She__and__he ... - 10 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 10

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 10

भाग__१०

सकाळी राधा उठली....आजची सकाळ काही वेगळीच जाणवत होती तिला....उठून ती बालकनीमध्ये गेली....थंड गार वारा आज वेगळाच वाटत होता....राधा आज मनोमन खुश होती...त्याच कारण तिला कळत नव्हतं पण तीं आज खुश होती.....



राधा__ किती छान फॅमिली आहे ना रणजीतची...सगळे किती आनंदी असतात....त्यांच्या फॅमिली मध्ये फक्त थोडेवेळ राहिले पण तरी किती लागेच जोडली गेली मी त्याच्याशी....एवढे मोठे बिजिनेसमैंन असून राहनिमान अगदी साधा आहे त्यांचा...आणि बबडू तर खुप आवडली मला....😊किती गोड आहे तीं.... पण तो mr.Potato......नुसता भांडखोर आहे...बटाटा कुठला...😏त्याने जर माझ्याशी पंगा घेतला ना तर....चांगला धड़ा शिकवण मी त्यांला.....समजतो काय स्वतःला....😏


झाल राधा रणजीत बद्दल बोलायला लागली...😂किती राग आहे दोघांच्या मनात एकमेकांबद्दल....राधा विचार करत असते....तेवढ्यात मालती रूममध्ये येतात....



मालती__ राधू...उठलीस का....



राधा__ हो आई.....गुड़ मॉर्निग



मालती__ गुड़ मॉर्निग बाळा....चल आता आवर आणि ये नाश्ता करायला....बाबा तर ऑफिसला पण गेले...



राधा__ हो अच्छा आली....


राधा फ्रेश होते....मस्त नाश्ता करते...आणि पुन्हा तीच रूटीनमध्ये बिजी होते.....असेच दिवस जात असतात.....


********************************


राधा आज घरीच होती....शॉपिंग साठी जायच होत ना आज....म्हणून.....तेवढ्यात तिला कॉल येतो....☎️



राधा__ 📞Hello....



Dr..रागिनी__📞 हेय राधा ....सॉरी तुला त्रास देते आहे....पण एक काम करशील का????



राधा__📞 हो रागिनी Mam...बोला ना...



रागिनी__📞 अग...एका पेशंट ची केस तुला द्यायची आहे मला.....



राधा__📞 कोणाची????



रागिनी__📞 नियती निशांत मोरे ची.....खर तर त्याच्या आधी तू तिला चेक केल होतास....आणि नंतर मागच्या एकच महिना मी तीच चेकअप केल....पण अग मला आता अर्जनटली U.S ला जाव लागतय...फॅमिली ईशु मुळे...प्लीज तू तिच्या Delivery पर्यंत केस घेशील का....



राधा__ Mam .....मी....




रागिनी__ अग त्यांला काय झाल....आता मागे तू नाही का एक केस घेतली होतीस Delivery ची....बाळ आणि आई दोघे पण सुखरूप नव्हते का...राधा अग पहिल्यांदा करायच आहे अशी का रिएक्ट होतेस....



राधा__ ओके मी घेते त्यांची केस.....



रागिनी__ Thank u So much !!! मी नियतीला तस कलवते....



राधा__ हम्म्म्म.....
(राधा फोन ठेवते)



राधा__(मनात)......काय चाललय हे....माझ्या नशिबात सारख का येतायत ते....😕काय अजब खेळ आहे हा.... असो राधा सैड नको होऊ...ह्म्म्म


राधा काहीवेळ विचार करत बसते आणि सगळे मिळून जेवन करायला बसतात....तेवढ्यात राधाचा फोन वाजतो☎️



राधा__☎️ hello....वनिता सिस्टर काय झाल बोला....



वनिता सि__☎️ सॉरी डॉक्टर आज तुम्ही सुट्टी घेतले माहित आहे...पण नियती मोरे आलेत चेकअप ची डेट आहे आज त्यांची....सो तुम्ही येता का...



राधा__☎️ अरे हो....मी विसरले आ त्याना सांगा फक्त अर्धा तास थांबा....मी येते आहे....



वनिता__☎️ ओके....



राधा__ आई बाबा...मी हॉस्पिटलला निघते आहे....



मनोहर__ फुलपाखरा जेवून जा....



मालती__ आज सुट्टी घेतली होती ना....मग आपल्याला जायच आहे राधू माहित आहे ना....



