Reshmi Nate - 35 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 35

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

रेशमी नाते - 35


पिहूला जाऊन दोन महिने झाले होते. ती छान रमली होती. दिवस भर विराट ने तिला कामात अडकवले होते....म्हणून ती कधी वेळ नाही देत म्हणत नव्हती. ती असल्यामुळे तो एक काम कमी करून लवकर घरी यायचा. ती जवळ असल्याने कामाला किती वेळ पण लागु दे अस झाले होते. ...त्यात पिहू ला ही कुठला धाक नव्हता तर आरामात रहायची ....
संडे ला फूल एन्जॉय करत होते... कुठे बीच वर जा तर कुठे स्पा, नाही तर साईट वर फिरून यायच....दिवस छान नोकझोंक मजेत जात होते.

विराटला रोहिणी चा फोन येतो.

हा बोल आई....

विराट दिवाळी आहे....

आई, मला जमेल की नाही अजून नाही सांगू शकत...

तुला जमत नसेल तर पिहूला पाठवून दे

पिहू ,तो विचार करत बोलतो.

हा पिहू ,हवी मला घरात किती दिवस मी सगळ बघणार ...आधी कॉलेज होत म्हणुन मी काही सांगत नव्हते......एकदा शिक्षण झाल की आयुष्यभर तेच करायच आहे....म्हणून गप्प होते......पिहू ला जबाबदार्‍या देऊ म्हंटल तर काय साधा मला एक फोन करून बोलली नाही मी कशी आहे आणि काय..न काय....रोहिणी नाराज होत बोलते.

आई, मी पिहूला पाठवतो. मला जमत असेल तर मी ही येतो. रोहिणी ची कळी खुलली. विराट ने मोबाइल बंद करून डोळे प्रेस केले .सगळे विचार झटकून कामाकडे फोकस केले.

विराट आज बाहेरच डिनरला जाणार होता घरी यायला थोडा उशीरच झाला होता. पिहू बाहेर झोपाळ्यावर बसुन मम्मी शी बोलत बसली होती. समोर लहान मुल खेळत होती. तर घर प्रसन्न वाटत होते. विराटची कार आली तिने कॉल बंद केला आणि घरात आली. विराट फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. पिहू त्याच्या कुशीत शिरली. विराटने ही तिच्या केसांवर ओठ टेकवले.

अहो,

ह्म्म ,तो डोळे झाकून बोलतो.

दिवाळी आली.....आपण कधी जायच,

आईचा फोन आला होता. तु पुढे जा.....

पिहू त्याच्या कुशीतून बाहेर येत उठून बसली....मी एकटी जाणार नाही.....तुमच्या बरोबर जाणार पिहू चिडून बोलली.
त्याने डोळे उघडले अणि तिच्या कडे रोखून बघितल. पिहू ने नजर दुसरीकडे वळवली.

पिहू,काय प्रॉब्लेम आहे....एकटी जायला तो ही उठून बसत बोलतो .

मी 🥺 नाही, तुम्ही पण यायच....

तुला एकटीला जायला प्रॉब्लेम आहे ना जेनी येणार आहे तिच्या सोबत जा..

अहो, तुम्ही बोलला होता ना आपण दोघ जायच ..पिहू बारीक चेहरा करत बोलली.

हो..ग सोना पण दिवाळी आहे. घरात तू हवी ना.....तुला ही सगळ कळायला हवे पुढे जाऊन तुलाच बघायच आहे ना. तो बेडला मागे टेकून पिहू ला जवळ घेत बोलतो. दिवाळी ची केवढी शॉपिंग असते स्वीट पासून गिफ्ट्स पर्यंत तुला सगळ यायला हव आणि आतापासून सवय हवी.
नमन ही सेट झाल्यावर त्याच्या लग्नाच बघणार मग त्याची कोण वाइफ असेल ती सगळ तुझ्याकडूनच शिकणार ना ...

मी किती ही चांगल्या पद्धतीने हॅन्डल केल तरी मोठ्या आईंना पटत नाही...हा, मला चॉईस चा प्रॉब्लेम आहे कळत नाही ...कस घ्यायचे पण शिकते ना .....पण त्या कही ना काही बोलून ....मग माझ मन होत नाही काही करायच.

