lazyism Four pieces and One Joint Hand - 4 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 4

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 4

तारीख एकवीस डिसेंबर संपून बावीस डिसेबर सुरु (मध्यरात्र) :

पात्र क्रंमाक दोन = तुम्ही

आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा एक खून करणार, आपल्या हातून एका जिवंत माणसाचं आयुष्य संपणार, आपण खून करणार, काय फिंलिग आहे, त्यांने जन्माला यायचं आणि एकूण जगण्याचा प्रवास सुरु करायचा आणि कुठूनतरी तुम्ही त्यांच्या समोर उभे राहणार आणि आणि…. ढिंशक्यावं….. सकाळी उठून तडक खून करायचायं आणि डायरेक्ट गायब, कायतरी तुमच्या मनाचं आतल्या आत चाललं होत…. आणखी एका मनाशी, मनातून काहीतरी बाहेर पडू पाहत होतं, काय बरं ते, प्लॅन फिसकटला तर…… ऐन निवडणुकीच्या काळात पकडलो गेलो तर, पोलिसांनी तुडवतुडव तुडवला तर….. भाऊंनी मग अडचण नको म्हणून आपलाच गेम केला तर…. विश्वास तर ठेवावाचं लागेल, जसा भाऊने नवीन असून पण आपल्यावर ठेवला तसा…. नाय भाऊ असं नाय करणार…. असा पण तो कुठं हरतोय ही महानगरपालिका, आता टी. व्ही वर खूप सारी लोकं भाऊच्या बाजूने बोलत होते आणि एडवर्टाइजमेंट मध्ये पण भाऊ दिसत होते, प्रंचड मतानी निवडून देण्याची विनंती होत होती, सगळं काही बॅनर, पोस्टर माहौल एकदम जमून येत होता. एकदा का भाऊचा आपल्यावर विश्वास बसला की मग आपलं कोणीचं काही वाकडं करु शकत नाही आपण मस्त आरामात जगू, नव्याने काही करण्याची गरज लागणार नाही हे असं रोजचं धक्के खात जगावं लागणारं नाही, हजार-एक रुपयासांठी महिनोमहिने राबवं लागणार नाही. कधीतरी एखादं दुस-याला उडव्यायचं की बास….त्रास होईल सुरवातीला…. मग काय? सवय होईल् हळूहळू.

**********

तिसरा तुकडा – मतदान

तारीख तीन जानेवारी (सकाळी साडेसातची वेळ) :

निवडणुक सुरु झाली, गाडी एका शाळेजवळ थांबली, भाऊ आत घुसले, त्यांना पण मतदान करायचं होतं, झालं मतदान, बाहेर मिडियावाले माईक घेवून उभे होते, भाऊंचा लुक चेज होता, त्यांची मिशी उतरली होती, आता भाऊ योगीसारखा दिसत नव्हता पण निवडणुक प्रचाराला जुनेच फोटे लावले होते बॅनरला, भाऊला भीती होती, महानगरपालिका निवडणुक हरण्याची, चेह-यावरुन चिन्ह स्पष्ट दिसत होती. एन्कर विचारत होता या वेळेला किती मताधिक्याने जिकूंन याल, भाऊंने मागच्यापेक्षा नक्कीच जास्त येतीलच असं बोलत तडक गाडीत बसला. मुळात त्याला या सगळ्याची काही पडली नव्हती, त्याला काही ठरवलेल्या गोष्टी कधी एकदा आपल्या मनाप्रमाणे सुरळीत होतात यांची आस लागून राहायली होती. डाइव्हरला गाडी जोरात चालवायचा इशारा केला गाडीत बसता बसता.

**********

पहिला तुकडा – निवडणुका

तारीख बावीस डिसेबर रात्र संपली:

इकडे ज्यांला हॉटेल बाहेर तुमची पारख करायला ठेवलाय तो जो रिक्षात झोपला होता तो उठला आणि त्याने हॉटेलात विचारपूस सुरु केली, तुम्हाला मोबाईलवर कॉन्टेक करणं सुरु झालयं, हॉटेलवाल्यांनी सांगितलं तो जो माणूस होता तो सकाळी सहालाच गेला हॉटेल सोडून, भाऊच्या आफिसात फोन गेला, तो निघालायं हॉटेलवरुन पण आता तो नक्की तिथं साईमंदीराच्या इथं येईल का नाही कळायला मार्गं नव्हता, कोण शूटर…. म्हणजे तुम्ही…. तुम्हाला काय वाटलं तो सुमेध लाटकर… तो तरं येणारचं…. भाऊच्या ऑफिस मधून आदेश आला, सुमेध वर लक्ष ठेवण्याचा आणि तुम्हांचा माग काढायचा…. भाऊनें तुम्हाला फोन लावायला सांगितला त्यांच्या माणसाला…. फोन लागला…. पण कोणी उचलत नव्हतं…. भाऊचा तुमच्यावरुन विश्वास उडला…. त्यांची खात्री पटली तुम्ही घाबरलात…. भाऊचां माणूस बोलला “मला वाटलेलेच हा पळून जाईल, नवीन माणसांवर जबाबदारी नाय टाकायला पाहिजे होती, ती पण निवडणुकीच्या टाईमाला….” भाऊंच मन काही असं मानायला तयार नव्हतं ते बोलले “नाही किमान आठ वाजेपर्यंत साईमंदीरला रहा उभे….बघू नंतरच नंतर….काळजी घ्या बाहेर काही एक कळता कामा नये… कुणी गेम केला ते”

तारीख बावीस डिसेबर (सकाळ):

स्थळ साईबाबा मंदिर

पात्र क्रंमाक तीन = सुमेध लाटकर

इथं भाऊंचा माणूस सव्वासातपासून साईमंदीरच्या समोरच्या चायच्या टपरीवर बसला होता देखरेखीला, इकडं तो अपक्षवाला यायला निघाला मंदिराकडे, त्यांच्या अंगात एक नवीनच उत्साह होता, घरात जमलेल्या लोकांना तो सांगत होता “जवळजवळ पंधरा वर्ष झाली पक्षासांठी काम करुन, तन-मन-धन सगळं वाहून घेतलं, राबराब राबलो, काय कमी नाही केलं, जॉब संभाळत सगळं केलं, लाठयाकाठया झेलल्या, मार खाला, राडे केले, पक्षाच्या मिंटीगीच्या टाईमला संतरज्या उचल्या, एकच आशा होती आज ना उदया पक्ष दखल घेईल, देईल काम बघून तिकीट, पण नाय! सगळा खेळ पैशाचा, नाय आपल्याकडे तेवढा पैसा, पण पोर तर आहेत ना सपोर्टला, आता तरी दया, पण नाय, आम्ही म्हणायचो आमचा पक्ष पैसे घेत नाय, पण हल्ली तिकीट मिळवण्यापासून पैसे चारावे लागतात वरपासून खालपर्यंत, या भाऊंला दाखवून देऊ कार्यकत्याची ताकद काय असते, पैसा लागतो काय?, माज उतरवतो की नाय बघं यांचा, सूर्यनगरचा एक तरी वोट पडतो काय बघ भडव्याला, अरे तो आकाशातून देव बघत असतो, तुमचे धंदे काय लोकांना माहित नाय काय?, काय करोडोने कमवता काय?, फॅक्टरी हाय की बापांची इस्टेट हाय एवढे कमवायला?, नुसते याला धमकवं….. त्याला लुबाड एवढंच हयाचं कर्तृत्व…. साईबाबाला नवस केलाय जर निवडून आलो तर येणा-या भंडाराचा खर्च आपण उचलतो बघ…. या प्रंशात किमरेला….. हा त्यालाच….. भांऊला……भनचोदला दाखवून देईन सुमेध लाटकर काय चीज आहे ते,” तो हे संगळ त्यांच्या बरोबरच्या दहा पंधराजणाना सांगत होता, तयारी झाली होती साईमंदीराकडे जाण्यासाठी. एका बिल्डरने यांना पैशाचा सपोर्ट केलाय या टाईमाला अशी खबर होती, बिल्डरसाठी सुमेध लाटकरचं निवडणुक लढवणं लॉटरीच्या तिकीटासारखं होतं, जर का सुमेध हरला तरी त्याला जास्त काही फरक पडणार नव्हता पण जरा का सुमेध जिकूंन आला तर मग त्या बिल्डरवाल्याचीं चांदी झाली समजा, सुमेधने आता पैसे लोकांना वाटायला सुरवात केलीय.

(टीप: पुढीलपैकी किंवा वरचा वाचनात येणारा एक परिच्छेद खोटा आहे, कोणता ते माहित नाही)