Reshmi Nate - 36 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 36

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

रेशमी नाते - 36

पिहू ,प्रांजल खूप दिवसानी एकत्र घरी होत्या. ....म्हणून घर भरल्यासारखं वाटत होते......आठ दिवस कसे गेले कळलेच नाही.

प्रांजल तू गावाला येणार आहे का...

नाही, ग मम्मी मी मुंबई ला जाते दी बरोबर ..

अग जाऊन काय करते. अजून महिना भर सुट्टय़ा आहेत .रेवती चिडून म्हणते.

मम्मी मी घेऊन जाते... काय आहे गावाकडे , पिहू बोलते.

हो ग खूप वर्ष गेलो नाही म्हणून चाललो तुझ्या पप्पांनी पण पंधरा दिवस रजा काढली आहे मग म्हटले जाऊन यावे...प्रांजल काय करणार मुंबईला जाऊन. तू ही परत केरळ ला जाशील मग....

मी दादा कडे जाईल...तू नको माझ टेन्शन घेऊ. ...तिकडे गावाकडे ओळख ना पाळख मी नाही येणार किती बोर होईल मला ....नाही गं मी मुंबई ला जाते.

रेवती जाऊ दे तिला उगाच त्रास देत बसू नको....भीमराव बोलतात.

करा तुमच्या मनासारखे माझ कोण ऐकते... भीमराव आणि प्रांजल एकमेकांकडे बघत उसासा सोडतात.

🙄मम्मी सगळे तर तुझ्या मनासारखे होते ना पिहू ब्लँक होऊन बोलते.

तुला सांगितल नाही का लाडक्या बहिणीने काय केल.

पिहू प्रांजल कडे बघत ,काय केले....

अग मागच्या महिन्यात मावशी इतक छान स्थळ घेऊन आली होती . मुलगा अमेरिकेत चांगल्या कंपनीत जॉबला होता....घरचे ही चांगले होते....तर काय तुझे पप्पा आणि ह्या मॅडम *रेवती प्रांजल कडे रागाने बघत बोलली. )मावशी ला ओरडले... प्रांजलच्या तोंडाला तर आवरच नाही वाट्टेल ते बोलते .आता मुलगी वयात आली लग्नांच बघ बोलले तर अजून दोन तीन वर्ष लग्न नाही करणार म्हणे. त्यात साथ तुझ्या पप्पांची मग काय माझ कोण ऐकते .

अग मम्मी, लग्न करून घर सांभाळायला मी डिग्री घेते का?....सारख लग्न लग्न मागे लागते....बघू मला जेव्हा वाट्टेल तेव्हा मी सांगेल तुला मला ह्या मुलाशी लग्न करायचे..प्रांजल खो खो हसत बोलते.

रेवती तोंडावर हात ठेवते..पिहू पण ब्लँक होऊन तिच्या कडे बघते. भीमराव गालात हसत पेपर रीड करतात .

अहो, बघा काय म्हणते....आणि तुम्ही काही कस बोलत नाही..
नक्की मुंबई ला जाऊन असले काही तरी असणार तीच..
कोण कुठला मुलगा अग लोक नाव ठेवतील....पिहू चा तर विचार कर. तिचे सासर कडचे काय बोलतील.
रेवती चिडून ओरडून बोलतात. ....

प्रांजू खर खर सांग....तुझ काही नाहिये ना पिहू घाबरून विचारते.

माय लेक डोक्यावर पडले का प्रांजल चिडून म्हणते. नीट ऐकत पण नाही पप्पा दोघीं माझ्या लाइफ मध्ये विलन बनून येणार आहे अस वाटते मला...🙄

प्रांजु तू नाटक करू नकोस ....तुला मी अस काही करू देणार नाहिये....पिहू बोलते.

हो, तुझ्या साठी पण मीच मुलगा शोधणार आहे. बघ पिहू किती खुश आहे विराट बरोबर मग तसच तुला ही सुखात बघायच आहे रेवती भावुक होत बोलतात. पिहू रेवती ला उठून मिठी मारते.

पप्पा एकच शब्द बोलले की, घडीत चिडले पण आणि आता स्वताच इमोशनल झाल्या .प्रांजल नाटकी वैतागत बोलते .

रेवती, परी हुशार समझदार आहे, तू तीच टेंशन घेऊ नको. आणि तिला जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण हक्क आहे .आणि ती आपल्याला मान्य असेल तर पुढे जाईल ...हे ही मी डोळे झाकून सांगतो.

पप्पा तुम्ही माझ्या वेळेस अस बोलला नाही पिहू बारीक चेहरा करत बोलते.

भीमराव गालात हसतात. पिहू,तुला माणसाची परख नाही. म्हणून कधी बोललो नाही अणि मला माहीत होते तु अस कधी मानत ही विचार आणणार नाही. प्रांजलला वाटले तिने बोलून दाखवले. आणि हे ही माहित आहे प्रांजल तुझ्या मम्मीला त्रास देण्यासाठी बोलत असते. फ्युचर मध्ये असे घडले तर सगळ्यात आधी मला सांगेल लाजत किंवा घाबरून शांत बसणारी वाटली का ह्...आणि राहिला विराट चा प्रश्न तो त्याच्या काकू वर, आईवर, बहीण भावा वर इतक प्रेम करतो. मग त्याच्या जीवनसंगिनी वर ही जीव ओवाळून टाकेल .आधी ओळखत नव्हता म्हणून काही फार प्रॉब्लेम आले असतील तुमच्या नात्यात पण नात कस असले तरी त्या नात्याला 100 टक्के प्रयत्न द्यायचा हा गुण विराटचा आहे. मग तेव्हा बिजनेस असू की नात असू.

पप्पा, एक विचारू पिहू विचार करत बोलते.

हा बोल ना.....

जर आमच पटल नसते तर ,आम्ही दोघे खुश नसलो तर मी काय करायचे होत. जर समजा ते मला म्हंटले असते मी खुश नाही. आपण डिवोर्स घेऊ तेंव्हा मी काय करायला हवे होते.

