Ti ratra - 4 in Marathi Love Stories by Durgesh Borse books and stories PDF | ती रात्र - 4

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

ती रात्र - 4

ग्रंथालयात काही पुस्तकं घेण्यासाठी गेलो होतो. तिकडे मला आत गेल्यावर काही पुस्तकं खूप जास्त आवडली. तिथेच उभा राहून पुस्तकांची प्रस्तावना वाचत होतो. पुस्तकांचा सुवास काही औरच होता. मला कधी कुणी विचारलं ना की तुझं आवडत अत्तर किंवा परफ्यूम कुठलं तर नकळत माझ्या तोंडून ओल्या मातीचा आणि नवीन पुस्तकांचा बाहेर पडणार. त्याच सुवासात मग्न होऊन मी पुढे चालत चालत पुस्तकं बघत होतो. अचानक पुस्तकांचा सुवास कमी व्हायला लागला, त्याची जागा आता दुसऱ्या कशाने तरी घेतली होती. हळु हळु मी पुढे पुढे जात होतो आणि तो पुस्तकांचा सुगंध कमी होत चालला होता. अज्ञात आणि तितकाच आकर्षित करणार सुगंध तीव्र होत होता. मी आता एका मांडणीच्या वळणावर आलो होतो मला भास होत होता की दुसऱ्या बाजूला कुणीतरी आहे, ज्याने पुस्तकांचा तो सुगंध कमी केला. माझी त्याला बघण्याची इच्छाशक्ती वाढत होती, एक वेळ अशी आली की ज्यामुळे माझ्यातल्या पुस्तकप्रेमी ला पछाडून माझी इच्छाशक्ती पुढे गेली. मी आता ती मांडणी ओलांडली होती. माझ्या समोर पाठ करून एक मुलगी होती. मी पुस्तकं बघत असण्याच नाटक करत पुढे चालत होतो. तिला मी मागे टाकले आणि तिच्या चार पाऊल पुढे जाऊन उभा राहिलो. बाजूला पू. ल. होते, आता ते असताना कुणी त्यांना मागे सोडून पुढे कसं काय जाऊ शकत. मी दोन पाऊल मागे गेलो आणि किंचितसा वळलो. आता मी पुस्तक काढून बाजूला होणार तितक्यात माझ्यासमोर ती.
मी दोन पाऊल मागे गेलो. ती माझ्यापेक्षा थोडी उंच होती, कदाचित तिच्या केसाचा फुगा त्याच कारण असू शकत, रंगला गोरी, तब्येतीचे माझ्यापेक्षा जरा जास्त होती. मी तिच्याकडे पाहतो हे एव्हाना तिच्या लक्षात आलं असणार म्हणून ती माझ्याकडे पाहत होती. ती कुठल्यातरी विचारात होती, अचानक हसून तिने मला हात दाखवला. पण मी तिला ओळखत नव्हतो, माझ्या हातात विनोद होता तो माझ्या आयुष्यात कसा आला. पु.ल. चिडले की काय माझ्यावर असं मला वाटायला लागलं. पु. ल. चिडले पण मला न्यूटन ला राग येण्याचं कारण नाही द्यायचं, मी त्याच हास्याने आणि तितक्याच उत्साहाने तिला प्रतिउत्तर देऊन न्यूटन च्या भौतिशास्त्रातील गतीचा तिसरा नियम पाळला.
मी पुस्तक घेऊन बाहेर आलो. पण ती कुठे गेली, मला का नाही दिसत. तितक्यात मला समोरून मानसी येताना दिसली. मानसी बरोबर तीच मुलगी होती. मानसी जवळ आली आणि म्हणाली “इकडे कुठे ?”
मी “पुस्तकं”
त्या मुलीकडे पाहून मानसी म्हणाली
“ही माझी रुममेट माया”
आणि मानसी माझी ओळख करून देत म्हणाली
“हा …”
तीच वाक्य पूर्ण होऊ न देताच माया बोलली
“श्रेयस, तू बोलली होतीस ना मला”
मी काय करायचं यात, हे सर्व नवीन होत माझ्यासाठी, मी परत पु.लं. ना पाहिलं आणि नमस्कार केला.
