The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
प्रतीक्षा तुझ्या आगमनाची डॉ. स्वाती अनिल मोरे शिव पार्वतीच्या लाडक्याची आतुरता समस्त जनाला गौरी नंदनाच्या आगमनाची एकदंत , लंबोदर सुखकर्ता तूच दुःखहर्ता आम्हा सर्वांचा पालनकर्ता देवता तू बुद्धीची म्हणूनच व्यासांनी महाभारत लिहितानी निवड केली उमापुत्राची... भक्तांची विघ्न हारणारा त्यांसी संकटातून तारणारा, विघ्नहर्ता, तूच अधिपती प्रत्येक शुभ प्रसंगी पूजन तुझे प्रारंभी उच -नीच ,गरीब- श्रीमंत विसरुनी धर्म अन् जात तुझ्या दरबारात नतमस्तक सारे होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात आगमन तुझे घराघरात करण्या स्वागत तुझे सारी सृष्टी ही नटली बरसून मेघराजाने जणू दिली तुझ्या आगमनाची वर्दी नेसलासी पितांबर गुलाबी रंग तयाचा असे सोन्याहूनी पिवळे उपरणे त्यावरती शोभून दिसे आवड तुझी लक्षात घेऊन नैवेद्याची केली तयारी छान उकडीचे मोदक अन् पंचपक्कवांन्न यांनी सजले केळीचे पान चरणी अर्पण केली हिरव्या दूर्वांची जुडी तुझ्या आरतीची लागली आम्हा गोडी लाडक्या लंबोदराला मूषक वाहन शोभते हरपून भान, रूप तयाचे डोळ्यात मी साठवते अर्पून फुलं,फळं,हार,दुर्वा बाप्पाला मी पूजते. स्वागत पार्वती नंदनाचे चला थाटात करूया "गणपती बाप्पा मोरया" असे जोशात म्हणूया...
*मी "ट्रेकिंग" नावाची कविता लिहली आहे..हा व्हिडिओ त्या कवितेतील काही कडवी वापरून बनवला आहे... background स्वतःची कविता, स्वतः वाचून दिला आहे*
मेरे दिल का सुकून हो आप! मुझ पे जो सँवार हैं , वो जूनून हो आप! जिसे माँगू दुवाओ में,वो गुजारिश हो आप!! ❤️❤️ Dr.Swati More
अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा डॉ. स्वाती अनिल मोरे दिन हा भाग्याचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा दिवस पारतंत्र्याचे बघितले ज्यांनी मोल स्वातंत्र्याचे जाणीले त्यांनी अनेकांनी देऊनी प्राणांची आहुती उभारली ही स्वातंत्र्याची गुढी सलाम त्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाला ज्यांनी आयुष्य वाहिले या लढ्याला.. सार्थकी लागले त्यांचे बलिदान आपण अनुभवतोय स्वतंत्र हिंदुस्थान.. उत्सव तीन रंगाचा आज देशभर होतोय साजरा जयघोष हा भारतमातेचा आसमंती निनादावा सण हा स्वातंत्र्याचा चिरायू व्हावा
रक्षाबंधन डॉ. स्वाती अनिल मोरे एक नाजुकसा धागा गुंफतो अतूट नात्याची गुंफण प्रेम आणि विश्वासाची घट्ट वीण मनगटी भावाच्या बांधते बहिण जन्मभर करीन रक्षण बहिणीला ,भावाचे हे वचन आनंद आणि उत्साहाचा सण आज रक्षाबंधन...
पुस्तकाचं नाव : स्वामी लेखक : श्री. रणजीत देसाई प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस पुस्तक परिचय : डॉ. स्वाती अनिल मोरे "स्वामी" ही थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथा. लेखक रणजित देसाई यांची पहिलीच ऐतिहासिक कादंबरी. यानंतर त्यांनी "राधेय", "श्रीमान योगी" यांसारख्या उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिल्या, पण समाजात त्यांची ओळख निर्माण झाली ते "स्वामी"कार म्हणूनच! थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. राखेतनं उठून आकाशाकडे झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाबद्दल आपण ऐकलंच असेल. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अश्याच एका फिनिक्स पक्ष्याची - थोरल्या माधवराव पेशव्यांची ही कहाणी... दौलतीच्या जिव्हारी चटका लावणाऱ्या पानिपतच्या पराभवानंतर झालेलं अमाप नुकसान, अवघ्या १०-११ वर्षांत भरून काढत देशात पुनश्च मराठा वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या तडफदार पेशव्याचं राजकीय आयुष्य जितकं दैदिप्यमान, थरारक घटनांनी भरलेलं, तितकंच हृदय पिळवटून टाकणाऱ्या, करुण,नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं गेलं.. सद्गुणी , तेजस्वी, कर्तव्यदक्ष,लहान वयातही अगदी मुरलेले राजकारणी माधवराव... स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा... सोशिक, त्यागी, पतिव्रता रमाबाई या तिन्ही व्यक्तीरेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. रमाबाई व माधवराव यांच्यामधील भावपूर्ण प्रसंग वाचताना डोळ्यांच्या कडा पाणावतात . त्या दोघांमधील शृंगारीक प्रसंगही लेखकाने त्यांच्या खास शैलीतून जिवंत केले आहेत.. त्या दोघांमधील काही संवाद तर परत परत वाचण्यासारखे आहेत... ‘‘रमा, ज्या मार्गानं तू जातेस, तो डोळे भरून बघ. वाटेनं तुला सागराचं दर्शन होईल. किनाऱ्याकडे सारखा झेपावणारा तो सागर बघ. प्रत्येक ठिकाणचा सागर तुला वेगळा भासेल. प्रत्येक ठिकाणचा किनारा बारकाईनं पाहिलास, तर वेगळा आवाज देईल. काही ठिकाणी सागराचा प्रमत्तपणा तुला दिसेल; काही ठिकाणी त्याच्या आवाजात व्यथा व्यक्त होईल." " मृत्यू हा अटळ आहे." जीवन वा मृत्यूच भय बाळगणा-याला समृद्ध जीवन जगता येत नाही. जीवन किती वर्षे जगला, ह्यापेक्षा कसं जगला ह्याला महत्त्व आहे. तसं नसतं, तर चंदनाचं नावही राहिलं नसतं, सा-यांनी वटवृक्षाचं कौतुक केलं असतं.." "स्वामी" मूळे रमा-माधव ही जोडी अजरामर झाली... रमाबाई सती जात असतानाचा प्रसंग, स्त्री असो वा पुरुष कोणाचंही हृदय पिळवटून टाकेल.. एवढ्या ताकदीनं उभा केला आहे ... त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य या दोहोंची सांगड घालत विणलेला दिमाखदार शेला आणि त्या शेल्याला रमा-माधव नात्याची नाजूक किनार म्हणजे "स्वामी".. मराठा इतिहास, पेशवाई यांबद्दल कुतूहल आणि जिव्हाळा असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी, अशी ही रणजित देसाई लिखित नितांत सुंदर कलाकृती.. या तरुण पेशव्याचा ( थोरले माधवराव) अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे" -- ग्रॅंट डफ "इतिहासाबद्दल सर्वांना प्रेम वाटते. ऐतिहासिक प्रसंगांमुळे, ऐकलेल्या कथांमुळे कांही व्यक्तींचा ठसा मनावर उमटतो; पण जेव्हा आपण एखादी विशिष्ट ऐतिहासिक व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून इतिहासाचे अवलोकन सूक्ष्मपणे करू लागतो, त्यावर चिंतन करू लागतो, तेव्हा कल्पना व सत्य यांतील अंतर जाणवू लागते. माधवरावांच्या कालखंडाचा अभ्यास करीत असता मला हे जाणवले. हा अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तकांची, बखरींची गरज लागते." ...... रणजित देसाई
एक स्त्री का समर्पण सिर्फ, उसकी पसंद के समक्ष होता है इसके बाद समझौता ही एकमात्र विकल्प है खुद से, समाज से और जिंदगी से.. .....स्वाती
किसीने मुझ से पूछा, कितनी मोहब्बत है तुझे तेरे उनसे हंसकर हमने कहा, मैं क्या बताऊ , मेरे लिये क्या है वो.. सुबह का पहला ख्याल और रात की आखरी सोच हैं वो... .......स्वाती -Dr.Swati More
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser