Raja Dahir in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | राजा दाहिर

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

राजा दाहिर

राजा दाहिर

तो काळा दिवस होता त्या सिंध प्रांतियांसाठी. कारण त्यांचा राजा मरुन गेला होता. आज सिंध पाकिस्तान मध्ये आहे. परंतू त्या राजाच्या बलिदानाची कहाणी आज पूर्ण जगात जन्म घेत आहे.
दाहिर राजाचा तो इतिहास राजासाठी गौरवशाली गोष्ट आहे. आज ती कहाणी भारतीय लोकांच्या भावनेचं प्रतिक बनली आहे. या अखंड हिंदुस्थानात पुष्कळ सारे हिंदू राजे पैदा झाले. ज्यांनी आपल्या वतनासाठी कुर्बानी सुद्धा दिलीही असेल, परंतू आपल्या वतनाला विकलं नाही. शरणागतीही पत्करली नाही. ते खुप लढले. मृत्यू पावले. वतनासाठी कटलेदेखील. परंतू आपल्या वतनाला झुकू दिलं नाही. आपल्या मातृभुमीला त्यांनी नमन केलं. धर्मासाठी लढले. वीरगतीस प्राप्त झाले. पण धर्म बदलविला नाही. असाच एक राजा या हिंदुस्थानच्या भुमीत होवून गेला. त्याचं नाव होतं दाहिर सिंग. जो सिंधपती होता. ज्यानं सिंध प्रांताला आपल्या अखेरच्या श्वाासापर्यंत गुलाम होवूू दिलं नाही. प्रसंगी त्यानं बलिदान दिलं.
गोष्ट त्यावेळची आहे की ज्यावेळी सिंध प्रांतावर हिंदू राजाचं वर्चस्व होतं. ते राजे या अखंड हिंदुस्थानवर राज्य करीत होते. काबूल ते कंदाहारपर्यंत या भारतीय हिंदू राजांच्या चर्चा चालत. हे छोटे छोटे राजे खुप सा-या गटात विखुरले होते. पण ते राजे कोणाचाही द्वेष करीत नसत. ते पूर्णतः सहिष्णूतेने इतरांना वागवत असत.
हिंदुस्थानात तीन मुख्य नद्या होत्या. सिंधू, गंगा व ब्रम्हपुत्रा. या नद्यांच्या खो-याचा हा प्रदेश फार सुपीक होता. त्यांच्याही काही उपनद्या होत्या. त्या उपनद्या व नद्या मिळून हा जो प्रदेश सुपीक झाला होता. जो प्रदेश पंजाब सिंध पासून पुर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचला होता. हा जो सिंध प्रदेश होता. हाच प्रदेश, ह्या प्रदेशाला सिंधू नदीमुळंच सिंध नाव पडलं होतं.
हिंदुस्थानचा इतिहास हा मुळातच गौरवशाली राहिला आहे. याच्या जडणघडणीत मुख्यतः हिमालय पर्वताचाही समावेश होतो. ह्या हिमालय पर्वताच्या अभेद्य अशा तटबंदीनं चांगले चांगले विदेशी आक्रमणं थोपवून धरता येतात. हिमालय व हिंदूकुश पर्वतात जी अभेद्य भिंत आहे. त्या भिंतीमुळे आज आपल्याला भारत आणि पाकिस्तान वेगळे झालेले दिसतात. पुर्वी मात्र एक होतं. हिंदूकुश पर्वतातील खैबर , बोलन या खिंडीमधून काही खुश्कीचेही मार्ग होते. ते मार्ग मध्य आशियातून जाणा-या व्यापारी मार्गाशी जोडले गेले होते. काही मार्ग हे चीनलाही जोडलेले होते. त्या मार्गाला रेशीम मार्ग म्हणत. कारण याच मार्गावरुन पश्चिमेकडील देशात जो माल पाठवला जायचा. त्यात मुख्यतः रेशीम उत्पादनाचा प्रथम क्रमांक लागायचा. याच मार्गावरुन अनेक परदेशी आक्रमकांनी भारतावर आक्रमणं केलीत. त्यात मोहम्मद बिन कासीमचे आक्रमण महत्वपूर्ण गोष्ट होती.
सिंध प्रांत.......सिंधू, गंगा, ब्रम्हपुत्रा.......या अखंड हिंदुस्तानातील महत्वपूर्ण नद्या. या नद्या व त्याच्या उपनद्या मिळून या परीसरात खोरे तयार झाले होते. हे खोरे सुपीक होते. हा सुपीक खो-यांचा प्रदेश सिंधपासून बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलेला होता. याच ठिकाणी प्राचीन संस्कृती उद्याला आली. तसेच छोटी छोटी गणराज्येही उदयास आली.
अखंड हिंदुस्तानात राजस्थान, गुजरात व हरियाणाच्या वाळवंटाचाही समावेश होतो. तसेच हा प्रदेश सतलज नदी, अरवली पर्वत, कच्छचे वाळवंट तसेच सिंधू नदी यामुळे शोभायमान झाला होता. नागमोडी वळणे घेत वाहणारी घग्गर नावाची नदी, या नदीला पूर्वी खुप पाणी असायचं. आता मात्र ती नदी कोरडी पडलेली आहे. या सर्व भागात सिंध संस्कृती वसली होती.
अखंड हिंदुस्थानात दख्खनच्या पठाराचाही समावेश होत होता. या पठाराला अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर लागलेला होता. जो व्यापार हिंदूस्थानात खुश्कीच्या मार्गाने चालायचा. तो व्यापार हडप्पा संस्कृतीपासूनच चालत होता. हा व्यापार मुख्यतः सागरी मार्गानं चालायचा. ह्या व्यापारामध्ये जी देवाण घेवाण चालायची. ती देवाणघेवाण चालत असल्यानं प्राचीन काळापासूनच हिंदुस्थानाची ओळख बाकीच्या लोकांना होती. हिंदुस्थान किती समृद्ध आहे आणि किती नाही हे त्या लोकांना माहित होतं. त्यामुळं हिंदूस्थानाला विदेशी मंडळी सोन्याची चिमणी म्हणत असत नव्हे तर येथील मंदीरं लुटण्यासाठी नव्हे तर येथील मालमत्ता लुटण्यासाठी या हिंदुस्थानवर सतत स्वा-या करीत असत.
सह्यांद्री व सातपुडा पर्वतरांगेसारख्या निसर्गरम्य भागात वसलेला हा हिंदुस्थान. या हिंदुस्थानात छोटी छोटी जी गणराज्य अस्तीत्वात होती. त्यात चेर, पांड्य, चोल, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव, वर्धन व राष्ट्रकूट या साम्राज्याचे नाव येते. ही राज्ये सार्वभौमत्वाशी प्रामाणिक होती.
सिंध प्रांत.......आज सिंध प्रांत पाकिस्तानात आहे. हा भाग सिंधू नदी व थेरच्या वाळवंटाच्या आसपास पसरलेला आहे. या भागाचा एक सुवर्ण इतिहास आहे. हा भाग ख-या अर्थानं हिंदूचा इतिहास म्हणून गणला जातो. जिथे शांतीप्रिय स्वरुपात हिंदू धर्म नांदत होता.
आपला अखंड हिंदुस्थान. या हिंदुस्थानावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात अनेक आक्रमणं झालीे. या आक्रमणानं हिंदूस्थानलाच बेचिराख केलं असं नाही तर पुष्कळ गंभीर स्वरुपाचं नुकसानही झालं. ते कधीच भरुन निघणारं नाही. निघणार नाही. परंतू या हिंदुस्थानवर जेही आक्रमणं झालीत. त्या आक्रमणानं या हिंदुस्थानला बदलविलं नाही, तर या हिंदुस्थाननं त्यांना इथे राहण्यासाठी विवश केलं. त्यांच्या मुळ स्वरुपाला बदलवलं नव्हे तर त्यांना देशवासी बनवलं. त्यापैकी मोहम्मद बिन कासीमचं आक्रमण एक होय.
मोहम्मद बिन कासीम हा सौदी अरेबियातील खलिफा शासनाचा एक सेनापती होता. त्याचा जन्म सौदी अरेबियात ताईफ नावाच्या शहरात इसवी सन ६९५ मध्ये झाला होता. त्याच्या वडीलांचा मृत्यू अल्पकाळात झाल्यानं त्याला त्याच्या काका हज्जाज बिन युसूफनं केवळ पालनपोषनच केलं नाही तर लहानाचं मोठं केलं. त्यानंच मोहम्मद बिन कासीमला युद्ध आणि प्रशासन कसं ठेवावं याच्या शिक्षा दिल्या. तसेच त्याचा विवाहही आपल्याच मुलीशी म्हणजे जुबेदाशी लावून दिलं.
हज्जाज हा इराकचा राज्यपाल होता. त्याचवेळी त्यानं मोहम्मदची शिक्षा पुर्ण होताच अगदी तो सतरा वर्षाचा असतांनाच त्या काळात सिंधवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. त्यावेळी या भागात हिंदू राजा राज्य करीत होता. ज्याचं नाव होतं महाराजा दाहिर सिंग.
दाहिरसिंग असा हिंदू राजा होता की ज्यानं ह्या हिंदुस्थानसाठी नव्हे तर या हिंदुस्थानच्या अस्मितेसाठी त्याग केला. तो लढला मोहम्मद बिन कासीमशी. त्यात त्यानं बलिदान पत्करलं. पण शरणागती पत्करली नाही.
दाहिरसिंग हा राजा होता सिंध प्रांताचा. ज्याचा जन्म इ स ६६३ मध्ये झाला. तसेच त्याचा मृत्यू २० जून ७१२ मध्ये झाला. लढता लढता आपल्या मातृभुमीसाठी त्यांनी विरमरण पत्करलं. त्यावेळी ते एकोणपन्नास वर्षाचे होते.
ज्यावेळी राजा दाहिरसिंग या भागात राज्य करीत होते. त्यावेळी सिंध प्रांत हा बलुचिस्तान, इराण, कराची पर्यंत पसरलेला होता.
सिंध प्रांत........ज्या प्रांतात शंभर वर्ष पुर्व राजपूत वंश राज्य करीत होता. त्या राजपूत वंशाचा जो राजा होवून गेला. त्याचं नाव राय साहसी होतं. त्याच्या वडीलाचे नाव राजा राय साहरस होतं. या राजा राय साहरसचा मृत्यू इराणचा शाह नीमरोजशी लढतांना झाला. त्यानंतर राजा राय साहसी हा राजा बनला. राजा राय साहसीने देखील कल्याणकारी राज्य केलं. त्यानेच सिंध कालगणनेची स्थापना केली. तो काळ होता इ स ६२४. त्यानंतर राजा राय साहसी हा मोठ्या आजारानं मृत्यू पावला.
राजा राय साहसीचा कोणीही उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळं तो आजारी असतांना त्यानं आपला राज्यकारभार हा काश्मीरी ब्राम्हण चचच्या हातात सोपवला. त्यावेळी राजा क्षत्रीय वंशाचा राहात असे तर ब्राम्हण हा प्रधानमंत्री.
राजा राय साहसी मरण पावल्यानंतर त्याच्या राजगादीवर त्याने निवडलेला प्रधानमंत्री चच गादीवर बसला. या चचला एक मुल होतं. त्याचे नाव होते दाहिर सिंग. राजा चच मरण पावताच त्याचा भाऊ चंदर हा राजगादीवर आला. जो राजा दाहिरच्या वडीलाचा म्हणजे चचचा प्रधानमंत्री होता.
राजा चंदर हा ब्राम्हण जरी असला तरी तो बौद्ध धर्मीय होता. कारण त्यानं पुढं बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. तसेच संपूर्ण राज्यात बौद्ध धम्मालाच राजधर्म म्हणून घोषीतही केले. राजा चंदर यानेे सात वर्षापर्यंत इथं राज्य केले. त्यानंतर राजा दाहिर राजगादीवर आला.
राजा चंदर मरण पावताच त्याचा पुतण्या राजा दाहिर राजा बनला. त्याला कित्येक प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला. आपल्या वडीलांद्वारे पदमुक्त केल्या गेलेल्या जाट, गुर्जर आणि लोहाणा समाजाचा विरोध त्यांना पक्तरावा लागला. कारण ती मंडळी त्याच्या पित्यापासून नाराज होती. तसेच ब्राम्हण समाज त्याच्या भावानं बौद्ध धम्माला राजधर्म घोषीत केल्यानं नाराज होता. परंतू राजा दाहिर राजगादीवर येताच त्यानं सर्व समाजाला समान लेखलं जाईल असं वचन दिलं होतं. त्यानं या सिंध प्रांतात मुळात ब्राम्हणांची नाराजी दूर करण्यासाठी राजधर्म म्हणून सनातन धर्माचा जरी स्विकार केला असला तरी बौद्ध धम्माचीही त्यांनी अवहेलना केली नाही. त्यामुळंच त्याच्या काळात शांततामय वातावरण निर्माण झाले. एवढंच नाही तर त्याच्या राजकाळात बौद्ध धर्मीयांना विहार बांधता आले. तसेच हिंदूंना मंंदीर बांधायची परवानगी मिळाली. राजा दाहिरच्या काळात त्याच्या पित्यापासून नाराज असलेले जाट, गुर्जर व लोहाणा समाजाचेही लोकं हे फारच खुश होते.

************************************************************************************************

सिंधचा समुद्री मार्ग हा जगामध्ये व्यापार करण्यासाठी खुला होता. सिंधचे व्यापारी ही दूर दूरपर्यंत व्यापार करण्यासाठी जात असे. विदेशातील व्यापारी ही सिंधमध्ये व्यापार करण्यासाठी येत असत. हे व्यापार समुद्र मार्गाने करीत असताना सिंध हे बंदर असल्यानं इराण इराकचे व्यापारी याच बंदरात मुक्काम करीत. त्यामुळं सिंधची परीस्थीती वा संपूर्ण हिंदुस्थानची स्थिती या परदेशी लोकांना झाली होती. इतर देशातील व्यापा-यांना त्यांच्या देशाबद्दल विचारणा केल्यास ते त्यांचा देश राहण्यासाठी अनुकूल नसल्याचे सांगत. पाणी खारे आहे. जमीन गोटाड आहे. पीक होत नाही. माणसे विश्वास योग्य नाही अशी माहिती सांगत. परंतू हिंदुस्तानातील लोकं हे आपल्या देशाबद्दल चांगलंच सांगत. आमच्या देशाला सोन्याची चिमणी म्हणत असून या देशात सोना जास्त आहे अशी पृष्टीही त्यामागं जोडत असत. त्यामुळं की काय, ते व्यापारी जेव्हा आपल्या देशात परत जात. तेव्हा आपल्या राजांजवळ हिंदूस्थानच्या तमाम गोष्टींची माहिती देत. त्यामुळंच परदेशी लोकांनी हिंदूस्थानला लक्ष करण्यासाठी सिंध मधूनच अंदाज लावला. तसेच पुढील काळात परकीय आक्रमणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
महाराजा दाहिरनं राजगादीवर बसताच अलोरला आपली राजधानी बनवली. तसेच देवल बंदरात वेगळा सुभेदार नियुक्त केला. जो बौद्ध समाजातून होता.
एक दिवस एक अरबी जहाज देवल बंदरात आराम करण्यासाठी येवून थांबला. त्या जहाजात असलेल्या व्यापा-यांनी देवल शहरावर अचानक हमला केला. तसेच देवल शहरातील काही लहान मुलं व स्रियांना आपल्या जहाजात कैद केले. ही गोष्ट जेव्हा देवल बंदरातील सुभेदाराला समजली. तेव्हा त्यानं त्या जहाजावर बदल्याच्या प्रत्यूत्तरात आक्रमण केले व त्या जहाजावर कैद केलेल्या स्रिया व मुलांना वाचवले. हा जहाज अरबांचा असून तो जहाज इराणमधून आला होता. यावेळी इराणमध्ये इराणचा धर्मगुरु खलिफाचे राज्य होते. हज्जाज हा मंत्री होता खलीफाचा.
खलिफाचे जे कोणी पुर्वज होते. त्यांनी सिंधवर आक्रमण करण्याचे बेत आपल्या मनात कित्येक वर्षापुुर्वीपासून तयार केले होते. पण त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती.
अरब व्यापारी देवल बंदरातील सुभेदाराच्या प्रत्युत्तरात आपल्या देशात निघून गेले. त्यांनी आपल्या खलिफाजवळ देवल बंदरात घडलेलं इतिवृत्त सांगीतलं. तसं पाहता तो खलिफा सिंधवर आक्रमण करण्याचीच वाट पाहात होता. परंतू त्याला फारसं यश आलं नव्हतं. तसा तो संधी शोधतच होता. तशी ही त्याला नामी संधी चालून आली होती. शेवटी ती घटना ऐकताच खलिफानं हज्जाजला सिंधवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.
खलिफाच्या आदेशानुसार हज्जाज सिंधवर आक्रमण करण्यास मजबूर झाला होता. त्यानं अब्दूल्ला नामक एका व्यक्तीला अरब सैनिकाचं एक दल देवून सिंधवर विजयाची स्वप्न पाहात रवाना केलं.

****************************************

देवल बंदरात घडलेली घटना. ही घटना जेव्हा सुभेदारानं दाहिरला सांगीतली. तेव्हा सुभेदारानं सांगीतलेल्या घटनेनुसार राजा दाहिरला वाटलं की आता सिंधवर अरब सेना आक्रमण करणारच. त्यानं आपल्या सैन्याला आदेश दिला की सेना आक्रमणासाठी सज्ज असावी. जेणेकरुन एखाद्या वेळी आक्रमण झालंच तर त्याचा प्रतिकार करता येईल. त्यानुसार त्यानं आपला मुलगा जयशाहकुमारला आदेश दिला आणि त्याच्याच हातात नेतृत्व देवून त्याला बंदरगाहला पाठवले. त्यानुसार त्याच्या नेतृत्वात एक तुकडी बंदरगाहला पोहोचली.
राजा दाहिरच्या अंदाजानुसार अरबी सेनेनं देवलजवळील बंदरगाहवर आक्रमण केलं. परंतू सिंधी वीरांची ही सींधी सेना काही कमजोर नव्हतीच. त्यांनी योग्य असा प्रतिकार करीत अरबी सेनेचा धुव्वा उडवला. अरबी सेना हताश झाली. ती एवढी हताश झाली की आलेल्या पावली ती सेना परत गेली. या युद्धात ज्या अब्दुल्लानं नेतृत्व केलं होतं. तो अब्दूल्ला शेवटी या युद्धात मरण पावला. अब्दुल्ला मरण पावल्यानं सेनेला मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता. ती अरबी सेना माघारी फिरताच जयशाह कुमारचा जयजयकार करीत सिंध सेना महालात परतली. रस्त्यात सिंधी वीरांची आरती उतरवीत स्वागत केलं गेलं.
अरबी सेना परत इराणला पोहोचताच व अरबी सेनेचा पराभव होताच खलिफा आगीनं तडपडला. त्याच्या मनात सुडानं जन्म घेतला. त्याचबरोबर हज्जाजलाही वाईट वाटलं. या हिंदुस्थानचं आता काय करायचं आणि काय नाही अशी स्थिती त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातच त्यांनी जे स्वप्नात सोचलं नव्हतं, तेच घडलं होतं.
खलिफानं मन ही मन खुदाला स्मरलं आणि जाहिर केलं की जो कोणी वीर महाराजा दाहिरचं डोकं व छत्र त्याच्या पावलात आणून टाकेल, त्याला तो उचित सन्मान देईल. त्यातच हज्जाजच्या दरबारातील तो नवयुवक उठला आणि त्यानं सांगीतलं की मी महाराजा दाहिरचं डोकं आणि छत्र आणून देईल. त्यातच त्यानं तशी शपथही घेतली. त्यातच दरबारातील एका व्यक्तीनं सांगीतलं की महाराजा दाहिरला शरण गेलेल्या एका अरब सरदाराला धर्माचा वास्ता देवून मदत मागावी. त्यानुसार गुप्त बेत रचला गेला. तसेच एक गुप्तचरही सिंधला पाठविण्यात आला. गुप्तचराच्या माहितीनंतर दहा हजार सैन्याचं दल तसेच काही उंट व घोडे घेवून तो मोहम्मद बिन कासीम सिंधला रवाना झाला.

