक असला तरी काही बाही बोलत होती. तिचं कामच व्हायचं होतं. आपल्या भावाला दिलेल्या आश्वासनानुसार संस्थाचालकानं भावाच्या मुलाला आपल्या शाळेत नोकरीला न लावता तिला नोकरीला लावले होते. परंतू तिचं काम खोटं असल्यानं दिवंगत मुख्याध्यापकानं तिचं काम केलं नाही. संस्थाचालकानं तिचं काम करायचा घाटंही घातला. तरीपण तिचं काम झालं नाही. यामुळं की काय, ती केवळ शाळेत येत होती निव्वळ राबण्यासाठी आणि संस्थाचालकाच्या म्हणण्यावर खुश होत होती.
मुळात तिच्यात विचार करण्याची शक्तीच नव्हती असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तशाच स्वरुपात ती वागत होती. ज्या मुख्याध्यापकाच्या हातून तिचं काम होणार होतं. त्याच मुख्याध्यापकाला ती केरकचरा समजत होती. शिवाय तिचं स्वतःला मालक समजून मुख्याध्यापक असलेल्या मंगेशला डिवचण्यासारखं वागणं ह्या गोष्टी मंगेशच्या मनावर घाव घालत होत्या. त्याला राग येत होता त्या शिक्षीकेचा. तो तिला म्हणतही होता की त्याला तिनं काम झाल्यावर गाढव म्हटलं तरी चालेल. परंतू काम करतांना घोडं म्हणावंच लागेल. परंतू तरीही ती आपलं वागणं बदलवीत नव्हती. तिला वेतन सुरु नव्हतं. त्यामुळं तिला वाटत होतं की तिचं वेतन संस्थाचालक सुरु करेल. परंतू ते शक्य होत नव्हतं.
मंगेश तिचं काम करु पाहात होता. परंतू संस्थाचालक तिच्या बाबतीतील पुरेसा रेकॉर्ड त्याला देत नव्हता. त्यामुळं तिचं काम कसं करावं हा विचार मंगेशपुढं होता. त्यातच संस्थाचालकाला सर्वेसर्वा समजणारी ती मंगेशच्या विरोधात असून कधीकधी मंगेशला माझं काम करा असं म्हणत होती.
अशी ही चार मंडळी.......ज्यात तीन स्नुषा तर एक जावई. त्यापैकी एक जेष्ठ शिक्षीका. जी मंगेशच्या बाजूनं होती. तसा तो जावईही. परंतू त्या दोन्ही स्नुषा मंगेशच्या विरोधात होत्या. ज्या ज्युनीअर तर होत्याच. शिवाय त्यांना वाटत होते की संस्खाचालक काहीही करु शकतो. मुख्याध्यापक पदंही बदलवू शकतो. त्यासाठीच तो मंगेशला बदनाम करु पाहात होता. वारंवार पद संपताच ते पद मंगेशला न देता पदाबाबत खेळखंडोबा करीत होता.
तूम्ही सर्वांना मदत करता तसं तुम्हाला वाटते. पण इतरांना तसं वाटत नाही. तुम्हाला जे आपले समजतात, त्याच्याशी तूम्ही चांगले बोलत नाही व जे स्वार्थपणाने तुमच्याशी वागतात. तुमच्याशी बोलत नाही. त्यांना तूम्ही आपले समझता. म्हणून दुःख येतं.
संस्थाचालकाला मंगेश हेच समजावून सांगत होता. तरीही मंगेशच्या बाबतीत हेच घडत होतं. तो संस्थाचालक अजूनही सुधरला नव्हता.
ते मुख्याध्यापक पद.........त्या मुख्याध्यापकपदी संस्थाचालक दुस-याच शिक्षीकांची नियुक्ती करीत असे. ज्या नियुक्त्या त्या शिक्षीका नाकारत असत. अशातच या नियुक्त्यातून दर नियुक्तेवेळी वेतन रखडत असे. ज्यातून संस्थाचालकाला आनंद मिळत असे.
ते मुख्याध्यापकाचं प्रभारी पद. त्यातच शिकवावा लागणारा वर्ग. त्यातुनच वेतनात न झालेली वाढ. तरीही मंगेश शिकवीत होता त्याचा वर्ग तसेच प्रभारी मुख्याध्यापकाचं कामही करीत होता तो. अगदी शांतपणे. निश्चींत मनानं. काय करावं सुचत नव्हतं. अशातच त्याला एक युक्ती सुचली. आपण कायम मुख्याध्यापक पदाची मागणी करावी.
मंगेशच्या मनात अशा प्रकारचे विचार येताच त्यानं शिक्षण विभागाला एक अर्ज लिहिला. त्यात लिहिलं की त्याच्यापेक्षा जेष्ठ शिक्षीका पदभार नाकारत असतांना व क्रमशः त्याचाच क्रमांक मुख्याध्यापक पदी असतांना त्याला नियमीत का करीत नाही. तसं त्याला नियमीत करावं. नाहीतर उद्या नाईलाजास्तव न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल. त्यानं तो अर्ज पाठवला व तो नियमीत मुख्याध्यापक पदाचा खटला लढण्याची तयारी करु लागला.
ते नियमीत मुख्याध्यापक पद. त्यातच त्या पदाच्या शर्यतीत उभी असलेली ती. परंतू ती सिनीअर नसल्यानं समस्या उत्पन्न होत होती. अशातच काय करावं सुचत नव्हतं.
मंगेशला दुस-यावेळी मुख्याध्यापक पद तर मिळालं होतं. तेही संस्थाचालकाच्या पद नाकारण्याच्या पत्रानुसार. परंतू यातून संस्थाचालकाला ते माहित होताच त्याचा जळफळाट झाला. त्यातच संस्थाचालकानं त्या शिक्षीकेला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात लिहिलं होतं की तिनं मुख्याध्यापक पद न घेतल्यामुळं स्वतःची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
एक संस्थाचालकाची स्नुषा. एक सक्षम असलेली महिला शिक्षीका. तिलाही स्वातंत्र्य ते होतंच. तिला स्वतंत्र्य जीवन जगण्याचा अधिकार होताच. तरीही तिला संस्थाचालक जगू देत नव्हता. तिनं मुख्याध्यापक पद घ्यावं म्हणून तिच्यावर बंधन आणत होता नव्हे तर तिनं पद न स्विकारल्यामुळं तिला वैद्यकीय तपासणी करायला सांगत होता.
जराजर्जर झालेली ती महिला शिक्षीका. तिच्या नोकरीला अडीच वर्ष राहिली होती. तिला वाटत होतं की तिनं सुखासुखात निवृत्त व्हावं. परंतू संस्थाचालक त्यावर बंधन आणत होता.
ती जेष्ठ महिला शिक्षीका. तिला गुडघ्याचं दुखणं होतं. ते दुखणं एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की ती पायानं नीट चालू शकत नव्हती. तिचे पाय अधू झाले होते. चालणं थोडं कठीणच वाटत होतं. अशातच तिच्या नावाचा मुख्याध्यापक पदाचा आदेश आणला.
तो आदेश पाहताच तिला आनंद होण्याऐवजी दुःख वाटलं. परंतू ते दुःख चेह-यावर दिसू न देता तिनं तो आदेश स्पष्टपणे नाकारला. त्याला काही किरकोळ कारण होतं. ते किरकोळ कारण म्हणजे तिच्या पायाचं दुखणं.
काही लोकं असे असतात की त्यांना दुस-यांना त्रास देण्यात धन्यता वाटत असते. ती धन्यता का वाटत असते ते कळत नाही. आज निव्वळ सगळीकडे स्वार्थ पसरला आहे. हव्यास वाढला आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचार. त्यातच त्या भ्रष्टाचारातून एखाद्यावेळी पैसा मिळत नसेल तर भ्रष्टाचार करणारा व्यक्ती भ्रष्टाचार न करणा-या व्यक्तींना त्रास देत असतो. यालाही त्रासच म्हणता येईल.
त्रासामध्ये घर असो की मग कोणतेही क्षेत्र असो. घरातही आपली पत्नी आपल्याला कामं सांगतच असते. परंतू आपण ती कामं करतांना कंटाळा करीत नाही. कारण ती पत्नी असते.
आपली पत्नीही जी कामं सांगत असते. ती कामंही कधी कधी कंटाळवाणी वाटत असतात. परंतू त्यात आपल्याला कंटाळा वाटत नसतो. कधी कधी असं वाटायला लागतं की ते मजूर परवडले की त्यांच्या घरी त्यांच्या पत्नी त्यांना कामं करायला लावत नाही. परंतू नोकरीवाल्यांना कामं करावी लागतात.
पत्नीच ती....... आपली पत्नी. ती जी कामं करायला लावते. तो त्रासच असतो. परंतू ती आपली पत्नी असल्यामुळं तिनं कितीही त्रास दिला तरी तो त्रास वाटत नाही. परंतू जर बाहेरच्यांनी त्रास दिला तर तो महाभयंकर त्रास वाटतो.
त्रासाचेही मुख्यतः दोन प्रकार पडतात. १)नैसर्गिक त्रास व २)कुत्रीम त्रास.
नैसर्गिक त्रासात सर्व शेतक-यांच्या आत्महत्या मोडतात. निसर्गाच्या कोपानं जेव्हा शेती पीकत नाही. सतत पावसानं वा पाऊस न आल्यानं जेव्हा हानी होते. तेव्हा त्यातून दुष्काळ संभवतो. त्यात ओला दुष्काळ वा सुका दुष्काळ निर्माण होतो. अशावेळी शेतक-यांच्या आत्महत्या घडतात. तसेच एखाद्या ठिकाणी भुस्खलन होते वा कधी भुकंप. त्यातून जो त्रास उद्भवतो. त्याला नैसर्गिक त्रास म्हणतात.
कुत्रीम त्रासाचे खालील प्रकार पडतात.
१) मनोरंजनासाठी दिला जाणारा त्रास
काही काही प्रकाराच्या त्रासात काही कारण नसते केवळ मनोरंजन होते म्हणून त्रास दिला जातो. जसा एक विदूषक सर्कशीमध्ये लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आपले जबडे वाघाच्या तोंडात देतो किंवा तोच विदूषक लोकांचे मनोरंजन करण्यासाठी स्वतःच्या अंगाला मारुन घेत असतो. हा विनाकारणचा त्रास आहे.
२) विनाकारण दिला जाणारा त्रास.
काही काही मंडळी ही विनाकारण त्रास देत असतात. जसे भांडवलदार मजूरांना त्रास देतात.
३)कुबुद्धीचा त्रास.
काही काही लोकांना बुद्धी नसते. ते बुद्धीचा वापरच करीत नाहीत. अशाचाही त्रासच होत असतो कधीकधी. याबाबत एक प्रसंग सांगतो. एके ठिकाणी एक मयत चालली होती. तिचाही बँड ऐकायला येत होता. लोकं अगदी शांतपणे चालले होते. त्या मयतीच्या समोर एक विवाहाची वरात होती. वरातीचं मयतीकडं लक्ष होतं. तरीही वरातीचे बँडवाले बँड वाजवतच होते. त्यांचा जोश वाढला होता. त्यातच त्या वरातीतील एक वयोवृद्ध व्यक्ती त्या बँडवाल्याला म्हणाला,
"काही मैनर्स आहे का?"
ते त्या माणसाचं वाक्य. तरीही ते बँडवाले बँड वाजवितच होते. त्याला कारण होतं, ते म्हणजे त्या घरची नाचणारी मंडळी. ती मंडळी त्या मयतीकडं जाणूनबुजून दुर्लक्ष करुन बँड वाजवतच होते नव्हे तर नाचत होते. या त्रासाला कुबुद्धीचा त्रास म्हणावा नाही तर काय.
४)सुडबुद्धीचा त्रास.
काही काही त्रासाच्या प्रकारात बदल्याची भावना असते. शेजा-याचा जर त्रास गतकाळात झाला असेल तर दिवस पालटताच त्याचा शेजारीही त्याला त्रास देत असतात. जसे काल स्रीयांवर सतीप्रथेच्या रुपानं त्रास झाला. आज स्रिया पुरुषांवर वरचढ झाल्या आहेत. तसेच उच्च समाजाच्या पुर्वजापासून झालेल्या त्रासावर आता कनिष्ठ समाजाकडून होत असलेला त्रास.
५)जाणूनबुजून दिला जाणारा त्रास.
काही काही मंडळी हे जाणूनबुजून त्रास देत असतात. जसे कारखान्याचे मालक मजूरांना वेतनासाठी जाणूनबुजून त्रास देत असतात. तसेच शाळेचे संस्थाचालक शिक्षकांनी त्यांना देण म्हणून पैसे द्यावेत म्हणून जाणूनबुजून त्रास देत असतात.
६)दुर्बलांना दिला जाणारा त्रास.
आज अशा प्रकारचा त्रास सर्वत्र पाहायला मिळतो. त्याला सर्वात जास्त प्रमाणाची पाश्वभुमी आहे. या त्रासामध्ये पाळीव प्राणीही मोडतात. माणसे प्राणी पाळतात. त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन घेतात. अशावेळी त्यांना त्रास दिला जातो. कारण ते दुर्बल असतात. जसे एखाद्यावेळी बैलाचा शंकरपट खेळला जातो. त्या शर्यतीमध्ये पहिला क्रमांक यावा म्हणून बैलांना मारले जाते. तसेच रेड्यांच्या टकरीमध्ये वा कोंबड्याच्या झुंजीमध्ये कोंबड्यांना, रेड्यांना इजा होत असते. तरीही त्याची पर्वा माणसांना नसते.
मुळात त्रास हा कोणीही कोणाला देत असतो. त्याचा भयंकर त्रास होत असतो लोकांना. परंतू त्रास देणा-यांना काही कोणाची पर्वा नसते.
मुळात असा त्रास कोणी कोणाला देवू नये. कारण असा त्रास सहन न झाल्यास अशा या त्रासातून आत्महत्याही घडत असतात. हे तेवढेच खरे आहे.

**********************************************

मंगेशलाही त्रास होतच होता. त्याचबरोबर त्याच्या शाळेतील कर्मचारी वर्गालाही. तो त्रास. जो संस्थाचालकाद्वारे त्यांना जाणूनबुजून दिला जात होता. हे केवळ पैशासाठीच होतं असं नाही तर त्यात संस्थाचालकाचा भ्रष्टाचार होता. आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठीही संस्थाचालक आपल्या या शाळेतील इतर शिक्षकांना त्रास देत होता. त्याला मुख्याध्यापक म्हणून घरचा व्यक्ती हवा होता. जो त्याचे पाप लपवेल. ती काळी कामं उजागर करणार नाही. यासाठीच तो त्रास देत होता.
सहा महिण्याचा आदेश. मंगेशचा परीविक्षा कालावधी संपलेला होता. त्यातच त्या कालावधीनुसार त्यानं पुन्हा परीक्षा दिल्यागत त्याला पुन्हा प्रभारी मुख्याध्यापक पदाचा आदेश मिळाला होता. ते प्रभारी मुख्याध्यापक पद. त्या पदाला संस्थाचालकासमोर काही किंमत नव्हती. पहिल्या वेळी वाटत होतं की हे काय मुख्याध्यापक पद. हे पद सहाच महिने तर आहे.
