date in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | तारीख

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

तारीख

मनोगत

'तारीख' ही पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही कोर्टातील मजकूरावर आधारीत पुस्तक असून या पुस्तकातून एवढाच संदेश दिला आहे की भांडणं करु नये वा कोणावर विनाकारण आरोप लावू नये. कारण त्याची परीयंती ही वाईट होत असते.
'तारीख' या पुस्तकात शर्मीला व सुगत अशी दोन पात्र मी उभी केलेली असून या पुस्तकानुसार शर्मीलानं सुगतवर एक आरोप लावला. त्याची परीयंती म्हणजे त्यांच्यावर कोर्टात येण्याजाण्याची तारीख लागली. या तारखेवर येणेजाणे करीत असतांना सुगत आणि शर्मीलाला भयंकर त्रास झाला.
या तारखेच्या संदर्भानं आणि पुस्तकाच्या संदर्भानं शर्मीलानं कोणता आरोप लावला होता? सुगतचं शेवटी काय झालं? शर्मीलाचंही काय झालं? तसेच त्यांचा जीवनप्रवास कसा चालला? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ही पुस्तक वाचावी लागेल. तेव्हा आपण वाचक या नात्यानं ही पुस्तक वाचा व या पुस्तकाच्या रुपानं न्यायाचा मतीतार्थ समजून घ्या एवढीच आपणाला विनंती.
आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

TARIKH (kadambari)
तारीख(कादंबरी)
प्रकाशक सौ. निर्मला शिंगाडे
लेखक अंकुश शिंगाडे १२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५ मो नं ९३७३३५९४५०
प्रथमावृत्ती २६/०१/२०२२
मुल्य ८० ₹
मुखपृष्ठ कु. अनुष्का
न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या सानथोरास सादर समर्पीत

तारीख (कादंबरी)

आज त्याला दुःख वाटत होतं. त्याचं मनही दुःखी होतं. त्याला वाटत होतं की आपण असे कोणते पाप केले की आपल्या वाट्याला असं दुःख यावं. तसं दुःख आज त्याच्या जीवनात होतं.
तो तसा विचार करीत होता. त्याचं कारणंही तसंच होतं. ते कारण म्हणजे कोर्टाचे चक्कर. तारीख वर तारीख करीत अगदी तरुण वयापासून तो कोर्टाचे चक्कर काटत होता. मात्र आज त्याला नाकी नव येत होतं. सुगत नाव होतं त्याचं.
ते एक गाव. त्या गावात केवळ द्वेष करणारी माणसं राहात होती. गावात कोणी शिकलेलं नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे त्या गावात सरपंचाची हुकूम होती. त्यामुळे शिकणं फिरणं हे त्याच्याच हातात होतं.
गावात एक सरपंच होता. त्याचं नाव चंद्रभान होत. तो आपल्या मुलांना तर शिकवीत नव्हता. त्यातच इतरांनाही शिकू देत नव्हता. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे हे जणू त्याला माहितच नव्हतं.
त्याचं कारणहीतसंच होतं. त्याचा एक मुलगा शालान्त पास झाल्यानंतर शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात गेला होता. तिथं रॅगींगच्या धाकानं त्यानं आत्महत्या केली होती. म्हणून तो इतरांनाही शिकू देत नव्हता. ते जर शिकले तर तो त्यांचा द्वेष करीत असे व आरोप प्रत्यारोप लावून त्याची नोकरी घालवत असे. अशा कितीतरी जणांच्या त्यानं नोक-या घालवल्या होत्या.
सुगतचं लहानपण अगदी आनंदात गेलं. लहाननपणी मुलांसोबत खेळतांना त्याला फार आनंद वाटत असे. तो त्याचा आनंद गगणात मावत नसे. ते फुलपाखरु पकडणे आणि त्या भाजीपाल्याचा खेळ खेळणे यात त्याला आनंद वाटत असे.
सुगत लहानपणी टरोट्याची लहान लहान रोपं उपडायचा. त्याच्या जुळ्या बांधायचा. त्यातच पावडरचे डबे गोळा करुन त्याची बैलगाडी बनवायचा. त्या बैलगाडीस लाकडी बैल जुंपायचा आणि त्या बैलगाडीला दोरी बांधून त्यावर भाजीपाला ठेवून ती बैलगाडी तो ओढत न्यायचा.
ते लहानगं वय. त्या वयात त्याला बाजारपेठही माहित झाली होती. ती बाजारपेठ.......त्या बाजारपेठेत तो माल उतरवायचा. त्यातच तो माल त्या बाजारपेठेत भाजी$$ भाजी$$ करीत विकायचा. त्याचे तो पैसे घ्यायचा. पण ते खरे पैसे नव्हते तर ते वर्तमानपत्राच्या कागदाचे फाडलेले पैसे असायचे.
सुगतचं बालपण हे अगदी रम्य असं होतं. ते बालपण सरत चाललं होतं. तसं पाहता त्याला मोठेपण आवडत होतं. कारण त्या बालपणात कोणतेही खेळ खेळतांना माती अंगाला लागत होती. त्यातच त्याची आई ओरडायची. बापही वेगळा ओरडायचा आणि बहिणीही.
सुगतला तीन बहिणी होत्या. मोठ्या बहिणीचा विवाह झाला होता. ती सासरी नांदत होती. मात्र त्याला मोठी बहिण आहे हे माहितच नव्हतं. कारण मोठ्या बहिणीचा जेव्हा विवाह झाला, तेव्हा तो अगदी लहान होता. तो विवाहही त्याला आठवत नव्हताच.
सुगतच्या वडीलाकडे शेती होती. शेतीवर जातांना त्याला फार मजा वाटायची. ती शेती त्याला करणं आवडायचं. शेतीचं बाळकडू अगदी अल्प वयात तो पित होता. त्यातच ते बाळकडू पितांना त्याला शेतक-यांचं जीवन माहित नव्हतं.
दररोज सकाळी उठून शेतावर जाणे व शेतातच शौच करणे ह्या सुगतच्या नित्याच्याच गोष्टी. एकदा शेतावर गेल्यानंतर शौचास बसले असता त्याला भल्लामोठा काळा काळ नाग दिसला. सुरुवातीला त्याला त्याची भीती वाटली नाही. परंतू क्षणभर थांबताच त्याला आठवलं की डोम्या नाग हा माणसाचा पाठलाग करतो. त्यातच त्याची घाबरगुंडी उडाली व तो तेथून जीव मुठीत घेवून पळाला. त्यातच त्याला जीव वाचल्याचा आनंद झाला.
सुगत लहानपणापासूनच घडत होता. त्याची आई चार वर्ग शिकली असली तरी जमीन्यानुसार ती अडाणीच होती. तसेच बाप एकही वर्ग शिकलेला नव्हता. परंतू शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात हौस होती. लहानपणच ते......सुगतला मस्त्या करणं आवडत होतं. परंतू जसजसा तो मोठा होत गेला. तसतसा तो समजदारही होत गेला.
सुगत शिकायला हवा असं त्याच्या बहिणींना वाटत होतं. त्याची मोठी बहिण सातवी शिकली होती. ती पाहायला सुंदर असल्यानं तिचं लहान वयातच लग्न झालं. तशी बालविवाहाची प्रथा अस्तित्वात असल्यानं अगदी बालवयातच सुगतच्या मायबापानं आपल्या लेकीचा विवाह केला. परंतू दुसरी विवाहयोग्य झाली असली तरी ती विवाहास तयार नसल्यानं ती शिकत राहिली. तिची अती शिकण्याची इच्छा होती. कारण ती अति हुशार होती. शाळेत तिचा दरवर्षी पहिला क्रमांक यायचा. पण दुर्दैव.......दुर्दैव असं की ती दहावीला नापास झाली.
दहावीची परीक्षा.......फार कठीण राहायची ती परीक्षा. हुशार हुशार मुलंही ती परीक्षा पास होत नसत. त्यातच खेड्यातील ती शाळा. त्यातच त्या काळात शिकवणी वर्गही नव्हते. तसेच ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात शिक्षक शिकवितही नव्हते.
बाकी विषयाचा अभ्यास करतांना तेवढा अभ्यास करावा लागत नसे. परंतू इंग्रजी, गणितातच मुलं जास्त नापास होत असत. इंग्रजीचा अभ्यास प्रश्नोत्तर पद्धतीचा होता. ते प्रश्न पाठांतरच करावी लागायची. तरीही पेपर सोडवितांना ते आठवत नसत. त्यातूनच मुलं नापास होत आणि जी हुशार मुलं नापास होत. ती मुलं आत्महत्याही करीत असत.
दहावीची परीक्षा पास करणं ही सत्वपरीक्षा होती. त्यातच त्याची दुसरी बहिण फारच हुशार होती. ती पास होणारच याची शाश्वती होती. शिक्षकांनाही तिच्याबाबत शाश्वती वाटायची. त्यातच तीन पेपर झाले आणि काय आश्चर्य. त्याच्या दुस-या बहिणीचा ऐन परीक्षेच्या काळात हात मोडला तोही उजवा. ज्या हातानं ती पेपर लिहू शकणार होती, तोच हात. ती पेपरला जायची. परंतू तिला पेपर लिहिता येत नव्हता. पेपरचे सर्व प्रश्न ती वाचायची. तिला त्याची उत्तरं यायची. परंतू हात मोडल्यानं तिच्यासमोर उपाय उरला नाही. त्यातच कशीबशी परीक्षा संपली. तशी ती फार खजील झाली होती व आपल्या नशीबावरच पश्चाताप करीत होती. कारण ती नापास होणार होती.
अतिशय हुशार असलेली त्याची बहिण. ती परीक्षेत आपल्या दुर्दैवानं नापास झाली. तिला फार वाईट वाटलं. त्यातच ती परीक्षेला बसली नाही. तिला बसावसं वाटलं नाही. मात्र तिनं स्वप्न पाहिलं होतं उच्च शिक्षणाचं. मी जरी शिकली नसेल, तरी कोणाच्या रुपानं तरी ते स्वप्न पुर्ण करणार.
दुसरी बहिण नापास होताच कामाला लागली होती. तिच्या काही मैत्रीणी पास झाल्या होत्या. मात्र त्या बारावीत नापास झाल्या. कारण बारावीही पाहिजे तेवढी सोपी नव्हतीच. त्यातच काही मैत्रीणीचे विवाहही झाले. त्यातच तिलाही दोनचार ठिकाणचे वर आले. परंतू ती नकार द्यायची.
मायबापाची इच्छा तिचा विवाह करण्याची होती. परंतू ती नाही म्हणायची. मायबाप जबरदस्तीनंही विवाह करु शकत होते. परंतू ती त्यांच्याकडे नाही टिकली तर.....मायबापालाही प्रश्न पडत होता. त्यातच लहान बहिण दहावीला गेली.
लहान बहिण....... सायंकाळी शाळेतून आल्यावर मायबाप व बहिणीचा आणि भावाचा स्वयंपाक करायची आणि रात्रभर अभ्यास करायची. ती पास होईल असं मधल्या बहिणीला वाटत होतं. तिला तरी आपण शिकवू असंही तिला वाटायचं. पण तिही दहावी परीक्षा नापास झाली होती. त्यामुळं मधल्या बहिणीच्या अपेक्षा फोल ठरल्या होत्या. त्यातच आता तिनं आपल्या भावाला शिकवू असा विडा उचलला होता.
भाऊ लहान होता. तो शिकत होता. परंतू त्याला दहावीला जायला बराच वेळ होता. तो आता चवथीत शिकत होता. त्यातच बहिणीचं वय वाढत चाललेलं. अशातच एक मुलगा पाहायला आला व तिचा विवाह पार पडला. त्यातच लहान बहिणीचाही दुस-याच वर्षी अगदी अल्प वयात विवाह झाला.
तीनही बहिणीचे विवाह होताच लहान भाऊ सुगत आपल्या मायबापासोबत राहात होता. तोही अभ्यासात हुशार होताच. परंतू त्याच्याबाबत मधली बहिण विचार करायची की तो जर या ग्रामीण भागात राहिला तर उद्या तो शिकू शकणार नाही. कारण हा ग्रामीण भाग. या भागात शिक्षणाची आबाळ होते. शेवटी तिनं तसा विचार करुन लहान बहिणीचा विवाह होताच सुगतला आपल्या मोठ्या बहिणीच्या पाठीमागं लागून सुगतला शहरात शिकायला आणलं. आता सुगत शहरात शिकण्यासाठी आला होता.
मधली बहिण. तिचं नाव सुजाता होतं. सुजातानं आपल्या वडीलाची परीस्थीती अतिशय जवळून पाहिली होती. त्यामुळं तिला आपला भाऊ शेतीत खपू नये असं वाटत होतं. त्यासाठीच ती त्याला शिकवीत होती.
सुगत आज मोठा झाला होता. त्याला एका शाळेत नोकरी लागली होती. त्यातच सुजाताला आनंद झाला होता. कारण तिचं स्वप्न होतं उच्च शिक्षण घेवून शिक्षीका व्हायचं. ते स्वप्न आज सुगतनं पुर्ण केलं होतं.
सुगतला शेतक-यांबद्दल कळवळा होता. एकदा असंच आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात घेतलेला सहभाग त्याला आठवत होता.
शेतकरी आंदोलन आज जवळपास काही दिवसापासून म्हणजेच एक वर्षापासून सुरु होतं. यातच या आंदोलनातून काही हिंसक गोष्टीही घडल्या होत्या. जवळपास ७५० शेतकरी बळी या आंदोलनानं घेतले होते. तसेच दहा हजार जणांवर खटलेही दाखल झाले होते. आजही दिल्लीच्या मैदानावर टिकेत नावाच्या शेतकरी नेत्याच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन करीत होते. या आंदोलनाला चिरडण्याचं काम सरकार करीत असल्याचं चित्र दिसत होतं. त्यातच शेतकरी आपलं आंदोलन मागं घेत नाहीत असा विचार करुन, तसेच उत्तरप्रदेशसह पाच राज्याच्या निवडणूका विचारात घेवून पंतप्रधान साहेबांनी आपला हात आवरता घेत बार उडवला की मी शेतक-यांच्या हितासाठी नाही तर देशहितासाठी आपलं मत परत घेत आहो. अर्थात 'मैने किसानों के लिए किया था। देश के लिए वापिस ले रहा हूँ।' त्यावेळी ते अत्यंत निराश दिसले. जणू त्यांनाच अतिव दुःख झालं. त्यानंतर या देशात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. कोणी त्या निर्णयाला चांगलं म्हटलं. कोणी मोदींसह नाराजीही व्यक्त केली होती.
शेतकरीही खुश झाले. त्यांनाही हायसं वाटलं. कारण ते शब्द मोदी साहेबांचे होते. इतर कुणाचेही नव्हते. परंतू क्षणातच शेतक-यांचं डोकं ठणकलं की ही फक्त घोषणा आहे. प्रत्यक्ष कायदे रद्द झालेच कुठे? त्यानंतर याबाबत पंजाबमध्ये या आंदोलनात सक्रीय असलेल्या एकुण बत्तीस शेतकरी संघटनांनी यावर विचार मंथन केलं आणि ठरवलं की या सरकारवर कोण विश्वास ठेवणार. जे शब्द तर बोलतात. परंतू ते खरे करुन दाखवत नाहीत. आपण शेतकरी आंदोलन मागं घ्यायचं नाही.
त्यांचंही बरोबरच. कारण मोदीसाहेब गादीवर येण्यापुर्वी त्यांनी काळेधन परत आणू असं आश्वासन जनतेला दिलं होतं. परंतू काळं धन अजूनही परत आलं नव्हतं. हं त्यांनी काही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या होत्या, पहिली म्हणजे अयोध्या बाबरी वाद सोडवला होता व दुसरा म्हणजे काश्मीरचा वाद सोडवला होता. त्यातच ट्रिपल तलाक ही देखील गोष्ट चांगली केली होती. त्यातच त्यांना वाटलं की आपण शेतक-यांच्या जगण्यावर प्रयोग करुन पाहावा. त्यातच त्यांनी शेतक-यांना विश्वासात न घेता कृषी कायदे बनवले व ते पारीत करण्यासाठी संसदेत मांडले. परंतू ते पारीत होणार. एवढ्यात गोष्ट फुटली व शेतकरी आंदोलन सुरु झालं.
सुधारणा व्हायला हवी असं आज सुगतला वाटत होतं. पण त्या सुधारणा केवळ सरकारनं करायला हव्या नाही तर त्यासाठी जनमत चाचणीही घेणं गरजेचं असं त्याला वाटत होतं. यात शेतक-यांच्या म्हणण्यानुसार सरकारनं जनमत चाचणी घेतलेली नव्हती. सरकारनं म्हणणं असं की शेतक-यांची हालत सुधारायला हवी. त्यासाठी त्यांच्या मालाचं खाजगीकरण व्हायला हवं. याचाच अर्थ असा की त्यांचा माल सरकारनं विकत न घेता तो माल एका खाजगी कंपनीनं विकत घ्यावा. जो उद्योगपती या खाजगी कंपनीचा मालक असेल.
सरकारनं यावर एक चांगला विचार केला. त्यांना वाटलं की जी खाजगी कंपनी असेल, त्या कंपनीचे मालक हे शेतक-यांना जास्त पैसा देतील. ज्या पैशानं शेतकरी मालामाल होवू शकतील. ते शेतक-यांना फायदेशीर होईल. परंतू ते जरी खरं असलं तरी हा खाजगी कंपनीचा मालक हा शेतक-यांना जास्त पैसा देणार काय? कोण शाश्वती देईल याची. एकदा कायदा बनला तो बनला. त्यात पुढे फेरबदल संभव नाही. हाच प्रश्न होता शेतक-यांचा. म्हणूनच शेतकरी आंदोलनावर बसले होते . त्यासाठी त्यातील सातशे पन्नास शेतकरी आंदोलनादरम्यान शहीदही झाले होते .
सुगत लोकांना सांगायचा की वरील शेतक-यांचं आंदोलन पाहता सर्वांना ब्रिटिश काळाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. ब्रिटिश काळात ब्रिटिश कायदेमंत्री कायदे बनवायचे. त्यासाठी ते जनमत विचारात घ्यायचे नाहीत आणि ते कायदे जनतेवर थोपवीत असत. आजही तीच परिस्थीती जणू दिसत आहे. सरकारी मत तशाच स्वरुपाचं. फक्त सरकार बदलली आहे. काही कायदे हे ब्रिटीशांचेही चांगले होते. जसा सतीप्रथा बंदीचा कायदा. विधवा विवाहाचा कायदा. परंतू काही कायदे नक्कीच चांगले नव्हते. आजही काश्मीर प्रश्न, अयोध्या प्रश्न झटक्यात सोडविणारं सरकार. या सरकारवर लोकांनी अगदी डोळे लावून विश्वास ठेवला. परंतू आज मात्र या अशा निर्णायक जिद्दीमुळं सरकारवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला दिसून येत आहे. सुधारणा करीत असतांना त्या सुधारणा जर रास्त स्वरुपाच्या असतील तर सरकारनं त्या सुधारणा नक्कीच कराव्या. पण ज्या सुधारणा जनतेला मान्य नाहीत. त्या सुधारणा करु नये. तसेच ज्या सुधारणांतून लोकांचा जीव जात असेल, अशाही सुधारणा सरकारनं करु नयेत. त्यापेक्षा जैसे थे परीस्थीती ठेवावी यातच सरकारचं हित असेल यात दुमत नाही आणि जर या सरकारनं जनतेचा विचार न करता केवळ सुधारणांच्या नावाखाली सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाच तर सरकारवरील जनतेला विश्वास कमी होईल व सरकारला जनता धडा शिकवेल. म्हणून सरकारनंही एक पाऊल मागे टाकत शेतकरी कायदे मागे घ्यावे. कारण त्यात जनतेचाच नाही, शेतक-यांचाच नाही तर सरकारचाही फायदा आहे.
सुगतचं बोलणं अगदी रास्त होतं. कारण थोड्याच दिवसात ते विधेयक संसदेत सादर झालं व संसदेतून ते विधेयक रद्दबादल ठरविण्यात आलं.
सुगत शालान्त परीक्षेला बसला होता. जी शालान्त परीक्षा अगदी कठीण वाटत होती. ती पास करणे मुश्कीलीचे काम होते. त्यातच सुगतला ती पास होईल का ही भीती होती. परंतू तो ती परीक्षा पास झाला होता.
सुगत शालान्त परीक्षा पास झाला. तसा त्यानं अकरावीला प्रवेश घेतला. तो अकरावीत असतांना मन लावून अभ्यास करीत होता. त्यातच त्याला त्याचा बाप आवडत होता. जो बाप शेतात अहोरात्र काम करीत होता. तसा तो बारावीही पास झाला आणि त्याचा नंबर शिक्षकी प्रवेशाला लागला.
सुगतनं शिक्षकाचीही परीक्षा पास केली व तो एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरीलाही लागला. त्यातच त्यानं त्याच्या मधल्या बहिणीचं स्वप्न पुर्ण केलं. त्याचा त्याला आनंद झाला. परंतू दुर्दैव असं की ती त्याची नोकरी त्याला अतिशय वेदना देणारी ठरली.
सुगत गावातील एक हुशार मुलगा. त्यातच तो गावातील एकमेव मुलगा होता की तो नोकरीला लागला होता. त्यातच तो गरीब शेतक-याचा मुलगा होता. सुगतच्या मायबापाची परीस्थीती अगदी बेताचीच होती, जेव्हा तो शिकत होता. त्यानं उच्च शिक्षण घेवू नये असं गावातील प्रत्येकाला वाटत होतं.
ते गाव सुसंपन्न असं गाव होतं. गावात धनधान्य पैसा आडका भरपूर होता. दुधदुभतंही भरपूर होतं. गावात शेतीही होती. त्यातच लहानसं गाव असल्यानं प्रत्येकाकडं जास्तीत जास्त शेती होती. दोनचार शेतकरी जे गरीब होते, त्या शेतक-यांकडे अल्प शेती होती. ज्या शेतीनं पोट भरत नव्हतं.
गाव सुसंपन्न जरी असलं तरी गावात शिकलेले तरुण कोणीही नव्हते. प्रत्येकजण दहावी पर्यंत शिकत असे व दहावी नापास होताच ते शेतातील कामावर जात असत किंवा कोणतीही मोलमजूरीची कामं करीत असत. ते उच्च शिक्षणाचं ध्येय ठेवून शिकत नसत. त्यातच सुगत शिकत गेला. तो उच्च शिक्षीत झाला. त्यातच अख्खं गाव त्याच्या शिकण्याबरोबर त्याचा द्वेष करायला लागलं.
आज गावात शिकलेला एकच तरुण होता. तो म्हणजे सुगत. सुगतनं शिकू नये असं गावाला वाटत असे. त्यातच त्यानं त्यांच्या मुलासारखं गावात कामावर जावं असं इतर गावक-यांना वाटत होतं. त्यातच सुगत शिकला हे गावक-यांना खपत नव्हतं. तशी त्याला लागलेली नोकरीही गावक-यांना आवडली नाही व गावानं त्याला बदनाम करण्याचं ठरवलं.
गावानं त्याला बदनाम करायचं ठरवताच गावानं एक योजना आखली. त्याला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवावं.
गावानं तसा विचार करताच गाव ती संधी शोधू लागलं. त्यातच त्याला कोणत्या गुन्ह्यात अडकवावं याचीही योजना बनवू लागला. तशी एक योजना गावक-यांच्या मनात आली व ती अंमलात आणण्यासाठी गाव प्रयत्न करु लागलं. गावाला वाटत होतं की जर सुगत अशा गुन्ह्यात अडकलाच तर सुगतची नोकरी सुटेल व तो गावातच इतर मुलांसारखा शेतीच्या कामावर जाईल. गावानं तसं ठरवताच गाव त्याला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवायला लागला होता. त्यांना त्याच्या संसाराची व कार्यकौशल्याची किंचीतही तमा नव्हती.