रेवती मधेच बोलते. पिहू काही पण कस बोलते. त्या रागात बोलतात. (पिहू दचकते. )रेवती तिच नीट ऐकून घेत जा मग रिएक्ट करत जा भीमराव चिडून बोलत पिहू जवळ येऊन बसतात .पिहू शांत होत भिमराव यांना बिलगते.
चिऊ, अस कधी झाले असते...तर त्या नात्याचा काही उपयोग नसला असता. उगाच दोन पक्षी एका पिंजर्‍यात अडकून ठेवण्या पेक्षा दोघांना आझाद केल हवे...त्यात तुमच्या दोघांची चूक नव्हतीच. ज़बर्दस्ती ने बांधलेल्या नात्यात प्रेमाचे अंकुर फुटले तर ठीक नाही तर वेगळे होणेच चांगला पर्याय आहे. समाजाला घरच्यांना घाबरून मुलीने कमजोर पडू नये. कारण जन्म झाल्यावर आई बाप एका फुला प्रमाणे जपतात .त्या फुलाला मूरजून देण्याच दुसर्‍या कोणाचा अधिकार नाहिये. त्या वेळेस फक्त मुलीने आपला विचार करावा त्रास दूसर कोणाला नाही होणार फक्त त्या मुलीला होणार आहे. मग तेव्हा तिने स्वतः चा विचार करून आपले निर्णय घ्यावे. आयुष्य एकदाच मिळते. आणि ते कस जगायच ते ही तिनेच ठरवायला हवे. पुढच्या वेळेस कधी ही काही त्रास तुला झाला तर तू स्वतः तुझे निर्णय घे. मी तुझ्या सगळ्या निर्णयात तुझी साथ देणार आहे तुझ्या मम्मी ला पटू या ना पटू. माझ्या दोन्ही मुली माझे दोन डोळे आहेत .भिमराव प्रांजल कडे हात करत बोलतात प्रांजल पटकन उठून मिठीत शिरते .पिहू च ही मन हलके होते. तस जर घडले असते तर दोघ कसे रिएक्ट झाले असते याचा अंदाज तिने बांधला.

भिमराव विचारात पडतात. पिहू सहज कधी अशी गोष्ट बोलणार नाही हे माहीत होते. पण तिला तीच उत्तर मिळाले त्याच समाधान होते.
.
.
.
.
.

विराट Mr. सोलंकी चा ( आलीशाचे वडील) डायमंड चा बिझनेस लॉस मध्ये आहे ...तुझ्या बरोबर नाव जोडले की त्यांचे मार्केट मध्ये शेयर वाढतील.......अस त्यांच मत आहे....काय विचार केला मानव बोलतो.

विराट विचार करतो. ह्म्म, डील साईन कर....60 -40% विराट ओठांच्या कडा रुंदावत बोलतो. मानव गालात हसत समजून जातो.

आलीशाचे वडील सुद्धा तयार होतात...त्यांच्या कडे ऑप्शन पण नव्हता. विराट 60 %अणि Mr. सोलंकी 40 %अशी डील साईन होती. विराट पिहूच्या नावाने डायमंड चा बिझनेस चालू करतो.

विराट ने कार पाठवून दिली. पिहू आणि प्रांजल मुंबईला आले. प्रांजल ही पिहू बरोबर घरी आली होती.

महिनाभर सुट्टय़ा आहेत प्रांजल राह आता इथेच तेवढीच पिहूला कंपनी....पिहू ब्लँक होऊन सुमनकडे बघते .

आंटी, मी महिनाभर.... दादा राहू देईल का? प्रांजल हसत बोलते .

दोघी जेवण वैगेरे करून रूम मध्ये येतात. दी, तू जाणार नाही का जीजू बरोबर केरळला ..

पिहू विचारात पडते....माहित नाही पिहू कंठ दाटून बोलते .

दि,जिजू घेऊन जातील ..टेंशन घेऊ नको प्रांजल तिला मागून मिठी मारत बोलते.

पिहू वरवर गालात हसते .पण तिला परत एकदा विराट शिवाय राहायच जीवावर आले होते. आणि आता ती काही बोलू पण शकत नव्हती.

दी जीजू कधी येणार लोणावळा वरुन ....

आता रात्रच होईल यायला....

ह्म्म, दी....वीरा चा कॉल येतोय आम्ही बाहेर चाललो बाय
.. प्रांजल कॉल रिसीव करत बोलतच बाहेर जाते.

लवकर या...पिहू मागून बोलते...

हो...हो, बाय....😘

संध्याकाळी मानव प्रांजल घ्यायला घरी येतो.

दादा, प्रांजल आली नाही अजून वीरा आणि ती बाहेर गेली आहे.

मानव फोन करतच होता की समोर प्रांजल आली .सॉरी सॉरी लेट झाला का?....

मग, दुपारी गेल्या आणि सात वाजून गेले पिहू थोड चिडून बोलते.

अग वहिनी लवकरच निघालो होतो. पण ट्रॅफिक खूप होते.

चल निघू...मानव प्रांजल कडे बघत म्हणतो. ह्म्म, आलेच प्रांजल तीच सामान घेऊन येते.

दी, तू आहेस ना अजून पाच- सहा दिवस मी भेटून जाईन. परत केरळला गेल्यावर कधी येणार प्रांजल थोड ऐकू जाईल अश्या भाषेत बोलते. पिहू डोळे ताठ करतच तिच्या कडे बघते .

बघू सांगेल मी नंतर पिहू शब्दांची जुळवाजुळव करत बोलते.
प्रांजल डोळा मारत पिहूला हग करते.
.
.
.

पिहू ,सुमन हाक मारून तिला जवळ बोलावतात.

हा बोला,आई पिहू जवळ बसत बोलते.

अग, आईच्या भाचीच लग्न आहे....तू नसली की ताईंना वेगळ वाटेल......मग विराट बरोबर तुला जाता येणार नाही. आता काय रिसॉर्टच काम संपत आले...दिड दोन महिने फक्त

पिहू चा चेहरा पडतो.तस न दाखवता मानेनेच हा बोलते.

रात्री विराटला यायला उशीरच होतो. पिहू वाट बघुन झोपून गेली होती. तो ही फ्रेश होऊन झोपतो. पिहूला सकाळी जाग आली तर विराट शेजारी झोपला होता. पिहू सरकून त्याच्या अंगावर झोपते. विराट झोपेतच एका हात तिच्या भोवती घट्ट करतो. पिहू त्याच्या चेहर्‍यावरून हळूच हात फिरवत ओठावर हलके ओठ ठेवते. विराट डोळे झाकूनच गालात हसतो.

ती तिचा चेहरा त्याच्या चेहर्‍यावर अलगद घासत हसते

विराटला गुदगुल्या होत होत्या तो हसत तिला बाजूला करत कुशीत घेतो . झोपू द्यायच नाहिये का....तो डोळे उघडून रोखून बघत विचारतो .




पिहू लाजून हसत त्याच्या कुशीत चेहरा लपवते. तो ही तिला मिठीत सामावून घेतो
.
.

.
.
विराट , मी तुला मुलीबद्दल बोलले होते. तू आल्यापासून त्यावर काहीच बोलला नाही. सुधा बोलते.

आत्या, मी रिषभ साठी मुलगी बघितली आहे....