त्याचं बरोबर होतं. कारण ते पद नंतर मिळेलच याची काही शाश्वती नव्हती. परंतु सुदैवानं ते पद मंगेशला मिळालं. त्यातच मंगेशला आनंद झाला. परंतू या गोष्टीनं संस्थाचालक खजील झाला.
दुस-या वेळचं प्रभारी मुख्याध्यापकाचं पद मिळताच संस्थाचालक संस्थेअंतर्गत असलेल्या रेकॉर्डला मंगेशच्या सुपुर्द करु पाहात नव्हता. कारण तेही प्रभारीच पद होतं. तसा तो शिक्षणाधिकारी साहेबाला विनंती अर्ज करीत होता. परंतू त्या विनंती अर्जावर शिक्षणविभागातील अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरं देत. एक अधिकारी त्यावर म्हणत असे की झोडपा त्याला. त्यावर मंगेश थोडा वेळ गप्प राहात असे व काही वेळानं म्हणत असे की मी आज झोडपणार आणि मग तो मला सहा महिण्यानं झोडपणार. ते ऐकताच सर्व आजुबाजूचे हसत. त्यावर पुन्हा तो अधिकारी विचारायचा की ते कसं काय? त्यावर पुन्हा मंगेश उत्तर द्यायचा की सहा महिण्यानं माझं पद संपताच तो माझ्यावर वरचढ होणार.
दिवसामागून दिवस जात होते. मंगेशचं ते प्रभारी पद. त्यातच त्याला न मिळणारा शालेय रेकॉर्ड. शाळेची कामं करतांना भयंकर अडचणी येत होत्या. काय करावं सुचत नव्हतं. त्यावर कायदेच तसे होते.
कायदे........काही काही कायदे असे असतात की त्या कायद्याचा आजच्या घडीला काहीएक उपयोग नाही. कालापरत्वे ते कायदे बदलवायला हवे. परंतू कोण बदलणार व ते कायदे कसे बदलणार. प्रश्न असा निर्माण होतो की ते कायदे संसदेत मांडल्याशिवाय व त्यावर संसद सदस्यांचे एक तृतीयांश मतदान झाल्याशिवाय बदलवताच येत नाही.
पुर्वीच्या काळी कायदे हे लिखीत नव्हते. ते कायदे तोंडी असायचे. ते लागू करण्यासाठी चौकाचौकात दवंडी व्हायची. हा काळ राजेरजवाड्यांचा होता.
ज्यावेळी इंग्रज भारतात आले. त्यावेळी त्यांनीही कायदे आणले. त्या कायद्याचा विरोध महात्मा गांधीच्या नेतृत्वात भारतीयांनी केला. परंतू तो विरोध करतांना आंदोलन केली गेली. परंतू ही आंदोलनं पूर्णतः अहिंसात्मक मार्गानं. यावेळी काही व्यक्तीसमुदाय त्यांच्या अहिंसक आंदोलनाला थारा देत नसत. त्यांना वाटत असे की एखाद्या वेळी एखादा इंग्रज अधिकारी एखाद्या स्रीची अब्रू लुटण्यासाठी आल्यास तिनं अहिंसक मार्गाचा अवलंब केला तर तो अधिकारी तिची अब्रू लुटून नेईल. जर तिनं श्वासही रोखला तर ती मरणार नाही आणि बेशुद्ध होईल. तसेच तिनं जर आत्महत्या केली तर तिच्या वागण्याला अहिंसक वागणं म्हणणार नाही. अशावेळी तिनं एकतर प्रतिकार करायला हवा तोही हिंसक मार्गानं. तेव्हाच तो इंग्रज अधिकारी पळून जाईल. हे तेवढंच खरं होतं.
इंग्रजांनी बरेच कायदे आणले. सायमन कमीशन, रौलेट एक्ट, मीठावरील कर, दत्तक वारस नामंजूर इत्यादी अनेक कायदे. परंतू या सर्व कायद्याचा विरोध काहीही असो, महात्मा गांधीच्या अहिंसक मार्गातूनच झाला. त्यात अनेक बळीही गेले. परंतू या स्वातंत्र्याच्या आंदोलनात जर हिंसक मार्गाचा अवलंब करुन आपण लढलो असतो तर इंग्रजांसमोर आपण पुरलोच नसतो.
इंग्रजांनाही भारतीयांच्या आंदोलनापुढं झुकावं लागलं. त्यांनीही निर्माण केलेले कायदे बदलवले. कारण त्यात लोकं एकत्र आले. त्यांनी विरोध केला. म्हणून नाईलाजानं इंग्रजांना कायदे बदलवावे लागले आणि शेवटी भारतीयांना स्वातंत्र्य द्यावेच लागले.
आजही तसेच कायदे आहे. जे कायदे कालापरत्वे बदलविण्याची गरज आहे. जे कायदे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान बनवितांना घटनेत नमुद केले. ज्या कायद्याचा वापर करुन आजचे संस्थाचालक शिक्षकांना त्रास देतात.
शिक्षकांना काढून टाकण्याचा वा त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यावेळी संस्थाचालकांना देण्यात आला होता. कारण त्यावेळचे संस्थाचालक चांगल्या विचाराचे होते. त्यांना शाळेचं भविष्य सुधरंवायचं होते. त्यावेळी शाळेत कोणी नोकरी करायला धजत नसत. कारण शाळेत वेतन अत्यल्प राहायचं. त्यापेक्षा जास्त पैसा गावातील सामान्य शेतमजूरही कमवायचा. त्यामुळे शिक्षक नोकरी केव्हाही सोडत. असा शिक्षक केव्हाही नोकरी सोडून जावू नये तसेच शाळेत शिक्षक म्हणून लोकांना नोकरीला लावता यावे म्हणून संस्थाचालकांना नियुक्तीचे अधिकार होते. त्याअनुषंगाने संस्थाचालक जबरदस्तीनं प्रलोभन देवू देवू शिक्षकांना शाळेत आणत असे व तो त्याची नियुक्ती करीत असे. असा शिक्षक शाळेतून शाळा सोडून केव्हाही जावू नये म्हणून त्याला काढून टाकण्याचा अधिकार संस्थाचालकांना होता. शिक्षकांना संस्थाचालकाच्या मर्जीशिवाय शाळेतून निघता येत नव्हते. तेच मुख्याध्यापकाचीही नियुक्ती करतांना घडलं. मुख्याध्यापकाच्या नियुक्तीचाही अधिकार संस्थाचालकांना देण्यात आला. परंतू कुणावर अन्याय होवू नये म्हणून त्यात सेवाजेष्ठतेची अट ठेवली.
हळूहळू काळ बदलला. बदलत्या काळानुसार शिक्षक म्हणून नोकरी करणे ही शिक्षकांची गरजच झाली. त्यानुसार सर्व संस्थाचालकांनी याचा फायदा घेतला. त्यातच संस्थाचालकांनी या बदलत्या काळानुसार न बदललेल्या शिक्षकांबाबतीतील कायद्याचा फायदा घेतला. त्यातून संस्थाचालकांनी आपल्याच नात्यातील व्यक्ती सेवाजेष्ठतेची अट वगळण्यासाठी इतरांना धमक्या देवून आपल्याच नात्यातील मुख्याध्यापक बसवून वाममार्गाने भरमसाठ पैसा कमवला. तसेच मुख्याध्यापकही यातून पैसा कमवू लागला.
आज तेच कायदे बदलविण्याची गरज आहे. संस्थाचालकाने त्या वेळच्या कायद्याचा वापर करुन ज्या शिक्षकात गुणवत्ता नाही अशा लोकांची शिक्षक म्हणून आपल्या संस्थेत नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यात बरेचसे नातेवाईकच आहेत. तसेच मुख्याध्यापक म्हणूनही शाळेत बरेचसे नातेवाईकच आहेत.
खरं तर आज मुख्याध्यापकाची तसेच शिक्षकांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा शिक्षणाधिकारी महोदयांना असावा. कारण तोच शिक्षणक्षेत्रातील सरकारी जबाबदार घटक आहे. परंतू ती नियुक्ती करण्याचा अधिकार हा संस्थाचालकाला आहे. त्यामुळेच संस्थाचालक गैरवाजवी बनलेले आहेत. या गैरवाजवीपणातून शाळेत गुणवत्ताधारक व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती होत नाही. कोणीही व्यक्ती जो संस्थाचालकांना भरमसाठ वाममार्गाने पैसा देतो असा व्यक्ती शाळेत शिक्षक म्हणून लागतो. त्यामुळं त्या गुणवत्ताधारक मुलांचे नुकसान होते. यासाठीच सरकारनं आता टि ई टी-परीक्षा १३ फेब्रुवारी २०१३ पासून आणली. तरीही यात संस्थाचालकानं भ्रष्टाचार केला व त्यानंतरही त्यांनी शिक्षणाधिकारी साहेबांना मैनेज करुन दुसरीच नात्यातील मंडळी शिक्षक म्हणून भरली तसेच काहींच्या पैसे घेवून नियुक्त्या केल्या. यातून विद्यार्थ्यांची खरं तर गुणवत्ता मारली गेली.
आज ज्यांनी टि ई टी पास केली. त्यांना वगळून ज्यांच्या नियुक्त्या संस्थाचालकानं आपल्या संस्थेत केल्या. त्यांना त्यांनी टि ई टी पास करावी म्हणून संध्याही दिल्या गेल्या. परंतू जिथे गुणवत्ताच नव्हती. तिथे संस्थाचालकांनी नियुक्त्या केलेल्या व्यक्ती पास झाल्या नाहीत. त्यांचा खटलाही आज सुप्रीम कोर्टात आहे. तो खटला त्यांच्यासाठी अखेरची संधी आहे. कदाचित न्यायालयातून त्यांना नोक-या मिळतीलही त्यांची टि ई टी न तपासता. परंतू यातून जी मंडळी टि ई टी पास झालीत. परंतू त्यांना अजुनही नोकरी मिळाली नाही, त्यांचं काय? हा एक यक्षप्रश्न आज टि ई टी धारकांपुढं उभा आहे. जर या टि ई टी नसलेल्यांना नोक-या द्यायच्या होत्या, तर टि ई टी घेतलीच कशाला? हेही त्यांचं म्हणणं असेलच. तेव्हा हा खेळखंडोबा होण्यापुर्वी संस्थाचालकानं केलेल्या नियुक्त्या ताबडतोब निकाली निघाव्यात. जेणेकरुन टि ई टी धारकांना न्याय मिळेल व गुणवत्तेचा इथे विजय होईल.
खरं तर गुणवत्तेचा इथे विजय व्हावा. त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील तरी कायदे बदलविण्याची गरज आहे. आदर्श शिक्षकाबरोबरच शाळेत आदर्श मुख्याध्यापक असावा. त्यांची नियुक्ती ही शासनानं करावी. एक आदर्श अशी टि ई टी सारखी परीक्षा घेवून. मुख्याध्यापकाची तसेच शिक्षकांची नियुक्ती ही संस्थाचालकाच्या आधीन असू नये. संस्थाचालक म्हणेल तो मुख्याध्यापक. मुख्याध्यापक हा आदर्श असावा. ज्या जहाजाचा प्रमुख चांगला. ते जहाज पाण्यावर तरंगेल. तसेच शाळेतही आहे. मुख्याध्यापक चांगला असेल तर शाळेचा विकास होईल. अन्यथा नाही. जर अशी टि ई टी पात्र मंडळी शिक्षणक्षेत्रात आली तर विद्यार्थी विकास होईल. विद्यार्थ्यांपाठोपाठ शाळेचाही विकास होईल. शाळेपाठोपाठ राज्याचा व राज्यापाठोपाठ देशाचा. कारण प्रत्येक वर्गखोल्यातूनच देशाचं भवितव्य ठरत असते. म्हणून वर्गखोल्या चांगल्या असाव्यात. त्यातच त्यांना शिकविणारे शिक्षक........ ते जर आदर्श नसतील, टि ई टी पात्रता धारक नसतील तर कदाचित वर्गखोल्यांनाही ग्रहण लागेल. त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागेल. जसं सुर्याला लागते तसं...........
मंगेशला तसंच वाटत होतं की निदान शिक्षणक्षेत्रातील तरी कायदे बदलावे. जेणेकरुन देशाचा विकास होईल. त्यासाठी आधी मुख्याध्यापकाच्या नियुक्तीचा कायदा बनावा. त्यानंतर हळूहळू शिक्षकांच्या नियुक्त्यांचा. या सर्व नियुक्त्या कोण्या एका व्यक्तीच्या वा व्यक्तीसमुदायाच्या आधीन नसाव्या. त्या नियुक्त्या सरकारनं एक विशेष परीक्षा घेवून कराव्यात. ज्यातून शाळेला शिक्षकच नाही तर मुख्याध्यापकही आदर्श मिळेल. जेणेकरुन देशाचा विकास होईल.
अशीच ती भांडणं काळ हळूहळू सरकत होता. संस्थाचालकाला तो रेकॉर्ड मागत होता. परंतू ते त्याचं प्रभारी मुख्याध्यापक पद असल्यानं संस्थाचालकही त्याला शाळेचा रेकॉर्ड देत नव्हता. पोलिसस्टेशला तक्रार करावी तर ते कायमस्वरुपाचं पद नव्हतं. त्यातच काय करावं सुचत नव्हतं.
ते प्रभारी मुख्याध्यापक पद. ज्याठिकाणी कायमस्वरुपी पद होतं. त्या ठिकाणी ते कायमस्वरुपाचं पद प्रभारी म्हणून चालत होतं. त्यातच त्या पदावर असतांना काही करताही येत नव्हतं. शेवटी मंगेशनं या पदासाठी न्याय मिळविण्यासाठी खटला लढायचे ठरवले.
मंगेशनं पदाबाबतचा खटला न्यायालयात दाखल केला. त्यातच न्यायालयानं एक नोटिस संस्थाचालकाला दिला. त्यातच संस्थाचालकानंही त्याचं कसंबसं उत्तर पाठवलं व तारीख वर तारीख करीत खटल्याची सुनावणी सुरु झाली.
सुनावणी दरम्यानं संस्थाचालक न्यायालयालाही फिरविण्याचे काम करीत होता. तो प्रत्यक्ष कोर्टात जेष्ठ शिक्षकांच्या वैद्यकीय तपासण्या लावत होता की ज्या वैद्यकीय तपासण्या न्यायमंडळ ग्राह्य पकडत नव्हतं. त्यावर न्यायालय म्हणत होतं की प्रत्येकाला जगण्याचा व पदभार स्विकारण्याचा तसेच न स्विकारण्याचा अधिकार असतांना आपण शिक्षकांवर असे बंधन घालू नये. हे बंधन घालणे म्हणजे गुलामी निर्माण करणे आहे. त्यावर संस्थाचालक म्हणत असे की हे सर्व वरीष्ठ श्रेणीचे लाभ घेत आहेत. त्या वरीष्ठ श्रेण्या काढून घ्या. त्यावर न्यायालय म्हणत होतं की नोकरी करीत असतांना प्रत्येकांच्या सेवेचा मोबदला हा द्यावाच लागतो नव्हे तर देणं गरजेचं आहे. हा मोबदला कधी वेतनवाढ कधी वरीष्ठश्रेणी तर कधी निवडश्रेणीच्या माध्यमातून मिळत असतो. शिक्षकांची सेवा ही खरी देशसेवा असून ते संगळं सहन करुन तसेच चूप राहून कार्य करीत असतात. त्यातही आपल्यासारखी मंडळी त्यांना त्रासच देत असतात. ते जर नसते तर देश अंधारात राहिला असता. मग जगात कोणी न्यायाधीश, कोणी संस्थाचालक, कोणी डॉक्टर व कोणीच इंजीनियर बनला नसता.
