Shanta in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | शांता

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

शांता

SHANTA
शांता
प्रकाशक - अंकुश शिंगाडे
१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५
मुल्य - ६० ₹
प्रथमावृत्ती ०१/०१/२०२१
मुखपृष्ठ - कु. अनुष्का
शांतासारख्या शोषीतांना सादर समर्पीत

मनोगत
'शांता' ही कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. शांता हे पात्र मुळातच एक उपेक्षीत पात्र आहे.
मी ही कादंबरी साकार करण्यापुर्वी अख्खं रामायण अनेकवेळा पाहिलं. परंतू मी त्या रामायणाकडे मनोरंजन दृष्टिकोणातून पाहिलं. एका चिकित्सक दृष्टिकोणातून नाही. मलाही रामायण आवडतं ते केवळ एक बोधकथा म्हणून. ती बोधकथा साकारतांना मला अगदी आनंदही वाटला.
वाचकांना मी आधीच सांगून ठेवतो की ही कादंबरी एक काल्पनीक दृष्टीनं लिहिलेली असून यातील काही गोष्टी ह्या काल्पनीकच आहेत. त्याचा उगाच बाऊ करु नये. मुळात ही कादंबरी लिहिली नसती. परंतू आपल्या जीवनानश्यक असलेल्या पुर्वीच्या गोष्टी जगाला माहिती व्हाव्या यासाठी ही माझी शांता कादंबरी.
मुळात मी जेव्हा जेव्हा रामायण पाहिलं. तेव्हा तेव्हा मला शांता कुठेच दिसली नाही. त्यातही कुकबीदेखील. शांता आणि कुकबी ह्या दोघ्या बहिणी. त्या रामाच्या बहिणी होत्या. असं जेव्हा मला एका मित्रानं सांगीतलं. तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. मग मीही विचार केला की आपण शांताबद्दल लिहावं. जी जगाला माहित नाही.
शांता कादंबरी हातात घेतली व बरेच जणांना विचारलं की ही शांता कोण? परंतू कोणीही त्याबद्दल मला सांगीतलं नाही. उलट मीच जेव्हा त्यांना सांगीतलं की शांता ही रामाची बहिण होती. तेव्हा तर त्यांनी मला वेड्यातच काढलं असेल. कारण तिची लोकांना ओळख करुन देतांना मला अगदी तसंच वाटलं. शेवटी ती मंडळी मला वेडा ठरवो की न ठरवो. मी शांता लिहिली. ती वाचनीय झाली आहे.
दुसरं आणखी विशेष सांगतो, ते म्हणजे रामाची माहिती. रामायण त्यासाठीच मी अनेकवेळा पाहिलं. आपणही पाहिलं असेलच. त्यातच सांगतो की हे रामायण पाहात असतांना मला एक सत्य गोष्ट दिसली. ती म्हणजे रामाचा दोष.
आज रामाला सीतेच्या अग्नीपरीक्षेसाठी दोषी मानण्यात येतं. परंतू खरंच राम दोषी होता का? याचा कोणीही विचार करीत नाही. उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारचा संसार वागत असतो.
राम हा आदर्शवान व्यक्ती होता. तसेच त्या काळानुसार निर्णयक्षमही. तो प्रजेचं दुःख दूर करण्यासाठी प्रजेत फिरायचा. तसं फिरत असतांना तो वेषांतर करुन फिरायचा. त्यातच एकदा शरयू नदीतटावर त्यानं परीटाकडून आपल्या बद्दल अपशब्द ऐकले. वाटल्यास तो त्या परीटाला शिक्षा देवू शकत होता. परंतू रामानं तसं केलं नाही. तो आपल्या राजप्रासादात आला व शांत राहू लागला.
रामाची शांती सीतेनं पाहिली. तिला ती सहन झाली नाही. त्यातच तिनं चौकशी केली. परंतू राम काहीच बोलला नाही. काही बोलतही नव्हता. ते पाहून सीतेनं आपला एक दूत प्रजेत पाठवला. त्यातच सीतेनंही त्याच गोष्टी ऐकल्या. ज्या रामाबद्दल बोलल्या गेल्या होत्या.
सीतेनं ऐकलेल्या गोष्टी. सीतेला वाटलं की माझ्या पतीवर असं कोणी लांच्छन लावायला नको. मी जर इथे राजप्रासादात राहिली तर लोकं माझ्या रामावर असंच लांच्छन लावतील. म्हणून मला रामाला सोडून अरण्यात जायला हवं. त्यानंतर ती अरण्यात जायला तयार झाली. रामानं तिला नकारही दिला. परंतू सीतेनं ते ऐकलं नाही. त्यातच ती अरण्यात गेली.
रामायण इथंच थांबत नाही तर ती जेव्हा लवकुशला घेवून वनातून परत येते. तेव्हा राम तिला अग्नीपरीक्षेतून यायला सांगतो. अग्नीपरीक्षा अर्थात समाजासमोरची परीक्षा. जर तू मी जा म्हणलेले नसतांना केवळ लोकांच्या म्हणण्यानं घरातून बाहेर गेली. तेव्हा परत येतांनाही याच लोकांच्या म्हणण्यानुसार ये असा त्याचा अर्थ. सीतेनं ते स्विकार न करता स्वतः म्हटलं की मी पवित्र आहे. ती पवित्रच होती. कारण तिच्यावर कोणीही दाग लावू शकत नव्हता. परंतू रामाला माहित होतं की ती पवित्र असतांना ज्या रामानं तिला रावणाच्या कैदेतून परत अाणलं असतांना लोकांनी तिला गैर ठरवलं. तेच लोक आज सीतेला पुन्हा अयोध्येत घेतल्यानंतर आणखी काही बोलतील व सीता पुन्हा वनात जाईल. त्यापेक्षा सीतेनं परत येतांना आता जनतेला विचारुनच यावं. परंतू सीतेनं ते ऐकलं नाही. तिनं स्वतः पवित्र असल्याचा दाखला दिला. त्यातच ती म्हणाली,
"हे धरणी माता, राम, माझा पती, माझ्यावर शंका घेतो. तेव्हा मला आपल्या कुशीत सामावून घे."
ते ऐकतच धरणी माता बाहेर आली. तिनंही सत्य पडताळलं नाही व सीतेला घेवून ती जमीनीत गडप झाली. त्यातच तद्नंतरच्या पिढीनं रामावरच दोष लावला. सीतेवर नाही.
मी हाही भाग प्रकर्षानं मांडला. त्यावर शांतानं रामाला खडसावलं. त्यावर रामानं समर्पक उत्तर दिलं. ते मी सांगणार नाही. ते आपणास वाचावं लागेल.
शांता रामाची बहिण होती हे मीच सांगीतलं असून ती कशी जगली? तिचं पुढं काय झालं? तिचा विवाह कोणाशी झाला? अन् शेवटी तिचं काय झालं? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी शांता नक्की वाची एकदा तरी आणि या पुस्तकाचा मनमुराद आनंद घ्या एक वाचक म्हणून. दुसरं सांगायचं म्हणजे कृपया राजकारण करु नका म्हणजे झालं.
आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

शांता (कादंबरी)


