The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
तो &ती -कथा : गरिबीचे चटके आपल्या सताळ उघड्या नेत्रांनी ती त्या कौलारू घरात शिरणारा लहानसा कवळसा पाहत होती. मे महिन्यातली तप्त उन्हे तापमानात आता परमोच्च शिखरावर होते. ओसाड असलेल्या त्या कौलारू खोलीत ती मध्यभागी निजून होती. तीच्या बाजूलाच कवळश्याचा लहानसा टीपका पडला होता. ती मूर्तीसारखी निश्चल होऊन पापणीही न लवता फक्त वर कोळ्यांच्या जाळ्यांनी घेराव घातलेल्या भिंतीला पाहत होती. खोलीत गर्द काळोख पसरला होता.. ठीकठिकाणी छिद्रे दिसत होती. मुळातच गर्भश्रीमंत असलेली ती.. या सर्व प्रसंगामूळे तीच्या मनाचा कोंडमारा होत होता. दोन महिन्यापूर्वी असलेली तिची गुलाबाची काया आता पार बदलून गेली होती. चेहऱ्यावरील रेषा खोल गेल्या होत्या.. तीचा स्वच्छ आकर्षण चेहरा घामाने डबडबला होता. हाताला मोठमोठाली फोडे आली होती. जागोजागी चटके बसून तळहात लालसर झाली होती. एवढ्यात दारावर एक थाप पडली तशी ती हर्षउल्हासित झाली.. तीला वाटलं 'तो' आला असेल. तिने जराही वेळ न दवडता दरवाजा उघडला. बाहेर कुणी दारुड्या वासनागंध नजरेने तीला पाहत होता. तीच्या अंगाला सश्याचा कंप सुटला. तिने लागोलाग दरवाजा बंद केला आणी कितीतरी वेळ तशीच एकटीच रडत होती. एका तासाने दार पून्हा वाजलं.. यावेळी तीला जाणवलं की तो आला आहे. त्याला सरळ चालणही होत नव्हतं. तो घरचा एकुलता एक होता आणी अभ्यासतही अव्व्ल म्हणून त्याने कधीही अंगमेहनतीच काम केलं नव्हतं पण आता पळून लग्न केल्यावर हे सर्व सोसावं लागतच होत..काही वेळात दोघेही जेवायला बसली. त्याला पाठ भिंतीला टेकवून बसायलाही त्रास होत होता " काय रे फारच अंगमेहनततीच काम केलंय का?" ती त्याच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाली " नाही गं " तो कृत्रिम हास्य आणत फक्त एवढंच म्हणाला. तीचा हात जवळ घेत त्याने डोळे मोठे करून विचारले " तुझ्या हाताला एवढी फोळे कशी काय आली ". अश्रूचा एक थेंबही बाहेर येऊ न देता ती म्हणाली " अरे! मला अशी चुलीवर स्वयंपाक करायची सवय नाही ना.. होईल सवय हळूहळू " त्या दोघांना एकमेकांच प्रेम तर मिळालं होत परंतु गरिबीचे चटके त्यांना जोरदार चपराक लावत वास्तवाची अनुभूती करत होती. समाप्त --- निखिल देवरे
तो & ती --कथा : सुखाची झोप गर्द थंडगार आम्रतरुच्या झाडाखाली तो तीच्या मांडीवर डोके ठेवून शांत पडला होता. तीच्या गालावरची खळी त्याला वेड लावत होती. तीच्या बोलक्या सावळ्या रूपावर तर त्याचा प्राणही अर्पण होता. ती त्याच्या केसातून हात फिरवत होती आणी तो तिला घट्ट बिलगून सुखाच्या झोपेत कणाकणाने विरघळत होता. त्या दोघांचे हृदयबंध घट्ट जुळले होते. एवढ्यात त्याच्या पाठीत कुणाचीतरी जोरदार लाथ बसली तसा तो खाडकन अर्धवट झोपेतून जागा झाला. " काम करायचं सोडून झोपतात हे हरामखोर " मालक चिडून म्हणाला. तसं त्याने चेहऱ्यावर पाण्याचा सपकारा मारला आणी सिमेंटची पोती उचलायला सुरवात केली.