Saany - 7 in Marathi Thriller by Harshad Molishree books and stories PDF | सांन्य... भाग ७

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

सांन्य... भाग ७

अध्याय ४.... बुद्धीचा खेळ

शुभम आणि अजिंक्य तिथून स्टेशन वर जात होते तेव्हाच सावरकर चा फोन आला अजिंक्य ला....

"सर अपूर्वची आई आता जिवंत नाहीये, अपूर्व वर अटक झाल्याचा काही वर्षानंतर त्यांची मृत्यू झाली, अपूर्व चे कोणत्याच जवळच्या नातेवाईकांकडे त्याच्या बदल काहीच माहिती नाहीये".... सावरकर

"ठीक आहे सावरकर".... म्हणत अजिंक्य ने फोन ठेवला

"सर अजून काय लिंक नाही भेटली".... अजिंक्य

शुभम शांत होता.... तो कसला तरी विचारात गुंग होता

"सर जर आपण डायरेक्ट अपूर्ववर अटक केली तर".... अजिंक्य

"नाही अजिंक्य, नाही प्रूफ शिवाय आपण त्याला अटक करू शकत नाही".... शुभम

ते लोक आप आपल्या घरी पोचले, रात्र झाली शुभम सारखा अपूर्व बदल विचार करत होता, त्याची ती मानसिक वृत्ती, त्याची बायकोचं ते सगळं म्हणणं.... शुभम अगदी त्या विचारात हरवला होता

"शुभू झोपायचं नाही का"....??? राजश्री

"हो"... शुभम

"शुभू मी बघते की ह्या केस मुळे तू खूप चिंतीत असतो, पण थोडा संयम ठेव सगळं ठीक होईल".... राजश्री

"कस संयम ठेवू यार, काहीच कळत नाहीये... दिवसांदिवस लोकांचा मनात त्या किलर ला घेऊन भीती वाढत चालीय, लोक भीती मूळे आपल्या मुलांना घराच्या बाहेर पाठवत नाहीये आणि तू... सोड यार जाऊदे".... शुभम

"शुभू शांत हो, इथं ये"..... राजश्री ने शुभम ला जवळ घेतलं, शुभम ने त्याच्या डोकं राजश्री च्या मांडीवर ठेवलं आणि शांत होऊन डोळे बंद करून झोपला, राजश्री शुभम च्या केसात हळूच हाथ फिरवत होती, शुभम झोपला....

२६ जनवरी शनिवार.…

सकाळ झाली, शुभम स्टेशन ला जायला निघत होता तेव्हाच अजिंक्यचा फोन आला त्याला...

"सर अपूर्व च्या घरी हालचाल जाणवली आहे, साबळेनी आताच बातमी दिली आहे".... अजिंक्य

"पोचतो मी".... शुभम

शुभम पटकन स्टेशन ला पोचला, स्टेशनला पोचताच अजिंक्य ने शुभम ला सांगितलं....

"सर अपूर्व च्या घरी हालचाल जाणवली आहे, मी इन्स्पेक्टर अमित साबळे ला त्याच्या वर नजर राखण्यासाठी सांगितलं होतं, सर खबर मिळाली आहे की लागोपाठ २ दिवसापासून अपूर्व त्याच्या घरापासून ५ किलोमीटर च्या अंतरावर स्टीत एक बिल्डिंग च्या इथं रोज जाऊन राऊंड मारतो, कमीत कमीत १ तास तो तिथं तसं राऊंड मारत असतो, may be सर त्याच्या पुढचा शिकार याच बिल्डिंग मध्ये किंवा आसपास चा असणार".....

"सर मी त्या पूर्ण एरियाची एक लिस्ट रेडी केली आहे, ऐकून ८७ छोटे मुलं आहेत त्या एरियात ज्यांचं वय ३ ते १२ च्या आत आहे".... अजिंक्य

"Great work.... अजिंक्य, अप्रतिम"..... शुभम खुश होऊन म्हणाला

"सर अजून एक माहिती भेटली आहे, अपूर्व जेव्हा त्याच्या घराच्या बाहेर गेला होता तेव्हा आपला एक ऑफिसर लपून त्याच्या घरात घुसला होता, सर त्याच्या घराचा आतचा माहोल थोडा विचित्र आहे".... अजिंक्य

"विचित्र म्हणजे".... ??? शुभम

"सर त्याच्या घरात भिंतीवर भरपूर फोटोफ्रेम आहेत, पण एका फ्रेम मध्ये पण फोटो नाहीये सर आणि सर त्याच्या किचन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चाकू व कोयते होते आणि महत्वाचा त्याच्या बेडरूम मध्ये एक typewriter आहे, भोतेक ज्याचने तो पत्र type करून पाठवत असेल"..... अजिंक्य

शुभम विचार करतच होता, तेव्हाच अजिंक्य बोलला.... "सर आज शनिवार आहे आणि तो काय करेल त्या आधी आपण त्याला पकडला पाहिजे"....

