(मागच्या भागात फ्लाईट लेफ्टनंट एकलव्य यांचे मिशन मध्ये नाव अभिमन्यू ठेवले होते पण एकेठिकाणी नजर चुकीने अभिमन्यू ऐवजी एकलव्यच लिहिले गेले आहे त्याबद्दल क्षमस्व.)
आता झाले असे की पुढे आलेले सारथी आणि प्रद्युम्न जमिनीला ९०° कोन करून गुरुत्वाकर्षणाला मात करून वेगाने जात होती आणि त्यांच्या मागे पाकिस्तानचे ४ F16 falcons कुत्र्यासारखे मागे लागले होते पण आधी सांगितल्याप्रमाणे या चार कुत्र्यांच्या मागे अर्जुन आणि अभिमन्यू दबा धरून बसलेल्या बिबट्या सारखे होते.
अर्जुनाच्या 'तेजस'मधील रडार स्क्रीनवर तो एफ-१६ (F-16) वेगाने नाचत होता.
Arjun: "Sarthi, this is Arjun. We are in a vertical climb. I have the tail-end Falcon in my sights. Target is locked!"
Sarthi (Lead): "Copy, Arjun. Maintain your pitch. Don't let the G-force break your focus. Do you have a clear solution?"
Arjun: "Affirmative. He doesn't even know I’m here. Requesting permission to release the Baan."
अर्जुनच्या 'तेजस' विमानाचा रडार आता ओरडू लागला होता. त्याने जोयस्टिकवरील ट्रिगरवर बोट ठेवलं. शत्रूचा F-16 आता पूर्णपणे त्याच्या जाळ्यात होता.
Arjun: "Sarthi, I have a visual. Target is locked. My Baan is hungry for the kill!"
Sarthi (Lead): "Steady, Arjun. Wait for the tone... wait for it..."
सगळी विमान सूर्याच्या दिशेनेच उडत होती. सारथीला (डी. आशूला) महाभारतातील तो संवाद आठवला जिकडे कृष्ण अर्जुनाला सांगतो,"तो बघ सूर्य आणि तो बघ जयद्रथ. उडव त्याचे डोके."
Sarthi (Lead): "Arjun, switch to Open Channel. Let them hear their end."
ओपन चॅनेल सुरू केल्यावर भारतीय पायलटचे बोलणे पाकिस्तानी पायलटना सुद्धा ऐकू जाणार होते.
Sarthi : "Arjun, behold the sun! And there is Bloody falcon! Take his head off!"
अर्जुनने श्वास रोखला, 'हेड-अप डिस्प्ले' (HUD) वरील तो गोल शत्रूच्या विमानावर स्थिर झाला आणि अचानक कॉकपिटमध्ये एक सलग आवाज घुमला— 'पीप-पीप-पीप-पीप!' अर्जुनने कॉकपिटमधील स्विच फिरवला. त्याच्या डिस्प्लेवर 'PY-5 ARMED' असा संदेश झळकला.
Arjun (On Open Frequency): "Falcon Leader, this is Arjun. Your time is up. My Baan is coming for you. Goodbye."
आपल्या हँडलवरची कॅप काढून लाल बटन दाबले आणि पायथॉन ५ आपल्या लक्षाच्या दिशेने उडाले. पायथॉन ५ हे ५ व्या पिढीचे अस्त्र (5th Gen Missile) आहे. हे जगातील सर्वात प्रगत 'Short Range Air-to-Air' मिसाईल्सपैकी एक आहे. हे मिसाईल फक्त उष्णता शोधत नाही, तर शत्रूच्या विमानाची 'प्रतिमा' (Image) देखील ओळखते. त्यामुळे शत्रूने कितीही 'मायावी कवच' (Flares) वापरले, तरी हा नेम चुकत नाही. हे विमान आपल्या पाठीमागे असलेल्या शत्रूवरही डागता येते.
F-16 Fighting Falcon अत्याधुनिक विमाने होती. मिसाईल त्याच्या दिशेने येतंय अशी त्याला वॉर्निंग येऊ लागली पण पायलटला काही कळायच्या आत पायथॉनने आपले काम केले. पाकिस्तानचे एक F-16 Fighting Falcon खाली पडल. त्याच्या बाजूच्या पाकिस्तानी पायलटला कळले की काहीतरी घडतंय, त्याने ओपन चॅनेल वरचे संभाषण सुद्धा ऐकले होते. त्याने आपली दिशा बदलली.
Sarthi (Lead): "Arjun, stay in formation. Abhimanyu, hold your position. Do not engage until I give the command. We need to assess their next move..."
पण सारथीचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अभिमन्यूने वेगवान वळण घेतले आणि दिशा बदलेल्या पाकिस्तानी F16 फाल्कन च्या मागोमाग नेले.
Abhimanyu: (रेडिओवरील आवाज थरारक पण शांत होता) "Sorry Sarthi, but this one is mine. He’s trying to flank Arjun. I won't let him."