तो स्वभाव आहे आईचा त्याला तोड नाही. पण आपन आपली कर्तव्य पार पाडावी. इकडे आल्यापासून तू आईला कितीदा कॉल केला. पिहू ब्लँक होऊन त्याच्या कडे बघते.

ते.....मी...नाही म्हणजे काही अस काम च ती बोलायची थांबली.

पिहू .... ..मनातून फिलिंग हवी ....आपल मानून घ्यायची. तू काम नाहीं म्हणून कॉल केला नाही. ...तू चुकते ना.. ..तो आईचा प्रश्न तुझा कॉल उचलायचा कि नाही..आणि तुझ काम ही आहे कि त्यांच्या तबियतिची विचारपूस करायची. आई कशी ही बिहेव केली तर मी आहे बोलायला त्यात वादच नाही. पण तू कुठे चुकू नकोस. अस मला वाटते....शेवटी तुझा प्रश्न तू कस रहायचे आणि ह्या घरातल्या लोकांना आपलेसे कस करायचा....आणि मला सारख सांगायला लावू नकोस.....तो थोड चिडून बोलतो.

अहो, मी किती चांगल बोलू दे पण आईंना मला एक्सेप्ट करायच नाही हेच वाटते.....

पिहू....मी बोललो ना आई कशी ही बिहेव करू दे....

एक मिनिट पिहू त्याला थांबवत बोलते....त्या कश्या ही माझ्या शी बोलू द्या पण मी कधी ही त्यांना अडव बोलले नाही माझ्या कडून एकदाच चुकून झाल .आणि.....तुम्हाला एक सांगू. पिहू पॉज घेत त्याच्या कडे बघते. तिचे डोळे वे1गळे बोलत होते.

विराट तिलाच बघत होता....बोल. ती शांत आहे बघून विराट बोलतो....

मोठ्या आई.....तिने भीतीने आवंढा गिळला...

पिहू ,....काय बोलायचं विराट रोखून विचारतो. त्याच मन चलबिचल झाल होत. जस त्याने तिच्या मनातल ओळखल होते .

आई, तुमच्या वर जे ....प्रेम....का....काळजी...दाखवतात ना ते म...... मला खोट वाटते पिहू घाबरत अडखळत बोलते.

पिहू ssss विराट जोरात ओरडून तिला बाजूला करत उभा राहतो. पिहू दचकते.....विराट चेहर्‍यावरून हात फिरवत गॅलरीच दार उघडून बाहेर येतो....

पिहूला तर घामच फुटला. काय तोंडून निघाले.
विराट शांत होत बाहेर बघू लागतो. पिहू घाबरतच त्याच्या मागे येते.

आ....अहो... ...म.....मला....तस .....पिहू एक एक पाउल टाकत भीतच जवळ येते. तो काहीच बोलत नव्हता. पिहूला सुचतच नव्हते काय बोलावे काय नाही ....अहो, सॉरी...चुकून बोलले...मी....पिहू त्याला मागून मिठी मारत थरथर कापत रडतच बोलते .

विराट तिला पुढे घेत मिठीत घेतो...

पिहू मान वर करून त्याच्या कडे बघते. . खरच सॉरी मला वाटून गेले म्हणून बोलले......माझा काही तरी गैरसमज झाला असेल. विराट तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो. पिहू शांत होत डोळे पुसून त्याला बिलगते.

अहो, सॉरी बोला ना चुकून बोलले.विराट मंद हसला आणि आकाशाकडे बघू लागला....

पिहू ब्लँक होऊन त्याच्याकडे बघू लागली.....अहो, विराट तिच्याकडे नजर वळवतो.

आई स्वार्थी असली तरी मी नाहिये. डॅडने आईला वहिनीचा नाही तर आईचा दर्जा दिला होता. कारण आजी पेक्षा डॅडला आईने सांभाळले होते. ......डॅडला बिजनेस मध्ये खूप लॉस झाला होता .....तेव्हा बिजनेससाठी आई ने स्वतःची ज्वेलरी दिली होती. .... आईने हेल्प केली नसती तर हे सगळ उभ राहिले नसते ....आई कशी ही राहू दे .पण डॅड साठी खूप केल. ....आईला कधी मूल होण्याचे चान्सेस नव्हते. मला ही लहान असताना खूप प्रेम दिले.....नंतर नमन झाल्या वर त्या बदलली....शेवटी आपल ते आपलच असते. विराट हलक हसत बोलतो.

