She__and__he ... - 2 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 2

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 2

भाग__२

सकाळी राधा तयार होऊन खाली येते....आणि सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसते....

राधा__ गुड़ मोर्निंग....


मनोहर__ गुड़ मॉर्निग माझ्या फुलपाखरा...


मालती__ ये राधू बस..नाश्ता कर..


मनोहर__ बर राधू...जरा बोलायच होत तुझ्याशी


राधा__ हा बाबा बोला ना....


मनोहर__ राधू बग हे तुझ लास्ट वर्ष आता १ महिन्यात संपेल..नाही का..?


राधा__ हो..पण का बाबा काय झाल..???


मनोहर__ बाळा म्हणजे नंतर तू जॉबला लागशील...तुझ लग्नही होइल...मग...


राधा__(संशायाने बघत)....मग काय???


मालती__ अहो स्पष्ट बोला ना...बर मीच बोलते...
राधु तुला एक स्थळ सांगून आल आहे...मुलगा तुझ्या समीर काकांच्या ओळखीतला आहे...समीर भाऊचा नातलग आहे...चांगल स्थळ आहे..आम्ही सुद्धा ओळखतो मुलाला...पाहिले होते आम्ही नुतनच्या लग्नात...बोलो ही होतो...


राधा__(मनात)...सम्या काका...बस तू एकबार मुझे मिल जा....फिर देख...


मालती__राधा मी काय बोलते...


राधा__ आ हो हो...पण आई बाबा मला नही करायच इतक्यात लग्न....


मनोहर__अग पण इतक्यात नाहीच करायचा लग्न...फुलपाखरा अग तुझ लास्ट ईयर संपल..रिजल्ट लागल सगळ सुरळीत झाल...की मग


मालती__ हो आणि तुला ते काय ते...कंपोस मधुन जॉब कन्फर्म झालाय ना..


राधा__कंपोस🤔🙄 अग आई कंपोस नाही...कैम्पस आणि ते...इन्टरविव घेतात आधीच...


मालती__हो ग तेच ते....मग तुझ मागे ते interview झाल ना त्यात तुझ जॉब पण फाइनल झाल न...मग हरकत काय आहे...


मनोहर__हो राधू तुझ लास्ट वर्ष संपल आणि रिजल्ट लागल की झाल...जॉब तर तुला फाइनल झाले ना...


राधा__ बाबा पण इतक्यात...


मालती__राधू..अग माझ लग्न झाल तेव्हा मी १५ वर्षांची होते...तू तर जास्त आहेस त्या मानाने...


मनोहर__हो बाळा अग...तू आमची एकुलती एक आहेस...तुझ चांगल वहाव असच वाटनार मला...


राधा__हम्म नंतर बघू...मी आता निघते...


मनोहर__बर...बोलू नंतर...पण फुलपाखरा..विषय बंद नाही ह झालाय...लक्षात ठेव...


राधा__ह्म्म्म..बाय..येते


मालती__हा नीट जा!!

राधाच्या मनात आता गुंता वाढला...आई बाबानी हा प्रश्न समोर मांडून सगळेच प्रश्न वाढवले...ती विचार करतच कॉलेज मध्ये पोहोचली...लेक्चरमध्ये ही तीच लक्ष नव्हतं लागत...हे निशांतने घेरल...लेक्चर नंतर राधा त्यांच्या कॉलेज बागेत बसली होती....

निशांत__ हेय स्वीटहार्ट...!!(मागून येत)


राधा__अरे निशु तू कधी आलास...बस ना....


निशांत__राधुडे काय झालय...तू लेक्चरमध्ये सुद्धा हरवल्या सारखी होतीस...??


राधा__काही खास नाही...


निशांत__पिल्ल्या सांग आता काय झालय....


राधा__(रडत)....निशु आज बाबानी लग्नाचा टॉपिक काढला....माझ्यासाठी चांगल स्थळ आलय तर......


निशांत__ओह...अरे पिल्ल्या रडू नकोस ना तू...अजुन आहे वेळ...नंतर मी येईल तुझ्या घरी आई बाबाशी बोलायला....ह्म्म्म


राधा__(रडन आवरत)....हम्म...


निशांत__गुड़ गल.....(तिला मिठित घेत)


राधा__निशु मी तुझशिवाय नाही राहु शकत रे...


निशांत__मी पण ग...राधू...तू शांत हो अता....नको रडू...आणि आता एक्साम आहेत सो तिकडे लक्ष दे...


राधा__हम्म्म्म....बर चल मी निघते...


निशांत__हो..बर मी सोडू का..


राधा__नको जाते मी..चल बाय..निशु(मीठी मारून)


निशांत__बाय पिल्ल्या....!!

राधा घरी जाते....फ्रेश होते...आणि सगळे विचार झाडून ती स्टडी करायला लागली...बघता बघता राधाचे सगळे पेपर मस्त गेले...पण या परिक्षेच्या दरम्यान निशांत आणि राधा जास्त भेटू नाही शकले....शेवटचा पेपर झाला आणि राधा तिच्या सगळ्या ग्रूपला कैंटीनमध्ये भेटली....

