skin yogi in Marathi Anything by Ankush Shingade books and stories PDF | चर्मयोगी

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

चर्मयोगी



मनोगत


हरळ्या हा चांभार समाजातील पहिला संत होवून गेला,जो संत रविदासाच्या जन्माच्या चारशे वर्षापुर्वी जन्मला.त्यांनीही कवने रचली.पण वचनभंडाराला आग लावून त्यातील काही साहित्य समाप्त केलं गेलं.त्यांनीही आपल्या कवनातून समाजातील भेदभाव, रुढी,परंपरा,चालीरीतीवर जोरदार हल्ला चढविला.काही चांभारसमाजातील मंडळींना हरळ्या,ककैय्या कोण हे अजूनही माहीत नाही.त्यांचे बलिदान माहीत नाही.तसेच आपल्याही समाजात रविदासापुर्वी एक महान संत हरळ्याच्या रुपाने होवून गेला हे शोधण्याचा तसेच जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करीत नाहीत.खरंच हरळ्या आणि मधुवय्याने सरंजामशाही राजवटीत जे काही केलं.त्यांच्या बलिदानातूनच बसवक्रांती होवून एका नव्या युगाला प्रारंभ झाला.हे विसरता येत नाही.हरळ्या हा जातीने चांभार जरी असला तरी संताच्या रांगेत तो पहिला संत आहे हे मानावेच लागेल.

संत हरळ्या हा चांभार समाजातील पहिला संत आहे.पण त्यांच्याबद्दलची माहीती बहुतःश चांभार समाजाला नसल्याने मी संत हरळ्यावर चर्मयोगी कादंबरी लिहून त्यांचा इतिहास चांभारसमाजच नाही तर जगापुढे आणण्याचा अल्पश: प्रयत्न केलेला आहे.इस एकहजार च्या दशकात म्हणजे संत ज्ञानेश्वरापूर्वी आणि म्हाईभटापुर्वीही तसेच संत रविदासापुर्वीही संत हरळ्या हा चांभार समाजातील पहिला संत होवून गेला.ज्याने समाजातील जातीभेद,अस्पृश्यता मोडण्यासाठी स्वतःच्या मुलालाच दावणीवर लावले.नव्हे तर त्याचा विवाह एका ब्राम्हण मंत्र्याच्या मुलीशी करुन दिला.त्याकाळी जातीतच विवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती.तसेच असा आंतरजातीय विवाह केल्यावर आपल्याला फाशी होवू शकते.याचीही कल्पना हरळ्याला होती.तरीही प्राणाची पर्वा न करता त्यांनी आपल्या मुलाचे लग्न ब्रामणाच्या मुलीशी लावून दिले.मात्र ते कसे लावून दिले?त्यासाठी त्यांनी त्या ब्राम्हण मंत्र्याला कसे तयार केले?बसवेश्वराचे हरळ्याला कशी मदत केली?का मदत केली?गुलाबी कोण होती?वैगेरे प्रश्नांची उत्तरे या चर्मयोगी कादंबरीतच आपल्याला पाहायला मिळतील.ही माझी ऐतिहासीक पुस्तक असून वाचकांना आनंद,विरंगूळा तर देणारच आहे नव्हे तर एक सत्यही तुम्हाला माहीत होईल,जे तुम्हाला माहीत नसेल.यासाठी लिहिलेली व समस्त चांभारसमाजाला वाहिलेली चित्तथरारक कथा कादंबरीच्या रुपाने.


अंकुश शिंगाडे

९९२३७४७४९२,९३७३३५९४५०


संत हरळ्याचे जीवनावरील चर्मयोगी कादंबरी


कवी अंकुश शिंगाडे यांनी कातळे शहीदांचे या नावाने बाराव्या शतकातील म.बसवेश्वरावराच्या जीवनाशी संबंधीत एका दलित संताचे जीवन यावर आधारीत कादंबरी माझे प्रस्तावनेसाठी सादर केली.ती मी वाचून काढली.याचे कारण ती वाचनीय आहे.आवडलीसुद्धा.....पण त्यांनी या कादंबरीला दिलेले नाव मला समर्पक वाटले नाही.त्यांना मी चर्मयोगी नाव सुचविले.ह्यावर त्यांनी होकार दिला.

ज्या लिंगायत संतावर ही कादंबरी लिहिण्यात आली.त्या संताचे नाव आहे संत हरळ्या.ते चांभार जातीचे होते.महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील कल्याण नगरात चालुक्य ब्रिज्वल राज्यात प्रधानमंत्री पदी कार्यरत होते.त्यांनी एकदेवोपासना(शिवतत्व)रम हाच कैलास,दासोह(दानधर्म),सदाचार,अस्पृश्यता निवारण आणि स्वातंत्र्य समता बंधूता तत्वावर अनुभव मंटप ही अधिष्ठीत धार्मीक संसद स्थापून त्यात महिलांना प्रथम आरक्षण देवून,त्यांना शिक्षीत करुन त्यांच्याकडून लोकभाषेत वचनवाडःमयाची निर्मीती करुन बाराव्या शतकात संपूर्ण मानव समाजाला एका झेंड्याखाली आणले.त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक व्यवसाय करणारा मानव समाज बसवाच्या कल्याण नगरीत एकत्र झाला.त्यातील संत हरळ्या हे एक होय.चर्मयोगी ही कादंबरी शहीद संत हरळ्याच्या जीवनावर रेखाटलेली आहे.

ही कादंबरी संत हरळ्या आणि त्याची पत्नी कल्याणीअम्मा या दोघांच्या दुहेरी अर्पणावर साकारली आहे.कन्नडभाषेतील बसववाडःमयात या कादंबरीच्या अल्पशा पाऊलखुणा आढळतात.पण मराठी भाषेत या संताचे जीवनचरीत्र अजरामर झाले आहे.म.बसवेश्वरांच्या कल्याण क्रांतीचे हे आद्य प्रेरक स्थान असल्यामुळे संत हरळ्या चरीत्राचा मागोवा घेतल्याशिवाय बसव वाडःमयाला पुर्णत्व येत नाही.

संत हरळ्या हे चांभार जातीचे संत म.बसवेश्वराच्या किर्तीच्या सुगंधावर मोहीत होवून त्यांची राजधानी बसवकल्याणला चांभार मोहोल्ल्यात राहू लागले.ते कर्नाटकातून येथे आलेले होते आणि प्रधानमंत्री बसवेश्वराच्या दर्शनासाठी अहोरात्र व्याकुळ झालेले होते.असाच एक दिवस उजळला आणि बसवेश्वराच्या दर्शनाचा लाभ झाला.

म.बसवेश्वर फिरत फिरत एकदा चांभार मोहोल्ल्यात आले.तेव्हा हरळ्याने बसवेश्वराला एकवेळ वंदन केले.त्यावेळी बसवेश्वरांनी त्रिवार शरणार्थ म्हणत त्याचे आदरातिथ्य स्विकारले.हरळ्या हे भावूक झाले.म.बसवेश्वरांनी दलित जातीतील सामान्य माणसाला त्रिवार नमस्कार केल्यावर ते हळहळले.त्यांनी ही व्यथा कल्याणीअम्माला विषद केली.ही घटनाच बसवेश्वराचे ऋण फेडणारी होती.असो समजून त्यांच्या ऋणातून मुक्त कसे व्हावे,त्यांना कोणती भेट द्यावी असा विचार या दांम्पत्याने केला.शेवटी त्यांचा व्यवसाय पादत्राणे बनविण्याचा असल्याने पादत्राण बनवून ते अर्पण करुन ऋणातून मुक्त होण्याची इच्छा.पण ही पादत्राणे कोणाच्या चर्माची करायची यावर चर्चा सुरु झाली.त्यावर असे ठरले की पादत्राणासाठी स्वशरीराचे कातळे वापरावे.त्यासाठी कल्याणीअम्माही सज्ज झाली.हरळ्याने उजव्या मांडीचे व कल्याणीअम्माने डाव्या मांडीचे कातळे वापरले.हे कातळे कापतांना या दांम्पत्यांना काय वेदना झाल्या असतील त्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात.पण बसवनिष्ठाच या घटनेला कारणीभूत आहे.केवढा हा त्याग.केवढा हा अर्पित भाव.त्यांचे गुरु अरळलिंगेश्वरांना सुद्धा हा भाव अर्पण केला नव्हता.

ही पादत्राणे बनवून ते म बसवेश्वरांना अर्पण करायला गेले.आपली त्यागनिष्ठा विषद केली.त्यावेळी बसवण्णा त्यांच्या कृतीवर हळहळले.पादत्राणे त्यांनी स्विकारली.पण ती पायात न घालता ती डोक्यावर धारण केली.ते म्हणाले,'एका संत शरणांनी स्वमांडीचे कातळे कापून तयार केलेली पादत्राणे मी पायात कशी घालू?ती माझ्या डोक्यावर शोभतील.त्यावेळी हरळ्या आणि कल्याणीअम्माच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या.बसवण्णांनी ही पादत्राणे हरळ्याच्या कमलहस्तात देवून देवघरात ठेवून पूजा करण्याची विनंती केली व निरोप घेतला.

रस्त्यात त्यांना मधुवय्या मंत्री भेटले.त्यांनी ती पायात घालताच त्याचा त्यांना भयंकर दाह सुरु झाला.त्यांनी हरळ्याची क्षमा मागीतली.

१२ शतकातील बसवअण्णांचे राज्यात सर्वजातीचे नगरजन असून त्यात अस्पृश्यता नव्हती.म्हणून बसवण्णाचा लिंगायत धर्म भारतात वेगाने वृद्धींगत होवून बलुचिस्तानपासून तर कन्याकुमारीपर्यंत शरण धर्मसंसद अनुभव मंटपात येवून त्यांनी वचनसाहित्य निर्मीती केली हे वैशिष्ट्यपुर्ण आहे.त्या निर्मीत साहित्यात हरळ्याचाही समावेश आहे.संत हरळ्या व ब्राम्हण मंत्री मधुवय्या ह्या दोघांनीही इष्टलिंगदिक्षा घेवून ते गुरुबंधू झाले.पण पुढे मधुवय्याची कन्या वनजा ही त्रिपुरातक तलावातील फुले तोडतांना पाय घसरुन तलावात पडली असतांना एकही तरुण आला नाही.ती मरते आहे हे हरळ्याचा पुत्र शिलवंताने पाहिले व त्याने तलावात उडी घेवून तिचा जीव वाचवला.पुढे तिचे लग्न करण्याचे ठरले.त्यावेळी तिने कोणत्याही ब्राम्हण युवकाशी लग्न नाकारुन शिलवंताशीच लग्न करण्यास ती सज्ज झाली.दिक्षा घेतल्यानंतर दोन्ही कुटूंब सजातीय झालं होतं.पंथ धर्मांधांनी हा विवाह विजातीय ठरवला.मधुवय्या,हरळ्या व शिलवंताला ब्रिज्वलाने बंदिस्त केलं.या अन्यायार्थ म.बसवेश्वरांनी प्रधानमंत्री पद सोडून ते कुंडलसंगमास निघून गेले.इकडे ब्रिज्वलाचा खुन झाला.कल्याणातील शिवशरण कल्याणचा त्याग करुन इतरत्र वास्तव्यास आले.अशी ही ऐतिहासिक क्रांती होय.

ब्रिज्वल वधाला कारण घडले ते अतिशय क्रुरतेचे होते.वरील तिन्ही व्यक्ती गुन्हेगार नसतांना ही त्यांची गुन्हेगार समजून त्यांचे नेत्रछेदन करुन हत्तीच्या पायी तुडविण्यात आले.मेल्यानंतर त्यांची प्रेते कुटूंबाच्या स्वाधीन न करता बुरुजावरुन फेकून देण्यात आली.या अत्याचाराला शरणांनी विरोध केला.त्यातून धर्मसंकट ओढवण्यात आलं. नव्हे तर हरळ्या शिलवंत आणि मधुवय्या अस्पृश्यता मिटविण्यास ह बसवधर्मासाठी शहीद झाले.

याच पाश्वूुमीवर अंकुश शिंगाडे यांनी चर्मयोगी कादंबरी लिहिलेली आहे.त्यात कन्नड भाव असला तरी तिचा सार मराठीत आहे.या कादंबरीत संत हरळ्या नाटकातील प्रतिबिंब साकार झालेले आहे.हे लोकप्रिय नाटक सन १९६८ रोजी मुंबईच्या बसवेश्वर नाट्य मंडळातर्फे म बसवेश्वर आणि संत हरळ्या शतमातोत्सम समारोप प्रसंगी मुंबईच्या आझाद मैदानावर सुमारे पाच हजार प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला.

संत हरळ्या नाटकाचा प्रारंभ जसा शोकांतिकाने झाला.तसेच शेवटही शोकांतिकाने झालेला आढळतो.बालक हरळ्याला नरसय्या अडवतो.आपल्या सावलीचाही विटाळ येथील शिवभक्तांना होतो म्हणून मंदीरात जाता येत नाही.आयुष्यात जगत असतांना अस्पृश्यतेचे दुःख मी भोगले.ते तुझ्या वाटेला येवू नये.अस्पृश्यता म्हणजे फार मोठा शाप आहे.ती मानवाचे ही असंख्य बलिदान घेवूनही संपविता येणार नाही.तसेच संतुष्ट होणार नाही.अशी बलिदानाची कथा एकशे चौसष्ट पृष्ठात विस्तार पावली आहे.कन्नडमधील कथानक मराठीत विशद करणे कठीणच.पण अंकुश शिंगाडे यांनी ही कादंबरी रेखाटून वातावरण निर्मीती केली आणि कथेला प्रश्नोत्तर रुपात नेत नेत वाचकांची जिज्ञासा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.बसव साहित्यात वास्तविकता चरीत्रे फार जरी असले तरी कादंबरी फार्म फार कमी.त्यामुळे संत हरळ्या या शहीदावर ही पहिली कादंबरी ठरेल.तिचं स्वागतच होईल.लोकप्रिय ही ठरेल.अशी शुभदा मी प्रगट करतो.

शिवार्पनमस्तु!


दिवंगत डाँ.सुधाकर मोगलेवार

************************************************

चर्मयोगी


आजुबाजूची गर्द झाडी माणसाच्या माणुसकीला संपन्नता देत होती.त्याच झाडीत जंगली श्वापदं अधिवास करीत होती.त्या गर्द झाडीत पळस,आंबा, बिबा,सालई,मोहई,पांजरा,साग इत्यादी वृक्ष डौलात उभे होते.त्या गर्द झाडीतील संपन्नता वाखाणण्याजोगी होती.त्याच गर्द झाडीतून एक संदिग्ध पायवाटही जात होती.रस्ता तसा बिकट होता.डोंगरद-यातून कडेकपारीतून जाणारी पायवाट पाहिली तर मनातून धस्स झाल्याखेरीज राहायचं नाही.

ती पायवाट कुठे जात असेल असा प्रश्न नेहमी कोणालातरी पडायचा.ते त्या वाटेने जायचे.पण रस्त्यात त्या जंगली श्वापदांचे शिकार व्हायचे.याच झाडीत एक नरसय्या नावाचा जातीने चांभार असलेला गृहस्थ आपलं अस्तित्व टिकवून होता.जंगली श्वापदाची भीती न बाळगता कित्येक आपल्या पिढ्यांपासून तो तिथे वास्तव्य करीत होता.संपतय्या,किसनय्या,कचरय्या,चातय्या,रामय्या सोबतच नरसय्याने राहून आपला संसार थाटला होता.संसाराचा रहाटगाडगा रेटता रेटता त्याच्या नाकी नव यायचं.

नरसय्या राहात असलेल्या भुभागाला चांभारवाडी म्हणत.तसा तो भुभाग संपूर्ण जंगलाने वेष्टिलेला होता.त्या चांभारवाडीच्या बाजूला एक कल्याण राज्य होतं.त्या कल्याण राजधानीत राजा ब्रिज्वल हा एक अत्याचारी राजा राज्य करीत होता.राजा ब्रिज्वल हा एक अत्याचारी व अन्यायप्रिय राजा म्हणून त्याची ख्याती पसरली होती.त्याचे मंत्री देखील अत्याचारी व अन्याय करणारेच होते.जणू आपल्या राजपदाच्या अन्यायी शृखलेने वेष्टिलेले राजे या ब्रिज्वलाच्या वंशपरंपरेत होते.प्रजेवर ते नेहमी जुलूम करीत असत.नव्हे तर तो जुलमांचा इतिहास त्याच्या सातव्या पिढीपासून चालत आलेला होता.ब्रिज्वल राजा न्याय करतांना कोणाला हत्तीच्या पायाने तुडवीत असे तर कधी कडेलोट करीत असे.तर कधी नेत्रछेदन करण्याची शिक्षा देत असे.

जातीपातीची पाळमुळं त्या काळात खुप खोलवर रुजलेली होती.जात केव्हा कुठून निर्माण झाली हे जाणून घेण्यापेक्षा ती पाळण्यावर खुप लोक विश्वास करीत असत.त्यामुळे आचरणात नेहमी विटाळाचा भरणा असे.विटाळाच्या विळख्यात दलित जात नेहमी भरडली जात होती.राजा आणि मंत्रीगण या दलित जातींना कधीच समानतेची वागणूक देत नसत.

राजांकडे तिनही अधिकार एकवटलेले होते.न्यायदान करणे,प्रजेचे रक्षण करणे आणि राज्य चालविणे .याव्यतिरीक्त प्रजेसाठी अन्न वस्र निवा-याची व्यवस्था करणे हे देखील राज्याचे प्रथम कर्तव्य होते.त्या कर्तव्यात हयगय करण्याची गोष्ट राजा करु शकत नव्हता.

दलित जातीमध्ये चांभार,मांग,मेहतर,महार,बलई,खाटीक,डोअर,सतनामी इत्यादी निम्नवर्गीय जाती येत असत.त्यांचा अधिवासही दूर अशाच ठिकाणी असायचा.जर एखाद्या वेळी राज्यात आपत्ती आल्यास किंवा जनावर मरण पावल्यास किंवा बाळंतपण करायचे झाल्यास या दलित जातीतील लोकांना बोलाविले जात असे.त्यांच्या मंदीरप्रवेशावर तर कडक बंदी होती.मंदीराच्या बाहेर राहून पायरीखालीच पायरीवर सावली न पाडता त्या सवर्णांच्या अगदी लपून छपून,चोरुन दर्शन घ्यावे लागत असे.एखादा व्यक्ती नजरचुकीनं दृष्टीस पडला तर त्याचा त्याला स्पर्श होवू नये,म्हणून जोरजोराने घोड्यासारखे किंचाळावे लागायचे.यामुळे पुढून येणारा स्पृश्य व्यक्ती सावध होवून आपला मार्ग बदलवीत असे.कारण या दलित व्यक्तीचा हात लागताच या स्पृश्य व्यक्तींना आंघोळ करावी लागत असे.

भेदभावाने चरणसीमा गाठली होती.भेदभावाच्या बुरख्याने पछाडलेल्या व्यक्तीच्या हातून दलितांचा केव्हा जीव जाईल हे सांगता येत नव्हते.अशातच चुकीनं एखाद्या मुलाने न समजून मंदीरप्रवेश केलाच तर त्याला क्रुसावर चढविण्याची प्रथा त्या काळात अस्तित्वात होती.तशी बोधीसत्व तथागत गौतम बुद्धाची विचारसरणी लोक खुलेआम वापरत नसत.

कल्याण राज्यात कित्येक संत व विद्वान मंडळी राहात होती.ते आपल्या विचारातून व संतवाणीतून देवाचा गोडवा गात असत.पण हयात नसलेल्या दगडाच्या देवालाही त्यांच्या संतनाणीतून जाग येत नव्हती.विद्वान आपल्या वाणीने व विचाराने लोकांना प्रेरीत करत.पण त्यांच्यावरच राजद्रोहाचा खटला ठेवून त्यांनाच फासावर चढविले जात असे.त्यामूळे त्या काळात कोणीही राजसत्तेच्या विरोधात जात नसत.

दलित माणसांना शिक्षा होत.त्या शिक्षेत कधीकधी झाडाला बांधून ठेवले जाई.आपल्याच माणसांना झाडाला बांधून जंगलात हिंंस्र प्राण्यांचे शिकार होण्याचे दृश्य ही दलित मंडळी नेहमी पाहात असत.यातुनच बंडाचे वारे या दलित माणसांच्या मनात निर्माण झाले होते.एखाद्याने शिक्षेस पात्र असणा-या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केलाच तर त्यालाही तशाच शिक्षा होत.त्यांचा स्पर्श हा अगदी वेंडाळल्यागत वाटायचा.त्यांचा चुकून स्पर्श झालाच तर स्पृश्य व्यक्तीला त्रिवार आंघोळ करावी लागायची.तहानलेल्या व्यक्तीला विहीर समोर असुनही व तिथे बादली दोर असुनही पाणी पिता येत नसे.जोपर्यंत एखादा व्यक्ती त्या विहिरीजवळून येत नसेल,तोपर्यंत त्याला पाणी पिता येत नसे.एखादा व्यक्ती त्या विहिरीजवळून भटकला आणि त्याला जर त्या अंकाळी व्यक्तीची तहानेची वेदना त्याला माहित झाल्यास तोच भावनेच्या भरात दलित माणसांना पाणी पाजत असे.अन्यथा तहानलेली व्यक्ती तहानेने व्याकुळ व्हायची.कधीकधी मरुणही जायची.पण शिक्षेच्या भीतीने असा व्यक्ती विहिरीला हात लावत नव्हता.

काही काही स्पृश्य लोक हे दयाळू होते.त्यांना दलितांची वेदना कळायची.पण शिक्षेच्या भीतीपोटी तेही या दलितांच्या वेदनेकडे दुर्लक्ष करायचे.जर एखाद्या दलिताने आपला तहानेने जीव जाईल म्हणून जर का विहिरीला हात लावलाच तर त्याला जबरदस्त शिक्षा होत असे.शिवाय पुरोहीतांकरवी त्या विहिरीचे शुद्धीकरणही केलं जात असे.त्या शुद्धीकरणानुसार विहिरीत गोमुत्र टाकण्यात येई.(गोमुत्र म्हणजे गाईचे मुत्र.)ज्यामध्ये करोडो विषाणू वास करायचे.ज्यामुळे संपूर्ण विहिरीचे पाणी घाणेरडे व्हायचे.तरीही ह्या शास्रीय कारणांची मिमांशा लक्षात न घेता माणुसकी हरवलेला तथाकथीत समाज फक्त दलितांच्या स्पर्शाने अशुद्ध व्हायचा.पण गाईच्या गोमुत्राने अशुद्ध होत नव्हता.

दलित मंडळी ही मोटा व चप्पल बनविण्याचे काम करीत.त्यांना देवीपरसही मोठी स्पृश्य मंडळी वाटत होती.कारण प्रत्यक्ष देवालयातील देवाजवळ ती मंडळी आपली विनंती घेवून जावू शकत नव्हती.त्यांच्या इच्छा हीच स्पृश्य मंडळी दया आल्यास दूर करायची.तरीही कोणाला दोष न देता ही दलित मंडळी स्वतःला पापी समजून जीवन जगत असत.अज्ञानीपणामूळे त्यांच्यात सुधारणेचा गंध नव्हता.उच्च वर्णियांचे उंबरठे झिजविण्यात अन् त्यांची सेवा करण्यातच त्यांचा दिवस जात असे.

स्रीयांच्या बाबतीत थोडीशी स्थिती वेगळी होती.एखादी सुंदर साजेशी दलितांची मुलगी असल्यास तिच्याकडे उच्च वर्णिय मंडळी प्रेम सोडून फक्त वासनेच्याच दृष्टिकोणातून पाहात असे.एखाद्याला जर ती आवडलीच तर तो तिच्यावर पाशवी बलात्कार करीत असे.पण भीतीपोटी ही दलित मंडळी राजाकडे कधी कोणतीच तक्रार करीत नसत.समजा तक्रार केलीच तर त्यात गुन्हेगाराला मोकळे सोडून गुन्हाची दोषी त्या दलित मुलीलाच समजून त्याची शिक्षा त्या मुलीच्या आईवडीलांना देत असत.तरीही उच्च वर्णियांच्या गुपचूपच्या आमीषप्रेमाला या दलितांच्या मुली बळी पडत.तसेच लग्न न करता त्या त्यांच्या बाळाच्या माता बनत.कामवासना पुर्ण करण्यापुरते विवाहाचे आमीष देवून ही उच्चवर्णिय मंडळी या तरुण मुलींचा निव्वळ उपभोग घेत.पण जेव्हा त्यांना ही दलित मुलगी गर्भार असल्याचे कळत असे.तेव्हा मात्र ते तरुण तिच्यापासून कोसो दूर जात असत.वेदना मात्र त्या मुलीलाच भोगाव्या लागत.अशातच गर्भपाताचे मार्ग माहीत नसल्याने ह्या दलित मुली आपल्या आईवडीलांना त्याबद्दल जेव्हा सांगत.त्यावर ते मायबाप आपली बदनामी होवू नये म्हणून स्वतःच्या मुलीचाही जीव घ्यायलाही मागेपुढे पाहात नसत.त्यामुळे नाहीतरी जीव जाणारच या भीतीने ह्या तरुण मुली आपला जीव स्वतःहाच आपल्या माय बापाला माहीत न करता संपवीत असत.त्या प्रसंगामुळे एखाद्या सावकाराच्या शेतातील विहिरीवर आपली जीवनयात्रा संपवितांना या मुलींना भीती वाटत नव्हती.जेव्हा ही घटना गावात माहीत होत असे.तेव्हा त्याचा ठपकाही ह्याच दलितावर फोडला जात असे."गेली असन कुटवाले" "मेली तोंड काळं करुन" अशा प्रकारचे वाक्य नेहमी कानी पडत.त्यामुळे संपूर्ण दलित मंडळींना काय करावे?अशा प्रकारचे प्रश्न विचारात येत असत.अशाप्रकारे वरीष्ठ मंडळी आपल्या क्रांतीकारी तरुणांच्या विचाराची अनुभवाच्या आधारे कत्तलच करीत होते.

दलितांनी बनविलेल्या चपला सवर्णांच्या आवडीची वस्तू होती.एरवी राजे महाराजे या दलितांनी बनविलेल्या चपला वा जोडे घालून मिरवीत असत.एखाद्या सवर्ण मुलीचीही पसंती या पायावरुनच होत होती.मानवाच्या शरीराच्या भागावरुन समाजाची विभागणी केली होती.मंडक्याच्या भागाला ब्राम्हण,हाताच्या व छातीच्या भागाला क्षत्रीय,पोटाच्या भागाला वैश्य व पायाच्या भागाला शुद्र संबोधिले जाई.पण मुलीची पसंती करतांना तिचे पोट वा हात न पाहता केवळ पायाची बोटे वाकडी आहेत का?तिच्या पायातील बोटांमध्ये अंतर आहे का?तिचे पाय फकूड आहेत का?हे पाहिल्या जात असे.दलितांनी बनवलेल्या वस्तु उच्चवर्णियांना चालत होत्या.मात्र स्पर्श अजुनही चालत नव्हता.

अशा भ्रष्टाचाराने गाजलेल्या कल्याण राज्यातील एका खेड्यात नरसय्या नावाचा एक व्यक्ती राहात होता.दररोज तो देव लिंगमश्वराचे दर्शन घेत असे.त्याला देवालयात घुसण्याची मनाई होती.त्यानुसार तो दररोज आंघोळ करुन या देवाच्या दर्शनाला लिंगमेश्वराला येत असे.तसा दुरुनच जोहार मायबाप देवहो असे म्हणून परत जात असे.देवालयाच्या दरवाज्याजवळही सावली पडू नये असा नियम असल्याने दूर उभे राहूनच देवाचे दर्शन घेत असे.

चर्मकार जातीत जन्माला त्याची व त्या तथाकथीत दलित समाजाची नेहमी उपेक्षा होत होती.चिखलात जरी ते जन्मले असले तरी त्यांचे सामर्थ्य कमळाएवढे महान होते.हे त्या नरसय्याच्या वागण्यावरुन दिसून येत होते.स्वभावाने नरसय्या मृदूभाषी होता.एरवी राग येवूनही तो राग चेह-यावर झळकू न देता संयमीपणाने नरसय्या आपले जीवन जगत होता.आपल्या दुर्भाग्याचा दोष संपूर्ण संगमेश्वरावर टाकून उकिरड्यात्या जगण्याला सार्थ ठरविण्याचे कार्य नरसय्या करीत होता.

दररोज देवालयात जावून हरीभक्तात रममाण होणारा नरसय्यालाही ह्या अशा जगण्याबद्दल राग यायचा.देवाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याच्या दृष्टिकोणातून त्याच्या मनातही देवाबद्द्ल राग यायचा व तो स्वगत विचार करायचा की देव या उच्च जातीतील जातवंतांना शिक्षा का बरे करीत नसावा?देवाच्या दरबारात सगळे प्राणीमात्रा समान असतांना त्यांचे दर्शन घेतांना स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव का?अशा प्रकारचे भेद जर देव करीत असेल तर तो देव कसला?असा विचार करुन कधीकधी त्या देवाचे दर्शनच घेवू नये असे त्याला वाटायचे.पण देवाचे दर्शन घेवून एखाद्या वेळी चमत्कार होवून या लोकांना सद्बुद्धी नक्की येवू शकते असेही त्याला वाटत असल्याने तो नित्यनेमानं त्या अरळलिंगेश्वराच्या दर्शनाला जात असे.पुजाही करीत असे.त्याचे मित्र मंडळी नेहमी त्याला तसे करण्याबद्दल विरोध करीत.फालतूचे उच्चवर्णियांचे बोलणे ऐकण्यासाठी त्याने लिंगेश्वराच्या दर्शनाला जावू नये असे लोकं जरी बोलत असले तरी त्याकडे लक्ष न देता नरसय्या आपले कार्य दररोज करीत होता.

हिंदू संस्कृती त्या ठिकाणी अस्तित्वात होती.स्वतःला हिंदू समजणारा हा दलित समाज एवढे अत्याचार होवूनही जीवंतच राहिला.त्या समाजाने आपला धर्म बदलण्याचा निर्णय घेतलाच नाही.तेच खरं तर हिंदू.हडप्पाचा अपभ्रंश हरप्पा असा जर केलाच तर या भागातही दक्षिणात्य संस्कृती अस्तित्वात असावी.हर म्हणजे शिव.प्रत्यक्ष लिंगमेश्वर.......या लिंगमेश्वराला देव समजून दक्षिणात्य लोक पुजा करीत असत.

आजुबाजूला जशी शेती होती.तसंच जंगलही......थोडीशी शेती करुन ही मंडळी आपला दिवस कंठत होती.या ठिकाणी जमीनदारी पद्धती असल्याने जमीनदाराकडे लोक नोकरी करुन आपला उदरनिर्वाह चालवायचे.या उदरनिर्वाहासाठी कामाच्या मोबदल्यात जमीनदार धान्य द्यायचे.पैसा विनिमयाची पद्धत नसल्याने मिळेल ते धान्य वर्षभर पुरवून तर कधी उपाशीपोटी राहून ही मांडलिक मंडळी आपल्या जीवनाचा गाडा रेटीत असत.

कल्याण तसं खुप धार्मीक होतं.दर सोमवारी लिंगमेश्नराच्या देवालयात भजनपुजन चालायचे.'जय जय उमापती शिवहरे,जय जय उमापती शिवहरे' म्हणत भजन म्हणताच लोकांना आनंद वाटायचा.प्रभू भक्तीत लिन असलेल्या या लोकांना पुजाविधी करतांना देवाची भीती वाटत नव्हती.उचनीचता बाळगतांना तसेच दलितांच्या पुजेत विघ्न आणतांना या उच्च वर्णियांना कधी देवाची भीती वाटली नाही.देवळात चाललेली किर्तने व भजने ऐकण्यासाठी आलेली दलित मंडळी कोणी देवळाच्या बाहेर काही अंतरावर बसूनच ती भजनं किर्तनं ऐकायची.

सोमवारचा दिवस होता.अरळलिंगेश्वराच्या शिवमंदीरात सायंकाळच्या सुमारास पूजा चालली होती.पुजेची घंटा वाजत होती.नरसय्या जंगलाने वेष्ठीस असलेल्या भागातून लहानशा शेतीच्या पारीवरुन अरळलिंगेश्वराची पूजा करण्यासाठी मंदीर परीसरात आला होता.त्याच्या सोबत त्याचा लहानगा मुलगा हरळ्या त्याचा बोट धरुन चालला होता.मंदीराचा परीसर आला,तसा नरसय्या आपल्या मुलाला म्हणाला,

"हरळ्या,थांब थांब,पुळं जावू नगंस.आपल्याले मंदीरात जाची मनाई हाये."

"कावून गा अप्पा,आपल्याले मनाई कावून हाये?"

"बापू आपून चांभार जातीचे हाओत न म्हून."

"मंग का झालं अप्पा?"

"चांभार जात दलितात येते.दलिताले मनाई हाये.मंदीरपरवेश करता येत नाय."

"मंग आपून इतंपरयंत कायले आलो.आपून याचंच नाय या अपळलिंगेश्वराची पूजा कराले.देवाले समजत नाय का का हे दलित बी माई पूजा करतेत याईले तरास नाय द्याचा म्हून."

"बापू,देवाबद्दल असं बोलू नगं.देव शराप देते.देव महान हाये आपला.पण या लोकायपुळं देव का करन."

"म्हंजे देव बी गुलामच समजायचा या समद्याईचा.मंग अप्पा अशा या गुलाम देवाची तु पूजा करतेस.अप्पा,जो आपल्यावरचा अन्याय दूर करु शकत नाय.तो का तुह्यावरचा अन्याय दूर करु शकन का?अप्पा,आजपासून या मंदीरात येवूच नोको पूजा कराले."

"बापू पुना सांगतो.तु लान हायेस.देवाबद्दल आसं बोलायचं नसतं.देवाची लीला ह्या लोकाईले का कळन."

"बर,मंग आपून का कराचं आतं."

"आपून आतं या देवाची पूजा पाहून कशी करतात ते.ते बी दुरुनच.मंदीरात जाता नाय येत आपल्याले.बेटा दुरुनच घ्या लागते दरशन."

"मंदीरात आपल्याले कावनाय जाता येत अप्पा?" निरागस हरळ्यानं प्रश्न केला.

नाय बाप्पू,आपून इटाळलेली माणसं.समाजानं दूर ठेवलेली माणसं.आपल्या स्पर्शानं हे लोक इटाळतेत.याईले दररोज तिनयेळा आंघोळ करावा लागते.म्हून आजुबाजूले कोणी आलं तं पाहात राय पोरा."

"कावून?"

"अरे आतं संध्याकाळची येळ हाये.कोणाले अंधारात आपून नाय दिसलो तं आपला हात नाय लागणार का त्याईले.मंग त्याईले पुना तिनयेळा आंघोळ करावा लागन."

"करा लागन तं करा लागन.तु त्याची कायले चिंता करतेस अप्पा?"

"बाप्पू,नेयमी नेयमी आपून त्याईले आपला स्पर्श केला तं ते आपली तक्रार राजाले करतीन.मंग राजा आपल्याले फाशीवर चढवन.मंग फुरटं मपणापक्षा बापू चुपचाप बसणं लय चांगलं का नाय."

आजुबाजूला अंधार पडत चालला होता.मंदीरात भजन सुरु होतं.ते भजन बाहेर ऐकायला येत होतं.सोमवारचा नरसय्याला उपवास होता.आठ वाजताची आरती होती.प्रत्यक्ष देवाच्या आरतीचा लाभ घ्यावा.यासाठी मंदीराच्या बाहेर एका कोप-यात नरसय्या आपल्या मुलाला घेवून बसला होता.तोही गुपचूप.आजुबाजूला मंदीरात येणा-या जाणा-यांची वर्दळ होती.त्यामुळे दूर अशा ठिकाणी बसण्याखेरीज नरसय्याला मार्ग नव्हता.अशातच कोणीतरी त्याच्याकडे येतांना दिसलं.आपला स्पर्श होवून त्या गृहस्थाला तिनवेळा आंघोळ करावी लागू नये म्हणून नरसय्या किंचाळला.तसा हरळ्या म्हणाला,

"अप्पा कायले किंचाळतेस गा.घोड्यायसारखा किंचाळतेस."

"बापू आपुन किंचाळलो नाय न तं आपला स्पर्श त्याईले होईन.तेवा ते तकरार राजाले करतीन नाय का?मंग राजा आपल्याले फाशीवर नाय लटकवणार का?मी मंगाशीनच सांगतलो तुले."

"मणला का होता गा.मले नाय आठवत आतं."

"मी मणलो होतो का आपल्याले इतं येणं तं सोड.चांभारवाडीतबी आपल्याले राहाले नाय भेटन."

"आपल्याले अप्पा चांभारवीडीतच जाता नाय येत का मंदीरात?तु देवाले तसाच म्हन.चांभारवाडीत ये म्हणून.या लिंगेश्वराले तिकडच कावनाय बोलवत तु.अप्पा या असल्या मंदीरात येण्यापक्षा तिकडंच बोलवावा.म्हंजे आपल्याले या लोकाईच्या शिवा खा नाय लागन."

अरे पोरा,बोलावलो असतो तिकडं.तिकडं बी देव मांडता येते आपल्याले.देव दगडाचाच हाये.कुठंबी ठेवता येते देवाले.पण माईत हाये का पोरा."

"का अप्पा?"

"बापू आपून का देव मांडला.आन् याईले का माईत झालं तं पुना ईपीत यायचं."

"ईपीत.म्हंजे?"

"अरे आपून देव जर का मांडला तं हेच लोक मणतीन का आमचा देव याईनं चोरुन नेला.आन् पुना आपली तकरार राजाले सांगतीन.मंग त्यानंतर का घडन.समदं तुले माईतच हाये."

"हं राजाले तकरार करतीन.राजा आपल्याले फाशीवर चढवन.समदं माईत हाये अप्पा.याईचा देव याईलेच बरा."लहानगा हरळ्या समजदारीनं बोलला.

ईश्वर श्रेष्ठ आहे.हे जरी खरं असलं तरी तो ईश्वर या भेदभाव करणा-यांना शिक्षा का बरे देत नसावा?असंही त्याला वाटलं.एरवी ईश्वराने जन्माला घातलेले सर्व जीव ज्याप्रमाणे आईवडील आपल्या लेकराला जन्माला घालून लहानाचे मोठे करतात.ते पुत्र कसेहू असोत.समानतेने वागवतात.त्याप्रमाणे देवाच्या दरबारातील सर्व जीव देवापुढे समान असतांना एकीकडे काही जीवांना समानतेचा दर्जा नाही तर दुसरीकडे काही जीव राजरोषपणे समानता भोगतात.कारण काय तर यांनी मागील जन्मी पाप केले आहे म्हणून.खरंच मागचा जन्म तरी असतो का?अशा प्रकारच्या विचाराने हरळ्याच्या मनात जागा केली होती.खरंच साक्षात जीवंत असणारा ईश्वर असा भेदभाव का करतो?यासाठीच हरळ्याने स्वतःला ईश्वरभक्तीत वाहून घेतले होते.त्याने खरा देव शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला.हाच देव शोधता शोधता देवाने माणुसकीच्या रुपात हरळ्याला दर्शन दिले.त्यामुळे भेदभाव म्हणजे नेमका काय हे हरळ्याला माहीत झाले.

मंदीरप्रवेशाची बंदी असल्यामुळे वडील नरसय्याने जरी सांगितले की देवाला उच्च वर्णियांच्या स्थानाकडून दलित वस्तीत आणता येत नाही, तरीही तो ईश्वर हरळ्याने दलित वस्तीत आणण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला.त्याने पुढे जावून दलित वस्तीतच अरळलिंगेश्वराची स्थापना केली.

दलित वस्तीतून अरळलिंगेश्वराच्या दर्शनाला यायला दोन रस्ते होते.एक अरुंद पायलट होती.या पायवाटेने येताना घोड्यासारखे किंचाळत यावे लागायचे.तर दुसरा मुख्य रस्ता होता.या रस्त्यावरुन उच्च वर्णियांचे रथ,घोडे,खासरं चालत.जर या रस्त्यानं एखादा दलित चालत निघालाच तर त्याला कधीकधी अश्वांकरवी तुडविले सुद्धा जाई.त्यामुळे बहुतःश ही दलित मंडळी या रस्त्याने जात नसे.कधीकधी या रथाचा तोल जावून उच्चवर्णीयही या रुंद रस्त्यावर अश्वाचे बळी ठरत.म्हणून तिही या अरुंद पायवाटेने जाणे पसंत करीत असत.परंतू दलित मंडळी समझदार असल्याने या उच्चवर्णियांना तिनवेळा अांघोळ करावी लागू नये म्हणून पायवाटेने चालतांना ते घोड्यासारखे किंचाळत चालत.तसा हरळ्या नरसय्याला म्हणाला,

"अप्पा,या काट्याकुट्यीच्या रस्त्याने चालण्यापक्षा त्या पक्क्या रस्त्यानं कावनाय चालत?"

"नाय बेटा."

"नाय अप्पा,आपून त्याच रस्त्यानं जायचं."

"अरे बेटा,असला हट्ट नोको करु.ह्या रस्त्यानं जाले आपल्याले बंदी हाये बेटा.मी का किंचाळत आलो हे माईत हाये का तुले?"

"अप्पा,म्हातारे हा तुमी.त्यामुळं किंचाळत असान."

"नाय बेटा,आपल्यासारख्या चांभारानं या रस्त्यानं येतानी किंचाळलच पाह्यजे.आयुष्यात असंच किंचाळलेलं असह्य जीवन जगतो हावो आपून."

"पण अप्पा आपून हिंदू नाय का?हावो न.मंग आपून हिंदू असून आपल्याले असं जीणं.कुत्र्यालेबी पलंगावर जागा देतेत हे लोक.गायच्या मुतानं सोताले पवित्र करतेत हे लोक.आन् आपल्याले.....आपल्याले सावली बी नोको हाये त्याईले.देवळात पूजा कराले लावणारी माणसं हिंदूच.मंग हिंदूचा हिंदूले ईटाळ होते म्हणतेत.पण हा ईटाळ हिंदूंचा हिंदूले कसा होत असन."हरळ्या बोलला.तसा नरसय्या म्हणाला,

"बेटा आपून हिंदू जरी असलो तरी आपली जात चांभार हाये हे ईसरू नोको.या जातीले या लोकाईनं नीच ठरवलं हाये.चांभार अगदी शुद्र जात.आपल्याले ह्या लोकाईनम पुरातन काळापासून दूर ठेवलं हाये.तवा आपूनबी या समाजपासून दूरच राह्यलं पाह्यजे.आपून याईच्यात मिसळाचा प्रयत्न करुच नये.आपून जर का याईच्यात मिसळण्याचा प्रयत्न केलाच तं आपल्याले माईत हाये कित्येक समाजबांधवाईचा बळी द्या लागन.आन् आपल्या समाजात कोणीबी सोताचा बळी द्याले तयार होणार नाय."

अनादी काळापासून चालत आलेली चांभार जात.ती जात त्या काळात श्रेष्ठ जात होती.ह्या जातीचं मुख्य काम शत्रूशी लढाई करणं होतं.या चांभार जातीचे कित्येक राजे होवून गेले.पण पुढं या जातीवर उतरती कळा आली.अन् भलतंच काम यांच्या पाठीमागं लागलं.मग यांचं मुख्य काम बनलं चपला शिवणं.ही मंडळी जनावरांचे कातडे सोलून त्याला पकवून त्यापासून दोर,मोटा,चपला बनविण्याचे काम करीत होते.त्यांना मदत म्हणून इतर लोकं सोबतीला राहात.

तशी यावेळीही ही जात महानच होती.एखादं जनावर मरण पावल्यास,तो प्राणी सडून त्याची दुर्गंधी परीसरात पसरु नये म्हणून त्याची अपेक्षीत अशा ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे महान कार्य ही चांभार मंडळी करीत.ही चांभार मंडळी ह्या मृत प्राण्यांच्या मांसाचाही उपयोग करीत.म्हणून ही सर्वश्रेष्ठ जात होती.याच चर्मकारामुळे व संपूर्ण इतर दलित समाजामुळे उच्चवर्णिय लोक सुरक्षेचं जीवन जगत असत.कारण कधीकधी ही मंडळी युद्धाप्रसंगी रणमैदानावर मोठमोठे पराक्रमही गाजवत असत.मात्र कितीही उच्चवर्णिय लोकांची ही मंडळी सेवा करीत असली तरी त्यांना प्रत्यक्ष जीवनात वागवतांना समानतेचा दर्जा नव्हता.ह्या हिन दर्जामुळेच ही मंडळी चिडत होती.

आजुबाजूला काळोख पसरला होता.किर् किर् रातकिड्यांची किरकिरी सुरु झाली होती.तसे काजवे आपल्यातील द्रवांशाने स्वतःला उजळवून टाकत होते.काजव्याच्या चमकण्याचा अंधूक प्रकाश परीसरात प्रकाश देत होता.तेवढ्यात हरळ्याची नजर या काजव्यावर पडली.तद् वतच त्याच्या मनात विचार आला.या काजव्यानेही स्वतः रातकिडा राहून स्वतःच्या जीवनाला उजळवून टाकले आहे.अन् आम्ही मात्र देव देव करीत या अरळलिंगेश्वराची पूजा करीत बसलो आहोत.जो अरळलिंगेश्वर आमचं तसुभरही दुःख दूर करीत नाही.

रातकिड्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या किड्याला पाहून हरळ्याच्या मनातील विचार पारदर्शक झाले होते.आजपासून या लिंगेश्वराच्या दर्शनाला कधीच यायचे नाही असे थोर विचार त्याच्या मनात येत होते.तसा निर्धार करुन तो माघारी फिरणार होता.जर लिंगेश्वराची पूजा करायची झाल्यास ती आपल्याच घरी करायची असेही विचार त्याच्या मनात होते.

हरळ्याच्या मनात विचार चालला होता.आपण तर या लिंगेश्वराला कधीच पाह्यले नाही.देवळात जायची मनाई आहे.मग आपण या अरळलिंगेश्वराची प्रतिमा कशी स्थापन करणार!त्याबद्दल त्याने आपल्या वडीलाला विचारले.पण त्यापुर्वी तो म्हणाला,

"अप्पा,चल ना घरी लवकर."

"अरे थांब न थोडा.आरती झाल्यावर जावू."

"पण अप्पा आपल्याले आतमंधी जाची परवानगी नाय न.मंग आपल्याले आरतीचा का उपयोग?"

"बेटा,आपून आरतीले हाजर जरी असलो तरी लिंगेश्वर पावन बेटा.देवाईच्या दरबारात भेदभाव नाय.हा भेदभाव निरमान माणसाईनं केला.माणूसच भेदभावाचा उगमकर्ता हाये.बेटा या माणसाईले कोण शिक्षा देईन?"

"का.या लिंगेश्वरानं.....तुह्य देवानं याईले शिक्षा नाय देवावा का?"

"बेटा,अरळलिंगेश्वर त्याईले शिक्षा देत बी असन.पण ते आपल्याले माईत होईन का?ते आपल्याले माईत होत नाय बेटा."

"अप्पा,आपून उद्यापासून घरीच पुजून या लिंगेश्वराले."

"बेटा हे कसं होईन.हे याईले माईत नाय होणार का?"

"अगा,हे लोकं का घरात अंदरशान येवून पायतीन.नाय नं."

"हं तुह्य बी मणणं बराबर हाये."

"पण अप्पा,तुनं पाह्यला का देवाले."

"नाय बेटा,मीनं अजून देवाले पाह्यलो नाय.पण देव वाटोळा हाये मणतेत लोकं."

"म्हंजे?"

"मणजे बेटा,आपल्या घरच्या वरवंट्यासारखा.वरवंटाच समज."

"मंग घरीच वरवंट्याची पूजा केली तं नाय देव पावणार का?आपलं इतं याचं कष्ट बी वाचन.अन् आपली पूजा बी होईन म्हंतो."

"नाय बेटा,तुले जर तरास होत असन तं तू नोको येत जावू.पण मा नेम नाय चुकला आतंपर्यंत.मी तं बेटा दररोज येतो दर्शनाले.आरती झाल्यावर जातो.तवा मी तं दररोज येईन बेटा."

"अप्पा,तुले याचं असन तं तू येत जाजो.पण मी मातर त्या वरवंट्याचीच पूजा करीन म्हंतो.चाल लवकर चाल घरी."

तशी आरती सुरु झाली.आरतीचा पुर्ण गजर परीसरात पसरला होता.तसा घंटीचा नाद ऐकून अरळलिंगेश्वरच पृथ्वीवर अवतरला की काय असे वाटत होते.लिंगेश्वराला प्रत्यक्ष पाहिले नसले तरी प्रत्यक्ष पाहिल्याचा भाष होत होता.तशी आरती झाली.ती कापराची आरती घेवून संगभट सर्वांना देण्यासाठी मंदीराच्या मुख्य दरवाज्यापाशी आला.त्याला त्या दरवाज्यापासून लांब अंतरावर हरळ्या आणि नरसय्या उभे असलेले दिसले.आज ते थोडे जवळच होते.कारण पोराच्या हट्टापायी नरसय्या थोडा जवळ आला होता मंदीराच्या पायरीपर्यंत.त्यांचे मंदीराच्या पायरीपर्यंतची परवानगी नसतांनाही यांचे मंदीराच्या पायरीपर्यंत येवून धडकणे हे संगभटाला पटले नाही.तसा त्यानं नरसय्याला आदेश दिला की त्याने लवकर निघून जाव.तसा तो माघारी चालता झाला.

संभाव्य धोका लक्षात घेता नरसय्याने हरळ्याला घेवून परीसर सोडला.प्रश्नांकिंत मनाने हरळ्याही नरसय्याचं बोट धरुन चालता झाला.संभाव्य धोका त्याच्याही लक्षात आला होता.पण बाळबोध हरळ्याला त्याबद्दल काहीच वाटलं नाही.तसा जाता जाता त्याच्या मनात विचार आला की हे उच्चवर्णिय लोक आपल्याशी असा व्यवहार का करतात?हे सरळ त्याच मंदीरात एक दिवस जावून त्या अरळलिंगेश्वराला विचारावे.अशी जणू प्रतिज्ञाच घेवून तो रस्ता चालत होता.

संपूर्ण परीसरातच अंधार पडला होता.आजुबाजूच्या काळोखाने खालचा रस्ता दिसत नव्हता.त्यामुळे रस्त्याने जंगली श्वापदंही दिसत नव्हती.तरीही अंदाजाने पावले टाकत टाकत दोघंही बापलेक चालले होते.तशी हरळ्याच्या पायाखालची जमीन ओली वाटली.कदाचित आपला पाय तर एखाद्या निष्पाप जीवावर पडला नसावा अन् तो जीवही अंधारात दिसत नसल्याने न पळता जागेवरच थांबला असावा असं हरळ्याला वाटलं.तसा नवीन विचार विचार त्याच्या मनात चमकून गेला.नवी जाणीवही देवून गेला.त्या प्राण्याप्रमाणे माणसाचे तर झाले नसेल.आपली दलित जाती या आपल्या पायाखालच्या किड्यामुंग्यांसमान.केव्हाही पाय ठेवायचा आणि केव्हाही कुचलायचे.जसा या किड्यामुंग्यांना अंधारात रस्ता दिसत नाही.तसाच रस्ता अंधश्रद्धेने बुरसटलेल्या आमच्या समाजालाही दिसत नाही.आज आमची अवजारे आमचे विचार या किड्यामुंग्यांसारखे मेलेले आहेत.एव्हाना जर ह्या मुंग्या एकत्र आल्या की आपल्यासा सळो की पळो करुन सोडतात.अगदी त्याच प्रकारे माणूस जर एकत्र आला तर.......अन्यायी अत्याचारींना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.ही भेदरट वृत्ती केव्हापर्यंत राहणार आमच्या दलितांची.आम्ही दलित माणसे केव्हा एकत्र येणार?केव्हा क्रांती होणार?एरवी जास्त मुंग्यांच्या प्रदेशातून माणूस जसा पळून जावू शकत नाही.तसा उच्चवर्णिय माणूसही क्रांतीतून पळून जावू शकणार नाही.पण ही क्रांती करेल कोण?क्रांती करण्यासाठी पुढे कोण येईल?की या किड्यामुंग्यांसारखं शेकडो वर्ष दलितांना मृत्यूच स्विकारावा लागेल दुर्बल होवून......इत्यादी प्रश्नांच्या गर्दीत विचारमग्न होवून हरळ्या चालला होता.

हरळ्याचा विचार रास्त जरी असला तरी तो त्या काळात रास्त ठरु शकत नव्हता.या अंधश्रद्धा व भेदभावावामुळे त्यांची जिंदगी किंचाळत जात होती.एक एक पाऊल टाकता टाकता आणि किंचाळत चालता चालता हरळ्याला त्याचं घर केव्हा आलं कळलंच नाही.तशी हरळ्याला पाहून हरळ्याची आई म्हणाली,

"अवं एवळा येळ का?"

उद्विग्नतेने नरसय्या बोलला,

"अवं मंदीरात आरती होत होती.त्या आरतीले थांबलो होतो.म्हून येळ झाला."

"पण आरतीले थांबणं गरजेचं होतं का?"

"अवं अरळलिंगेश्वराची आरती होती.त्या आरतीनं देव प्रसन्न होते.आपल्यानंतरच्या पिढीले असं ईटाळाचं जीणं जगावा लागन नाय म्हून जातो दररोज आरतीले.कधीकधी उशिर होते मग."

"पण दररोज तं आरती लवकर होते.आज कावून बा येळ लागला म्हून इचारलं."

"अवं आज भटजी उशिरा आला."

"भटजी तं मोठ्या दिमाखानं गोष्टी सांगते न........त्यानंच तं इटाळाचा ठेका घेवून ठेवला हाये.समद्या गावाले तोच सांगते का दलिताईले गावात येवू द्याचं नाय म्हून.काम पल्ला तं दलित अन् काम निसटला तं आमची आठवणच येत नाय."

"म्हंजे?"

"अवं त्या दिशी त्या मायद्याच्या इतं गाय मरुन पल्ली.तवा त्याईले नरसय्या आठोला.त्याईले फेकाले का झालं होतं.नरश्या नरश्या मणत आला होता न तो.त्याईले कामासाठी याले इतं ईटाळ नाय होत का?त्याईले दलित वस्तीत कामासाठी येता येते का?आमालेच नाय जाता येत त्याईच्या वस्तीत कामासाठी?हा कोणता न्याय याईचा?अवं ज्याले नेम नाय पाळता येत,त्याले गोष्टी बी सांगाचा अधिकार देल्ला कोणं?"