पिहू शॉक होत फक्त ऐकत होती. सगळ माहित असून हे इतके का ऐकतात हाच प्रश्न पडला होता.

विराट तिच्या गालाला टॅप करतो....हे ,जास्त विचार करू नको....आई कधी बदलणार नाही आणि मी ही कधी बदलणार आईला जे हव ते देईल मी..... आणि आज बोलली परत बोलू नकोस. तो थोड सिरियस होत बोलतो. पिहू ब्लँक होत मान नाही म्हणून हलवून त्याच्या कुशीत शिरते....
तू आहेस ना माझ्या वर बिना स्वार्थ प्रेम देणारी अजून मी कोणाकडून अपेक्षा केलीच नाही .....तो तिला घट्ट कवटाळत थोड वर उचलून बोलतो. पिहू त्याचा चेहरा दोन्ही हातात धरते. विराट चा आज वेगळा गुण तिला दिसला होता. त्यावर काय रिएक्ट करावे कळत नव्हते.
तो डोळ्यांनी काय म्हणून विचारतो.... ती गालात हसून त्याच्या गालावर किस करते. तो डोळे बारीक करून रोखून बघतो. पिहू हसते.. टाइम मी ठरणार पिहू गाल फुगवून बोलते...

किस चा काय टाइम असतो का....stupid तो ओठ जवळ आणत बोलतो.

ना.... ती चेहरा फिरवते. तो तिच्या गळ्यात चेहरा घुसवून तिला गुदगुल्या करत आत घेऊन जातो......

अहो sss ....पिहू खळखळून हसते.
.
.
.
.

सकाळी पिहू चिडून बसली होती. तिला जायच नव्हते पन विराट ने तिच बुकिंग केल होते.

पिहू,विनाकारण हट्ट करू नको...तुमच्या दोघींमधे माझ डोक आउट झाले.. तू गेल्याशिवाय आईला चैन पडणार नाही.

ती काहीच बोलत नाही.....रागाने तिची बॅग पॅक करत होती.

पिहू दिवाळी झाल की मी परत घेऊन येणार आहे....

मी परत येणारच नाहिये.......पिहू कंठ दाटून चिडून बोलते

पिहू , तू इतकी हट्टी कशी झाली... जेनी आल्यामुळे दोघ शांत होतात....विराट जेनी कामच बोलत बसले होते....पिहू रागाने बाहेर जाऊन बसते...त्याच तर डोक् आउट झाले होते. .

ती थोड्यावेळाने परत आत येते....दुपारनंतर ची फ्लाईट होती....तिची तर धाकधूक वाढली होती. एकटे जायचे नंतर घरी गेल्यावर रोहिणीचा वेगळा ताल....गाडीत पण ती शांत बसली होती काहीच बोलत नव्हती.... दोघे एयरपोर्ट वर आले....पिहू त्याला बिलगते.......विराट ही तिला घट्ट मिठीत घेत पाठीवरून हात फिरवतो. बोलत जरी नसली तरी आतून घाबरली असणार कारण ती पहिल्यांदाच अशी एकटी जात होती. पिहू मी दिवाळी ला टू डेज आधीच येणार आहे ...
टू नाही फाईव डेज आधी पिहू चिडून कंठ दाटून बोलते.

विराट हसत हो म्हणतो.....okay तुला गिफ्ट काय हव दिवाळी ला....मागची दिवाळी एकत्र असून नसल्यासारखी होती...पण ही दिवाळी छान सेलिब्रेट करू तो तिचा चेहरा वर करत डोळ्यात बघत बोलतो.

तुम्ही येणार ना लवकर ती विश्वासाने त्याच्या डोळ्यात बघत बोलते....

हो ,ग.... आता तर स्माईल कर तो कपाळाला ओठ टेकवत बोलतो....

ती तोंड वाकडं करत मान हलवून नाही म्हणते.....

तो हसत तिला मिठीत घट्ट कैद करतो...फ्लाईट ची अनाउन्समेंट होती. ....

