Does God exist in the world? in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | देव जगात आहे का?

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

देव जगात आहे का?

देव जगात आहे?

*शिखांचा देवांवर विश्वास नव्हता असे नाही फक्त ते इश्वर एकच आहे असे मानायचे. मात्र देव देव करीत जाप करीत राहाणं या गोष्टीला प्राधान्य न देण्यापेक्षा कर्माला जास्त प्राधान्य द्यावं असं शिख धर्माचं तत्वज्ञान आहे. देव हा आत्मा म्हणून वावरतो व तो आत्मा सर्वश्रूत आहे असं त्यांचं म्हणणं.*
देव जगात आहे वा नाही यावरुन नेहमीच वाद होत असतात. कोणी म्हणतो देव जगात आहे. देव जर नसता तर ही सृष्टी निर्माणच झाली नसती. आकाशात चंद्र, तारे व सुर्य दिसले नसते. पृथ्वीवर जैविय घटक दिसले नसते. माणसं जन्माला आली नसती. प्राणीही जन्माला आले नसते. हवा नसती. पाणी नसतं आणि तेच नसतं तर जीवसृष्टी नसती.
जीवसृष्टी.......जीवसृष्टी कोणं निर्माण केली? असा प्रश्न माणसाच्या मनात आलाच तर ती विधात्यानंच निर्माण केली असं काही लोकांचं म्हणणं तर काही लोकं म्हणतात की ही जीवसृष्टी नर आणि मादीच्या संक्रमणातून तयार होते. पाणी सुद्धा हायड्रोजन व ऑक्सिजनच्या संप्रेरकातून तयार होते. हवा देखील वातावरणातील चुंबकीय बदल आहे, त्या बदलातून तयार होत असते. शिवाय चंद्र, सुर्य व तारे यासारखे घटक आगीच्या तप्त गोळ्याचं असलेलं रुपांतरणच आहे.
काही लोकं म्हणतात की सृष्टी ही प्रत्यक्ष परमेश्वरानंच निर्माण केली. त्यानंच चंद्र बनवला. त्यानंच पृथ्वी बनवली व त्यानंच ब्रम्हांड बनवलं. पृथ्वीवरील हवा, पाणी, आग ही त्या परमेश्वराचीच देण आहे असंही त्यांचं म्हणणं.
प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात. दोन घटकच. एक असतो चीत आणि दुसरा असतो पट. तसेच सृष्टी निर्माण झाली यावरुनही दोन मतभेद आहेत. पहिला हा की ती परमेश्वरानंच निर्माण केली व दुसरा म्हणजे ती वातावरणातील बदलानं निर्माण झाली. पहिला घटक अंधश्रद्धाळू लोकं मानतात व दुसरा घटक वैज्ञानीक मानतात असतात. तसं पाहता वैज्ञानिकांचंही बरोबरच आहे. कारण त्यांनी दगडालाही वाचा फोडली आहे. आजची स्थिती पाहता एक साधा स्मार्टफोन. कितीही लांब असलेल्या माणसांशी संपर्क साधून देतो. यावरुन वैज्ञानिकाचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. तसंच लोकं दगडाला देव मानत आहेत हे काही वैज्ञानिकांना पटत नाही. त्याचं म्हणणं असं की दगडाचा देव काहीही करीत नाही आणि ते त्यांनी पदोपदी सिद्ध करुन दिलं.
देव आहे हे सिद्ध करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. बरीच उदाहरणं आहेत. याबाबतीत एक उदाहरण आहे. अफजलखान जेव्हा वाईला आला. तेव्हा सरळसरळ न येता पंढरपूर व तुळजापूर मार्गानं आला. त्यावेळेस त्यानं तुळजापूरची भवानी शिवरायांना ताकद देते असा विचार करुन त्यानं तुळजापूरच्या शिल्पात असलेल्या भवानीच्या दगडाच्या मुर्तीला आदळून तिचे अक्षरशः तुकडे केले व लोकांना सांगीतले की पाहा, मला या भवानीच्या पाषाणी मुर्तीनं काहीच केलं नाही. परंतु त्या अफजलखानाच्या तसे करण्यानं शिवरायांच्या भावना दुखावल्या व त्यानं ठरवलं आणि मनात विचार केला की हे खाना, फक्त तू आमच्या भागात ये. अर्थात प्रतापगडाच्या पायथ्याशी ये. मग तुला दाखवतो व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येताच धिप्पाड अशा खानाचा कोथळाच बाहेर काढला.