अलिकडे शिक्षणाला फार महत्व आले आहे. परंतू शिक्षकाला तेवढे महत्व आलेले दिसत नाही. जो शिक्षक आपल्या हाडाचं, रक्तामासाचं पाणी करीत विद्यार्थ्यांना शिकवतो. त्या शिक्षकाला लोकं मात्र आज नावबोटं ठेवतांना दिसतात.
पुर्वी शिक्षकाला इज्जत मिळायची. त्यांचा विशेष असा रुतबा होता. त्या काळचे राजेही न्यायदान करतांना आपल्या न्यायदान प्रसंगी अशा शिक्षकांचा सल्ला देत. ते राजे शिक्षक म्हातारे होताच व त्यांना जेव्हा शिकवणं जमायचं नाही. तेव्हा त्यांची पदोन्नती करुन त्यांना दरबारात सल्लागाराची जागा देत. ज्या सल्लागाराला कोणतीच कामं नसायची. ते फक्त आणि फक्त सल्ला देत.
रामायणातील गुरु वशिष्ठाचा उल्लेख इथे आवर्जून करतो. त्यांनीच तरुणपणात रामासह त्याच्या तीनही भावंडांना शिकवलं व अंतिम समयी त्याला अयोध्येचा सल्लागार बनवलं गेलं. द्रोणाचंही कृपाचार्यचंही तेच झालं तसेच चाणक्याचंही तेच. चंद्रगुप्त राजा बनताच त्यानं चाणक्याच्या नीतीनुसारच राज्य केलं.
यामध्ये विशेष बाब अशी की ज्या राज्याचा सल्लागार चांगला असायचा. ते राज्य विकासात अग्रेसर राहिलं आणि ज्या राज्याचा सल्लागार चांगला नसायचा. ते राज्य लयास गेलं. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास महाभारताचं उदाहरण देता येईल. कौरव पांडव असे महाभारतातील दोन गट बरंच काही शिकवून जातात. एकाकडे गुरु द्रोण सल्लागार. ज्याने त्याला गुरु मानणा-या एकलव्याचा अंगठा कापून घेतला होता. ज्याने ध्रृपद राजाला हरवून अर्ध राज्य मागून घेतलं होतं. त्याची बुद्धी कशी असेल हे यावरुन दिसते. हा कौरवाचा सल्लागार होता. तसाच दुसरा कौरवाचा सल्लागार होता शकूनी. ज्याचा शब्द न् शब्द दुर्योधन ऐकायचा. तो जे सांगेल ते सर्व. मग त्या सल्ल्यात तथ्य असायचं असं नाही. अशा दोन गुरुंच्या भरवशावर कौरवांचा कारभार चालत राहिला. त्यातच क्रिष्ण.......विरुद्ध गटाचा सल्लागार अर्थात पांडवांचा सल्लागार. त्यानं अर्जूनाचं सारथीपणंही केलं. यामध्ये त्यानं पांडवांना चांगलेच सल्ले दिले. त्याची परीयंती अशी झाली की कौरव संपले. परंतू पांडव तरले आणि पुढे हस्तीनापूरच्या राजगादीवर विराजमान झाले.
आजही आपण चोल, चंदेल, राष्ट्रकुट, पल्लव, मगध, गुप्त, वर्धन यांचे राज्य पाहतो. ती राज्य त्यांच्या त्यांच्या काळात भरभराटीस होती. त्याचे कारण त्यांचे त्यावेळचे सल्लागार. जे सल्लागार त्यांच्या पुर्वाश्रमीच्या आयुष्यात शिक्षकच होते. हळूहळू काळ बदलला व राजे सल्लागार म्हणून कालांतरानं शिक्षक नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती करु लागले.
आपण सगळे अकबर बिरबलाच्या कथा आवडीने वाचतो. अकबर कोण होता व बिरबल कोण होता हे सर्वांनाच माहित आहे. तसेच क्रृष्णदेवराय व तेनालीरामही आपल्याला माहित आहे. त्यातच पेशवे आणि फडणवीस. ही सर्व राजघराणी. त्यांनी या देशातील राज्यात बरेच दिवस राज्य केलं. त्याचं कारण म्हणजे त्यांचे सल्लागार. जे चाणाक्ष होते आणि ते शिक्षकामधून आले होते.
आजही शिक्षकांना तेवढं ज्ञान आहे. हा शिक्षक वेळप्रसंगी आजही आपल्या स्वतःसाठी जगत नाही तर तो आजही दुस-यांसाठीच जगतो. परंतू त्याच्या जगण्याला आजही किंमत नाही. खरा आदर्श शिक्षक हा आपली मुलं हुशार बनविण्याऐवजी आपल्या विद्यार्थ्यांना हुशार बनविण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. शिक्षक जर नसते तर आज कोणीही डॉक्टर, इंजीनियर बनू शकले नसते. त्यातच न्यायदान करणारे न्यायाधीशही एवढंच नाही तर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही कोणी बनू शकले नसते.
वरील सर्व घटक जे कोणी बनवतात. ते घटक बनविणारा शिक्षक. आज त्या शिक्षकाचीच हेळसांड होतांना दिसत आहे. वास्तविकता अशी आहे की आज शिक्षणाला महत्व आलं आहे. परंतू शिक्षकाला नाही.
शिक्षक असं व्यक्तीमत्व की ज्यानं या कोरोनाच्या संकटकाळातही स्वतःला सुरक्षीत ठेवलं नाही. त्याने शासन म्हणेल त्या त्या ठिकाणी नोक-या केल्या. कधी पेट्रोल पंपावर तर कधी नाक्यावर. कोरोनाच्या या संकटकाळात देशाला उभारी देण्याचेही कार्य याच शिक्षकाने केले. एवढेच नाही तर आपला जीव धोक्यात घालून या शिक्षकाने विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी जावू जावू शिकवले. हं, मानतो की या कोरोनामध्ये विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतू तरीही ते होवू नये म्हणून शिक्षकांनी ऑनलाइन अभ्यास पाठवला. तसेच त्यासाठी त्यांनी त्यांनी यु ट्यूब, गुरुमाऊली, दिक्षा तसेच इतरत्र शोधून वा स्वतः मेहनत करुन व्हिडीओ बनवलेत व ते व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठवले.
या काळात शिक्षकांनी तोलामोलाची कामगीरी केली. हं, लुटलं कोणी तर मोबाइल कंपन्यांनी. त्यांनी मुलं अभ्यास करतात म्हणून याच काळात नेट शुल्क कमी करायला हवं होतं वा माफ करायला हवं होतं. परंतू त्या कंपन्यांनी ते शुल्क माफ केले नाही. उलट त्यात वाढ केली. त्यामुळं आधीच लाकडाऊनमुळं बेरोजगार ठरलेली माणसं त्यातच मोबाईल कंपन्यांचं वाढलेलं शुल्क. त्यामुळे तर विद्यार्थी वर्ग सुरक्षीत नाही. त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होणारच.
त्यामध्ये लोकं त्या मोबाईल कंपन्यांना जबाबदार पकडणार नाही. जबाबदार इथेही शिक्षकच पकडला जातो आणि त्याचेवरच ताशेरे ओढले जातात.
महत्वपूर्ण वस्तुस्थिती अशी की ज्या देशाचे शिक्षक आदर्श असतील. तो देश आदर्श म्हणून गणला जातो. तसेच विशेष सांगायचं म्हणजे ज्या देशाच्या प्राथमीक विभागाच्या शाळा चांगल्या असतील. त्या शाळा दर्जेदार शिकवीत असतील तर तो देशही विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जातो. कारण योग्य नागरीकत्वाचे बाळकडू हे प्राथमीक शाळेतच मिळत असते. जे बाळकडू इतरत्र मिळत नाही. ज्याप्रमाणे बाळाचा किंवा प्राण्यांचा जन्म होताच आईच्या वा प्राण्यांच्या पहिल्या दुधात जी प्रतिकारशक्ती असते. ते दूध प्राशन केल्यानं जगातील कोणतेच आजार आपल्याला बळावत नसतात. अलिकडे तेही पाजत नाही. तर ते शुद्ध नाही म्हणून फेकून देतात. तीच स्थिती अगदी प्राथमीक वर्ग शिकणा-या बाळाची असते. प्राथमीक वर्ग म्हणजे आईचं पहिलं दूध असतं. तिथे जन्म देणारी आई असते. इथे शिक्षणरुपी आई असते. पण त्याच शिक्षणरुपी आईचं शिक्षणरुपी दूध पेल्यास वा प्राशन केल्यास जगात कोणालाही घाबरावं लागत नाही.
मुळात शिक्षक हा सल्लागार बनण्यालायकच असतो. कारण त्याला फार मोठे शिकविण्याचेच नाही तर आयुष्यातील अनुभव असतात. त्यांचा सन्मान हा आपला सन्मान असतो. त्याचा अपमान आपला अपमान असतो. म्हणून शिक्षकांचा आदर करावा. त्यास सन्मान द्यावा. जेणेकरुन आपला तर विकास होईलच. व्यतिरीक्त आपल्या विद्यार्थ्यांचाही होईल. त्याचबरोबर आपल्या देशाचाही होईल यात काही शंका नाही. कारण शिक्षकच देशाचा विकास करतो. तोच नसेल तर देशातील लोकं शिकू शकणार नाही व त्यातून कोणीच खासदार आमदार तसेच पंतप्रधान, राष्ट्रपती बनू शकणार नाही आणि ते जर नसतील तर देशाचाही विकास होणार नाही.
सुनावणी झाली होती. त्यातच सुनानणीत न्यायाधीशांनी संस्थाचालकाला चांगले खडसावले होते. संस्थाचालक न्यायाधीशाच्या खडसावण्यानं खजील झाला होता. परंतू त्याला त्याचं वाईट वाटत नव्हतं.
सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले की मंगेशचं बरोबर आहे. तो मुख्याध्यापक पदाचा दावेदार आहे. त्याचेआधी असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांनी पदाबाबत पद न स्विकारण्याचं लिहून दिलं आहे. त्यानुसार माझा स्पष्ट आदेश आहे की आपण संस्थेचे पदाधिकारी या नात्यानं मंगेशच्या नावाचा ठराव बनवावा व तो ठराव शिक्षण विभागात पाठवून मंगेशच्या नावानं मुख्याध्यापक पद आणावं. जेणेकरुन शाळा व्यवस्थीत चालेल.
न्यायाधीश महोदयानं दिलेला निकाल. त्यातच शिक्षणविभागालाही दिलेले स्पष्ट आदेश. त्यामुळं की काय, आज मंगेश त्या शाळेचा मुख्याध्यापक बनला होता. आता ती शाळा विकास पावली होती. कारण मंगेश नवनवीन उपक्रम राबवीत होता. मात्र आज तोच त्या शाळेचा संस्थाचालक शाळेत भटकत नव्हता. जणू त्याला कोर्टाचा धाक होता की मंगेशचा ते कळत नव्हते.
शाळा नावारुपाला आली होती. त्या शाळेतून विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेत चमकत होते. त्यातच विद्यार्थी मंगेशचं नाव घेत होते.
आज मंगेशचा शाळेतील शेवटचा दिवस होता. तो निवृत्त होत होता. त्यातच सर्व शिक्षक दुःखी झाले होते. त्यासोबतच विद्यार्थीही. कारण त्यानं जे कार्य केले होते, ते कार्य इतरांना लाजवेल असेच होते.
मंगेशला आज निवृत्त होतांना ते सर्व गतकाळातील दिवस आठवत होते. त्यानं केलेला संघर्ष. त्याला मुख्याध्यापक होत असतांना झालेला त्रास. त्यातच तो लढलेला खटला. सारं काही आठवत होतं. त्यानं जो संघर्ष केला होता. ज्या संघर्षातून आज शाळा नावारुपाला आली होती. ते सर्व आज आठवत होते अन् आठवत होता तो संस्थाचालक. आज तो जीवंत नव्हता शाळेतील बदललेलं स्वरुप पाहण्यासाठी. आज त्या शाळेच्या रोपाचं रुपांतर वृक्षात झालं होतं आणि त्याला पारंब्याही फुटल्या होत्या.

*********************************************************************************************************

मंगेश आता निवृत्त झाला होता. त्याचा निवृत्तीचा काळ सुखात कटत होता. तशा त्याला जुन्या आठवणीही सतावत होत्या. त्यानं आपल्या अख्ख़्या हयातीत चांगली कामं केली होती. त्याला वाटत असे की लोकांनी चांगलं कर्म करावं. त्याचं फळ चांगलंच मिळेल. त्याच्या मतानुसार प्रत्येकानं आपलं वागणं सुधारण्याची गरज होती. तो म्हणत असे.
"काही काही माणसं अशी असतात की त्यांच्यासमोर कितीही वाईट परीस्थीती आली तरी ते हिंमतीनं सामोरे जातात. विपरीत परीस्थीतीत स्वतःचा तोल जावू देत नाहीत. तर काही माणसं अशी असतात की जे विपरीत परीस्थीती येताच आपला तोल ढासळतात. काही माणसं हे क्षणीक सुखाचे भागीदार असतात. अशी माणसं ही चापलुसी करीत असतात. संभवतः जसे दिवस आले. तसा आपला लबाडीपणा दाखवतात. व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचा स्वभावगुण ठरलेला असतो. त्या त्या स्वभावानुसार ते तसे बदलत असतात. महत्वाचं म्हणजे प्रत्येकानं आपलं वागणं सुधारण्याची गरज आहे.
काही माणसं अशीही असतात की जे थोडंसं संकट आलं की घाबरुन गप्प पडून राहतात. ते संधीची वाट पाहात असतात. ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस येतो. त्याप्रमाणे संधी तशी चालून आलीच की मग ते आपला स्वभावगुणही बदलवीत असतात. आज त्याच स्वभावगुणानुसार माणसाच्या स्वभावाला प्राण्यांचे नाव दिले आहे. जसे माकडासारखा हसतो. वाघासारखा डकरतो. हरणासारखा चालतो. सशासारखा पळतो. कासवचालीचाच आहे हा.......वैगेरे वैगेरे.
काही माणसं संकट जाताच व परीस्थीती समतोल होताच असे बदलतात की ज्यांना वाटते शेतातील मालक मरण पावला. आता उस मुळासकटच खायला हवा. तसेच काही लोकांना वाटते की सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारुनच पाहायला हवी. म्हणजे हिच्या पोटात जास्त अंडी दिसतील. याबाबत एक उदाहरण देतो.