*******************************************

सिंध प्रांत......या सिंधवर ६३८ ते ७११ या काळात खलिफानं पंधरा वेळा स्वा-या केल्या. कमीतकमी चौ-याहत्तर वर्ष हे सिंधचं आक्रमण चाललं. त्यातच पंधरा खलिफा बदलले. पण सिंध प्रांत काही त्यांना जिंकता आला नाही. त्यातच पंधराव्या आक्रमणाचं नेतृत्व मोहम्मद बिन कासीमनं केलं. कासीम जेव्हा दहा हजार सैनिक दल घेवून सिंध वर पोहोचला. तेव्हा महाराजा दाहिरनंही आपल्या सेनेला तयार करण्यासाठी कंबर कसली. त्यातच गुर्जर, जाट व लोहाणा समाजाला सामाजीक अधिकार प्रदान करुन त्यांच्या काही लोकांना आपल्या सैन्यात सामावून घेतलं. यातच महाराजा दाहिरच्या मुलींनी म्हणजे परमाल व सूर्यकुमारीने सिंध च्या गावागावात फिरुन लोकांना जागृत केलं. त्यांच्या मनात मातृभूमी रक्षणाची ज्योत पेटवली. तसेच मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्यात सहभागी व्हायची विनंती केली.
महाराजा दाहिरच्या मुलींच्या विनंतीने मातृभूमीच्या रक्षणार्थ काही नवयुवक दाहिरच्या सैन्यात भर्ती झाले. त्या नवयुवकांंनी व लोकांनी मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी पुढे येवून पुढाकार घेतला.
निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थतीतीनुसार देवल सुभेदार बौद्धधर्मीय विचाराचा पुुरस्कर्ता ज्ञानबुद्ध याला जेव्हा अरबी आक्रमणाचा संकेत मिळाला. तेव्हा तो उदास झाला. बौद्धमत हा हिंसेवर विश्वास ठेवणारा नव्हता. त्याला वाटत होतं की कोणताही धर्म हा माणसाला लढायची प्रेरणा देत नाही. तसेच युद्धाशिवाय शत्रूला नामोहरणही करता येत नाही. तसेच युद्धभुमीतून परतही जाता येत नाही.
युुद्ध नको असं बौद्धमतचं म्हणणंं होतं. पण अरबी खलिफा ऐकेल तेव्हा ना. अशातच तो विचार करु लागला. त्यातच त्याला एक युुक्ती सुचली. त्यानं त्यासाठी एका धर्मगुुरुची मदत घेतली. ज्या धर्मगुरुशी संवाद करुन युद्धजन्य परिस्थीती टाळता येईल.
धर्मगुरु सागरदत्तनं बौद्धमतला सांगीतलं की अरबी लोकांनी मागील काही वर्षात आक्रमणं करुन आपली विहारंही नष्ट केली. याहीवेळी ते आक्रमणं करुन विहारं नष्ट करतीलच. तेव्हा आपण महाराजा दाहिरला मदतच करायला हवी. हं मानलं की बौद्ध धम्म शांतीचं प्रतिक आहे, पण शांती कुठवर पाळायची? अरबी लोकं आपण शांत बसलो तरी आपले नुकसानच करीत असतील तर आपण शस्रही हातात घ्यायलाच हवी.
अरबांनी मकरान प्रदेशावर आक्रमणं करुन बौद्ध मठं नष्ट केली होती. त्यामुळं यावेळीही ते तसेच करतील असे वाटत होते. त्यांच्या राज्यात आपण सुरक्षीत राहूच शकणार नाही असेही बौद्ध धर्मीयांना वाटत होते. त्यामुळे महाराजा दाहिरला मदत करणे ही त्या काळातील बौद्धांंची परिस्थिती होती. शेवटी ज्ञानबुद्धची बुद्धी मंद झाली आणि त्यानं आपला मंत्री मोक्षवासवला खलिफाशी समझौता करण्यासाठी पाठवले.
मोक्षवासवनं समझौता करतांना खलिफाला एक संदेश पाठवला व सांगीतलं की आम्ही तुम्हाला सहायता देतो. पण आमची बौद्धमठं ही तुटायला नको. तसेच आम्हाला कोणतंच नुकसान पोहोचायला नको.
खलिफाला संदेश ऐकताच खुप आनंद झाला. शत्रूच्या शामियानातील विश्वासघाताचे सूर त्याला ऐकायला मिळाले. त्यातच हज्जाजनं सकारात्मक संदेश ज्ञानबुद्धला पाठवला. त्यानुसार बौद्ध मंडळी सुरक्षीत झाली होती.
ज्ञानबुद्धनं एका दगडात दोन पक्षी मारले होते. एक म्हणजे महाराजा दाहिरनं बौद्धांसोबत जे काही केलं होतं. त्याचा बदला काढला होता. कारण महाराजा चंदर गादीवर बसताच त्यानं जो बौद्ध धम्माला राजाश्रय मिळवून दिला होता. त्यानुसार बौद्धधम्म हा राजधर्म बनला होता. तो राजाश्रय महाराजा दाहिर गादीवर बसताच त्यानं बौद्धधम्म व राजधम्म नष्ट केला होता. हा एक उद्देश होता व शांतता प्रस्थापीत करणे हा दुसरा उद्देश होता.
राजा दाहिर.........एक कट्टर देशासाठी लढणारा राजा. ज्या सिंध प्रांतापासून हिंदूस्थानाला हिंदूस्थान हे नाव पडलं. त्या प्रांताचा राजा. पुढे या राजाच्या बलिदानाचा इतिहास हा लिहिला गेला. तो इतिहास चचनामा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये इतिहासकारांनी राजा दाहिरबद्दल ब-याच गोष्टी लिहिल्या आहेत. त्या तर्कसंगत वाटत नाहीत.
१) पहिली गोष्ट अशी की राजा दाहिर हा कट्टर हिंदूवादी होता.
राजा दाहिर हा कट्टर हिंदूवादी होता. यामध्ये थोडासा संभ्रम वाटतो. एका बाजूने विचार केल्यास हा राजा हिंदूवादी होता. कारण त्याचा काका चंदेलनं जेव्हा राज्यकारभार सांभाळला. तेव्हा तो बौद्धधर्मीय असल्यानं त्यानं बौद्धधम्माचा पुरस्कार केला होता. त्यातच त्यानं आपल्या राज्यात बौद्ध धर्माला राजधर्म म्हणून घोषीत केलं होतं. परंतू ज्यावेळी राजा दाहिर राजगादीवर बसला. त्यावेळी तिथे असलेल्या बौद्ध राजधर्माला बदलवून हिंदू राजधर्म मानायची घोषणा राजा दाहिरनं केल्यामुळं त्याला कट्टर हिंदूवादी समजायला काही हरकत नाही. यावरुन तो कट्टर हिंदूवादीच दिसतो. परंतू त्याने तिथे असलेल्या तमाम इतर बौद्ध धर्मीयांना वाळीत टाकले नाही. तर त्यांना तिथं मोठमोठी विहारंही बांधण्याची परवानगी दिली होती. हेही तेवढेच खरे आहे. ही गोष्ट राजा दाहिरच्या सहिष्णुता पणाची साक्ष देते. एवढेच नाही तर खलिफानं सोळा स्वा-या केल्यानंतरही मनात किंतू परंतू न ठेवता राजा दाहिरनं एका अरबी सरदाराला शरण दिली होती. अर्थात अरबी लोकांना सन्मानच दिला होता. परंतू राजा दाहिरविरुद्ध त्या माणसाचा उपयोग त्याला धर्माचा वास्ता देवून करुन घ्यावा असा सल्ला ज्यावेळी इराणमध्ये बैठक भरली. तेव्हा एका प्रसंगात एका सरदाराने हे त्या खलिफा दरबारी सुचवले होते. एकंदरीत सांगायचं झाल्यास राजा दाहिरला त्यानंतर बदनाम करण्यात आले असावे. कारण लिहिणारे हात हे त्यानंतर आलेल्या व सत्तेच्या आहारी गेलेल्या लोकांचे असावेत.
आज जगात पृथ्वी गोल आहे हे सांगणा-या गॅलिलिओला फाशी देण्यात आली. कारण त्या वेळेपर्यंत पृथ्वी सपाट आहे असंच मानण्यात येत होतं. पण पुढं ब-याच वर्षानं पृथ्वी गोलच आहे हे सिद्ध झालं व गॅलिलिओचं विधान खरं निघालं. साॅक्रेटिसलाही सत्यासाठी विषाचा प्याला प्यावाच लागला. याच मृत्यूच्या धाकानं का असेना, डार्वीनला उत्क्रांतीवाद माहित झाल्यावरही त्यानं ठोसपणे तो सिंद्धांत मांडला नाही. तिच गत राजा दाहिरच्या पराक्रमाचा इतिहास लिहितांना लेखकांची वा इतिहासकारांची झाली असेल ही शक्यता नाकारता येत नाही.
२)दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राजा दाहिरचा स्वतःच्या बहिणीसोबतचा विवाह. यामध्ये हिंदू धर्म हा मुळात अंधश्रद्धेवर जरी आधारलेला असला तरी त्यात असल्या विचित्र गोष्टीला स्थान नाही. मुस्लीम मंडळी विवाहासाठी रक्तसंबंध पाळत नाही तर ते दूध पाळतात. अर्थात काकाच्या मुलीशी देखील ते विवाह करु शकतात. कारण मोहम्मद बिन कासीमचा विवाह हज्जाजनं आपल्या मुलीशी लावून दिलेला होता. जो हज्जाज त्याचा काका होता. परंतू हिंदू धर्मात तशी सोय नाही. इथे विवाह करतांना दूधच नाही तर रक्तसंबंधही पाळला जातो. त्यामुळं राजा दाहिरनं बहिणीशी विवाह केलेलाच नसावा हे निर्वीवाद सत्य आहे. पण यात असं होवू शकते की ज्या मुलीशी त्याचा विवाह झाला. त्यावेळी ती त्याची कोणी आतेबहिण, मामबहिण असावी. तिला राजा दाहिरनं बहिणीचाच दर्जा दिला असावा. परंतू यामध्ये इतिहासकारांनी हा इतिहास मांडतांना धर्माचा आधार घेतला व असं सांगीतलं की राजा दाहिर हा अंधश्रद्धाळू होता. सत्तापिपासूही होता. ज्यावेळी देवलचं एक युद्ध पार पडलं, त्यानंतर कोण्या ज्योतिषानं त्याला सांगीतलं की तुझी बहिण ज्याच्या कुणाच्या घरी जाईल. तो या राज्याचा राजा बनेल. म्हणूनच राजा दाहिर सत्तापिपासू असल्यानं त्यानं बहिणीशी विवाह केला. जी असत्य गोष्ट वाटते. यात ते इतिहासकार तसं कारणही स्पष्ट करतात आणि सांगतात की राजा दाहिरला दुसरा राजा माझ्यानंतर बसावा असं वाटत नव्हतं. म्हणूनच त्यानं बहिणीशी विवाह केला.
राजा दाहिरनं बहिणीशी विवाह केला हे कारण खरं मानून काही इतिहासकार म्हणतात आणि पुढं सरकतात. यामध्ये असं जाणवतं की कदाचित राजा दाहिरला वाटत असावं की माझी बहिण इथंच राजमहालात राहावी. तिचा जर विवाह केला आणि पती वाईट निघाला तर माझ्या बहिणीचं वाटोळं होईल. कदाचित यासाठीही ही पुष्टी जोडली असावी. तसेच पुढे जावून चचनाम्याशिवाय कोणीच राजा दाहिरबद्दल काहीही लिहू नये. वादंग व्हावेत म्हणूनही राजा दाहिरनं बहिणीशी विवाह केला असं लिहून राजा दाहिरला बदनाम केलं असावं.
राजा दाहिर हा पराक्रमी राजा होता. तो सिंधचा हिंदू धर्मातील शेवटचा राजा ठरला. कारण त्यानंतर सिंधमध्ये एकही हिंदू राजा गादीवर आला नाही. सिंधचं या राजगादीवर बहुतःश मुस्लीम राजेच आले. पण मुस्लीमांना या ठिकाणी राज्य स्थापन करण्यासाठी सिंधवर सतरा वेळा स्वा-या कराव्या लागल्या होत्या.
सिंधभुमी, जी हिंदूंची मातृभुमी होती. ज्या सिंधपासून अखंड हिंदुस्थान बनला होता नव्हे तर ज्या सिंधू नदीने व तिच्या उपनद्यांनी हा भाग सुपीक बनला होता. तसेच ज्या सिंधच्या मळ्यात मसाल्याचे पदार्थ भरपूर प्रमाणात पीकत असत. हे मसाल्याचे पदार्थ घेण्यासाठी अरबी लोकंच नाही तर पाश्चात्य देशही व्यापार करण्यासाठी यायचे. ते व्यापार करायचे. शिवाय चर्चाही करायचे. ज्या चर्चेतून हिंदुस्थानचा इतिहास लोकांना माहित झाला. हा हिंदुस्थान स्वयंपूर्ण असून या ठिकाणी सोना पीकतो ही गोष्ट अरब देशात पसरली. तसं पाहता या देशात ज्यावेळी समुद्रगुप्ताचं व हर्षवर्धनाचं राज्य होतं. तेव्हा या देशात आलेल्या विदेशी लोकांनी या देशाचं खुप सारं वर्णन त्यांनी जे त्यांच्या भाषेत लिहिलं. त्यामुळं हिंदूस्थानाला सोन्याची चिमणी म्हटलं गेलं.
हिंदुस्थानात मुळात तीन प्रकारचे जे धर्म होते. त्या धर्मात चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या. शिवाय येथील शिक्षण पद्धतीही वाखाणण्याजोगी होती. त्यावेळी असलेली नालंदा व तक्षशीला ही विद्यापीठं जगात नावाजलेली होती. तसेच या विद्यापीठात जगातील विदेशी लोकं शिकायला येत. तसेच तिथं शिकायला आलेले विद्यार्थी विद्यापीठात शिकत. शिवाय या देशातील तमाम गोष्टींचाही अभ्यास करीत. येथील राजे महाराजांची भरभरुन स्तुती करीत. अशी स्तुती की येथील राजे त्यांच्या स्तुतीने होळपळून जात. त्यांना आपण काय करीत आहोत. याचीही जाणीव राहात नसे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करुन त्या पाश्चात्य लोकांनी ज्या गोष्टी आपल्या पुस्तकात लिहिल्या. त्यात सांगीतलं ही हिंदुस्थान हा सोन्याचा देश आहे. येथील शेतात सोनंच पीकत असून येथील राजे उदार आहेत. ते धर्माला जास्त मानतात व सर्वात जास्त दान हे धर्मासाठीच खर्च करीत असतात. त्यामुळं त्यांचं धन हे त्यांच्याजवळ कमी व मंदीर व विहारातच जास्त आहे.
त्यामुळं की काय, सातव्या शतकात हिंदुस्थानवर आपली तिरपी नजर ठेवणा-या अरबी खलिफाला महत्वाकांक्षा वाटली की आपण हिंदुस्थान जिंकावा.
हिंदुस्थान......... या हिंदुस्थानावर फार पुर्वी आर्यांनी आक्रमण केले होते. त्यांनी या हिंदुस्थानवर आक्रमण करुन येथील मुळात राहात असलेल्या द्राविडांना गुलाम केले. आपली संस्कृती या ठिकाणी प्रसवली. त्यांच्यात देव आणि भूत या अंधश्रद्धा प्रसवल्या.
येथील द्रविड मंडळी मुळात वीर होती. पण आर्याच्या आधुनिक तंत्रज्ञानापुढं त्यांचं काही चाललं नाही व येथील शूर द्रविड गुलाम बनले. पण हे द्रविडही मुळात शूर असल्यानं त्यांना सरासरी गुलाम बनवता आलं नाही. त्यासाठी त्यांच्या विचारात अंधश्रद्धेचं बीज व विष पेरावं लागलं. ही माणसं शूर होती. पण त्यांना पाहिजे त्या प्रमाणात तेवढी अक्कल नव्हती. ज्यानं थोडीसी अक्कल सांगीतली. येथील मंडळी त्याच्यावरच जास्त विश्वास ठेवत असे. तो गोड गोड बोलून त्याला डोहात ढकलत असला तरीही. यातूनच पुढे द्रविडांचं अस्तित्व संपलं व आर्यांचं अस्तित्व तयार झालं.
आर्यही शूर नव्हते असं नाही. ते शूर होते. ते या हिंदुस्थानात स्थिरावले. त्यांनी या देशाला सावरलं. परंतू त्यांच्यात जन्मदराच्या वाढत्या प्रभावानं पुढं काही गट तयार झाले. हे गट म्हणजे दुफळीचे गट. प्रत्येकाच्या मनात इर्षा तयार झाली. मग काय, प्रत्येकाला वाटायला लागलं की आपलं साम्राज्य असावं. यातूनच या देशात काही महाजनपदे उदयाला आली. कोसल(लखनौ), वत्स(अलाहाबाद), अवंती(उजैन), मगध(दक्षिण बिहार). हे काही महाजनपदे आहेत. तसेच काशी(बनारस),मल्ल(गोरखपूर), चेदि(कानपूर), कुरु(दिल्ली), पांचाल(रोहिलखंड), मत्स(जयपूर), शुरसेन(मथुरा), अश्मक(औरंगाबाद), अंग(चंपा पुर्व बिहार), वृज्जी(उत्तर बिहार), गांधार(पेशावर), कंबोज(गांधारजवळ). ही देखील काही महाजनपदेही होती. त्यानंतर मगधचा राजा धनानंदाने आर्य चाणक्याचा अपमान करताच त्यानं भर दरबारात प्रतिज्ञा केली की जेव्हापर्यंत मी धनानंदाचा नाश करणार नाही, तोपर्यंत शेंडीला गाठ बांधणार नाही. त्यानुसार आर्य चाणक्यानं मगधानंतर उत्तर हिंदूस्थानात मौर्य साम्राज्य स्थापन केलं. पुढं मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भागात शुंग, इंडो ग्रीक, कुशाण, गुप्त, वर्धन, तर दक्षीण भागात चेर, पांड्य, चोळ, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, पल्लव, चालुक्य इत्यादी राजघराणे आले. ज्यांनी आपली मातृभुमी टिकवून ठेवली. अर्थात आर्यानंतर कोणाचाही शिरकाव या हिंदुस्थानात होवू दिला नाही. मात्र इ स पुर्व सहाव्या शतकात दार्युश नावाच्या इराणी राजाने हिंदुस्थानातील वायव्येकडील प्रदेश व पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकला होता. पण त्याला हिंदुस्थान जिंकता आला नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा असाच हिंदुस्थानला जिंकण्याचा प्रयत्न सिकंदरने केला. पण त्याला हिंदुस्थानात शिरु देण्यापुर्वीच त्याला मायदेशाचे वेध लावले गेले. त्याच्याच सैनिकांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. त्यानंतर तो परत गेला. पण आपल्या देशात परतण्यापुर्वीच त्याचा रस्त्यात अंत झाला.
हा हिंदुस्थानचा इतिहास....... अरबांनी ह्या इतिहासाचा अभ्यास केला होता. हिंदुस्थानात सोने आहे. ते सोने मंदीर व विहारात दडलेले आहे हेही त्यांनी ऐकले होते. मग काय, ते स्वप्न पाहू लागले की आपल्याला हिंदूस्थानवर आक्रमण करायचे आहे. जर हिंदूस्थान आपल्या ताब्यात आला, तर बाकी कोणत्याही देशांना जिंकण्याची गरज नाही. कारण हिंदूस्थान सोने की चिडीया होता. सगळ्यात जास्त धन मंदीर व विहार. शेवटी एक तात्कालिक कारण घडलं. जे सिंधला देवल बंदर होतं. त्याच बंदरात एक नाव आली आणि त्या नावेतील सैनिकांनी देवल शहरावर हल्ला केला. हा हल्ला म्हणजे अरबांनी हिंदुस्थानवर आक्रमण करण्यासाठी केलेला सराव होता. कारण त्यानंतर खलिफानं चौदा स्वा-या केल्या व पंधरावी स्वारी करुन सिंधला नेस्तनाबूत केलं. परंतू सिंध वाचवतांना राजा दाहिरसह त्याच्या संपूर्ण परीवारानं बलिदान केलं हे तेवढंच खरं आहे.
श्रीलंका......श्रीलंकेला सिंघल म्हणत. एकदाचा प्रसंग.......श्रीलंकेच्या राजाने बगदादचा राज्यपाल हुज्जाज बिन यूसुफ यांना काही नजराणा पाठवला होता. परंतू हा नजराणा देवल बंदराजवळ लुटण्यात आला होता. या समुद्रीजहाजावर काही स्रीयाही उपस्थीत होत्या. त्यातच काही लोकं भुमीगत होवून हज्जाजजवळ पोहोचले. तसेच त्यांनी सांगीतलं की महाराजा दाहिरच्या श्रेत्रात जहाज लुटलं गेलं असून ती लुट दाहिरच्याच माणसांनी केलेली आहे. त्यानंतर हुज्जाज बिन युसूफनं राजा दाहिरला पत्र लिहिलं. त्या पत्रातील मजकूर होता की जहापनाह, आपके बंदरगाह के समीप हमारे खिदमत में सिंघल से कुछ असर्फिया पेश हो रही थी। किंतु वह अशर्फिया आपके बंदरगाह के समीप लुट ली गई हैं। हमे लगता है कि वह लुट आपके ही आदमियों ने की होगी। तथा आपसे दरख्वास्त है कि आप जल्द से जल्द हमारा लुटा गया माल और हमारी औरतें तथा हमारा पुरा सामान आप वापिस कर दे।
हे संदेशात्मक पत्र. त्यानंतर राजा दाहिरसाठी एक आदेशही जारी झाला. परंतू त्या गोष्टीला राजा दाहिरनं प्रतिसाद दर्शवला नाही. तसेच तशी घटना देवल बंदरात घडलीच नाही असंही सांगीतलं. परंतू हुज्जाजनं राजा दाहिरच्या त्या नकारकतेवर विश्वास ठेवला नाही.
सिंधचा समुद्री मार्ग हा पूर्ण जगाला व्यापार करण्यासाठी खुला होता. सिंधचे व्यापारी त्या काळात व्यापार करण्यासाठी खुप दूर दूर जात होते. तसेच इराण, इराक व अरब वरुन येणारे जहाज सिंधच्या देवल बंदरातून अन्य देशाकडे जात होते. त्यातच जी घटना घडली. त्या घटनेनुसार अरब व्यापारी व सुरक्षा कर्मचा-यांनी देवल बंदराजवळ विनाकारण हमला केला. तसेच शहरातील काही मुलं व स्रियांना जहाजात कैद केले. परंतू याच गोष्टीला राजनैतिक रंग देवून हज्जाजनं त्याला मुलामा चढवला. कारण तो सिंधवर आक्रमण करण्याची स्वप्न पुष्कळ दिवसापासूनच पाहात होता.
सिंधवर आक्रमण करण्यासाठी काही कारणंही होती. त्यात पहिलं कारण होतं. श्रीलंकेचं जहाज देवल बंदराजवळ लुटणं जाणं. हज्जाजनं म्हटल्यानुसार स्रिया आणि सामान परत करायला महाराजा दाहिर तयार नव्हते. राजा दाहिरच्या मतानुसार, सिंधच्या देवल बंदराजवळ सिलोनच्या जहाजावर झालेला हमला हा समुद्री डाकूंनी केला असावा. त्यात आमचा दोष नाही असे मत होते. मला यात कोणता लाभ असेही प्रतिपादन राजा दाहिरनं केले.
दुसरं कारण होतं. ते म्हणजे महाराजा दाहिर एक चांगला राजा असून त्यानं माविया बिन हारिस अलाफी आणि त्याचा भाऊ मोहम्मद बिन हारिस अलाफी यांना शरण दिलं होतं. ज्यानं खलिफाविरुद्ध बगावत केली होती. याच दोन भावांनी सिंधच्या मकरान प्रांतात आश्रय घेतला होता. जिथं महाराजा दाहिरचं राज्य होतं.
बगदादच्या गव्हर्नरनं कित्येक पत्र राजा दाहिरला लिहिले आणि त्या पत्रात लिहिलं की या दोन्ही भावांना त्यांच्या सुपुर्द करावं. परंतू महाराजा दाहिरनं त्यालाही नकार दिला होता.
युद्धाचं अजून एक कारण होतं. ते म्हणजे राजकीय अराजकता. कितीही चांगलं प्रशासन राजा दाहिरचंं असलं तरी काही राज्यातील लोकं असंतुष्ट होते. कारण राजा दाहिरनं आपल्या राज्यात बौद्ध धर्माला वाट दाखवून हिंदू धर्म प्रस्थापीत केला होता. जरी राजा दाहिरनं विहार बांधायची परवानगी दिली, तरी हा बौद्ध गटंही राजाच्या या कर्तृत्वानं असंतुष्टच होता. ज्यावेळी मोहम्मद बिन कासीम हा युद्धवेळी युद्ध सैनिक व सामान घेवून. निरोनकोट व सिवस्तानला पोहोचला. तेव्हा तिथं बौद्ध भिक्षूंनी त्याचं स्वागत केलं आणि मदतही केली असं म्हटलं जातं. चचनाम्यात हेच लिहिल्याचं इतिहासकार सांगतात. परंतू त्यावेळी बौद्ध धर्मीय लोकं शांततावादी जरी असले तरी धर्माधर्मात तेढ वाढविण्याचे प्रयत्न केल्या गेले. राजा दाहिरच्या राज्यात बौद्ध मंडळीपैकी काही सुभेदार होते. तर दोन बौद्ध लोकांना त्यानं दोन प्रांताचे राज्यपाल बनवले होते.
राजा दाहिर असा व्यक्ती होवून गेला की ज्याने सिंधच्या भुमीवर आपलं डोकं दिलं. त्यानंतर सिंध प्रांत हा तिनशे चाळीस वर्षापर्यंत अरबांच्या गुलामीत राहिला. जेव्हापर्यंत सोमरा वंश त्याठिकाणी आला नाही.
मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खन पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरची अनेक छोटे मोठे साम्राज्य होऊन गेली. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशाची व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे हिंदुस्थानातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून प्रदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्काने तसेच नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजेच जमिनीवरून व्यापाराचे दळणवळण सुरू झाले. सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले.

************************************************************************************************

अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारत हिंदुस्थानातील बेटे होती. तसेच लक्ष्ममद्विप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात होता. प्राचीन काळच्या समुद्र व्यापारात या बेटाचे स्थान महत्त्वाचे होते. तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक यामध्ये हिंदुस्थानातील बेटांचा उल्लेख आहे हे पुस्तक एका ग्रीक खलाशांने लिहिलेले आहे. हडप्पा आणि मोहंजोदडो आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत मिळून हिंदुस्थान बनलेला होता. याच भागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असंही म्हटलं जातं. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता आणि म्यानमार हे शेजारी देश होते. तसेच दक्षिण आशियाच्या भारतीय उपखंडाचा हिस्सा चीन आणि म्यानमार नव्हते. तरी प्राचीन भारताशी त्यांचा संबंध आला होता.
इ स पू सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राज्याचे मोठे साम्राज्य प्रस्थापीत झाले होते. हे साम्राज्य हिंदूस्थानपासून तर रोमपर्यंत आणिर इजिप्तपर्यंत पसरले होते.
सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे समर्थ कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. याचा सेनापती पुष्यमित्र शृंग याने बंड करून त्यांची हत्या केली आणि तो स्वतः राजा बनला. याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशांमध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राज्यांना इंडो ग्रीक राज्य असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासात या राज्याची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीचे नाणे बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती परंपरा पुढे भारतात रुजली. इंडो ग्रीक राज्यांमध्ये मिनँडर हा राजा प्रसिद्ध असून त्यांने नागसेन या बुद्ध भिक्खू बरोबर बुद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनँडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांनी विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ना या ग्रंथाची निर्मिती केली.
भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राज्यांनी केली. गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता, त्याच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राज्याने सुरु केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. कनिष्काचे सोन्याचे नाणे, तांब्याचे नाणे सापडले आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्कानेच काश्मीरमध्ये कनिष्क शहर वसवले होते. कनिष्कच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्ध चरित्र आणि वज्रसुची हे ग्रंथ लिहिले होते.