माणसाचं जीवन दुःखानं भरलेलं आहे. तो एकटा या पृथ्वी वर आला आणि एकटाच जाणार आहे. त्यातच दुःख ही त्याला एकटच झेलावं लागतं. अशावेळी तो खचून जावू नये म्हणून त्याला गोतावळा दिला. तसंच पशूपक्षी वनस्पतीही शिकवतात जगण्याचं सुत्र. जगणं आनंददायी व्हावं म्हणून.
माणूस जन्माला येतो. त्यातच त्याचं पालनपोषण त्याचे मायबाप करीत असतात. अशावेळी तो जेव्हा थोडा मोठा होतो. तेव्हा त्यानं या जगात रमावं म्हणून त्याला मायबाप मिळतात. त्यानंतर मित्रपरीवारही. तो थोडासा मोठा झाला की त्याचा विरंगुळा व्हावा, म्हणून सृष्टी हळूहळू त्याचे सवंगडी वाढवीत असते. त्यातच या वयात त्याला गुरु मिळतात. शाळेतील मित्र मैत्रीणी मिळतात. तो आणखी थोडा मोठा होताच, त्याचा विवाह होतो, त्याचे मायबाप मोठे झालेले असतात. ते जास्त दिवस जगू शकणार नसतात. त्यामुळं त्याला त्याच्या मायबापानंतरही या सृष्टीत जगता यावं म्हणून त्याला एक जन्मभराची साथ निभाविणारी एक जोडीदारीणही सृष्टी मिळवून देत असते. तसेच तिलाही आणि त्यालाही कालांतरानं ही सृष्टी कंटाळवाणी वाटू नये, म्हणून त्या दोघांना मुलं होतात. मग मुलं होताच त्यांचं जीवन आनंददायी बनतं. पुढं मुलं मोठी होवून कर्तबगारी करीत असतांना त्यांना करमत नाही. म्हणून नातवंड होतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास जी सृष्टी आपल्याला जन्माला घालते. तीच सृष्टी आपण जगावं, आपल्याला ही सृष्टी कंटाळवाणी वाटू नये, म्हणून आपल्या विरंगुळ्याचं साधनही निर्माण करुन देते. आणखी सांगायचं झाल्यास हीच सृष्टी आपण जर कर्तबगारी असेल, तर आपल्याला काही जबाबदा-याही सोपवते. त्या जबाबदा-या पार पाडता पाडता आपल्याला वेळ मिळत नाही. त्यातच वेळ कसा जातो, तेही कळत नाही.
प्रत्येक व्यक्ती हा विनाकारण जन्माला येत नाही. त्याचं काही कर्तव्य ठरलेलं असतं.सृष्टी प्रत्येकाला त्याचं कर्तव्य सोपवून जन्माला घालत असते. तिचा उद्देशच असतो की अमुक अमुक व्यक्तीनं नवनिर्मीती करावी. मग ती नवनिर्मीती कोणत्याही पद्धतीची का असेना. त्याचं कार्य संपलं की तो या जगातून निरोप घेणारच घेणार. परंतू जन्म घेणारा व्यक्ती हा आपलं कर्तव्य विसरुन आपलं कर्म करीत असतो. त्याला सृष्टी ज्या उद्देशासाठी पाठवते. ते कार्य तो करीत नसून आपल्या ज्ञानाच्या व ताकदीच्या भरवशावर वाईट कर्म करीत असते. जे कर्म सृष्टीला आवडत नाहीत. त्यातच ही सृष्टी तसे वाईट कर्म दिसताच त्याची वाट पाहात शेवटी त्या वाईट कर्माची शिक्षा माणसांना देत असते.
मग आपले वाईट कर्म कोणते?असा विचार केल्यास जे कर्म सृष्टीला वाईट वाटतात ते वाईट कर्म. आता सृष्टीला वाईट कोणते कर्म वाटतात? जे सृष्टीला आवडत नाहीत. ते कर्म वाईट वाटतात. याचा अर्थ असा की सृष्टीला तिच्या विनाशाच्या गोष्टी आवडत नाहीत. तिच्या विनाशाच्या गोष्टी म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी? तिनं जन्माला घातलेल्या गोष्टीचा नाश करणे. जसे प्राणी हत्या करणे. वृक्षांची हत्या करणे, जमीनीची हत्या करणे.
जमीनीची हत्या! हा काय प्रकार आहे? अर्थात जमीन खोदणे. कोळसा, मँगनीज (खनिजे) मिळविण्यासाठी जमीनीचे पोट फाडणे. आता लोकं म्हणतील की जर आम्ही प्राणी मारुन खाल्ले नाही, तसेच झाडांना कापून खाल्लं नाहीतर जगणार कसे? हे म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण आपण तसं केलं नाही तर आपण जगूच शकणार नाही आणि म्हणूनच यामुळं दुःख येतं. जे दुःख कालांतरानं मरतेसमयी भोगावं लागतं. लोकं असा व्यक्ती मरण पावल्यावर त्याला कर्माची फळं भोगली असं म्हणत असतात. सृष्टी हीच जगण्याची सुत्र देत असते. आपल्या जीवनाला हे जीवन जगत असतांना ते जीवन नीरस वाटणार नाही याची काळजी ही सृष्टीच घेत असते. जर सृष्टीनं या गोष्टी आपल्याला दिल्या नसत्या तर आपण या सृष्टीत जास्त काळ काढता आला नसता. त्यामुळं सृष्टीच आपली नातेवाईक आहे नव्हे तर सृष्टीच आपली मायबाप आहे असे म्हणायला काहीही हरकत नाही.
ते दुष्काळाचे दिवस होते. शांताला माहित नव्हतं की तो दुष्काळ कोणामुळं आला. कारण ती निरागस होती. निरागसच्या पूर्ण कसोटीत ती बसत होती.
शांता राजा दशरथ यांची पहिली मुलगी होती. ती होताच राजा दशरथाला फार आनंद झाला.एवढा असीम आनंद की तो मनात मावेनासा. त्यातच पूर्ण राज्यही आनंदात होतं. तसं पाहता दिवसेंदिवस तो आनंद वाढत चालला होता. पण तो आनंद राजमहालातील होता. राज्य जरी आनंदात असलं तरी तो आनंद राज्यातील नव्हता.
भाऊबीज स्रीजातीला स्वतंत्र्य दर्जा मिळवून देवू शकते काय? असा जर विचार केल्यास त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण आजपर्यंत भाऊबीज झाल्या. बहिणीनं भावाला ओवाळलं. परंतू ना समाजप्रबोधन झालं. ना समाज पूर्ण रितीनं बदलला.
प्रत्येक वेळी भाऊबीज होते. प्रत्येक मुलीला आपल्या भावाला ओवाळतांना आनंद होतो. बहिण आपली मानसिकता सोडून भावाला ओवाळतेही. कदाचित भाऊ पुढील जन्माचा संकटात सोबती होईल यासाठी.
आजपर्यंत याच उद्देशानं ह्या भाऊबीजा साज-या झाल्यात. बहिणीनं भावाला ओवाळलं. त्याच्या लांब आयुष्याची प्रार्थना केली. परंतू भावानं तिच्या भावना ओळखून आजपर्यंतच्या आयुष्यात तिच्या मागण्या कधीच पुर्ण केल्या नाहीत. तिला स्वतंत्र्य दर्जा कधीच प्रदान केला नाही किंवा तिला राजसुख दिले नाही. त्यातच तिचे वेडेवाकडे पाऊल राज्याला घातक समजून तिचा पावलोपावली छळच केला. विवाहानंतरही तिला तिच्या पतीच्या शय्येवर सती जातांना कधी तिला रोखले नाही वा जाणूनबुजून तिला सासरचे लोकं सती देत होते, तेव्हाही त्याचा त्यानं विरोध केला नाही.
स्री जात........ स्री जातीला पुर्वीपासून हिनच मानलं गेलं. तिच्या उठण्याबसण्यावर फार कडक बंधन घातली गेली. तिच्या मनाला बांधील केलं गेलं. तिनं कोणत्याही संकटाच्या समयी कितीही धैर्य दाखवलं तरी तिची किंमत झाली नाही. त्यातच तिला अर्धांगीनी न मानता तिला दोष देत तिला उपेक्षीत जीवन जगायला भाग पाडलं गेलं.
राज्यातील महत्वाचे विषय. राज्यातील महत्वाचे प्रसंग. परंतू या महत्वाच्या प्रसंगावरही स्रीयांच्या नशीबी दुःखच होतं. कोणत्याही महत्वाच्या विषयावर स्रीया कितीही हुशार असल्या तरी त्यांचे निर्णय राजा विचारात घेत नसे नव्हे तर कोणत्याही कठीण प्रसंगात राजा स्रीयांना दुय्यम स्थानच द्यायचा.
युद्ध असो की अजून कोणती परीस्थीती. राजाला देव मानून प्रजा त्याच्या उलट्यासुलट्या गोष्टीवरही विश्वास ठेवत असे. त्यातच समजा कधी दुष्काळाची परीस्थीती आली तर त्या दुष्काळी परीस्थीतीसाठीही राजा स्रीयांनाच दोषी ठरवत असे.
स्वयंवराची पद्धत होती. परंतू या स्वयंवरात राजाचीच इच्छा चालत असे. स्वयंवरापुर्वी दूरदूरच्या राज्यात विवाहाचे (स्वयंवराचे) निमंत्रण पाठवले जाई. त्यातच त्या स्वयंवराला दुरदूरची मंडळी हजेरी लावत. जे हजेरी लावत. त्या राजाची आणि राज्याची माहिती राजा आपल्या सुमंताकरवी वा भाटाकरवी प्राप्त करीत असत. त्यातच ती माहिती प्राप्त होताच राजा आपल्या मुलींसोबत आपल्या चर्चा करीत असे आणि बजावून सांगत असे की तिनं कोणाच्या गळ्यात वरमाला घालावी वा कोण तिच्या लायक आहे. त्यानंतर स्वयंवर होत असे. स्वयंवरात पैजा लागत असत. त्यातच जो राजा या स्वयंवरात पैज जिंकला. त्याच्या गळ्यात ती राजकन्या वरमाला टाकून विवाह करीत असे.
विवाह करतांना स्वयंवरात राजानं बजावून सांगीतल्यामुळे विवाह तो राजा पैज जरी जिंकला असला तरी राजकन्या करीत नसत. उदाहरण द्यायचं झालं तर कर्णाचं देता येईल. कर्ण हा सुतपुत्र जरी नसला तरी त्याचा परीचय केवळ अधिरथाच्या घरी तो वाढत असल्यानं व त्याची कल्पना खुद्द द्रोपदीला असल्यानं तो जरी स्वयंवराची पैज जिंकला असला तरी त्याच्याशी स्वयंवर जिंकल्यावरही द्रोपदीनं विवाह केला नाही. त्याच्याशी विवाह वृषालीला करावा लागला. तसेच दुर्योधनानं स्वयंवराची पैज जिंकली असतांनाही भानुप्रियानं नकार दिला होता. परंतू दुर्योधनानं बलाचा वापर करुन जबरदस्तीनं तिच्याशी विवाह केला. त्यातच आपल्या प्रिय भावासाठी भिष्मानंही स्वयंवर जिंकला आणि इच्छा असतांनाही अंबा अंबिका अंंबालिकांना भिष्माशी विवाह करता आला नाही.
मुळात स्री इच्छा विवाहप्रसंगी चालत नव्हतीच. रुख्मीनीलाही विवाह करतांना पळून जावं लागलं. त्यातच विवाहयोग्य वर निवडतांना आपल्या भावाचा रोष पत्करावा लागला होता. त्यातच शुभद्रेला आपल्या भावाच्या मदतीनं पळून जावं लागलं.
संपत्तीचाही अधिकार स्रीयांना पुर्वीपासूनच नव्हता. तिनं कमावलेलं स्री धन हे तिचं न राहता ते पुरुषांचंच असायचं नव्हे तर तिच्या धनावर पुरुषांचाच हक्क असायचा. ती आपलं धन स्वतःवर पुरुषांच्या परवानगीशिवाय खर्च करु शकत नव्हती. हे स्रीधन मग तो पुरुष पिता असेल तर पित्याच्या स्वाधीन करीत असे. तो जर पती असेल तर पतीच्या आणि तो जर पुत्र असेल तर पुत्राच्या.
स्री जन्माबाबतही समाजात उदासीनता होती. जर स्रीयांनी स्री भ्रृणांना जन्म दिला तर दुषणे लावली जायची. त्यातच स्री भ्रृणांना निसर्गतः नष्ट करण्याचं कार्यही याच संस्कृतीनं पुर्वीपासून केलं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसेच हा भ्रृण जन्मास आलाच आणि पुढं राज्यावर कोणतं संकट आल्यास त्याला जबाबदार याच स्री भ्रृणालाच पकडल्या जात असे. त्या स्री भ्रृणाच्या जन्माचा काहीही दोष नसतांनाही. असा दोष दिसलाच तर त्या स्रीयांना मग त्या सख्ख्या मुली का असेना राजा त्यांना दुःख न बाळगता दुस-यांना दान म्हणून देवून टाकत असे वा ठार करुन टाकत असे. स्रीयांना बोलण्याचा पाहिजे त्या प्रमाणात अधिकार नव्हता.
स्रीयांना आपल्या परीवारात काम करतांनाही मनाईच होती. तिला पुरुषांच्याच मर्जीनं काम करावं लागत असे. तिच्या मर्जीनं कामं करायला मनाई होती. जर तिनं पुरुषांच्या मर्जीनं कामं केली नाहीत, तर तिला जबर शिक्षा होई. त्यातच तिचे अवयव कापण्याचीही शिक्षा होत असे. तिचा दोष पाहिजे त्या प्रमाणात नसतांनाही.
स्रीयांना पुरुष मृत्यूवेळीही सोडलेले नव्हते. समजा पुरुष असलेल्या तिच्या पतीचा मृत्यू झालाच तर तिलाही त्या पुरुषांसोबत सती देण्याची पद्धत होती. त्यातच तिची इच्छा असो वा नसो. अशा कितीतरी स्रीया काळानं पुरुष निधनानंतर हिरावल्या होत्या.
रजस्वला स्रीयांना मंदिरप्रवेश नव्हताच. समजा अशी स्री एखाद्या वेळी मंदिरात गेली आणि ते जर कोणाला माहित झाले तर त्या स्रीयांना फासावरच देण्याची पद्धती होती.
हा झाला पुर्वीचा काळ. आजही काळ बदलला नाही. काळ बदलू पाहात आहे. परंतू आजचीही पुर्वीची मानसिकता त्या काळाला बदलू देत नाही. आजही स्रीयांना त्या रजस्वला असतांना स्रीयांना मंदिरात जाता येत नाही. आजही स्री जन्माचा विटाळच मानला जातो. आजही स्रीयांच्या भ्रृणांना नष्ट केलं जातं. आजही स्रीयांचे विवाह पुरुष मर्जीनंच होतात. अन् आजही स्रीयांच्या संपत्तीवर पुरुषच हक्क गाजवतात. तिला तिचंच वेतन खर्च करता येत नाही स्वतःवर. मात्र एक बदल झाला, तो म्हणजे सतीप्रथेचा. आज सतीप्रथा अस्तित्वात नाही. परंतू ती प्रथा जरी आज अस्तित्वात नसली तरी आज पतीनिधनानंतर स्रीयांचं सौंदर्य नष्ट केलं जातं. भांगावरचं कुंकू पुसलं जातं. बांगड्या फोडल्या जातात. एवढंच नाही तर जोडवे काढल्या जातात. त्यातच आज पांढ-या साड्यांची पद्धत नसली तरी पतीनिधनानंतर तिचं सारं सौंदर्य हिरावलं जातं. ओष्ठरंग, नेलपालिश सारं नष्ट केलं जातं. ती आजही पतीनिधनानंतर काजळ, पावडर लावू शकत नाही. काजळ पावडर लावून समाजात मिरवू शकत नाही.
आज चौफेर निरीक्षण केलं आणि सर्वेक्षण केलं तर स्रीया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. तरीही सर्वेक्षणातून मुलींचीच जनन संख्या कमी असलेली दिसते. मुली का कमी झाल्या असा जर विचार केला तर ती संख्या स्री भ्रृणहत्येनं कमी झालेली आहे असं कोणीही म्हणेल. आज देशातील राज्याचे काही भाग सर्रासपणे स्री भ्रृणहत्येचे पापच करीत असलेले दिसतात.
मुळात सांगायचं झाल्यास हे स्री भ्रृणहत्येचे पाप का घडतं. स्रीयांबाबत हा हिन दृष्टिकोण अजूनही समाजात का आहे? आजही स्रीयांना आपल्या पसंतीचा जोडीदार का निवडता येत नाही? आजही अशा आंतरजातीय किंवा प्रेमविवाह करणा-या प्रेमीयुगलांचा विवाह समाज का स्विकारत नाही अन् असे विवाह समाज का मान्य करीत नाही? तसेच आजही रजस्व स्रीयांना मंदिर प्रवेश का नाही? ह्या सर्व बाबी विचार करायला लावणा-या अाहेत.
आजही स्री जन्माबाबत उदासीनताच आहे नव्हे तर उदासीनताच दिसून येते. समजा पहिल्या वेळी मुलाचा जन्म झाला तर वाढत्या लोकसंख्येनुसार नसबंदी करुन संख्यावाढीवर नियंत्रण आणलं जातं. परंतू जर पहिले अपत्य मुलगी जर असेल तर नसबंदी केली जात नाही. दुसरं मुल होईपर्यंत वाट पाहिली जाते. दुसरं अपत्य जर मुलगीच झाली तर वाढती महागाई व लोकसंख्यावाढ लक्षात घेता मनात इच्छा नसतांना नसबंदी केली जाते. हीच मानसिकता आज समाजाची होवून बसलेली आहे. मुलगी प्रगतीचा आधार नाही तर मुलगाच प्रगतीचा आधार आहे.मुलगी वंशवेल वाढवीत नाही तर मुलगाच वंशवेल वाढवतो हीच समाजाची मानसिकता....... पण बाबांनो, मुलगीच जर एखाद्या मुलाला पत्नी म्हणून मिळाली नाही तर वंशवेल तरी वाढेल का? याचं उत्तर नाही असंच आहे.
आज पुरुषी मानसिकता बदलविण्याची गरज आहे. ती बदलणार कशी? त्या मानसिकतेला कायदेही बदलवू शकत नाहीत. समाजप्रबोधनही बदलवू शकत नाही. मग ती बदलणार कशी? हा एक यक्षप्रश्न आजही विचारवंतांपुढं उभा आहे. आज हीच मानसिकता बदलायला हवी. तेव्हाच स्री जातीचा उद्धार होईल. पुरुषांना जसा जीवन जगण्याचा अधिकार आहे. तसाच अधिकार हा स्रीजातीलाही आहे. हा विचार पुरुष जातीनं आज अंगीकारण्याची गरज आहे. जेव्हा संपूर्ण पुरुषजात प्रत्येक पुरुषांसह तो विचार अंगीकारेल, तेव्हाच समाज सुधारेल. षुरुष मानसिकताही बदलेल व स्रीयांचा दर्जा सुधारेल. मग प्रत्येक स्रीजातीला ती स्वतः स्वतंत्र्य असल्याचा अनुभव येईल नव्हे तर तिला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वाटेल.
आज ज्याप्रमाणं प्रत्येक पुरुषाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तशीच गरज आहे प्रत्येक पुरुष असलेल्या भावाची मानसिकता बदलणं. आज अशा प्रत्येक भावाची मानसिकता प्रत्येक स्री असलेल्या बहिणीबाबत बदलल्यास नव्हे तर प्रत्येक स्रीजातीबाबत बदलल्यास समाज परिवर्तन होवू शकते. स्रीबाबत विचार करण्याचा दृष्टिकोण बदलेल. स्रीयांनाही पुरुषांच्या बरोबरीचे समान हक्क मिळतील व हे जेव्हा घडेल, तेव्हाच ती खरी बहिणीला ओवाळणी असेल यात दुमत नाही.
स्रीजातीला त्या काळात स्वतंत्रता नव्हतीच. तसं पाहता शांता जन्माचा उत्सव राजा दशरथानं साजरा केला. परंतू आज तिच्या जन्मानंतर राज्यात सतत तीन चार वर्ष दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचं खापर शांतावर फोडण्यात आलं. त्यातच राजज्योतीषानं सांगीतल्याप्रमाणं शांताला वाळीत टाकण्यात आलं. राजा दशरथ हा शांताचा बाप असूनदेखील त्यानं राजज्योतीषाच्या सल्ल्यानं आपल्या लाडक्या व एकुलत्या एक कन्येस वाळीत टाकतांना तमा बाळगली नाही.
****************************************