एक शाळा. त्या शाळेचा मुख्याध्यापक हा अतिशय त्रास देणारा होता. तो एवढा त्रास द्यायचा की त्याचा त्रास सहन होत नव्हता. त्यातच त्याचं वागणं पाहून सगळे शिक्षक घाबरलेले असायचे. कारण तो मुख्याध्यापक शिक्षकांचे वेतनच बंद करायचा.
काळ हळूहळू सरकला. या बदलत्या काळात त्याला अपघात झाला व तो मरण पावला. बदलत्या काळानं त्याचा जीव घेतला. कारण त्याच्या कर्मानं त्याचा हिशोब केला होता नव्हे तर त्यानं केलेले एकशे एक गुन्हे पुर्ण झाले होते.
गतकाळातील मुख्याध्यापक मरण पावला होता. तो अपघातानं मरण का पावेना. परंतू त्याच्या मरण पावल्यानं शिक्षकांची व संस्थाचालकाची चांदी झाली. त्यातच संस्थाचालकालाही वाटलं की आपण आता मोकळे झालो. आता आपल्याला कोणीच अडवू शकत नाही.
दिवंगत मुख्याध्यापक तसा क्रुरकर्माच होता. तो ज्याप्रमाणे शिक्षकांचे वेतन बंद करायचा. त्याचप्रमाणे तो संस्थाचालकालाही मोजत नव्हता. संस्थाचालकाला तर शाळेत पायच ठेवू देत नव्हता. शेवटी संस्थाचालकानं त्याच्या मरणापर्यंत शाळेत पायच ठेवला नाही.
जेव्हा तो मुख्याध्यापक मरण पावला. त्याच्या मरणानंतर संस्थाचालक मोकळा झाला. त्यानं त्या मुख्याध्यापकाची जागा घेतली. त्यातच त्याच्या शिक्षकांना धमक्या सुरु झाल्या. त्या धमक्यामध्ये अख्खी शाळाच गारद व्हायला लागली. जणू त्याची अवस्था उसाचा मळा पाहणा-या पांथस्थासारखी झाली. त्याला वाटलं की आता उसाचा मालक मरण पावला. आपण आता या मळ्यातील अख्खा उसच मुळासकट खावा. तसाच तो वागू लागला.
ज्याप्रमाणे संस्थाचालकाचा स्वभाव बदलला. त्याप्रमाणे त्या शाळेतील शिक्षकांचाही स्वभाव बदलला. ते शिक्षकही त्या मुळाचा उस खाणा-या पांथस्थासारखेच वागू लागले.
विशेष सांगायचं म्हणजे दुःखानंतर सुख येतं. सुखानंतर दुःख. तेव्हा सुख जर आलं तर हुरळून जावू नये आणि दुःख जर आलं तर लाजू नये. या अर्थाची एक म्हणही आहे. आपल्या पुर्वजांनी अशा काही म्हणी निर्माण केल्या. त्या सोचून समजूनच आणि त्या त्या परीस्थितीनुसार. तशीच एक म्हण अशीही बनवली की उस गोड लागला, म्हणून मुळासकट खावू नये. ते खरंही आहे. कारण असा जर मुळासकट उस खाल्ला तर एखाद्या वेळी त्या उसाची मुळं रुतून घशाला समस्या निर्माण होवू शकते. ही बाब लक्षात घेवून प्रत्येकानं आपलं वागणं सुधरायला हवं. त्या त्या परीस्थीतीनुसार कधी आनंद आलाच तर माजू जावू नये आणि दुःख आलंच तर लाजू नये. तो आनंद आणि ते दुःख पचविण्याचीही ताकद आपल्यात निर्माण करावी. तेव्हाच आपण जीवनात यशस्वी होवू शकतो. आनंद आणि दुःख शिशिरानंतर वसंत व वसंतानंतर जसा ग्रीष्म येतो. तसे येत असतात किंवा जसा रात्रीनंतर दिवस येतो व दिवसानंतर रात्र. तशा येत असतात. अशा परिस्थीतीत जे आपले विचार बदलवीत नाही. तेच तरुन जातात. तेव्हा प्रत्येकानं आपलं वागणं सुधरवायला हवं आणि त्यानुसार स्वतःला समर्पीत करायला हवं. जेणेकरुन आपल्यासमोर संकट आलंच तर निराशा येणार नाही आणि आनंद आलाच तर तो पचविताही येईल."
हे बोलतांना तो भारावून जायचा. कारण त्यानं तीच परिस्थीती भोगली होती. तो लोकांना अशाच स्वरुपाचं मार्गदर्शन करायचा. जे भोगलं, ते तो सांगायचा. परंतू त्यात आपले नाव समोर करीत नव्हता.
तो निवृत्त झाला असला. तरी तो स्वस्थ बसला नाही. आपण जे भोगलं. तसं कोणी भोगू नये असं त्याला वाटत होतं. त्यामुळं की काय, तो आता लोकांना मार्गदर्शन करु लागला होता.
त्याला चुका करणारे लोक आवडत नव्हते. त्यातच त्याला कोणी जाणूनबुजून जे चुका करायचे ते आठवत होते.
निवृत्तीनंतरचा काळ. कामं काहीच नव्हते. त्यातच या काळात केवळ आणि केवळ जुन्या गोष्टी आठवणे याशिवाय दुसरी कोणतंच कामं नव्हती.
मंगेशला कोंबड्या, बक-या आवडत नव्हत्या. त्यातच त्याला कोंबड्या, बक-या पाळणा-या लोकांचा राग यायचा. त्याला वाटत असे की एक कोंबडी माणसाला गुन्हेगार बनवू शकते.
एक कोंबडी गुन्हेगार निर्माण करु शकते. हे त्याचं म्हणणं आणि मानणं खरं होतं. कारण अलिकडेच नाही तर पुर्वीपासून कोंबडे बकरे पालनाचा व्यवसाय आहे. त्यातच कित्येक वर्षापासून कोंबड्या बक-यांना कापून लोकं आपल्या जीभेचे चोचले पुरवीत असतात. कोंबड्यांना कापणारा वा बकरीला कापणारा गृहस्थ, त्यांना कापतांना त्या मुक्या जीवांनाही जीव असतो हे विसरतो आणि करकर कापत असतो. अशी ही कोंबडी गुन्हेगार निर्माण करीत असते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
कोंबड्या बक-याला कापणारा हा गुन्हेगार असतो. कारण ज्याप्रमाणे माणसाचा खुन करणे हा गुन्हा आहे. तसं कोंबडी बकरी कापणंही गुन्हाच आहे. परंतू अशा गुन्ह्यात माणूस मरण पावला, तर त्याची नोंद होते. तशी कोंबड्या बक-याचा जीव घेणा-यांची नोंद होत नाही. आज सर्रासपणे ही जीवं कापली जातात.परंतू त्याचा कोणीही विरोध करीत नाही. याबाबतीत काही लोकं म्हणतात की जर आपण त्यांना कापलं नाही तर उद्या त्यांची संख्या वाढेल व ते माणसावर भारी होवून माणसालाच मारुन खातील. म्हणून नाईलाजानं कापावं लागतं.
आज कोंबड्या बक-यांना कापण्यासाठी विकून लोकं भरमसाठ पैसा कमवीत आहेत. काही लोकं यात धंदाही करीत आहेत. परंतू यात काही लोकं वेगळ्याच स्वरुपात कोंबड्या बक-यांचा वापर करुन धंदा करतात. ते स्वरुप वेगळं असतं. परंतू त्यामुळं कोंबड्या बक-यांच्या हत्येची नोंद होत असते.
रस्ता.......रस्त्यावरुन दिवसरात्र रहदारी सुरु असते. अशी रहदारी सुरु असतांना काही लोकं आपल्या कोंबडीला लोकांच्या गाडीच्या खाली फेकतात व त्यातून माझ्या कोंबडीच्या अंगावर गाडी चढवली. मी तुमची तक्रार पोलिस स्टेशनला टाकतो. अशी धमकी देत अशा स्वरुपाचे लोकं जाणा-या येणा-यांकडून पैसा उकळत असतात. अशी टोळी ब-याच ठिकाणी आता सक्रीय झालेली असून ती एक कोंबडी जो गुन्हेगार नाही, त्याला गुन्हेगार बनवीत असते. कारण यामध्ये जर त्या गाडीचालकाचा गुन्हा असो वा नसो, तो घाबरुन पैसे देत असतो. काही लोकं असे पैसे देत नाहीत. नव्हे तर ते पैसे द्यायला मनाई करतात.यातून मग मारामा-याही होतात. त्यातच खूनही होवू शकतात. अलिकडे हा प्रकार जास्त प्रमाणात वाढत चाललेला असून एक लहानशी कोंबडी तिचं प्रकरण निपटवीत असतांना फुकटचं लचांड आपल्या मागं लागू नये म्हणून काही लोकं त्या कोंबडीवाल्याला त्या कोंबडीच्या रकमेएवढे पैसे देवून देतात व पुटपुटत निघून जातात. समजा यामध्ये त्या कोंबडीचे पैसे मिळाले नाही आणि कोंबडी मरण पावली. तसेच कोंबडी ज्यांच्या गाडीत आली. त्या गाडीवाल्याची आपल्याच ओळखीची काही माणसं साक्षीदार पकडून तक्रार केली जाते. त्यातच जो गाडीवाला गुन्हेगार नसतो. त्याला जबरदस्तीनं गुन्हेगार ठरवलं जातं.
एक याबाबतीतील प्रकरण त्याला आठवत होतं. गोष्ट जुनी होती. मंगेशच्या गावाकडील एक गोष्ट. त्या व्यक्तीचं नाव रमेश होतं. तो रोजच त्या रस्त्यानं जायचा. रोजच यायचा. व्यक्ती श्रीमंत होता. त्यातच त्या रस्त्यावरील एका व्यक्तीनं ठरवलं. आपण याच्याकडून पैसे उकळायचे. जसं त्या व्यक्तीनं मनात विचार केला. तशी त्यानं ती योजना कार्यान्वीत केली. एक दिवस त्यानं कोंबडीला धागा बांधला. त्या धाग्याचं एक टोक आपल्याजवळ ठेवून त्यानं ती कोंबडी त्याच्या गाडीखाली जावू दिली. त्यातच दोनचार घराजवळचे साक्षीदार पकडून त्याची तक्रार पोलिसस्टेशनला करतो म्हणून त्याचेकडून पैसे उकळले.
ती कोंबडी. त्याचे पैसे कमवायची साधनच ठरली. त्याला पैसे मिळताच त्याची हिंमत वाढली व तो आता ब-याच लोकांना अशाप्रकारे त्रास देवू लागला. काहीजणं अगदी घाबरुन जावून कोंबडीचे पैसे देवू लागले. तर काही मुजोरीही करु लागले. त्यातच ते प्रकरण व त्यातील सत्य माहित असलेला तो रमेश नावाचा गावाकडील व्यक्ती. त्याच्याही बाबतीत असंच घडलं. त्यातच मंगेशच्या गावाकडील व्यक्तीला राग आला व त्यानं त्या व्यक्तीचा खून केला.
जाणा-याचा जीव गेला. कोंबडी जागच्या जाग्यावर राहिली. हे असे का घडले असावे? सर्वजण विचार करु लागले. त्यातच कोणीतरी म्हणाला, 'जी कोंबडी तो फेकायचा. तिला अतिशय वेदना होत. ती घाबरायची. कधी कधी तिला यात लागतही असेल. त्यातच तिच्या तोंडातून शापही निघत असेल. ती म्हणत असेल, मरो जावो बकरा.' ती मुकी होती. शेवटी जे व्हायचं तेच झालं. ज्या कोंबडीचा छळ झाला. ती कोबडी जगली आणि ज्यानं छळ केला. तो मरण पावला. परंतू तो मरण पावला खरा. पण त्यानं त्या कोंबडीला हाताशी धरुन एक निर्दोष गुन्हेगार निर्माण केला होता. ती कोंबडीच आज त्या गुन्ह्याला घडविणारी नायक ठरली होती. ही घटना मंगेशला माहित होती. म्हणून तेव्हापासूनच त्याला कोंबड्या, बक-याचा राग यायचा. तसेच ते पाळणा-यांचाही राग येत असे. त्यातच तो म्हणत असे.
"समाजात अशी अनेक मंडळी असतात की जी अशी कोंबडी फेकण्यासारखं वर्तन करीत असतात. आपण जरी भांडखोर नसलो तरी ते भांडायला मजबूर करीत असतात. त्यातच त्यांच्या भांडणातून आपल्यासारखी निर्दोष माणसंही गुन्हेगार बनत असतात. म्हणून वेळीच सावध झालेले बरे!"
मंगेश एकदा वर्तमानपत्र वाचन करीत बसला होता. त्यातच एक वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित झाली होती. बातमी होती, जपानमध्ये एक व्यक्ती भाडेतत्वावर मिळतो.
भाडेतत्व........ एक विचारणीय तत्व. भारत देशात अशा गोष्टी आश्चर्य करणा-या नव्हत्या. त्यामुळं मंगेशला ती बातमी वाचून आश्चर्य वाटलं नाही.तो ती बातमी वाचून विचार करीत होता.
'आमच्या भारत देशात भाडेतत्वावर सगळंच मिळतं. घर, बस, कार, बैलगाडी, एव्हाना सायकल आणि माणसंही. माणसं मिळतात भाडेतत्वावर, परंतू ती माणसं काम करण्यासाठी........मनोरंजन करण्यासाठीदेखील माणसं मिळत असतात. परंतू जपान नावाचा तो देश. त्या देशात असाही तो व्यक्ती की तो केवळ मनोरंजनासाठी भाडेतत्वावर येतो. शोजी मोरिमोटो असं त्याचं नाव. तो टोकियोमध्ये राहतो. तो भाडेतत्वावर येतो व बदल्यात त्याचा मोबदलाही घेतो. तिथं कदाचित भाडेतत्वावर लोकं जात नसतील. कारण सगळी कामं मशीन करतात. त्यामुळं त्यांना तसं आश्चर्य वाटणं साहजीक आहे.
आज अशी भाडेतत्वावर मिळणारी माणसं काही कमी नाहीत. परंतू ती माणसं कामे करण्यासाठी मिळतात आणि मनोरंजनासाठीही या देशात मिळतात.
अलिकडे जीवनात निरसता आहे. कोणी कोणाला आनंद देवू शकत नाही. कारण त्यांच्याजवळ पुरेसा वेळच नसतो. महागाई वाढली आहे. या महागाईचा सामना करीत असतांना माणसाला नैराश्यपण येतं आणि त्या नैराश्येतून पुढे आत्महत्या.
मनोरंजन ही माणसाच्या आयुष्य जगण्याची एक पुरवणी आहे. मनोरंजन जर नसेल तर ते आयुष्य निराशामय होवून जातं. जीवनात मनोरंजकता आणण्यासाठी माणूस धडपडतो. कारण अलिकडला काळच तसा आहे. माणूस कोणाच्या वाट्याला जरी जात नसेल, कोणाशी भांडण करु जरी इच्छीत नसेल, तरी भांडणं होतात. ती भांडणं विनाकारण असतात. ज्या भांडणातून काहीच निष्पन्न होत नाही. कोणी त्याला नशीबाचा भाग समजतात. तर कोणी त्याला नशीब समजत नाही.
