A farewell like this. - 7 in Marathi Thriller by Ashish Devrukhkar books and stories PDF | एक निरोप असाही... - 7

Featured Books
Categories
Share

एक निरोप असाही... - 7

चौघे लगबगीने वॉर रूममध्ये आले. भारताचे CDS व्हिडिओ कॉलवर होते.

"So worriers, what is the plan?"

"Let's dodge that bloody Falcons." फ्लाईट लेफ्टनंट एकलव्य जवळजवळ ओरडलाच.

"That's the spirit."

"Thank you sir."

"Whats the plan."

"History will be repeated." डी. आशू

"म्हणजे?"

"१९६५ च युद्ध, जर फॉलैंड नैट त्यावेळच्या बलाढ्य F-86 सैबर पाडू शकतात तर मग आपले 'तेजस' काय कमी आहेत का?"

"समजलं. जेटवर काय काय लोड करून हवंय?"

"२ तेजस एम. के. २ वर २ २ पायथॉन ५ मिसाइल्स."

"हिट सिकर्स पायथॉन ५?

"हो. एकूण चार हवेत."

"दिले. आणखी काय?"

"२ केएच ५९एमके."

"विंग कमांडर आपल्याला विमान पाडायची आहेत, बोटी नाही उडवायच्या."

"असू दे तरीही हवीत."

"ओके २ तेजस २ वर २ पायथॉन ५ आणि बाकी दोघांना २ २ केएच ५९ एमके मिसाइल्स."

"Right."

"what about the name of operation?"

"ऑपरेशन चक्रव्यूह."

"ओहह, चक्रव्यूह करून उडवायचे ह्यांना."

"हो."

"विंग कमांडर डी. आशू. पदानुसार तुम्ही उच्च आहात तर ह्या ऑपरेशनची जबाबदारी तुमची. इतर तिघे विंग कमांडरचे आदेश ऐकतील."

"Yes sir."

     अवघ्या तासाभरात चारही तेजस तयार झाले. शेवटची चारही पायलटस् ची मिटिंग सुरू झाली. विंग कमांडर डी. आशू बोलत होता.

"स्कॉड्रन लीडर सत्यजित तुझे नाव अर्जुन आणि तू पायथॉन ५ लावलेले तेजस घेऊन उडणार आहेस."

"Yes sir."

"स्कॉड्रन लीडर केदार तुझे नाव प्रद्युम्न आणि तू केएच ५९ एमके मिसाईल्स लावलेले तेजस घेशील."

"ओके."

"आणि फ्लाईट लेफ्टनंट एकलव्य तू असणार आहेस अभिमन्यू आणि पायथॉन ५ लोडेड तेजस तुझ्याकडे असणार आहे."

"ओके."

"तुमचे नाव नाही सांगितलेत."

"मी फक्त सारथी."

"ओके."

"गरज असेल तरच सीमारेषा पार करायची. नाहीतर नाही."

"हो."

     नंतर सगळी रणनीती त्याने सगळ्यांना समजावून सांगितली. चौघे आपापल्या तेजसमध्ये बसले. इतक्यात ATC मधून संदेश आला. 

ATC : "Sarthi, Pradyumna, Eklavya, Arjun... this is Krishna. Do you read me?"

Sarthi (Lead): "Loud and clear, Krishna. Sarthi is ready for takeoff."

Pradyumna: "Krishna, this is Pradyumna. Systems green. Signing in."

Eklavya: "Eklavya here. Weapons armed. Ready for the hunt."

Arjun: "Arjun is online. Target locked in sight. Let's do this."

Krishna (ATC): "Excellent. The battlefield is yours. Operation Chakravyuh is a GO. All units, you are cleared for immediate departure. Godspeed. Out."

Sarthi (Lead): "Copy that, Krishna. Operation Chakravyuh, signing in. Out."

    चारही तेजस उडाले. अरबी समुद्रावरून ते पाकिस्तानच्या सीमेच्या दिशेने निघाले. ATC मधून संदेश आला.

ATC (Krishna): "Flight, be advised. You are painted on Pakistan's radar. I repeat, you are on enemy radar. Out."

Sarthi (Lead): "Copy that, Krishna. Initiating defensive measures. Out."

ATC मधून कृष्णचा गंभीर आवाज हेडफोनमध्ये घुमला. 'तुम्ही पाकिस्तानच्या रडारवर आहात,' हा इशारा मिळताच कॉकपिटमधील वातावरण तणावपूर्ण झाले. 'कॉपी दॅट,' म्हणत सारथीने आपल्या सहकाऱ्यांना सावध केले आणि चारही तेजस विमानांनी शत्रूच्या नजरेतून सुटण्यासाठी आपली दिशा बदलली.