वरील उदाहरणात एक महत्वाची बाब म्हणजे शिवराय लहान होते. खान धिप्पाड होता. शिवराय तर खानाच्या बगलेत दबत होते. मग ते घडलंच कसं? यावर वैज्ञानिक म्हणतील की युक्तीनं घडलं. शिवरायांजवळ युक्ती होती. मग शिवरायांजवळ युक्ती होती तर त्यांना ती युक्ती कशी सुचली? आता वैज्ञानिक म्हणतील की ते बुद्धिमान होते. ठीक आहे. ते बुद्धिमान होते. मग त्यांच्यात एवढी बुद्धीमत्ता आली कुठून? तर त्यात काही म्हणतील की ती त्यांच्या मायबापांकडून अंनुवांशीकतेनं आली. काही म्हणतील की ती अनुभवानं आली. अशी बरीच संभ्रमाची उत्तरे येतील की ज्या उत्तरानं प्रश्न संपणारच नाही. शेवटी पर्याय येईल की ही बुद्धीमत्ता प्रत्यक्ष परमेश्वरानंच दिली. जिथं विज्ञान संपतं. तिथं परमेश्वराचीच सुरुवात होते. मग आता कोणी म्हणतील की निसर्गातील कोणताही जिवंत घटक नर आणि मादींच्या संक्रमणातून तयार होतो. मग यात देव कुठून आला. तर त्याचं उत्तर आहे. प्रत्यक्ष विधात्यानं त्याचं काम करण्यासाठी काही माध्यमं वापरली. ती माध्यमं म्हणजेच नर आणि मादी. आता लोकं म्हणतील की स्मार्टफोन तर वैज्ञानिकानं बनवला. ते तर विज्ञान आहे. तेही बरोबरच. परंतु ते विज्ञान जरी असलं तरी विधात्यानं वस्तू निर्माण करण्यासाठी वैज्ञानिकांना माध्यम बनवलं. त्यांच्यात तेवढी कल्पकता भरली की ते नवनवीन शोध लावू शकतील. तसं पाहता वैज्ञानिक सर्वच लोकं बनत नाहीत. एखादाच बनतो. कारण त्याचेवरच देवाची कृपादृष्टी असते. तो माध्यम असतो परमेश्वराचा. म्हणूनच खान मरण पावला. प्रत्यक्ष शिवरायांसारख्या लहानशा व्यक्तीमत्वानं त्याला मारलं. कारण त्यानं भवानीची मुर्ती तोडून प्रत्यक्ष परमेश्वराचाच अपमान केला होता. म्हणूनच तो शिवाजीसारख्या लहानशा व्यक्तीमत्वाकडून मारल्या गेला. कारण तशी बुद्धीच भवानीनं शिवरायांना प्रदान केली असेल ही शक्यता नाकारता येत नाही.
विशेष बाब ही की देव हा दगडातच आहे हे मी म्हणत नाही. तो आहे चराचरात, अनुभवात, कर्तव्यात व चांगल्या कर्मात. जर आपले कर्म वाईट असेल तर आपण कितीही चांगल्या गोष्टीचे प्रदर्शन केले तर देव पावत नाही. याचाच अर्थ असा की कितीही पैसे लावून आपण पाषाणी देवाच्या मुर्तीची पुजा केली वा तिर्थयात्रा केल्या वा भागवताचं आयोजन केलं वा सत्संग, किर्तनाचं आयोजन केलं, तरी ते लाभदायक ठरत नाही. शास्र सांगतं की पाप घडलं असेल तर त्यापासून मुक्ती म्हणून भागवत करा. किर्तन करा. गरुड पुराण वाचन करा. पारायण करा. लाभ होतो. परंतु ते सर्व थोतांड असून ते निव्वळ काही लोकांच्या पोट भरायचं साधन आहे. पाप कधीही नष्ट होत नाही. कितीही तीर्थयात्रा होम हवन व सत्संग भागवत केले तरी. पाप जर घडलं असेल अचानक तर त्याचं क्षालन करण्यासाठी पश्चाताप करावा आणि त्यानंतर पुण्य कर्म करावे. जेणेकरुन पुण्याचं पारडं जड होईल व पापाचं पारडं हलकं. त्यानंच आपले पाप धुतले जावू शकतात. ते पाप नष्ट जरी झालं नसेल पुण्य कर्मातून पापाचं क्षालन होत असते. मात्र आपले पुण्यकर्माचं पारडं जड असायला हवं.
पापकर्म. पाप कर्माचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अनवधानाने घडलेलं पाप. जसं रस्त्यावरुन जात असतांना अचानक एखादा प्राणी रस्त्यावर येणे व आपल्या गाडीनं मरणे. जसे साप, मुंग्या, माकोडे वा इतर किडे. दुसरं पाप हे जाणूनबुजून घडत असते. ते घडवत असतो आपणच. जसे. एखाद्याला मारायची वा त्याची हत्या करायची सुपारी घेणे. अफजलखानाने तुळजापुरच्या मुर्तीची विटंबना करणे. औरंगजेबाने संभाजीची हत्या करणे. फतेहसिंह व जोरावर सिंह या लहान जीवाला जिवंत भिंतीत दफन ठार मारण्याचा प्रयत्न करणे. मुक्या प्राण्यांना त्रास देणे. हे आपले आपल्या हातून घडलेले जाणूनबुजून झालेले पाप कर्मच असतात. काही पापकर्म आपण जाणूनबुजून केले असले तरी त्यात आपली मजबुरी असते. परंतु पाप ते पापच असतं. त्याची शिक्षा परमेश्वर देतोच. मग तो भक्त असेल आणि मोठी पुजापाठ करीत असेल, सत्संग, किर्तन, भागवत, पारायण करीत असेल तरीही. हे शंत प्रतिशत खरं आहे.