************************************************************************************************

इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्ला एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबर पवित्र कुराण मार्फत या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाला शरण जाणे असा होतो. सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्ला आहे, तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे, असे इस्लाममध्ये सांगितले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हा होय असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे.
हिंदूस्थान आणि अरबस्थान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील किंवा सिंधच्या देवल बंदरांना भेट नेहमीच देत असत. इसवीसनाच्या सातव्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रचार झाला. त्याच काळात अरबी व्यापाऱ्यांमार्फत हिंदूस्थानातही इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळांना मशीद म्हणत.
अरबी लोक हिंदूस्थानात येण्यापूर्वी हा देश संपन्न असा होता. या ठिकाणी शिक्षणाची अनेक केंद्रे होती. प्राचीन भारतात शिक्षणाचीे जी अनेक केंद्रे होती. ती नावाजलेली होती. जसे तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होय. तेथे सापडलेल्या पुराव्याच्या आधारे ते इसवी सन पूर्व सहाव्या शतकात वसवले गेले. गौतम बुद्धाचा समकालीन असलेल्या जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व चौथ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. मराठी साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचेसुद्धा शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक वैद्य हे तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी छान वर्णन केलेले अाहे. ग्रीक मध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते. असे त्यांनी लिहून ठेवले आहे.
चीन बौद्ध भिक्खू भारतात आला होता. त्याचं नाव फाहियान होतं.त्यानेही चारशेच्या सुमारास तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठांमध्ये वैदिक वाडःमय, अर्थशास्त्र अशा विविध विषयात प्रशिक्षण दिले ढाई.
वाराणसी हेही शिक्षणाचं केंद्र होतं. वरणा आणि असी या गंगेच्या उपनद्या आहेत. या दोन नद्यांच्या मध्ये बसलेल्या शहराला वाराणसी नाव मिळालं. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षण देणारे केंद्र प्राचीन काळापासून होते. तसेच गुजरातमध्ये सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. ते इसवी सनाच्या पाचव्या ते आठव्या शतकात आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युवांन श्वांग आणि इत्सिंग यांची भेट या चीनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती.
नालंदा विद्यापीठ हे देखील खुप गाजलेलं हिंदुस्थानातील शिक्षणाचं केंद्र होतं. आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदारहस्ते देणग्या दिल्या होत्या. युवान सॉंग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे.
विक्रमशिला विद्यापीठ हे देखील गाजलेलं शिक्षणाचं त्या काळातील केंद्र होतं. अाजच्या बिहारमधील भागालपुरच्या जवळच धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना केली. इसवी सनाच्या आठव्या शतकात केली. तिथे सहा विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.
कांची हे देखील शिक्षणाचे एक केंद्र होते. पल्लव राजसत्तेच्या काळात आजच्या तामिळनाडूमधील मधील कांची हे सर्व महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई.
हिंदुस्थान सर्वच दृष्टीकोनातून संपन्न असा देश होता. या देशांमध्ये कौटिल्य झाला आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच कालीदासाचे शाकुंतल नाटक सुद्धा विख्यात आहे. प्राचीन हिंदुस्थानातील देशांतर्गत आणि दूरवरच्या देशाशी असलेले व्यापारामुळे समृद्धी नांदत होती समाजात विविध जातींमध्ये विभागलेल्या होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी म्हणत. सगळ्यांच ठिकाणाहून खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. त्यात तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट मातीची भांडी या सर्व भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी होती. तांदूळ, गहू, सातू ही मुख्य पिके होती. यात धान्यापासून बनवलेले पदार्थ तसेच मासे, मांस आणि फळे यांचा समावेश असे. लोक कपडे वापरत. तसेच लोकरीची वस्त्रे वापरत. भारतीय वैद्यकशास्ताला आयुर्वेद असे म्हटले जाई. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगाचे निदान, रोगावरील उपचार या सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर रोग होऊ नये, म्हणून काय करायला पाहिजे याचा विचार केला होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्सा शास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक यांनी लिहिला. तसेच सुश्रूत या सल्लाविशारदाने सुश्रुतसंहिता. यात रोगाचे निदान आणि त्यावरील उपायांची माहिती आहे. या ग्रंथाच्या विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्याचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रिया यांचे प्रकार याची चर्चा केलेली आहे. सुश्रूत सहिंतेचे अरबी भाषा मध्ये रूपांतर झालेले आहे. त्याचे नाव किताब इ सुसुद असे होते.
गणित आणि खगोल शास्त्र मध्ये सुद्धा भारतीय लोक काही कमी नव्हते. एक ते नऊ तसेच शुन्य या संख्यांचा वापर त्यांनी प्रथम केला. एकं दहं या अंकानंतर अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्ट हा खगोलशास्त्रज्ञ होता. त्यानं आर्यभट हा ग्रंथ लिहिला होता. त्याने त्याच्या अनेक शोध लावले होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला वराहमीहीर. त्याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक-रोमन इजिप्ती या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचा विचार केलेला दिसतो. इसवी सनाच्या सातव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मदत्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले आहे.
हिंदुस्थान हा सर्व क्षेत्रात आघाडीवर होता. इथे बंदर होते. ते बंदर विकसित अशा स्वरूपाचे होते. भारतीय माल येथील विकसित बंदरातून बाहेर जात असे. इसवी सनाच्या पहिल्या दुसर्‍या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आला होता. या व्यापारात दक्षिण हिंदूस्थानातील बंदरांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात काही नकाशे सापडले आहे. तसेच धातूच्या काही वस्तू सापडल्या. त्या रोमन बनावटीच्या आहेत. हिंदुस्थान आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. अशा अनेक व्यापारी केंद्राची माहिती तत्कालीन साहित्यात मिळते. या ठिकाणी इजिप्तमधील अलेक्झांडर नावाचे बंदर महत्वाचे होते. येथील माल अलेक्झांड्रापर्यंत घेऊन जात. तेथून तो युरोपातील देशामध्ये पाठवला जाई. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोप पर्यंत पोचवले.
गणिताच्या संकल्पना आपल्या हिंदुस्थानातील लोकांनी मांडलेल्या असून या संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरब लोकांनी या संकल्पनेच्या परिचय करून दिला. ज्याप्रमाणे भारतात व्यापार हा शिगेला पोहोचला होता. त्याप्रमाणे आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. इंडोनेशियात अाजही रामायण आणि महाभारत यातील कथांवर आधारित काही नृत्य लोकप्रिय आहेत. आग्नेय आशियातील राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड इत्यादी देशात पोचला. नंतरच्या काळात शिव आणि विष्णू या मंदिराची निर्मिती झाली.
************************************************************************************************

तो रणरणता रस्ता. त्या रस्त्यानं ती अरब सेना त्या रेशीम मार्गानं सिंधवर आक्रमण करण्यासाठी आली होती. त्या सेनेच्या मनात देवलबाबत बदला काढण्याचा विचार होता. अशातच मोहम्मद बिन कासीमची सेना देवलच्या जवळ आल्याची बातमी राजा दाहिरला मिळाली. त्याचबरोबर राजाला थोडी धास्तीही वाटली. तो थोडा घाबरला. तसा तो एक लांब श्वास घेत विचार करु लागला. अशावेळी काय करायचं. त्यातच त्यानं ताबडतोब एक मंत्रीगटाची बैठक बोलावली. चर्चा केली. पण चर्चेअंती त्याला काही मार्ग सापडत नव्हते.
राजा विचलीत झाला होता. तसा त्याला अनुभव होताच. मागील सोळा युद्धाचा. पण ते युद्ध त्यानं बौद्ध सुभेदार असलेल्या ज्ञानबुद्धच्या व दोन बौद्ध राज्यपालाच्या आणि काही मंत्रीगणाच्या भरवशावर जिंकलं होतं. पण आज त्याच्या दरबारातील काही चाणाक्ष मंत्री मरण पावले होते. त्यांचा अनुभवही दांडगा असायचा.
आज ते नव्हते. त्यातच ज्ञानबुद्ध हा सुभेदार मोहम्मद बिन कासीमला मिळाला होता. त्यानं तर स्वागतच केलं होतं मोहम्मद बिन कासीमचं. तसेच त्यानं आपला मंत्री मोक्षवासवलाही नेलं होतं.
राजा दाहिरनं जे सोळा युद्ध जिंकले होते. ते सोळा युद्ध केवळ बौद्ध समाजाच्या लोकांच्या भरवशावर जिंकले होते. परंतू आता त्या धर्माची माणसं जी सैनिक होती. ते सैनिक त्याला सोडून मोहम्मद बिन कासीमला मदत करणार होती. याच विचारानं राजा दाहिर त्रस्त होता. तसा त्याला त्या मंत्रीबैठकीतून काहीच सूर गवसला नाही. शेवटी युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता.
राजा दाहिरची एक नीती होती की बलाढ्य जरी शत्रू असेल आणि तो जर ऐकत नसेल तर त्याच्यावर चढाई करणे. तशी राजा दाहिरला वाटत होतं की आपण हे युद्ध जिंकू शकू. त्याचं कारणंही तसंच होतं. मागील सोळा युद्धात त्यानं अरबांवर अगदी सहजतेनं विजय मिळवला होता. तसा राजा दाहिर हा शूरवीर होताच. त्याची सोळा युद्ध जिंकल्यामुळे अरबांना धास्तीही होतीच. सहजासहजी अरबांना राजा दाहिरवर विजय मिळविणं ही गोष्ट एवढी सोपी गोष्ट नव्हती.
हिंदुस्थान ही मुळात व्यापारी पेठ होती. इसवी सनाच्या पुर्वीपासून तर इसवी सनाच्या नंतरही येथील राजे हे अरबच नाही तर इतर देशाशी व्यापार करीत. इथे असलेल्या मौलवान वस्तूंना जी इतर देशाची मागणी होती. पुढे या हिंदुस्थानला जिंकताच ह्या देशातील संपूर्ण माल आपलाच होईल असं अरबांना वाटत होतं. ही गोष्ट केवळ अरबांनाच वाटत नव्हती. तर इतरांनाही तसंच वाटत होतं. शेवटी अरबांनी त्यासाठीच भारतावर चढाई करुन सोळा युद्ध थोपले.
अरबी लोकांना हिंदूस्थानात येण्याचा मार्ग म्हणजे हा रेशीम मार्ग. जो देवल बंदरातूनच येत होता. दुसरा कोणताच रस्ता नव्हता त्यांना. त्यामुळं की काय, अरबांना देवल बंदर जिंकणं आवश्यक होतं. त्यातच देवल बंदर ज्यांच्या ताब्यात होतं. तो सिंधचा प्रदेश तोही जिंकणं भाग होतं. त्यातच सिंध जिंकणं म्हणजे राजा दाहिरला जिंकणं भाग होतं. राजा दाहिरला जिंकणं म्हणजे तारेवरची कसरतच होती. कारण तोही सिंधच्या राजगादीवर आलेल्या इतर वारसांसारखाच शूर होता. शिवाय ज्या सोळा स्वा-या सिंधवर झाल्या होत्या. त्या स्वा-यांमध्ये राजा दाहिर विजयी झाला होता. त्यामुळं खलिफासमोर प्रश्न पडला होता की सिंधला जिंकायचं कसं? त्यातच एक दिवस दरबार भरवला. तबकात विडा ठेवण्यात आला आणि जाहिर करण्यात आलं की जो कोणी राजा दाहिरचं मस्तक व छत्र आणेल. त्याला यथोचित बक्षीस देण्यात येईल.
ती सुचना सगळीकडं पसरली. ते वाक्य सर्वांनी ऐकलं. कुजबूज सुरु झाली. कोणीच पुढे येईना. अशातच एक नवयुवक उठला. ज्याच्या मनात जोश होता. महत्वाकांक्षा होती. पण तो तसा वीर वाटत नव्हता.
मोहम्मद बिन कासीम त्याचं नाव होतं. तसा खलिफा म्हणाला,
"कोण तू? आणि कशासाठी उभा झाला?"
"जहापनाह, गुस्ताखी माफ करा. मी मोहम्मद बिन कासीम. मला हे आव्हान स्विकार आहे."
"हे आव्हान. तुला स्विकार आहे म्हणतोस. माहित आहे का तू काय बोलतोस ते?"
"होय जहापनाह."
"तू होश हवाशात तरी बोलत आहेस का?"
"होय जहापनाह."
"नशेत तर नाही तू."
"नशेत! छे! मी पूर्ण होशहवाशात बोलतोय. मला ही जबाबदारी द्यावी तुम्ही."
"अरे मुला, माहित आहे का तुला, हा काही भातूकलीचा खेळ नाही की तू जावून राजा दाहिरचं मुंडकं व छत्र आणणार."
"जहापनाह, आपण विश्वास ठेवा."
"अरे पण तुझं वय काय, तुझे अजून दुधाचे ओठ सुकायचे आहेत बाळा. अन् माहित आहे लढाईसाठी युद्ध कौशल्य लागतं, अनुभव लागतो. तो आहे का तुझ्याजवळ?"
"जहापनाह सर्वच युद्ध हे अनुभवावर जिंकल्या जात नाहीत. काही काही युद्ध हे केवळ युक्तीनंही जिंकल्या जातात."
"पण तूला माहित आहे का, मागील काही वर्षात आम्ही सोळा युद्ध केलेत हिंदुस्थानसोबत. एकाही लढाईत आपण जिंकलो नाहीत."
"आपण यावेळी विश्वास तर करा. मी युक्ती लढवेन तशी. मात्र मला तुम्ही मातब्बर सैनिक द्या सोबतीला आणि आशिर्वाद द्या. जेणेकरुन मी राजा दाहिरला जिंकू शकेल."
"पण तूला माहित आहे का राजा दाहिर कोण आहे ते? अरे जो एकही युद्ध हरला नाही असा वीर आहे तो. त्याचा दबदबा आहे सिंध प्रांतात. माहित आहे का तुला. बरं मला एक सांग की तू अशी कोणती युक्ती करशील की हे युद्ध तू जिंकू शकेल?"
"जहापनाह सोपं आहे. त्यांच्या गोटातील लोकं फोडायचे. त्यांना आमीष द्यायचं."
"म्हणजे?"
"जहापनाह, ते तुम्हाला नाही कळणार."
"पण बाळ तुझं वय काय? तू किती लहान दिसतोस."
"जहापनाह, आपण माझ्या वयावर जावू नका. वाटल्यास माझ्या काकाला विचारा."
"काका, कोण काका?"
तसा त्यानं हजाजकड बोट दाखवला. खलिफानं हजाजकडे आपला मोर्चा वळवला. जो इराणच्या एका प्रांताचा राज्यपाल होता. तसा त्यानं प्रश्न केला.
"हजाज आपणच काय?"
"होय जहापनाह."
"ह्या लेकराचं बोलणं ऐकलं काय?"
"होय जहापनाह."
"खरंच हा त्या हिंदस्थानातील दाय-याचं मुंडकं आणेल काय?"
"होय जहापनाह."
"ते कसं काय?"
"जहापनाह, ते गरम रक्त आहे."
"पण युद्धकौशल्य पाहिजे ना लढायला. राजा दाहिरचं मुंडकं उडविणं काही साधी गोष्ट आहे का?"
"जहापनाह, मला माहित आहे."
"मग याला तसं युद्धकौशल्य येते काय?"
"होय जहापनाह."
"कोणत्या शाळेत शिकला ते युद्धकौशल्य? हजाजजी, तुम्ही काय म्हणता ते तरी कळते काय तुम्हाला? हा सतरा वर्षाचा मुलगा, खरंच कोणता तीर मारेल? अरे आपलीच हानी होईल. नुकसान अपरीमीत. माहित आहे का? मागच्या सोळा युद्धाचा खर्च किती झालाय? काय मिळविलं आपण? माझ्या खलिफाची पुर्ण वंशावळ गेली युद्ध करता करता. पण हाती काहीच भेटलं नाही. तो हिंदू राजा आहे हिंदू. ते जिद्दी असतात. कणखर भी. आपलं त्यांच्या समोर काही चालत नाही. तरीपण आपण युद्ध करतो. कशासाठी माहित आहे का?"
"नाही जहापनाह."
"अरे हिंदूस्थान तो सोने की चिड़िया है।"
"म्हणजे?"
"अरे हिंदूस्थानात पैसाच पैसा आहे. आपण जर हिंदूस्थानला जिंकलो तर आपल्याला पैशाची काहीच कमी नाही. एकटा सिंध प्रांत एवढा समृद्ध आहे की त्यांच्या भुमीत सोना दडलेला आहे. माहित आहे तिथल्या भुमीत सोनाच सोना दडला आहे म्हणतात."
"म्हणजे?"
"अरे लपवला आहे त्यांच्या पुर्वजांनी."
"हो का? म्हणूनच जहापनाह, तुम्ही वारंवार युद्ध करता वाटते त्यांच्यासोबत."
"होय. त्यासाठीच तर निवड करायचीय मला अशा वीराची. जो सिंध जिंकूनच देणार नाही तर राजा दाय-याचं मुंडकं देखील आणेल कापून. सांग अशावेळी हा लहानसा पोरगा उभा झाला. नाही याला युद्धाचा अनुभव नाही काही. कसा आणेल हा कापून ते मुंडकं?"
"जहापनाह, आपण जे पाहतो अर्थात आपल्याला जे दिसतं ना. ते खरं नसतं. आपल्याला जे दिसत नाही. तेच खरं असतं. कदाचित हाच मुलगा राजाचं मुंडकं कापून आणू शकेल. माझ्यावर विश्वास ठेवा. खास मी स्वतः याला प्रशिक्षण दिलं आहे युद्धाचं. तुम्ही फक्त विश्वास ठेवा व नेतृत्व सोपवा. मग पाहा तो काय करतो ते."
"नाही नाही हजाज."
"जहापनाह, एकवेळ तर विश्वास ठेवा माझ्यावर."
तसा खलिफा विचार करु लागला. काही युक्ती सुचते का पाहू लागला. कारण त्याला हिंदुस्थान जिंकायचा होता. तो हिदूस्थान जिंकण्याची स्वप्न पाहात होता.

************************************************************************************************

सिंध प्रांत......... या सिंध प्रांतात मोहम्मद बिन कासीमच्या आक्रमणापुर्वी बराच खजिना होता. सन १८५४ ला झालेल्या खोदकामानुसार या सिंधमध्ये याआधी लोकवस्ती अस्तित्वात होती असं म्हणता येईल. ज्या भागात एक मशीद आहे. त्या भागात जे खोदकाम झालं. त्यात सापडलेल्या अवशेषावरुन इथे मोहम्मद बिन कासीमच्या आक्रमणापुर्वी प्रगत लोकवस्ती होती हे सिद्ध होते. या मशीदीच्या क्षेत्रात पंधरा फुट खोलीचे जे चार खड्डे खोदलेले आहेत. त्यानुसार इथे लोकवस्ती होती हे स्पष्ट होते. शाह लतीफ विद्यापीठातील पुरातत्व विद्यापीठाचे प्रमुख डॉक्टर गुलाम मोहिउद्दीन वीसर यांच्या नेतृत्वात वीस शिक्षक व विद्यार्थी गटांने जे संशोधन केलं त्यानुसार इथे सापडणा-या इमारतीचा स्तर व मातीची भांडी यात बराच भेद आहे. इस्लामी कालखंड व इस्लामपुर्व कालखंड या दोन्हींचा कालखंड याचे संकेत मिळतात. इथे सापडलेल्या मातीच्या भांड्याचं निरीक्षण केलं असता ते इसवी सनाच्या तिस-या शतकातील वाटते. अशा प्रकारचे भांडे भांभूरमध्येही मिळाल्याची नोंद आहे. या आधारावर असं म्हणता येईल की या ब्राम्हणाबाद शहरात जे संशोधन झालं. त्यात सापडलेले अवशेष हे इस्लामी आक्रमणापुर्वीचे आहेत. तसेच हे शहर इसवी सनाच्यी तिस-या शतकातील आहे. म्हणजेच मोहम्मद बिन कासीमनं हे शहर जिंकलं असलं तरी तिथे लोकं आधीपासूनच राहात होते.
ब्राम्हणाबादमध्ये जे संशोधन झालं, त्यानुसार असं स्पष्ट झालं की हे शहर आर्थीक कामकाजाचंही केंद्र असावं. या ठिकाणी काही महागडी नाणी व इतर काही कलाकृती मिळाल्या. त्यावेळी पाकिस्तानची निर्मीती व्हायचीच होती. या सर्व वस्तू ब्रिटीश संग्रहालयाकडे व मुंबई कडे पाठविण्यात आल्या होत्या. तसेच अलिकडेच झालेल्या संशोधनानुसार या मातीच्या भांड्यासोबतच महागडे खडे, नीलम, रुबी आणि पाचूही मिळालेले आहेत.याव्यतिरीक्त पॉलिश करायची साधनं व साचेही मिळालेले आहेत. या ठिकाणी झालेल्या संशोधनावरुन या ठिकाणी या खड्यांशी निगडीत उद्योगही अस्तित्वात होता असं म्हणता येते. शिवाय इथे हस्तीदंताचे दागीणे, शेल सहजपणे बारीक करता येणारा स्लेटसारखा मऊ दगड आणि नाणीही सापडली आहेत.
मोहेंजोदारो व भांबूरसारख्या विहिरी या ब्राम्हणाबादच्याही संशोधनात दिसल्या. पण या ठिकाणी या विहिरींची रचना थोडी वेगळी आहे. मातीच्या भांड्याप्रमाणेच भट्टीत तयार केलेला पाईप, त्या पाईपाला तयार करतांना त्यात तो पाईप रंग मिसळवून तयार केला आहे. जमिनीखाली हा पाईप लांबपर्यंत गेलेला दिसला. बहुतेक हा पाईप पाण्याचा स्रोत सतत मिळावा यासाठी असावा. हे विलक्षण तंत्र त्याकाळी विकसीत असलेलं दिसलं.
सिंधी भाषेतील इतिहासकार मिर्झा कलीच बेग यांनी प्राचीन सिंध नावाची जी पुस्तक लिहिली होती. त्यात ते म्हणतात की हिंदू राजाच्या सत्ताकाळात ब्राम्हणाबाद हे शहर सात मोठ्या किल्ल्यांच्या शहरापैकी एक होता.

*******************************************

ब्राम्हण राजा चच यांच्या सत्ताकाळात अघम लोहाना या राज्याचा प्रधान होता. लाखा, समा व सहता या जाती सत्तेत सहभागी होत्या. या राजाचा वटहुकूम समुद्रापर्यंत म्हणजे देवल बंदरापर्यंत चालत होता. अघम हा देवल चाही ताबा मिळवून होता. त्यावेळी राजा दाहिरच्या वडीलानं अघमशी युद्ध केलं. त्याला युद्धात हरवलं व त्याच्या पत्नीशी विवाह केला. त्यानंतर देवलच नाही तर लोहाना प्रांतावरही आपला ताबा मिळवला. त्यानंतर चंदेलच्या मृत्यूनंतर राजा दाहिर राजा बनताच व आपल्या हातात राज्याची सुत्रे घेताच त्यानं आपल्या सख्ख्या भावाला या भागातील प्रधान बनवलं व मृत्यूनंतर त्याच्या मुलाकडेच ती सत्ता जाईल अशी योजना तयार केली.
या भागात बौद्ध विचारसरणीचे भरपूर लोक राहात होते. त्यांचे विहारही होते. तसेच या भागात काही ज्योतिषीही होते. ते ज्योतिषी आपल्या व्यवसायात पारंगत होते. चच राजा जेव्हा गादीवर आला. तो कट्टर हिंदू प्रेमी होता. परंतू त्यानं तो कट्टर हिंदू प्रेमी असूनही बौद्धांचं धार्मीक स्थळ त्यानं तसंच राहू दिलं होतं. त्यानं त्यात बाधा आणली नव्हती.
खलिफा विचार करीत होता. तसा त्यानं विचार केला की आपण एवढे वेळा पराभूत झालो. यावेळीही विजय मिळवता येते की नाही ते माहित नाही. कदाचित मिळणारही नाही. तेव्हा एकवेळ हजाजवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. तसा त्यानं विचार केला व त्यानं हजाजवर विश्वास ठेवला.
मोहम्मद बिन कासीम. एक नवयुवक होता. अवघं त्याचं वय सतरा वर्षाचं होतं. तो तसा धिप्पाड देहाचा नव्हता. पण कुशल होता. तलवारबाजीत त्याचा कोणी हातही पकडू शकत नव्हता.
खलिफानं हजाजवर विश्वास ठेवला. तसा हजाज राज्यपालच नाही तर त्यानं खलिफाला बरीच मदतही केली होती. त्यामुळं खलिफानं त्याच्यावर विश्वास ठेवला व मोहम्मद बिन कासीमला हिंदुस्थानवर आक्रमण करण्यासाठी नियुक्त केलं. त्यातच त्याला सुसज्जीत असे दहा हजार सैनिक दिले व सांगीतलं की हे महारथी जा आणि हिंदुस्थानवर आक्रमण कर. राजा दाहिरला तर ठार कर. त्यासोबतच छत्रही आण आणि त्या हिंदूस्थानातील स्रीया आणि मुलंही. कारण मला बदला घ्यायचा आहे त्यांचा. त्या हिंदूस्थानवाल्यांनी काही वर्षापुर्वी आमच्या जहाजावर हमला केला होता व आमच्या जहाजातील मुलांना व महिलांना ओलिस ठेवले होते. तो बदला घ्यायची वेळ आज आली आहे. आता जावे आक्रमणासाठी आणि लवकरच आनंदाची बातमी घेवून परत यावे. आम्ही हिंदूस्थानवर विजय मिळविल्याची बातमी ऐकण्यासाठी आतूर राहणार आहोत. आम्ही तेही पाहण्यासाठी आतूर राहणार आहोत की ज्या एका हातात त्या हिंदू राजाचं म्हणजे दाहिराचं मस्तक असेल आणि दुस-या हातात ते छत्र असेल. हे नवयुवका, तू जा आता आणि लवकरच परत ये. पण जर का तुला विजय मिळाला नाही तर परत येवू नकोस. त्या हिंदूस्थानच्या मातीतच आपलं आयुष्य संपवून टाकशिल.असं हारलेलं तोंड या इराणी धरणीवर तुझं दिसतं कामा नये. आम्ही पराभवी झालो असलो तरी आमच्या या देशानं कोणत्याही पराभवी लोकांचे तोंड पाहिलेले नाही. एकतर तू मार त्यांना, नाहीतर मरुन ये. पण असा निर्लज्जपणानं पळपुटेपणानं येवू नकोस. तू जर त्या मातीत संपलाही या इराणसाठी तरी चालेल.
खलिफाचं बोलणं संपलं. तसा मोहम्मद बिन कासीमनं आपल्यासोबत दहा हजार सुसज्जीत सैनिक घेतले. काही शस्रसाठाही घेतला व तो त्याच रेशीम मार्गानं हिंदू राजा दाहिरला संपविण्यासाठी निघाला. वाटेत त्याच्या मनात फार मोठा विचार होता. राजा दाहिरला कसे संपविता येईल याचा.
मोहम्मद बिन कासीम देवल बंदराच्या रस्त्याने येत होता. तसा तो हुशार होता आणि धुर्त आणि कपटीही तेवढाच होता. त्यानं विचार केला होता. राजा दाहिर हा पराक्रमी आहे. त्याला जिंकणं अशक्य आहे. त्यामुळं त्याला जिंकायचं जर असेल तर युक्तीच लढवायला हवी. कारण राजा दाहिरच्या पराक्रमामागे शक्ती चालत नव्हती. युक्तीच चालणार होती. तसा तो विचार करीत होता. त्यातच त्याला आठवलं. आपण राजा दाहिरच्या सैन्यातील लोकं फोडले तर........क्षणातीलच हा विचार. त्यानं देवल बंदराजवळ पोहोचण्यापुर्वीच निरोप पाठवला त्या देवल बंदरातील सुभेदाराला की त्यानं मोहम्मद बिन कासीम आणि त्यांच्या सेनेचं स्वागत करावं. यात त्याचे दोन हेतू होते. एक हेतू म्हणजे राजा दाहिरचं मानसिक खच्चीकरण करणे व दुसरं म्हणजे ज्ञानबुद्धसह राज्यातील संपूर्ण बौद्ध मंडळींची सहानुभूती मिळविणे.
खलिफाचे काही गुप्तचर सिंध प्रांतातही होते. त्यांच्याकडून माहिती मिळाली होती की सिंधमध्ये असाही एक गट आहे की जो असंतुष्ट आहे. ज्या गटाला डावलून तसेच त्यांचा राजधर्म घालवून आपलं प्रस्थ प्रस्थापित केला. राजा दाहिरनं त्यांच्यावर अन्यायच केला. त्याच गटाला भडकंवायचं. तो गट आपल्याला मदत करु शकेल की नाही हे खलिफाला माहित नव्हते. पण त्याबद्दलची माहिती खलिफानं मोहम्मद बिन कासीमला दिली होती. त्यामुळं त्याची माहिती खलिफानं कासीमला देताच कासीमनं ठरवलं की आपण ज्ञानबुद्धकडून सहानुभूती मिळवावी. जेव्हा मोहम्मद बिन कासीम देवल बंदराजवळ पोहोचला. तेव्हा त्या देवल बंदराजवळ पोहोचण्यापुर्वी त्यानं ज्ञानबुद्धला निरोप पाठवला की त्यानं भेटीला यावं व ही वार्ता कोणाला सांगू नये.
मोहम्मद बिन कासीमच्या म्हणण्यानुसार ज्ञानबुद्ध मोहम्मद बिन कासीमला भेटण्यासाठी गेला. सोबत आपला एक मंत्री मोक्षवासवला सोबत घेतलं. त्यालाही वाटत होतं की सिंधमध्ये शांतता नांदावी. कारण मागील सोळा वेळा युद्ध करता करता या सिंधची अपरीमीत हानी झाली होती. ती कधीच भरुन निघणारी नव्हती. त्यामुळं तिच शांती प्रस्थापित करण्यासाठी ज्ञानबुद्ध कासीमला भेटायला गेला.
ज्ञानबुद्ध ज्यावेळी मोहम्मद बिन कासीमला भेटायला गेला. त्यावेळी कासीमनं मोक्षवासव व ज्ञानबुद्धचं जोरदार स्वागत केलं. कारण त्याला आपला उल्लू सीधा करायचा होता. भेट झाली. भेटीदरम्यान चांगला सन्मान करण्यात आला व मोहम्मद बिन कासीमनं विचारलं,
"आमची अशी इच्छा आहे की आपण आम्हाला मदत करावी."
आपण आम्हाला मदत करावी. साधे शब्द होते. पण त्या शब्दानं ज्ञानबुद्ध चक्रावला. त्याला आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. कारण तो शांती प्रस्थापित करण्यासाठी गेला होता. गद्दारी करण्यासाठी नाही. तसा तो म्हणाला,
"खाविंन्द, असं कसं होईल. ही आपल्या वतनाशी गद्दारी होणार नाही काय?"
तसा कासीम म्हणाला,
"होय, गद्दारी होईल. आपलं म्हणणं बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या. तुमच्या राजानं तरी काय केलं? गद्दारीच ना."
ज्ञानबुद्धला कासीमचा थोडा राग आला. त्याला सुचेना की हा काय बोलतोय. तसा तो म्हणाला,
"खाविंन्द, ही गद्दारी नाही तर काय? अहो, ज्या राजानं आमच्या पीढ्यान् पीढ्या पोसल्या. ज्यानं आम्हाला सन्मान दिला. एवढंच नाही तर ज्या राजानं आम्हाला विहारं बांधायची परवानगी दिली. तसेच आमच्या धर्माचे दोन राज्यपाल बनवून दोन प्रांत दिले. त्या राजाशी ही आपणाला मदत करणे गद्दारी नाही तर दुसरं काय? मलाही त्यानं देवलचं सुभेदार बनवलं खाविंन्द. हे बघा आम्ही आपणाला भेटायला आलो. शांती प्रस्थापित करण्यासाठी. आम्हाला युद्ध नको आहे. आम्हाला शांती हवी आहे."
"हे बघा, आमचं तसं म्हणणं नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला मदत करावी."
"हो मदत करावी. पण कशी करणार. ही गद्दारी होईल. जी आमच्या मनाला पटत नाही."
कासीम त्या बोलण्यावर विचार करु लागला. या माणसांचे मन कसे पालटंवायचे. कारण यांचे जर मनं पालटविले नाही तर आपल्याला राजा दाहिरला जिंकता येणार नाही. तसा तो म्हणाला,
"हे बघा, राजा दाहिरनंही तुमच्याशी गद्दारीच केली. ऐकणार का कोणती गद्दारी केली ती?"
ज्ञानबुद्धला काहीच समजेना. शेवटी तो म्हणाला,
" सांगा बरं कोणती गद्दारी केली ती? आम्हालाही ऐकायची, कोणती गद्दारी केली आमच्या राजानं?"
"ऐका तर."
असं म्हणून कासीम ज्ञानबुद्धला राजा दाहिरबद्दल सांगू लागला. नव्हे तर भडकवू लागला.
"राजा दाहिर...... तुमचा पराक्रमी राजा. त्यापुर्वी त्याचा काका चंदन हा राजगादीवर होता. हे तरी माहित आहे का आपल्याला?"
"होय."
"तो स्वतः ब्राम्हण असून त्यानं बौद्ध धर्म स्विकारला होता हे तरी माहित आहे का आपल्याला?"
"होय."
"आणि हे तरी माहित आहे का की त्यानं बौद्ध धर्मालाच राजधर्म बनवला होता."
"होय, हेही माहित आहे."
"मग आता आहे का तुमचा बौद्ध धर्म राजधर्म?"
"नाही."
"का बरं? तुमचा बौद्ध धर्म हा राजधर्म राहू शकत नव्हता काय?"
"राहू शकत होता."
"मग तुमच्या राजानं काय केलं?"
"काय केलं आमच्या राजानं?"
"अहो तुमच्या राजानं बौद्ध धर्माला राजधर्मातून काढलं आणि हिंदू धर्माला राजधर्म बनवला हे तरी माहित आहे का आपल्याला?"
"हो माहित आहे."
"तरीही तुम्ही म्हणता की तुमच्या महाराजानं गद्दारी केलेली नाही."
"हो गद्दारीच आहे. पण त्यांनी आम्हाला विहारं बांधायची परवानगी दिली ना."
"विहाराचं काय करता? राजधर्म बघा राजधर्म. तोही आपला राजधर्म. त्या राजानं चक्क तुमच्या धर्माशीच खिलवाड केली. तरीही तुम्ही त्यांना माफ करता? ही गोष्ट जी तुमच्या राजानं केली. ती खरंच क्षमायोग्य आहे काय? नाही ना. चक्क धर्माशी खिलवाड."
"मग आता काय करावं म्हणता."
"तुम्ही तुमचा राजधर्म परत घ्या."
"कसा घेणार?"
"आम्हाला मदत करा. आम्ही तुमचा राजधर्म परत मिळवून देवू.सन्मानही देवू. मग काय, तुम्हीच स्वतःचे राजे. स्वतः हवा तसा निर्णय घ्यायचा. आम्ही काय अरब लोकं. आम्ही इथे काय वस्ती करणार आहोत. हा सिंध प्रांत तुमचाच आहे. तुम्हीच इथले राजे. हवं तर आम्ही जर जिंकलो तर तुम्हालाच सिंधपती बनवून आम्ही परत जावू."
मोहम्मद बिन कासीमचं गोड गोड ते बोलणं.......त्याला सिंध प्रांत जिंकायचा होता. त्याला राजा दाहिरला धुळ चारायची होती. त्याला कोण कोणत्या धर्माचा या गोष्टीशी काही लेनदेन नव्हतं. त्याला फक्त राजा दाहिरचं मस्तक हवं होतं तसेच छत्रही हवं होतं. जे त्याला खलिफासमोर दाखवायचं होतं. नाहीतर आपलं डोकं पाठवायचं होतं. त्यामुळंच त्यानं ज्ञानबुद्धला राजा दाहिरविरुद्ध भडकवलं होतं. अति तिक्ष्ण अशा धार्मीकतेवर बोट ठेवून.
ज्ञानबुद्धची बुद्धी भ्रष्ट झाली होती. त्याला काही सुचलं नाही. तसेच त्यालाही तो राजा बनणार याचा लोभ सुटला. राजधर्मही परत मिळणार हेही लक्षात आलं. त्याचबरोबर हेही पटलं की ही अरब माणसं इथं वस्ती करणार नाहीत. त्यामुळं की काय त्याला कासीमचा धुर्त डाव लक्षात आला नाही.
कासीम कपटी होता. त्याला वाटत होतं की जर सिंध जिंकला तर येथील माल लुटता येईल. आपल्या देशात नेता येईल. तसेच सिंधसह तमाम हिंदुस्थानातील इतरही प्रदेशावर सत्ता स्थापन करता येईल. हिंदूंचं साम्राज्य नष्ट करता येईल. तसेच मुस्लीमांचं साम्राज्य प्रस्थापित करता येईल. त्यासाठीच तो पावले उचलीत होता. त्याला वाटत होतं की सिंध प्रांत जर जिंकला नाही तर आपल्याला आपला जीव द्यावा लागेल किंवा आपल्याला आपल्या देशात परतही जाता येणार नाही. त्यासाठीही तो कपटीपणाचं प्रदर्शन करीत होता. तो ज्ञानबुद्धला त्यासाठीच सांगत होता. तसा ज्ञानबुद्ध त्या मोहम्मद बिन कासीमच्या बोलण्यात वाहावत गेला व म्हणाला,
"खाविंन्द, आता मी काय करायला हवं?"
कासीमनं कपटी डाव टाकला. त्यात ज्ञानबुुद्ध आपल्या डावात फसल्याचे लक्षात येताच तो म्हणाला,
"तुम्ही आता बगदादला जा. खलिफाची भेट घ्या. खलिफाशी समझौता करा. यातून तुमची सुटका खलिफाच करु शकतो."
ज्ञानबुद्घला मोहम्मद बिन कासीमचो विचार पटले व लवकरच तो कासीमच्या सांगण्यानुसार खलिफाला भेटायला गेला. यावेळीही सोबतीला त्यानं आपला मंत्री मोक्षवासवला नेलं.
ज्ञानबुद्ध खलिफाला भेटायला जाण्यापुर्वी कासीमनं आपला एक गुप्तचर बगदादला पाठवला होता. ज्ञानबुद्ध भेटायला येत आहे अशी सुचना गुप्तचरामार्फत खलिफाला मिळाली होती. तसा तो आनंदावलाही होता. त्यातच एक दिवस ज्ञानमत खलिफाला भेटण्यासाठी बगदादला दाखल झाला.
ज्ञानबुद्ध येणार आहे खलिफाला भेटायला. ही सुचना आधीच गुप्तचरामार्फत खलिफाला मिळाल्यानं खलिफानं राज्यात दवंडी पिटवली होती. त्यानुसार ज्ञानबुद्धचं बगदादमध्येही जोरदार स्वागत झालं. बैठक झाली. बैठकीत तोच विषय मांडला गेला आणि ठरलं की खलिफा जर जिंकला तर तो ज्ञानबुद्धच्या धर्माला राजाश्रय देईल. तसेच ज्ञानबुद्धला राजगादी. याच समझौता करारानं ज्ञानबुद्ध मोहित झाला व ठरलं की देवल बंदराजवळ कासीमच्या सेनेचं ज्ञानबुद्धनं स्वागत करावं. जेणेकरुन राजा दाहिरची मानसिकता खचेल.

********************************************
कासीम व खलिफाच्या म्हणण्यानुसार ज्ञानबुद्ध पलटला. त्याला दोघांचाही कपटी डाव लक्षात आला नाही. त्यानुसार त्यानं देवलला परत येताच तिथं पोहोचलेल्या कासीमच्या सेनेचं स्वागतही केलं. त्याचबरोबर ही बातमी हाहा म्हणता महाराजा दाहिरला कळली.
ज्यावेळी ही बातमी हा हा म्हणता महाराजा दाहिरला कळली. तो खुप हताश झाला. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. त्याच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखी वाटली. आपल्याच राज्यातील ही माणसं. ती माणसं अशी वागत असतांना त्यांनी असा पवित्रा का घ्यावा? असे प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. हे राज्यावर फार मोठे संकट आल्यासारखे वाटले. पण आता उपाय नव्हता. शेवटी त्याच निराश अवस्थेत त्यानं आपल्या मंत्रीमहोदयाची बैठक बोलावली व आपल्या सेनेला सुसज्जीत होण्याचे आदेश दिले. कारण ही त्याची स्वतःची लढाई नव्हती. तर ती त्याच्या देशाची लढाई होती. त्याच्या अस्तित्वाची लढाई होती.
************************************************************************************************

देवलच्या सुभेदार ज्ञानबुद्धनं केलेली दगाबाजी राजा दाहिरला जशी माहित झाली. तशीच ती गोष्ट त्याच्या मुलींनाही माहित झाली होती. त्यामुळं की काय राजा दाहिरच्या मुलीही जनतेत फिरुन तर कधी दवंडी पिटवून आपल्या राज्यावर संकट आल्याची सुचना देत होते. तसेच मातृभुमीचं रक्षण करण्यासाठी आर्जव करीत होते.
राजपूत हे मुख्यतः राजस्थानच्या आसपास राहणारे लोक होते. पण ते काही इतिहासकारांच्या मते शकांचे वंशज होते. काही इतिहासकार म्हणतात की ते पाचव्या सहाव्या शतकात भारतात घुसलेल्या टोळ्यातील गुर्जर होत.तर काही म्हणतात की ते हुणांबरोबर भारतात आलेले व स्थायीक झालेले लोकं होत. काही मात्र याला पौराणिक पुष्टीही जोडतात, ते म्हणतात की वसिष्ठानं जेव्हा होम केला होता. त्यावेळी त्या अग्नीकुंडातून परमार, चालुक्य, परिहार आणि चाहमान हे वीरपुरुष जन्मास आले. त्यांच्यापासून उत्पन्न झालेली मंडळी म्हणजे राजपुत. हे राजवंश परकीय असल्यानं त्यांना हिंदू धर्मानुसार होमहवनानं शुद्ध केल्यानंतर त्यांना क्षत्रीय मानण्यात आलं. प्रतिहारराजे हे स्वतःला गुर्जर समजत. तर काही म्हणतात की ज्या राजांच्या मुख्य राणी सोडून ज्या इतर राण्या असायच्या. त्यांचे पुत्र होत.
राजाला ब-याच राण्या असायच्या. बहुपत्नीत्व पद्धती अस्तित्वात होती. त्यानुसार पहिल्या राणीचा मुलगा हा राजा बनायचा. कारण तो जेष्ठ असायचा. पण इतर ज्या राण्या असायच्या. त्यांची मुलं ही काही राजे बनायचे नाही. त्यांना राजपुत्र म्हणत. पुढे त्याचा अपभ्रंश राजपुत झाला असावा.
सातव्या शतकात सिंधमध्ये राजपुत, गुर्जर लोकं राहात होते. तसेच राजस्थानमध्ये नवीन राजवंशही अस्तित्वात होती. त्यात भिलमान येथे चापोत्कट यांना चावडा म्हणत.मांडव्यपुर उर्फ मंडोर येथे परिहार, मेवाडात गुहिलपुत्र (गुहिलोत), चितोड आणि कोटा येथे मौर्य वंश राज्य करीत होता. ७११ मध्ये ज्यावेळी मोहम्मद बिन कासीमनं सिंधवर स्वारी केली. त्यावेळी महाराजा दाहिरनं या सर्व लहान लहान राजांना एकत्र करुन त्यानं अरबाविरुद्घ लढा दिला.
शिवराज्यभिषेकाची ऐतिहासिक पाश्वभूमी अभ्यासल्यावर असं लक्षात येते की इस पाचशेपर्यंत गांधार, हुण, श्वेतहुण(कंदहार), तक्षशीला(सिंध मुलतान), ब्रम्हदेश, बांग्लादेश, इत्यादी भागापर्यंत पाटलीपुत्रचं राज्य होतं. तर दक्षिणेकडे चोल, पांड्य, तसेच श्रीलंकेचे ताम्रपर्णी साम्राज्य असे चौफेर साम्राज्य पसरलेले होते. त्या काळात हिंदुस्थान नावाचा सलग भुभाग जरी नसला तरी या भागात बरेचसे लोकं हिंदू धर्माचे होते. तसेच या ठिकाणी बौद्ध व जैनही धर्माचे लोकं होते. या काळात या भागात मुस्लीम मंडळी औषधालाही सापडत नव्हती. परंतू जसजसा काळ ओसरत गेला. तसतशी अरबची आक्रमणं होत गेली. त्यातच हा भुभाग संपन्न असल्यानं त्यांना आवडत गेला व इथे मुस्लीम मंडळी स्थिरावली.
सिंधवरच नाही तर हिंदूस्थानवर मुस्लिमांनी पहिला विजय मिळवला. तो म्हणजे सातशे बारामध्ये. तेव्हापर्यंत एकही मुस्लीम व्यक्ती या देशानं स्थिरावलेला पाहिला नव्हता. ज्यावेळी कासीमनं राजा दाहिरला शिकस्त दिली. त्यावेळेपासूनच इथे मुस्लीम स्थिरावले गेले.
आठव्या शतकापासून मुस्लीम या भागात स्थिरावले. साधारणतः या लोकांनी वायव्य दिशेकडून जास्त स्वा-या केल्या. अरबांनी तर बंदराबंदरावरच स्वा-या केल्या. कारण या बंदरातूनच व्यापार चालत असे. ते स्वा-या करतांनाही हजरत मुहम्मद पैंगबराला प्रेरणा मानत असत. त्यांच्याच प्रेरणेने आपण स्वा-या करीत आहोत असाही ते हवाला देत असत. अरबांनी केलेली पहिली स्वारी म्हणजे देवल बंदरातील. ही स्वारी इसवी सन सहाशे छत्तीस मध्ये केली गेली. या देवलला देबल देखील म्हटले जाई. परंतू अरबी मध्ये या देबलचा अपभ्रंश देवल असाच झाला. यालाच दायबूल असेही म्हटले जाई. त्यातच त्याचवेळी मुंबईला. ठाणे बंदरातही केली गेली. कारण मुंबईतील ठाणे देेखील मोठं बंदर होतं. त्यानंतर भडोच, चौल इत्यादी ठिकाणीही स्वा-या करण्यात आल्या. मात्र या ठिकाणी असलेल्या हिंदू राजांनी त्या स्वा-या परतावून लावल्या व परिचय दिला की या हिंदुस्थानातील हिंदू राजे काही कमजोर नाही.
हिंदुस्थान........या हिंदुस्थानात छोटे छोटे अनेक राज्य होते. त्यातील बरेचसे राजे हे हिंदू होते. काही बौद्ध विचारसरणीचेही होते. बौद्ध हा धर्म नव्हता. तो एक विचार होता. बौद्ध विचार असा विचार होता की ज्या विचारानं दुःखावर मात करता येत होती. नव्हे तर शांती प्रस्थापित करता येत होती.
आपल्या गृहस्थ जीवनाचा त्याग करणा-यांना भिक्खू म्हणत. त्यांना लोभ राहात नसे. पुढे या विचाराला धर्माचे स्वरुप प्राप्त झाले. ह्या धर्माचा उपयोग पाहून ब-याचशा राजांनी युद्ध टाळण्यासाठी याच धर्माचा आधार घेतला. काही राजांनी तर या धर्माला राजधर्मही मानलं. कारण या धर्मात आधीपासूनच कोणत्याही स्वरुपाचा वर्णाभेद व जातीभेद नव्हता. मानवी जीवनात दुःख असते. दुःखाला कारण असते. दुःख दूर करता येते. त्यासाठी मार्ग आहे. त्याला अष्टांग मार्ग म्हणतात असे हा बौद्ध धर्म सांगत असे.
या धर्माचे संस्खापक तथागत गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. जन्मानं कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नसतो असे हा धर्म मानत होता. छोटीशी चिमणीदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते असे तथागत सांगत. तसेच स्रीयांनाही उन्नती करण्याचा अधिकार आहे असे हा धर्म प्रतिपादित करायचा. हिंदू धर्मात होत असलेल्या यज्ञप्रकाराला तसेच होमहवनाला हा धर्म विरोध करीत असे. तसेच समाजातील बुवाबाजी, कर्मकांड, अंधविश्वास या गोष्टीला या धर्मात थारा नव्हता. प्राणीमात्राबद्दलही गौतम बुद्धाचे विचार बरेच चांगले होते. त्यांच्याशी दया दाखवा असे ते म्हणत. हिंसा, असत्य बोलणे, चुगल्या, चहाडी, वायफळ बडबड, कठोरता, प्राणीहत्या, चोरी, स्वैराचार, कोणाचेही स्वातंत्र्य हिरावणे, गुलामगीरी, स्वार्थपणा, गैर मार्गाची उपजीवीका, वाईट कर्मत्याग, लोभ, राग, चित्त भटकणे इत्यादी सर्व गोष्टींना या धर्मात थारा नव्हता. तरीही पुढील काळात काही स्वार्थपीडीत लोकांनी आपल्यामध्ये स्वार्थ, लोभ निर्माण करुन या धर्माला बदनाम करण्याचं कारस्थान केलं. त्यातच ज्ञानबुद्धसारख्याची मती मारली जावून तो मोहम्मद बिन कासीमच्या गोड गोड बोलण्यात फसला व राजेशाहीच्या आमीषाला बळी पडला. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये लोभ उत्पन्न झाला. अशाच काही काही घटनांमुळं बौद्ध धम्माला उतरती कळा लागली व बौद्ध धर्माला जगात वाढविणेही कठीण झाले.
इसवी सनाच्या सहाशे चौरेचाळीस मध्ये झालेले रसीलचे युद्ध हे खलिफाच्या पाडावासाठी लढले गेले. सहाशे एक्कावन मध्ये झालेले सिस्तान,झरांज आणि सहाशे बावन मध्ये झालेले हेरात युद्ध, या स्वा-या रशीदून व उथेमा या खलिफाकडून करण्यात अाल्या. इसवी सन सहाशे त्रेपन मध्ये मकरच्या भुभागावर हल्ला झाला. तोही उथेमा या खलिपाच्या काळात. यात उथेमाला विजय मिळाला. पण सिंधवर काही आतापर्यंत विजय मिळवता आला नव्हता. तसेच ही भुमी हिंदुस्थानच्या बाहेर होती. परंतू जसा हा प्रदेश अरबांनी जिंंकला. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानवर आक्रमणं करणे सोपे झाले. अर्थात अरबांना हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची दारं उघडली गेली. पुढे याच मार्गानं हिंदुस्थानवर आक्रमणंं होवू लागली.
मुख्यत्वे सिस्तान, मेकरान, खुरासान या भागातून हिंदुस्थानात येणा-या आक्रमणकर्त्यांना थोपविण्याचे काम या भागातील झाबूल व काबूलच्या राजांनी तसेच लोकांनी केले. परंतू त्यात त्यांना अपयशच पत्करावं लागलं. त्यामुळं अरबांची ताकद वाढत गेली. त्यानंतर हिंदुस्थानवर अरबांनी आपला मोर्चा वळवला. त्यातच उम्माय्द या खलिफाच्या आदेशानं मोहम्मद बिन कासीम सिंधवर आक्रमण करण्यासाठी आला. जो हिंदुस्थानचा भाग होता. तसेच त्या ठिकाणी कट्टर हिंदू राजा राज्य करीत होता.
ज्यावेळी कासीम हिंदुस्थानात आला. त्यावेळी त्याच्या सोबतीला सहा हजार सिरीयन घोडदळ, सहा हजार इराणी सांडणीस्वार आणि काही मावळी होते. ज्याला महाराष्ट्रात मावळे म्हटलं जातं. पण ते महाराष्ट्रातील मावळ्यांचे वंशज नव्हते. महाराष्ट्रातील मावळे हे हिंदू होते.
तत्कालीन सिंध व मुलतान हे हिंदू राज्य होते. या ठिकाणी हिंदू संस्कृती राज्य करीत होती. तेथील राजे हे धर्माने हिंदू असून हिंदू विचारांचे होते. परंतू ते बौद्ध विचारांनाही मानत होते. तसेच हे राजे सहिष्णुतेचे पुजारी होते व पाडाव झालेली ही पहिली हिंदू राज्ये ठरली.
अरब सैन्य देवल बंदराच्या जवळ येताच राजा दाहिरला चिंता पडली. त्यातच काय करावं सुचेनासं झालं. त्यातच राजा दाहिरनं कासीमला संदेश पाठवला की त्यानं आपले सैन्य माघारी घेवून जावे. राजा दाहिर काही हार मानणा-यांपैकी नाही. आपल्या वतनासाठी मस्तक कापलं गेलं तरी चालेल, पण हा लढणारा वीर आहे. परंतू कासीमही ऐकणारा वीर नव्हता. तो तर तरुण होता. सतरा वर्षाचा नवययुवक. त्याचं रक्त गरम तर होतंच. शिवाय सळसळतंही होतं.. तो काही हार मानणारा व्यक्ती नव्हता. शेवटी त्याच्या खलिफानं सांगीतलं होतं की जीव गेला तरी चालेल, पण परत यायचं नाही आणि परतच यायचं असेल तर आपलं मस्तक पाठवायचं. जीवंत परत यायचं नाही. मग काय राजा दाहिरनं पाठविलेला संदेश मोहम्मद बिन कासीमनं धुडकावून लावला. त्याला वाटत होतं की आपण राजा दाहिरचा यावेळी पराभव करु.
कासीमनं धुडकावलेला संदेश प्राप्त होताच राजा दाहिरला भयंकर राग आला. समझौत्याच्या गोष्टी वा वाटाघाटीच्या गोष्टी आता संपल्या होत्या. तसा पुरेपूर हिंसा होवू नये म्हणून राजा दाहिरनं बराच प्रयत्न केला.. परंतू मोहम्मद बिन कासीमनं न ऐकल्यानं शेवटी राजा दाहिरनं आपल्या सैन्याला आक्रमण करण्याचा आदेश दिला. शेवटी सिंध सेना सोबतच गुर्जर, जाट व राजपूताना तसेच लोहाना वीरांना घेवून चढाई करु लागली. ती सर्व मेहनत वतनासाठी. वतन महत्वाचं होतं. विदेशी अरबांना देशावर हावी होवू द्यायचं नव्हतं.
सिंधी सेनादल आपल्या राजाच्या आदेशानं राजाचा पुत्र राजकुमार जयशाहच्या नेतृत्वात राजकुमार तसेच राजाचा जयघोष करीत युद्धासाठी जात होती. सोबत काही हत्तीही होते. त्या हत्तीच्या चित्कारण्याचा आवाज परीसरात पोहोचला होता. जणू आकाशातून रणधुमाळी ऐकू येत होती.
सैनिक ओरडत होते. 'सिंध देश की जय' 'राजकुमार जयशाह की जय' 'राजा दाहिर की जय' त्यातच राजकुमार जयशाहाचा जयजयकार करीत सेना चालली होती. अशातच ती सेना देवलच्या तटावर येवून पोहोचली. ज्या ठिकाणी मोहम्मद बिन कासीमची सेनाही उभी होती. दोन्ही सेनेनं एकमेकांना न्याहाळलं. थोडावेळ स्मशान शांतता होती. त्यानंतर युद्ध सुरु होणार होतं. कोण मरणार, कोण जीवंत असणार हे काही सांगता येत नव्हतं.
ते सिंधी वीर. त्यांना आपल्या शौर्याचं प्रदर्शन करायला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. लवकरच युद्ध सुरु झालं.