Silent mode ही एकप्रकारची युद्धनीती आहे. यात विमाने आपली रडार बंद करतात जेणेकरून त्यातून निघणाऱ्या waves शत्रूच रडार नाही पकडणार त्यामुळे त्यांना त्याचा पत्ता नाही लागत आणि रेडिओ सुद्धा बंद केला जातो, म्हणजे ATC शी अजिबात संपर्क नसतो. त्यांनी याचा विचार केलेला होता आणि शत्रू सुद्धा प्रगत आणि तयारीत आहे, त्यामुळे त्यांनी ही रणनीती वापरत आणायची नाही असे ठरवले. आपण त्यांच्या रडारवर दिसावे या उद्देशाने ते उडत होते.

    ही चारही विमाने जशी पाकिस्तानच्या रडारवर दिसू लागली तसा पाकिस्तान ATC कडून त्यांच्या लढाऊ विमानांना F-16 फाल्कन जी सीमेवर घुटमळत होती त्यांना संदेश गेला.

"जनाब, ४ काफिर आ रहे है. ओव्हर."

F-16 पायलट : "आने दो. पहले तीन आये थे, भाग गये. चार बनके आये है. इनको भी भगाएंगे. ओव्हर."

"इंशा अल्लाह. ओव्हर"

"कोनसे घोडे पै आये है. ओव्हर"

"जी, तेजस ही है. ओव्हर."

"लोकेशन बताओ. ओव्हर."

"जी जनाब."

     लोकेशन दिल्यावर पाकिस्तनाची ६ पैकी ४ F-16 Fighting Falcon ही त्या दिशेने आली. तेजसमधल्या चौघांना रडारवर समजले की समोरून चार विमान येत आहेत.

सारथी ने म्हणजेच डी. आशू ने सूचना केली, "Guys, be ready. 1,2,3. Go go go."

  विंग कमांडर डी. आशूचा इशारा मिळताच अभिमन्यू आणि अर्जुन म्हणजचे फ्लाईट लेफ्टनंट एकलव्य आणि स्कॉड्रन लीडर सत्यजित ह्यांनी आपले विमान उलटे फिरवून भारताच्या दिशेने हाकले तर सारथी आणि प्रद्युम्न म्हणजेच विंग कमांडर डी. आशू आणि स्कॉड्रन लीडर केदार ह्यांनी सरळ आकाशात वरती झेप घेतली.

पाकिस्तान रडारवर नजर ठेऊन असलेल्या ATC कंट्रोलर ने F-16 ला संदेश दिला, "जनाब, २ डरपोक भाग रहे है. ओव्हर."

"भगोडे कही के, हा हा हा हा. दोनो पे नजर बनाये रखना. ओव्हर अँड आऊट."

"बेहतर जनाब. ओव्हर अँड आऊट."

खरतर अभिमन्यू आणि अर्जुन दोघेही परत नव्हते फिरले. सारथी आणि प्रद्युम्न आकाशाच्या दिशेने जमिनीला ९० अंशाचा कोन करून वर जाऊ लागले तसे पाकिस्तानचे रडार वरती तोंड करून फिरू लागले. ह्या दोघांना मारायला पाकिस्तानची चार F-16 Fighting Falcon त्यांच्या मागोमाग उडू लागली. इकडे अभिमन्यू आणि अर्जुन अचानक समुद्राच्या दिशेने वेगाने खाली आले. त्यामुळे झाले काय की ते पाकिस्तानी रडारवर दिसायचे बंद झाले कारण रडार वर उंच आकाशात जाणाऱ्या सारथी आणि प्रद्युम्नला कव्हर करत होते.

पाकिस्तान ATC : "जनाब, २ काफिर रडारसे गायब हो गये. गिर गये लगता है. ओव्हर एंड आऊट."

"बहोत खूब. आउट."

   लगेच पाकिस्तानच्या वायुसेनेचे ट्विट,

"भाग गये भगोडे."

     लागलीच भारतीय वायुसेनेचे उत्तर आले,

"Just wait and watch."

ATC कडून मिळालेल्या संदेशाचे पाकिस्तानी पायलट खुश झाले आणि वेगाने तेजसचा पाठलाग करू लागले. सगळं कसं १९६५ च्या युद्धासारखे चालले होते. अभिमन्यू आणि अर्जुन समुद्राच्या पृष्ठभागावर अगदी जवळून परत पाकिस्तानच्या दिशेने उडू लागले. जसे ते वर सरळ उडणाऱ्या पाकिस्तानी विमानाच्या खाली आले तसे ते त्यांच्या मागे आले. म्हणजे झाले असे की अगदी वरती सारथी आणि प्रद्युम्न होते, त्यांचे मागे पाकिस्तानची ४ F-16 Fighting Falcon आणि आता त्यांच्या मागे अर्जुन आणि अभिमन्यू. अर्जुन ने पुढे उडणाऱ्या एका F-16 Fighting Falcon वर निशाणा लावला आणि सारथीला संदेश दिला.

(क्रमशः)