नरसय्याच्या पत्नीचं अगदी बरोबर होतं.तशी ती जुन्या काळातील असली तरी तिचे विचार परिवर्तनवादी होते.रुढीवादी परंपपेला तिचा विरोध होता.तिच्याच वळणावर जावून हरळ्याचे विचारही वंशपरंपपेनुसार परीवर्तनवादी झाले होते.बहूजन समाज ही जरी भेदभावाच्या पलिकडील नसला तरी त्याही समाजाला भेदभावाची थोडी झळ पोहोचलीच होती.अंधश्रद्धा,देव यासारख्या गोष्टीची भीती दाखवून उच्चवर्णियांनी दलितांना छळले होते नव्हे तर अधाशी धरले होते.अनेक देवीदेवता ही याच काळात जन्माला आल्या.देवीदेवतांना प्रसन्न करण्यासाठी मग लोक पुरोहीतांच्या सांगण्यावरुन यज्ञयाग,कर्मकांड करायला लागले.देवीदेवतांची पूजा केल्याने भूतं दूर भागतात अशी कल्पना या दलितांच्या मनात उच्चजातींनी बिंबविल्यामुळे लोकं अतोनात घाबरु लागले तसेच मांत्रीक पुरोहीतांचा सहारा घेवू लागले.

देव माणसात वास करतात तर भूतं निर्धन स्थळी वास करतात अशीही भीती दाखवली होती.या भुताचेही विविध प्रकार होते.पाण्यात राहणारा पाणदेव,मातामाय,देईमाय,भैरोबा,नक्टोबा,वाघोबा,आंबागड्या,जोमाई,म्हसोबा,गंगामाय इत्यादींना पळवून लावण्यासाठी लिंहेश्वराची पूजा केली जाई.त्यातच जमीनीत असलेल्या संपत्तीचं रक्षण भुतनाग करतो.त्याला जर प्रसन्न केलं तर जमीनीतील गाडलेलं धन आपल्याला मिळतं.या भ्रामक कल्पना......या कल्पना वास्तव वाटत असल्याने असे गाडलेले धन बाहेर काढण्यासाठी लहान लहान बालकांचा बळी सुद्धा देण्यात येत असे.अशाच बळीसाठी दलितांच्याच मुलाचा विचार केला जाई.बळजबरीने दलितांची मुले पळवून तर कधी हिसकून त्याचा नाहक बळी देण्याची प्रथा त्या काळात अस्तित्वात होती.

सुरपूर नावाचं ते गाव होतं.गाव तसं माहासलेलं होतं.या गावात एका भागात अरळलिंगेश्वराचं देवस्थान होतं.या देवस्थानच्या एका बाजूला उच्चवर्णियांची वस्ती होती.तर देवस्थानापासून दूर अशा ठिकाणी दलितांची वस्ती होती.या वस्तीकडे कोणी फिरकत नसत.या वस्तीतीव लोक व्यवसायाने अतिशय कनिष्ठ स्वरुपाचे व्यवसाय करीत.या व्यवसायात चामडे सोलणे,ते पकवणे त्यापासून चपला जोडे वार्त्या मोटा बनविणे,झाडलोट करणे,झाडू बनविणे,तट्टे विकणे,मांस विकणे,वाद्या तयार करणे,वाजे बनविणे,इत्यादी हलक्या दर्जाची कामे करीत असत.मेलेल्या प्राण्यांचे मांस घरावर वाळविणे.ते वाळवून पावसाळ्यात घरी भाजी बनवून खाणारी माणसं.त्यांना स्वच्छतेचं महत्व कळत असलं तरी अंगावर वितभर कपडे मिळत नसल्याने सदोदित ती मंडळी अर्धनग्न अवस्थेत वावरत.गुप्त भाग तेवढा झाकण्यापुरते स्रीया वस्र वापरत तर पुरुष खालच्या भागातील कपडे वापरत.मुलांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मोठमोठी मुले अंगावर कोणतीच वस्रे परीधान करीत नव्हती.

चांभारवाडीत राहणारे चांभार लोक आपल्या अस्तित्वाच्या ठिकाणाला चांभारवाडी म्हणत असत.याच चांभारवाडीत संत हरळ्याचा जन्म झाला होता.हरळ्या आईप्रमाणेच लहानपणापासूनच क्रांतीकारी विचारांचा होता.



चिकित्सक बुद्धिमत्ता प्राप्त असलेल्या हरळ्याला लिंगेश्वराच्या मंदीरात प्रवेश करुन कायदा मोडायचा असे वाटत होते.

असाच एकदाचा तो दिवस उजळला.आपल्या वडीलाला घेवून हरळ्या अरळलिंगेश्वराच्या मंदीरात आला.तिही दिवसाची वेळ होती.कोणाला न दिसता हरळ्या मंदीरात शिरला.तशी आरती सुरु झाली.पुर्ण आरतीभर हरळ्या कोणालाच दिसला नाही.कारण आरती सुरु असतांना प्रभुभक्तीत लीन असलेल्या माणसांनी अगदी डोळे मिटून आरती करावी असा जणू नियम असल्याने सर्व भावीक डोळे मिटून होते.हा नियम संगभटाच्या सातव्या पिढीपासून चालत आलेला आहे असे संगभट सांगत होता.तसेच तो त्याची पुनरावृत्ती गिरवीत होता.मन लावून अगदी डोळे मिटून समस्त मंडळी आरती म्हणत होती.तसा अर्धनग्न अवस्थेत असलेला हरळ्या कोणाचीही नजर स्वतःवर न पडू देता देवाच्या पुढ्यात नजर चुकवून उभा झाला.जणू त्याला देवासमोर भेदभावाबद्दल जाब विचारायचा होता.

संगभटाने आरती आटोपली.देवाला कापूर दिला आणि लोकांना आरती देण्यासाठी तो मागे फिरला.तोच पुढ्यात अर्धनग्न अवस्थेत असलेला हरळ्या दिसला.वडील नरसय्या भीतीने बाहेरच उभे होते.जसा हरळ्या दिसला.तसा संगभटाला आश्चर्याचा धक्काच पोहोचला.त्याचा क्रोध वाढला.त्याला संताप आला.तो अनावर झाला.तसा तो स्वगतच पुटपुटला.

''शिवो शिवो शिवो,हे काय इपरीत घडलं देवा,मी आज कोणतं पाप केलं.पापाचंच अस्तित्व की काय,हा बालक साक्षात माह्यापुळं उभा हाये."

तसा तो त्या बालकाला म्हणाला.

"कोण रे तु?कोणाचा पोरगा होयेस?अन् असा अर्धनग्न का आला?तुले मंदीर वैगेरे समजत नाय का?"

"मी....मी हरळ्या......हरळ्या चांभार......नरसय्या चांभाराचा पोरगा."

"शिव शिव शिव,हरळ्या चांभार.तुले समजत नाय का इतं या नाय लागत म्हून."

"इतं का नाय यायचं आमी?"

"अरे तु इतं कायले आला.दूर हो दूर हो आधी."

"अवो मायराज,मी देवाले भेदभाव कावून बा करतेस ते इचाराले आलो.अन् आमचा कोणता गुना हाये.ते बी इचाराले आलो.कावून बा.इचारु नोको का देवाले?"

"मोठा आला इचारणारा.चल पह्यलं बायेर हो मंदीरातून."

"नाय होणार.""

तसा रागाने लाल होत संगभट म्हणाला,

"चांभारड्या कुठला,तुही सावली देखील पडू नये माह्यावर.अन् माह्या या देवावर."

"देव अन् मायराज तुमचा! तुमचा.......भेदभाव करणा-याईचा देव.देवाजोवर समदी माणसं समाान असतेत,समजलं."

"पुन्हा तेच ते.सांगतलं न दूर हो म्हून."

तशा लोकांच्या नजरा हरळ्यावर स्थिर झाल्या.सर्वांनाच राग आला होता.पण प्रत्यक्षात ते संगभटाच्या आदेशाची वाट पाहात होते.संगभटाने दिलेला आदेश पाळून देवाच्या कार्यात विघ्न न आणण्याचा विचार संपूर्ण गाव करीत होता.मग हरळ्याला न जातांना पाहून संगभट गावक-यांना म्हणाला,

"अरेरे!घेतला रे मा पोराचा जीव.घेतला रे.देवा हे माणसं होयेत का शैतान.तुलेबी माईत नाय देवा याईचा व्यवहार."

"तु कोणं रे म्हातारडा?तुच याचा बाप ना."कोणीतरी म्हणालं.

"हो मायबापहो,मीच याचा बाप.माह्या पोराले कावून फेकल्या बाप्पा?"

"तुले मंदीराचा नेम माईत हाये का नाय."

"मायबापहो मले माईत हाये.पण या पोराले कोण सांगन.अन् लान पोर म्हंजे देवाघरचं लेकरुच नाय का?तुमीच म्हणता नवं."

"लेकरु!"गावक-यांचा आवाज फारच चढला होता.

जातीचे चांभारडे अान् देवाघरची लेकरं मणतेत कायले आले इकडं?भैताड कोठले."कोणीतरी म्हणालं.

"मायबापहो या मा पोराले घेवून मी या शिवमंदीराच्या आरतीले आलो.दररोज येतो आज पोराले घेवून आलो.का काई गुना केला का मायबापहो.पाहाले आणलो बा मा पोराले.सोम्मार हाये म्हून."

"जातीचे चांभारडे आन् सोम्मारची शिवपुजा पायता.अबे नरश्या शिवपुजा पाहासाठी तुले बामन कुळात जनमाले या लागन माह्यासारखा."संगभट म्हणाला.

"तेच तं दुर्दैव हाये मायराज आमचं.देवानं आमाले बामन नाय बनवला म्हून तं भोगतो हाओत आमच्या जनमाच्या कळा.देवापासून बी पारखे हाओत आमी.कितीबी देवाबद्दल आस्था असन,तं ती बी पुर्ण होत नाय.मंदीरप्रवेश तं नायच नाय.पण साधी देवाची पूजाबी दूरुन पायता येत नाय."

"अरे म्हातारड्या,सांगतलं न तुले,का तुमी मागच्या जनमात लय पाप केलं होतं.म्हून तुमाले देवानं चांभार बनवलं,समजलं आतं.लय रिपरिप करतोय तु."

हरळ्या पडला खरा.पण ती हाडामासाची माणसं होती.त्यांना जास्त लागेल कुठून.हरळ्या लवकर उभा झाला.तसा तो त्या उच्चवर्णियांचं बोलणं ऐकू लागला.त्याला ते म्हातारड्या,चांभारड्या म्हणणं आवडलं नाही.तो संगभटाच्या जवळ जावून म्हणाला,

"माह्या अप्पाले थेरड्या का म्हंता? माह्या अप्पाले थेरड्या मणाचंच नाय.लाज नाय वाटत तुमाले.तुमच्या एवळाच हाये का मा अप्पा?"

"शिव शिव शिव,दूर हो दूर......केवळा घाणेरडा वास येते तुह्या आंगातून.विटळवलंस मले.सावली पाडलीस माह्या अांगावर."

दुरुन नरसय्या पाहात होता ते सारं.अजून हरळ्याला हे लोकं मारतील असं त्याला वाटत होतं.तसा तो हात जोडून मान खाली टाकून बोलला.

"भटजी,मा पोराच्या हातून लय चूक झाली.हवं तं त्याले माफ करा.लान पोरगा तो."

"जाणुनबुजून विटळवता आन् माफी बी मांगता.बरा न्याय हाये तुमचा.तुमी आज जरुन घरुन साजिश करुन आलेले दिसता."

"नाय मायबापहो,तसं बिसं काय नाय.मा हरळ्याले देव जोवरुन पाहाचा होता.म्हून गेला असन देवाच्या जोवर."

"ते गी काय नाय.मी आज तुमचा निकालच लावतो."

"ए पंडीत्या सतरा येळा मा बाप तुमाले मायबापहो म्हंते,हात जोडते.आन् तु लय भाव खातेस रे.चल जाते का नाय आपली पूजा कराले.का हानू एक गोटा.अरे माह्या सावलीनं जर तुहा मंदीर इटाळला असन तं धुवून टाक आपला मंदीर.मी बी पायतो.किती साफ ठेवतेस तं.मी पुना पुना येईन मंदीराच्या आत.कितीक लक्ष ठेवतेस मा वर तं पायतो मी बी."

हरळ्याचं बोलणं ऐकून संगभटाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.तसा तो नरसय्याला म्हणाला,

"नरश्या,तुह्या पोराले लवकर इतून घेवून जा.माह्य डोस्कं जास्त खराब होवू देवू नोको."

"नायतं का करान तुमी.अजून मारान एवळच न.मी बी पायतो कसे मारता ते."हरळ्या म्हणाला.तसा नरसय्या आपल्या मुलाला समजंविण्याचा प्रयत्न करु लागला.तसा हरळ्या परत म्हणाला,

"मुर्ख पंडीत,याईले काय आमच्या सावलीताबी ईटाळ होते.आपला ईटाळ हा जाणार कवा अप्पा?"

"हे पाय.तुयासारखी लेकरं जवा शिकतीन.ते इतराईले शिकोतीन अान् इतरबी इतराईले शिकोतीन तवा जाईन ईटाळ."

"मंग ईटाळ असा जात नसन तं आपून जोडे शिवाचा धंदा बंद करुन टाकावा.याईचे जोडे आपून शिवतो.म्हून हे लोक माजले सारे.आपून याईचे जोडेच शिवलो नाय तं आपोआपच हे लोक सिधे बनतीन."

"लेकरा,धंदे सोडले म्हून जात बदलत नाय.जात सुटन असं वाटते का तुले.आपून चांभारच आन् आपली जात बी चांभारच.आन् बेटा धंदा सोडल्यावर आपण जगूच असं वाटत नाय मले.लेकरा आपून जर का धंदा सोडलाच तं मरुन जावून उपासानं."

"मंग मले देवानं तुह्या घरी तरी कायले जनमाले घातला."

"ते समदं अरळलिंगेश्वराले माईत."

"मंग मी बी अरळलिंगेश्वरालेच इचारतो का मले कायले चांभार जातीत जनमाले घातलास म्हून.मी जातो पुना मंदीरात."

"नाय रे बाप्पा,तु नोको जावू पुना त्या मंदीरात.पुना हे लोकं तुले फेकतीन.तुले दगडानं मारुन टाकतीन.त्यापरस तु एवळा मोठा हो का त्या अरळलिंगेश्वराले भक्तीनं प्रसन्न करुन टाकजो.समजलं का मी का म्हंतो ते."

"हो अप्पा,तुह्य बी मणणं बराबर हाये."

हरळ्याजवळ संगभट उभा होता.मंदीराच्या दरवाज्याजवळ लोकांची दर्दी जमली होती.हरळ्याचे मंदीरात येणे लोकांना पसंत पडले नाही.संगभटाच्या आदेशाने हरळ्याला बाहेर फेकले तरी लोकांचे समाधान झाले नव्हते.या लेकराला मंदीरात जायला नरसय्याने जाणुनबुजून लावले असे लोकांना वाटत होते.कोणी ठार करा तर कोणी त्यांना दगडाने ठेचून टाका असे ओरडत होते.असंतोषाचा अग्नी अगदी भडकत चालला होता.तसा नरसय्या आपल्या मुलाला म्हणाला,

"बेटा चाल लवकर घरी.नायतं हे लोकं आपल्यावर दगडफेक करतीन.आपल्याले मारुन टाकतीन.चाल लवकर घरी चाल."

"अप्पा थांबा तुमी.कोण दगड मारतेत तेच पावू."

हरळ्या दरवाज्याच्या दिशेनं रोखून पाहात होता.त्याचा बाप त्याला नेण्यासाठी हाताने खिचत होता.जणू देवाला चांभाराच्या हातची पूजा बरोबर वाटत नसावी असे वाटत होते.तसा नरसय्या पुन्हा म्हणाला,

"बेटा,चाल लवकर.चांभारानं आपली पूजा केलेली या देवालेबी आवडत नाय.चाल बेटा,आजपासून पुना कधीच या मंदीरात येणे नाय."

नरसय्याने आपल्या मुलाचा हात धरला व तो खिचत खिचत चालू लागला.हरळ्या मात्र पाठीमागे फिरुन फिरुन त्या मंदीराच्या दरवाज्याकडे रोखून पाहू लागला.तसे हरळ्याच्या मागावर असलेले लोक विचार करु लागले की यांना जर सबक शिकविली नाही तर उद्या दुसरी दलित मंडळी मंदीरप्रवेश करुन देवाचा अपमान करतील.जातीभेद मोडतील आणि उचनीचता संपुष्टात येईल.ही मंडळी आपल्याला तसूभरही दबणार नाहीत.जणू याचाच विचार करुन कोणीतरी म्हणालं,

"अरे ते चालले पाय.त्याईले जावू देवू नोका.मारा त्याईले ठार करा."

"हो हो ठार करा......ठार करा."असे म्हणत कोणीतरी नरसय्याच्या दिशेनं दगड फेकला.त्याचबरोबर सगळी मंडळी दगडफेक करु लागली.त्यातील एक अनकुंचीदार दगड नरसय्याला लागला.आता पळून जातांना यातील एखादा दगड आपल्या बाळबोध लेकराला लागला तर....आपलं लेकरु मरुन जाईल.कदाचित लेकराबरोबर आपणही.त्यापेक्षा आपल्या लोकराला कवेत घेवून आपण या दगडाचा सामना केलेला बरा.निदान आपल्या लेकराचा तर जीव वाचेल. असा विचार करुन नरसय्याने हरळ्याला कवेत घेतले.मागवून दगडाचा वर्षाव होवू लागला.हरळ्या जीवाच्या आकांताने अप्पा अप्पा ओरडत होता.नरसय्या मात्र रक्तबंबाळ झाला होता.तरीही दगडफेक थांबत नव्हती.मात्र जीव जाईपर्यंत नरसय्या त्या दगडाचा सामना करीतच होता.नव्हे तर झुंज देत होता.अशातच एक दगड नरसय्याच्या मस्तकात येवून धडकला.नरसय्या खाली कोसळला.पण तरीही कवेतील हरळ्याला त्यानं सोडलं नव्हतं.मंदीरात जाण्याची परियंती खुप वाईट होती.

काही वेळानं दगडफेक थांबली.कदाचित नरसय्या जर मरण पावला तर ही बातमी वा-यासरशी ब्रिज्वल दरबारी जाईल व आपल्याला शिक्षा होईल या भीतीने लोकांनी दगडफेक थांबवली होती.तसा नरसय्या आपल्या मुलाला म्हणाला,

"बेटा हरळ्या,चांभार जातीत जनमाले आलो म्हून हे यातना मले भोगाले आली.देवाजोवर तरी न्याय नाय आपल्यासाठी.देव याईले शिक्षा द्याऐवजी आपल्यालेच देते."

"अप्पा दुःखी नोका होवू.मी जावून त्याईचा समाचार घेतो."

"नाय बेटा,हे लोक आतं भडकले हायेत.आतं चूप बसणं बरं हाये.ते तुलेबी ठार कराले मांगंपुळं पायनार नाईत.तु नोको जावू लेकरा.मी का सांगतो ते ध्यानात असू दे."असे म्हणून नरसय्या हरळ्याला उपदेश करु लागला.

"नदीनं आपली दिशा बदलली म्हणून कित्येक येळी आापून दुस-याले मदत करतो.पण दुस-याले मातर आपण मदत मागतली तं तो करनच असं नाय.मंग आपल्याले चीड येते.पण हरळ्या असं चिडून जावू नये हे ध्यानात ठेव.अरळलिंगेश्वरानं आपल्याले मदत नाय केली म्हून काय झालं.तो अंतर्यामी हाये.त्याच्यावर श्रद्धा ठेव.त्याले इसरु नोको.हरळ्या हे माई आखीरची येळ.ये बस माह्याजोवर."

उभा असलेला हरळ्या खाली बसला.त्याला बाप काय म्हणतो ते कळत नव्हतं.तरीही तो शांतपणे ऐकत होता.तसा नरसय्या पुन्हा म्हणाला,

"मी तुले बेटा या समाजापासून दूर ठेवलं.याचसाठी.हे लोक बेकार हायेत बेटा.मी सोचलं का आयुष्यभर याईच्या ईटाळाची झळ तुले पोयचू नये म्हून तुही जपणूक केली.बेटा मी तुहा दत्तकबाप होवो.तुह्या बापाचा नाव मादय्या होता.आन् तुया आईचा नाव मदाम्मा.ते दोघंबी मोठे शिवभक्त होते पण त्याईलेबी मंदीरप्रवेश नोयता.त्याईलेबी समाजातल्या ईटंबनेची झळ पोचली.माह्ये बी मायबाप लानपणीच मेले होते.तवा तुह्या बापानं सोताच्या भावासारखं मले सांभाळलं.ते होते तवापर्यंत मले कायपण कमी नोयतं.एक दिस ते अरळलिंगेश्वराचं ध्यान करत करत ते दोघंबी या जगातून निघून गेले.मले एकट्याले सोडून.बेटा,आपून याईचं कितीबी केलं तरी नीच माणसं हे.समुंदराची लाट खवळली म्हून अख्खा समुंदर खवळत नाय.समाजात क्रोध वाहाळला तं तो जोशानं थंड होतच नाय.शांत रायल्यानच थंड होते.तुह्ये मायबाप खरंच थोर होते.सोताच्या भावासमान ह्या पोरक्या झालेल्या नरसय्याने आधार देला त्यानं.मरतांनी मातर त्याईनं माकडून वचन घेतलं होतं.मले मणलं होतं का,:नरसय्या आमी तं देवाघरी चाललो.पण जातानी आमची एक इच्छा हाय.ते मणजे आमचं पोर.आमी आमची वंशयेल तुह्या हातात देत हाओ.तिले सांभाळ.अंतर देशिन नोको.हसव फुलव.नाजूक लतेपरमान तिचा सांभाळ कर.मी बी त्याईले तुले सांभाळाचाच वचन देलो.मंग ते सुखानं मरण पावले.माहा हात हातात घेवून.तवापासून तुले सांभाळलो बेटा,तुले वाटू बी देलो नाय का मी तुहा बाप नोये मणून.आपला पोरगा समजूनच सांभाळलो.तुले कधीच दुस-याचा पोरगा समजलो नाय.पण आतं तुले लय ईचार करता येते.आतं तु समजदार झालास.बेटा,मले मरणाची कारजी नाय.कारजी हाय तुही.माह्यानंतर तु कसा जगशिन असं वाटते मले.पण कारजी हाय तुही......माह्यानंतर तु कसा जगशिन असं मले जरी वाटत असलं तरी मी आज समाधान पावलो.तुह्यात हिंमत हाये.हे मी पाह्यलो आज.कारजी नोको करशिन बेटा,माहा आशीर्वाद हाये तुले.पण याईचं याईच्यापाशी ठेवशिन.तुह्य तुह्यापाशी.पोटच्या गोळ्यापरमान जतन करुन ठेवलेला तु मा जीव.या समाजाच्या झंझावातालेबी तु मात देशिन असं वाटते.पण जरा शांत राहून आन् मौनात राहून.मौनानं भल्ली भल्ली कामं होतेत.न होणारं काम बी होते.पण ह्या समाजाच्या झंझावाताले घाबराचं नाय.मी बी मोठ्या धैर्यानं तोंड देलो.पण तुले दूर ठेवलो.पण नेटानं तुले शिकवलो.पण आतं हाच झंजावात मा जीव घेत हाये."

"अप्पा हे तुमी का बोलता?तुमी मले सोडून चालले का?मी कसा करीन तुमी गेल्यावर.तुमी मले सोडून नोको जा.मी तुमच्या मणण्यानुसार वागीन.चूप राहीन.अरळलिंगेश्वराची पूजा बी करीन.पण तुमी मले सोडून जावू नोका."

"बेटा घाबरु नोको.माह्या आशीर्वाद हाये तुले.आयुष्यात जे दुःख मी भोगलो,ते तुह्या वाट्याले येवू नये.एवळीच माही इच्छा."

"अप्पा,माह्यासाठीच तुमच्यावर ही येळ आली.मीच तुमचा गुन्हेगार....मीच गुन्हेगार हाये अप्पा.मले माफ करु नोका.मीच मणालो होतो त्या लिंगेश्वराच्या मंदीरात चाल म्हून.तुमी तं बायरं उभे होते.अन् मी आतमंधी गेलो.अन् माह्यामुळंच हे इपरीत घडलं."हरळ्या रडत रडत बोलत होता.नरसय्या मरतो की काय असे त्याला वाटत होते.त्यासाठीच तो स्वतःला गुन्हेगार समजत होता.नरसय्या मेल्यावर आपले कसे होणार यासाठी तो चिंताग्रस्त होता.तसा नरसय्या म्हणाला,

"बेटा,गुन्हेगार तु नाय.मीच हाये बेटा.मी तुले येतची पूजा पाहाले आणलोच नसतो तं हे इपरीत घडलं नसतं.आतं माह्य शेवटचं काम कर.तु मले पाणी आणून पाज.अन् तु मले झोपू दे सुखानं."

हरळ्यानं नरसय्याला बाजूला नेवून झोपवलं आणि पाणी आणायला गेला.तसा त्याच्या मनात विचार आला.हे सगळं आपल्यामुळच घडलं.आपण इथं यायलाच नको होतं.आपल्यामुळच आपल्या पालक पित्यावर ही वेळ आली.आपले वडील केव्हा मेले हे देखील आपल्याला माहीत नाही.पण ते आज कळलं.आपल्याला आपल्या वडीलाची उणीव या गृहस्थानं जाणवू दिली नाही.खरं तर मीच त्याला बाप समजत होतो.त्यांचे उपकार मी जन्मभर फेडू शकणार नाही.आजपर्यंत आपल्याला समाजाची झळ पोहोचू नये म्हणून या माणसानं आपल्या पाल्य बापानं समाजाच्या समोर येवू दिलं नाही.समाजातही विटाळ आहे हे कधी जाणवू दिले नाही.नरसय्या खरंच महान आहे.

तसं त्यानं पाणी आणलं.ते नरसय्याला पाजलं आणि विचारलं,

"अप्पा आतं कसं वाटते."तसा नरसय्या म्हणाला.

"बेटा,या लिंगेश्वरावर श्रद्धा ठेवून जगात वावर.आयुष्यभर जे मले करता आलं नाय,ते तु करुन दाखव.हे अस्पृश्यता आपल्या दलित जातीले शराप हाये.हे अस्पृश्यता संपवाची हाये तुले हे ध्यानात असू दे.हे अस्पृश्यता अनेकाईचे जीव घेईन तरी संपणार नाय.ते तुले संपवायची हाये.धीटाईनं जग.इतराईलेबी जगव.घाबरु नोको कधी कठीण परसंगातही.अन् ज्या दगडाईन् माह्या जीव जाणार हाय,त्या दगडालेच याचा जाब इचारण्याचा प्रयत्न कर.जातो मी....."

'जातो मी' हे नरसय्याचं शेवटचं वाक्य ठरलं.त्यानं आपल्या वाणीनं अस्पृश्यतेविषषी लढण्याचा संदेश दिला होता.अस्पृश्यतेच्या कलंकानं मादय्याच्या पिढ्यान् पिढ्या कलंकीत झाल्या होत्या.अनादीकालापासून आलेली अस्पृश्यता....या अस्पृश्यतेनं दलितांचं जगणं मुश्कील करुन टाकलं होतं.दलितांना दलित नावानेही आवाज देणे ही देखील एकप्रकारची शिवीच होती.त्या शापानेच दलितांच्या कित्येक पिढ्यांचा जीव गेला होता.तरीही दलितांना आत्मज्ञान झाले नव्हते.कारण जो समाजाचा धाक होता.तो एवढा प्रचंड होता की लोकं त्या धाकाला घाबरत होते.आपण पापाचे धनी या स्वरुपातच हे दलित घाबरत होते.तसा नरसय्या मृत्यू पावल्यावर त्याच्या प्रेताजवळ बसून हरळ्या रडत होता.आजुबाजूंची बघ्यांची गर्दी त्याच्या रडणा-या चेह-याकडे पाहात होती.कोणालाही किंचीतही दया येत नव्हती.वा कोणीही प्रेताला हात लावायला तयार नव्हतं.तेवढ्याच क्षमतेने हरळ्या त्या उच्चवर्णियांना शिव्या देत होता.त्याच्या ममातही रडता रडता विचार चालला होता.तो विचार त्याच्या ओठावर आला व तो त्या प्रेताशी बोलायला लागला,

"अप्पा,मले तुमी सोडून गेलात.मी पोरका झालोय.अप्पा मी पोरका झालोय.मुळातच मादय्या आन् मादम्मा या जोडप्याने पोरक्या केलेल्या या हरळ्याले आपण बी सोडून जावून पोरकं बनवलंय.अप्पा,आतं मले कोण सांभाळन.या दगडानंच माह्या बाचा जीव घेतला.हा दगडच मंदीरात बसला हाये.तो अरळलिंगेश्वर नाय.तो जर अरळलिंगेश्वर असता तं माह्या बापाचा जीव गेला नसता.अरे लिंगेश्वरा, माह्या बाप तुही किती सेवा करत होता रे.दररोज तुह्या आरतीले येत होता रे.पण तु त्याईची कदर केली नाय.तु जर देव असता तं माह्या बापाचा जीव गेला नसता.तु जर देव असता तं त्या दगडाची फुलं झाली असती.

कोण सांगन त्या दगडाच्या देवाले माह्या बापाचं मरण.या दगडानच अन्याय केला माह्या बापावर.हे असंख्य दगड......समाजात असे असंख्य दगड असतीन की ज्या दगडाईनं माह्या असंख्य पिढ्याईचा जीव घेतला असन.माह्या समाजातल्या कित्येक स्रियांचे कुंकूबी पुसले असन.म्हून मले या दगडाच्याच देवाले प्रश्न इचारले पाह्यजे.सांग म्हणावं हे लिंगेश्वरा,ह्या दगडानं माह्या बापाचा जीव का घेतला?आमी चांभार जातीत जनमाले आलो म्हून या दगडाईले आमचा एवळा मोठा राग......आमचा द्वेष करत करत आमचाच जीव घेतेत.आकाशाले गवसणी घालणा-या नारळाच्या झाडाच्या खाली बी एकांदी हरळी गुण्या गोविंदानं नांदते.पण या समाजात आमच्यासारख्या माणसालेबी निर्जीव दगडाची शिकार होवा लागते.देवा माह्ये बी प्रश्न हायेत.सुर्य लालच का?आकाश निळंच का?बदक पांढरंच का?गवत हिरवंच का?अन् हे दगडं बी शेंदूर लावल्यानच देवं का बनतेत?पण याचं उत्तर मले कधीच सापडलं नाय.अरळलिंगेश्वरा,दे नं याचं उत्तर.......मण मंग मले नाय देता येत उत्तर म्हून.तुनं मा बाचा जीव घेतला नं.तु खोटारडा हायेस.तरीपण मा बाप तुलेच पुजाले सांगून गेला.तुनंच जीव घेतला हे त्याले माईत होतं तरीबी.......कारण का देवा,तुनंच गुलाम केलं या धरणीवरच्या लोकाईले.तुह्याच आदेशानं हे दगडं मारतेत आमाले.पापीबी समजतेत.अान् आमाले आंगणात बी येवू देत नाय.अन् मा बाप तुहीच पूजा कराले सांगून गेला!मले तं आश्चर्य वाटते देवा का त्यानं मले असं का सांगतलं.तुही पूजा कराले लावून आमाले मराले लावते.हे बराबर हाय का."

आजुबाजूला गर्दी जमत चालली होती.कुजबूज सुरु झाली होती.'अरेरे दगडान बिचा-याचा जीव गेला'असे म्हणणारी सारी माणसं आपापसात कुजबूजत होती.त्यांनाही भीती वाटत होती की एखाद्याचा मंदीरासमोर असा बळी जाणं देवाला आवडेल का?अरळलिंगेश्वरानं जन्माला घातलेला जीव असा जाणं याचं पातक आपल्यालाच लागेल याचा जो तो उच्चवर्णिय विचार करीत होता.तसेच या प्रेताची विल्हेवाट ही लावण्याचा विचार समस्त गावकरी मंडळी करीत होती.जीवंतपणी नाही पण मेल्यावर तरी प्रेताला अग्नीपर्यंत नेण्याचं धाडस कोण करणार?हा अचिंतनीय प्रश्न होता.

मृत्यूची बातमी हा हा म्हणता म्हणता दलितवस्तीत पोहोचली.कुणीतरी सांगितलं.मंदीरप्रवेश करता करता नरसय्या मारला गेला.जबरदस्तीनं तो मंदीरप्रवेश करीत होता.

म्हून लोकांनी दगडांनी ठेवून त्याला ठार केलं.अन् प्रेताला जो ही हात लावेल त्यालाही दगडांनी ठेवून त्याला ठार केलं.अशी दुसरी बातमी आल्यावर दलित वस्ती संतापली.पण धाकाच्या मारे कोण आपला बळी देईल याचा विचार करुन एकही दलित वस्तीतील माणूस प्रेताकडे फिरकला नाही.नरसय्या आणि हरळ्या एकाच घरचे असल्याने दुसरे कोणीच आले नाही.त्या दलित वस्तीतील गोष्टी ऐकून ब्रम्हांडालाही लाजविल्यासारखे वाटत होते.मंडळी म्हणत होती.

"आपल्याले अस्पृश्यतेचा डाग.कोणं सांगतलं नरसय्याले मंदीरात जाले."किसनय्या.

"देवाले म्हून का त्याची दया आली."रामय्या.

"अरे तो उच्चवर्णियांचा देव होये.आपला नाय.पाय बरं नरसय्याले दगडानं ठेचून मारला.पण कोणी आलं का?देव तरी धावला का?"कचरय्या.

"बिचारा नरसय्या,दररोज जात होता मंदीरात.देवाले वाचा फुटन असं वाटत असन त्याले.अरे आपून पाप केलं हाये.घोर पाप.आपल्याले आतं उपाय नाय.आपून पाप केलं मांगच्या जनमात.म्हून आपल्याले ते भोगाच लागन.त्याची शिक्षा देवानं नरसय्याले देली."किसनय्या.

"अरे बाबा,बिचारा नरसय्या मेला.त्याची मैयत कराले चालत नाय का तुमी.बिचारा आपला बंधू......समाजबंधू"चैतय्या.

"अरे चैतय्या, तुह्यं बराबर हाय.पण मले सांग त्याच्या मैयतीले जावून आपून चारपाच जण मेलो तं आपून तं मरुन.पण आपली पोरंबारं कोण पोषन.याचा ईचार केला का तुनं."किसनय्या.

"हं तुह्य बी मणणं बराबर हाये."चैतय्या.

"तुमाले जाचं असन तं जा बाबा.मी नाय जात.कोण आपला जीव गहाण टाकन बाबा."

जो तो म्हणू लागला व आपली जबाबदारी चुकवू लागला.दलितवस्तीतील लोकांत शोककळा निर्माण झाली होती.लोक रडत होते.पण मयतीला कोणी फिरकलं नाही.ते पाहून लाश सडण्यापेक्षा संगभटानं गावक-याला म्हटलं,

"याच्या मरणाची बातमी दलितवस्तीत पाठोली का नाय."

"पाठोली मायराज."

"मंग सायंकाळ होत चालली हाय.सुर्य बी कलाले लागला.पण कोणताबी माणूस फिरकला नाय आतंपर्यंत.कावून बा.का भानगड हाय?"

"मंग मायराज, आतं कसं कराचं?मी फेकून येवू का या प्रेताले.खाईन जंगलात कोणीबी कुत्र बात्र."गावातील एक तरुण बोलला.

"कसे बोलता तुमी.अरे निदान प्रेताबद्दल असं बोलू नये."संगभट म्हणाला.

"मंग का कराचं मायराज?मायराज जास्त येळ होईन तं आपल्याले या मुदड्याची वास नाय का येईन."

"अरे,आपून या प्रेताची रितीरिवाजानं विल्हेवाट लावून."

"म्हंजे याले खांदा देवू.अग्नी देवू.अन् मंत्रानं न भजनानं याची प्रेतयात्रा काढू म्हंता."

"हो.अगदी तसंच करु."गावातील एक एक माणूस आपलं मत प्रदर्शित करीत होता.

"पण मायराज ईटाळ नाय होणार का?"

"अहो ईटाळ होते आपल्याले याईचा.याईच्या वागणुकीचा.याईच्या धंद्याचा.याईच्या खाण्याचा.पण मले सांगा हे प्रेत का धंदा करणार हाये याईचा.हे प्रेत का मांस खाणार आहे का हे प्रेत जगाले येणार हाये का इश्वात."

"तुमी मणता ते बी बराबर हाय मायराज."

"नरसय्या मेला.....पण तो दलितवस्तीत मेला का?नाय तो दलितवस्तीत मेला नाय.तो मेला आपल्याच वस्तीत.....आपल्या अरळलिंगेश्वरापाशी.अरळलिंगेश्वराच्या पायथ्याशी समाधिष्ट झाला तो.तो चुकून दलितवस्तीत जनमाले आला.खरं तं तो दरोज अरळलिंगेश्वराच्या आरतीच्या येळी येत होता मंदीरात.त्या दुरुनच तो पाहात होता.पूजा अन् दुरुनच आरतीचा लाभ घेत होता.त्यानं पयल्या जनमात काईतरी पाप केलं असन,म्हून त्याले देवानं दलित वस्तीत जनमाले घातला.त्यात त्याचा गुना नाय.तुमीच सांगा."

"नाय मायराज,तुमचं बराबर हाये."

"आतं बघता काय,कोणीतरी शिकोली बांधा.मडका आणा त्या संपत कुंभाराकळून.हारफुल आणा,बंडी आणा.आपून नरसय्याची प्रेतयात्रा चांगली जंगी काळू.लवकर करा समदं.नायतं रात व्हायची.प्रेतयात्रा चांगली दिंड्या भजनानं काळू.आन् घरी येवून चांगली आंघोळ करु,समजलं.गोमुत्र टाकू पुर्ण गावात.त्या गोमुत्रानं पुर्ण गावाची शुद्धी होते."

म्हणायचा अवकाश कोणी हार आणले,कोणी मडका आणला,कोणं तर शरणासाठी लाकडं गोळा केली.कोणी बैलगाडीही आणली.तर कोणी बाजार आणला.पण नरसय्याच्या मैयतीला संगभटाला न माहीत करता कोणत्याही दलिताला भटकू दिले नाही.

मडक्यामध्ये अग्नी भरला गेला.तो दुरूनच हरळ्याच्या हातात दिला.तसं संगभटाचं लक्ष हरळ्याकडे गेलं.त्याला मडकं दुरुनच देतांना कोणीतरी दिसलं.तसा तो म्हणाला,

"अरे असं का वागता?तो हरळ्या लान हाये.लान पोरं देवाघरची फुलं होतेत.ते देवाले जास्त पसंत रायतेत.काय नाय होत त्याले हात लागला तं."

"ठीक हाय मायराज,तुमी जसे मनान तसे.आमाले का माईत धरमाचे नियम.पण धरमात दुरुस्तीची सोय हाये न.नायतं देवच आपल्याले शिक्षा देवाचा."कोणीतरी म्हणालं.

"ते मी पाईन.आतं फक्त मी जे मणतो,तेवळं करा.बस बाकी काई नोको करा."

हरळ्याले विचार येत होता त्या संगभटाच्या बोलण्याचा.जर लहान मुलं देवाला पसंत असतात तर या हरळ्याला मंदीरात पाहून त्याच्या बा ला या लोकांनी मारलं कशाला?असं त्याला वाटत होतं.

आक्ता हरळ्याले पकडाले लावली होती.कोणीतरी आक्तेचं मडकं हरळ्याच्या हाती आणून दिलं होतं.नरसय्याच्या पुढून शरणाची बंडीही कोणी उच्चवर्णिय हाकलत होता.चार धडधाकट तरुणांनी तिरडीला खांदाही दिला होता.पाठीमागून एकजण लाह्या फेकत होता.त्याच्या पाठीमागं दिंड्या भजनं करीत लोकं चालले होते.दिंडी अन् भजनानं प्रेतयात्रा त्याच दलित वस्तीतून चालली होती.संपुर्ण दलित वस्ती रडत जरी असली तरी ते अश्रु कोणाला दाखवले जावू शकत नव्हते.कारण जर कोणाला ते अश्रु दाखवले तर आपलाही जीव जाईन ही भीती मनात होती त्या दलितांच्या.तसा किसनय्या रामय्याला म्हणाला,

"भाऊ,आपला स्पर्श याईले बरा वाटत नाय.अन् या नरसय्याच्या तिरडीले याईनच तं खांदा देला.हे आश्चर्यांची गोष्ट नाय का?"

"अन् जीवंतपणी हात लावाले जमत नाय.अन् मेल्यावर तिरडीले खांदा बी द्याले जमते."

"जावू दे फक्त तिरडीकडे पाय अन् हात जोड म्हणावं का नरसय्याले सद् गती मिळू दे."चैतय्या बोलला.

"येवू दे रे नरसय्या,या लोकाईलेबी सद् बुद्धी येवू दे.रामय्या म्हणाला.

प्रेतयात्रा स्मशानात पोहोचली.शरण रचलं गेलं.त्या शरणाला शांत करण्यासाठी संगभटानं शांतीमंत्र म्हटला.नव्हे तर तिरडीला शांत करण्यासाठी त्यावर गोमुत्रही शिंपडलं.तशातच त्या तिरडीवरील ते प्रेत शरणावर ठेवलं गेलं.शरण रचलं गेलं.त्यानंतर हरळ्याकरवी त्या प्रेताला अग्नी द्यायला बाध्य केलं गेलं.हरळ्याची टक्कल करुन त्या प्रेताची रक्षाही नदीत शिरवली गेली.हरळ्याला वर्गणी करुन अख्ख्या गावानं नवीन कपडेही घेवून दिले.त्यानंतर त्याला त्याचे घरी व्यवस्थीत नेवून सोडले गेले.

नरसय्याच्या मैयतीनंतर संपूर्ण गावात गोमुत्र शिंपडलं गेलं.एक पारायणही लिंगेश्वराच्या मंदीरात केलं गेलं.गाव त्यामुळे शुद्ध झालं असा गावक-यांचा समज झाला होता.त्याच विश्वासानं ते चूप बसले होते.

हरळ्या एक दिवस घराच्या अंगणात बसला होता.समोर त्याने पाहिलेल्या अरळलिंगेश्वराची स्थापना केली होती.गावातील मंदीरात जावून विनाकारण आपल्या जीवाचा बळी देण्यापेक्षा घरीच लिंगेश्वराची पूजा करण्याचा निर्णय त्याने घेतला होता.घटना झालेल्या दिवसापासून तासन् तास याच लिंगेश्वराच्या देवासमोर बसून हरळ्या विचार करीत असे.आजही तो बसला असतांना त्याचे मनात सहज विचार आला.'आपला बा नरसय्या मेला.पण त्याच्या मैयतीलेही आपले आप्त आले नाय.अन् आपल्या बाची मैयत त्या उच्चवर्णियाईले करा लागली.'याची खंत आजही हरळ्याच्या मनात होती.आपल्याला स्पर्श करायला जे लोक मागे हटतात जीवंतपणी.......अन् मेल्यावर देव समजतात.म्हणतात हरळ्या लहान आहे.लहान मुले देवाची लेकरं असतात.लहान मुले देवाघरची फुले.तर मेलेला माणूस देव होतो असं मानतात.गाईच्या मुतानं गाव धुणाारी ही माणसं.यांना माणसाचा स्पर्श चालत नाही.माणसाची का वास येते यांना.तरीही जीवंत माणूस चालत नाही.अन् ज्या मुतात शेकडो जंतू राहात असतील ते मुत चालते यांना.ज्या शेणात धनुर्वात तसेच तत्सम रोगाचे जंतू असतात.ते शेण चालते यांना.मग माणसाची विष्ठा काय अन् गाईची विष्ठा काय.विष्ठा ती विष्ठाच तरीही त्या गाईच्या विष्ठेची गोधन म्हणून पूजा होते.मंग माणसाला माणूस का समजत नाहीत ही मंडळी.माणसाचा स्पर्शही चालत नाही.एकीकडे विष्ठा चालत असतांना दुसरीकडे स्पर्श न चालणे ही हास्यास्पद गोष्ट आहे.हा कुठला न्याय आहे हे कळत नाही.हे लिंगेश्वरा,माझ्या बापानं तुझीच पूजा करायला का बरं लावली असेल.तु मला चांगला असा दृष्टांत दे.मा बापाच्या,या नरसय्याच्या मैयतीले अख्खा गाव दिंड्या भजनानं आला.अन् माझे आप्त मात्र तिकडे भटकलेही नाही.मग जवळचे कोण?आप्त की ते......सांग लिंगेश्वरा.यांची कोणती मजबूरी होती की ते येवू शकले नाहीत.कदाचित नरसय्या मेल्याची बातमी तर यांना समजली नसावी!कदाचित आपण मैयतीला गेल्यास आपली आगामी पिढी या मंदीकप्रवेशाच्या बुचकळ्यात पडेल असे तर माझ्या आप्तांना वाटले नसेल.

हरळ्याच्या मनातील विचार रास्त होते.आजुबाजूची नातेवाईक मंडळी जास्त बोलत नव्हती.त्याला एकटेपणा जाणवत होता.यात काही अंशी बदलाव यावा.असं त्याला वाटत होतं.

त्यांचं आज सुरपूर गावात मन रमत नव्हतं.समाजात चार वर्ग होते.ब्राम्हण, क्षत्रीय,वैश्य,शुद्र.त्यापैकी शुद्रातही दोन वर्ग होते.शुद्र व अतिशुद्र.ब्राम्हण पूजाविधी करीत.क्षत्रीय समाजरक्षण,वैश्य व्यापार व शुद्र सेवा करीत असत.पण ब्राम्हण जर सोडले तर बाकी सर्वच जातींना शुद्रच समजून त्यांच्याकडे सेवेचे कार्य होते.त्यांनी लोकांची सेवा करता करता ब्राम्हणांचीही सेवा करावी असा दंडक होता.दलितांना मात्र अतिशुद्र समजण्यात येई.दलितांना अतिशुद्र मानून गावकुसाबाहेर ठेवण्याची परंपरा होती.त्यांचे पाणवठे,त्यांच्या विहिरी वेगवेगळ्या राहायच्या.त्यांना मंदीरप्रवेश नव्हता.त्यांना देवाचे दर्शनही नव्हते.देवाचे दर्शन घ्यायचेच झाले तर मंदीराच्या दरवाज्याच्याबाहेर काही अंतर दूर उभे राहून घ्यावे लागायचे.मंदीरावर उच्च वर्णियांची मालकी होती.काही काम पडल्यास घरी आल्यावर दुरुनच उभे राहून बोलण्याची प्रथा रुढ झाली होती.त्यालाच विटाळ नाव होतं.दलितांनाच अस्पृश्य समजून त्यांना आपली मेलेली जनावरे ओढून नेण्याचे काम स्वतः उच्चवर्णिय सांगत असत.आणि त्यांनी ते काम करावं यासाठी त्यांना मजबूर केलं नाही.त्या मेलेल्या जनावरांचे चामडे काढून त्या चामड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवून त्या वस्तू उच्चवर्णियांना देत.त्या बदल्यात त्यांना वर्षभराला पुरेल एवढे धान्य मिळत असे.कधी सणांच्या दिवशी सण शिजविलाच तर दुस-या दिवशी गाई ढोरांना सणाचे पदार्थ टाकण्यापेक्षा याच दलितांना ते खायला दिले जाई.त्यासाठी ही दलित मंडळी डोक्यावर मोठं टोपलं घेवून उच्चवर्णियांच्या दारोदारी फिरत असे.मग ही मंडळी आपल्या घरची मेलेली जनावरे ओढतात.आपल्याला चामड्याच्या वस्तू देतात म्हणून म्हणून त्यांच्या घरी शिजलेल्या करंज्या,लाडू,पापडं,पात्या अर्थात शिजलेलं सणाचे पदार्थ उच्चवर्णिय या लोकांना देत.तसेच वात्रट बोलणेही देत असत.जसा उच्चवर्णियांना स्पर्श वज्र होता,तसा ब्राम्हणांनाही होता.रस्त्याने जातांना मात्र थुंकण्यास मनाई नव्हती.

दलितांना पाणी जर पाजायचे झाले तर त्यांचे पातेले वेगळेच होते.एखाद्या घरुन जोडे किंवा चपला विकत घेतल्यास त्या चप्पल किंवा जोड्यावर आधी गोमुत्र शिंपले जाई व मगच ते पादत्राण पायात घातले जाई.

स्रियांची स्थिती यापरस वेगळी होती.दलित स्रियांवर एखाद्या उच्चवर्णिय माणसाने अत्याचार केल्यास तो त्याचा हक्क समजला जाई.किंवा तिलाच ठार केले जात असे.पण एखाद्या जर दलिताने उच्चवर्णिय स्रियांवर अत्याचार केल्यास मात्र त्याला क्षती पोहोचविण्यात येत असे.यात तिची चूक असल्यास तिला मात्र कोणतीच शिक्षा होत नसे.माफ केले जाई.दलित स्रीची जर चूक असेल तर अशा स्रीला राज्याचे हवाली केले जाई.तिथे राजाची मर्जी चालायची.राजा तिला ठार करण्याऐवजी तिला जनानखाण्यात ठेवत असे. या जनानखाण्याचा उपभोग राजासह त्याचे उत्तराधिकारी व मंत्रीगण घेत असत.अशा जनानखाण्यातील स्रीला बोलण्याचा वा आपले मत प्रदर्शित करण्याचा अधिकार नव्हता.तसेच आपल्या अत्याचाराबद्दल न्याय मागण्याचाही अधिकार नव्हता.राज्याची सैनिक व्यवस्था चोख राहावी यासाठी हे जनानखाने उपयोगात यायचे.

प्रत्येक राज्यात जनानखाने असायचे.हे जनानखाने म्हणजे त्यावेळचे वेश्यालय होतं.त्यावेळी परकीय राज्यांसोबत लढाया होत.राज्याची झालेली मनुष्यहानी भरुन काढण्याचे कार्य जनानखाने करीत.कारण ज्या लढाया होत,त्या लढाईत हे सैनिक वीरगतीस प्राप्त होत.त्यामुळे अर्थातच सैनिकांची कमतरता भासायची.ही कमतरता जनानखान्यातून पुर्ण व्हायची.जनानखाण्यात असलेल्या स्रियांवर अक्षरशः बलत्कार करुन त्यांना गर्भार केलं जात असे.त्यांना जर मुलगा झालाच तर तो सैनिक म्हणून कामात येई आणि मुलगी जर झाली तर राण्यांची सेवा किंवा राज्याची सेवा करण्याच्या कामी येई.

त्यांच्यापासून होणा-या संततीचं नाव ही ठेवलं जाई.त्यांना कोणी काही नाव ठेवू नये म्हणून त्या मुलांना राजा दत्तक घेई.त्यांना दासीपुत्र म्हणून राजा उपाधी देत असे.

काही काही अत्याचार हे सहन करण्याच्या पलिकडचे होते.अशा अत्याचार ग्रस्त स्रिया आत्महत्या करीत असत.मात्र त्यांना झालेली मुलं मात्र राजा स्विकारत असे व आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करीत असे.

या दलित स्रीयांच्या शरीराचा उपभोग घेतांना राजा किंवा त्याच्या अधिकारी वर्गाला विटाळ होत नव्हता.जनानखाण्यात दलितच नाही तर पराभूत झालेल्या राज्यातील सैनिकांच्या पत्नीही असायच्या.त्यांचाही वापर मुलं पैदा करण्यासाठीच केला जाई.

स्रियांना सेवेव्यतिरीक्त शिकण्याचा अधिकार नव्हता.बहुपत्नीत्व व बालविवाह प्रथा रुढ असल्याने पुरुषांना स्रियांचा उपभोग राजरोषपणे घेता येत असे.नव्हे तर वेश्याव्यवसाय राजरोषपणे चालत असे.अनौरस संततीला कायद्याने मान्यता होती.स्रियांचे वरीष्ठांना बोलणे म्हणजे अपमान समजला जाई.स्रियांना पायात चपला घालायलाही बंदी होती.प्रजेकडून जबरन कर वसूल केला जाई.अस्पृश्यांना मात्र कर माफ होता.समाजाचे काही नियम ठरलेले होते.जो कोणी नियमांच्या विरोधात गेलाच तर त्याला जाताबाहेर काढले जाई.हरळ्याने मंदीरप्रवेश केल्यामुळे त्याला समाजातील लोकांनी जातीबाहेर काढले होते.



एकाकीपणामुळे त्याचे मन गावात रमत नव्हते.त्याचे वडील ज्यांच्याकडे काम करीत असत,त्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळत असे.माहीत नसतांनाही वडीलांच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे पादत्राणे बनविण्याचा धंदा हरळ्या करु लागला.एक दया म्हणून लोकं हरळ्याची पादत्राणे घेत असत.अशाच अनुभवातून हरळ्याची पादत्राने कलाकुसर पादत्राणे कलाकुसर पद्धतीने तयार होवू लागले.आज त्यांच्यात कौशल्य निर्माण झाले होते.एकटेपणामुळे लवकरच लवकरच त्यानं आपला विवाह कल्याणी नावाच्या मुलींशी केला होता.लहानाचा हरळ्या संसार सांभाळता सांभाळता मोठा होवू लागला.कल्याणीपासून त्याला एक मुलगा झाला.त्याचं नाव शिलवंत ठेवण्यात आलं.


बसवेश्वराने याच काळात जन्म घेतला होता.आपल्या लहानपणापासूनच बसवेश्वराने दलित आणि स्रियांवरील अत्याचार अगदी जवळून पाहिले होते.जन्माच्या वेळीच या बसवेश्वराने मुंज नाकारुन प्रथेला सुरुंग लावला होता.त्याचे शल्य बसवेश्वराच्या मातापित्यांना होतं.त्याला वेदविद्या यावी,तो वेदविद्येत पारंगत व्हावा म्हणून त्याला एका ब्राम्हणाकडे विद्यार्जनासाठी ठेवण्यात आले होते.पण बसवा तेथे दलितांबद्दलचे उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने त्याचेशी तेथील ब्राम्हण वर्ग दुजाभावाने वागत असे.तसेच मत्सरभावानेही वागत होता.त्यामुळे बागेवाडीत जन्म घेवून लहानाचे मोठे होतांना त्याचे मन रमत नसल्याने त्याने बागेवाडी सोडण्याचा निर्णय घेतला.त्यांनी कुंडलसंगम गावी स्थलांतर केले.जातेवेळी त्याने रस्त्यात पडलेल्या गावाचे निरीक्षण केले.

कृष्णा व मलप्रभेच्या छायेत बसवअण्णा व त्याची बहिण अक्क नागम्मा लिंगायत धर्माच्या साक्षात्काराचे धडे घेत होते.ते शिवाला जास्त पुजत होते.त्यांना मातृपितृप्रेमाचा विसर पडला होता.दोघेही प्रातःकाळी उठायचे.प्रातःविधी आटोपून ग्रंथचिंतनात कुलगूरुंचे दर्शन घेवून त्यात दंग होवून जायचे.त्याच ठिकाणी वैदिक ग्रंथ,उपनिषद,पुराण वाचून त्यावर चिंतन मंथन करुन त्या ग्रंथवाचनातून समाजाची सेवा करण्याची प्रेरणा बसवेश्वराला मिळाली.