जेनी लांब थांबलेली दोघांच्या जवळ आली....विराट ने पिहू ला बाजूला केले....

जेनी....she's going outside for the first time...take care of her....तो बॉस टोन मध्ये तिला ऑर्डर देत बोलतो.

जेनी हसून मान हलवत हो बोलते.....मॅम ...जेनी पिहू कडे बघून बोलते. ..

पिहू ,विराट कडे एक नजर वळवून निघून जाते. विराट नमन ला कॉल करुन पिहुला पिक करायला सांगतो.

पिहू मुंबईला येते नमन आणि रिषभ आलेच होते....दोघांना बघून पिहूची भीती कमी होऊन रीलॅक्स होते.....

वहिनी, ss नमन जवळ जात हग करत बोलतो....पिहू दोघांची विचारपूस करत गाडीत बसते.....घरी आल्यावर सगळ्यांचा गोंधळ चालूच असतो....पिहू च्या चेहर्‍यावर समाधान येते. तिकडे दोघ होते...हे सगळ मिस करत होते. एकत्र राहण्याची वेगळीच मज्जा होती.

विराट पिहू ने सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेतले होते. पिहू सगळ्यांना देत होती.

वाहिनी, पिहूचे गाल छान वर आलेत....केरळ च पाणी जास्तच मानवल वाटते...सुधा पिहू ला कोपर मारून चिडवत बोलते.
पिहू लाजून खाली बघते....सुमन सुधा हसतात. रोहिणी डोळे फिरवत मोबाइल मध्ये बघते. जशी पिहू आली तस रोहिणी ने सगळा कामाचा भार तिच्यावर सोपवून टाकला....पिहू ही सगळ आवडीनं करत होती. ......

पिहू काय करतेस....सुमन किचन मध्ये येत बोलल्या....पिहू you tube वर बघून काही तरी करत होती म्हणून सुमन बोलल्या.

ते...आई मी ह्यांच्या साठी हिरव्या मुगाचे लाडू करते
...पिहू अजून मोबाईल मध्ये बघत बोलली...

सुमन सुधा एकमेकाना कडे बघून हसतात....

पिहू शुगर फ्री पण केल आहे सुधा म्हणते.

हो,......पण शुगर फ्री पण खात नाही.... गोड नकोच म्हणतात. कधी तरी खूप बोलले की खातात....मग विचार केला शुगर नको ना शुगर फ्री नको त्याऐवजी खजुर टाकून करते. ...

आता तूच इतकी गोड आहे अजून काय हवे. विराटला सुधा हसत बोलते....

आत्या ss काय आल्यापासून मागे लागल्या .पिहू लाजून दुसरीकडे बघत हसत बोलते.

तुला नाही तर कोणाला त्रास देऊ...हहहहह हो कि नाही वहिनी...

सुधा जाऊन आउट हाउस मध्ये बघ सगळ फराळाचे झाले का. ..... ..पॅकिंग ला घ्यायला सांग.....पिहू तुझ झाल की ये तिकडेच......रोहिणी मागून येत बोलते.

पिहू मान हलवून हो म्हणते..... सगळे गेल्यावर पिहू विराट ला कॉल करते. तो आज येणार होता.

अहो 😕 तुम्ही बोलला होता ना येणार ....

हो ग....आज येणार होतो...पण अचानक काम आले....उद्या नक्की येईल....

तुमच हे दरवेळेस आहे.....काम करत बसा...पिहू चिडून बोलते....तितक्यात परत सुमन येतात...पिहू ने फोन कट करते.......

काय झाल विराट निघाला का....

नाही येणार आज पिहू रागारागात चमचा हलवतच बोलते...
सुमन च्या लक्षात आले...आल्यापासून त्यांनी हे तिसरी वेळ बघितल होते.

पिहू , कुठला ही पदार्थ करायचा असेल ना प्रेमाने केल्यावरच त्यात प्रेम उतरते....रागात करून काही उपयोग नाहिये...त्या पेक्षा करू नको..सुमन थोड चिडून बोलते.

पिहू सुमन कडे बघते....आई मी मनाने करते ...आणि ह्यांच साठी मी आधी पण मन लावून करत होते आणि आता ही मन लावून करते ...पिहू पण चिडून बोलते..

