Ti ratra - 3 in Marathi Love Stories by Durgesh Borse books and stories PDF | ती रात्र - 3

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती रात्र - 3

त्या रात्री तिने मला प्रपोज केलं, मी तिला हो सुध्दा म्हणालो होतो. थोडा वेळ आम्ही अजुन फोन वर बोललो, मला झोप मात्र लागत नव्हती. काय केलं मी , मला काहीच समजत नव्हतं. डोक्यात वेगळेच विचार सुरू होते, हे प्रेम आहे की आकर्षण या दोघांमध्ये द्वंद्व सुरू होते. कारण आम्हाला भेटून फारसे काही दिवस झाले नव्हते, पण इतक्या कमी वेळात कुणी कसं काय प्रेमात पडेल. प्रेम व्हायला एक सेकंद पण कमीच असतो पण त्यासाठी खूप मोठा ओळखीचा, समजून घेण्याचा, काळजीचा इतिहास असतो. आमचा तसा काही इतिहास नाही.

मी त्या रात्री खूप विचार केला, तिला हो तर म्हणालो पण आता मी हे कसं सांगणार ?. मला जसं वाटत तस तिलाही वाटत असणार का ?
तिने सुध्दा घाई केली असेल तर ?
तिच्या सुध्दा मनात आकर्षण असेल तर ?
असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात गर्दी करत होते.
मला त्या रात्री झोप नाही आली. सकाळ होता होता मी माझं उत्तर आणि निर्णय दोघंही ठाम केले.
सकाळचे सात वाजले असतील मी तिला कॉल केला. तिने एका रिंग च्या आधी तो उचलला, ती तिकडून गुड मॉर्निंग विश करत होती. त्या आवाजात मला आनंद जाणवत होता. तिच्या मनात आले असणार की या नात्याच्या पहिल्याच सकाळी मी कॉल करून तिला प्रेमाच्या गोष्टी बोलणार, पण त्या गोष्टी आता माझ्यासाठी चुकीच्या वाटत होत्या.
ती “गुड मॉर्निंग sweetheart”
मी “गुड मॉर्निंग”
ती “मला खूप छान वाटलं , तू मला कॉल केला. किती लवकर उठतो तू, झोप झाली ना तुझी ?”
मी “मला झोपच नाही आली रात्रभर”
ती “मला पण नाही आली”
मी “तुला का नाही आली”
ती “रात्रभर मी तुझाच विचार करत होते, मला तर स्वतःच हसूच येत , किती काही विचार येत होते माझ्या मनात. मी पार आपल्या मुलांचे नाव पण ठेवले”
अरे ही वेडी आहे का ?, मी इथे ब्रेकअप करायला कॉल केला तर ही पोरगी मुलांचे नाव पर्यंत पोहचली. थांबवलं पाहिजे नाहीतर म्हातारपणाची माझी पेन्शन पण खायची ही.
मी “मी खुप विचार केला, मला वाटतं खूप लवकर घडलं हे सर्व , मला अजुन विचार करायचा आहे”
ती “मग तू पण कर विचार, तुला जे आवडणार तू ते सांग नाव, पण मुलीचे नाव मी ठेवणार”
अरे सुरू काय आहे हे, डोक्यावर पडली का ही मुलगी, मी चिडलो होतो.
मी “थांब , माझं आधी पूर्ण ऐकुन घे नंतर बोल तू”
ती “ठीक आहे बोल”
मी “मला वाटतं आपण अजून वेळ द्यायला हवा, मला हे फक्त आकर्षण वाटत आहे, यात प्रेम कुठे आहे ते माहिती नाही, तेच शोधायला मला वेळ पाहिजे आहे. आपण पुढे काही दिवस मित्र म्हणून राहू आणि एक दुसऱ्याला समजून घेऊ, त्यानंतर समजेल काय आहे. मला जर तुझ्याबद्दल प्रेम असेल तर ते समजेल, मग आपण विचार करू या नात्याचा”
आता तर निरव शांतता पसरली होती, सकाळचे गार वारे सुरू होते, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अचानक तिच्या हुंदक्यांचा आवाज.
हुंदके देत ती म्हणाली “आणि प्रेम नसेल तर”
मी या प्रश्णापुढे काय बोलणार मला काहीच समजत नव्हते.
मी “आपण त्याचा नंतर विचार करू, ज्या गोष्टी झाल्या नाही त्याचा विचार आपण आत्ताच का करायचा”
ती “ठीक आहे, पण तू माझ्याबरोबर बोलणं तर नाही ना सोंडणार”
मी “नाही , अजिबात तसे काही करणार नाही मी”
ती “मला तू जे म्हणतो ये पटलं आहे, मलाही तू घाईत निर्णय घेतला याची शिक्षा द्यायची नाही तुला, तुझं हक्काचं प्रेम पाहिजे ज्यात काहीच प्रश्न नसणार. मी थांबायला तयार आहे”
तिचे हुंदके एव्हाना थांबले होते. तिच्या आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. मला त्याची भीती वाटायला लागली होती.