अंग पार वाळून गेलं होत. फक्त हाडाचा सांगाळा उरला होता. गरिबीमुळे जे मिळेल ते काम तो करत होता. रात्री काहीही न खाता तो तसाच झोपी गेला. काहीही केलं तरी त्याला झोप येतच नव्हती. तिच्या आठवणींचा एक एक मणी पुढे पुढे सरकत होता. त्या सर्व आठवणींच्या सावल्या डोळ्यापुढे नाचत होत्या. रात्रीचे दहा वाजता तो उठला. पोटात भुकेने खड्डा पडला होता. अंगावर जीर्ण टी शर्ट चढवला. तसाच चालत चालत तो बाजूच्या वडापावच्या गाड्यावर गेला. दोन वडापाव कागदात बांधून घेतले. ईतक्यात बाजूच्या पिझ्झा हटच्या रिसॉर्टवर एक कार येऊन थांबली. त्यातून ती उतरली.. भूतकाळातल्या ओळखी आता नाहीश्या झाल्या होत्या. तिच्यासाठी त्याच अस्तित्व नामशेष झालं होतं. तीच्या नजरेत त्याच महत्वही शून्य होतं. तिने त्याला वळूनही पाहिजे नाही. मुळात तिचे त्याच्यावर लक्षच नव्हते. तीच रूप आत पूर्णतः बदललं होत. अंगावर मौल्यवान दागिने लखलखत होते. तीच लग्न श्रीमंतांच्या घरी झाल्यामुळे ती झोपडीतून महालात गेली होती आणी तो बाबांच्या दुखण्यामूळे मिळेल ते काम करत होता. त्यामुळे शिक्षण आणी सरकारी नोकरीच स्वप्नही आधीच भंगल होत. सोबतच प्रेमही दुरावल होत. त्याची सुखाची झोप कायमची संपली होती तर तिला फक्त आणी फक्त श्रीमंतीतच सुखाची झोप येत होती. समाप्त. --निखिल देवरे For audio story on youtube visit: nikhil deore stories
अनपेक्षित प्रवास पहाटेच्या हवेत जरासा गारवा भिनला होता. डिसेंबरची थंडी तशीही जराशी बोचरीच असते आणी त्यातही जर पाऊस पडून गेला असेल तर काही सांगायची गरजच नाही. रस्त्याच्या कडेला उभा राहून तो बसची वाट पाहत होता. श्वेत धुके सर्वत्र पसरले होते. दुर्तफा असलेली झेंडूची शेती मनाला फार प्रफुल्लित करत होती. मोगऱ्याच्या वेलीवरचे दवबिंदू हिऱ्यासारखे लख्ख चकाकत होते. " हा तिसरा महिना तिला न पाहण्याचा" तो स्वतःशीच म्हणाला. त्याचा चेहरा लगेच दुःखाने ओढल्यासारखा झाला. "कदाचीत एक दिवस आधी आपण जर तिला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या असत्या तर किती बरं झालं असतं. नाहीतरी दुसऱ्या दिवशी आपण तिच्याशी बोलणारच होतो आणी त्याच दिवशी तो जीवघेणा अपघात.. देवा किती हा भयंकर योगायोग.. कुठे गेली असेल ती.. या जगात आहे की नाही? आपल्याला तर तीच्याबद्दल काही ठाऊकही नाही.. देवा! तुझी कृपादृष्टी कायम तिच्यावर असू दे "तो स्वतःशीच म्हणाला. त्याच्या मनाच्या डोहात चिंतेच्या लहरी निर्माण होत होत्या. तो आणी ती दररोज एकाच बसमधून प्रवास करत होते.. जवळपास एक - दोन किलोमीटरच ते अंतर असेल. त्यानंतर बस एकाजागी थांबत असे आणी मग त्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे होऊन जायचे. तो तेथून ऑफिसला जायचा आणी ती तीच्या बँकेत कामाला जायची. काही जवळीक फार क्षणीक कालावधीत होऊन जाते. तसंच त्यांच्याही बाबतीत होतं.. त्याला तीच नाव सोडून काहीही ठाऊक नव्हतं.. संवादही फार क्वचित व्हायचा..काही संवाद तर फक्त नजरेतून किंवा हसण्यातूनच व्हायचा. त्याचा Love at first sight वर विश्वास होता म्हणून तो दुसऱ्या दिवशी प्रेमाची कबुली देणार होता पण दुर्दैवाने त्याच दिवशी त्या बसचा अपघात झाला.. तो काही बोलायच्या आधीच अभद्र घडलं. सुदैवाने तो तर त्या अपघातातून बचावला परंतु तीचा काही पत्ता लागत नव्हता म्हणून तो जरासा हतबल दिसत होता. एवढ्यात समोर बस येऊन थांबली..ढगाळ, लाल, पिवळ्या रंगाचे स्वेटर, मफलर घातलेले लोक बसमध्ये चढत होते. खिन्न मनाने तो ही बसमध्ये चढला. बसमध्ये आधीच फार गर्दी होती म्हणून त्याला बसायला सीट मिळालीच नाही.. तो तसाच तिच्याच विचाररम्यजगात बसमधल्या गर्दीत एकटाच उभा होता. त्याच्या जगात तिचाच चेहरा होता. ईतक्यात त्याला काही वेगळं जाणवलं. त्याची नजर पून्हा गरगरली.. हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. त्याच्या बाजूच्याच कोपऱ्याच्या सीटवर ती बसली होती. अर्ध्या चेहऱ्यावर पट्टी गुंडाळून होती. त्याला पाहून ती हसली त्या हसण्यातही वेदना होत्याच.. तिला पाहून तोही मनोमन सुखावला. बसमल्या उभ्या पोलच्या एका बाजूला तीचा हात होता तर पोलच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या हाताची बोटे तीच्या बोटांना स्पर्श करीत होती. दोहेही ऐकमेकांच्या नेत्रात आकांत बुडाली होती. चेहऱ्यावर समाधान होत. हा अनपेक्षित प्रवास त्याला आणी तिला फार प्रमोदीत, हवाहवासा वाटत होता. समाप्त निखिल देवरे
तो आणी ती : जुन्या आठवणींचा अल्बम " काय दडलंय रे नक्की या जुन्या आठवणींच्या अल्बममध्ये... का मन अजूनही तिथेच रमतंय. काळ, वेळ आणि माणसं सर्वच तर बदलीय मग का छळतो अजूनही तो जुन्या आठवणींचा अल्बम " बऱ्याच दिवसांनी whatss up वर तिचा msg खणाणला होता. एरवी सदैव तिच्या msg ची वाट पाहणारा तो.. आता मात्र त्या आठवणीच्या अल्बममधून बाहेर पडला होता. अलगद msg type करून तो म्हणाला " जुन्या आठवणींचा अल्बम म्हणजे मनात त्या क्षणाचा असणारा गारवा, हृदयाच्या पटलावर कोरलेले विविध मनोहर सप्तरंग , जुन्या आठवणींचा अल्बम तुम्हाला जगण शिकवतो, तुम्हाला प्रेरणा देतो, त्यात रमून जाऊ नको फक्त त्याला अलवार स्पर्श कर .. त्याचा तुला तिटकाराही वाटणारा नाही आणि त्रासही होणार नाही " त्याच ते उत्तर वाचून तिच्या चेहऱ्यावर निखळ हास्य खुललं होतं. ती सुद्धा त्या जुन्या आठवणींच्या अल्बमातील पानांना अलवार स्पर्श करू लागली. यावेळी तिला तो जुन्या आठवणींचा अल्बम त्रासदायक वाटत नव्हता. 😊😊 Nikhil D