हो माहीत आहे मला.....पण सारख चिडून काही मिळणार नाहिये.. थोड चीडचीड कमी कर.......त्याला ही वाटते ना त्याच्या फॅमिली बरोबर असाव....थोड समजून घ्यायच ना....पिहू एकटक बघत राहते.

आई, मी.... सुमन चा फोन वाजतो सुमन फोन कानाला लावून बाहेर येतात. पिहूला भरूनच येते. ती स्वतः ला सावरत कामाकडे लक्ष देते.

पिहू सगळ काम संपवून रूम मध्ये येते .दुपार पासून आई च डोक्यातून जातच नव्हते. डोळे ही सारखे भरून येत होते. विराट ने फोन केला तेव्हा तिने पटकन स्वतःला सावरले. आणि फोन कानाला लावला...

पिहू ,सॉरी मी खरच निघालो होतो....तो बोलतच होता की पिहू बोलली. अहो, सावकाश या.. पिहू शांत टोन मध्ये बोलली.

🙄पिहू आज लवकर राग शांत झाला....चांगल आहे पण उद्या मी येणार आहे....विराट हसत बोलतो.

पिहू खुश होऊन डोळे पुसते

रडूबाई , उद्या पासून दिवाळी चालू होती...आणि लक्ष्मी रडली तर माझ कस होणार.

पिहू हसते....तुम्ही ना...काही पण बोलता.

काही पण म्हणजे...तूच तर माझी लक्ष्मी आहे ..तू खुश असली तर आपल घर हसून खेळून भरल्या सारख वाटेल

पिहू , हसून हो म्हणते...

झोप आता , दमली असशील...लड्डू करून विराट हसत बोलतो.

अहो तुम्हाला कस माहीत...पिहू ब्लँक होत विचारते.

आत्या बोलली होती ग काम होते म्हणून फोन केला होता... दिवाळी झाल की रिषभ च्या लग्नाच बघायच आहे... मुलगी बघितली आहे.

काय, ???मग आलीशा पिहू शॉक होत विचारते.

आल्यावर बघू....डोन्ट वरी , मी आल्यावर रिषभ आलिशा च बोलणार आहे .

हुश्श, पिहू relax होते.

.
.

धनत्रयोदशीच्या दिवशी पिहू ने रेड ऑरेंज कलरची सुपरनेट सिल्कची साडी घालून आवरून खाली आली.

पिहू ,इकडे ये सुमन बोलवतात....काल पासुन पिहू घाबरून जास्त बोलतच नव्हती... पिहू जवळ जाते .....

ताई पिहू कडे द्या ती थाळी आज ती पूजा करेल....

हो, रोहिणी आता पिहू मोठी सुन आहे....आजी पिहू च्या तोंडावरून हात फिरवत बोलतात.

रोहिणी वरवर हसत पिहू कडे बघते. धर हे सगळ नीट लावून ठेव ..

पिहू थाळी हातात घेत सुमन कडे बघते. सुमन हसत डोळ्यानेच जा म्हणतात. सुमनला ही पिहूच मन कळत होते .काल उगाच बोलल्या सारख वाटले. पण विराट ही मुद्दाम करत नव्हता. त्याला समजून घेणार कोण तरी हव ना ...आल्यापासून पिहूच बोलण बघत होत्या. कुठल्याही गोष्टीवर चिडून बोलत होती.....

बाहेर रंगोली आर्टिस्ट ने खूप छान रांगोळी काढली होती....
पिहू ट्रे मध्ये दिवे लावून घेऊन गेली....सगळी कडे वीरा आणि पिहूने दिवे लावले.....पूर्ण देशमुख मेंशन दिवे लाइटिंग उजळून निघाले होते. विराटची कार बघून पिहूच्या चेहर्‍यावर मोठी स्माइल आली....

तो बाहेर येताच वीरा पळतच जाऊन बिलगली....विराट तिला घट्ट मिठी मारात केसांवर ओठ टेकवतो. वीराला थोड बाजूला करत तिला वरुन खालून निहाळत परत मिठीत घेतो... I miss you.. baby. ....तो वीराला चार पाच महिन्याने बघत होता.