देव आहे व तो दगडात अजिबातच नाही. हे लोकांना माहीत आहे. तरीही लोकं त्याला पुजतात. कारण तो दगड म्हणजे परमश्वरानं लोकांना चांगला रस्ता दाखविण्यासाठी उभारलेलं माध्यम आहे. ज्यातून ते स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. कोणी स्वतःत सुधारणा घडवून आणण्यासाठी पुस्तकाला माध्यम करतात व त्यातून चांगल्या गोष्टी अंगीकारुन आपल्यात सुधारणा घडवून आणतात. कोणी भागवत, किर्तन, संत्सग, पारायणाचा आधार घेवून स्वतःत सुधारणा घडवून आणतात. तर कोणी इतर बर्‍याच काही गोष्टी करतात की ज्यातून स्वतःत सुधारणा करता येतील.
महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रत्येक धर्मात इश्वराचं स्वरुप हे पाषाणात नाही. काहीच्या इश्वरांची माध्यमं वेगवेगळी आहेत. कोणी कबरेला माध्यम बनवलं तर कोणी आत्म्याला, कोणी क्रॉसला माध्यम बनवलं तर कोणी तत्वांना. प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे व देवाला पुजण्यासाठी वापरली गेलेली माध्यम वेगवेगळी आहेत. परंतु हे जरी खरं असलं तरी देव काही वेगवेगळा नाही. आत्म्येही काही वेगवेगळे नाही. देव एकच आहे. कोणी त्याला भगवान म्हणतात. कोणी त्याला वाहे गुरु म्हणतात. कोणी त्याला अल्ला म्हणतात तर कोणी त्याला गॉड. शिवाय प्रत्येक धर्माची सुत्रं व नियम वेगवेगळी आहेत. जरी देव एकच असला तरी. कोणताही देव वा कोणाच्याही धर्माचा देव हा पाषाणात वा कबरीमध्ये नाही. ना कोणाचाही देव तत्वात आहे. ते सर्व देवाला समजून घेण्यासाठी वा देवाचं अस्तित्व मान्य करण्यासाठी वापरलेली माध्यमं आहेत. तिर्थयात्रा, भागवत, किर्तन, सत्संग, पारायण धा इतर धार्मिक गोष्टी या गोष्टी माणसात सुधारणा घडविण्यासाठी आहेत. पापातून मुक्ती मिळविण्यासाठी नाहीत. जर आपण भागवत, संत्सग, किर्तन कितीही ऐकले वा पारायण कितीही केले आणि आपण सुधरलोच नाही तर आपल्या ते ऐकण्याला काहीच अर्थ उरत नाही. तसाच देव दिसतो जर आपण चांगले कर्म केले तर......ज्याचे कर्मच वाईट त्याला देव दिसत नाही. मग पावायचा प्रश्नच वेगळा. म्हणूनच चांगले कर्म करावे. देव त्याच्यातच आहे. त्याला पुजण्याची वा पुजण्याचा आव आणण्याची काहीही गरज नाही. तो एकच आहे. मग त्याची प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या माध्यमाच्या स्वरुपात पुजा होत असली तरी आणि कुणी त्याला अल्ला, भगवान, गॉड वा वाहे गुरु अशा वेगवेगळ्या नावानं संबोधत असले तरी. तसंच त्याचं अस्तित्व हे आहेच. कोणी नाकारत असलं तरी. तो अनंत, अखंड आणि अशाश्वत आहे. चिरंतन आहे. नर, मादी, माती, हवा, पाणी, आकाश, आग व वैज्ञानिक हे उपज करणारे घटक फक्त माध्यम आहेत जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण करण्यासाठी देव आहे. म्हणूनच कोणी कोणताही अनियंत्रीतपणा करु शकत नाही. कोणी कोणत्याही अनियंत्रीतपणाचं साधन निर्माण करु शकत नाही आणि झालाच तर तो सृष्टीनिर्माता, ज्याला आपण देव संबोधतो. तो त्याला नष्ट केल्याशिवाय राहात नाही हे तेवढंच खरं. महत्वपुर्ण गोष्ट ही की देव माना अगर नका मानू. परंतु देव आहे. कोणाला तो पुस्तक रुपानं अनुभूती देतो. कोणाला पाषाण रुपानं अनुभूती देतो. मग आपण त्याचं अस्तित्व मानो अगर न मानो यात शंका नाही.