राधा__ अग माझ्या अंडर एक केस आली आहे...अग ती मुलगी pregnant आहे ग....आणि आज तिचा चेकअप ची डेट आहे.....मला जाव लागणार आई....तुला तर माहित आहे ना आई... Pregnancy काय असते...आई अग तिला मेडिसिन द्यावा लागणार आहेत...तीच चेकअप बाकी आहे...प्लीज जाते ना ग...तस ही आई मी एक डॉक्टर आहे माझी नोकरी माझ्यासाठी पहिले येते....



मनोहर__ बरोबर बोलीस राधू...फुलपाखरा तू जा..मालू जाऊदे तिला



मालती__ बर जा पण लवकर ये....



राधा__ हो ऐका मला वेळ होइल थोड़ा सो तुम्ही माझ्यासाठी थांबु नका....तुम्ही जा...आणि मला माहित आहे मॉल कोणता आहे मी येइल तिकडे....ह्म्म्म चल बाय बाय



मालती__ बर....बाई नीट जा


राधा तिच्या खोलीत जाते....तोंडावर पाण्याचा मारा करते....आणि फ्रेश होते....कपाटातुन व्हाइट पिंक लॉन्ग स्कर्ट काढला.....त्यावर व्हाइट पिंक थोड़ा शार्ट असा टी शर्ट घातला....टिकली लावली...हातात घड्याळ घातला....केस ओपन ठेवली...तिचा कोट, बॅग घेतली आणि राधा तशीच पळत सूटली.....स्कुटी वरुन ती पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचली....आणि केबिनमध्ये आली....



राधा__ (धाप टाकत).....hiii.....सॉरी सॉरी..... Really sorry....मला लेट झाला....



नियती__ हाय डॉक्टर....आहो तुम्ही बसा आधी....कुल....


राधा पाणी पीते थोड़ शांत होते.....आणि मग नियतीच चेकअप करून घेते......



राधा__ नियती बाळ अगदी सुखरूप आणि मस्त आहे....काहीही प्रॉब्लम नाही....☺️ बर आता तुला ३ रा महीना चालू झाला ना....



नियती__ thanks Doctor....हो....



राधा__ ओके आता जास्त काळजी घे...बर आता काही त्रास होतोय का....



नियती__ हो...उल्टया होतात सारख्या....काही कळत नाही ओ....म्हणजे दुधाचा वास जरी आला तरी उलटी येते...



राधा__ हो घाबरु नका....नैचरल आहे...उलटी झाली तरी जेवन बंद कर नका...आता फक्त हा महीना मग उल्टया बंद होतील....ओके....मी गोळ्या देते आहे...त्या घे...



नियती__ ओके thanks डॉक्टर....



राधा__ बर तुझ्या घरी कोणी मोठी माणस असतील ना..म्हणजे तुझ्या सासुबाई किवा आई...



नियती__ नाही ना डॉक्टर...माझी आई मी लहान होते तेव्हाच आम्हाला सोडून गेली....आणि..माझ्या सासुबाई म्हणजे आमच्या माई त्या गावी आहेत...येणार आहेत...सो



राधा__ हम्म्म्म.....जास्त काळजी घे आणि त्यांना लवकर बोलव इकडे....



नियती__ तस माझे मिस्टर खुप काळजी करतात माझी...सगळ आता स्वतः करतात....मला त्रास होऊ देत नाहीत.....



राधा__ ह्म्म्म चांगली गोष्ट आहे☺️



तेवढ्यात निशांत येतो....आणि दार नॉक करतो...



निशांत__(नॉक करत)......आत येऊ का....?



राधा__ ह्म्म्म या....



निशांत__ झाल का चेकअप ??



नियती__ हो आहो...झाल....निघूया आता



निशांत__ हो....



राधा__ नियती काळजी घे.....नेक्स्ट चेकअप ला ये...काही जानवल तर मला कॉल कर....नंबर फाइलवर आहे हम्म्म्म☺️



नियती__ हो डॉक्टर...



राधा__ आणि अग राधा नाव आहे माझ...राधा बोल...आणि अग जास्त वय नाही माझ...अग बोलीस तरी चालेल....



नियती__ ओके😃 बाय राधा!!!