बेडवर पडून आम्ही दोघं गप्पा मारत होतो. तिला तहान लागली होती, मी पाणी घेण्यासाठी माझ्या रूम मध्ये गेलो. सृष्टी निवांत झोपली होती, झोपताना पहिल्यांदा मुलगी पाहत होतो. मला वाटायचं मुली झोपताना पण सुंदर दिसत असतील, कसलं सुंदर. घोरत होती ती, घोरण हे तर नैसर्गिक आहे ना? पण मुली म्हणजे ते परीलोक आणि त्यांच्याबाजुला टेडी , मखमली चादर, शांत पियानो च पार्श्वसंगीत.
माझा मुलींच्या झोपेबद्दल चा गैरसमज, पार धूर झाला. मी जाणून बुजून दरवाज्याचा आवाज केला, उठली ती आणि हो मला ही तेच हवं होत.
सृष्टी “काय झालं ?”
मी “काही नाही, तू झोप पाणी घ्यायला आलो होतो, सॉरी मला वाटलं तू जागी असणार. झोप तू”
सृष्टी “ठीक आहे”
आणि ती झोपली. आपण गाणं ऐकत असताना pause घेतो , नंतर पुन्हा सुरू केलं की गाणं तिथून सुरू होत. हीच सुध्दा अगदी तसाच घडलं. पुन्हा त्याच टोन मध्ये घोरायला लागली.
मी पाणी घेऊन मानसी कडे आलो. तिचा सुध्दा डोळा लागला होता. तिच्याकडे पाहून मला तिचेच शब्द तिच्याबद्दल बोलावेसे वाटत होते, अगदी लहान बाळ झोपल आहे असा वाटत होत. एका बाजूला होऊन झोपली होती, एक हात डोक्याखाली घेतला होता तर दुसरा हात सरळ कमरेवर, पाय हलकेसे दुमडलेले होते. Fan सुरू होता म्हणून आकडून झोपली होती, हवेमुळे तिचे एक दोन केस तिच्या कपाळावरून सरळ खाली उतरून गालावरचा सुखकर मार्ग घेऊन हळुवार ओठांवर खेळत होते.
तिला थंडी वाजत असणार म्हणून मी तिच्यासाठी आतून नवीन चादर काढली. नवीन चादरी खूप छान सुगंध देत असतात. मी तिच्यावर ती चादर टाकली. पण ती घाढ झोपेत नसल्याने उठली.
“आला तू” असे म्हणून तिने माझ्याकडे हात पुढे करत पाणी मागितले,
ती “डोळा लागला होता माझा”
मी “दमली असणार , झोपायच होत की , का उठते ?”
ती “नको, तू पुन्हा नाही भेटणार असा”
आणि ती पाणी पिण्यासाठी थोड थांबली नंतर
ती “झोपेच काय आहे, ती दर दिवशी येते. तू काधीतरी भेटतो असा, आज छान गप्पा मारू. तू सांग कसं सुरू आहे तुझं ? एखादी मुलगी आली की नाही नंतर”
मी “कसलं मुलीचं विचारते तू, इथे बॉस वेताळ सारखं बसलेला असतो कायम माझ्या मानेवर आणि जॉब वैगरे सुरू आहे. घरचे लग्नासाठी मुली दाखवतात मी नकार देतो”
ती “अरे असा करतात का कुठे ? त्यांना काय वाटत असेल, घरचे किती काळजी करत असणार तुझी, कर की लग्न लवकर”
मी “मला पाहिजे तशी मुलगी नाही मिळाली अजुन”
ती “कशी माया सारखी ?”
अश्या माझ्या खोड्या फक्त हीच काढू शकते.
मी “माया, ते तुला सांगायची गरज आहे का आता ?, सर्व तर माहिती आहे तुला. तरी सुध्दा त्रास देणार का तू मला”
ती “नाही रे, गम्मत केली तुझी. तू का सीरियस होतो उगाचच, मला माहिती आहे ते प्रकरण कधीच संपलं आहे”
मी “ठीक आहे , मग मनु दीदी च कसं सुरू आहे, मी ऐकलं तीच लग्न झालं”
ती “हो, आम्ही भेटलो होतो मागेच, खुश आहे ती, तुला विचारत होती.”
मी ” तुला राग नसेल येणार तर एक प्रश्न विचारू तुला ”
ती “आला तरी मी काय करू शकते तुला, विचार काहीपण ”
मी “तू सासरी का नाही गेली, तिकडे राहायला काय प्रोब्लेम आहे. सर्व ठीक आहे ना ?”
ती “आपण या विषयावर बोललो होतो, तुला सर्व माहिती आहे. मला माझा नवरा आवडत नाही. त्याला मी लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगून दिले की माझं कॉलेज का असताना एका मुलावर प्रेम होत आणि त्याच्याबरोबर च लग्न करायचं होत. पण तुझं बोलावणं आल आणि मी नाईलाजाने हो म्हणाले”
मी “तू असं म्हणाली त्याला, अरे पण तू कुणासाठी करते हे सर्व. ज्याच्यासाठी करते तो अजुन तुझ्यावर प्रेम करतो का ?”
ती “मी खुप वाट पहिली त्याची पण त्याच काही ठरत नव्हतं, तो लांब पळत होता माझ्यापासून. ते प्रकरण कधीच संपलं होत. मला माझ्या company मधला एक मुलगा आवडत होता. पण मला ते आकर्षण वाटत होत. त्यामुळे त्याला नाही म्हणाले आधी पण आता त्याची खूप आठवण येते. असा वाटत की मी त्या दिवशी त्याला नकार देऊन चूक केली”
मी “मग तुझ्या नवऱ्याने सर्व ऐकलं ? तो काही बोलला नाही तुला”
ती “काय बोलणार तो आणि मी त्याला वेळ दिला खूप , विचार केला की होईल हळु हळु ओळख, होईल प्रेम. पण तसे काहीच झाले नाही. आमचे भांडण वाढत गेले, म्हणून मी तिकडे राहायला जात नाही, आमच्यात काहीच ठीक नाही. आम्ही नवरा बायको फक्त नावाला आहोत, आमच्यात त्या नावाला साजेस असं काहीच होत नाही. मी त्याला सांगितले की मला तुझ्याबद्दल भावना नाहीत म्हणून शारीरिक संबंध पण नको”

– क्रमशः