काय???कुठली कधी कशी आहे सुधा ब्लँक होत एकामागून एक प्रश्न विचारते.

सुमन रोहिणी एकमेकींकडे बघत ब्लँक होतात.

इव्हिनिंगला कळेल ...हॉटेल मध्ये सगळे भेटू...विराट चेयर वरुन उठत बोलतो.

विराट, तू अस कस काय ठरवू शकतो. सुमन विचारतात.

मॉम, ट्रस्ट मी....मुलगी चांगली आहे आणि तुम्ही ही सगळे तिला चांगल्या प्रकारे ओळखतात....I'm getting late....Evening ला भेटू. विराट ब्लेझर घेऊन निघून जातो.

सुधा रिषभ ला फोन करून सांग रोहिणी बोलते.

सुधा रिषभ ला कॉल करते.

रिषभ आज लवकर घरी ये.

काय काम आहे , रिषभ फ़ाइल बघतच बोलतो.....

विराटने सांगितले नाही ...का ??

नाही, रिषभ विचार करत बोलतो....

ह्म्म , विराट ने तुझ्या साठी एक मुलगी बघितली आहे...

रिषभ ब्लँक होत विचारतो कुठली मुलगी मला नाही काहीच माहित नाही मला न विचारता कस काय तुम्ही ठरवले....तो चिडून बोलतो.

अरे अजून कुठे फिक्स आहे बघून येऊ मग ठरव पसंत आहे की नाही....

नाही आई मला कुठलीही मुलगी बघायची नाहिये....

ते तू विराट ला सांग.....विराट ने बघितली म्हणजे चांगलीच असणार आहे.....सुधा बोलून फोन ठेवून देते....

आई ss...तो रागात एकदा फोन बघत विचारत पडतो.

नमन केबिन येतो हे ब्रो....तो पाणी पित त्याला टॅप करत बोलतो....

नमन...तू कधी बोलणार आहे....तुला बोलता येत नसेल तर मी बोलतो....रिषभ चिडून बोलतो....

मग जा ना बोल ना...नमन लॅपटॉप बघत हसत बोलतो....
डोर चा आवाज आल्याने नमन ने वर बघितले...हा खरच गेला का शिटsss नमन घाईतच उठत बोलतो....

विराट आणि मानव डिस्कशन करत होते..रिषभ अचानक आल्याने दोघ ब्लँक होत त्याच्याकडे बघतात.....विराट आठ्या पाडत हातानेच काय म्हणतो....

दादा मला बोलायच....तो पुढे येत बोलतो....

अस न नाॅक करता इतक काय महत्त्वाच काम होत...विराट थोड रागात च बोलतो.

दादा आईचा फोन आला होता...विराट रागात बघत हातानेच थांब बोलतो....हे घर आहे घरचे विषय काढायला..जा काम कर....त्याच्या मागे नमन आलेला....त्याच्या कडे विराट ने कटाक्ष टाकला...तुला पन बोलायचे विराट दात ओठ खातच विचारतो....नमन मानेनेच नाही बोलतो....

दादा ऐकून तरी घे....रिषभ वैतागच बोलतो.....

विराट माथ्यावर अंगठा प्रेस करत मानवकडे बघतो...मानव उठून निघून जातो.....

आता मुहूर्त शोधू का बोलायला ss....

दादा मला लग्न नाही करायच....रिषभ एका दमात बोलतो...नमन एकदा विराट कडे तर एकदा रिषभ कडे बघतो.....

हेच बोलायच होत... विराट नजर रोखून बघत बोलतो.

ह्म्म्म हे ....हेच रिषभ अडखळत बोलतो....

ह्म्म ,मिटिंग अटेंड करून घरी जायच दोघांनी इव्हिनिंगला ठरवू.....विराट फोन लावत बोलतो.

दादा, मी....

मानव,कम ...विराट फोन ठेवत लॅपटॉप कडे बघतो....दोघे अजून तिथेच थांबले होते...विराट ने दोघांवर कटाक्ष टाकला तसे दोघे बाहेर आले....

नमन तू का बोलला नाही रिषभ चिडूनच बोलतो...

चील ब्रो....लग्न झाल नाहिये......रिषभ रागाने बघत निघून जातो....😠

नमन डोळे ताठ करत कामाला लागतो. 🙄

इव्हिनिंगला सगळ्यांची घाई गडबड चालूच होती......

वाहिनी विराट काय बोलला का कुठले पाहुणे आहेत...

नाही ना काहीच बोलला नाही.....पण ओळखीचे आहेत.....बघू कळेल .

रिषभ आला का ?सुमन सुधा कडे बघत बोलते .

आला आहे, चिडला आहे सुधा वैतागतच बोलते ...

पिहु शांत काम करत ऐकत विचार करत होती

आत्या अस अचानक तुम्ही काही ठरवलं मग चिडणार ना नमन मागून येत बोलतो.

नमन लहान आहेस मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस शोभत नाही.....जा आवर निघायचे आहे. रोहिणी मोठ्या आवाजात बोलतात....(नमन रागात बघत निघून जातो.).....आज काल सगळे मनासारखे वागायला लागलेत.....

जाऊ द्या, वहिनी सुधा बोलते.....

नमन कमी होता का... आता रिषभ ही त्याच्या सारखा अडून बसायला लागला. विराट ने विचार करूनच बघितली असेल मुलगी पण नाही, ऐकायच नाही.....

विराट ऑफिस मधून घरी येतो.....फोन लावून निघालेत की नाही बघतो.....

सुमन विराट जवळ येते...विराट कुठली मुलगी आहे...रिषभ खूप चिडला आहे त्याला नाही करायच लग्न .दामोदर राव हसतात......

माॅम मुलगी छान आहे तुम्ही सगळे ओळखता आणि रिषभ ला ही आवडेल विराट हलकी स्माईल देत बोलतो...

मी काय बोलते तू काय बोलतो सुमन आठ्या पडतच बोलते .

थोड्याचवेळात कळेल चला आवरले का..?.. रिषभ कुठे विराट सगळीकडे नजर फिरवत म्हणतो...

ते तिघे येणार आहेत...आपण पुढे जाऊ......रोहिणी बोलते...

ह्म्म

सगळे हॉटेल मध्ये येतात.....थोड्यावेळाने आलीशा आणि तिचे आई वडील येतात...दोन मिनिट सगळे तिघांना बघून शॉकच होतात.....

सुधाचा मूडच ऑफ झाला......तिला जास्त आलीशा आवडत नव्हती.त्यात ती वेगळ्या कास्ट ची हाच प्रश्न पडला होता. .आणि हे विराटला माहीत होते.....आधी सांगितले असते तर आत्या नकोच बोली असते म्हणून विराट सांगत नाही.....

