Saany - 2 in Marathi Thriller by Harshad Molishree books and stories PDF | सांन्य... भाग २

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

सांन्य... भाग २

अध्याय २...

पत्र वाचून प्रदीप ला खूप मोठा धक्का बसला, तो धावत धावत घरी पोहोचला.. नवीन ,बाळा नवीन .."नवीन कुठे आहेस? प्रदीप नवीन ला जोरात हाका मारू लागला, प्रदीप ची बायको पण प्रदीप ला असं बघून घाबरली....

"प्रदीप काय झालं?? तू एवढ्या लवकर घरी कसा आलास??आणि तू नवीन ला का हाक मारत आहेस ते ही एवढ्या मोठ्याने??

"नवीन कुठे आहे"???.... प्रदीप फक्त एकच प्रश्न विचारत होता.....

प्रदीप ने त्याचा बायकोला(अनघा) हातातला पत्र दाखवला..ते वाचून ती मोठमोठयाने रडू लागली..तिचे हात थरथरू लागले..

प्रदीप ला काहीच सुचत नव्हते...

त्याने अनघा ला विचारल "नवीन कुठे आहे तर तिने उत्तर दिले की तो तर सकाळीच बाहेर गेला आहे"......

हे ऐकून प्रदीप धावत बाहेर त्यांला शोधण्यासाठी गेला पण त्याला नवीन चा काहीच पत्ता लागला नाही.. तो पुन्हा त्याचा घरी आला..अनघा दरवाजा मध्ये बसून प्रदीपची वाट बघत होती..प्रदीप दिसताच ती त्याच्याकडे धावत गेली

"भेटला का नवीन??कुठे आहे माझा नवीन?? कुठे गेला असेल?? ते पत्रामध्ये लिहलेल खर तर नसेल ना".... ?? अस बोलून मोठमोठयाने रडू लागली आणि चक्कर येऊन खाली पडली...

थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली आणि पुन्हा विचारू लागली.."नवीन आला का??"

प्रदीप आणि अनघा ला नवीन ची चिंता वाटू लागली म्हणून ते पोलीस स्टेशनमध्ये मध्ये निघाले..

पोलिस स्टेशन मध्ये पोहचताच अनघा पुन्हा रडू लागली.."साहेब माझा मुलगा साहेब..माझ्या मुलाला शोधा.. मी तुमचा पाया पडते.माझ्या मुलाला शोधा"...

"तुम्ही आधी शांत व्हा थोडा, please i can understand, पण Please"..... शुभम

"सर फक्त ६ वर्षाचा आहे माझा मुलगा, सर please सर काय तरी करा".... प्रदीप

शुभम ने त्यांची पूर्ण चौकशी केली..प्रदीप ने त्याला मिळालेलं पत्र शुभमला दाखवल....

"सर हा तोच आहे हे तसच पत्र दिसतंय... अजिंक्य

हे ऐकून शुभम ला खूप राग आला, पण तो तरी काय करू शकतो,
शुभम पुढे चौकशी करू लागला....

"नवीन ला तुम्ही शेवटचं कधी बघितलं होतं???"..... शुभम

"सर सकाळी, आज मी त्याला माझ्या आईच्या घरी घेऊन जाणार होती म्हणून त्याला शाळेत नाही पाठवलं, सकाळी सर तो बाहेर खेळायला गेला होता, मला सांगून गेला होता".... अनघा

"तुम्हाला हे पत्र किती वाजता भेटलं???".... शुभम

"सर सकाळीच, एक १०:३० च्या सुमारास"..... प्रदीप

"नवीन घरातून किति वाजता बाहेर पडला???".... शुभम

"सर ०९:०० वाजता"..... अनघा

"म्हणजे जे काय झालं आहे ते ह्या दिढ तासात झालं".... शुभम

"ठीक आहे आम्ही बघतो, तुम्ही please हिम्मत हरू नका.. आम्ही नवीन ला नक्की शोधून काढू...

पन आतातुम्ही घरी जा..आम्हाला काही माहिती मिळाली की आम्ही तुम्हांला कळवू...सावरा स्वतःला .

प्रदीप आणि त्याची बायको खूप रडत होते आणि तेच अजिंक्य आणि शुभम ला हे कळत नव्हतं की असलं विचित्र काम कोण करतंय आणि का.... ?????

शुभम ने पत्र वाचायला सुरुवात केली.

नवीन, वय ६ वर्ष....

काल रात्री पासून पोटात कसं तरी होत होतं, भूकेने माझा जीव जात होता , आणि तेव्हाच मी तुमचा मुलाला बघितलं, एकदम नरम नरम मास, आज तर मज्जा येईल त्याला खायला, बस आता भूक वाढत चालीय....

" सांन्य "...

"सर याच काय तरी केल पाहिजे लवकर ..वर्षाच्या पहिल्याच दोन आठवड्यात २ छोटे मुले गायब झाली"..... अजिंक्य

शुभम ने अजिंक्यला काहीच जवाब दिला नाही, तो शांत उभा राहून विचार करत होता..

पोलिसांनी प्रदीप च्या घराचा आजूबाजूला सगळी कडे बघितलं, सगळ्यांसोबत विचारपूस केली पण शेवटी तेच, शुभम ला काहीच सुगावा भेटला नाही ज्याने तो नवीन पर्यंत पोहचू शकेल..

"दिढतासात त्याने सकाळच्या वेळेत एका मुलाला गायब केलं, आणि परत पत्र ही ठेवून गेला पण त्याला कोणी बघितलं नाही" हे कसं शक्य आहे??..... शुभम

"अजिंक्य नवीन च्या घरापासून १ किलोमीटर च्या अंतर मध्ये प्रत्येक घर हॉटेल, क्लब, सगळं चेक कर"..... शुभम

"oook सर".... अजिंक्य

तेव्हाच शुभम ला त्याच्या superior चा कॉल आला, त्यांनी शुभम ला पटकन त्यांच्या ऑफिस मध्ये बोलवलं...

