lazyism Four pieces and One Joint Hand - 2 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 2

Featured Books
  • પ્રેમ અને મિત્રતા - ભાગ 2

    (પ્રથમ ભાગ માં જોયું કે રાહુલ એ નીરજા ને પ્રેમ કરે છે....અને...

  • સ્વપ્ન્સમ - ભાગ 2

    ગત. અંકથી શરુ......અનુએ આંખો ખોલી એ નામ હજી સુધી એના કાનમાં...

  • Dear Love - 3

    એક દિવસ મારા હોસ્ટેલના રૂમ પાસેથી એક છોકરી પસાર થઈ. તે એટલી...

  • લવ યુ યાર - ભાગ 74

    રહસ્યમય રીતે એક ગાડી મિતાંશની લગોલગ આવીને ઉભી રહી અને તે ગાડ...

  • સોલમેટસ - 7

    અદિતિના મૃત્યુનો આજે તેરમો દિવસ હતો. પરિવારજનો વિધિ પતાવી અન...

Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 2

= = = = = = = = = = =पात्र क्रंमाक एक = भाऊ= = = = = = = = = = = = = = =

त्यांना जे पूर्वापार चालत आलयं त्यात बदल करण्याचा भारी कंटाळा यायचा, त्याचं एकच आपलं नेहमीचचं “चालयं ते चालू दया”. बंडखोरी, विद्रोह या गोष्टी त्यांना स्वत:ला आवडत नाही आणि कुणी केली की ती खपवून घेत नाही, एकदा इमान राखला की बसं मग मरेपर्यंत तोच पक्ष, जे जसं चालतयं ते चालू दया, पक्ष म्हणतो तसं वागा, आपलं कोणतही वेगळं मत बनवायचचं नाही आणि मत मांडत बसायचंदेखील नाही, मत बनवण्याच्या प्रकियेत सहभाग झिरो, फक्त मत मानायचं एवढचं….. …..

भाऊंची त्या संपूर्ण शहरात चालते, काही प्रमाणात दहशत आहे, आमदार आहेत ते इथलें. इथल्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकून देण्याची जबाबदारी पक्षाने दिल्यापासून विभागवार बैठका, चर्चा, खाजगीत योजना आखणं वैगेरे जोरात चालू होतं, मागची तीस वर्ष इथं त्यांच्याच पक्षाची महापालिकेत सत्ता आहे राज्यात नव्हे, त्यामुळे अजून मंत्री पद काय असतं तो अनुभव नाही, भाऊचां होल्ड या अख्या एरियावर मागच्या पंधरा वर्षापासून, त्यांच्या अगोदर योगी होते कमालीचा वकुब होता त्यांचा पण, सध्या भाऊ जे काही वागतो बोलतो त्यावर योगीची छाप आहे असं लोक बोलतात, योगी काय माणूस होता, गरीबातल्या गरीबाबदल जाणं होती, दोन चार हाफ मर्डरसुदधा केल्या होत्या योगीने, तीन चार वेळा जेलची हवापण खाऊन आले होते, लोक म्हणतात असं केल्याशिवाय राजकारणात मोठं होता येत नाही, जेव्हा योगी जिंवत होते तेव्हा योगीची फुल हवा होती, लोक जाम मानायचे त्यांना, एका वेळानंतर जरा जास्तच मानायला लागले होते, आणि एके दिवशी काय झालं काय माहितं त्यांचा अपघात झाला, त्यांना हॉस्पिटलला दाखल केलं होतं, पण वारले ते, लोक म्हणतात इंटरनल पॉलिटिक्समध्येच त्यांचा खून करण्यात आला, पण हे सगळं लोक खाजगीतच बोलतात, अपघात वैगेर फक्त मिडियाला न्यूज बनवण्यापुरता, तेव्हा कुठं मिडिया एवढा पावरफुल होता, काहीजण म्हणतात पक्षानेच त्याला मारायला सांगितले पक्षापेक्षा वरचढ होत होते म्हणून, आता यात खरं किती आणि अफवा किती हे देव जाणो, पण आता योगीची कमी भाऊंनी भरुन काढली, पक्षाला माणूस भेटला, लोक आता भाऊला मानतात, भाऊ पण दिवस-रात्र बिझी असतो, आता इतके वर्ष महानगरपालिकेच्या का असेना पण सत्तेत असल्यामुळे सत्तेची एक चटक जी काही असते ना ती भाऊला लागली होती, लोकांनी मान सन्मान देणं, मोठया लोकांबरोबर उठ-बस असणं, पोलिस आणि बडया अधिकारी यांनी सल्लामसलत करणं, पैसा आणि जमिनीचे व्हवहार करणं, सगळं रोजचं होत, बरं या सगळ्या रामरगाडयात आपल्या आजूबाजूच्या सर्वसामान्य लोकांमध्ये, एकूण समाजात आपल्या इमेजाला धक्का न लागण्यासाठी विशेष खबरदारी घेणं अगदी सगळं व्यवस्थित चालू होतं, पण कोणत्याही परिस्थितीत भांऊना निवडणुकीत सत्ता गमावणं नापसंत होतं, आणि या वेळेला अन्टी एनकबन्सी फॅक्टर जोरात होता, अन्टी एनकबन्सी म्हणजे इतक्या प्रदीर्घ काळ सत्ता असल्यानंतर लोकांच मत बदलासाठी म्हणून सहाजिकच विरोधी पार्टीला जाणार अस एकूण वातावरण. भाऊंला ते नको होतं, त्यांला तो धोका नको होता, त्याचं पक्क होतं, साम-दाम-दंड-भेद….. काहीही म्हणजे काही ही करायला तयार होता भाऊ….. आणि तसं आजवर तो करत देखील आला होता ….. पण आता एक पिढी निघून गेली होती….. आता पक्षात आलेली नवीन पिढीतली पोरं जरा नव्या विचाराची नव्या रक्ताची आहेत, त्यांना संगळ इंन्सटट लागतं, त्यामुळे विचार जुळवताना खटकत असे….. साम दाम दंड भेद वापरताना खूप काळजी घ्यावी लागत होती, आणि भाऊ ज्या भागाचा आमदार होता त्या भागात तर अजिबातच त्याला विरोधी पार्टी वरचढ होताना नको होती.