कृष्णेत स्नानादी आटोपून बसवेश्वर बिल्वपत्र व फुले संगमनाथाच्या समाधीवर वाहात व नंतर शिवध्यानास बसत.सायंकाळी ते गुरुबंधूसोबत ब-याच विषयावर चर्चाही करीत.एकदा ते आश्रमातील मित्रांसोबत यलम्मा देवीच्या दर्शनाला निघाले.तिथे सा-या देवगासीचा बाजार भरला होता.त्यांच्याजवळ त्यांच्या पोटच्या मुलीही होत्या.त्याच ठिकाणी अर्धनग्न अवस्थेतल्या मुली विकणारे मायबाप बसवाने पाहिले.या मुली कमरेला कडूनिंबाच्या डहाण्या व तोंडात लिंबडहाळी धरुन आपल्या देहाचं प्रदर्शन करतांनाही बसवानं पाहिलं.त्याच्या मनात त्या विचित्र प्रसंगाने खोल दरी निर्माण केली.त्यानंतर देवीच्या नावानं कोंबड्या बक-याचा बळीही देतांना बसवानं पाहिलं.त्यामुळं ही सर्व अंधश्रद्धा असून दया हे धर्माचे मुळ नाहीच,हा रास्त विचार बसवाच्या मनात अगदी लहानपणापासूनच रुजला.

गुरु जातीवेदाने बसवांना शिवतत्व लय पावल्यावर पुन्हा शिवतत्व जन्माला येतं हा विचार शिकवला होता..net त्यामुळे बसवाने पुर्ण लक्ष शिवभगवानावर केंद्रीत केले होते.पुढे तेच तत्व बसवाच्या विरशैव धर्मकार्याचे उगमस्थान बनले होते.तेहत्तीस कोटी देव असतील तरी विश्व एक असल्याने देवही एकच असा उपदेश जातीवेदाने बसवाला शिकविल्याने त्याचा पुढील काळात अंधश्रद्धेवर विश्वास उरला नाही.देवाच्या नावाने कोंबडे बकरे काढून पैशाची लुट करणारे पंडीत बसवाने पाहिले.त्यामुळे देवालयावर बसवाचा विश्वास उरलाच नाही. खरे दर्शन देवालयात नाही,तर आपल्या तळहाताचे जरी दर्शन घेतले तरी देव आपल्यावर प्रसन्न होतो हा चमत्कारी विचार बसवाला समजला व तोच विचार बसवाने समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला.तद् नंतरच्या काळात मंदीरातील पुरोहिताच्या शोषणापासून समाजाला मुक्त करण्याचा निश्चय बसवाने केला.देव देवळात नसून आत्म्यात आहे.असे त्याने सांगितले.इष्टलिंगाला गळ्यात बांधल्यावर व ते ह्रृद्यावर धारण केल्यावर मानवी शरीरच देवालय बनते.त्यामुळे देव आणि माणूस यामध्ये पुरोहीत हा दलाल नसावा असा विचार बसवेश्वराच्या रुपाने समाजाच पसरु लागला.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याच्या बहिणीचा नागम्माचा विवाह शिवदेव नामक व्यक्तीशी झाला.बसवाचे मामा बलदेव हे ब्रिज्वल दरबारी मंत्री होते.जातीवेदाच्या म्हणण्यावरुन त्यांनी आपली मुलगी गांगाबिका बसवाला देवून त्यांच्या प्रस्तावाचे स्वागतच केले.आपल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर जावयाच्या नोकरीची चिंता बलदेवाला होती.त्यामुळे मंगळवेढ्याला ब्रिज्वल दरबारी बसवेश्वराला बलदेवाने कर्णिकाची नोकरी लावून दिली.या पदावर असतांना कामाची चिकाटी,प्रामाणिकपणा व कार्यनिष्ठा राजाला उचित वाटली.गणित विषय चांगला असल्याने हिशोबातील चूक शोधून बसवाने भरपूर संपत्ती वाचवली.त्यामुळे खुश होवून मंत्री सिद्धण्णाने बसवाची कोषागार पदी नियुक्ती केली.कोषागार पदी नियुक्ती झाल्यानंतप राज्याचा खजिना बसवाने वाढवला.मंगळवेढ्यातील राजमहालाची दुरुस्ती करतांना एक ताम्रपट दिसला.त्या ताम्रपटात कलचूरी राज्यात सिंहासनाच्या खाली भरपूर खजिना आहे हे लिहिलेले होते.ते बसवेश्वराने राजा ब्रिज्वलाला सांगितले.त्यामुळे ते ब्रिज्वलाने खोदकाम करुन मिळवताच ब्रिज्वल बसवेश्वरावर खुप खुश झाले.

महात्मा बसवेश्वर दलितांचे व गरीबांचे मसीहा होते.ते त्यांची सेवा करीत.त्यांच्यासाठी कामही करीत.त्यांच्या सेवेसाठी आपली संपत्ती खर्च करण्याचे व्रत बसवाने घेतले होते.सिद्धम्मा राजाचा मंत्री होता.त्याच्या पत्नीने ब्रिज्वल लहान असतांना आपल्या स्तनातून दूध पाजले होते.म्हणून सिद्धमाच्या मृत्यूनंतर ही निलांबिका उर्फ नीललोचना राजदरबारात भगीनी म्हणून वावरत होती.ब्रिज्वल राजाला तिच्या विवाहाची चिंता होती.त्यांनीच बसवेश्वरापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला.बसवेश्वराने गांगाबिकेला विचारुन निलांबिकेशी विवाह केला.कारण त्या काळात बहुपत्नीत्व ही प्रथा रुढ होती.त्यानंतर बसवअण्णाची नियुक्ती राजाने प्रधानमंत्री पदावर केली.

बसवअण्णा पाठोपाठ हरळ्याही मोठा झाला होता.त्याने बसवाचे नाव ऐकले होते.वाळीत पडलेला हरळ्या जातीच्या त्रासाने अगदी वैतागला होता.शेवटी बसवाने जसे बागेवाडी सोडले होते.तसे हरळ्यानेही सुरपूर गाव सोडायचे ठरवले.त्यांनी सुरपूर गाव सोडलं व कल्याणी आणि शिलवंतासह कल्याणला येण्यासाठी निघाला.

एकदा हरळ्याला बसवप्रचारक लिंगप्पा भेटला.त्याने हरळ्याची कहानी ऐकली व त्याला कल्याणला जाण्याचे सुचविले.त्याच्याच सुचनेवरुन हरळ्या पायी पायी कल्याणला जाण्यासाठी निघाला.लिंगप्पाने कल्याणला पोहोचल्यावर सिद्धम्माची भेट आधी घ्यायचे सुचविल्याने हरळ्याने कल्याणला पोहोचताच सिद्धम्माची भेट घेतली.त्या सिद्धम्माने हरळ्याला मदतच केली.हरळ्या कल्याणला स्थायीक झाल्यावर नगराबाहेर तो आपली एक कुटी बांधून राहू लागला.चन्नबसवण्णाकडून हरळ्याने इष्टलिंगाची दीक्षा घेतली.त्यानंतर संपूर्ण कुटूंब गांगाबिकेच्या प्रौढ साक्षरता केंद्रात शिक्षण घेवू लागले.

बसवेश्वराने सर्व लोकांसाठी अनुभव मंटप स्थापन केला होता.त्या ठिकाणी सर्व जातीधर्माच्या लोेकांना विचारविनिमय करता येत असे.बसवाचे एकेश्वरवादी विचार आकार घेत असल्याने बसवाची दैवी शक्ती या ठिकाणी आकार घेत होती.हा हा म्हणता या अनुभव मंटपात काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत तसेच अफगानिस्तान पर्यंतचेही लोकं सामील झाले होते.कशासाठी तर सामंजस्याचे मुक्त जीवन जगण्यासाठी.यात राजे महाराजे संत धर्मवंत प्रज्ञावंत भक्तीवंत वेदनावंत इत्यादी सदस्य होते.दलित अन् आदिवासी ही होते.त्यांची सदस्यसंख्या सातशे सत्तर होती.त्यात सत्तर स्रियाही होत्या.हा अनुभवमंटप लोकशाही तत्वावर आधारीत असून स्वातंत्र,समता,बंधुतेचा पुरस्कार करणारे होता.या अनुभव मंटपात विविध व्यवस्था करणारे सदस्य होते.इष्टलिंग दीक्षेने जात तर केव्हाचीच नष्ट केली होती बसवेश्वरांनी.एवढेच नाही तर पुरुषांएवढेच मानाचे स्थान या अनुभव मंटपात स्रियांनाही देण्यात येई.त्यामुळे महिलानीही सभेत बोलण्यापर्यंतची मजल मारली होती.

या अनुभव मंटपाचे अध्यक्ष पद आपल्या स्वतःकडे न ठेवता बसवाने आपले भाचे चन्नबसवेश्वराला दिले होते.त्यानंतर शून्य सिंहासनाचे अध्यक्षपद अल्लमप्रभू उर्फ प्रभूदेवाला दिले गेले होते.या अनुभव मंटपातील सर्व सदस्य पुरुषांना शिवशरण व स्रियांना शिवशरणी संबोधिल्या जाई.बसवेश्वराचा भिक्षावृत्तीला विरोध असल्याने दिवसभर राबून स्वतःच्या मिळविलेल्या धनावर ते जगत.सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी या धर्मकेंद्रात सगळी मंडळी एकत्र येवून विचारांची देवाणघेवाण करीत.ते विचार लिहून त्याचे जतन करण्याची जबाबदारी शांतीरस नावाच्या विद्वान ग्रंथपालाकडे दिली होती.ते विचार तो ताडपत्रावर लिहून ठेवीत असे.

जंगलातील निर्धन रस्ता होता.त्या रस्त्यानं कुणीही भटकत नसत.मुख्यतः त्या रस्त्याने दरोडेखोर राहतात असा संभ्रम होता.मृत्यूचं भय नसलेली दलित माणसंच तेवढी या रस्त्याने जाता दरोडेखोराच्या टोळीतील सदस्य याच दलित वस्तीतील असत.अत्याचार झालेली निरपराध माणसं लपण्याच्या जागा भरपूर असल्याने या भागात दरोडेखोराचा मार्ग प्रशस्त झाला होता.एखादेवेळी दलिताची मुले या रस्त्यानेच जंगलात जात.जंगलातील राळ,डींक,मध,लाख,मौलवान वस्तू लाकडे तयार मोहफुल वेचण्यासाठी जंगलात ती मंडळी जात नसत.मोहाच्या मोहफुलाची राब बनवून सायंकाळच्या जेवणात रंगत वाढवली जात होती.सायंकाळी दलित वस्तीतील मुले आट्यापाट्या सारखे खेळ खेळत.सकाळी माधुकरी मागून पोट भरण्यापेक्षा जंगलात जावून झाडावरची फळं खाण्यात ही दलित मंडळी पटाईत होती.

सायंकाळी दलित माणसे मोहाची दारु पिवून पिवून झिंगत पडलेली असायची.दलितांच्या स्रियाही दारु पिवून दिवसाची रात्र साजरी करीत होती.अशाच या निर्धन रस्त्यावरुन जंगलात जावून गोव-या वेचण्याचेही काम दलित स्रिया करीत.कधीकधी ही मंडळी हिंस्र वाघाचेही शिकार होत.अशाच या निर्धन रस्त्याने कचर-याची मुलगी गोव-या वेचण्यानिमित्यानं आली होती.दलितांची मोठी माणसं चामडे पकवून त्याच्या विविध वस्तू दिवसभर बनविण्यात मग्न असायचे.स्रिया सकाळी स्वयंपाक बनवून त्याही चपला बनविण्यासाठी घरधन्यांना मदत करायच्या.तर उरलेली लहान मुले स्वयंपाकासाठी सरपण गोळा करण्यात आपला दिवस घालवायचे.

गुलाबी नावाप्रमाणेच पाहायला सुंदर होती.तिच्या अधरावर स्मित हास्य होतं.तिची कमर पतली होती.तिची कांती सतेज होती.हाताच्या दोन्ही भागाला बागडीसारख्या वेली होत्या.कपाळावर टिकली चमचम करीत होती.केस विखुरलेले होते.केसीच्या वर वेलीची चुंबळ होती.बटा बांधलेल्या होत्या.त्या चुंबळीच्या वर एक टोपले होते.बहुतःश ते डोक्यावरचं टोपलं स्थिर होतं.दोन्ही हात सोडून चालतांनाही ते टोपलं जराही हालत नव्हतं वा पडतही नव्हतं.

तेरा वर्षाची गुलाबी नावाप्रमाणेच गोरीगोमटी होती.गोव-या वेचता वेचता पाठीमागून येणा-या एका सुंदर पुरुषांचा तिला धक्का लागला.तशी ती जोरानं ओरडली,

"कोण हाये?"

दलितांनी रस्त्यानं चालतांना किंचाळत चालावं असा नियम असल्यानं गुलाबीचा कोणाला धक्का लागणे म्हणजे किंचाळणे आलेच.तशी दलित प्रौढ मंडळी आपल्या मुलाबाळांना सवर्ण व दलित कोण?आपण कसं वागायचं समाजात.याची शिकवण देत.कारण लहान मुलांचाही त्या उच्चवर्णियांना स्पर्श चालत नव्हता.एवढेच नाही तर वागण्याचेही नियम सांगत असत.त्यामुळे ही बाळबोध विचाराची मंडळी लहानपणापासूनच भेदभावाच्या दरीतून अन्याय सहन करीत करीत लहानाची मोठी होत.जेव्हापर्यंत अंगात उर्मी असे.तेव्हापर्यंत या भेदभावाचा ते विरोध करीत.त्यासाठी जातीभेद मोडण्यासाठीही प्रयत्न होत.पण जेव्ही त्यांच्या रक्ताच्या प्रयत्नांना यश यायचं नाही.त्यांचे विचार दडपले जायचे,तेव्हा मात्र वडीलधारी मंडळी आपल्याही मुलांना तो इतिहास सुरु ठेवून तसे त्यांनी करु नये.म्हणून गुपचूप त्यांना अत्याचार सहन करण्याचे धडे देत.हरळ्याने मंदीरप्रवेश केल्यावर हरळ्याचा कसा जीव गेला.तसेच नरसय्याच्या तिरडीलाही दलितांनी खांदा का दिला नाही.इत्यादी गोष्टी हीच दलित मंडळी आपल्या मुलांना शिकवीत.तसेच आपण या हरळ्याच्या उज्बेकिस्तान तर ही प्रेरणा घ्यायला पाहिजे की कधीही उच्चवर्णियांच्या वाटेला जावू नये. कधीही आपण बंड करु नये हीच गोष्ट प्रत्येक दलित आपल्या पोराला शिकवीत असे.पण या विटाळाबद्दल वा अत्याचाराबद्दल कोणीही बोलत नव्हता.हीच प्रेरणा आणि हाच इतिहास आज सुरपूर गावातून इतर गावोगावी घुमत घुमत आता कल्याणलाही येवून पोहोचला होता.

मंगळवेढ्यातून राजा ब्रिज्वल कल्याणला येवून पोहोचला होता.त्याने बळजबरीने कल्याणचे राज्य जिंकले होते.बसवण्णा आता मंगळवेढ्याला कोषागार पदावर होते.राजा ब्रिज्वलाने सिद्धम्माची मुलगी निलांबिका त्याला देवून आपला जावई बनवले होते.तशी ती राजदरबारातील कन्या म्हणून चर्चित होती.त्यामुळे राजा ब्रिज्वलाने कोषागार सांभाळणा-या बसवाला मंगळवेढ्यातून कल्याणला बोलावून घेतले.तसेच त्याची प्रधानमंत्री पदावर वर्णी ही लावली.प्रधानमंत्री झाल्यावर बसवेश्वराने समाजाच्या सेवेचे खुप मोठे कार्य केले.

रानावनात एकटे फिरत असतांना तरुण स्रियांना फार भीती वाटत असे.उच्चवर्णियांच्या स्रिया बहुतःश घरातच राहात.चूल आणि मुल सांभाळण्यातच त्यांचा दिवस जात असे.तर उपवर तरुणी आईच्या कामात नेहमी मदत करीत.त्यांना बाहेर फिरायची परवानगी जरी नसली तरी लपून चोरुन त्या बाहेर पडत.मात्र दलितांना बाहेर पडण्या खेरीज पर्याय नसल्याने गुलाबी घराच्या बाहेर पडली होती.गुलाबीचे मायबाप कामाच्या विळख्यापुढे नतमस्तक झाले होते.त्यामुळे गोव-या वेचून का होईना पण संसाराला मदत करण्याचे कार्य ती करीत होती.मात्र आज वेळी अवेळी तिला धक्का एका तरुण पुरुषाचा लागताच ती दचकली व किंचाळली.

तिची नजर त्या तरुणाच्या नजरेवर पडली.त्याही तरुणाची नजर तिच्या नजरेस भिडली.त्यांच्या नजरेत एकमेकांबद्दल कुतूहल निर्माण झालं.तसं त्या काळात कोणालाही प्रेम करण्याचा अधिकार नव्हता.प्रेम करुन विवाह केल्यास नाक कटले असा शब्दप्रयोग अस्तित्वात होता.ज्याने प्रेम केले,त्यास सुळावर चढविण्याची प्रथा रुढ होती.त्यामुळे हा न्याय राजाकडे जावू न देता व बदनामीचा डाग कुटूंबाला लागू नये म्हणून मायबाप स्वतः निर्णय घेवून प्रेम करणा-या उपवर तरुण तरुणींना घरच्या घरीच ठार करुन टाकत असत.हे माहित असल्याने कोणताही तरुण वा तरुणी प्रेम करायला पुढे जात नसे.

गुलाबीची नजर त्या तरुणाच्या चेह-यातील खोबणीतील दोन बुबूळात शिरली.तशी त्याची रोमांचक नजर गुलाबीच्या डोळ्यातील बुबूळांना छेदून तिच्या ह्रृदयातील कंगो-यापर्यंत येवून गेली.पुढचा प्रवास करण्यापुर्वीच ती घाबरली.तसा तो तरुणही घाबरला.गुलाबी लाजली व माफ करा म्हणत बाजूला झाली.तसा तो तरुण म्हणाला,

"कोण तु आन् इतं का करते?"

"मी.....मी गुलाबी......गुलाबी हाय मी."

"गुलाबी!कोण गुलाबी?अन् इतं कायले आलीस?"

"मी गुलाबी........मी गोव-या येचत हाये."

"गोव-या!का येचतेस गोव-या?"

"आमच्या घरी सयपाकाले लागतेत गोव-या."

"पण तु पोरगी कोणाची होयेस."

त्या काळी आडनाव जरी असले तरी ते सांगण्याची प्रथा नसल्याने नाव व नावासमोर जात लावण्याची प्रथा रुढ होती.पण तो तरुण जर उच्चवर्णिय असल्याममुळे त्याला माहीत होवू नये म्हणून गुलाबी जात सांगायला लाजत होती.तशी ती म्हणाली,

"आधी तुमी कोण ते सांगा.मंग मी सांगीन माह्या बापाचं नाव."

"मी ज्ञानभट."

त्यानं सुटकेचा श्वास सोडला.तशी ती म्हणाली,

"ज्ञानभट!ज्ञानभट को ण?"

"ज्ञानभट.....मी ज्ञानी हाये.पण मा बाप मले मुर्ख म्हणून चिडवते.गुलाबे,मी खरंच मुर्ख वाटतो का तुले."

"मुर्ख नाय तं का?मी इचारलं जवा तुमी कोण तवा तुमी ज्ञानी म्हून सांगता."

"मी संगभटाचा पोरगा हाये.ज्ञानभट......ज्ञानभट.भटजी हाये मी."

"भटजी......!बापरे!मेलोच मी."तशी ती पुन्हा किंचाळली.

"का झालं?"

"काय नाय."

"नाय नाय.का झालं ते सांग.मी काईबी करणार नाय."

"नाय नाय.तुमी जावा म्हंते."

"नाय नाय.मी तुले काई बी करणार नाय.मले कारण तं समजू दे.नायतं रातभर झोप नाय येईन मले.मंग मले रातभर लोंबकळत ठेवाचा इचार हाये का तुहा?"

"नाय नाय."

"नाय चं कारण कोणतं समजू मी?"

"नाय.मीच जाते आतं."

"मी सांगतलं न.परत सांगतो का मी तुयाबद्दल कोणाले सांगणार नाय."

तशी ती म्हणाली,

"तुमाले इटाळ झाला म्हंते.माफ करा बरं का."

"इटाळ.......इटाळ म्हंजे?हे पाय प्रत्येक ाले रगत मास हाड हाये न.मंग हा इटाळ कसला?मा बाप आन् समदा गाव मानते इटाळ.मी नाय मानत बा.सांग निःसंकोच सांग.तु कोणाची पोर हाय ते."

गाव तसं भरलेलं होतं.त्या गावाच्या एका कोप-यात दलितांची वस्ती होती.ते दलित की ज्यांना गावात जायची परवानगी नव्हती.अशाच वस्तीत गुलाबी लहानाची मोठी झाली होती.तिच्या वडीलांकडून उच्चवर्णियांशी कसे बोलावे याबद्दलचे धडे तिने घेतलेले होते.त्या वस्तीत चांभार,मांग मेहतर यासारखे कितीतरी जातीतील लोक राहात.

"ज्ञानभटा,मी गुलाबी कचरय्या चांभाराची पोेरगी."

"गुलाबी चांभारीन.एक अप्सरा......आन् या जंगलात एकटी."

"मी अप्सरा बिप्सरा नाय."

"नाय तु अप्सराच.दलित जातीत बी सुंदर पोरी रायतेत."

"नाय राहात.आमी शेंमड्या शामड्याच ब-या.माह्या रुपानं दलित जातीत बी अप्सरा रायतेत असं वाटलं का तुमाले."

"नाय तसं नाय."

"सध्या तं शायण्यासारखे बोलता तुमी ज्ञानभट नावाने मंग मुर्ख कसे मणतेत तुमचे बाबा."



'आपून अस्पृश्य जातीतील माणसं.आपले सदामास मागणारे हात.आपून कोणाहीसमोर मागत असतो.मागण्याचीच भाषा करतो.कोणाले कधीबी देण्याचा ईचार करीत नाय.आपण पापी हाओत.तरीबी आपून त्या मुर्ख ज्ञानभटाले आपला देह देला.हे नश्वर शरीर देलं.त्याच्या पिरमासाठी वाहून टाकलं मी स्वतःले.पण तो पिरमभंग करन का साथ देईन माह्या.

ही उच्च जातीतील माणसं.पंचायत मंधीबी मलेच खोटं ठरवतीन.मंग असं जर झालं तं मलेच आत्महत्या करावी लागन.अपमानाचं अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा मरण बरं.'इत्यादी नानाविध प्रकारचे विचार तिला येत होते.तसा पुन्हा विचार आला.

'ज्ञानभट.....मुर्खच म्हणा लागन त्याले.त्याचे वडील मुर्खच म्हणतेत त्याले.कारण तो काहीबी न बोलता नुसता गाढवासारखा ढम्म उभा होता.त्यानं आपली चूक कबूल कराले पाह्यजे होती.पण तो काईपण बोलला नाय."

असा विचार करता करता केव्हा घरं आलं ते कळलं नाही.गुलाबीनं डोक्यावरील टोपलं उतरविलं आणि आजीजवळ गेली.आजीला पाहून ती ओक्साबोक्सी रडू लागली.तशी आजी म्हणाली,

"बाळ,का झाल?"

''काय नाय आजी.मले मा मायबापाची लय आठव येत होती."

अंतर्मनातील वेदना मनातल्या मनात लपवत गुलाबी बोलली.तशी ती उठली आणि आपल्या कामाला निघून गेली.

गुलाबी घरी गेली खरी पण ज्ञानभटाला इकडे कसेतरी वाटत होते.तशी गुलाबी पाठमोरी झाल्यावर संगभटाचा आवाज त्याच्या कानावर पडला.

"काय रे मुर्खा,तु इतं पिरमाचं चाळं करत होतास.एवळ्या येळापासून मी तुले शोधत होतो.तुह्यासाठी मीनं अख्खा गाव पालथा घातला.पण तुहा पत्ता नाय लागला गावात.अन् तु इतं सापडला.तुले का गावात आपल्या जातीच्या पोरीच नाय सापडल्या.त्या लागला चांभाराच्या पोरीच्या मांगं."

संगभटानं ज्ञानोबाचा कान धरला.अन् तो पिळगाळत म्हणाला,

"चाल घरी लवकर.तुले दाखवतोच आतं."

"बा,तुमी मले मूर्ख मणता.खरंच मी मूर्ख हाये का?"

"मूर्ख नाय तं का?दगड हायेस दगड."

"म्हंजे?"

"दगड नाय तं का?तुले ते चांभाराचीच पोरगी चांगली वाटली.अरे त्याईचा आपल्याले ईटाळ होते.त्याईच्या इतं पाणी प्याचं तं सोड.साधं त्याईच्या वस्तीत जाची हिमत नाय होत आपली.आन् तु तिचा हात पकडतेस चक्क.अरे चामडं ओढतेत ते आन् जनावराचं मासबी खातेत ते.घाणेरडे हायेत ते.शिव शिव शिव.त्याईचा स्पर्शबी आपल्याले सहन होत नाय.अान् तुले त्याईच्याच जातीची पोरगी पिरम करासाठी आवडली.शिव शिव शिव."

"माफ करा मले बाबा."

"अरे ते जरी तेल्यातुंबड्याची पोेरगी असती तरी तिले माफ केलं नसतं.ते तं पोरा चांभारीन होये.मी तिले आन् तुले माफ कसा करु?"

"पण बा,ते तं तशी नाय.रक्त मास हाड तीचं बी आन् आपलं बी तं एकच हाय.ते चांमडं नाय ओढत.गोव-या येचून पोट भरते आपलं.आन् मास बी नाय खात."

"तु मले अक्कल नोको शिकवू.तु का पाहाले गेलता का?"

"ते तसंच तं सांगत होती.मा इश्वास हाये तिच्यावर.ते खोटी बोलणार नाय."

"मुर्ख हायेस तु.अरे गाळवाले कितीबी सजवलं तं त्याचा घोळा बनत नाय.तसा माणसानं जर सिंहाचा आवाज काहाळला तं तो सिंह बनत नाय.तसंच दलितानं कितीबी पूजा अर्चना केली तं तो काई बामण बनत नाय.बामण बामण असते बेटा आपून बामण हाओ.माईत हाये का नाय तुले.आपलीबी इज्जत हाय गावात.बामण विद्येचा भोक्ता.देवाच्या जोवरचा.देवाचं पोट बी भरत नाय बामणाशिवाय.आपण होवून आपली पायरी नाय सोडावी.आपण बामण वरीष्ठ जातीतली वरीष्ठ माणसं.आपल्याले महार मांग चांभार अन् संपूर्ण दलित जातच नाय तं इतर जाती बी नमस्कार करतेत.अान् तु कलंक लावतेस."

"बा,तुमी बोलता ते बराबर हाये.पण......"

"पण का?अरे दगडाचा देवबी आपून पूजा केल्याशिवाय प्रसन्न होत नाय.लोकाईले पावत नाय.देव बी आपल्या पायाशीन येते.आन् तु त्या पापी.....मांगच्या जनमात पाप केलेल्या पोरीच्या मांगं लागतेस."

"बा,निर्जीव दगडाले देव मानून नमस्कार करता आन् जीवंत माणसाची हेळसांड करता बा.हा न्याय कोणता?"

"का मणलास?अरे त्या चांभारीनचा असर पडला का तुह्यावर.जरुर तिनं तुले जादूटोना तं केला नाय.खरं तं तुले लाज वाटाले पाह्यजे.आपण बामण असून तु हे असले इचार ठेवतेस."

"बाबा,ज्या दगडाची तुमी पूजा करता.त्यालेच दगड म्हणून शिवा बी देता?"

"तु आधी घरी चाल.तुले दाखवतोच घरी.न्याय,शास्र,मिमांशा,पठन करण्याऐवजी तु पिरमपठन कराले लागला.थांब तुले दाखवतोेच घरी."

"त्यात का हाये.हे पिरम कराचं वयच हाय आमचं.'

"वय!वयबी दाखवतोच घरी.तुह्या काहाळतो पिरम कराचा वय."

संगभटाने त्याचा हात जोरात धरला आणि तोही झपाट्याने पावलं टाकत घराची वाट चालू लागला.त्याच्याही अंकर्मनात क्रोध डिवचत होता.आधीच दलितांच्या सावलीनं विटाळत असलेला संगभट ज्ञानभटाच्या प्रेमाच्या चाळ्याने विचलीत झाला होता.काय करावे काय नको असे त्याला होवून गेले होते.

"हो न पाह्यनं.मा बाप मले मुर्ख समजते.आज तुहा चेयरा पावून धन्य झालो मी.तुहा चेयरा पावून मले शकुंतलेची आठव येते."

"बरं मी निघते घरी."

"का बरं."

"लय येळ झाला.आजी रागवन."

"ठीक हाये.नंतर भेटशिन का?"

"हो."

तशी ती निघाली.पहिल्या भेटीची आठवण पदरी घेवून.ती पहिली भेट तिला आज फार आठवत होती.

दिवसामागून दिवस जात होते.ती दररोज गोव-या वेचायला येत होती.त्याची भेट घेत होती.प्रेमाच्या गोष्टीही होत होत्या.पण दूरुनच.पण आता हळूहळू या प्रेमाने वासनेत रुपांतर करणे सुरु केले होते.ज्ञानभटाच्या मनात वासना फुलत चालली होती.तसा तो तिच्याशी एक दिवस काहीतरी बोलला.त्यावर ती म्हणाली,

"छट् तुमी कायतरीच बोलता."तशी ती लाजली.तो म्हणाला,

"चांभार जातीतबी एवळं सौंदर्य रायते हे तुयाकडून समजलं बा" त्यानं इकडं तिकडं पाहिलं.जवळपास कोणीच नाही असं समजून वासना त्याच्या मनात निर्माण होत होती.तसा तो म्हणाला,

"गुलाबे,इकळं ये.जराशी जोवर ये.जोवर ये माह्याजोवर."

"कोणी पायन तं का मणन."

"या ज्ञानभटापुळं बोलाची कोणाची हिंमत तरी हाये का?"

"अवं पण मी जातीनं चांभार हाय बरं."

"म्हून का झालं..सौंदर्याले जात असते का?पिरमालेबी जात नसते बरं.मी तुले आवडलो का सांग.तु मले आवडली आन् मी तुले आवडलो म्हंजे झालं."

"हे का इचाराचं.तुमी मले आवडलाच."

"बस झालं.तु बी मले आवडलीच.मंग आतं जात कायले आणाची मंधात."

"पण मी एक पोरगी.निराश्रीत पोर हाय.मले बी जोवरचं कोणी नाय.एक म्हातारी आजी हाय.तिच्याजोवर रायतो मी.तिले मदत कराले मी गोव-या जमा करुन त्या इकून आपलं नी आजीचं पोट भागवतो."

"ये गुलाबे जोवर ये.तुह्य माह्य जमलं का बस झालं.तुले धंदा कराची बी गरज नाय.तुया या जवानीनं मले घायाळ करुन टाकलं.तुयापासून आतं रायनं होत नाय."

"ये गुलाबे जोवर ये.तुह्य माह्य जमलं का बस झालं.तुले गोव-या येचाची बी गरज नाय."तो पुन्हा म्हणाला.

ती गुपचूप उभी होती.तसं तिचं मौन पाहून तोच तिच्याजवळ गेला.मगाचा धक्का आता रोमांचक स्पर्शात बदलला.

आजुबाजूला झाडांची दाटी होतीच.त्या गर्द झाडीत ती व तो.दुस-या कोणाच्याच येण्याची शक्यता नव्हती.त्याने आपल्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला केला.तसे तिच्या अंगावरचे रोमांच उभे झाले.त्याने अलगद तिचा हात हातात घेतला व घट्टच दाबला.तशी ती म्हणाली,

"अवं,सोडा माह्या हात,तुमी बामण पंडीत,आमा लोकाईचा ईटाळ मानणारे.आमच्या सावलीलेबी भेणारे.आन् तुमी मा हात हातात घेतला.मले बेस वाटत नाय.सोडा मा हात."

"वाटन बेस.....हळूहळू चांगलं वाटन.तु फक्त चूप राय म्हंजे झालं." तसा त्यानं हिंमतीनं तो हात तिच्या खांद्याजवळ नेला आणि तिला आलंगीत केलं.तशी ती म्हणाली,

"अवं,सोडा मले.हे तुमी का करुन रायले?माई आजी का मणन."

"कायपण मणणार नाय.अन् तुले कायपण होणार नाय.मी तुह्याशीन लगन करीन.तुले एकटं टाकणार नाय.मंग तु आन् मी.तुही आजी बी रायन आपल्यासोबत.तुले या गोव-याचं टोपलं बी उचला लागन नाय."

तसा तो कोमल स्पर्श.त्या स्पर्शानं आता गुलाबीच्या शरीराचे उभे झालेले खाली आले होते.एरवी ज्ञानभटाच्या कोणत्याच कृतीला विरोध न करता ती मुकपणे ते कृत्य सहन करीत होती.नव्हे तर त्या कृत्याला सहमती देत होती.ज्ञानभट आता क्रमाक्रमाने आपले वाईट कृत्य वाढवीत होता.त्याने तिच्या अधरावर अधर चिपकवलं.तिला बाहुपाशात घेतलं.

गुलाबीला त्याचा डाव माहीत झाला.तो आपल्यावर जबरदस्ती करीत आहे हेही माहीत झालं.पण आता ती त्याच्या बाहुपाशात होती.तिनं त्या बाहुपाशातून स्वतःस सोडविण्याचा बराच प्रयत्न केला.पण ती विफल ठरली.

ज्या गोष्टीची तो आजपर्यंत वाट पाहात होता.त्या गोष्टी अनुभवतांना त्याला अगदी हायसं वाटत होतं.ज्या मधूर मिलनाच्या गोष्टी त्याने मनात ठेवून साठवून ठेवल्या होत्या.त्या मधुर मिलनाचे प्रसंग प्रत्यक्ष अनुभवतांना त्याला बेचैन जरी वाटत असलं तरी तो त्याच्यासाठी सुखद अनुभव होता.असाच काही वेळ गेला.काही वेळानं त्यानं तिला आपल्या बाहुपाशातून अगदी मोेकळं केलं.

ते आता लपूनछपून दररोज भेटत होते.एखाद्या दिवशी भेट न झाल्यास दिवस कासावीस वाटत होता.निर्जन रस्ता.....आजुबाजूला कोणाची वर्दळ नसल्यानं त्यांचं प्रेम फुलत चाललं होतं.तसं त्यांचं झालेलं मिलन,त्यातच गुलाबीचा नकार असला तरी निसर्गराजा जाम खुश झाला होता त्यांच्यावर.तद्नंतरच्या काळातही ते गुपचूप भेटतच राहिले.शारीरिक संबंध होतच राहिले विवाहाचा झासा देवून.विवाहाबद्दल विचारल्यास ज्ञानभट्ट ते टाळून दुस-याच गोष्टी करायचा.नव्हे तर विवाहाचा झासा देवून तिच्यावर पाशवी बलत्कारच करायचा वेळोवेळी.तसा विवाहाचं विचारताच म्हणायचा,

"अवं मी तुह्याशीनच लगन करणार हाये न.पिरमाले जात पात नाय हे पह्यलंच सांगतलो न.पण ह्या पिरमाच्या गोष्टी सध्यातरी इतराईले कळू कायले द्याच्या.आपलं पिरम अमर पिरम हाये.ये जोवर ये.आपला हात माह्या हातामंधी दे."

असे म्हणून तिला सांत्वना देत ज्ञानभट तिच्या जीवाशी आणि शरीराशी खेळत होता.आठवड्यातून किंवा महिण्यातून भेटणारा ज्ञानभट आता तिला दररोज भेटत होता.मी जंगलात जावून ज्ञान मिळवतो नव्हे तर निसर्गाचा अभ्यास करतो असे घरी सांगून तो घराबाहेर पडायचा आणि इकडे येवून गुलाबीला भेटायचा.

पुर्वी कधीही घराबाहेर न पडणारा ज्ञानभट अचानक असा बाहेर पडतो.जंगलात अभ्यास करायला जाण्याचं सांगतो.निश्चीतच काहीतरी गुपीत आहे असं अभ्यास करतो हे ऐकणा-या संगभटाला एक दिवस वाटलं.त्याला काहीतरी शंका आली होती.तसा एक दिवस आपला मुलगा नक्कीच काय करतो हे पाहण्यासाठी संगभटाच्या मागोमाग गेला.ती योजना त्याने आधीच बनवली होती.तसं जंगलात कामही होतं त्याला.काहीतरी औषधी आणायचा जणू बहाणाच होता तो.पण बाप मागे येणार आहे याची काहीच कल्पना ज्ञानभटाला नव्हती.समजा ज्ञानभटाची भेट झालीच तर आपण औषधासाठी निघालो असा बहाणा करु असा उद्देश बाळगून संगभट आपल्या मुलाला न दिसता एक दिवस त्या आपल्या मुलाच्या मागे निघाला.संगभट मागे व ज्ञानभट पुढे असे ते बापलेकं निघाले होते.तसा ज्ञानभट एका झाडीत शिरला.ज्या झाडीत आधीच गुलाबी येवून तयार होती.तिलाही आता त्याची आठवण येत होती.तिलाही आता त्याच्याशिवाय राहाणं वा जगणं मुश्कील झालं होतं.तिलाही एखाद्या दिवशी तो न दिसल्यास वा न भेटल्यास कासावीस झाल्यासारखं वाटायचं.तसा त्या झाडीत शिरुन तो तिच्या जवळ गेला.

तिच्या जवळ गेलेला तसेच तिथे एक मुलगी उभी असलेलं दृश्य तो संगभट दुरुनच पाहात होता.त्यांचं ते कृत्यही क्षणभर अनुभवत होता.तसा गुलाबी जवळ जावून ज्ञानभट म्हणाला,

"गुलाबे मले वाटत होतं का तु उशिरा येशिन.पण तु तं आधीपासूनच येवून तयार हायेस."

"का करु ज्ञानराजा, मले तुमच्याशिवाय करनतच नाय.तुमच्यावाचून दिस जात नाय.हे दिसं मले कडू झाल्यासारखे वाटतेत.मले आपलं कधी लगन होतं आन् कधी नाय असं वाटाले लागलं.सांगा ज्ञानराजा,आपुन लगन कवा करुन."

"लगन!करुन न लगन......लगन करुच आपून.मी तुले टाकून देणार नाय.इश्वास हाय ना माह्यावर."

"हो हाये ना.मा बी इश्वास हाये.पण मी तरी का करु?एवळे दिस मी यासाठीच तं वाट पायत हाये.पण आतं तुमचा इरह सहन होत नाय."

"अवं मलेबी तसंच वाटते.पण मी तरी का करु?मलेबी मा बापाची परवानगी घ्या लागन का नाय."

"अवं तुमचे बा जातीनं बामण.खरंच परवानगी देतीन.मले नाय वाटत."

"अवं मी बापाचा एकला पोरगा.अन् मले परवानगी नाय देतीन असं तुले वाटते!मा बाप मा खुशीसाठी परवानगी देईनच."

"मंग इचार न ज्ञानराजा.लवकर इचार न बाप्पा.तु कसा रायतेस मा शिवाय तेच समजत नाय मले."

"मी कसा रायतो.माह्य मलेच मालूम हाय.पण मी तुले माई येदना कशी सांगू.मले तं धीरच धरा लागन."

"मी बी परेशान.तु बी परेशान.त्यापरस आपून पळून गेलो तं."

"तुह्या आजीले टाकून."

"हो तुमचं बी बराबर हाय.भावनेच्या भरात बगा मी का बोलले.काई बी बोलतो माणूस नाय का कावराबावरा झाल्यावर."

"हो न गुलाबे,आजपासून आपून अशी गोष्ट कराची नाय.लगन करुन तवा करुन.आतं फक्त आपली भावना भागवाची.बस एवळंच कराचं आपून."

"हा देह.....हा देह तुमच्यासाठीच अर्पिला ज्ञानराजा.या देहाचा जेवळा वापर कराचा,तेवळा करा.माह्या जनम बी तुमच्यासाठीच झाला.घ्या या देहाचा उपभोग.पण मले धोका नोको देजा म्हंजे झालं."

"छे!छे!मी तसा दिसतो का?वाटतो का तुले?तु तं एवळ्या दिसापासून पायतेस मले.अनुभवतेसही.मले समजली नाय का एवळ्या दिसापासून."

"हो,समजली हो.पण......"

"पुना तेच ते आणते तु.पुना असं मनाचं नाय.माह्यावर इश्वास ठेव.माह्यावर जर इश्वास नसन तं आजपासून मी तुले सोडून देईन.पुना इकळं भटकणार नाय."

"नाय नाय ज्ञानराजा,तुमी रागवा नोको.मी उद्यापासून नाय मणणार काईपण.घ्या आन् आपली भावना तृप्त करा."असे म्हणून तिनं हात पुढं केले.

"ये गुलाबे,जवळ ये थोडी." ती थोडी सरकली.तसा त्यानं तिचा हात हातात घेतला.हे सर्व दृश्य संगभट दूरुन पाहात होता.पुढल्या प्रसंगाचा वेध घेवून पुढले प्रसंग घडू नये म्हणून त्याने त्यांच्या जवळ जाण्याचा विचार केला.कदाचित आपण कोणते स्वप्न तर पाहात नाही असे त्याला वाटत होते.पण ते वास्तविक सत्य होतं.ज्ञानभट अभ्यासाचं नाव सांगून दररोज असले अश्लील चाळे करायला इथे येत असेल याचा अंदाज त्याला आला.विचार करता करता तो त्याच्या जवळ गेला.म्हणाला,

"वा छान ज्ञानभटा,छान अभ्यास चाललाय."

ज्ञानभट घाबरला..त्याला पुढ्यात आपला बाप दिसला.त्याने गुलाबीला मारलेली घट्ट मीठी झटक्यात सोडली आणि खाली मान टाकून उभा राहिला.जणू चुक झाल्याचा आव आणत."

"ज्ञानभटा,कसले चाळे चालले होते हे.तु आधी बायरं ये आन् तिलेबी काळ."

वडीलांना प्रत्यक्ष पुढ्यात पावून ज्ञानभट खुप घाबरला होता.तशी गुलाबीही मनोमन घाबरली होती.तसा संगभट ज्ञानभटाला म्हणाला,

"कोण रे हे?कोणाची पोरगी?काई ठावठिकाणा हाये का इचा?"

ज्ञानभट चूप होता हाताची घडी करुन.तसा त्याला चूप असलेले पाहून संगभट गुलाबीला म्हणाला,

"कोण वं तु?कोणाची पोर?"

"मी.......मी गुलाबी हाय."भेदरलेल्या आवाजात गुलाबी म्हणाली.

"अन् इतं कायले आलीस?"

"मले भेटाले आली."ज्ञानभट मधातच बोलला.

"तुले इचारलं नाय.तु मधामधात बोलू नोको."

"हं मंग सांग पोरी.तु इतं कायले आलीस?"

"मी गोव-या येचाले आली होती."

"तु कोणाची पोरगी?"

"कच-या चांभाराची."

"कच-या चांभार होय तं मंग.म्हंजे तु चांभारडीन वाटतं."

"हो चांभारीन.गुलाबी चांभारीन मणतेत मले."

"आतं तुमी हे का करत होत्या.कल्पना हाये का तुमास्नी?"

"........"

"का करत होते तुमी दोघं?"

"पिरम करत होतो."

"चुप बस.तुले कल्पना तरी हाय का,तु का बोलत हाये त्याची."

"हो पक्क माईत हाये मले.मी का म्हंते ते."

"तुले का माच पोरगा सापडला होता का असे चाळे करायसाठी?"

"गलती तुमच्या पोराची हाय."

"चूप बस.मणे गलती तुमच्या पोराची हाय."

"तुमच्या पोराले इचारा."

"हे पोरी,तुले कल्पना तरी हाय का?आमी बामण माणसं आमच्यासोबत पिरम कराचा तुमाले अधिकार तरी हाय का?"

"पिरम मी नाय केला.तुमच्या पोरानं मले पिरम करायसाठी मजबूर केलं."

"शिव शिव शिव.दूर हो.जातीची चांभारीन आन् मा पोराचा हात धराले लाज नाय वाटली थोडूशी?"

"माफ करा मले.मा हातून गुना झाला असन तं.आमी अस्पृश्य माणसं.चूक आमचीच झाली.तुमची चूक असूनबी.तुमी जरी गुना केला असन तरी गुनेगार आमीच हाय."

"जा पटकन येथून.अन् एक आईक.पुना दिसली आन् भेटली याले तं याद राख.जातीची चांभारीन.तु समजत असशिन का मा पोराचा गुना हाय.पण ते गलत हाय.तुमी जे का मागच्या जनमात पाप केलं.त्याची सजा समज,तुमाले हे भोगाच लागते."

"तुमी मले बोलाचं कारण नाय.मी माह्य काम करत होती.तुमच्या पोरानंच मले बहलवलं आन् बयकवलंबी.इचारा आपल्या पोराले."

"इचारतो इचारतो.तु जा पह्यलं."

संगभटाचं अपमानास्पद बोलणं ऐकून गुलाबीच्या देहाचा दाह होत होता.तिला मनोमन संताप येत होता.पण शेवटी ती काय करणार.ती तर अस्पृश्य होती ना.तिच्या जातीत तिची बदनामी होईल म्हणून ती गप्प राहिली होती.शेवटी तिनं आपला टोपला घेतला आणि अंतर्मनात विचार करीत करीत ती तिथून झपाझप पावले टाकत निघाली.मनात आपल्या जातीबद्दल व ब्राम्हण जातीबद्दल तीव्र संताप करीत.तिला ज्ञानभटाचा अति राग येत होता.कारण ज्याने विवाहाचे आश्वासन दिले,तो आता ऐन वेळेला काहीही बोलला नव्हता.उलट गप्प होता.तो पुढेही विवाहाबद्दल आपल्या मुलासमोर बोलू शकेल असे गुलाबीला वाटत होते.

गुलाबी एक एक पाऊल टाकत रस्त्यावरुन चालली होती.तसा प्रत्येक पावलागणिक तिच्या मनात विचार होता.

आजुबाजूला निसर्गरम्य बाग पसरली होती.त्या बागेच्या बाजूला एक तलाव होता.त्या तलावाचे जवळ घुष्णेश्वराचं मंदीर होतं.मंदीरला लागूनच ती बाग होती.या बागेत सद् गृहस्थ येत.मंदीरातल्या घुष्णेश्वराचं दर्शन घेत आणि नंतर बागेत मनसोक्त विहार करीत असत.कधीकधी नौकाविहारही करीत असत.

राजेमहाराजे रथावर आरुढ होवून येत.कधी कधी राजकन्याही.राजे आपआपल्या महाराण्यांना नौकाविहार करण्यासाठी आणत.नौकाविहार करतांना अतिरिक्त आनंद होत असे त्यांना नव्हे तर युवराज देखील आपल्या प्रेयसींना घेवून इथे येत.प्रेयसीसह नौका विहार करतांना गंंमत वाटायची.कधीकधी मंत्र्यांचीही मुले येत.तसेच मंदीरातील देवाचे दर्शन घेवून आनंद घेत.अशाच एका दिवशी मधुवय्याची मुलगी वनजा या बागेत फिरायला आली होती.मंदीराचे दर्शन घेवून आपण बागेत मनसोक्त फिरु असा तिचा उद्देश होता.त्यामुळं नुकतंच तिनं घुष्णेश्वराचं दर्शन घेतलं होतं आणि आता ती बागेत आपल्या मैत्रीणीसह फिरणं सुरु केलं होतं.अशातच बागेत फिरत असतांना तिचा धक्का एका युवकाला लागला.त्याच्या हातात असलेली फुलाची परडी खाली पडली.त्याचं मात्र लक्ष तिच्याकडे होतं.तो युवक पळून गेला.

अशातच दुसरा एक युवक फुले तोडण्यात गुंग असतांना त्याने किंचाळण्याचा आवाज ऐकला व तो स्वगत विचार करु लागला.

'या तलावामंधी कोणी पडलं तर नाय.अन् एवळ्या सकाळी इतं कोण आलं असन.'

त्यानं इकडं तिकडं पाहिलं.त्याला कोणीच दिसलं नाही. पण तलावात कोणीतरी बुडल्याचा भाष झाला.तसा त्यानं विचार केला.

'मले गेलंच पाह्यजे.जो कोणी बुडला असन,त्याले वाचवलंच पाह्यजे.'

पण पुन्हा विचार आला.

'जर मा स्पर्श त्याले झाला तं.आपला स्पर्श म्हंजे ईटाळच.'

क्षणिक विचार करीत करीत तो तलावाच्या किना-यावरुन तलावात पाहू लागला.फुलाची परडी त्याच्या हातात होती.तसा त्याला 'वाचवा वाचवा'असा करुण किंचाळण्याचा आवाज आला.'आता येळ बरी नाय.'असा विचार करुन त्याने तलावात उडी मारण्याचा विचार पक्का केला.त्याने तलावात उडी घेतली.बुडालेल्या व्यक्ती जवळ तो गेला.त्या तलावात पडलेल्या व्यक्तीचे केसं पकडून त्याला त्याने बाहेर काढले.

तलावाच्या पाण्यात बुडालेली व्यक्ती ही एक कन्या होती.तिच्यावरुन ती कोणी राजकन्या असल्याचे जाणवत होते.ती असहाय्य होती.मनमोहकही तेवढीच.तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते.युवकाचा धक्का लागताच तिचा पाय घसरुन ती पाण्यात पडली होती.तसा तो तरुण आपल्याला मार पडेल म्हणून पळून गेला.मैत्रीणींतही तिला वाचविण्याचे सामर्थ्य नसल्याने त्या तरुणी वाचवा वाचवा म्हणत किना-यावरुन ओरडत होत्या.

सुंदरतेने नटलेल्या त्या तरुणीला या युवकाने किना-यावरील सपाट जागेवर झोपवले.तिच्या पोटाला हाताने दाब देवू लागला.त्या किंचीत दाबल्याने तिच्या नाकातोंडातील पाणी अलगद बाहेर पडलं.तसे त्याने आपल्या हाताची दोन बोटं तिच्या श्वासनळीजवळ नेले.ती जीवंत असल्याचा अनुभव आला.तसे त्याने पुन्हा तिचे पोट दाबले तसं पुन्हा पाणी पुर्णपणे तिच्या तोंडातून बाहेर पडलं.

पुर्ण पाणी तोंडातून बाहेर पडूनही ती तरुणी बेशुद्धच होती.तसा त्यानं तिच्या हाताला घासलं.तळपायालाही घासून पाहिलं.काहीच फरक जाणवला नसल्याने त्याने तलावातून पाणी आणलं व तिच्या चेह-यावर त्याचा शिडकाव केला.तद् वतच ती तरुणीला होश आला व तिने आपल्या पुढ्यात त्या सुंदर युवकाला पाहिलं.ज्याने तिचे प्राण वाचवले होते.त्या तरुणीला आता आपण स्वप्नात तर नाही ना,असे वाटायला लागले होते.तशी त्याचीही नजर तिच्या नजरेला भिडली.तसा तिला होशात येताच तो तरुण म्हणाला,

"आतं कसं वाटते?"

त्याच्या बोलण्याचा अवकाश.....तिच तरुणी म्हणाली,

"कोण तुमी?"

"घाबरु नोका.मी काईबी करणार नाय."

तशा त्या सर्व मैत्रीणी तिच्याजवळ बसल्या व म्हणायला लागल्या,

"अगं,हाच तो तरुण,ज्यानं तुले पाण्यातून वाचवलं.नायतं तु त्या तलावाची बळी ठरली असतीस."

"नाय.मी बोलत नाय.पण याईनच तं मले पाण्यात ढकललं आन् आतं वरुन शेरा."

"नाय गं,तुले पाण्यात पाडणारा युवक पयून गेलाय.याईन तं जीव वाचोला तुह्या."

"तुमचा काईतरी गैरसमज होतोय.मी नाय पाडलं तुमास्नी.मी तं तुले वाचोलं.चोराच्या उलट्या बोंबाच दिसते."

"म्हंजे?तुमी मले पाडलं नाय."

"नाय पाडलं मी.मीच तं तुमाले वाचोलं."

"मंग आपले फार उपकार झाले मणायचे."

"त्यात कसले आले उपकार?"

"आज आपण इतं नसता तं मी केवाच देवाघरी गेले असते नाय का?"

"त्या अरळलिंगेश्वराची तुमाले माराची इच्छा नोयती बरं का.पण हा परसंग घडलाच कसा मणायचा."

"अवो पाहा,तुमच्या सारखा दिसणारा एक युवक, त्याचा मले धक्का लागला.मी पाण्यात पडलो.मणून मी तुमालेच समजलो.माफ करा मले."

"तो तरुण कोठाय?"माहीत होवूनही त्यानं विचारलं.

"मले का मालूम?"

"म्हंजे तो पयून गेला तर."

"हो,तसंच समजा लागन."

"पण तुमी इतं कायले आल्या एवळ्या सकाळी सकाळी?"

"अं फिराले आलो.इहार कराले.या घुष्णेश्वराचं दर्शन घ्याले आलो आमी."

"या तलावापाशी कसे?"

"तलाव पाहाले.कावून पाह्यल नाय पाह्यजे का?"

"बरं ते जावू द्या.आधी सांगा आतं कसं वाटतेय ते."

"आतं लय बरं वाटते.तुमच्या मणण्यानुसार त्या लिंगेश्वराचीच कुरपा झाली मणायची.मी इचार केला का हे तलावातली कमळं तोडून न्याची.तं मले कोणीतरी धक्काच देला.त्यानंतर कायपण आठवत नाय.शिवाय आपल्या शिवाय कोणताच माणूस मले वाचवाले धावून आला नाय.तुमीच मा संकटसमयी धावून आले.पण तुमी मले सांगा,तुमी येतं कसे?"

"मी आलो इतं फुलं तोडाले.दरोज येतो.त्या अरळलिंगेश्वराले फुलं वायतो रोज.तेवळ्यात याईचा नाजूक करुण आवाज मले कानी पल्ला.मंग संकटात सापडलेल्या कोणत्याही जीवाले मदत करणं मी माह्ये कर्तव्य समजत असल्यानं तुमाले वाचवासाठी या तलावात उडी घेतली.आन् तुमाले वाचवलो."

"पण माह्य रक्षण करतांनी तुमाले भीती वाटली नाय का?"

"कसली आली भीती?हा नश्वर देह.सत्कार्यासाठी या देहाले कसली आली भीती?"

"किती उच्च इचार हायेत तुमचे."

"अवो माणूस जनमाले येते ते मुळी सत्कार्यासाठीच ना.दुस-याची सेवा करण्यासाठीच हा मनुष्यजनम हाये."

"पण असं समजणारी माणसं जगात लय कमी हायेत."

"सोताच्या आचरणानं जनतेसमोर असा आदर्श नोको का?"

"तुमी असे बोलत असल्याने वाटत हाये का शुक्राचार्यासमोर देवयानी उभी हाय मणून."

"मी सामान्य माणूस हाय.माही बराबरी तरी होईन का शुक्राचार्यासमोर."