आलीशा हसून सगळ्या मोठ्यांच्या पाया पडते.....सगळे थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते.....

विराट रिषभ बघ कुठे आहे....दामोदर राव म्हणतात.....

ह्म्म ,विराट नमन ला कॉल लावतो....

नमन आणि वीरा त्याला काय बोलायचे ते पुर्ण रस्त्यात सांगत होते. .....तिघे ही हॉटेल मध्ये आले... तिघे शॉक होत एकमेकांना कडे बघत होते. रिषभ तर सातव्या आसमान वर च जातो....त्याला हसू की रडू असे झाले होते... दिवसभर त्याला इतक टेंशन आले होत़े.....विराट ने मन नसताना त्याने लग्न केल होते ...त्याच त्यावेळी चालले नव्हते. .मग माझा कुठे नेम लागणार...सगळे ज़बरदस्ती करून लग्नाला उभ करणार हाच विचार डोक्यात घुमत होता....

आलीशा रिषभ कडे बघून लुक देत पिहु कडे बघत..पिहु हसू दाबत रिषभला डोळ्याने पाया पड बोलते ..रिषभ येऊन सगळ्यांच्या पाया पडतो...

रिषभ तुम्ही दोघे फ्रेंड्स आहात....चांगले एकमेकांना समजून घ्या मग निर्णय सांगा...दामोदर राव दोघांकडे बघत बोलले....
सुधा ,रमेश तुमच काय मत आहे.....आलीशा पसंत आहे का दामोदरराव बोलतात....

आलीशाला आपण ओळखतो....खूप चांगली मुलगी आहे.....सुधा अडखळत बोलते.....

ह्म्म ,राकेश

दादा मी तुमच्या विचारा पुढे जाणार का...

विराट तू बोल....रोहिणी तो आत्ता पर्यंत शांत बसला होता.....म्हणून विचारते......

मिस्टर सोलंकी...,तुम्ही रिषभला चांगले ओळखता.....मी पुर्ण विश्वाने सांगतो आलीशा आमच्या घरात सुखाने राहील.....आलीशाच्या करियर ची काळजी करायची काही गरज नाही.....लग्नानंतर तिला काहीच प्रॉब्लेम येणार नाही.....

विराट, तू असल्यावर मी माझी मुलगी डोळे झाकून देईल....पण रिषभ च काय....त्याच फ्युचर काय...mr. सोलंकी रिषभ कडे बघत बोलतात.....

Mr. सोलंकी ,त्याची काळजी करू नका......तो स्वतः खूप मेहनत करतोय......अजून सात आठ महिने...मग पूर्ण पणे तो बिझनेस मध्ये तयार होईल.....

ह्म्म....सगळ्याच एक मत होते....पन सुधा काहीच बोलली नाही...म्हणून रिषभ ला टेन्शन आले होते....जेवण करून सगळे घरी आले. रिषभ खुश होता पण आई काय बोलते त्यावर आता सगळे डिपेंड होते..

विराट मला आलीशा सुन म्हणून बिलकुल आवडली नाही......सुधा बोलते.....

आई आलिशा मध्ये काय वाईट आहे....आणि मी तिला पासून
लाईक करतो....

सुधा सुमन रोहिणी एकमेकांना कडे शॉक होत बघू लागल्या....

काय,बघा वहिनी काय म्हणतोय...सुधा रोहिणी कडे बघून म्हणाली.....

रिषभ ,मोठ्या समोर बोलताना भान ठेवत जा...रोहिणी चिडून बोलते......

आय....आय मीन, माझी चांगली फ्रेंड आहे, तिच आणि माझ बॉन्डिंग चांगले आहे...हे...हो ना दादा रिषभ अडखळत बोलला....

ती नमनची फ्रेंड आहे.....सुधा रागात च बोलते....

रिषभ खूप झाल बोलून जा आता पुढच आम्ही ठरवतो.....विराट नजर रोखून बघत बोलतो.....रिषभ निघून जातो....

आत्या आलीशा का आवडत नाही तुला विराट शांत होत विचारतो.....

विराट, तिच्यात काही कमी नाहिये पन मला ती आवडत नाही.....आणि ती आपल्या कास्ट ची पण नाहिये तू कस काय तयार झाला.

आत्या कास्ट काय....मी ते मानत नाही...

पण तरी ही मला आवडत नाही.

धिस इस नॉट फेर, काही तरी खटकत असेल तर सांग....

अरे पन अचानक कस काय तुला आलीशा सुचली किती तरी मुली आहेत.....

Mr. सोलंकी ना रिषभ आवडला म्हणून ते स्थळ घेऊन आलेत....

विराट ते तुझ्या कडे बघून आपली मुलगी देत आहे....रोहिणी सुधा कडे बघत टोमणा मारत बोलते....

विराट, ती घर गृहस्थी सांभाळणारी मुलगी नाहीये.....आठ आठ दिवस ईकडे फिर तिकडे फिर...लोकांची मंडप सजावट करत फिरायची. आपल्या घरात असे कधी घडले पण नाहिये..

तुला तिच्या प्रोफेशनशी प्रॉब्लेम आहे बाकी कुठला नाहिये.

ह..हा...तस नाहिये....पण मला तीच राहणीमान आवडत नाही.

आत्या, राहणीमान तीच आणि आपल्या वीराच काही वेगळ नाहिये.....

वीराचा काय संबध रोहिणी मध्ये चिडून बोलते.

आई, तूच सांग आलीशा आणि वीरा मध्ये काय फरक आहे. फक्त ती अजून शिकतेय आणि आलिशा तिच्या पायावर उभी आहे. स्वतः ती फायनेंशियल कधीच कुणापुढे झुकणारी नाहिये. अश्या मुलीला नको म्हणते .आत्या, रिषभ आणि आलिशा दोघ एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. दोघांच् बॉन्डिंग चांगले आहे. तू तिला शिकवल तर सगळ शिकेल. पिहू ला तरी काय येत होते का....( तशी पिहू त्याला एक लूक येत गाल फुगवत.)आता तुमच्यात राहून आपल्या सगळ्या पद्धती स्वतः शिकली ना. ...तसच आलीशा ही शिकेल....

विराट पिहू च वेगळ आहे .तिच्या सारख एक तरी गुण आहे का ..आणि तिला आम्ही काही शिकवलच नाहीये ...तिला काही अडलं तर ती स्वतः हून शिकली ....

आत्या, मी काय बोलतोय तुला कळते का नाही....माझ्या साठी आलीशा रिषभसाठी परफेक्ट आहे .मला एवढच बोलायचे आहे. पुढच् तू ठरव....बघ विचार कर. आणि सांग. विराट एवढ बोलून निघून जातो.....

