Corona virus nashiwala dosh devu naka in Marathi Magazine by Ankush Shingade books and stories PDF | कोरोना व्हायरस नशिबाला दोष देवू नका

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

कोरोना व्हायरस नशिबाला दोष देवू नका

3. कोरोना व्हायरस;नशिबाला दोष देवू नका

कोरोना व्हायरस आला आहे आणि या ना त्या प्रकारे सत्यानाश करुन राहिला असून आपल्याला सावध राहाणे गरजेचे आहे. हा व्हायरस वूहानसारख्या शहरातून शेकडो किमीचा प्रवास करुन भारतात आला आहे. या व्हायरसची दहशतच माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.

जागतिक क्रमवारीचा विचार केल्यास लोकं पाखरासारखे मरत आहेत. लोकांना सावरायलाही जागा नाही. कारण या व्हायरसवर निदान करण्यासाठी लस अजूनही प्राप्त झाली नाही.

त्रेतायुगात रामाला ज्यावेळी कैकयीने वनवास दिला. त्यावेळी लक्ष्मण कैकेयीला दोष देत होता. पण रामानं म्हटलं,

"हे लक्ष्मणा, माता कैकेयीला दोष देवू नकोस. कारण वनवास होणं हे विधीलिखीत होतं. तो वनवास आपल्या नशिबात होता. "

द्वापरयुगात द्यूत खेळल्यानंतर व द्रोपदीही हरल्यावर याच प्रकारच्या द्रोपदीच्या प्रश्नाला उत्तर देतांना युधीष्ठीर तेच म्हणतो,

"द्रोपदी दुर्योधन हा आपला अनुज असून हा वनवास व अज्ञातवास विधीलिखीत आहे अर्थात आपल्या नशिबात आहे. "

असे असतांना या कलियुगात एखाद्या द्रोपदी किंवा एखाद्या लक्ष्मणाने जर कोरोना का आला? असा प्रश्न केल्यास कोणीतरी म्हणतात की हा कोरोना येणे विधिलिखित होते. तो आपल्या नशिबात होता. मी बरेचदा काही लोकांच्या तोंडून हेच ऐकलंय.

अडाणी मत. देव चमत्कार करतो. या सगळ्या अंधश्रद्धा भरलेल्या. त्या चमत्कारापुढं माणुसकी हरलेली असून कोरोना जगातील कित्येक राक्षसासारखे माणसे मारत सुटलेला आहे. तरी आजही आमचे डोळे उघडलेले नाहीत. आज आमचा देव कुलूपात बंद आहे. तरीही आमचे डोळे उघडलेले नाहीत. आम्ही आजही दिव्य चमत्कारावर विश्वास करतो. कोणी होम हवन करायला सांगतात तर कोणी गाईचं मुत्र प्यायला सांगतात. तुपही लावायला सांगतात. कोणी टाळ्या वाजवायला सांगतात. तर कोणी घंट्या वाजवायला, मेणबत्ती जाळायलाही सांगतात.

टाळी वाजवणे ठीक आहे. कारण त्यातून हातात उर्जा निर्माण होवून हातावरील जंतू मारले जातात. तसेच पंतप्रधानाने लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच एकत्रीकरण करण्यासाठी मेणबत्ती, टाळीचा वापर केला. काहीतरी करण्यासाठी काहीतरी माध्यम हवं. पण होमहवन करणं हे माध्यम नाही. ते मोदी साहेबांनी सांगीतलेलं नाही. तूप किंवा गाईचं गोमुत्र कोरोना हटविण्याचं माध्यम नाही. तसंच कोरोना काही विधीलिखीत नाही. तो नशिबाचाही खेळ नाही. त्यामुळं तो येणे नशिबात होता. विधिलिखित होता. असे म्हणणे धांदात खोटे आहे. अशा अफवांना कोणीही बळी पडू नये व त्यावर विश्वास करुन वावरु नये.

मात्र आजही अडाणी मत असंच सांगत असून परिसरातील लोकं म्हणतात,

"कोरोना नशिबाचा खेळ हाये जी, तो येणार होता. म्हून आला. त्याले का घाबराचं एवळं. ज्याच्या नशिबात मरणं असन, तो मरणच. मरण चुकणार तरी आहे का?"

होय, ज्याच्या नशिबात मरण असेल, तो मरेल. मरण चुकणार नाही. पण थोडी काळजी घेतल्यास मरण काही काळ तर पुढं ढकलता येईल नं तुमचं. तुम्ही जर हाच विचार करुन बिनधास्तपणे वावरत राहिल्या, तर कोरोनाचे वाहक बनणार नाही का?कोरोना तुम्हालाही लागेल व तुमच्या घरातील लोकांनाही आणि तुमच्या परीसरातील लोकांपाठोपाठ तुमच्या देशालाही. कोरोनाची लागण तुम्हाला होणे हे काही तुमच्या नशिबात लिहिलेलं नाही. ज्या मनूस्मृतीत माणसानं कसं वागावं हे कित्येक पिढ्यांपुर्वी लिहिलं होतं. त्या कित्येक पिढ्यांपासून तशाच प्रकारे माणसं वागत होती. कोणी विरोध करीत नसत. ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी एका झटक्यात जाळून टाकली. वेळ लावला नाही. नशीब माणसालाच घडवता येतं. कोणी चमत्कार करीत नाही वा कोणाला घडवता येत नाही.

आपण केवळ नशिबाला हवाला देवून डॉक्टरकडे गेलो नाही. तर आपण उद्या मरायचे ते आजच मरु. नव्हे तर कित्येकांना मारुन मरु मानवी बाँब बनून. ठीक आहे, तुम्हाला मरायचे आहे तर खुशाल मरा. पण ज्यांना मरायचे नाही. त्यांना मारु नका जबरदस्तीनं नशिबाच्या नावावर. कारण तुमच्यासारखंच नशिब सर्वांचंच लिहिलेलं नाही. नशीब बदलता येतं. कोरोना वाहक बनून नाही तर घरातल्या घरात बसून. हातपाय स्वच्छ ठेवून. त्यामुळं नशिबाला दोष देवू नका. नशीब घडविण्याची ताकद याक्षणी तरी तुमच्याजवळ आहे. तुम्ही घरातच बसल्यास वा स्वच्छता बाळगल्यास या कोरोनावर मात करुन वागलात काही दिवस तर काहीतरी नक्कीच करु शकाल. नशीबही तुम्हाला तुमच्या मनानुसार घडवता येईल. यात काही दुमत नाही. फक्त त्यासाठी नशीबावर अवलंबून राहू नका. अन् नशीबावर विश्वासून बाहेर पडू नका. नाहकच कोरोना वाढवून डॉक्टर, नातेवाईक, पोलिस आणि आपले सरकार यांना त्रास देवू नका.