I miss you too...दादा 😘

नमन विराटला बघून पळतच जात मागून मिठी मारतो....दादा sssविराट हसत मागून त्याला पुढे घेतो.

विराट पिहू कडे नजर मिळवत स्माईल करतो...पिहू पण हसते...

दादा, आत चल...

हो, चल तो पिहू कडे हात करत चल म्हणतो....विराट ला बघून सगळे खुश होतात...

पिहू पूजेची तयारी करते....मोठया ताम्हणात नाणी रुपये...खानदानी दागिने ठेऊन त्याची पूजा करतात.... दिवा अगरबत्ती लावून धने गूळ ठेऊन आरती करतात.....

रात्री सगळ्यांना जेवायला उशीरच होतो..... गप्पा हसी मज़ाक करत बसले होते. पिहू सकाळी लवकर उठली होती तिला झोप आवारतच नव्हती....ती रूम मध्ये येऊन फ्रेश होऊन बेडवर पडून विराटला मेसेज करते....

🗨अहो 😴😴...झोप आली

मोबाइल blink झाल्यावर विराटने बघितल ....मेसेज बघून तो गालात हसला. तो मोबाईल बघत उठतो.

चला झोपा उद्या पाचला उठून अभ्यंगस्नान करायचे आहे. रोहिणी सगळ्यांना उठवत बोलतात.

विराट रूम मध्ये येतो ...पिहू बेडवर झोपून मोबाईल चाळत होती...त्याला बघताच हात करत जवळ बोलावत...

पिहू फिफ्टीन डेज फक्त लांब होतो...तो तिच्या जवळ जाऊन तिला कुशीत घेत बोलतो...

ती काही न बोलता त्याला बिलगून डोळे झाकते.....तो ही शांत तिच्या केसांमधून हात फिरवत दंडाला थोपवत तिचा चेहरा निहाळत गालात हसतो....ती पाच मिनिटात झोपून पण गेली.
.
.
.
.सकाळी पिहू ने उटणे लावून अंघोळ केली ....विराट अजून झोपला होता ...

अहो, उठा....पिहू त्याला हलवत बोलली....

पिहू , झोपू दे ना......तो वैतागून बोलतो.

अहो, उठा ना..... उटणे लावते...

विराट डोळे उघडझाप करत तिला बघतो..... नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती....बेबी पिंक कलर ची सॉफ्ट साडी घातली होती. केसांमधून पाणी अंगावर पडत होते ....गोर्‍या अंगावर साडी खुलून दिसत होती. उटणे चा सुगंध त्याला मोहक करत होता....त्याने तिचा हात पकडून बेडवर ओढले...

अहो sss, पिहू त्याच्या छातीवर हात ठेवत लांब करत बोलते.

खूप हार्ट 🔥 दिसते....तो झुकून ओठ टेकवत बोलतो...पिहू चेहरा फिरवते....अहो, नको.....सोडा ना.....ss

नाही, तो तिचे हात काढून हग करत बोलतो....

अहो, उशीर होतो उठा ना मी तेलाने मालीश करून उटणे लावून देते...

नेक्स्ट....तो गालात हसत विचारतो...

नंतर काही नाही अंघोळ.... झाल एवढच असते..पिहू कळून बोलते.

Okay नेक्स्ट मी ठरवतो...तो तिच्या नाकाला टच करत उठतो. ..तो शर्ट काढतो... पिहूला त्याला बघून पोटात तर फुलपाखरू नाचू लागतात......विराट ही मुद्दाम मज्जा घेतो.

ती नजर खाली घेत त्याला तेलाने मालीश करते....तिचे नाजूक हात त्याच्या अंगावर गोड शहारे आणत होते. ....विराट सारखाच तिचा हात पकड़त होता...अहो, काय चावटपणा आहे...पिहू लटक्या रागात बोलली.

अजून कुठे चावटपणा चालू केला विराट खट्याळ हसत डोळा मारत बोलतो ...पिहू उटणे घेऊन त्याला लावू लागली.

पिहू दररोज करत जा तेलाने मालीश ....

काय ss ,दररोज....मग तुम्ही माझ्या सारखे बारीक व्हा ....मग दररोज मालिश करेन पिहू नाटकी हसत बोलते.

तो भुवई उंचावत तिच्या कडे बघतो....तुला म्हणायचे काय आहे....

हात दुखायला लागले तेल उटणे लावून पिहू पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलते. विराट हसत तिचा हात ओढतो. पिहु त्याच्या मांडीवर बसते...

अहो sss ... सगळी साडी खराब झाली पिहू वैतागत च बोलते....
विराट पापणी न हलवता तिलाच बघत होता.....पिहू नजर खाली घेत उठू लागली..विराट ने तिला जवळ ओढले ....पिहू च्या अंगाला काटा आला. विराट ने बाउल मधून उटणे घेऊन पिहू च्या पोटावर लावले........

अ...sssहोssss तिच्या तोंडून पुसट आवाज निघाला ....ती पटकन त्याला बिलगली....

विराट तिच्या पाठीवर लावणार की दार नॉक झाले. पिहू दचकून विराट कडे बघू लागली....दार तर एकसारखे वाजू लागले.....

विराट ss,पिहू sss रोहिणी बाहेरून आवाज देऊ लागल्या....

अहो, sss पिहू गोंधळून उठते....अहो, आता तुम्हाला ना काही कळतच नाही.....कधी काय करायचे... तुम्ही....ना.....पिहू चिडून हात झटकत बोलते....

तुला खूप कळते ना....mad 😠 तो चिडून बाथरूम मधे निघून जाते. पिहू एक नजर त्याला बघते.

पिहू ss रोहिणी अजून दार वाजवत होत्या.

ह....हा...हा आले पिहू अडखळत बोलते..... आणि घाईतच दार उघडते...

पिहू ,हे....धर विराटला दे....तिला बॅग देत बोलत होत्या तर तिचा अवतार बघून त्यांच्या कपाळावर आठ्याच पडल्या.... पिहू ने नजर खाली घेत बॅग घेतली....

.पिहू , पटकन आवरून ये खाली.....आणि लवकर त्या ऑर्डर सोडून निघून गेल्या.

पिहू घाबरून पटकन साडी चेंज करून आवरून खाली येते.

पिहू , रोहिणी कडे नजर वळवते त्या कामात होत्या पिहू पटकन किचन मध्ये गेली...

सुमन गीताला काही तरी सांगत होत्या. ....,सुमन तिच्या कडे नजर वळवतात..पिहू विराट ची झाली आंघोळ...तेल उटणे लागली ना....पिहू हसत हो म्हणते.

मानव तीन चार दिवस आधीच पुण्याला आला होता....

पहिले चौघांनी मिळून शॉपिंग केली. प्रांजल मानव ने घर सजवले ....लाइटिंग आकाशकंदिल स्वत मानव घेऊन आला होता...
रेवती भीमराव तर बघतच बसले होते...दोघांनी काहीच केल नाही....पणती पासून स्वीट काय आणायचे असेल तर मानव स्वतः रेवती, प्रांजल ला घेऊन जायचा....त्याला ही खूप छान फिलिंग येत होती.

संध्याकाळी लक्ष्मी पूजन ची तयारी झाली.....

पिहूने मोती कलर लाल काठाची पैठणी घालून साजेसा मेकअप केला....विराट ने ही मोठी कलर चा कुर्ता घातला होता. पिहू विराट जोडीने सगळ्यांच्या पाया पडतात....रोहिणी दामोदर दोघांना गिफ्ट्स देतात. पूजा करून सगळे बाहेर येऊन फटाके फोडतात. ....
दुसर्‍या दिवशी पाडवा होता ... ऑफिस मध्ये पूजा घातली. पिहू आणि विराट दोघे जोडीने पूजेला बसले .घरी आल्यावर सुमन ने आरती च ताट पिहू कडे दिले .पिहू , औक्षण कर....पिहू त्याला ओवाळते.

विराट गिफ्ट दे पिहूला सुमन हसत बोलतात.

विराट तिच्या हातात गिफ्ट ठेवतो.

पिहू काय आहे ,उघड सुधा excited 😁 होत बोलते.
पिहू हसून गिफ्ट्स उघडते. हिर्‍यांचा नेकलेस होता...

वॉव, किती मस्त आहे....सुधा हसत बोलते.
.
.
.
.