राधा__ बाय☺️



निशांत काहीच बोलात नाही....काऱण त्यांला कळत नव्हते की काय कराव....राधा इतकी जास्त चांगली आहे..हे त्यांला नव्याने समजत होत..इतर मुलींप्रमाणे तिने खुन्नस नाही दाखवली...तो नियतीला घेऊन जातो....राधाला जरा अस्वस्थ वाटत होत...पण तिकडे लक्श न देता...ती जरा एक फाइल चाळत बसते....आणि तिला वेळेच भान राहत नाही....



राधा तिच्या केबिनमध्ये बसून काम करत असते.....तेवढ्यात सिस्टर येतात....



वनिता सि.__ डॉक्टर....



राधा__ हा कम इन....
बोला वनिता सिस्टर काय झाल.....



वनिता__ तुम्हला भेटायला कोणीतरी आलय....😃😃



राधा__ ह्म्म्म पाठवा....

(आता कोन आल असणार याचा अंदाजा तुम्हला असेलच😃),


रणजीत__ में आय कम इन....Dr..रेडियो......



राधा__ (खाली बघून).....रेडियो......
(वरती बघून).....आ रणजीत तू.....



रुता__ राधू काकी......

तिच्यकडे पळत येते....आणि तिला मीठी मारते....



राधा__ (तिला उचलून घेऊन)......आरे मेरा बच्चा...इथे कसा आला तू....😘



रुता__ मला ना....जीत काका घेऊन आला....तुला वेळ झाला ना...आणि तू फोन पन नाही रिशिव केला...मग शगले मॉल ला गेले आणि आम्ही तुला घ्यायला आलो....



राधा__ सॉरी बबडू....
(त्याच्याकडे बघत).......सॉरी....फोन साइलेंट होता....



रणजीत__ ईट्स ओके.....निघूया....



राधा__ आ प्लीज घरी जाउन मग जाउया का...मला थोड़ फ्रेश वहायचा....



रणजीत__ ओके....

(रुता होती म्हणून दोघ भांडले नाही...नाहीतर भड़का उडाला अस्ताच😃🤣🤣)



ते घरी जायला निघतात....तर राधा रुताला घेऊन...मागे बसते....



रणजीत__ प्लीज तू पुढे येशील....



राधा__ का?????



रणजीत__ अग मी तुमचा ड्राइवर वाटतोय....



राधा__ हो का...तरीही मला नाही बसायचा तुझा बाजूला.....😏



रणजीत__ अग रेडिओ मी मांडीवर बसायला थोड़ी सांगतोय.....



राधा__ Potato...नीट बोल ह....तू...



रुता__ काकू....चल ना पुढे जाऊया



राधा__बर......ओके😘 तुला कस नकार देऊ मी....



रणजीत__ हममम मग मला द्यायला बरा जमतो ना....😏



राधा__ काय बोलास🙄



रणजीत__ कुठे काय....छे काही नाही बोलो...मी😅



राधा__ हम्म्म्म तोंड बंद कर माशि जाईल नाहीतर....


तस रणजीत तोंड बंद करतो....राधा रुताला घेऊन पुढच्या सिटवर बसते....काहीवेळाने राधाच घर येत....



रुता__ चला आता मी डोळे बंद करते तुम्ही एकमेकांना किशी दया....



राधा__🙄काय....



रणजीत__ बबडू....काय बोलतेस हे....



रुता__ अरे तुम्ही दोघा आता भांडले ना...मग मम्मा आणि पप्पा असच करतात भंडतात आणि नतर सॉरी बोलून किशी देतात😃



रणजीत__ (तिला उचलून घेत).....बबडू अस नाही बोलायच गप....😅.........(राधकड़े बघत)......हहहह काही ही बोलते ही😅किस आणि मी ते ही तुला.....



राधा__ बस आता किती हसशील😏
रुताला घेऊन ये आत....



रणजीत__ खड़ूस कुठली😏😏


राधा लॉक खोलून घरात जाते....रणजीतला पाणी देते आणि ती फ्रेश व्हायला जाते....रुता पण तिच्या मागे जाते....


रुता__ काकू ही तुझी लूम ए....



राधा__ हो...आणि लूम नाही रूम सोन्या....बर तू इथे बस ह्म्म्म मी फ्रेश होते....



रुता__ ओके काकू ......


राधा फ्रेश व्हायला रूममध्ये जाते....आणि बाहेर येते बघते तर काय रुता बाई गोड़ पध्दतीने झोपल्या होत्या....



राधा__ ओव...किती गोड आहे रुता....पिल्लू ते आमच😘


राधा केसांची वेणी घालते....चेंज करून ड्रेस घालते आणि रुताला उचलून खाली घेऊन येते...