अलिकडे मनोरंजनासाठी लोकं चित्रपटगृहाचा आधार घेतात. कोणी सर्कशीचा तर कोणी बागेचा. लोकांच्या मनोरंजनासाठी सरकारनं बागेची सुविधा करुन दिलेली आहे. तसेच गोव्यासारख्या ठिकाणी मनोरंजनासाठी कसीनोही उघडं करुन दिलं आहे. या कसीनोत मनोरंजन करीत असतांना कित्येक करोडो रुपयाचा जुवा खेळला जातो. त्यातच लाटरी, डान्सबारलाही तिथे उघडपणे सुट दिली आहे. दारुला तर अजीबात बंदीच नाही. अवघ्या देशातील एकंदर राज्यांपैकी या राज्यात दारु स्वस्त आहे. ह्या सर्व साधनांना गोव्यात बंदी नाही. त्याचं कारणही आहे करमणूक. करमणूकीनं आपल्या मनातील नैराश्येची मरगळ दूर होते. तसेच अशा प्रकारच्या मनोरंजक सोयीमुळं लोकं आपलं नैराश्यपण विसरतात. नैराश्येतून आत्महत्या करीत नाही.
सर्कशीत विदूषक आपल्याला हसवतात. हे आपण पाहिलं आहे. परंतू जो हसवतो तो किती दुःखी असतो अंतर्मनात हे आपल्याला माहित नाही. मेरा नाम जोकर नावाचा चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याला हे सगळं कळेल. या चित्रपटात त्या विदुषकाची आई मरण पावलेली असते. तरीही तिकीटं विकली गेल्यानं त्याच्या मालकाला तो खेळ रद्द करता येत नाही. शेवटी आईचं प्रेत तसंच ठेवून तो सर्कशीत उतरतो. तो सर्कशीतून मनोरंजन करतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यात एवढंसंही दुःख नसतं. यामध्ये हे लक्षात घेण्यासारखं आहे की हा चित्रपट आहे. परंतू ख-या जीवनातही असंच घडतं. ख-या जीवनात जे कलावंत काम करतात. ते कलावंत आपल्या मायबापापासून बरेच लांब असतात. परीवारापासूनही लांब असतात. कदाचित सर्कशीत काम करीत असतांना त्यांच्या परीवारातील कोणाचा ना कोणाचा मृत्यू होतो. परंतू त्याही वेळी त्याला जाता येत नाही. ते केवळ आणि केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी जगत असतात. तेही भांडेतत्वावर.
भारत देश........हा देश संस्कृती प्रदान देश आहे. या देशात मनोरंजनालाही संस्कृतीची झालर आहे. काही काही आदिवासींमध्ये उत्सवाच्या प्रसंगी नाचगाणे होतात. कधी हे नाचगाणे रोपे लावणीवेळी तसेच पीक काढण्याच्या वेळी होतात. यावेळी परीवारातीलच नाही तर गोटूलातील सर्व लोकं थोडी थोडी दारु प्राशन करीत असतात आणि सोबत सोबत नृत्य करीत असतात. परंतू ते सर्व नृत्य संस्कृतीला धरुन संयम ठेवून असतं. अर्धनग्न अवस्थेतील नृत्य नसतं. विदेशात मात्र मनोरंजनासाठी नृत्याचा प्रकार वापरला जातो. या ठिकाणी नृत्यात अर्धनग्नतेचा समावेश होतो. कारण तेथील वातावरण. तेथे दमट वातावरण आहे. ज्या वातावरणानं शरीरावर कपडेच सहन होत नाही. परंतू गोव्याचा विचार केल्यास भारतातही तो प्रकार आता रुढ होवू लागला आहे. परंतू या प्रकाराला गोवा जर सोडला तर बाकी ठिकाणी बंदी आहे. कारण ती आपली संस्कृती नाही. तरीही लपूनचोरुन आजही देशात असे नृत्य भरवले जातात आणि देशाच्या संयमी आणि शिस्तप्रदान संस्कृतीचे धिंडोळे उडवले जातात.
आज याच मनोरंजनाचा विचार केल्यास ज्याप्रमाणे जपानमध्ये शोजी मोरिमोटो नावाचा व्यक्ती लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जातो. तो त्याचा मोबदला घेतो. तशी भाडेतत्वाची सोय याही देशात आहे. परंतू त्याला राजमान्यता नाही. ह्याच भाडेतत्वाचा विचार केल्यास काही कवी मंडळी मनोरंजन करण्यासाठी जातात. ते भाडेतत्वच आहे.
मनोरंजनाचा विचार केल्यास मनोरंजनाचे दोन प्रकार दिसतात. पहिला प्रकार म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी मनोरंजन आणि दुसरा म्हणजे वाईट गोष्टीसाठी मनोरंजन. चांगल्या मनोरंजनाचा विचार केल्यास कवींचं भाडेतत्वावर जाणं. त्यांनाही मोबदला दिलाच जातो. ते भाडेतत्वच असतं. तसेच वाईट गोष्टीसाठी मनोरंजन म्हणजे एखाद्या नर्तकीला भाडेतत्वावर मनोरंजनाची स्विकृती देणं. पुर्वीचे राजेही अशाप्रकारचं मनोरंजनासाठी भाडेतत्व वापरत असत. त्यांच्या काळात विशिष्ट असा रंगमंच असायचा. याला कलादालन म्हणत. या कलादालनावर राजनर्तकी आपल्या राज्यातील राजे व मंत्रीगणाच्या मनोरंजनासाठी नृत्य करीत असत. बदल्यात तिला पैसे देत. यामध्ये विशेष नाव म्हणजे आम्रपाली हे नाव उल्लेखनीय आहे. तसेच ज्याला आपण दंतकथा म्हणतो. त्या इंद्राच्या दरबारी असलेल्या रंभा, उर्वशी, मेनका आणि तत्सम ज्याला आपण अप्सरा म्हणतो. त्याही अशाच भाडेतत्वावरील असतील हे नाकारता येत नाही.
जपानमध्ये शोजी मोरिमोटो नावाचा एक माणूस मनोरंजनासाठी जाणे म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. असे अनेक देश मनोरंजनासाठी आपल्या देशातील कितीतरी माणसांचा वापर मनोरंजनासाठी करीत असतात हे सांगणे विशेष.
आताची परिस्थीती लक्षात घेता ज्याप्रमाणे पुरुष मनोरंजनासाठी स्रियांचा वापर करतात. त्याचप्रमाणे महिलादेखील मनोरंजनासाठी पुरुषांचा वापर करीत असल्याचे दिसते. एखाद्या स्रीला घरी करमत नसेल तर ती स्री आपल्या फोनद्वारे पुरुषांना बोलावते व त्याच्याकरवी आपलं मनोरंजन करुन घेते. अर्थात त्याचेसोबत फिरायला जाते. चित्रपट बघते. सर्कशीही पाहते. सायंकाळी पती घरी येण्याच्या वेळेवर ती घरी येते. परंतू ही गोष्ट जेव्हा तिच्या पतीच्या निदर्शनात येते. तेव्हा त्यातून घटस्फोट, आत्महत्या आणि खुनासारखे प्रकार होतात. पुरुषही मनोरंजन करण्यासाठी एखाद्या स्रीला बोलावतात नव्हे तर तिच्याबरोबर रासलीला मनवतात. तेही प्रकरण जेव्हा त्याच्या पत्नीला कळतं. तेव्हाही समस्या उद्भवतात.
विशेष म्हणजे घरी पत्नी असतांना पुरुषांनी अशी स्री बोलावून मनोरंजन करु नये. मनोरंजन करायचे असेल तर आपल्या पत्नीसोबतच करावे अर्थात फिरावे. तसेच स्रीनेदेखील परपुरुषांसोबत मनोरंजन करु नये. आपल्या पतीलाच तसा दर्जा प्रदान करावा. हा देश काही विदेशी दमट हवामानाचा देश नाही. आपली संस्कृती काही पाश्चात्य संस्कृती नाही की जिथे दररोजचे पती बदलले जातात. या देशाची वेगळी अशी संस्कृती आहे. ज्या संस्कृतीनुसार एका स्रीला एकच पती असतो. पती हाच परमेश्वर मानला जातो. त्यासाठी पतीनंही तसं वागायला हवं. तसेच ह्या देशात पाश्चात्य संस्कृती विपुल प्रमाणात रुजूही देवू नये. पाश्चात्य संस्कृतीचं तेवढंच घ्यावं. जे चांगलं असेल. जे पाश्चात्य संस्कृतीचं वाईटपण आहे. ते वाईटपण अजीबात घेवू नये. तसेच मनोरंजन करायचे झाल्यास आपल्या मनोरंजनात पाश्चात्यांच्या वाईट गुणांचा शिरकाव होवू देवू नये. आपली संस्कृती जशी महान आहे. तिला महानच राहू द्यावे म्हणजे झालं. मनोरंजनाचा आधार घेवून मनोरंजनासाठी आपल्या महान संस्कृतीच्या चिंधोळ्या उडवू नये. भाडेतत्वावर मनोरंजक साधने सहज मिळतात तरी. मंगेश एक चांगला विचार करीत होता. त्याचं तसं विचार करणं रास्त होतं.
मंगेश आता निवृत्त झाला होता. त्यातच त्याला घरी निव्वळ बसून राहणं कंटाळवाणं वाटत होतं. त्यातच त्याला वाटत होतं की आपण जे भोगलं. तसं इतरांनी भोगू नये. म्हणून की काय, तो आता आपल्यासारख्या दुःखी कष्टी मंडळींची सेवा करीत होता. त्यांची कामंही करीत होता नव्हे तर त्यांना मार्गदर्शन देखील करीत होता. त्यांचे प्रश्नही सोडवीत होता.
नोकरीच्या समस्या........मंगेश त्यावरही चिंतन करायचा. कधी कधी त्याची पेन्शनही थांबत असे. जेव्हा तो चौकशी करीत असे. तेव्हा त्याला उत्तर मिळत असे की सरकारजवळ पैसा नाही. त्यातच उत्तरार्थी त्याला कळत असे की हा तर लोकसंख्येचा प्रश्न आहे. जो प्रश्न आम्हा नोकरदारांनाही सतावत आहे. मुलं पैदा ते करतात आणि भोगावं लागतं नोकरदार वर्गाला. तो विचार करीत असे त्या भारतदेशाबद्दल. ज्या देशात तो राहात होता.
आमचा हा भारत देश. या देशाची लोकसंख्या अफाट असून आज आमचा देश लोकसंख्येच्या बाबतीत चीनची बरोबरी करीत आहे. चीनचीही लोकसंख्या अफाटच होती. परंतू त्या देशानं कुटूंबनियोजनावर कात्री लावली व आज चीनची लोकसंख्या कमी झालेली आहे. आता चीनची लोकसंख्या एवढी कमी आहे की त्या देशानं आता लोकसंख्या वाढविण्यासाठी दोन पुत्रावरील बंदी हटवून आता दोन मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिलेली आहे.
भारत तसा नाही. भारतात पुत्र जन्माबाबत अजीबात बंदी नाही. काही काही समुदायात एक किंवा दोन पुत्रांवर कुटूंबनियोजन नाही. ते घरी खायला असो की नसो, अनेक मुलं जन्माला घालत असतात. त्यातच अशी अनेक मुलं जन्माला घातल्यानं अनेक समस्या निर्माण होत असतात.
पहिला प्रश्न खाण्याचा. अनेक मुलं पैदा झाल्यानं त्यांना काय खायला द्यायचं आणि काय नाही हा प्रश्न देशासमोर उभा राहतो.
दुसरा प्रश्न म्हणजे भिक्षावृत्ती. अशा मुलांना त्यांचं पोट भरता यावं म्हणून भिक्षा मागणे शिकवले जाते. ती मुलं भिक्षा मागत असतात. अर्थात देशात भिक्षावृत्तीची समस्या भेडसायला लागते.
तिसरा प्रश्न उद्भवतो कपड्यांचा. अशा मुलांना जिथे अन्नच खायला मिळत नाही. तिथे अंग झाकायला कपडे कुठून मिळणार. शेवटी तरणोपाय नसतो. मग एकाला शर्ट मिळतं तर दुस-याला पँट. काही काही मुलं तर निव्वळ नागडीच फिरत असतात.
चवथा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे बेरोजगारी. देशात अशा प्रकारची लोकसंख्या वाढल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येला रोजगार कोण देणार. कारण देशात रोजगार कमी झाला आहे. त्यामुळं की काय, या वाढत्या लोकसंख्येमुळं नोकरीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
शिक्षणक्षेत्रात असलेल्या नोक-या. या नोक-यांमध्ये सारेच ओरडत असतात. कोणी पेन्शनसाठी ओरडत असतात. म्हणतात की पेन्शन बरोबर मिळत नाही. कोणी महिण्याच्या वेतनासाठी ओरडत असतात. म्हणतात की वेतन बरोबर निघत नाही. कोणी वरीष्ठ श्रेणीसाठी ओरडतात. म्हणतात की मला वरीष्ठ श्रेणी लागलेली नाही. कोणी पुर्ण वेतनासाठी ओरडतात. कारण त्यांच्या शाळा ह्या अंशतः अनुदानावर असतात.
अनुदानानुसार शाळेच्या प्रकाराचा विचार केल्यास काही शाळा कायम विना अनुदान तत्वाच्या आहेत. काही शाळा अंशतः अनुदान तत्वाच्या आहेत. काही शाळा काँन्व्हेंटच्या आहेत तर काही शाळा पुर्ण अनुदानाच्या. पुर्ण अनुदान मिळणा-या शाळा ह्या ते अनुदान लवकर मिळावे यासाठी भांडतात. अंशतः अनुदान असणा-या शाळा पुर्ण अनुदानासाठी भांडतात आणि कायम विना अनुदान असणा-या शाळा अनुदान द्या म्हणून. त्याचप्रमाणे काँन्व्हेंटच्या शाळा ह्या विद्यार्थी शुल्क जबरदस्तीनं वसूल करता यावं यासाठी भांडत असतात. त्यातच नोकरदार मंडळी नोकरी मिळण्यापुर्वी नोकरी मिळविण्यासाठी भांडत होती. नोकरी मिळाल्यावर वेतन मिळविण्यासाठी. त्यातच आता वेतनवाढीसाठी भांडतात. म्हणतात की महागाई वाढली आहे. आमचं वेतन वाढवा. परंतू यामध्ये वेतन वाढवावे कसे? हा प्रश्न सरकारपुढं उभा अाहे. सरकारनं महागाई वाढवली. कारण त्यांच्यासमोर वाढत्या लोकसंख्येला पोसण्याचा प्रश्न आहे. त्यातच त्यांना सुविधा देण्याचाही प्रश्न आहे. जी सामान्य जनता गरीब आहे. परंतू ती जनता गरीब का आहे. याचा कोणी विचारच करीत नाही. ती जनता गरीब आहे. याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे त्यांच्या घरची खाणारी तोंड. देशातील गरीबी मोजल्यास ज्या घरी दोनच्या वर मुलं आहेत. तेच घर गरीब आहे. यात दोष कोणाचा? जनतेचा की सरकारचा? दोष जनतेचाच असतो. परंतू ती जनता आपल्या गरीबीपणाचा दोष सरकारला देते आणि सरकार त्यावर कडक पावलं न उचलता नरमाई घेते. कारण या सरकारला निवडणूक लढवायची असते. ज्या निवडणूकीत हीच गरीब जनता अल्पपैशानं मतदान करीत असते आणि त्याच पैशाच्या भरवशावर सरकार निवडून येत असते.