पिहू पण रूम मध्ये येते. अहो, माझ नाव घ्यायची काय गरज़ होती. पिहू गाल फुगवून बोलते.

मी एक example सांगत होतो ...तो तिला उचलून घेत हसत गॅलरी येत सोफ्यावर बसतो.

मला आधी पासूनच सगळ येते....

तुला रोमांस चा र तरी येत होता का......मीच शिकवल ना....तो तिच्या कानाला ओठ घासत बोलतो.....पिहू लाजून त्याच्या कुशीत शिरते.

विराट हसून तिला घट्ट कवटाळून केसांवर ओठ टेकवतो.

अहो, आत्या लग्नाला तयार होईल ना ...पिहू त्याच्या कडे बघत बोलते.

तयार होईल, उद्या स्वतः हून येईल बोलायला विराट गालात हसत बोलतो.

कस काय? पिहू विचार करत बोलते.

उद्या कळेल ....

सांगा ना...पिहू गाल फुगून बोलते...

आई बरोबर तयार करते......आलीशा आधीपासून त्यांना आवडते .

का, मग आता का काही बोलल्या नाही... तेवढ वीरा च नाव आले तेवढच चिडून बोलल्या.

आई माझ्या समोर नाही बोलणार...पण नंतर बोलेल.... आलीशा ची मॉम आणि आई चांगल्या फ्रेंड आहेत . अर्धाच्या वर काम आलीशा करते. मग आई हा एडवांटेज सोडणार नाहिये....

तुम्ही इतक डोक कस चालवता.....सगळ्या प्रॉब्लेम चे सोल्यूशन आहे. एक एक मिनिट....मग तुमचा ही काही स्वार्थ असेलच ना ....

विराट तिचे गाल ओढतो...तू जास्तच मला ओळखलं अस वाटत नाही.....

बिचारे दोघ प्रेम करतात अणि तुम्ही तुमच प्रॉफिट शोधता. मी मागे बोलले तर तुम्ही दादा हसला ना तेव्हाच कळाले काही तरी नक्की डोक्यात आहे...कितीsss किती sss दुष्ट आहात...पिहू त्याच्या दंडाला मारून आत जात बोलते.

विराट गालात हसत तिच्या मागे जातो.....पिहू ,दुष्ट कोणाला म्हणाली...ह्य...तो तिला मागून गुदगुल्या करत बोलतो....

तुम्हीच.... पिहू जोरजोरात हसत बोलते.

ओके, मी दुष्ट आणि तू....

मी, 😇 इनोसन्ट 💁‍♀️ ती डोळे मिचकावत बोलते....

तू, सगळ्यांसमोर इनोसन्ट असते....आणि माझ्यासमोर तोतिला गुदगुल्या करत बोलतो..., पिहू खळखळून हसत त्याला बिलगते.
.
.
.
.दुसर्‍या दिवशी विराट जसा बोलला तसच झाल होते. सुधा स्वतः येऊन लग्नासाठी तयार झाली सगळे खूप खुश झाले....
रिषभ ला तर काय करू नी काय नाही अस झाले होते . कोणाला काही कळल पण नाही आणि त्याच्या मनासारखे झाले...तो या भ्रमात जगत होता. 🤣🤣🤣 पण इकडे विराट ने बरोबर त्याच काम करून घेतले होते.

आई, मी दोन -तीन दिवसाने केरळला चाललो .....

ह्म्म, पिहूला राहू देत....पुढच्या आठवड्यात माझ्या भाचीच्या लग्नाला तिला घेऊन जाणार आहे.

पिहूला ही घेऊन चाललो परत दोन महिने मला जमणार नाही यायला...आता पूर्ण काम करूनच येणार आहे .मग रिषभच्या लग्नाची डेट काढू.

पण पिहू नसली की काय म्हणतील ..काही गरज़ नाहिये तिला घेऊन जायची रोहिणी थोड चिडून बोलतात.

आई इथे राहून काय करणार , मॉम लग्न झाले की जिजी कडे जाणार आहे .वीरा सिंगापुर च्या ट्रीप ला जाणार आहे तू आजी ,बाबा पण गेले तर कोकण ला नाही तर गावाला चक्कर मारून येतील. राहिला नमन तो ऑफिस झाल की फ्रेंड्स पार्टी अस काही चालू मग पिहूला बोर होणार ना .. ती एकटी काय करणार....

विराट पण लग्न ...

आई, ..तुम्ही तिघी मोठ्या आहेत तुम्ही असले की झाल ना.......पिहूच्या कामाचा सेटअप केला आहे. ...तिला कामात परत प्रॉब्लेम येईल....

रोहिणी शांत बसते. आतून तर राग खूप होता.पिहूच्या बाबतीत त्याच पझेसिव्हनेस खूप वाढला होता.
.
.

.
नमन आणि रिषभ बाहेर फिरायला आले होते. .नमन ती प्रांजल आहे का?? रिषभ ग्लास खाली घेत बोलला.
नमन ही कारची स्पीड कमी करत त्या दिशेला बघू लागला.प्रांजल बरोबर दोन मुली आणि तीन मुले होते....सगळे नुकतेच रेस्टॉरंट मधुन बाहेर पडले होते त्यांची सगळ्यांची मस्ती चालू होती. एका मुलाने प्रांजल च्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे गाल ओढले. नमन कार थांबवतो.

नमन कुठे चालला रिषभ त्याचा हात पकडत बोलला.

तो मुलगा कस टच करू शकतो.नमन रागात दात ओठ खात बोलला .

अरे ,तिला काही प्रॉब्लेम नाही तर ....(नमन विचारात पडतो. )
फ्रेंड्स आहेत. आले असतील एन्जॉय करायला. अणि तू जाऊन काय करणार मारणार का 😅😅😜

😒 नमन ने रागात त्याचा हात झटकून दिला. आणि कारच्या बाहेर आला. सगळे अजून मस्तीच करत होते.

प्रांजल माझ्याबरोबर येते ना तो मुलगा हेल्मेट घालत बोलला.
प्रांजल काही बोलणार की मागून नमन हाक मारतो.
प्रांजल ss....(दोघे वळून नमन कडे बघू लागले .)

प्रांजल हसून हात हलवत हाय बोलते. नमन तू इथे. त्या मुलाने नमन वर नजर टाकत मोबाइल मध्ये डोक घातले.

यावेळी तर डोक्यात राग होता पण कंट्रोल केला. नमन वरवर गालात हसतो.काम होत म्हणुन आलो....तू इथे त्याने त्या मुलावर कटाक्ष टाकला आणि परत प्रांजल कडे बघितले.

हा, ते फ्रेंड चा बर्थडे होता ना celebrate करायला आलो होतो....