काकुत्स्थ हा भगीरथचा पुत्र होता. त्याचा पुत्र रघू होता. हा रघू अत्यंत तेजस्वी व न्यायप्रवण राजा होता. पुढं याच रघूच्या नावानं इक्ष्वाकू कुळ हे रघुकुळ या नावानं प्रसिद्ध झाले. याच रघुचा पुत्र अज. हा कोसला नगरीचा राजा होता. अयोध्या ही त्याची राजधानी होती.
इंदूमती ही विदर्भाची राजकन्या होती. राजा भोळ हा विदर्भाचा राजा होता. त्याची धाकटी बहिण होती इंदूमती. तिचा विवाह अजशी झाला होता.
ही इंदूमती पुर्वजन्मात एक अप्सरा होती. (तसं आज वर्तमानात जगतांना पुर्वजन्मावर विश्वास ठेवणे कठीण आहे. परंतू काही चमत्कार आजही असे ऐकायला मिळतात की जन्माला आलेली मुले काही महत्वाची माणसं मेलेली असतांना त्यांचा इतिहास सांगतात. अगदी तोच धागा पकडून हा सारांश) तिचे नाव हरिणी होतं.
तृणबिंदू.........हा असा व्यक्ती की तो तपस्वी होता. त्यातच या मुनीच्या तपश्चर्येनं भयभीत होत इंद्रानं त्याची तपश्चर्या मोडण्यासाठी हरिणी नावाच्या आपल्या अप्सरेला पृथ्वी वर पाठवलं. त्यातच तिनं आपल्या बुद्धीकौशल्यानं व मनमोहक इशारे करुन या तृणबिंदू ऋषीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणला. त्यामुळं संतप्त झालेल्या तृणबिंदूनं तिला शाप दिला की तू पृथ्वीवर एका नश्वर स्री रुपात जन्म घेशील. तसेच पृथ्वी वरील स्वर्गीय फुलाचे दर्शन होईपर्यंत तिथंच राहशील असेही सांगीतले.
त्या ऋषीच्या शापवाणीनुसार इंदूमतीनं विदर्भात जन्म घेतला. पुढे ती तरुण होताच तिचा स्वयंवर ठरला. त्यातच त्या स्वयंवरात तिनं राजा अजचा पती म्हणून स्विकार केला.
राजा अज व इंदूमती कोसला राज्यातील अयोध्या नगरीत राहू लागले. या दांम्पत्यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव नेमी ठेवण्यात आलं.
नेमी हा लहानपणापासूनच उनाड स्वभावाचा होता. तो आठ वर्षाचा असतांना एकदा नारदमुनीची माला इंदूमतीच्या हाताला गवसली. त्यातच नारद हे स्वर्गात वास्तव्य करणारे होते. त्यातच ऋषी तृणबिंदूचा शाप होता की स्वर्गातील फुलाचा स्पर्श होताच तू स्वर्गात जाशील. त्याच कारणानं त्या नारदमुनीच्या स्वर्गमालेचा स्पर्श होताच इंदूमती स्वर्गात गेली अर्थात मरण पावली. त्यानंतर राजा अज एकटा वावरु लागला.
महाराणी इंदूमती मरण पावताच राजा अजला करमत नव्हतं. तो राजप्रासाद भव्यदिव्य जरी असला तरी तो राजप्रासाद त्याला खायला धावत होता. त्यातच त्याचं मन कशातही लागत नव्हतं. त्याला अन्न धकत नव्हतं. पाणी पिणंही जड जात होतं. तसा तो सुकत चालला होता. त्याची कांती सुकत चालली होती. तसं घडण्याचं कारण म्हणजे त्याचं पत्नीप्रेम. तो एकपत्नीवादी होता. तसं पाहता त्यावेळच्या राजांना अनेक पत्नी करण्याची मुभा होती. परंतू अजनं तसं केलं नाही. त्यातच हा पत्नीविरह सहन न झाल्यानं राजा अजनं आत्महत्या केली.
राजा अजनं आत्महत्या करताच अयोध्या नगरीवर अस्मानी संकट कोसळलं. राज्य होतं, पण राजा नव्हता. राज्य हे राजा असल्याशिवाय चालत नाही. त्यामुळं राज्याला राजा हवा. कारण राजाला त्या काळात परमेश्वरच मानलं जात असे. या सर्व गोष्टीचा विचार करुन अयोध्यावासीयांनी नेमीला राजा बनविण्याचे ठरवले. त्यावेळी त्याचं वय अगदी आठ वर्ष.
नेमी हा लहान वयातच कोसला राजधानीचा राजा बनला. लहानपणच्या उनाड स्वभावाचा त्याला फायदाही झाला. त्यातच त्याचं वय हळूहळू वाढत गेलं व तो मोठा होताच फार पराक्रमी व शूर बनला. त्यातच मोठे होताच त्यानं दिग्विजय आरंभ केला. तसं पाहता त्यावेळच्या शूर राजांना दिग्विजयाचे स्वप्नच पडायचे. ते स्वप्न साकार करण्यासाठी ते आपला एक अश्व सोडत. जो कोणी त्यांचं मांडलिकपण स्विकारणार नाही, त्या राजांशी लढाई करुन त्याला हारवल्या जात असे.
राजा नेमीचे विश्वविजयाचे धोरण. त्यातच त्यानं आपल्या दिग्विजयासाठी आपला रथ चारही दिशेत फिरवला नव्हे तर दिग्विजय प्राप्त केला. त्यामुळं त्याला पुढं नाव मिळालं दशरथ. दशरथ म्हणजे ज्याचा रथ दाही दिशात फिरला असा तो. त्यावेळी त्याचा विवाह झाला नव्हता.
दशरथाचा विवाह झालेला नसतांना एके दिवशी तो शिकारीसाठी जंगलात गेला. त्यातच तो नदीजवळ दबदबा धरुन बसला. कारण नदीवर पाणी पिण्यासाठी प्राणी येतात हे त्याला माहित होते. तसं पाहता त्यावेळच्या राजांना शिकार करण्याची भारी हौस असायची.
ते उन्हाळ्याचे दिवस होते. तेव्हा पाणी प्यायला जंगली प्राणी येतीलच असं दशरथाला वाटलं व तो दबा धरुन अगदी पाण्याच्या जवळ आडोशाला बसला.
राजा दशरथ नदीजवळ हिंस्र श्वापदाच्या शोधार्थ दबा धरुन बसलेला असतांना त्यातच त्यावेळी भक्त श्रवण मायबापांना घेवून काशीला जाणारा याच ठिकाणी एका झाडाखाली थांबला. त्याचे मायबाप आंधळे होते. तो मायबापाची खुप सेवा करीत असे. त्यातच मायबापांनी इच्छा व्यक्त केली की त्यांना अंतिम समयी काशी विश्वेश्वराचं दर्शन करायचं आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या पुत्रानं काशीची यात्रा घडवावी.
आपल्या मायबापाच्या इच्छेखातर पितृ मातृ भक्त श्रवणकुमारनं त्यांना काशीचं दर्शन घडवून आणण्यासाठी कावड घेवून तो काशीला निघाला. त्यातच त्याच्या मायबापानं पाणी प्यायची इच्छा व्यक्त केली. तसं त्यानं एका गर्द सावलीच्या झाडात मायबापाला ठेवून त्यांना पाणी पाजण्यासाठी तो पाणी आणण्यासाठी नदीवर आला. त्यातच तो नदीतून पाणी काढू लागला. तोच बुडबुड्याचा आवाज ऐकून कोणीतरी जनावर पाणी पिण्यासाठी आलेला आहे असं समजून राजा दशरथानं त्या प्राण्याच्या दिशेनं बाण सोडला.
तो शब्दभेदी बाण. तो श्रवणकुमारच्या छातीत शिरला व तोच मेलो मेलो असा मनुष्यवाणीचा आवाज आला. त्यातच राजा दशरथ त्या ठिकाणी गेले असता त्यांनी पाहिलं की श्रवणकुमारच्या छातीत बाण शिरला आहे. तो विव्हळत आहे.
राजा दशरथाने त्याला उचलले. त्याचा बाण काढू पाहिले. परंतू भक्त श्रवणकुमार म्हणाला,
"राजन, बाण काढून तू उगाच वेळ वाया घालवू नकोस. तू माझं एक काम कर. या जंगलच्या दाट झाडीत माझे मायबाप आहेत. त्यांना तहान लागली आहे. तेव्हा माझी तमा न बाळगता त्यांना पाणी नेवून पाज व त्यांची अंतिम इच्छा काशी दर्शनाची आहे. ती तू पूर्ण कर."
राजा दशरथानं होकार दिला व तो ते पाणी त्या श्रवणकुमारच्या मायबापांना पाजण्यासाठी घेवून गेला. परंतू त्यांनी ते पाणी न पिता शाप दिला की जसे आम्ही आज पुत्र वियोगानं मरत आहोत. तसाच एक दिवस तुही पुत्र वियोगानं मरशील. तुझा एकही पुत्र तुझ्याजवळ असणार नाही. त्यानंतर त्यांनी ते पाणी न पिता पुत्रवियोगानं तिथंच प्राण सोडला.
राजा दशरथ त्या शापवाणीनं विव्हळत होता. त्याचं प्रजेच्या कामात लक्ष लागत नव्हतं. त्यातच त्यानं आता विवाह करण्याचं ठरवलं. त्यातच त्याचा विवाह महाराणी कौशल्याशी झाला. त्यातच त्यांना पहिली पुत्री झाली. तीच पुत्री शांता होय.
राजा रोमपद व राजा दशरथ हे दोघेही साळभाऊ होते. त्याची राणी वर्षीनी व महाराणी कौशल्या या सख्ख्या बहिणी होत्या. राजा रोमपदाचा विवाह हा राजा दशरथाच्या विवाहापुर्वीच झाला.
रोमपद........रोमपद हा यादव राजा धर्मरथ यांचा पुत्र होता. तसं पाहता रोमपद हा दशरथाचा परममित्र होता. त्यांच्या विवाहाला बरेच वर्ष झाले होते. परंतू अजूनही त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती.

****************************************
राज्यात दुष्काळ पडला होता. आज पाच वर्ष झाले होते. पाचही वर्ष सतत दुष्काळ होता. त्यातच राजज्योतीषांना कारण विचारताच त्यांनी कारण सांगीतलं की ह्या दुष्काळाचं कारण ही शांताच आहे. हिला नष्ट करा नाहीतर कोणाला दान देवून टाका.
शांता राजा दशरथाची एकुलती एक मुलगी. आज ती पाच वर्षाची झाली होती. तिच्या मनात कशाचंही दुःख नव्हतं. तिला वाटतही नव्हतं की आपलं पुढे काय होणार. ती अबोध होती. त्यातच राजज्योतीषांनी सांगीतल्यानुसार राज्यात जरी इतर ठिकाणी शांतेसारखी बाळं जरी जन्मास आली असली तरी त्या सततच्या पाच वर्षाच्या दुष्काळाला जबाबदार शांतेलाच ठरवण्यात आलं. त्यातच राजा दशरथाच्या मनात शांतेबाबत असुया निर्माण झाली. तो तिच्याकडे अगदी शत्रूसारखा पाहू लागला. ती निरागस बाळबोध असतांना. अशातच अयोध्येत राजा रोमपद व वर्षीनीचं आगमण झालं.
राजा रोमपद अयोध्येत काही दिवस राहिला. त्यानं राजा दशरथाचे हालहवास विचारले. राजा दशरथानेही राजा रोमपदाचे हालहवाल विचारले. त्यातच रोमपदनं आपल्या राज्यातील सुसंपन्नता वर्णीत केली व एक दुःख ही व्यक्त केलं. ते म्हणजे पुत्रजन्माचं. सांगीतलं की राज्यात सर्वकाही आहे. परंतू एक पुत्र जर राज्याला वारस म्हणून लाभला असता तर अगदी बरं झालं असतं.
राजा रोमपद पुत्रविरहानं तळपत होता. ते राजा दशरथानं पाहावलं जात नव्हतं. त्यातच राजा दशरथालाही एक मुलगी होती. जी त्याला जड वाटत होती.
एकतर इक्ष्क्वासू राजे. कन्याजन्माला निषीद्ध मानणारे. त्यातच सततचा पाच वर्षाचा दुष्काळ. त्यातच राजज्योतीषाची भाकीत. शेवटी या सर्व बाबीचा विचार राजा दशरथ रोमपदला म्हणाला,
"माझी पुत्री आपणास मी दत्तक म्हणून देवू इच्छितो. तिचा स्विकार कराल काय?"
दशरथाने बोललेले शब्द राजा रोमपदानं ऐकले. त्याचबरोबर राणी वर्षीनी अन् तेच शब्द कौशल्यानंही. तसा महाराणी कौशल्याच्या मनाचा थरकाप उडाला. तिला वाटलं की आपलं कोणी काळीज तोडून नेत आहेत की काय? पण ती पुरुसत्ताक पुरुषांची मक्तेदारी असल्यानं बोलू शकली नाही. मनातल्या मनात विव्हळत राहिली. सख्खी बहिण का असेना, तिला तसं करणं जड जात होतं. शेवटी ती आपल्या पतीपुढं चूप बसली. मनात दत्तक देण्याची इच्छा नसतांनाही.
राजा दशरथानं शांतेबद्दल वार्तालाप करताच राजा रोमपद अत्यंत आनंदीत झाला. त्याचा आनंद गगणात मावेनासा होता. पण मनात एक दुःख होतं की आपली एकुलती एक मुलगी दिल्यानंतर राजा दशरथाचं कसं होणार.
राजा दशरथाला त्या गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं. त्यातच त्याच्या मधात कौशल्याही बोलायला तयार नव्हती. त्यातच राजा दशरथानं दत्तकविधी करुन त्याचा मानसन्मान केला व आपली पुत्री राजा रोमपदाला दान दिली.
राजा रोमपदनं व वर्षीनीनं शांताला आपल्या सोबत नेलं व तिला आपल्या घरी नेवून तिचं चांगलं पालनपोषण केलं. त्यातच शांता हळूहळू मोठी होवू लागली.
शांताचा जन्म होणं त्यातच राज्यात दुष्काळ पडणं ह्या गोष्टी काही तारतम्य जोडणा-या नव्हत्या. तरीही अयोध्येत दुष्काळ पडला होता. त्यातच तिला दत्तक दिल्यानंतरही रोमप्रदेशाातही दुष्काळ सुरु झाला. अंगदेश दुष्काळानं ग्रासला होता. त्यातच अशा दुष्काळात अंगदेशातील राजा रोमपद विचारात पडला. परंतू त्यानं त्याचा दोष शांतावर लावला नाही. तो चूप बसला नव्हे तर त्याची शिकायतही त्यानं राजज्योतीषाला केली नाही नव्हे तर त्यानं त्या दुष्काळावर आपल्या राज्यातील राजज्योतीषाला मार्ग विचारला. त्यातच राजज्योतीषानं मार्ग सांगीतला की या अंगदेशात ऋष्यशृंग ऋषींना आणून त्यांच्याकडून पुजाविधी करवून घ्यावा. जेणेकरुन राज्यातील दुष्काळ पूर्णतः बरा होईल.