"आपलं सौंदर्य पाह्यलं का असं वाटत हाये का आपण कोणीतरी महात्मा महापुरुष असान.पराक्रमी तं नक्कीच.हा देह तं आपल्यावरुन ओवाळून टारावासा वाटते.अन् का वाटू नये.एरवी आपण आपला जीव धोक्यात घालून हा पराक्रम केला.आन् वाचोलं मले.तुमचा पराक्रम पाहून कोणतीबी स्री तुमच्यावर जीव ओवाळून टाकन म्हंतो."

"म्हंजे?"

तिला संपूर्ण होश आला होता.ती उठून बसली होती.तसा तिनं त्याचा हात हातात घेतला व म्हणाली,

"द्या मले आधार.मी उठते आतं.मलेआतं लय बरं वाटत हाये."

पण त्यानं तो हात सोडवून घेतला.म्हणाला,

"अवो,माह्या हात हातात घेवू नोको.या मैत्रीणीले आधार मांग आतं."

"कावून लाज वाटते."

"हो तसंच समजा."

"मले वाचवतांनी लाज नाय वाटली."

"नाय.ते येगळं आन् आताचं हात पकडणं येगळं.कोणी पाईन तं का मणन.या पोरी का मणतीन."

"का मणतीन?वाचवतानी कोणी आल्ता का?जो आतं बोलन.नाई न."

"नाय तसं नाय.पण......."

"पण काय?ठीक हाय.तुमी मणता ते मान्य.मी मा मैत्रीणीचा आधार घेईन.पण पुना असं लाज ठेवजा नोको."

तसा तिनं मैत्रीणीला आधार मागितला आणि ती उठून उभी झाली.त्या तलावाकडे पाहू लागली.तशी ती म्हणाली,

"बरं आमी निघतो आता."

"बरं काळजी घ्या सोताची."

"होय.आन् तुमी बी."

"हो,आन् स्वस्थ झाल्यावर भेटा पुना."

"हो."

ती मैत्रीणीसमवेत निघाली.तो मात्र तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहात होता.ती ओझल झाल्यावर तोही फुलाची परडी घेवून घरी निघाला.

ते आता दररोज त्या बागेत येत होते.तो फुलं तोडायला यायचा तर ती विहार करायला.कधीकधी ती एकटीच यायची.त्यांच्या गप्पाही होत.अशातच त्यांचे सूर केव्हा जुळले आणि त्यांच्यात प्रेम केव्हा निर्माण झालं ते त्यांना समजलं नाही.तशातच एक दिवस वनजा तलावाच्या काठावर उभी होती.ती तलावाकडे पाहात होती.बाजूला तो युवक उभा होता.तशी ती म्हणाली,

"व्वा काय अमाप सौंदर्य आहे.......अहाहा.....हे निळं निळं आराश,डोलणारी सुंदर नाजूक फुलवेल.आकाशाला भिडणारी, भिडणारी मोठमोठी झाडं,त्याच्या छत्रछायेत मानानं जगणारी ते हराळी.हे कुमारा,हे सारं सारं कसं मोहून टाकते नाय का?जीवन बी एक कुरुक्षेत्र हाये.पण या कुरुक्षेत्रात या घुष्णेश्वरामुळं धर्माचं पावित्र प्राप्त झालं हाय.हा तलाव बी आज शांत हाय.या तलावातल्या लाटांचा दरोज चाललेला लपंडाव आज बंद हाय.त्या लाटा आज कशा मंद गतीने चालत हाय.ह्या तलावातली सुंदर कमळं गुलाबालेबी लाजवल एवळं त्याईचं सौंदर्य अपरतिम हाय.ते फुलं मनाले कशी येडावून टाकतेत नाय का?हे काळीकाळी भ्रमरं का बरं इतं गुंजारवतेत तेबी कळत नाय."

"खरंच तुह्य मत बराबर हाय.टणक दगडालेबी पोखरुन टाकणारी ही भ्रमरं.पिरमातून आतूर झालेल्या मनोवृत्तीनं या कमलनीच्या पिरमपाशात सापडून आपल्या जीवाची आहुती का बरे देतेत ते कळत नाय.ते कमलपुष्प या भ्रमराचा जीव घेतेत हे त्या भ्रमराईले माईत असूनबी ते त्या कमळावर पिरम करतेत.ते का बरे पिरम करत असतीन!याचं मले तं आश्चर्य वाटते.या निष्पाप भ्रमराले देखील निष्पाप व सोज्वळ पिरमाचं एवळं आकर्षण.पतंग पाह्यला का कधी.तो बी जळत्या दिव्यावर झेप घालते मजा घेण्यासाठी.अन् आनंदात मरुन पडते बाजूला.चकोर पाखरुबी चकोरणीची वाट पाह्यते.हा स्वर्ग बी पृथ्वी ची भेच घ्याले आतूर होते,पण मधूमिलन होत नाय.तो चकोर वाट पायत पायत मरतो.

सखे,निसर्गात या निर्व्याज पिरमाचं नाटक सुरु हाय.लपंडावच जणू.......कोणाचं पिरम साकार होते.कोणाचं होत नाय.हं नाजूक पाकळ्यानं हिरवीगार झालेली कमळं आपल्याले दिसतेत.पण ते कमळं फुलण्यापुर्वी झाडाले कोणत्या येदना होत असतीन ते तरी दिसते का?अवं,वरुन दिसणारं समदं चांगलं नाय राहात.अंतरंगात मात्र सत्य वेगळंच असते.हे भ्रमरं या कमळाच्या भोवताल हिंडतेत.पण या कमळाले कोण सांगन का बाबारे या कमळाभोवती हिंडण्यात मजा नाय हे कमळंच तुह्या जीवाचा अंत करतीन."

कुमाराचं नाव शिलवंत होतं.तो जातीनं चांभार होता.आतापर्यंत त्यानं आपली जात सांगीतली नव्हती.त्याला वाटत होतं की जर या वनजाला आपली जात माहीत झाली तर.म्हणून आपण तिला सत्य सांगून द्यायचं असं त्याला वाटलं.

तशी ती म्हणाली,

"कुमारा,हे पाय,ह्या कमळानं गुंफलेली मालिका मी मा भावी पतीले वाहीन.पण छे!असलं पतीत्व तर मले मिळन का कधी.मले तं पती मिळालाच नाय अजीनपर्यंत.अन् मी त्याची आठव करते.पण महत्वाचं म्हणजे या कमळाची आसक्ती माही काई केल्या कमी होत नाय.आज हे फुलं तोडून त्यांचा सुंदर हार शिवप्रभूच्या चरणी अर्पण केला पाह्यजे असं मले वाटते.पण किती दूर हायेत हे कमळं.मनाचा हिय्या करुन आणलं पाह्यजे त्याईले.पण काय करणार?"

"तुह्य हे गुलाबी मादक सौंदर्य.कमळासारखे निळेभोर डोळे,गजगामीनी,मंद मंद चाल पाहून असे तुह्ये इचार पावून तु कोणी राजकन्या असन असे वाटते.खरंच तु राजकन्या हाये का अजुन कोणी?"

"तुमाले का वाटते?"

"मले तं वाटते तु कोणी राजकन्या असशिन."

"तुमचं मत बराबर हाय."

"म्हंजे तु राजकन्या हायेस तर."

"मी राजकन्या हाये हे जाणून घेतलं तुमी.मंग तुमी बी आपली वळख सांगा."

"आधी तुमी आपलं नाव सांगा.कोणत्या राजाची पोरगी ते सांगा."

"मी वनजा.मधुवय्याची पोरगी.माह्ये वडील कल्याण दरबारी मंत्री हायेत.मले नीललोचनाबी मणतेत."

"तरी वाटलंच मले का तुमी कोणीतरी मोठं व्यक्तीमत्व नक्कीच असान.तुमचा राजबिंडा चेयराच याची साक्ष देत होता."

"कुमार,माह्याबद्दल मी सांगतलं.आतं तुमी सांगा आपल्याबद्दल बरं का?"

"मी.......मी माह्याबद्दल काय सांगू?"

"म्हंजे?आपण देखील एखाद्या राजपुत्रासारखे नक्की दिसता."

"राजपुत्र अन् मी.......छे!मी आपला सेवक समजा.माही लायकी नाय आपल्यासमोर उभं राहाची."

"माह्या जीवनात एखादा राजकूमार यावा असं नेयमी वाटत होतं मले."

"शोधा......शोधून मिळनच."

"आतं शोधून का उपयोग?"

"म्हंजे?"

"माह्य तुमच्यावर पिरम झालंय ना."

"अवं मी तुमच्या लायकीचा नाय."

"आतं असं मणू नोका.तुमी कसेबी असान तरी मले प्रिय हात."

"पण मी राजकुमार नाय."

"चालन मले,तुमी कोणी बी असान तं."

"माह्या परीचय आयकशीन तं तु सोताच नाय मणशीन."

"मंग सांगा तुमचा परीचय."

"नाय.तुले येदना होतीन लय."

"चालन,त्या येदना पचवण्याची ताकद हाय माह्यात.अवं जीव वाचवाले कोणी नाय आला त्यायेळी.समजा मी मेली असती तं त्यायेळी.मंग कोणत्या राजकुमाराले मी कशी भेटली असती?तुमी राजकुमार बी नसन तरी चालन मले.पण आपला परीचय द्या म्हंजे झालं."

"माह्य नाव इचारु नोको.तुले लय वाईट वाटन.राग येईन तुले लय."

"राग येण्यासारखं का हाये त्यात.सांगा ना सांगा कुमार तुमचं नाव सांगा.मी नाय रागावणार.निःसंकोचपणानं सांगा."

"हे पाय वनजा,माह्या नावाची जेथं तेथं वाच्यता केली जाते.जेथं जेथं माह्या कुळाची वाच्यता झाली,तेथं तेथं माह्या वाट्याला पश्चाताप आला.ऋषीचं मुळ आन् नदीचं कुळ ऐकू नये.असं मणतेत ते बराबर हाय."

"म्हंजे आपण ऋषीकुमार व्हात तर."

"मंग सांगा ना तुमचं नाव.इतं आपल्या दोघांशिवाय कोणीच नाय."

"माह्या नाद सोडून दे वनजा.तुले घरी जाचं असन तं मी सोडून देतो आन् तु मणशिन तं उद्यापासून भेटणार नाय."

"नाय असं मणू नोका कुमार.मी वाटल्यास जाईन बरोबर घरी.पण तुमचं नाव आयकल्यावर."

"आन् मी नाय सांगतलं तं."

"तं मी याच तलावात उडी घेईन.या जगण्याचा मले मंग कोणता उपयोग हाय.तुमाले सांगाच लागन.तसं पाह्यलं तं आतं तुमचं पिरम हाये माह्यावर माह्य बी हाये.तुमी मा जीव वाचोला हाये.जीव कोण वाचवतो,ज्याचं पिरम असतं.जो पती असतो असं समजा. "

"हे वनजा,तु कल्याण राज्यातल्या मंत्र्याची नावाजलेली पोरगी.एखादा खास राजकुमार तुले भेटन.माह्या नाद सोडून दे.घरंदाज राजकुमाराच्या घरी पडण्याची तुही योग्यता असतांनी तु माह्यामांग!या दारच्या माधुकरी मांगणा-या भिका-यामांगं सखे तुह्या पिरमात पडण्यालायक माही योग्यताच नाय.तु याचा इचार कर वनजा.आन् हा बी इचार कर का आजपासून मले इसरलेलं बरं."

"आपले प्राण पणाला लावणा-या महापुरुषा,तुमची त्यागाची थोरवी अपार हाये.तुमी जसेबी असान,मले शिरोधार्थ हात.तुमचं नाव कुरपा करुन सांगा म्हंजे झालं."

"तुमी रागावणार नसान आन् तुमची इच्छा असन तं सांगतो."

"नाय नाय.मी रागावणार नाय.माही बी इच्छा हाय का तुमीच माह्ये नाथ बनावं.तुमी माह्या पिरमाचा स्विकार करावा."

"मले तुमचं समदं पटतंय.पण माह्या इतिहास,माही जात पात समदं समजून घ्या."

"मले तुमचा इतिहास जाणण्याची गरज नाय.कुपया तुमी आपलं नाव सांगा.तेवळच पुरेसं हाये."

"तं मंग ठीक हाये.मी मा नाव सांगतो."

"सांगा कुमार, निःसंकोच सांगा."

"माहय नाव हाये शिलवंत."

"शिलवंत.......किती सुंदर नाव तुमचं आन् सांगायला घाबरत होते.शिलाचं मुर्तीमंत प्रतिक हात तुमी."

"अवं,पुळचं आयकशिन तं तोंडात बोटं टाकशिन."

"सांगा ना मंग."

"मी हरळ्याचा पोरगा......हरळ्या चांभार.हरळ्या चांभाराचा पोरगा हाये मी."

"आपण चांभार.जातीनं चांभार हात आपण."

"मी चांभारच हाये.खोटं बोलणारच नाय.मा तुमाले इटाळ झाला असन.वाटत असन का हे या कुमारानं आधीच कावनाय सांगतलं."

"नाय अशक्य.तुमी काईबी सांगता.माहा इश्वासच बसत नाय."

"हो चांभार.वाटलं न नवल."

"नाय वाटलं.अवं,जाती कोणं निर्माण केल्या.माणसानच ना."

"म्हंजे तुले काईच नाय वाटलं."

"नाय......आन् ईटाळ कसा होईन मले.संकटाच्या येळी प्राणपणाले लावणारी माणसं.तुमी मले वाचवतानी माई जात पाह्यली होती का?मंग ज्याचा प्राण वाचला,त्यानं मंग जात पाह्यली पाह्यजे का?सांगा कुमार याचा न्याय करा."

"तुमी कोणत्याबी जातीशीन पिरम करु नये."

"नाय कुमार,आतं शक्य नाय.मी कोणत्या बी जातीशीन आतं पिरम करणार नाय.मी आखीरपर्यंत तुमचीच असेन.कितीबी मले संकट झेला लागले तरीबी.सांगा मी जर जीवंत नसते तं.......तुमी कोणत्याबी जातीचे असान तरी मले चालता.तुमी मले पसंत हात.रायणार शेवटपर्यंत."

"बरं."

"बरं कुमार,मी जाते आतं घरी.येळ लय झाला."

"मी पोहचवून देवू का घरी."

"नाय कुमार,मी एकटीच जाते.पण मी का म्हंतो ते आयका.मले कधीच इसरु नोका.मले कधीच इसरु नोका.तसं वचन द्या."

त्यानं वचन दिलं.तशी ती निघाली.तो मात्र तसाच उभा राहून तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहात व विचार करीत उभा होता.विटाळ चरणसीमेवर असूनही वनजाच्या निर्णयाचं तो स्वागत करीत होता.जी वनजा या भेदभावाच्या काळातही आपल्या निर्णयावर ठाम होती नव्हे तर त्याला समाजात ठाम राहण्याबद्दल प्रोत्साहन देत होती.

ब्रिज्वलाने विश्वासघात करुन कल्याणचं राज्य बळकावलं होतं.त्याने बसवण्णाची नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून केली होती.तसेच मंत्री म्हणून मधुवय्या व मचण्णादेखील मंत्रीपदावर आरुढ झाले होते.ते दोघेही बसवण्णाचा द्वेष करीत असत.केव्हा या बसवाचा काटा काढता येईल याचा पदोपदी विचार करीत असत.मधुवय्या थोडा बरा होता.पण मचण्णा हा कुरघोडी राजकारण करीत होता.बसवेश्वराचा द्वेष जरी मनात असला तरी ते दोघेही बोलतांना चेह-यावर दाखवत नसत.तसा एक दिवस मधुवय्या मचण्णाला म्हणाला,

"मचण्णा,जवापासून बसवण्णा प्रधानमंत्री बनला,तवापासून कल्याण भरभराटीस आलं हाये.कल्याणचं जणू भाग्य उजळलं हाये.त्याईच्या सत्कार्याचा परिपाक दाही दिशात घुमत हाये.तो खुप लाभकारी योजना आखत हाय.माह्यावर जास्त प्रिती हाय त्याची.मले तं साक्षात अवतारच वाटते ते."

"ते ठीक हाये मधुवय्याजी तुमचं मणणं.पण बसवण्णा केवळ समाजसेवा करतेत.त्याईचं राजकारणात लक्षच नाय.त्याईचं लक्ष समाजसेवेशिवाय कोठंच लागत नाय."

"मंग कुठं कुठं लागते त्याईचं लक्ष?"

"त्याईचं लक्ष लागते जंगमसेवा,जंगमभक्ती,जंगमनिष्ठा.सा-या महेश्वरांना देव मानून आपला देव सोडून ते पूजा करतेत.त्यातच सारा येळ खर्च करतेत."

"म्हंजे?"

"त्याईनं विरशैव पंथाची स्थापना केली म्हणे.या कल्याणमंधी विरशैवीयांचीच जास्त गर्दी होत हाये.विरशैव धर्माचं निसतं प्रस्थ माजणार हाये का काय?असं वाटाले लागलं हाये.या कल्याण नगरीत सा-याईले विरशैव बनवत हायेत बसवण्णा."

"म्हंजे?"

"म्हंजे तुमी तुमच्या आज्यापासून पाह्यले असाल का त्या दलिताईले गावाच्या बायरं ठेवत असत.त्याईले गावात येवू देत नसत.पण बसवण्णा दलितालेबी राज्यात परवेश देतेत.असं वाटते का एक दिस बसवण्णा या दलितालेबी आपल्या ताटावर बसवतीन."

"म्हंजे?"

"म्हंजे बसवण्णानं दलितालेबी लिंगदिक्षा देण्याचा सपाटा चालवला हाये."

"त्यानं का होते?"

"अरे त्यानंच तं भेदभाव नष्ट होईन.आपल्याले ईटाळ नाय होईन का?आतं दलित बी सर्रास गावात याले लागले.अन् तुले नसन एक गोष्ट माईत."

"कोणती?"

"दलिताईले लिंगदिक्षा देल्यावर तो दलित राहात नाय.असं म्हंते बसवण्णा."

"मंग कोण रायते तं तो."

"अरे तो शिवैक्य होते.त्याची जात लिंगधारी.अन् हे लिंगधारी जात सरवायचा प्रयत्न करतेत."

"म्हंजे?"

"तेली,कुणबी, बामण,महार,मांग,हे समदी जात सरवाची हाय बसवाले.फक्त एकच जात राहीन.ते म्हंजे लिंगधारी."

"अस्सं."

"अन् त्यासाठी त्यानं अनुभव मंटपाची स्थापना केली बसवानं.मणतेत तेथं सरवं जातीचे लोक एकत्र जमतेत.अन् एकत्र समाजाची पारथना होते."

"धर्मस्वातंत्र्य सर्वालेच हाये.पण धर्माच्या नावावर दंभाचार माजणार नाय.याईची काळजी घ्यावी बसवानं."

"अरे मधुवय्या,राजाचा खजाना गोळा झाला राज्य चालवासाठी.पण बसवण्णा राज्याचा खजाना या दलिताले जेवण द्यासाठी वापरतेत.राज्याचा खजाना म्हंजे बसवाले धर्मफंडच वाटते.महाराज ब्रिज्वलाच्या कानावर जर हे गोष्ट टाकली तं महाराज त्याले माफच करणार नाय."

"त्याईनं असं केलं तरी काय?"

"अरे तो तं एक लक्ष छ्यानव हजार महेश्वराले एका वेळी रोज जेवण देते.महेश्वर म्हंजे दिक्षा घेणारे.तेही फुकटमंधी.त्यासाठी राज्याचा खजाना वापरते हा माणूस.जसा त्याच्या बापाचा लागला."

"पण हा खजाना कल्याणचाच हाये असं कसं वाटते तुमाले?अन्नदान हे पुर्णदान हाय त्याचा हेवा वाटू नये."

"का वाटू नये?"

"पण हेवा वाटण्यासारखं त्यात का हाये."

"का नाय हाये.मधुवय्या शेवटी ते प्रजेची संपत्ती हाये.तिचा दुरुपयोग होता कामा नये."

"बसवण्णाच्या अधिकाराचा अजुन कशाकशाप्रकारे दुरुपयोग होत हाये बाबा मचण्णा."

"मधुवय्या,सांगाले लागलो तं महापुराणच होईन."

"वा रे वा बसवण्णा,राजान् त्याले आपली पोरगी देली म्हून.नायतं राजानं केव्हाच त्याले पदावरुन काढून टाकलं असतं."

"हो,पोरगी कोणाची आन् शहाणपण कोणाले."

"सिद्धम्माच्या बायकोनं ब्रिज्वलाले दूध पाजलं नसतं तं सिद्धम्मा मेल्यावर त्याच्या पोरीले, राजाले पोषा लागलं नसतं आन् तसच तिचा लगन बसवासोबत करा लागला नसता.आजच्या काळात कोण कोणाच्या दुधाले जागते.ब्रिज्वल राजा महाथोर हाये का तो पेलेल्या दुधाले तरी जागला.आन् त्या निलांबिकेले बहिणीसारखं पिरम देलं.आन् तिचं लगन बी करुन देलं."

"पण बसवण्णा,ज्यानं पोरगी देली आन् प्रधानमंत्री पद देलं त्यालेबी इसरला.आन् लागला जंगमसेवा कराले.हे काई बराबर नाय.आतं परवाचीच गोष्ट बसवा त्या चांभाराच्या घरी जावून आला."

"चांभाराच्या घरी गेलता!"

"हो,चांभाराच्या घरी गेलता.कायले गेलता बा."

"तो तेथं हाये न.तो....तो नाय का.....तो."

"तो!तो कोण?"

"तो नाय का?त्याचं नाव बी नाय आठवत.तोंडातच हाये त्याचं नाव."

"हरळ्या का?"

"हं तोच तो."

"पण त्याले कायले भेटाले गेलता तं."

"अरे तो हरळ्या सोताले शिवभक्त समजते न.आन् संत बी समजते सोताले.मणते मी अरळलिंगेश्वराची पूजा करतो."

"तो शिवभक्त हाये का?"

"हो,तो तसंच मानते."

"असन लेकाचा.कोणं पाह्यला."

"मंग त्यात का बिघडलं.चांभारवाडी म्हंजे राजाचीच परजा का नाय.त्यासाठी चांभारवाडीत भेट देली तं त्यात बसवाचा कायचा गुना.ते मंग चांभारवाडी राहो का मांगवाडी.राजाचं प्रजेकडं लक्ष देणं पह्यलं कर्तव्य असते."

"पण पुळचं आयकलं का महाभयंकर?"

"काय घडलं महाभयंकर?"

"तेच तं सांगतो तुले.....बसवाले पाह्यल्याबरोबर हरळ्याले एवळा आनंद झाला का म्हणे शिवप्रभूनं दर्शन देलं त्याले.बसवेश्वर पाहिल्याबरोबर तसंच प्रधानमंत्री चांभारवाडीत आले म्हून."

"प्रत्यक्ष प्रधानमंत्री चांभारवाडीत आले म्हून झाला असन आनंद.प्रधानमंत्री चांभारवाडीत येणं शक्य गोष्ट नाही न."

"हं त्याच्याचमुळं आनंद झाला.त्याच्या स्वागतासाठी चांभारवाडीत उत्सव मनवला गेला.सारी चांभारवाडी तोरणं व पताकांनी सजवली होती.घरोघरी रांगोळ्या काढल्या गेल्या.चांभारवाडी मंगलवाद्याईनं गुंजारव करु लागली होती.तेथल्या बायाबी पंचारती घेवून त्याले ओवाळाले आल्या होत्या.जसा देवीचा उत्सव होता चांभारवाडीत."

"म्हंजे बसवण्णा भाग्यवान महापुरुषच समजावा तर...भाग्यशाली महापुरुष ालेच असा सौभाग्य प्राप्त होते.डोंगरकपारीतून उगम पावलेल्या नद्यांनी सागराच्या भेटीले जावं त्याचं दर्शन घ्यावं तशी ही जनता बसवाच्या दर्शनाले गेली.यात कायची चूक बसवाची?"

"मधुवय्या,तेच तं सांगतोय मी.बसवानं हरळ्याच्या थेट झोपडीत भेट देली.अकस्मात फिरणा-या साधूपरमानं बसवा दत्त म्हून हजर.तसंच त्या हरळ्याले कल्याणीअम्मा आन् बाकीच्या चांभारवाडीतल्या बायानं साथ देली.कुंकूम लावला.त्याची पंचारती ओवाळली.फुलं उधळली,जयजयकार केला त्याचा."

"म्हंजे मधुवय्यालेबी कधी अशी इज्जत भेटली नाय.त्याले तं देवासारखा पुजला म्हणायचा."

"हो तो प्रत्यक्ष देवच पुजल्यासारखा वाटला चांभाराईले."

"धन्य धन्य त्या बसवेश्वराची का त्याच्या आगमनानं चांभारवाडी पवित्र झाली."

"पुळचं तं आईका मधुवय्याजी,बसवा जवा झोपडीत गेला,त्या झोपडीत जाले बी रस्ता नोयता.वाकून जावा लागे तरीबी बसवा आतमंधी गेला.आन् त्यानं शरण मणत त्रिवार पायावर दंडवत टाकला.जवळच त्याचा पोरगा शिल्या आन् बायको कल्याणीअम्माबी होती.त्याईले बसवाचं दर्शन होताच ते रडू लागले.बसवेश्वराले ईटाळ बिटाळ होईन याचीबी तमा बाळगली नाय त्यानं.आन् थेट पायावर घातला साक्षात दंडवत!शिव शिव शिव.बसवण्णा बी ईटाळ न पाळता सिदा हरळ्याच्या झोपडीत शिरला.देवा तुच पाय रे बा लिंगेश्वरा."

"बापरे महाभयंकरच मणावं हे.......बसवण्णा प्रधानमंत्री असून त्याईले एवळीशीबी लाज वाटली नाय."

"हरळ्याच्या भक्तीनं त्या बसवाचे डोळे पानावले.त्यानंबी पायावर पडलेल्या हरळ्याले हात लावला.दोनबी हातानं त्यानं त्याले उठवला.आन् उलट त्यानंच तीनवेळा हरळ्याले नमस्कार केला.तोबी वाकून.एवळा मोठा प्रधानमंत्री असून.तुच्छ हरळ्याले त्रिवार दंडवत.छे!हे बसवाचं चुकलं नाय का?मित्रा हा त्या प्रधानमंत्री पदाचाच नाय तं समस्त मंत्रीपदाचा अपमान हाय का नाय."

"हो अपमानच.घोर अपमान.त्या बसवानं धर्म बाटवला."

"मधुवय्या,बसवा सोताले सुधारणावादी समजते.त्याचाच हा परीणाम.त्याचंच हे कडू गोड फळ.लहान माणसं मोठ्याईच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेत.पण इतं तं मोठ्याईच्या पावलावर पाऊल ठेवून न चालता बसवा हरळ्यासारख्या लहान माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून चालाले लागला.या बसवानं हरळ्यासारख्या सामान्य माणसाले डोक्यावर बसवलं प्रधानमंत्री असून.....याची दाद कोणाले मागावी ते कळत नाय."

"कोणाले म्हंजे?ब्रिज्वलाले मागावी."

"ठीक हाये,तु माह्या पाठीशीन रायशिन का?"

"ठीक हाये.याची शहानिशा झालीच पाह्यजे.नायतं हे प्रस्त कल्याण नगरीले कवा बरबाद करन ते सांगता येत नाय."

"हो मचण्णा,त्यापेक्षा हे प्रस्त आधीच हटवलेलं बरं.बसववण्णाले राजगादीवरुन ब्रिज्वलाले शिकायत करुन हटवाच लागन.नायतं समदा कल्याण डुबला म्हून समजा."

बसवेश्वराच्या वागण्याची कळत नकळत मधुवय्या मचण्णा सह संपूर्ण कल्याण नगरीला झळ पोहोचली होती.जो तो समोर नाही तर पाठीमागं या कृत्याची निंदा करीत होते.

आज गुलाबी गोव-या वेचत होती.उन्हाळ्याचे रखरखीत दिवस होते.मध्यान्हीवर आलेला सुर्य आपल्या तोंडातून जणू अंगार ओकत होता.माणूस आगीत जळून भष्मसात होईल जणू असंच वाटत होतं.रस्च्यावरुन चालक

चालतांना पाय भाजत होते.अशाच रखरखीत उन्हाच्या आडोशात तप्ततेची तमा न बाळगता गुलाबी गोव-या वेचीत होती.तिच्या पायात साधी चप्पलही नव्हती.ती चांभार असूनही.एवढ्या तप्त उन्हात पाय भाजत असतांनाही अति विश्वकोटीच्या दारीद्र्यामुळे अनवाणी पायाने चालत असतांना देवाला व दैवालाही दया येत नव्हती.

तिच्या अंतर्गत मनात ती दुःखी होती.उदरनिर्वाहासाठी तिला गोव-या वेचणे भाग होते.ज्ञानभटाची आठवण तिच्या मनात घर करुन होती.तसा ज्ञानभट बरेच दिवस होवूनही भेटायला आला नव्हता.त्याच्या वडीलानं तिच्यापासून त्याला वेगळं केलं होतं.त्या जुन्या दिवसाच्या रोमांचकारी आठवणीने ती आनंदीत होत होती.कधीकधी तिला ज्ञानभटाची आठवण यायची.कदाचित तो एक दिवस येईल भेटायला असे वाटत होते.अशीच एक दिवस ती गोव-या वेचत असतांना ज्ञानभट तिला भेटायला आला.तशी ती पाठमोरी होती.ती घाईघाईने गोव-या वेचत असतांना तो म्हणाला,

"गुलाबे,घाईघाईनं कोठं चाललीस?"

ज्ञानभटासारखा आवाज....ती विचार करु लागली.तशी पुन्हा ती गोव-या वेचायला लागली.तसा पुन्हा आवाज आला.

'गुलाबे ए गुलाबे.'

तसं तिनं मागं वळून पाहिलं.तसा पुढ्यात ज्ञानभट दिसला.तशी ती म्हणाली,

"आपण आणि माह्या मागे!"

"मंग मी कोणाच्या मांगं जावू."

"तुही मुसमुसलेली जवानी सोडत नाय मले.जरा थांबणं थोडुशी."

"मांग सांगतलं न.मी जवा घरी गेले.तवा तुमी माह्या मांगं आले का?तुमी आपल्या बापाले घाबरता.तुमच्या बापानं तुमचा कान पकळला आन् तुमाले घेवून गेले.जेथं तुमी सोताचं बापापासून रक्षण करु शकत नाय.तेथं माह्य रक्षण कोणापासून करान असं मले नाय वाटत."

"अवो,मा बाप तो..मोठ्या माणसाईची इज्जत करा लागते.आपल्या विजातीय पिरमाले मोठी माणसं तं रागावतीनच.मी रागावलो का तुह्यावर.तुह्याशिवाय मले झोप बी येत नोयती."

"मंग आणा ना एखादी बामण पोरगी.मणे झोप लागत नोयती.झोप जर लागली नसती तं दरोज आल्या असत्या मले भेटाले.एवळे दिस तळपत ठेवल्या नसत्या.मी किती तळपले एवळे दिस माईत हाय का तुमाले.मी जातपात न पायता मा जीव तुमच्यावर ओवाळून टाकला.तुमाले एकटं सोडलं नाय.तुमच्या हव्या त्या इच्छा पु-या केल्या.आन् तुमी....तुमाले एवळे दिसपर्यंत माही आठवच नाय आली.असं जर हाये तं त्यापरस बामणाच्या पोराईनं बामणाच्या पोराशीनच लगन करावा.मायबाप बी आठवण नाय.आन् पटकन लगन करता येईन.मीच जर बामणाची पोरगी का असते तं तुमी तं सोडा,तुमचा बा बी भेटाले आला असता आन् आपलं लगन करुन देलं असतं."

"मले माफ कर गुलाबे एवळा इलंब झाला."

"माफीचा सवालच नाय उरत.मी कोण हाये तुमाले माफ करणारी.मी का बामण पोरगी होये!मी तं चांभारीन जातीची.आमी तुमच्या इशा-यावर चालणारे प्याधे.आमा दलिताईले आमचे सोताचे इचार तरी रायतेत का?तुमी बोलायचे आन् आमी नाचायचे.नाय नाचलं तं उरावर चाबूक. एक नाय कित्येक.एवळंच आमचं अस्तित्व.म्हूनच तुमी एवळे दिस आले नाय न."

"अं तुह्य मणणं बराबर हाये.पण मले मा बाप मुर्ख मणते.दगड मणते.खरंच बामणाची पोरगी बी भेटली असती का मले.बामणाची पोरगी मले भेटणं म्हंजे सुर्य पुर्वेकडून पश्चिमेकडे मावळणं हाये."

"म्हून मी भेटलो का पकडाले."

"शंभर मुली बामणाच्या एका पारड्यात ठेवल्या आन् दुसरीकड तुह्य सौंदर्य ठेवलं तं तुह्या सौंदर्याचं पारडं खाली झुकन."

"माह्य पारडं झुकन असं वाटते का तुमाले?"

"हो तसंच वाटते मले."

"तुमी माई मजा घेत हा का?"

"नाय गुलाबे,मी मजा घेत नाय."

"जातीची पोरगी शोधाची सोडून माह्या पाठीमांगं लागले तुमी.चांभार जातीच्या पोरीयसंगं लगन करणं हा मुर्खपणा नाय का?"

"तसं जर वाटन असन तुले तं मी मुर्खच हाये असं समज."

"म्हूनच तं सांगतो का बामणानं माह्या नाद सोडून देणं चांगलं.प्रत्येक जातवाल्याईनं आपली पायरी सोडू नये म्हंजे झालं."

"का मी तुले आवडत नाय का?"

"तसं नाय ज्ञानभटा,जात आडवी येते म्हून म्हंतो."

"पिरमाले जात नसते.पिरम पिरम रायते.संस्कृतीच्या प्रत्येक ग्रंथायमंधी मी हे वाचलो.मले या पिरमासाठी मा जीवाचीबी पर्वा नाय..भ्रमर कमळापाशी जातानी कधीच आपल्या जीवाचा पर्वा करत नाय."

"पिरमाले जात नाय रायत असं आपण म्हंता.पण मले सांगा, याले इतिहास हाये का?"तुमी तं बामणाची पोरं.तुमाले तं धर्मग्रंथ वाचता येते.तुमच्या धर्मग्रंथवाचनात अशी पिरमाची प्रकरणं वाचली नाय का?त्यात काई पुरावा सापडला का?"

"अवं पिरमाले पुरावा हाये न पुराणात.शांतनू राजाने कोळी जातीच्या मत्सकन्येशी इवाह केला होता.मले सुद्धा शांतनूच्या पावलावर पाऊल टाकाचा हाये.गुलाबे,करशिन का माह्याशी लगन."

"मी तयार हाये हो लगनाले.......पण आधी तुमी तुमच्या बापाले इचारा.कारण तुमी बामणाची पोरं.तुमचा बाप तयार होईन का,का माह्याच जीव घेईन.का तुमाले आन् मले सुळावर चळवन."

"मंग चढवू दे सुळावर.मी तुह्यासाठी सुळावरबी चळाले तयार हाये."पण मले तुच पाह्यजे समजलं.आन् माह्या बाप देईनच होकार.न द्याले का झालं."

"आन् नाय देलं तं."

"आन् नाय देलं तं संगमेश्वराच्या देवालयात आपून एकमेकाईच्या गळ्यामंधी हार टाकून लगन करुन मोकळे होवून जावून."

"लोकं का मणतीन आपल्याले?जातीचा कायदा मोळला म्हून लोकं वाळीत टाकतीन नाय का आपल्याले."

"त्याची चिंता कायले करतेस.काई दिसानं मा बापच तिर्थमंत्रानं शुद्ध करुन आपल्याले जातीत मिळवन.देवाचा अंगारा लावला का समदं पवित्र होते मालूम हाय का तुले."

"पण मी लोकाईचं मणणं सांगतलं."

"लोकं तं माह्या बापाच्या मणण्यावर खुश हायेत.माह्या बापाच्या तोंडाले तोंड द्याची कोणात हिंमत हाय का?"

"पण ब्रिज्वल दरबारी मालूम झालं तं."

"अव ब्रिज्वल दरबारीबी माह्या बापाची शान हाय.तसा माह्या बाप गावून जवा आला.तो थेट ब्रिज्वल दरबारात पदावर चळला.माई माय तं मणते का मा बाप ब्रिज्वल दरबारी कोणत्या तरी पदावर हाये म्हून.मले नाय मालूम कोणतं पद हाये तं.बहुतेक मंत्रीच हाय वाटतं."

"अवं पण मी चांभारीन.चांभाराईच्या सावलीनं तुमी इटाळता.मंग लगन झाल्यावर तुह्या बापाचं मंत्रीपद जाणार नाय कशावरुन?तुमच्या बापालेबी वाळीत टाकतीन."

"नाय नाय.अवं तसं जर झालं तं संगमेश्वराची पुजा कोण करन?"

"ठीक हाये,तसं जर हाये तं मी बी मा आजीले इचारतो.आन् मंग सांगतो तुमाले."

"त्यात का इचाराचं?तुया आजीलेबी आनंद होईन म्हंतो."

"माई आजी खरंच परवानगी देईन असं वाटते का तुमाले.एक प्रकारचा तुमचा बाप परवानगी देवून देईन.पण माई आजी परवानगी देणार नाय."

"अं,मंगची मंग पावू.आधी इचार तं खरं आपल्या आजीले."तसा पुरता निरोप घेवून ती जावू लागताच तो म्हणाला,

"अहं अशीच जातेस."

"मंग का करु.लय येळ झाला न."

"ते मांगच्या मधूरमिलनाचं कसं.बरेच दिस झाले ना."

"नाय नाय.आतं प्रत्यक्ष आपल्या मायबापाले इचारु.मंगच बाकी समदं.तसं आजकाल मले मळमळाले लागलंय."

"म्हंजे?"

"उलट्या बी व्हाले लागल्यात."

"म्हंजे?"

"म्हंजे,म्हंजे समजत नाय कावो तुमाले.म्हूनच तुमाले मुर्ख पंडीत मणतेत.तुमचा बा मुर्ख मणते."

"मी नाय समजलो."

"अवं मले दिस गेलेत.मी तुमच्या बाळाची आई होईन कदाचित असंच वाटतेय.आतं तरी आपल्याले लवकर लगन कराच लागन."

ज्ञानभट पुरता घाबरला होता.त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटत होती.कारण त्याला माहीत होते की असं जर झालं तर समाजात फार बदनामी होणार.शिवाय तो संगभटाला अतीव घाबरत होता.मग बापही आपल्याला गुलाबीशी विवाह करतांना रागवेल असं वाटत होतं.पण आव आणत तो म्हणाला,

"अवं हे तं आनंदाची बाब हाये."तशी ती म्हणाली,

"त्या दिशी तपासलं मांगीननं."

"का मणे मांगीन."

"मांगीन मणे कावीळ झाला असन म्हून.तिले का माईत का कुवा-या पोरीले दिस गेले असन म्हून.पण मले वाटते का मले दिस गेले असन."

"हा कावीळच निघाले पाह्यजे."

"म्हंजे?"

"अवं कुवारपणी गरोदर.आयकाले कसं वाटते."

"अान् कुवारपणी मधूरमिलन आयकाले कसं वाटते.ते कशासाठी होतं?"

"नाय आपण लगन करणार हावो न."

"पण आतं झालं का लगन."

"नाय,पण लवकरच करणार हावो न आपण लगन."

"लगन झाल्याशिवाय माणसाईनं पोरं पैदा करु नये.नायतं कुवारी माय म्हून लोकं वाळीत टाकतेत.लोकं कुल्था मणतेत."

"तुले मनाचं हाय का आतं आपलं मधुर मिलन लगनानंतरच."

"असं नाय,हा देह तुमच्यासाठीच सदान् कदा हाजीर हाय.पण सांगा तुमी माह्याशीनच लगन करान न."

"का नाय करीन तुह्याशी लगन."

"नक्की न."

"हो हो नक्कीच."

तसा त्यानं तिचा हात हातात घेतला.विवाहाचं नेहमीसारखं आश्वासन दिलं.जवळपास कोणीच नाही याचा अंदाज घेतला.तसं तिला त्या जंगलातील निर्मनुष्य असलेल्या झाडीत नेले आणि मधूर मिलनाच्या नावाखाली सुखद बलात्कार केला.तसा तो बापाला चोरुन नेहमी नेहमी तिला भेटतच होता.विवाहाचे आश्वासन देतच होता व वारंवार बलत्कार करीतच होता.त्यामुळे ती केव्हा गरोदर राहीली व केव्हा तिला दिवस गेले ते तिलाही कळलेच नाही.



बसवेश्वर हरळ्याच्या झोपडीत आल्यापासून हरळ्या नेहमी चिंताग्रस्त अवस्थेत राहायचा.बसवेश्वर प्रत्यक्ष त्याला परमेश्वर वाटला होता.आपण एकदाच नमन केले,पण बसवेश्वराने तिनदा नमन केले.बसवेश्वराचे हो शिरसाष्टांग नमस्कार घालणे हे हरळ्याला कर्ज घेतल्यासारखे वाटले.आपण दलित पण तो सवर्ण बामण असूनही शिवाय राजाचा प्रधानमंत्री असुनही बाकीचे काही म्हणतील याचा विचार न करता तीन वेळा बसवेश्वराने घालणे हरळ्याला टोचल्यासारखे वाटत होती.तसं सेवेचं व्रत घेतलेली माणसं ती जन्माने दलित का असेना,पण कधीही कोणाचे कर्ज उरावर ठेवत नसत.बसवेश्वरासाठी काय करता येईल याचा विचार तो पदोपदी करीत होता.आजुबाजूला चामड्याचे काही तुकडे पडलेले होते.त्याकडे एक शुन्य नजरेने तो पाहात होते.त्याचं बसवेश्वर गेल्यावर कोणत्या कामात मन लागत नव्हतं.पश्चातापाच्या अग्नीत होळपळत असतांना त्याला त्याची पत्नी कल्याणी अम्मा म्हणाली,

"कसला इचार करताय."

"इचार मोठा बाका हाये."

"पण कोणता इचार हाये मनात ते तरी ओठावर येवू द्या."

"इचार करतो बसवेश्वराचा."

"बसवेश्वराचा म्हंजे?"

तिच्या मनात पडलेला प्रश्न स्वाभावीक होता.बसवेश्वराने असे काय केले?असे तिला वाटत होते.जोडे चपला शिवत असतांना हरळ्याला विचार येत होता.बाजूला चामडे भिजविण्याची कुंडी होती.त्या कुंडीत चामडं पकविण्यासाठी टाकलं होतं.तसा मनातल्या मनात तो बरळतही होता.

बाराव्या शतकाच्या बसवा,तु उद्धारक हायेस.केवळा तुनं त्याग केला हाये.केवळी तुही धर्मभावना हाये.जातीधर्माचा त्याग करण्याचा मोह तसंच जातीभेदाले मुठमाती द्याचं वज्रासारखं काम बसवा तुच करु शकतो.तुह्या कुरपेनं या दलित जातीचा उद्धार होत हाये.तुह्या जयजयकार असो."

तसा तो एकटाच बरळत असतांनी कल्याणीअम्मा त्याला म्हणाली,

" कोणाचा जयजयकार करता?"

"आणखी कोणाचा?"

"कोणाचा ते आमाले बी कळू द्या."

"बसवदेवाचा करतोय जयजयकार......अवं बसवेश्वर आपल्या दलित वस्तीत आला तो आपला देवच का नाय.सद्गुणांचा मुर्तीमंत सागर हाय तो.सा-या आयुष्यभर त्याच्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो."

"अहो आपण ऐहिक सुख सोडून एवळा मोठा संसार सोडून त्या बसवाच्या मांगं राहाचं का?"

"हो."

"पण बसवेश्वराच्या मांगं रायल्यानं आपला पोट भरन का?"

"पण आपून दीन दलित माणसं,आपल्याले मंदीरपरवेशाची परवानगी नाय.तरीबी देव आपल्या पाठीमांगं हाये का नाय."

"कसा?"

"अवो आपल्याले कोणत्यातरी गोष्टीची गरज पल्ली का?नाय न."

"हो तुमचं बी मणणं बराबर हाय."

"अवं प्रत्यक्ष बसवेश्वरच देव हाय."

"कसा का?"

"अवं देव भेदभाव करत नाय.देवाच्या मनात कपट राहात नाय.हे तुले मान्य नाय का?"

"हो मान्य."

"आपला स्पर्श उच्चजातीले झाला तं इटाळ होते हे मान्य हाय का नाय."

"हो हे बी मान्य."

"मंग उच्चजातीतले माणसं आपल्या वस्तीत येतेत का?"

"येतेत न."

"अवं मी तसं नाय मणत."

"मंग का म्हंता?"

"उच्चजातीचे माणसं आपल्या झोपडीच्या अंदर कधी आले का हे म्हंतो."

"नाय,नाय आले कधी."

"पण बसवेश्वर आलेत.हो ना."

"हो."

"मंग बसवेश्वर उच्च जातीतले का नाय."

"हो."

"मंग त्याईनं भेदभाव पाळला का?"

"नाय."

"मंग देव भेदभाव पाळत नाय.बसवेश्वरानंबी पाळला नाय."

"हं बसवेश्वर देवंच.पण धनी मले ते समजलं नाय."

"अवो,अरळलिंगेश्वरानंच प्रत्यक्ष बसवेश्वराच्या रुपात जनम घेतला असं समज.मी दरोज या अरळलिंगेश्वराची पूजा करतो,म्हून देव रुपात बसवेश्वर आला आपल्या घरात."

"पण मले एक नाय समजलं का हे उच्चवर्णीय माणसं आपल्या घरात येवू देत नाय.तरीबी मंदीरातल्या देवाची आपण घरी पूजा का करत असन."

"मले इचार येते नेयमी का मा बाप नरसय्या या लिंगेश्वराले पुजाचं का सांगून गेला.मणे लिंगेश्वराले सोडशीन नोको."

"म्हून करता लिंगेश्वराची पूजा."

"आन् त्या लिंगेश्वरानं प्रत्यक्ष रुपात दर्शन देलं आपल्याले."

"हो आन् तुमच्या चरणावर त्रिवार दंडवत."

"साक्षात तुमीच देवाचे सच्चे भक्त हात."

"पण त्याईच्या त्रिवार शरणानं आपल्यावर लय कर्ज झालं हाये."

"मंग हे कर्ज कसं उतरंवायचं आपण?"

"आपल्याले ते नाय जमायचं म्हंतो.हा जनमाले आलेला देह एवळ्या संकटात घालाची हिंमत होत नाय."

"येडी हाय तु कल्याणी.झालेलं कर्ज चुकवा तं लागनच न."

"हो ते बी बराबरच."

"त्या नागपंचमीच्या दिवशीचा परसंग आठोते का तुले?"

"नाय आठवत बा."

"हादरवून सोडणारा परसंग."

"आठवण करुन द्या म्हंजे आठवण."

"त्या अरळलिंगेश्वराची पूजा करतानी नागानं दंश करु नये म्हून त्या दगडाच्या नागाची पूजा केली."

"हो.....पण बसवेश्वरानं भेदभाव केला नाय.तो सरळ आपल्या घरी आला.मले तं त्याईचं कर्ज उतरवून त्याईच्या कार्यात सहभागी व्हाले आवडन.बसवेश्वराच्याच सल्ल्यानं मले बंड उभाराचं हाये अस्पृश्यतेबाबत.अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाह्यजे.तु माह्या कार्यात सहभागी होशीन का?"

"धनी हे का इचारता?मी तुमची पत्नी हाय.मले तुमच्या कार्यात सहभागी व्हाच लागन.त्याशिवाय मी तुमची बायको कसली?"

"पण."

"पण का धनी?तुमच्या पवित्र झेंड्याखाली मले देखील माह्या देहाचा लोभ दूर करुन तुमच्या कार्यात सहभागी झालं पाह्यजे.आपल्या पतीच्या पाठोपाठ जाणं हाच स्रीचा सतीधर्म हाये.मी जर तुमच्या कार्यात सहभागी झाले नाई तं.तो इतिहास बनन.माह्या ह्या जगण्याले कलंक लागन.आपल्या चांभारवाड्यातली पुळची पिळी मणन का कल्याणीनं हरळ्याचा जीव घेतला.त्याले त्याईच्या कार्यात मदत केलीच नाय म्हून.तुमी मा सारख्या अनाथच स्रीले सन्मान मिळवून देला.मले स्रीसारखं वागवलं.माह्य सुख दुख तुमी आपले समजले.माह्या दुखाचं निरसन तुमी केलं.आन् मी तुमच्याशी बेईमानी करु म्हंता."

"व्वा कल्याणी व्वा.तुले थोरच म्हणा लागन.आजपर्यंतच्या स्रीया असं नव-याले साथ द्याले मांगं पुळं पाह्यतेत.अवो द्रोपदीनं तरी तिच्या अपमानाचा बदला घ्यासाठीच आपल्या पाच पतीले युद्ध कराले लावलं.सोता लढली नाय.पण तु......तु तं अस्पृश्यता मिटविण्यासाठी सोता सहभागी होवून लढाले तयार हायेस मा बरोबर.व्वा कल्याणी व्वा.तुया इतिहास पुळच्या पिळीत सुवर्णअक्षरानं लेहल्या जाईन."

"हो हो आठोते.आन् हे बी आठोते का त्या दिशी खरा नाग जवा वारुळातून निगाला,तवा त्या नागाले माराची इनंती मीच केली."

"या नागाच्या देहाची तुले भीती वाटली नाय का?"

"बराबर."

"मंग मी त्या येळी मणलं."

"का मणलं आठोत नाय."

"सच्चा मानव तोच जो जहरबी देणा-याले दूध पाजते."

"तु भेव वाटून नोको घेवू.आन् आपल्या शरीराचा लोभ बी नोको करु.असं मणून मी सापाले पकळलं.आन् साप नरम झाला.मंग मी त्याले सोडून देलो.मंग तो निगून गेला.हे समदं आठोते का तुले."

"हो हो,समदं आठोते.हा नागाचा मयमा.त्याले बी उचनीचता कळत नाय.पण या माणसाईले उचनीचता कळते.अवं त्यानं दलित म्हून आपल्याले चावा घेतला असता.......पण त्यानं धर्म पाळला.जात नाय पाळली.पण ह्या माणसाले....त्याईची एवळी मदत करुनबी जहरच उगलतेत.आपल्याले दसाले धावतेत.हा भेदभाव नाय का?"

"तसं पाह्यलं तं आपला शिल्या लय मोठा झाला.आतं त्याचं बी लगन आटपवून संसाराची जबाबदारी त्याचेवर सोपवावी.आन् आपण सोता धर्मकार्य व अस्पृश्यता निवारण्याचं काम करावं."

"खरं हाय तुह्य मणणं.पण मले तं झोपच येत नाय.पश्चातापाच्या आगीत मी जळत हाय.बेचैन झालो हाय मी."

"कायनं बेचैन झाले हा तुमी?मले कारण तरी कळू द्या.मी मदत करीन तुमास्नी."

"अवं मदतीची गोष्ट नाय.पण तुले बी मालूम पाह्यजे म्हून सांगतो.त्या दिशी बसवेश्वरानं आपल्या झोपडीत प्रवेश केला नव्हं."

"हो माईत हाय.आन् हे बी माईताय का तुमी त्याईले एक येळ दंडवत घातल्या आन् त्याईनं त्रिवार घातलं."

"हो त्याच तं आगीत होरपळतो मी.त्याच तं आगीत जळते मा जीव.वाटते हे कर्ज कसं उतरन."

"केवळी थोर व्यक्ती.तुमच्या सारख्या शुद्र माणसाले बसवण्णासारख्या महान विभुतीनं त्रिवार शरण घातलं."

"प्रत्यक्ष रवीराज्यानं काजव्याच्या भेटीले जावं तसा तो प्रसंग होता.वरुन त्या काजव्यालेच प्रकाशाचं दान देणं म्हंजे रवीराजाचं ऋण नाय का?रवीराज्यानं आपल्यावर कर्ज केलं हाय.त्या ऋणातून मुक्त होणं हा कल्याणाचा मार्ग हाय.पण उपाय सुचत नाय.मले कल्याणी काईतरी उपाय सुचव यावर."

"यावर एखादा चांगला जोडा तयार करुन तो उपहार म्हून द्यावा बसवेश्वराले."

"हो,तुह्य बी मणणं बराबर हाय.तो आपल्यासाठी प्रत्यक्ष देवच हाय.त्याले या प्राण्याईच्या कातड्याचे जोडे शोभा देतीन का?आन् हे प्राण्याईच्या कातड्याचे जोडे आपल्याईले ऋणातून मुक्त करतीन का?नाय करणार.त्यासाठी आपल्या देहाचंच कातडं कापा लागन.त्याशिवाय हा देह ऋणातून मुक्त होणार नाय.अवं आपल्या देहाचा लहानसा अंशही आपल्याले त्याईच्या ऋणातून मुक्त कराले कारणीभूत ठरन.मंग का कराचं कल्याणी?तुह्यी लहानशी सुचना बी या घडीले गोडच वाटन."

"मी देलेली सुचना तुमाले आवडन का?पण मी बी शिवभक्त हाय तुमच्यासारखीच.या शिवभक्तीले कायपण तोड नाय.तुमी बी माई परीक्षा पावू नोका.बसवेश्वराच्या जोड्यासाठी मी माह्या देहाची आसक्ती सोडली.मी म्हंतो का त्या बसवेश्वरासाठी आपण आपल्या मांड्यांच्या कातळ्याचे जोडे बनवले कम.किती लय चांगलं होईन.माह्या डाव्या मांडीचं कातळं आन् तुमच्या उजव्या मांडीचं कातळ.ते कातळं कापून घ्या आन् त्याले कुंडात पकवून त्याचे जोडे बसवदेवासाठी बनवा.म्हंजे समदं ऋण पुर्ण एका झटक्यात उतरुन जाईन.प्राण गेला तरी मी दुःखी होणार नाय."

"काय मांडीचं कातळं मणतेस तू?"

"हो हो,मांडीचं कातळं.तुमीच मणलं होतं न का बसवेश्वारासाठी मांडीचं कातळं.देह बी अर्पण कराले तयार."

"हो,मणलं होतं......म्हून का मांडीचं कातळं का?"

"त्या महात्म्याले अर्पण करायसाठी आपल्याजोवर आपल्या मांडीच्या कातळ्यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी वस्तू नाय.काया,वाचा आन् मनानं वाह्यलेली वस्तू बसवेश्वराले पावन होईन."

"धन्य हायेस कल्याणी,धन्य हायेस तु.चल आपण आपल्या कार्याले लागून....येदना गिळून."

"चाला तं,तुमच्या कार्यात मी बी सहभागी हाये."

उभयग्रस्तांनी आपल्या मांडीचे कातळे काढून त्यांचे जोडे बनवून वाहण्याचा निर्धार केला.हरळ्यानं रापी आणली आणि त्याने मांडीच्या वरचे चामडे कापले.गुंगीचे औषध घेण्याचे तंत्र त्या काळात विकसीत नसल्याने मांडी कापतांना हरळ्याला फार त्रास झाला.पण बसवेश्वर रुपात अरळलिंगेश्वरच आपल्या घरी चालून आल्याचे लक्षात घेवून ते दोघेही आपआपल्या मांडीचे कातळे कापत होते.आपल्या मांडीचे कातळे कापून झाल्यावर ती रापी हरळ्यानं आपल्या पत्नीच्या हाती दिली.तशी ती आपल्या हाताने आपल्या मांडीचे कातळे कापू लागला.कापतांना मात्र तिचे हात थरथरतही नव्हते.