ओह्ह, नमन मंद हसत बोलतो

प्रांजल late होतोय....तो थोड वैतागतच बोलला.

प्रांजल i will drop you नमन त्या मुलाकडे रोखून बघत बोलतो.

It's okay नमन, मी....

प्रांजल मानव आज लेट येणार आहे ,मग घरी जाऊ..

हो माहीत आहे दादा बोलला मला ...घरी नको आता..उद्या दी चालली ना मग भेटायला येईल .बाय ती बाईक वर बसणार नमन तिचा हात पकडत मागे घेतो....

प्रांजल मी drop करतो. यू go ...तो मुलाकडे बघत रागात हसत बोलतो.

😐प्रांजल ब्लँक होत नमन कडे बघते. तो मुलगा दोघांकडे नजर टाकत निघून जातो. नमन ss माय हँड

ओह्ह 😬 नमन ने पटकन हात सोडला.

तू स्वतः ला अतिशहाणा समजतो का, 😠

प्रांजल ही मुंबई आहे आणि हे सगळे चिल्लर फ्रेंडस आहेत ना थोड डिस्टेंस मेंटेन ठेव .चल गाडीत बस....तो रूबाबदार पणे तिला बोलत चालू लागतो.

चिल्लर फ्रेंड्स 😲😲हे थांब काय म्हणला चिल्लर फ्रेंड्स माझे
आणि हे अशी दादागिरी खपवून घेणार नाही मी 😏😏

कार मधे बसून बोलू आपण 😁😁चल... नमन गाडीच्या दिशेने चालत बोलतो.

ओय ,😡😡 नमन sss ती ही त्याच्या मागे जाऊन त्याला मागून ढकलून देते...तो पडणार की तो स्वतः ला सावरत तिच्या कडे बघतो...

यू sss ,मॅड गर्ल 😤 पडलो असतो ना....

काय म्हणला चिल्लर फ्रेंड्स आणि स्वतः चे फ्रेंड्स हायफाय
वाह....

मला तस म्हणायचे नव्हते....आय...मीन , तुला अजून

रिषभ दोघांच्यामधे येतो....हे..हे...भांडू नका रोडवर .. चला कारमधे बसून भांडा.....

कार, मधे बसणार पण एका अटीवर

🙄 दोघे ब्लँक होऊन बघतात.

मी कार चालवणार😎 मंजूर ती हात पुढे करत बोलते....

कार sss....रिषभ बोलतो..

हो, तुझी ही कार मला खूप आवडते....😍😍प्रांजल डोळे विस्फारून त्या कार कडे बघते....

ओके नमन हसत बोलतो.... प्रांजल हात पुढे करते....नमन😁 हातात हात देतो

ये, हात नाही मागितला किज दे.....प्रांजल त्याच्या हातातून हात काढत बोलते. 😏

ओह्ह, सॉरी 😬धर तो चावी देत बोलतो. प्रांजल पळत जाऊन बसते...नमन तिला खुश बघून रिषभ कडे नजर टाकतो....तो तर नमनला रागाने खाऊ की गिळू या नजरेने बघत असतो....

नमन जीभ चावत त्याच्या गळ्यात हात घालतो....

मी किती वेळा मागितली कार एकदा पण दिली नाही 😤😠रिषभ रागात त्याचा हात काढतो....

अरे ,ते....मी....आपण घरी गेल्या वर बोलू 😅😅चल बस नमन गाडीचा डोर ओपन करतो...तो बसणार की रिषभ पळत जाऊन प्रांजल च्या शेजारच्या सीट वर बसतो. थँक्स नमन,तो डोर लावत त्याला लुक देत बॉक्स टाइप स्माइल करत बोलतो. नमन दात ओठ खातच त्याच्या कडे बघत मागच्या सीटवर जाऊन बसतो...

पिहू विराट ने बॅग पॅक करायला लावली तर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. दोघे सकाळी केरळ ला निघून येतात.
यायला त्यांना दुपार होते....पिहू आल्या आल्या झोपून घेते. विराट फ्रेश होऊन साइट वर जातो.

वीरा सिंगापुरला जाणार म्हणून विराट वीराला कॉल करतो.....

का, गेली नाही विराट ब्लँक होत विचारतो .

दादा, माझ्या दोन बेस्टीज येणार नाहिये...म्हणून मी कॅन्सल केल...नाही तर मी दोन- तीन वेळा जाऊन आले ....मग कॅन्सल केल...

वीरा, जायच म्हणून किती हट्ट केला आणि आता, हे अशी नाटकं करते....मॉम बरोबर बोलत होती...अती लाडाने तू बिघडली आहेस....तेव्हाच मॉम म्हणत होती ....पण मीच बोललो.....जाऊ दे आता हॉलिडे सुद्धा आहेत ....विराट ओरडून बोलतो.

दादा, मी केरळला येऊ का 😍 बघू ना कस आहे...

वीरा मी ओरडतो तुला...

हो रे 🤣 पण ते माझ्या साठी नवीन नाहिये....ते जाऊ दे मी आणि प्रांजल येऊ का केरळला तिला पण हॉलिडे आहेत .
प्रांजल समोर बसली होती . ती डोळे ताठ करतच तिच्या कडे बघते

विराट विचार करत ह्म्म ये....आणि ह्यापुढे तू परत कुठल्या ट्रीप च नाव काढ....मग तू आणि मॉम बघून घे तेव्हा मी मधे पडणार नाही.....

हा...हा.....बघू तेव्हा हूम्म ,

वीरा excited होत प्रांजलला सांगते...प्रांजल पिहूला फोन करून सांगते. पिहू पण खुश होते.

नमन आणि पिहू वीडियो कॉल वर कामाच बोलत होते. नमन, चार पाच दिवस मला जेवढे होईल तेवढच करेन. प्रांजल वीरा येत आहेत इकडे मग मला जास्त वेळ मिळणार नाही.....

नमन चमकून बघतो....वहिनी मला सांगितल नाही वीराने तो चिडून बोलतो.

अरे, अचानक ठरले.विसरली असेल उद्या येणार आहेत दोघी.

ह्म्म, वहिनी तुला फक्त वीराची काळजी आहे .माझी तर काहीच नाही नमन बारीक चेहरा करत बोलतो...

नमन तस काहीच नाहिये....

तू इतके दिवस तिकडे आहे कधी बोलली नाही तू रिषभ या थोड चेंज होईल....

अरे, मी....आणि हे ओरडतील ना . तू इकडे आल्यावर काम कोण बघणार

वहिनी दोन तीन दिवसाने काय फरक पडणार आहे. प्लीज़ वहिनी मला पण थोडा चेंज हवा....