****************************************

शर्मीला....... गावातील एक मुलगी. मुलगी पाहायला तेवढी देखणी नव्हती. ती काळी सावळी होती. तिला पाच बहिणी होत्या. मुलगा वंशाचा दिवा असतो अशी तिच्या आईवडीलाची इच्छा. त्यातच मुलाच्या जन्मासाठी आस बाळगून त्यांनी एका मागून एक पाच मुली होवू दिल्या. शर्मीला त्यातील एक.
शर्मीला त्यावेळी नववीत होती. ज्यावेळी सुगत शिक्षक बनला होता. तसं त्याचं गाव तो शिक्षक बनल्यानं द्वेषच करीत होतं.
गावातील लोकांनी विचार केला. कोणत्यातरी गावातील मुलीचं लचांड सुगतच्या जीवनाशी लावावं. त्यानं तिची छेडखाणी केली असा आरोप त्याचेवर लावावा. त्याची रितसर पोलिस तक्रार करावी. तक्रार पोलिस स्टेशनला गेल्यास व गुन्हा सिद्ध झाल्यास सुगतची नोकरी सुटेल व सुगत आपल्याच गावात मजूरीला लागेल. नोकरी करु शकणार नाही.
गावानं विचार केला. तशी ते ती मुलगी शोधू लागले. त्यातच त्यांना ती शर्मीला नावाची मुलगी सापडली. जिच्या घरी त्या पाच बहिणी व मायबाप असे धरुन सात जीव होते. घरची परीस्थीती बेताचीच होती. त्यातच गावानं विचार केला की समजा त्यांचा कट फसला तर त्याला तिच्याशी विवाह करायला लावावं.
गावात काही प्रतिष्ठीत माणसंही होती. ती माणसं विचार करीत होती. त्यांना त्याच्या विचार शैलीतून शर्मीलाचं घर आठवलं. तसं पाहता ते शर्मीलाला तयार करण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यातील एकजण शर्मीलाच्या बापाला म्हणाला,
"भावराव, नमस्कार. आम्हाले एक काम हाये बा तुमच्याशी."
शर्मीलाच्या वडीलाचं नाव भावराव होतं. तो आश्चर्यचकीत झाला होता. कारण सकाळी सकाळी सरपंच आपली चारपाच तरणीताठ माणसं घेवून त्याच्या घरी आला होता. तसा भावराव उठला व हात जोडत म्हणाला,
"बोला न जी, काय काम हाये ते सांगा. मी पटकन करुन टाकीन एका झटक्यात काम. बोला, बोला."
"भावराव, काम असं तसं नाय. लय रिस्क हाय त्या कामात. तुले तुह्या पोरीची बली द्या लागन."
भावरावनं बली शब्द ऐकला. तो आश्चर्यचकीत झाला. तसा त्याला त्या सरपंचाचा भयंकर राग आला होता. परंतू संयम ठेवत तो पुन्हा म्हणाला,
"अजी बली म्हणता. अन् ते बी मा लेकीची. नाय जमणार जी. नाय जमणार. मले पोरी झाल्या म्हून का मी त्याईचा जीव घेवू."
"भावराव, बली म्हंजे जीव नगं."
"मंग का हाये तं बाप्पा."
"अरे, तुह्याच पोरीच्या जीवनाचं लय झ्याक होईन."
"म्हंजे? मी समजलो नाय."
"मी समजावून सांगतो."
असं म्हणत सरपंच त्याला आपली योजना समजावून सांगू लागला.
"त्याचं काय हाये भावराव. तुले पाच पोरी हाये नं."
"होय. पाच पोरी."
"अन् तुले माहित हाये नं त्या श्याम्याच्या पोराबद्दल."
"हो,माहित हाये."
"बस, आपल्याले त्या श्याम्याच्या पोरासोबत तुह्या पोरीचं लगट जमवायचं."
"म्हंजे?"
"अरं, तुह्या पोरीची छेडकानी केलाी असा आरोप लावाचा त्या सुगतच्या पोरावर."
"सरपंच, का बोलता तुम्ही. तुम्हाले भान तरी हाय का?"
"अरे तं भावराव, रागावतेस कायले.त्यात तुह्याच फायदा हाये म्हणावं."
"कसला फायदा?"
"तुह्यीच पोरगी खपन एक. तसा सुगत लय चांगला पोरगा हाय. त्याले वेसन नाय कोणतं."
"पण मा पोरीची बदनामी."
"तुह्या पोरीची बदनामी. बरोबर हाये गोष्ट तुह्यी. पण एक इचार कर का तुह्या पोरीची बदनामी होईन. पण त्या सुगतचीबी होईन न बदनामी. याचा इचार नाय केला का तू. अन् त्याची बदनामी झाल्यावर तो लगन नाय का करन तुह्या पोरीशीन. आपुन लगनाचा प्रस्ताव ठेवू. म्हणू लगन कर नायतं केस टाकू. अन् केस मागच घेणार नाय. त्याची बदनामी होईन अन् तो बदनामीच्या धाकानं तुह्या पोरीशीन लगन करन. पाय इचार कर. दोनही बाजूनं फायदा तुह्याच हाये."
सरपंच जे बोलायचं ते बोलून गेला. तसा भावराव विचार करु लागला. तसा विचार करुन तो म्हणाला,
"ठीक आहे. पण माह्या पोरीले समजावून सांगन कोण? अन् आपली जात येगळी अन् त्याची येगळी."
"जातीचं का घेवून बसलास भावराव. जग चंदरावर गेलं. लोकं शिकू लागले हायेत. हं, आपून आपले पोरं नाय शिकवत तो भाग येगळा. तशी सोय बी नाय हाये नं गावात. तुले तं माहित हाये."
"पण मा पोरीले समजवन कोण?"
"हं, भावराव, ते मातर तुच करायचं. ते आम्ही करु शकणार नाय. पोरगी तुह्यी ना. मंग तुच करायचं. प्रश्न मिटला. हं, फायदा दोनबी बाजूनं तुह्याच हाये समज."
भावराव जे समजायचं ते समजला. तसं त्यानं ठीक आहे म्हटलं व सरपंच तेथून निघून गेला.
सरपंच निघून गेले. तसं भावरावनं आपल्या मुलीला म्हणजेच शर्मीलाला बोलावलं. तसा भावराव म्हणाला,
"बेटा, मले तुह्याशीन एक गोष्ट बोलाची हाये."
"कोणती गोष्ट बाबा?"
"बेटा, तू आयकशीन."
"हो, सांगा बाबा."
"तू सुगतले वळखतेस नं."
"हो, तो श्यामराव काकाचा पोरगा नं."
"हो बेटा."
"लय शिकला नं तो."
"हो बेटा."
"पण बाबा, तुम्ही मले असं का इचारता?"
बेटा, त्याचं असं हाय का तुले एक कामगीरी सोपवायची हाये."
"कोणती कामगीरी बाबा?"
"सुगत गावात येणार हाये. तो मास्तर बनला हाये. पण त्याचं मास्तर बनणं गावाले आवडलेलं नाय. तवा तू त्याले रस्त्यात अडवाचं एकटा पाहून. आन् आरोप लावाचा का त्यानं तुही छेडखाणी केली म्हून."
"बाबा, तुम्ही हे का बोलून रायले. तुम्ही बाप व्हा माये का अजून कोणी. तुम्हीच मले जन्म देला नं वं."
"बेटा, मी मजबूर हाये. मायं ऐक थोडंसं."
"कसे मजबूर हात. अहो बाबा, तुमची मजबूरी कोणती?"
"बेटा, तुम्ही पाच पाच बहिणी. मी पोरगा व्हावा म्हणून तुम्हाले जन्मास घातलं. त्यातच कसंतरी तुम्हाले खा प्याले बी देलं. कसंबसं शिक्शन बी शिकोलं. पण प्रत्येक बापाची इच्छा रायते का आपल्या पोरी चांगल्या घरी जाव. मलेबी वाटते का तुले चांगला पती मिळावा. म्हून मा हा इचार."
"पण बाबा, तुम्ही म्हणता तसा मी आरोप लावल्यावर तो माह्याशीन लगन करन कशावरुन?"
"अं, नाय करन तं नाय करन. त्याचा इचार छोड. पण समजा त्यानं लगन केलंच तर........."
तशी ती विचार करु लागली. त्यातच ती विचार करता करता ती सुगतबाबतही विचार करु लागली. तसा भावराव म्हणाला,
"बेटा, समजा सुगतनं तुयाशीन लगन केलंच तर तुझं नशीब चांगलं बनन नाय का याचा विचार कर."
"हो बाबा. मी सांगते तसं."
"बेटा, समजा आपला गेम जमला तं तू लखलाभ होशीन. अन् एक विचार कर का आपण सुगतले विचारलं का माया पोरीशीन लगन कर तं तो तसा करन का? नाय नं. अन् जर त्याच्यावर दबाव टाकून आपण लगन कर म्हणलं तर भीतीनं तो तुह्याशीन लगन करुनही टाकन हे लक्षात घे."
शर्मीला विचार करु लागली. सुगत आज मास्तर झाला आहे. आपल्या बापाच्या म्हणण्यानुसार सुगतला आपल्याशी विवाह कर म्हटलं तर सुगत आपल्याशी विवाह करणार नाही. अन् आपल्या बापाच्या म्हणण्यानुसार आपण सुगतवर आरोप लावलाच तर तो धाकानं का होईना हो म्हणन. तसा सुगत पाहायला देखणा आहे.
शर्मीलानं विचार केला. तसं तिनं ठरवलं की आपण सुगतवर आरोप लावावा की त्यानं आपली छेडखाणी केली. तसं पाहता आता ती त्याच्या येण्याची वाट पाहू लागली.
****************************************

सुगत आज गावाला आला होता. गावाला त्याचे मायबाप राहात होते. तशी ती त्याची एकटे दिसण्याची वाट पाहात होती. तशी एक संधी चालून आली. तसा तो दिवस उजळला.
सुगत शेतीकडं निघाला होता. तो एकटाच जात होता. तशी तिही त्याच्यामागं निघाली.
तो निष्पाप मनानं निघाला होता. त्याला माहित नव्हतं की त्याचेसोबत काय होणार आहे. तशी ती त्याच्या शेतीकडे वळणारी आडवळणाची वाट आली. त्याच आडवळणाच्या वाटेवर तिनं त्याला अडवलं. तशी ती अडवत सुगतला थेट म्हणाली,
"सुगत मले वळखलं का?"
"होय, तू शर्मीला ना."
"व्हय."
"बोल."
"तू मले फार आवडतोस."
"मग."
"मले लगन करायचं हाये तुयासंग."
"येडी झाली का?"
"येडी नाय. अगदी होशात राहून बोलतेय. मले लगन करायचं हाये तुह्यासंग. बोल करशील नं."
तो विचार करु लागला. तिच्या त्या प्रश्नावर काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यातच अतिशय विचार करीत तो म्हणाला,
"नाय म्हटलं तर."
"मी आरोप लावीन तुयावर."
"कोणता?"
"कोणता म्हंजे, छेडखाणीचा. म्हणीन की छेडछाड केली सुगतनं."
"मग कोण आयकन तुह्यं?"
"लोकं आयकन. येणारे जाणारे लोकं. या रस्त्यावरचे लोकं."
"मग सांगच त्यांना. म्हण सुगतनं छेडखाणी केली म्हून. जा लवकर जा."
तो अति गुर्मीत म्हणाला. त्याला काय माहित होते की ती त्याबाबत आरडाओरड करेल. त्याला काय माहित होते की ही तिची योजना असेल. तसा तो त्या योजनेपासून अबोध होता.
थोडासाच अवकाश. शर्मीलाच्या आणि सुगतच्या मागावर असलेली व योजनेनुसार प्रकरणाला वळण देणारी सरपंचाची माणसं त्या रस्त्यानं येत होती. त्यांना अडवत शर्मीला रडत रडत म्हणाली,
"अजी, अजी थांबा. यानं माही छेडखाणी केली." तशी ती आणखी ओक्साबोक्सी रडायला लागली.
तिचं ते ओक्साबोक्सी रडणं. ते रडणं त्या माणसांनी ऐकलं. ते थांबले व त्यांनी सुगतला पकडलं. तसा सुगत आपल्या सफाईमध्ये म्हणायला लागला की त्याची या प्रकरणात कोणतीच चूक नाही. परंतू ती योजना होती. त्यामुळं त्या योजनेत कोणीही सुगतच्या बाजूनं बोलायला खाली नव्हते. त्यातच एकानं सुगतला पकडलं व दुसरा त्याला मारझोड करु लागला. तसा त्यातील एकजण म्हणाला.
"बोल शर्मीले, याचं का कराचं?"
"याले माशीन लगन कराले लावा."
"त्या रस्त्यानं आलेल्या सरपंचाच्या गृहस्थांनी योजनेनुसार त्याला म्हटलं की त्यानं तिच्याशी विवाह करावा. परंतू तो काही तयार झाला नाही. कारण त्यात सुगतची कोणतीही चूक नव्हती की तो तिच्याशी विवाह करेल. शेवटी ती केस पोलिसस्टेशनला गेली.
गावालगतचं पोलिसस्टेशन........पोलिसस्टेशन, कोर्ट कचे-यामध्ये शहाण्या माणसानं जावू नये म्हणतात. ते अगदी सुगतच्या बाबतीत खरं ठरलं. त्यातच सुगतचा काही दोष नव्हता. तरीही त्याला पोलिसस्टेशनला पोलिसांनी पकडून नेलं. त्याला त्याचा दोष नसतांनाही जाम मारलं व म्हटलं,
"बोल, गुन्हा कबूल आहे की नाही."
सुगतचा त्यात दोष नसल्यानं तो गुन्हा कसा कबूल करणार. त्यातच पोलिस त्याला मारतच होते. तसा गुन्हा कबूल न केल्यानं की केस कोर्टात गेली व सुगतच्या मागं कोर्टाचे चक्कर सुरु झाले.
कोर्टाचे ते चक्कर. त्यातच शाळेतील त्याची नोकरी.दोष नसतांना सर्व तारांबळ उडत होती. आठ आठ दिवसानं तारीख राहात होती. त्यातच त्या तारखेवर सुगतला जावे लागत होते. त्यातच त्याला शाळेत त्या तारखेच्या वेळी सुटी टाकावी लागायची.
सुगतला ती तारीख लढतांना वकील करावा लागला होता. तो वकीलही त्याला लुटतच होता. त्याला पैसे हवे होते.
सुगतचे मेहनतीचे पैसे........ त्यातच कोर्टाचे चक्कर.....त्यातच अख्खा रिकामा जात असलेला दिवस. तसेच दोष नसतांना शर्मीलाशी नाहरकत भांडणं......सुगतला मोठा विचार येत होता.
सुगतवर मायबापानं संस्कार केले होते. तेही चांगले संस्कार. सुगतवर सुरु झालेला खटला........या खटल्याच्या धस्क्यानं सुगतचा बाप मरुन गेलेला. त्यातच आईलाही लकवा ग मारलेला. त्यामुळं ते सगळं सांभाळतांना सुगतला नाकीनव यायचं. तरीही ते सगळं सांभाळून तसेच आईची इमानीइतबारे सेवा करीत सुगत तो खटला लढत होता. त्यातच ती केस बोर्डावर आली आणि तिला वकीलानं न्यायाधीशामार्फत एक नोटिस पाठवला.
शर्मीलाला काही वाटलं नाही आतापर्यंत. पण आता आलेला कोर्टाचा नोटिस. त्यातच ती थोडी घाबरली. कारण तिच्या बानंच योजना ठरवली होती. परंतू बाला फसवायचं कसं? तिच्या मनात विचार होता. त्यातच आपणही आवविचार करता बिचा-या निष्पाप जीवाला फसवलं याचाही विचार तिच्या मनात होता.योजना मात्र फसली होती. सुगतनं तर तिच्याशी विवाह केला नव्हता. व्यतिरीक्त त्याची नोकरीही गेली नव्हती. तसं पाहता गुन्हा सिद्धच झाला नव्हता. त्यातच ज्या सरपंचानं तिच्या बाला सोबत घेवून योजना आखली. आज आपलं नाव समोर येईल. म्हणून सरपंचानं त्या योजनेतून हात काढून टाकला होता.
शर्मीलाला आलेला नोटिस. त्या नोटिसनुसार शर्मीला न्यायालयात हजर झाली. त्यातच तिला कठड्यात उभं करण्यात आलं. प्रतिपक्षी वकील प्रश्नांची सरबत्ती सोडत होते. तसं पाहता त्या सरबत्तीनं ती परेशान झाली होती.
ती प्रश्नांची सरबत्ती. त्या सरबत्तीनं ती गोंधळून गेली होती. तिचे ओठ थरथरत होते. काय बोलावं सुचत नव्हतं. तसे न्यायाधीश महोदय म्हणाले,
"पहिल्याच दिवशी तिला घाबरवाल काय?"
प्रतिपक्षी वकीलानं ते न्यायाधीश महोदयांचे शब्द ऐकले. तशी तारीख दिली गेली.
तारीख मिळताच शर्मीला गावी गेली. तशी ती गावी गेली खरी. त्यातच ती विचार करु लागली. खटला कसा लढावा. आपल्यालाही वकील करावा लागेल. वकीलाला पैसेही मोजावे लागतील. परत जाण्यायेण्याची तिकीटंही. त्यातच आपण मुलीची जात. एकटी जावू शकणार नाही. सोबत आई किंवा बापाला न्यावं लागणार. त्यासाठी पैसा लागणार. वाटत होतं की आपण आरोप लावताच सुगत आपल्याशी विवाह करणार. पण झालं उलट. त्यानं विवाह केला नाही. अन् तो करणारंही कसा. आपण कमी शिकलेले होतो. त्यातच तो मास्तर बनला होता. शिवाय आपण त्याचेएवढे पाहायलाही देखणे नव्हतो. आपण ही चूकीची योजनाच निवडायला नको होती.
तो सरपंच. त्यानं आमीष दाखवून योजनेत अडकवलं आणि तो निघून गेला दूर. आता माझ्या बाला तरी काय समजत होतं. तो आडाणी होता. अन् मी.....मीही लहानच होती. परंतू आज ते सगळं कळतं. आपण हे करायला नको होतं.
तो सुगत आज शहरातच राहते. त्याला वेतन मिळतं. त्या वेतनाच्या भरवशावर तो केस लढणार. त्याचा चांगला वकील असणार. त्याला जाण्यायेण्याचा खर्च लागणार नाही आणि मला......मला मात्र त्याचेपेक्षा कितीतरी जास्त पैसा मोजावा लागणार. त्यापेक्षा आपण माघार घेतलेली बरी. पण माघार तरी कशी घेणार. त्यापेक्षा लढू काही दिवस. नाहीतर या केसला सर्रास खोटं समजलं जाईल.
शर्मीला खटला लढत होती. आज सहा महिने झाले होते. निष्कर्ष काही अजूनपर्यंत निघाला नव्हता. तारीख वर तारीख करीत वेळ जात होती. त्यातच शर्मीलाला जाण्यायेण्याचा खर्च लागत होता. अजूनपर्यंत तिनं वकील केला नव्हता. अशीच ती तारीख उजळली. न्यायाधीश महोदय या तारखेला म्हणाले,
"वकील केला आहे का?"
"नाय."
"का बरं?"
"..........." ती गप्प राहिली. त्यातच समजा पैसे नाही आहेत असं बोलल्यास नाचक्की होईल असं तिला वाटलं. त्यातच ती गप्प आहे असं पाहता न्यायाधीश महोदय म्हणाले,
"का बरं गप्प? वकील हवा आहे का? सरकारी वकील."
"............." ती गप्प होती. तिला काय माहित होते की तो पैसे घेत नाही. त्यातच तिला वाटले की तोही पैसे घेणार. तसे तिच्या मनातील चलबचल विचार ऐकून न्यायाधीश महोदय म्हणाले,
"सरकारी वकील. त्यांना पैसे लागत नसतात. निःशुल्क असतो तो."
निःशुल्क शब्द ऐकताच ती म्हणाली,
"ठीक हाये. मले सरकारी वकील हवाय केस लढाले."
त्यातच तिच्या मागणीनुसार तिला सरकारी वकील मिळाला व ती आपला खटला लढू लागली.
खटला लढणे हे जिकीरीचे काम असतं. हे तिला माहित नव्हते. त्यातच सरकारी वकील मिळाला तरी खटला काही तुटला नव्हता. तारीख वर तारीख करीत तो सुरु होता. वकील पैसे घेत नव्हता. तो निःशुल्क मिळाला होता. परंतू तेवढ्यावरच भागू शकत नव्हता. जाण्यायेण्याचा पैसा तिला लागतच होता. त्यातच कधी साक्षीदार आणणं. त्या साक्षीदारांचाही पैसा तिला द्यावाच लागत होता. त्यातच त्या साक्षीदाराचा नाश्तापाणीही.
आज शर्मीला गावात काबाडकष्टाला जात होती. ढोर कष्ट उपसत होती. तसं पाहता तिचं कर्म वाईट होतं. त्याचीच जणू ती शिक्षा भोगत होती.
आज ती काम करीत होती. त्यातच केस लढता लढता ती वयात आली होती. तिचं विवाहयोग्य वय आज संपत चाललं होतं. त्यातच तिच्या बहिणीही विवाहयोग्य वयात आल्या होत्या. त्यांनाही विवाहाची चिंता सतावत होती.
शर्मीलाच्या बहिणींचं आणि तिचं विवाहयोग्य वय झालं असलं तरी त्यांच्या घरी पाहूणे उतरत नव्हते. काही गावातील मंडळी त्यांच्याबाबत सांगत असत व पाहूणा बसू देत नसत. ते सांगत असत की तिची कोर्टात केस सुरु आहे.
ते गाव......ज्याप्रमाणे गावात शर्मीलाकडून बोलणारी मंडळी होती. तशीच काही मंडळी ही सुगतकडूनही बोलत होती.
शर्मीलाचं वाढणारं वय तिला खटकत होतं. त्यातच तिच्या बहिणीचेही वाढणारे वय तिला खटकत होते. त्यातच ती घायाळ होत होती. काय करावं सुचत नव्हतं. ते सगळं त्या कोर्टातील केसनं घडत होतं. त्यातच तिच्या बहिणीही त्यांचे विवाह जुळत नसल्यानं तिला काहीबाही बोलत होते. त्यातच ती पश्चातापाच्या अग्नीत घायाळ होत होती.