****************************************

विभाण्डक.....ऋषी कश्यप यांचा पुत्र होता. त्याचा विवाह स्वर्गअप्सरा उर्वशीशी झाला होता. त्याचं कारण ही तसंच होतं.
विभाण्डक हे तपशचर्या करीत होते. ते तप एवढंं कठोर होतं की त्या तपानं सर्व देवतागण भयभीत झाले. त्यातच त्या तपानं इंद्रही भयभीत झाला. जो देवांचा राजा होता. त्यामुळं इंद्रानं त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्ग अप्सरा उर्वशीला पाठवलं. उर्वशी आली व ती विभाण्डकासमक्ष नृत्य करु लागली. तिचं मनोहर नृत्य पाहून विभाण्डक मोहित झाला. त्यातच त्याची तपश्चर्या भंग झाली. तद्नंतर विभाण्डकानं उर्वशीशी विवाह केला.
विवाह होताच उर्वशीच्या पोटी ऋष्यशृंगानं जन्म घेतला. त्यातच काही दिवसानं उर्वशी स्वर्गात परतली. तिनं आपल्या मुलाला व पतीलाही सोडले होते. त्याच घटनेनं विभाण्डक दुःखी झाला. तो एवढा दुःखी झाला की त्यानं जेवनखावण सोडलं. त्याला अन्न गोड वाटत नव्हतं.
विभाण्डक पुत्र ऋष्यशृंगाचं पालननपोषण करीत होता. त्यातच त्याला उर्वशीचा भयंकर राग आला होता. त्याला उर्वशीचा एवढा राग आला होता की त्यानं ती गेल्यानंतर स्री जातीशी अजिबात संपर्क ठेवायचा नाही असे ठरवले होते. त्यातच अशा संपर्कात आपला पुत्र येवू नये म्हणून त्यानं नगर सोडलं व तो अंगप्रदेशाच्या जवळ असलेल्या वनात जावून राहू लागला.
ऋष्यशृंगाला मस्तकावर एक फुगीर उंचवटा होता. तो उंचवटा शिंगासारखाच वाटायचा. त्यामुळं त्याला शिंग आहे असं मानलं जायचं.
ते घनदाट जंगल. त्या जंगलात अगदी हिंस्र श्वापद मुक्तपणे फिरत असत. यातच ते हिंस्र श्वापद कोणाचा केव्हा जीव घेतील याचा काही नेम नव्हता. ते हिंस्र श्वापद. त्यांचं जरी नाव काढलं तरी मनात धडकी भरत असे.
रात्रीला वाघ सिंहाच्या डरकाळीनं रात्रीची सुरुवात व्हायची. त्यातच कोल्हेही आपल्या आवाजानं रात्रीची शांतता भंग करायचे.
ऋष्यशृंग जंगलात राहात होता. त्या जंगलाच्या सावलीत वावरतांना त्याला अतिशय आनंद वाटत होता. जे ज्ञान गुरुजनांकडून शिकता येत होतं, ते ज्ञान तो जंगलातील प्राणीमात्रा आणि वृक्ष व दगडांकडून शिकत होती. वृक्षाएवढा कोणी धर्मात्मा नाही हे त्याला कळून चुकलं होतं.
झाडं हे सुर्यप्रकाश शोषून घेवून अन्ननिर्मीती करीत असतात. ते त्याला कळत होतं. त्यातच सृष्टीच्या नियमानुसार झाडांची पानं गळतात, फुलं कोमेजतात. पण ती पुन्हा निर्माण होतात हेही तो शिकत होता.आभाळ, पृथ्वी, पर्वत, मैदान आणि मैदानावरील हिरवळ पाहून मनाला तरंग निर्माण होत होते.
त्याला वाटत असे की आभाळ, जमीन, पर्वत,मैदान तसेच पाणी ही सर्व सृष्टीची लेकरं असून ती त्याला जीवन कसं जगायचं ते शिकवीत असत.
शिशीर संपताच वसंतात वृक्षावर बहार आलेली असायची.जी झाडं शिशीरात पानं गळून पर्णहीन झालेली असायची. त्या झाडावर टवटवीत पानं आलेली असायची. त्यातच पळस याच काळात लाल रंगाचा शालू नेसून मिरवीत राहायचा.
पळस हा वृक्ष राणी असल्यागत सजून जायचा याच काळात. त्यातच या झाडावरील फुलांमधून मकरंद प्राप्त करुन पळसमैना दूरदुरुन यायचे. त्यातच कडूनिंबही डेरेदार असायचा.
कडूनिंब हा प्रकृतीचा सहाय्यक असतो असं पुरेपूर ज्ञान असलेला विभाण्डक जंगलामध्ये असतांना त्यानं आपल्या कुटीसमोर हीच झाडं जास्त प्रमाणात लावली होती नव्हे तर त्याच झाडाच्या सानिध्यात तो वावरत होता. तो आपल्या मुलांनाही त्याच्याच सानिध्यात ठेवलं होतं.
मोहाची झाडं मात्र रात्रीच बहरतात हे त्याला माहित होतं. त्यातच ही मोहफुलं खावून विभाण्डक आपलं पोट भरत असे.
पक्ष्यांच्या जगात जातांना विभाण्डकाला आनंद वाटत होता. वेगवेगळे पक्षी त्याला दिसायचे. या पक्ष्यावरुन दानी वृत्ती विभाण्डकाने आपल्या मुलाला शिकवले होते.
पक्षी हे आपल्या पंखानं उडत असतात हे ऋष्यशृंग पक्षी निरीक्षणातून शिकला होता. ते जेव्हा उडत, तेव्हा त्याच्या शरीराचा आकार हा नौकाकार होतो हेही तो शिकला होता. त्यातच पक्षी हजारो मैल उंच आकाशातून उडत असतात हेही तो जाणून होता.
पक्षांना दात नसतात हेही तो जाणून होता. त्यातच ते फक्त दाणे टिपतात हेही त्याला कळलं होतं.
ऋष्यशृंगला जशी झाडाबद्दल माहिती झाली होती. कोणती झाडं कोणत्या कामात येतात हे विभाण्डकानं त्याला शिकवलं होतं. त्याचा पिता असलेला विभाण्डकच त्याची माताही ठरत होता नव्हे तर गुरुही. त्यातच विभाण्डकानं फुलपाखराविषयीही ऋष्यशृंगला विभाण्डकानं माहिती दिली होती. चातक हा पक्षी केवळ पावसाचंच पाणी पितो ह्याही गोष्टी त्याला माहिती होत्या.
फुलपाखरु हे आकर्षक रंगाचं असतं. त्यालाही पोट, डोळे, छाती यासारखे अवयव असतात. तसेच ते मिशांनी वास घेतात व पायाने चव ओळखतात ह्या गोष्टी त्याच्या पित्याकडूनच कळल्या होत्या. तसेच फुलपाखराच्या जीवनचक्राचाही अभ्यास त्याला होता. अंडी, अळी, कोष आणि फुलपाखरु अशा फुलपाखराच्या चार अवस्था. फुलपाखरु हे अंडी घालतात. त्या अंड्यातून काही दिवसानं अळ्या तयार होतात. त्यातच पुढे कोष व नंतर फुलपाखरु. त्यातच काही फुलपाखरे एका वेळी एकच अंडे घालतात तर काही फुलपाखरे समुहानं. फुलपाखरु हे मिलनानंतर लवकरच झाड शोधते. ती कशासाठी झाड शोधते ते ऋष्यशृंगला अगदी आपल्या बापाकडून माहित झालं होतं. ही अंडी पानाच्या मागं टाकतात तेही त्याला माहित झालं होतं. याचा अर्थ असा होता की ती अंडी इतर कोणालाही माहित होवू नये. तर बेडकासारख्या प्राण्यांपासून त्या अंड्याचं संरक्षण होईल. त्यातच या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. पण त्या अळ्या बाहेर पडतांना त्या अंड्याचे कवच खात असतात हे ऋष्यशृंग केवळ निरीक्षणावरुन शिकला होता. त्यातच ह्या अळ्याही निव्वळ खादाड असतात हेही त्याला माहित झालं होतं.
अळीची वाढ पुर्ण झाली की ती अळी आपली एक सुरक्षीत जागा शोधते. ती स्थिर जागा, ज्या जागेतून त्या अळीला कोणीही हटवू शकणार नाही. त्यातच ती अळी अशी सुरक्षीत स्थान मिळताच त्या जागेत या अळीतून पाय, डोके, मुख, त्वचा गळून पडतात हेही तिला माहित होतं. काही कोष हे जमीनीवर तर काही कोष हे जमीनीच्या आत असतात.हेही तो निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं समजत होतं. ही कोष अवस्था सहा दिवसाची असते असे त्याला कळत होतं.
फुलपाखरु जेव्हा कोषातून फुलपाखरु बनते, तेव्हा त्याचे पंख ओलसर असतात.तसेच ते दुमडलेले असतात. परंतू दिड तासानंतर त्या पंखाची हालचाल सुरु होते हे त्याला कळलं होतं. शेवटी झेप घेवून पूर्ण वाढ झाली की फुलपाखरु उत्तूंग भरारी मारतो हेही त्याला माहित होतं. तसेच पक्ष्यांच्या विविध जातीही त्याला माहित होत्या.
वेगवेगळे पक्षी, वेगवेगळी किटकं, वेगवेगळी झाडं, वेगवेगळे प्राणी ह्या सर्व गोष्टीची ऋष्यशृंगला काडीनकाडी नव्हे तर इत्यंभूत माहिती होती. त्यातच कोणती झाडं शिघ्र ज्वलनशील व कोणती ज्वलनशीर नाहीत. ह्याही गोष्टी त्याला मााहिती झाल्या होत्या. यज्ञोपयोगी सर्व गोष्टींची ऋष्यशृंगला माहिती झाली होती. याऊलट चित्र होतं शांताचं. शांतानं कधी निसर्ग अशा पद्धतीनं अनुभवला नव्हता. ती राजवाड्यातच अगदी मजेनं राहात होती. तिला रोमपदानं लहानाचं मोठं करतांना काहीही कमी पडू दिलं नाही. तिला खुप खुप प्रेम दिलं होतं नव्हे तर तिला राजप्रासादातील राजकीय गोष्टी तो शिकवीत असायचा. राज्यकारभार कसा करायचा. राज्यकारभाराची घडी कशी बसवायची. मंत्रासोबत कसे वावरायचे. कोणाला आपलेसे कसे करायचे. प्रजेला आनंदात कसे ठेवायचे. राज्य कसं सांभाळायचं. ह्या सर्व गोष्टी अगदी आनंदाने शिकवीत होता रोमपद. त्याला जणू तिच्या हातात राज्यकारभार द्यायचा आहे की काय असे वाटत होते.
ज्यावेळी रोमपद राजदरबार भरवायचा. त्यावेळी अगदी प्रकर्षानं तो आपल्या प्रिय लेकीला सोबत ठेवायचा. त्याला वाटत होतं की राजदरबारात बोललेल्या गोष्टी तिला कळाव्यात. अगदी बालवयातच राज्यकारभाराचे बाळकडू तिनं प्यावेत.
ते तिचं बालवय. त्या बालवयात विहार करण्याचे दिवस असतांना राजा रोमपद तिला राज्यकारभार शिकवीत होता. काही दिवस भरभराटीत गेले.
शांता जेव्हा दत्तक पुत्री म्हणून रोमपदाकडे आली. त्यावेळेपासून तर आजपर्यंत त्या राज्यात दुष्काळ पडला नव्हता. त्यातच राज्यकारभार समजून घेतांना शांताला नवल वाटत नव्हतं. अगदी बालवयातच तिनं तलवार बाजी व बाण चालविणं शिकून घेतलं होतं.

*********************************************

ते अंगदेशाचं राज्य. ते काही सरकारी प्रशासकीय राज्य नव्हतं. तिथं राजा होता. परंतू तिथे राजा जरी असला तरी तो कल्याणकारी राजा होता. कारण त्या राज्यात सुख शांती समृद्धी होती.
पुर्वीचे काही राजे हे राज्यकारभार चालवतांना अगदी चांगल्या पद्धतीने चालवत. ते गरीबांना दान देत. दान देतांना त्या दानात मौलवान वस्तू व खजिनाही देत. त्यातच असे दान देतांना कपड्यांचा शोध न लागल्यानं कपडे दान देता येत नव्हते. परंतू दागदागीणे तेवढे दान देता येत असत.
चांगले राजे हे रणांगण गाजवत असत. ते तलवार चाववीत. त्यातच युद्धात मोठमोठे पराक्रम गाजविण्यात त्यांना धन्यता वाटत असे. आज तेच राजे मोठमोठ्या पराक्रमानं आपली कारकीर्द गाजवत असत. तसेच असे राजे शत्रू पक्षातील जखमी व शरण आलेल्या सैनिकावर औषधोपचार करीत असत. त्यांची नजर अति तीक्ष्ण राहायची. ते स्मीतहास्यानं बोलत.कामात ते उत्साही असायचे. तसेच त्यांची कोणावर हवी असणारी चाल तीक्ष्ण असायची. ते स्रीयांना आदरानं वागवायचे.
चांगले राजे हे सर्वांना सन्मानानं वागवत. ते पशूपक्षी, नरनारी छुत अछुत यांच्यात भेदभाव करीत नसत.असे राजे मुलगा जन्माला येवो की मुलगी भेदभाव करीत नसत. राज्यात वंशाचा दिवा मुलाला म्हणणारे लोकं समाजात राहायचे. ते काहीबाही बोलायचे. पण असे चांगले राजे त्यांच्या बोलण्याचा विचार करायचे नाहीत. असे राजे हे मुलीच्या जन्माचे स्वागतच करायचे.
शांता लहानपणीच तलवारबाजीचं शिक्षण घेत असून तिला लोकं नावबोटं ठेवत असत. परंतू त्या गोष्टीची राजा रोमपदानं तमा बाळगली नाही. त्यातच अंगदेशचा राजा रोमपद याने मुलगी शांता हिला जीवापाड जपले होते. आज शांता सर्व गोष्टीत तरबेज झाली होती.
शांता हळूहळू मोठी झाली होती. तिच्या मोठे होण्याबरोबर राजा रोमपदाला विवाहाची चिंता पडली होती. परंतू तो तिच्यासाठी स्वयंवराचं आयोजन करु शकत नव्हता. त्याचं कारणंही तसंच होतं.