ह्म्म ,ये मग....ह्यांना सांग काय म्हणतात मग ठरवा दोघ.

🙄 वहिनी, आम्ही...नो ss...तू विचार दादा तुझ ऐकेल....

😐,मी नाही....नाही.....ते तुमच् तुम्ही बघून घ्या. मला मध्ये नका आणू....

🥺🥺🥺वहिनी, तू कधी पासून अस बोलते.....ठीक ये....

नमन, 😣😣

प्लीज़ वहिनी प्लीज़ ना. .....पिहू च्या मोबाइल वर आदिचा मेसेज येतो. पिहू चेक करते. तिचा रिजल्ट त्याने सेंड केला होता. पिहू खुश होऊन नमनाला रिषभला सांगते. दोघे ही खुश होतात .

वहिनी आमच काम कर 😆😆

😐😐हो ,

.
.
.

अहो sss,पिहू विराट ला दारात बघून एक्साइटेड 😁 होत त्याला बिलगली. विराट ने चमकून तिला एका हात पाठीवर धरला....

Oye,...काय झाल तो हसत तिला घेऊन आत येत बोलला.

अहो ss, ...ती मोबाइल दाखवत बोलली. तिचा रिजल्ट. first claas with distinction आला होता.

विराट हसत , त्याचा मोबाईल दाखवतो.

😯😯 तुमच्या कडे कस. ती मोबाइल घेत बोलते.

पिहू हा प्रश्न कस विचारू शकते. तो डोक्यात टपली मारत बोलतो .

ओह्ह सॉरी लक्षात च नव्हते. Mr. विराट देशमुख यांना सगळ्या न्यूज मिळत असतात 😒

विराट तिच्या डोक्याला डोक लावत हसतो... I am so proud of you.😘😘😘

पिहू लाजून त्याच्या कुशीत शिरते. ...अहो मला गिफ्ट ती हात पुढे करत बोलते. तो भुवया उंचावतो.

अहो ,प्लीज़ ना मी कधी काही मागते का ती बारीक चेहरा करत बोलते.

गिफ्ट नाही आणले.मी उद्या येताना आणेल तो तिच्या गालावर किस करत बोलतो .

मला माझ्या आवडीच हव आहे .

बोल ना....त्याने तिचा हात धरून मांडीवर बसवल.. त्यालाही खूप आनंद झाला होता ती पहिल्यांदा काही तरी हट्ट करून मागते.

तुम्ही वीरा आणि प्रांजल बरोबर नमन -रिषभला इकडे बोलावा फक्त आठ दिवस थोड त्यांना ही चेंज वाटेल. विराट 🙄 विचारात पडतो. मागुन मागून काय मागितले. 🤦‍♂️आणि हे तीच डोक नाही हे ही कळले.

पिहू,कोण बोलले तुला तो तिला बाजूला बसवत रोखून बघत विचारतो.

😬 म....मला...ते मीच विचार केला .बिचारे कुठे जातात दोघे घर ऑफिस करून दमतात ना...

पिहू , ते दोघ तुझ ब्रेन वॉश करतात आणि तू लगेच त्यांच्या बोलण्यात येतेस तो उठून फ्रेश होण्यासाठी जातात .

अहो 🙁🙁

दोघ जेवण करत होते. विराटच मोबाइल मध्ये लक्ष होते.
अहो, तुम्ही माझ ऐकणार नाहिये का.

डिनर झाल्यावर बोलू तो मोबाईल मध्ये बघतच बोलला. पिहू शांत जेऊ लागली .

पिहू किचन मध्ये गेली तर तिचा मोबाईल वाजला विराट ने नजर टाकली तर नमन चा कॉल होता. पिहू रिंग चा आवाज ऐकून परत बाहेर आली. तो पर्यन्त विराट ने मोबाइल स्पीकर टाकला .

वहिनी बोलली का तिकडून नमन बोलला. तस विराट ने पिहू वर नजर टाकली.

🤦‍♀️

हैलो वहिनी, पिहूचा आवाज येत नसल्याने नमन बोलतो.

नमन, काम सोडून इकडे का यायच कारण कळेल का मला विराट मोबाईल कानाला लावत कडक आवाजात बोलतो.

दा.....दादा नमन शॉक होत रिषभ कडे बघतो. 🙅‍♂️

दरवेळेस पिहू ला पुढे केल्यावर मला कळणार नाही अस वाटते का ? तीच मी सगळ ऐकतो अस वाटते. हा....विराट ओरडून बोलतो. पिहू तर तिच्या वर बरसेल म्हणून पटकन रूम मध्ये निघून गेली.

दादा, त .... तस नाही नमन चेहरा पाडून म्हणतो.

मग कस हा....परत जर अशी नाटकं केली तर बघ.....कोकण च्या रिसॉर्टच अकाउंट चेक करून मला मेल कर....

मी वाहिनीला मेल केल तिने सांगितले तू बघितल....

मी चेक केल पन तु चेक करून त्यातल्या करेक्शन कर मग मला मेल कर.

करेक्शन 🙄 मग तू कस बघितल.

पिहू ला मी बोललो नाही.....अजून शिकतेय चुका होणारच ... मी बघितल म्हणून तू पण relax होऊन बसला
मंदss कुठला.....उद्या मला सगळे करेक्शन करून पाठव.

I am sorry 😞....

थोड मस्ती कमी केली ना बर होईल. कामाकडे लक्ष दे..... दिल्ली ला गेल्यावर तीन डेज नंतर येईल वाटले किती डेज नंतर आला....पूर्ण वीक पार्टी एंजॉय फ्रेंड्स ....अजून काय हवे हो ना...

ते दा ...दादा करण ची पार्टी होती...नमन बोलत च होता की विराट त्याला तोडत बोलला....लास्ट आहे ओन्ली फोर डेज साठी या.....विराट बोलून फोन कट करतो....

नमन चा चेहरा उतरला होता पन अचानक ब्लँक झाला.

काय झाल रिषभ बोलतो.

दादा ये बोलला फोर डेज साठी नमन हसत बोलतो.

दोघे खुश होतात...

पिहू ,परत जर दोघांच्या साइड ने बोलली ना....बघ...विराट दात ओठ खातच रागात मोबाइल बेडवर टाकतो....😡

पिहू त्याला मिठी मारत गालावर किस करते....अहो, 😘😘😘 ती त्याला मस्का लावत बोलते.


विराट नजर रोखून बघतो. ....ती डोळ्यावर हात ठेवत ओठांवर डीप किस करून लाजून त्याच्या कडे पाठ फिरवते...विराट हसून तिला जवळ ओढतो...

प्रांजल सकाळी लवकर निघायच म्हणून रात्री इकडे आली होती. वीरा तीच सामान चेक करत होती.

