She __ and __ he ... - 1 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 1

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 1

भाग__१


आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर भारी श्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा मित्र आहे....


राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती....

सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या बांगड्या घातल्या...ओठांवर लाइट पिंक लिपस्टिक लावली..त्यामुळे तिच्या ओठां वर असलेला तीळ भारी चमकत होता...


डार्क ब्राउन डोळ्यात कालजलाची बारीक रेख ओढली...डायमंडची टिकली लावली आणि झाली राधा तयार....राधा तिच्या खोलीत असलेल्या कृष्णाच्या मूर्तीजवळ गेली आणि हात जोडून प्रार्थना करु लागली.....🙏


राधा__(हात जोडून)....गुड़ मॉर्निग कान्हा...☺️तुला तर महितच असणार आज माझा वाढदिवस आहे...आणि मला माहित आहे सगळ्यांच्या आधी तू मला विश केलास..खुप आशीर्वाद दिलेस..Thank uu कान्हा...आज माझा मुड़ भारी आहे...कॉलेजमध्ये भारी मज़्ज़ा येणार आहे आज...चल कान्हा मी निघते सॉरी हं जरा घाई करते ना मी पण सगळे वाट पाहत असणार माझी म्हणून...आणि तुला माहित आहे ना..तुझ्याशी गप्पा मारूनच मी निघते...आपण मी आले की बोलुया...बाय कान्हा....


राधा खाली जाते...तर मनोहर,मालती तिची वाट पाहत होते...आणि राधाची लहनपनापसुन ते आता कॉलेज पर्यंत असलेली बेस्टेस्ट बेस्ट फ्रेंड जागृती..म्हणजे जीरु आली होती....


राधा__ गुड़ मॉर्निग Everyone....

मनोहर__ अरे वा!! आल माझ फुलपाखरू...Wish u many many Happy Returns of the Day Radhu♥️😚तुला श्रीकृष्ण उदंड आयुष्य देवो....(मीठी मारून)

राधा__ Thank uu Baba...नमस्कार करते....(पाया पड़त)

मनोहर__ सुखी राहा माझ्या फुलपाखरा...☺️

मालती__ Happy Birthday Radhu...♥️😚

राधा__ Thank uuu Aaaiii😚.....
नमस्कार करते....

मालती__ माझी गुणाची लेक😚

राधा__ एएए जीरु.......(मीठी मारून)

जागृती__Happy Birthday Radhudi...😚♥️

राधा__ thank u Baccha😚

जागृती__बर चला निघूया कॉलेजला...

राधा__ हो चल....आई बाबा येते मी...रात्री जरासा वेळ होइल यायला...तुम्ही जेवून गया ओके...

मनोहर__ ओके पण जास्त उशीर नाही ह चालणार

राधा__ हो बाबा...येते

मालती__बाय!!!


राधा आणि जागृती कॉलेजला पोहोचतात....२ लेक्चर नंतर राधाचा ग्रुप मिळून बन्सला जातात...तिचा बड़े साजरा करतात...गिफ्ट्स देतात...राधा ही त्यांना मस्त पार्टी देते...सगळे मग गार्डन मध्ये जातात आणि बस्तात...

राधा__ जीरु कुठे गेलाय ग तो...? कधी येईल..

जागृती__ येईल ग....

पल्लवी__येईल ग तो राधा वेट् कर जरा😂किती घाई

विक्रम__जरा दूर राहवत नाही हिला 😂

सनम__ हो ना😂😂

सगळे हसत असतात..की तेवढ्यात राधचे डोळे मागून येऊन तो झाकतो....

राधा__माहित आहे मला तूच आहेस...(डोळ्यावरील हात काढत)

सनम__काय रे निशांत किती वेळ...


हा निशांत मोरे...राधाच्या वर्गात शिकनारा...राधा आणि निशांत ५ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत...


निशांत__सॉरी यारो..राधासाठी जरा प्लान करत होतो...

राधा__कसला प्लान???

पल्लवी__बर आम्ही निघतो आता...तुम्ही एन्जॉय करा आता....

सनम__हो...चला रे...


आणि त्यांचा सगला ग्रुप निघुन जातो...निशांत राधाला घेऊन एका जागी येतो...छान जागा असते ती...राधा आत जाताच तिच्या अंगावर फूल पडतात...निशांत हळूच तिला उचलतो आणि एका खुर्चीवर बसावतो...आजुबाजुला सगळी सजावट केलेली होती....जमिनिवर फुगे पाडले होते.....मग त्यांनी केक कट केला आणि सगळी कड़े गाण वाजु लागले...


निशांतने राधाचा हात हातात घेतला..आणि डांस करायला घेऊन आला....दोघेही त्यांच्या डोळ्यांत हरवून डांस करु लागले....


दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम
तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम
हा सीखा मैने जीना जीना कैसे जीना
हा सीखा जीना तेरे बिना हमदम....
🎶🎵🎶🎵🎶🎵🎶


राधा__ निशु Thank uuu so much😚माझ्यासाठी तू इतक केलास....

निशांत__ आभार काय मानतेस राधू...इतका तर करू शकतो मी....😚

राधा__I Loveeee You Nishu.....😚♥️

निशांत__ Love You too Radhu...😚♥️
बर ऐक ना इकडे वरती रूममध्ये जा आणि हा ड्रेस ट्राय कर ना....(गिफ्ट हातात देत)

राधा__ हे काय आता?

निशांत__ माझ्याकडून अजुन एक गिफ्ट....प्लीज आता जा आणि दाखव मला घालून

राधा__बर आले...


राधा चेंज करुन बाहेर येते....पिंक कलरची नेटची छान अशी साड़ी निशांतने तिला दिली होती...त्या पिंक कलरमध्ये तीच रूप खुलून दिसत होत...निशांत स्वतःला हरवून बसला....


निशांत__ किती सुंदर दिसते आहेस तू..यार तुला कल्पना सुद्धा नाही...😍😍

राधा__(लाजुन)....गप बस😳

निशांत__हाय!!!😍

निशांत हळूच राधाच्या कमरे मध्ये हात टाकतो...तिला जवळ ओढतो...त्याच्या स्पर्शाने ती शहारते...निशांत हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो....आणि बराचवेळ त्यांचा ओठांशी खेळ चालू होता...निशांतचे ओठ आता तिच्या मानेवर फिरू लागतात...तो तिला बेडवर झोपवतो...साड़ीचा पदर बाजूला सारतो...वेड्यासारखा तिच्या मानेवर किस करू लागतो...ओठांवर किस करू लागतो....तेवढ्यात राधाचा फोन वाजतो....


राधा__निशु थांब आई फोन करते...

निशांत__ओके..फ़ाईन...

राधा__📞 हा आई...बोल

मालती__📞 राधू कुठे आहेस...खुप वेळ झालाय....तू आता काही सांगू नकोस...अर्ध्या तसात घरी ये....

राधा__📞ओके

निशांत__काय झाल ग...

राधा__जाव लागेल..आणि अरे वेळ पण बराच झालाय...

निशांत__अरे यार...बर ठीके....☺️चलो...


राधा चेंज करते...आणि निशांत तिला घरापर्यंत ड्रॉप करतो....त्याचा निरोप घेऊन ती घरात जाते...जेवण करून मग तिच्या खोलीत जाते...

राधाच्या नजरेसमोर आजचे क्षण येतात...त्यामुळे ती लाजुन चूर चूर होते....निशांतच्या विचारात ती छान झोपी जाते.....


क्रमशः


©प्रतिक्षा__🥀