****************************************

प्रेम.......प्रेम जर केलं असतं मी सुगतवर. तर कदाचित सुगतनं माझं प्रेम स्विकार केलंही असतं. परंतू मी प्रेम न करता थेट सुगतसमोर बोलली. माझ्या बदनामीचा स्वतःच बाजार मांडला. त्या निर्लज्ज सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित माणसांच्या बोलण्यानं.,आज माझी बदनामी झाली. कोणामुळं तर ती माझ्याचमुळं. यात सुगतचा काहीही दोष नाही.
माझं गाव. महा हरामखोर गाव आहे हे आज कळलं. आजही या गावातील माणसं शिकत नाहीत. एवढे वर्ष होवूनही. देश कितीतरी पुढं गेला. देशातील लोकांनी चंद्र, सुर्य म्हणजे काय, ते शोधून काढलं आणि माझं गाव...... माझं गाव आजही बुचकळ्या खात या अज्ञानाच्या डोहात उभं आहे. गावात कितीतरी योजना आल्या. परंतू तो राक्षस..... तो सरपंच..... त्या सरपंचानं कोणालाही त्या योजना मिळू दिल्या नाहीत. त्यानं आपली तर मुलं शिकवली नाही. परंतू त्यानं गावातील कोणालाही शिकू दिलं नाही. अन् तो बिचारा सुगत शिकला. तर त्यालाही या सरपंचानं बहकाव्यात आणलं. आपण खरं तर त्या सुगतची माफी मागायला हवी. परंतू तो माफ करेल का या वळणावर. कारण त्याचीही या प्रकरणात बदनामीच झाली आहे.
आज केस लढायला माझ्याजवळ पैसे नाहीत. माझ्या बानंही याचा विचारच केला नाही. त्याला वाटलं की कदाचित सुगत बदनामीच्या धाकानं माझ्याशी विवाह करेल. परंतू ते सगळं फोल ठरलं. सुगत आज लढतोय. कारण त्याचेजवळ पैसा आहे. मी लढू शकत नाही. कारण माझ्याजवळ पैसा नाही. मग कितीही मी काबाडकष्ट केले तरीही.
आपण आपल्या वकीलाला सांगायला हवं की मला हा खटला परत घ्यायचा आहे. त्यांना खरं खरं सांगायला हवं की आज माझेजवळ खटला लढण्यासाठी पैसे नाहीत. आज त्यांना सांगायला हवं की तिला सुगतची माफी मागायची आहे. जणू आज ती तसा विचार करुन चिंतेतून मोकळी झाली होती.
आज शनिवार होता. कोर्टाची तारीख होती. ठरल्याप्रमाणं आज कोर्टाच्या तारखेवर ती जाणार होती. ती आज माफीही मागणार होती सुगतची. त्यातच खटला बंद करण्याची शिफारसही करणार होती.
शर्मीलानं तसा विचार केल्यानुसार ती सकाळीच उठली. तिनं लवकरच अंघोळ आटोपवली. जेवन केलं. त्याचबरोबर तिच्या बानंही जेवन केलं व ती कोर्टात जायला निघाली. त्यातच ती आता बस्टापवर आली.
आज एसटीचा संप होता. बसा बंद होत्या. कित्येक दिवसापासूनची एसटी केवळ शासनाच्या दुर्दैवी हेतूनं बंद होती.
सरकार का ऐकत नाही आमचं. एस टी कर्मचा-यांचीही तक्रारच होती. त्यातच पगारवाढीवरुन व एसटी विलगीकरणावरुन एसटी कर्मचारी भडकले होते.
एसटी बसा..... या बसांमधून विद्यार्थी आपल्या शाळा, महाविद्यालयात हजेरी लावत असत. कोणी म्हातारी माणसं अर्ध्या तिकीटांमध्ये प्रवास करीत असत. ही एसटी ब-याच दिवसापासून सुरु असून ती कर्मचा-यांची सेवा करीत होती नव्हे तर नागरीकांचीही सेवा करीत होती. मात्र ही एसटी गरीब गुद्या लोकांची सेवा करीत असली तरी त्यात कार्यरत कर्मचा-यांना पुरेसे वेतन मिळत नव्हते. त्यांचे वेतन अत्यल्प होते.
एसटीला प्रवासी मिळो की न मिळो, ती आपल्याला वेळेवर दुस-या गावांना पोहचवून देत असे. त्यातच अगदी रात्रीला दहा साडेदहा पर्यंत अनोळखी गावातही एसटी त्या गावच्या लोकांना पोहचवीत असे. एसटीचा प्रवास शाळकरी मुलांना सुखदायकच होता. याउलट खाजगी वाहनांचं होतं. खाजगी वाहनात तिकीटा कमी नव्हत्या. त्यातच एसटीचा वेळ हा ठरलेला असल्यानं व कर्मचा-यांना एसटीच्या वेळेत जाणं शक्य नसल्यानं ते खाजगी वाहनातून जात. परंतू खाजगी वाहनातून जातांना लोकांना पुरेशी जागा मिळायची नाही. त्यातच त्यांना दाटीदाटीनं जावं लागत असे. शिवाय मन मानेल एवढी त्यांची तिकीट असे. त्यातच त्यांच्या गाड्या भरल्याशिवाय ती वाहने निघत नसत.
एसटी कर्मचा-यांची होत असलेली आबाळ. त्यातच त्यांचे अल्पसे वेतन पाहून ते वाढविण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला होता. त्यातच सरकार खाजगीकरणंही एसटीचं करु पाहात होतं.
आज दोन महिने झाले होते. ब-याचशा एसटी कर्मचा-यांना सरकारनं निलंबीतही केलं होतं. परंतू एसटी कर्मचारी काही संप संपवायला तयार नव्हते.
त्याचं कारणही तसंच होतं. शेवटी संप संपविण्यासाठी सरकारनं त्यांच्या तीन मागण्या मान्य केल्या. पहिली मागणी महागाई भत्ता, दुसरी मागणी पगार वाढ, तिसरी मागणी घरभाडे भत्ता. यामध्ये परीवहन मंत्र्यांनी महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ केली होती. अर्थात विद्यमान महागाई भत्ता बारा टक्के होता. त्यातच आता तो पाच टक्के वाढल्यानं सतरा टक्के झाला होता. परंतू कर्मचारी हा भत्ता अठ्ठावीस करावा अशी मागणी करीत होते. त्यासाठी ते आणखी आंदोलन करीत होते.
कर्मचारी आंदोलन करीतच होते. त्यातच काही कर्मचारी मानले. त्यांनी संप सोडला होता. परंतू जे कर्मचारी आंदोलन करीत होते. त्यांच्यावर सरकारनं मेस्मा कायदा लावायची मागणी केली होती.
मेस्मा कायदा हा अत्यावश्यक सेवेसाठी लावण्यात येत असतो. एसटी ही एक अत्यावश्यक सेवा होती. त्यातच आंदोलन कर्ते मानत नव्हते. कारण त्यांना विलीनीकरण मान्य होते. ते सरकारमध्ये विलीनीकरण करा असेच म्हणत होते.
परीवहन मंत्र्यांनी पगारवाढही केली होती. तसंच जाहिर केलं होतं की दरमहिण्याच्या दहा तारखेला पगार होईल.
सध्या राज्यभरात एसटीचे कर्मचारी संप करीत होते. त्यांच्या चार मागण्या अजुनही पुर्ण झाल्या नव्हत्या. पहिली मागणी होती विलीनीकरण. दुसरी घरभाडे. तिसरी महागाई भत्ता आणि चौथी पगारवाढ.
या संदर्भात एसटी कर्मचा-यांनी दि. २७ आक्टोंबरला राज्यव्यापी उपोषण केलं होतं. परंतू तो यशस्वी न झाल्यानं दि. २९ आक्टोंबरपासून त्यांनी अघोषीत संप सुरु केला होता. त्यातच हळूहळू हे आंदोलन जोर पकडू लागले होते.
सुरुवातीला या संपात आठ आगार होते. परंतु नंतर ह्या मागण्या फायद्याच्या वाटल्याने २५० आगार बंद झाले होते. कर्मचारी एसटी स्टँडवर जात आणि संप पाहून परत येत. असे आज एकुण सदतीस दिवस झाले होते. अजून किती दिवस संप चालेल हे काही माहिती नव्हतं. या संपक-यांनी ऐन दिवाळी तोंडावर असतांना संप पुकारलेला होता.
*विलीनीकरण काय होतं*
विलीनीकरण म्हणजे त्याचा सोपा अर्थ सामावून घेणे. कर्मचारी म्हणत की आमची सेवा सरकारी सेवेमध्ये सामावून घ्या. ज्यामुळे आमचे वेतन सरकारच देईल व आमचे भत्तेही सरकारच ठरवेल. त्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलन करीत होते मागील काही दिवसापासून.
महाराष्ट्राची आवश्यक सेवा बनलेली एसटी ही सरकारी सेवा नसून एम एस आर टी सी ही संस्था एसटीचा कारभार चालवत असे. ह्या संस्थेला १९५० च्या कायद्यानुसार राज्य सरकार ५१ टक्के व केंद्र सरकार ४९ टक्के अनुदान देत असे. यातच राज्याचे परीवहन मंत्री हे या एसटी महामंडळाचे अध्यक्ष असत. परंतू यामध्ये सरकार कोणतेही बदल करु शकत नव्हते वा भत्ते ठरवू शकत नव्हते. कारण ती एक स्वायत्त संस्था होती. तसेच हलविण्याचा अधिकार केंद्राला होता. जर या एसटीचे विलीनीकरण झाल्यास एसटी ही सरकारी होईल व कोरोनासारखे संकट आले आणि एसटी तोट्यातही चालली तरी एसटी कर्मचा-यांचे वेतन अगदी वेळेवर होईल असं एसटी कर्मचा-यांचं म्हणणं. म्हणून विलीनीकरणाचा महत्वपूर्ण मुद्दा. त्यासाठीच आंदोलन. आम्हाला कोणत्याही स्वायत्त संस्थेच्या अधिनस्थ राहून काम करण्याची गरज नको.
कोरोना महामारी. त्यातच लाकडाऊन. प्रवास बंद. मग एसटीही बंद. उत्पन्नाचं साधन गोठलं. त्यातच एम एस आर टी सी या संस्थेजवळ पैसा कुठून येणार. कारण ती एक खाजगी संस्था. त्यातच कर्मचा-यांना सात तारखेला मिळणारे वेतन हे अनियमीत होवू लागले. काही ठिकाणी वेतन झालेच नाही. काही ठिकाणी झाले. पण कमी मिळाले. कारण विचारणा करताच एसटी महामंडळ नुकसानीत चालत आहे हा हवाला कर्मचा-यांना देण्यात आला. त्यातच अशा विपरीत परीस्थीतीत काही कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या. कारण मिळणा-या तुटपुंज्या पगारानं कर्मचा-यांचं पोट भरेनासं झालं.
आज याच गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं कर्मचा-यांशी चर्चा करुन पगारवाढ केली होती. महागाई भत्ताही अठ्ठावीस टक्के मान्य केला होता. परंतू विलीनीकरणाचं काय? एसटी कर्मचा-यांना आजही भीती होती की सरकार आज संप मिटविण्यासाठी अगदी गोड गोड बोलून वाढ करीत आहे. परंतू खाजगी म्हणजे खाजगीच. त्यात सरकारी विलीनीकरण नसणार. म्हणूनच आता अजुनही आंदोलन.
काही कर्मचारी कामावर परतले होते. पण त्यांची संख्या फक्त अठराच टक्के होती. बाकीचे अजुनही आलेले नव्हते. विलीनीकरणाशिवाय यायला तयार नव्हते. सरकारनं बळजबरीनं त्यांच्या सेवाही समाप्त केल्या होत्या. तरीही ते ठाम होते आपल्या निश्चयावर. सरकार मेस्मा कायदाही त्यांच्यावर लावण्याचा प्रयत्न करीत होते.
*काय होता मेस्मा कायदा*
मेस्मा कायदा हा अत्यावश्यक सेवेसाठी लावण्यात येतो. बससेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. मेस्मा याचा अर्थ असा की कोणताही कर्मचारी हा संप वा आंदोलन करु शकत नाही आणि तसे आंदोलन करीत असल्यास त्याला अटक करता येवू शकते.
सरकार कर्मचारी वर्गाचा संप चिरडण्यासाठी मेस्मा कायदा लावण्याची करीत असलेली भाषा. कदाचित कर्मचारी वर्गाला धाक देणारी ही कृती होती. कदाचित उद्या ते मेस्मा कायदा लावतीलही. त्यातच काही कर्मचारी वर्गाला सरकार अटकही करेल. परंतू यातून निष्पन्न काय होणार. त्यातच अन्यायाच्या निषेधार्थ एसटी कर्मचारी भडकू शकतात. एखाद्या ठिकाणी हिंसक वळण घेवू शकतात हे कर्मचारी. त्यापेक्षा विलीनीकरण शक्य असल्यास ते केलेलं बरं. असे काही तज्ज्ञांचे म्हणणे होते.
प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. तेही चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. तसा अधिकार एसटी कर्मचा-यांनाही होता. अनुदान तर सरकारच देत होतं. राज्य सरकार ५१ टक्के व केंद्र सरकार ४९ टक्के. मग काय हरकत होती विलीनीकरण न करण्याची आणि संप चिरडण्याची भाषा करण्याची. तरीपण परीवहन मंत्री विनाकारण विरोध करीत आहेत. असं एस टी महामंडळ कर्मचा-यांना वाटत होतं. तसेच शासनाच्या ताब्यात एसटी गेल्यास आर्थीक बाब सुरळीत होईल. तसेच एसटी कर्मचा-यांचे सर्व प्रश्नही सुटतील असंही कर्मचा-यांना वाटत होतं. त्यासाठीच आंदोलन.
आज जवळपास सातशे कोटीच्या घरात एसटी बंदन नुकसान झालेलं होतं. तरीही सरकार मानत नव्हते. त्याचं कारण म्हणजे सरकारला वाटत होते की सरकारमध्ये एसटी कर्मचा-यांचं विलीनीकरण केल्यास राज्य शासनावर आर्थीक ताण निर्माण होईल. तसं पाहता हे विलीनीकरण एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही. त्यासाठी रोड ट्रांसपोर्ट कार्पोरेशन कायदा १९५० मध्ये सुधारणा करावी लागते. ती सुधारणा केवळ परीवहन मंत्र्याला केवळ एकट्याच्या निर्णयानं करणं शक्य नाही. तो केंद्र सरकारचा कायदा आहे. म्हणूनच निर्णयात विलंब.
सरकार मेस्मा लावो की अजून काही. सरकार जसं ठाम आहे. तसेच ठाम कर्मचारीही आहेत. सरकार जर आपल्या निर्णयावर ठाम असेल तर कर्मचारी संपून जातील एकएक करीत. अन् कर्मचारी ठाम राहिले आपल्या निर्णयावर तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. यापेक्षा चर्चेनं मधला मार्ग काढून प्रश्न सोडविण्यातच सारस्य आहे. दुसरा आणखी कोणताच मार्ग नाही. अशा प्रकारच्या चर्चा कर्मचारी वर्ग करीत होता.
शर्मीला बसची वाट पाहात होती. एवढ्यात कुणीतरी म्हणालं बसा बंद आहेत. त्यातच शर्मीलाचा मुड खराब झाला. आता आपल्याला परत गर्दीतून जास्त पैसे देवून जावं लागेल असं तिला वाटलं. त्यातच ती अशा खाजगी वाहनाची वाट पाहात बसली.
थोड्या वेळाचा अवकाश. थोड्या वेळातच एक खाजगी गाडी आली. त्या गाडीत भयंकर गर्दी होती. कारण बसा बंद होत्या. त्यातच ती गाडी शर्मीलाजवळ येवून उभी राहिली. तोच त्या गाडीत उपाय नसल्यानं शर्मीला आणि तिच्या आईला बसावे लागले. तेही जास्त पैसे देवून. काय करणार उपाय नव्हता.