मांडीचे कातळे कापून झाले होते.तसा शिलवंत तेथे पोहोचला.त्याने बाबाकडे पाहिले.तसा तो म्हणाला.

"बाबा,काय झालंय."

हरळ्या शिलवंताच्या प्रश्नावर काहीही उत्तर देवू शकला नाही.तो वेदनेने तळपत असूनही ती गोष्ट शिलवंताला माहीत होवू नये याचा विचार करुन गप्प होता.तसा तो आपल्या आईला म्हणाला,

"अम्मा,का झालं अप्पाले.आन् तु बी का येदनेनं अशी तळपत हायेस."

तशी कल्याणीअम्मा वेदनेने तळपत असतांना बोलली,

"अरे तुले आमच्या येदनेचं का कराचं?तु लान हायेस अजून."

"आन् तुमी दोघानबी आपली एकेक मांडी का बांधली?का झालं?......झालं तरी का?"

"अरे,त्या दिशी बसवेश्वर आपल्या वस्तीत आलते का नाय."

"हो,आले मंग....."

"त्याले तुह्या बापानं शरण घातलं का नाय."

"हो,घातलं मंग."

"मंग बसवेश्वरानं तुह्या बापाले त्रिवार शरण घातलं."

"हो,मंग."

"त्यानं आपल्यावर ऋण चळलं का नाय."

"हो,चळलं.मंग......"

"त्याची परतफेड चुकवासाठी म्हून पोरा आमी दोघानबी आपआपली मांडी कापली.तुह्या बापानं उजवी आन् मी माह्या डाव्या मांडीचं कातळं कापलं."

"पण कायले कापलं अम्मा मांडीचं कातळं?"तो रडत म्हणाला.

"पण पोरा तु का रडते?"

"तुमचा त्याग पावून.पण तुमी का कापली मांडी?"

"अरे तो बसवेश्वर आपल्यासाठी देवच का नाय."

"हो देवच तर.......तसे बाकी लोकं आपल्या घरी काम पल्ला तं येतेत.पण घराच्या अंदरमंधी येत नाय.बसवेश्वरजी घरात आले म्हून एवळा त्याग!पण बा तो माणूस हाये.देव नाय."

"अरे,तो देवच.अरळलिंगेश्वराच्या रुपानं घरात आला.रोज पूजा करते न तुहा बाप त्या लिंगेश्वराची.म्हून देवच परगटला अरळलिंगेश्वराच्या रुपानं."

"आतं या कातळ्याचं का करणार तुमी?"

"आमी त्याचे जोडे बनवणार हाओत.आन् ते बसवेश्वराले पायात घालाले दान देणार हाओत.ते जवा पायात घालतीन तवा पटकन आमच्या आंगावरचं ऋण चुकतं होईन.आन् आमालेबी समाधान लाभन."

"अम्मा हे गोष्ट मले बी सांगतली असती तं मी बी नाय का माह्या मांडीचं चामडं देलं असतं.मी बी शिवभक्त हाय.शिवाची भक्ती माह्यात बी कुटकुटून भरली हाय.त्या थोर विभूतीसाठी मी बी माह्या देहाचं बलिदान देलं असतं.आन् मीनं माह्या देहाचं बलिदान देल्यावर मी सोताले धन्य समजलो असतो.अम्मा तुमी फार मोठी चूक केली."

"पोरा,आमी वाळलेली माणसं,पिकलेली पानं आमी.आमी कवा गळून पडून याचा नेम नाय.तुले सांभाळाचं हाये घर.आमच्यानंतर......फक्त तु लवकर लगन कर.तुह्याच लगनाची तेवळी चिंता हाय आमाले."

हरळ्या आणि कल्याणीनं आपआपल्या मांड्यांना झाडपाला कुटून कुटून लावला होता.धोतराच्या सोग्यानं आपल्या मांडीचा भाग बांधून टाकला होता.महाभयंकर वेदना होत होत्या.पण ह्या वेदना तेवढ्या तीव्र नव्हत्या,जेवढ्या वेदना कापतेवेळी झाल्या होत्या. मांडीचं कापलेलं कातळं कुंडीत पकवण्यासाठी भिजत टाकलेलं होतं.

दररोज ते जखम धुवून त्याला त्या झाडपत्त्यांचा लेप लावत असत.आज त्यांचे घाव सोकत आले होते.जणू परमेश्वर कृपेने लवकर घाव सोकले असा त्यांचा समज होत होता.पण घाव सोकले असले तरी व्रण मात्र शिल्लक होते.कधीकधी शिलवंत त्या मांड्यांना पट्ट्या लावून देत असे.

दररोज सकाळी उठून अरळलिंगेश्वराची पुजाविधी आटोपून उरलेला वेळ समाजासाठी तसेच बसवाच्या कार्यासाठी हरळ्या देत असे.काही वेळ जोडे बनविण्यासाठीही खर्ची घालत असे.आज त्याने आकर्षक जोडे बनवले होते.

मांडीचे घाव जरी सोकले असले तरी आज ते व्रण हरळ्याला बसवेश्वराची आठवण देत होते.चांगले पाँलिश करुन रंगरंगोटी करुन त्याने आकर्षक जोडे बनवले होते.त्याला बसवेश्वर म्हणजे समाजातील विषमता दूर करणारा व्यक्ती वाटत होता.त्याला स्वतःबद्दल हिनता वाटत होती.बसवेश्वराचे चांभारवाडीत येवून जाणे म्हणजे पुर्ण अस्पृश्यांवरील कलंक मिटणे असे त्याला वाटत होते.तसा जोड्याकडे पाहात शिलवंत म्हणाला,

"अप्पा,जोडे तयार झाले.कसे चकाकत हायेत."

"हो पोरा."

"आन् तुमचे या जोड्यायबराबर घावबी सोकल्यासारखे दिसत हायेत."

"हो."

"पण अप्पा,हे व्रण मात्र बसवेश्वरजीची आठवण नेयमी देत रायतीन."

"हो पोरा."

"हे जोडे किती सुंदर दिसत हायेत."

"पोरा,हे जोडे आमच्या मांडीच्या कातळ्याचे हायेत माईत नाय का तुले."

"हो ना अप्पा."

"यात येदना दडली हाये आमची.जणू प्रभूकुरपा दडली हाये त्यात.याची सर तरी कोणाले येईन का?हे जोडे म्हंजे भक्ती,श्रद्धा,त्याग याईचं मिश्रण.बसवेश्वराले दान द्यासाठी आन् ऋण चुकवायसाठी बनवले हे जोडे.बसवदेवाच्या पायात किती चांगले दिसतीन हे जोडे.याची कल्पना हाये का तुले.माह्याच्यानं तं याची कल्पनाच करवत नाय."

"आन् याले बांधाले अप्पा,रेशमी वस्र कोठाय?"

"हाये न रेशमी वस्र बी हाये.तुह्या अम्मापाशी हाये.धुवून ठेवले हायेत."

"हे आणले धुवून आन् वाळवूनबी रेेशमी धागे."कल्याणीअम्मा मधातच म्हणाली.

"तुह्ये घाव सोकले का अम्मा?"

"हो.बसवेश्वराले अर्पण केलेल्या या मांडीच्या कातड्याचं सोड.या मांडीचा त्रास अरळलिंगेश्वराच्या कुरपेनं कमी हाय.जगात यापरस श्रेष्ठ त्याग कोणताच नसन."कल्याणीअम्मा म्हणाली.

"अप्पा,माह्या मांडीचे कातडे कापले असते तं."

"पोरा,या दुःखाचा वाटेकरी कराची इच्छा नोयती माही.आता आमी एखादी पोरगी पावून तुही चिंताच दूर करुन टाकतो कायमची.तुह्य लगन झालं का मी मोकळा म्हून समज."

"बसवेश्वर रायतीन का मा लगनाले हजर."

"ते मोठी मंडळी,आपून लान माणसं पोरा,त्यातल्या त्यात आपून अस्पृश्य......जातीनं चांभार.चांभारडे म्हून शिवा हाणतेत ते उच्च जातीचे लोक.चांभाराच्या लग्नाले साधा बामण येत नाय.आन् तु त्या बसवेश्वरासारख्या प्रधानमंत्र्याची गोष्ट करते.अरे पोरा,त्या दिशीच तं आला आपल्या झोपडीत तं लय उपकार झाले.तेच उपकार लय समज.ते तं सोड.बसवेश्वराले मी एकदाव दंडवत केलं.तं त्यानं त्रिवार केलं.खरं तं पोरा आपून त्याईले दंडवत कराले पाह्यजे.कारण आपून अस्पृश्य असल्यानं त्याईचा दंडवत घ्याची लायकी नाय आपली."

"ते येणार नसन तं मी लगनच करणार नाय.आपून चांभार म्हून जनमाले आलो तं त्याचं काय एवळं.शिवभक्त हाओ नं आपून.....अप्पा,जातीच्या निकषानं कल्याणमधली माणसं का मोजता येतेत.देवाले समदी माणसं सारखी नसावी का?शिवाय तुमीच तं म्हंता,बसवेश्वर देव हाये मणून.आन् त्याले देव समजून येदना होत असतांना बी तुमी मांडीचं कातळं कापलं.आन् त्याचे जोडे वायणार हात बसवेश्वराले.मंग एवळा समदा त्याग केल्यावरबी बसवेश्वरजी आपल्या लगनाले येणार नाय तं कमालच झाली मनाची."

"खरं हाय तुह्य मणणं.पण पोरा,आपल्या मनात बदल्याची भावना असूच नये.आपण जो काई त्याग करतो,त्याची अपेक्षा ठेवली तं देव पावत नाय म्हून समज."

"बाबा तुमी मणता ते बराबर.पण....."

आतं फक्त एकच चिंता हाय पोरा,तुयासाठी जातीची पोरगी पावून तुह्य लगन लावून देलो म्हंजे माह्यी चिंता मिटली म्हून समज.मंग बसवेश्वर तुह्या लगनाले येवो अगर न येवो."

"अप्पा,मा लगनासाठी कोणतीच पोेरगी पाहाची गरज नाय."

"का बरं पोरा,तुले लगनच कराचं नाय का?"

"नाय तसं नाय मणत मी.मी म्हंतो.......मी सांगू तरी का तुमाले."

"सांग निःसंकोेच सांग.आमी कायपण तुले मणणार नाय.तु मणशीन ते करुन आमी.सांग भेवू नोको."

"अप्पा,मी वनजेशीन लगन करीन म्हंतो."

"वनजा!वनजा कोण रे बाळ?"

"वनजा......मधुवय्याची पोरगी."

"मधुवय्या कोण रे बाबा?"

"मंत्री हाये मणे तिचा बाप दरबारात."

"छे!का बरळतेस तु?"

"नाय माह्य तिच्यावर पिरम हाय."

"पिरम!पिरम टाक धोड्यात.आपण चांभार.आपल्याले समाजाची बंधनं पाळली पाह्यजेत.असला अइचार करु नोको बेटा.समाजाची बंधनं तोडणं अशक्य गोष्ट हाय."

"कायची अशक्य गोष्ट हाये अप्पा.आपून जर का या समाजाच्या जाचक बंधनाईले इरोध केला तं कदाचित याचा इतिहास बनन.तो समदा पुळच्या पिळीले कामात येईन.पुळची पिळी तोच शब्द दोहरावन.असं नाय वाटत का तुले."

"म्हून का तु त्या वनजेशिन लगन करीन म्हणतेस.अरे बेटा,ते मंत्र्याईची पोरगी.मंत्री ही असा,जो लय भेदभाव पाळते.तो तं तुही तक्रार ब्रिज्वलाजोवर करन आन् तो राजा तुयासकट आमालेबी मारुन टाकन पोरा.तो नाद सोडून दे.ते केल्यानं काई भलं होणार नाय."

"पण अप्पा,ते वनजाच माह्याशीन लगन कराले तयार हाये."

"तं तिले समजव पोरा,यात काईएक ठेवलं नाय मणावं.तुह्य पिरम सत्य हाय.पण तिले असं पिरम करणं सोड मणावं.आजच्या या बिरादरीले चालत नाय मणावं.पोरा,जर या पिरमाबद्दल त्या मधुवय्याले माईत झालं तं तो आपली बिरादरीच नष्ट करुन टाकन.तुह्य मंग पिरम सोड,तुह्या पिरमाचीच ऐसीतैशी करुन टाकन.आतं तरी सावध हो पोरा."

"पण अप्पा,आतं ते येळ निगून गेली हाये.आमी जीवभर पिरम करतो एकमेकाईवर.आमी आतं एकमेकाईले सोडू शकत नाय."

"पोेरा जातीचेबी काई नियम रायतेत.त्या नियमाले जरा पाळा लागते.ते नियम मोडले तं शिस्तभंगाची कारवाई होते.दंड आन् सजाबी होते.कधीकधी वाळीत बी टाकल्या जाते.कोणी मंग आपल्याशीन बोलत नाय."

"वाळीत म्हंजे?"

"अरे आपल्याले एकट्या घरानं टाकतेत.खुद आपल्याच बिरादरीतले लोक आपल्या घरी येत नाय.आपल्यालेही त्याईच्या घरी येवू देत नाय.आन् गेलो तं आपल्याच बिरादरीतले लोक आपल्याशीन भेदभावानं वागतेत."

"टाकू दे टाकलं तं वाळीत अप्पा,त्याईची आपून पर्वा कराची नाय.मी माह्या जनमापासूनच याचा इचार करत हाये.पण मार्ग सापडत नोयता.अप्पा,बसवेश्वर सुधारणेची गोष्ट करतेत न.त्याईचं आपल्या झोपडीत येणं,त्याईचं वागणं पावून वाटते का कदाचित हे बंधन शिथील होईन.ही बंधनच शिथील होतीन.तुमी परवानगी द्या अगर नोका देवू.मी मा इचार पक्का केला हाये.मी वनजेशीनच लगन करीन."

"आन् नाय करु देलं तं."

"नाय करु देलं तं......नाय करु देलं तं मरुन जावून आमी."

"का बोलतेस पोरा,मी एवळे दिस सांभाळलो,तुयासोबत रायलो.तरी तुहा माह्यावर तेवळा पिरम नाय.आन् पिरम हाये.त्या वनजेवर.ते दोन दिसाची आली तं मरतो मणतेस."तशी कल्याणीअम्मा म्हणाली,

"जावू द्या नं,पोरगा जे म्हणते ते करुन.त्याले कायपण मणाचं नाय."

त्याचं प्रेम जोरात सुरु होतं.ते कधी तलावाजवळ तर कधी बागेत एकमेकांना भेटत होते.सुखदुखाच्या गोष्टी करत होते.त्याचं जरी तिच्यावर प्रेम नसलं तरी तिचं मात्र त्याच्यावर निरतिशय प्रेम होतं.ती त्याचेशिवाय जगू शकत नव्हती.तिचं आणि त्याचं प्रेम निःपक्षपातीपणाचं व निःस्वार्थीपणाचं होतं.त्याच्या प्रेमामध्ये वासनांधतेचा गंध नव्हता.फक्त ते एकमेकांना भेटून ते आपल्या स्वप्नातल्या इच्छा पुर्ण करीत.त्याच्या प्रेमात आलिंगणाला वाव नव्हता.

जसजसे दिवसामागून दिवस जात होते.तसतसं त्यांचं प्रेमही फुलत चाललं होतं.तसं त्यानं आपल्या आईबाबांकडून नाईलाजानं का होईना परवानगी मिळवलीच होती.फक्त तिच्या वडीलाच्या परवानगीची गरज होती.तेही त्याने वनजेला म्हटले होते.पण वनजा स्री असल्याने वनजेची हिंमतच होत नव्हती परवानगी मागण्याची.

वनजा पाहायला देखणी होती.राजकुमारी असल्यासारखीच ती वावरायची.तिचे केस अति लांब होते.चालणं रुबाबदार होतं.मंत्र्याची मुलगी असली तरी जास्त लठ्ठ नव्हती.भरजरी लुगड्यात ती अजून जास्त सुंदर दिसत होती.कानात कर्णफुलं होती.बोटात अंगठ्या होत्या.समोरुन काळे केस चमकतांना भासायचे.त्या केलामधून दोन कल्ल्याही सापागत वेटोळे घेतल्यागत निघालेल्या होत्या.शिलवंत तेच केसं पाहून फिदा झाला होता.पण त्यालाही काही मर्यादा आहेत.

"जोडे तयार हायेत."कल्याणी अम्मा हरळ्याला म्हणाली.

"पण याले रेशमी धागे लावाचे तेवळे रायले."

"हे घ्या रेशमी धागे.मी धुवाले नेले होते."

"हो आन् तु लवकर तयार हो.मी तवापर्यंत हे रेशमी धागे लावतो.आपल्याले बसवेश्वराकड जाचं हाये जोडे द्याले."

"हो,चाला.निघालं पाह्यजे.मी लवकर तयार होते."असे बोलून कल्याणीअम्मा आतमध्ये निघून गेली.तशी ती तयारी करुन बाहेर आली.तिघांनीही त्या जोड्याला वंदन केलं.हरळ्याने ते जोडे डोक्यावर घेतले.तसा तो निघाला.त्याच्या पाठीमागंशिलवंत व कल्याणीअम्नमा होतीच.

हरळ्या ज्या रस्त्याने निघाला.त्याच रस्त्याने बसवण्णा देखील निघाले होते.हरळ्याच्या डोक्यावर जोडे होते.तर त्याने पायामध्ये काहीही घातलेले नव्हते.उन्हाळ्याचे ते दिवस होते.तर त्याने पायामध्ये पायात काहीही न घातल्याने या रखरखीत उन्हात त्याचे पाय भाजत होते.पण तरीही नेहमी नेहमी हिंडता हिंडता बहुतःश सर्वच दलितांचे पाय जाड झाले होते.त्यांच्या दाहकतेला कोणी विचारात घेत नव्हता.ते दुस-याच्या पायाला आधार देत.पण स्वतः मात्र काहीही न घालता जीवन कापत असत.तशी अंगातही रग असल्याने अंगालाही उन्हाचा उकाडा वाटत नव्हता.तसं बसवेश्वरानं त्यांना पाहिलं.तद् वतच बसवेश्वर म्हणाला,

"हरळ्या,आपण कोठे चाललात?"

"मी....मी तुमच्याकळेच."गोंधळून अचानक बसवेश्वराला पुढे पाहताच हरळ्या म्हणाला,

"आन् हे का घेतलं डोक्यावर.एवळी उन असतांनी हे जोडे पायात न घालता चक्क डोक्यावर ठेवून चाललेत तुमी.कोठं जात हात."

"स्वामी,आमी तुमच्याकळेच.पण तुमी इकळं कोणीकळ?"

"मी बी तुमच्याकळेच निगालो हरळ्या."

"पण कायले जी.आमच्या गरीबायकळे......आमाले......आमाले हासवासाठी निगाले का?"

"नाय हरळ्या,मी मा आत्मा शुद्ध कराले निगालो."

"मले लाजवू नोका.माह्यी थट्टा करु नोका.मी.....मी जातीचा शुद्र चांभार.माह्यात कोणतं सामर्थ्य नाय.तुमच्याकळं मी लान काजवा हाये.मी तुमचा दास हाये दास."

"अरे काजव्यालेबी सुर्याचा प्रकाश असते.हे तु इसरतो हरळ्या."

"नाय देवा,काजवा तो काजवाच.त्याले इवलासा परकाश जरी असला तरी तो सुर्य बनू शकत नाय.एक परकारची पणती परवडली, पण काजवा नाय.पणती तरी इतराईले परकाश देते.पण काजव्याचा टिमटिम परकाश काईपण दिसत नाय"

"नाय नाय हरळ्या,तु मुळीच काजवा नाय......तु तं सुर्य हाये या जगाचा.पाय बरं लोकाईच्या पायाले जोडे देणारा हरळ्या सोता मात्र अनवाणी चालते.काईबी घालत नाय.अगदी सुर्यासारखा.सुर्य सा-या इश्वाले परकाश देते.सोता जळते.दरोज येळेवर निगते.पण कधी आपल्या जीवाले आराम देते का?ही वृक्ष....या लतिका पाय.हे सरवं घटक सोतासाठी नाय,पण निसरगातल्या सर्व सजीव सृष्टीसाठी आपला देह झिजवतेत.बदल्यात काईबी मागत नाय.तसाच तुबी तं बदल्यात आमच्याकळून चतकोर तुकड्याचीबी अपेक्षा करत नाय.तु तं माह्यापेक्षाबी श्रेष्ठ हाय.उच नीच हरळ्या जातीन् ठरत नाय.ठरु बी नये.ते करमानं ठरावं.जर एखादा उच्च जातीतला व्यक्ती चो-या करत असन,डाका टाकत असन,मुली बायाची छेडखाणी करत असन.तं तो श्रेष्ठ ठरुच शकत नाय.तु चांभार जातीत जनम घेतला असला तरी तुह्य ह्रृदय तुही भक्ती श्रेष्ठ हाय.शिवभक्ताईले जात नसते हरळ्या.सदाचार हाच स्वर्ग रायते त्याईच्यासाठी.अन् अनाचार हाच खरा नरक रायते.करम तेबी चांगलं असन तं त्याले कैलास अन् वाईट असन तं....त्याले का मनाचं ते तुच ठरव.पण मले सांग का तु आतं चाललास तरी कोठं?"

"आपण आमाले भेटलात,आमी धन्य झालो.स्वामी त्यायेळी तुमी त्रिवार शरण म्हून नमस्कार केला,त्याची परतफेड म्हून आमी जोडे बनवले."

"परतफेड आन् जोडे......मी समजलो नाय."

"मी समजवते."कल्याणी मधातच बोलली.

"सांगा,तुमी तरी समजावून सांगा."

"त्या दिशी तुमी मा नव-याले त्रिवार शरण घातलं ना,हे आमच्यावर करजं झालं.त्याची परतफेड म्हून हे जोडे बनवले आमी."

"करजं आन् ते बी तुमच्यावर.आन् ते बी माह्य.......मी समजलो नाय.हे ध्यानात घ्या का ते माह्य कर्तव्य होतं.म्हून मी त्रिवार शरण घातलो बा तुमाले."

"नाय नाय तसं नाय.ते आमच्यावर ऋण चळलं.तुमाले या जोड्याचा स्विकार कराच लागन."

"जोडे तं मी स्विकारीन.पण ऋण म्हून नाय."

"आन् माईत हाये का एक गोष्ट......"शिलवंत म्हणाला.

"कोणती?"

"मा बापानं आन् माईनं हे जोडे मांडीच्या कातड्याचे बनवले."

"म्हंजे?"

"सोताच्या मांडीचं कातळं कापलं.सोताच्या मांडीचे कातळे कापून त्याले पकवून त्याचे जोडे बनवले मा बापानं आन् माईनं."शिलवंत रडत म्हणाला.अचानक त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

"बापरे!"

बसवण्णा भयकंपीत झाले होते.त्यांना कसेतरी वाटत होते.त्यांचा कंठ दाटून आला होता.तसे त्यांनाही अश्रू कोसळले.तसे ते म्हणाले,

"मी का देव वाटलो का तुमाले?यासाठी मांडी कापाची का गरज होती.साधे जरी जोडे बनवले असते तरी त्या जोड्याचा मी स्विकार केला असता.माह्या त्रिवार नमस्कारासाठी तुमी एवळी मोठी सजा भोगली.हरळ्या आन् कल्याणीअम्मा तुमी खुप धन्य हात.तुमचे मावर लय उपकार झाले.आजपासून जवा जवा लोक माह्य नाव घेतीन,तवा तवा लोकाईले तु बी आठवशीन.आन् तुनं केलेला त्याग बी आठवण.तुह्या समाजात तुह्या इतिहास बनन.तुही लोक संत म्हून पूजा करतीन.आन् का करु नये.खरंच तु काही कोणी लान सान विभूती नाय.तु लय मोठी विभूती हाय.मले तं वाटते का मी तुमाले त्रिवार शरण घालालेच पाह्यजे नोयतं."बसवण्णा रडत रडत म्हणाला.

"असं बोलू नोका स्वामी,आमचा तं सोडा,या जोड्याईचा अपमान होईन.या जोड्यालेबी वाटन का मी बेकार बनलो."

"जोड्यालेबी लाज लज्जा असते का?हरळ्या तुह्यं केवळ हे माह्यावरचं पिरम हाय.केवळा तुहा त्याग.या जोड्यासाठी तुमच्या दोन पवित्र जीवाचे कातडे......आन् तेबी मांडीचे!हरळ्या,कल्याणीअम्मा एवळं थोर कार्य केलं तुमी माह्यासाठी.या जगाचा इतिहास तुमची साक्ष ठरन.तुमची इतिहासात नोंद होईन.तुमचा समाज हा इतिहास आपल्या पोराईले शिकवतीन.थोर हात तुमी.तुमची गणती या पृथ्वी तलावरती माणसात करताच येत नाय."

"स्वामी आपण अधिक इचार करु नोका.यापेक्षा अजून का अर्पण करु शकतो.तुमच्यासारख्या उच्चतम परमेश्वररुप माणसाले.बस आपण ते पायात घालावे एवळंच मणू शकतो."

"द्या ते जोडे इकळं.त्याची जागा माह्या पायात नाय.त्याची जागा माह्या डोक्यावर हाये."असे म्हणत बसवेश्वराने ते जोडे घेतले आणि ते आपल्या डोक्यावर ठेवले.तसा हरळ्या म्हणाला,

"स्वामी आतं आमाले ऋण मुक्त झाल्यासारखं वाटते.पण हे जोडे पायातच शोभा देतेत.डोक्यावर नाय.तुमी त्याले पायात घाला.द्या माजोवर ते.मी त्याची रेशमी वस्र सोडून ते पायात घालून देतो तुमाले."

"हरळ्या,आपल्यासारख्या पवित्र माणसाईच्या शिवभक्ताच्या मांडीचं कातळं पवित्रच.ते पवित्र कातळं मी पायात घालू!नाय हरळ्या नाय.मले फार मोठं पाप लागन.हे पातक मंग मी सात जनम घेतले तरी फेडता येणार नाय.हे जोडे माह्या डोक्यावरच शोभतेत."

"नाय स्वामी,आपण हे का करता?आमाले हे का लाजवता?आमच्या मेहनतीचे जोडे हाये हे.त्याले डोक्यावर का घेता?असं करु नोका देवा.आपण आमच्यासाठी देव हात."

"परभू एका पातकातून मुक्त होण्या आगोदर दुस-या पातकात पाडू नोका."कल्याणी म्हणाली.

"हरळ्या तु खरा संत हायेस.या जोड्याले कुंडलसंगम नाथाचं पावित्र प्राप्त झालं हाये.आजपासून हीे पवित्र वस्तू कुंडलसंगमनाथाले अर्पण करा.कोणी देवो का न देवो,आजपासून ही संत उपाधी बी मी तुले प्रदान करतो.आजपासून लोकं तुमाले संत म्हून ओळखतीन.इश्वात जेवळे जनम तु घेशीन.तेवळ्या जनमात तुले तुह्या जनमाचं सार्थक झाल्यासारखं वाटन."

"धन्य धन्य हाये बसवण्णा तुमची.एवळ्या निष्ठेनं आन् श्रद्धेनं तयार केलेल्या या जोड्याले धारण करणारी व्यक्ती समाजात तुरळक रायतेत.तुमच्या दर्शनानं मले वाटते का अरळलिंगेश्वरच स्वतः भेट स्विकारले आला असन.बसवण्णा तुमचं महात्म्य थोर म्हून समजा."

"मी थोर नाय आन् मी परमेश्वर बी नाय हरळ्या.धन्यवाद मले नोको देवू.त्याले दे,ज्यानं तुले जोडे बनवाची सद्बुद्धी देली.मी तं एक साधारण माणूस.खरा परमेश्वर साक्षात तो कुंडलसंगम हाये.त्याले धन्यवाद दे हरळ्या.बरं मी आतं जातो.हे जोडे मात्र कोणालेबी न देता त्या कुंडलसंगमेश्वराले अर्पण कर."

"बरं हाय देवा,मी तुमच्या आदेशाचं पालन करीन."

असे म्हणत बसवेश्वर निघून गेले.तसे पाहता ते तिघेही जण बसवेश्वराची प्रशंशा करीत बसले होते.एवढ्यात घोड्याच्या टापाची वर्दळ ऐकायला आली.रस्ता मोडीवर होता.घुंगरु ऐकायला येत होते.तसा घोड्यावर स्वार लष्कराचा ताफा येवून हरळ्याजवळ थांबला.तसा घोड्यावर बसलेला मधुवय्या खाली उतरला व म्हणाला,

"ए या मुख्य रस्त्यावर का करता तुमी?इथून तुमाले चालाचा हक्क नाय.आन् तुमी या सावलीनं हा अख्खा रस्ता खराब केला."

"नाय मायराज."घाबरलेल्या अवस्थेत हरळ्या म्हणाला.

"जोहार मायबाप,आमाले माफी करावी."कल्याणीअम्मा.

"माफी आन् तुमाले,तुमीच आमचा रस्ता खराब करता.आन् तुमीच माफीबी मांगता.जा माफ केलं.आन् हे का डोस्क्यावर?हे जोडे पायात घालाचे सोडून का डोस्क्यावर घेतले."

"हे काई साधारण जोडे नाय.हे मा बापाच्या उजव्या मांडीच्या व मा मायाच्या डाव्या मांडीच्या कातळ्यापासून बनवलेले जोडे हायेत."

"बापरे!पण हे बनवले कोणासाठी?"

"बसवेश्वरासाठी."

"बसवेश्वर का देव होये का?आणा इकडं.मी घालतो.तसं पाह्यलं तं जोड्याची जागा डोस्क्यावर नाय राहात.पायात रायते.मी याचं जास्तीत जास्त मोल देईन."असं म्हणत मधुवय्या मंत्र्यानं ते जोडे हिसकावून घेतले.आणि त्या जोड्याला कुरवाळू लागला.

"लय मऊ हायेत हे जोडे.सांगा किती किमत देवू याची."

"मायराज,बसवेश्वर म्हंजे महान विभूती.त्याची सर कोणाले येत नाय.त्याईनं हे जोडे कुंडलसंगमेश्वराले अर्पण कराले लावले.तुमी घालू नोका याईले"

"अरे कातळ्याचे जोडे आन् देवाले अर्पण करतेस.कातळ्याचे जोडे का देवघरात ठेवा लागते का?अजब कहानी हाय तुही.आन् अजब न्याय हाये तुह्या.त्यापेक्षा मले देवून टाक.मी पैसे देईन म्हंतो न."असे म्हणून मधुवय्या ते जोडे पायात घालू लागला.तसा हरळ्या म्हणाला,

"मायराज नोको घाला.बसवेश्वरासाठी तयार केलेल्या जोड्याचा आपण स्विकार करु नोका.माई गरीबाची इनंती आयका."

"नाय आयकत.या जोड्याची किमत देवून रायलो न.बोला किती पैसे झाले ते.मी हे जोडे घाललो तं का बिघडलं."

"पैशापरसबी या जोड्याईची किमत जास्त हाय मायराज "

"काई बी मण हरळ्या मले हे जोडे आवडले लय.मी या जोड्याईले पायात घालणारच."

''लय इचार करा मायराज.थोडा इचार जरुर करा."

"अरे पावू तं दे थोळे पायात घालून."

तसे त्याने ते जोडे पायात घातले.तसा तो म्हणाला.

"हरळ्या किती उष्ण हायेत हे जोडे......अरे बापरे! किती दाह होत हाये.पाय बी खाजवत हाये.आन् हे काय.माह्या आंगात बी उष्णता संचारत हाये.सारखी आग होत हाये.माह्या जीवच जाईन असं वाटाले लागलं.हरळ्या मले असं कावून व्हाले लागलं.काई उपाय काळ बाबा तुच.काई मंत्र तं फुकलं नाय याच्यावर.इतराईनं घातले नाय पाह्यजे म्हून."

"नाय जी.मी कायले मंत्र तंत्र फुकू.मले का येते मंत्र तंत्र.तुमाले मी पह्यलंच सांगतलो होतो का हे जोडे घाला नोको म्हून.तरीबी तुमी घातले जोडे.तुमी आले कायसाठी आन् झालं का तं भलतंच.मायराज मले बी यावर उपाय सुचेनासा वाटते.कोणता उपाय सांगू मी तुमाले."तसा हरळ्या विचार करु लागला.

"हरळ्या,माह्या देह शांत कर रे बाबा,तु मणशीन ते मी करीन.माह्य वचन हाय तुले.माह्या जीव चालल्यासारखा वाटते.आंगात किती आग वाळत चालली हाये.तु कल्पना बी नाय करु शकत.माह्या आंग भाजल्यासारखा वाटत हाये."

"बसवेश्वराचे जोडे घातल्यानं वाटत असन.हे अरळलिंगेश्वरा,तु मधुवय्या मंत्र्याचं रक्षण कर रे बाबा."

"हरळ्या येळ लावू नोको.काई तरी उपाय कर रे बाबा.नायतं मा जीव जाईन इतंच."

हरळ्याले तो सारखी विनवणी करीत होता.तसा त्याचा दाह सारखा वाढत चालला होता.केव्हा दाह कमी होईल याचा तो विचार करीत होता.हरळ्याही विचारात गढून गेला होता.कोणता उपाय करावा हे त्यालाही सुचत नव्हते.तसा तो म्हणाला,

" मायराज थांबा,घाबरु नोका.त्या माह्या कुंडीतलं पाणीच आणून टाकतो तुमच्या आंगावर.निदान त्याच्यानं तरी तुमचा दाह कमी होईन.आपण चिंता करु नोका.लिंगेश्वराच्या कुरपेनं समदं ठीक होईन."

"जा रे बाबा.लवकर जा.लवकर आणून टाक काईबी."तो काकूळतीने म्हणाला.

"जा शिल्या,जा लवकर.आन् आपल्या घरचं कुंडीतलं पाणी आण हेलभर याईच्या अांगावर टाकाले.ज्यात आपण ह्या जोड्याचा चामडा पकवला."

शिलवंत उठला व तो धावत जावू लागला थोड्या वेळात शिलवंत माठभर पाणी घेवून आला.काही पाणी त्याने जोड्यावर शिंपडले व काही पाणी त्या मधुवय्याच्या अंगावर रिचवले.तसा होणारा दाह कमी झाला.तसा हरळ्या म्हणाला,

"आतं कसं वाटते मायराज?"

"आतं थोडं बरं वाटते हरळ्या.पुना शिप थोडं."

"मायराज,राग नाय येणार तं एक गोष्ट बोलू."

"बोल हरळ्या,एक नाय दाहा गोष्टी बोल."

"महात्मा बसवेश्वरासाठी बनवलेल्या या जोड्याले तुमी घातल्यानं या जोड्याचा अपमानच झाला नाय का?"

"हो मी पापी हाये.अपराधी हाये हरळ्या.तुह्या अपराधी.माह्या हातून लय मोठा अपराध घडला.मले माफ कर "

"मायराज,मी कोण होतो तुमाले माफ करणारा.माफीच मांगाची असन तं त्या अरळलिंगेश्वराले मांगा.माफी मांगाचीच असन तं बसवेश्वराले मांगा.त्याईनं माफ केलं तरंच तुमचं अपराध माफ होईन."

"खरंच हरळ्या,तुनं माह्ये डोळे उघळले. आतं मले समजलं का बसवेश्वर कोण हाये ते.ते तं साक्षात शिवाचा अवतार हायेत.त्याईच्यासाठी तुनं एवळा त्याग केला.खरंच तुबी महान हायेस.ते घालाची माई योग्यता नसतानी मी ते घातले.या ऋणातून मी कसा मुक्त होईन.तु तं मांडीचे जोडे तरी बनवले.मी तं ते बी बनवू शकत नाय.हरळ्या तु खरंच थोर हायेस.तुनच मा जीव वाचवला.

"त्या अरळलिंगेश्वराची कुरपा मायराज,मी काईबी केलं नाय.ते बुद्धी बी त्यानच देली."

"दगडात बी देव रायते.तसं या जोड्यातबी निरमान झाला असन.या जोड्यालेबी देवाचंच महात्म्य प्राप्त झालं असन."

"आपल्याले झालेल्या त्रासाबद्दल माफ करा मायराज."

"हरळ्या,तुच मले माफ कर बाबा,तुच खरा संत हायेस.हे आज मले अनुभवानं कळलं.तु माह्या देहाचा उद्धार केलास."

"मायराज,ते लिंगेश्वराच्या कुरपेचं फळ हाय."

"पण हरळ्या,तुह्य ऋण झालं हाये मावर.ते कवा उतरन ते सांगता येत नाय."

मधुवय्या विचार करीत होता.हरळ्या एवढा थोर असून आपण त्याला वाईट समजतो याचा प्रत्यय त्याला आला होता.

दहावा भाग

मधुवय्या विचार करीत होता.केवळं सामर्थ्य त्या पाण्यात.त्या कुंडीतील पाण्यानं दाह शांत झाला.संत हे देवाचे अवतार रायतेत हे मले आज कळलं.मी संत हरळयाचं न आयकता त्याईच्या मांड्याच्या कातळ्याचे जोडे पायात घातले.आन् त्यामुळे मले तं ब्रम्हांड दिसलं.हरळ्या चांभार असला तरी त्याच्यात खूप सामर्थ्य हाये.हरळ्यानं बनवलेला जोडा मी पायात घातला.तोच मले हा दाह.जो सहनच होत नोयता.कुंडीतल्या पाण्यानं मा एवळा दाह शांत व्हावा.का आश्चर्य.सतत होणारा दाह.....बरं झालं.मले कुंडीतलं पाणी सापडलं होतं.

माह्या आंगात अशक्तता येत होती.देह सुकत चालला होता.कोणी मणत होतं का मधुवय्याले कुष्ठरोग झाला.कोणी मणत होतं का मधुवय्यानं पाप केलं असन.कोणी रक्तपिती झाली हे मणत होतं.शेवटी मी अंथरुणावर खिळून गेलो होतो.

जणू स्वर्गात प्रस्थान करणार का काय असं वाटत होतं. जवा माह्या आंगावर कुंडीतलं पाणी शिपलं.तवा माह्या दाह बंद झाला.त्या पाण्याले मी घाणेरडं मणू नये.त्या पाण्यापरसही माहा देह एवळा घाणेरडा........दुर्दैवी गोष्ट हाये.बसवण्णासाठी बनवलेल्या पाण्याच्या शिडकावानं माहा दाह कमी होत होता.हरळ्या तुही किमया किती अपार हाये.बसवण्णाचं जीवन मुळी महासागरच.या महासागरात कधीतरी मधुवय्याले मुक्ती मिळन का?ते कुंडीतले पवित्र पाणी.त्याले मी घाणेरडं समजत होतो आजपर्यंत.त्याले प्याची बी चीड येत होती.माहा दाह कमी करासाठी मी समदे उपाय केले.पण जवा फायदा नाय झाला.तवा मरणासन्न अवस्थेत पोहोचलेला हा देह मले सांगत होता.मधुवय्या हे पाणी डोळे लावून प्राशन कर.एवळा पाण्याचा मयमा.मरण्यापक्षा हे पाणी पेलेलं बरं.मी मेलो बी असतो.पण मा पोरीसाठी मले जीवंत राहा लागन.तिले बी कोण हाये.मा शिवाय कोण हाये.तिची आई तं लानपणीच मरण पावली.तिले माह्यामांगं सोडून.तिचे दोनाचे चार हात झाले तं मी सुखानं मरीन.याच एका इचारानं मी कुंडीतले पाणी प्राशन केलो.ज्याले मी घाणेरडं समजून पेत नोयतो.ते पाणी पेल्यावर दाह कमी होते.मले तं आश्चर्य वाटलं.पण मी पुरणं व्याधीतून सशक्त झालो.आतं मातर ठणठणीत हाये.

त्या कुंडीतील पाणी.माणसाचं जीवन वाचवू शकते.आन् आपुन त्या जातीले हीन समजतो.हे चांभार जातच मुळात महान जात हाये.आपल्या मनात कोणताच स्वार्थ न ठेवता केवळ ऋण म्हून त्रिवार वंदन करणा-या बसवेश्वरासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता वेदनेनं घायाळ होवूनही त्या हरळ्यानं आपल्या मांडीचे कातळे कापले.आन् त्याचे जोडे बनवून ते बसवण्णाले दान देले.केवळा त्याईचा बलिदान.....त्याईच्या बलिदानापुळं देव बी झुकन असा त्याईचा व्यवहार.हे लोकं एवळे महान असतानी आमी त्याईले हीन समजतो.त्याईच्या सावलीलेबी भेतो.पण नाय.आजपासून मी ठरवीन.त्याईच्या इतं बी जात जाईन.त्याईच्या इतं खाईन.पाणी बी पेईन.त्याईची रिश्तेदारी बी करीन.त्याच्या पोरामुळंच आपल्या पोरीयचा बी जीव वाचला.त्याच्या पोरामुळंच आपली पोरगी आपल्याले दिसत हाये.नायतं आजकाल कोण वाचवते कोणाले.कोणीच नाय.समदे स्वार्थी हायेत.पण अशायेळी हरळ्याचा पोरगा आपल्या प्राणाची चिंता न करता,जात पात न पायता माह्या वनजेले वाचोलं.वाचवाले धावला.तो बी महानच त्यालेच पोरगी द्यावी.चांभाराच्या महान जातीत.आन् या जातीले मी महान दर्जा द्यासाठी प्रयत्नबी करीन.'

परिवर्तनशील विचार मधुवय्याच्या मनात शिरले होते.हरळ्याच्या घरच्या कुंडीतील पाण्यानं त्याच्या मनात परिवर्तन आणलं होतं.दगडात जसा देव असतो.तसा कुंडीतील पाण्यानं दाह शांत होताच खरा देव दलितांच्या वस्तीतच वास करतो.याचा प्रत्यय त्याच्या स्वतःच्या दाहकतेवर उपचार करतांना आला होता.त्या कुंडीतील पाण्यानं त्याचं जीवन बदलवून टाकलं होतं.आता तर तो आपल्या मुलीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी हरळ्याजवळ जात होता.

उन्हाळा आज संपत चालला होता.तसं सुर्याला आपल्या कुशीत ढगानं लपवलं होतं.पावसाची हलकी सर येवून गेली होती.मातीला तर सुगंध येत होता.तशी त्या सुगंधासह हरळ्याच्या मुलाला मुलगी देण्याचे विचार आकार घेवू लागले होते.तसा तो उठला.त्याने तयारी केली व तो हरळ्याच्या घरी गेला.मनात असंख्य विचार घेवून.....तसं थोड्याच वेळात हरळ्याचं घर आलं.तशी कल्याणी हरळ्याला म्हणाली,

"बायेर कोणीतरी आले वाटते."

"आपल्या घरी तसं कोणी येवू शकत नाय."

"नाय दुसरं कोणीतरी आल्यासारखं वाटते."

"पाय बरं कोण हाये तं."

तिनं बाहेर येवून पाहिलं.तसा तिला मधुवय्या दिसला.तशी ती म्हणाली,

"मंत्रीसायेब हायेत.""

"कोण?"

"मधुवय्या सायेब दिसतेत."

"मधुवय्या कट्टर इट्या मानणारा.आन् आपल्या झोपडीत!त्याचं इतं कोणतं काम?"

"ते इकडंच येत हायेत."

तसे ते दोघंबी बाहेर निघाले.तसा हरळ्या बोलला,

"जोहार मायबाप,आपण इकळं कसं का येणं केलं?आपले पाय गरीबाच्या झोपडीकळ कसे का वळले?"

"पुर्वेकडचा सुर्य इकळं पश्चिमेकळ कसा उगवला जी?"कल्याणी.

"आपली कृतज्ञता व्यक्त कराले आलो मी."

"सांगा मंग,मी आपली कोणती सेवा करु?"

"नोको हरळ्या,जे केलं ते लय झालं.तु थोर हायेस."

"मंग आपल्या येण्याचं प्रयोजन काय?"

"तुह्या कुंडीतल्या पाण्यानं मले सुधरवलं हरळ्या.त्याबद्दल धन्यवाद द्याले आलो."

"त्याबद्दल धन्यवाद!तुमीबी मले कर्जात टाकू नोका मायराज.आधीच एका कर्जानं माह्या मांडीचं कातळं नेलं.आन् आता तुमीबी......"

"नाय,मा उद्देश तसा नाय."

"मंग कोणता हाये तुमचा उद्देश?"

"मी दोन तीन कामानं इतं आलो."

"दोन तीन!मी समजलो नाय!"तसा तो पुन्हा म्हणाला,

"सांगा मंग दोन तीन कामं कोणती ते....."

"पह्यलं म्हंजे तुमी मले सुधरवलं त्याबद्दल कृतज्ञता."

"ते तं आधीच कळलं.दुसरं......"

"दुसरं म्हंजे तुमचा पोरगा."

"का केलं माह्या पोरानं.काई केलं असन तं माफ करा त्याले.नादान हाये तो.लान हाये अजून."

"नाय नाय,तसं नाय हरळ्या."

"मंग काय मायराज?"

"तुमचा पोरगा भाग्यवान हाये म्हंतो."

"भाग्यवान!कसा काय?"

"तुमच्या पोराचेच आभार मानाले आलो इकळं."

"आभार!का केलं तरी का मा पोरानं."

"तुमच्या पोरानं लय मोठं काम केलं."

"मोठं काम!कोणतं असं काम केलं बा मा पोरानं."

"त्या दिशी आमची वनजा त्या घुष्णेश्वराच्या देवळाच्या तलावात बुडत होती का नाय.तवा तुह्या पोरानं जात पात न पायता वाचोलं.तलावात उळी घेवून.सोताचा जीव धोक्यात घातला कुमारानं."

"मा पोरानं वनजेले वाचोलं!मले तं काईच नाय सांगतलं मा पोरानं.मंग त्यामंधी आभार मानण्यासारखं का हाये."

"आभार म्हंजे.अरे संकटकाळी उपयोगात येण्याचं महान कर्तव्य बजावलं तुह्या पोरानं.तुह्या पोरानं मा पोरीले जीवनदान देलं."

"खरं सांगता मंत्री मायबाप."

"हो अगदी खरं."

"बरं ते जावू द्या.अजून काई."

"अजून तिसरं काम हाये न."

"कोणतं मायबाप?"

"तिसरं म्हंजे ज्यानं माह्य मरण वाचोलं तो हरळ्या महान हाये.आन् ज्यानं मा पोरीयचा बी जीव वाचोला तो कुमार बी महानच.तवा त्या बापाले आन् पोराले धन्यवाद द्याचा हाये."

"ते तं आधीच बोलला मायराज."

"आतं माह्या तोंडातून शब्द फुटत नाय हरळ्या.तिसरं अजून एक काम हाये तुह्याकळं आन् ते अति महत्वाचं हाये."

"सांगा मंग.नि:संकोचपणे सांगा."

"तु रागावणार तं नाय नं."

"आमची का जुर्रत राग कराची.आमी अस्पृश्य माणसं.तुमच्यावर रागवायचं तरी सामर्थ्य हाये का आमच्यात.आमी अस्पृश्य तुमची बराबरी तरी करु शकतो का?सांगा कोणतं प्रयोजन हाये आणखी?"

"तं मंग आयका."

"सांगा मायराज."

"मी म्हंतो का माह्या रिश्ता तुह्याशीन कराचा हाये."

"म्हंजे?मी समजलो नाय."

" माह्यी पोरगी वनजेचा लगन तुह्या पोराशीन कराचा म्हंतो म्हंजे माह्यी पोरगी तुह्या पोरासाठी मांग म्हंतो."

"म्हंजे?मायबाप तुमी का बोलून रायले."हात जोडून हरळ्या मधुवय्यासमोर उभा होता.तसा मधुवय्या परत म्हणाला,

"मले तुह्या जातीशीन रिश्ता कराचा हाये.तुह्या पोराले मा जवाई बनवाचा हाये.सांग हरळ्या,माह्यी पोरगी वनजाले तु सून म्हून स्विकारशीन का नाय."

"मायराज आपन हे का बोलत हात.मले काई कळत नाय हाये.आमी लायक तरी हावो का तुमच्या.आमी तुमच्या पायाखालची माणसं.सतत वाळीत टाकलेली."

"आतं ते गी काई नाय हरळ्या.मी ठरोलं हाये का माह्यी पोरगी तुह्याच पोराले द्याची.तु हो मण का नाय मण.पटलं का नाय."

"माह्य जावू द्या मायराज,पण लोकं का मणतीन त्याचा जरा इचार करा."

"लोकं कायपण मणू दे.माह्या इचार पक्का हाये.तु फक्त हो मण.निदान लेकरासाठी तरी.ते एकमेकाईले ओळखतेत.अरे पिरम करतेत एकमेकाईवर.मले मालूम हाये समदं."

"ठीक हाये मायराज,तुमी मणता तं ठीक हाये.जशी तुमची इच्छा.त्या अरळलिंगेश्वराले जे मंजूर असन ते होईन."

ठीक हाये.मी हा रिश्ता पक्का हाये हे समजून निगतो आतं."

"ठीक हाये.तुमी मणान तसं."

मधुवय्या निघून गेला होता.पण त्याने ही गोष्ट मुलीला सांगितली नव्हती.कसे सांगावे आपल्या मुलीस याचा विचार करीत तो चालला होता.त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.

जेव्हापासून मधुवय्या सुधरला होता.तेव्हापासून त्याच्या मनात परिवर्तनशील विचार घोळत होते.त्यामुळे त्यानं वनजेच्या विवाहाचा प्रस्ताव हरळ्यासमोर मांडला होता.पण हा प्रस्ताव मांडला खरा.पण त्याची मुलगी वनजा ह्या विवाहाला मान्यता देईल की नाही असे त्याला वाटत होते.कारण त्याने विवाहाचा प्रस्ताव हरळ्यापुढे ठेवतांना वनजेची परवानगी घेतली नव्हती.ह्याच प्रश्नाच्या विचारात तो रात्रंदिवस गढून राहात होता.पण मुलीला ते विचारण्याची हिंमत होत नव्हती.ह्याच प्रश्नाच्या आगीत जळत असतांना एक दिवस वनजा तेथे आली.तिने आपल्या बापाला कशात तरी गुरफटलेले पाहिले.तशी ती म्हणाली,

"पिताजी,दिवसेंदिवस आपण चिंतेत.का गोष्ट हाये?"

"अं काय नाय बेटा,असाच बसतो हाये.आतं मले मातारपणी कोणतं काम नाय न.म्हून बसतो बा."

"पण पिताजी,तुमी चिंतेत दिसला.मले कळन का तुमच्या चिंतेचं कारण."

"बेटा,एक चिंता हाय.तु मोठी झाली.तुह्य आतं लगन होईन.मंग तु मले सोडून जाशीन.मी मंग एकटा राहीन.त्याचीच चिंता सतावते.तुही माय असती तं तु गेल्यावर ते रायली असती माह्याजोवर."

"नाय पिताजी,तुमाले ते चिंता नाय सतवत."

"तसं पाह्यलं तं बापाले कोणती चिंता सतावते.पोरगी मोठी झाल्यावर बापाले एकच चिंता रायते.ते म्हंजे तिच्या लगनाची."

"माह्या लगनाची चिंता नोको करा तुमी."

"म्हंजे?माह्या पोरीनं सोताच शोधला का पोरगा."

"हो मीच शोधणार.पण अजून शोधला नाय बरं का.पण कसा शोधणार.राजबिंडा राजकुमार शोधायचा का एखादा रिकामटेकडा शोधायचा.कळत नाय पिताजी."

"मेहनती असावा फक्त राजबिंडा नसला तरी चालन.मंग माह्या मनातली काळजी मिटली असं मी समजतो.पण मले सांग तु लगन करशीन तरी कोणाशीन."

"कोणाशीन म्हंजे?"

"माह्या जीवनाचं जो सार्थक करन,त्याच्याशी करीन मी लगन.मंग तो राजकुमार राहो का न राहो."

"बाळ लगनानंतर माही पोरगी सुखी व्हावी हे सर्व वधुपित्याची इच्छा रायते."

"मंग त्यासाठी एखादा पोरगा पाह्यला का माह्यासाठी.आन् तो राजपुत्र मले सुखी ठेवनच कशावरुन?"

"राजपुत्र किवा मंत्रीमहोदयाच्याच्या पोरामुळंच घराण्याले शोभा येत नाय असं तुले वाटते का?"

"खरं हाय तुमचं मणणं.कारण लगनानंतर मा पती नलराजासारखा वा सत्यवाना सारखा निगला तं......"

"अं मंग ते नशिबच.नशिब का धुवून पाह्यलं पोरी."

"हो,ते बी खरंच."

"आन् दुर्दैवाची गोष्ट म्हंजे जे नशिबात असल ते.....ते कोणालेबी भोगावच लागतं पोरी.मायबाप हे केवळ निमित्य रायतेत."

"आन् जो पोरगा तुमी मासाठी पाह्यणार.त्याचं कर्तृत्व,त्याचं रुप आन् त्याचे गुण बी तुमाले पटले पाह्यजेत ना."

"हो पाह्यल्याशिवाय कसं पटणार."

"मंग पाहा आन् तुमीच ठरवा पिताजी.मात्र अंतिम निर्णय माह्या राहीन.आन् जर का तुमी माह्या निर्णयाविरोधात माह्य लगन केलंच तं सांगतो.जवा माह्य जीवन होरपळून निगन,तवा तुमी फक्त उघड्या डोळ्यानं पाहाचं.काईच कराचं नाय माह्यासाठी.या जपलेल्या उन्हातून सावलीत नेलेल्या पोटच्या गोळ्याचं उभं आयुष्य बरबाद होवू द्यायचं आन् होरपळून निगू द्यायचं."

"कशी बोलते बाळ ?"

"मी बराबर बोलते पिताजी,या काळात बायायले तसंबी कोणी इचारत नाय.ती राजकुमारी राहो का अजून कोणी.तिन फक्त पतीचं आयकायचं.तिले सोताचं मत तसं राहात नाय."

"तुले मनाचं का हाये बेटा,तु का रागावली बेटा एवळी माह्यावर."आजपर्यंत एवळे हट्ट पुरवले आन् मी आतं च नाय पुरवणार का?"

"मी रागवत नाय पिताजी,पण मी मातर माह्या राग मावरच काळतो.तसं पाह्यलं तं इश्वरानं चूल आन् मूल यासाठीच स्रीयाईले तयार केलं का?असा नेयमी प्रश्न पळते मले.आन् जवा पळते,तवा मातर मीच दुःखी होतो."

"म्हंजे बेटा,मी समजलो नाय."

"पिताजी,आपत्तीच्या महासागरात लोटविण्यासाठीच का स्रीजातीचा जनम."

"वनजे,कुलवान शिलवान घराण्यातला तुहा जनम.या बाबतीत तुहा विचार घेणार हाये मी.तुह्या मतानच करीन मी तुहा लगन."

"पिताजी,खरंच तुमी मा मतानं माह्यं लगन करीन म्हंता."

"हो तुह्या मतानच तुह्य लगन करीन."

