Saany - 3 in Marathi Thriller by Harshad Molishree books and stories PDF | सांन्य... भाग ३

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

सांन्य... भाग ३

अध्याय दुसरा.... "भूक"

"गुड मॉर्निंग शुभु" उठ लवकर तुला स्टेशन ला निघायला उशीर होईल नाहीतर..मी नाश्ता बनवून घेते.. तू फ्रेश होऊन खाली ये.... राजश्री
शुभम तयार होऊन लगेच खाली आला .. आणि नाश्ता करून निघाला ..
शुभम सकाळी जरा लवकरच पोलिस स्टेशन ला निघाला होता.... अर्थातच त्याचा डोक्यात त्या किलर चा विचार सतावत होता..
शुभम ने सांगितल्या प्रमाणे अजिंक्य ने लिस्ट तयार केली.....सर्व कैद्यांची सुटण्याची तारीख वेळ आणि त्यांनी केलेले गुन्हे हे त्यामध्ये होते..

शुभम जसा पोलीस स्टेशन मध्ये पोहचला तसं त्याने सगळ्यात आधी अजिंक्यला केबिन मध्ये बोलवून घेतले.

"Good morning सर".... अजिंक्य

"Good morning, अजिंक्य ती लिस्ट??".... शुभम

"रेडी आहे सर, सर ऐकून २५६ कैदी आहेत जे बेलवर किंवा त्यांची सजा पूर्ण करून सुटलेत"..... अजिंक्य

"Ooook त्यातून असे किती कैदी आहेत जे सिरीयल किलिंग च्या केस मध्ये involve होते"...... शुभम

"सर ७ कैदी"..... अजिंक्य

"Ooook त्या ७ लोकांना शोधून काढा..जिथे असतील तिथून पकडून आणा, ते ७ जण मला दुपार पर्यंत इथं हवेत"....

"Oook सर"....

दुपार पर्यंत अजिंक्य त्या ७ लोकांना पकडून घेऊन आला, आणि सरांसमोर उभा केलं.
शुभम त्या सर्वांची चौकशी करू लागला,बेपत्ता असलेल्या दोन्ही मुलांचे फोटो दाखवू लागला..त्या दिवशी ते कुठे होते याची माहिती घेऊ लागला..
पण या सर्वचा काहीच परिणाम झाला नाही..

"आम्ही काही नाही केलं सर".... ते ७ लोकं

"ह्यांचा आईला, मारा ह्यांना आत घेऊन, जाऊन जो पर्यंत खरं बोलत नाही ना हाणून काढा"..... शुभम

"सर सर आम्ही काहीच केलं नाहीये".....

काही वेळानंतर अजिंक्य शुभम च्या केबिन मध्ये आला.....

"त्यालोकांना खूप मारलं, पण कोणीही कबूल केलं नाही, सर हे लोकं नाहीयेत, सर इतका मर खाऊन पण हे लोकं त्यांच्या उत्तरावर ठाम आहेत.. सर मला वाटतंय हे सात जण खर बोलत असावेत".... अजिंक्य
शुभम विचारांमध्ये गुंग होता...किल्लर च वाचलेल पत्र त्याचा सारखं नजरेसमोर येत होतं..
शुभम खूप टेन्शन मध्ये दिसत होता, शुभम ला असं बघून अजिंक्यने त्याला विचारलं

"सर काय झालं, खूप टेन्शन मध्ये आहेत आज??"..... अजिंक्य

"टेन्शन तर आहे, अजिंक्य टेन्शन तर आहे..... उद्या सोमवार आहे" ! ........ शुभम

"सर टेन्शन तर मला पण आहे, काहीच कळत नाहीये की नक्की काय करावं".... अजिंक्य

"जाऊदे अजिंक्य तुझी ड्युटी संपली आहे ना. जा तू घरी..या केस मुले तुलाही आराम करायला वेळ नाही मिळाला.आज तू जा लवकर घरी"..

"साहेब पण तुम्ही इथे एकटे"...अजिंक्य

"हो मी थोडी केस ची स्टडी करतो आणि घरी निघतो"..... शुभम

"ओके सर, जय हिंद सर"..... अजिंक्य

"जय हिंद"..... शुभम

शुभम बराच वेळ केबिन मध्ये बसून एकच विचार करत होता, सांन्य.... म्हणजे काय कसा नाव आहे हा सांन्य, किलर फक्त सोमवारच्या दिवशीच का अपरहन करतो, पत्र लिहून पाठवणे यात याचा नेमकं काय उद्देश्य आहे, किलर ला हवं तर तो लपून पण रहाऊ शकतो, पण तो असं पत्र लिहून हे मान्य करून की अपहरण त्याने केले आहेत लोकांमध्ये त्याची भीती वाढवतोय, जर हा मुलांना खरच कापून खातोय तर मग हे तो लोकांसमोर जाहेर का करतोय, अस करून त्याला नेमकं काय भेटतंय.....