तो आणी ती : भातुकलीच्या खेळामध्ये सर्वत्र दिवाळीचा झगमगाट होता. घरोघरी पणतीच्या चंदेरी प्रकाशाने अंगण आणी परिसर कसं उजळून निघाल होत. गावात फार तूरळक आकाशकंदील घरावर लोंबलेले दिसतात तरी आता यावर्षी हे चित्र बरंच पालटलं होत.आकाशकंदीलाची जणू लांबलचक रांगच गावात दिसत होती. त्याची ही तिच्याशिवाय पहिलीच दिवाळी होती. काळकुट्ट नभात फटक्याची आतीशबाजी व्हायची तसं त्याच्या काळजावर दुःखाचे चरे उमटायचे. बालपणासून तर आत्तापर्यंत प्रत्येक दिवाळी त्यांनी सोबतच साजरी केली होती पण आता परिस्थिती बदलली होती. ती ही शेजारून त्यालाच पाहत होती.. फरक फक्त एवढाच होता आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र होत. अंगणात दिव्याच्या प्रकाशात सर्वजण फटाके उडवत होते. काही लहान मूले तिथेच भातूकलीच्या खेळात मग्न होते. तिथला प्रत्येकजण उल्हासाने दिवाळी साजरी करीत होता आणी 'तो'... तो..मनातल्या मनात जळत होता. विरहाचा अग्नी जरी पेटला असला तरीही त्याने वरून स्वतःला स्थीर ठेवलं होत. अलगद हळूच ती त्याच्या अंगणात आली. त्याच्याघरचे सर्वजण तिला ओळखतच होते. तिने कापऱ्या शब्दात त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानेही तिला हसून पुनःश्च शुभेच्छा दिल्या आणी बोट दाखवत म्हणाला " किती निरागस असतात ना ही लेकरं स्वच्छ मनाने भातुकलीचा खेळ खेळतात कसलाही मुखवटा न चढवता ..नाहीतर आता चेहऱ्यावर किती मुखवटे चढवतात लोक. हा भातुकलीचा खेळ म्हणजेही गंमतच आहे हो ना? ". दुःखी स्वरात ती म्हणाला " हो ना! हा भातुकलीचा खेळ म्हणजे गंमतच आहे.. या खेळात कसंलच आईवडिलांच मनावर ओझं नसतं.. या खेळात निदान मनासारखा नवरा तरी निवडता येतो.. नवरा म्हणून त्याला हाकही मारत येते" ती तशीच वायुवेगाने माघारी वळली आणी तो फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत होता. समाप्त
आता कुठे रमतोय " आता कुठे रमतोय रे तू ? म्हणजे हल्ली कधी बोलतच नाही. आधी किती बोलायचो ना आपण.. आता कधी बोलणं होतंच नाही. अजूनही रागावला आहेस का ? " आपल्या रेशमी केसांना दूर सारीत 'ती' म्हणाली. चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती. कदाचित बऱ्याच दिवसांनी त्याला पाहिल्यावर तिच्या मनाच्या स्वच्छ आकाशात काळजीचे ,हताशेचे आणि आठवणींचे काळपट ढग जमले होते. मनाचे घट्ट जुळलेले बंध जेव्हा दुरावतात तेव्हा त्याच्या धूसर प्रतिमा माणसाच्या चेहऱ्यावर थोंडात दिसतातच ' तो ' ही त्याला कुठे अपवाद ठरणार होता. तिच्या शब्दांनी तो मात्र जरा चपापलाच. चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणत तो म्हणाला " कुठे रमतोय.....रमतोय या सकल विश्वाच्या कृष्णधवल शलाखेत , रमतोय या सुंदर उमललेल्या बकुळसुमनांत , रमतोय या कोवळ्या पर्णरंधाच्या शीतल छायेत , रमतोय या विस्तीर्ण धबधब्याच थंडगार जल अंगावर घेत , रमतोय ईथल्या विहगांशी गप्पा करीत ,रमतोय या रंगीबिरंगी इंद्र्धनुष्याला स्पर्श करीत ,रमतोय ईथल्या पाषाणावर आठवणींच्या खुणा मोजत ,रमतोय आता स्वतःच्या जगात " ताडकन उठून तो आता दूर जाऊ लागला. नेत्रांच्या कडा अश्रूंनी पाणावल्या होत्या पण त्या कधीही तिला दिसणार नव्हत्या...... NIKHIL D
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser