lazyism Four pieces and One Joint Hand - 7 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 7

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 7

समाप्त............

आज इतकी वर्ष उलटून गेली पण या खूनाचा आरोपीच सापडला नाही, पोलीस रेकार्डला कुणाचंच नाव नाही, सुमेधच्या घरांच्यानी, नातेवाईकांनी, एरियातल्या लोकांनी कोणताही प्रयत्न केला नाही.

आता तिथं भाऊचीं एक हाती सत्ता आहे, शहरातला कोणताही नवा प्रोजेक्ट भाऊंच्या संमतीशिवाय पुढे जात नाहीत, आता फोटोशापचा वापर करत भाऊंचा आणि योगीचा एकसंध फोटो झळकवलाय बॅनरला…..


**********

बौधिक: सामान्या जनता, आळस आणि गैरसमज

अंनत फंदी यांच्या “बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गं सोडू नको” किंवा “ठेविले अनंते तैसेची रहावे” या तुकोबाच्या ओळीचा आधार घ्यावा लागण्याइतपत परिस्थिती खालावलीय, आळशीपणामुळे प्रगती थांबते ही सगळी थोंताड आहेत, इतर सुविचार संपले की आम्ही एकच लिहायचो ‘अभ्यासाला कंटाळा म्हणजे भाग्याला कंटाळा’. दररोज येणारी संपादकीय, इतर बातम्या यांनी भरलेल्या वर्तमानपत्राचा वापर निव्वळ सणाच्या दिवशी ठरवून तेलकट पु-यासाठीच्या टोपल्यात तेल शोषून घेण्यासाठी वापरायचा, आम्ही मतदान करतो का तर आम्ही ईथले रहिवाशी आहोत यांचा पुरावा राहावा म्हणून, भाऊसारखी काही लोक झोपडपटटी यांसाठी वाढवतात की वोटबँक तयार व्हावी. बरं जर जास्त जर धोका वाटला की ही लोक आपल्याला मत देणार नाय तर मग काय आपोआप निवडणुक यादीतून एरियातली काही ठराविक नाव गायब करायची. साम-दाम-दंड-भेद, भाऊ बोलतो आपण नाय रिस्क उचलू शकत, एकदा का एक निवडणूक गाफील होऊन हरलो मग पुढचं सगळं मुश्कील होऊन जाईल, पोपटाचा जीव पिंजरात आहे, एकदा का तो पिंज-याबाहेर पडला की तो मेला, तसा भाऊचा त्यांच्या इमेज मध्ये होते हे खरयं, त्यांची मिशी ठेवण्याची स्टाईल आहे ती, इथल्या एका स्वर्गीय मानल्या जाणा-या नेत्याशी मिळती जुळती आहे, योगी नाव त्याचं, भाऊ पोस्टर पण तशेच लावतो, पण आता पैच झाला होता भाऊचां आजारी बाप वारला होता, अजून बॅनर तयार नव्हते, आणि मिशी सकट डोक भादरणं गरजेचं होतं, पण जरा का मिशी काढली तर आपण योगीसारखं दिसणारं नाही आणि आपण हरु अशी भिती वाटत होती, आणि बिना मिशीचे फोटे जर बॅनरवर लागेल तर लागलीच वाट, भाऊलां वाटयचं की, “ही जर का निवडणुक हरलो, तर मग येणा-या पुढच्या सगळ्या निवडणुकीचा अंदाज बदलून जाईल, मिडीयावाले आहेतच हैराण करायला तो तावातावाने बोलायचा “च्यायला आईच्या गांडीचे आडाखे बांधतात, यांच्या बापाने अंदाज काढलेला एका महानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन वर्षानंतर होणा-या राज्याच्या निवडणुकीचा अंदाज घ्यायला”.