****************************************

दुपारचे बारा वाजले होते. कोर्ट खचाखच भरलं होतं. कोरोनामुळं आजवर कोर्ट बंद होतं. त्यातच पेश्याही बंद होत्या. आज पहिलाच दिवस होता.
शर्मीलाचे तिच्या दोन तारखांमधील बरेच दिवस आनंदात गेले होते. त्यातच आज पुन्हा तारीख. त्या तारखेवर येणे फारच कठीण जात होते.
शर्मीला विचार करु लागली. तसा सहजच तिच्या मनात विचार आला. आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही.
आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण देशातील जनता ही गरीब आहे. त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नाही. समजा अन्याय झालाच आणि त्या अन्यायाबद्दल खटला लढायचा झाल्यास तो खटला ती गरीब जनता लढू शकत नाही. कारण देशात भारदस्त वकीलाची फौज आहे. जी फौज या खटल्यावर आरोपीच्या बाजूने खटले यशस्वी करुन दाखवू शकते. त्यातच अशा खटल्यात अशा वकीलाच्या मदतीने समजा विजय मिळालाच तर तोच आरोपी पैशाच्या बलबुत्यावर अशा गरीबांवर उलट खटला दायर करुन त्यांना परेशान करीत असतो हे तेवढंच खरं आहे. आज देशात अशा प्रकारचे अनेक खटले आहेत की जे प्रलंबीत आहेत. त्या खटल्यात अगदी निर्दोष असणा-या व्यक्तींना मरणासन्न यातना होत असतात.
आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे आजचे शेतकरी कायदे.......हे कायदे म्हणजे शेतक-यांना अन्यायच वाटत आहे. पण त्या कायद्याविरुद्ध दाद मागतांना(लढतांना) अंदाजे साडेसातशेच्या वर शेतक-यांना वीरमरण आलेलं आहे. दुसरा भाग महाराष्ट्रात सध्या चिघळत असणारा विषय म्हणजे एसटी कामगारांचा विषय. यातही सरकारचं खाजगीकरणाचं तत्व. कितीतरी एसटी कामगारांना नोकरीवरुन हात धुवावं लागलं. त्यातच काही एसटी कामगार आत्महत्याही करीत आहेत.
तिचा विचार रास्त होता. तशी तिला आणखी एक गोष्ट आठवली.
एका वस्तीत दोन मकानं होते. त्यातच त्या मकानामध्ये एक अगदी श्रीमंत कुटूंब होतं. तर दुसरं गरीब कुटूंब. त्यातच त्यांचा त्या मकानातील जागेवरुन वाद झाला. त्यातच दोघांनी एकमेकांना मारलं. त्यातच श्रीमंत कुटूंबानं गुंड बोलावून त्या गरीब कुटूंबाना जबर मारहाण केली. त्यातच त्या गरीब कुटूंबानं त्या श्रीमंत कुटूंबाची तक्रार पोलिस स्टेशनला टाकली. त्यातच तो खटला न्यायालयात गेला.
न्यायालयात तो खटला पैशाच्या जोरावर चांगला वकील लावून त्या श्रीमंत कुटूंबानं जिंकला. त्यातच गरीब व्यक्ती हरला. त्याला अन्यायाविरुद्ध न्यायालयातूनही पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात दाद मागता आली नाही. त्यातच तो खटला हरताच त्या श्रीमंत परीवारानं त्या गरीब कुटूंबाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. अर्थात ही गोष्ट उलटा चोर कोतवालको दाटे अशी घडली. त्यातच खटला दाखल करणारा श्रीमंत व्यक्ती मरणही पावला. परंतू खटला सुरुच होता. त्यातच त्या खटल्यानं गरीब परीवार त्रस्त होत होता. परंतू तो खटला संपायचे नाव घेत नव्हता.
तिला आजही वाटत होतं. ती बरीच दुःखी होती. परंतू या खटल्यात ती स्वतः स्वयं कर्तृत्वानं दुःखी झाली होती. तिला काय माहित होतं की तिच्याही जीवनात असं होईल. तिला वाटलं होतं की कदाचित आपल्या कृत्यानं आपल्याशी सुगत विवाह करेल व आपलं जीवन सुखी होईल. परंतू यात उलट झालं होतं. आज असे बरेचसे कुटूंब असेच होते की न्यायालयात असे विनाकारणचे खटले सुरु असून संपायचे नाव घेत नाहीत. त्यातच न्यायालयात अशा खटल्यांची संख्या वाढत होती. ती तसा विचार करीत होती.
न्यायालय फक्त पुरावे पाहात असून श्रीमंत माणसे केवळ पैशाच्या जोरावर असे पुरावेही गोळा करुन अशी न्यायालयीन लढाई जिंकतात. पण गरीब कुटूंबांना अशी लढाई जिंकता येत नाही. कारण त्यांच्याजवळ पुरेसा पोट भरायलाच पैसा नसतो. त्यामुळं ते न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पैसा लावतील कुठून? यातच आज श्रीमंत गरीब अशी दरी न्यायालयीन प्रकरणातही वाढत आहे. आज अन्याय होतो. श्रीमंतावरही होतो आणि गरीबांवरही. श्रीमंत माणसं हे खटला लढण्याची वाट पाहात नाही. ते गुंड लावून आपला बदला पूर्ण करतात नव्हे तर गरीबांना त्रस्त करतात. यासाठी कायद्यामध्ये तरतूदही आहे. ती तरतूद म्हणजे अन्यायग्रस्त माणसाचा खटला हा सरकारी वकील लढतो. परंतू असं जरी असलं तरी तो सरकारी वकील तो खटला जिंकून देईलच याची शाश्वती नाही. यातूनच गरीब व्यक्ती खटला हारतो. त्याला कैद होते. त्यातूनच ज्यावेळी तो गरीब कुटूंबातील व्यक्ती कैदेतून सुटतो. तेव्हा आपोआपच तो गुंड म्हणून बाहेर पडतो. हे चित्र वारंवार चित्रपटातून दिसत असलं तरी त्यात असलेली वास्तविकता नाकारता येत नाही.
सा-याच समस्या. अन्यायाविरुद्ध दाद मागायचीही समस्या.......गरीब व्यक्ती हा न्यायालयातून हरतो. पैशाअभावी पराभव पत्करावा लागतो. परंतू नियती त्याला सोडत नाही. हीच नियती पुढे असे अक्राळविक्राळ स्वरुप धारण करते. त्यात मग करोडो रुपये जरी आपल्याजवळ असले तरी ते आपल्या कामात येत नाहीत. मग हीच नियती अक्राळविक्राळ रुप धारण करुन कधी कोरोना रुपात येवून तर कधी अपघात होवून आपल्या जवळ येते. त्यातच मरण देते. मग आपल्याला मरतेवेळी नातेवाईक तर सोडा. पाणीही नशीब होत नाही. म्हणून थोडं सावधान असलेलं बरं. गरीबांवर आपण असा अन्याय करु नये. लाचारांना नेस्तनाबूत करु नये. तसेच कोणावरही अन्याय करु नये. नियतीला नक्कीच घाबरावे. दुर्बलांची सेवा करावी. त्याशिवाय खरं समाधान प्राप्त होत नाही हे तेवढंच खरं आहे.
तिचा विचार. तिचं विचार करणं बरोबरच होतं. परंतू काही खटले हे तिच्याचसारखे असत.
तो न्यायालय परीसर. त्या परीसरातही त्या काळात जास्त गर्दी नव्हती. पण जसा कोरोना आटोक्यात आला, तसं न्यायालय उघडलं. मग काय न्यायालयात एवढी गर्दी गोळा व्हायला लागली की वाटलं की आजक लोकांना कामधामच उरलेलं नसेल.
कोर्टात आज वादी प्रतिवादींची संख्या फार वाढत चाललेली होती खटले संपायचे नाव घेत नव्हते. त्याची कारणंही बरीच असतील. पण मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या. आज लोकसंख्या अफाट होती. त्यामानानं भांडणं होणारच. त्यातच ती भांडणं सोडविण्यासाठी पुरेसी यंत्रणा नव्हती. म्हणजेच न्यायाधीश नियुक्त केलेले नव्हते. त्यामुळं अनेक प्रतिवादींना एकच न्यायाधीश न्याय देवू शकत नव्हता.
न्यायाधीश महोदयांनाही बंधन असतं. ते म्हणजे तेवढे खटले समाप्त करणे. ते तसे खटले समाप्तही करतात. पण लोकं असे असतात की विनाकारण भांडणं करुन न्यायालयात आपली प्रकरणं प्रविष्ट करीत असतात.
आज असे कितीतरी खटले न्यायालयात प्रविष्ट होत होते की ज्या खटल्यात प्रतिवादींचा गुन्हे नसत. परंतू ते गुन्हे जरी नसले तरी त्याला न्यायालयात चकरा माराव्याच लागत. त्याचं कारणंही तसंच असे. ते कारण म्हणजे इतर कोणीही गुन्हे करु नयेत.
गुन्हे.......गुन्हे हे सुनियोजीत असत असे नाही. काही गुन्हे हे अकस्मात घडून येत असत. तर काही गुन्हे हे सुनियोजीत असत. काही गुन्ह्यात गुन्हेगार हा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असत. तर काही गुन्ह्यात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी. काही काही वादी तर असे असत की ते विनाकारण कोणाच्याही वाट्याला जात असत. त्यानंतर स्वतःच खटले दाखल करीत असत. कारण त्यांना त्यात आनंद वाटत असे.
एक असाच न्यायालयातील खटला. तो खटला ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. तो खटला म्हणजे पैसे कमविण्याचा धंदाच. लोकं कसकसे पैसे कमवतात त्याचं मुर्तीमंत उदाहरण. तसं पाहता न्यायालय पुराव्याअभावी कोणालाही अटक करण्याचा आदेश न देत असल्यानं सराईत गुन्हेगार आपआपल्या भागात दहशत निर्माण करतात. त्यातच दहशतीनं हफ्ते वसूल करीत असतात. त्यातून आलेले काही पैसे हे पोलिसस्टेशनला देत असतात केसा लागू नये म्हणून. त्यातच काही केसा लागल्याच तर त्यातून सुटण्यासाठी वकीलालाही ते पैसे देत असतात. यातूनच गुन्हेगार सुटतात व परीसरात गुंडगीरी माजते. शेवटी अशा गुंडांमुळे लोकं कंटाळतात व त्या लोकांपैकी कोणीतरी हिंमत करुन या गुंडाला संपवतो. त्यानंतर त्याच परीसरात दुसरा गुंड निर्माण होत असतो.
गुंड हे परीसरातच असतात असे नाही. ते कुठेही असू शकतात. घरागारात, शाळेतही असतात. घरातील गुंड हे आपल्या परीवारावर धाक जमवून असतात. तर शाळेतील गुंड शाळेत. विद्यार्थ्यांतही गुंड नसतात असे नाही. त्यातही काही गुंड असतातच.
एक अशीही शाळा. त्या ठिकाणीही अशीच एका गुंडाची रेलचेल होती. ब-याचशा शाळा अशा असतात की त्या शाळांमध्ये संचालक गुंड म्हणूनच वावरतो. तो शिक्षकांकडून हफ्ते म्हणून धाक देवून खंडण्या वसूल करतो. तर ती एक शाळा. त्या शाळेत एक असाही व्यक्ती..... तो शाळेचा मुख्याध्यापक होता. त्याची पैसे कमवायची इच्छा होती. तो विचार करु लागला. पैसे कसे कमवावे. विचारांती त्याला युक्ती सुचली. ती म्हणजे आपण भांडण करावं.
तो सहकारी माणसाशी भांडण करु लागला. त्यातच ज्याचेशी तो भांडण करीत असे. त्याचे तो शाळेत येवूनही वेतन बंद करु लागला.
शाळेत येवूनही वेतन बंद होताच शाळा कर्मचारी आपला खटला न्यायालयात टाकत असे. मात्र हा खटला लढण्यासाठी तो मुख्याध्यापक शाळेतील शिक्षकांकडून मनमानी पैसा गोळा करीत असे. त्यातच तो पैसा गोळा करण्यासाठी कर्मचा-यांना त्यांचे वेतन बंद करण्याची धमकी देत असे.
मुख्याध्यापक खटल्यासंबंधाने म्हणत असे की मी हे खटले आपणासाठीच टाकले. त्यानंतर गोळा झालेल्या पैशाचा फक्त दहा टक्के भाग हा वकीलाला देत असे. बाकी नव्वद टक्के भाग आपल्याजवळ ठेवत असे.
पैसे कमविण्याचा हा न्यायालयीन मार्गाचा धंदा मुख्याध्यापकाचा जोरात चालला होता. आज तो त्याच अतिरिक्त पैशाने श्रीमंत बनला होता.
बरेचसे असेही गुंड आहेत की जे न्यायालयातून वकीलामार्फत निर्दोष सुटत असतात आणि ते निर्दोष सुटले की घराकडे चाकूच्या धाकावर खंडणी लुटत असतात. त्याला जनताही धडा शिकवू शकत नाही. कारण त्यांना भीती असते की एखाद्या वेळी हा गुंड आपल्याला मारुन टाकेल वा त्यांना पोलिसही काही करीत नाही. कारण पोलिसांना माहित असते की हा गुंड एखाद्या दिवशी आपल्यालाही ठार करेल.
याबाबत आणखी एक गोष्ट. एका वसतीगृहात गावोगावची मुलं राहात होती. ती मुलं सणासुदीला गावला जात. त्यातच त्या सणाच्या निमित्यानं गावला गेल्यावर ती मुलं गावावरुन परतताच त्यांचे मायबाप त्यांना खाण्याचे पदार्थ बांधून देत. त्यातच काही पैसेही देत.
वसतीगृहाचा एक अधिकारी होता. हा अधिकारी वसतीगृहातील कार्यालयात सकाळी दहा ते रात्री सातपर्यंत राहात असे. त्यानंतर तो लवकरच घरी निघून जात असे.
तो लवकरच घरी निघून जात होता. त्याचं कारणंही होतं. ते म्हणजे त्याला असलेला गुंडाचा धाक. तो तडीपार गुंड होता. तो गुंड सात वाजल्यानंतर वसतीगृहात यायचा. कधीकधी तो वसतीगृहात दिवसाही यायचा. त्यातच तो त्या वसतीगृहातील अधिकारी वर्गाकडून पैसा वसूल करायचा. ते अधिकारी देखील त्याला पैसा देत. कारण तो त्यांना ठार करण्याचीच धमकी द्यायचा. त्यातच त्याची पोलिस तक्रार करायचीही भीती वाटायची. कारण पोलिस स्टेशनमधूनही तो लवकर सुटायचा.
तो गुंड रात्री जेव्हा यायचा. तेव्हा सणासुदीला आणलेले पैसे विद्यार्थ्यांकडून हिसकायचा. नाही दिल्यास मारहान करायचा. त्यातच त्या पैशातून फक्त दारु प्यायचा.
त्याची एकदा पोलिस स्टेशनला तक्रार केली गेली. पोलिसांनी त्याला पकडूनही नेले. परंतू आश्चर्याची गोष्ट अशी की दुस-याच दिवशी तो वसतीगृहात हजर. असे बरेचदा झाले. शेवटी काही विद्यार्थ्यांनी त्याच्या धाकानं वसतीगृह सोडलं व अशारितीनं वसतीगृहच बंद पडलं.
आज समाजात असेच गुंड तयार होत आहेत. त्यांना पोलिसस्टेशनचा धाक राहिलेला नाही. तसेच न्यायालयाचा तर नाहीच नाही. व्यतिरीक्त न्यायालय अशा गुंडाची ग्राऊंडलेवल तपासत नाही. त्यातूनच गुंड वाढत आहेत. गुंडेगीरीही वाढत आहे. साध्या रस्त्यावरच्या बाजारात गुंड फिरत असतात. ते गुंड बाजारातून पैसा वसूल करीत असतात. काही गुंड भर रस्त्यावर बलत्कारही करीत असतात. काही छेडखान्याही राजरोष करीत असतात. त्यातच काही गळ्यातील चैना तोडत असतात. परंतू प्रशासन त्यांना शिक्षेचे दोषी न समजता त्याची लवकर न्यायालयीन कोठडीतून सुटका करते आणि जे मुळात गुन्हेगार नसतात. त्यांना मात्र कोर्टाचे चक्कर मारायला लावते. आज अशीच रीत सुरु आहे.
न्यायालयीन प्रकरणानं तंग आलेल्या सभ्य माणसांना आत्महत्याही कराव्याश्या वाटतात. पण सभ्य माणसांपुढंच विचार असतो. तो म्हणजे त्याचा परीवार. त्याच्या परीवारापुढं ते दुर्बल असतात नव्हे तर न्यायालयात त्याच परीवारामुळं आशेने तारीख तुटण्याची आशा बाळगून कोर्टाचे चक्कर मारत असतात.
कोर्टानं अलिकडं अशी दिरंगाई करु नये. ज्या खटल्यात तथ्य नाही, ते खटले ताबडतोब निपटंवावेत. मात्र जे गुन्हेगारीचे खटले आहेत. त्यात त्यांची पाश्वभुमी तपासावी. त्यातच त्या पाश्वभुमीवरुन कडक अशाच शिक्षा कराव्यात. जेणेकरुन ते पुन्हा गुन्हे करणार नाही. लोकांनीही न्यायालयाचा मान राखावा. उगाचंच भांडणं करु नये. भांडणातून विनाकारण न्यायालयाची धाव घेवू नये. न्यायालयात न्यायीक प्रकरणाची गर्दी करु नये. तसेच भांडणामध्ये विनाकारण वेळ वाया घालवू नये. देश अापला आहे. आपण देशाचे आहोत याचा विचार करावा. त्याचप्रमाणे न्यायालयही आपले आहे याचाही विचार करावा.
आज मुस्लीम जनसमुदायात लग्न मंजूर आहे की नाही असं विचारतांना वधू सांगते, 'कबूल है, कबूल है, कबूल है।' त्यातच अलिकडं काही चित्रपटंही याच अनुषंगानं येतात. असे बरेच चित्रपट आले आणि त्यात दाखवलं की जोपर्यंत आरोपी गुन्हा कबूल करीत नाही. तोपर्यंत पोलिस मारझोड करीत असतात. त्यातच काही शख्स गुन्हे कबूल करतात. त्यांचा दोष नसला तरीही. त्यातच चोरवर्ग सुटतो अाणि संन्यासालाच फाशी होते.
न्यायालयातही अगदी तसंच आहे. कोणाला ब्र देखील काढता येणे शक्य नाही. हं, समजा न्यायालयानं निकाल दिलाच तर दाद अवश्य मागता येते. तोपर्यंत आरोपींची त्यानं गुन्हा केलेला नसला तरी पिसाई होत असते. यातही चोर वर्गाला सोडल्यासारखीच स्थिती.
एक प्रसंग असा. एक असाच खटला. या खटल्यातील वादीनं प्रतिवादीवर खटला दाखल केला होता. यात प्रतिवादीचा अजिबात दोष नव्हता. एका कार्यालयातील दोन कर्मचा-यांचा वाद होता. दोघांचं भांडण झालं होतं पैशावरुन. कर्मचारी बरोबरच होता. त्याला आपल्या अधिका-याला पैसे द्यायचेच नव्हते. कारण तो भ्रष्टाचार होता.
अलिकडे आपली नोकरी टिकविण्यासाठी कनिष्ठ कर्मचा-यांना वरीष्ठ कर्मचा-याला काही रक्कम देण म्हणून द्यावी लागते. काही बक्षीसाचे डबेही देत असतात. जर असा पैसा किंवा असे बक्षीसाचे डबे अधिका-यांना मिळाले नाही तर दोघांची भांडणं होतात. असंच हे भांडण. त्यात कनिष्ठ कर्मचा-यांचा दोष नव्हता. त्यातच वरीष्ठ अधिका-यानं कनिष्ठ कर्मचा-याला त्रास व्हावा म्हणून न्यायालयात जाणूनबुजून खटला दाखल केला. शेवटी कनिष्ठ कर्मचा-यांच्या मागं न्यायालयात चकरा सुरु झाल्या.
काळ हळूहळू सरकत गेला. बदलत्या काळानुसार अधिकारी दोषी आहे हे कोणीही पाहिले नाही. ते फक्त काळानं पाहिले. या काळानं एक दिवस झडप घातली. अधिकारी अपघातात मरण पावला. तसं वर्तमानपत्रात ती बातमी छापून आली. त्यातच त्याचं मृत्यू प्रमाणपत्रही बनलं. परंतू तो खटला सुरुच होता. कनिष्ठ कर्मचा-यावर टाकलेला. न्यायाधीश त्या खटल्यात ती वर्तमानपत्रातील बातमी नाही तर ते ओरीजनल प्रमाणपत्र मागत होते. जे ओरीजनल प्रमाणपत्र त्याला मिळू शकत नव्हते वादींच्या सहकार्याशिवाय. तसेच त्या खटल्यात न्यायाधीश महोदय तो शख्स मरण पावल्याची पुष्टी करण्यासाठी साधी चौकशीही करीत नव्हते. खटला अजूनही सुरुच होता. कारण न्यायालयाला वाटत होतं की वादीनं लावलेल्या आरोपानुसार प्रतिवादीनं गुन्हा कबूल करावा. म्हणजे गुन्हाचे मोजमाप करता येईल.
अलिकडे असे बरेच निरर्थक खटले न्यायालयात सुरु आहेत. ज्या खटल्यातून काहीच निष्पन्न होत नाही. होणार नाही. तरीही ते खटले...... जणू प्रतिवादींना खुनावत असतात की तुम्ही गुन्हा केलाही नसेल तरी कबूल करा. नाहीतर मी असाच तुझ्या पिंडाला लागून सुरुच राहिल. यावेळी अगदी जीव रडकुंडीला येत असतो प्रतिवादींचा. कारण त्याचा गुन्हा नसतोच मुळी. ज्याने गुन्हा केलेला असतो. त्याला त्याचं काहीही वाटत नाही. परंतू ज्यानं गुन्हा केलेला नाही. त्याला मात्र त्याचं पदोपदी वाईट वाटत.
खटले लढतांना वादी प्रतिवादींचा मृत्यूही होतो. वर्तमानपत्रात बातम्याही येतात छापून मृत्यूच्या. पण खटले संपायचे नावच घेत नसतात. असंच सारखं चित्र आज समाजात जागोजागी दिसत असते. त्यामुळेच न्यायालयात गर्दी वाढत असते व ही वाढणारी गर्दी चिंतेची बाब ठरत असते.
कोणतेही खटले का असेना, त्या खटल्यात गव्हाबरोबर सोंडाही पिसला जातो. मग गुन्हा असो अगर नसो. श्रीमंत, मातब्बर लोकांना व्ही आय पी सुविधा मिळतात न्यायालयातही. परंतू सामान्यांचं काय? सामान्य माणसं ही सोंड्यासारखीच असतात. त्यांचा गुन्हा नसतोच कोणताही. परंतू गुन्हे वारंवार घडू नये म्हणून न्यायालय असे अफलातले खटले दिरंगाईचे मार्ग काढत असते. जे खटले वादी प्रतिवादींच्या मृत्यूनंतरही चालत असतात दिर्घ न् दिर्घ. ज्या खटल्यातील वालीही गतकाळात मरुन गेलेले असतात.
खटले लवकरात लवकर संपवायला हवेत. प्रत्येक खटल्याचे आयुष्य हे ठरलेले असावे. खुन, गांजा तस्करी, बाँबस्फोट किंवा बलत्कारासारख्या खटल्यात दिरंगाई बाळगली तरी चालेल. परंतू किरकोळ भांडणाचे खटले........हे खटले तेवढे तीव्रतेने घेवू नयेत. त्यातच सर्वसामान्यांना राहत द्यावी. जेणेकरुन लोकांचा न्यायपालिकेवर विश्वास टिकून राहिल व कोणताच व्यक्ती आपल्या न्यायपालिकेचा आदर बाळगत गुन्हे करणार नाही. न्यायपालिकेबाबत सहिष्णुता बाळगेल.
शर्मीला न्यायालयाच्या पाय-या चढत होती. तसतसे वेगवेगळे विचार तिच्या मनात आकार घेत होते. तसं तिनं आज ठरवलं होतं की आपण सुगतला माफी मागावी व खटला संपवून टाकावा.
एक एक पायरी चढत ती आपल्या कोर्टकक्षात आली. तिथंही गर्दी होतीच. त्यातच तिनं आजूबाजूला नजर फिरवली. तसा एका कोप-यात सुगत बसलेला दिसला.
ती सुगतकडं एकटक पाहातच राहिली. त्यातच तिच्या मनात प्रेम निर्माण झालं. आपण चूक केल्याची जाणीव तिला झाली. त्यातच तिला वाटायला लागलं की आपण बोलावं. तो काही म्हणेल तरीही. पण हिंमत होत नव्हती.
थोड्या वेळाचा अवकाश. तिचा वकील कक्षात आला. तशी ती त्याची भेट घ्यायला कक्षात गेली. म्हणाली,
"वकीलसायेब, मले आपल्यासोबत काहीतरी बोलाचं हाये."
"बोला, बोला. काय बोलायचं ते."
"आम्हाले आमची केस परत घ्याची हाये. आम्हाले लढाची नाय."
"का बरं? नीट विचार करा. मग सांगा."
"नाय सायेब, आम्ही लय इचार केला. आम्हाले खटला बंद कराचा हाय. परवडत नाय.लय पैसा लागते सायेब. तो पैसा आमच्याजोवर नाय."
"परंतू आपल्याच्यानं गुन्हेगार सुटन त्याचं काय?"
"सुटू द्या सुटला तं. आम्ही त्याले माफ करु."
"मग माफीनामा लिहून द्यावा लागेल."
"लिहून देवू. पण एक अट असेल."
"कोणती अट?"
"मले त्याचेसोबत बोलाचं हाये थोडंसं."
"ठीक आहे."
ती वकीलाशी पुर्णतः बोलली. तसं वकीलानं होकार देताच ती बाहेर गेली. तशी कोर्टाची मधली वेळ झाली व कोर्ट काही वेळेसाठी बंद झालं. मात्र तोपर्यंत अजूनही तारीख झाली नव्हती.
मधली वेळ. शर्मीलाला बेचैन करीत होती. त्यातच काही वेळात तिचा वकील त्याच्या वकीलाशी भेटला. सुतोवाच केलं व ठरलं की समझोता व्हावा. तशी वकीलाची भेट होताच तिच्या वकीलानं काही कागदपत्र तिच्या समक्ष आणले व तिला त्यावर सही करण्यास सांगीतले. त्याच समझोता करारावर त्याचीही सही घेण्यात आली. जसा जणू विवाहाचा करार होत आहे.
त्यातच तिच्या मागणीनुसार थोडं बोलण्यासाठी वकीलाच्या म्हणण्यानुसार सुगत तिच्यासोबत थोडा दूर गेला. तसा तो तिला म्हणाला,
"बोल, काय बोलायचं ते लवकर बोल."
शर्मीला बोलणार होती. तोच तिला कसं बोलावं याची हिंमत होत नव्हती. तशी ती गप्प राहिली. ते पाहून सुगत म्हणाला,
"बोल ना लवकर. काय बोलायचं ते."
त्याचे ते शब्द. ती बोलकी झाली. म्हणाली,
"सुगत, माफ कर मले. मी फार मोठा गुन्हा केला. मले वाईट वाटत हाये."
तसा तो म्हणाला,
"It's ok."
ते इंग्रजीतील शब्द. तिला काहीच समजले नाही. तशी ती परत म्हणाली,
"का म्हणलं?"
तसा तो म्हणाला,
"मी ठीक आहे म्हटलं."
"बरं ठीक हाये. एक गोष्ट इचारु."
"विचार."
"तू मायाशीन लगन कर."
लगनाचा विचार. सुगतच्या मनपटलावर उमटला होता. तसा तो विचार करु लागला. तोच तो काही वेळानं विचार करुन म्हणाला,
"नाही. मी तुझ्याशी विवाह करु शकत नाही."
"का बरं? आता मायाशी विवाह कोण करन."
"त्याचा विचार तू पहिलंच करायला हवा होता. आता एवढा खटला चालल्यावर........"
त्याचे ते शब्द. ती व्यथीत झाली होती. परंतू काय करणार ती. ती आता मजबूर होती. तिला त्याचेशी विवाह करण्याची इच्छा असली तरी आता ती पूर्ण होवू शकत नव्हती. कारण तिनं टाकलेल्या त्या खटल्यात सर्वात जास्त त्रास त्यालाच झाला होता.
तिला केसची फाईल बंद करणं आवश्यक होतं. कारण आज तिच्याजवळ पैसा नव्हता पुरेसा. केस भांडायला पैसा लागत होता. वकील जरी निःशुल्क असला तरी जाणं येणं करण्याची ताकद तिच्यात नव्हती. तिनं त्याला विवाहाचं विचारता यावं म्हणूनच दूर नेलं होतं. पण त्याच्या उत्तरानं तिची आशा पूर्णतः फोल ठरली होती. तशी ती गप्प होती. ते पाहून तो म्हणाला,
"अजून काही बोलायचं आहे का?"
"नाय. आतं काईच बोलाचं नाय."
"बरं. ठीक आहे."
तिनं गप्प राहताच तोही निघाला. त्याचेपाठोपाठ तिही. तसं त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. त्याच्या मनात तिच्याबाबत अास्था निर्माण झाली होती. वाटत होतं की तिच्या केस लढण्यात काहीतरी काळं पांढरं नक्कीच असेल किंवा कोणीतरी तिला भडकवलं असेल. म्हणूनच तिनं आपल्यावर आरोप लावला असेल.
आरोपी म्हणून असलेला तो. जणू ते विवाह केलेले जोडपे वाटत होते. परंतू या करारानुसार त्यांच्यात जणू घटस्फोटच होत आहे असं वाटत होतं.
आज जणू त्याच्याही मनात कितीही कुतूहल निर्माण झालं असलं तरी तो तिच्याशी विवाह करु शकणार नव्हता.
थोड्या वेळाचा अवकाश. कोर्ट सुरु झालं. शर्मीलाच्या वकीलानं तो समझोतापत्र न्यायाधीशासमोर सादर केलं. त्यातच त्या न्यायाधीशानं ते समझोता पत्र वाचलं. त्यांनी त्यांच्याकडं पाहिलं व पुढची तारीख देत म्हटलं,
"येणा-या पुढच्या तारखेला तुम्ही आपल्या मतावर ठाम राहा म्हणजे झालं."
न्यायाधीशाच्या या वाक्यावर ते काहीच बोलले नाही. तशी तारीख होताच ते बाहेर पडले व आपल्याआपल्या दिशेनं जायला निघाले. तोपर्यंत सायंकाळ होवून गेली होती.
शर्मीला घरी निघाली होती. रस्त्यातून जातांना आज तिचे पाय चालत नव्हते.,अतिशय जड वाटत होतं तिला पाऊले टाकतांना. जणू आपण आपल्या पतीलाच सोडत आहो असं तिला वाटत होतं.
सुगत तिचा पती नव्हता. तसा तो तिचा प्रियकरही नव्हता. त्यातच त्याला बदनाम करण्यासाठी व त्याची नोकरी सुटावी म्हणून तिनं आरोप लावला होता त्याचेवर. परंतू त्याची परीयंती केसमध्ये झाली व तिला केस भांडावी लागली. त्यातच त्याचं जसं नुकसान झालं. अगदी तिचंही तसंच नुकसान झालं. त्यातच कंटाळून तिनं आपली केसही मागं घेतली. कारण तिला पैशाची समस्या सतावत होती. परंतू आज ती केस समाप्त करतांना तिच्या मनात त्याचेविषयी साहजिकच प्रेम निर्माण झालं. जे प्रेम त्याला मिळवितांना कामात येत नव्हतं.
आज जेव्हा ती रस्त्यानं निघाली होती. तेव्हा अतिशय जड अंतःकरणानं ती पावले टाकत होती. तिला वाटत होतं की तोच पती म्हणून तिला मिळायला हवा होता. याउलट सुगतचं होतं. त्याच्या मनात तिच्याबाबत किंचीतही कुतूहल नव्हतं वा त्याला प्रेम वाटलं नाही. त्याला तर वाटत होतं की ती त्याची जिंदगी बरबाद करीत होती.
त्याचंही बरोबरच होतं. कारण तिनं जे वादळ त्याच्या जीवनात आणलं होतं. त्या वादळानं खरंच त्याची जीवनी बरबाद होणार होती. बरं झालं, त्याची नोकरी वाचली.
****************************************