राधा__ ऐ सनम रे....निशु नाही अला का???


सनम__नाही राधुडे...


राधा__का????


विक्रम__अग त्यांला घरून अर्जण्ट कॉल आला मग तो गेला...थांबला होता...पण तू येत नव्हतीस तर गेला तो...


राधा__अस अचानक...


जागृती__राधुडे अग तो महंत होता तुला मेसेज करतो...बग केला असेल


राधा__हो....

राधा फोन चेक करते तर निशांतचे १ अर्ध्या तासा आधी २ कॉल आलेले होते..आणि मेसेज पण होता....(ती मेसेज वाचते)

MY Dear, Pillya...♥️
सॉरी अस अचानक तुला भेटता जातोय...पण मला आण्णाणंचा कॉल आला होता..आणि माईची तब्बेत जरा बिघड़ले...म्हणून मला तातडीने निघाव लागल....तुझी वाट पाहत होतो ग...पण तू जरा लेट येणार होतीस वाटत...तर मी आता निघालोय कोल्हापुरला.....जाउन जरा अण्णा माईला भेटून येतो...

नुपुर सुद्धा खुप आठवण काढ़ते ग...बर आता तू नाराज नको होऊ....नीट रहा...काळजी घे..आपल्याला कदाचित जास्त नाही जमनार बोलायला...कारण कोल्हापुरला नेटवर्क ईशु खुप होतात...सो तू कॉल नको करू मीच तुला करेंन..जर केव्हा बोलन नाही झाल तर प्लीज रागवु नको ह पिल्लू..समजून घे....मी इकड़च आटोपल की येतो लगेच...मिस यू..खुप पिल्ल्या....And I love You Sooooooo Much Pillya♥️😚काळजी घे...ओके...बाय....♥️

मेसेज वाचून राधाला जरा वाइट ही वाटल पण तिने समजून घेतला....मग मित्रांसोबत बसून ती काहीवेळाने घरी गेली....

मालती__अलीस बाळा....बस हे घे पानी...(पाणी देत)


राधा__thanks आई....


मनोहर__झाले पेपर...कसे गेले???


राधा__उत्तम😀


मालती__ बर झाल चला....


मनोहर__हो...आता रिजल्ट केव्हा...


राधा__५ महिन्या नंतर.....Group वर डेट सांगतिल...


मनोहर__ठीके आता आराम कर जा....


राधा__हो....

राधा तिच्या खोलीत जाते...तिला निखिलची खुप आठवण येत होती....पण काय करणार...नाइलाज होता....असच ती त्याच्या आठवणीत बुडालेली असायची...तो कॉल केव्हा तरी करायचा...आणि 2 मिनिट बोलायचा...तिला राग येत होता पण ती शांत राहायची....
**********************************

महिन्या नंतर....

आज मॅडमचा रिजल्ट होता....राधाला भारी टेंशन आल...जागृती आणि राधा नेहमी सारख्या एकत्र रिजल्ट बघायला भेटल्या....एकदाचा रिज़ल्ट लागला आणि राधा जोरात किंचाळली....

राधा__आआआआ जीरु.....मी पास झाले...😀


जागृती__हो राधुडे....मी पण झाले आता आणि तू पन😀😚


राधा__ये ये....नाचो.....(नाचत)😀😂


मालती__अग हो हो पोरीनो लागल का रिजल्ट काय झाल...???


राधा_ आई मी पास झाले....९१% पडले....A ग्रेड😀...ऐ नाचो ता ताड़ ता ताड़....धनक धनक ये...


मालती__काय बर झाल बाई...मी यांना फोन करून सांगते....नाव काढलस हो राधे...बर जीरु तुला ग किती...?


जागृती__काकू मला....८८%....A ग्रेड...


मालती__वा वा!! छान दोन्ही पोरिनी नाव काढल हो....मी आलेच


जीरु__बर राधू मी घरी सांगते ओके....बाय...


राधू__हो....

राधा तशी तिच्या खोलीत जाते...आणि तिच्या कान्हाला सगळ सांगते...


राधा__ये कान्हा मी खुप खुश आहे....अरे का काय विचारतोस...पास झाले मी....९१% A ग्रेड....😀जीरु पण पास झाली...फक्त आता निशुची आठवण येते....

तेवढ्यात तिचा फोन वाजतो...ती बघते तर तिच्या ग्रुप फ्रेंड्सचा मेसेज असतो....


राधा__ये कान्हा मांझा सगळा ग्रुप पास झाला आता फक्त...निशु.....

तेवढ्यात राधाला निशांतचा कॉल येतो....ती आनंदात फोन घेते....

राधा__📞 हेय..निशु आता तुझीच आठवण काढली...बोल किती पाडले...झालास ना पास....?


