Ti ratra - 5 in Marathi Love Stories by Durgesh Borse books and stories PDF | ती रात्र - 5

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

ती रात्र - 5

त्या दिवसानंतर माया जास्त एकरूप होऊन बोलायला लागली. जसं काही ती माझ्या प्रेमात आहे आणि आम्ही दोघेही प्रेमाच्या नात्यात बांधले गेलो. ती माझ्याबरोबर बोलतांना पिल्लू , बच्चा असे शब्द वापरायला लागली होती. मला सुरवातीला वाटायचं की ती बालिश आहे म्हणून अस काही बोलत असणार पण कालांतराने मला त्या शब्दांचा राग यायला लागला होता.
जेव्हा आम्ही कधी भेटायचो तेव्हा ती माझ्या अगदी जवळ यायचा प्रयत्न करायची, मला तिच्या स्पर्शाचा त्रास नाही, फक्त त्या मागच्या भावनेचा त्रास होत असे. कारण त्या स्पर्शात मैत्री कुठेच दिसत नव्हती.
एके दिवशी मायाचा सकाळी मेसेज आला. “तिकिटे काढली का ?”
मी विचार केला कोणत्या तिकितांबद्दल बोलते आहे ही , मला वाटलं मानसी आणि मायाच काही ठरलं असणार सिनेमा बघण्याच पण मानसी विसरली असणार मला तस काही सांगायचं.
मी – “नाही”
ती – “कधी काढणार तू, मी रात्रीपासून वाट बघते, झोपली सुध्दा नाही”
मी – “ठीक आहे , कोणता सिनेमा आणि किती तिकिटे काढू”
ती – “तुला आवडेल तो, आणि किती म्हणजे काय आपली दोघांची”
अच्छा तिला सिनेमा बघायचा असेल म्हणून अस बोलते. मी विचार करायला लागलो, माझं काही बोलण झालं नाही मानसी बरोबर मग कसं काय ही तिकीट काढायला सांगते.
मी – “मानसी च तिकीट”
ती – “तीच का आपलं दोघांचं ठरलं आहे ना, ती जर आली तर तू मला माझं गिफ्ट कसं काय देणार”
मी – “कोणत गिफ्ट”
ती – “इशश .. तू पण ना असं गम्मत नको करत जाऊ बर, लवकर तिकीट काढून मला फोन कर”
आणि तिने फोन ठेवला.
त्या दिवशी मी काही तिला फोन केला नाही आणि नंतर मी तिला बाहेर भेटणं टाळायला लागलो होतो. त्या दरम्यान माझ्यात आणि मानसी मध्ये वाढलेली दरी मी कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. प्रयत्नच ते कितीही केले तरी, कारण माझ्यात आणि माया मध्ये वाढलेली जवळीक मानसी ला दिसत नव्हती असं ही काही नाही. कदाचित त्याचं कारणामुळे मानसी चा राग माझ्यावर वाढत चालला होता. पण हे सर्व घडत आहे ते तिला समजत नाही या भावनेने आमच्यात वावरत होती. डोळ्यातला राग ओठांवर यायला किती दिवस लागणार, शेवटी माया ची जवळीक पाहून मानसी चा राग अनावर झाला. रागाचा ज्वालामुखी माझ्यावर फुटला, कॉलेज ला तास संपल्यावर ती जागेवरच बसून राहिली होती. मी पण निघणार तोच तिने मला आवाज देऊन थांबायला सांगितले. मला माहिती होत, तिचा राग खूप जास्त आहे, म्हणून तिने जे सांगितले ते मी गुपचूप ऐकुन घेतले. सर्व जण एक एक करून बाहेर गेले आणि शेवटी वर्गात मी आणि मानसी दोघं होतो.
मी माझ्या जागेवरून उठलो आणि तिच्या कडे गेलो, तिने बेंच वर बाजूला सरकून मला जागा करून दिली. मी बसलो तिच्या बाजूला, आजही तिच्या केसांचा सुगंध मला ती भेटलेल्या पहिल्या दिवसाची आठवण करून देतो. तिने माझ्याकडे रागात पाहिले, मी जागेवरून उठणार तितक्यात तिने माझा हाथ पकडून पुन्हा बसवले.
मी – “काय झालं इतकी रागात का बघते”
ती – “इतका भोळा का बनतो आहे तू”
मी – “मी काय केलं, तूच मला थांबायला सांगितले आणि बसलो आहे तुझं ऐकुन”
तिने रागात थोडे डोके चोळले आणि समोर आलेले केस पुन्हा कानामागे टाकत माझ्या कडे पाहून बोलायला लागली.
ती – “तू मला काय समजतो आहे, तुझं हे जे काही सुरू आहे ते मला समजत नाही असं तुला वाटतं आहे का ?”
मी – “काय म्हणायचं आहे तुला”