**********************************************

तो प्राचीन काळ. त्या प्राचीन काळात मनू आणि शतरुपाने वयोवृद्ध झाल्यानंतर घोर तपस्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होवून विष्णूनं त्यांना दर्शन दिलं. त्यातच विष्णु म्हणाला,
"मी तुमच्यावर प्रसन्न झालो असून तुम्हाला जो वाटेल तो वर मागा."
"नाही देवा. आम्हाला वर नको."
"नाही, नाही. मी ज्याला ज्याला दर्शन देतो. त्याला वर दिल्याशिवाय परत जात नाही. तेव्हा वर मागायचा असेल तर अवश्य मागा."
"तर मग ठीक आहे. आम्हाला असा वर द्या की तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा."
विष्णूनं तथास्तू म्हटलं व ते अंतर्धान पावले. त्यातच त्रेतायुगात मनूनं दशरथ रुपानं जन्म घेतला व शतरुपानं कौशल्यारुपानं आणि राम हा विष्णू रुपात जन्माला आला आणि राम प्रसिद्धही झाला. परंतू शांता? शांता कोण होती? कोणाची बहिण होती हे मात्र अजुनही कोणाला माहित नाही.
राजा दशरथाला एकच कन्या होती असे नाही तर त्याला दोन कन्या होत्या. एकीचं नाव शांता होतं तर दुसरीचं नाव कुकबी.
कुकबी ही मोठी असेल. ती जन्मास आली असेल. तिच्या जन्मानंतर राज्यात सुसंपन्नता असेल. म्हणून तिचा पाहिजे तसा उल्लेख पुराणात नाही. परंतू जो दुःख भोगतो. त्याचा इतिहास बनतो. तो इतिहास चिरकाल टिकतो. शांतानं जे भोगलं. त्यामुळं तिचा इतिहास बनला व तिच्यापासून जो वंश उत्पन्न झाला. तो वंश राजपूत सेंगर वंश म्हणून नावारुपाला आला. शांताला राजा दशरथानं राजा रोमपद व महाराणी वर्षीनीला दत्तक म्हणून दिली. कारण तिच्या जन्मानंतर राज्यात दुष्काळी परीस्थिती आली. त्यानंतर राजा दशरथ हा पुरुषच वंश वाढवतो ही धारणा ठेवीत असल्यानं कुकबी त्याची मुलगी त्याच्या जवळ असली तरी ती कन्या असल्यानं पुढे वंशवाढीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला असेल ही शक्यता नाकारता येत नाही.
शांतनू व ज्ञानमती यांना शांता व श्रवण नावाचे दोन मुलं होते. पुत्र श्रवण हा पाहिजे तेवढा हुशार नव्हता. परंतू शांता फार हुशार होती. त्यातच शांतनू आणि ज्ञानमती काही दिवसानं आंधळे झाले. मात्र त्यांची अंतीम समयी इच्छा होती की त्यांना काशी ची यात्रा त्यांच्या पुत्रांनी करवावी.
श्रवणकुमारचा जन्म त्रेतायुगात झाला. त्याच्या वडीलाचे नाव शांतनू व आईचे नाव ज्ञानमती होतं श्रवणकुमारची आई शुद्र होती व वडील वैश्य. त्यामुळं श्रवणला वेद विद्येचं ज्ञान मिळालं नाही. परंतू तो लहानपणापासूनच पितृ मातृ आज्ञेत होता. त्यामुळं त्याचे माता पिता हेच त्याचे गुरु होते.
ज्ञानवती व शांतनूला पुत्र नव्हते. त्यामुळं त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यातच ब्रम्हा प्रसन्न होवून त्यांनी आशिर्वाद दिला आणि सांगीतलं की तुम्हाला पुत्र झाल्यावर त्याला आपल्यापासून दूर ठेवावं. परंतू पुत्रप्रेम आड आलं आणि त्यांनी आपला पुत्र श्रवणला आपल्याजवळ ठेवून घेतलं. त्याची फलश्रुती अशी झाली की त्याला सतत पाहिल्यानं त्याचे मायबाप आंधळे बनले. काही ठिकाणी त्रिजटा ऋषीच्या शापानं आंधळे बनल्याचं सांगीतलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्रिजटा नावाचे ऋषी शांतनूच्या पहिल्या अवतारात शांतनूच्या घरी आले असता त्यांचे पायाला लागलेली धूळ पाहून त्यांनी त्यांचे पाय धुतांना डोळे लावले. त्यामुळे त्या ऋषींना राग आला व त्यांनी शाप दिला. त्यातच त्यांनी त्यावर उःशाप मागताच ऋषी त्रिजटा म्हणाले की आपला पुत्र आपला तारणहार ठरेल. पुढे दुस-या जन्मात ते आंधळे झाले व श्रवणकुमार त्यांचा तारणहार म्हणजे सहारा बनला. ते आंधळे झाले. त्यातच त्यातच श्रवणकुमारनं केलेली सेवा वाखाणण्याजोगी आहे.
श्रवणचे मायबाप आंधळे बनले खरे. पण त्यानं आपली पितृ मातृ भक्ती कमी केली नाही. त्यातच एका मुनीनं श्रवणकुमारला सांगीतलं की त्यांचं अंधपण हे त्याच्यामुळंच आहे. तेव्हा तो जर त्या मायबापांना खांद्यावर घेवून चौसष्ट तिर्थक्षेत्राची यात्रा करेल आणि तेथील पाणी आपल्या मायबापाच्या डोळ्यावर शिंपेल. तेव्हा त्यांना डोळे येतील. त्यामुळं श्रवणकुमारनं एक कावड बनवून मायबापांना चौसष्ट तिर्थस्थानाची यात्रा करण्यासाठी प्रस्थान केलं. त्यानं आपल्या घरचा कारभार आपली बहिण शांताच्या हातात सोपवला व तो यात्रेसाठी निघाला. वाटेत अनेक ऋषीमुनी आणि परशुरामाचेही दर्शन घेतले व तो पुढे निघाला. परंतू दुर्दैव असं की श्रवणकुमारचा दशरथाच्या हस्ते मृत्यू झाला. त्यातच ही घटना जेव्हा शांताला माहित झाली. तेव्हा शांताही मरण पावली होती. परंतू मरतेसमयी तिच्या मनात बदल्याची भावना होती. पुढे हीच शांता राजा दशरथाचा विवाह झाल्यावर त्यांच्या घरी जन्माला आली. त्यातच बदल्याच्या भावना आता दुस-या जन्मातही तिच्या निरागस मनात असेलच. त्यातूनच तिच्या जन्मापासून अयोध्येत दुष्काळ पडला होता. पुढे तिला दत्तक म्हणून रोमपद व वर्षीनीला दिल्यावर तिथे दुष्काळ जाणवला नाही. कारण शांताच्या मनात अयोध्या नरेश दशरथाबद्दल राग होता. अंगनरेश रोमपद राजाबद्दल नाही.
*********************************************

विभाण्डकाला उर्वशी त्याला सोडून गेल्यापासून स्री जातीचा भयंकर राग होता. तो तसा त्याच्या मुलाला स्रीयांपासून दूर ठेवण्यासाठी अरण्यात घेवून गेला. तो केवळ अरण्यातच त्या मुलाला घेवून गेला नाही, तर त्याने आपल्या प्रिय मुलाला सर्व दृष्टीतून महान बनवले. त्याला वेद विद्या तसेच तपोबलाचे ज्ञान दिले. तसेच स्वतःही क्रोधाच्या ज्वाळेत जळत जळत तप करणे आरंभ केले.
तो अंगदेश.......त्या अंगदेशाची सीमा त्या अरण्याला लागून होती. ज्या अरण्यात विभाण्डक तपश्चर्या करीत होता. त्याच्या तपश्चर्येत एवढं सामर्थ्य होतं की आजूबाजूचा प्रदेश त्याच्या तपोबलानं शुष्क होत चालला होता. त्यातच अंगदेशही.
अंगदेशात गत काही दिवसापासून पाणीच नव्हतं. कोणी म्हणतात की रोमपद राजा दानशूर असल्यामुळं त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वर्गातून एक वेषधारी व्यक्ती अंगदेशातील राजा रोमपदाकडे आला. त्यानं त्याला आपल्या शेतीसाठी पाणी हवं असल्याचं निवेदन केलं. परंतू राजा रोमपदनं ते नाकारलं. त्यामुळं त्यानं शाप दिला की हे राजन, तुझ्या राज्यात पुढे भयंकर दुष्काळ पडेल. तुला प्यायलाही पाणी मिळणार नाही.
आज त्या वेषधारीनं म्हटल्याप्रमाणे राज्य अंगदेशात प्यायलाही पाणी नव्हतं. होतं नव्हतं तेही पाणी सुकून गेलं होतं. पाण्याची खोली जमीनीपासून खूप खोल गेली होती. कितीही खोल तलाव खोदला तरी कपाळी करंटाच लागत होता. काय करावं सुचेनासं झालं होतं. अशावेळी राजा काही धर्मात्म्यांचं मार्गदर्शन घेत होता. तशी ती गोष्ट त्यानं आपला परम मित्र दशरथाला सांगीतली. दशरथ त्याला म्हणाला,
"तुमच्या राज्यात शांता आहे ना. अगदी तिच्यामुळेच राज्यात दुष्काळ आहे."
दशरथ बोलून गेला खरा. तो तिचा सख्खा पिता. परंतू त्याला पुत्रप्रेमाबाबत दयामाया नाही हे रोमपदनं ओळखलं. त्यातच क्रोध न करता तो दशरथाला म्हणाला,
"आपण राजदरबार बोलवा. आपण हा प्रस्ताव राजदरबारात ठेवू."
रोमपदला माहित होते की राजा दशरथाच्या दरबारी अनेक विद्वान व्यक्ती आहेत. जे आपल्याला व्यवस्थीत सल्ला देवू शकतील. तसा दशरथानं होकार दिला.
राजदरबार भरला. ठरल्याप्रमाणं राजदरबारात रोमपदही जातीनं हजर होता. विषय ठेवण्यात आला. तसा अयोध्या नगरीतील गुरु वशिष्ठ बोलला,
"राजन, आपण एक यज्ञ करायला पाहिजे."
"यज्ञ! यज्ञ केले. पाऊस यावा म्हणून अनेक यज्ञ केले. परंतू काही उपयोग झाला नाही."
"आपण ऋषी श्रृंगकडून असा यज्ञ करवून घ्यावा."
"पण ते कसे शक्य आहे?"
"का बरं अशक्य!"
"त्यांच्या पित्यानं कधीच त्यांच्यावर नारी जातीची छाया पडू देणार नाही अशी शपथ घेतली. मग ते जर राज्यात आले तर त्यांना राज्यात अनेक स्रीया दिसतील. त्यातच त्यांचे पिता संतापतील व ते आम्हाला पुन्हा शाप देतील. मग आम्ही जसे आहोत, तसेही राहणार नाही."
"परंतू राजन, हे सगळं ऋषी विभाण्डकाच्या तपसामर्थ्यानं घडलं. त्यांच्या तपामध्ये एवढं बल आहे की त्या अरण्याला लागून असलेल्या आपल्या अंगदेशावर असाच दुष्काळ पडला आहे. तो दुष्काळ त्याचा मुलगाच दूर करु शकेल. काहीही करा. पण त्याच्याच हातानं वर्षायज्ञ करावा असेच मी तुम्हाला सांगू शकतो." गुरु वशिष्ठ म्हणाले.
सभा बरखास्त झाली. तसा रोमपदाच्या मनात विचार आला. ऋष्यशृंगाला बोलवायचं कसं? तसा तो तळमळू लागला. त्याच विचारात. अन् त्याच विचारात असतांना त्याला रात्रभर झोपही आली नाही.
सकाळ झाली होती. पक्ष्यांची किलबिल सुरु झाली होती. तसा तो पाखरांचा आवाज त्या राजप्रासादातूनही आतमध्ये शिरला होता. तसा रात्रभर न झोपलेला राजा रोमपद उठला. त्यानं स्नानविधी उरकवला. तसा तो राजा दशरथाचा निरोप घेवून माघारी परतला. तसं वाटेतून चालतांनाही तोच विचार त्याच्या मनात होता. ऋष्यशृंगला आपल्या राज्यात यज्ञासाठी आणायचं कसं?
दुदूंभी वाजत होत्या. ऋष्यशृंग अंगदेशात आला होता. त्याला वर्षायज्ञ करायचा होता. कारण त्या यज्ञातून त्याला इंद्राचा प्रकोप दूर करायचा होता.
इंद्र हा देवाचा राजा. पाऊस पडणे हे त्याच्या अधीन होते. त्यातच विभाण्डकाचा कोप होण्यापुर्वी त्यानं एक वेषधारी ब्राम्हण राजा रोमपदाच्या दरबारी पाठवला होता. जो त्याच्या शेतीला पाणी लागत आहे अशी मागणी करीत होता. ज्याला राजाने पाणी दिले नव्हते. ज्यातून त्या वेषधारी ब्राम्हणानं शाप दिला की तुझ्या राज्यात पुढे फार मोठा दुष्काळ पडेल.
अंगदेशात असा ब्राम्हण व्यक्ती पाठविण्यामागे इंद्राचं राजकारण होतं. ते राजकारण असं की उर्वशी ही स्वर्गअप्सरा होती. ज्या अप्सरेचा विभाण्डकानं उपभोग घेतला नव्हे तर त्या दोघांनी ऋष्यशृंग नावाच्या मुलाला जन्म दिला. त्यातच इंद्राला वाटत होतं की यात विभाण्डकाची चूक आहे. त्यानं स्वर्गअप्सरा उर्वशीला का बरं पसंत करावं? त्यातच बदला काढण्याच्या उद्देशानं इंद्रानं लगतच्या अंगराज्यात एका ब्राम्हणाला पाठवलं. त्यातच त्यानं शापवाणीही उच्चारली.
इंद्राला उर्वशीबाबत अभिमान होता नव्हे तर विभाण्डकाबाबत राग. त्या रागावर विजय मिळविण्याचे स्वप्न पाहात असतांना इंद्राला वाटलं की लगतच्या राज्यात पाऊस पडलाच नाही आणि दुष्काळ पडला तर आपल्याला, आपल्याला मनात वाटेल तसं त्यांना बदनाम करता येईल. यातच इंद्रानं वार्ता पसरवली की विभाण्डकाच्या तपसामर्थ्यानं अंगदेशात दुष्काळ पसरला आहे.
अंगदेश.......या अंगदेशात ऋषी ऋष्यशृंग वर्षायज्ञ करायला आला होता. तो यज्ञ करणार होता आणि त्या यज्ञातून अंगदेशाचा त्रास समाप्त होणार होता.
ऋष्यशृंग........आपल्या राज्यात यायला हवा यासाठी राजा रोमपद अति दक्ष होता.
राजा रोमपदला ऋष्यशृंग ऋषी वर्षायज्ञ करण्यासाठी येतो की नाही. याची चिंता लागली होती. त्यातच त्यानं भीतभीतच ऋष्यशृंगला आपल्या एका दुताकरवी निरोप पाठवला. ज्यावेळी असा निरोप ऋष्यशृंगला पोहोचला. त्यावेळी त्याचा पिता विभाण्डक कुटीतून लाकडं आणण्यासाठी अरण्यात गेला होता.
दुतानं पुरता निरोप ऋष्यशृंगला दिला. तसा ऋष्यशृंगला ती गोष्ट सामाजीक बांधीलकी धरुन अाहे असे वाटल्यानं तो अंगराज्यात यायला तयार झाला. तसा तो अंगदेशात आला.
आज अंगदेश ऋष्यशृंगच्या स्वागतासाठी सजलं होतं. ऋष्यशृंग वर्षायज्ञ करणार होता अंगदेशात पाऊस यावा म्हणून. तसं पाहता आज अंगदेशात दिवाळीच आहे की काय असे वाटत होते.
मुनी अंगदेशातील राजप्रासादात जात होता. इतक्यात त्याची नजर शांताकडे पडली. त्यातच तिचं सौंदर्य एवढं अप्रतिम होतं की तो ते सौंदर्य पाहून मोहीत झाला. त्यातच क्षणभर तिला न्याहाळून त्यानं महालाच्या गर्भगृहात प्रवेश केला.
ती शांता.......दिसायला सुंदर असलेली शांता. तिला पाहताच तो मोहित झालेला. त्याला ती आवडली होती. तशी तिचीही नजर त्याचेवर पडली व तिही त्याचेकडे आकर्षीत झाली होती.
ऋष्यशृंग आला खरा. त्यातच त्यानं इंद्राला मोहीत करीत वर्षायज्ञ केला. त्यातच वर्षाऋतूच आगमण झालं. वर्षा धो-धो कोसळायला लागली.
वर्षाराणीचं आगमण होताच संपूर्ण अंगनगरीत उत्साह पसरला. लोकं आनंदानं नाचू लागले. त्यातच नदीनाले भरुन वाहू लागले.. तलाव आणि ओढे गच्च भरले. त्यातच जमीनीच्या भेगाही पूर्णतः अदृश्य झाल्या होत्या. पुरता पुरता ही बातमी ऋष्यशृंगचे वडील विभाण्डकाला पोहोचली व तो अंगदेशाकडे रवाना झाला. तसा लवकरच तो अंगदेशात आला.
विभाण्डक आपल्या देशात आल्याची वार्ता राजा रोमपदाला लागली. त्याला चिंता पडली की विभाण्डक आता काय करेल. तसं पाहता राजा रोमपदाला विभाण्डकाच्या शक्तीचा परीचय होता. तो विभाण्डकाचा क्रोध जाणून होता. ज्या विभाण्डकानं उर्वशी स्वर्गात जाताच आपल्या तपोबलानं संपूर्ण अंगदेशात दुष्काळ निर्माण केला. तो व्यक्ती आपल्या शापवाणीनं संपूर्ण अंगदेश नष्ट करणार ही भीती राजा रोमपदाच्या मनात होती. त्यातच त्यानं आपल्या राज्यातील काही धर्मात्म्यांना विचारणा केली नव्हे तर विचारविमर्शही. त्यातच त्यांनी सल्ला दिला की त्यानं आपल्या मुलीचा विवाह विभाण्डकाची ऋष्यशृंगची भेट होण्यापुर्वी लावून द्यावा. जेणेकरुन विभाण्डकाचा क्रोध शांत होईल.
राजा रोमपद तसा विचार करु लागला. तसा क्षणात विचार करता करता रोमपदानं क्षणाचाही विलंब न करता आपल्या मुलीचा विवाह ऋष्यशृंगशी लावून दिला. त्यासाठी त्याने ऋष्यशृंगची परवानगी घेतली.
ऋष्यशृंगचा विवाह झाला होता. तसा विभाण्डक आपल्या पुत्रापर्यंत पोहोचला. त्यानं पाहिलं की ऋष्यशृंगचा विवाह झालेला आहे व त्याचेसोबत एक नववधू उभी आहे. तशी त्याला त्याची प्रतिज्ञा आठवली की मी माझ्या मुलाचा संपर्क स्री जातीशी होवू देणार नाही. पण घडले उलटच. ऋष्यशृंगाजवळ स्री........त्याला जमीन आपल्या पायाखालून सरकल्यासारखी वाटली.
ऋष्यशृंगानंही आपल्या बापाला पाहिलं. तो घाबरला. काय करावं सुचेनासंं झालं. कारण त्याला आपल्या बापाच्या क्रोधाची कल्पना होती की ते काय करु शकतात. परंतू बापाला एक शब्द बोलायचीही त्याची हिंमत होत नव्हती. परंतू शांता चालाख होती.
शांता हूशार होती. तिनं लहानपणापासून राज्यकारभाराचे शिक्षण घेतले होते. कोणाला कसे वशमध्ये करावे ते तिला माहित होते. तिनं त्या अत्यंत कठीण समयी आव ताव न पाहता तिनं विभाण्डकाच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे डोळे लालभडक असलेले पाहिले. तशी तिही घाबरली. परंतू त्यांच्यासमोर घाबरटपणा न दाखवता ती पुढे झाली. ती विभाण्डकाच्या जवळ आली व विभाण्डकाच्या पायावर नतमस्तक झाली. तशी ती म्हणाली,
"मुनीवर मला आणि माझ्या पित्याला माफ करा. राजा हा प्रजेचा पालक असतो. जर प्रजेची चिंता राजानं दूर केली नाही तर त्याचा दोष राजाला लागतो. त्यामुळं आम्हाला असं करावं लागलं. आम्ही आमच्या प्रजेसाठीच असं केलं. माहित आहे, आपल्या तपोबलानं आमच्या राज्यात दुष्काळ पडला होता. तो दुष्काळ दूर करण्यासाठी आम्हाला वर्षायज्ञ करणे भाग होते आणि तेही आपल्या मुलाकडूनच. आमची चूक झाली की आम्ही आपल्या मुलाला वर्षायज्ञसाठी बोलावलं. माफ करा माझ्या पित्याला. हवं तर त्याची शिक्षा आपण मला द्या. मी शिक्षा भोगायला तयार आहे. हवं तर मी उर्वशीसारखी आपल्या मुलाला अंतर देणार नाही. मी त्यांना कधीच जीवनभर सोडून जाणार नाही."
शांता बोलून गेली खरी. पण त्या बोलाने विभाण्डकाचा राग शांत झाला. त्याचे पित्त निवळले व तो खाली वाकला. त्यानं शांताला दोन्ही हातानं उठवलं. तशा डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. तसा तो म्हणाला,
"ऊठ पोरी ऊठ. मी सर्वच नारीजातीला उर्वशी गेल्यानंतर उर्वशीच समजत राहिलो. परंतू आता कळलं की माझी ती चूक होती. तू उर्वशीसारखी असशीलही कदाचित. परंतू तू उर्वशी बनशील नको म्हणजे झालं. तू माझी पुत्रवधू. मी आनंदीत आहे आणि तुला पुत्रवधू म्हणून स्विकारत आहे."
विभाण्डकानं शांताला पुत्रवधू म्हणून स्विकारलं. त्यानंतर काही दिवस तो अंगदेशात राहिला व काही दिवसानंतर तो शांता, ऋष्यशृंग व रोमपदचा निरोप घेवून अरण्यात निघून गेला. पुढं पश्चातापाच्या अग्नीत स्वतःला झोकून देण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या चुकीवर विजय मिळविण्यासाठी. आज तो आनंदी झाला होता. तसेच आता जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर मोक्ष मिळविण्यासाठी पुन्हा तपश्चर्या करणार होता. त्यासाठीच तो शेवटच्या समयी पुन्हा अरण्यात गेला होता.
विभाण्डक अरण्यात जाताच रोमपदानं अंगदेशचा कारभार आपल्या मुलीकडे सोपवला. तिला राजकुमारी बनवलं व तोही वर्षीनीसह अरण्यात निघून गेला होता. आता शांता आपला पती ऋष्यशृंगसह राजप्रासादात राहून आनंद घेत होती.