आज याच लोकसंख्येच्या अति पैदावारीमुळं नोकरी पेशात समस्या येत आहेत. नोकरदारांचे वेतन वाढवता येत नाही. त्यातच बेरोजगारांचाही प्रश्न सोडवता येत नाही. तसेच वाढत्या लोकसंख्येच्या अधिवासाचा प्रश्न सोडवितांना भुमी कमी होत असल्यानं अन्नाचाही तुटवडा भासत असून सारेच प्रश्न निर्माण होत अाहेत. ज्या समस्या सोडविता येणे कठीण आहे. हे असेच सुरु राहिले तर उद्या नक्कीच देश कंगाल होईल. देशात भुमीपाठोपाठ पैशाचीही अडचण निर्माण होईल. लोकसंख्या भरपूर नसेल. परंतू धान्य नसेल. असे धान्य विदेशातून आयात करावे लागेल. जे धान्य आयात करतांना कर्जाचा डोंगर वाढेल. त्यातून विदेशी देशही पैसा द्यायला वा धान्य द्यायला टाळाटाळ करतील. समस्या सा-यात निर्माण होतील. त्यातच नोकरीतही समस्या निर्माण होतील.
मंगेश बरोबर विचार करीत होता. कारण आज देशातील जनता साक्षर झाली तरी त्यांना कळत नव्हतं. ते लोकसंख्येवर मात करण्यासाठी कुटूंबनियोजन करीत नव्हते. जे कुटूंबनियोजन काळाची गरज होती.
मंगेश विचार करीत होता देशाच्या भवितव्याबाबत. तो ज्या देशात राहात होता. त्या देशाचं भवितव्य अंधारात होतं. त्याचं कारण म्हणजे लोकसंख्यावाढ. त्यातच त्या लोकसंख्यावाढीबाबत मंगेश लोकांना समजावून सांगत असतांना काही भाषणंही देत होता.
कुटूंब नियोजन ही भारत देशासाठी काळाची गरज आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज भारत देशातील लोकसंख्या अफाट आहे. ती अरबच्या घरात गेली आहे. अशावेळी लोकांना खायला प्यायला मिळत नाही.
भारत देशात भुमी ही कमी आहे. तसेच ह्या देशात भुमीचं प्रमाण अजून कमी होत आहे. त्याचं कारण निर्वासीत. या देशाचा जननदर हा जास्त असून मृत्यूदर हा कमी आहे. हा मृत्यूदर कमी असल्यानं वाढणा-या लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटूंबनियोजन करणे ही काळाची गरज आहे.
ज्याप्रमाणे जननदर वाढला आहे. त्यानुसार त्या वाढणा-या जननदरानुसार वाढलेल्या लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारच्या नाकीनव येत आहे. हिच लोकसंख्या, जी वाढत आहे. त्या वाढणा-या लोकसंख्येला खायला, जे अन्न लागतं. ते अन्न शेतीतून मिळते. म्हणून शेती करण्यासाठी जंगलं नष्ट केली जात आहेत. ज्यामध्ये हिंस्र प्राणी राहतात. ते प्राणी आता जंगलं नष्ट झाल्यानं वस्तीत येत आहेत. त्यातच राहायला घर पाहिजे म्हणून त्याला लागणारं लाकूडही जंगलात मिळतं. यासाठीही ते लाकूड मिळवितांना जंगलं तोडली जात आहेत. तसेच राहायला जागा पाहिजे म्हणून शेतजमीनीला ओसाड करुन तो प्रश्न मिटवला जात आहे. यामुळं हा प्रश्न सोडविण्यासाठी शेतजमीन कमी होत आहे.
या देशात कुटूंबनियोजन नसल्यानं खाणारी तोंड वाढली आहेत. तसेच त्यांचा प्रश्न सोडवित असतांना जमीन कमी होत आहे. त्यामुळं नवनवीन प्रश्न उद्भवत आहेत. यावर उपाय एकच. ते म्हणजे कुटूंबनियोजन.
कुटूंबनियोजन करणं ही काळाची गरज आहे. ती फार मोठी गरज आहे. कारण आज काही काही कुटूंब स्वतः पुढे येवून व पुढाकार घेवून कुटूंबनियोजनाची शस्रक्रिया करतात. परंतू काही काही कुटूंब अशी आहेत की जी कुटूंबनियोजन शस्रक्रिया करीत नाही. ते तर आपल्या घरी तीनच्या वर मुलं आजही जन्माला घालत असतात. मग त्यांना खायला मिळो अथवा न मिळो. आजही काही काही ठिकाणी मुलाच्या हव्यासानं मुली मुलगे होईपर्यंत जन्माला घातली जातात. मग त्या मुलींची संख्या वाढली तरी चालेल. अशानं लोकसंख्या वाढते. तसंच काही काही ठिकाणी आपल्या धर्माची वाढ झाली पाहिजे म्हणून त्या त्या धर्मात जननसंख्येला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. यावरुनही लोकसंख्या वाढत आहे.
ही जननसंख्या वाढू नये. म्हणून सरकार उघडपणे विरोध करु शकत नाही. कारण असा उघडपणे विरोध केला तर उद्या हिच मंडळी आपल्याला मतदान करणार नाही अशीही भीती सरकारला वाटत आहे. त्यातून सरकारनं त्यावर उपाय काढला. तो म्हणजे मुलींच्या विवाहाचे वय. हे विवाहाच्या वयाचे प्रमाणच वाढवले. जेणेकरुन मुलींनी शिकून समृद्ध व्हावं. अर्थात विचार करण्यालायक व्हावं. जेणेकरुन त्या विचार करण्यातून किती मुलं जन्मास घालावी? मुलं जास्त जन्मास घातली तर त्याचे परिणाम काय होतील? हा विचार मुलींना विवाह केल्यानंतर करता येणार आहे. तसेच कायदे असेही बनवले गेले आहेत की मुलांनी जरी मुलं जन्मास घालतांना बळजबरी केलीच. तर त्यावर स्रीयांना दादही मागता येणार आहे.
विवाहासाठी वय वर्ष एकवीस करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असतांना काही लोकं ओरडत आहेत. कारण त्यांना त्याचा मतितार्थ बरोबर कळला आहे. वय वर्ष जेव्हा एकवीस होईल. तेव्हा साहजीकच अठरा वर्षानंतर विवाह केल्यास जिथे तीन मुलं जन्मास येवू शकणार होती. तिथे वय वर्ष एकवीसपर्यंत एकही मुल जन्मास येणार नाही. त्यानंतर कदाचित एक किंवा दोनच मुलं स्रीया जन्मास घालतील असं सरकारला वाटतं. परंतू वय वर्ष एकवीस करा की चोवीस करा. पुत्र जन्माला घालणारी मंडळी जेव्हापर्यंत पुत्र जन्माला घालता येतात. तेव्हापर्यंत ती मुलं जन्मास घालतच राहतील. कारण त्यांना पुत्र जन्मानंतरच नुकसान दिसत नाही. त्यांना फक्त आणि फक्त आपला संसार दिसतो तर काही लोकं धर्मप्रेरीत असल्यानं त्यांना पुत्र जन्माच्या वेळी आपला धर्म दिसतो. तो कसा वाढेल हा प्रश्न सतावतो.
महत्वाचं म्हणजे पुत्र जन्मावर ब्रेक जर लावायचा असेल तर कुटूंबनियोजन सक्तीचं करावं. जो व्यक्ती एक किंवा दोनवर थांबत नसेल तर त्याच्या तिस-या अपत्याला जन्मास घालतांना त्याच्या सर्वसोयी नाकाराव्यात. त्याच्या तिस-या अपत्यांना जन्मास घालतांना बाळंतपण शुल्कही जास्त वसूल करावं. तसेच ज्यानं तिसरं अपत्य जन्मास घातलं. त्या कुटूंबांनाच शासन दरबारच्या सर्व सुविधांपासून वंचित करावे. हे असे जेव्हा होईल. तेव्हाच कुटूंबनियोजन यशस्वी होईल. जास्त मुलं जन्मास घालण्याला ब्रेक लागेल. त्यातच लोकसंख्यावाढ नियंत्रणात आणता येईल नव्हे तर यातून निर्वासीतांचा प्रश्न सोडविता येईल. तसेच वनाचेही संरक्षण होईल व वन्यप्राण्यांचेही संरक्षण होईल. त्याचबरोबर देश सृजलाम सुफलाम होईल. पर्यावरणाचेही रक्षण होईल. त्याचबरोबर जंगलांचे रक्षण झाल्याने पाऊस पडेल. तसेच देशातील शेतीत चांगलं धनधान्य पिकेल व सर्वांनाच अन्न, वस्र निवारा योग्यरितीनं देता येईल यात शंका नाही. परंतू त्यासाठी कुटूंबनियोजन सक्तीचं करणं ही काळाची गरज आहे.
मंगेश बरोबर बोलत होता. परंतू लोकांना तो ते का बोलतोय ते कळत नव्हतं. कारण ते शिक्षीत असूनही अजूनही अशिक्षीतासारखे वागत होते नव्हे तर मनावरची बुरसटलेली अशिक्षीतपणाची घाण अजूनही स्वच्छ करायला तयार नव्हते.
मंगेशला वाटत होतं की आपण नेता बनावं. त्याशिवाय शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही. त्याचा मसीहा जेव्हापर्यंत तयार होणार नाही.
त्याचं एकप्रकारे बरोबर होतं. कारण त्याला वाटत होतं की नेतेमंडळी अशी होती की आज नेत्याचीच वाहवा देशात चालत होती. परंतू त्याला राजकारणी लोकांचा राग येत होता. कारण याच राजकारणी लोकांमुळे अर्थात राज्यकर्त्यांमुळे देश पारतंत्र्यात गेला होता. तसेच इतर विदेशी राज्यकर्त्यांनीही देशावर राज्य केले हे त्याला माहित होते. आज त्याला वाटत होतं. राजकीय वादळं क्षमणार कधी. कारण राजकीय वादळानंच त्याच्या पुर्वजांना गुलामीत टाकले होते.
मंगेशनं नेता बनायचे ठरवले होते. त्यातच तो विवीध विषयावर भाषणेही द्यायचा. तो जेव्हा जेव्हा भाषणे द्यायचा. ती भाषणं त्वेषानं द्यायचा. विरश्री संचारायची त्याच्यात. तसा तो म्हणायचा.
" आज सामान्य माणसाला कोणी हुंगत नाही. त्याची काही इज्जत नाही असे वाटायला लागले आहे. कारण ही सामान्य जनता आहे.
सामान्य जनता ही नेत्यांच्या पेक्षा अतिशय महत्वाची आहे. कारण याच सामान्य माणसांच्या भरवशावरच ते या देशात मतदानाच्या माध्यमातून निवडून येत असतात.
मतदान ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट असून त्या मतदानातून दोनचार वेळा निवडून आलेले प्रतिनिधी हे दोनचार वेळा निवडून येताच बेताल वक्तव्य करीत असतात. त्या बोलण्यातूनच जास्त प्रमाणात वाद चालत असतात.
असं बेताल वक्तव्य केवळ एका बाजूचीच माणसं करतात असं नाही. तर विरुद्ध भागाचीही नेतेमंडळी असं बेताल वक्तव्य करीत असतात. गतकाळात अशा बेताल वक्तव्यात काहींचा क्रमांक आघाडीवर राहतो. तर काहींचा मागे. मात्र बोलत सगळेच असतात. कोणताही विचार न करता. काही दिवसापुर्वी एका नटीच्या गालासारखे रस्ते असल्याचे वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केले होते.
हेच बेताल वक्तव्य. असं बेताल वक्तव्य आपण कोणाबद्दल करतो? तो कोण आहे? आपण त्याची बरोबरी करु शकतो का? याचा जराही विचार कोणीच करीत नाही.
महत्वाचं म्हणजे आपण एखादा आमदार बनलो. एखादा खासदार बनलो. आपण अध्यक्ष बनलो. एखाद्या खात्याचा मंत्री. आपण खुप मोठा तीर मारला. आपण काहीही बोलू शकतो असं बहूतेक नेतेमंडळी मानतात. त्यातच असं बेताल बोलणं. परंतू ती नेतेमंडळी असं बोलतांना नेमकं हे विसरतात की आपण त्यांची बरोबरी करु शकतो काय?
मुळात अध्यक्ष असलेले काही नेते. मैफलीतील मित्रमंडळात म्हणतात की मी अमूक नेत्यांना शिव्या देवू शकतो. मारुही शकतो.
आता यामध्ये ज्यांना मारणार ती मंडळी कुठे आणि आपण कुठे असा विचार अशा नेत्यांनाही पडत नाही. काही लोकं तर म. गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या तत्सम नेत्यांबाबत नेत्यांबाबत बोलत असतात. असे वादग्रस्त विधान करतांना आपण या गत समाज विचारवतांची बरोबरी करु शकतो का? याचा विचार करीत नाहीत.
आपण असे विचारवंत होवू शकतो का? आपण समाजासाठी काही करु शकलो का? याचा विचार न करता उचलली जीभ व लावली टाळूला असे बेताल वक्तव्य नेते करीत असतात.
महत्वाचं म्हणजे असे बेताल वक्तव्य कोणीही करु नये. प्रत्येकांनी असं बेताल वक्तव्य करण्यापुर्वी विचार करावा की आपण कोणाबद्दल बोलतोय. आपण तसं वागतो का? आपण जर तसं वागत असेल आणि आपण ज्या माणसांबद्दल बोलतो. त्या माणसाला बोलण्याची आपली लायकी असेल, तरच आपण बोलावे. अन्यथा आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार नाही.
विशेष सांगायचं म्हणजे आपली लायकी नसतांना आपण असंही बोलत असतो आणि आपल्या देशात राजकीय वादळं विनाकारण निर्माण करीत असतो. जी राजकीय वादळं आपल्या देशाला घातक अाहेत. ज्यातून राजकीय वादळं निर्माण होवून देश पोखरला जातो. आपला देश मुळातच अशा राजकीय वादळाचा गुलाम राहिलेला आहे. अशी राजकीय वादळं पुर्वीच्या काळातही झालेली आहेत.
इसवीसनाच्या सातशेव्या शतकात प्रथमच भारतात प्रवेश करणारे मुसलमान. त्यांनी विश्वासघातानं राजा दाहिरची क्रुर हत्या केली. जो राजा दाहिर हिंदू धर्माचाच नाही तर बौद्ध धर्माचाही पुरस्कर्ता होता. तरीही केवळ हिंदू धर्मालाच राजाश्रय दिला असा विचार करणारी इतर धर्माची मंडळी राजा दाहिरबाबत बेताल वक्तव्य करीत असत. त्यातूनच राजा दाहिरबाबत सुडबुद्धी जागृत झाली व त्याची परियंती राजा दाहिरची हत्या करवून घेण्यात झाली. ज्ञानमत याने मुस्लीम शासक मोहम्मद बिन कासीमशी संगनमत करुन स्वतःला राजा बनवीन असे आमीष मिळताच मोहम्मद बिन कासीमच्या मदतीनं दाहिरची हत्या केल्यानंतर त्याचीही हत्या झाली. त्या व्यतिरीक्त राजा दाहिरच्या परीवारावरही अत्याचार करण्याचे षडयंत्र झाले.