ती – “माया च आणि तुझं”
मी – “माझे तसे काहीच नाही , तीच खूप चीपकते मला”
ती – “हो ना तू magnet आहे आणि ती लोखंड”
मी – “मी तर तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो”
ती – “ती तुला आवडते”
मी – “नाही”
ती – “मी तुला आवडते”
मी – “हो”
ती – “हे तिला माहिती आहे”
मी – “तिला का सांगायचं पण ते”
ती – “तिला सांगायला पाहिजे की मी तुला आवडते, तिला वाटत असेल की मला तू आवडतो पण तुला मी नाही कारण मी एक मैत्रीण म्हणून त्या दिवशी तुला प्रपोज केला ती पूर्ण गोष्ट तिला सांगितली, तिचा गैरसमज झाला असावा की तू मोकळा आहे , मानसी आणि श्रेयस च काहीच होणार नाही पुढे, म्हणजे माझा मार्ग मोकळा, तिचा तो गैरसमज दूर करायला हवा ”
तिचा राग तिने बोललेल्या प्रत्येक शब्दातून बाहेर पडत होता. तिचा चेहरा लाल झाला होता. तिला बोलतांना दम लागत होता, मी तिला शांत केले आणि पाण्याची बॉटल दिली. ती पाणी पित म्हणाली, “मला तुझ्यावर विश्वास आहे, पण तरी सुध्दा तिचा गैरसमज दूर होण्यासाठी तिला आपण इथे बोलावून घेऊ”
मी – “आणि शांततेत चर्चा करू”
ती – “हो, नको काळजी करू तिची , मारणार नाही मी तिला”
असं म्हणून तिनेच कॉल केला आणि तिला वर्ग क्रमांक सांगून बोलावले. कॉलेज चे शेवटचे दिवस असल्यामुळे सर्व परीक्षेच्या तयारीला लागले होते, कुणी वर्गाकडे फिरकत पण नसे, आमचा थोडा सिलॅबस बाकी होता म्हणून ज्यादा तास घेऊन तो ही आज संपवला. त्याच वर्गात आम्ही दोघेही मायाची वाट बघत बसलो होतो.
मी रात्री बरोबर झोपलो नाही म्हणून मानसी ला सोडल्यावर पुन्हा रूमवर येऊन झोपण्याचा प्रयत्न केला. थकवा आणि रात्रीचं जागरण यामुळे माझा डोळा कधी लागला मला समजलेच नाही. मी झोपेत असतानाच इशांत मोठ्याने ओरडत होता.
माझी झोपमोड झाली. मी ठिकाणावर आलो आणि बाहेर जाऊन पाहिले तर महाशय बाथरूम मध्ये होते.
मी विचारलं “काय रे काय झालं”
ईशांत “पाणी गेलं रे”
मी आत जाऊन मोटर सुरू केली आणि पाणी सुरू झालं. पुन्हा रूम मध्ये गेलो, बेड वर अंग झोकून दिले. आता निवांत झोपणार पण वेळ पाहण्यासाठी मी फोन पाहिला तर त्यात बॉस चे तीन मिस कॉल, मी पुन्हा कॉल केला. बॉस ने विचारलं कॉल का घेतला नाही ते मी पण बोललो त्यांना अंघोळीला गेलो होतो मधेच पाणी संपले.
बॉस ला ते कारण पटले सुध्दा पण बॉस ने जे सांगितले ते मला पटणारे अजिबात नव्हते. कारण त्यांनी मला एक काम दिले होते. माझी झोपमोड होणार होती. मी दिवसभर तेच काम करत बसलो.
झोप यायची तर चहा प्यायचा हाच एक उद्योग दिवसभर माझ्यासाठी, मी इतका चहा झोप घालवण्यासाठी प्यायलो ना तितक्या चहात ईशांत ने सकाळी अंघोळ केली असती. देवाच्या कृपेने माझं काम संपल, मी ते बॉसला मेल करून पुन्हा एकदा बेडवर पडणार तोच माझ्या फोन ची रिंग वाजली.
पाहिले तर मानसी कॉल करत होती. कॉल घेऊन मी बोललो “हॅलो , काय झालं, पोहचली का ??”
ती – “नाही, मी गेली नाही अजुन”
मी घड्याळात पाहिले तर रात्रीचे आठ वाजले होते.
मी – “अरे पण आठ वाजले आहेत आत्ता”
ती – “मी आणि दादा दिवसभर सृष्टी ची वाट पाहत होतो पण ती आलीच नाही. आत्ता तिचा कॉल आला की मी आज नाही येऊ शकत. आपण उद्या निघू असं म्हणून तिने फोन ठेवला.”
मी – “मग आता काय करणार तू”
ती – “तुझ्याकडे आज पण राहू शकते का ? आज सृष्टी नसणार मी एकटीच आहे. तुला चालेल ना”
मी – “तुला चालेल ना ? माझ्यावर विश्वास असेल तर सांग येतो घ्यायला”
ती हसत म्हणाली – “ये मग घ्यायला मला पुन्हा बस स्टँड ला”
मी गाडी काढली आणि तिला घेण्यासाठी बस स्टँड ला गेलो.

– क्रमशः