सायंकाळचे सहा वाजले होते. पक्षी आपआपल्या घरट्यात पोहोचले होते. तसा त्यांचा किलबिल आवाज कानावर येत होता. परंतू अजुनपर्यंत शर्मीला घरी पोहोचली नव्हती. एसटीच्या संपानं ती त्रस्तच होती.
वाहनांची वाट पाहता पाहता सायंकाळचे सहा वाजले. कोर्टानं चार वाजताच तारीख दिली होती. त्यातच घरी पोहोचायला शर्मीलाला रात्रीचे आठ वाजले होते. सगळीकडं अंधार दाटला होता. त्या अंधाराला चिरत चिरत मनात असंख्य विचार करीत करीत ती चालली होती. तिला दुःख होत होतं त्याचं. तिच्या जीवनाची अवस्था तेलही गेलं, तुपही गेलं अशीच झाली होती.
गाव तसं मुख्य रस्त्यावरुन दूरच होतं. तिला पायी चालावं लागत होतं. तशी ती आपल्या आईसोबत पायी चालत होती. तशी ती स्वतःलाच कोसत होती. तसं पायी चालत असतांना अचानक भुतकाळ तिच्यासमोर प्रत्यक्ष उभा झाला. त्या कोर्टाच्या पाय-या अन् ते सारच काही.
पोलिसस्टेशनला तक्रार करुन बरेच दिवस झाले होते. काय झालं आणि काय नाही, ते काहीच कळलं नव्हतं. सगळं सुखसोयीनं चाललं होतं. शिक्षणही झालं होतं. परंतू ती दहावी नापास झाल्यानं पुढं शिकण्याची इच्छा नसल्यानं ती पुढे शिकली नाही. तिनं शिक्षण सोडलं व ती शेतीच्या कामाला जावू लागली. त्यातच विवाहयोग्य वय झालं.
मायबापानं तिचा विवाह करण्याचं ठरवलं. परंतू कोर्टाची केस असल्यानं व उद्या ही केस सासरकडील मंडळींना माहित झाल्यास तिला ते सोडून देतील या भीतीनं तिचं आईवडीलांनी विवाह जोडला नाही. तसं पाहता गावातील लोकांच्या कुरघोडीनं व तिची बदनामी झाल्यानं तिचा विवाह झाला नाही. त्यातच कोणावर प्रेमही करायचा झाल्यास कसा करणार. पाहिजे त्या प्रमाणात विधात्यानं सुंदरता दिलेली नव्हती.
शेतीवर काम करता करता त्या तरुण वयात तिच्या चेह-यावर काळे डागही पडलेले होते. सौंदर्य निखरलं होतं, तरी पाहिजे त्या प्रमाणात ते सौंदर्य निखरलं नव्हतं. त्याचं कारण होतं चिंता.
शालान्त नापास झाल्यानंतरही विवाह जुळत नसल्यानं ती बेचैन होत होती. ती कोर्टाची तारीख सुरु आहे की नाही याची तिलाही बरोबर माहिती नव्हती. अशातच एक दिवस एक पोलिसवाला तिच्या घरी आला. विचारलं,
"शर्मीला आहे का घरात?"
शर्मीला आहे का घरात विचारताच ती बाहेर निघाली. त्यातच तिचे मायबाप आणि बहिणीही. त्यातच तिची आई म्हणाली,
"का हाये जी?"
"वारंट आहे. कोर्टाचा वारंट."
"कोर्टाचा वारंट म्हणजे?"
"पकड वारंट आहे. लिहिलं आहे की दिलेल्या तारखेववर कोर्टात हजर व्हावं. नाहीतर पकडून न्यावं लागेल."
"पण कशाचा वारंट?"
"तुम्ही काही केस टाकली असेल कोर्टात. त्याचाच वारंट."
शर्मीला ते सगळं ऐकत होती. तशी ती म्हणाली,
"आई, जावू दे नं. नसती चौकश्या करतेस."
शर्मीलानं तसं म्हणताच तिची आई गप्प झाली. तोच शर्मीला म्हणाली,
"द्या मायाकडं."
"बेटा, हितं सही मार तुझी."
शर्मीलानं पोलिसानं सांगीतलेल्या दिशानिर्देशानुसार त्या कागदावर सही मारली व तो कागद पोलिसांकडून घेतला. तसा पोलिसवाला निघून गेला.
पोलिसवाला निघून जाताच शर्मीलानं लिफाफा फोडला व त्यातील नोटिस बाहेर काढला व ती वाचू लागली.
तो कोर्टाचा वारंट होता. केस बोर्डावर आली होती. त्यातच ती त्या केसची प्रमुख असल्यानं तिला कोर्टात हजर राहायला लावलं होतं. त्यात तारीख दिली होती.
शर्मीलानं तो नोटिस वाचला. थोडा घाबरटपणा सुटला. कारण तो कोर्टाचा नोटिस होता. तसा तिच्या मनात विचार आला. आता कशी भांडायची केस. मला तर यातलं काहीच माहित नाही. फुकटच मी या भानगडीत पडले. बापाचं ऐकून लोभापायी मी सारं गमावलं.,इज्जत अब्रूदेखील. त्यामुळं माझा विवाह झाला नाही.,आता मी माझा पैसाही गमावणार.
मनात तो नोटिस पाहताच विचारांचं काहूर माजलं. त्यातच दोनचार दिवस असे वैतागात गेले. तसा तारखेचा दिवस उजळला.
तारखेचा तो दिवस. वाटलं आज पहिल्या तारखेलाच फैसला होईल व तारीख तुटून जाईल. कारण तिला त्यातील एबीसीडी ही माहित नव्हती. परंतू तो विचार तिचा फोल ठरला होता. त्या कोर्टात तारीखवर तारीखच सुरु झाली होती.
तारीखवर तारीख मिळताच व त्या तारखांवर जात असतांना तिला अगदी वैताग येत होता. पण काय करणार, उपाय नव्हता. कधी बसची समस्या तर कधी कोणता प्राब्लेम. यामुळे तिला परेशानी होत होती. त्यातच ती केस सातव्या माळ्यावर असल्यानं त्या चढतांना त्या तरुण वयातही तिचे पाय दुखत होते. त्यातच म्हाता-या आईबाबांचेही.
ती कोर्टाची तारीख आज संपण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्यातच एक दिवस तिच्या बाला झटका आला व भावराव क्षणार्धात चालला गेला.
ती कोर्टाची तारीख. त्यातच बाबा गेलेले. तिला अतिशय वाईट वाटत होतं. घरात फार मोठं दुःख कोसळलं होतं. त्यातच बहिणींचे लग्नही झाले नव्हते. पाचही बहिणी आज विवाहयोग्य झाल्या होत्या.
आज देशात बोलण्याच्या शितयुद्धाची लहर सुरु होती. नेत्यांनी बोललेलं वक्तव्य. कोणी म्हणत की त्या नेत्यांचं बोलणं देशविरोधी आहे. कोणी जनतेच्या बाजूनेही व्हाट्सअपवर मेसेज पाठवीत असत. पण त्या मेसेजमध्ये आपले नाव टाकत नसत. कारण प्रत्येकाला भीती असे की आपण जर नेत्यांच्या बाजूनं बोललो किंवा राहिलो, तर जी कारवाई नेत्यांवर होवू शकते. तीच कारवाई आमच्यावरही होईल. त्यापेक्षा चूप बसलेलं बरं. त्यांचंही बरोबरच होते. कारण उगाच कोण फुकटचा वाद स्वतःवर ओढवून घेणार. कायद्याचा धाक होता.परंतू लापरवाही करीत करीत काही नेते बरळतच असत. त्यांच्या केसेसही होत कोर्टात. त्या चालतही असत. तरी त्यांना फरक पडत नसे.
शर्मीला त्यावरही तसा विचार करायची. भोग हे सामान्य माणसालाच. नेत्यांनी छेडखाणी केलीही किंवा काही केलंही. तरी त्यांना काही प्राब्लेम नाही. त्यांनाही कायदा सोडत नाही.
विचारस्वातंत्र्य......घटना कलम बारा ते पसतीस अंतर्गत भाग तीन मध्ये मुलभूत स्वातंत्र्याअंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. त्यानुसार प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. बोलणे म्हणजे वाचाळ बोलणे नाही. परंतू मत अवश्य मांडता येते. हा अधिकार आपल्याला कलम १९ अ अंतर्गत दिला गेला आहे.
कोणी म्हटलं की भारताला मिळालेलं स्वातंत्र हे भीकेतून मिळालं. परंतू ते वाचाळ बोलणं झालं. कारण स्वातंत्र काही देशाला भीकेतून मिळालेलं नाही. त्यासाठी मेहनत करावी लागली. हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली.
कलम १९ अ अंतर्गत मिळालेलं हे अभिव्यक्ती स्वातंत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घटनेत पुरस्कार केला. पण हे जरी खरं असलं तरी कोणत्याही प्रकारचं बेताल वक्तव्य कोणालाही करता येत नाही. तसाच कोणताही शर्मीलासारखा आरोप कोणावरही लावता येत नाही. अन् समजा तसा आरोप लावल्यास तो आरोप न्यायालयामार्फत पुरावे देवून सिद्धही करावा लागतो.
आज देशात जिकडे तिकडे बेताल वक्तव्य सुरु आहे. बोलण्याला काहीच तारतम्य उरलेलं नाही. उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारचं वाचाळ वक्तव्य सुरु आहे. त्यातच कोणावरही कोणतेही आरोपही लावणे सुरु आहे. कोणी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी अर्थात असं बोलून स्वतःची आणखी प्रसिद्धी करुन घेण्यासाठी असं वक्तव्य करतो नव्हे तर आरोप प्रत्यारोप लावतो. जणू स्पर्धाच चालल्यासारखी. नेते असं का बोलतात ते कळत नाही. परंतू देशाला स्वातंत्र भीकेतून मिळालं नाही हे तेवढं खरं.
देशाच्या स्वातंत्र्याबद्दल थोडं सांगतो. देश हा केवळ इंग्रजांचाच गुलाम नव्हता. (कारण देशाला सारे इंग्रजांचेच गुलाम समजतात) तर तो अनादीकालापासून गुलामच राहिलेला आहे. पुर्वी हा देश अनेक राज्यामध्ये विखुरलेला असून या देशात अनेक लहान लहान राजे होती. त्या राज्यात प्रजा ही राजेशाहीची गुलाम होती. ज्यात काही राजे जरी चांगल्या स्वभावाचे असले तरी काही राजे हे नक्कीच हुकूमशाही स्वभावाचे होते. ते प्रजेवर केव्हाही जुलूम करीत. त्यात प्रजेतील कोणत्याही नागरीकाचा केव्हा जीव जाईल याची शाश्वती नव्हती. ही राजेशाही आजपर्यंत चालली.
या राजेशाहीत इस च्या सातव्या शतकापर्यंत काही राजे हे हिंदू राजे झाले, काही बौद्ध धर्मीय तर काही जैन धर्मीयही झाले. यात या प्रत्येकांनीच शांततेनं राज्य केलं असं नाही. तर काही राजांनी अराजकतेनंही राज्य केलं.
हे सर्व राजे इसाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले. पुढे या देशात मोहम्मद बिन कासीमच्या रुपानं अरबांचं आक्रमण झालं आणि मुस्लीम सत्ता या देशात उदयास यायला लागली. त्यातच या देशात मुस्लीम शासक अकराव्या शतकात स्थिरावली. नंतर तेही येथे हिंदू मुस्लीम भेदभाव करीत या देशातील हिंदू धर्मीयांवर अन्याय करु लागले. तसेच चौदाव्या शतकात गोव्यामध्ये आलेले पोर्तूगीज आपला धर्म या देशात वाढविण्यासाठी हिंदूंचे हात कापू लागली. आजही तिथे असलेला हातकातरी खांब याची साक्ष देतो. कालांतरानं या देशात मुस्लीम शासन जावून ब्रिटीश शासन आलं. तेही या भारतीयांवर अत्याचार करु लागले. तरी आम्ही ते सगळं सहन करीत गेलो. कारण आम्ही ब्रिटिश शासन भारतात येईपर्यंत शिकलो नव्हतो.
ब्रिटिश शासन भारतात येताच त्यांनी या देशातील काही लोकांचे जीणे पाहिले. त्यांच्यावर याच देशातील याच लोकांकडून होणारा अत्याचार पाहिला व त्यांनी ठरवलं की या देशात यांना शिकविण्यासाठी शाळा उघडाव्या. त्यांनी या देशातील लोकांना शिकविण्यासाठी शाळा उघडल्या. त्यात त्यांना शिकवलं. याचा अर्थ त्यापुर्वी या देशात शाळा नव्हत्या काय? त्याचे उत्तर म्हणजे या देशात त्यापुर्वीही शाळा होत्या. पण त्या शाळेत केवळ युद्धाचं शिक्षण मिळत होतं. राज्यकारभाराचं शिक्षण मिळत होतं. परंतू आपले अधिकार व कर्तव्य कोणती? त्यांचा वापर कसा करावा? हे शिक्षण मिळत नव्हतं. तसेच ते शिक्षण त्यापुर्वी विशिष्ट वर्गाला होतं. परंतू ब्रिटीश आल्यानंतर त्यांनी ते शिक्षण सार्वत्रीक केलं. त्यानुसार लोकं शिकले. त्यांनी इंग्रजांसोबत उभे राहून सुधारणा घडवून आणल्या. काही मात्र स्वातंत्र्यासाठी उभे राहिले. त्यांना वाटलं की बस झालं आतापर्यंतचं पारतंत्र्य. आता आपलं राज्य यावं. राजेशाही नष्ट व्हावी.
इंग्रजांनी येथील जनतेला शिकवलं खरं. येथील सतीप्रथा, अस्पृश्यतानिवारण बंद केलं खरं. परंतू ते या देशाला स्वातंत्र देवू पाहात नव्हते. त्यातच शिकलेले भारतीय......त्यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य समजताच ते स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरीत झाले. त्यांनी जनतेत स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. त्यातच काही लोकांनी हौतात्म्यही पत्करले.
नेत्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हा देश काही भीकेतून मिळालेला नाही. तसं बोलू नका. कारण या देशानं लहान सहान क्रांतीकारक पाहिलेत. शाळकरी विद्यार्थ्यांचे हौतात्म्य पाहिले. त्यातच आबालवृद्धांचेही हौतात्म्य पाहिले. हा देश स्वतंत्र करण्यासाठी कित्येक महिलांनी आपले पती दिले. तर कित्येक महिलांनी आपले पुत्र. त्यातच पंधरा आगष्ट १९४७ ला देश स्वतंत्र्य झाला.
देश हा भीकेतून मिळालेलं फलीत नाही. त्यासाठी आपल्या पुर्वजांची अपार मेहनत आहे. हा देश टिकवायचा आहे नव्हे तर तो टिकविण्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायचा आहे. व्यतिरीक्त विकासही करायचा आहे. परंतू तो विकास करण्याऐवजी या देशात चालतात फक्त राजकीय समीकरणं आणि त्या समीकरणातून बेताल वक्तव्य. कोणी त्याला आपली प्रसिद्धी समजतात. तर कोणी त्या बोलण्याला राजकीय स्टंट. परंतू ते काहीही असो. कलम १९ अ अंतर्गत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र मिळालं हे खरं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं आहे घटनेत कलम लिहून हेही खरं आहे. तेव्हा आपणास नम्र विनंती आहे की बोला. बोलायची मनाई नाही. पण असं बोलू नका की जे बोलणं वाचाळ असेल व जे देशाला घातक असेल. तसेच जे देशाचा विकास रोखणारे असेल. ज्यात राजकीय स्टंट असेल वा प्रसिद्धी असेल. असं बोला की ज्यातून देशाचं हित साकार होईल व देशाचा विकास साध्य होईल. देश जगामध्ये विकासाच्या मर्यादा ओलांडून जागतीक क्रमवारीत क्रमांक एकवर येईल.
शर्मीला असं काही बोलून गेली की ते वाचाळच बोलणं होतं. तिचं विनाकारण सुगतवर आरोप लावणंही कायद्याच्या कसोटीत बसत नव्हतं. त्याची शिक्षा सुगत तर भोगत होताच. ती शिक्षा शर्मीलालाही भोगावी लागत होती. तारीख वर तारीख हजर होवून. तिलाही तिनं लावलेला आरोप सिद्ध करण्यासाठी कोर्टाच्या चकरा माराव्याच लागत होत्या. मनात किंतू परंतू न ठेवता. कारण घटनेनुसार कोणावर कोणताही आरोप लावता येत होता. परंतू तो आरोप लावल्यानंतर पुरेसे स्वतःच पुरावे देवून सिद्धही करावा लागत होता. हे तेवढंच सत्य आहे.
शर्मीलाची आई ही म्हातारपणाकडं वाटचाल करायला लागली होती. तिला हा खटला म्हणजे टेन्शन वाटत होतं. त्यातच केस केव्हा संपते आणि केव्हा नाही असंही तिला वाटत होतं. अशातच आज पुन्हा कोर्टाची तारीख आली.
ती कोर्टाची तारीख. त्यातच नेहमीप्रमाणं शर्मीला कोर्टात हजर झाली. पुकारा झाला. तशी ती हजेरी द्यायला कोर्टासमक्ष उभी झाली. त्यातच तिच्या वकीलानं तिनं आणि त्यानं सही केलेले दस्तावेज कोर्टाला सादर केले.
न्यायाधीश महोदय ते कागदपत्र वाचत बसले. त्यातच एक कटाक्ष तिच्याकडं टाकला. तसे ते म्हणाले,
"बेटा, का बरं केस परत घेते?"
"..........." ती काहीच बोलली नाही.
"बरं बेटा, मला वाटते की मी तुझ्या भावनेवर आघात केला. घाबरु नको. निश्चींत राहा."
न्यायाधीश महोदय बोलून गेले खरे. तिला थोडी सहानुभूती वाटली. निकाल तिच्याच पक्षानं लागला असता असंही तिला वाटलं. परंतू ती तरी काय करणार. तिच्याजवळ पुरेसा पैसा नव्हता. त्यातच ती विचार करु लागली.
माझी खोटी केस. ही केस माझी मलाच माहित. अशा कितीतरी केसा कोर्टात येत असतील. अशा कितीतरी केसेसवर न्यायाधीश सहानुभूती दाखवत असतील आणि अशा कितीतरी केसेसमध्ये आरोपी म्हणून ज्यांचा गुन्हा नसतो. तोही अडकत असेल. त्यातच काही काही गुन्हेगार पुराव्याअभावी सुटतही असतील ख-या गुन्ह्यातून. आज खरा गुन्हा मीच केला. परंतू बिचा-या सुगतच्या मागं भोगमान आलं. आज जवळपास एवढ्या दिवसापासून तो कोर्टात चकरा मारत आहे. न्याय मिळावा म्हणून आणि त्याला अजुनही न्याय मिळाला नाही. जर मी केस अशीच सुरु ठेवली आणि लढत राहिलो तर माझा विजय निश्चीत आहे. कारण आजही माझ्या केसेसमध्ये असलेले प्रत्यक्ष साक्षीदार हे योजनेतून ठरलेले आहेत. ते माझ्याच बाजूनं बोलतील व मला माझा खटला यशस्वी करता येईल. पण त्याला वेळ लागेल. आजही अख्खं गाव माझ्या केसमध्ये पैसा लावू शकतं. जर मागीतला तर. आजही सरपंच मला पैसा देवू शकतो सुगतला नेस्तनाबूत करण्यासाठी. कारण त्याला सुगतची नोकरी करणं आवडत नाही. गावातून कोणीही पुढं गेलेलं आवडत नाही. पण नको. बिचा-या सुगतचा काही गुन्हा नसतांना त्याला फसविणे आता नको. आपण माघार घेतलीच पाहिजे. आपल्या खटल्याचा त्याला तर त्रास होतोच. व्यतिरीक्त आपल्यालाही त्रास होतोच. तेव्हा आपणच स्वतः होवून केस बंद करावी.
तिच्या मनात निर्माण झालेली भावना. आज तिला वाटत होतं की ती त्यावेळी नाबालिग होती. तिला कळत नव्हतं. परंतू आज ती सज्ञान झाली होती. तिला कळत होतं की गुन्हा कोणाचा. त्यातच जशी त्या खटल्याची झळ त्याला पोहोचली होती. तशीच तिलाही पोहोचली होती.
न्यायाधीश महोदयांनी आपला रुख तिच्याकडून प्रतिपक्ष वकीलाकडे वळवला. तसं विचारलं,
"आपल्याला काही सांगायचं का यावर."
"नाही." प्रतिपक्ष वकील म्हणाले.
"तर मग ठीक आहे. या खटल्याचा निकाल पुढच्या तारखेला लावू."
पुन्हा तारीख. तिचा जीव अगदी वैतागून गेला होता. तारीखवर तारीख तिच्या जीवनात सुरुच होती.
तारीख झाली होती. तशी ती बाहेर निघाली. तिनं एक कटाक्ष सुगतकडे टाकला. अन् ती त्या कोर्टाच्या पाय-या उतरु लागली. मनात विचार होता की आपण हे केले ते बरे नाही केले.