दोघे ही रूम मध्ये येतात...अहो, उद्या जायच आहे लक्षात आहे ना....

विराट 🙄 विचार करतो.... फिफ्टीन डेज आहे मी इथे....

😖😖😖मी पुण्याला म्हणते.

विराट डोळे ताठ करतो.......हा..हा जाऊ 😅😅विसरलो होतो.....

आजकाल खूपच विसरता वाटत नाही 🤨 का मुद्दाम करता....

विराट हसत तिला कुशीत घेतो....तू खरच मला सोडून राहणार तो लाडीगोडी लावत बोलतो...

हो, 😏😏 तुम्ही राह आता एकटेच कस वाटते कळेल हूहूहूह

ओन्ली टू डेज....मी पुण्यावरून येताना तुला घेऊन येणार आहे....

मी येणार नाहिये...आठ दिवस राहणार आहे ....पुण्याच नाव काढले की तुम्ही बर विसरून जाता... इथे काही तरी महत्वाच काम असेल म्हणून थांबणार आहे ...मला सगळ कळते ...पिहू त्याला ढकलून निघून जाते.
.
.
.
. सकाळी वीरा, दिपाने विराट, नमन,रिषभला ओवाळले
ब्रेकफास्ट करून विराट पिहू पुण्याला आले....

पिहू गाडीतून उतरते. ...घरावर नजर टाकत गेट उघडते ...पिहू गेट च्या खाली नजर टाकून हसते....विराट मागून येत तिला डोळ्यानेच काय म्हणतो..

प्रांजलची रांगोळी बघा पिहू हसत बोलते. विराट खाली नजर टाकतो. प्रांजल ने रेडीमेड रांगोळी स्टिक केली होती.

ह्याला म्हणतात डोक, टाइम वेस्ट कुठे आणि कश्यासाठी करावा इथे example आहे...विराट हसत आत येत म्हणतो....

म्हणजे मी टाईम वेस्ट करते म्हणायच का,

मी अस बोललं का....तुझी लाइफ आणि तिच्या लाईफ मध्ये खूप फरक आहे, सिस्टर असले तरी विचार करायची टेक्निक वेगळी आहे.

दी sss प्रांजल पिहू ला हग करत बोलते. मानव ही बाहेर येत विराट च्या गळ्यात पडतो. सगळे आत येतात.

पिहू, प्रांजल मानवला ओवाळतात. दोघींना वॉच गिफ्ट देतो.

दादा ह्याची काय गरज होती....पिहू पपांना कडे बघत बोलते.

दादा मला खूप आवडले. प्रांजल डोळे मिचकावत बोलते.

पिहू, मी चांगल कमावतो....तुमच्या साठी नाही तर कोणासाठी खर्च करणार. ...

पिहू ,प्रेमाने आणले घे...भीमराव बोलतात....

पिहू , थोडा बोनस वाढला तर अजून छान गिफ्ट आणले असते...... .मानव विराट कडे बघून बोलतो.विराट त्याला लुक देतो. सगळे हसतात.

जिजू दादा वर नाही तर माझ्यावर दया करा...बोनस थोडा वाढतो का बघा...तसे सगळे शॉक होत प्रांजल कडे बघतात

आय मीन,....मला अजून छान गिफ्ट मिळेल ना नेक्स्ट टाइम ....तसे सगळे जोरात हसतात.

प्रांजल, मानव आधी सारखं काम करत नाही ना...हल्ली खूप चुका होतात तो पिहू कडे बघून बोलतो. पिहू बारीक डोळे करून बघते.

ओह्ह, आता तू तुझे पर्सनल काम सांग मग सांगतो त्या कामाचा पण हिशोब नाही लावला ना बघ......

Okay, you are going to do calculations and accounting with me? really विराट रोखून बोलतो.

तसा मानव दबाकतो ,...मी....आनि तुझ्याशी....अस कधी होईल का..... विराट हिशोबावर आला ना. ...कुठे तरी वाढायच्या ऐवजी अर्धा देऊन मोकळा होईल .

थोड्यावेळ बसून संध्याकाळी विराट आणि मानव हॉटेल मध्ये येतात.

दोन दिवसानी विराट मानव मुंबईला येतात.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🏵🏵🏵🏵🌺🌺🌺🌺🌺🌺