शुभम च्या डोक्यात अशे अनेक प्रश्न फिरत होते, बऱ्याच वेळ बसल्या नंतर शुभम घरी आला.....

शुभम त्याच्या घरात बसला होता, सोफ्यावर बसून टीव्ही वर न्युज पाहत होता......

"उठा आता झोपायचं नाहीये का"... शुभम ची बायको त्याला म्हणाली (राजश्री)

"नाही मला झोप येत नाहीये, तू जा"…... शुभम

"काही टेन्शन आहे का"..... ?? राजश्री

"नाही गं मला कसल टेन्शन"..... ?? शुभम

"तुमचा चेहऱ्यावर दिसतंय की तुम्ही माझ्यापासून काहितरी लपवताय"..... राजश्री

"काही नाही ग. फक्त झोप येत नाहीये मला..थोडया वेळाने झोपायला येइन मी.... तुम्ही दोघे जाऊन झोपा"...

"बघा मला माहित आहे त्या case ला घेऊन तुम्ही थोडे.... पण टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होईल".....राजश्री

"हो.... नाही घेत टेन्शन जा जाऊन झोप".... शुभम

"अमर ,चल बाबा ना बसू दे".... राजश्री अमर ला घेऊन बेडरूम मध्ये गेली

शुभम टीव्ही बघत बसलेला, शुभम च्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की नेमकं आता पुढे काय होईल, उद्या सोमवार आहे, परत जर असं झालं तर.....

शुभम हया सगळ्या गोष्टींचा विचार करत स्वता सोबतच बोलत बसला होता....

"सांन्य..... सांन्य काय हवं आहे ह्याला,??? हा फक्त सोमवारीच का कीडनॅपिंग करतोय".... ???

शुभमला विचार करता करताच झोप लागली आणि तो झोपला, टीव्ही चालू होता आणि शुभम तसाच झोपी गेला....

एक लहान मुलगा हळू हळू मागे सरकत होता, मागे सरकत सरकत तो भिंती ला टेकला आणि मग तसाच तिथं खाली बसला, तो मुलगा इतका घाबरला होता की त्याचा तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता....

तेव्हाच समोरून एक माणूस चालत आला, त्या माणसाच्या हातात एक कोयता होता आणि तो हळू स्वरात गाणं म्हणत होता...

चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी !

"काय झालं तुला बाळा, भूक लागलीय का... ?? हा भूक लागली आहे, भूक तर मला पण खूप लागली आहे, पण तू बघ असा घाबरशील तर माझं पोट कसं भरेल, चल आता लवकर ये जवळ, अरे ये ना"....

त्या माणसाने त्या मुलाचा हात पकडला आणि खचकन कोयत्याने कापला, तो मुलगा तडफत होता, जोर जोराने रडत होता....

"अरे काय झालं इतकं का रडतोय तू , हे घे तुला खायचं आहे का..?? घे मग तू खा आधी"....

त्या माणसाने तो कापलेला हाथ उचलला आणि त्या मुलाच्या तोंडाचा इथं घेऊन गेला....

"हे घे खा अरे खा ना".... बाळा

तो मुलगा हलत नव्हता, रक्ताची नुसती धार सुटली होती.....

"अरे मेलास तू, ठीक आहे चल पण काळजी करू नकोस मी तुला वाया थोडी घालवणार, मी आहे की".....

अस म्हणत त्या माणसाने कोयता परत उचला आणि त्या मुलाच्या मानेला मारताच होता की.....

शुभम झोपेतून उठला, घामाघूम झाला होता..... तो रडायला लागला आणि रडत रडत म्हणाला.... " सांन्य "
शुभम चा लक्षात आलं की हे सर्व स्वप्न होत.. पण तो खूप घाबरला होता...

२१ जनवरी सोमवार २०१९

इथं न्यूज वर ही बातमी वाऱ्यासारखी पसरत चालली होती..दोन मुलं बेपत्ता ..किलर पाठवतोय मुलांचा घरी पत्र..... काय लिहलय त्या पत्रात??पोलीस कधी शोधून काढणार त्या मुलांना??पोलीस करतायत तरी काय??