त्या दिवसानंतर अनेकदा माया मला भेटायची आणि आम्ही हसून पुढे जायचो. कालांतरने आमच्यात जवळीक वाढत गेली. आमचे फोन नंबर सेव झाले. आमच्यात आता फोन वर बोलण सुरू झालं होत. याबद्दल मानसीला कल्पनाही नव्हती की आम्ही बोलत आहोत. आमच्यात जवळीक वाढत चालली होती. मैत्रीच होती ती माझ्यासाठी, मी सर्व काही माझ्या मनातलं तिच्यासमोर रित करायचो. ती ते पूर्ण नीट ऐकुन घ्यायची, मला सल्ले द्यायची. ती जरी माझं दुःख नाही घालऊ शकली कधी, तरी पण तिच्याबरोबर घालवलेल्या क्षणांत मला त्या दुःखांचा विसर पडायचा.
एके दिवशी मला १ वाजन्यापर्यंत झोप येत नव्हती, झोप आली कशीबशी, झोपून अर्धा तास झाला असणार, मला लादेन भेटला बरोबर दाऊद आणि मी तिघे तीन पत्ती खेळत होतो.२ करोड चा डाव लागला होता, माझ्याकडे ३ एक्के होते मी शो करणार तेवढ्यात मी व्हायब्रेट झालो. मला वाटलं भूकंप आला की काय ? मग बचना ये हसिनो गाणं लागलं. मला आत्ता समजल की माझा फोन वाजतो आहे. रात्री २ च्या सुमारास मला एक कॉल आला पाहतो तर काय माया चा नंबर, मी तो उचलला तर ती तिकडून खूप मोठ्याने रडत होती.
मी खुप जास्त घाबरलो. मी कसतरी तिचं रडणं थांबवलं आणि तिला रडण्याच कारण विचारलं तर ती म्हणाली “माझ्या स्वप्नात तू आला होता”
मी हिला कसं सांगणार की मी इथे तीन पत्ती खेळत होतो, तुझ्या स्वप्नात कसा येणार. मला काय माझे स्वप्न कमी पडले का बर.
मी “मग मी काही केलं का ?”
माया “नाही”
मी “मग”
माया “तू माझ्यावर खूप चिडतो आणि माझ्याबरोबर बोलणं बंद करतो”
मी “मी का तुझ्यावर का चिडेन पण”
माया “कुणीतरी माझ्याबद्दल तुला वाईट सांगेन म्हणून तू चिडणार माझ्यावर”
मी “नाही होणार तसे काही, मी नाही कुणाचं ऐकुन तुझ्यावर चीडणार, नको काळजी करू झोप तू”
कसल्या मुली असतात काही समजतच नाही, इथे माझी झोप खराब झाली आणि तीच वेगळच, काय तर तिच्या स्वप्नात मी तिला सोडून चाललो म्हणून ती माझ्या स्वप्नात येऊन मला रिंग देते मग मी उठतो आणि पाहतो तर ती खरंच मला कॉल करते, म्हणजे माझी झोप खराब केली पण माझा डाव खराब केला. मी परत झोपलो, कसतरी तिथूनच स्वप्न सुरू होईल असा प्रयत्न करत होतो, पण उशीर झाला होता, लादेन ला बराक ओबामांनी मारून टाकले आणि दाऊद दुबई ला गेला होता.
मानसी तिच्या लग्नाच्या व्यथा मला सांगत होती. काय झालं तिला मला काही त्याची कल्पना नाही पण मधेच ती बोललो, “मी पण काय माझे गाऱ्हाणे सांगत बसली, तू बोल ना काहीतरी, आपण कॉलेज ल असताना फोन वर बोलत होतो. तेव्हा तू तासंतास बोलत असावं आणि मी ऐकत राहावं. आता पण मीच बोलते.”
तिने तिच्या डोळ्यातील जमा झालेल्या अश्रूंना अजुन खाली येण्याच्या आधीच विषयांतर केले होते, बोलून तिने मान खाली केली. कदाचित तिच्या डोळ्यातील आसवांना माझी गरज नसावी, ती सक्षम आहे, स्वतःला सावरायला.
मी “मला ना तुझे गाल ओढायचे आहेत.”
झटक्यात तिने वर पाहिले, आता आसवं नाहीसे झाले होते. तिच्या मनात काय सुरु होत माहिती नाही पण मला भीती वाटते आहे.
ती “ते काय विचारायचं असतं का ???”
ती मोठ्याने हसायला लागली होती. तिने माझ्या एका गालावरून हात फिरवत म्हणाली
“तुला अजूनही अधिकार आहे मला स्पर्श करण्याचा.”
मी हात पुढे केला आणि तिच्या गालाला लावला आणि त्यामागून दुसरा हात , दोन्ही हाताने मी तिचे गाल ओढले. मला तिच दुःख अजुन कुर्तडनार नाही, विषयांतर आणि ती त्यातून बाहेर पडावी म्हणून मला सुचलं ते मी बोललो. मला जसं अपेक्षित होत तस घडलंही ती आता हसत होती. आमच्या गप्पा सुरू होत्या.
मागचे १०-१५ मिनिट झाले, ती नुकतीच झोपली होती. तीच वैवाहिक जीवन फारस बरं चालत नव्हतं. तीच लग्न चुकीच्या माणसाबरोबर झालं, मग ती तरी कशी खुश असणार. अश्याच विचारात मी पण झोपलो.
सकाळी तिला लवकर जायचं होत, म्हणून त्या दोघी उठण्याच्या आधी मी उठलो आणि तयार झालो. त्यानंतर मानसी का उठवायला गेलो. तिला उठवण्याची अजिबात इच्छा नसताना मी उठवले.
ती उठली आणि माझ्याकडे बघून किंचित हसली. पुन्हा डोळे मिटून झोपली. मी पुन्हा तिला उठवले आणि हाताला धरून उभे केले. दोन्ही हातांनी जोरात तिला हलवले. तेव्हा ती जागी झाली.
ती दुसऱ्या रूम मध्ये गेली. तिथूनच मला आवाज दिला.
मी तिकडे गेलो “काय झालं ?”
तिथे, सृष्टी तयार होऊन बसली होती.
मी विचारलं, “कुठे चालली ?”
सृष्टी “मित्र येतो आहे घ्यायला त्याला भेटायला.”
मी “मग मानसी”
सृष्टी “मी भेटून आले की मग सायंकाळी आम्ही दोघे बरोबर जाऊ, परवा पुन्हा ऑफीस उद्या आराम होईल”
मी मानसी कडे पाहून म्हणालो,
“तू काय करणार दिवसभर मग”
ती “तू नको काळजी करू, एक दादा आहे त्याला भेटणार, दिवसभर काही शॉपिग करेन.”
थोड्या वेळानंतर सृष्टी गेली होती, मानसी ची तयारी सुध्दा झाली. थोडा वेळ आम्ही बसलो त्यानंतर मानसीला तिच्या फोन आला “एक अर्ध्या तासात येते मी” असे म्हणून तिने फोन ठेवला.
माझ्याकडे पाहून ती बोलली चल निघू आपण आता”
मला खूप वाईट वाटत होत ती चालली होती, अजुन तिच्याबरोबर खूप बोलायचं होत. आमच्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या होत्या, तिच्याबरोबर अजुन थोडा वेळ पाहिजे होता. पण अजुन जास्त वेळ तिच्या सहवासात राहिलो तर मला तिची सवय होईल. मी तिला अजुन थांबण्याचा हट्ट करणार नाही.
मी “तुला कुठे सोडायचं ?”
ती “बस स्टँड ला”
मी “निघायचं मग”
सर्व सामान बरोबर घेतलं की नाही तपासून घेत असताना बोलली.
ती “हो”
आम्ही निघालो, रूम च्या दरवाज्यावर येऊन मी थांबलो ती माझ्या मागे उभी होती. मी मागे वळलो तिच्या हातातून तिची बॅग घेतली आणि खाली ठेवली. ती त्या बॅग कडे पाहत होती. मी हळूच पुढे गेलो आणि तिला मिठी मारली. मला वाटलं मी चुकी केली. हे असं करायला नको होत, पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मला जाणीव होत होती की ती मला लांब करण्याचा प्रयत्न करत असावी तिने मिठीत असतानाच हात मागे करण्यासाठी म्हणून वर केले.
पण तो माझा गैरसमज होता, तिने ते हात मागे करण्यासाठी नसून मला मिठीत घेण्यासाठी वर घेतले होते. ती माझ्या मिठीतुन बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नसून ती माझ्या मिठीत स्तिर राहण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने मी हात खाली केले. मग हळुवार तिने पण तिचे हात खाली केले.
मी आणि ती दोघेही बाहेर पडलो. तिला तिने सांगितलेल्या ठिकाणी पोहचवले आणि मी पुन्हा रूम वर आलो.

– क्रमशः