"शुभम what is this, is this some kind of a joke.... अजून राहुल च्या बद्दल काही माहिती भेटली नाही आणि आता अजून एक....
मीडिया मध्ये ही गोष्ट आगी सारखी पसरते, मला immediate action पाहिजे ह्यावर".....

" हो सर, सर हा जो कोण आहे मला नाही वाटत हा इतःच थांबणार आहे".... शुभम

"म्हणजे, you want to say की असं परत होईल".....

"हो सर possiblity आहे".... शुभम

"मला हे माहीत नाही, पण i want that bloody bastard..... कोण आहे हा " सांन्य????

"हो सर.... जय हिंद"..... शुभम

शुभम सरांच्या ऑफिस मधून निघाला तसाच त्याला मीडिया वाल्यांनी अडवलं.....

"सर सर एक मिनिट please सर कोण आहे " सांन्य ".???.. जो अश्या विचित्र पध्दतीने मुलांना गायब करतोय"...???.

"तो फक्त एक सायको किलर आहे आणि आम्ही त्याला लवकरात लवकर तुरुंगात टाकू ..... शुभम

"सर काय खात्री आहे की तो किलर परत कुठल्या मुलाला कीडनॅप नाही करणार??"....

शुभम ने ह्या प्रश्नच काहीच उत्तर दिलं नाही आणि तो मीडिया सोमरून काही न बोलताच निघून गेला..

"तर आपण बघितलं की ह्या case ला स्वता हँडल करणे इसनपेक्टर शुभम कडवईकर यांचाकडे सुद्धा ह्या प्रश्नाचं काहीच उत्तर नाहीये"...... मीडिया रिपोटर

मुंबई शेहरात एक सायको किलर खुलेआम फिरतोय, जो लहान मुलांना कीडनॅप करून, त्याच्या आई बाबांना पत्र लिहून हे कळवतो की त्यांच्या मुलांना त्यांनी मारून खाल्लं व त्यांचा मास किती स्वदिष्ट होत...आणि पोलिसना त्यांचा बद्दल अजून एकही पुरावा हाती लागला नाहीये हे दुर्भाग्य म्हणावं लागेल..

तर दर्शकानो सतर्क हव्या, आपल्या मुलांना कुठे ही बाहेर पाठवू नका,कोणत्याही अनोळखी माणसाला घरात घेऊ नका.....


"सर same आहे, ह्या पत्र वर पण त्याचे आईबाबांना सोडून कोणाचे fingure prints नाही भेटले".... अजिंक्य

search team ची के खबर???.... शुभम

"सर nothing आम्ही नवीन च्या घरापासून पुढं १ किलोमीटर च्या अंतरावर सगळी कडे बघितलं, लोकांच्या घरात जाऊन पण विचारपूस केली पण got nothing"..... अजिंक्य

"मग हा किलर एवढ्या लवकर गायब कुठे झाला??"..… शुभम

"सर बहुतेक त्यांने आधी पासूनच लक्ष ठेवल असेल नवीन वर"..... अजिंक्य

"अजिंक्य हा जो कोण आहे तो खूप चालक आहे, प्लॅन करून करतोय हे सगळं".... शुभम

"सर पहिली कीडनॅपिंग झाली ७ तारखेला सोमवारी आणि दुसरी सोमवार १४ ला आणि सर आता शंभर टक्के chances आहे की पुढच्या सोमवारी किलर परत एक कीडनॅपिंग करेल..... अजिंक्य

"Yess exactly, पण आता माहीत कसं पडणार की तो कुठे, कधी, कोणाला कीडनॅप करणार आहे??"...... शुभम

"अजिंक्य एक काम कर गेल्या तीन महिन्यात जेवढे पण history shiters ज्यांना जेल मधून सोडलं किंवा जे बेल वर सुटले आहे त्यांची एक लिस्ट बनव आणि सोबतच, शहरात असे किती लोक आहेत ज्यांचा मानसिक उपचार चालू आहे सोबतच एक लिस्ट phsyciatric डॉक्टर्सची पण काढ"..... शुभम

"Oook सर"..... अजिंक्य

"Lets the action begins"....... शुभम

इथं शुभम आणि अजिंक्य त्या किलरला ट्रॅक करण्यासाठी योजना बनवत होते, तेच दुसरी कडे वेगळच काही तरी चालू होतं.....

एक माणूस पायऱ्या उतरत होता, उतरून त्यांनी पुढं चालायला सुरवात केली आणि पुढं येताच त्याने पहिला की एका रांगेत मोठे मोठे पिंजरे होते दोन्ही बाजूला......

तो माणूस हळू हळू पुढं चालत जात होता, प्रत्येक पिंजऱ्या मध्ये छोटी छोटी मुले होती ज्यांचे पाय रशी ने बांधलेले होते , तो पुढं चालत गेला........

प्रत्येक पिंजऱ्यात मुलं होती, पण पुढं एक पिंजरा होता ज्यात कोणी नव्हतं, पण आकड्याला अडकवून रसी तिथेपण पडली होती जणू कोणाला बांधून ठेवला आहे, तो माणूस हे दृश्य बघतच होता की अचानक मागून एक माणूस हातात कोयता घेऊन त्याच्या अंगावर धावत आला...... आणि तो झोपेतून उठला.....

----------------------------------------------------------- To Be Continued ---------------------------------------------------------------