राजकुमार जयशाहनं न्याहाळलं की अरबी सेना देवलच्या किल्याजवळ असलेल्या मैदानात ठाण मांडून आहे. जो किल्ला एकेकाळी त्यांच्या ताब्यात होता. त्या किल्ल्यावर ज्ञानबुद्धला सुभेदार म्हणून नियुक्त केलं होतं. पण ज्यावेळी ज्ञानबुद्ध आपल्या स्वार्थासाठी कासीमला मिळाला. त्यावेळी या किल्ल्यावर असलेली सगळी माणसंही कासीमला मिळाली. त्यामुळं साहजिकच देवल किल्ल्याचा ताबा सहजासहजी कासीमला मिळाला. परंतू अजूनही किल्ला राजा दाहिरच्या ताब्यात असल्यानं ज्ञानबुद्धचं काहीच चाललं नाही. त्यामुळं की काय कासीमला या किल्ल्याच्या निकटच्या मैदानात कासीमच्या सेनेला आश्रय घ्यावा लागला. नव्हे तर कासीमची सेना याच देवल किल्ल्याजवळ ज्ञानबुद्धचं आदरातिथ्य भोगत होती.
राजकुमार जयशाहची सेना देवल किल्ल्यात पोहोचली. तशा दोन्ही सेना समोरासमोर उभ्या होत्या. त्या आक्रमणाच्या सुचनेची वाट पाहात होत्या. तो शंखनाद त्यांना लढण्यासाठी खुणावत होता. मातृभुमीसाठी प्राण न्योछावर करायला ते वीर उत्सूक होते. मातृभुमीसाठी मेलो तरी चालेल. पण झुकायचे नाही असं त्यांना वाटत होतं. अशातच एक दूत र जयशाहाच्या खेम्याकडे येवून धडकला. त्यानं सुचना दिली की मोहम्मद बिन कासीम समझौता करायला तयार आहे. पण दोन अटी आहेत. राजा दाहिरला मोहम्मद बिन कासीमला सुपुर्द करावं व संपूर्ण राज्यात मुस्लीम धर्म हा राजधर्म बनवावा.
दूत निघून गेला. तसा जयशाह विचारात पडला. कसं करायचं?? राजा दाहिर.........त्याचा पिता होता तो........ त्यानंच लहानाचं मोठं केलं होतं. उन्हातून सावलीत नेलं होतं. दूध पाजलंं होतं.. एवढंच नाही तर युद्धकौशल्य शिकवलं होतं आणि प्रधानही बनवून एका प्रांताचं राज्यही बहाल केलं होतं. परंतू प्रजेची इच्छा..........उगाचच रक्तपात नको. निरपराध माणसं मारली जातील. काय करावं सुचत नव्हतं. अशातच त्यानं राजा दाहिरला संदेश पाठवला की मोहम्मदची इच्छा आहे की राजा दाहिरनं त्याला शरण जावं.
राजा दाहिरनं सांगीतलं,
"मी शरण जायला तयार आहे. निरपराध माझ्या प्रजेची धुळधानी होवू नये असं मलाही वाटते. पण प्रजा काय म्हणते. प्रजेचंही मत विचारात घ्यावं." शेवटी राजा दाहिर प्रजाहितदक्ष राजा होता. तसेच राजा दाहिर म्हणाला,
"पण यावर प्रश्न मिटेल काय? मी जर शरण गेलोच तर माझ्यावर लांच्छन लावण्यात येईल.. युगानेयुगं लोकं म्हणतील की एक राजा असाही होवून गेला की जो लहानशा मुलासमोर शरण गेला. नव्हे तर त्या राजानं आपल्या प्रजेला गुलाम केलं आपला स्वार्थ साधत."
राजा दाहिर शरण जायला तयार नव्हता. तो आपल्या प्रजेसाठी लढणार होता. त्याला आपल्या प्रजेला गुलाम होवू द्यायचे नव्हते. तसेच त्याला हिंदू हाच राजधर्म ठेवायचा होता. मुस्लीम हा राजधर्म ठेवायचा नव्हता.
मुस्लीम राजधर्म........कोणी म्हणतात की मोहम्मद बिन कासीम लढाईसाठी आला होता. त्याच्या काहीच अटी नव्हत्या. पण थेट युद्ध झालेले नसून मोहम्मदनं मुस्लीम राजधर्म बनवावा ही अट घातली होती हे तेवढंच सत्य आहे. कारण राजा दाहिर मरण पावल्याच्या तीनशे वर्षाच्या काळात सिंधतील बहुतःश लोकं मुस्लीम झाले होते. हे धर्मांतरण जबरदस्तीनं अरबांनी करवून घेतलं होतं.
राजा दाहिरनं प्रजेचं हित लक्षात घेवून प्रजेलाच थेट विचारलं की त्यांना शांतता हवी की राजा हवा. त्यावर प्रजेनं चक्क सांगीतलं की आम्हाला शांतता नाही मिळाली तरी चालेल. आम्हाला आमचा राजाच हवा. त्यानंतर राजानं दुसरा प्रश्न केला की तुम्हाला मुस्लीम राजधर्म हवा की हिंदू? त्यावरही जनतेनं सांगीतलं की आम्ही आमच्या धर्मासाठी मरुन जावू. पण आम्हाला मुस्लीम बनायचे नाही.
जगातील कोणताही धर्म..........ज्यावेळी देश कोणाच्या आधिपत्याखाली जातो ना. तेव्हा ज्याच्या आधिपत्याखाली जातो, तो देश आपली संस्कृती, आपली मातृभाषा, आपली जीवनशैली त्या भागातील लोकांची इच्छा नसेल तरी वसवतो. त्याचबरोबर आपला धर्मही वसवतो. लोकं सरळ मार्गानं धर्मांतरण करीत नसतील तर त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण करवून घेतो. काही कट्टर धर्मवेडे असतील तर त्यांना कोंबड्या बक-यांसारखं कापून टाकलं जातं. याचाच धाक बसून काही लोकं सहजासहजी जीव वाचविण्यासाठी धर्मांतरण करतात.
भारतात धर्मांतरण प्रक्रिया ही आधीपासूनच होती. ज्यावेळी बौद्ध, जैन धर्म अस्तित्वात आला. त्यावेळी बळजबरी नव्हती.लोकं स्वेच्छेने धर्मांतरण करीत असत. विचार ज्याचे पटले त्याचा धर्म स्विकारत असत लोक. पण ज्यावेळी अरबांनी सिंध जिंकला. त्यावेळी याच अरबांनी हळूहळू हिंदुस्थानातील इतरही भागावर डोळे टाकणे सुरु केले होते. त्यातच या भारतात सोना आहे, तो जास्त प्रमाणात मंदीरातच आहे हे गुप्तहेरांकडून समजल्यानं अरब खलिफा हिंदुस्थान जिंकायला पाहात होता. नव्हे तर हिंदुस्थानवर वाकडी नजर टाकत होता.
सिंध प्रांत हा हिंदुस्थानचा पहिला प्रांत होता की जो अरबांनी जिंकला आणि आपली पाळेमुळे या हिंदुस्थानात रोवली. त्यानंतर मुस्लीम राज्यकर्ते हिंदुस्थानातील इतरही भागात पसरले.
************************************************************
राजा दाहिरनं प्रजेला विचारलं. प्रजेनं नकार देताच तसा संदेश त्यानं जयशाहला पाठवला. संदेश मिळताच जयशाहनं ठरवलेल्या सेनानायकानुसार योजना आखून आक्रमणाला सुरुवात केली.
रणशिंग फुंकलं गेलं. त्याचबरोबर समोरासमोर असलेली सेना आमोरासमोर आली. दोघांजवळही सुसज्जीत अशाच सेना होत्या. पण या भारतीतील सिंधी सैनिकही काही कमजोर नव्हते. हे सिंधी वीर जीवांच्या आकांतानं लढत होते. त्यांच्या तोंडून हरहर महादेव हे वाक्य पदोपदी निघत होतं. तर कोणी सिंध की जय म्हणत होते. एक एक सिंधी वीर दोन दोन अरबांवर भारी पडत होता.
दिवसभर सेना लढत होती. अशातच सुर्यास्त होणार होता. त्याचवेळी अरबी सेना हारण्याच्या कगारवर येवून पोहोचली होती. मोहम्मद बिन कासीमला काय करावे सुचत नव्हते. चांगली सुसज्जीत दमदार फौज. त्यातही बरेच सैनिक तरुण होते. तरीही राजा जयशाहच्या नेतृत्वात लढणारे सिंधी वीर त्यासोबतच गुर्जर, राजपूत, जाट आणि लोहाना याही समाजाचे सैनिक आपल्या मातृभुमीच्या रक्षणासाठी अगदी जीव ओतून लढत होते. अशातच सुर्यास्त झाला.
जर त्या दिवशी सुर्यास्त झाला नसता तर कदाचित चित्र निराळे असते. यावेळीही राजा दाहिरनं मोहम्मद बिन कासीमलाच नाही तर त्याच्या खलिफालाही पराभवाची धुळ चारली असती. पण सुर्यास्त झाल्यामुळं मोहम्मद बिन कासीमला विचार करायला पुरेसा वेळ मिळाला.
सुर्यास्त झाला होता. तसे प्रत्येकानं आपआपले सैनिक आपल्या आपल्या शिबीरात नेले. त्यातच थकल्या कारणानं राजकुमार जयशाह व त्याचे सैनिक विश्रामकक्षात लवकरच झोपेच्या आहारी गेले. कारण सकाळी उठून पुन्हा त्यांना युद्ध करायचे होते.
ज्याप्रमाणे राजा दाहिरचे सैन्य त्या अंधा-या रात्री थकल्या कारणानं झोपेच्या आहारी गेले होते. त्याच अंधा-या रात्री शत्रूच्या शामियानात कट शिजत होता. राजकुमार जयशाह व राजा दाहिरला कसं समाप्त करता येईल याचा.
रात्रीचा वेळ. चंद्र अजूनही आकाशात विराजमान झाला नव्हता. तसं पाहता या देवल किल्ल्याचा ज्ञानबुद्ध सुभेदार असल्यानं त्याला या किल्ल्याची खडा न् खडा माहिती होती. तेथील चोरवाटा, तेथील भुयारं याचीही माहिती होती.
रात्रीची ती वेळ. सर्व सिंधी सैनिक दिवसभर युद्ध केल्याकारणानं चांगली गाढ झोपेत होती. त्यासोबतच राजकुमार जयशाहही गाढ झोपेत होता. अशातच शत्रूच्या शामियानात जो कट शिजत होता. त्या कटाचा नायक होता मोहम्मद बिन कासीम.
सुर्यास्त झाला. तसे सगळे सैनिक आराम करायला आपआपल्या कक्षात निघून गेले. त्याचबरोबर मोहम्मद बिन कासीमही आपल्या कक्षात निघून गेला. त्याच्या बाजूला त्याचा एक मंत्री बसला होता. तसं मोहम्मदनं आपल्या मंत्र्याचा विचार तसेच सल्ला घेण्यासाठी आपल्या मंत्र्याला म्हटलं,
"मंत्रीमहोदय, मला तर काहीच सुचत नाही काय करावं ते. आज जर सुर्यास्त झाला नसता ना, तर आज आपल्याला पळून जावं लागलं असतं आपल्या देशात. काही सुचवा मंत्रीमहोदय यावर. नाहीतर नक्कीच उद्याला आपलं सामान बांधून बगदादची वाट धरावी लागेल. या राजा दाहिरसोबत लढणं काही सोपी गोष्ट नाही. आजचं युद्ध पाहिलंत. आज राजा दाहिर नव्हता, त्याचा पुत्र होता राजा जयशाह. तरीपण आपले सैनिक हारण्याच्या कगारवर होते. शत्रू सैन्यापुढे आपल्या सैन्याचा टिकावच लागू शकत नाही की काय?"
मोहम्मद बिन कासीमचा मंत्रीही काही कमी नव्हता. तोही फारच हुशार होता. तो म्हणाला,
"असं नाही खाविंन्द, आपण अशीच हार मानायची नाही. हार जर मानली तर आपलं मनोबल ढळेल. मग शक्ती चालणार नाही, युक्ती तर नाहीच नाही."
"अहो, मंत्रीमहोदय, शत्रू सैन्य फारच हुशार आहेत. आपण जर असेच आज रात्री हातावर हात धरुन बसलोत ना. तर उद्याची रात्र आपल्यासाठी कधीच उजाडणार नाही."
"मग एक सुचवू जहापनाह."
"सुचव सुचव. लवकर सुचव. आम्ही आपल्या उपायाची अत्यंत आतूरतेने वाट पाहतो आहे."
"आपण आत्ताच हमला करायला हवा."
"आत्ताच हमला! काय डोकंगीकं फिरलं की काय आपलं?"
"होय आत्ताच हमला करावा लागेल आपल्याला. त्याशिवाय त्यांना जिंकता येणं शक्य नाही."
"पण कसा करणार? रात्री युद्ध करण्याचा नियम नाही ना. शिवाय ते सैनिक झोपलेले असतील किल्ल्यात. त्या निरपराधांवर रात्रीच हमला! छे आम्ही काय एवढे भेकड की आम्ही त्यांच्यावर रात्री हमला करणार आणि कसा करणार? ते तर त्या देवल किल्ल्यात सुरक्षीत आहेत. पहारा असेल तिथं आजूबाजूला. मग कसा करणार हमला?"
"चोरवाटेनं."
"म्हणजे?"
"अहो
खाविन्द, प्रत्येक किल्ल्याला चोरवाटा आणि भुयारंं असतातच. याही किल्ल्याला असतीलच. हे शक्य आहे."
"पण त्या चोरवाटा एवढ्या रात्री कशा शोधायच्या."
"ते आहेत ना. ज्ञानबुद्ध व त्याचा मंत्री मोक्षवासव. त्यांना विचारु. बोलवा त्यांना."
मोहम्मद बिन कासीमनं एका दुताकरवी ज्ञानबुद्ध व मोक्षनासवला बोलावलं. त्यांना चोरवाटा व भुयारं विचारली. त्यांना काय माहित होतं की मोहम्मद बिन कासीम याच अंधा-या रात्री देवल किल्ल्यावर अचानक हमला करेल. शेवटी त्यांची इच्छा आता होत नसली तरी त्यांना ते बोलता येत नव्हतं. त्यांना वाटत होतं की राजा दाहिरनंतर आपल्याला राजा बनता येईल.,आपल्याला आपला धर्म राजधर्म बनवता येईल. पण मोहम्मद बिन कासीमच्या मनात दुसरंच काही होतं. त्याच्या मनात मुस्लीम धर्मालाच राजधर्म बनवायचं होतं. अशातच अल्पबुद्धीच्या ज्ञानबुद्धनं विचार न करता चोरवाटा व भुयारं सांगीतली. ज्या भुयारातून शत्रू सैन्य किल्ल्यात प्रवेश करणार होते.
मोहम्मद बिन कासीमनं ताबडतोब योजना बनवली. त्यानं निवडक तरबेज सैनिक सोबत घेतले व स्वतः पुढं होवून शत्रू सैन्यावर आक्रमण करण्यासाठी ज्ञानबुद्ध व मोक्षवासवच्या पाठीमागं चालू लागला. त्यातच किल्ल्याच्या मागच्या दरवाज्यातून पुर्व योजनेनुसार अरब सैनिक आत आले. त्यांनी सिंधी वीर गाढ झोपेत असतांना त्या गाढ झोपेतच त्यांच्यावर वार केला. त्यात काही सैनिक मारले गेले. राजकुमार जयशाह देखील घायल झाला. त्यानंतर ज्याला जो रस्ता दिसेल, त्या रस्त्यानं सिंधी वीर पळत सुटले. कारण रात्रीच्या अंधारात त्यांना शस्रही दिसत नव्हती. मजबुरीनं का असेना सिंधी वीरांना किल्ल्याचा ताबा सोडून जंगलात पळून जावंस लागलं. त्याचबरोबर जयशाहला देखील किल्ला सोडून जंगलात पळून जावं लागलं. अशारितीनं देवल किल्ल्यावर शत्रू मोहम्मद बिन कासीमला ताबा मिळवता आला.
देवलच्या किल्ल्यावरील बातमी. ते राजकुमार जयशाहचे आपल्या सैन्यासोबत जंगलात पळून जाणे, त्यातच त्याचं जखमी होणं तसेच नियमांचं उल्लंघन करुन अगदी झोपेत भ्याड हल्ला करणा-या मोहम्मद बिन कासीमच्या ताब्यात जाणारा किल्ला ह्या सगळ्या गोष्टी महाराजा दाहिरच्या कानावर येवून धडकल्या. त्यावेळी तो अलोरला होता. तो फारच व्यथीत झाला. देवल बंदराचं शहर, त्यातच तो सिंधचा अभेद्य किल्ला. त्या किल्ल्यावर कोणत्याच शत्रूची सरासरी हिंमत होत नव्हती. त्याला ज्ञानबुद्ध आणि मोक्षवासवबाबत तेवढं काही माहित नव्हतं की त्यांनी शत्रूंशी हातमिळवणी केली. तसेच त्यांच्याच भरवशावर देवलचा किल्ला मोहम्मद बिन कासीमला जिंकता आला. तसेच त्याला हेही माहित नव्हतं की ज्ञानबुद्ध व मोक्षवासवला आपला धर्म प्रिय होता. देश नाही. तसेच त्याला हेही माहित नव्हतं की मोहम्मद बिन कासीमकडे त्यांनी राजधर्म व राजपद मागीतलं. तो तसा विचार करु लागला होता की एवढा देवलसारखा अभेद्य किल्ला शत्रूच्या ताब्यात गेलाच कसा?
महाराजा दाहिरला जेव्हा देवलचा किल्ला शत्रूच्या गोटात गेला व राजकुमार जयशाह घायल होवून जंगलात गेल्याचं माहित होताच त्याला फार दुःख झालं. ते दुःख त्यानं आपल्या राण्यांजवळ बोलून दाखवलं व अलोर किल्ल्याची जबाबदारी महाराणी लाडीच्या सुपुर्द करुन स्वतः तो मोहम्मद बिन कासीमशी लढायला निघाला. सोबतच त्यानं भलीमोठी सेनाही घेतली. तसेच स्वतः तो त्याच्या हत्तीवर स्वार झाला.
एकदोन दिवसातच त्यानं अलोर ते देवलचं अंतर गाठलं. तसं त्याला पाहताच व उपस्थीत होताच सिंधी वीरात नवचैतन्याची लाट निर्माण झाली. त्यांना नवा जन्म मिळाल्याचं समाधान झालं. त्यातच सिंधी वीरात ताकदही आली. ते अजून जोशानं लढू लागले. त्यांचा जोश पाहून पुन्हा मोहम्मद बिन कासीमच्या सेनेत हालचाली सुरु झाल्या. त्यातच त्यांचे पायही डगमगू लागले. त्यांना काय करावं आणि काय नाही असं वाटायला लागलं. एक एक सैनिक कमी होवू लागला. त्यामुळं साहजिकच मोहम्मद बिन कासीमला चिंता वाटायला लागली. युद्धाचं ते मैदान एक एक सिंधी वीर युद्धाच्या पहिल्या दिवशीसारखाच अरबी सैनिकांवर भारी पडू लागला.
मोहम्मदला चिंता वाटायला लागली खरी. पण तो डगमगला नाही. तो विचार करु लागला. तसं त्याला माहित होतं की कोणतंही युद्ध हे शक्तीनं नाही तर युक्तीनंच जिंकता येतं. शक्ती काही या ठिकाणी चालत नव्हती. युक्तीच चालणार होती. त्यामुळं तो त्या युक्तीविषयी विचार करु लागला. तसा विश्वासघातपणा व कपटीपणा त्याच्या अंगात कुटकुट भरला होता. शेवटी त्याला एक नामी युक्ती आठवली.
युक्ती अशी होती की सैनिकांना महिलांचा नकाब करायला लावणं. कारण हिंदू वीर कधीही महिलांवर विनाकारण वार करीत नव्हता. हा नियमच होता, तेव्हापर्यंतच्या युद्धाचा. जर ती महिला शस्र घेवून असेल, तरच हिंदू वीर वार करीत होता.
सोळा वेळा अरबांचं युद्ध. कासीम विचार करु लागला. हे सतरावं युद्ध. सोळाही युद्धात आपण हारलो. आपलं अतोनात नुकसान झालं. पण आता हे नुकसान सहन करायचं नाही. एनप्रकारेन हे युद्ध जिंकायचंच. जेही काही करावं लागलं तरी चालेल. युद्धात साम, दाम, दंड, भेद सारेच वापरु. त्यातच तो दिवस उजळला.
दि. २० जून ७१२ चा तो दिवस. राजा दाहिरसाठी हा दिवस काळा दिवस ठरला. मोहम्मदनं आपल्या काही सैनिकांना हिंदू महिलांचा वेष धारण करायला लावला. ते महिला वेषधारी सैनिक महाराजा दाहिरच्या सैन्यात शिरले. ते महाराजाजवळ आले व त्यांना विनंती करु लागले की त्यांना अरबी सेनेमार्फत छळलं जात असून महाराजा दाहिरनं त्यांना वाचवावं. असं म्हणत म्हणत ते महिला वेषेतील सैनिक रडतही होते.
राजा दाहिर हा जसा शूर होता. तसा तो दयाळूही होता. त्याला काय माहित होते की ह्या महिला म्हणजे मोहम्मद बिन कासीमचेच सैनिक आहेत. त्यानं त्यांची दया घेवून त्या महिला वेषधारी सैनिकांना आपल्या मातब्बर सैनिकांच्या टोलीटोलीमध्ये सुरक्षीत ठिकाणी पाठवले. तसेच जागोजागी जिथे जिथे रडण्याचा आवाज येत होता. त्या त्या ठिकाणी स्वतः होवून राजा जायला लागला. पण ते नाटक त्याच्या लक्षात आलं नाही. मात्र ही नामी युक्ती मोहम्मद बिन कासीमच्या कामात आली. जेव्हा ते महिला वेषातील ते सैनिक राजा दाहिरच्या सुसज्ज सैनिकांच्या टोळीत पोहोचले. तेव्हा त्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी असली अवतारात येवून राजा दाहिरच्या सैन्यावर गुप्तपणे वार करणे सुरु केले. त्यातच हळूहळू का होईना, राजा दाहिरचे सैनिक मारले जावू लागले. ज्याची माहिती खुद्द राजा दाहिरलाही नव्हती. त्या महिला वेषातील
महिला वेषातील ते मोहम्मद बिन कासीमचे सैन्य. त्यातच त्यांचा रडण्याचा आवाज. त्यांची अब्रू वाचवितांना उडालेली राजा दाहिरची तारांबळ. यातच मोहम्मद बिन कासीमच्या कपटी कारस्थानानं कमी कमी होत गेलेले राजा दाहिरचे सैन्य. त्यामुळं राजा दाहिर आता एकटा पडला होता. परंतू आताही तो हत्तीवरच आरुढ होता. त्यातच कोणीतरी त्याच्या हत्तीवरच अग्नीबाण चालवले. त्यामुळं की काय हत्ती विचलीत झाला. त्याला मागचं पुढचं दिसेनासं झालं. त्यातच तो देवलच्या पहाडीच्या खाली पडला.
देवलचा किल्ला...... हा पहाडीवरच स्थित होता. त्याच्या बाजूलाच मैदान होते. याच मैदानात लढाई चालली होती. या मैदानाच्या आजूबाजूला खाई होत्या.. शत्रूला उध्ववस्त करीत असतांना ह्या खाईचा फार उपयोग होत असे.
किल्ला म्हटलं तर चढायला कठीण असावा असं प्राचीन काळच्या राजाचं मत असायचं. ते किल्ले बांधत. भुुईकोट किल्ले फार कमी बांधत. किल्ले बांधायचे असलेच तर डोंगरावर बांधत असत. तसंच त्यांचं लढाईचं मैदानही असायचं.
देवलजवळच्या मैदानावर जिथं युद्ध सुरु होतं. तिथं खाई तर होतीच. पण त्या खाईतून एक नदी वाहात होती. या नदीला वर्षभर पाणी असायचं.
ज्यावेळी राजा दाहिरच्या हत्तीवर अग्नीबाण चालविण्यात आलेत, त्यावेळी हत्ती विचलीत झाला व तो हत्ती त्या खाईत पडला. त्यातच त्यावर आरुढ असलेला राजाही खाईत पडणार. तोच प्रसंगावधनाने राजानं हत्तीवरुन खाली उडी मारली. त्यातच राजा अरबी सैनिकांच्या हातात पडला.
हत्ती मरण पावला होता. पण राजा दाहिर जीवंत होता. तो अरबांच्या हातात सापडला होता. ते पाहून सिंधी सैनिक घाबरले. त्यांनाही वाटलं की आपला राजाच बंदी बनला. आता आपण लढायचं कसं? शेवटी त्यांनी पळ काढला.
राजा दाहिर एकटाच शत्रूला सापडला होता. त्याला शत्रू सैनिक मोहम्मद बिन कासीमकडे घेवून गेले. शत्रू मोहम्मद बिन कासीम, त्याला पाहताच जोरात हसला.
साखळदंडात जखडलेला राजा. ज्यावेळी मोहम्मद बिन कासीमनं राजा दाहिरला पाहिलं. तेव्हा त्यानं पहिला प्रश्न केला. तो म्हणजे त्यानं हिंदू धर्म सोडावा. तसेच मुस्लीम धर्माला राजधर्म बनवावा. त्याचं कारणही तसंच होतं. गुप्तचराकरवी त्याच्या खलिफाला माहित झालं होतं की हिंदूस्थानचे राजे हे धर्मवेडे आहेत. ते जीव देतात. पण आपला धर्म सोडत नाहीत. तसेच ज्ञानबुद्ध आणि मोक्षवासव कडून हेही माहित झालं होतं की बौद्ध धर्माला राजाश्रय मिळवून द्यावा.जो राजाश्रय राजा चन्दरच्या काळात होता. राजधर्मचं एवढं अवास्तव महत्व की ज्ञानबुद्ध व मोक्षवासवनं धर्मासाठी आपल्या मनात स्वार्थ आणला आणि स्वार्थासाठी आपला देश सोडला. आपल्या देशासोबत व आपल्याच राजासोबत विश्वासघात केला. आपल्या धर्माला राजधर्माचं महत्व प्राप्त व्हावं म्हणून. त्यामुळेच की काय, मोहम्मदला वाटलं. आपण बौद्ध राजधर्म पुन्हा स्थापन करण्याऐवजी आपला मुस्लीमच राजधर्म बनवला तर....... त्यामुळं त्यानं राजाला तोच पहिला प्रश्न विचारला की त्यानं इस्लाम कबूल करावा.
मोहम्मद हा स्वार्थी व धुर्त राजकारणी होता. त्यानं राजा दाहिरला साखळदंडात जखडलेलं पाहिलं. तेव्हा तो विक्षीप्तपणानं जोरजोरात हसला. तसेच म्हणाला,
"तुच राजा दाहिर काय? चर्चा ऐकली होती की तू मोठा शूर आहेस. कोणालाच हरत नाहीस. आता कसा हरला?"
राजा दाहिर वयानं मोहम्मद पेक्षा कितीतरी मोठा. जणू त्याचा वडीलधारीच होता. पण मोहम्मदला बोलायची त-हा नव्हती. आपण कोणाशी बोलतोय हेही त्याला समजत नव्हतं. त्यामुळं तो उपहासानं व अपमान केल्यागत बोलला.
"अरे, तू अजून छोटा आहेस. तुला लढायचे नियम माहित नाही काय, अरे समोरासमोर लढाई करुन पाहा. अशी लढाई करुन तर कोणीही जिंकतो. बाईलसारखेे खेळ खेळून मला अक्कल शिकवतो काय?" साखळदंडातील राजा म्हणाला.
"चूप बैठ, गुस्ताखी करता है। अरे राजा, तू आमचा गुलाम आहेस. असं गुलामानं बोलू नये."
"मी काही तुझा गुलाम नाही." राजा म्हणाला.
"बहोत बोलता है।" मोहम्मद म्हणाला.
राजा दाहिरची ती वाणी अजूनही पाहाडासारखीच होती. त्याला चूप बसणे आवडत नव्हते. तसा तो म्हणाला,
"बोलणार. मी बोलणारच. आपल्या वतनासाठी बोलणार. तुला काय करायचं?"
"तेरी जबानच खीच लूँगाा।" असं म्हणून त्यानं राजा दाहिरवर एक तलवारीचा हलकासा वार केला. त्याचबरोबर राजा किंचाळला. तसा कासीम बोलला.
"कसम है खुदा की की अभी भी तू जिंदाा है।"
"अरे, मार डाल. तुला घाबरतेच कोण?"
"नही, मै तुझे अभीच नही मारँगा। तुझसे तो इस्लाम कबूल करवाना है।"
"इस्लाम! ज्या इस्लामची तू स्वप्न पाहतोस ना. हा राजा दाहिर मरुन जाईल. पण इस्लाम कबूल करणार नाही. मला माझ्या वतनाची शपथ आहे."
"कैसा नही करता है इस्लाम कबूल वही मै देखता हूँ। आखिर पुरा हिंदुस्थान हमे इस्लाम बनाना है। यह तो सुरुवात है इस्लाम बनाने की। हमे तो पुरे हिंदूस्थान पर हुकूमत करना है। चल कर इस्लाम कबूल।" असं म्हणत मोहम्मदनं पुन्हा एक तलवारीचा वार त्याच्या शरीरावर केला.
तो तलवारीचा शरीरावरचा वार. असह्य होत होत्या त्या वेदना. जालिम मोहम्मद बिन कासीम........ त्याला दयामायाही येत नव्हती. सोबतच त्याचा वार्तालापही सुरु होता राजासोबत. तसेच तलवारीचे वारही.
संपूर्ण शरीरच दाहिरचे रक्तबंबाळ झाले होते. जागोजागी जखमा झाल्या होत्या. शरीर जणू रक्तानं न्हाऊन निघाल्यागत वाटत होतं. तसा सारखा इस्लाम कबूल कर, इस्लाम कबूल कर असे बोल मोहम्मद बिन कासीम बोलत होता. त्यावर राजा नकार देताच पुन्हा एक तलवारीचा वार त्याच्या शरीरावर व्हायचा. तसा दाहिर पुन्हा पुन्हा विव्हळायचा.
"हा सिंध देश माझा आहे. मी येथील राजा आहे. मी मरण पत्करीन. पण माझ्या या देशाशी व माझ्या या धर्माशी गद्दारी करणार नाही. मी माझ्या वतनाशी गद्दारी करणार नाही."
राजा दाहिरचे हेच वाक्य. अगदी त्यांच शरीर छिन्नविछीन्न झाालं होतं. तो सिंधचाच राजा नव्हता तर एक स्वाभिमानी हिंदूही राजा होता. तसा मोहम्मद म्हणाला,
"हे राजा, आता शेवटचं सांगतो, तू इस्लाम कबूल कर. तुला मी सोडून देईल. तुझे राज्यही तुला प्रदान करील." मोहम्मद धुर्तपणानं लालच देवून म्हणाला.
"नाही. मला माझे राज्यही नको. पण मला माझा धर्म हवा. जो धर्म......... माझ्या मातृभुमीचा धर्म आहेे. अरे मुर्खा, आज तू मला मिटवशीलही. माझा सिंध देशही मिटवशील. पूर्ण हिंदूस्थान तू इस्लाममय बनवशील. पण याद ठेव. याच मातीत पुढे शेकडो दाहिर पैदा होतील. जे आपल्या धर्मासाठी तसेच वतनासाठी आपलं मस्तक देतील. पण झुकणार नाहीत. ही हिंदूची औलाद आहे. ऐ-यागै-याची नाही."
राजा दाहिरचं ते शेवटचं वाक्य ठरलं. मोहम्मद बिन कासीमनं ते ऐकलं. त्याला भयंकर राग आला. तसं पाहता राजा दाहिरनं शत्रू सोबत बराच वेळ पर्यंत संघर्ष केला होता. शेवटी मोहम्मद बिन कासीमनं म्हटलं
"मै तुम्हे आखिरी बार बोलता हूँ। बोल इस्लाम कबूल है क्या नही?"
"नही।" तोच शेवटचा शब्द.......मोहम्मदला भयंकर राग आला. तो राग एवढा महाभयंकर होता की त्या रागाची त्सुनामी आली.मोहम्मदनं जवळच उभ्या असलेल्या सैनिकाचा भाला घेतला. तो भाला आवताव न पाहता राजाच्या मस्तकावर मारला.
आधीच छिन्नविछिन्न झालेला राजा. तसेच रक्ताच्या थारोळ्यात असलेला राजा दाहिर. तलवारीच्या वारानं रक्त वाहून जाताच त्याचं शरीर अगदी कमजोर झालं होतं. त्यातच आता मस्तकावर भाल्याचा वार. राजा थोडावेळ तडफडला. तसा तो म्हणाला,
"सिंध की जय. हिंदू धर्म की जय. बौद्ध धर्म की जय."
राजा दाहिर. ज्या राजाला मारण्यासाठी अरबी खलिफानं मोहम्मद बिन कासीमला सिंधवर पाठवलं. त्या मोहम्मदच्या अखेरच्या वारानं राजा दाहिर मरण पावला होता. मात्र मोहम्मद बिन कासीमचे स्वप्न मातीत मिळाले होते. कारण राजा दाहिरनं इस्लाम कबूल केला नव्हता.
राजा दाहिरला हिंदूच धर्म नाही तर बौद्ध धर्मही प्रिय होता. मरणाच्या अखेरच्या वेळी त्यानं सिंध की जय, हिंदू धर्म की जय तसेच बौद्ध धर्म की जय म्हटलं होतं. त्याला ज्याप्रमाणे हिंदू धर्म प्रिय होता. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मही प्रिय होता. म्हणूनच की काय, त्यानं हिंदू धर्मवासीयांची संख्या जास्त असल्यानं हिंदू धर्माला प्रथम स्थान देवून हिंदू राजधर्म बनवला. परंतू त्यानं बौद्ध धर्म वासीयांना टाकून दिलं नाही. त्यांनाही सोबत घेवून विहारं बांधायची परवानगी दिली होती.
राजा दाहिर मरण पावताच सिंधी लोकाचं मनोबल तुटलं. तसेच त्या मोहम्मद बिन कासीमचं मनोबल वाढलं. त्याच्या सैनिकांचंही मनोबल वाढलं. मात्र त्याची एक खंत अजुनही पूर्ण झाली नव्हती. ती म्हणजे इस्लामची कबूली. त्यानं दगाबाजी करुन तर राजा दाहिरवर विजय मिळवला होता. पण तो राजा दाहिरकडून इस्लाम कबूल करण्यात हारला होता. पण राजा दाहिरच्या मरणानंतर त्याला वाटलं, आपण या संपूर्ण सिंधला इस्लामी बनवू. त्यामुळं की काय, तो आताा सिंधच्या जनतेवर इस्लामी कहराचा वर्षाव करु लागला. इस्लाम कबूल करा नाहीतर मरा. त्यातच जो इस्लाम कबूल करत नव्हता. त्यांच्यावर अत्याचार करीत होता. त्यांच्या परीवारातील स्रीयांवरही अत्याचार करीत होता. तसेच सिंधच्या लोकांना मारुनही टाकत होता. जे त्याच्या विरोधात वागत होते. इस्लाम कबूल करीत नव्हते.