हेच घडले ११ व्या शतकात. राजा जयचंद दिल्लीचा शासक न बनल्यानं त्यानं असंच पृथ्वीराज बाबत बेताल वक्तव्य केलं. तसंच बेताल वागणंही. त्याच्याच कुरघोडीनं पृथ्वीराज चौहानला असेच मरावं लागलं. तसेच त्यांचा परीवार दिल्लीत अग्नीमध्ये स्वाहा झाला जोहार करीत. हेच अलाऊद्दीन खिलजीच्या काळात घडलं. राणी पदमावतीला जोहार करावा लागला अलाऊद्दीन खिलजीच्या धाकानं. आपला पती रतनसिंहाचा पराभव पाहून. इथे कित्येक राजपूत राण्यांना जोहाराला पुढं जावं लागलं. तसेच संभाजीची दारुण हत्याही अशीच फितूरीनं आणि सत्तालालसेनं झाली. हेच बेताल बोलणं आणि बेताल वागणं. ह्याच बेताल बोलण्यातून विषाची गरळ पसरली आणि त्यातून मरणागती गेले भारतीय राजे. ज्या भारतीय राजांचा काहीच गुन्हा नव्हता. ही राजकीय वादळंच होती.
इतिहासाची पानं चाळतांना अशीच मुस्लीम शासकांनी सुरु केलेली हत्या प्रकरणं. त्यातच घाबरुन मानसिंह सारखी व मिर्झाराजे जयसिंगसारखी मांडलिक झालेली मंडळी. ज्यांनी हत्येच्या भीतीनं आपल्या सुंदर सुंदर मुली मुस्लिम राज्यकर्त्यांना दिल्या. एकच शासक झाला बाप्पा रावल की ज्यानं राजा दाहिर अभ्यासला. त्यातच त्याच्या हत्येचा बदला काढण्यासाठी बाप्पा रावलनं राजा दाहिरच्या हत्येनंतर भारतात प्रस्थ जमवलेल्या मुस्लिम शासकांना काबूल, कंदाहारपर्यंत हाकललं. त्यातच त्याच्या धाकानं मुस्लिमांनी आपल्या मुलींचा विवाह बाप्पा रावलशी लावून दिला. इथेही राजकीय वादळच धुमसलं. पराभवानंतर बदला. बदल्यानंतर पराभव. हे आजपर्यंत घडत आलं. केवळ आणि केवळ राजकीय वादळानं.
आज खरंच या संविधानीक काळात सर्व समान असतांना व हत्येची भीती नसतांना अशी राजकीय वादळं घडविण्याची गरज आहे का? नाही. मग असा पानीपतचा पराभव बदलून का लिहावा. साबूदान्याचा शोध १९४३ ते ४४ मध्ये लागला तर त्यावेळी सैन्याना साबूदान्यावर ठेवले अशी केलेली काही नेत्यांनी बदनामी मनाला पटत नाही.
आज सुजलाम सुफलाम असलेला भारत देश इंग्रजांनी लुटला असे म्हटले जाते. बरोबर आहे. त्यांनीही या देशातील कच्चा माल अतिशय स्वस्त दरात आपल्या देशात नेला आणि महाग असलेला माल आपल्याला थोपवला. मुस्लिम शासकांनीही काय केलं? तेच केलं. मोहम्मद गझनीनंही सतरा वेळा सोमनाथासारख्या कित्येक मंदिरावर स्वा-या करुन येथील धन आपल्या देशात नेलं. कित्येक बौद्ध मंदिरं पाडली. कित्येक हिंदूची मंदिरं. महत्वाचं म्हणजे सातशेच्या शतकानंतर जे जे मुस्लिम शासक झाले. त्या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या रुपात येथील बौद्ध, जैन, हिंदू धर्मीयांना छळले हे तेवढंच खरं आहे. ते केवळ राजकीय वादळांनीच. तरीही आज राजकीय वादळं क्षमलेले नाहीत. राजकीय वादळांनं नुकसान होत असलं तरी.......
महत्वाचं म्हणजे ही राजकीय वादळं आज संपवायची गरज आहे. कारण ही राजकीय वादळं आपली संस्कृतीच संपवत नाहीत तर ही राजकीय वादळं आपल्यालाही संपवून टाकत आहेत. या राजकीय वादळांचाच फायदा घेवून विदेशी ताकदी आपल्या देशात येतात व आपल्याच देशाला संपवतात. तसंच घडलं आहे आजपर्यंत. म्हणून वेळीच सावधान झालेलं बरं! असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आपल्यावर असं संकट पुन्हा निर्माण होवू नये यासाठी असं बेताल बोलणं व बेताल वागणं टाळावं. जेणेकरुन राजकीय वादळं क्षमतील व देश विकासाच्या टप्प्यावर अधिक पुढे जाईल यात शंका नाही.
मंगेश आज नेता बनला होता. तो शिक्षकांचा नेता होता. त्याला वाटत होतं की आपण शिक्षक असतांना आपल्याला फार त्रास झाला. आपण तो त्रास सहन केला. परंतू आजची पिढी असा त्रास सहन करु शकत नाही. त्यांच्यावरील त्रास दूर करायला हवा. म्हणून तो नेता बनला होता. हळूहळू भाषणं देता देता मंगेशनं आमदारकीचं तिकीटंही मिळवलं व तो आता शिक्षकाचा आमदार बनून शिक्षकांचे प्रश्न सोडवीत होता.
एखादा आमदार म्हटलं तर आपल्यासमोर असा चेहरा उभा राहतो. ज्याचं स्वतःचं कार्यालय तर असतं. ज्यांचे कपडे भरजरी असतात. ज्यांचं बोलणं तापट असतं नव्हे तर ज्यांचं वागणंही तापट. परंतू आमदार बनलेला मंगेश. तो अतिशय सौम्य स्वभावाचा असून त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं नव्हे तर त्याचा पोशाखही एका आमदाराला लाजवेल असाच होता.
काही काही मंडळी अशी असतात की ज्यांना प्रसिद्धीची हाव नसते. ते कार्य करीत असतात, ते त्यांचं नाव व्हावं म्हणून नाही तर आपण एक समाजाचा एक घटक आहोत म्हणून. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास झाला. तो त्रास इतरांना होवू नये म्हणून ते झटत असतात. असाच शिक्षक हक्कासाठी लढा देणारा मंगेश. जो शिक्षक आमदार म्हणून निवडून आला. राष्ट्रहित विद्यार्थी हित व शिक्षकहित असं ब्रीदवाक्य असणा-या एका शिक्षक परीषदेतून. त्यानं केवळ वेतन उचलणा-या शिक्षकांनाच न्याय दिला नाही तर त्या उपेक्षीत शिक्षकांनाही न्याय दिला, ज्यांना वेतन मिळत नव्हते. तसेच त्या विद्यार्थ्यांनाही न्याय मिळवून दिला. ज्यांना काँन्व्हेंटच्या भरमसाठ शुल्क घेणा-या शाळेत प्रवेश मिळत नव्हते. अशा निःस्वार्थ कार्य करणा-या मंगेशचा लढा हा अजूनही अविरतपणे सुरुच होता.
समाजात अशी माणसं क्वचितच जन्माला येत असतात. असं लोकांना वाटत होते. आमदार असलेला मंगेश हा त्यापैकीच एक. तो अगदी साधा राहात असे. त्यांच्या साधेपणाच्या वागण्यावरुन त्याला अनेकवेळा अडचणीही आल्या. एकदा विधानपरीषदेत प्रवेश करीत असतांना तेथील चौकीदारानं त्यांना अडवलं व कडक विचारणा केली. तेव्हा त्याला आपलं ओळखपत्र दाखवावं लागलं. दुसरा एक प्रसंग. तो एकदा बसमधून जात असतांना त्यानं आपली तिकीट काढली आमदार एसटीतून प्रवेश करुच शकणार नाही असं समजून. तेव्हा कोणीतरी मंगेशला ओळखणारा व्यक्ती त्या कंन्डक्टरला म्हणाला की ते सर आमदार आहेत. तेव्हा कंन्डक्टरला वाईट वाटलं. परंतू तिकीट कापल्यानंतर त्यावर उपाय नव्हता.
आज बसमधून जातांना काही लोकं तिकीट न काढता प्रवास करतात. काही पासष्ट वर्षाचे वयापेक्षा जास्त नसूनही ओळखपत्रात वय वाढवतात व बसमधील अर्ध्या तिकीटाचा फायदा घेतात. परंतू मंगेश आजही बसमधूनच प्रवास करीत होता नव्हे तर त्यातून प्रवास करतांना तिकीटही रीढ़ होता.
एकदा रेल्वेमधील त्याचा प्रवास चालला होता. तो रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्याच्या त्याच रेल्वेतून एक महिला प्रवास करीत होती. तेव्हा त्या बोगीत एक गर्भवती महिलाही होती. तेव्हा त्यानं आपली सीट तिला दिली व आपण स्वतः दूरचा प्रवास उभे राहून केला.
आज लोकं असे नाहीत की जे दुस-यांना दूरचा प्रवास करतांना आपली जागा दुस-यांना देतील. ते तर पैसे मोजून स्वतःच्या आरामाची व्यवस्था रेल्वेमध्ये करुन घेतात. परंतू मंगेश हा वेगळ्याच विचारांचा होता.
सुरुवातीला आमदार बनल्यावर मंगेशला शिक्षण कार्यालयही घाबरत नव्हतं. कारण त्यांची लढाई ही पत्राची असून संयमाची होती. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो असे तो मानत असे. त्यासाठी पत्र पाठवावेच लागते असही तो म्हणत असे. कारण तो कागद म्हणजे पुरावा असतो असं त्याला वाटायचं. पत्र लिहिण्यात तसं पाहता तो खुप माहिर होता. काही काही पत्र तो स्वतः लिहित असे. त्यांच्या या पत्राच्याच प्रभावानं त्यानं मोठमोठे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारी पक्षी मारले होते.
मंगेश तसं पाहता शेतकरी कुटूंबातून आलेले होता. त्यांचे वडील हे शेती करीत होते. त्यानं शालेय प्राथमीक व माध्यमीक शिक्षण पुर्ण करताच ते नगरामध्ये आला. तिथे एका महाविद्यालयात त्यानं प्रवेश घेतला. इथूनच तो घडला. या महाविद्यालयात तो एका संघटनेचा उमेदवार म्हणून लढला. त्यावेळी त्यानं आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांच्यावर दबाब निर्माण केला गेला. काही धमक्याही आल्या. परंतू त्याला न घाबरता तो महाविद्यालयीन राजकारणात सक्रीय राहिला. पुढे तो त्याच संघटनेतर्फे निवडूनही आला. याच दरम्यान एका जेष्ठ नेत्याशी त्याचा संपर्क आला.
पुढे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यावर तो त्या शहरी भागातील शाळेमध्ये गणित विषयाचा शिक्षक म्हणून लागला. परंतू इथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्या काळात गणित विषयाचे शिक्षक मिळत नसतांनाही व मंगेश गणित विषयाचा शिक्षक असूनही तो राजकारणी आहे व संस्थाचालकाला घाबरत नाहीत. म्हणून संस्थाचालकानं त्याला दोन वेळा बडतर्फ केलं. कारण त्यावेळी संस्थाचालकाचा वेगळाच दबाब होता. संस्थाचालकाच्या कोणीही विरोधात जात नसत. तसेच त्यांच्या विरोधात कोणीही ब्र देखील काढू शकत नसे. त्यावेळी तो लढला. न्यायालयात लढला संस्थाचालकाविरोधात. त्यातच त्याच काळी तो एका आमदारांच्या संघटनेत सहभागी झाला होता. जी संघटना केवळ संस्थाचालकांचा शिक्षकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी अस्तित्वात आली होती.
मंगेश आमदार बनण्यापुर्वी बरेचसे शिक्षक संस्थाचालकांना घाबरत असत. कारण त्यांचे कासरे संस्थाचालकाच्या हाती असत. परंतू आज मंगेश आमदार बनताच बरेचसे असे शिक्षक होते की जे संस्थाचालकाला घाबरत नसत. ते संस्थाचालकाचा अन्याय सहन करीत नसत. हे सर्व मंगेशच्या माध्यमातून साध्य झालं होतं. परंतू आजही नियुक्ती आणि बडतर्फचे अधिकार हे संस्थाचालकांना असल्यानं आजही शिक्षक घाबरत असत.
आज खरं तर असे कायदे बदलविण्याची गरज होती. नियुक्ती आणि बडतर्फीचे अधिकार हे संस्थाचालकाला नसावे. ते प्रत्यक्ष न्यायालयाला वा शिक्षणाधिकारी साहेबाला असावे. तेव्हाच शिक्षक हा अभय होवून आपल्या वर्गात शिकवेल. तसेच आपल्या वर्गाला न्याय मिळवून देईल.
आज आमदार मंगेशकडे शिक्षक आशेच्या दृष्टिकोणातून पाहात असत. बहुतःश मंगेशनं शिक्षकांच्या नियुक्त्या व त्यांचं निलंबन संस्थाचालकाच्या हातून काढण्यासाठी लढावं असं शिक्षकांना वाटत असे. ते त्यासाठीच त्यांच्याकडे आशेच्या दृष्टीनं पाहात. तरीही मंगेश लढत होता या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी. हे निलंबन आणि ही नियुक्ती संस्थाचालकाच्या हाती असल्यानं भयंकर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता. तो भ्रष्टाचार कदाचित त्यांच्या हातून दूर होईल असं वाटत होतं. तसंच ते निलंबन व नियुक्त्या संस्थाचालकाच्या हातून त्यांच्याच प्रयत्नातून निघेल व शिक्षकांना अभय मिळेल असंही वाटत होतं. जेणेकरुन यातून शिक्षक आपल्या वर्गात संस्थाचालकाला न घाबरता निर्भयपणे शिकवेल व त्यातून त्यांच्या सुप्त गुणांचा तर विकास होईल. व्यतिरीक्त विद्यार्थी विकास होईल. तसेच शाळेचा आणि देशाचाही विकास होईल. हे नाकारता येत नव्हतं. हेच कार्य मंगेश आजपर्यंत करीत आल्यानं आज तो दोन वेळा आमदार झाला होता.