रणजीत__ अरे बबडू झोपली....



राधा__ हो....



रणजीत__ आणि लवकर तयार झालीस.....मला वाटल मेकअप करण्यात वेळ जाईल....😅😂



राधा__ मी मेकअप फक्त वाटल तर करते...अस रोज नाही....समजल बटाटया....चल आता आणि हळू बोल पिल्लू उठेल....बावलट😏



रणजीत__ ओके कुल....लगेच कालिका माता का संचारते तुझ्यात....चल ....😏


दोघेही मॉलला जायला निघतात....रुता राधाच्या मांडीवर छान झोपते.....मग ते मॉल मध्ये पोहोचतात....आणि सगळ्यांना जाउन भेटतात....



रम्या__ अरे बबडू झोपली.....



राधा__ हो ताई....



राहुल__ राधा दे मी घेतो तिला......



राहुल तिला उचलतो तस रुता रडायला लागते...आणि राधा जवळ मीठी घट्ट करते.....



राधा__ (तिला थोपटुन).......शूशऊ....झोप ह झोप...काही नाही झाल....दादा राहुदया माझ्याकडे रुताला...मला काही अड़चन नाही....☺️



राहुल__ बर....



माधवी__ खर ह राधा लाघवी आहेस तू....म्हणून तर आमची रुता जी कोनाकडे जात नाही ति आता तुझ नाव काढल्याशिवाय राहत नाही.....



राधा__☺️



सदाशिव__ बर मंडळी चला आता....खरेदी करू....



मनोहर__ हो चला.....



राहुल__ सदाशिव काका....बाबा आई....मी काय म्हणतो....मी,रम्या,रेवा,राधा आणि रणजीत.....आमची सगळी खरेदी करतो न...आमच्या आवडीने....तशी लिस्ट तर आहेच न आमच्यकडे....तुम्ही त्या सेक्शन ला करा तुमची खरेदी....काय.....



महेश__ हो बरोबर आहे पोरांच....तुम्हला काय वाटत



मनोहर__ हो जाउद्य त्यात काय.....
राधू जा बाळा ह्म्म्म....मस्त खरेदी करा झाल की मग फोन करा....एकत्र जमा वह



राधा__ हो बाबा.....चालेल....



राहुल__ ओके....चल जीतूडी....चल😀



रणजीत__ (मनात).........काय भाई🙄किधर फसा दिया....husshhhh चला रणजीतराव तुमच्या लग्नाची शॉपिंग करूया.....


सगळे वरच्या फ्लोरवर जातात....तिकडे बेबी सेक्शन मध्ये रुताला झोपवतात....आणि शॉपिंग करतात....राहुल रम्या मस्त शॉपिंगमध्ये गुंततात....पण रणजीत आणि राधा भूत बघितल्या सारखे बसलेले असतात....



रम्या__ जीत....अरे अस का बसला आहेस....राधासाठी काय तरी साड़ी खरेदी कर....



रणजीत__ आ हो वहिनी.....



राधा__ (मनात)..... ह्म्म्म आता या बटाटयाची चॉइस पन बघावी लागेल....काय माहित कशी असेल यची चॉइस.....


रणजीत आणि राधा लिस्ट नुसार सगळी खरेदी करतात...जी साड़ी राधाला आवडत होती तीच रणजीतला ही आवडत होती....दोघांची चॉइस अगदी सेम निघाली.....



राहुल__ वा! दोघांची चॉइस सेम आहे....ह



रम्या__ हो ना....माझी आणि राहुलची चॉइस अजिबात जुलत नाही....आता बग ना तुमची सगळी खरेदी झाली....तरी आमची चालूच आहे....😂



राहुल__ हो का आता कर शॉपिंग पटकन....रुता उठेल ग तिकडे.....



राधा__ मी काय म्हणते दादा....तस ही माझी आणि रणजीतची खरेदी लिस्टनुसार झालेच....मग मी जाउन बबडूला बघून येऊ का....म्हणजे उठली असेल तर....



रम्या__ हो...राधा thanks...ह



राधा__ thanks काय....आले मी



राहुल__ जीतू जा तू पण....



रणजीत__ आ ह....हो...


राधा आणि रणजीत रुताला अनायला जातात.....तस आत जाताच रुता पळत येऊन राधाला बिलगते....