निशांत__📞 हो....झालो...९०% पडले....


राधा__📞 वा मस्त...!!मला ९१%....


निशांत__📞ह्म्म्म....गुड़...


राधा__📞तुझी खुप आठवण येते निशु...लवकर ये परत....


निशांत__📞ह्म्म्म...अजुन तरी नाही बघू काही दिवसात....


राधा__📞काही झालय का...? परवा पण असच बोलात होतास...काय झाल???


निशांत__📞काही नही...बर चल ठेवतो....माईला डॉक्टर कड़े घेऊन जायच आहे....


राधा__📞ओके....
तो लगेच कॉल ठेवतो.....


राधा__ काय झालाय याला....खुप दिवस झाले...कदाचित माईच्या तब्बेतीमुळे टेन्स असेल....बघू नंतर बोलेन त्याच्याशी.....
महंत ती जरा पलंगावर झोपी जाते....
**********************************

असे बरेच दिवस झाले....रिजल्टच्या दिवसानंतर निशांतचा फोन येन बंद झाल....राधा फोन करायची तर तो लागत नव्हता....तिला मात्र त्याची खुप काळजी लागलेली होती...पण तिला वाटायच की तिकडे नेटवर्क नसेल....आणि स्वतःच्या मनाची समजूत काढत ती गप्प बसायची....असेच दिवस जात होते...

(राधाचा फोन वाजतो)

राधा__📞 Hello....कोण बोलताय????


समोरील व्यक्ती__📞Hello Mam....तुम्ही राधा मनोहर कुलकर्णी बोलताय ना...?


राधा__📞हो बोला ना...


व्यक्ती__📞हा Mam...मी M.K.Gandhi Hospital मधुन बोलतेय....तुम्ही मागच्यावेळी जे कॉलेज मध्ये Interview दिले होते...आणि तुम्ही सिलेक्ट झाला होतात ना तर..तुमच सगळ शिक्षण तर पूर्ण झालाय ना...सो तुम्हाला आमच्या हॉस्पिटल कडून जाँब ऑफर देतोय आम्ही....सो तुम्ही इंटरेस्टेड आहात का??


राधा__📞OMG....!!! Seriously....Thank u so much...मला आवडेल काम करायला....


व्यक्ती__📞 ओके Mam..मग उद्या ९ वाजता हॉस्पिटलमध्ये या...तुमचा अजुन एक छोटा Interview होइल....तस तुम्ही खुप हुशार आहात हे तुमच्या कॉलेज कडून समजल आहे...पण तरीही एक इंटरव्यू होइल....सिलेक्ट झालात की तुम्हाला थोड़ी ट्रेनिंग ही देऊ आम्ही....

राधा__📞ओके चालेल....मी येते उद्या...थैंक्यू...!! राधा फोन ठेवते.....

शेवटी राधा आता स्वतःच्या पायावर उभी राहायला पहिले पाऊल टाकनार होती....ती खुप आनंदी होते...मनोहर आणि मालतीही खुप खुश होतात...प्रश्न होता...निशांतचा..?


राधा__अरे याचा फोन अजूनही बंद लागतोय....काही अडचणीत तर तो नसेल ना...नाही कदाचित नेटवर्क ईशु असेल....ही न्यूज त्यांला ही सांगावे वाटतंय मला....शिई यार😕...माझे पेशन्स आता संपत चाललेत...किती महीने झाले मी पेशन्स ठेवले आता नाही...हुशहह...असो..नंतर बघू तो करेल तर....

स्वतःची समजूत काढत राधा झोपी जाते...सकाळ होते..राधा उठून तयार होते आणि हॉस्पिटल मध्ये जायला निघत असते... तेवढ्यात तिच्या खोलीत जागृती धाप टाकत येते...राधाला काही कळतच नाही की काय झालंय...आणि जागृती बोलू लागते......


क्रमशः

(फ्रेंड्स मला ते डॉक्टर व्हायला काय करतात ते नाही माहित ह...म्हणून जे माहित आहे ते लिहितेय...😅आणि आता थोड़ सांगते कथेबदल... ती आणि तो ही कथा आहे त्याची आणि तिची....म्हणजे राधा आणि रणजीतची...आता रणजीत अजुन दाखवला नाही पण आहे बर....राधा जिच आयुष्य वेगळ्याच वळणावर येते...तिकडे रणजीत तिला आधार देतो...जेव्हा रणजीतला गरज पड़ते तेव्हा राधा त्यांला आधार देते....दोघ एकामेकांशी भांडतात पण तरीही एकत्र असतात...त्यांची भांडण सुद्धा खुप गोड़ असतात...तर त्यांच्याच गोड़ नोकझोक,मैत्री,प्रेमावर आहे ही कथा....आता जास्त नाही सांगत...वाचत राहा तुम्ही मग समजेल तुम्हाला...आणि मला स्पोर्ट करत राहा...😊)

©प्रतिक्षा__♥️🥀