"मंग मी एखादा सुंदर राजकुमार न शोधता एखादा कुलीन गरीब शोधला तरी चालन का?"

"पण गरीब कुलीन का बरं शोधाचा पोरी?तुले तं चांगले चांगले राजकुमार पसंत करतीन.अशी रांग लागन तुह्यासमोर."

"पिताजी,माह्याशीन लगन कराले रांग लागन.तुमचं मणणं खरं हाय.पण राजे आन् युवराजे केवळ एका पत्नीवर खुश नाय राहात.राणी बनवतेत,फक्त दाखवासाठी......त्याईच्या दरबारात शेकडो दास्या कार्तिक.त्या प्रत्येक दासीपाशी जाते राजा.त्याले त्याची सख्खी युवराज्ञी बी काय पण मणू शकत नाय.राज्यात एखादी सुंदर कन्या दिसली तं तिलेबी ते राणी बनवतेत.मंग तितं कोठं आलं तिचं सोताचं मत."

"तुह्य बी मणणं पोरी बराबर हाये.मंग त्यावर काई उपाय?"

"मी एखाद्या गरीबायशीन लगन करीन.जो चोवीस तास मा जोवरच राईन.मले जीवापाड जपन.याचा मी आधीच इचार करुन ठेवला.राजघराण्याशीन नाय करणार."

"हे पाय,तुले मी तसा राजबिंडा शोधाची परवानगी देतो.पण पोरगा गुणी आन् चारीत्र्यसंपन्न पाह्यजे."

"म्हंजे माह्या मतानं लगन होईन तर मा.मले लय आनंद झाला पिताजी.तुमी किती चांगले हात."

"तु माह्यी एकुलती एक पोरगी,घृष्णेश्वराच्या दुर्दैवी आपत्तीतून संगमेश्वरानं तुह्यं रक्षण केलं."

"पिताजी,संगमनाथानं नाय,त्या शिलवंतानं मणा,तो जर तेथं नसता तं तुमची पोरगी तुमाले सोडून केवाच देवाघरी गेली असती."

"शिलवंत.......तो चांभाराचा पोरगा......हरळ्या चांभाराचा."

"हो शिलवंत.तोच तो.तुमी ओळखता त्याले."

"नाय बेटा."

"पिताजी,त्यानं जातीपातीची पर्वा न करता माह्य जीवन वाचोलं.देवासाठी फुलं तोडाले आला होता तो.आन् या मानवी देहाले जीवनदान देवून गेला.पिताजी,अस्पृश्य जातीत बी असे भाग्यशाली पोरं जनमाले येतेत."

"मुली जनमानं जात ठरली.ती जात जनमानं ठरु नये.करमानं ठरावी.पोरी,त्या जातीनंच आपल्या दोघाईची मदत केली.त्या जातीचे आपण ऋणी हाओत.त्या जातीनच आपला दोघाचाबी उद्धार केला."

"म्हंजे?"

"म्हंजे बापानं माह्या आन् मुलान् तुहा.हरळ्या साक्षात संत हाये संत मुली.......साक्षात संतच."

"माह्या जीव वाचोला हे मले माईत हाय.पण तुमचा कसा?"

"पोरी,मी हरळ्यानं बसवेश्वरासाठी बनवलेला जोडा घातला.आन् माह्या आंगात दाह.एवळा दाह का तुले मी सांगू बी शकत नाय.तो दाह त्याईच्या घरच्या कुंडीतल्या पाण्यानं बसला.तो प्या बी लागला आन् आंगावर शिपा बी लागला."

"म्हंजे?"

"पोरी,ते कुंडीतलं पाणी,त्याले मी घाणेरडं पाणी समजत होतो.पण ते घाणेरडं नाय.मी अगदी मरण अवस्थेत पोहोचलो असतानी तुह्या आशेसाठी पोरी मी नाईलाजानं ते पाणी पेलो.आतं मले ते सांगाची लाज बी वाटत नाय."

"वनजा,यासाठीच समाजात संत जनम घेतेत.ते संत समाजातली सारी घाण दूर करण्याचा प्रयत्न करतेत.बसवण्णा हे साक्षात परमेश्वराचा अवतार हायेत.कारण ते प्रधानमंत्री बनल्यावर सा-या समाजाले सुधरवायची कोशिश करत हायेत.त्यासाठीच ते हरळ्याच्या घरी गेले.त्याले हरळ्याले त्रिवार नमन केलं.आन् आमी.....आमी त्याईले दुषणे देत राह्यलो.आमचं मंत्रीपद जपत राह्यलो.जो हिंसा करतो तो खाटक.जो अभक्ष भक्षण करतो तो महार,देह हेच देवालय हाये.अखिल प्राणीमात्राचं कल्याण चिंतणारा कुलीन देखील सच्चा शिवचरण होय.तसेच महार जातीतच अभक्ष भक्षण करणारे रायतेत असं नाय.तसेच खाटक लोकंच हिंसा करतेत असं नाय.तसेच मेहतर लोकंच मैला साफ करतेत असं नाय.आपल्या घरची बाईबी आपल्या पोराईची विष्ठा धुवून देते.पण ती मेहतर होत नाय.तसं पाह्यल्यास झाडांना सजीव मानत असतांनी त्याचं फळ नामक लेकरु आपण कापूनच खातो न.मंग ही का हिंसा झाली?"

"आपणबी पिताजी बसवण्णाच्याच तत्वासारखं वागावं अशी माही इच्छा हाये."

"का नाय वागायचं.आपणबी बसवासारखं आपलं आचरण केलं पाह्यजे."

"आन् पिताजी, एखाद्या बामण पोरीनं एखाद्या अस्पृश्य जातीतल्या माणसाशीन इवाह केला तं ते चांगलं शोभन का?"

"नाय शोभन.पण समाजात एक क्रांतिकारी गोष्ट म्हून तिची नोंद होईन."

"मंग पिताजी,हा बेत ठरवा तं."

"कोणता?"

"तुमी बी मासाठी एखादा अस्पृश्यच कुमार पाहून द्या माह्य लगन लावून त्याच्याशीन.सुरुवात....... क्रांतिकारी विचाराची सुरुवात आपल्या घरापासूनच."

"वनजे,तु का बोलते?"

"पिताजी,मी त्या कुमाराशीनच लगन करीन."

"कुमार! कोण कुमार?"

"ज्यानं माह्या जीव वाचोला."ज्याच्यामुळं मी आजबी जीवंत हाये.तो जर धावून आला नसता तं मी या जगात राह्यले नसते."मी त्या कुमाराशीन लगन करुन त्या नव्या इतिहासाचीच नोंद करणार हाये मी."

"पोरी,हे का बोलतेस भलतंच.असं घडणं तरी शक्य हाये का?"

"रागवू नोका पिताजी,शिलवंत......त्याच्या सोभावाची प्रचिती आली मले.तो गरीब जरुर हाये.पण लाचार नाय.स्वार्थीबी नाय.माह्य पिरम हाये त्याचेवर.घृष्णेश्वर मंदीराच्या अवतीभवती अनेक तरुण वावरत होते.काई फुलं बी तोडत होते.त्यापैकीच एकानं मले धक्का देत तलावात पाल्ला.मंग तो पळून गेला.पण हा शिलवंत,ओळख नाय पाळख नाय.....केवळ माणूसकीखातर तो धावून आला.पिताजी,केवळ सावली पडल्यानं आपण या माणसाईचा विटाळ मानतो.मंग जीव वाचवणा-या माणसाचा आपल्याले इटाळ का वाटू नये!आपण त्याले मणतो का,का बाबारे मी अस्पृश्य.मले मरु दे.वाचवू नोको."

"म्हंजे,चांभार जात महानच तर.......त्याईच्या मनात स्वार्थ नाय.निःस्वार्थपणानं काम करतेत ते लोक.तो कुमार म्हंजे साक्षात संताचाच अवतार.पण पिताजी अशा संताचा जनम अशा चांभारवाड्यात झाल्यानं समाजानं त्याईले नीच ठरोलं.तसे ते नीच नाय."

"काळाच्या चाकोरीतून अव्याहतपणे चालणारा हा समाज,हा सामान्य समाज हाये.पण त्याच्यावर समाजानं जे सोताले उच्च समजतेत.सोताच्या स्वार्थासाठी सोताले उच्च समजून त्या सामान्य समाजावर राज्य करता यावं म्हणून जातीवाचक कठोर बंधन लावलं.तसेच ती उच्च समजणारी माणसं सोता मात्र दांभीकतेनं प्रदर्शन करतानी दिसतेत.त्याईच्याबी आचरणात खुप सारे ढोंग रायतेत.ते ढोंग इतराईले कळूनबी त्याची वाच्यता केली जात नाय.अस्पृश्यता,आंतरजातीय विवाहालेबी आज मान्यता मिळाली पाह्यजे."

"पिताजी,जर का ही अस्पृश्यता बंद झाली नाई तं एक दिस हेच लोकं आंदोलन करतीन मंग समाजाले त्यामुळं धोका नाय का निर्माण होणार."

"होईन न.धोकाच निर्माण होईन.म्हून तं या लोकाईनं त्याईले ज्ञानदानापासून वंचित ठेवलं.एवळंच नाई तं पुळची पिळी शिकू नये म्हून एकलव्याचा आंगठा बी घेतला.हा इतिहास हाये."

"हो बेटा,निव्वळ अज्ञानामुळं रंगमंचावर बोलतानी हे लोकं संस्काराची भाषा बोलतेत.प्रत्यक्ष आचरणात मात्र बंधनं पाळतेत.सोताले समाज सुधारक समजतेत.समाजाले पोखरुन टाकतेत हे लोकं.मले तं असल्या समाजसुधारकाईची किव येते.समाजात वेगळेवेगळे पंथ हायेत.जाती धर्म हायेत.ह्याच्या हातचं खाचं नाय.त्याले पोरगी द्याची नाय.अस्पृश्याईले तं याईनं वाळीतच टाकलं हाय.त्याईची सावली बी चालत नाय.फक्त चालते का तं त्याईनं बनवलेले जोडे.आन् राजदरबाात चालतेत त्याईच्या सुंदर सुंदर पोरी.दासी म्हून.याईले इटाळ नाय होत का त्यायेळी.गोमुत्रानं मंग शुद्धीरण.गोमुत्र पवित्र.या चांभार कुंडीतल्या पाण्यासारखं.त्या पाण्यानं दाह सुधरला.जर का याईचा कुंडीतला पाणी रोगावर चालते तं याईची सावली का चालत नसावी.मुख्य रस्त्यानं याईचं जाणं म्हणजे गुना समजला जाते.किंचाळत चालावं लागते.त्याईचं देवळात जावून देवाचं दर्शन घेणं पाप समजलं जातं.अर्थात समाजातल्याच या मानवानंच समाजातल्या मानवाले हिन करुन टाकला.फक्त त्याईची वस्तू चालते.ते चालत नाय.अशी अवस्था करुन टाकली त्याईची.दूध पेणारी मांजर,हाड खाणारा कुत्रा आमी पोषतो.मंग आमीच आमाले पदोपदी या मदत करणा-या माणसाची हेळसांड का करतो?हे काई सामाजिक रीत नाय.अरळलिंगेश्वरा,याईले माह्यासारखी समज येवू दे रे बाबा."

"पिताजी,चिखलातच कमळाचा जनम होते.कोळशात हि-याचा जनम होते.मंग अस्पृश्य जातीत जर संत जनमले तं त्याचं नवल करु नये."


जीव वाचोण्यासाठी धावलेल्या शिलवंताचा तो चांभार असुनबी तुमाले इटाळ वाटला नाय.त्याचा तं या वनजेले स्पर्श झाला.मी भाग्यशाली हाये.

पिताजी,लगनाच्या येळी हातात हात घेवून दोघं एकत्र होतेत.शिलवंतानं माह्या हातात हात घेवून मले काळलं.त्याच दिशी माह्य पाणीग्रहण झालं असं वाटू लागलं मले.त्याच दिशी परपुरुषाचा मले स्पर्श झाला तं हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्याले पती समजण्याची का हरकत हाये.तो मा पतीच हाये हे इचार करा."

"पण तो जातीचा चांभार हाये असं नाय वाटत का तुले."

"जनमापक्षा कर्मानं जात बनते.असं तुमी नेयमी मणता.मंग या देहात फसलेल्या व मनानं कबूल केलेल्या पुरुषाची जात का पाहाची."

"पण या कल्याणनगरीत आन् पुळंबी समाज आपल्याले का बोलन.आपण टिकेले पात्र ठरु.आपली भावी पिळी आपल्याले का बोलन."

"पिताजी,आपण माह्या कल्याणाचा इचार करता न.तुमी मा कल्याणाचा इचार करत असतानी समाजात भरपूर सजातीय मुल सापडतीन पण शिलवंतासारखे कधीच सापजणार नाय.मले सांगा शिलवंत कोणत्या गोष्टीत कमी हाय.फक्त एकाच गोष्टीत न का तो चांभार हाये.फक्त जातीचंच बंधन आडवं येतं न.पिताजी,संताले जात नसते असं तुमीच मणता न.मंग शिलवंताशीन माह्या लगन व्हावा असं नाय वाटत का तुले.ज्या जातीनं आपला उद्धार केला,त्य जातीची सर आपली जात तरी करु शकते का?"

"वनजे,किती उच्च इचार हायेत तुह्ये.तु एवळी इद्वान पोरगी माह्या पोटी आलीच कशी?"

"पिताजी,तुमी अजून इचार करा.पण हे स्थळ गमावू नोका."

मधुवय्याच्या तोंडची गोष्ट वनजाने हिरावली होती.त्याने तसे हरळ्याला सांगीतलेही होते.पण मुलीला लवकर होकार देवू नये असे त्याला वाटत असल्याने या मताचा मधुवय्या नव्हता.त्याच्या तोंडची गोष्ट.पण तिच्या होकाराची वाट होती.प्रत्यक्ष का होईना,पण त्याने आज वनजेचा होकार मिळवला होता.तसा त्याच्या मनात एक विचार चमकून आला.

'आपण अनुभव मंटपाचे सदस्य हाओत.आन् असे भेदभावाचे वळण घेतो.हरळ्यानंबी अनुभव मंटपातच दिक्षा घेतली.त्यामुळं त्याची जरी जात चांभार असली तरी अनुभव मंटपाच्या दिक्षेवरुन एकच जात झाली.ते म्हंजे लिंगवत लिंगायत.'

तसा तो विचार करुन पुन्हा हरळ्याच्या घरी निघाला.रस्त्यात चालता चालता अनुभवाचा खजाना सोबत होताच.समोर हरळ्याचं घर दिसत होतं.बाहेर कल्याणी अम्मा अंगण झाडत होती.तसा तो घोड्यावरुन उतरला.म्हणाला,

"कल्याणे,का करतेस?" तिने मागे वळून पाह्यले.तसा तिला मागे मंत्री उभा असलेला दिसला.तशी ती म्हणाली,

"अरे, मायबाप इकळं.या बसा,या या."

तिनं अंगण झाडायचं सोडून सिंदीच्या पत्र्यापासून विणलेली चटई टाकली.तशी ती म्हणाली,

"कसं का येणं केलं मायराज?"

"अं असाच आलो.इचारपूस कराले.समधी कोठाय?"

"गेले असन फिराले जी.आत्तच तं होते.आन् आज कसे का पाय वळलेत आमच्या गरीबाच्या झोपडीकळं.आपल्यासारख्या मंत्र्याच्या येण्यानं चांभारवाडीले रोशनाई येते."

"असं मणू नोका.मी का सामान्य पामर.तुम्हीच खरे संत.देवाचे उद्धार कर्ते.तुमी तं आपल्या मांडीच्या कातळ्याचे जोडे बनवले.जीवाची पर्वा न करता बनवले.एवळंच नाय तं माह्या जाणारा जीव बी तुमच्या कुंडीतल्या पाण्यानं वाचला.एवळंच नाय तं तुमी मा पोरीयचा बी जीव वाचोला.तुमी माह्यापक्षा बी थोर हात.आमी बामण जरी असलो तरी तुमची सर आमी करु शकत नाय."

"असं बोलू नोका हो.आमची थट्टा करु नोका."

"कल्याणी अम्मा हे थट्टा नाय.अहो तुमची आन् हरळ्याची संत मयमा या कल्याणनगरीत गाजत हाये."

"पण तुमच्या येण्याचं प्रयोजन "

"मी इचाराले आलो का हरळ्यानं मा पोरीबद्दल जरा का इचार केला का नाय ते."

"पण ते तं ते आल्यावरच कळन."

"माह्यासमोर तं माह्या वनजेच्या लगनाची काळजी हाये "

"मंग एखादा खानदानी पोरगा पावून उरकवून टाकावा लगन."

"हो ना सुशिक्षीत,सोज्वळ,सुस्वरुप पोरगी हाये माई."

"आमचा कुमार बी लय तारीफ करते तुमच्या पोरीची."

"आन् माह्यी पोरगी बी कुमारची तारीफच करते.म्हंते माह्या त्याच्यावर पिरम हाये.मी त्याच्याशिवाय जगू शकत नाय."

"ते समदं बराबर हाये.पण एक अडचण हाय."

"कोणती अडचण?"

"तुमच्या आन् आमच्या जातीले कलंक नाय लागन का जी.हा आंतरजातीय लगन बरा नाय न."

त्यांचं संभाषण सुरु होत.तेवळ्यात हरळ्या आला.त्याने मधुवय्याला पाहिले.तसा तो म्हणाला,

"मंत्रीसाहेब,तुमी आमच्या घराकळं.कसं येणं केलं आमच्या चांभाराच्या वस्तीत."

"मी मा पोरीच्या आन् तुमच्या पोराच्या लगनाची गोष्ट कराले आलो."

"पण ते तं आंतरजातीचं लगन ठरन."

"मंग का होते हरळ्या.आपण फक्त भाताचे सोबती.बाकी संसार त्याईलेच पाहाचा हाय े.एकमेकाले सांभाळलं म्हंजे झालं.तुले पुळचं का करा लागते.आन् मले वाटते का ते सक्षम हायेत आपला संसार सांभाळाले."

"तुमचं बराबर हाये.पण....पण काई इतिहासात पुरावा?"

"पण म्हंजे? अवो,मत्सकन्या ही कोळी जातीची असून तिनं त्या काळात राजा शांतनूशी लगन केलं होतं.हा इतिहास पुरावा हाये न इतिहासात लेहलेला."

"ठीक हाये.तुमचं मणणं पटलं मले.पण आपल्या पोराईचा लगन झाल्यावर तो मसला राज्याकळं जाईन.मंग राजा का सोडन का आपल्याले असं केल्याबद्दल.आपल्याले फासावर नाय का चढवतीन."

"आपल्याले चळवू दे फासावर चळवतीन तं.पण आपल्या पोराईचं एकमेकायवर पिरम हाये.हरळ्या निदान पोरायच्या खुशीसाठी तरी आपल्याले आपल्या प्राणाचं बलिदान द्या लागन.आपण जरी फासावर चळलो तरी आपण मोडलेली हाळं.पण हा इतिहास उद्या सुवर्णअक्षरानं उँगलियाँ जाईन.तसेच काई अंशी भेदभाव मिटाले प्रेरणा भेटन.लोकं मणतीन का एके काळी हरळ्या आन् मधुवय्यानं आपल्या पोरायचा आंतरजातीय लगन उरकवला होता.या मधुवय्यासोबत हरळ्याचंबी नाव इतिहासात अमर होईन."

"तुमचं मणणं मले पटलं.आतं मी बी तयार हाये लगन कराले.तुमची पोरगी सुंदर हाये,सोज्वळ हाये,सुस्वरुप हाये.तुमच्या पोरीले शेकडो पोरं भेटत असतानी बी केवळ माह्या शिल्याच्या उपकाराची फेड म्हून एवळा मोठा त्याग.खरंच आमी भाग्यशाली हाओत आन् आमचा पोरगा बी."

"माह्या पोरीनच निर्णय घेतला तुह्या पोरासोबत लगन कराचा."

"पण मी बी सांगून ठेवतो.आमी लान माणसं.त्यातल्या त्यात जातीनबी लान.उद्या नसतीच तोडमतोड नोको.आतच निर्णय घ्या तसा."

"नाय तसं नाय हरळ्या.तसं जर कराचं राह्यलं असतं तं मी सोता तुह्या घरी आलो नसतो."

"हे पाय मधुवय्या,बसवण्णाच्या अनुभव मंटपत आमी दिक्षा घेतली.आमचं शुद्रत्व तवा संपल.तुमीसुद्धा घेतली.तवा तुमचं बामणत्वबी संपलं.आधीच मी बसवेश्वराच्या तत्वज्ञानानं वागाचं ठरोलं हाये.बामण चांभार हा भेद आमच्या मनातून कवाच हद्दपार झाला.तो पुर्वाश्रमीचा भेद होता.आपल्या मनण्यानुसार हा जातीभेद निर्मूलनाचा पह्यला प्रयत्न.पह्यलं पाऊल समजा.पण आपण बसवण्णाचा थोडा इचार घ्यायलाच हवा."

"त्याईनं तं मले कवाचीच संमती देली.फक्त तुमची आन् तुमच्या लेकराची तेवळी संमती रायली होती.वनजेची इच्छा हायेच.तेव्हा आपण शिलवंताची बी परवानगी घेतली पाह्यजे."

"हो......त्याची बी परवानगी पाह्यजेच."त्याले वनजा पसंत हाये का ते इचारावं."

"हो आमच्या कुमाराले इचारलं पाह्यजे.त्याल् वनजा पसंत हाये का म्हून."

"झालं तं मंग.त्या शिलवंताची परवानगी भेटताच आपण त्याईचा लगन अनुभव मंटपात उरकवून टाकून."

"हो,आन् बसवेश्वर देखील तेथं उपस्थीत रायतीन."

"आन् आमचा कुमार का आमच्या वचनाबायेर जाणार हाय."कल्याणी अम्मा म्हणाली.तेवढ्यात तिथे शिलवंत आला.त्याने मधुवय्याला पाह्यले तसा तो म्हणाला,

"मंत्रीजी,आपण!नमस्कार करतो."

"कोठं गेला होता तू."

"कोठं नाय.फेरफटका मारत होतो.पण आधी तुमी सांगा,कसे का आलात चांभारवाडीमंधी."

"मी वनजेच्या लगनाची गोष्ट कराले आलो."

"कोठं देला वनजाले?"

"तो संताचा पोरगा हाये."

"संताचा!तुमी मंत्री राहुन.राजबिंडा तरुण नाय भेटला का?"

"तुमच्या चांभार जातीतल्या......."

"चांभारजातीत कोणता संत हाये मायराज?असं कोळ्यात बोलू नोका.स्पष्ट स्पष्ट बोला.आमाले असे कोळे समजत नाय म्हंतो."

"एवळे उतावीळ होवू नोका कुमार.धिरानं घ्या धिरान."

"मी धीरच राखतो.पण यात धीर कसला? सांगा कोण हाये तो?"

"आतंच तुमी धीर राखतो मणलं आन् आतच सांगा मणता."

"झालं तं मंग,पण एक इचार करा का या कल्याण नगरातील लोकं का मणतीन.ते अगोदरच आमच्या जातीची घृणा करतेत.मंग लोकाईले तोंड देणं म्हंजे ब्रिज्वल राज्याले तोंड देणं झालं.ब्रिज्वल राजाले तरी पटन का हे गोष्ट."

"कुमार,त्याची काळजी तुमी करा नोको.मी मंत्री हाये.पण बसवेश्वरासारखं मी बी परिवर्तन घेवून फिरतो.बसवण्णा आपल्या पाठीशी हायेत.संगमनाथाच्या कुरपेनं समदं बराबर होईन.पण कुमार तुमची साथ हवी.हे पवित्र कार्य जुळून आलंच पाह्यजे.यशस्वीबी झालं पाह्यजे.त्यासाठी सर्वस्व पणाले लावाचीबी माई तयारी हाये."

"आपल्या इच्छेले आमी नाय कसं मणू.आमचा साथ हाये तर......"आमी सपनातबी हे असं घडन हे सोचलो नोयतो."

"कुमार जगात जे काई चांगलं घडतं ते इश्वरकुरपेनं घडतं कुमार मी तुमालेच पोरगी द्याले आलो.बोला कुमार पसंत हाये का माह्यी पोरगी?तुमी तिचा जीव वाचवला मणते.तवापासून ते तुमच्यावर पिरम करते मणते.आतं बोला.सांगा लवकर."

"वनजेला तुमी मले द्याले आले.मी बेकार हाओ.कोणताच कामधंदा करत नाय.बापाच्या आयत्या कमाईवर खातो.चप्पल बी बराबर बनवता येत नाय.आन् तुमी मले पोरगी देतो मणता!"

"आमचा बेत पक्का झाला.तुमी जर का बेकार असान तं दोनाचे चार हात झाल्यावर आपोआप कमवान.आमी ठरोलं हाये का आमची वनजा तुमालेच द्याची."

"अजून इचार करा."

"आमी इचार केलाय आधीच.आमी योग्य निर्णय घेतला."

"वनजेचा इचार घेतला का आधी?"

"हो घेतला तिचाबी इचार.ते तयार हाये.तिचं आमच्यापरस तुलेच जास्त मालूम हाये कुमार."

"मंग ते जर तयार असन तं मी बी तयार हाये."

"मंग लागा तयारीले.तिथी निश्चीत करुन उरकवून टाकून लगन.आन् जातीभेदाले पहिला सुरुंग लावून तुमच्या माह्या सहकार्यानं."

"जशी आपली इच्छा.तो अरळलिंगेश्वर सर्व विघ्न पार पाडन."

तसा मधुवय्या चालता झाला.त्याला लगनाची तयारी करायची होती.तसा विचार रस्त्याने जातांनाही त्याच्या मनात होता.

दिवसामागून दिवस जात होते.गुलाबीचं अजून लग्न झालं नव्हतं.लग्नाच्या निव्वळ आश्वासनानं ती अबला घायाळ होत चालली होती.तिच्या पोटातील गर्भ वाढत चालला होता.तरीही ज्ञानभटाच्या निव्वळ आश्वासनानं तिच्या मनाचा बांध फुटत चालला होता.ज्ञानभट तिला भेटत होता.पण कोणतं ना कोणतं कारण सांगून तिच्या शरीराशी खेळत होता.तिलाही त्याच्या वागण्या बोलण्यात तथ्यता वाटत असल्याने तिही त्याला आपल्या शरीराचा भोग घेवू देत होती.परंतू त्याला नकार देण्याची हिंमत तिच्यात नव्हती.तिच्याही मनात विचार होता की कदाचित आपण नकार दिल्यावर ज्ञानभट कायमचा सोडून तर जाणार नाही.काहीही झाले तरी आपण लग्न करुच या ज्ञानभटाच्या आश्वासनानं तिला बरं वाटायचं.एरवी कधी ना कधी ज्ञानभट लग्न करेलच असं तिला वाटत होतं.म्हणून ती आजपर्यंत गप्प होती.पण आज गर्भारपणानं तिला चूप बसणं म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण असं वाटत होतं.

ग्रिष्माचा उकाडा सहन होत नव्हता.पावसाची नुकतीच चाहूल लागली होती.तशी दिवसेंदिवस गुलाबी चिंताग्रस्त होत होती.पाऊस सुरु झाल्यावर तुळशीच्या विवाहापर्यंत विवाह करण्याची तरतूद नसल्याने तिला चिंता करणे स्वाभाविक होते.तसं तिनं संगभटाची भेट घ्यायचं ठरवलं.

आज गुलाबी सकाळीच उठली होती.उच्चवर्णियांच्या वस्तीत दहावाजे पुर्वी दलिताने जायचा नियम नव्हता.तरीही संगभट भेटायला हवा असा निर्धार करुन ती आज वस्तीत आली होती.तोच संगभटाची नजर गुलाबीवर पडली.तसा त्वेषाने तिच्यासमोर येवून संगभट म्हणाला,

"कायले आली वस्तीत.तुले नियम नाय मालूम का?"

"तुमी मले नियम शिकोता का?"

"मंग कोणाले शिकवू.मा पोरासोबतच्या पिरमानं तुह्यी बोलण्याचीबी ताकद वाळली वाटते."

गुलाबी तशी हेकडच होती.परीस्थीतीनं तिला वात्रट बनवलं होतं.तशी ती म्हणाली,

"तो तुमचा पोरगा कोठं गेला?"

"कावून त्याचं कोणतं काम?"

"मले आतंच लगन कराचं हाये त्याच्याशीन."

"लगन!आश्चर्याची गोष्ट हाये तुही.तु बया झाली नाय का?"

"बया झाला तू."

"ए तोंड सांभाळून बोल.मोठ्या माणसाशीन असं बोला लागते का?"

"आधी तोंड तुमी सांभाळा.तुमचा पोरगा कोठाय तो सांगा आधी?"

"मा पोराचं का कराचं हाये?"

"मी पह्यलंच सांगतलं न का तुह्या पोराशीन मले लगन कराचा हाये म्हून."

गुलाबीचे तेवर पाहून आपली बदनामी होईन या धाकानं तिला संगभटाने बदनामी होईन या धाकानं तिला घरात नेलं.घरातून माजघरात नेले व तिला समजाविण्याचा प्रयत्न करु लागला.तशी ती म्हणाली,

"हे पाहा,मले तुमच्याशीन भांडण कराचा नाय.मी हे सांगाले आलो का मले तुमच्या ज्ञानापासून दिस गेले हायेत.मी गरोदर हाये."

"कशी गरोदर हाये?आन् हे पाप मा पोराचंच होये हे कशावरुन?हा तुहा मले बदनाम करण्याचा षड् यंत्र हाये.भवाने,लोकाईच्या पोरायसोबत झोपली असशीन आन् मा पोराचा नाव घेतेस.खबरदार मा पोराचा नाव घेशीन तं.तुले लोकायकडून चांगला बदडीन.माई काई समाजात प्रतिष्ठा हाये का नाय.आमचं समदं घरच अपवित्र केलं.कुल्था कोठची."

"गुलाबीच्या घरी येण्यानं तुमी अपवित्र होता.आन् ज्ञानभटाले मुर्ख संबोधून आमच्या जातीवर अत्याचार कराची परवानगी देता.हा कोणता न्याय हाये तुमचा?"

"म्हूनच तं तुनं मा पोराच्या मुर्खपणाचा फायदा घेतला.आपली हवस भागवली.दुसरीकळून चरलीस आन् मा पोरायचा नाव घेत मा घरी आलीस.जा निंग येथून."

"येथून तं मी निगून जाईन.पण माफ करणार नाय तुमाले.तुमी त्या देवाची पूजा करता न त्या अरळलिंगेश्वराची.तो बी तुमाले माफ करणार नाय.सांगून ठेवते.मी जबरदस्तीनं ज्ञानभटाशीन लगन करीन."

रागाच्या आवेशात गुलाबी बोलली खरी.पण नंतर तिला तिच्या बोलण्यावर पश्चाताप झाला होता.आपण असे बोलायलाच हवे नव्हते असे तिला वाटू लागले होते.आता मात्र विवाहाचा फैसला ज्ञानभटावर अवलंबून आहे असं तिला वाटत होतं.तिच्या मनात वेदना होत्या,ज्या वेदनेने तिला जन्माची आठवण दिली होती.

सायंकाळ झाली होती.ज्ञानभट घरी आला होता.त्याच्या येण्याची वाट संगभट पाहातच होता.तो जसा आला,तसा संगभटाने त्याला आवाज दिला.म्हणाला,

"ज्ञानभटा इकळं ये आधी."

"का बाबा,का काम हाये."

"गुलाबी आली होती."

गुलाबीचं नाव काढताबरोबर तो घाबरला व घाबरत घाबरत म्हणाला,

"का मणत होती गुलाबी बाबा?"

"तुही करतूत सांगत होती."

"मी तं काईच केलं नाय.फक्त तिले भेटतो."

तेरावा भाग


"हो न मले मालूमच हाय लेकरा,तु मुर्ख हायेस.पण तुह्या मुर्खपणाचा फायदा गुलाबीनं घेतला."

"अजून का मणत होती?"

"ते मणत होती का मले ज्ञानभटापासून दिस गेलेत."

"म्हंजे?"

"ज्ञानभटा ती गरोदर हाये."

"म्हंजे?"

"हो मुर्खा,तुह्या बाळाची माय बनणार हाये ते."

"माय.....छे!"

"बाळा,तू खरा बोलते."

"हो बाबा,शंभर टक्के खरं."

"माह्या डोयात डोये टाकून बोल.मले तं वाटते का तुह्या गुना नाय.गुना गुलाबीचाच असन.ते चरली असन कोठं.आन् नाव तुह्य घेते.मले बदनाम कराची कोशीश होये हे.तु नोहे न ज्ञाना."

ज्ञानभटाचे डोळे खाली होते.बापाच्या डोळ्यात डोळे मिळवायची हिंमत नव्हती.कारण तो गुन्हेगार होता.तसा संगभट म्हणाला,

"म्हंजे तुह्यापासूनच गुलाबीले दिस गेले का काय."

"हो बाबा,मी तिच्या पोटातील गर्भाचा बाप."

"मी तिच्या पोटातील गर्भाचा बाप मणतेस.मुर्खा,तु जनमाच्या आधी मेला कावनाय.तुले असं कराले कोणं सांगतलं होतं.इचारलं का मले पिरम करण्याआधी."

"पिरम हे नकळत होत असतं बाबा.ते इचारावं लागत नाय.तुमी तं समजत असानच.तसं तं आमी आज तरुण हाओत.तरुणाईत कोणाचा तोल जात नाय.माहा बी गेला.त्यात माह्य का चुकलं."

"अरे चूक केलीस.घोरचूक केलीस.आन् पुना माह्य का चुकलं मणतेस.म्हूनच तुले सर्वजण मुर्ख मणतेत."

"पण त्यात गुलाबी बी तेवळीच दोषी हाये न."

"हो ते बी दोषी हाये.पण तिले दोष देणारा तू कोण?अरे,आजच्या काळात पुरुषालेच दोषी समजतेत."

दोष त्याचाच होता.पण तो दोष तिचाच दाखवत होता.तसा तो म्हणाला,

"बरं आतं का करावा लागन बाबा,मले तं कायपण समजत नाय."

"तू तं मुर्ख हायेस.म्हूनच असं केलं तुनं.मुर्खा,तू का करु शकशीन.समदं मलेच करा लागन."

"हे पाय मुर्खा,तू तिले सांगून टाक का मले लगन कराचा नाय म्हून.आन् मी राजाले दवंडी पिटवाले लावतो का जो कोणी आंतरजातीय लगन करन आन् त्याले प्रोत्साहन देईन तं त्याले देहांत शासन देण्यात येईन.याचाच फायदा घेवून तू मण तिले का मी आतं लगन करत नाय.आन् मा जीव धोक्यात घालत नाय.तु मले इसरुन जा."

बापलेकानं गुलाबीला आपल्या मार्गातून हटविण्याचा निर्णय घेतला.संगभटानं राज्यात दवंडी द्यायला राजाला बाध्य केलं. एरवी त्यानं आपल्या ओळखीचा आणि मंत्रीपदाचा फायदा घेतला.जर राज्यात आंतरजातीय विवाह झाले तर राज्यात अराजकता माजेल.असे राज्याला समजावून सांगताच राजानं राज्यात दवंडी दिली.ती अराजकता कशी माजेल हे राजाला समजावून सांगीतलं.त्या दवंडीचा फायदा तो आपल्या स्वार्थासाठी करुन घेणार होता.

संगभटाच्या म्हणण्यानुसार राजाने राज्यात दवंडी पिटवली.त्यानुसार कोणी राज्यात अांतरराष्ट्रीय विवाह करु नये असे जाहीर केले होते.तसेच जबर शिक्षेचंही प्रावधान ठेवलं होतं.ब्रिज्वलाची धमकी ऐकून प्रेम करणा-यांनी प्रेम करणे सोडून दिले होते.कित्येक प्रेमी प्रेमीकांनी आत्महत्या केल्या होत्या.तरीही त्याचं सोयरसुतक राजा ब्रिज्वल किंवा संगभटाला नव्हते.संगभटाला बाकीच्या लोकांबाबत काही लेनदेन नव्हती.कोणी मरो की जावो याची कोणालाच तमा नव्हती.तर त्याने गुलाबी गरोदर असल्याचे कळूनही आखलेले हेतूपुरस्सर षड् यंत्र पुढील काळात गुलाबी चा जीव घेण्यास कारणीभूत ठरलं.

बसवण्णाने सदाचारात अहिंसेचा पुरस्कार केला होता.कोणत्याही प्राणीमात्राची हत्या करु नये असे त्याचे मत होते.तसेच दुराचाराला प्रोत्साहन करणा-या वस्तू सेवन करु नये असेही त्यांचे मत होते.मांसाहार व दारुवर संपूर्ण राज्यात बसवण्णाने बंदी आणली होती.बसवेश्वराचे कार्य म्हणजे दलितांना वाहिलेले एक पुष्प होते.दलित मुक्ततेवर त्यांचा जास्तीत जास्त जीव होता.त्यांना वेशीवर ठेवण्यात येई.जशी गावबंदी होती.तसेच रोजी रोटी व्यवहारावरही बंदी होती.मग बेटी व्यवहार कसा चालेल.मात्र हरळ्या व मधुवय्या आज बेटी व्यवहाराच्या गोष्टी करु लागले होते.अन्नपाण्यावर बंदी असल्याने दलित वर्ग मेलेली जनावरे ओढणारी माणसं त्या जनावरांचे मांस खावून स्वतःची गुजराण करायचे.हिच उच्चजाती त्यांचं अन्नपाणी बंद करायची आणि अन्न न मिळाल्यास मेलेली जनावरे खाल्ल्यास हिच माणसं नावबोटं ठेवायची नव्हे तर वाळीतही टाकायची.नगराचे रक्षण कोतवाल सांभाळायचा.वेठबिगारी करणा-या या समाजाच्या हालअपेष्टामय जीवन बसवेश्वरांनी अगदी लहानपणापासूनच अगदी जवळून पाहिले होते.त्यामुळे त्यांचे पित्त खवळले व त्यांनी पुढील काळात दलितमुक्तीच्या दृष्टिकोणातून विचार करुन दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली.त्यांना जीवन सुखी समृद्ध करण्याची प्रेरणा दिली.देव धर्म उच्चवर्णिय ज्या भुमीवर राहतात.त्याच भुमीवर दलितही राहतात.ही भुमी जर भेदभाव करीत नाही तर आपण माणसे भेदभाव का करतो.ही अमानवीय कृती आहे असे बसवेश्वर आपल्या समाजातील लोकांना सांगत.त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या समाजातीलच लोक चिडत आणि ते त्यांचा द्वेष करीत तर अस्पृश्य समाजातील लोक त्यांना देव मानू लागले.बसवेश्वर दलित वस्तीत जात व त्यांचा प्रसाद ग्रहण करीत.

स्रियांची स्थिती यापरस वेगळी होती.विटाळाच्या विळख्याने स्रियांना सोडले नव्हते.पण बसवेश्वराने स्रियांना समान मानून त्यांना समानतेचा अधिकार प्रदान केला होता.त्यांनी स्रियांना शक्तीरुपीनी मानले होते.पुरुषांच्या बरोबरीने स्री देखील कार्य करण्यास समर्थ आहे.असे बसवेश्वर मानत.स्रियांनी केवळ चूल व मूल सांभाळणं ही गोष्ट बसवेश्वरांना मान्य नव्हती.त्यासाठी त्यांनी अनुभव मंटप स्थापन केला होता.त्यात स्रियांची भागीदारी सत्तरच्या वर होती.त्यांच्या राज्यात त्यांनी सतीप्रथेवर बंदी आणली होती.तर विधवेच्या पुनर्विवाहाला चालना दिली होती.देवदासी आणि वारांगणेनी आपला मूळ व्यवसाय सोडून विवाह करावा व संसार थाटावा असे बसवण्णा म्हणत.समता हे तत्व बसवेश्वराच्या धर्मप्रसाराचे तत्व होते.कोणीही कनिष्ठ वा श्रेष्ठ नाही हे त्यांनी सांगीतले.जेवणाच्या वेळी उच्च नीच भेदभाव न करता एकाच ओळीत सर्वजण पंगतीत जेवायला बसत.एवढेच नाही तर सार्वजनिक सभा परीषदेत सारख्याच उंचीच्या खुर्च्या असत.स्वामींचे उच्चासन व इतरांचे निच्चासन या तत्वाच्या विरोधी ते होते.त्यामुळे की काय,संगभट,मचण्णा,मधुवय्या हे त्यांचे शत्रू बनले होते.

हरळ्याच्या स्वभावगुणामुळं मधुवय्या पार बदलून गेला होता.पण आजही बसवेश्वराचे दोन शत्रू होते तशातच मधुवय्याने बसवण्णांच्या कानावर आपली मुलगी वनजा व शिलवंताच्या विवाहाची बातमी टाकल्याने विवाहास तयार झालेल्या बसवेश्वराचा राजा ब्रिज्वल सुद्धा एक शत्रूच बनला होता.

स्रिजातीचा कनिष्ठ दर्जा लक्षात घेता स्रियांची उन्नती व्हावी म्हणून बसवेश्वर त्यांना अनुभव मंटपाचं सदसत्व बहाल करीत.नव्हे तर उच नीच भेदभाव दूर करण्यासाठी बसवेश्वर स्रियांचेही विवाहसोहळे संपन्न करीत.पण आजपर्यंत एकही आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव बसवेश्वरांपुढं आला नव्हता.अशातच शिलवंताच्या विवाहाचा प्रस्ताव आल्याबरोबर बसवेश्वरांना अतीव आनंद झाला.आपण केलेल्या कार्याचं हे फलित होय असे बसवेश्वरांना वाटू लागले.हे लग्न कोणत्याही परिस्थितीत पार पाडायचे यासाठी बसवेश्वर प्रयत्न करु लागले.

दवंडी झाल्याचे बसवेश्वरांना माहीत झाले होते.त्या दवंडीचा निषेध करणे म्हणजे राज्याच्या निर्णयाचा विरोध करणे होय.कदाचित आपल्याला प्रधानमंत्री पदावरुनही हटावे लागेल याची कल्पना बसवण्णांना होती.तरीही त्याचा हव्यास न बाळगता तसेच गडबडून न जाता गावोगावी दूत पाठवून हे जाहीर केले की जो कोणी आंतरजातीय विवाह करेल, त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल.तसेच लिंगदिक्षेपाठोपाठ विवाहाचा खर्चही वाचेल.अशाप्रकारे पहिल्यांदाच बाराव्या शतकात अशा सामूहिक विवाहसंमेलनाचे आयोजन करण्याचे धाडस बसवेश्वरांनी केले होते.हा निर्णय राजा ब्रिज्वलाच्या वटहुकूमाच्या विरोधात असल्याने पुढील काळात बसवेश्वरावर आरोप ठेवून त्यांना प्रधानमंत्री पदावरुन हटवण्यात आले.

त्या काळी दोन विवाह होत असत.दोन विवाह एकाच माणसाचे नाही तर भावाचे होते.तीन विवाहसोहळे आयोजित करण्याला बंदी होती.अशा विवाहामुळे तिरपट लागते व घरची तीन माणसे मरतात अशीही एक अंधश्रद्धा प्रचलित होती.तर चार विवाहाने चौपट होते अर्थात गडगंज संपत्ती नष्ट होते असी समज होता.त्यामुळे कोणत्याही परीवारातील व्यक्ती तीन किंवा चार विवाह करीत नसत.परंतू अनुभव मंटपातील सदस्य या जुन्या विचाराला खतपाणी घालणारे नव्हते.ते नव्या विचाराचे युगप्रवर्तक होते.परीवर्तनवादी विचार त्यांना आवडत होते.परीणामी हे विवाहसोहळे अंधविश्वासावर आधारलेले नसून दोन परीवाराच्या विचारांची आदानप्रदान व्हावी या उद्देशावर आधारलेले होते.त्यांच्या जुनाट कजाग विचाराला बुद्धीवंताची तोड देवून त्यांच्या जुनाट विचारावर प्रक्रिया करुन बसवेश्वरांनी जुनाट कजाग कुविचार संपविण्याचा निर्धार केला होता.परंतू राजा ब्रिज्वल वर्णाश्रम मानणारा असून पापभिरु व देवावर विश्वास ठेवणारा होता.कोणत्याही गोष्टीबाबत सत्य पडताळून पाहण्याऐवजी फक्त विश्वासघाती माणसावर विश्वास ठेवीत असे.तो शिवपुजक जरी असला तरी महत्वाकांक्षी व सत्तांध होता.सत्ता चालविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहात नसे.याच ब्रिज्वलाने मंगळवेढ्याचा कार्यभार बसवेश्वरांकडे सोपवून कल्याणचे चालूक्य पद हस्तगत करण्यासाठी कल्याणला गेला होता.

चालूक्य तैलप तृतीय हा चालूक्याचा राजा गणला जात असतांना कल्याण ही त्याची राजधानी होती.ब्रिज्वल हा तैलपचा आतेभाऊ होता.कल्याणचे राज्य त्याच्या आत्याचे राज्य होते.पण गादीचा वारस तैलप हा कर्तव्यशुन्य आणि कमकुवत वृत्तीचा असल्याने त्याचा फायदा ब्रिज्वलाने घेण्याचे ठरवले.त्यासाठीच तो कल्याणला आला.तसं पाहता ब्रिज्वल हा चालूक्याचा मांडलिक राजा होता.सम्राट तैलप शक्तीशाली नसल्याने त्याचेवर पांड्य,चोळ,वनवासी,होरसळ,काकतीय,शिलाहार,कलचूरी,यादव इत्यादी मांडलिक राजे जोर काढून होते.त्यामूळे ते त्यांच्याशी विरोधाने वागत होते.चालूक्याचे मांडलिकत्व कसे झुगारता येईल याकडे ते जातीने लक्ष ठेवून होते.याचाच फायदा घेवून वरंगळच्या काकतीय राजाने बंडही केले होते.हे बंड मोडून काढण्यासाठी राजा तैलप वरंगळला गेला होता.पण तेथे तो अपयशी झाला.त्या अपयशाचा पश्चाताप झाल्यामुळे तो कल्याणला परत आलाच नाही.त्यामुळे सत्तेची आस लागून असलेला ब्रिज्वल त्या ब्रिज्वलाने अधिकारी व प्रजाजन यांना विश्वासात घेवून तैलपाचे नावाने राज्यकारभार सुरु केला.राजा तैलप येण्याची चिन्हे न दिसत असल्याने काही दिवसांनी स्वतःलाच त्याने राजा घोषीत केले.त्यामुळे चालूक्याचे राज्य संपुष्टात आले व कलचूरी राज्याला सुरुवात झाली.राजा ब्रिज्वलाने त्यानंतर आपली राजधानी मंगळवेढ्यावरुन कल्याणला आणली.व पुढे बसवेश्वराला प्रधानमंत्री म्हणून घोषीत केले.बसवेश्वरांनी आपल्याच काळात मठसंस्थाही स्थापन केल्या आणि त्या ठिकाणी मठाधिपतीही नेमले होते.

बसवेश्वराने आपल्या धर्माला लिंगायत धर्म नामकरण केलं होतं.जन्माने ब्राम्हण असूनही त्यांनी आपलं ब्राम्हणत्व नाकारलं होतं.त्यांनी समाजसेवेचा घेतलेला वसा आजतागायत चालत आहे.

लिंगायत संस्कृतीचा विकास महाराष्ट्रात,प्रसार महाराष्टात व जन्म तेलंगाण्यात झाला.लिंगायत धर्माचा प्रज्ञासुर्य म्हणून बसवेश्वराचे नाव घ्यावे लागते.बसवेश्वर शस्र व शास्र जाणत होता.तसेच विद्वानांचा सन्मानही राखत होता.छप्पन कोटी देव पुजण्यापेक्षा त्याचं संपूर्ण सार असलेला एकच धर्म हा शिवधर्म असून माणसाने फक्त शिवाची पूजा करावी असे ते सांगत.

याच काळात बसवेश्वरांनी जी अनुभव मंटपाची स्थापना केली.त्यात राजे,महाराजे,संत,धर्मवंत प्रज्ञावंत वेदनावंत हे लोक सदस्य होते.इष्टलिंगदिक्षेने बसवेश्वर त्यांची जात नष्ट करीत.त्यामुळे हे सदस्य एकच जात मानून वावरत.व्यवहार करीत.त्यामुळे आपोआपच या अनुभव मंटपाकडे महार,मांग,चांभार,खाटीक,मेहतर ह्या दलित जाती आकर्षिल्या गेल्या होत्या.हरळ्याने मांडीच्या कातळ्याचे जोडे बसवेश्वरांना वाहिल्याची गोष्ट जसजशी गावोगावी पसरली,तसतसा दलितच नाही तर सारा समाज या अनुभव मंटपाकडे आकर्षित झाला व दीक्षा घेवू लागला.यात न्हावी,ढोर याच नाही तर ब्राम्हण जातीही होत्या.

त्यांच्या अनुभव मंटपात अल्लमप्रभू(ब्राम्हण),सिद्धराम(गवळी),चन्नूसवेश्वर(ब्राम्हण बसवेश्वराचे भाचे),रुद्रमूनी(क्षत्रीय),मोळगीमय्या (क्षत्रीय),अमुगीदेव (कोष्टी),माचीदेव (धोबी),कंकय्या (डोअर),हरळ्या (चांभार),हडपद अपन्ना (न्हावी),शयसद मचण्णा,शांतरस( ब्राम्हण),मरुळ शंकरदेव,शरण चन्नय्या (मांग),सकलेश मादरस( राजा क्षत्रीय),उरीलिंग पेद्दी (दलित दरोडेखोर),चौडय्या (नावाडी),चौडय्या बहुरुपी (ब्राम्हण),शरण केतय्या (बुरूड),सोडूळ बाचरस,हविनहाळ कल्लय्या (सोनार),तुरगाई रामण्णा (गुराखी),वैद्य सकण्णा (वैद्य),किन्नरी बोमय्या (कलार),मुदण्णा (शेतकरी),आयदकी मादय्या (जमीनीवरचे तांदूळ गोळा करणारा),नुलीय चंदय्या(सुंभ बनविणारा),नटराज घटवाळय्या( नर्तक),कन्नप्पा (कोळी),हेळद मादय्या,नगेय मारीतंदे,एकांतप्रिय रामय्या (ब्राम्हण ),अहिंसामुर्ती दसरय्या,सुज्ञानीदेव (लुटारु),निजलिंग चिवकय्या (डाकू),शिवनागोमय्या नागोराव कांबळे (महार), शंकर दासमय्या (ब्राम्हण),संकण्णा( गीतकार),अनिमिसदेव( राजा क्षत्रीय),देवदासीमय्या (विणकर),मधुवय्या (ब्राम्हण),गोल्लाळ( धनगर),गजेश मसनय्या,सकण्णा (गायक),अक्का महादेवी (कवयीत्री),अक्का नागम्मा (बसवेशेवराची बहिण),गांगाभिका (बसवेश्वराची पहिली पत्नी), निलांबीका (बसवेश्वराची दुसरी पत्नी),निजदेवी बोंतादेवी (क्षत्रीय राजकन्या),रोमय्या( सुत कातणारी),सोमादेवी सोमव्वा सत्यवती (मेहतर),दानम्मा (सोनार),मुक्तायक्का रेम्मब्बे (शेतकरी जमीनदार मुलगी),शिवप्रिया रायम्मा,महादेवी,पदमावती(जैन) रेचम्मा (कोळी),लिंगम्मा (न्हावी),अपन्नाची पत्नी,वीरम्मा,दासय्याची पत्नी,लकम्मा, मादय्याची पत्नी,सिद्ध देवम्मा (गायीका) इत्यादी सदस्यांना मानाच्या जागा दिल्या होते.हे सर्व सदस्य अनुभव मंटपात गोडीगुलाबीने आणि भेदभाव न राहात होते.


त्या शहरात महाकालेश्वराचं मंदीर होतं.त्या मंदीरात नेहमी भाविक येत जात असत.या मंदीराच्या बाहेर उभे राहून डोअर समाजातील मंडळी रोज सकाळी महाकालेश्वराचे दर्शन घेवून पवित्र झाल्याचा अनुभव घेत.डोअर समाज हा चांभार जातीची पोटजात होती.तसा दलित समाज हा कोणत्याही शहरात अधिवास करतांना शहराच्या बाहेरच अधिवास राहायचा.हे डोअर जातीचे लोक जनावरांना कापत.म्हणून त्यांचे नाव डोअर असे पडले होते.

त्या शहरात महाकालेश्वराचं मंदीर होतं.त्या मंदीरात नेहमी भाविक येत जात असत.या मंदीराच्या बाहेर उभे राहून डोअर समाजातील मंडळी रोज सकाळी महाकालेश्वराचे दर्शन घेवून पवित्र झाल्याचा अनुभव घेत.डोअर समाज हा चांभार जातीची पोटजात होती.तसा दलित समाज हा कोणत्याही शहरात अधिवास करतांना शहराच्या बाहेरच अधिवास राहायचा.हे डोअर जातीचे लोक जनावरांना कापत.म्हणून त्यांचे नाव डोअर असे पडले होते.हे महाकालेश्वर मंदीर उजैन येथील होते.

मंदीर तसं पाहिल्यास भव्य व डौलदार होतं.महाकाल व पदमावती हे दाम्पत्य रोज सकाळी अंघोळ करायचे,प्रातःविधीची सगळी कामं करुन ते मंदीरात दर्शनासाठी जायचे.परंतू अस्पृश्यांना त्या मंदीरात जायची मनाई असल्याने ते गृहस्थ मंदीराच्या बाहेरच राहून दर्शनाचा लाभ घ्यायचे.

दलितांची सावली अंगावर पडणे हे महापाप समजले जात असतांना विहीर,मंदीर,सार्वजनिक जागा,पाणवठे इत्यादी ठिकाणी जाण्यास परवानगी नसतांनाही हे दाम्पत्य विरोध सहन करुन या मंदीराजवळ जात असत.त्यासाठी डोक्याला तिलक आणि पुजेचं साहित्यही सोबत असायचं.हे पुजेचं साहित्य मंदीराच्या बाहेरच एका दगडावर अर्पण केले जात असे.

मंदीरातील देव प्रसन्न होत नाही ह्याचा प्रत्यय त्यांना येवून ते चिंताग्रस्त व्हायचे.महाकालेश्वर देवाच्या अगाढ कुपेने की काय त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं.त्याचे नाव श्रीकर ठेवण्यात आले.तो देखील मायबापाचा हात धरुन मंदीरात जात असे.मंदीरात प्रवेश नसल्याने ते हिरमुसले होत.मंदीराच्या दरवाज्याजवळ उभे राहून पूजा करतांना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहात.ते महाकालेश्वराला प्रश्न करीत.'देवा तुझे आम्ही भक्त असतांना आम्हाला प्रवेश का नाही.' महाकालेश्वर ते सर्व पाहायचा.त्यालाही प्रश्न पडायचा.पण तोही उच्चवर्णियांच्या विटाळकोठडीत बंद होता.तो फक्त ऐकण्याचे काम करायचा,बोलायचा नाही.