Sarthi (Lead): "Abhimanyu, stay back! That's an order! Break your lock now! I repeat stay back."
पण उशीर झाला होता. अभिमन्यूच्या कॉकपीट मध्ये आवाज घुमला. पी पी पी पी पी. अभिमन्यूच्या बोटाने ट्रिगर दाबला होता.
Abhimanyu: "Ummm negative. Python-5 away! Hunt him down!"
हे पायथन ५ एखाद्या भुकेल्या शिकाऱ्यासारखं सुसाट सुटलं. पाकिस्तानी F16 फाल्कन च्या मागे मागे ते जाऊ लागले आणि शेवटी ते त्याच्या इंजिनमध्ये घुसले. दुसरे विमान पडले.
Sarathi (lead): "Abhimanyu! You just broke the formation!"
Abhimanyu: "Enemy is down, Sarthi. That’s what matters, right?"
सारथी निरुत्तर झाला पण आता सारथीच्या कॉकपीटमध्ये बीप वाजू लागला. सारथी आणि प्रद्युम्नाच्या मागे असणाऱ्या पाकिस्तानी F16 फाल्कन विमानांमधील एकाने सारथीच्या विमानावर आपले टार्गेट लॉक करून मिसाईल सोडले. ही आपल्या पायथन ५ सारखेच उष्णतेचा माग घेणारे अमेरिकेत बनलेले AIM-9 Sidewinder होते.
ATC (Krishna): "Sarathi! Break left! Break left! Launch-warning! One IR signature detected on your six. It’s a Sidewinder! Range 2 miles and closing fast!"
One your six म्हणजे सारथीचे विमान १२ कडे तोंड करून आहे तर घड्याळाच्या आकड्यांप्रमाणे ६ म्हणजे अगदी मागच्या बाजूला होय. मिसाईल सारथीच्या अगदी मागून येत होते.
Sarthi (Lead): "Copy, Krishna! I have the spike. Pradyumna, break formation! Perform a high-g break. I’ll take the heat! I repeat break formation."
सारथीने आपल्या 'तेजस'चे इंजिन पूर्ण क्षमतेने सुरू केले म्हणजे Afterburners on केले. Afterburners म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर टर्बो बूस्ट. यात होते असे की विमानाच्या इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या गरम exhaust gas मध्ये जास्तीचे इंधन फवारले जाते परिणामी विमानाला मोठा थ्रस्ट मिळतो.
Sarthi (Lead): "Arjun, Abhimanyu, the Sidewinder is closing in! I need maximum energy. Afterburners... ON!"
Arjun: "Copy that!"
सारथीने थ्रोटल पूर्णपणे ओढला आणि विमानाने आवाजाचा वेग मागे सोडला. त्याच्या मागे असलेल्या sidewinder मिसाईलने इंजिनच्या उष्णतेचा वेध घेत आपला वेग वाढवला. आकाशात मिसाईलच्या धुराची एक पांढरी रेघ सारथीचा पाठलाग करत होती.
Krishna: "Sarthi, it's gaining on you! 1.5 miles... 1 mile! Deploy countermeasures now!"
Sarthi (Lead): "Not yet... wait for it... let him get closer..."
जेव्हा मिसाईल अगदी जवळ आले, तेव्हा सारथीने आपल्या विमानाला अचानक एका 'बॅरेल रोल' (Barrel Roll) मध्ये टाकले आणि एकाच वेळी 'Flares' चा वर्षाव केला.
Flares म्हणजे उष्णतेचे गोळे ज्यांचे तापमान विमानाच्या इंजिनमधून निघणाऱ्या उष्णतेपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे heat seeking missile गोंधळून जाते आणि ते त्या गरम flares ना जाऊन धडकते. पण अमेरिकन F16 falcon मधून सोडलेले ते प्रगत मिसाईल होते त्यामुळे सारथीने बॅरेल रोल केले होते. बॅरेल रोल म्हणजे विमान अचानक स्वतःच्या अक्षाभोवती ३६०° फिरते म्हणजे रोल करते आणि एका लूप मध्ये फिरते.
तर झाले असे की सारथीने flares सोडल्यामुळे sidewinder missile आधी गोंधळले पण प्रगत असल्याने त्याने आपल्या लक्षाकडे प्रवास सुरू केला. त्यातच सारथीने बॅरल रोल केल्यावर त्याच्या विमानाचा वेग अचानक कमी झाला आणि ते स्वतःच्या अक्षाभोवती ३६० अंशात फिरत flares सोडत पुढे निघाले. खरेतर असे केल्याने मिसाईल आपला वेग कमी करू शकत नाही आणि ते पुढे निघून जाते पण हे थोडे प्रगत होते. अचानक वेग कमी होणे, विमान रोल होणे त्यामुळे बदलती दिशा आणि कोन यामुळे मिसाईल भरकटले आणि फ्लेअर्स वर जाऊन धडकले.
BOOM! आकाशात एक प्रचंड स्फोट झाला. Sidewinder ने आपले लक्ष्य चुकवले होते.
(क्रमशः)