विभाण्डक अरण्यात गेला होता. त्यातच राजा रोमपद व वर्षीनीही. तसं पाहता राजकुमारी शांता व. ऋष्यशृंग आरामात राजवाड्यात राहात होते. तसं पाहता ते एक तपस्वी ऋषी होते. त्यांची ख्याती दूरवर पसरलेली होती. अशातच त्यांना दशरथाचं निमंत्रण आलं. पुत्रकामेष्टी यज्ञ करायचाय.
पुत्रकामेष्टी यज्ञ..........शांताला दत्तक दिल्यापासून राजा दशरथाला मुलबाळ नव्हतं. हं, एक मुलगी होती. परंतू वंशवाढीसाठी त्याला एका मुलाची गरज होती. मुलीची नाही. म्हणून तो परेशान होता.
आज तो परेशान होता. त्यातच त्याचं कौशल्याशी पटत नव्हतं. त्याचं कारणंही होतं. ते म्हणजे शांताला दत्तक देणं. शांताला दत्तक देत असतांना कौशल्याचं मत विचारात घेतलं नव्हतं. त्यातच स्वतःची मुलगी दत्तक देत असतांना तिला बरंही वाटलं नाही. परंतू त्या ठिकाणच्या पितृसत्ताक कुटूंबपद्धतीमुळं केवळ दशरथाची चलती झाली. कौशल्या मधात बोलू शकली नाही. परंतू आज कौशल्याला त्याचं दुःख वाटत असल्यानं व शांता तिच्या काळजाचा तुकडा असल्यानं दशरथाशी कौशल्याचं पटेनासं झालं
आज कौशल्यापासून राजा दशरथाला पुत्र प्राप्त न होताच त्यानं दुसरी पत्नी केली. तिचं नाव कैकेयी. त्यातच तिलाही पुत्र न झाल्यानं राजानं तिसरा विवाह केला. तिचं नाव सुमित्रा. परंतू तिच्याहीपासून पुत्र प्राप्त न केल्यानं त्यानं राजज्योतिषांचा सल्ला घेतला. त्यातच राजज्योतिषाच्या सल्ल्यानुसार राजा दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची योजना आखली.