आळसवादांचे आदर्श दाखले आणि शाश्वतपणा

जर काही छंद जोपासायचे असतील तर नख वाढवायचे, केस वाढवायचे, दाढी वाढवायचे करा, जेणे करुन आळसावादाला चालना मिळेल, त्यासाठीचं एकूण वातावरण तयार होईल, हो आळसवाद हेच सांगतो, तुम्हाच्या अस्तित्वाच्या खुणा अशाच असायला हव्यात, कोणी काही ही म्हणो. नाहीतरी इथं जगणं महत्तवाचयं, उदयाचा कसला ही भरोसा नसताना तुम्ही काय निष्पन्न करु पाहत आहात याला काही अर्थ नसतो, त्यातून जसे आहात तसेच रहा, सगळं जगचं नश्वर आहे तर मग नवनिर्मितीचा ध्यास का? कशाला सगळं जे गाडलं गेलय ते उपसत त्याचे अर्थ लावत बसायचे, मोठमोठाल्या पानाची पुस्तक वाचायची, त्यातले थोडसं मग शाळेच्या पुस्तकात धडे म्हणून पोंराना वाचायला लावायचं, राग आला की दहा दहा वेळा गिरपटायला लावयाचं, गाळलेल्या जागा भरायला लावायच्या आणि मग सगळं चूकलं की नापास आणि ज्याचं संगळ बरोबर तो पहिल्या नंबराने पास आणि जो नापास तो आळशी, अश्या पदधतीने चालणा-या शिक्षणावर का अवलंबून राहायचं, मग शाळेला दांडी मारायची, देवापुढं रोजची एक अगरबत्ती लावली की मग त्यांच्या भरोश्यावर दयायचं सोडून, कशाला उगाच काय करायला जावं. मुळात आळसवाद नकळत मानणारा खूप मोठा समाज आज आजूबाजूला दिसत असतो, आठवडाभरानंतर येणारा अख्खा रविवारचा दिवस अंथरुणावर लोळून काढणारी पिढी, एकदम अलगद येणारी हवीहवीशी वाटणारी जाभंई आली रे आली की काळ-वेळ न बघता मिटणारे डोळे, नवीन कोणती ही जबाबदारी अंगावर न घेता सरकारला दोषी ठरवणारा नवयुवक वर्ग, एखादा जवळचा शॉटकट माहित असलेली हमरस्त्याचा वेळ वाचवणारी गल्ली शोधणारे, उगाच अख्खं पुस्तक वाचून काढण्याऐवजी टिपण देणा-या नोटस बनवणारी पब्लिकेशनस, रोजचं भाजी-कालवण करण्याऐवजी चन्याच्या पोळ्यावरं जेवण आटपण्या-या बायका, गाडी जरी जोरात चालत असली तरी एकदा चढवलेला एक्सीलेटर कमी करायला वैतागलेला चालक, सरकारी कचेरीतला आता उदया या म्हणून सांगणारे सरकारी बाबू, सकाळपासून भाडं नाकारत एकाच जागेवर दिवसभर रिक्षात बसून गप्पा गोष्टी करत असलेले रिक्षाचालक, बाहेर धो धो पडणा-या पावसासोबत घराच्या छपरातल्या एका गळक्या कोप-यातून पडणा-या थेंबाला बादलीत साठवत एप्रिलपासून “आता छप्पर बदलू, आता छप्पर बदलू” च्या वल्गना करणारी मंडळी. तुमच्या आतमध्ये आळसवाद खोलवर मुरत जातो असा समाज बघितला की. आळस, का आणि कशाला या प्रश्नांची उत्तर न शोधण्याची मस्त सोय करतो, नसत्या उठाठेवी करायच्या नाहीत, “असेल हरी तर देईल खाटल्यावरी” हे ब्रीद वाक्यं बनतं, एखादं आसपासच चागलसं लॉटरीचं दुकान बघावं, प्रत्येक वेळी न लागण्या-या आकडयासोबत पुढच्यावेळी नक्की लागेल असं मनातल्या मनात समजूत काढत पुढील लॉटरीच्या तिकीटासाठीच्या पैशासाठी नवीन गि-हाईक शोधावं, रस्त्यांनी रणरणत्या उन्हात हातगाडी ओढणा-या माणसाकडं निव्वळ तुच्छेतेन पाहावं. “ग्रह तारे चांगले असावे लागतात, आपल्या हातात थोडी असतं ते, तो वरचा जुळवतो संगळ, अरे हे माझं ते माझं, हे हाय ते हाय असं म्हणारी माणसं मरतात बघ एका झटक्यात, आजकाल कुणाचा भरोसा नाही, तरणीताठी पोरं हार्ट अटैकनी मरतात” ही अशी बोलणी कानात साठवून ठेवायची. एकदम आळसवादाला पूरक असणारा समाज.