धर्माच्या बाबतीत कातील असलेले अरब राजा दाहिरच्या मृत्यूननंतर सर्व मंदीर तसेच विहारांना नष्ट करीत सुटले होते. ज्ञानबुद्ध व मोक्षवासवला दिलेला शब्दही पाळला नव्हता त्यांनी. आम्ही बौद्ध धर्माला राजाश्रय मिळवून देवू. ज्ञानबुद्धला राजा बनवू ह्या गोष्टी केवळ स्वप्नातील गोष्टीच वाटत होत्या. ज्ञानबुद्धचे स्वप्न धुळीस मिळाले होते. उलट विहारंही नष्ट होत होती.
ज्ञानबुद्धला आता पश्चाताप होत होता. आपण केलं ते बरोबर नाही. कदाचित आपल्याला आपला मार्गदाता माफ करेल. पण ही जनता माफ करणार नाही. ज्या जनतेला आपल्यामुळेच गुलामी सहन करावी लागत आहे. त्यांची सरेआम हत्याही होत आहे. त्यांच्यावर अनन्वीत अत्याचारही होत आहेत. परंतू आता त्याला पश्चाताप करुन काही उपयोग नव्हता. कारण आता त्यांच्या हातून चूक होवून गेली होती. ज्याची शिक्षा संपूर्ण सिंध भोगत होता.
जनतेला महाराजा दाहिरबद्दल सहानुभूती होती की जो वीर त्यांच्याा सिंध साठी लढला. त्यानं सिंधी जनता गुुलाम बनू नये म्हणून मरण पत्करलं. पण इस्लाम कबूल केल नाही.
ज्याप्रमाणे मोहम्मद बिन कासीमनं मंदीर व विहारं नष्ट केलीत, ज्याप्रमाणे त्यानं हिंदू लोकांची कत्तल केली. ज्याप्रमाणे त्यानं सिंध प्रांताच्या हिंदूवर अत्याचार केले. त्याचप्रमाणे त्यानं सर्वच बौद्ध विहारांनाही नष्ट केलं. त्यांच्यावरही अत्याचार केले. एवढंच नाही तर गाजर मुळ्यांनाा जसं कापतो, तसेे निहत्या बौद्ध भिक्खूंची कत्तल केली. तसेच संपूर्ण सिंधमधील बौद्धांची कत्तल केली. त्याचे कारणही तसंच होतं. त्या मोहम्मदला वाटत होतं की एकप्रकारे सिंधमधील हिंदू परवडले की ज्या हिंदू राजानं धर्मासाठी आपले प्राण न्योछावर केले. परंतू राजा दाहिरच्या मृत्यूपुुर्वी कोणताही हिंदू कुरघोडीखोर ठरला नाही वा ज्ञानबुद्ध व मोक्षवासवसारखा स्वार्थी व लोभी ठरला नाही. तसेच सिंधमधील संपूर्ण बौद्ध समाज नष्ट करण्याचं काम मोहम्मदनं केलं. कारण त्याला वाटत होतं की कदाचित आपले प्रस्थ प्रस्थापित झाल्यावर हे हिंदू ज्ञानबुद्ध वन मोक्षवासवसारखी कुुरघोडी करणार नाहीत. पण बौद्ध समाज त्यांच्यासारखा कुरघोडी करु शकतात. ज्यामुळं आपल्या राज्याला धोका उत्पन्न होवू शकेल. तेव्हा मोहम्मद हाच विचार करुन सिंधमधील बौद्ध धर्मातील लोकांना नष्ट करीत होता. ज्यांनी त्याला मदत केली होती.
मोहम्मदनं एवढंच केलं नाही तर संपूर्ण देवल शहरही जाळून टाकलं. तसेच तेथील पूर्ण संपत्ती लुटून टाकली.. ती लुटलेली संपूर्ण संपत्ती इराकला पाठवली. हजारो स्रीयांंची अब्रू लुटली. तसेच त्या महिलांनाही इराकला पाठवलं. बहुतःश पुरुष, लहान मुलं आणि वृद्ध माणसांच्या कत्तली झाल्या. ज्यांनी ज्यांनी धर्मपरीवर्तन केलंं. त्यांची त्यांची मोहम्मदनं कत्तल केली नाही. परंतू त्यांना आपला दास बनवले व त्यांना दास बनवून खलिफाकडे पाठवले. अशाप्रकारे संपूर्ण देवल शहर आज इस्लाममय झाला होता. राजा दाहिर असा व्यक्ती की त्यानं सहिष्णुता पाळत ज्या आपल्या राज्यात सर्वच धर्मीयांना स्थान दिलं, ते स्थान मोहम्मद बिन कासीमनं दिलं नव्हतं.. उलट त्यानं आपल्या वचनाला काळीमा फासला होता. जे वचन त्यानं ज्ञानबुद्धला दिलं होतं.
महाराज दाहिर वीरगतीस प्राप्त होताच व देवल शहरावर अरबांचा कब्जा होताच अरबी सेनेनं आपला मोर्चा अलोरकडं वळवला. जिथं राजा दाहिरंनं युद्धावर निघण्यापुर्वी राज्याची धुरा महाराणी लाडीच्या हातात सुपूर्द केली होती. महाराणी लाडी आपल्या धन्याच्या हुकूमाची पायमल्ली न करता आपल्या वतनासाठी राज्य सांभाळण्यास तयार झाली होती. तसं पाहिल्यास राजा दाहिरला माहित असेल की मी या युद्धातून परत येणार नाही. वीरगतीस कदाचित प्राप्त होवू शकतो. म्हणून की काय, त्यानं राज्याची धुरा महाराणी लाडीला दिली होती.
देवल जिंकताच अरबी सेनेचा उत्साह द्विगुणीत झाला. त्यातच आता अरबी सेना अलोर जिंकण्याची स्वप्न पाहू लागली.
महाराणी लाडीला आपल्या महाराजची वीरगती माहित झाली होती. त्यातच अरबी सेना आपल्या अलोरकडे येत असल्याची सुचना महाराणी लाडीला लागली. तशी ती सावचित झाली.
ज्यावेळी अरबी सेना अलोरजवळ येवून धडकली. त्यावेळी त्या सेनेचं स्वागत सिंधच्या वीरांगणांनी भाल्याच्या वर्षावानं केलं आणि परिचय दिला की आमचा राजा वीरगतीस प्राप्त झाला असला तरी आम्ही हरलेलो नाही. अजूनही आमच्या मनगटात ताकद शिल्लक आहे. त्यातच अलोरला अरबी सेना येताच भयंकर युद्ध झालं.
अलोर मध्ये अरबी सेना पोहोचताच जे घनघोर युद्ध झालं. त्यात राणी लाडीही वीरगतीस प्राप्त झाली. त्यानंतर काही शुरवीरही मारले गेले. त्यानंतर त्या शुरवीरांच्या वीरांगणा अरबी सेनेसोबत युद्ध करु लागल्या. परंतू ज्यावेळी त्या वीरांगणा त्या अरबी सेनेसमोर टिकाव धरु शकल्या नाहीत. तेव्हा त्यांनी स्वतःच आत्मबलिदान केलं. अर्थात आपलं सतीत्व शाबूत ठेवलं. पण त्या अरबी, कुटील राजकारणी, कपटी, धुर्त मोहम्मद बिन कासीमसमोर शरणागती पत्करली नाही वा त्याच्या हवसच्या शिकार झाल्या नाहीत. आपलं सतीत्व कायम ठेवण्यासाठी काही वीरांगणा सतीही गेल्या होत्या.
महाराजा दाहिरच्या दोन्ही मुलींवर चांगले संस्कार होते. त्या राजकुमारी दोन्ही बाजूंकडील जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या. महाराजा दाहिर वीरगतीस प्राप्त होताच तसेच राणी लाडीही वीरगतीस प्राप्त होताच राजाच्या दोन्ही मुलींना शत्रू सैन्यानं पकडलं. त्याचबरोबर इतरही काही महिलांना कैद करण्यात आलं. दोन्ही राजकन्येला व महिलांना शत्रू सैनिकांनी कैद करताच त्यांना मोहम्मद बिन कासीमसमोर प्रस्तूत करण्यात आलं. त्याचबरोबर कैद करण्यात आलेल्या महिलांना बगदादला खलिफाकडे पाठविण्यात आलं.
मोहम्मद बिन कासीमनं खलिफाकडे पाठविलेल्या महिला.......... त्यात राजकन्याही होत्या. त्या राजकन्या इतर महिलांसारख्याच सुंदरही होत्या. त्या इतर महिलांप्रमाणे राजकन्यांना बगदादमध्ये खलिफासमोर प्रस्तूत करण्यात आलं.
ज्यावेळी त्या राजकन्यांना खलिफासमोर आणण्यात आले. त्यावेळी त्यांचं सौंदर्य पाहून खलिफा मोहित झाला. त्याला वाटलं की एवढ्या सुंदर सौंदर्याच्या राजकन्या, या राजकन्यांना आपल्या जनानखान्यात ठेवायला हवं. आपल्या राण्या बनवायला हवं. त्यासोबतच खलिफानं आदेश दिला की यांना जनानखान्यात पाठविण्यात यावं.
जनानखाना म्हणजे युद्धात पळवून नेलेल्या स्रीयांना ठेवण्याची जागा होती. या जनानखान्यात त्या सुंदर स्रीयांना ठेवलं जाई. ज्या स्रीला राजा आपली राणी बनवू शकेल. इतरांना जनानखान्यात प्रवेश नव्हता. काही राजे जनानखान्यांना पाक समजत. ते स्रीयांची इज्जत करीत असत. तसेच स्रीयांच्या अब्रूला जपत असत.
काही जनानखाने असे नसत. या जनानखान्यात ज्या स्रीया असत. त्या स्रीयांची अब्रू वेशीवर टांगली जात असे. या स्रीया गुलाम असायच्या. त्यांना त्या होणा-या अत्याचाराबाबत काहीच बोलता येत नसे. उगभोग उपभोगण्यासाठी या स्रीया असतात वा पळवून आणल्या जातात असा अर्थ व समज त्यावेळी अस्तित्वात होता.
काही राजे हे चांगल्या विचारांचे होते. ते राजे जनानखान्यात युद्धातून पळवून आणलेल्या स्रीयांना ठेवत. परंतू त्यांना आपल्या आईबहिणींसारखी वागणूक देत. त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देत. त्यांच्यावर अत्याचार करीत नसत. तसेच कोणाला करुही देत नसत. जर कोणी असा अत्याचार केल्यास त्यांना जबर शिक्षा करीत असत.
काही ठिकाणी जनानखान्याचा अर्थ वेगळा घेण्यात येई. या जनानखान्याला पाक समजले जाई. या जनानखान्यात बादशाहाच्या स्वतःच्या आईबहिणीही असत. या जनानखान्यात परपुरुषांना प्रवेश नसे. तर जे नातेवाईक असायचे. त्यांनाच प्रवेश असायचा. शिवाय कारभार करण्यासाठी किंवा राणीची सेवा करण्यासाठी एक तृतीयपंथी व्यक्ती असायचा तोच व्यक्ती तिची सेवा करायचा व जनानखान्यातील स्रीयांशील संवाद साधायचा. या स्रीला सर्व जगताची माहितीही असे.
जना म्हणजे स्री. जनानखाना म्हणजे युद्धात पळवून आणलेल्या स्रीयांना ठेवायची जागा. याला हरमसुद्धा म्हणत असत. विवाहितांचे परपुरुषाशी किंवा अविवाहित स्रीयांचे खालच्या अधिका-यांशी संबंध होवू नयेत म्हणून पातशाहाच्या महालात स्रीयांना पुरुषांपासून वेगळं ठेवलं जात असे.
जनानखान्याला पवित्र समजले जात असे. एरवी हा जनानखाना राजा खासकरुन आपल्या राण्यांसाठी बांधत असे. राज्यातील जी मुलगी रुपवती असली आणि ती त्या राजांना आवडली तर तो तिच्याशी विवाह करीत असे. तिला त्या जनानखान्यात ठेवत असे. कधीकधी त्या जनानखान्यात राजा व्यतिरीक्त कोणीही विनापरवानगीनं जावू शकत नव्हता. खुद्द राजालाही जनानखान्यात प्रवेश करतांना जनानखान्यातील स्रीची परवानगी घ्यावी लागायची. तसं पाहता युद्धातून पळवून आणलेल्या स्रीया जर सुंदर असतील तर त्यांना खुद्द राजा आपल्या जनानखान्यात ठेवत असे. अशांचं संरक्षणही राजा स्वतःच करीत असे.
प्रत्येक राज्यात जनानखाने असायचे. अशा जनानखान्यात कितीतरी स्रीया असत. त्या स्रीयांची मुलंही असत. जनानखान्याच्या भींतीही जबरदस्त बांधलेल्या असायच्या. कोणताही राजाला मारल्याशिवाय त्या जनानखान्यात शिरु नये अशी तटबंदी जनानखान्याची असायची.
या जनानखान्याच्या जशा भिंती अभेद्य होत्या. तशीच राण्यांसाठी या जनानखान्यात चांगल्या सोयीही होत्या. त्यात या स्रीयांसाठी जलक्रिडा विहारही असायचे.
काही जनानखान्यात एखादी स्री गेलीच की तिला बाहेरची हवा लागणं मुश्कील असायचं. कारण ती या जनानखान्यातून बाहेर जावूच शकत नसे.,खुद्द आपल्या मायबापालाही भेटू शकत नसे आणि मायबाप स्वतः भेटायची इच्छा जरी करीत असले तरी ते राजाच्या परवानगी शिवाय शक्य नसायचं.
हा जनानखाना सोन्याचा पिंजराच वाटत असे. या ठिकाणी तलाव असायचा. या तलावाभोवती सायंकाळी दिवे व कंदील लावण्यात येत असे. त्या हजारोच्या संख्येनं लावलेल्या दिव्याचे प्रतिबिंब या तलावात पडत असे. ते तलावाच्या पाण्यात चमकत असत. त्यातच या तलावाशेजारी गायनाचे कार्यक्रम होत असत. ते ऐकायला राजा आवर्जून हजर राहात असे.
असं मानलं जातं की हा जनानखाना म्हणजे महालच असे. त्यांची साधारणतः लांबी १२० मीटर किंवा त्याहीपेक्षा कमीजास्त असायची तर रुंदी १६ मीटर किंवा कमीजास्त असायची. जनानखाने कधीकधी दोनदोन मजलीही असत. काही जनानखान्यात तीन मोठे हाल असत. तसेच एक हमामखानाही असे. सर्व दालनं सुंदर महिरपींनी युक्त असून त्याची नजाकतता कलाकुसरीची असायची. तसेच कलाकुसरीचे झरोकेही असायचे. महालाच्या दुस-या मजल्यावर तलावातून थंड हवा येण्याची व्यवस्था असायची. हालला मोठमोठ्या खिडक्या असायच्या. सगळ्या दालनाच्या छतांना टाईल्स लावलेले असायचे. त्या टाईल्स रंगीत असायच्या. मोठमोठ्या खिडक्यातून पाझरणा-या प्रकाशात ही सगळी दालनं निळ्या पिवळ्या प्रकाशानं चमकायची.
सगळ्या महालात पाणी खेळतं ठेवण्याची व्यवस्था असायची. वरच्या मजल्यावर देखील चारही बाजूंनी बंदिस्त पण आकाशाकडे मोकळा असलेला ऐसपैस हरामखाना राहायचा. तसेच महालाच्या गच्चीवर चांगलाच प्रशस्त उमललेल्या कमळाच्या आकाराचा स्वीमींग पुलही राहायचा. महालात राहणा-या शाही स्रीयांना पोहोण्यासाठी ही विलासी व्यवस्था. किती योजनापुर्वक रीतीनं तो महाल साकारलेला असायचा.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की स्रीयांना वैयक्तीकपणा नव्हे तर मुक्त स्वातंत्र्य देण्याचा हेतू असायचा. स्नानगृहाची अशी रचना असायची की वरचं आभाळ न्याहाळता येईल. तसेच सभोवतालचा निसर्ग व्यवस्थीत बघता येईल. अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणात दिर्घकाळ स्नानाचा आनंद घेता यावा अशीही व्यवस्था या जनानखान्यात असायची.
महालाच्या वरच्या मजल्यावर जायला अतिभव्य जिना असायचा. तसेच तलावाकडे जायचा खाजगी जिनाही असायचा.
तलावाजवळ काही चबूतरे बांधलेले असायचे. बहूतेक हे तलावाचा आनंद घेण्यासाठी बसणा-या राण्यांसाठी असायचे. शाही व्यक्तींच्या विहारासाठी विशिष्ट नावा असायच्या. काही ठिकाणी पैव्हेलियनच्या सोयी असायच्या. या पैव्हेलियनमध्ये गप्पागोष्टी चालत असत. सभोवताल पाचूच्या बेटासारखा हिरवागार परीसर डोळे दिपवून टाकायचा.
जनानखान्याबाबत एक गोष्ट प्रसिद्ध आहे. ती अंगोलाच्या राणीची. ती तिला आवडणा-या चिबदोसमधील पुरुषांना काम पूर्ण झाल्यानंतर जाळून टाकत असे.
ज्याप्रमाणे राजा राण्यांसाठी जनानखाने उभारायचा. त्याचप्रमाणे काही राण्याही अशाच स्वरुपाचा महाल उभारायचे. त्याला चिबदोस म्हणत. या चिबदोसमध्ये राण्यांनी युद्धानंतर जिंकलेले व गुलाम झालेले पुुरुष राहात. ज्यावेळी अशी राणी चिबदोसमध्ये जात असे. ती चिबदोसमध्ये राहणा-या इतर पुरुषांना लढाई करायला सांगत असे. या लढाईत जो जिंकला. त्याचा वापर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या राण्या करीत असत. यात पुरुषांना महिलांचा पोशाख ह परीधान करुन दिला जाई. यामध्ये राण्या आपल्या इच्छा अशा पुरुषांकडून पूर्ण करुन घेवून काम झाल्यावर अतिशय क्रुरतेने त्या पुरुषांना जीवंतपणीच जाळून टाकत असत.
स्त्री हा कायमच समाजाच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. कारण समाजाची शुद्धता म्हणजे स्त्रीची पवित्रता, असेच निकष आपण लावत आलो आहोत. विवाहसंस्था अस्तित्वात आल्यापासून स्त्रीधनाची व्याख्या बदलली. त्या आधी स्त्री हेच धन मानले जायचे. त्यानंतर पुरुषसत्ताक पद्धती अधिक घट्ट झाली. सिमान्‌ दी बहुवाच्या ‘दी सेकंड सेक्स’ या जागतिक पातळीवर गाजलेल्या पुस्तकात जगभरातल्या स्त्रियांच्या माणूस म्हणून आणि स्त्री म्हणून वाटचालीचा आणि पुरुषांच्या तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचाही विस्ताराने, अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. त्यात अगदी पुढारलेला समाज म्हणविल्या जाणार्‍या अमेरिकेपासून अगदी प्राचीन सभ्यता मानल्या जाणार्‍या ग्रीक आणि हिंदूस्थानपर्यंत स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मांडण्यात आला. एकीकडे तिला देवी मानले गेले. कारण त्या काळात प्रजननाचा अर्थ मानवाला कळला नसल्याने स्त्री आपल्यासारख्याच एका जीवाला जन्म देते, हा तिचा खूप मोठा चमत्कार मानला जायचा आणि म्हणून मग तिच्याविषयी गुढ निर्माण झाले. त्यातून तिला दैवी मानलं जाऊ लागलं. मग ती देवी ठरली.
एकीकडे ती देवी आहे आणि दुसरीकडे ती उपभोग्य वस्तूही आहे. उपभोग्य वस्तू अस्सल, शुद्ध आणि कसदारच असली पाहिजे, अगदी हा कुठल्याही उपभोक्त्याचा अट्‌टहासच असतो. त्यासाठी तो विशेष किंमत मोजतो, असा किमान त्याचा समज असतो. त्यामुळे स्त्रीदेखील तशीच असली पाहिजे, हादेखील अट्‌टहास कायम राहिला. अगदी माणूस टोळी करून राहायचा त्या काळातही तिची शुद्धता तपासली जायची आणि त्याचा एकमेव निकष हा शारीरिक होता. म्हणजे कौमार्य हा तिचा दागिना ठरविण्यात आला. त्यावरच तिची मानसिक आणि शारीरिकही जडणघडण करण्यात आली.
विवाहसंस्था अस्तित्वात आल्यानंतर तिची ससेहोलपट थांबली. आधी गोधन पळविले जायचे. युद्धांत तसेच इतरही ठिकाणी स्त्रीधनही पळविले जायचे. जनानखाना ठेवायचा आणि दासींनाही सोडायचे नाही, हे अगदी सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत सुरू होते. एकपत्नीत्वाचा कायदा हा अलीकडच्या सभ्यतेत आला. तोवर ही तिची ओढाताण सुरूच होती. तरीही मग आपल्या वाट्याला आलेली स्त्री दुसर्‍या कुणी उपभोगलेली नसावी, यासाठी कौमार्य चाचणी केली जायची. आताही ती केली जाते. अगदी सभ्य समजल्या जाणार्‍या समाजातही विवाहानंतर पहिल्या रात्री ते तपासण्याच्या विविध पद्धती. या पद्धती ऐकल्या की किळस येते. अंगावर काटा उभा राहतो. काही ठिकाणी ते आधीही तपासले जाते. काही जातपंचायतीत तर उकळत्या तेलात हात घालण्याचीही परीक्षा घेतली जाते. अगदी अलीकडच्या काळातही हे असले प्रकार काही तांड्यांवर, जातपंचायतीत घडतात. तिला मग कुलटा ठरविले जाते. पुरुषाची मात्र असली कुठलीही चाचणी केली जात नाही. याच पद्धतीची परीक्षा सीतेलाही द्यावी लागली. तिचा दोष नसतांना. प्रसंगी ती चाचणी विवाहानंतर रावणाच्या घरुन आणतांना घेण्यात आली. तिला अग्नीपरीक्षा हे नाव देण्यात आलं.
कौमार्याबद्दलच्या या कल्पना अत्यंत अप्रागतिक आणि मागास अशाच आहेत. वैद्यकीयदृष्ट्या कौमार्यभंगाची अनेक कारणे असू शकतात. आता महाराष्ट्र सरकारने कौमार्य चाचणी हा गुन्हा ठरविण्याचे विधेयक पास केले. आता त्याचा कायदा होईल. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चांगला आहे, पुढारलेला आहे आणि विज्ञानवादीही आहे. अत्यंत धाडसी आणि स्त्रीवादी असाच हा निर्णय आहे. त्याचे स्वागत करताना केवळ सरकारने कायदा करून होत नाही, तर समाजाने तो तितक्याच विवेकी शहाणपणाने अंमलात आणला पाहिजे, हे महत्त्वाचे आहे.
लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य, हे जरी खरं असलं तरी शेवटी खर्‍या अर्थाने कुठल्या कायद्याचे राज्य, हा प्रश्न पडतोच. आपण देशात घडणार्‍या घटनांचे निरीक्षण करतो तेव्हा अशा अनेक प्रथा सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते. काही दिवसांपूर्वी कौमार्य चाचणीविरोधी कायद्याासंदर्भात ठराव पास करण्यात आला. खरेतर कौमार्य चाचणी या विषयावर बोलले जातेय तसेच त्याचा विरोध म्हणून कायदा करण्याचा विचार केला जातोय, ही बाब खरं तर कौतुकास्पद आहे. जेव्हा आपण आधुनिक आणि सुसंस्कृत समाजाचा विचार करतो, तेव्हा त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्री-पुरुष समानता, हाच आपण मानतो. याचाच अर्थ, स्त्री-पुरुष यांच्यात भेदभाव न करता सामाजिक जीवनात सर्वांना समान न्याय, सन्मान, प्रतिष्ठा मिळेल हे अपेक्षित असते. परंतू या सर्वांना दूर सारून आजही जुन्या प्रथा सुरू असताना दिसतात. कांजभाट समाजातील कौमार्य चाचणी ही प्रथा स्त्रीच्या अस्तिवाला काळिमा फासणारी आहे. गेल्या काही वर्षांपासून कौमार्य चाचणी हा घृणास्पद प्रकार बंद व्हावा म्हणून पुण्यामधील काही युवकांनी ‘स्टॉप द वि रिच्युअल’ नावाची चळवळ चालविली आहे. या चळवळीला कांजभाट समाजातीलच नव्हे, तर अनेक विखुरलेल्या जाती आणि जमातींचा विरोध होतो आहे. चळवळ करणार्‍या मुलांना निर्घृण मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे.
एकीकडे आपण सुशिक्षित असल्याचे दाखले देतोय आणि दुसरीकडे अन्यायाविरुद्ध लाढणार्‍यांना मागे खेचतोय, हे कितपत योग्य आहे? आज आपण यावर उपाययोजना म्हणून कायदा बनवतो आहे, परंतू एखाद्या कायद्यामुळे स्त्रीयांचे प्रश्न सुटणार नाहीत, याचीही जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. मात्र स्त्रीयांच्या हक्काची मागणी करण्याचे एक चांगले विचारपीठ या कायद्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हायला हवे. खरंतर केवळ कायदा करुन उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे.
कौमार्य चाचणी म्हणजे काय? तर लग्नानंतर पहिल्या रात्री नवरा मुलगा आपल्या बायकोची कौमार्य चाचणी करून ती शुद्ध आहे की नाही ते तपासतो. ते जाहीरही करतो. सभ्य समाजात आता हा प्रकार जवळपास नाहीसा झाला असला, तरीही हा ‘रक्तलांच्छित’ तपास मात्र चुपचाप घेतलाच जातोच. तसे नाही झाले, चादर बेदाग राहिली तर आपण फसविले तर गेलो नाही ना, आपल्या बायकोचे इतरांशी संबंध आलेले तर नाही ना, अशी शंका नवरोबाच्या मनात असतेच. आधुनीक वैद्यकीय विज्ञान काहीही सांगत असले, तरीही परंपरागत मानसिकता काही स्वस्थ बसू देत नाही.
गावकुसाबाहेर, भटक्या सामाजात आणि अजूनही जातपंचायतचा कायदाच मानला जातो तिथे मात्र अजूनही लग्नाच्या पहिल्या रात्री ही तपासणी केलीच जाते. त्यासाठी नव्या जोडप्याच्या शयनकक्षाच्या बाहेर नवर्‍याच्या घरची मंडळी बसलेली असतात. ‘निकाल’ काय येतो, ही त्यांची उत्सुकता असते. काही जमातींमध्ये तर एक प्रौढ स्त्री नवर्‍या मुलीची विवस्त्र करून तपासणी करते आणि नंतरच तिला मधुचंद्राच्या खोलीत सोडले जाते. बाहेरून सतत विचारले जाते, ‘‘माल खरा आहे ना?’’ आणि त्याने सांगितले की, ‘‘खरा आहे.’’ मग बाहेर जल्लोष केला जातो. तसे नाही झाले तर मग मात्र त्या मुलीच्या छळाला पारावार नसतो. अत्यंत घृणास्पद आणि क्रूर प्रकार केले जातात. स्त्रीत्वाचा अपमान करणारी ही कुठली प्रथा आहे? ते कळत नाही.
आता स्त्रिया सार्वजनिक जीवनात सर्वच आघाड्यांवर वावरतात. खेळाडूंपासून तर वैमानिक होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. शारीरिक कवायती आणि कष्ट, कसरती त्या करतात. आधीही त्या जड कामे करतच होत्या. खेड्यातल्या स्त्रिया तर शेत्यांवर, घरकामांवर कष्ट करतात. कौमार्य तपासणी म्हणून जे निकष लावले जातात, ते कौमार्य भंग होण्यास ही कारणे पुरेशी असतात. धावणे, सायकल चालविणे, शाळेत अनेक कसरतींमध्ये भाग घेणे हे मुलींना करावेच लागते. याकूनही कौमार्यावर शंका उत्पन्न होवू शकतात. पण हे या लोकांना कधी कळेल? मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार या समाजात मांडला जातो. मग मुलीच्या कौमार्याची चाचणी कशासाठी?
प्रत्येकाला एक हा प्रश्न पडतो की मुलींच्या कौमार्याची चाचणी घेणे ठीक आहे. मग मुलांच्या कौमार्याच काय? हा प्रश्न यांना कोण विचारणार? म्हणजे अगदी सतीप्रथेपासून तर चालू असलेल्या काळापर्यंत कौमार्य चाचणीपर्यंत फक्त मुलींवरच अन्याय का? पुरुषी मानसिकता याला जबाबदार तर आहेच. परंतू परंपरेने आणि रूढी-प्रथानुसार वागणार्‍या महिलाही तितक्याच जबाबदार आहेत. स्त्रीचा अपमान करणारी ही प्रथा बंद व्हायलाच पाहिजे. आज मुलं- मुली बरोबरीने शिकत आहेत. सुशिक्षित होत आहेत. जग कुठून कुठे जात आहे आणि आम्ही अडकलोय कौमार्य चाचणीवर. हे कधी थांबणार? मुळात ही कौमार्य परीक्षा कशासाठी? काय, तर मुलगी वयात अाली तर काही चुकीचं करू नये म्हणून. का? प्रत्येक मुलगी वयात आली तर चुकीचेच करेल, असं का वाटते लोकांना आणि ती काही चुकीचं वागत असेल, तर त्याच वेळी त्या चुकीत एक पुरुषही सहभागी असतोच. बर्‍याचदा तर ते तिच्यावर लादलेले असते. जबरदस्तीनेही झालेले असते. सांगता येत नाही अन्‌ सहनही होत नाही, अशीही अवस्था असते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या कौमार्याच्या परीक्षेत ती नापास ठरण्याला केवळ शारीरिक संबंध हेच कारणीभूत नसतात.
त्यावरचाही प्रश्न म्हणजे, जे काही घडतं. ते चूक की बरोबर हे ठरवणारे आम्ही कोण? संविधानाने तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून दर्जा दिलेला आहे. स्वतंत्र नागरिक म्हणून अधिकार दिला आहे. तिच्या सर्वच गरजांचे आणि अधिकारांचे संरक्षण संविधान करीत आहे. त्यामुळं अगदी तिच्या नकाराचाही सन्मान आपण करायला हवे. भारतीय राज्यघटनेत परिच्छेद क्रमांक एकवीसमध्ये दिलेला खाजगी अधिकाराचा ती वापर करूच शकते. तरीही आम्ही तिच्यावर बंधने टाकतो. म्हणजेच कुठेतरी आम्ही संविधान नाकारतो आहे. खरेतर आपण मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देण्यात कमी पडतोय.
लैंगिक विचार हा जीवनाचा सर्व बाजूंनी विचार करायला लावणारा महत्त्वाचा भाग आहे. असे असूनही आज त्याकडे समाजव्यवस्थेचं दुर्लक्ष होतंय, ही दुर्दैवी बाब आहे. दुर्दैवाने लैंगिकता म्हणजे न बोलण्याचा विषय आहे, असाच एकुण समज आहे. तिला सुरक्षित ठेवण्याची भावना नक्कीच चांगली आहे. तिलाही शुद्ध मन आणि तनही असावं असंच वाटतं, मात्र ते भंगही पुरुषच करतात आणि पावित्र्याची मागणीही तेच करतात, हे ढोंग आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत लैंगीक शिक्षण असावेच, अत्यंत निकोप भावानं हे शिकविलं आणि शिकलं जावं. लैंगीक या शब्दाबद्दल आपल्या समाजात एक नकारात्मक भूमिका आहे. या विषयी कुणी बोलायचे नाही. प्रश्न विचारायचे नाही आणि याचमुळे वाढणार्‍या अंधश्रद्धेचं प्रमाण खूप मोठं होत आहे. याच अंधश्रद्धेतून निर्माण होतात या अशा कौमार्य चाचणीसारख्या कुप्रथा... रूढी, प्रथा, परंपरेतून मोठ्या प्रतिष्ठा जपणार्‍या अशा कौमार्य चाचणीची कुप्रथा चालूच आहे. प्रशिक्षित, सुशिक्षीत समाजात कौमार्य चाचणी होताना जरी दिसत नसली, तरी प्रत्येक पुरुषाला आपली होणारी सहचारिणी ही कौमार्य संभाळलेली असावी, असेच वाटते, हेही तितकेच खरे आहे. या सर्व गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी जरी कायदा येत असला, तरी कायदा मानसिकतेत बदल घडवून आणेल का, हा मोठा प्रश्न समोर पडतो आहे. कायदा हा वाईट गोष्टी दूर करण्यासाठी मदत करेल, परंतू त्याची अंमलबजावणी ही स्वतःलाच करावी लागेल. अशा कुप्रथा बंद करण्यासाठी कायद्याची गरज असते. पण अशा प्रकारचा सामाजीक कायदा स्वतःच्या पायावर कधीच उभा राहणार नाही. जोेपर्यंत त्याला लोकमताचा आधार मिळणार नाही. तोपर्यंत त्याची हवी तशी अंमलबजावणी होणार नाही. म्हणून खरा प्रश्न अंमलबजावणीचा आहे.
कायदा येईलही कदाचित. कौमार्य कायदा. परंतू हाही कायदा इतर कायद्यांप्रमाणे कागदावरच राहील का, असा संशय येतो. तर दुसरीकडे अशीही भीती वाटते की, खरंच रूढी-परंपरेतून समाज बाहेर पडणार का? पिंजरा उघडला आहे, पण पक्षीच पिंजर्‍याबाहेर पडायला तयार नाही. याची काळजी ही समाजालाच घ्यावी लागणार आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. (सदर उतारा मा.अॅड. प्रीती मख यांच्या लेखनीतून आधारासाठी घेतला.)