रुता__ (रडत)......आआ कुते गेली होतीस मला सोडून....आआ



राधा__ अग माझ पिल्लू....सॉरी....माझा बच्चा झोपला होता ना....म्हणून आम्ही तुला इकडे झोपवल बेटू....



रुता__ नको पलत सोलुं इथे.....



राधा__ ओग....रडू नको सोन्या....नाही जाणार ह....शूशऊ....शांत हो.....



रणजीत__ चल निघूया राधा....



राधा__ ह्म्म्म


(तेवढ्यात...राधाचा फोन वाजतो......☎️)



राधा__ अरे...यार....बबडू जरा जीत काकाकड़े जा...



रणजीत__ बबडू ये…



रुता__ नाही नाही.....



राधा__ बर बर ठीके....रडू नको....
आ फोन कस काढू....


राधा फोन काढ़ायचा खुप प्रयन्त करत होती....मग शेवटी रणनीत मदत करायला गेला....



रणजीत__ आआ रेडिओ तुझी हरकत नसेल तर...मी....



राधा__ हो प्लीज बटाटया....


रणजीत राधाजवळ जातो....आणि तिच्या पर्स मधून फोन काढत असतो.....रणजीत राधजवळ जाताच त्याच हृदय जोरात धड़धड़ करू लागत...त्यालाच कळत नाही....अस का होतय....



राधा__ ए...Mr.Potato...दे ना लवकर फोन....कॉल कट पण होइल....



रणजीत__ (भानावर येत).......आआ हो...
(फोन काढत)



राधा__ कोणाचा आहे....?



रणजीत__ (फोन मध्ये बघून).......आ सम्या काका...
परत आला फोन....



राधा__ उचल लवकर आणि माझ्या कानाला लाव....अरे ये ढोल्या लाव ना.....😡 कसली वाट बघतो....कट व्हायच्य....



रणजीत फोन राधाच्या कानाला लावतो...आणि राधा सगळ्यांशी गप्पा मारते.....



राधा__📞 Hello.....सम्या काका.....



समीर__📞 बोल बाळा कशी आहेस....



राधा__📞 मी मस्त...पन तुझा राग अलाय...तू आला का नाहीस....अरे उद्या तरी या आता....परवा साखरपुडा आहे माझा....आणि आता राहयच आहे तुम्ही लग्न झाल की..जा..



समीर__ 📞हो बाळा....बर तुझ्या काकू ला बोलायच आहे....थांब



शालिनी__ 📞 राधुडे कशी आहेस ग....आणि सॉरी आम्ही आता तिकडे नाही आहोत....काय करणार ग तू समंजू शकतेस....



राधा__ 📞हो काकू....मी आणि साखरपेकर फॅमिली शॉपिंगला आलोय...बाबा आणि आई तुमच्यासाठी पण खरेदी करतायत....😀पन प्लीज लवकर या आता....



शालिनी__ 📞हो ग बाळा येतोय आम्ही....बर थांब...वैदु बोलणार आहे....



वैदेही__📞 हाय तायु.....कशी आहेस....रियली मिस यू...डार्लिंग....उम्म्मआ...😚



राधा__📞 मिस यू टू...बेटा...उमम्मा😚



रणजीत__(मनात).....फोन वर अस पण बोलतात हे मला आताच समजतय....🙄😂😅बापरे...जर मी अस विन्याशी बोलो तर....😵एव्व नको....फील करूनच कस तरी वाटत😅😂😂😂😂ही सगळी पोरिंची नाटकी आणि काय...



वैदेही__📞 चल तायु...खुप बोलायच आहे लवकर भेटु...बाय♥️



राधा__📞 बाय बाळा....



रणजीत फोन कट करतो.....आणि फोन ठेवून देतो.....😅त्यांला हसू येत होत....त्यांला हसताना बघून राधा पेटली.....😂



राधा__ काय झाल हसायला.....🙄😡 माझ्या प्रत्येक गोष्टीवर हसन गरजेचे आहे का....🙄😡



रणजीत__ (हसत).......अग....ते.....मी...😂😂



राधा__ तू ना....कधी नाही सुधरणार....😏😏



रणजीत__ अग😂😂😂



राधा__ आई......😩😩



रणजीत__ बाबा.....😩😂😂🤣



राधा तशीच तिकडूंन निघुन जाते....आणि रणजीत हसतच राहतो.....😂😂




क्रमशः



©प्रतिक्षा__♥️🥀