****************************************

सुगत नेहमीप्रमाणं तारखेवर जात असे. त्याला फार वाईट वाटत असे. जो गुन्हा केला नाही, त्याची शिक्षा आपण भोगतो आहोत असं त्याला वाटत होतं. त्यातच मागच्या तारखेत शर्मीलानं समझोत्याची गोष्ट करताच तो आनंदीत झाला होता. तरी त्याला वाटत होतं की शर्मीलाचा मुळ जर बदलला तर ती, ती केस परत घेणार नाही व पुन्हा मला ही केस तारीखवर तारीख करीत लढत राहावी लागणार.
तो तिचा समझोता ऐकून आनंदीत झाला नव्हता. त्यातच तिनं जेव्हा समझोता म्हटलं, तेव्हा कोर्टात एका वकीलानं टिपणी केली होती की बघ, तिच्यात किती चांगली भावना आहे की तिनं तुला सोडलं. तेव्हा तर त्या वकीलाचा सुगतला रागच आला होता.कारण त्या वकीलाला काय माहित होतं की सुगतच्या आयुष्यात काय घडलं ते.
न्यायाधीश महोदयांच्या म्हणण्यानुसार पुढची तारीख आली. शर्मीला ठरल्याप्रमाणे पुन्हा तारखेवर हजर झाली. परंतू तारीख वर तारीख करत पुन्हा तिला तारीखच मिळाली. कारण यावेळी वकील हजर नव्हता.
सुगत तसेच शर्मीलालाही तारीख केव्हा केव्हा तुटते असं होवून गेलं होतं. तसा तो एकदाचा दिवस केव्हा उजाडणार आणि केव्हा तारीख तुटणार असं होवून गेलं होतं. ज्या दिवशी तारीख चुपचाप. तो दिवस सुगत आणि शर्मीलासाठी आनंदाचा ठरणार होता. सुगतला तारीख तोडून एकदाचे मोकळे होणे आवडत होते. परंतू ते त्याच्या हातात नव्हते.
विवाहाचं त्या दोघांचं वय. दोघांनीही समझोता करारावर सह्याही केल्या होत्या. तरीही तारीख सुरुच होती. काय करावं सुचत नव्हतं. कदाचित सरकारी वकील, न्यायाधीश महोदय व सुगतच्या वकीलानं संगनमत केलं असेल. ते संगनमत म्हणजे ह्या दोनपैकी कोणीही पुढील काळात कधीही न्यायालयात येवू नये. पुन्हा कोर्टाला त्रास देवू नये.
विवाहाचं वय होत चाललं होतं. सुगतचं ठीक होतं. तो पुरुष होता. परंतू शर्मीला स्री होती. तिला विवाह करणं भाग होतं. त्यातच तिनं विवाह नसता केला तर तिच्या बहिणीचा विवाह झाला नसता. अशातच एक मुलगा तिला पाहायला आला व तिनं कोर्टाची तारीख न सांगता विवाह केला.
दोनचार महिने ठीक गेले. तारीख आली की शर्मीला कोणतेतरी कारण सांगून माहेरी यायची. तारीख करायची व पुन्हा परत जायची. परंतू ते काही जास्त दिवस चाललं नाही. अन् चालेलही कसं. तसंच ती कोर्टाची केस होती. ती जास्त दिवस लपेल तरी कशी? शेवटी सहा महिने विवाहाला होताच ती कोर्टाची केस तिच्या पतीला माहित झाली. मग काय तिच्या कुटूंबात वादळ तयार झालं व त्याची परीयंती पुन्हा भांडणात झाली. तिच्या पतीनं तिला हाकलून दिलं. त्यातच घटस्फोटाची पुन्हा नवी केस तयार झाली.
एक केस संपली नाही. तोच दुसरी केस. त्यातच ती परेशान झाली होती. आता ती घटस्फोट आणि छेडखाणी या दोन्ही केसा भांडत होती. काय करावं तिला काही सुचत नव्हतं. तारीख वर तारीख..........तारीख तुटायची काही नावच घेत नव्हती.
शर्मीलाच्या जीवनाचं जसं वाटोळं झालं होतं. तसंच वाटोळं सुगतच्याही जीवनाचं झालं होतं. शर्मीलाची तारीख........ त्यातच सुगतची नोकरी. यात तारतम्य राहात नव्हतं. त्यातच सुगत शाळेत काहीही कारणं सांगून सुट्टया मारत होता.
सुगतच्या सुट्टया मारणं शालेय प्रशासनाच्या लक्षात आलं होतं. शालेय प्रशासनानं त्याच्याकडं कटाक्षानं लक्ष दिलं होतं. त्यातच त्या गोष्टी लक्षात घेवून शालेय प्रशासनानं त्याचा फायदा घेत त्याला पैशाची मागणी केली.
सुगत हा इमानदार होता. त्याच्या वडीलानं त्याला इमानदारी शिकवली होती. तो शालेय प्रशासनाला लाच म्हणून पैसे कसे काय देणार. तो त्या गोष्टीचा विरोध करीत होता.
सुगत ज्या शाळेत नोकरी करीत होता. ती शाळा एका खाजगी प्रशासनाची शाळा होती. त्यातच ती खाजगी शाळा त्याला मिळणा-या पगारातून पैशाची मागणी करीत होती. तो पैसा देणे हे इमानदारीचे लक्षण नव्हते. त्यातच ते कृत्य त्याला आवडतही नव्हते.
सुगतला वाटत असे की शाळेचा स्तर सुधरवता येईल. पण शाळेतील संचालकानं आपला स्तर सुधरवला तर.

****************************************

अलिकडे काही सरकारी शाळेचा स्तर बिघडत चाललेला दिसून येत होता. मराठी शाळा ओस पडत चाललेल्या होत्या. काँन्व्हेंटच्या शाळा वाढत चाललेल्या होत्या. लोकांचा कल सरकारी शाळेकडे नसून खाजगी शाळेकडे होता. त्यातच काही मराठी सरकारी शाळेत शिक्षक बरोबर शिकवीत नसल्याने पालक वर्ग आता खाजगीकरणाकडं वळलेला होता. त्याचे कारणही तसेच होते. सरकारी शाळेत सतत कोर्टाचे खटले वाढत होते. त्याची झळ विद्यार्थ्यांपाठोपाठ पालकांनाही पोहोचलेली होती. ज्या शाळेचे न्यायालयीन खटले सुरु असत. ती शाळा फोल. असे संभ्रम पालकात निर्माण होवून अशा शाळेची पटसंख्या अगदी अल्प होत होती. परंतू अशा शाळेची संख्या अल्प होत असली तरी त्यात शिक्षकांचा दोष काय? हा प्रश्न सुगतला पडत होता. तो प्रश्न कोणीही जाणून घेत नव्हता. याउलट शिक्षकाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु असत. यातच सरकारला जे खाजगीकरण अपेक्षीत होते. तेच होवू घातलेले होते.
कोर्टाच्या चक्करामध्ये वाढ होत होती. काही सुगतसारखे शिक्षक संचालकाच्या देणला घाबरत नव्हते. ते संचालकाची गुंडगीरी शाळेत चालू देत नव्हते. त्यातच संचालक आपल्या शाळेतील शिक्षकांवर आरोप प्रत्यारोप लावत, कधी वेतन बंद करत तर कधी वेतनवाढी लावत नसत. त्यातच शिक्षकांवर अन्याय करत. त्यांना नानाप्रकारचा त्रास देत. त्यातच असा त्रास झाला की शिक्षक न्यायालयाचा मार्ग पत्करत असत. त्यातच सुगतला संचालकाचा त्रास खपत नसे.
आज न्यायालयात खटल्यांची गर्दी वाढत चाललेली होती. इतर स्तरावरच्याही खटल्यात वाढ होतांना दिसत होती. त्यातच शाळेतील खटल्यातही वाढ होत होती.
शाळेमधील खटल्यातील वाढीची नेमकी बाब म्हणजे खंडणी. संचालक मंडळांनी आज शाळेचा मुळ उद्देश सोडलेला असून आजमीतीला फक्त पैसा कमविणे हाच उद्देश ठेवलेला होता. सेवा किंवा विद्यार्थी मुल्य केव्हाच हद्दपार झालेले होते. आज देशात भांडवलशाही प्रथा अस्तित्वात असल्यानं प्रत्येकानं किती संपत्ती जमवावी त्यावर बंधन नव्हते. असे असतांना शाळा काढण्यापुर्वी संचालकाकडे जेवढा पैसा असतो. तेवढाच पैसा त्याच्या शाळा काढल्यानंतर दिसत नव्हता. त्यात कितीतरी पटीनं प्रचंड वाढ झालेली किस्त असे. हा पैसा कुठून आला याची साधी चौकशी होत नव्हती. तसेच जर चौकशी झालीच तर संपूर्ण माहिती विभागाला प्राप्त होत नव्हती. परंतू महत्वाचं सांगायचं म्हणजे हा पैसा जनतेचा होता.
शिक्षकांना देण्यात येणारे वेतन हे सरकार देत असलं तरी तो जनतेच्या करातून आलेल्या पैशातून मिळत असते. त्यातच शाळेत जे शिक्षक शिकवितात. त्या शिक्षकांच्या शिकविण्याच्या मेहनतीचा परीणाम म्हणून सेवा केल्याबद्दल शिक्षकांना हा पैसा मिळत असतो. यात कोणाचा वाटा अजीबात नसतो. अशा शाळेत संचालक मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करतांना आपल्या नात्यातील व्यक्तींची नियुक्ती करतो. ब-याचशा शाळेत मुख्याध्यापक हे संस्थाचालकांचे नातेवाईक असतात. जे नातेवाईक नसतात. त्यांचं संचालकाशी पटत नाही. कारण ते संचालकाच्या कोणत्याही काळ्या कामावर सह्या करीत नाहीत.
बरेचसे संचालक हे शिक्षकांच्या पैशावर डोळा ठेवतात. त्यांचा विद्यार्थ्यांची सेवा करणे हा उद्देश नसतो. त्यातच ते आपल्या नात्यातील मुख्याध्यापकांना वेठीस धरुन शिक्षकांकडून अशी खंडणी वसूल करण्यासाठी शिक्षकांना मुख्याध्यापकामार्फत त्रास देत असतात. त्यातच दोघांचं संगनमत होतं व त्यातून शिक्षकांकडून मुख्याध्यापक जबरन पैसे वसूल करतो. त्यातच जो काही पैसा येतो. त्यात संचालक व मुख्याध्यापक टक्केवारी ठेवून गोळा झालेल्या पैशाची विभागणी करतात. यातूनच संचालक मुख्याध्यापकाचा पैसा वाढतो.
संचालक मुख्याध्यापक हे शिक्षकांवर अत्याचार करुन जो पैसा गोळा करतात. त्या पैशातून ते शाळेसाठी काहीही करीत नाही. तीच बाब लक्षात घेवून काही इमानदार शिक्षक अशा संचालक मुख्याध्यापकाच्या खंडणीला बळी पडत नाहीत. त्यातूनच त्यांची भांडणं सुरु होतात. त्यातच संचालक मुख्याध्यापकाकरवी अशा शिक्षकांच्या वेतनवाढी रोखणे, ते चांगले शिकवीत असूनही त्यांना शिकवीत नाही म्हणणे, त्यांना वर्ग न देता ते वर्ग घेत नाही म्हणणे, वरीष्ठ श्रेण्या न लावणे, त्यांना शिक्षकहजेरीवर सह्या करु न देणे, त्यांच्या अतिरीक्त सुट्या लावणे, एल डब्ल्यू पी लावणे तसेच ते शाळेत नियमीत येत असुनही त्यांचे वेतन न काढणे यासारखे इतर भयंकर त्रास देत असतात नव्हे तर त्याला भयंकर त्रास देत असतात. जेणेकरुन त्यांना त्यांचेकडून पैसा मिळवता येईल व असा अतिरिक्त पैसा कमविता येईल. ते शिक्षणाचे मुल्य असा त्रास देतांना विसरत असतात. त्यातच भांडणं सुरु झाली की असे शिक्षक हे संचालक मुख्याध्यापकाला कोणताही पैसा न देता आपल्या न्याय हक्कासाठी शिक्षणाधिकारी साहेब किंवा त्यांच्या वरच्या अधिका-यांना त्या प्रकरणाची शिकायत करीत असतात. त्यात च त्या शिकायती करुनही न्याय मिळत नसेल तर लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाकडे वाटचाल करीत असतात. अर्थात वर्तमानपत्रात बातम्या छापत असतात. हा त्यांचा बदनामीचा प्रकार नसतो. ती सत्यता असते. परंतू शाळेतील मुख्याध्यापक, संचालक हे या विषयाला कलाटणी देवून त्याला बदनामीचा प्रकार समजत दावे प्रतिदावे अशा शिक्षकावर ठोकत असतात.
शिक्षक हे आपल्या न्यायहक्कासाठी न्यायालयातही जात असतात. न्यायालयातून आपले हक्क मिळवीत असतात. न्यायालय आदेशही देते.परंतू हे आदेशही संचालक मंडळ पाळत नाही. तेव्हा पुन्हा कोर्टाची केस. अशा कोर्टाच्या केसेस लढता लढता शिक्षकांची उभी हयात जाते. परंतू त्याचे संचालक मुख्याध्यापकांना काहीही वाटत नाही. त्यांना मजा वाटते. कारण अशा केसेस भांडण्यासाठी जो पैसा लागतो. तो पैसा त्यांच्य खिशातून जात नाही. तो इतर शिक्षकांच्या खिशातून जातो. कारण ते खटले लढण्याचा पैसाही हे संचालक मुख्याध्यापक शिक्षकांकडूनच खंडणी स्वरुपात घेत असतात. यातूनच न्यायालयाच्या केसेस वाढतात.
खरं पाहता संचालक, मुख्याध्यापकाची वाढत. जाणारी संपत्ती........ही संपत्ती कुठून आली? ह्याची चौकशी व्हायला हवी. नोकरी ही सुख देणारी सुखवस्तू वाटत असल्यानं शिक्षकच नाही तर इतर सर्वजण आपली सारी संपत्ती विकून संचालकाचे व मुख्याध्यापकाचे नोकरी लागण्यापुर्वी घर भरत असून आज नोकरी लागण्याची किंमत लाखोच्या घरात आहे. साधी प्राध्यापकाची नोकरी मिळवायची असेल तर जवळपास पन्नास लाख रुपये संचालकाला द्यावे लागतात. तेव्हाच शाळेत प्राध्यापक म्हणून नियुक्त होतो. त्यातच असे कितीतरी प्राध्यापक एका संस्थेत असतात. अशा पन्नास पन्नास लाख रुपायांची बेरीज केल्यास कितीतरी कोटी रुपये गोळा होतो. जो पैसा. संचालक व मुख्याध्यापक किंवा प्राचार्य परस्परात वाटून घेत असतात. खरं तर अशा प्रकरणांची चौकशीच व्हायला हवी आणि विचारायला हवं की हा पैसा कुठून आणला? परंतू या बाबत आपल्या देशातील कायदा पाहिजे त्या प्रमाणात सक्षम नाही.
शाळेत नियुक्त झालेले शिक्षक म्हणून लागलेले कर्मचारी शाळेतील अशा संचालकाला देण देत असल्याने किंवा पन्नास लाख रुपये डोनेशन देवून ते शाळेत लागले असल्यानं ते शाळेत चांगले शिकवीत असतीलच असे नाही. त्यातच जे पैसे देत नाहीत. तेही केवळ न्यायालयात संचालकाशी भांडत असतांना शाळेत शिकवीत असतीलच असे नाही. अशावेळी शाळेचे मूल्य घसरत जाते व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतो. शिक्षकांची ही न्यायालयीन प्रकरणं पालकांना माहित होत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते.
*यावर उपाययोजना*
१) विशेष सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होवू नये म्हणून अशा प्रत्येकच शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष न्यायालय असावं. त्यातच त्या केसेस निपटविण्यासाठी शिक्षकांच्या खटल्याला कालमर्यादा असावी.
२) संचालक व मुख्याध्यापकाच्या मालमत्तेची चौकशी व्हावी व तो पैसा सरकारी मालमत्तेत गोळा व्हावा. संचालकावर दंडात्मक कार्यवाही व्हावी. जेणेकरुन इतर संचालकावर जरब बसेल व तो कोणत्याही शिक्षकाकडून खंडणी वसूल करणार नाही. तसेच शिक्षकांना त्रास देणार नाही.
३) प्राध्यापक व शिक्षकांनीही असा पैसा संचालकांना नोकरी लागतांना देतांना थोडा विचार करावा. तो पैसा स्वार्थीसाठी देवू नये. हा. भ्रष्टाचार आहे. तसेच हा भ्रष्टाचार स्वतः करु नये. तसेच इतरांनाही करु देवू नये.
४) पालकांनीही थोडं जागरुक होवून शाळेच्या कारभारावर लक्ष द्यावं. शाळेचे वाद सोडवावे नव्हे तर ते सोडविण्यात हस्तक्षेप करावा.
५) शाळेचे वाद सोडविण्याची मुभा कायद्यानुसार पालकांना द्यावी नव्हे तर असे वाद क्षमत नसतील तर ती शाळा बंद करण्याची परवानगी शिक्षक पालक समीतीला असावी.
६) महत्वपूर्ण बाब ही की मुख्याध्यापक हा संस्थेचा नातेवाईक नसावा.
७) कोणत्याही शाळेत संचालकाच्या नातेवाईकांची भरती करु नये.
८) ज्या शाळेत असे न्यायालयीन वाद दिसल्यास त्या शाळेचं अनुदान कायमचं बंद करावं. तसेच त्या शाळेतील शिक्षकांचं इतर चांगल्या शाळेत समायोजन करावं.
९) शिक्षकांच्या शिकविण्याकडे विद्यार्थी माध्यमातून पालकांचं विशेष लक्ष असावं.
अलिकडे अशी वाढणारी भांडणं. अशा भांडणावर वरील उपाय जर केले, तरच सरकारी शाळेचा स्तर सुधारेल. आज सरकारी शाळा टिकविणे तारेवरची कसरत झाली आहे. एका एका विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना पायपीट करावी लागते. काही काही शिक्षक तर विद्यार्थ्यांना शाळेचे पोशाख घेवून देण्यासारख्या गोष्टी करतात. एवढेच नाही तर त्यांच्या जाण्यायेण्याची व्यवस्था करतात. तसेच त्यांच्या पालकांनाही काही पैसे देतात. कारण त्यांना शाळा टिकवायची असते. त्यांना माहित असते की आज शाळा आहे. म्हणून ते आहेत. आज एक एक विद्यार्थी आहे, म्हणून ते आहेत.
सरकारी शाळा या मुळात बंद होवू नयेत. त्या आहेत म्हणून गरीबांची मुलं शिकतात. नसल्या तर उद्या ह्याच काँन्व्हेंट शाळा पालकांना मनमानीपणानं लुटतील. मग गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाचा कोणीही वाली उरणार नाही. म्हणून पालकांनी वेळीच सावधान व्हावं. सरकारी शाळा टिकविण्याचा प्रयत्न करावा नव्हे तर स्तर सुधरविण्याचा प्रयत्न. संचालकांनीही सेवेच्या दृष्टिकोणातून असा प्रयत्न करावा. उगाचंच शिक्षकांना त्रास देवू नये. शाळेतील भांडणं सोडविण्याचा प्रयत्न करावा. तसेच ती भांडणं सोडविण्याचाही प्रयत्न करावा. जेणेकरुन ते विद्यार्थ्यांना सर्वकषपणे शिकवतील. तसेच गरीब पालकांची मुलंही अगदी आनंदानं शिकतील यात काही दुमत नाही.
शाळा ही संचालकाच्या नातेवाईकाचे पोट भरायचे साधन नाही. तसं कोणीही समजू नये. कारण तसे समजून तसे वागल्यास शाळेचा विकास खुंटतो. शाळेला विद्यार्थी मिळत नाही. त्या बंद पडण्याच्या मार्गावर राहतात.
अलिकडे हेच चित्र दिसत होतं ब-याच शाळेत. ब-याचशा शाळा ह्या ज्या संचालकाच्या होत्या. त्या शाळेत सर्वात जास्त संचालकाचे नातेवाईक होते. ते मनमौजीपणानं शाळेत वागत असत. ते मुख्याध्यापकाचे आदेशही पाळत नसत. त्यातच नातेवाईक व संचालकापुढं मुख्याध्यापकाची हार होत असे. मुख्याध्यापक, संचालक व नातेवाईक यांची भांडणं सुरु असत. विद्यार्थी शिकविण्याकडे लक्ष राहात नसे. विद्यार्थी मागे पडत. हळूहळू हे पालकांना माहित होत असे. शेवटी ते आपल्या मुलांना अशा शाळेत टाकत नसत. ते त्या शाळेतून आपल्या पाल्यांना काढून घेत असत. यातच ब-याचशा शाळेची पटसंख्या कमी झालेली होती.
शाळा ह्या विद्यार्थी विकासाची माध्यमं होती. प्रत्येक पालकाला वाटत असे की माझा मुलगा शाळेत जाईल. उच्च शिक्षण घेईल. ते आपल्या पाल्यांना शाळेत टाकत असत. अशावेळी त्या शाळा जर नातेवाईक संबंध जोपासणा-या असल्या तर पुर्ण शाळेची दाणादाण होत असे.
ब-याचशा शाळा ह्या आजच्या काळात ज्या उघडलेल्या होत्या. त्यात त्या त्या शाळांना सरकारी अनुदानही प्राप्त झालेले होती. या शाळेत सरकारी अनुदान मिळत असल्यानं ब-याचशा संचालकांनी आपल्याच जवळच्या नातेवाईकांची या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त्या केलेल्या होत्या. त्यांचं पोट भरावं हा दृष्टिकोण लक्षात घेवून. अशा शाळेत असे शिक्षक आपले कर्तव्य विसरुन ते केवळ संचालक जसा वागवेल तसे ते वागत असत. यातच काही काही संचालक जे नातेवाईक नसत, त्यांना आपल्या घरचीही कामं करायला लावत ही वास्तविकता होती.
आरक्षण आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी ओबीसींना आरक्षण मिळवून दिले होते. त्याच आरक्षणाच्या माध्यमातून नाईलाजानं का होईना, एससी, एसटी, ओबींसींना नोक-या मिळत होत्या, पदोन्नतीही. जर आरक्षण नसतं तर त्याही नोक-या आणि पदोन्नत्या एससी, एसटी, ओबीसींना मिळाल्या नसत्या. हेही तेवढंच सत्य होतं. या पाश्वभुमीवर समजा एखाद्या एससी, एसटीला अशा खाजगी संस्थेत नोकरी मिळालीच तर त्यास संस्थेत सदरव्हू कर्मचा-याला मोठा त्रास दिला जात असे. त्याला संचालकाच्या घरची कामंही करावी लागत. नाही केल्यास त्याचं निलंबनही केलं जात असे. पदोन्नत्या मिळत नव्हत्या. मुख्याध्यापक असेल तर मुख्याध्यापकांना त्रास दिला जात असे. त्याला काम करु दिलं जात नसे.
संचालक हे मुखत्वे आपल्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून नात्यातीलच व्यक्ती बसवत. त्यांना इतर व्यक्ती चालत नव्हते. तसेच इतर व्यक्तीही फालतूचा त्रास आपल्याला नको म्हणून संचालकानं म्हटल्यानुसार संचालकांना लिहून देत की मला हे पद नको. कारण त्याला माहित असे की मी जर हे पद घेतलंच तर उद्या हेच शाळेचे नातेवाईक आणि हा शाळा संचालक माझ्यावर विनाकारणचे खोटेनाटे आरोप लावून मला फसवेल. कारण संचालक तसा फसवतोच हे निर्विवाद सत्य होतं.
शाळेत मुख्याध्यापक म्हणून शाळा संचालक हा आपल्या नातेवाईकांचीच वर्णी लावत असे. तरीही यावर मात करण्यासाठी शाळा संहितेत मुख्याध्यापक नियुक्ती करतांना सेवाजेष्ठता हे तत्व आणलेलं होतं. परंतू असे झाले आणि इतर व्यक्ती मुख्याध्यापक बनलाच तर त्याला त्या शाळेतील संचालकाचे नातेवाईक जगू देत नसत. याबाबत एक प्रसंग घडला होता. तो प्रसंग असा होता.
एक शाळा. त्या शाळेतील विद्यमान मुख्याध्यापक अचानक मरण पावला. त्या जागेवर सेवाजेष्ठता नियमांच्या आधारावर शिक्षणाधिकारी साहेबांनी एका शिक्षकाला मुख्याध्यापक केलं. जो मुख्याध्यापक संचालकाचा नातेवाईक तर नव्हताच. तसेच तो मुख्याध्यापक हा एससी प्रवर्गाचा असल्यानं संचालक महोदयांनाच नाही तर त्या शाळेतील इतर नातेवाईक शिक्षकांनाही चालत नव्हता. मग काय, पत्राचं शितयुद्ध सुरु झालं. नातेवाईक मुख्याध्यापकाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत होते. विनाकारण आरोपाचे पत्रावर पत्र पाठवीत होते. विद्यार्थ्यांना शिकवीत नव्हते. तसेच शाळेत नियमीत येत नव्हते. त्यातच त्या मुख्याध्यापकालाही कामे करणं कठीण झालं होतं.
मुख्याध्यापक हा संचालकाचा नातेवाईक नसल्यानं तो त्याच शाळेतील इतर नातेवाईक मंडळींची मनमौजी खपवून घेवू शकत नव्हता. त्यातच त्यानं विद्यार्थी विकास व शाळेचं हित लक्षात घेवून आपली ध्येयधोरणं राबविण्यास सुरुवात केली.
दिवंगत मुख्याध्यापक हा संचालक महोदयाचा नातेवाईक होता. तो संचालक महोदयाच्या नातेवाईकांचं काही चुकतही असेल तरी त्यांना काही म्हणत नसे. त्यांच्या चुकांवर पांघरुण घालत असे. त्यामुळं शाळा बुडीस निघाली होती. परंतू विद्यमान मुख्याध्यापक हा शाळेतील संचालकांचा नातेवाईक नसल्यानं तो त्या शाळेतील संचालकाच्या नातेवाईकांच्या चुकांवर कसा पांघरुण घालेल. बस तेच त्यांना नको होते. त्यातच संचालक आणि त्याचे नातेवाईक त्या मुख्याध्यापकाला आपले शिकविणे सोडून पत्राच्या फैरीच्या फैरी झाडत असत. याचा परीणाम विद्यार्थ्यावर होत होता. ते मुख्याध्यापकाचे कोणतेच आदेश ऐकत नसत. त्यातच त्या मुख्याध्यापकाला काय करावं आणि काय नको असं होवून जात असे.
सुगतला वाटत असे की शाळा ही काही नात्यातील लोकांचे पोट भरायचे साधन नाही. त्या शाळेला तसे कोणीही समजू नये. समजा शाळेत असे नातेवाईक असलेही, तरी त्यांनी नातेसंबंध पाळू नये. तसेच चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा विचार करावा. मुख्याध्यापकाचे आदेश पाळावे. तसेच संचालकालाही आपल्या शाळेची प्रत टिकवून ठेवायची असेल तर आपल्या शाळेत अशा नातेवाईकांचा भरणा करु नये. जे संचालकाला आपला नातेवाईक समजून मुख्याध्यापकीय आदेश पाळत नाहीत. विद्यार्थी वर्गाला शिकवीत नाहीत. विद्यार्थी विकास घडून येत नाही.
संचालकाने शाळेला शाळेचा दर्जा प्रदान करावा. नातेवाईकांचा भरणा करु नये. कारण शाळेच्या सर्व वर्गखोल्यातून देशाचे आदर्श नागरीक घडत असतात. जे देशाचे आधारस्तंभच नाही तर भवितव्य असतात. ज्यातून कोणी शास्रज्ञ, कोणी पंतप्रधान, कोणी राष्ट्रपती तर कोणी शिक्षक बनतात आणि तसं बनून देशाची सेवा करीत असतात.
शिक्षणाच्या मुल्यात सुगतचा संचालक अडसर ठरत होता. तो केवळ पैसा कमविणे हा उद्देश ठेवून पूर्ण शिक्षणाचा उद्देश नेस्तनाबूत करीत असल्याचे जाणवत होते. तो शिक्षकांना तर खाजगी मालमत्ताच समजत असे. परंतू शिक्षक हा संचालकाची खाजगी मालमत्ता नाही. असे म्हटल्यास त्यात काही चूक नाही. तसं कोणीही समजू नये. असे सुगतला वाटत असे. त्यातच तो त्या संचालकाच्या तशा प्रकारच्या वागण्याला विरोध करीत असे.