****************************************

राजा अज हा राजा दशरथाचा पिता होता. एकदा तो शरयू नदीत अंघोळ करीत असून त्या नदीच्या पुढे एक शिवपिंड होती. राजा अजने नदीत अंघोळ केली व त्यानं त्या नदीतील पाणी शिवपिंडीच्या दिशेनं न फेकता आपल्या पाठीमागं फेकले. त्याचवेळी त्या ठिकाणी रावण त्याचेशी युद्ध करण्यानिमित्यानं आला होता. त्यानं ते दृश्य पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की हा वेडा राजा तर नाही की जो आपल्या ओंजळीतील पाणी शिवपिंडीच्या दिशेनं न फेकता तो आपल्या पाठीमागं फेकत आहे. तसा राजा अज त्या नदीतून बाहेर येताच त्याला रावण म्हणाला,
"राजा, मी पाहिलं की आपण अंघोळ केल्यानंतर आपल्या हातातील ओंजळीतील पाणी त्या शिवपिंडीच्या दिशेने न टाकता ते मागे टाकले. याचं कारण काय?"
रावणाला पडलेला प्रश्न. तसा राजा अज त्यावर म्हणाला,
"हे रावणा, मी मागे पाणी फेकण्याचं कारण जाणून घ्यायची जर तुझी इच्छा आहे तर सांगतो. मी हे माझ्या ओंजळीतील पाणी यासाठी मागे फेकले की या नदीपासून शंभर योजन दूर एका हरणीची एक सिंह शिकार करतांना मला दिसला. ती हरणी गरोदर आहे. तेव्हा हे पाणी फेकून तिला आणि तिच्या बाळाला वाचविण्याचा माझा प्रयत्न. मी तिला संतानविरहीत करु इच्छित नव्हतो."
आश्चर्यात पडलेला रावण पुन्हा म्हणाला,
"ते कसे काय शक्य झाले?"
"ह्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे बाण बनलेत आणि त्या बाणांनी सिंहाच्या तोंडाला बंदिस्त केलंय. तसेच पायालाही बंदिस्त केलंय. ज्यावेळी त्या सिंहाचा तिची शिकार करण्याचा बेत बदलेल. तेव्हा हे माझे बाण विरघळून जातील व तो सिंह सुखरुप निघून जाईल. यात संपूर्ण सत्यता आहे. जर तुला तसं वाटत नसेल तर तू जावून पाहा तिथं. तुला सगळं दिसेल."
रावणाला त्यावर विश्वास वाटला नाही. तो ते पडताळून पाहण्यासाठी तिथे गेला असता त्यानं पाहिलं की ती हरणीही तिथंच बसलेली असून सिंहाच्या तोंडात बाण खुपसलेले आहेत. तसेच त्याच्या पायामध्येही बाण रुतलेले आहेत. तसा त्यानं विचार केला की जो व्यक्ती असे करु शकतो. तो व्यक्ती सहजपणे आपल्याला हारवू देखील शकेल. तसा त्यानं युद्धाचा विचार त्यागला व तो माघारी परत निघून गेला.
ज्याप्रमाणे पुत्रप्राप्ती राजा दशरथाला नव्हती, तशीच पुत्रप्राप्ती अजलाही नव्हती. त्यातच राजा अज वनभ्रमण करीत होता. त्यावेळी त्याला एक सुंदर सरोवर दिसले. त्या सरोवरात कमळाची फुलं होती. तिही सुंदर दिसत होती. त्या सरोवरातील ती फुलं घेण्यासाठी राजा अज सरोवरात उतरला. परंतू ती फुलं त्याच्या हाताला लागली नाहीत. त्यातच भविष्यवाणी झाली, 'हे राजन, तू या फुलाच्या योग्य नाहीस. कारण तुला पुत्र नाही. तू निःसंतान आहेस."
ती भविष्यवाणी......ती भविष्यवाणी ऐकताच राजा अजला अत्यंत वाईट वाटले. परंतू ते भगवान शिवाचे उपासक होते. त्यातच त्या भविष्यवाणीने आपला भक्त चिंतेत असल्याचे पाहताच भगवान शिवही चिंताग्रस्त झाले व त्यांनी राजा अजला मदत करायचे ठरवले. त्यांनी एका धर्म्यात्म्याला बोलावले व सांगीतले की आपण एक झोपडी बांधून शरयू नदीकिनारी राहावे. ज्यावेळी राजा अज अंघोळीला येईल. त्यावेळी पुत्रप्राप्तीसाठी त्याला योग्य असं मार्गदर्शन करावे.
ठरल्याप्रमाणं तो घर्मात्मा भगवान शिवाच्या म्हणण्यानुसार शरयू तटावर एक झोपडी बांधून राहू लागला. त्यातच राजा अज दररोज अंघोळ करायला यायचा व दररोज जायचा. पण त्याचं लक्ष त्या झोपडीकडं गेलं नाही. एक दिवस सहजच त्याचं लक्ष त्या झोपडीकडं गेलं व त्याची पावलं त्या झोपडीकडं वळली. परंतू त्या झोपडीत असं कोणीच नव्हतं. ते पाहून राजा अजला फार आश्चर्य वाटलं. तसा राजा अज आपल्या राजवाड्यात परतला. परंतू रस्त्यात त्याला एक संन्यासी भेटला.
राजा अज आपल्या राजवाड्यात परतला खरा. परंतू त्यानं पाहिलं की एक संन्यासी त्याला वाटेत भेटला. तो भिक्षा मागत होता. राजा अजनं त्याला दानात सोन्याचा खजिना देण्याचे कबूल केले. परंतू ते घेण्याचे धर्मात्म्याने नकार दिला. त्यानंतर गळ्यातला हारही दिला. परंतू त्या धर्म्यात्म्याने तोही घेण्यास नकार दिला. त्यातच त्यानं म्हटलं,
"राजन, हे झालं प्रजेचं घन. मला दानात तुझ्या श्रमाचं धन हवं."
राजा ते ऐकून विचारात पडला. परंतू तोही पराश्रमी होती. दानीही होता. त्यालाही माहित होतं की हा कोणी धर्मात्मा असेल. तेव्हा तो त्या महात्म्याला म्हणाला,
"हे पुण्यात्मा, मला थोडी सवड द्या.मी उद्याला तुम्हाला मी कमावलेलं धन दानात नक्कीच देतो. थोडी सवड हवी."
राजानं धर्म्यात्म्याला वचन दिलं. तसा तो राजमहालात आला. त्यानं मजूराचा वेष परीधान केला व तो आपल्या नगरीत फिरायला गेला. वाटेत त्याचे पाहिलं की एक म्हातारा लोहार घन मारत आहे. त्याला ते नीट घन मारताही येत नव्हते, तरीही तो ते घन मारत होता. त्यातच तो ते घन मारत असतांना त्याला दम लागत होता. तद्वतच वेषधारी राजा त्याला ते घन मारुन देण्यासाठी तयार झाला. त्या बदल्यात त्याला त्या लोहारानं एक टका दिला. तो एक टका घेवून तो राजमहालात आला.
राजा अज राजमहालात आला खरा. परंतू रात्रभर त्याला झोप आली नाही. कारण त्याला त्या धर्मात्म्याची भेट घ्यायची होती. त्यासाठी तो आतूर झाला होता. त्याला वाटत होते की त्या धर्मात्म्याची भेट केव्हा होते आणि केव्हा नाही. तसेच त्याला तो एक टका दान केव्हा देतो आणि केव्हा नाही.
दुसरा दिवस उजळला या दुस-या दिवशी तोच धर्मात्मा आला व म्हणाला,
"राजन, तू म्हटल्याप्रमाणे मी आलो आहे. तेेव्हा तू आपले मला दिलेले वचन पुर्ण कर."
राजा अजनं ते बोलणं ऐकलं. तसं त्याच्या लक्षात होतंच. तसा राजा अजनं तो एक टका काढला व तो त्या धर्म्यात्म्याला देत म्हणाला,
"हे घ्या. हे माझ्या ख-या मेहनतीचं दान होय. हा एक टका मी स्वतः मेहनत करुन मिळविलाय."
धर्मात्मा जे समजायचं ते समजला. त्यानं तो एक टका घेतला व तो एक टका जमीनीवर फेकला. तद्वतच त्यातून एक रथ निघून तो वर आकाशात जात लुप्त झाला. त्यातच दुसरा रथ निघाला. तोही आकाशात जावून लुप्त झाला. असे दहा रथ निघाले. पण दहावा रथ लुप्त झाला नाही. तो रथ जमीनीवरच थांबला.
राजा अजाला तो चमत्कार वाटला. त्यातच तो रथ त्या पुण्यात्म्याने राजाला देत म्हटले,
"राजन, हा आपल्या मेहनतीचा रथ. हा रथ एक टक्यापासून उत्पन्न झालेला आहे. ह्या रथाचा तू वापर कर. पुढे तुला काही दिवसांनी एक गोंडस पुत्र प्राप्त होईल."
तो धर्मात्मा बोलून गेला खरा. तसा तो घर्मात्मा थोड्या वेळानं अंतर्धान पावला.
त्या धर्म्यात्म्याच्या अंतर्धान पावल्यावर काही दिवसानं इंदूमती गरोदर राहिली. त्यातच तिला काही दिवसात तिनं एका गोंडस पुत्राला जन्म दिला. हाच पुत्र म्हणजे राजा दशरथ होय. म्हणतात की जो रथ राजा अजला धर्म्यात्म्यानं दिला होता. त्या रथात एक बालक होता. तो राजाला देत त्या धर्मात्म्याने म्हटले की या बालकाचा सांभाळ कर. त्या बालकाचा राजा अजने सांभाळ केला. त्यानंतर त्या बालकाचं नाव नेमी असं ठेवलं. परंतू तो रथ तोच बालक दहाही दिशात फिरवीत असल्यानं राजा नेमीचं नाव दशरथ पडलं होतं. ज्या दशरथाला शांता नावाची मुलगी झाली होती.
ज्या शांताच्या जन्मातून समस्त अयोध्या नगरीत दुष्काळ पडला. त्याच शांताच्या विवाहातून राजा रोमपदानं संपूर्ण अंगदेशातील दुष्काळाचा प्रश्न सोडवला होता.
शांता अशी मुलगी होती की तिचा आजाही पराक्रमी होता. त्या अजच्या पराक्रमाने केवळ सिंहच नाही तर रावणही युद्ध न करता परत गेला होता नव्हे तर राजकुमारी शांतेचं रुपांतर राजकुमारीत झाल्यानंतर तसेच तिचा विवाह ऋष्यशृंगशी झाल्यानंतर तिचं नशिब पालटलं व तिचा भागोदय झाला होता.
पुत्रकामेष्टी यज्ञ.......या पुत्रकामेष्टी यज्ञात राजा दशरथानं ऋष्यशृंगाला निरोप पाठवला होता. कारण राजा दशरथाला शांता झाल्यानंतर पुत्र नव्हता. जो पुत्र वंशाचा वारस ठरणार होता. तसा दूत सांगत होता की दशरथाच्या म्हणण्यानुसार केवळ अयोध्येत ऋष्यशृंगानच यावं, शांतेनं येवू नये. कारण राजा दशरथाला भीती होती की शांता अयोध्येत येताच पुन्हा अयोध्येत दुष्काळ निर्माण होईल.
राजा दशरथाचा प्रस्ताव. त्यातच त्याचं शांताला अयोध्येत नको आणा असं म्हणणं. त्यातच फक्त ऋष्यशृंगालाच बोलावणं ही गोष्ट ऋष्यशृंगाच्या मनाला खटकली. तसा ऋष्यशृंगानं दुताजवळ पुरता निरोप पाठवला. जर राजा दशरथ शांतेला बोलवत असेल आणि तिचा आदरसत्कार करीत असेल, तरच तो अयोध्या नगरीत येईल व पुत्रकामेष्टी यज्ञ करुन देईल. जर राजा दशरथ शांतेला बोलवत नसेल तर तो केवळ शांतेचाच नाही तर ऋष्यशृंगाचाही अपमान असेल आणि हा अपमान तो मुळातच सहन करणार नाही. त्यामुळं तसं घडल्यास तो पुत्रकामेष्टी यज्ञही करुन देणार नाही.
अयोध्या नगरीतून आलेला दुत आल्यापावली निघून गेला. त्यानं पुरता निरोप आपल्या प्रिय राजाला ऐकवला. तसा राजा विचारात पडला. परंतू वंशचालविण्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करणे भागच होते. त्यामुळं राज्यात दुष्काळ पडला तरी चालेल. शांतेला बोलवावं असं त्यानं मनात ठरवलं. त्याशिवाय ऋष्यशृंगही येणार नाही अयोध्येत असं त्याला वाटलं. त्यासाठी त्यानं सभा बोलावली. राजदरबारात विषय ठेवला व राजदरबाराच्या इच्छेनुसार वंशचालविण्यासाठी पुत्र हवा म्हणून शांताला ऋष्यशृंगसोबत मानानं बोलवायचं ठरलं. त्यानुसार राजानं पुन्हा अंगदेशात निरोप पाठवला व दुताच्या म्हणण्यानुसार ऋष्यशृंगही शांतेसह अयोध्या नगरीत यायला व पुत्रकामेष्टी यज्ञ करायला तयार झाला.

****************************************

शांता येणार आहे अयोध्येत म्हणून सारी अयोध्या नगरी खुश होती. त्यातच खुश होती कौशल्याही. कारण तिनं स्वतःची कोक फाडून शांतेला जन्म दिला होता. आज बरेच वर्ष झाले होते की तिनं शांतेला पाहिलं नव्हतं. शांतेला दत्तक दिल्यापासून ती खुप काळजीत होती.,आपली मुलगी कशी असेल, कशी दिसत असेल याची आजपर्यंत तिला काळजी लागली होती. परंतू आज तिला भेटण्याचे नवतरंग तिच्या मनात निर्माण झाले होते. तसा तिला आनंदही वाटत होता.
शांताच्या येण्याचं माहित होताच राजा दशरथ फार दुःखी झाला होता. कारण त्याला वाटत होतं की पुर्वीसारखाच तिच्या येण्यानं राज्यात दुष्काळ पडेल. परंतू त्याला ते सर्व पुत्रकामेष्टी यज्ञासाठी सहन करावं लागणार होतं. अशातच ठरल्याप्रमाणं शांतेचा व तिच्यासोबतच ऋष्यशृंगचा अयोध्या नगरीत येण्याचा दिवस ठरला.
ठरल्याप्रमाणं ऋष्यशृंग व शांता अयोध्येत आले. त्यातच शांतेनं अयोध्येत पाऊल टाकताच पाऊस जोरात कोसळणे सुरु झाले. हा शांतेच्या येण्याचा संकेत नव्हता तर तो ऋष्यशृंगाच्या पावलाचा चमत्कार होता.
शांता अयोध्येत आली होती. तिला पाहताच कौशल्याला अतिशय आनंद झाला होता. त्यातच कौशल्या त्या शांताला भेटताच तिचं ह्रृदय भरुन आलं. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा टपकू लागल्या.
तो पाऊसही अजून धो धो कोसळतच होता. त्यातच राजा दशरथाच्या मनात जे द्वंद्व चाललं होतं की जर शांता अयोध्येत आली तर दुष्काळ पडेल. ह्या गोष्टी अगदी फोल ठरल्या होत्या.
ऋष्यशृंग हा जावई होता दशरथाचा. त्यातच शांतेसह त्याच्या जावयानं अयोध्येत पुत्र कामेष्टी यज्ञ केला.
शांता ही एक मनमिळावू स्वभावाची होती असे म्हटल्यास काही दुमत नाही. कारण ज्या अयोध्येतून लहानपणी शांताला दत्तक दिलं होतं. त्याच अयोध्येचं कल्याण करण्यासाठी शांता आज अयोध्येत आली होती नव्हे तर आपल्या पित्याच्या राज्यात वंश टिकावा म्हणून प्रयत्न करीत होती. त्या अयोध्येनं तिला बाहेर काढलं असलं तरी.
ऋष्यशृंगनं पुत्रकामेष्टी यज्ञ केला व तो आपल्या राज्यात रवाना झाला. काही दिवसानं अयोध्येत पुत्रकामेष्टी यज्ञाचा परीणाम की काय, चार पुत्र जन्मास आले. ते कालांतरानं मोठेही झाले. त्यांचे विवाहही झाले. परंतू पुढे रामाला वनवास आणि वनवासातून राम परतही आला. परंतू त्यांचं आपल्या बहिणीकडं लक्ष गेलं नाही.
शांतानं राज्यकारभार हाती घेतला होता. ती राज्यकारभारात रमली होती. तिला पुरेसा वेळंही मिळत नव्हता. परंतू तरीही तिला भावाची मनोमन आठवण यायची. ती विव्हळायची. वाट पाहायची त्यांची की कधीतरी ते येतील व बहिणीची भेटही घेतील. त्याचं ती जणू स्वप्न पाहात होती. परंतू तिचं स्वप्न फोल ठरत होतं. कारण तिचे भाऊ तिला भेटायला येत नव्हते.