"मग म कसली वाट पाहतोय आपण.... lets go".... शुभम

शुभम फोर्स घेऊन अपूर्व ला पाकडण्यासाठी निघाला आणि अपूर्व च्या घरी पोचला....

अपूर्व च्या घराचा दार उघडाच होता, आत येताच शुभम ने पाहिलं की भिंतींवर सगळी कडे फ्रेम आहेत पण एकही फ्रेम मध्ये फोटो नव्हते, शुभम इथं तिथं बघतच होता तितक्यात तिथं अपूर्व आला....

"सर काय झालं"..... अपूर्व एकदम normally बोलला, त्याला पोलीस ला समोर बघून अजिबात भीती वाटली नाही...

"काय झालं....??? अजिंक्य ह्याला धर, आत मध्ये ताक याला"..... शुभम अगदी रागात बोलला

अजिंक्य ने पाटी पुढे काहीच विचार केला नाही आणि अपूर्वच्या मानेला पकडून त्याला खेचत गाडीत बसवलं आणि स्टेशन ला घेऊन आले....

स्टेशन मध्ये आणल्या नंतर अपूर्व ला enquiry कक्ष मध्ये बसवलं होत, काही वेळा नंतर अजिंक्य आणि शुभम विचारपूस करण्यासाठी कक्ष मध्ये आले...

"आता गपचूप जे काय माहीत आहे ते सांग, काही नखरे न करता".... शुभम

"किती मुलं कुठे आणि कधी, अपहरण कसं कोणासोबत मिळून केलं पटापट बोल".... अजिंक्य

"सर काय बोलताय तुम्ही कुठले मुलं, कसलं अपहरण.... तुमचा मुलाचा अपहरण झाला आहे का"..... ??? अपूर्व अस अजिंक्य ला बघत म्हणाला आणि मग जोरजोरात हसायला लागला....

हे बघताच अजिंक्य ने अपूर्व ला जोरात एक मुक्का मारला तोंडावर, पण शुभम ने त्याला पटकन थांबवलं....

"अजिंक्य control, control कर".... शुभम

"सर माझा मुलगा सर, कस control करू नाही होत आता control".... अजिंक्य च्या आवाजात अगदी लाचारी जाणवत होती

शुभम ने अजिंक्य ला शांत केला, त्याला आश्वासन दिलं....

"ठीक आहे, नको सांगूस, काहीच नको सांगूस...... अजिंक्य हा जे पर्यंत काही बोलत नाही ह्याला ना तर जेवण द्याच्या न तर झोपू द्याच्या, कुत्र्याला पाणी सुद्धा देऊ नका".... शुभम अगदी रागात म्हणाला

दिवस तसाच निघून गेला.... तेच रात्र ही निघून गेली, पण अपूर्व ने तोंड उघडलं नाही....

शुभम आणि अजिंक्य काय घरी गेले नाही आणि सकाळ झाली....

२७ जनवरी रविवार २०१९...

अपूर्व काहीच बोलायला रेडी नव्हता, इथं अजिंक्य आणि शुभम चा राग वाढत चालला होता, तेव्हाच राणू आली, राणू ने बघितलं की शुभम खूप टेन्शन मध्ये बसला आहे....

"शुभम काय झालं, लक्ष कुठे आहे तुझा".... राणू

"काय नाही, ये बस".... शुभम

"नाही काय तरी झालं आहे, काय झालं आहे सांग मला".... राणू

शुभम आदी काय सांगत नव्हता पण मग राणू ने खूप आग्रह केल्यामुळे शुभम ने पूर्ण situation आणि जे काय घडलं ते सगळं राणूला नीट समजवून सांगितलं...

राणू ने शांत पणे सगळं ऐकून घेतलं आणि मग बोलली..... "you mean की तो किलर आता इथं आहे, आतमध्ये".... राणू

"हो, पण काय फायदा नाही, तो काहीच बोलत नाहीये".... शुभम

"शुभम let me try"..... राणू

"इथं काय खेळ चालला आहे का, की तुला try करायचा आहे"... शुभम अगदी रागात बोलला

"शुभम खरच मला try करुदे"..... राणू

शुभम काय बोलेल या आधीच अजिंक्य बोलला... "सर मला वाटतं की एक chance दयावा, may be तो काय बोलेल"....

शुभम ने अजिंक्य समोर बघितलं आणि मग राणू ला बोलला.... "ठीक आहे पण सांभाळून, मी आणि अजिंक्य बाहेर थांबतो काही झालं की पटकन आवाज दे"...

"Ooook"... राणू

राणू मग आत गेली जिथं अपूर्वला ठेवलं होतं, अपूर्व चे हाथ बांधलेले होते आणि तो झोपला होता, राणू हळूच त्याच्या जवळ गेली आणि त्याला उठवलं, अपूर्व दचकून उठला आणि राणू घाबरली.....

"काय नाय मी आहे राणू , घाबरू नको मी तुला इथून बाहेर काढू शकते".... राणू

"पाणी".... अपूर्व ची हालत खराब झाली होती, त्याला खूप तहान लागली होती

"हा हे घे... पाणी घे".... राणू ने पाणीची बाटली अपूर्व ला दिली झाकण उघडून, अपूर्व ने गटागट पाणी पिलं आणि त्याच्या जीवात जीव आला....

"अपूर्व तुला खरच माहीत नाही का त्या मुलांबद्ल".....??? राणू

अपूर्व राणू समोर रागाने पाहू लागला, हे बघून राणूला पण भीती वाटायला लागली, शुभम खिडकीतून लपून हे सगळं पाहत होता, अचानक अपूर्व जोरजोरात हसायला लागला....

राणू ला आता खूप भीती वाटत होती, ती भीतीने मागे सरकत जात होती तेव्हाच अपूर्व बोलला...

"बरोबर, असच perfect असच.... मुलं पण मागे सरकतात जेव्हा मी हसतो"....

हे ऐकताच शुभम ने आत याच्या प्रयत्न केला पण अजिंक्य ने त्याला थांबवलं.....

"कोण, कुठले मुलं"..... राणू ला खूप भीती वाटत होती अगदी बोलताना तिची बोबडी वळत होती

"तेच मुलं ज्यांना मी मारून खातो, अशे छोटे छोटे तुकडे करून तुला माहीत आहे जेव्हा त्यांच्या मानेवर कोयता फिरवतो ना..??? तर रक्त कसं उडतं".….

राणू अगदी घाबरली होती आणि अपूर्व ही शांत झाला बोलता बोलता, त्याने बाटलीतून पाणी पिलं आणि पूर्ण राणू वर ठुकून टाकलं आणि हसत हसत म्हणाला....

"असं उडतं रक्त".....

शुभम हे बघताच आत आला, त्याने राणूला पटकन जवळ घेतलं आणि अजिंक्य पुढचा विचार न करता अपूर्व ला मारत सुटला, अजिंक्य ने अपूर्व ला खूप मारला....

शुभम राणूला बाहेर घेऊन आला, तिला शांत केलं, राणू खूप घाबरली होती

"शुभम हा माणूस नाही आहे, रक्षास आहे हा, त्याच्या डोळ्यात मी पाहिलं आज त्याच्या डोळ्यात ना भीती आहे ना दया"..... राणू अस म्हणत रडायला लागली

शुभम ने तिला शांत केलं व अजिंक्य ला म्हणाला..... "अजिंक्य अपूर्व वर लक्ष दे मी राणूला घरी सोडून येतो, आणि हा जरा नीट लक्ष दे मार अशी पडली पाहिजे की हाड नाही तुटली पाहिजे पण पूर्ण शरीर सुजलं पाहिजे साल्याचा".....

शुभम राणूला घेऊन तिच्या घरी आला....

"आत ये ना"... राणू

"नको परत कधी, आत खूप काम आहे, अपूर्व ने तुझ्यासमोर तर कबूल केलं पण आता त्याला मी सोडणार नाही"....

"शुभम".... राणू हळूच म्हणाली

शुभम थांबला... "काय झालं बोलना"....

राणू ने पटकन शुभम ला hug केलं जोरात आणि मग काही न बोलताच घरात निघून गेली.... शुभम ला काही कळलं नाही, तो पटकन मग तिथून स्टेशन ला पोचला....

इथं अजिंक्य अपूर्व ला दांडक्या ने मारत होता आणि सारखा विचारात होता.... "माझा मुलगा कुठे आहे, बोल कुत्र्या बोल"....
पण अपूर्व काहीच बोलत नव्हता....

अजिंक्य आणि शुभम ने खूप प्रयत्न केले पण अपूर्व काहीच बोलला नाही रात्र झाली आणि रात्र ची सकाळ पण अपूर्व काहीच बोलला नाही....

२८ जनवरी सोमवार २०१९....