वीरा ओन्ली टेन डेज साठी चाललो प्रांजल तिचा पसारा बघत बोलते. आणि सिंगापूर ला जाण्यासाठी बॅग पॅक केली होती ना...

अग, हो....पण रागाने ती मी अनपॅक केली....

ह्म्म, सिद्धार्थ येणार नाही म्हणून का 😉😉

शुss डोर ओपन आहे....वीरा घाबरून दाराकडे बघते.

वीरा इतक घाबरल्यावर कस ग....

अग, काय करणार दादा जितक प्रेम करतो .त्या पेक्षा राग खूप आहे...त्याला कळले ना सिद्द ची काय हालत करणार त्या विचाराने धडकी भरते.

अग, हो...पण तो कुठे तुझ्या मागे लागला तूच हात धुवून मागे लागली प्रांजल दात काढत हसत बोलते...

त्याला ही मी आवडते. पण काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही .

तो जीजू ला घाबरत असेल. प्रांजल विचार करत बोलते.

ह्म्म, जाऊ दे...तिकडून आल्यावर बघते त्याला..

कोणाला बघणार नमन रिषभ आत येत बोलतात...दोघी ही त्याच्या आवाजाने दचकतात .

अम्म, माझी फ्रेंड निधी तीच बोलत होते. प्रांजल विषय फिरवत बोलते.

नमन ला काही ऐकू आल नाही...म्हणून त्याने ही जास्त ताणले नाही ....आम्ही ही येतोय तुमच्या सोबत नमन बेड वर पालथा पडत वीराचा मोबाइल हातात घेत चेक करत बोलतो. वीरा पटकन मोबाइल घेते....

वीरा ss,पासवर्ड चेंज हा....नमन संशयाने तिच्या कडे बघत बोलतो.

हा...ते....म्हणजे, असच वीरा नजर चोरत दुसरीकडे बघत बोलते.

तू, काय म्हणत आता प्रांजल मध्ये बोलते.

हा ते ...आम्ही दोघ येणार आहोत केरळला दोघे एकमेकांना टाळी देत बोलतात...

का sss वीरा वैतागत बोलते.

का, म्हणजे तूच लाडकी नाहिये मी ही दादा चा लाडका आहे नमन रूबाबदार पणे म्हणतो...

अच्छा, किती वेळ लेक्चर ऐकले दादाच वीरा चिडवत बोलते.... प्रांजल ओठ दाबून हसते .नमन लुक देतो....

हे ऐका ना.....आपण आलीशाला घेऊन जायच 🤗🤗
कोणी काहीच बोलत नाही 😑😑

काय झाल....🙁

कोण बोलणार,....तुमच्या दोघांच्या नादात कुठे तर आमच कॅन्सल होईल....वीरा बोलते😵😵😵

हे अस नको ना बोलू वीरा...प्लीज़....ना....तो तिला लाडीगोडी लावत बोलतो. ....

वीरा ला आता नाईलाज होता...ती मोबाइल घेऊन बसते.... सगळे वीरा कडे आशेने बघत होते....लावते ना....वीरा चिडून फोन लावत बोलते.

विराट चा मोबाइल रिंग करतो. पिहू हसत त्याला इशारा करते...तो मोबाइल न बघताच कट करत पिहू च्या शोल्डर ओठ फिरवतो ..

कट केला....वीरा तिघांकडे बघत बोलते...अजून एकदा ट्राय कर ना....वीरा परत कॉल लावते.

अहो, ...मोबाईल बघा पिहू त्याला ढकलून लाजून त्याच्या कुशीत शिरते . विराट वैतागत मोबाइल बघतो... तो रिसीव करत स्पीकर वर टाकतो. बोल अजून काय बोलायच सकाळपासून चौथी वेळ आहे वीरा ...

अरे, ऐकून तरी घे झाली माझी पॅकिंग...😔

मग, अजून काय राहील....मनासारखी शॉपिंग झाली बॅग पॅक झाली उद्या फक्त फ्लाइट मध्ये बसून यायच राहिले .

दादा 😣😣 वीरा दोघां कडे बघून लुक देत बोलते. पिहू बारीक डोळे करून बघते...

आता बोल ss,

ह...हो...ते दादा, मी...मी काय म्हणत होते..म्हणजे मी नाही
(विराट पिहू ब्लँक होऊन एकमेकांना कडे बघतात वीरा ला काय बोलायच कळत नव्हते)म्हणजे रिषभ भाई आहे...ना.. त्याला बोलायच होत..वीरा एका दमात बोलून मोकळी होऊन मोबाइल देते रिषभ डोक्यालाच हात मारून घेत मोबाईल कानाला लावतो.

दादा....मी काय अस म्हणत होतो...की,
(विराट रागात दात ओठ खात होता....एक तर चुकीच्या वेळी कॉल केला 😂😂त्यात बोलायला घंटा लावतात...🤣 ) दादा...

आता परत तु अडखळत बोलला तर कोणी येऊ नका बसा तिथेच ss

पिहू ,गाल फुगवून मोबाइल स्वतः च्या हातात घेते....हा बोला रिषभ दादा, पिहू आवाज ऐकून रिषभ relax होतो...

वहिनी ,मी काय म्हणत होतो...म्हणजे अस सगळे बोलत होते....(विराट चेहर्‍यावरून हात फिरवतो. नमन वीरा रिषभ कडे रागाने बघतात) आलीशा ही सोबत आली असती तर....म्हणजे आम्ही दोघ अजून चांगल्या प्रकारे एकमेकांना ओळखू ....आता पर्यंत आम्ही फक्त फ्रेंड म्हणून च भेटत आलो ना..रिषभ तिघांना डोळा मारत बोलतो... (त्याच ऐकून पिहू तोंडावर हात ठेवून हसू कंट्रोल करत विराट च्या कुशीत शिरते...विराट ला आता हसू येत होते... सगळे मिळून विराट लाच वेड्यात काढत होते असे त्यांना वाटू लागले. ) दादाला विचार ना काय करू दे.

रिषभ त्यांना काय विचारायचे घेऊन ये पिहू हसत बोलते...हा पण ती येईल का... तुम्ही दोघे एकमेकांना नीट ओळखत नाही ना अजून लगेच तयार होईल का पिहूच नाटकी बोलण ऐकून विराट डोळे ताठ करत नाही अशी मान हलवून डोळे झाकतो.

तिला मी तुझ नाव सांगतो तू ये बोलली लगेच तयार होईल रिषभ innocent फेस करून बोलत फोन ठेवतो.

इतक्या वेळ थांबून ठेवलेल हसू पिहू च बाहेर पडते.....विराट ही हसू लागतो.