पदमावती व महाकाल मंदीरपरीसरात गेल्यावर पदमावती श्रीकरचा हात पकडून महाकालच्या जवळच उभी राहात असे.जवळच श्रीकरही उभा राहात असे.त्यामुळे तिथे उभा असलेला श्रीकरही या दांम्पत्यांच्या डोळ्यातील अश्रुंचा बांध पाहात असे.अनेक भक्तगण देवालयात गर्भगृहापाशी जात असत.श्रीकरला प्रश्न पडत होता की बाकीच्या मुलांचे मायबाप मंदीरात गर्भगृहात जातात.माझे मायबाप असे दुरुन पूजा करतात.असे का? यातील फरक मात्र अजून कळला नव्हता.पण जसजसे वय वाढत गेले,तसतसे कळायला लागले होते की आपण अस्पृश्य आहोत.अस्पृश्यता हा आपल्या जीवनावरील कलंक आहे हे तत्व कुठेतरी जुळले होते.नव्हे तर त्याला उमगले होते.त्याला समाजातील विषमतेचा भयंकर राग येत होता.तसा एक दिवस संधी साधून त्याने आपल्या आईला प्रश्न केला.

"आपण मंदीरात आत न जाता असे दरवाज्यापाशीत पूजा कावून करतो?देव रागावला का आपल्यावर?"त्यावर आई म्हणाली,

"बाळ,देव चांगला हाये.तो रागावला नाय.रागावणार बी नाय.येथली माणसं रागावली हायेत.आपण अस्पृश्य हाओ न.म्हून ते आपल्याले मंदीरात प्रवेश देत नाय."

"आपण माणसं नाय का?"यावर त्याची माय गप्प राहात असे.तसा तो बेचैन व्हायचा.या भेदभावाच्या विरोधात लढण्याचा निर्धार करायचा.तो अशाच प्रकारच्या काळजीत मोठा होत होता.सारे काही सहन करीत होता.

श्रीकर आता वीस वर्षाचा झाला होता.त्याचे लग्न झाले होते.त्याच्या पत्नीचे नाव कालिका अम्मा होते.मायबाप मरण पावल्याने कुटूंबाची जबाबदारी श्रीकरवर आली होती.कामधंदा म्हणून तो वडीलाचाच व्यवसाय करीत होता.वंशपरंपरेने तो व्यवसाय त्याच्याजवळ आला होता.दुसरे व्यवसाय करतो म्हटल्यास त्या व्यवसायाचे कसब त्याचेजवळ नव्हते.तसे परंपरागत व्यवसाय करण्यावर त्याचा रोषही नव्हता.मात्र तरीही मायबापाचा शिवदर्शनाचा नियम त्याने नेटाने पुढे सुरु ठेवला होता.

नित्यनेमाने श्रीकर प्रातःविधीची सगळी कामं आटोपून महाकालेश्वर मंदीरात दर्शनासाठी जात असे.एक दिवस असाच दर्शनाला गेला असता काश्मीरचा राजा भुपालदेव महादेव व त्याची पत्नी गंगादेवी हे गृहस्थ राजा ब्रिज्वलाची भेट घेण्यासाठी कल्याणला निघाले.पण वाटेत उजैनला थांबल्यामुळे ते या महाकालेश्वरच्या दर्शनाला आले होते.भेटीदरम्यान श्रीकरला या राजाने बसवेश्वराची व अनुभव मंटपाबाबत सांगीतले.त्या गोष्टीचा प्रभाव श्रीकरवर पडला.तो घरी आला.रात्रभर त्याने विचार केला.रात्री पती पत्नी झोपले असता श्रीकरला स्वप्न पडले.त्या स्वप्नात त्याने कल्याणनगर पाहिले.तो बसवेश्वराचा भव्य प्रासाद पाहिला.या प्रासादात शिवभक्त प्रसाद ग्रहण करतांना पाहिलं.श्रीकर व कालिकाअम्मा त्या रांगेत उभे असलेले पाहिले प्रत्यक्ष बसवण्णा आपल्या स्वहस्ताने त्यांना प्रसाद वितरण करतांना पाहिलं.तसेच तो प्रसाद ग्रहण करताच तृप्त झाल्याचंही समाधान चेह-यावर झळकतांना पाहिलं.समतेचे वातावरण व समतेने प्रसादाचं वितरण त्या श्रीकरला जातीभेद निर्मुलनाचे धडे शिकवून गेले.तरी ते स्वप्न होतं.

स्वप्न भंग पावलं होतं.बसवेश्वराच्या अनुभव मंटपातील समता आणि उजैन शहरातील समता यातील फरक भुपाल महादेवच्या म्हणण्यानुसार श्रीकरला समजला.त्याने कल्याणला जाण्याचा विचार केला.आपला बेत त्याने आपल्या पत्नीला बोलून दाखवला.कालिका अम्माही तयार झाली.तसे ते दाम्पत्य कल्याणला जायला तयार झाले.तेथून ते कल्याणच्या चांभारवाड्यात आले.ज्या चांभारवाड्यात हरळ्या राहात होता.याच कल्याणला संत हरळ्याची व श्रीकरची भेट झाली होती.

एक दिवस श्रीकर सकाळी उठला.त्याला मधूर स्वर ऐकू येत होते.गाण्याचा आवाज ऐकून श्रीकर त्या दिशेने निघाला.तर तो थेट अनुभव मंटपात पोहोचला.तेथील वातावरण पाहून तो मोहीत झाला.तिथे त्याची भेट चन्नबसवेशेवराशी झाली.त्यांनी श्रीकरचा कल्याणला येण्याचा उद्देश समजून घेतला व त्याने त्याला इष्टलिंगदिक्षा दिली.समाजात कोणीही नीच नाही, उच नाही,तर प्रत्येकाने आपले कामधंदे व्यवस्थीत करावे असे या श्रीकराने आपल्या वचनात लिहून ठेवले आहे.या गोष्टी त्यांनी अभिनव मल्लीकार्जून या नावाने प्रसिद्ध केल्या आहेत.

श्रीकर वयोवृद्ध झाले होते.ते सात्वीक वृत्तीचे होते.ब्रिज्वल राजाच्या सैन्यात उच्च पदावर त्यांना नोकरी मिळाली होती.कल्याणमध्ये गणाचार नावाची संघटना उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.माचय्या व श्रीकर हे या गणाचार दलाचे प्रमुख होते.त्यांना लोक प्रेमाने काका म्हणत.काकाला कन्नडमध्ये ककैया म्हणत.पुढे हेच श्रीकर ककैय्या म्हणून प्रसिद्ध झाले.त्यांचे जगणे पवित्र होते.साधी राहणी उच्च विचारसरणी हे ककैय्याच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते.लहानपणापासून तर मोठेपणपर्यंत नेहमी प्रभुभक्तीत लीन राहण्याचे कार्य ककैय्या करीत असे.तरीही ब्रिज्वल दरबारी ते नोकरी सांभाळून बसवेश्वराच्या तसेच हरळ्याच्या जातीभेद निर्मुलनाच्या कार्यात ते मदत करीत असत.

गुलाबीशी नेहमी ज्ञानभट भेटत होता.त्याला विवाहाच्या गोष्टीबद्दल आकर्षण नव्हते.तर आकर्षण फक्त कामवासनेपुरते होते.वासनेच्या गोष्टी काढताच गुलाबी विवाहाचा विषय जेव्हा छेडत असे.तेव्हा तो कसातरी विवाहाची गोष्ट टाळत असे.आपण तर मनाने एकत्र झालो आहोत असा बहाना करुन तर कधी कोणते आश्वासन देवून ज्ञानभट गुलाबीची गोष्ट टाळत राहिला.मी तुझाच आहे म्हणत म्हणत तो गुलाबीच्या शरीराचा भोग घेतच राहिला.तिलाहा तो विवाह आपल्याशी करेलच असे वाटत होते.कारण तिच्या पोटात आता गर्भ होता.जेव्हा ती गरोदर असल्याची बातमी ज्ञानभटाला माहीत झाली,तेव्हा ज्ञानभट खुश झाल्याचे तिने पाहिले होते.पण त्याच्या खुशीमध्ये निव्वळ उपहास आणि नौटंकीपणा होता.तो नौटंकीपणा गुलाबीच्या लक्षात आला नाही.

संगभट आणि ज्ञानभट या दोघांनीही तिला मार्गातून हटविण्याचा विडा उचलला होता.त्यासाठी त्यांनी दवंडी ही दिली होती.जो कोणी आंतरजातीय विवाह करेल वा प्रोत्साहन देईल,त्याला देहांत शासन देण्यात येईल.मग दवंडीची चक्रे गावागावात फिरत होती.आता मात्र मार्गातील काटा आपोआपच दूर होईल असे संगभटाला वाटत होते.फक्त लग्नाला नकार देण्याचीच देरी होती.पण बोलायला हिंमत होत नव्हती.पण निश्चयापुढे कोणाचेच जसे चालत नाही.तसे त्याचेही झाले.त्याने मनाशी खुणगाठ बांधली होती नकार देण्याची.ती तो आज पूर्ण करणार होता.

गुलाबीनेही दवंडी ऐकली होती.ती चिंतेत पडली होती.कदाचित ज्ञानभटानं नाही म्हटलं तर.....तिला रात रात झोप येत नव्हती.सारखं तिला आपल्या गरोदरपणाची चिंता लागली होती.तशातच एक दिवस ज्ञानभट तिला भेटायला आला.तसा जवळ येताच गुलाबी म्हणाली,

"तुमी मले किती तळपवताय.कवा करान लगन माह्याशीन."

"हो,पण जरा येळ हवा."

"माह्ये दिवस भरत चालले आन् तुमाले अजून किती येळ हवा."

"गुलाबे एक सांग,तु दवंडी आयकली का?"

"हो,आयकली.मंग त्या दवंडीचं का घेवून बसले."

"अवं,मी आतं गर्भगळीतच झालो हाये.मी पुरता घाबरलो हाये.आपल्या दोघायच्या पिरमाची ताटातूट होण्याचा योग दिसत हाये या दवंडीतून."

"ताटातूट आन् पिरमात.ते बी आपल्या दोघाची.....ते दवंडीतून......कसं शक्य हाये?"

"मंग का त्या दवंडीनुसार आपण दोघायनं का फासावर लटकून मराचं.मले नाय मराचं बाबा."

"मंग पिरम करतांनी नाय समजलं तुमाले?त्यायेळी तसा इचार नाय आला?"

"गुलाबे पिरम आंधळं असतं.आतं ते डोळस झालं हाये."

"मंग मी आतं का करु?हे बाळ घेवून मी कोठं जावू?"

"मी तुह्या रस्ताच मोकळा केला."

"म्हंजे?मी समजलो नाय."

"म्हंजे मी तुला सोडून जाणार.मी तुह्याशीन लगन करु शकत नाय.दवंडीनुसार आपण लगन केला तं.तुले मालूम हाये, का होणार हाये ते.त्यापरस तु आपल्या जातीशीन लगन कर.मी बी मा जातीशीन लगन करतो.दोघंबी वाचू आन् सुखी राहू.तु तुह्या घरी.मी माह्या घरी."

"का बोलता ज्ञानभटा,माह्या जातीचा इचार न करता तुमी पिरमाच्या गोष्टी करत होत्या.माह्या सौंदर्यावर तुमी भाळल्या होत्या.मणत होत्या का जाती माणसानंच बनवल्या.सौंदर्यापरस जात मोठी नाय.पिरमाच्या पाशात अडकविलात.तुमी बी अडकलात.लगनाचं आमीष देवून.......माह्या शरीराचा उपभोग घेतला.आन् आज नाय मणता.लाज नाय वाटत एवळीशीबी."

"त्यात मा का एकट्याचा गुना हाये.टाळी का एकाच हातानं वाजते का?"

"असं तत्वज्ञान सांगा नोको मले.तुमाले मी माह्य सर्वस्व अर्पण केलं.मीनं माह्या जातीची पोरं झिडकारली.मी तुमच्यावरच निस्सीम पिरम करत होते.आज मले तुमच्यापासून दिस गेले हायेत.हे तुमचच बाळ.मी तुमच्याच बाळाची आई होणार हे माईत असूनबी तुमची अशी भाषा.....असं झिडकारणं."

"त्यात तुह्याच दोष हाये.तुले माईत असूनबी तू माह्याशीन पिरम केलं.तुह्याबी शरीराचा भूक भागली का नाय."

"हो माह्याबी आन् तुमच्या बी शरीराची भूक भागली.पण आतं यातून निर्माण होणा-या या बाळाचं कसं?"

"तो बाळ का मले इचारुन ठेवला तू."

"पण तो तं तुमच्याचमुळं राह्यला ना."

"ते समदं जावू दे.मले भाषण नोको देवू.तुह्यासोबत लगन करुन फासावर लटकण्याचं धाडस नाय माह्यात.मले माफ कर लागन तं."

"पिरमात दोघंबी फासावर लटकलो तं का झालं?दोघंबी आणाबाणा टाकत होतो न.आतं बी काई चुकलं नाय.मी तुमच्या पाया पळते.मले असं टाकू नोका.माई शपत हाये तुमाले."

नकळत तिच्या डोळ्यातून अश्रुधारा टपकायला लागल्या.ती विनंती करु लागली.हातापाया पडू लागली.गहिवरुही लागली.तरी त्या ज्ञानभटाला दया येत नव्हती.तसा तो म्हणाला,

"हे पाय,मी इद्वान पंडीताचा पोरगा हाय.त्यायेळी मा मुर्ख झालो असलो तरी आतं मा बापानं मले शायनं केलं हाय.गुलाबे,आजपासून तू माह्याशीन लगन करण्याचा इचार सोडून दे."

"मंग माह्य ही आयका.तुमी माह्याशीन लगन नाय केलं तं मी जीव देईन जीव.समजलं."ती रडत म्हणाली.

"तुले का कराचं ते तर.पण मले सांगू नोको."

"खरंच नोको सांगू."

"हो नोको सांगू.मी तुह्या रस्ता मोकळा केला."

"ज्ञानभटा$हे परमेश्वरा या स्रीजातीले डंक माराचा प्रयत्न करणा-या या कालसर्पाले समज का येवू देत नाय.हे परमेश्वरा,तू सारं कर.परंतू या स्रीजातीचं सत्व ढळू देवू नोको.या कालसर्पाले ठेचून काळ म्हंजे झालं.ज्यानं पिरमाच्या आणाबाका टाकल्या.देवा तो कालसर्प निगाला.म्हून सांगतो.देवा,तू त्याले माफ करु नोको."

तसा ज्ञानभट झटक्यानं निघून गेला.गुलाबी मात्र दुर्दैवी मनानं दुःखी झाली होती.तशी तिही घराकडे एकेक पाऊल टाकत रडत रडत जात होती.तसं तिचं घर आलं होतं.तशी ती गप्प झाली.तिनं डोळे पुसले.आजीला माहीत होवू नये याचा वेध घेवून........आजीच्या नजरेत एक नजर टाकून ती निघून गेली.

आजीच्या समोर नातीन आत गेली होती.त्या आजीनेच तिला लहानाचे मोठे केले होते.पण नकळत आश्वासन व आमीषानं तिचं पाऊल फिसललं होतं.

जशी गुलाबी आत गेली,तशी आजीला चिंता वाटली.दररोज आजीशी घरी येताच बोलणारी मुलगी आज का बोलली नसावी याचं तिला नवल वाटलं.तशी माजघरात जावून एका कोप-यात बसून गुलाबी रडत असलेली आजीनं पाहिली.तिचं रडणं म्हाता-या आजीला ऐकू आलं.तशी आजी माजघरात गेली व विचारता झाली,

"गुलाबे,का झालं?कावून रडतेस?मी आजपर्यंत तुले असं कधी रडतानी पाह्यलं नाय.आन् आज अचानक."

गुलाबीनं मान वर केली.तिनं आजीकडं पाह्यलं.तसे तिने डोळे पुसले आणि ती आजीला चिपकली.तशी पुन्हा धाय मोकळून रडायला लागली.तशी आजी पुन्हा म्हणाली,

"बाळ, का झालं?कोणं काई मणलं का तुले?मले सांग.मी आतंच त्याची खबर घेतो."

तशी ती रडत रडत आपलं दुःख सांगू लागली.

"आजी,तो संगभटाचा पोरगा ज्ञानभट नाय का?"

"हो तो मुर्ख.....का केलं त्या मुर्खानं.तुले छळलं का सांग.मी जातो त्या पंडीत्याकळं.त्याची पंडीतकीच काळतो.म्हंतेत न इटाळ होते म्हून.मंग आमच्या पोरीयले छळतानी इटाळ नाय होत."

"नाय आजी,भांडाले जावू नोको.आपलीच बदनामी होईन."

"पण का केलं......का केलं तरी का त्या कुत्र्यानं."

"आजी,त्यानं मले पिरमाच्या नावाखाली लय छळलं.माह्या देहाचा उपभोग घेतला दोन साल."

"दोन साल झाले आन् तू आतं सांगतेस.बरं आतं का मणणं हाये त्याचं?"

"आतं तो मले म्हंते पिरम कराचं नाय.मले इसरुन जा."

"मंग बराबर म्हंते तो.दुसरा जातीचा पोरगा पावून लगन करु.पण बाळ तुनं असं कराले नोयतं पाह्यजे.अवं ते बामण आन् आपण चांभार.खरंच आपलं पटते का त्याईशीन.असं कराले सांगतलं कोण?"

"चूक झाली आजी.मोठी चूक झाली.मी नादान होती.पण त्याले समजत नोयतं का?"

"हे पाय तो भैयताड पोरगा,आन् त्याच्या तू पिरमात पडलीस आतं पाय बरं कोणावप बितत हाये ते.पण बाळ,तू चिंता करु नोको."

"अवं आजी,तोच मणत होता.आन् आणखीन मणत होता का मी लगन करीन."

"अवं,हे बामणाचे पोट्टे लय बदमाश रायतेत.लग्नाचा आश्वासन देतेत.पण लगन करत नाय."

"हो.पण मले त्याच्यावर इश्वास वाटत होता आजी."

"मंग आतं गेला न तो.जावू दे"

"चिंता नोको करु तं का?अजून दुसरी गोष्ट बाय."

"दुसरी कोणती गोष्ट पोरी?"

"तू रागवशीन नाय तं सांगते."

"नाय रागवत.सांगून टाक.मन हलकं होते."

"आजी,मी तुले कसं सांगू?मले हिंमत होत नाय."

"हिंमत कर पोरी,आपल्याले त्याच्यावर उपाय करता येईल."

"आजी,मले ज्ञानभटापासून दिस गेलेत."

"दिस गेले मणतेस.काय झालं परमेश्वरा.......एवळे दुःख मा पोरीले.लानपणी माय बाप नेलास.आन् आतं हे इपरीत.पण तरीबी तू घाबरु नोको बाळ.मी दवाई देईन."

"निदान चार पाच मयने झाले असन असं वाटते.तो भडवा लगन करीन मणे न आजी."

"चार पाच मयने होवून तुनं मले सांगतलं नाय.मांग तू उलट्या करत होतीस.पण मले वाटला का तुही तब्येत खराब असन.कावीळ झाला असन म्हून करते उल्ट्या.पण भलतंच निगलं हे.अवं तुनं मले मांगच सांगतलं असतं तं हे येळ आली नसती.आतं मातर बदनामी होईन पोरी.निव्वळ बदनामी.आपल्याले का मणन पोरी लोकं.पह्यलंच तं आपल्याले आपल्या बिरादरीचा इटाळ होते मणतेत.आन् हे माईत झाल्यावर तं आपली जात आपल्यालेच वाळीत टाकन.त्यापक्षा आपण मेलेलं बरं पोरी."

गुलाबीसह तिच्या आजाच्याही डोळ्यातून अश्रू येत होते.पण त्या अश्रुंना आवाज देणे योग्य वाटत नसल्याने आजी गप्प होती.तसे तिच्या मनात आत्महत्येचे विचार निर्माण झाले होते.तो बेत तिनं आजीला सांगीतला.आजीही तयार झाली होती.अशाप्रकारे समाजव्यवस्थेने गुलाबी आणि तिच्या आजीच्या रुपात बळी घेतला होता.

गुलाबी आणि तिच्या आजाचे बलिदान वाया गेले नाही.पुढील काळात दलित पिढी सुधारली.जबरदस्तीने उच्च वर्णियांच्या पोरांशी प्रेम करु लागली.नव्हे तर जबरन लग्नही करु लागली.

"आजी एक इचारु"गुलाबी म्हणाली.

"इचार.आतं शरम बाळगू नोको."

"मी गरोदर हाये.चार पाच महिण्याचा गर्भ पळू शकत नाय.तूच मणतेस का आपली बदनामी होईन.पण त्यावर माह्याजोवर एक उपाय हाये."

"कोणता उपाय पोरी?"

"आपण आत्महत्या कराची."

"अात्महत्या!"

"हो आत्महत्या.तु तं म्हातारी झाली हायेस.तुह्या का उपयोग आतं.आन् मी तं चांडाळीनच.मी बाळाले जनम देवून बी लोकं मले पुण्यवान समजणार नाय.त्यापरस मेलेलं बरं.तुच मणालीस."

"ठीक हाये.तुह्य मणणं."

त्यांनी मरण्याचा विचार केला.दोघ्याही एकमेकांचे गळे धरुन रडल्या.गुलाबीनं विषाचे प्याले तयार केले.त्यातील एक प्याला आपण घेतला.दुसरा आजीच्या हातात दिला.दोघांनीही एकाच वेळी विषाचे प्याले प्राशन केले.तसेच तळपत तळपत मुकाट्याने आपले आयुष्य संपवले.सकाळी दार उघडे नसल्याने व जास्त वेळ झाली असल्याने गुलाबी व तिची आजी कशी उठली नाही याचा विचार करुन लोकं तिच्या घराकडे गेले.त्यांनी पडलेली प्रेते पाहिली.तसे ते हरहरले.पण कारण माहीत झाले नाही.त्यांनी गुलाबी व तिच्या आजीला मुठमाती दिली.तसेच गुलाबीचा इतिहास कायमचा बंद करुन टाकला.पण समाजव्यवस्थेने त्यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेतले नाही.ते गुपीतचं गुपीतच राह्यलं अखेरपर्यंत.त्यामुळे समाजाचे किडे संगभट आणि ज्ञानभट बा इज्जत बरी झाले होते.गुलाबीचा आणि तिच्या आजीच्या आत्महत्येला जबाबदार असूनही.....

"मंग सांग वनजा,तुह्य मत माह्या मताशीन जुळू शकन का?"

"हो कावनाय जुळू शकत.अवं,पत्नी नव-याच्या इशा-यावर अवलंबून असन तं सर्व काई ठीक होते."

"हो पण....."

"पण का शिलवंता?"

"पण हे दवंडी आपल्याले अडचणीत आणू शकते.आपल्याले आन् आपल्या बापालेबी.त्यामुळं आतं आपल्या बापाले पह्यलं इचारु."

"आन् आपल्या मायबापानं नाय मणलं तं."

"नाय मणलं तं आपण कसा लगन करु?"

"मंग मीबी आत्महत्या करीन कुमार गुलाबीसारखी."

"मी तुमच्याशिवाय एक पलबी जीवंत रावू शकत नाय.ते तं सोडा कुमार.मी तुमच्यापासून दुर रावू शकत नाय.तुमी नाय मणलं तं या जगण्याचा का उपयोग? अवं बाई कोणाही एकाच पुरुषाले सर्वस्व अर्पण करते.जे बाकीच्या लोकायसमोर नाईलाजानं रायते वा स्वखुशीनं वावरते.तिले वारांगणा मणतेत.तसा मले मा जीवन कराचा नाय.मी फक्त तुमच्यावर पिरम करते.मले वारांगणा बनाचं नाय.वारांगणा बनण्यापक्षा मेलेला बरा."

"वनजा,रागावलीस.अवं मी फक्त एक इचार म्हून मणलं आन् तू तं साक्षात त्याचा परीणाम आधीच मनाले लावून घेतला.अवो ते जरी नाय मणन तरी मी हाये न एवळा.मी काई ज्ञानभट नाय.ज्ञानभटाले वाटलं असन का त्याच्या त्याच्या पिरमाच्या चाळ्याची बातमी राज्यात फैलावणार नाय.पण ते वार्ता राज्यात फैलावली हाय.त्यामुळं तं कित्येक लोकं आंतरजातीय लगनाले धास्तावले हाय.पण म्हून का आंतरजातीय इवाह करु नये का?"

"का करु नये?प्रत्येक तरुण तरुणीले आपला जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य हवं.नायतं मायबाप मणते त्या तरुणाईशीन लगन करावा लागते.मंग पोरीयले तो पसंत रावो का न रावो.तो काळा रावो का गोरा.बायाले तसं तं पसंतच करावा लागन.त्यात चांगला भेटनच असं नाय.चांगला जर का भेटला नाय तं जीवनभर आपल्या भाग्याले दोष देवून पसतावा लागते.त्यापरस आपण दोघं लगन केलेलं बरं.मी जर तुमाले सोडून मा लगन केला तं मले तुमच्यासारखाच भेटन म्हून सांगता येत नाय.कुमार,तुमी माह्याशीन लगन करान तं मले लय चांगलं वाटन.नायतं मी इतरायशीन लगन करण्यापक्षा मरुन जाईन."

"मंग तू जर तयार हाये तं मी बी तयार हाये.जरी आपले मायबाप आतं तयार नसतीन तरी.....तरीही आपण लगन करुम मोकळे होवू मणतो."

"आन् आपल्यासाठीच सजवला हाये अनुभव मंटप........पण त्या अनुभव मंटपात आपण जावून कसे मणतो."

"अवं तुह्य बी बराबर हाय.तु एक काम कर.तुनं आपल्या बापाले मांगं मणलं होतं न का,का जर त्याईन् परवानगी देली नाय तं त्याईले मराची धमकी देवून म्हून."

"बराबर."

"तं मंग जा आतं.मी बी जातो.पण निरोप नक्की सांग मले.इतराईले सांगू नोको.नायतं सटवीच्या लगनाले सतरा विघनं असं व्हायचं."

"ठीक हाये."

"जा आतं.पण येतानी गोळ बातमी घेवून ये."

"हो."

ती तशी निघून गेली.घरी गेली.घरी तिचे वडील पाठीमागे हात बांधून कसलातरी विचार करीत रस्त्यावरुन सारख्या चकरा मारत होते.त्यांच्या एकंदर हावभावावरुन व वर्तनावरुन तेच दिसत होतं.तशी चाणाक्ष नजरेतून न्याहाळत असलेली वनजा आपल्या वडीलाला म्हणाली,

"पिताजी,तुमी असे का बरं फिरत हात.काईतरी इचारात दिसता.आन् चिंतेतबी.कोणता इचार मनात चालला हाये पिताजी?"

"पोरी,मी तं तुह्या भविष्याचाच इचार करतो.मले वाटत हाये का तुह्य लगन कसं करता येईन."

"म्हंजे?मले तुमी का मणता ते समजलं नाय."

"पोरी,दवंडी झाली राज्यात.जो कोणी आंतरजातीय लगन करन वा त्याले प्रोत्साहन देईन त्याले देहांत शासन देण्यात येईन."

"आन् तुमी कोणाले न घाबरणारे त्या दवंडीले घाबरले."

"पोरी,मी पिकला पान हाओ.पण तुही सुरुवात हाये.मी तुले खोवू शकत नाय.म्हून घाबरा लागन का नाय."

"तुमी जर का घाबरान.तं आमी कसे धीटाईनं पुळं जावून.पण बीन काय नाय पिताजी,मले त्या कुमाराशीनच लगन कराचा हाये.त्याशिवाय मी कोणाशीनबी लगन करणार नाय.आन् मी सांगते का त्या कुमारासारखा पोरगा मले पती म्हून सात जनमात भेटणार नाय."

"ठीक हाये बेटा.पण हे दवंडी."

"पिताजी,दवंडीचं जावू द्या.मले सांगा, हे दवंडी तं लगनाच्या पह्यलंची हाये.जर लगन झाल्यावर संकट आली तं त्याचा सामना आमी कसा करणार?हे दवंडी........आन् या दवंडीचा सामना आमाले करावाच लागन.मले सांगा,जे आमच्या नशीबात असन,तेच घडन का नाय."

"तुह्यी बी गोष्ट बराबर हाये पोरी."

"मंग आतं एक काम करा.बसवण्णाले भेटून तुमी आमचं लगन त्या अनुभव मंटपात लावून द्या.पुळची पुळं पावू."

"ठीक हाये पोरी."

"पण त्याचा परीणाम?परीणामाले तयार रायशीन पोरी."

"आपण परीणाम पाहून घेवू पिताजी.का का करतीन फासावरच लटकवतीन न.पण एक इचार करा.त्याची दिशा ठरन.त्या बलिदानातून शेकळो वनजा आन् शिलवंत तयार होतीन.हा इतिहास एक रक्तरंजीत इतिहास म्हून नोंद होईन.तसेच शेकळो मधुवय्याबी तयार होतीन.आपण अमर होवून या धरेवर."

"तं मंग ठीक हाये बेटा,लवकरच मी महात्मा बसवेश्वराची भेट घेतो.आन् त्या अनुभव मंटपात तुह्या लगनाची घोषणा करुनच टाकतो इश्वरकुरपेनं आपल्या प्रयत्नाले यश येईनच."

मधुवय्या पोरीच्या बोलण्यानं भारावला होता.जणू मुलगी म्हणजे मागील जन्माच्या पुण्याईचे फळ वाटत होते.तिनच मधुवय्याच्या डोळ्यावरचा अंधकारमय आणि अंधविश्वासू चष्मा काढला होता.नव्हे तर त्याची मुलगीही अस्पृश्यतेची बेडी तोडण्यासाठी तसेच दोन समाजांना एकत्र करण्यासाठी पुढे सरसावली होती.मधुवय्याला ते पाहून आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते.अत्यंत गुणी मुलगी भेटली म्हणून मधुवय्या इश्वराला धन्यवाद देत होता.तसा तो म्हणाला,

"पोरी,मी बसवेश्वराची भेट घेवून येतो."

"बरं पिताजी,बसवण्णाबी स्वागतच करन तुमच्या निर्णयाचं."

मधुवय्या बसवेश्वराची भेट घेण्यासाठी गेला.त्याने मंत्रीपदाचाही तेव्हा विचार केला नाही.तसेच ज्याने आपल्या कुलाचे जीवन वाचवले,त्या हरळ्याच्या मुलाली मुलगी देणे हे तो स्वतःचे सौभाग्य समजत होता.त्या दृष्टिकोणातून तो पुढील पावले टाकत होता.तसा बसवेश्वराजवळ पोहोचताच तो बसवेश्वराला म्हणाला,

"मी आलोय.एक काम पडलं आपल्याकळ."

"या मंत्रीसाहेब या.बसा.सांगा कसं का येणं केलंत."

"महानता तुमच्या ठायी कुटकूट भरली हाये बसवण्णा.तुमी या जगाचे उद्धारकर्ते हात.प्रत्यक्ष इश्वरच हात बसवण्णा."

"असं बोलू नोका.मी काई इश्वर नाय.मी काईच केलेलं नाय.तो देवाचं कार्य हाये.मी फक्त देवाच्या कार्याचा मार्ग मोकळा कराचा प्रयत्न करत हाये."

"नाय बसवण्णा,तुमी समाजातल्या जुन्या रुढी परंपराले दूर भगवासाठी आपल्या प्राणाची बाजी लावता.परीणामाचा इचारच करत नाय.बघा न.हा अनुभव मंटप स्थापन करुन तुमी दलिताच्याबी इचाराले खतपाणी घालता.तुमी किती थोर हात बसवण्णा."

"ते जावू द्या.तुमच्या येण्याचं प्रयोजन सांगा आधी."

"महात्मा,तुमी मले दिक्षा देली.तवापासून माह्यात नवविचाराचा संचार झाला हाये.माह्यी एक इनंती हाये."

इनंती....आन् तुमची! बोला मंत्रीसाहेब तुमची कोणती इनंती हाये.ते तुमची इनंती.तुमी इनंती नोका करा मले.आज्ञा करा.तुमचा इचार स्वागतार्ह राईन असं समजा."

"मी मणलं माह्या पोरीचा वनजेचा लगन....."

"बोला,मंत्रीसाहेब.बोला.निःसंकोच बोला का बोलाचं ते."

"मी मणलं,वनजेचा लगन हरळ्याच्या पोराशीन कराचा इचार हाय."

"हरळ्याच्या पोराशीन.....त्या शिल्याशीन."

"हो मणलं."

"करा न मंग."

"पण तुमची परवानगी घ्यावा मणलो.मी मणलं का त्या दोघाचा लगन अनुभव मंटपात करावा."

"अनुभव मंटपात.चांगली गोष्ट हाये."

"पण बसवण्णा,त्याचा परीणाम......तुमालेबी त्याचा परीणाम भोगा लागन न."

"मी समर्थ हाये मंत्रीमहोदय.ह्या पवित्र कामासाठी मले मा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी देईन.पण तुमी तुमचा इचार पक्का करा."

"तं बसवण्णा,झाला....... आमचा बी इचार पक्का झाला.तुमी मा पोरीचा आन् त्या हरळ्याचा लगन त्या अनुभव मंटपात लावून द्या.आन् त्याईले आशीर्वाद द्याले बी तुमी हाजर राहा म्हंजे झालं."

"हो आमी ही त्या हरळ्याच्या पोराच्या लगनाले हाजरच रावू.आखरी त्याचे उपकार हायेत माह्यावर."

"ठीक बसवण्णा.आमी चालतो आता.आता परत भेटू अनुभव मंटपातच."

"ठीक हाये.जा तुमी.निःसकोचानं जा."

मधुवय्या तेथून निघून गेला होता.जाता जाता मनात विचार करीत होता.त्याच्या मनात दवंडीच्या परीणामाचा विचार होता.कदाचित त्यानंतर अराजकता माजून मधुवय्याला फाशीही होणार होती.तरीपण परीणामाचा विचार न करता त्याने तो विवाह करुन देण्याचा निर्धार केला होता.एका चांभार व्यक्तीसमवेत एक ब्राम्हण व्यक्तीही आज समाजाच्या अघोरी नीतीनियमाविरुद्ध बंड पुकारायला तयार झाला होता.बंड....जे उभारल्याशिवाय त्या अघोरी प्रथा व नियम मोडणार नव्हते.पण हे कार्य परीणामाची चिंता न करता करणार होते.जणू त्यांनी तसा वसाच घेतला होता.


शिलवंत घरी परत आला.त्याच्या मनात त्या दवंडीची भीती होती.त्याने वनजेला समजावले होते.पण तरीही वनजा मात्र गप्प राहिली नाही.तिनं विवाह करील तर शिलवंताशीच करील.नायतर लग्न करणार नाही.तसेच लग्न म झाल्यास आत्महत्या करील अशी धमकी दिली होती.ती धमकी ऐकून शिलवंत बावचळला होता.काय करावे ते त्याला सुसह्य झाले होते.त्याला काही सुचत नव्हते.तसा त्याला हरळ्याचा आवाज आला.

"बेटा कुमार.....कुमार$ बेटा कुमार$$"

"का अप्पा."

"इकळं ये बेटा."

"शिववंत जवळ गेला.तसा हरळ्या म्हणाला,

"शिलवंता,तू नावाप्रमाणेच शिलवंत म्हणावा लागन."

"का बरं असं बोलता बाबा?"

"पोरा,तू खरंच सामाजिक परीवर्तन कराले निघालास.पण....."

"पण का अप्पा?"

"पण पोरा,तू घाबरु नोको.हा हरळ्या तुह्या बाप हाये तुह्या पाठीमागं तटस्थ उभा.पण पोरा."

"का अप्पा?"

"तुनं दवंडी आयकली का?"

"हो अप्पा,आन् त्या दवंडीनुसार देहांत शासनाची शिक्षा हाये.देहांत शासन म्हंजे जो कोणी आंतरजातीय इवाह करन त्याले आन् जो कोणी त्याले प्रोत्साहन देईन त्या दोघालेबी फासावर लटकंवतीन."

"म्हंजे तुले माईत हाये मणायचं."

"हो मले वनजानंच सांगतलं."

"म्हंजे वनजा तुले भेटली म्हंतेस."

"हो,वनजा मले भेटली."

"का मणे ते?"

"अप्पा,ते मणत होती का असं घाबराचं नाय.असं घाबरुन संसार होत नाय.संसार सुखाचा झाला पाह्यजे असं वाटत असन तं अशा प्रकारच्या तुच्छ गोष्टीयले थारा द्याचा नाय."

"अजून का मणत होती ते."

"अजून मणत होती का तिच्या बापाले सांगून अनुभव मंटपात लगन कराची कोशीस कराची.बसवेश्वराले उपस्थीत ठेवून त्याईच्या साक्षात्कार साक्षीनं लगनसोहळा आटपंवायचा.मणत होती का फासावर लटकवलं तरी चालन.मायबाप नाय मणतीन तरी चालन.पण आपण लगन करुन.....वाटल्यास पळून जावून लगन करुन."

"नाय पोरा,पळून गेल्यानं समाजसुधारणा होणार नाय.तुले रितसरच लगन कराचा हाय.माह्या तं आशिर्वाद हाये तुले.तू घाबराचं कारण नाय."

"नाय अप्पा,मी घाबरत नाय.मी हरळ्याचा पोरगा हाये.नरसय्या बाचा संस्कार हाये माह्यावर.घाबरणारी चांभाराची जात नाय.अवो अप्पा,आपण वाघा सिंहाशीन पंगा घेणारी माणसं.अवो,तुमच्यामुळं आपल्या घरी प्रधानमंत्र्याचं आगमण झालं आपल्या वस्तीत.आन् तुमच्याचमुळं मधुवय्याचं ह्रृदय परीवर्तन झालं.पुळचा आपला समाज मणन मोठ्या दिमाखानं का हरळ्या चांभारानं सगळ्यात पह्यलं समाजपरीवर्तनासाठी क्रांती केली होती.समाजक्रांती......क्रांतीच्या परीणामाची चिंता न करता......तुमी चांभार समाजात नाय तं संपूर्ण दलित जातीतले पह्यले क्रांतीकारक ठरान अप्पा,आन् समाजसुधारकही......."

"पोरा,ते समदं बराबर हाये.पण तू तय्यार हाये का मनापासून."

"शाब्बास माह्या पोरा.......शाब्बास.तू खरा चांभाराईचा भाग्यविधाता हायेस.माह्यापक्षा खरी समाजक्रांती तं तूच करत हायेस.इटाळ मानणा-या त्या बामण समाजाच्याच पोरीले पटवून तिच्या इच्छानुसार तिच्याशीन लगन करुन समाजाच्या पह्यला सुरुंग तुच लावत हायेस पोरा.शाबास पोरा शाबास.मले आज तुले जनम देल्याचं खरं सार्थक वाटते.मले तुह्याबद्दल गर्व वाटते.तुह्यापासून सर्व चांभार समाजातले लोकं मणतीन पुत्र हवा तं शिल्यासारखा.ज्यानं बामणाची पोरगी पटवून तिच्याशीन लगन करुन अस्पृश्यतेले पह्यला सुरुंग लावला.आतं मले जरी मरण देलं तरी मी ते मरण आनंदानं स्विकार करीन."

"अप्पा,ह्या देहांत मरणानं कोणी संपत नाय.मले तं माह्य स्वप्न आजच साकार होतांनी दिसत हाये.ज्या समाजानं आपल्या समाजाले वंचित ठेवलं देवाचं दर्शन घेवू देलं नाय.तोच समाज आज आपल्या जोडीनं पंगतीले बसाले तयार हाये.आपल्या घरामंधी शिराले तयार हाये.तोच समाज उद्या आपल्याले पंगतीले बसवन आन् पोरीबी देईन आनंदानं.पण त्याची सुरुवात तुह्यापासून होवू दे.आन् अप्पा,ज्या गुलाबीले आज आत्महत्या करा लागली न.तसं पुळं होणार नाय.आपल्याले जशा ते पोरी देतीन.तशा पोरी ते बी मांगतीन.समजलं अप्पा.हा इतिहास लोकायले समाजपरीवर्तनापासून रोखणार नाय.उद्या त्याईचे लगन समारंभ आन् आपले समारंभ एकत्र होतीन.आपल्यालेबी मंदीराच्या गर्भगृहापर्यंत जाची परवानगी भेटन.एवळंच नाय तं कोठंबी आपल्याले केवाबी जाता येईन.तसं उद्याचं मले सपनच दिसत हाये."

"पोरा,सपन नोको पावू.सपन साकार होत नाय.सरवंच सपनं साकार होत नाय."

"अप्पा,जे सपनं ख-या मनानं पाह्यले जातेत.ते खरे होतेत.पण त्यासाठी कय्यो पिळ्या जातीन."

"पोरा,देव करो आन् तुह्य सपन साकार होवो.जेवा अरळलिंगेश्वराले आपल्या जातीची दया येईन.तेवा मातर देव कोणाले नाय कोणाले बुद्धी देवून पृथ्वीवर पाठवन.देव एक दिवस परीवर्तनासाठी येळ काळनच."

"अप्पा तसं गिसं काय नाय.देवापाशी एवळी फुरसत नाय.आन् देव काई जनम घेत नाय.आन् देव काई कोणाले जनम बी देत नाय.हे सर्व थोतांड हाये.परीवर्तनासाठी देवाची गरज नाय.माणसाच्या करणीची गरज हाय."

"हो,तुह्य बी मणणं बराबर हाय.माह्या बाप नरसय्यालेबी परीवर्तन व्हावं असंच वाटत होतं.पण तरीबी कोणीबी दलित जागला नाय.शेवटी मले जागा लागला.समाजपरीवर्तन करासाठी आन् अस्पृश्यता उखडून फेकासाठी.मले तं पोरा आज अभिमान वाटते का मा कार्यासाठी मा पोरगा बी हिंमतवान भेटला,का जो जोहार मायबाप मणता मणता सामाजिक परीवर्तनाच्या गोष्टी कराले लागला."प्रत्येक मायबापाले पोराचा हेवा वाटन तसंच करावं पोरानं.निदान माह्या इतिहास पावून तरी पुळं दलितानं जागावं.आपल्या पोराले हिंमतवान बनवावं.कारण समाजपरीवर्तनासाठी हिंमतीची गरज रायते."

"खरंच पोरा,तुह्या माह्या बलिदानातून शेकळो हरळ्या व शेकळो शिलवंत तयार होतीनच.पण एक गोष्ट लक्षात घे का मले नाय वाटत बसवेश्वराले तुह्या लगनानंतर प्रधानमंत्री रावू देतीन म्हून."

"बसवेश्वर त्याची पर्वा करत नाय.ते तं आपल्या जातीचा उद्धार पाह्यतेत."

"हो,बसवेश्वराचे तं उपकारच मानाले पाह्यजे.कारण बसवेश्वर तुमचा लगन लावण्याचा प्रयत्न करत हायेत."

"आन् अप्पा,मांडीच्या कातळ्याचे जोडे बनवणं म्हंजे साधी सोपी गोष्ट हाये का?कातळं कापतानी मोठा जीव कासावीस झाला असन.तवाच तं बसवेश्वरानं ते पायात न घालता आपल्या डोक्यावर ठेवून परत केले.त्या संगमेश्वराले वाहासाठी.त्याच प्रसंगानं भारावले अप्पा ते.म्हूनच माह्या लग्नात उपस्थीत रायणार हायेत ते."

"आन् मधुवय्यानं तं आपली पोरगीच देली.पोरा बसवेश्वरापक्षा बी आजच्या घडीले महान मणलं तं मधुवय्या हाये का ज्यानं आपली पोरगी तुले देली.त्यासाठी जात पात पाह्यली नाय."

"हो.पण त्याचा तुमी जीव वाचोला हे इसरलात का?जीव वाचोला म्हून देलं वनजेले."

"अरे,जीव तं कोणीबी वाचोते.त्या बदल्यात कोणी पोरगी देते का आपली.जातीसाठी माती खातेत लोक.नायतं जातवाले वाळीत टाकतेत.तरीबी मधुवय्यानं पोरगी देली तं तो महान नाय का?"

"हो महानच,नायतं आजच्या काळात कोण कोणाले पुजते अप्पा.कोणी कोणाचे काम करत नाय.फक्त स्वार्थासाठीच एकमेकाईचे काम करतेत हे लोकं.अशायेळी मधुवय्यानं सोताची पोरगी देणं लय मोठी गोष्ट हाय."

"आन् पोरा,जर का मी मेलो तं त्याले इसरशीन नोको.त्याले बी वनजा आन् तुह्याशिवाय कोण हाये?"

"हो अप्पा,कसा इसरीन.समस्त संसाराची निर्मीती करण्यासाठी तरी पोरीची गरज पळते.पोराले कोणी पोरगीच नाय देली तं संसार स्थापन होईन का?मंग त्या पोरीचे मायबाप महान नाय समजाचे का?"

झोपेची वेळ झाली होती.त्या संभाषणाला अंधाराने ब्रेक लावला.झोपेची वेळ झाली होती.तसा घरातून आवाज आला.

"अहो,ते संभाषण उद्या करजा आतं जेवण करा."

"हो जेवणार नाय तं ताकद कशी येईन.या अस्पृश्यतेची बेडी तोडाले आमा बापलेकाले जेवा लागनच न."

"या मंग लवकर."

"हो."

तसं कल्याणीनं पाणी दिलं.तसे सगळेजण जेवायला बसले.मग विचार करीत करीत एक एक घास पोटात कोंबत विचाराच्या चक्रव्युहात जेवण केव्हा संपलं ते हरळ्याला समजलं नाही.तसा हात धुवून तयार असलेल्या बिछाण्यावर हरळ्या उद्याची दिवास्वप्ने पाहात पहुडला होता.जणू वनजेला सुन करुन तो अस्पृश्यतेला पहिला धक्का देणार होता.हा विवाह केव्हा केव्हा होतो,केव्हा केव्हा नाही असं त्याला होवून गेलं होतं.

तो अनुभव मंटप भव्य सजला होता.सगळीकडे तोरणे पताका लावलेली होती.वाद्य वाजत होती.सनई चौघडाही वाजत होता.वरवधू आपआपल्या जागी स्थानापन्न झाले होते.अध्यक्षपद अल्लमप्रभूने स्विकारले होते.ते विराजमान झाले होते. बसवेश्वरही जातीने हजर होतेे.स्वर्गातून जणू पुष्पवृष्टी होत आहे असा जणू भाष होत होता.गावोगावचे विद्वान,पुरोहीत,कर्तबगार मंडळी या विवाह सोहळ्याला हजर होते.कारण इथे आंतरजातीय विवाह सोहळाही संपन्न होणार आहे याची कल्पना त्यांना नव्हती.एरवी तो सामुहीक विवाह सोहळा असून या सोहळ्याची ही पहिलीच घडी होती.त्यातच बसवेश्वरांनी शिलवंत व वनजेची आंतरजातीय विवाहाची जोडी या सोहळ्यात उपस्थीत केली होती.याच विवाह सोहळ्यामुळे या सोहळ्याला जास्त महत्व प्राप्त झालं होतं.जणू हा विवाह सोहळा म्हणजे तमाम अस्पृश्यता बाळगणा-या लोकांच्या गालावर एक चपराकच होती.एवढा गहणपणा या विवाहसोहळ्यात दडला होता.तसे पाहता याचा परीणाम वाईट येईलच हेही अनुभव मंटपातील सदस्य अंगी बाळगून होते.तसेच आपले प्रधानमंत्री पदही जाईल हेही बसवेश्वरांना वाटत होते.

"शिलवंत व वनजासह मुलीला आशिर्वाद देण्यासाठी देशोदेशीचे राजे आपल्या राण्यांना घेवून आले होते.तसेच मधुवय्या आणि हरळ्याही तिथे हजरच होते.ते एकमेकांशेजारी बसले होते.अनुभव मंटपाच्या एका बाजूला भव्य प्रवेशद्वार उभारला होता.तिथे मंटपाच्या दोन सदस्यांना तिलकसाठी ठेवले होते.तसेच आंतरजातीय विवाहाची कल्पनाच नसल्याने संगभट व मचण्णाही मंचावर बसले होते.एवढ्या लोकांच्या गर्दीत संगभटाचे हरळ्याकडे लक्ष गेले नाही.तसा वरवधूंनी आपल्या कपाळावर आपआपल्या जातीनुसार बाशिंग बांधले होते.त्यांच्या हातात हार देण्यात आले.भटांकरवी मंगलाष्टक म्हटल्या गेलं आणि विवाहसोहळा संपन्न झाला.तसे वरवधूंनी हार एकमेकांच्या गळ्यात टाकले.तसा टाळ्यांचाही गडगडाट झाला.

वरवधू आपआपल्या जागेवर स्थानापन्न झाल्यावर त्या वरवधूंच्या परीचयासाठी भाट पाहूण्यांना घेवून प्रत्येक वरवधूपाशी गेला.परीचय करुन देवू लागला.शेवटी शेवटच्या बाकावर बसलेल्या शिलवंत व वनजेला आशिर्वाद देण्यासाठी पाहूणे गेले,तेव्हा मात्र सर्वांनी बसवेश्वराची स्तुती करताच मचण्णा आणि संगभटाच्या अंगाचा तिळपापड झाला.त्यातच भाटानं त्यांचा परीचय देताच दवंडीतील कायदा मोडल्याचे प्रत्यंतर आले.एरवी ज्ञानभट व गुलाबी चा विवाह होवू नये म्हणून चाल चालून संगभटाने व मचण्णाने राज्यात आंतरजातीय विवाहाच्या बंदीची दवंडी पिटवली होती.तरीही त्या दवंडीला न जुमानता मधुवय्या आणि हरळ्याने आंतरजातीय विवाह लावलाच होता.आता याची तक्रार राजा ब्रिज्वलाकडे करुन बसवण्णाचे प्रधानमंत्री पद हुसकावून लावण्याची गाठ मनात त्यांनी भेटीदरम्यान करुन टाकली होती.

पंगत पडली होती.सा-याच समाजाचे लोक एकत्र जेवत होते.संगभट व मचण्णा हे सगळं पाहात होते.त्यांना ती पद्धत आवडली नाही.त्यामुळे की काय ते मात्र त्या पंगतीला बसले नाही.तसेच संपूर्ण समाज बाटला असे लक्षात येवून त्यांनी प्रधानमंत्री बसवेश्वराची भेट घेण्याचे ठरवले.यासाठी की त्यांनी पुढील काळात अशा प्रकारच्या समाज बाटवण्याच्या घटना करु नये.

विवाह सोहळा थाटाथाटात पार पडला.हरळ्या व मधुवय्याने आपआपल्या लेकराला आशिर्वाद दिला होता.तशी संधी साधून मचण्णा व संगभट प्रधानमंत्री बसवण्णाच्या भेटीला गेले.त्यातील संगभट म्हणाला,

"नमस्कार बसवण्णा."

"नमस्कार, बसा मंत्रीसाहेब.कसं का येणं केलं."

"अं आलो आमी असेच समजा."

"नाय सांगा काई बेत."

"बसवण्णा,आमी आलो काईतरी सांगाले."

"नि:संकोच बोला मंग."

"मी म्हंतो बसवण्णा,तुमी जे काई करत हात,ते चांगली गोष्ट नाय."

"गोष्ट!कोणती गोष्ट?गोष्ट कळू द्या आधी."

"गोष्ट म्हंजे?तुमी त्या दिशी शिलवंत आन् वनजेचा लगन लावला ते."

"मंग त्यात का झालं?"

"अवो बसवण्णा त्याचा इटाळ झाला न आपल्याले."

"पण ते बी माणसंच होयेत न."

"पण त्याईचा इटाळ होते न आपल्याले.आन् तो हरळ्या पंगतीत बी बसला तुमच्यासोबत.त्याले पंगतीले बसाले लाज बी नाय वाटली."

"बसला तं बसला.त्यात का वाईट वाटून घ्याचं."

"अवो पण आपल्या समाजाची धुळधानी झाली न.आपले पुर्वज का मणत असतीन त्या दिशी."

"अवो,पंडीतसायेब,तुमी इद्वान हात.म्हून तुमचा ब्रिज्वल दरबारी मोठा मान हाये.तुमू मंत्री तं हातच.पण राजाचे सल्लागारबी हात.आन् तुमी असे बोलता? अवो,समाजसुधारणा झाली पाह्यजे का नाय.आपण मंत्री हाओत.याचं जरा भान असू द्या.आपण त्याईले जीव समजलं पाह्यजे.त्याईले बी बिचा-याईले जगू देला पाह्यजे.अवो आपल्या आंगणात कुत्र्यालेबी पोळी भेटते.मंग ते तं माणसं हायेत.त्याईले का मनाई करता तुमी जगाची.आपण मंत्री हाओत.हे मंत्रीपद मिळणं मोठं भाग्य.याचा फायदा घेवून हा समाजातला इटाळ आपणच दूर केला पाह्यजे.केला पाह्यजे का नाय."

"बसवण्णा,हा समदा इटाळ देवादिकायपासून चालत आला हाये.आपण नाय आणला."

"अवो मंत्रीसायेब,देव इटाळ मानतच नाय.कोणत्या पुराणात लेहलं हाये.तुमी तं ज्ञानाचे पंडीत हात.तुमी तं पूजा करता.पुस्तकं वाचता.तुमाले ज्ञान हाये.तवा सांगा बरं."

"पुस्तकात नाय लेहलं म्हून का झालं.परथा तं पाळाच लागन न बाप्पा.अवो देवायले इटाळ होते,म्हून आमी त्याईले मंदीरात प्रवेश देत नाय.आन् तुमी त्याईले चक्क पंगतीले बसवता.त्याईचा लगन बी करता.तो बी आंतरजातीय.त्या मधुवय्यालेबी अक्कल नाय.तो बी मंत्री हाये न.बसवण्णा,आपणच असं करु तं बाकीचे लोकं नाय करणार का असं."

"पुस्तकात नाय लेहलं न.मंग देवाले इटाळ होते हे मी मानत नाय.त्याईचं रक्त मास हाड एकच.त्याईची इष्टलिंग देव एकच.मंग हा भेदभाव कसा?आपण बी देवानं जनम देलेले आन् ते बी देवानं जनम देलेले.मंग हा आपण असा भेदभाव का पाळावा सांगा मंत्रीसाहेब."

"आपले पूर्वज मानत होते नाही न."

"आपले पूर्वज का मानत होते इटाळ?"

"बसवण्णा,तुमाले सांगून का उपयोग.तुमी तं ध्यासच धरला समाजसुधारणेचा.त्यासाठी धर्माची हाना होईन तरी चालते तुमाले.आतं तुमाले सांगतल्यानं तुमी बदलणार नाय."

"परमान जर असन तं बदलाले का झालं."

"सांगा संगभटजी,बसवण्णाले बी कळू द्या धर्माचे सार.निदान ते आयकून बसवण्णाचं मन बदलन."मचण्णा.

"हे पाहा बसवण्णा,मी तुमचं मन बदलाले आलो नाय.पण निदान तरी आमच्या धर्मात अडथळा आणू नोका म्हंतो."

"पण हा इटाळ,कसा का मानला पुर्वजाईनं ते तरी सांगा न बा."

"बसवण्णा हे लोक अन्न खात नाय.मेलेल्या जनावराचं मास खातेत.आठ आठ दिस कुजत पडलेल्या जनावरांचं मास.आन् रायतेत बी हेंदळे म्हून आपले पूर्वज त्याईचा इटाळ मानत होते."