अजिंक्य अगदी कंटाळून अपूर्वला बोलला.... "काय पाहिजे तुला सांग पैसे हवे, पैसे हवे का तुला, पण फक्त एवढं सांग की माझा मुलगा जिवंत आहे की नाही".... अजिंक्य थकला होता, त्याच्या अवजावरून जाणवत होतं की त्याला किती दुःख आहे

तेव्हाच शेवटी अपूर्व बोलला... "सांगतो सगळं सांगतो, पण मला आधी बसुद्या".....

शुभम ने हे ऐकताच त्याला लगेच बसवलं.... "बोल पटकन बोल आता".....

"सर एक कोरा पान आणि पेन भेटेन का"....??? अपूर्व

शुभम ने सावरकर ला इशारा केला आणि तो एक वही आणि पेन घेऊन आला....

अपूर्व त्यावहित काय तरी लिहू लागला आणि मग त्याने शुभमला बोलला "बोला काय विचारायचं आहे"....

हे ऐकताच अजिंक्य रागात म्हणाला "माझा मुलगा कुठे आहे"....

"खाल्लं, कापून खाऊन टाकलं बोललो ना खूप भूक लागली होती तर मग मी कापून खाऊन टाकलं त्याला"..... अजिंक्य हे ऐकताच अगदी रागात त्याला मारायला जात होता तेव्हाच बाहेरून त्याला आवाज आला

"एक मिनिट ऑफिसर अजिबात माझ्या client ला हाथ लावू नका....
तुम्ही कोण"... शुभम

"मी अपूर्व चा वकील आहे आणि हे घ्या त्याचे बेल चे ऑर्डर्स"..... वकील

शुभम ने बेल ऑर्डर्स बघितले आणि बोलला....

"काल रविवार होता आणि आज सोमवार, सोमवारी ते पण इतक्या सकाळी बेल ऑर्डर्स घेऊन पण आले वाह...! खूप मन लाऊन काम करताय तुम्ही".... शुभम

"हो मी मन लावूनच काम करतो पण जर तुम्ही पण मन लावून काम केलं असतं तर आज खरा आरोपी आत मध्ये असला असता".... वकील

"म्हणजे"....??? शुभम ने प्रश्नार्थक भावाने विचारलं

वकील काय बोलेल त्या आधीच सावरकर ने शुभम ला मधीच बोलताना अडवलं... "सर please टीव्ही चालू करा"....

अजिंक्य ने पटकन न्युज लावली... न्युज वर चालू होतं

"BREAKING NEWS"....

पत्रचा खुनी खेळ अजूनही चालू आहे, गेल्या काही सोमवार पासून दर सोमवारी एक ना एक घरात एक पत्र येतो, हा पत्र एक अस विचित्र संदेश घेऊन येतो ज्याची कल्पना कोणालाच नसते आणि तसाच या सोमवारी पण घडलं, पण ह्या सोमवारी जे घडलं ते ह्याच्या आधी कधीच घडलं नाही, सकाळी सकाळी निखिल शर्मा ह्याच्या घरी एक डब्बा आला, ज्यात स्वादिष्ट मटण होत पण त्या सोबतच शेवटच्या डब्यात एक पत्र होत... तर तो पत्र अश्या प्रकारे होता

अखिल वय ८....

तुमच्या मुलालाचा मटण म्हणजे काय सांगू, किती कौतुक केलं तरी कमी आहे....! मला खूप आवडलं, पहिल्यांदा खरं सांगतो पहिल्यांदा मला कुठल्या मुलाचा मटण एवढं आवडलं, म्हणून थोडं तुमच्या साठी पण पाठवलं आहे, खाऊन बघा एकदा आवडेल तुम्हाला.....

" सांन्य "....

तर हा होता पत्र, कोण आहे सांन्य का करतोय तो अस, आखीर कधी पर्यंत हा खुनी खेळ असाच चालणार आहे, पोलिस कूट पर्यंत हातावरहात घेऊन बसून रहाणार....

शुभम आणि अजिंक्यला न्युज बघून खूप मोठा धक्का बसला, शुभम ला काहीच सुचत नव्हतं की नेमकं काय करावं.....

"काय पुरावा नाही काय नाही आणि तुम्ही हाथ कसा उचलला माझ्या client वर, तुम्हाला तर मी सोडणार नाही"..... वकील

अजिंक्य आणि शुभम काहीच बोलू शकले नाही, अपूर्वला शुभम ने सोडलं आणि अपूर्व तिथून निघाला...

जाताना अपूर्व थांबला आणि शुभम समोर थांबला आणि हळूच बोलला..... "मला तुमच्या वर विश्वास आहे"...

अपूर्व एवढं बोलून निघून गेला.......

----------------------------------------------------------------- To Be Continued ---------------------------------------------------------