****************************************

शिक्षक हा असा घटक आहे की तो संयम राखत शाळेचे हित विचारात घेवून आपल्या शाळेत काम करीत असतो. तो आपल्या विद्यार्थ्यांना चांगले चांगले ज्ञान देत असतो. त्यातच शाळा ही लघुकोन,काटकोन, त्रिकोण, चौकोन हे सर्व शिकवते.पण आपलं कोण, हे मात्र शिकवीत नाही. ते सगळं परिस्थिती शिकवत असते.
आज असाच शिक्षक. ज्याला संचालक आपली स्वतःची खाजगी मालमत्ता समजायला लागला होता. त्याचेवर अत्याचारही करु लागला होता.
पुर्वी खाजगी प्रशासनाच्या शाळा नव्हत्या असे नाही. तसेच सर्वच शाळा सरकारी होत्या असेही नाही. त्यातच सरकारच या शाळेवर नियंत्रण ठेवायचे असेही नाही. ब्रिटीशांचं राज्य ज्यावेळी देशात अस्तित्वात आलं. त्यावेळेपासूनच शाळेला सरकारी दर्जा लाभला असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचे कारणही तसेच होते.
पुर्वीच्या शाळा ह्या पक्क्या इमारतीत भरत नव्हत्या. त्या शाळा देवळात, एखाद्या दाट झाडाखाली, एखाद्या सावकाराच्या वाड्यात, किंवा एखाद्या श्रीमंत माणसाच्या गोठ्यात भरत असत. परंतू आज तशी परीस्थीती नाही. आज शाळा सुसज्ज इमारतीत भरते. परंतू आजच्या शाळेतून खरं शिक्षणाचं मुल्य पाहिजे त्या प्रमाणात विकसीत होत नाही.
आज शिक्षण ही व्यवस्था काही अंशी खाजगी आहे. पुर्वी तर पूर्णतः खाजगी होती. परंतू पुर्वीचे संस्थाचालक हे मालक जरी असले तरी त्यांना शिक्षणाबाबत कळवळा राहायचा. ते ज्यावेळी शाळा भरवीत. त्या शाळेत विद्यार्थ्यांना बसायला नीट व्यवस्था असायची नाही. कारण ब-याचशा शाळा ह्या गोठ्यातच भरायच्या. त्यातच अशा शाळेत फक्त नी फक्त ब्राम्हणांना प्रवेश असायचा. पुढे यात सुधार झाला व तीस टक्के ब्राह्मण विद्यार्थी तसेच बाकी इतर ओबीसी जातीचे विद्यार्थी शाळेत असावे असे ठरले. म्हणजेच यात अस्पृश्य जातीला हिन समजले जावून त्यांना शाळा प्रवेश नव्हता. या शाळेत बरीचशी मुलं हिंदूचस असायची. पुढे अकराव्या शतकात जेव्हा मुसलमान भारतात आले. तेव्हा त्यांनी आपल्या हक्काच्या शाळा काढल्या. यावेळी मुस्लीम शाळा व हिंदू शाळा असे वर्ग भरवले जात असत. परंतू ज्यावेळी ब्रिटिश राज्य भारतात आलं. त्यावेळी मात्र त्यांच्या शाळेत हिंदू विद्यार्थ्यापाठोपाठ मुस्लीमांनाही प्रवेश मिळाला. सोबतच अस्पृश्यही. त्यांना मात्र हरीजन समजलं नाही. कारण त्याचा अर्थ कोणालाही माहित नव्हता.
अशा शाळेत शिकवीत असतांना शिक्षकाला मेहताना (वेतन) म्हणून दोन ते पाच रुपये तेवढे मिळायचे किंवा धान्य मिळायचे. शिक्षकही जास्त मागत नसत. कारण त्यांना माहित होतं की ज्या गावची मुलं ते शिकवतात. त्या गावातील कोणत्याही माणसांच्या शेतातून त्यांना निःशुल्क सा-या वस्तू मिळतात. त्या वेळच्या शाळेत एका वर्गात फक्त पंधरा ते सोळा मुलं राहायची.
शाळेत जास्त शिक्षक नसायचे. त्यातच शाळेचे वर्ग शाळेचा जो वर्गनायक असायचा. तोच सांभाळायचा. नवीन विद्यार्थी आला की त्याचेकडे तो नवीन विद्यार्थी सुपुर्द केला जायचा. अशा नवीन विद्यार्थ्यांना तो जुना वर्गनायक शाळेचे नियम शिकवून तरबेज करायचा.
शाळा संपुर्णतः खाजगी प्रशासनाच्या होत्या. पण त्या शाळेचा मालक हा काही स्वार्थी, धुर्त नसायचा. त्याच्या मनात परोपकारी भावना असायची. तो केवळ आपला गाव किंवा वस्ती सुधारली पाहिजे म्हणून शाळा सुरु करायचा. ह्या शाळा पाहिजे तेव्हा सुरु होत व पाहिजे तेव्हा बंद होत. परंतू ते संचालक शाळेतील शिक्षकांनास खाजगी मालमत्ता समजत नसत. ते शिक्षकांचा आदर करीत. वेळप्रसंगी त्यांचा सल्ला घेत.
इस १८१८ मध्ये ब्रिटीश अंमल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी पारंपारीक शिक्षणाची पद्धत सुरु ठेवली. त्यातच त्यांनी पुण्यात संस्कृत पाठशाळेची १८२१ मध्ये सुरुवात केली. तसेच मुंबईत बाँबे नेटिव्हस एज्यूकेशन सोसायटीची स्थापना करुन या संस्खेतर्फे ठाणे, मुंबई, पनवेल व पुणे या चार ठिकाणी शाळा चालवल्या. त्याचप्रमाणे खेड्यापाड्यात शाळा सुरु केल्या. इस १८४० पर्यंत या शाळेची संख्या ११५ होती.
मुळात आजपर्यंत (१८५२) तरी अस्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या. त्यातच १८५२ ला महात्मा ज्योतीराव फुले यांनी उघडलेल्या शाळेला फार महत्व प्राप्त झाले. परंतू हे पाऊल अस्पृश्यांच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल होते. आज हाच अस्पृश्य समाज महात्मा फुलेंना विसरलाही असेल कदाचित. परंतू त्याच पावलानं अस्पृश्यांच्या जीवनात क्रांती आणलेली आहे.
इस १८५२ पासून मालकी हक्काच्या शाळा ब्रिटीश सरकारनं काढून घेतल्या. कारण त्या गोष्टीला महात्मा फुलेंनी काढलेल्या अस्पृश्य शाळा जबाबदार ठरल्या. कारण ह्या अस्पृश्य शाळा जशा काढल्या. तसा लोकांचा आक्रोश सुरु झाला. हा लोकांचा आक्रोश वाढू नये व अशा प्रकारच्या शाळा कोणीही उघडू नये म्हणून ब्रिटीश सरकारनं शाळेची मालकी आपल्या हातात घेतली व इस १८६० पासून शाळेची मालकी संस्थेच्या हातात दिली. तेव्हापासूनच संस्था अस्तित्वात आल्या. या संस्थांना सरकारी मान्यता व अनुदान लागले. त्या अनुदानाचा वापर संस्थेचे चालक आपल्या शाळेच्या विकासासाठी करीत असत. तसेच विद्यार्थी विकासासाठी करीत असत.
ह्या ब्रिटीश शाळा होत्या. त्यात केवळ इंग्रजीवर भर दिला जात होता. तसेच शाळेत ब्रिटीशांचेच नियम शिकवले जाई. भारतीय शिक्षणाला तिथं वाव नव्हता. त्याचा अभ्यास त्यांच्याच शाळेत शिकलेल्या काही समाजविचारवंतांनी केला व १८८० मध्ये पुण्यात भारतीय हक्काच्या शाळा सुरु झाल्या. अशा शाळेसाठी प्रामुख्याने बाळशास्री जांभेकर, लोकहितवादी, कर्मवीर भाऊराव पाटील, न्यायमुर्ती रानडे, महात्मा फुले, भांडारकर, आगरकर व न्यायमुर्ती रानडे यांनी प्रयत्न केले. पुढे अशा उघडलेल्या शाळेत हळूहळू बदल झाले व शाळा नावारुपाला आल्या. कारण त्यावेळी संस्थाचालताकाचा समाजसेवी दृष्टिकोण होता.
आजही खाजगी प्रशासनाच्या शाळा आहेत. शाळेला एक निर्णायक संस्था आहे. शाळेला सरकारी मान्यता आणि अनुदानही मिळते. पण ह्या अनूदानाचा वापर शाळा संचालक कसा करतो हे न बोललेलं बरं. शाळा संचालक हे त्या अनुदानाचा वापर हा आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी करतात. ते शिक्षकांना मिळणा-या वेतनातील काही पैसा वसूली म्हणून मागत असतात आणि शिक्षकांनी त्यांना पैसा दिला नाही तर ते शिक्षकांना खाजगी मालमत्ता समजून त्रास देत असतात.
आज शिक्षक हा काही लाचार नाही. तो काही कोणाचा गुलाम नाही. तो काही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. त्यांना कोणीही खाजगी मालमत्ता समजू नये. परंतू आजचे संचालक त्यालाच खाजगी मालमत्ताच समजतात. त्यामुळे आज मुल्य उरलेले नाही. ज्या शाळेत विद्यार्थ्यांचा विकास व्हावा म्हणून अनुदान मिळतं. त्याच आजच्या शाळेतून त्याच विद्यार्थ्यांच्या अनुदानाच्या रकमा आजचे संचालक स्वतःचा विकास करण्यासाठी वापरतात नव्हे तर तो पैसा मिळविण्यासाठी शाळेचं वातावरण गढूळ करतात. असे करणे संचालकांना न शोभणारे कृत्य आहे.
महत्वाचं म्हणजे संचालकानं असं करु नये.शाळेकडे शाळा म्हणूनच पाहावे. विद्यार्थ्यांकडेही आपला मुलगा समजून वागावे. तेव्हाच चांगल शिक्षण देता येईल व शिक्षणाचे योग्य मुल्य साकार करता येईल. हे तेवढंच सत्य आहे.
अलिकडे कोरोना व्हायरसनं नाकात दम करुन टाकलाय. त्यातच आता ओमीक्रोन आला. हा कोरोनाचाच बांधव. परंतू हा लसीलाही मानत नाही. असे म्हणतात की हा व्हायरस कोरोनाच्या डेल्टा व्हायरसपेक्षा तीस पट वेगानं वाढत असून हा व्हायरस आफ्रिकेतून आलाय. हळूहळू त्याचा प्रसार होत असून चिंता व्यक्त केली जात आहे की ह्या व्हायरसनं सत्तर प्रतिशत सृष्टी (माणसं) कमी होणार. त्यातच अशी धास्ती सर्वांना लागलेली असून लोकं घाबरायला लागले आहेत. त्यातच शाळाही घाबरायला लागली आहे. तीही सुरु होण्याची चिन्ह दिसत नाही.
दि. १ डिसेंबर........या दिवशी महाराष्ट्रात शाळा सुरु होणार होती.परंतू ओमीक्रोनची भीती. शाळेबाबतचा निर्णय तुर्तास मागे पडला. शाळा सुरु झाली नाही. शाळा सुरु व्हायची, परंतू ती पुढे ढकलली. कोरोना पुन्हा झपाट्यानं वाढू नये म्हणून. तशाही शाळा ह्या मरणाच्या दारातच उभ्या आहेत. असे म्हणायला काहीही हरकत नाही.
शाळा मरणाच्या दारात आहेत असे म्हटल्यास सर्वांना आश्चर्य वाटेल. परंतू शाळा एक जीव नाही की ती मरेल हा विषय थोडा बाजूला ठेवून शाळेचा जीव आहे असा अर्थ घेतल्यास काहींना शाळा मरत आहेत असे जर म्हटले तर ते खरं वाटेल.
*शाळा मरण्याची कारणे*
१) सध्या कोरोनाचं संकट. शाळा दिड वर्षापासून बंद आहे. ऑनलाइन अभ्यास सुरु आहे. पण पालक शुल्क भरत नसल्यानं काँन्व्हेंट शाळेच्या शिक्षकांना पुरेसं वेतन मिळत नाही. अगदी अल्प वेतनात त्या शिक्षकांना काम करावं लागतं. त्यातच त्या वेतनावर शिक्षकांचं पोट भरत नाही. अशावेळी ते शिक्षक ते काम करणं सोडून दुसरं काम पोट भरण्यासाठी पकडतील व शाळेत शिकविणं बंद करतील अशा वेळी शाळा मरणार नाही तर काय?
२) अलिकडं काँन्व्हेंटच्या शाळा निघाल्या. जो तो काँन्व्हेंटलाच टाकतो. कोरोना काळ गेल्यावर पुन्हा काँन्व्हेंटची भरभराट होवू शकते अशा वेळी शाळा मरणार नाही काय?
३) मराठी खाजगी शाळेत शिक्षकांना संचालक त्रास देतो. एवढा त्रास देतो की आज डी एड करायला कोणी पुढं येत नाही. शिक्षण पदवीका महाविद्यालये ओस पडलेली आहेत. शाळेत शिक्षकांच्या भरत्या होत नाही. अशावेळी शाळेत शिकवायला शिक्षक मिळणार नाही. मग शाळा मरणार नाही तर काय?
४) काँन्व्हेंटला मुलं जास्त जरी असली तरी शिक्षकांना मराठी शाळेपेक्षा वेतन कमी असतं. अशा अल्पवेतनात शिक्षकांचे पोट भरत नाही. म्हणून शिक्षक कोणी बनायला धजत नाही. यावरुन शाळा मरणार नाही काय?
५) अलिकडे पालकांचा शाळेत हस्तक्षेप वाढला. ते शिक्षकांवर विशेष लक्ष ठेवून असतात. त्यातच विद्यार्थ्यांना शिक्षक रागवू शकत नाहीत. अन् थोडंसंही रागावल्यास शिक्षकांवर ताशेरे ओढले जातात. म्हणून लोकं शिक्षक व्हायला पाहात नाही. मग जिथे शिक्षक मिळणार नाही, तिथे शाळा मरणार नाही कशावरुन?
६) अशाही परीस्थीतीत काही शिक्षक आपल्या छातीला माती लावून शिकवतात. पालकांचे लाड पुरवतात. विद्यार्थ्यांना त्रास देत नाहीत. तरीही संचालक त्यांचेवर ताशेरे ओढतो. त्यातच शिक्षकांकडून खंडणी वसूल करतो. ती न दिल्यास आरोप प्रत्यारोप लावतो. हे सारं जग पाहतो. त्यावरुन त्यांची शिक्षक बनायची इच्छा उडते. मग शाळा मरणार नाही तर काय?
७) शाळा वाचविण्याची प्रत्येक शिक्षक पायपीट करतो. लोकांना मार्गदर्शन करतो आणि पटसंख्या मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतू त्यात कुटूंबनियोजन आड येतं.,आता एका घरी एकच मुल आहे. शाळेची संख्या जास्त आहे. शाळेसाठी विद्यार्थी सापडत नाही.,मग शाळा मरणार नाही तर काय?
*शाळा वाचू शकते*
१) शाळा वाचू शकते. त्यासाठी महत्वाचं म्हणजे आजही शाळेचा स्तर सुधारायला संचालकानं मदत करावी. स्वार्थ सोडावा. शिक्षकांना अभय द्यावे. त्यांच्याशी आत्मीयता बाळगावी. शाळेत खेळीमेळीचं वातावरण तयार करावे नव्हे तर तसं वातावरण तयार करायला शिक्षकांना मदत करावी. त्यातच संचालकाचे आपल्याच पोटाचा विचार करु नये.
२) शासनानेही शिक्षकांच्या जीवाचे जीवघेणे आदेश काढू नये. जे सध्या नोकरीला आहेत. त्यांचा विचार करावा.
३) पालकांनीही शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांना मदत करावी. विनाकारण त्रास देवू नये. शिक्षकांना विनाकारण धारेवर धरु नये.
४) विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या शुल्लक रागावण्याच्या गोष्टी मनावर घेवू नये. शिक्षक रागावतही असेल थोडासा. तो ते त्यांना आपलं समजून. त्यांना त्रास देण्याचा हेतू नसतोच मुळी. त्यांना समजून घ्यावे. तरच शाळा वाचेल.
महत्वाचं म्हणजे शाळा वाचविण्याची आज गरज आहे. शाळाच नसेल तर त्या देशाची स्थिती जनावरांसारखी होईल आणि तशी अवस्था जर झाली तर मुकी जनावरे व आपल्यात काहीच फरक उरणार नाही हे तेवढंच खरं आहे.
मराठी शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. परंतू सुगतच्या संचालकाला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. अशातच संचालकाला सुगत देण देत नसल्यानं त्याची वेतनवाढ रोखली. ती दुस-या वर्षीही लावली नाही. तो त्याच्या सुट्ट्याही गहाळ करवू लागला. तरीही सुगत संचालकाला देण देत नसल्यानं त्याचा पगार बंद केला.
सुगतचं वेतन बंद झालं होतं. तो देण देत नसल्यामुळं संचालक महोदयानं मुख्याध्यापकाकरवी त्याचं वेतन बंद केलं होतं. त्यातच आता सुगतला विचार येवू लागला. त्यावर तोडगा काढण्यासाठी सुगतनं वरीष्ठ अधिका-यांनी त्या शाळेची तक्रार केली. परंतू काहीच फायदा झाला नाही. शेवटी आपण असे चूप राहून आपले काम होणार नाही. म्हणून एक वकील पकडून त्यानं कोर्टात खटला दाखल केला.
सुगतला तो खटला लढणे आवश्यक होते. कारण तो त्याच्या पगारचा प्रश्न होता. तो जिंकणेही आवश्यक होते. कारण तो जीवनाचा प्रश्न होता. संचालक त्याचे पूर्ण वेतन सरकार जमा करु पाहात होते.
वेतन बंद. त्यातच दोन दोन खटले लढतांना सुगतला नाकीनव येत होते. पुरेसा पैसा नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. दुपारी शाळेत जावंच लागायचं. विद्यार्थ्यांना शिकवावंच लागायचं. नाही शिकविल्यास सेवा समाप्तीची भीती. जीव अगदी रडकुंडीला येत होता. त्यातच तो रात्रपाळीत कामाला जात होता.
रात्रपाळीत कामाला जाणे. सकाळी घरी आल्यावर पुरेशी झोप घेणे. त्यातच जेवनखावण करुन पुन्हा दुपारी शाळेत जाणे जणू तारेवरचीच कसरत होती. परंतू पोट भागविणे आवश्यक होते. त्यासाठी त्याला ती दोन्ही कामं करणंही भाग होतं. तीच गत शर्मीलाचीही होती.

