Polyavar coronachi marbat in Marathi Magazine by Ankush Shingade books and stories PDF | पोळ्यावर कोरोनाची मारबत

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

पोळ्यावर कोरोनाची मारबत

19. पोळ्यावर कोरोनाची मारबत

सध्या देशात तसेच जगात कोरोनाचा संसर्ग चरणसीमेवर आहे. त्या अनुषंगाने लोकांनी गर्दी करु नये व कोरोना पसरु नये म्हणून सरकार नवनवे नियम लावत आहे. त्यातच ज्या भारतीय सणाला लोकांची गर्दी जमते. ते सण साजरे करण्यासाठी देशाने काही नियम बनवले आहे. याच नियमाच्या अनुषंगाने कोरोनाच्या चक्रव्युहात बैलाचा पोळाही फसला आहे. हे कोरोनाचे चक्रव्युह केव्हा भेदता येईल हे सांगणे कठीण आहे.

पोळा...... बैलाचा सण. विदर्भात हा सण मोठ्या उत्साहानं साजरा होतो. लोकं जी बैलजोडी शेतीकामाला शेतक-यांना वर्षभर मदत करते. त्या बैलाच्या उपकाराची आठवण म्हणून दरवर्षी विदर्भातील शेतकरी श्रावण महिण्याच्या शेवटच्या दिवशी तो दिवस बैलपोळा म्हणून साजरा करतात. नव्हे तर हा बैलपोळा साजरा करुन त्याचा उत्सव मनवितांना त्या बैलाला सजवून (चौरा मटाट्या, बाशिंग बांधून) गावच्या एका चौरस्त्यावर नेतात. इथून बैलाची मिळवणूक काढतात मग या बैलांना घरोघरी फिरवून पुरणपोळीचं नैवैद्य खावू घालतात. त्याचबरोबर काही ठिकाणी मोहफुलांची राबही. विदर्भात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. मग हा सण पाहण्यासाठीही लोकांची प्रचंड गर्दी होते.

या पोळ्याच्या पहिल्या दिवशी पळसाच्या झाडाची कत्तल करुन त्याच्या फांद्या लोकं आपआपल्या घराच्या दरवाज्यावर लावतात. नव्हे तर यात शेकडो झाडांची कत्तल होते. पर्यावरण समतोल ढासळतो. एवढंच नाहीतर या पोळ्याच्या दुस-या दिवशी कित्येक कोंबड्या बक-याची कत्तल होते. आपले जीभेचे चोचले पुरविण्यासाठी. बिचा-या निरपराध कोंबड्या बक-यांना ठार केलं जातं. ते पाहिलं की पोळा हा आनंदाचा सण आहे की दुःखाचा असा प्रश्न काही लोकांना नक्कीच पडत आहे.

या वर्षी कोरोनाचं संकट जरी असलं तरी या वर्षी झाडांची कत्तल होणार नाही असे नाही. लोकं त्या पळसाच्या डहाळ्या घराच्या समोर लावण्यासाठी झाडं तोडतीलच. तसेच दुस-या दिवशीही निरपराध कोंबड्या बक-यांचा जीव घेवून आपल्या जीभेचे चोचले पुरवतीलच. ही शक्यता नाकारता येत नाही.

पोळ्याचा जेव्हा दुसरा दिवस निघतो. ज्या दिवशी मारबत निघते. त्याचबरोबर बडगाही. बडगा माणसाचं प्रतिक तर मारबत बाईचं प्रतिक. ज्यांनी वाईट कामं केलीत, त्यांचा निषेध म्हणून ही मारबत व बडग्याची मिळवणूक काढण्याची प्रथा आहे. ही प्रथा ब-याच दिवसापासून विदर्भात सुरु असून नागपूरमधील पिवळी मारबत अधिक प्रसिद्ध आहे.

सध्या देशात तसेच जगात कोरोना थैमान घालत असतांना पोळ्यावरही कोरोनामुळं संक्रांत आली असून वरील बाबी ख-या असल्या तरी पोळा हा सण कसा साजरा करावा हा एक न उलगडणारा प्रश्न आहे. तो प्रश्न प्रत्येक जनमाणसाला पडलेला आहे. त्यातच त्या बैलाचा काय दोष? असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरु नये.

पोळा आम्ही साजरा करीत असतांना आमच्या भागातील शेतकरी या बैलाला पोळ्यात तर नेतात. त्या दिवशी मारत नाहीत पोळ्यात नेईपर्यंत बैलाला. पण जेव्हा पोळा फुटतो. अर्थात तोरण तुटतं. तेव्हा मात्र त्या बैलाच्या मालकांच्या अंगात शैतान संचारतो व तो मालक 'मला भेटते की माझ्या कुत्र्याला मिळते' या वृत्तीनं त्या बैलाला मारत मारत वा परानी टोचून आपल्या घरी आणतो व रात्री पर्यंत पैसे गोळा करण्यासाठी बैलाला लोकांच्या घरी फिरवतो. परंतू यात हे समजत नाही की हा सण बैलासाठी ना. मग त्याला घरी नेण्यासाठी या दिवशी तरी पराणी टोचण्यासारखा उपक्रम का? पण लवकर जर बैलाला घरी नेलं नाही, तर त्या बैलांना घरोघरी फिरवून पैसे कुठून मिळणार? पण यावर्षी कोरोनानं याची दखल घेतली आहे. त्यानं असं ठरवलं आहे की लोकांनी पोळाच भरवू नये. गर्दी तर सोडा. आपल्याला ही कोरोना मारबत जरी वाटत असला तरी बैलाच्या दृष्टीकोनातून बैलांसाठी बरोबर वाटत आहे. कारण कोणी असा पैसा गोळा करण्यासाठी मारणार तर नाही. तसेच दरवर्षी पोळ्यात सजून जाण्याची काही बैलाची इच्छा असते. काहींची नक्कीच नसते. पण माणूस त्यांना गुलाम समजत त्यांना जबरदस्तीनं पोळ्यात नेतो. तेच कोरोनानं यावर्षी टाळलं आहे. याचबरोबर दुस-या दिवशी येणारा तान्हापोळाही या वर्षी भरणार नाही असे संकेत आहेत.

पोळा हा बैलाचा सण असला...... पोळ्याला लहान मुलांना नंदीबैल फिरवितांना मजा वाटत जरी असली....... लोकांना बडग्या व मारबतची मजा येत जरी असली तरी या पोळ्यावर कोरोनानाच्या मारबतीनं कहर केला आहे. लोकं गर्दी करणार नाही. पण 'जागे कोरोना मारबत' म्हणत प्रत्येक घराघरातून नक्कीच सुर गुंजतील. तसेच कोरोनाचे प्रतिकात्मक पुतळे बनवून ते पुतळे प्रत्येक माणूस जाळल्याशिवाय राहणार नाही. मग कोरोनाच काय?कोरोनाच्या पिल्लावळींनाही नाईलाजानं देशातून जावं लागेल ही देखील शक्यता नाकारता येत नाही.

लोकांनी बैलाला अवश्य सजवावं. पोळाही साजरा करावा. पण स्वतःची सुरक्षा अवश्य करावी. घरीच पोळा साजरा करावा व आपल्या बैलाला स्वतंत्र्यता देवून त्याचे उपकार मानावे. मात्र कोरोनाला जागे मारबत म्हणत देशातून तसेच जगातून अवश्य हाकलावे. घरीच राहावे. सुरक्षीत राहावे.