****************************************

आज रामानं राज्यकारभार हाती घेतला होता. त्यातच त्यानं पुन्हा सीतेला वनवासात पाठवलं होतं.
आज एकामागून एक घटना अयोध्येत घडल्या होत्या. राम वनवास, भरताला राज्य, त्यातच सीतेला वनवास ह्या सर्व गोष्टी. शांताला अयोध्येतील सर्वच गोष्टी माहित होत होत्या. तिला बरं वाटत नव्हतं. त्यातच तिला वाटायचं की कधीतरी अयोध्येत जावं व रामाला फटकारावं.
तिचं बरोबर होतं. परंतू तिला वेळ मिळत नव्हता. अशातच आज अयोध्येत एक घटना घडून गेली. सीतेची रामानं अग्नीपरीक्षा मागीतली होती.
आपल्या भावानं आपल्या भावजयची मागीतलेली अग्नीपरीक्षा. शांताला विचार येत होता. काल याच अयोध्या नगरीनं मलाही दत्तक दिलं नव्या माझ्या बापाला. माझा नवा बाप. कसा असेल, तो कसा वागवेल. याचा विचार न करता. यावर ते अयोध्यानगरीतील नागरीक.......तेही गप्प.......ती विचार करीत होती. पण ती तरी काय करणार. तशातच ती विचार करीत असली तरी आज त्या विचार करण्याला काहीही अर्थ नव्हता. काल जे काही घडलं होतं. ते विसरुन पुन्हा तिला तिचं आयुष्य नव्यानं जगणं होतं. तरीपण रामानं घेतलेली आजची सीतेची अग्नीपरीक्षा तिच्या मनाला खटकली होती. तशी ती अयोध्येत आली आणि आपल्या भावाला तिनं चांगलं खडसावलं होतं. पण राम हाही जनतेचा बांधील होता. तो जनतेवर प्रेम करीत होता. प्रजेसाठी राम आपल्या परीवाराचंही ऐकत नव्हता.
राम कर्तव्यपरायण होता. तो कर्तव्य करीत होता. त्यातच तो कर्तव्य करीत असतांना त्याच्या कर्तव्याच्या आड येणा-या त्याच्या प्रिय अनुज बंधूला म्हणजे लक्ष्मणाला त्यानं काळाशी केलेल्या अटीनुसार देहदंडाची शिक्षा दिली होती. त्यातच सीतेचीही रावणाच्या लंकेतून आणतेवेळी अग्नीपरीक्षा घेतली होती. केवळ आणि केवळ आपल्या प्रजेनं आपल्याला काहीही म्हणू नये म्हणून.
ज्याप्रमाणे राम कर्तव्यपरायण होता. त्याचप्रमाणे सीताही कर्तव्यपरायण होती. तिनंही राम अयोध्या नगरीत राज्य करीत असतांना एका परीटानं रामाला दुषण लावले हे तिच्या लक्षात आले. तेव्हा आपला पती हा निष्कलंक आहे हे लक्षात येताच ती स्वतः वनवासात गेली व वाल्मीक ऋषीच्या आश्रमात राहिली. तेथेच तिनं लव व कुशाला जन्म दिला.
आज सीता अयोध्येत पुन्हा परत आली होती. ती जेव्हा परत आली, तेव्हा रामानं तिची परत अग्नीपरीक्षा मागीतली. परंतू तशी परीक्षा न देता सीता माता भुमीत गडप झाली. त्याचं शांताला अतीव दुःख झालं. तिला वाटलं की आपल्या भावानं सीतेची परत अग्नीपरीक्षा मागून गुन्हा केलाय. तो वारंवार गुन्हा करतोय. ते पाहून शांता पुन्हा अयोध्येत आली आणि आपल्या अनुज भावावर रागावू लागली की काही काही गोष्टी ह्या प्रजेच्या मतानं करायच्या नसतात. त्या आपल्या स्वतःच्या मतानंही करायच्या असतात. तेव्हा त्यावर उत्तर देत राम म्हणाला,
"अक्का, त्यात माझा गुन्हा नाही. मी तिला वनातही पाठवले नाही. हं, हे खरं आहे की मी वेषांतर करुन राजवाड्याबाहेर शरयू नदीतटावर गेलो होतो. तिथं मी परीटांना चर्चा करतांनाही ऐकलं. त्यातच ऐकलं की राम हा चरीत्रवान कसा? तो तर एवढा निर्लज्ज आहे की रावणानं छळलेली पत्नी सुद्धा त्याला कमी आहे. अक्का, मी स्वतः ऐकले हे शब्द माझ्या कानानं. अगं प्रजाच ती. आपण कितीही चांगले वागत असलो तरी प्रजा चांगल्या गुणवानांनाही दुषणं लावायला कमी करीत नाही हे त्या दिवशी कळलं मला. मी तिथं काही बोललो नाही आणि घरी परत आलो.
प्रजेचा तो विचार. मी त्यावर विचार करीत शांत होतो. मी कुणाशी बोलत नव्हतो. कारण त्या परीटाची गोष्ट माझ्या मनाला लागली होती. काय करावं सुचत नव्हतं. वाटत होतं की प्रजेनं आपल्या कर्तृत्ववान राजाला असं बोलावं. आपण त्याची मान छाटावी. पण दुसरंही मन म्हणत होतं की नाही, प्रजा आहे ती. ती त्याा गोष्टी बोलणारच. शेवटी चूप बसलो. परंतू सीतेचं चुकलंच. सीतेनं मी बोलत नाही म्हणून वस्तीत आपला दूत पाठवला. त्यातच तिला माहित होताच ती खजिल झाली. शेवटी ती माझ्यावर प्रेम करीत असल्यानं माझ्या पतीवर प्रजेनं असा कलंक लावू नये म्हणून स्वतः वनात गेली. मी जायला परवानगी दिली नाही तरीही. त्यातच जेव्हा तिला परत घ्यायची वेळ आली. तेव्हा मी कसा घेणार! मी काही तिला वनात जा म्हटलं होतं का? मी तिला वनातून परत येतांना म्हटलं की माझं न ऐकता ज्या प्रजेचं ऐकून तू वनात गेली. आता येतांनाही त्याच प्रजेच्या मतानं ये. मला तुझं तू, तू निष्कलंक असल्याचं प्रमाणपत्र देवू नकोस. कारण मला माहित आहे की तू निष्कलंक आहेस. परंतू या प्रजेला कोण सांगणार की तू निष्कलंक आहेस. तेव्हा या प्रजेला प्रमाण दे. यात माझं काय चुकलं? बस, सीतेला राग आला आणि ती भुमीत गडप झाली मला दोषी ठरवत आणि आता तूही मलाच दोषी ठरवत आहेस. हं, मला माहित आहे की आपल्या वडीलानं एक चूक केली. ती फार मोठी चूक होती की तुला दत्तक दिलं. तू त्याचा संबंध दुष्काळी परिस्थितीशी लावला अन् आजपर्यंत हा सारा जमाना आपल्या वडीलांनाच कलंक लावत आला की दशरथानं भेदभाव केला. दुष्काळ पडतो म्हणून त्यानं दिलं कन्येला दत्तक. तसंही कन्या जन्मली म्हणून भेदभाव केला. परंतू एक लक्षात घे की तू कन्या जन्मास आली म्हणून आपल्या वडीलानं भेदभाव केला नाही, तर त्याला रोमपद राजाचं दुःख पाहावलं गेलं नाही म्हणून तुला दत्तक दिलं. त्यांना आनंद प्रदान केला स्वतः दुःख शोषून. अन् त्यांनी आपल्या आईचाही दोष स्वतःवरच ओढवून घेतला. कारण आईही तुला दत्तक दिल्यावर आपल्या वडीलांशी नीट बोलत नव्हती. तिही कलंक लावतच होती आपल्या वडीलांवर. त्यामुळंच त्यानं अनेक पत्नी केल्या. परंतू मी त्याचवेळी प्रतिज्ञा केली आपल्या वडीलांचं दुःख पाहून की मी दुसरी पत्नी कधीच करणार नाही.....मरेपर्यंत. तसेच अक्का, जर आपल्या वडीलाच्या मनात कन्या जन्माचं दुःख असतं तर त्यांनी कुकबीलाही दत्तक दिलं असतं कोणास. हं, एक मात्र निश्चीत की अयोध्येनं तुझ्या पतीकडून पुत्रकामेष्टी यज्ञ नक्कीच करवला. कारण अयोध्येला वंश चालवायचा होता. जो वंश कुकबीच्या विवाहानं चालणार नव्हता. कुकबीही विवाह करुन बाहेर जाणार होती. त्यातच अयोध्येचं अस्तित्व पूर्णतः समाप्त झालं असतं.
आज सीता गेली मला सोडून. ज्या आपल्या माता कौशल्यानं आपल्या पित्यावर तुला देतांना दोष लावला. तसा दोष आज सीतेनंही माझ्यावर लावलेला आहे. तो दोष जनतेला तर दिसतच नाही. व्यतिरीक्त तू बहिण असून तुलाही दिसत नाही. तूही मलाच बोलतेय. परंतू एक लक्षात घे अक्का की यात माझा दोष अजिबात नाही."
राम जे बोलायचं, ते बोलून गेला खरा. त्या बोलण्यातून शांताचे डोळे उघडले. पुढे तिच्या मनात रामाबद्दल अपार श्रद्धा निर्माण झाली. आपला भाऊ हा खरा आदर्श पुत्रच नाही तर आदर्श पतीही आहे असं तिला वाटायला लागलं. त्यातच तो आदर्श भाऊ आणि आदर्श राजाही आहे असं तिला वाटायला लागलं. त्यातच आता रामाबद्दलची तिच्या मनातील असुया जावून ती त्याचा उदोउदो करु लागली. आता तिच्या मनातून अयोध्येबद्दलचा राग पुरता मावळला होता. तसेच आता ती आपल्या वडीलालाही आदर्श मानत होती रामासारखी. कारण आता तिला वाटत होतं की राजा दशरथानं म्हणजे आपल्या पित्यानं आपल्यावर अन्याय केलेला नाही तर न्यायच केलेला आहे. आपण जर या राज्यात असतो तर आज आपण एका राज्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेवू शकलो नसतो. त्यांच्या दत्तक देण्यानंच आपल्याला अंगदेशाचं स्वतंत्र्य राज्य चालवायला मिळालं आहे. आपले वडील हे स्री पुरुष भेद करणारे नव्हते. कारण तसे जर असते तर त्यांनी कुकबीलाही दत्तक दिलं असतं. तसेच त्यांनी माझ्या जन्माच्या बाबतीत दुष्काळ पडल्याचाही भेदभाव केला नसेल. तसं दाखवलं असेल जनतेला की जनतेनं मला रोमपद राजाला दत्तक देतांना विरोध करु नये.
तिला आता तिच्या विचारातील सत्य समजलं असलं तरी आज ते समजायला तिचा बाप जीवंत नव्हता. आई जीवंत होती. पण तिही आज अगदी म्हातारी झाली होती.
शांताला तिच्या आईची आठवण आली. तशी ती धावतच आईजवळ गेली. तिची आई आजारी असून अंथरुणावर पहूडली होती.
शांतानं आईला पाहिलं. तशी ती धावतच आईजवळ गेली. तिच्याजवळ बसली व आई म्हणत हुंदके देत रडू लागली. तशी हळूच डोळे उघडत कौशल्या म्हणाली,
"कोण?"
"मी......मी शांता. तुझी मुलगी."
"तू शांता. माझी मुलगी. बेटा, आलीय तू. तुला भेटण्याची फार मोठी इच्छा होती. ती माझी इच्छा आज पूर्ण झाली. आता मी सुखानं डोळे मिटेल."
कौशल्याचे ते शब्द. शांताला अगदी हायसं वाटत होतं. कारण कालपर्यंत तिला अयोध्या नगरीनं पराया केल्याचा भाष होत होता. परंतू आज रामानं तिचे डोळे उघडताच तिला आज अयोध्या नगरी आपलीशी वाटत होती. आज तिच्या मनात अयोध्या नगरीबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं.
****************************************

शांता काही दिवस अयोध्येत राहिली. त्यातच याच दरम्यान कौशल्यानं आपला देह मृत्यूदेवतेस समर्पीत केला. तसं पाहता ती कौशल्याच्या मृत्यूनंतर अयोध्येतून अंगदेशात रवाना झाली. त्यानंतर ती आपल्या राज्यात रममाण झाली. पुन्हा ती परत अयोध्येत आली नाही.
आज ती म्हातारी झाली होती. परंतू तिला आजारानं ग्रासलं नाही. ती शेवटपर्यंत धडधाकटच राहिली. पुढं तिनं आपला राजपाट आपल्या मुलाच्या हाती सोपवला व ती जंगलात जावून राहू लागली. त्यातच अंतिम समयी त्याच जंगलात तिनं अंतीम श्वास घेतला. आजही हिमालयातील कुल्लूच्या त्याच निसर्गरम्य अशा ठिकाणी तिचं मंदिर डौलात उभं आहे. हे मंदिर कुल्लूपासून अगदी पन्नास किमीच्या अंतरावर आहे. ते मंदिर आजही जणू तिच्या अस्तित्वाची साक्ष देते. (बालकांड सर्ग ११ श्लोक २,३,४,५)
आज शांता जगात नाही. ती काळाच्या ओघात लोकांच्या नजरेआड गेली. त्यातच तिला लोकं विसरलेही. तसंच कुकबीचंही झालं. त्यातच रामाला मानणारी मंडळींना रामाला दोन बहिणी होत्या हेही माहित नाही. पण काळाला माहित होतं की रामाला दोन बहिणी होत्या. एकीचं नाव शांता होतं तर दुसरीचं नाव कुकबी. त्या कालांतरानं लोकांना माहित झाल्या आणि ज्यांना माहित नाही झाल्या असतील त्यांनाही त्या माहित होतीलच. तशाच माहित होतील त्यांच्या वेदना. ज्या वेदना त्यांनी शोषल्या.
काळाच्या
शांतानं शोषलेल्या वेदना. तिला एक चांगला पिता जरी मिळाला असला तरी ख-या पित्यापासून झालेली तिची आबाळ आजही या युगात वाखाणण्यासारखी आहे. आज शांता अस्तित्वात नाही. कुणी रामायण घडलंच नाही असंही म्हणतात. पण असं जरी असलं तरी शांतेसारखी गोष्ट आज विपरीत परिस्थीतीत वास्तवात घडत असते. फरक एवढाच की त्या काळात अापली मुलगी कोणाला दत्तक दिल्यास नावबोटं ठेवली जायची. मग तो राजा का असेना, अन् आज सर्रासपणे काही लोकं आपली मुलगी दत्तक देतात. कारण आजच्या काळात काही मुली नाजायज मुलं पैदा करतात. काही मुली कुवारपणी आपलं कौमार्य विकतात. त्यातून निर्माण झालेली संतती आपली बदनामी होवू नये म्हणून दुस-यांना विकणं भाग पडते. नाहीतर आपली बदनामी होते.
शांताही अशीच दिली गेली दत्तक. त्यात विकणं हा प्रकार नाही. परंतू जे शांताच्या वाट्याला दुःख आलं. जे दुःख तिनं शेवटपर्यंत झेललं. ते दुःख आज समाजात येवू नये. याचा विचार शांता करीत होती. त्याच भावनेतून ती आपल्या भावाला म्हणजे रामाला बोलली होती. तिला आईची माया काय होते ते माहित होतं. म्हणून की काय सीता पृथ्वीत अदृश्य होताच म्हणजे सामावताच तिच्या बाळांना म्हणजे लवकुशांना आईची माया कोण देईल असं तिला वाटत होतं. परंतू सीता भुमीत सामावल्यानंतरही रामानं आपल्या मुलांना अंतर दिलं नाही. त्यानं स्वतः हाच माय व बाप बनून लेकरांचा सांभाळ केला. कारण शांतानं त्याला तेच सांगीतलं होतं.
आज शांता जगात नव्हती. ती रामाच्या अवतार संपविण्यापुर्वीच पृथ्वी तलावरुन निघून गेली होती. परंतू रामाला अजूनही तिचे शब्द आठवत होते. अन् आठवत होतं तिचं मार्गदर्शन. त्यातच ती आपल्याजवळच साक्षात उभी आहे असंही वाटत होतं.