शुभम चा फोन वाजला, तेव्हा शुभम झोपेतून उठून नुकताच तयार होत होता आणि तेव्हाच त्याने समोर न्युज वर बघितलं

"एक नाही दोन नाही पण एकत्र २२ छोट्या छोट्या मुलांच अपरहन झाला आहे, मुबई पोलीस अजूनही झोपेत आहे"....

शुभम ने पटकन फोन उचलला....अजिंक्य चा फोन होता..

"सर तुम्ही लवकर या, इथे खूप मोठा गोंधळ झाला आहे"..... अजिंक्य

शुभम पटकन पोलीस स्टेशन ला पोचला, पोलीस स्टेशनच्या बाहेर खूप गर्दी जमली होती.. मीडिया वाले ही कॅमेरे घेऊन थांबले होते.....

शुभम जसा गाडीतून उतरला, सगळे मीडिया वाले त्याच्या मागे धावत आले.....

"सर तुम्ही कधी पर्यंत असच हातावर हात घेऊन बसणार
आहेत ,?? आज ऐकून २२ मुलांचा अपहरण झाल आहे सर".... मिडियावाले

शुभम ने मीडिया वाल्याना काहीच उत्तर दिलं नाही, आणि तो आत मध्ये निघुन गेला..आतमध्ये ही नुसतीच गर्दी होती, ज्या २२ मुलांचा अपहरण झाल होत त्यांचे आई वडील सगळे तिथे जमले होते..
मोठमोठ्याने रडत रडत आमचा मुलांना शोधून काढा अशी भीक मागत होते..
शुभम आणि अजिंक्य ने कसतरी त्याना शांत केलं.
त्त्यांचा मुलांची सर्व महिती लिहून घेतली.
अजिंक्य ने जसं तसं लोकांना आश्वासन देऊन बाहेर काढलं......

"सर हे खूप आधी पासून प्लॅन केलेलं होतं, सर ज्या २२ मुलांचा अपहरण झाला आहे, त्यां सगळ्यांना तसच पत्र भेटलं आहे ..सर".... अजिंक्य

शुभम ला खूप राग येत होता, पण काय करावं नेमकं.....

"अजिंक्य २२ मुलांना घेऊन तो इतक्या लवकर मुंबईतुन बाहेर पडू शकत नाही, काहीही करून हा आपल्या हातातून सुटला नाही पाहिजे आज".....

"सर सगळी कडे नाकाबंदी आधीच केली आहे, तो मुंबईतून बाहेर जान शक्य नाही"..... अजिंक्य

थोड्या वेळ साठी स्टेशनमध्ये एकदम शांतता पसरली सगळे एकदम शांत उभे होते, तेव्हाच अजिंक्य हळूच बोलला....

"सर शाळेची आखी बस त्यांनी गायब केली".....

"अजिंक्य बस ड्राइवर चा काय पत्ता??".... शुभम

"नाही सर तो पण त्यांच्यासोबत गायब आहे"..... अजिंक्य

शुभम ने सगळी पत्र अजिंक्य कडून घेतली....

"अजिंक्य ही फक्त २१ पत्र आहेत आणि २२ मुलांचं अपहरण झाला आहे ना मग अजून एक पत्र कुठे आहे??...... शुभम

हे ऐकून अजिंक्य ने हळूच खिश्यात हात टाकला आणि एक पत्र काढल.....

"सर त्या २२ मुलांमध्ये एक मुलगा माझा पण आहे"...... अजिंक्य शुभमला पत्र देत म्हणाला

हे ऐकून शुभम चा घसा सुखला, त्याच्या कपाळावर घाम फुटला......

"सर हा जो कोण असेल मी त्याला सोडणार नाही"..... बोलता बोलता अजिंक्य च्या डोळ्यातुन पाणी आलं, तो रडायला लागला

शुभम ने अजिंक्य ने दिलेल पत्र वाचायला सुरुवात केली..

वैभव.... वय ६ वर्ष आणि ओळख बाप पोलिसवाला आहे......

अरे स्वतःचा मुलाला तर सांभाळू शकत नाही, दुसऱ्यांच्या मुलाला काय वाचवणार तुम्ही, पण असुदे तुझा मुलाला जेव्हा मो कापेन ना त्या आधी सांगेन मी त्याला तुझा बद्द्ल की बाळा चुकी माझी नाही तुझ्या बापाची आहे ज्यांनी मला वेळेवर धरलं नाही आणि आता काय माझी भूक वाढली त्यात माझी थोडी चूक आहे..... ????

" सांन्य "......

शुभम ने पत्र वाचून रागात हाथ टेबल वर मारला.......

-------------------------------------------------------------- To Be Continued ------------------------------------------------------------