************************************************************************************************

बगदादच्या खलिफाला राजकुमारी आवडताच त्यानं त्यांना आपल्या जनानखान्यात पाठवणी करण्याचा आदेश दिला. तो जनानखाना. ज्याला पाक समजत असत. तसेच त्या जनानखान्यात केवळ खलिफाच जाणार होता. तशी राजकुमारीत बदल्याची आग धुमसतच होती.
खलिफाचा तो आदेश अग्नीमध्ये तुप टाकल्यागत झाला. कारण त्या जनानखान्यात पाठवणी करणं म्हणजे खलिफाच्या पटराण्या बनण्यासारखा योग होता. त्याच संधीचा फायदा घेत दाहिर राजाची मोठी मुलगी परमाल रडायला लागली. त्यावर खलिफा म्हणाला,
"साहिबाँ, क्यो रोती हो? हम तो तुम्हे अपनी मासूका बनाने का हुक्म दे रहे है। आज से तुम मेरी इतनी करीब रहेगी और ये खलिफा तुम दोनों को पास नजर आयेगा पता है। राजा दाहिर नही है तो क्या हुआ? बेशक हम आपके मासूक बनकर आपकी खितमतदारी करेंगे। बताओ रोने का क्या कारण है? तुम्हे तुम्हारी पिता की याद आ रही है क्या?"
खलिफाच्या त्या प्रश्नावर राजकुमारी परमाल म्हणाली,
"नही जहापनाह, मला ना ही माझ्या वडीलाची आठवण येत. ना ही मला माझ्या वतनाची. हं मात्र एक शंका आहे. विचारु का?"
"पुछो पुछो, क्या बात है? पुछो।"
"जहापनाह, आम्ही जनानखान्यात जायच्या योग्य नाही."
"मतलब? क्या मतलब है इसका?"
"मतलब हाच की आम्ही पाक नाही. जनानखान्यात पाक मुलीच असतात. आमच्यासारख्या नापाक नाही."
"हम समझे नही खान साहिबाँ?"
"आम्ही कौमार्य नाही असं आम्हाला म्हणायचं."
"मग आम्हाला सांगा, तुमचं कौमार्य कोणं भंग केलं?"
खलिफाचा तो प्रश्न. राजकुमारीच्या मनात जोर पकडून होता. त्यातच त्यांनी विचार केला. बदला काढायचाच. त्या मोहम्मद बिन कासीमनं आपल्या वडीलाला व आईला धर्मासाठी मारलं काय? त्यालाही या खलिफाच्या हातून मृत्यूदंडच द्यायचा. तशी परीमाल म्हणाली,
"गुस्ताखी माफ करा जहापनाह. पण आम्ही सांगतोय ते शंभर प्रतिशत खरं आहे."
"सांगा, एवढ्या सुंदर राजकुमारींचं कौमार्य कोणं भंग केलं. कोणाची एवढी हिंमत झाली की आमच्यासाठी पाठविलेल्या राजा दाहिरच्या मुलींचं कौमार्य तेही आम्ही असतांना भंग केलं. तुम्ही सांगाच. मी प्रत्यक्ष या तलवारीनं त्यांचं मुंडकं उडवीन."
"शपथ घेवून सांगा. म्हणजे आम्ही विश्वास करु. आमच्या हिंदूस्थानात राजाला इश्वराचा अंश मानतात. जो राजा आपल्या प्रजेचं रक्षण करु शकत नाही. त्याला आम्ही राजा मानत नाही आणि इथंतर आम्ही तुमच्या जनानखान्यात हरमसाठी जाणा-या युवराज्ञी. आम्हाला तुमची पटराणी बनायचं भाग्य लाभत असतांना आम्ही फार खुश आहोत. पण आमची इच्छा आहे की तुम्ही त्या आमच्या इज्जतीवर अर्थात तुमच्या या राण्यांवर वाईट नजर टाकणा-या त्या नराधमाला जबर शिक्षा द्यावी. जसे आम्ही आमच्या राज्यात इश्वराची शपथ खातो. तशी आपणही खावी."
"हम कहते है की हम उन्हें मृत्युदंड देंगे।"
"परंतू आम्ही आपल्यावर विश्वास करायचा कसा? त्याचं काय प्रमाण आहे? काही प्रमाण द्याल काय? ते प्रमाण द्या. मगच आम्हाला जनानखान्यात न्या. पण जनानखान्यात नेण्यापुर्वी त्याला शिक्षा व्हायलाच हवी."
"ठीक है। आपका हमपर विश्वास नही है। ठीक है। लेकिन आपका खुदापर तो विश्वास है।"
"हो हो तुमच्या खुदावर विश्वास आहे."
"तो हम खुदा की कसम लेकर कहते है कि हम उस नाचीज को सजा ए मौत देंगे। आप उस नाचीज का नाम जल्द ही बताओ। ताकि हम उसे उसके अंजाम तक पहूँचा सके।"
"तो सुनो, उस नाचीज का नाम है मोहम्मद बिन कासीम। जिन्होंने हम दोनों राजकुमारीयोंका कौमार्य भंग किया।"
अरबी खलिफा. नाव ऐकताच त्याचा चेहरा रागानं लालबुंद झाला होता. त्याच्या चेह-यावर राग धुमसत होता. त्याला मोहम्मदचं काय करावं काय नको असं वाटत होतं. त्यातच परीमालची लहान बहिण म्हणाली,
"माझी बहिण अगदी शंभर टक्के खरं बोलतेय."
खलिफा आगबबूला झाला. तसा त्यानं आपल्या सैन्याला आदेश दिला की मोहम्मदला चामड्याच्या पिशवीत बांधून बगदादला आणावं. मला त्याला जाब विचारायचा आहे की तुला यासाठीच हिंदूस्थानवर स्वारी करण्यासाठी पाठवलं होतं की काय? त्यानंतर त्याची शिक्षा मला मुकद्दर करायची आहे.
सैनिकांनी खलिफाचा आदेश ऐकला. तसे काही सैनिक हिंदूस्थानात दाखल झाले.. त्यांनी मोहम्मदला पकडलं. त्याची उत्तरं जाणून न घेता त्याला चामड्याच्या पिशवीत पकडलं आणि त्याला खलिफाच्या समोर दाखल करण्यासाठी ती सैन्य तुकडी बगदादला रवाना झाली.
******************************************