आज ही शिक्षकांना त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. तसं पाहता तो सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असे. आज त्यांच्याकडे येणारा वर्ग जर पाहिला तर अगदी काँन्व्हेंटला शिकणा-या लहान मुलांपासून तर अंशी वर्षाच्या म्हाता-यापर्यंतचा होता. प्रत्येकाचा तो फोन उचलत असे. मग तो कोणीही असो. तो कोणालाही व्हि आय पी वागणूक दाखवत नसे. प्रत्येकाशी बोलत असे.तसेच प्रत्येकाशी चांगूलकीनं समोर येत असे. त्यामुळं लोकं त्यांच्याबद्दल आवर्जून म्हणत की आम्ही आजवर असा आमदार पाहिला नाही. न पाहणार. कारण आमदार म्हटलं तर व्हि आय पी वाटणारा. त्याच्याकडे गेल्यावर त्यांचा चौकीदारच अडवतो. त्यातही त्यांची भेट झालीच तर तो बरोबर बोलतही नाही. आपण म्हटल्यावर अधिकारी वर्गाला एक साधा फोन लावत नाही. कधी पत्र लिहित नाही. हे शिक्षकांनी अनुभवलं होतं. पत्र लिहिण्यासाठी काही आमदार पैसेही मागत असत. म्हणत की आम्ही तुमच्यामुळं निवडून आलो नाही. मात्र मंगेश याउलट होता. तो स्वतः फोन लावत असे आणि कधीकधी त्या समस्या दूर करण्यासाठी स्वतः येत असे. जणू त्यानं आपलं जीवन शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी समर्पीत केलं आहे असं वाटत होतं. त्यानं तर शिक्षकहितासाठी आपली पेन्शनदेखील नाकारली होती. हे वास्तववादी सत्य होतं.
खरं सांगायचं म्हणजे असेच आमदार खासदार, अधिकारी, नगरसेवक, संस्थाचालक, मुख्याध्यापक प्रत्येकांना मिळायला हवे. जे मंगेश सारखे असावेत. ज्यांना स्वतःची व्हि आय पी वागणूक नसावी. कोणालाही हवं तेव्हा भेटता यावं. तसेच कोणालाही केव्हाही फोन करता यावा. तेव्हाच खरं समाधान वाटतं. असं प्रत्येक शिक्षकांना वाटत होतं. खरं पाहता आमदार मंगेश हा त्यातीलच होता. स्वतःला व्हि आय पी न समजणारा. परंतू व्हि आय पी पेक्षा बरेच मोठा असलेला.
मंगेशला वाटत होतं की कोणीही विदेशात शिक्षण घ्यायला जावू नये. चांगलं शिक्षण या देशातच मिळावं. पुर्वी मिळत होतं तसं. त्यासाठी त्याने स्वयंकेंद्रीत शिक्षणाची कल्पना मांडली होती. ते स्वयंकेंद्रीत शिक्षण नव्हतं तर ते मंगेशचं संशोधनच आहे असं मत जे ते मांडत होते.
तो आमदार असलेला मंगेश पुर्वी एक शिक्षक होता. त्यानंतर तो मुख्याध्यापक झाला. नंतर आमदार. त्यातच तो शिक्षक आमदार. त्यानंतर त्यानं जे चांगले निर्णय घेतले. त्यामुळं तो शिक्षणविभागात चर्चेचा विषय झाला. त्याचं कारण म्हणजे त्यानं केलेले शिक्षण क्षेत्रातील परीवर्तन. त्याला नंतर टिचर अवॉर्डही मिळाला. त्यामुळं तो जास्त चर्चेत आला. त्याहूनही चर्चेत आला तो त्याच्या कामामुळे. त्यानं स्वयंकेंद्रीत शिक्षणाची मांडणी केली होती. त्यानं हे शिक्षणवृत्ती मांडण्यामागे म्हणणं मांडलं की विद्यार्थ्यांनी काही करण्यासाठी स्वतः शिकावं. जेणेकरुन आणखी ब-याच मोठ्या प्रमाणात प्रगती करता येईल. परंतू या त्याच्या स्वयंकेंद्रीत शिक्षणमताला सोलापूर येथील लोकांचा बराच विरोध होता. तो काही मंत्र्यांमुळे मावळला होता.
मंगेश एका खाजगी संस्थेत लागलेला शिक्षक होता. तो आमदारकीसोबतच परीवर्तन तत्व मांडत होता. त्यातच त्यांच्या या प्राक्तनाची विदेशी लोकांनी दखल घेत त्यांना पुढील शिक्षणाचे मत मांडण्यासाठी पर्याय उघडा करुन दिला. त्यानं मांडलेला सिद्धांत विदेशीतही अभ्यासला जात असे. परंतू याच भारत देशातील काही मंडळींच्या कुरघोडी पणानं त्याचेवर ठपका ठेवून त्यांच्या प्रगतीला आड आणलेला आहे असे दिसून येत होते.
मंगेश आमदार बनताच त्यानं स्री शिक्षणासाठी काही महिण्याची सुटी मंजूर करावी अशी मुख्यमंत्री साहेबाला विनंती केली. स्री शिक्षणक्षेत्रात बरीच मागे आहे असं आजही मंगेशला वाटत असे. परंतू त्यानं मांडलेला हा विचार कालबाह्य ठरवत स्री ही शिक्षणात बरीच पुढे आहे असं बाकीच्यांनी सांगीतलं. म्हणून हा विचार मुख्यमंत्र्यांनी स्वतः कालबाह्य ठरवला. असे असतांना त्यामध्ये तीन वर्ष तरी सुट द्या असेही मंगेशनं म्हटलं. अर्थात तीन वर्ष शिकू द्यावे असे मत मंगेशचे होते. त्यातच मंगेश काहीही विधानसभेत मांडत असल्याचा ठपका ठेवीत त्यांच्या पुढील चांगल्या प्रकारचे विचार नाकारल्या गेले व त्यांच्या प्रगतीला कुठेतरी झळ पोहोचली. परंतू यामध्ये समजा त्यांच्या या प्रगतीच्या टप्प्यात पाश्चात्य देश जर धावून आले नसते तर मुख्यमंत्री महोदयाचा मार्ग मोकळा झाला असता. आज पाश्चात्य देशात शिकवला जाणारा अभ्यासक्रम मंगेशची देण होती.
मंगेशसारखी मंडळी ही केवळ त्याच्या जिल्ह्यातच नाही तर देशात होती. असाच या देशातील एक प्रसंग होता. ज्यावेळी आनंदवनाचे संस्थापक बाबा आमटेंना रमन मैगसेसे पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्या जिल्ह्यातील जिल्ह्याधिकारी साहेबांनाही प्रश्न पडला होता की हा बाबा आमटे नेमके कोण? त्या पुरस्कारापासूनच बाबा आमटेंची ओळख भारतालाच नाही तर जगालाही झाली. पुढे बाबा आमटेंना अनेक पुरस्कार मिळाले.
या भारतात असाही एक व्यक्ती होता की जो उजेडात आला नाही. त्यानं तर कोरोनाच्या काळात आपल्या कमाईतील दहा टक्के वेतन विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक आणि पुस्तकाच्या रुपानं दिले. त्याचं नाव होतं सत्येंद्र. हा व्यक्ती उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कोटतल्ला इथे राहात होता. तो प्रत्येक महिण्यात शाळेसाठी वेतनातील दहा टक्के पैसा शाळेला लावत असे. परंतू कोणी म्हणत असे की आम्हीही आमच्या वेतनातील दहा टक्के रक्कम शाळेसाठीच तर संस्थाचालकांना देतो ना. बरोबर होतं ते म्हणणं. परंतू ही दहा टक्के संस्थाचालकाला जी रक्कम शिक्षक देत असत. त्या रकमेतून संस्थाचालक आपलाच विकास करत होता. शाळेचा विकास करीत नव्हता.
दुसरं नाव ज्यांना २०२० चा पद्म पुरस्कार मिळाला होता, तो कर्नाटकातील व्यक्ती हरेका हजाब्बा. या व्यक्तीनं गावात शिक्षणाची सोय नाही म्हणून शाळा उघडली होती. स्वतः फळं विकली व आलेल्या पैशातून शिक्षकांचे वेतन दिले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही नाव या यादीत होतं. त्याचं कारण त्यांनी सोडलेली नोकरी. ते लंडनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतांना बाबासाहेबांनीही नोकरीच सोडली होती.
अजूनही अशा ब-याच व्यक्ती होत्या की ज्यांची देशात कदर होत नसल्यानं ते विदेशात जात होते. तिथे गलेलठ्ठ वेतनाची नोकरी मिळवीत होते. मंगेशसारखे असे अनेक लोकं होते की जे त्याच्या महत्वाचे विचार मांडण्यानं ते विदेशात मोठे झाले. ज्यांचे जन्म आणि शिक्षणही भारतात झाले होते.
शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींचा विचार केल्यास आजही याच देशातील कितीतरी शिक्षणसंस्थात मंगेशसारखे प्राध्यापक होते. परंतू आजही या संस्थेच्या शाळेत त्यांना इज्जत नव्हती वा त्यांच्या गुणांची प्रशंसा केली जात नव्हती वा त्यांच्या चांगल्या गुणांना वाव मिळत नव्हता. अशा विज्ञानाच्या कितीतरी स्पर्धा होत. ज्यामधून विद्यार्थी उच्चदर्जाचं बक्षीस घेवून येत. यात प्रेरणा कोणाची असते तर ती शिक्षकांचीच म्हणावी लागेल. आजही अशा संस्थेच्या शाळेत असे कितीतरी प्राध्यापक, शिक्षक होते की ज्यांचे रोजचे लेख वर्तमानपत्रात येत. तसेच त्यांची कितीतरी पुस्तकं प्रसिद्ध होती. तिही संशोधनात्मक. तरीही त्यांची ना संस्थेत कदर होती. ना शिक्षणाधिकारी दखल घेत होता ना सरकार दखल घेत होतं. मंगेशची तरी दखल घेतली असती का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. तो आमदार बनल्यामुळं आणि तोही शिक्षक आमदार असल्यामुळं त्याची दखल घेतली गेली.
ज्यावेळी जनमत मंगेशला न्याय मिळवून देण्यासाठी धावून आलं. तेव्हा मंगेशला न्याय मिळाला असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण मंगेशवर तो आमदार पदावरुन हटावा म्हणून वारंवार विरोधक त्याच्या कामावर ताशेरे ओढत असत.तो चांगली कामं करीत असतांनाही त्याच्या चांगल्या कामासाठी नीधी मंजूर करीत असतांना अन्यायच होत होता. यात नीधी मंजूर झाला तरी अडचणी येत होत्या आणि मंगेश जर अामदार झाला नसता तर त्यांच्या हातून स्वयंकेंद्रीत शिक्षणाचा श्रीगणेशा झाला नसता. आज त्याच्या स्वयंकेंद्रीत शिक्षण संशोधनाला राजमान्यता मिळवितांना त्रास झाला असता.

****************************************

आज अशी कितीतरी मंडळी आहेत की जे लिहितात. परंतू त्यांच्याकडे पी एच डी सारखी पदवी नाही. त्यांचं लिहिणं हे पि एच डी धारकांना लाजवेल असं असतं. अगदी संशोधनात्मक लिहिणं. परंतू त्यांच्याकडे पी एच डीची पदवी नसल्यानं त्यांनी लिहिलेल्या कित्येक चांगल्या गोष्टी या लिहिण्याच्या बाजारात खपत नाही. कारण आज लिहिण्यासाठी पी एच डी पदवी म्हणजे एक लायसन झाल्यासारखी वाटते. तसंच असं पी एच डी धारकांना लाजवेल असे लिहिणारे शिक्षक हे संस्थेच्या शाळेत असल्यामुळं ते कितीही चांगलं लिहित असले तरी त्यांची संस्था दखल घेत नाही. मग इतर घटक का बरं दखल घेतील?
आज देशातील स्थिती अशी आहे की घराच्या आजूबाजूलाच कोणी गुणसंपन्न व्यक्तीमत्व राहात असेल आणि ते व्यक्तीमत्व फुलत असेल तर त्याचे पाय ओढण्याचे काम आजुबाजूची मंडळी करीत असतात. डिसलेंचच उदाहरण घ्या.
महत्वाची गोष्ट अशी की ते काय अमेरिका शिष्यवृत्ती देईल डिसलेंना असे मत देशातील नागरीकांचे होते. आपला देशच विद्वान तयार करणारी खाण आहे. इथे बरेच विद्वान घडले. येथील तक्षशिला व नालंदात कितीतरी तरुण शिकले व ते संशोधनात अजरामर झाले. इथेच संत ज्ञानेश्वर, कान्होपात्रा, संत एकनाथ, नामदेव तुकाराम घडले आणि इथेच शिवराय. इथेच संभाजी महाराज घडले आणि इथेच राजा दाहिर आणि महाराज पृथ्वीराज. अन् आपली अब्रू लुटली जावू नये यासाठी जोहार करणारी राणी पदमावती आणि संयोगीताही याच भुमीतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, वीर सावरकर, भगतसिंग, गोपाळ आगरकर, राजा राम मोहन राय, स्वामी विवेकानंद नेताजी सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद अशी कितीतरी नावं घेता येतील की जी या देशात जन्मालाच आली नाही तर घडलीही. ती मंडळी इथेच लहानाची मोठी झाली. प्राथमिकच नाही तर महाविद्यालयीन शिक्षण ही ती मंडळी इथेच शिकली.
महत्वाचं सांगायचं म्हणजे हा शूरवीरांचाच देश नाही तर रणरागीणींचाही देश आहे. या भुमीत सुजाता, आम्रपाली पासून तर राणी लक्ष्मीबाई, सावित्री, अहिल्याबाई, जीजाबाई, रमाबाई, सवितामाई अशा कितीतरी महिला झाल्या की ज्यांनी आपल्या देशाला समृद्ध ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं.
खरं शिक्षण हे याच देशात आहे की ज्यातून असे बरेच वीर घडले. त्यात स्रीयाही अग्रक्रमानं पुढे असतांना आणि याच देशातील भुमीमध्ये विद्वानांची खाण जन्मास येत असतांना तसेच याच भुमीत गाजलेली तक्षशिला व नालंदा विद्यापीठं असतांना तसेच याच भारतात पुर्वी शिक्षणासाठी विदेशातून लोकं येत असतांना आज भारतावर अशी अवकळा यावी की आपल्याला विदेशात शिकायला जावं लागावं आणि तेथील शिष्यवृत्ती मिळवावी. ही भारतासाठी शोकांतिकाच आहे. खरं तर हे विद्वान शिकून निर्माण होत नाहीत. ते विद्वानांचे गुण जन्मतःच असतात. ती जन्मतःच विद्वान निर्माण करण्याची ताकद भारतीय भुमीत आहे. आजही भारतात विद्वान निर्माण होवू शकतात नव्हे तर होत आहेत. फरक एवढाच आहे की अशा विद्वांनाना आपण पाहिजे तसं वातावरण देत नाही. म्हणून की काय, त्यांना विदेशात जावं लागलं. निव्वळ शिकण्यासाठी नाही तर उदरनिर्वाह करण्यासाठीही.
महत्वाचं म्हणजे भारत ही विद्वानांची खाण असतांना व येथील माती पवित्र असतांना या मातीशी बेईमानी करुन कोणाला वाटते विदेशात जावं. कोणालाच वाटत नाही. तरीही आमची भावी पिढी विदेशात जात आहे. ही शोकांतिकाच आहे. तेव्हा याचा सारासार विचार सरक