शर्मीलाही दोन दोन खटले भांडत होती. पहिला म्हणजे सुगतसोबतचा व दुसरा म्हणजे घटस्फोटाचा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं होतं.,अगदी मेहनत करुन संविधान बनवलं होतं. त्यात सविताबाईचेही योगदान होते. परंतू लोकं तिच्या योगदानाला योगदान मानत नव्हतं. तसा सुगत त्याबद्दल विचार करीत होता.
संविधान सव्वीस नोव्हेंबर १९४९ ला लिहून. पुर्ण झालं. ते लिहिणं भाग होतं. कारण संपूर्ण देशाचा कारभार चालवायचा होता. तसं पाहता देश काही लहान नव्हताच की ते चालवायला काही नियम लागणार नाही.
संविधानाला राज्यघटना असे म्हणतात. ही राज्यघटना बनविण्याचे काम जोखमीचे काम होते. त्यातच देशाला व्यवस्थीत नियमांची गरज होती. जी गरज विनाकायदेतज्ञानं पुर्ण करता येत नव्हती. देश पर्याय शोधत होता. देशात कोण कोण तशी राज्यघटना लिहिणारे कायदेपंडीत आहेत.
देश संविधान लिहिण्यासाठी कायदेपंडीतांचा शोध घेत असतांना त्यांना देशात एवढी शिकलेली मातब्बर मंडळी असूनदेखील देशाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. त्यामुळं त्यांनी त्या इतर देशातील लिहिणारे कायदेपंडीत शोधण्याचा निर्णय घेतला. परंतू त्यांना ती राज्यघटना लिहिणारे कायदेपंडीत सापडले नाहीत. त्यातच शेवटी ते इंग्लंडमध्ये गेले.
अमेरीकेत परीदृढ राज्यघटना होती. स्वित्झर्लंडमध्ये परीवर्तनशील. त्यातच फ्राँन्सचीही राज्यघटना अभ्यासली. ती लिखीत होती. काही ठिकाणी लिखीत राज्यघटना होत्या, तर काही ठिकाणी अलिखीत. परंतू देशातील काही नागरीकांना लिखीत राज्यघटना हवी होती. म्हणून हा सारा खटाटोप चाललेला असतांना ते अचानक इंग्लंडमध्ये गेले. ज्या इंग्लंडमध्ये अलिखीत राज्यघटना होती.
राज्यघटना बनविण्याचं जाहिर करणारं शिष्टमंडळ जेव्हा इंग्लंडमध्ये गेलं. तेव्हा त्या इंग्लंडवासीयांनी सांगीतलं की तुमच्याच देशात डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत की जे संविधान लिहू शकतात. त्यातच त्यांनी स्वतः संविधान लिहिण्यास नापसंती दर्शवली. शेवटी पर्याय नाही म्हणून शिष्टमंडळ परत आलं व त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांवर संविधान निर्मीतीची जबाबदारी सोपवली. परंतू त्यातही पुर्ण जबाबदारी सोपवली नाही. त्यातच ते श्रेय बाबासाहेबांना मिळू नये म्हणून त्यांच्यासोबत आणखी संविधान निर्मीती प्रक्रियेत चार सदस्य जोडले. ज्यांनी टाळाटाळ करीत संविधान निर्मीतीला मदत केली नाही. हं, संविधान निर्मीतीला मदत फक्त एकाच व्यक्तीनं केली. ती म्हणजे त्यांची पत्नी. जिचं नाव सविता आंबेडकर होतं.
घटनेचा प्रवास खडतर होता. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समीती गठीत झाली. सचिदानंद सिन्हा हे या समीतीचे अध्यक्ष होते. पुढे ११ डिसें. १९४६ ला डॉक्टर राजेंद्रप्रसाद घटनासमीतीचे अध्यक्ष झाले. समीतीत ३८९ सदस्य होते. फाळणानंतर त्याची सदस्यसंख्या २९२ होती. समीतीच्या अकरा बैठका झाल्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर संविधान निर्मीतीची जबाबदारी येताच त्यांनी अमेरीका, फ्राँन्स सह इतर देशाचा अभ्यास केला. त्यातच त्यांनी एकएक कलम बनविण्यास प्रारंभ केला. ती एकएक कलम बनवीत असतांना ती कलम बनविल्यानंतर ती संसदेच्या सभागृहात ठेवण्यापुर्वी आपल्या पत्नीसमोर ती कलम ठेवीत व विचारीत असत की ही कलम बरोबर राहिल का? तसं पाहता सविता आंबेडकरही शिकल्या होत्या. त्या तेवढ्या शिकल्या नव्हत्या. पण त्या चर्चेतील काही ज्ञान त्यांनाही असेलच. त्यातच बाबासाहेब तिला समजावून देतांना प्रकरणांची उकल करीत असत. त्यावर तिला तो मुद्दा पटला की ती होकार देत असे. त्यातच ती कलम संसदेच्या सभागृहात बाबासाहेब मांडत असत. या दरम्यान बाबासाहेब आजारीही असायचे. त्यातच सविताबाई डॉक्टर असल्यानं त्यांची सेवाशुश्रृषा करीत असे. बाबासाहेबांना या काळात उच्चरक्तदाब व मधुमेह होता.
सविताशी चर्चेदरम्यान बाबासाहेब रात्रंरात्र झोपतही नसत. त्यातच त्यांच्याबरोबर सवितादेखील रात्रंरात्र झोप नसे. त्यातच त्यांचं जेव्हा एखाद्या मुद्द्यावर सविताकडून समाधान होत असे. तेव्हाच ते शांतपणे झोपत असत. तेव्हापर्यंत नाही.
आज देशातील काही मंडळी डॉक्टर बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार म्हणतात. पण सविताला विसरतात. परंतू सविता जर नसती आणि सवितानं त्यांची त्या काळात प्रकृती सांभाळली असती तर संविधान तरी बनलं असतं का? असा विचार कोणी करीत नाहीत.
संविधान निर्मीती एका अस्पृश्याकडून व्हावी ही देशातील संविधान निर्मीती करणा-या शिष्टमंडळाची नव्हती. त्यातच मजबुरीनं का होईना इंग्लंडने सुचविल्यानुसार बाबासाहेबांना संविधान लिहिण्याचं काम मिळालं. त्यातच बाबासाहेबांनाच एकटं श्रेय मिळू नये म्हणून या प्रक्रियेत इतर चार लोकं. परंतू त्यांनी काहीच केलं नाही. सगळी मेहनत बाबासाहेबांची. त्यातच ज्यावेळी संविधान बनलं. त्यावेळी ते काही राज्यातच प्रयोगांती लागू झालं. काही राज्यात नाही.
आज संविधान आहे. सशक्त असं संविधान. जगातील राज्यघटनाच्या पेक्षा कितीतरी मोठं असं संविधान. परंतू हे संविधान आजचे धुर्त हितकारणी बदलवू पाहात आहे. कारण भेदभाव आजही गेलेला नाही. ते हितकारणी आजही बाबासाहेबांचा तिरस्कार करीत अाहेत. जे इतर देशातल्या संविधानाहून महान ठरलेलं संविधान. ते बदलवू पाहण्याची भाषा करणं निव्वळ हास्यास्पद व द्वेष करणारी गोष्ट आहे. हे संविधान बदलविण्यापेक्षा त्यातील काही कलमा बदलवणे ठीक. परंतू त्यांना डॉक्टर बाबासाहेबांचे नाव त्यामध्ये नको, म्हणून संविधान बदलविण्याची गरज. परंतू संविधान बदलवून काय मिळेल? खरंच तसं संविधान बनवता येईल का? तसेच आज असं का घडत आहे की संविधान बदलवावं लागतं. सर्वात परंतू पहिली गोष्ट ही की काहीही गरज नसतांना संविधान का बदलंवावं? हा प्रश्न प्रत्येक जनमाणसांना पडल्याशिवाय राहात नाही. तसेच जे या संविधानातील कलमानुसार सुख उपभोगतात. त्यांच्याही तोंडून संविधान बदलण्याची भाषा निघणे बरोबर नाही. त्यातच आपण जर संविधान बदलविणारे आहोत, तर मग आपण किती विद्वान आहोत असा विचार प्रत्येकानं करावा. मगच संविधान बदलविण्याची भाषा करावी. अन्यथा नाही. भारतीय संविधान हे सर्वसमावेशक, सशक्त, परीपुर्ण आणि महत्तम असं संविधान असून त्याचा आदर प्रत्येकानं करावा. संविधान बदलविण्याची भाषा करु नये. भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नीच्या त्यागाचं स्वरुप आहे. त्यांनी आपल्या त्या काळातील झोपा जर उडवल्या नसत्या किंवा अपार मेहनत जर घेतली नसती तर आज हे सशक्त, महत्तम संविधान बनलं नसतं हे तेवढंच खरं आहे.
सुगतचा विचार रास्त होता. कारण त्याचं वेतन बंद होताच त्यानं संविधानाच्याच आधारावर न्यायालयात खटला दाखल केला होता.
सुगत रात्र रात्र मेहनत करीत होता. त्यातच न्यायालयातील केसही भांडत होता. समझोता झाला तरी सुगतचा शर्मीलासोबतचा खटला सुरुच होता. त्यातच एक दिवस खटल्यादरम्यान सुगतच्या मनात शर्मीलाबद्दल कुतूहल निर्माण झालं. तसं त्याचं वय झालं होतं. तिही वयस्कच वाटू लागली होती.
खटल्यादरम्यानच एक दिवस सुगतनं शर्मीलाला आवाज दिला. तशी शर्मीला आली. म्हणाली,
"बोल, का बोलाचं ते लवकर बोल." शर्मीला रागाच्या सुरात म्हणाली. तशी ती त्रासली होतीच. ती केस संपायच नावंच घेत नव्हती. त्यातच आता तिला एकटीलाच यावं लागत होतं. तसं पाहता ती स्वतः शेतीत खपत होती.
तिचा आवाज चढलेला होता. तो त्यानं पारखला. तसा तो म्हणाला,
"शर्मीला, रागवू नकोस. मी काय म्हणतोय ते आधी ऐकून घे. पटेल तर हो म्हण. नाहीतर नको. जबरदस्ती नाही." अगदी सौम्य आवाजात तो म्हणाला.
"ठीक हायेे. बोल मंग." ती म्हणाली.
"हे बघ, आपण एवढ्या दिवासपासून केस लढतोय. समझोता देखील झाला. पण केस संपायचं नावंच घेत नाही."
"मंग. तुले का म्हणाचं हाये."
"माझा विचार आहे की........"
"का हाये तुह्या इचार?"
"माझा विचार आहे की आपण असे किती दिवस राहावं?"
"म्हणजे?"
"आपण असे अविवाहित केव्हापर्यंत राहावं."
"माह्यं लगन झालं. पण........"
"पण काय?"
"जावू दे. तू आधी सांग तुले का बोलाचं होतं ते."
"जावू दे. तुझा विवाह झाला."
"बोल तं. तुया मनात का होतं ते?"
"मला म्हणायचं होतं की आपण विवाह केला तर........पण आता जावू दे. तुझा विवाह झाला."
"सुगत एक बोलू."
"बोल."
"माह्या लगन झाला अन् तुटला बी."
"म्हणजे?"
"आपल्या या केसनं तुटला. सध्या घटस्फोटाची केस सुरु हाये कोर्टात. हवं तं आपण लगन करु शकतो. पण लपूनचोरुन. तुले चालन का तसं लगन."
तिनं तसे बोललेले शब्द. त्याला आनंद वाटला. तसा तो म्हणाला,
"हं, चालेल. पण माझीही एक केस आहे कोर्टात सुरु."
"म्हणजे? कायची?"
"पगाराची. मला पगारच नाही. आपल्या या केसचाच परीणाम."
"म्हणजे?"
"अगं जेव्हा आपली कोर्टाची केस सुरु झाली. तेव्हा मला तारखेवर येतांना नेहमी सुट्ट्या टाकाव्या लागत. त्याचाच फायदा आमच्या संचालकानं उचलला. तो पैसे मागू लागला. त्यातच मला या केसपायी पैसे पुरेनासे झाल्याने मी त्यांना पैसे दिले नाही. तशी ती त्यांची लाचच होती. ती लाचखोरी मला आवडली नाही. मी त्यांचा विरोध केला. बस.......शेवटी माझ्यावर खोटेनाटे आरोप लावून मला संचालकानं आरोपात गोवलं आणि माझा पगार बंद केला.,आता लढत आहो केस."
"म्हणजे दोघांचेबी नशिब सारखेच तं."
"होय."
थोडा वेळ शुकशुकाट होता. तशी ती गप्प पाहून तो म्हणाला,
"ए, आपण दोघं एक होवूया का?"
"पण असं का इचारलं?"
तशी ती विचार करु लागली. सुगत बरा की त्यानं स्वतःच विचारलं विवाहाचं. त्यातच मी त्याला केसही सांगीतली घटस्फोटाची. तरीही तो विवाहाला तयार आहे. नाही याच्याशी विवाह करायला हवा. सुख मिळेल. खरं सुख. माझी इच्छाही पूर्ण होईल. जी इच्छा त्याचेसोबत विवाह करण्याची मी केली होती. तशी ती पुन्हा म्हणाली,
"हो होवूयात."
ती तिची इच्छा. त्यालाही वाटत होतं. शर्मीला किती चांगली. माझे वेतन बंद असल्याची केस ऐकूनही तिनं होकार दिला. तसा तो म्हणाला,
"अगं पण माझे वेतन बंद आहे. मग मी पोसणार कसा तुला?"
ती थोडा वेळ चूप राहिली. तशी ती म्हणाली,
"मी पोसीन तुले.मंग तं झालं."
"कशी?"
"मी जाईन दिवस भर कामाले. तुह्या केसले पैसा लावीन अन् तूले जिंकवीन."
"पण तारीख तुटेल तेव्हा ना."
"तुटेलच कधीतरी."
त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. तारीख तुटली नव्हती. त्या दोघांचा लवकरच विवाहही पार पडला. तसा घटस्फोटाचाही निकाल लागला. त्यातच त्याच्या वेतनाचाही निकाल लागला. तो गलेलठ्ठ पगार कमवू लागला. ते पती पत्नीही बनले. पण छेडखाणीही तारीख अजूनही सुरुच होती. तो खटला तारीख पे तारीख करीत ते दोघेही भांडत होते. घरी पती पत्नी बनून तर न्यायालयात एकमेकांचे शत्रू बनून. त्यांच्या त्या लढण्यात एक प्रकारचा औरच आनंद होता. जो आनंद निव्वळ विवाह केल्यानंच मिळणार नव्हता.
आज तिला ते विवाहानंतरचे दिवस आठवत होते. तिनं सुगतशी विवाह तर केला होता. परंतू पूर्णतः वेतन बंद असल्यानं तिलाच त्रास सहन करावा लागत असे. सुगत जात होता शाळेत. दुपारपाळीतील त्याची शाळा. त्यातच कुवारपणी तो रात्रपाळीत पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी कामालाही जायचा.
सुगतची शाळा ही ग्रामीण भागाला लागून असल्यानं कधी थ्रेसर मशीनवर सोयाबीन, गहू काढायला जायचा. यातच कधी मशीनीचे वायरं टाकतांना रात्रपाळीला साप, सरडेही गवसायचे. परंतू त्याची तमा न बाळगता तो काम करायचा.
सुगतचे रात्रपाळीत आता विवाहानंतर कामाला जाणं खपत नसल्यानं शर्मीला विवाहानंतर कामाला जावू लागली. त्यातच तो शिक्षक असल्यानं तिला त्याला कामाला पाठवणं आवडत नव्हतं. त्यामुळं की काय, तीच कामाला जात होती. त्यातच सांजच्याला घरी आल्यावर ती सुगतसाठी स्वयंपाकातही शिरत असे आणि त्याला सुख देत असे. शेतातील आणलेला भाजीपाला वापरुन शर्मीला आपला दिवस गोड करीत होती.
आज तिला सुगत आवडायला लागला होता. ती त्याचेवर निरतिशय प्रेम करु लागली होती. तिला नेहमी वाटत होतं की सुगतनं पुष्कळ सा-या वेदना भोगल्या आणि ज्याही वेदना भोगल्चा असतील, त्या सर्व आपल्यामुळंच भोगल्या. म्हणून की काय, ती त्याला जपत होती. अगदी ह्रृदयातील श्वासासारखी. तिलाही आज वाटत होतं की सुगत एक ना एक दिवस वेतनाची केस जिंकेल व मग त्यालाच नाही तर मलाही चांगले सुगीचे दिवस येतील. मात्र त्या दिवसाची मला चातकासारखी वाट पाहावी लागेल.
ती त्याच दिवसाची अगदी चातकासारखी वाट पाहात होती. अशातच निकाल लागला व सुगतचं वेतन निघालं. त्याचबरोबर पुष्कळ सारा पैसाही. आज सुगतच नाही तर तीही खुश होती.
ती साधारण शालान्त शिकलेली. शालान्तची परीक्षा नापास होती. तिनंच सुगतला फसवलं होतं. त्याचा खटलाही सुगतला भांडावा लागला होता. परंतू आज विवाहानंतर तो सारंकाही विसरला होता. कारण तिनंच त्याला त्याच्या नंतरच्याही दुःखी जीवनात मदत केली होती कामाला जावून. आज त्याच्या मनात ती अल्प शिकली असली तरी तिच्याबद्दल गर्व होता.
शिक्षणाचा खरा अर्थ आज तो जगाला सांगत होता. निव्वळ जास्त वर्ग शिकणे म्हणजे शिक्षण नाही तर त्या शिक्षणाचा जर आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी किंवा आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग होत असेल तर त्यालाच शिक्षण म्हणावं.
त्याचंही बरोबर होतं. कारण ती अल्प शिकली असली तरी त्याच्या वेतन बंदच्या काळात तिनं आपलच नाही तर त्याचंही पोट पालवलं होतं नव्हे तर पोटाचा प्रश्न सोडवला होता. तो मात्र मास्तरकीचं शिक्षण घेवूनही एका अनपढ संचालकासमोर हतबल होता. ती अल्प शिकूनही स्वतःच स्वतःची मालकीण होती आणि तो अति शिकूनही संचालकाचा गुलाम होता.
****************************************
आज न्यायालयातील तारीख तुटली नव्हती. ती तुटण्याची ते दोघंही वाट पाहात होते. न्यायालयाचंही बरोबर होतं. कारण न्यायालयात कोणीही उठसुठ कशाहीप्रकारचं भांडण करुन जात असत. त्यातच न्यायालयाचा वेळ खर्ची घालत असत. त्यामुळं की काय, उठसुठ कोणीही भांडण करु नये. कोणीही कोणाला फसवू नये. म्हणून न्यायालय त्याकडे येणा-या लोकांच्या केसा बंद करीत नसे. जेणेकरुन जगानं न्यायालयाच्या पाठीमागून जावे, पण मागून नको असे इतरांना सांगावे. तेव्हाच भांडणं कमी होतील असं न्यायालयालाही वाटत होते. त्यातच न्यायालय तारीख वर तारीख करीत वादी प्रतिवादींना सतावत होतं. जेणेकरुन आपण न्यायालयात यायलाच नको होतं असं त्यांना वाटावं.
शर्मीला आणि सुगतची केस शेवटी आपसी समझोत्यानं संपली नाही. न्यायालयानं विवाहाचेही पुरावे तपासले. त्यावरही न्यायालयानं विश्वास ठेवला नाही. पण जेव्हा पुरावा तपासला त्यांच्या पुत्रीचा. तेव्हा मात्र दया दाखवत न्यायालयानं त्यांची केस बंद केली.
शर्मीलानं सुगतसोबत जो संसार थाटला होता. त्यातून त्यांना एक पुत्र झाला होता. त्याचं नाव ठेवलं होतं तारीख. तो त्यांच्यासाठी फारच भाग्यशाली ठरला होता. त्याच्याच पायगुणानं नव्हे तर जन्मानं त्यांची तारीख तुटली होती. जेव्हा जेव्हा ते दोघंही आपल्या पुत्राचा वाढदिवस साजरा करीत. तेव्हा ते एकमेकांकडे पाहायचे. त्यांना ते जुने दिवसं आठवायचे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायचे. पण ते अश्रू आपल्या मुलाला न दाखवता पुसायचे व आपल्या मुलाला मीठीत घेवून एकमेकांना आलिंगण देत वाढदिवस साजरा करायचे. तेव्हा वाटायचं की आज आपल्या जीवनातून शिशिर गेला आणि आपल्या जीवनात नव्या दमानं तारीख नावाच्या पुत्राच्या रुपानं वसंत नवा बहार घेवून आला. तो वसंतच असायचा. नवी जीवनात आनंदाची पालवी घेवून यायचा आणि आनंदाचे वंशजही.......आज त्याला हायसं वाटायचं. शर्मीलालाही हायसं वाटायचं. कारण सुगतच्या चेह-यावर तेज असायचा. तो तिच्यावर प्रेम करायचा. परंतू तिला मात्र आजही खंत वाटत होती. ती म्हणजे आपण एका निरपराध आणि इमानदार व्यक्तीला फसवलं होतं. ज्यानं माझ्या जीवनात तारीख देवून माझं जीवन यशस्वी केलं आहे. ती आनंदीत होती. कारण तिच्या जीवनातील आज तारीख नावाचं तिचं अपत्य आज तिचं जीवन सार्थक करीत होतं.
काही दिवसानं ती एकाकी झाली सुगतविना. कारण सुगत काही जास्त दिवस जगला नाही. तो लवकरच मरण पावला होता नव्हे तर तो शर्मीलाच्या जीवनातून कोसो दूर गेला होता. पलिकडे....... जिथं न्यायालयाचीही दृष्टी पोहोचत नव्हती. आज कोणी तिच्या जीवनात भांडायला नव्हतं. ना ही कोणी तारीख लावणार होतं. ना ही कोणी तिच्यावर आक्षेप घेणार होतं. ना ही साक्षीदार तपासणे होते. आज ती मोकळी झाली होती सुगतच्या जीवनाच्या सहचारीणी धर्माच्या शिक्षेतून. जी शिक्षा तिला आनंद देणारी होती. आज विधात्यानं एका शिक्षेतून तिला मोकळं केलं होतं तर दुसरी शिक्षा भोगायला दिली होती ती एकटेपणाची. आजही तोच मागचा वसंत दरवर्षीच यायचा. पण तो आनंदाची पालवी घेवून नाही तर दुःखाची झालर घेवून. नकळत तिच्या डोळ्यातून आठवण येताच अश्रू यायचे. तेव्हा तो तारीख नावाचा तिचा पुत्र पाठीमागून येवून तिच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि म्हणायचा, 'आई' तेव्हा क्षणातच अश्रू पुसून ती मागे पाहायची. तिला त्या तारीख नावाच्या पुत्रात तिला सुगत दिसायचा. त्यातच ती मागचं सगळं विसरायची आणि उठून उभी होवून त्याचं बोट धरुन चालायची. तोच हलकासा वारा सुटायचा आणि वाटायचं सुगत या वा-याच्या रुपानं भेटायला आला की काय! तोच वारा तिच्या जीवनातला वसंतच असायचा. वसंतासारखा नवी पालवी घेवून येणारा.........