अरबी सैनिकांनी मोहम्मद बिन कासीमच्या नेतृत्वात देवल पाठोपाठ अलोरही जिंकला होता. त्यानं राजा दाहिरच्या मुलींना खलिफासाठी बगदादला रवाना केलं होतं. तशी ती सेना अलोर व देवलचा कब्जा झाल्यानंतर आगेकूच करत उत्तर हिंदूस्थानकडे रवाना होत होती. एवढ्यात ते सैनिकांचं दल हिंदूस्थानात दाखल झालं. ज्याठिकाणी मोहम्मद बिन कासीम स्थिरावला होता. त्यांनी खलिफाचा आदेश सांगीतला. तशी त्या सैनिकांनी आपली विजयाची पावले रोखली.
हजाज जो मोहम्मद बिन कासीमचा काका होता. त्यानं दिलेल्या आदेशानुसार मोहम्मदला अरबी सेनेनं कैद तर केलंच. शिवाय त्याला खलिफाकडे दाखल करण्यासाठी घेवून जात असतांना त्या चामड्याच्या पिशवीतच त्याचा गुदमरुन मृत्यू झाला.
सैनिक ते मोहम्मद बिन कासीमचं शव घेवून बगदादला पोहोचला होता. दरबार भरवला गेला. त्या दरबारात त्या दाहिरच्या दोन मुलीही जातीनं हजर होत्या. तसं हजाजनं ती घटना खलिफा दरबारी वर्णन करायला लावली. ती घटना त्या राजकुमारीही ऐकत होत्या. तेव्हा ती घटना सांगताना तो सैनिक....... त्या सैनिकानं आपले गुडघे जमीनीला टेकवले. डोकं खाली झुकवलं व म्हणाला,
"हुजूर, आम्ही मोहम्मदचे हातपाय बांधून त्याचं व्यवस्थीत तोंड बांधून त्याला चामड्यच्या पिशवीत तर कैद केलं. पण घात झाला जहापनाह, मोहम्मद बिन कासीमनं रस्त्यातच दम तोडला."
सैनिकांचं ते घटना बयाण करणं. त्यातच त्याला स्वतः जाब विचारणार असं म्हणणं. त्यातच त्याला जाब माहित न होता खलिफाच्या आदेशानुसार मोहम्मदचं गुदमरुन मरणं. ज्या खलिफाननं सोळा स्वा-या भारतावर केल्या. ज्यात नुकसान तर अपार झालं. पण यश आलंं नव्हतं. जे हिंदूस्थानचे राजे शौर्यवान होते. त्याच हिंदूस्थानवर मोहम्मद बिन कासीमनं आपल्या विजयाचा ध्वज लहरवला होता. तो मोहम्मद खलिफाच्या चुकीनं मरण पावला होता. त्याला भयंकर वाईट वाटलं. तसा तो चिडला. त्याला कदाचित त्याची चूक कळल्याचं वाटत होता. तसा तो राजकन्यांकडे रागाच्या भरात पाहू लागला व सत्य वदायचा आदेश दिला.
खलिफा आगबबूला होवून त्यानं सत्य वदण्याचा आदेश देताच सुर्य आणि परीमाल या राजा दाहिरच्या दोन्ही मुली म्हणाल्या,
"मुर्ख राजा, आम्ही आमच्या हिंदूस्थानात आणि जगात तुझ्यासारखा मुर्ख राजा आजवर बघितला नाही. ज्यानं आपल्या इच्छेसाठी आपल्या शत्रूवर विश्वास केला. हे विश्वासघातकी माणसा, तुझ्या या कासीमनं आमच्या बापाशी आणि आमच्या परीवाराशी जी दगाबाजी केली ना. आज आम्हीही तशीच दगाबाजी करुन त्याला ठार केलं आहे. आमचा बदला निघाला आहे. आता आम्हाला आमच्य मृत्यूचंही भय वाटत नाही."
ते ऐकताच खलिफा भयंकर चिडला. त्यानं राजकुमारी सुर्य व राजकुमारी परीमालच्या मृत्यूचा आदेश दिला. तसे अरबी सैनिक त्या दोन्ही राजकुमारींच्या दिशेनं सरसावले. तोच त्या राजकुमारींनी आपल्या कपड्यात लपविलेला खंजर काढला. तसा दोन्ही बहिणींनी एकमेकांच्या पोटात खोपला आणि मोठ्या आवाजात गरजल्या. सिंध की जय. हिंदू धर्म की जय. हिंदूस्थान की जय. आज आमचा बदला पूर्ण झाला."
तोच भयंकर आवाज. जीवाच्या आकांतानं त्या बहिणी जोरजोरात ओरडत होत्या. खलिफा तसेच इतर प्रजाजन दूरुनच ते दृश्य पाहात होते बारकाईनं. तो राजा, त्या राजाची ती दोन्ही लेकरं आज वतनासाठी शहीद होणार होती.
काही वेळातच त्या बहिणीनं एकमेकांचे हात हातात घेतले. श्वास भरुन येत होता. तसा त्यांना हिंदूस्थान आठवत होता. तशा त्या बेचैन होत होत्या. त्याचं कारणंही तसंच होतं. शेवटी त्या मरण पावल्या. पण अंतिम समयी त्यांचं ते शेवटचं वाक्य अजरामर करणारं ठरलं. ते म्हणजे 'काश! आम्ही या बगदादला न मरता आपल्या देशातच मरण पावलो असतो तर......'
राजकुमारी सुर्या व राजकुमारी परीवाल मरण पावल्या होत्या. थोडावेळ खलिफा ते दृश्य पाहातच राहिला. स्वप्नातही त्यानं विचार केला नसेल की हिंदूस्थानची जनता जणू असंही करु शकेल. ती पहिलीच आत्महत्या खलिफानं पाहिली असेल आपल्या जीवनात की जी त्याच्यासमक्ष घडली होती.
राजकुमारी सुर्या व राजकुमारी परीमाल मरण पावताच थोडा वेळ बगदाद दरबारी शुकशुकाट राहिला. थोड्या वेळात खलिफा त्या राजकुमारी जवळ गेला. त्यानं पाहिलं की त्या राजकुमारी हातात हात घालून रक्ताच्या थारोळ्यात शांत चित्तानं झोपलेल्या आहेत. अगदी प्रसन्न मुद्रेनं. डोळे उघडे ठेवून. जणू त्या डोळे उघडे ठेवून हिंदूस्थानच्या विजयाची वाट पाहात असल्यासारख्या.
खलिफा राजकुमारींच्या जवळ गेला. त्याचा राग मावळला होता. तो एकटक नजरेनं ते बगदादच्या जमीनीच्या कुशीत झोपलेले मृतदेह पाहात उभा होता. तोच काही वेळानं नकळतच त्यानं गुडघे टेकवले. तसा तो खाली बसला. त्यानं त्या दोन्ही राजकुमारींचे डोळे बंद केले व स्वगत म्हणाला,
"हरलो, मी खलिफा हरलो. ज्यानं साम, दाम, दंड भेद वापरुन सिंध जिंकला. तो बादशाहा या राजकुमारीचं बलिदान पाहून हरला." असे म्हणत खलिफा मौन बसला.
खलिफा मृतदेहाजवळ बसलेला होता. जणू त्या त्याच्याच पत्नी वा नातेसंबंंधातील होत्या. तसा तो बसलेला असतांना कुणाचीच हिंमत होत नव्हती त्या शवांना हात लावायची. तसा हजाज सैनिकांना म्हणाला,
"उचला ते मृतदेह आणि पूर्ण यथोचित संस्कार करुन त्यांचा दफनविधी उरकवा."
तसे मृतदेह उचलण्यात आले. पण ते उचलत असतांना खलिफा बोलला.
"थांबा, ह्या शवांचा दफनविधी हिंदू पद्धतीनंंच करा. त्यासाठी हिंदूस्थानची थोडीशी माती आणा. त्या मातीचा स्पर्श आमच्या भुमीलाही होवू द्या. त्या मातीत एवढी ताकद आहे की ती माती वीर जन्मास घालते. ह्या मृतदेहावर अत्यसंस्कार नक्की करा. पण अंत्यसंस्काराची तेव्हापर्यंत वाट पाहा. जेव्हापर्यंत हिंदूस्थानची मुठभर माती इथं आणली जात नाही. कदाचित आपण हे मृतदेह हिंदूस्थानला नेले असते. पण ते तसे नेणं शक्य नाही. म्हणून सांगतोय."
खलिफाच्या आदेशानुसार ताबडतोब काही सैनिकांचा दस्ता हिंदूस्थानला पाठविण्यात आला. तो दस्ता वायूवेगानं हिंदूस्थानला रवाना झाला. तो हिंदूस्थानला पोहोचला. त्या दस्त्यानं हिंदूस्थानची माती उचलली. ती बगदादला नेली. ती मुठभर माती जोपर्यंत बगदादला पोहोचत नाही. तोपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आला.
मुठभर माती......... ती माती बगदादला येताच त्या दोन्ही राजकुमारींवर अंतिमसंस्कार करण्यात आला. ती माती........ ती हिंदूस्थानची माती होती. ती माती पाहून कदाचित ते मृतात्म्येही संतुष्ट झाले असतील.

************************************************************************************************

घोर साम्राज्यवादी महत्वाकांक्षा. त्या महत्वाकांक्षेसाठीच खलिफानं मोहम्मद बिन कासीमला सिंधवर आक्रमण करायला लावलं. त्यांची इच्छा होती की हा हिंदुस्थानच नाही तर अख्खं जग इस्लाममय व्हावं. त्यामुळं की काय, खुनी संघर्ष किंवा सामुहीक लोकांना मारणे, त्यांच्यावर अत्याचार करणे या गोष्टी खलिफा करीत होता. तसं पाहता सुुरुवातीपासूनच जे ही खलिफा आले. त्यांनी साम्राज्यविस्तार व इस्लामीक प्रसाराला जास्त महत्व दिले. त्यांनी त्यासाठी तलवारीचा वापर केला. कोणी म्हणतात की इस्लीमीक लोकांनी आपल्या धर्माचा प्रसार तलवारीनं केला नाही. परंतू हे सत्य नाही.
पुर्वी जगात युनान, मिश्र व रोम यांची विकसीत संस्कृती होती. ती संस्कृती जगात पसरली होती. परंतू या तीनही संस्कृतीच्या पाऊलखुणा जळातून मिटविण्याचे काम जर कोणी केले तर ते इस्लामीक लोकांनीच. आज त्या संस्कृत्या आपल्याला दिसत नाहीत. त्या सभ्य संस्कृत्या होत्या असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. परंतू त्यानंतर ज्या इस्लामीक संस्कृती आल्या, त्या संस्कृत्यांमुळेच मतभिन्नता वाढली. तसेच असभ्यताही पसरली.
यहूदी संस्कृतीला तर इस्लाम स्विकार करा वा या देशातून चालते व्हा असा करार देवून इस्लीमीक संस्कृतीनं जबररदस्तीनं त्यांना मुस्लीम बनविण्याकडं जास्त महत्व दिलं. त्यामुळं पुष्कळशा लोकांनी इस्लाम कबूल केला. कारण जीवाचं भय. आपला जीव आपल्याला सर्वात जास्त प्रिय असतो. परंतू त्यातच बरेचसे लोक आपला धर्म वाचविण्यासाठी त्या इस्लामीक राज्यातून निघून गेले. त्यातील काही लोक हिंदूस्थानात आले. त्यातूनही इस्लामीक लोकांची धर्मप्रसाराची आग शांत झाली नाही. त्यांची नजर हिंदूस्थानवर पडली. कारण हिंदूस्थाननं त्यांना आसरा दिला होता. म्हणूनच की काय, मुस्लीमांनी सिंधवर आक्रमण केलंं.
सिंध प्रांत हा हिंदुस्थानच्या पश्चीम सीमेवर होता. त्यामुळं इराणवर ताबा मिळविल्यावर अरबांनी सरळ सिंधलाच आपलं लक्ष बनवलं होतं. ज्यावेळी सिंधवर आक्रमण झालंं, ते जल आणि स्थल या माध्यमातून झालं. त्यावेळी महाराजा ब्राम्हण चच आणि क्षत्रीय असलेली महाराणी सोहन्दी, त्यांचा मुलगा महाराजा दाहिरचं शासन होतं. महाराजा साहसी रायच्या मृत्यूनंतर त्यांची राणी सोहन्दीनं साहसी रायचा मंत्री चच राजा बनताच त्याच्याशी प्रजाजनांच्या सल्ल्याने विवाह केला होता.
ज्यावेळी देवलवर विश्वासघात करुन मोहम्मद बिन कासीमनं हमला केला, त्यावेळी राजकुमार जयशाह जंगलात पळाला, तो खुप जखमी झाला होता. त्यातच त्या अवस्थेत त्याचा अंत झाला. तसेच ज्या ज्ञानमत व मोक्षवासवनं मोहम्मद बिन कासीमला सिंधच्या राजगादीच्या बदल्यात मदत केली होती. सिंधवर ताबा मिळवताच त्या दोघांनाही कासीमनं तोफेच्या तोंडी उडवलं अर्थातच मारुन टाकलं. त्यानंतर ज्या बौद्ध धर्मीयांनी ज्ञानमतच्या बहकाव्यात येवून मोहम्मद बिन कासीमला मदत केली होती. त्या बौद्ध समाजाचाही सरेआम अंत करण्यात आला. ज्या तक्षशीला विद्यापीठाचं नाव जगात नावाजलं होतं. त्या तक्षशीला विद्यापीठाची तोडफोड करण्यात आली. तसेच बौद्ध धर्मीयांसाठीही कडक शासन लावण्यात आलं.
इस्लामीक देशाचा भौगोलिक अभ्यास केल्यास त्या देशांचा ज्या भागात विस्तार जास्त आहे. तो भाग म्हणजे मरुभुमी. ज्याला आपण वाळवंटही म्हणतो. ज्या ठिकाणी पाऊसही आपली कृपादृष्टी ठेवत नाही. त्यामुळं साहजीकच येथील लोकं हे पशूपालन व व्यापार करतात. ते जास्त प्रमाणात शेती करीत नाहीत.
या अरबांचा भारतीय लोकांशी गुप्ताच्या काळापासून संबंध आला. गुप्ताच्या काळापुर्वी भारतीय व्यापारी अरबच्याच रस्त्यानं रोमशी व्यापार करायचे. पण गुप्तकाळ आल्यानंतर अरबच्या व्यापा-यांनी रोमशी व्यापार करणे सुरु केले होते. त्यातच अरब व्यापारी हे आता भारतातील लोकांकडून माल खरेदी करायचे व रोमला विकायचे. तसेच रोमकडून वस्तू विकत घ्यायचे व भारताला विकायचे. महत्वाचं म्हणजे आता भारत आणि रोमच्या व्यापारात अरबी लोकंच महत्वाचे केंद्रबिंदू ठरले होते.
या अरबी व्यापारी लोकांनी मलबारच्या बेटात आपली वस्ती वसवली होती. कोणी म्हणतात की त्या काळात व्यापारामध्ये अरबी लोकंच सर्वश्रेष्ठ होते.
इसवी सनाच्या सातव्या शतकातच अरबात इस्लाम धर्माचा उदय झाला. इसवीसनाच्या सहाव्या शतकात मोहम्मदच्या मृत्यूनंतर मुस्लीममध्ये खलिफा पद सुरु झालं. त्यानंतर तीव्रतेनं इस्लाम धर्माचा प्रसार अरबांमध्ये झाला. इस्लामीक खलिफांनी इस्लाम धर्माच्या प्रसारासाठी आपले दूत देशविदेशात पाठविणे सुरु केले. ते अरब व्यापारी व्यापाराच्या सोबतच इस्लामचा प्रचारही करु लागले.

************************************************************************************************

सिंधवर मोहम्मद बिन कासीमचा अधिकार होण्यापुर्वी इसवी सन ६३६ मध्ये उमर बिन अल खतब यांच्याकडे खलिफा पद होतं. त्यानं समुद्री रस्त्यानं मुंबईच्या ठाणे बंदरावर आक्रमण केलं. परंतू त्याला यश आलं नाही. त्यातच इसवी सन ६४७ मध्ये अब्दुला बिन उमरच्या नेतृत्वात मकरानच्या रस्त्यानं सिंधवर आक्रमण झालं. तेही असफल राहिलं. त्यावेळी उस्मान बिन अफ्फान खलिफा होता. यात सिंधच्या पश्चिमी क्षेत्रातील काही भाग अरबांनी ताब्यात घेतला. परंतू त्या भागात रसद बरोबर पुरवली जात नसल्यानं अरबांना तो भाग नाईलाजानं सोडावा लागला. त्यानंतर इसवीसन ६५९ मध्ये अल हैरिसच्या नेतृत्वात पुन्हा आक्रमण झालं. याहीवेळी अरब यशस्वी झाले नाहीत. त्यावेळी अली बिन अबीतालिब हा खलिफा होता. इसवी सन ६६४ मध्ये उमय्यद वंशाजवळ खलिफा पद होतं. त्यावेळीही सिंधवर आक्रमण झालं. त्यातही अरब यशस्वी झालं नाही. त्यानंतर उबेदुल्लाहनं आपल्या नेतृत्वात सिंधवर आक्रमण केलं, परंतू यावेळीही ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर बर्दूलच्या नेतृत्वात आक्रमण झालं. पण त्यालाही पराभवच पत्करावा लागला.
हिंदूस्थानात अरबी लोकं भरपूर वेळा आक्रमण करीत होते. पण त्यांना अपयशच हाती येत होतं. ते आक्रमण करीत होते. त्याची इतरही आणखी काही कारणं होती.
१) हिंदूस्थान सोने की चिड़िया होती. हिदूस्थानात सोने चांदी जवाहरात विपूल प्रमाणात होते. त्यामुळं ते लुटण्याचा अरबांचा डाव होता.
२)अरबांची साम्राज्यविस्तारवादी नीती होती. त्यांना स्पेन, सिरीया, उत्तरी आफ्रीका व इराणला जिंकायचे होते. त्यातच आता खलिफा म्हणून जो उमय्यद वंश इराणमध्ये आला. त्याचा सेनापती मोहम्मद बिन कासीम होता. त्या कासीमनं दमिश्क सीरीयाला आपली राजधानी बनवली. हिंदूस्थानात आपली सत्ता स्थापन करण्यासाठी त्यालाच त्या खलिफानं पाठवलं होतं.
३)अरबांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. तसेच त्यांना इस्लामचा प्रचार आणि प्रसारही करायचा होता. त्यांनी सीरीया, स्पेन, इराण, इराक, आफ्रीकानंतर हिंदूस्थाननवर ताबा मिळविण्यासाठी सिंधवर आक्रमण करणं सुरु केलं होतं.
असं म्हटलं जातं की इसवी सन ७०८ मध्ये सिंघल द्विपवरचा एक अरब व्यापारी सिंघल द्विपात मारला गेला. ज्याचा परीवार सिंघल द्विपावर राहात होता. त्याचा सर्व माल सिंघलच्या राजानं आठ जहाजात भरुन तो इराणला पाठवला. परंतू तो माल रस्त्यात समुद्री डाकूंनी लुटला. त्यात संशयाची सुई दाहिरवर फिरवून इसवी सन ७११ मध्ये मोहम्मद बिन कासीमच्या नेतृत्वात हिंदूस्थानवर स्वारी केली गेली. त्यात हिंदूस्थानवर हुकूमत करणे हा एकमेव उद्देश होता.

************************************************************************************************

देवल किल्ल्यासह देवल शहरावर ताबा होताच मोहम्मद पुढे सरसावला होता. त्यातच देवल किल्ल्यावर मोहम्मदनं मध्यरात्री हमला करताच राजकुमार जयशाह आपला जीव वाचविण्यासाठी जंगलात पळून गेला. त्यावेळी तो जबर जखमी झाला होता. तो कसातरी लपतछपत अलोरला पोहोचला. त्यावेळी अलोरही मोहम्मद बिन कासीमच्या ताब्यात गेला होता. आता काय, त्याला निराशा आली होती. कारण राजा दाहिरचा मृत्यू झाल्यानंतर अलोरही मोहम्मद बिन कासीमच्या ताब्यात होता. काय करावे काय नाही असे सुचेनासे झाले होते. त्यातच राजा दाहिर आणि महाराणी लाडीच्या व पद्माच्या मृत्यूनंतर एकमात्र सिंधचा वंशज जयशाह उरला होता. त्याला वाटत होतं की कसेतरी अरबी सेनेला या भागातून हाकलून लावावे व राज्य हातात घ्यावे.
राजकुमार जयशाहनं अलोरचं राज्य हातात घेण्याचा विचार करताच त्यानं सामंतांची भेट घेतली. त्यातच त्या दोघांचा निर्णय झाला की ही अरबी सत्ता परकीय असून तिला उखडून फेकायचे. शेवटी राजकुमार जयशाहनं सामंतांच्या मदतीनं अलोर आणि ब्राम्हणाबादमध्ये आपली सत्ता स्थापन केली. त्यावेळी उमर इब्न अब्द अल-अजीज हा खलिफा होता. त्यावेळी उमरनं पुन्हा एक सेना सेनापती हबीबच्या नेतृत्वात सिंधला पाठवली. त्यातच हबीबनं मोहम्मद बिन कासीमसारखंच जयशाहला पराजीत करुन अलोर व छोटे छोटे प्रांत जिंकून घेतले. त्यातच राजा बनलेला राजकुमार जयशाहला बंदी बनवलं गेलं. त्याला खलिफासमक्ष पेश करण्यात आलं. त्यानंतर खलिफानं एकच प्रश्न केला की त्यानं इस्लाम स्विकार केल्यास त्याला स्वतंत्र्य स्वरुपात ब्राम्हणाबादला राज्य करता येईल. नाहीतर जीवंत समाधी दिली जाईल.
राजा जयशाहनं विचार केला. जर जीवंत राहायचं असेल तर खलिफाचं ऐकायला हवं. निदान ब्राम्हणाबाद तर मिळेल राज्य करायला. त्यातच अशीच ताकद खलिफाची राहिल कशावरुन? समजा खलिफाची ताकद ज्यावेळी ओसरेल. तेव्हा नक्कीच अरबांवर आक्रमण करता येईल. तोपर्यंत सामंतांनाही चूप बसवता येईल.
सामंत....... ज्यांच्या मदतीनं राजकुमार जयशाहनं सत्ता मिळवली. त्या सामंताला तो विसरला होता. त्यातच सामंतांशी त्याची भांडणं सुरु झाली. त्यातच सामंतांशी होणारे विवाद पाहून व आपला जीव वाचविण्यासाठी त्यानं अरबांशी हातमिळवणी केली.
राजा बनलेला जयशाह हा काही आपल्या वडीलासारखा पाहिजे तेवढा शूर नव्हता. त्यातच त्यानं पाहिलं होतं की त्याच्या वडीलाला धर्मस्विकृतीवरुन तडपवू तडपवू मारले होते. तसेच त्याच्या आई व बहिणींना सुद्धा धर्मासाठी बलिदान द्यावं लागलं होतं. म्हणूनच त्यानं इस्लाम कबूल केला.
राजा बनलेला जयशाह. इस्लाम त्यानं कबूल केला तर खरा....... परंतू इस्लाममध्ये वावरत असतांना त्याला आता बरं वाटत नव्हतं. त्याची लाज त्याला खात होती. त्याचा स्वार्थ त्याला जगू देत नव्हता. त्यातच त्याला आपण सामंतांशी धोका केला असंही वाटायला लागलं होतं. तसेच आपण आपल्या वडीलांसारखे, आई व बहिणींसारखे लढायला हवे होते असेही वाटत होते. आपले वडील त्या अरबांच्या चरणावर न झुकता तटस्थ राहून त्यांना शिकस्त दिली. तसेच राज्यातील माझी आई तसेच इतर लोकांनी तटस्थ राहून जौहार केला नव्हे तर आपल्या बहिणीही. तसा तो धैर्याच्या लढाईत पराभवी होत चालला होता. शेवटी त्यानं निर्णय घेतला. आपण इस्लाम सोडायचा. त्यानं इस्लाम सोडायचा निर्णय घेतला. तसा निर्णय त्यानं खलिफाला कळवला.
"जहापनाह, मी आपल्या म्हणण्यानुसार इस्लाम कबूल केला. पण मला इस्लामी बनून राहावंसं वाटत नाही. माझा जीव गुदमरतोय. त्यावर उपाय एकच. हा घेतलेला इस्लाम धर्म सोडणे. मी याचक्षणी इस्लाम धर्म सोडलेला असून आता माझा जीव गेला तरी चालेल. मला त्यात आनंद वाटेल. मला अभिमान आहे की माझ्या आईवडीलानं प्राण दिला. पण धर्म सोडलेला नाही. मलाही आता त्याच पावलावर पाऊल ठेवून चालायचे आहे. जहापनाह हेच सांगणं आहे अखेरचं. माझा हिंदू धर्म तुमच्या इस्लाम पेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे."
राजा जयशाह जे बोलायचं ते बोलून गेला. ते खलिफानं ऐकलं. तसा खलिफाचा चेहरा रागानं लालबुंद झाला. त्याला काय करावे व काय नको असेही वाटायला लागले होते. त्यावेळी हिशाम इब्न अब्द अल मलिक हा खलिफा होता. त्या खलिफानं ताबडतोब जुुुनैदसोबत काही सैन्य पाठवले. जुनैदनं जयशाहला कैद केलं. त्यातच त्याला खलिफासमोर उभं करण्यात आलं.
राजा जयशाहला जुनैदनं बंदी बनवून खलिफासमोर उभं करताच खलिफानं आदेश दिला की याला मृत्युदंड द्यावा. त्यानुसार सैनिकांनी राजा जयशाहची हत्या केली. त्यानंतर बाकीचे काही मंडळी उरली होती. जी खलिफाचं वर्चस्व स्विकारु पाहात नव्हती. त्यांचाही खलिफाच्या आदेशानंच बंदोबस्त लावला गेला.
सिंधमध्ये विजय मिळताच अरबी आक्रमणकर्त्यांनी मेवाड, मालवा तसेच अन्य प्रांतावरही युद्ध पुकारलं. त्यातच विजय मिळताच अधिकार मिळवला.
इसवीसनाच्या ७३० च्या जवळपास खलिफानंं नमुद केलेला सिंंधचा प्रांतपाल जुनैद याने मेवाड, गुजरात, सौराष्ट्र तसेच मालव्यावर युद्ध पुकारले. परंतू लवकरच गुर्जर प्रतिहार शासक नागभट्ट, चितोडचा शासक बप्पारावल तसेच चालुक्य शासक यांनी अरबी सेनेला शिकस्त देत तेथून हाकलून दिले. त्याचबरोबर जी नागभट्ट आणि बप्पारावल यांच्यासोबत जुनैदची लढाई झाली. त्या लढाईत सिंध राजस्थान सीमेवर जुनैदला ठार केलं गेलं व अरबी सेनेचा पराभव झाला.
जुनैदच्या मृत्यूनंतर अरब सेनेनं सिंधमधून काढता पाय