"मंग मले सांगा,त्याईले मास खाले बाध्य कोणं केलं?आपणच न."

"अवो बाध्य म्हंता.झाडपाला नाय खाता येत का?"

"पंडातजी,आपल्यावर अवलंबून असणारी ही माणसं.आपण देवून त्या चतकोर पोळीत समाधान मानणारे.कधी आपल्या वस्तीत पोळी भेटली नाय तं ते चक्क उपाशी रायतेत.अशायेळी खाल्लं जनावराचं मास तं कोणता गुना झाला."

"मास!झाडपाला,कंदमुळं खावा त्याईनं."

"तेच तं मनाचं हाये मले.त्याईले मास खाले कोणं लावलं ते.आलं का ध्यानात तुमच्या?"

"आपण.....आपण कसं केलं बाध्य?"

"अवो,आपण आपल्या घरची मेलेली ढोरं त्याईले जंगलात नेवून फेकाले लावतो.मंग अन्न भेटत नाय कोणत्या दिशी म्हून ते लोकं ते मास वाळू टाकतेत उन्हात.मंग ज्या दिशी अन्न भेटलं नाय वस्तीत म्हंजे खातेत लमचे ते मांस.मले सांगा आपणच आपल्या घरी गड्डा करुन ते जनावर पुरलं तं ते खातीन का मांस?"

"हो म्हून का जनावरं आपल्या घरी गाळाची?"

"त्यात का झालं."

"नाय नाय बसवण्णा,हे असलं हलकं काम आपण कराचं म्हंता."

"मंग हे हलकं काम त्याईनच का करावं?तुमी त्याईच्याचकडून हे असले हलके काम करुन घेता आन् त्याईलेच हलके समजता.हा कोणता न्याय.म्हंजे तुमी त्याईचा फक्त उपभोग घेता."

"उपभोग म्हंजे?त्याईचा जनमच त्यासाठी झाला."

"जनम.....जनमावरुन जात ठरते म्हंता."

"हो,जनमानवरुन जात बनते.ज्या जातीत त्याचा जनम झाला ते त्याची जात."

"सांगा मंग तुमी लान होते दुधपेते,तेवा तुमाले तुमची जात माईत होती का?कोणं सांगतली मंग तुमाले जात."

"आमच्या मायबापानं."

"दुधपेतेच असतांनी."

"नाही.थोडे मोठे झाल्यावर.समजाले लागलं तवा."

"बरं तुमच्या मायबापाले."

"त्याईच्या बापानं."

"आतं मा इचारीन का त्याईलं कोणं तं तुमी मणाल त्याईच्या बापानं.मंत्रीसायेब,लान पोराले त्याचा बापच मालूम राहात नाय मंग जात बनवणारा त्याचा कोण हे तरी कळते का?आपण आपल्या सोयीसाठी जात बनवली.आपल्याले तो माणूस पटकन वळखू यावा यासाठी.आन् हा इटाळबी आपणच बनवला.ते बी माणसंच त्याईलेबी आपल्यासारखंच जगू द्या मंत्रीसायेब.आपल्या एका गोळ शब्दाचा ते मान करतेत.आपल्या लहानशा हाकेनं ते काम करतेत.आपल्याकळ ते आशेनं पाह्यतेत.कोणतंबी काम का असेना ते त्यात आपला परका पाहात नाय.बदल्यात आपण का देतो.देतो फक्त भेदभाव आन् त्या मांगं लपलेला अपमान.आपणच इटाळ मानतो आन् काम पळलं तं त्याईचीच मदत घेतो.मात्र मदत घेतानी आपण त्याईचा इटाळ मानत नाय."

"ते कायनाय बसवण्णा,आमी तुमचं मन बदलंवाले आलो होतो.पण तुमी मन बदलण्याऐवजी आमालेच बदलवाले पायता.पण लक्षात ठेवा.तुमी निदान आमी गेल्यावर तरी मन बदलवा.नायतं याचे परीणाम वाईट होतीन."

"वाईट म्हंजे?"

"तुमाले तुमच्या प्रधानमंत्री पदावरुन हात धुवा लागन."

"मी त्याची पर्वा करत नाय.माह्या समाजसुधारणेच्या बीचमंधी जो बी येईन, त्याले तोंड द्याले सक्षम हाये मी."

"अजून येळ गेलेली नाय.तुमी धर्माले घातक काम करत हात.सुधरा तुमी.यानं धर्म नष्ट होईन.त्याईले समान स्थान देलं तं देव बी भ्रष्ट होईन."

"देव भ्रष्ट होईन म्हंता आन् त्याच देवालयात त्या देवाच्या जनमाले घातलेल्या निष्पाप जीवाचा बळी देता.नवस म्हून.तुमच्या देवाले मटन, रक्त,बळी सर्व चालते राजरोष.फक्त माणसाचा प्रवेश चालत नाय.वारे वा तुमचा देव."

"तुमी काई समजायच्या मुडमंधी नाय.चालतो आमी."

"बरं मंत्रीसायेब.या पुना कधीतरी.आन् याल तं तुमच्या मनातलं हे इटाळाचं भूत काळून या.नमस्कार."

ते रस्त्यानं निघाले होते चर्चा करत करत.बसवेश्वरानं धर्म मोडल्याला असंतोष त्यांच्या मनात खदखदत होता.केव्हा केव्हा त्यांना प्रधानमंत्री पदावरुन हटवतो असं त्यांना होवून गेलं होतं.ज्ञानभटाचा विवाह थांबला असेल तरी समाजात वनजेच्या व शिलवंताच्या विवाहानं खळबळ माजवूच असा निर्धार करुन ते चालले होते.जर का या विवाहाला पायबंद घातला गेला नाही तर पुढे सर्रासपणे दलित आणि उच्च वर्णियांचे आंतरजातीय विवाह पार पडतील.मग त्यांना कोणी रोखणारा नसेल असे त्यांना वाटत होते.यामुळेच की काय या गोष्टीची तक्रार करायला राजाकडे जाण्याचा बेत रस्त्याने चालता चालताच ते मनात करीत होते.मनात बसवण्णालाही पदावरुन हटविण्याचा निर्धार करुन.........




बसवेश्वराला हटविण्याचा मचण्णा व संगभटानं निर्धार केला होता.तसे ते राजा ब्रिज्वलाची भेट घेणार होतेच.तशी संधी साधून एक दिवस दोघेही जण राजा ब्रिज्वलाला भेटायला गेले.राजा सिंहासनावर बसला होता.तसा संगभट राजाला म्हणाला,

"मायराज,प्रणाम करतो."दोन्ही हात जोडून व वाकून तो नमस्कार करु लागला.तसा राजा बोलला,

"नमस्कार मंत्रीगण,बोला अकस्मात कसं येणं केलं?"

"

"एक प्रयोजन हाये मायराज."

"कोणतं प्रयोजन.जरा आमाला तं कळू द्या."

"एक तक्रार हाये मायराज."

"तक्रार! कोणाबद्दल तक्रार हाये?"

"तक्रार.....तक्रार....."

"हो,तक्रार......बोला मंत्रीसायेब.कोणाबद्दल हाये तक्रार?"

"सांगावसं वाटत नाय.आपल्याच माणसाबद्दल तक्रार हाये."

"म्हंजे?"

"आयका मायराज."असे म्हणत संगभट राजा ब्रिज्वलाला घडलेला प्रकार सांगू लागला.

"मायराज,फक्त रागावू नोका म्हंजे झालं."

"नाय रागावणार, बोला."

"आपल्या बसवण्णांबद्दलची तक्रार हाये."

"का केलं बसवण्णानं?"

"मायराज त्याईनं शिलवंत हरळ्या चांभाराचा पोरगा आन् आपला मधुवय्या त्याची पोरगी वनजा याईचा लगन लावला अनुभव मंटपात."

"मंग त्यात का झालं?"

"मायराज,त्यामुळंच तं बसवण्णा दोषी झाले मणायचे."

"म्हंजे?"

"मायराज,धर्म बुडला.शिव शिव शिव."

"तो कसा का?"

"तो हरळ्या चांभार होये आन् आपला मधुवय्या बामण."

"हो.मंग कसा धर्म बाटला ते कळलं नाय अजून."

"मायराज,आंतरजातीय लगन नाय का झालं.अवो,आपण समस्त मंडळी त्याईचा इटाळ मानतो,आन् त्याईलेच पोरगी द्याची."

"हो,बराबर हाये तुमचं मणणं.धर्म बाटला तं अशानं."

"मंग त्यात बसवाचा कोणता दोष?"

"त्याईनच लावला न लगन अनुभव मंटपात.त्याईच्या पंगतीलेबी जेवला तो.मायराज,तुमच्या आदेशाची आन् त्या दवंडीचीबी पर्वा केली नाय त्यानं.शिव शिव शिव."तसा मचण्णा बोलला,

धर्माच्या नावाखाली मायराज कसे दंभाचार माजले हायेत.चांभार आन् बामण याईचे लगन सर्रास पार पडत हायेत.कल्याणनगर असलं दृश्य आपल्या उघड्या डोळ्याईनं पाहात हाये.याले केवळ आपले बसवण्णाच कारणीभूत हायेत.श्वान आन् गाय आन् उंदीर आन् सिंह एकाच पंक्तीले बसू शकत नाय.देव दानवात रोटी बेटी व्यवहार होत नाय.सरगात सुद्धा या गोष्टीनं हाहाकार माजन मायराज.अशानं देव आपल्यावर कोपन नाय का मायराज.आपण देवाच्या इच्छेत इघ्न आणलं असं मनाचं हाये मले."

"पण आपल्या मधुवय्यानं असं केलं!"

"हो मायराज,मधुवय्या मंत्रीसायेबानंबी असंच केलं."

"हो हे आपले मंत्रीसुद्धा त्या बसवण्णाच्या नादानं त्या हरळ्यासोबत फिराले लागले.हातात चिपळ्या घेवून,गळ्यात माळा घालून सोताले लिंगेश्वर मनवून मंत्री मधुवय्या सुद्धा फिरतेत बसवण्णासोबत."

"मंग तुमचं मणणं का हाये?"

"त्या दोघालेबी मंत्रीपदावरुन बरखास्त करावं.कारण अशानं धर्म बुडून राह्यला मायराज."

"त्याईनं तं मंत्रीपदाचा फायदा घेवून घरादाराले तिलांजली देवून अधर्माचं शिखर गाठलं मणायचं.त्या दोघालेबी मंत्रीपदावरुन निष्काषीत करा लागन."

"हो न मायराज,कल्याणनगरातली सारी प्रजा ओरडत हाये बसवण्णाच्या नावानं.अर्ध्या कल्याण नगरीनं तं हरताळ पाळला होता.तरीबी आपण गप्पा हात मायराज."

"आमी गप्प नाय......हे गोष्ट आमाले आतं माईत झाली मणायची.आन् लोकाईनं यावर हरताळ का बरं पाळला."

"का पाळणार नाईत हरताळ.आजपर्यंत कधीबी न झालेल्या आंतरराष्ट्रीय पिरमइवाहाची सुरुवात जर मंत्र्याच्या महालापासून झाली तं कल्याणनगरीत राहणा-या झोपळ्यातील तरुण तरुणीले आपोआपच पिरमइवाहाचे आन् पिरमाचे धडे मिळतीन या निमीत्याने इवाहाच्या इतर पद्धती बंद पडतीन.धर्म बुडन."

तेवढ्यात संगभट म्हणाला, "मायराज,संत संत मणून बडेजाव करणा-या त्या हरळ्याले कल्याण नगरीतून हाकलून द्यावा मणतो."

"पण आतं का उपयोग हाये त्याचा.गोष्ट तं घडूनच गेली न."

"नाय मायराज,ते आपल्याले माईत नाय असं समजून आपण खेळी खेळावा मणतो."

"नाय,नाय असं करता येणार नाय."

"नाय मायराज,त्यात वाईट का हाये.दोघालेबी शिक्षा झालीच पाह्यजे का नाय."

"पण शिक्षा कोणत्या गोष्टीची देणार."

"शिक्षा द्यावाच लागन मायराज,तुमी नियम जे बनवून दवंडी देली न......आठवा नियम आन् दवंडी......तुमी त्या दवंडीवर जर का शिक्षा देणार नाय तं तुमाले कोण मानन.आन् मले सांगा का दवंडी म्हंजे कायदाच का नाय."

"हो."

"मंग त्याईनं तं तुमच्या दवंडीचा आदेशच ठुकरावला."

"हो ठुकरावला."

"म्हूनच सांगतो मायराज,त्या आदेशाची अवहेलना केली म्हून त्या हरळ्याले फासावर लटकवणं हे गोष्ट कायद्यात बसत नाय का?"

"बसते.ते कायद्यात बसणारीच गोष्ट हाये.पण......"

"पण का मायराज?"

"मी त्या हरळ्याचे आन् त्या मधुवय्याले उल्लंघन म्हून फाशी द्याले गेलो तं हे बसवेश्वर अडवतीन.शिवाय येथली जनता बी त्या गोष्टीले अनुरोध करन.मंग संप हरताळ.मंग मी.......आमाले पदावरुन हटवतीन.नाय आमची पिळी बी पदावर राईन."

"मायराज,तुमी त्या बसवेश्वराले पाहा.त्याईले प्रधानमंत्री पदावरुन हटवा.आमी जनतेचं पायतो."

"तुमी जनतेचं पायता.कसं पाहान जनतेले.जनता कशी काबूत येईन तुमच्या."

"हे हायेत न मायराज,हे हायेत न भटजीबोवा.....हे जनतेले आपोआपच काबूत आणतीन मायराज........शिवाय ह्याईच्या घरची पूजा पुर्ण होत नाय.लोकाईची कशी दिशाभूल कराची.त्याची खरी गोष्ट या भटजीबुवाले समजते.मचण्णाचं बोलणं मधात अडवत संगभट म्हणाला,

"होय मायराज,मी धर्माची,देवायची भीती दाखवून जनतेले सांभाळतो.तुमी बसवेश्वराले सांभाळा म्हंजे झालं."

पंधरावा भाग


"पण बसवेश्वराले कसं सांभाळाचं म्हंतो.मले तं चिंता हाये."

"चिंता नोको करा मायराज.क्षमा करत असान तं मी एक उपाय सांगू."

"उपाय सांगता भटजी,सांगा....उपाय सांगा मंग."

"त्या बसवण्णाले प्रधानमंत्री पदावरुन हटवा.मंग समदी चिंताच मिटते."

"भटजी,हटवलं बी असतं.पण कसं हटवाचं तेच तं चिंता हाय."

"सोप्प हाय."

"मंग सांगा न.वाट कायची पायता."

"आपण त्याले स्पष्ट सुचना द्या का तुमी शिस्तभंग केला म्हून तुमाले हटवाचं हाय."

"पण ते तं आमचे नातेवाईक न."

"नातेवाईक....हो.प्रधानमंत्री म्हून मले दुसरा बी नात्यातलाच पाह्यजे का नाय."

"मंग बसवेश्वराचे भाचे चन्नबसवेश्वराले बसवा प्रधानमंत्री पदावर.साप बी मरन आन् लाठी बी तुटणार नाय."

"व्वा व्वा भटजी,का युक्ती काहाळली.तुमचा मेंदू अशा गोष्टीत लय चालते.मले तं वाटलं का तुमी फक्त पोथ्या वाचून कथाच आयकवता.राजकारणातलं समजत नसन.पण तुमी बी पक्के राजकारणी दिसता."

"तुमी या खोक्या दिमाकाची गोष्ट नोको घ्या मायराज.पुरातन काळापासून आमचे पूर्वज न्यायदान करत आले.राजा मायराजाले न्याय देवून,सल्ले देवून मदतच करत आले."

"म्हूनच तं तुमाले आमचं सल्लागार मंत्रीपद देलं.येळोयेळी आमी तुमचा सल्ला घेतो."

"हो मायराज,आमी बी चांगलाच सल्ला देतो न.नायतं हरळ्याच्या समाजानं किती किती लोकाईले सल्ले देले असते.अवो ते तं सोडा,तुमी दवंडी देली नसती तं माह्या पोरानंबी त्या गुलाबीसंग लगन केलं असतं."

"म्हंजे तुह्या पोराचंबी चांभाराच्या पोरीसोबत पिरम होतं तर."

"हो मायराज,तुमच्या दवंडीनं वाचला मा पोरगा."

"हो तसंच समजा.मंग त्या गोष्टीनं मोठ्या मोठ्या लोकाईचा फायदा झाला असन तं."

" हो"

"म्हूनच दवंडी द्याले लावली वाटते."

"हो,तसंच समजा."

"अजून बोला भटजी."

"का बोलू मायराज,जर का हरळ्या आन् मधुवय्याले फासावर चळवलं नाय तं लोकं माजून जातीन.मणतीन का त्या हरळ्याचंच काय नाय झालं तं आपलं का होईन.बाकीचेबी बिघळतीन म्हंतो.ते तं सोळा मायराज.धर्माचंबी नुकसान होईन.राजा असो का सामान्य जनता......मंग समद्याईचे पोरं बिरादरी सोळून असेच पिरम करतीन आन् दुस-या बिरादरीच्या पोरीचे पोटं आणतीन.पण त्याईले जर का शिक्षा देली तं हा प्रकार बंद होईन."

"हा प्रकार जर बंद होत असन आन् त्या प्रकाराबद्दल जनतेचं वाईट होत असन,तसेच धर्माचं नुकसान होत असन तं आपण हरळ्या आन् मधुवय्याले फाशीच देवू.त्याईले फासावर लटकवल्याशिवाय पर्याय नाय."

"हो मायराज,आन् मी तुमाले सांगतो का त्याईले फासावर लटकवल्यावर समाजात धास्ती निर्माण होईन.आन् पुळं कोणीबी असला आंतरजातीय लगन कराले समोर येणार नाय.येदकाळापासून चालत आलेल्या वर्णाश्रमाविरुद्ध या कल्याणनगरीत अभुतपुर्व क्रांती सोनेरी इतिहासात लेहली जाईन बसवण्णाच्या आंतरजातीय इवाहाची घटना.मांगं त्या गुलाबीले ज्ञानभटासोबत बोलतांनी पावून माई तळपायाची आग मस्तकात गेली.मी तिले असं फटकारलं होतं का तो जनमभर विसरली नसती.या कल्याण नगरीत धर्माले अधर्मानं घेरलं किवा वर्णाश्रम खिळखिळा झाला तं आमा पंडीताले कोण इचारन मायराज.अशा घडलेल्या क्रांतीपुर्ण घटनेले देहांत प्रायश्चित शिवाय दुसरा पर्याय नाय.त्याईले फासावर लटकवाच मायराज.जातो आमी.ठीक हाये."

"ठीक हाये.तुमी म्हंता तसंच होईन.जा तुमी चिंता करु नोका."

संगभट व मचण्णा ब्रिज्वलाला विचारात टाकून निघून गेले होते.ब्रिज्वल मात्र विचार करीत होता.काय करावे ते त्याला सुचत नव्हते.मधुवय्या ब्राम्हण असूनही त्यानं आपल्या मुलीचा विवाह हा प्रश्न त्याला बेचैन करीत होता.कल्याणनगरात आपल्याएवढीच हरळ्याचीही ओळख निर्माण झाली आहे याची प्रचिती त्याला येत होती.एरवी तो संत होता हेही त्याला माहीत होते.तसेच हरळ्या त्या मांडीच्या कातळ्याच्या जोड्यापासून जास्त प्रसिद्ध झाला होता.उद्या तर हे लोक आपल्याला गादीवरुन उतरवून त्या हरळ्यालाच गादीवर बसवतील हेही त्याला वाटत होते.कारण बसवेश्वराचे नाव ब्रिज्वलापेक्षा मोठे झाले होते. बसवेश्वराची एवढी कृपा झाली होती की जो तो व्यक्ती बसवेश्वराकडे कृपेच्या दृष्टिकोणातून पाहात होता.

ब्रिज्वल राजा एक अत्याचारी राजा होता.त्याचा व्यवहार प्रजेप्रती आदराचा नव्हता.त्याचा स्वभावगुण तामसी स्वरुपाचा होता.क्षणातच त्याला राग येत असे.अन् त्याला कोणी काही बोलल्यास त्याचं परीपाक मृत्युदंडात होत असे.अशाप्रकारे त्याने कित्येक लोकांना यमसदनास पोहोचविले होते.तसा तो कधी प्रजेमध्ये मिसळत नसे.तर आपले नातेवाईक,मंत्रीमंडळात मिसळत असे.त्या जवळच्या मंत्र्यांनी कोणाची कुरघोडी केल्यास त्यांनाही देहदंडाच्या शिक्षा करण्यास राजा मागेपुढे पाहात नसे.तसं पाहिल्यास मधुवय्याच्या वनजाचं आणि शिलवंताचा विवाह झाल्याचं ऐकताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली होती.त्यामुळे मचण्णा व संगभट गेल्यानंतर एक दिवस त्याने दरबार भरविण्याचे निश्चीत केले.ठरल्याप्रमाणे बसवेश्वराला जाब विचारण्यासाठी बसवेश्वरालाही दरबारात हजर राहण्याचे निमंत्रण दिले.संगभट व मचण्णालाही बोलावले.एवढेच नाही तर मधुवय्या व हरळ्याला साखळदंडात जखडून आणण्यात आले.त्यांना पकडण्याचे फर्मान आधीच सोडले होते.

दरबारात गोलाकार सगळी मंडळी बसली होती.मध्यभागी सिंहासनावर राजा ब्रिज्वल बसला होता.तर ब्रिज्वलाच्या उजव्या बाजूला बसवेश्वर व डाव्या बाजूला मचण्णा बसले होते.बाकीची मंडळी थोडी दूर बसली होती.समोर साखळदंडात जखडलेले मधुवय्या व हरळ्या उभे होते.त्यांच्या मागे दोन पहारेकरी भाले घेवून उभे होते.दरबारातील सर्व खुर्च्या सर्वांनी हस्तगत केल्या होत्या.त्या त्या खुर्च्यावर बाकीची मंडळी विराजमान झाली होती.तसा शिपायाचा आवाज आला.महाराज ब्रिज्वलाचा जयजयकार असो.तसा ब्रिज्वल राजसिंहासनावर स्थानापन्न होताच ब्रिज्वल राजा बोलता झाला.तो म्हणाला,

"दंडनायक बसवण्णा,आपण आमचे प्रधानमंत्री......आपण धर्मप्रवण,कार्यप्रवण,तसेच वैराग्यशाली पुरुष म्हून आमच्या कल्याणमंधी प्रसिद्ध हात.धर्मस्वातंत्र्य व व्यक्तीस्वांतत्र्य सर्वालेच हाये.पण व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मधुवय्या आन् हरळ्यानं जे कृत्य केलं.त्याले जबाबदार कोण?हा असला आंतरजातीय इवाह कोणत्या पुराणात लेहला हाये.कुरपा करुन तो मले दाखवावा एवळंच माह्य मणणं हाये.बोला बसवण्णा आपले का मत हाये यावर."

"मायराज,शास्रामंधी प्रवर्तक आन् निवर्तक अशा दोनच जाती हायेत.संसार कर्मसंबंधी प्रवर्तक जात आन् शिवकर्मसंबंधानं निवर्तक जात.आन् जे अठरा वर्ग हायेत,त्यात भक्तीयुक्त वर्ण सर्वात मोठा.भक्त हा देवाले प्रिय रायते.पण तो सामान्याले सामान्यासारखाच रायते.यावरुन इश्वात जो कोणी शिवभक्त असन.त्याचं महत्व अगाढ हाये.तसं पाह्यलं तं मायराज या पृथ्वीतलावर स्री आन् पुरुष या दोनच जाती अस्तीत्वात हायेत.बाकीच्या बामण,चांभार या जाती नाईच.मी त्याईले जातीमंधी मोजत नाय."

"म्हून का तुमाले आंतरजातीय लगन व्हावा असं वाटते.ते बी बामण मंत्र्याच्याच पोरीचा एका शुद्र चांभाराच्या पोरासोबत.तेबी बामणानं द्यावी पोरगी या शुद्र चांभाराच्या पोराले.आपण बामणाईनंच राजधर्म सांगावा आन् आपणच बामणानं राजधर्म सोळावा.आमी राज्यात दवंडी पिटवावी का आंतरजातीय लगन करु नये.देहांत शासन देण्यात येईन.आन् तुमी अनुभव मंटपात हाच आंतरजातीय लगन सोयळा थाटात करावा.हे कितपत बराबर हाये.हा आमचा नियम होता.आन् तो नियम तोडतांनी तुमाले शिक्षेची चिंता नोयती का?का दवंडीचा नियम तुमाले माईत नोयता?"

"मायराज,मधुवय्यानंच नाय तं हरळ्यानंबी विरशैवं पंथाची दिक्षा घेतली.जाणतेपणानं मणा का अजाणतेपणानं मणा.एखाद्या धर्माची दिक्षा घेतल्यानंतर त्या धर्माचा जय होतो हे समजा.मधुवय्या आन् हरळ्या हे एकाच धर्माचे झाले.त्यामुळे हा इजातीय इवाह नाय तं सजातीय इवाह झाला.असं मले वाटते.समाजाच्या सर्वोन्नतीचा आधार धर्म हाये.प्रजेनं जर राजदंडापक्षा श्रेष्ठ असलेला धर्म स्विकारला तं त्यात तुमचाच इजय झाला असं समजा.आन् तुमाले खात्रीनं सांगतो का आमच्या अनुभव मंटपात धर्माचं व्यवस्थीत पालन होते.हे आपण प्रत्यक्षात पाहावं.आमच्या अनुभव मंटपाले भेट देवून."

"पण आमी तुमच्या हातात फक्त राजधर्म देला हाये.धर्माचं काम नाय.पुरोहीत करतेत धर्माचं काम.त्याकळं लक्ष द्याची तुमाले कोणती गरज येवून पल्ली."

"ते समदं मले मान्य हाये मायराज.पण........"

"पण का बसवण्णा."

"पण राजधर्माचं पालन करतानी धर्मदंड जर पुरक ठरत असन तं तो स्विकाराले का हरकत हाये मणतो."

"तुमचं मणणं बराबर हाये.पण....."

"पण का मायराज?"

"पण नीच पातळीच्या अस्पृश्य लोकाले धर्माची दिक्षा देवून त्याईले बराबरीचं स्थान देणं योग्य नाय.हे कोणत्याबी ग्रंथात लेहलं नाय."

"मंग त्याईले स्थान द्याचं नाय हे तरी कोणत्या ग्रंथात लेहलं हाये का?मी अठरा पुराण वाचले.येदशास्र वाचलं.पण कोठंच मले हा फरक जाणवला नाय.आन् ज्यानं लेहलं बी असन,त्याले बी या परीवर्तनवादी काळात बराबर मानत नाय."

"बसवण्णा,सागर कितीबी अथांग असन तरी त्यानं मर्यादा सोळाची नसते."

"मायराज,मी मानवधर्माच्या दृष्टीनं जे योग्य तेच केलं हाय.अखिल शिवभक्त मले एकाच मानववंशाचे वाटतेत.आन् ते एकाच लिंगाचे,एकाच मानवजातीचे,असून एकाच लिंगाची जर का पूजा करत असतीन तं त्याईले आपण अस्पृश्य का समजावं?हरळ्या आन् मधुवय्याबी एकाच लिंगाची पुजा करतेत.मले तं त्या दोघांमंधी फरकच जाणवत नाय."

"तुमच्या मनातील इद् वत्तेचा इचार मले गंभीरपणानं कराची गरज नाय.माह्या दवंडीची पायमल्ली या दोघानं केली का नाय ते सांगा."

"पण तुमी हेतूपुरस्सरपणानं इपरीत बुद्धीनं तसा वटहुकूम काळाले सांगतलंच कोणं?"

"म्हंजे तुमी आमचा बी हुकूम मानत नाय तर......"

"का बरं मानत नाय राजाज्ञा."

"माह्यं तसं मणणं नाय बसवण्णा."

"मायराज,राजाज्ञा रास्त भावनेतली असन तं मानावा लागनच."

"म्हंजे,हे दवंडी रास्त भावनेतून नोयती असं मनाचं हाये का?"

"मायराज,मी तसं मणत नाय."

"मंग का मनाचं हाये."

"मायराज,आपण जवा वटहुकूम काहाळला,तवा मोठी चूक केली."

"चूक......आमी चूक केली असं मणता."

"हो मायराज,चूकच......तुमी चूकच केली."

"कशी का चूक? राजकारणाची सर्व सुत्र तुमच्या हातात देली हेच आमची चूक होती वाटते."

"तसं नाय मायराज,तुमी आमाले प्रधानमंत्री असतांनी बी हा हुकूम काहाळला,पण आमाले एका शब्दानंबी इचारणं तुमाले योग्य वाटलं नाय.निदान सल्ला तरी इचाराले पाह्यजे होता.तो सल्ला अंमलात आणत्या नायतं नाय आणत्या.पण इचाराले पाह्यजे होतं का नाय."

"मले ते इचाराले पाह्यजे होतं असं तुमाले वाटते का?तो मा आदेश होता."

"मंग मंत्रिमंडळ बनवलं कायले?"

"हे पाहा,कल्याणची सारी प्रजा ओरडत हाये आमच्या नावानं लोकाईचे मोर्चे येत हायेत आमच्या महालावर.अनेकांच्या तक्रारी येत हायेत आमच्या कानावर.आमी गांगरलो गेलो या घटनाईनं.शेवटी या गोष्टीले आळा घालासाठी आमाले बळाचा आन् शिक्षेचा वापर करावाच लागन का नाय."

"आपला गैरसमज होत हाये मायराज.आजपर्यंत या बसवण्णानं न्यायानं,नीतीनं आन् धर्मानं राज्य केलं.यायेळी मात्र इश्वास ठेवा का नोको ठेवा."

"आंतरजातीय लगनं हे आपल्या इजयाचं लक्षण मानणारे महामुर्ख असतीन तं आमाले काईच मणायचं नाय.आन् आपण संमती देलेल्या या इवाहाले सद्यकाल व्यवस्थीत नाय.असं आमाले वाटते."

"मायराज,धर्म हा तारक रायते.मारक नाय.आमी जे काई केलं ते भविष्यकाळासाठी आन् परीवर्तनासाठी.आमच्या भावी पिळीसाठी.आज जरी ते तुमाले कुचकामाचं वाटत असन तरी भविष्यात चे फार मोलाचं वाटन.भविष्यकाळासाठी केलेली ही उपाययोजना हाये."

"भविष्य काळाचा तेवळा इचार कराची आमची पात्रता नाय.हा वटहुकूम तोडला तुमी,त्याचं का कराचं ते समदं सांगा आधी."

"आमी काय कराचं ते केलं.आतं तुमाले का कराचं ते करा."

"ठीक हाये.तुमी आमच्या कामात दखल द्याची गरज नाय."

तसा ब्रिज्वल पुढे असलेल्या मधुवय्याला म्हणाला,

"आपण आतापर्यंत आमचे मंत्री होते.अधिकारावर असलेल्या मंत्र्यानं समाजाच्या हिताच्या दृष्टिकोणातून कार्य केले पाह्यजे.पण विध्वंसक कार्य करु नये.असा राजकारणाचा नियम हाये.हा नियम तुमाले माईत नोयता का?आपण आपल्या पोरीचा लगन ह्या हरळ्याच्या पोरीशीन करुन राजद्रोह केला हाये.याबद्दल आपले मत का हाये ते सांगावे."

"मी आपल्या दरबाराचा मंत्री होतो.आजपर्यंत मी माह्यी मंत्रीपदाची जबाबदारी व्यवस्थीत पार पाल्ली.एखाद्या मंत्र्यासारखा भ्रष्टाचार करुन मी गडगंज संपत्ती जमवली नाय.तसेच मी अधिका-याईसोबत मदीरापानबी केलं नाय वा झिंगत पल्लो नाय.नाचगाण्याच्या मैफीलीले वा वारांगणेच्या व्यवसायाले प्रोत्साहन देलं नाय.सोताचा बडेजावपणाबी वाळवला नाय.वरची सत्ता हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला नाय.लोकाईले आश्वासन देवून,मानपत्र स्विकारुन,गळ्यात हार घालून कोणाची दिशाभूल केली नाय.मायराज,बसवण्णा सोळून बाकी सर्वच मंत्री तुमच्या आड बेकायदेशीर वर्तन करत हायेत.बडेजावपणा वाळवासाठी मानानं मिरवीत हायेत.पण ते आपल्या लक्षात येत नाय.का तं आपण त्याईच्यावर इश्वास टाकला.असा राजइद्रोह आपल्याले दिसत नाय.हा राजइद्रोह नाय मायराज,समाजइद्रोह हाये.आपण त्याईच्या बोलण्यावर इश्वास ठेवून साध्या वटहुकूमाची पायमल्ली केली म्हून आमालेच दोषी ठरवता हे काई बराबर नाय.तुमी तं आमचं स्वागत कराल् पाह्यजे.पण ते न करता तुमी आमाले बंदीस्त केलं.मी मानतो का मा पोरीनं हरळ्याच्या पोरासोबत लगन केला.पण त्याईचा संसार सुखाचा झाला ह्या आनंदापरस दुसरा आनंद मायबापासाठी कोणता मायराज?लेकराचं सुख हे मायबापाचं सुख नाय का होवू शकत.तरीपण ते ध्यानात न घेता आपण सुडाचं राजकारण करावं हे आपल्यासारख्या न्यायी राजाले सोबत नाय."

"मधुवय्या,तुमाले बाकीच्या गोष्टी कराले नाय सांगतलं.फक्त लगनाबद्दल बोला काय ते."

"मायराज,सदर लगनं हा माह्या खाजगी प्रश्न असून भविष्यकाळासाठी परीवर्तन करणारं एक पाऊल हाये.राजकारणाशी त्याचा कोणताबी संबंध नाय.धार्मिक सामाजिक दृष्टिकोणातून बोलल्यास शिवप्रभूची सेवा करणारे तमाम लोकं हे उचनीच नसून एकाच जातीचे हायेत.हरळ्याबी माह्यासाठी हिन जातीचा नाय.शिवभक्ताचं घर म्हंजे कैलास.हरळ्याचाबी देव शिवच हाये.माह्याबी देव शिवच.त्यावरुन आमी दोघंबी एकाच जातीतले.कारण हरळ्यानं आन् मीनं लिंगदिक्षा घेतली हाय."

"मधुवय्या,तू बामण असून आपल्या जातीले इसरलास."

"मायराज,मी बामण जरी असलो आन् हरळ्या चांभार जरी असला तरी शिवदिक्षेनं आमी आमची जात केवाच मांगं टाकली हाये.अस्पृश्याईच्या घरात शिवभक्त राहात असन तं तेबी स्थान कैलासच.त्यामुळं आमच्या दोघाच्याबी बाबतीतला प्रसंग कैलासपतीच्या संमतीनं घडला.इश्वरापाशी सारी लेकरं एकच.पण माणसानंच आपल्या बडेपणासाठी जातीभेद निर्माण केला.हा जातीभेद मोडायसाठी आमी जो अल्पसा प्रयत्न केला तो आमाले खरा वाटते.आमाले त्यात दुःख वाटत नाय.त्यासाठी तुमी आमाले जे बी शिक्षा द्यान ते आमाले मान्य राईन.तुमाले जे वाटन ते आमाले शिक्षा द्या.आमाले आता भीती वाटत नाय."

"ठीक हाये,हरळ्या तुले काई बोलाचं हाये का?"

"महास्वामी,मी चांभार कुळात जनमाले आलो,हेच आमचं दुर्दैव हाये.चिखलात फुललेल्या कमळावरती लक्ष्मी वास करते.तद् वतच बसवेश्वरानं या दलित जातीतल्या चिखलात सडणा-या कमळासारख्या तुच्छ माणसाचा उद्धार केला.मी.....मी जातीचा शुद्र चांभार मायराज पण आतं मी शिवभक्त हाये.शिवाची दिक्षा घेतलो आन् संत बनलो.मायराज माणसाची योग्यता कोणत्यात जातीच्या मापदंडात मोजली जावू नये."

"म्हून का तुमी आमच्या हुकूमाची पायमल्ली करावी."

"तुमी तरी जनतेले इश्वासात घेवून वटहुकूम काहाळला का?"

"अवो प्रत्येक नियम जनतेले इश्वासात घेवून काहाळले तं कोणतेच नियम बनणार नाय."

"आन् राजानं काहाळलेले नियम जनतेले इश्वासात घेवून काहाळले तं त्याले शिरसावंद्य मानायचे का?"

"म्हंजे आमच्या हुकूमाची पायमल्ली करुन शिक्षा भोगाची तयारी हाये तर......."

"मायराज,असली भीती दाखवता कोणाले?आपण अल्लम मधुपसारख्या गुणी माणसाचे नेत्रछेदन कराले डगमगले नाय तेवा या दीनदलित दुबळ्या हरळ्याची का केवा मणायची."

"म्हंजे तुमाले तुमचे हाल माईत होते तर......"

"आन् आपण शेवटी करणार तरी का?"

"तोंड सांभाळून बोल हरळ्या."

"मणजे सत्य बोललं तं पचत नाय मणावं.अवो,शेवटी तुमी का करणार हात.सन्मार्गानं चालणारे हे पाय तोडान,सत्कर्म करणारे हे हात तोडान आन् शिवनामाचा अखंड जाप करणारी ही जिवा तोडान.आन् न्यायापुळं ताठ रायणारी माह्यी मान तोडान.सुळावर द्यान मले.नायतं कडेलोट तरी.त्याशिवाय जास्त का करान.आपली निर्घुण राक्षसी सत्ता.आन् या सत्तेपुळं दोन निष्पाप जीवाची हत्या होईन.पण मायबाप या भयंकर बलिदानातून अन्यायाचा प्रतिकार करणारी शिवभक्ताची सेना जनमाले येईन हे इसरु नोका."

"हरळ्या बराबर बोललास.याचे परीणाम महाभयंकरच निगतीन."

"मायराज,अरळलिंगेश्वरात्या कुरपेनं हे परीणाम भोगाले तयार हाओत आमी.सदैव आनंदात तयार हाओत.कारण आपल्यासारखी माणसं या सिंहासनावर बसली हायेत न.राजरोषपणानं राज्यकारभार चालवत हायेत न.आन् बसवेश्वरासारखी माणसं उगाच छळली जात हायेत.मधुवय्यासारखी माणसं चालत नाय तुमाले.बसवेश्वरासारखी न्यायप्रवण माणसं हातापायात बेड्या घालून गुन्हेगार म्हून उभी रायतेत आपल्यापुळं.हाच का मायराज आपल्या दरबाराचा न्याय.राजाले सर्वी जनता समान पाह्यजे.पण तुमी त्याईले समाजपरीवर्तनाच्या हत्यारानं छळता.धर्म बुडवला म्हंता.हाच का आपला न्याय.आपल्याले असला न्याय शोभा देत नाय."

"चूप बस हरळ्या,यापुळं एक शब्दबी बोलला तं."

"मायराज,चूप बस मणल्यानं का माह्यी वाणी चूप होणार हाय.जवापर्यंत माह्यी वाणी चूप होणार नाय,तवापर्यंत ह्या हरळ्याची जीवा क्रांतीचीच आन् समाजपरीवर्तनाची भाषा बोलणार हाय."

"तं मंग ठीक हाये.आधी तुमची जीवाच छाटतो."

"तुमाले जे कराचं ते करा.हा हरळ्या आतं एक पाऊल बी मांगं सरकणार नाय.वा टसमस होणार नाय."

"याबाबत बसवण्णा,आपले का मत?"

"मायराज,याबाबत आपले का मत हाये ते मले समजलं.वाटल्यास आपण मले शिक्षा द्या.कारण या इवाहाले मीच सर्वस्वी जबाबदार हाये.कुंडलसंगमनाथाच्या कुरपेनं मीच या इवाहाले संमती देवून त्या दोघांचा लगन लावून देला अनुभव मंटपात.सोताच्याच मार्गदर्शनात हा इवाह सोहळा आटपवला.या घटनेच्या परीणामाची कल्पना मले होतीच.त्यामुळं मीच या घटनेचा गुनेगार हाये.मलेच शिक्षा द्यावी आन् या दोघालेबी सोळून द्यावं.बस एवळीच इनंती हाये मायराज."

"नाय बसवण्णा नाय.आपण थोर हात.अवो,चांगल्या कामासाठी आमाले फाशी होत असन तं आमाले ते फाशी स्विकार हाये.बसवण्णा निर्दोष हायेत.त्याईचा कायपण गुना नाय."

"हो मायराज बसवेश्वराले कायपण शिक्षा द्याची गरज नाय.बसवेश्वरासारख्या देवदूत महापुरुषाले आपण ऋण मुक्त करावं."

"पण तिघालेबी शासन होणं गरजेचं हाये."

"मंग द्या मायराज,आमी आपल्या शिक्षेची पायमल्ली करणार नाय."बसवेश्वर म्हणाले.

"मंग आयक तर आपापली शिक्षा.हरळ्या आन् मधुवय्याचा गुना मोठा असल्यानं त्याईले कडेलोटाची शिक्षा फरमावण्यात येत हाये.आन् बसवण्णाले प्रधानमंत्री पदावरुन हटवण्यात येत हाये."

मचण्णा आणि हरळ्यानं योजनापूर्वक डाव खेळून ब्रिज्वल राजाचे कान भरले होते.बसवेश्वर गरीबाचे जरी कैवारी असले तरी त्याची प्रसिद्धी आन् कार्य मचण्णा व संगभटाला पटत नव्हती. बसवेश्वर कुंडलसंगमेश्वरास नेहमी म्हणत की हे संगमेश्वरा,मला भरपूर संपत्ती दे,म्हंजे मी ती गोरगरीबांना वाटून देईल.तसेच स्वतः मी मात्र गरीब राहील.तसं पाहिल्यास बसवेश्वराकडे आलेला पैसा त्याने दानात जास्त खर्च केला होता.

बसवेश्वर हे प्रधानमंत्री बनण्यापुर्वी कोषागार मंत्री होते.राज्याचा संपूर्ण कोष त्यांच्या हातात होता.तरी त्या कोषाला ते इश्वराचे धन समजत असत.तरीपण राज्याच्या संपत्तीचा त्यांनी कधी अपहार केला नाही.गोळा झालेला धनसाठा बसवेश्वर गोरगरीबांना वाटून टाकत.एवढेच नाही तर ते दलितांच्या वस्तीत जावून त्यांच्याही समस्या ते या कोषाने दूर करण्याचा प्रयत्न करीत.बसवेश्वरांनी महामने प्रासाद उभारला होता.तो प्रासाद अखिल शरणाचे निवासस्थान झाला होता.स्वतः बसवेश्वराची पहिली पत्नी हा ह्या महामने प्रासादावर लक्ष ठेवत असे.बसवेश्वराजवळ प्रासादाची चाबी असली तरी एकही रुपया ते आपल्या स्वतःसाठी खर्च करीत नसत.तरीपण विरोधक त्यांच्यावर आगपाखड करीत असत की बसवेश्वर कोषागारातील रक्कम ही स्वतःसाठी खर्च करतात.ते आपली लिंगायत चळवळ चालविण्यासाठा हा पैसा खर्च करतात.ही तक्रार आधीच राजाकडे करण्यात आली होती.पण जेव्हा हिशोब तपासण्यात आला,तेव्हा खजिन्यातील हिशोबापेक्षा जास्त पैसा या कोषागारात जमा होता.त्यामुळे साहजिकच विरोधकांची तोंड बंद झाली.तरीपण विरोधक काही शांत बसले नव्हते.ते संधी शोधतच होते.

अशीच संधी दलितांबद्दल व्यवहार करतांना त्यांना आढळून आली.त्यातच राज्य चालविण्यासाठी दलितांशी बोलावं लागेल असे उत्तर बसवेश्वराने राजा ब्रिज्वलाला दिल्यावर राजा ब्रिज्वल शांत होता.पण विरोधी चूप बसलेले नसल्याने हा बदल्याचा विचार करीत असतांना अचानक मधुवय्याने व हरळ्याने आपआपल्या मुलामुलीचा विवाह लावला.तो आंतरजातीय विवाह असल्याने तोच विवाह बसवेश्वराला बदनाम करणारा वाटला आणि त्या विवाहाच्या रुपानं का होईना बसवेश्वराला प्रधानमंत्री पदावरुन हटवण्यात आले व चन्न बसवेश्वराला प्रधानमंत्री बनविण्यात आले.

बसवेश्वरावर आरोप ठेवून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र.....बसवेश्वर चांगल्या विचाराचे असले तरी त्यांचे विरोधक संगभट आणि मचण्णाच्या बोलण्यानुसार वाढत होते.बसवेश्वरांनी प्रधानमंत्री पदाचा त्याग केल्यावर ते निघून गेले.कारण त्यांचे कल्याणला मन लागत नव्हते.

बसवेश्वर निघून गेल्यावर हरळ्या आणि मधुवय्यावर जे आरोप लावण्यात आले त्यानुसार हरळ्या आणि मधवय्याचे नेत्रछेदन करण्यात आले.त्यानंतर त्यांना हत्तीच्या पायी तुडविण्यात आले.कारण त्यांच्यानंतर कोणीही विजातीय विवाह करु नये.हत्तीच्या पायाने तुडविल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची प्रेते किल्ल्याच्या बुरूजावरुन जंगलात फेकून देण्यात आली.हे पाहून संपूर्ण कल्याण राज्य खवळलं होतं.

कल्याण राज्यातील सर्व जनता फार मोठ्या प्रमाणात संतापली होती.ब्रिज्वलाने हरळ्या व मधुवय्याला दिलेल्या शिक्षेचा सर्वत्र धिक्कार करण्यात आला.परीणामाची चिंता माहीत असल्यामुळे शिलवंत वनजेला व त्याची आई कल्याणीअम्माला घेवून अज्ञातस्थळी निघून गेला होता.शेवटी या कल्याण क्रांतीत जोमदार युद्ध लढले गेले.सगळीकडे बसवेश्वराचा राजीनामा जबरदस्तीने घेतलेला आहे ही चर्चा रंगत चालली होती.त्यामुळेच की काय लिंगायत शरणार्थी संतापले होते.

कल्याण राज्यातील सर्व जनता फार मोठ्या प्रमाणात संतापली होती.ब्रिज्वलाने हरळ्या व मधुवय्याला दिलेल्या शिक्षेचा सर्वत्र धिक्कार करण्यात आला.परीणामाची चिंता माहीत असल्यामुळे शिलवंत वनजेला व त्याची आई कल्याणीअम्माला घेवून अज्ञातस्थळी निघून गेला होता.शेवटी या कल्याण क्रांतीत जोमदार युद्ध लढले गेले.सगळीकडे बसवेश्वराचा राजीनामा जबरदस्तीने घेतलेला आहे ही चर्चा रंगत चालली होती.त्यामुळेच की काय लिंगायत शरणार्थी संतापले होते.त्यांनी ब्रिज्वलाच्या सैनिकांच्या कत्तली केल्या.तसेच ब्रिज्वलाच्या सैनिकांनीही लिंगायतच्या कत्तली केल्या होत्या.जाळपोळ सुरु झाली होती.लुटालूटही चालू झाली होती.वचन भांडाराला आग लावण्यात आली.समस्त शरणार्थींनी गणाचार तत्वाचा अवलंब केला होता. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी ते तयार झाले होते.यात प्रामुख्यानेमाचीदेव,ककैय्या,केतय्या,चन्नबसवेश्वर,निलांबिका,गांगाबिका यांनी वचनवाडःमय वाचविण्याचा निर्धार केला होता.हे ते साहित्य होतं,जे साहित्य अनुभव मंटपातील चर्चेतून तसेच त्या मंटपातील सदस्यांच्या लिखाणातून अवतरलं होतं.वचनभांडाराला आग लागताच वचनवाडःमय वाचविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकजूट होवून ते वाडःमय घेवून त्यांनी कल्याण सोडले होते.ते वचनवाडःमय उळवीकडे वळवले होते.जातांना या सदस्यांनी फक्त वचनवाडःमयच सोबत नेलं.अन्नधान्य सोबत नेलं नाही.त्यांच्या सोबत चन्नबसवेश्वरही होतेच.ते पुढे सोलापूरला निघाले,ज्या सोलापूरला त्यावेळी चमलादेवी राणी राज्य करीत होती.तिला माहीती मिळताच तिने या शरण शरणार्थीच्या जेवणाची व्यवस्था केली.तसेच निवासाचीही व्यवस्था केली.तसेच पुढच्या मार्गासाठी सैन्यही दिले.मात्र ब्रिज्वलाच्या सैन्यानं त्यांचा पाठलाग सोडला नव्हता.त्या सैनिकांना नमविण्यासाठी अखेर युद्ध करणे भाग होते.यावेळी त्यांच्यासोबत माचीदेव,ककैय्या,नागक्का,गांगाबिका लढले.शेवटी ते धारातीर्थी पडले.पण उळवीला वचनवाडःमय पोहोचेपर्यंत त्यांनी शत्रूला इंचभरही पुढे सरकू दिले नाही.त्यावेळी लढतांना ककैय्याची भुमिका बाजीप्रभूप्रमाणे होती.उळवीला वचनवाडःमय पोहोचल्यावर तेथे असलेल्या कदंब राजाने या वाडःमयाला संरक्षण दिले.तेथे चन्नबसवेश्वर,नागक्का व इतर शरणार्थी वास्तव्य करीत थांबले.रस्त्यात कल्याणीअम्मा व गांगाबिका मरण पावल्या.

वचनभांडाराला आग लागल्याचे कळताच,तसेच ब्रिज्वल सैन्य पाठलाग करीत आहेत हे कळताच शरणार्थी एवढे संतापले की त्यांना ब्रिज्वलाने केलेल्या कृत्याचे वाईट वाटले.आधीच ते ब्रिज्वलाच्या म्हणण्यानूसार बसवेश्वराचे प्रधानमंत्री पद काढल्याने क्रोधीत झाले होते.याच शरणार्थी पैकी जगदेव नावाचा शरणार्थी अत्यंत संतापला होता.त्याने अल्ल व मल्ल या दोन शिष्यांना बसवेश्वराचा वध करण्याचा सल्ला दिला.त्याच जगदेवाच्या सल्ल्यावरुन अल्ल व मल्ल संधी शोधू लागले व एक दिवस संधी साधून ते ब्रिज्वल दरबारात शिरले.कोणीच नाही याचा कानोसा घेवून त्या दोघांनीही ब्रिज्वल राजाचा निर्घुणपणे खुण केला.नव्हे तर मधुवय्या आणि हरळ्याच्या वधाचा बदला घेतला.

प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवण्णा खुप निराश झाले.त्यांनी कल्याण सोडलं व ते कुंडलसंगमास पोहोचले.त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक हडपदअपणणाही होते.कुंडलसंगमास पोहोचताच त्यांनी त्यांची एकमेव जीवंत असलेली राणी निलांबिकेला आणायला हडपद अपण्णाला सांगीतले.सुचनेनूसार हडपद अपण्णा कल्याणला आले.त्यांनी निलांबिकेला बसवेश्वराचा निरोप सांगीतला.सुरुवातीला ती कुंडलसंगमास जाण्यास तयार झाली नाही.पण शेवटी ती तयार झाली.

ते पावसाळ्याचे दिवस होते.कृष्णा व मलप्रभा या दोन्ही नद्यांना अतोनात पूर होता.अशावेळी पावसातच पैलतीरावर हडपद अपण्णा व निलांबिका येवून पोहोचले होते तर बसवेश्वेवर पैलतीरावर उभे होते. ते तंगडगी इथे आले असता पैलतीरावर लगेच जाणे शक्य नव्हते.अशावेळी नावाड्यांकडून बसवेश्वर मरण पावल्याची बातमी हडपद अपण्णा व निलांबिकेला समजली.त्यांनी प्रेतयात्राही पाहिली होती.दोघेही ओक्साबोक्सी रडले.त्यांना रडू आवरेनासे झाले.शेवटी आपल्या स्वामींची भेट शेवटच्या समयी न झाल्याने निलांबिका बेहोश पडली.त्या बेहोशीतच तिने केव्हा प्राण त्यागला हे कोणालाच कळले नाही.तिच्या पाठोपाठ हडपद अपण्णानेही आपले जीवन संपवले.अशावेळी बसवण्णा,निलांबिका व हडपद अपण्णा या तिघांचेही जीवन संपल्याने एका युगाचा अंत्य झाला.पण बसवेश्वराच्या प्रयत्नानेच पुढील काळात परीवर्तनशिलतेला थोडेफार खतपाणी मिळाले.नव्हे तर तद्नंतरच्या काळात अनेक संत निर्माण झाले.त्यांनी ही तुच्छ अंधश्रद्धा मिटविण्याचा प्रयत्न केला.

अल्लमप्रभूने शिलवंत व वनजाच्या विवाहाला आशीर्वाद दिला होता.त्यामुळे ब्रिज्वलाचे सैन्य त्यालाही यमसदनास धाडण्यासाठी सज्ज झाले होते.त्यामुळे हेराफेरी तेही शैलपर्वतावर निघून गेले होते.तेथेच ते समाधिष्ट झाले होते.

दवंडीचा नियम तोडून विवाह केल्याने हरळ्या तसेच मधुवय्याला जसे ब्रिज्वल सैनिकांनी पकडले.ते आपल्यालाही पकडून फाशीची शिक्षा देतील याची पुसटशी कल्पना असल्याने शिलवंत व वनजांनी वेषांतर करून कल्याण सोडलं.ते कुठे गेले.कुठे राहिले याचा शोध कोणालाच नव्हता.पण एक निश्चीत की या वनजा आणि शिलवंताच्या आंतरजातीय विवाहातून अत्याचारी राजा ब्रिज्वलाचे अहंकारी राज्य संपुष्टात आलं होतं.नव्हे तर या बसवक्रांतीत संगभट आणि ज्ञानभटाचीही हत्या झाली.त्यामुळे साहजिकच गुलाबीलाही न्याय मिळाला होता.



हरळ्या हा चांभार समाजातील पहिला संत होवून गेला,जो संत रविदासाच्या जन्माच्या चारशे वर्षापुर्वी जन्मला.त्यांनीही कवने रचली.पण वचनभंडाराला आग लावून त्यातील काही साहित्य समाप्त केलं गेलं.त्यांनीही आपल्या कवनातून समाजातील भेदभाव, रुढी,परंपरा,चालीरीतीवर जोरदार हल्ला चढविला.काही चांभारसमाजातील मंडळींना हरळ्या,ककैय्या कोण हे अजूनही माहीत नाही.त्यांचे बलिदान माहीत नाही.तसेच आपल्याही समाजात रविदासापुर्वी एक महान संत हरळ्याच्या रुपाने होवून गेला हे शोधण्याचा तसेच जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करीत नाहीत.खरंच हरळ्या आणि मधुवय्याने सरंजामशाही राजवटीत जे काही केलं.त्यांच्या बलिदानातूनच बसवक्रांती होवून एका नव्या युगाला प्रारंभ झाला.हे विसरता येत नाही.हरळ्या हा जातीने चांभार जरी असला तरी संताच्या रांगेत तो पहिला संत आहे हे मानावेच लागेल.