(टीप: हा पूर्ण लेख माझ्या बहिणीने तिच्या वहीत लिहिला होता तो मी आता तो तुमच्या पुढे प्रस्तुत करत आहे ..आवडल्यास comment मध्ये कळवा..)
पार्ट :१
आयुष्य किती रोचक आहे ना।
म्हणजे आपण जसा विचार करतो तसं ते असेलच असं नाही. बऱ्याचदा आपण स्वतःला खुप चांगलं समजत असतो, आपल्याला आपलं जीवन समजायला लागलयं असं वाटायला लागते. "आपण याच भ्रमात असतो की "येवढं काय आहे, सगळ करता येईल!" पण काही वेळा यातचं आपलं चुकतं. आयुष्यात जसा आपण विचार करतो, किंवा ज्या प्रमाणे आपल्याल्या वाटतं असतं गोष्टी घडतील म्हणून तसं खुप कमी वेळाच होत. खुप काही अनपेक्षित !
अशा वेळी मग आपण हताश व्हायला लागतो. सगळ माझ्याच सोबत असं का होतं?" असाच विचार करतो. आणि करतच जातो. आणि सतत नशिबाला किंवा स्वतःला दोषी ठरवतो." माझचं चुकलं" "माझ नशिबचं साथ नाही देत' वगैरे वगैरे.
पण याच वेळी आपण जो वर्तमान आहे तो का विसरतो? का आपण हा विचार नाही करत कि "जे झालं ते झालं, सध्या माझी स्थिती काय आहे ते मला बघायला हवं. मी आत्ता खुश असलं पाहिजे माझा प्रेसेंट मी आनंदी करायला हवा."
खरं बघायला गेले तर मला असंचं वाटलं कि जे काही सुख आहे ते फक्त वर्तमानात जगण्यातच आहे. झाला ते भुतकाळ आणि येईल ते भविष्य यांचा काहीच अंदाज नाही. आपण फक्त प्रेसेंटमधे स्वतःला आनंदी ठेवू शकतो. बाकी पुढचं आयुष्य कुणी बघलय आणि जे काही घडून गेलं भूतकाळात ते आपण कधीच बदलू शकणार नाही. मग आयुष्य जे काही आहे ते "आज" आहे. याचा अर्थ असाही नाही कि आपण भविष्याचा विचारही करू नये, करावा : अर्थातच.
पण त्याबद्दल चिंता नको करायला. भविष्याची फक्त प्लॅनिंग करावं. बाकी जे व्हायचं आहे ते आपण प्रसेंट मधे जे करत असतो त्यावरच अवलंबून असतं की। आता राहिला विषय भुतकाळाचा तर जे घडलं त्यातुन अनुभव घेवून त्याचा उपयोग पुढे आयुष्य सुरळीत करण्यासाठी करता येतोच ना मग जे घडले ते बदलता येणं शक्य नसतांना सुद्धा सतत असं घडलचं का?" नव्हतं व्हायला पाहिजे असं आपण असाचं विचार करतो. म्हणजे असे विचार आपण मुद्दाम करतो असं नाही पण त्यांचा विचार किती वेळ करायचा हे सर्वस्वी आपल्या हातातच असतं. आणि स्वतःला यासाठी तयार करणं कुछ कठीण असलं तरी अशक्य आहे असं मला तरी वाटत नाही. "आपली मनस्थिती आपण बदलू शकतो." या वाक्यावर जय विश्वास ठेवला ना की ते बदलणं काही जास्त अवघड नाही. आणि आपल्या मनाला वर्तमानात आणले कि सर्व काही सोपं होऊन जाईलच... फक्त विश्वास असायला हवां आपला आपल्यावर... फक्त आनंद शोधन आपलं काम बाकी कृष्ण आहेच. नं... तो सगळ सांभाळून घेईल :!!
पार्ट : 2
आज एक खुप सुंदर विचार ऐकला,
" माणसाचं मन मोठं असलं ना कि सगळं काही सामावून घेता येत "....
किती सुंदर आणि मार्मिक वाक्य आहे ना. प्रत्येकाने जर याचा अवलंब केला तर नात्यातील मदत मतभेद, दुरावा आणि गैरसमज नाहिसेच होतील, ज्याप्रमाण मला याचा अर्थ समजला आहे यानुसार म्हणायला गेलं तर माणसानं नेहमी समोरच्या व्यक्तिला समजून घ्यायला हवं. त्याच्या समस्या, अडिअडचणी न सांगता समजायला हव्यात आणि एकंदरीतच समोरच्या व्यक्तिच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं याचा विचार करूनच प्रत्येकाशी वागायला हवं. माझ्या म्हणण्याचा अर्थ नेमका असाही नाही की, आपण मुद्दाम हून कोणाला चुकिच बोलतो किंवा वागतो. बयाचदा हे सगळ आपल्याकडून नकळतच घडत असतं पण तरी सुद्धा आपल्या मनातच जर चांगलेपणा असेल तर आपण एकदम कोणासोबत वाईट वागणे शक्यच नाही.
किती वेळा अस होत न कि आपण खुप चांगले असतो, आपले विचार आणि ज्ञान सगळं काही योग्यच असतं पण काही वेळा आपली त्यावेळची मनस्थिती योग्य नसल्यामुळे आपण नकळत रागावतो आणि समोरची व्यक्ती दुखावली जाते. मग आपलं मन आपल्यालाच खायला उठतं मी असं नको होतं करायला म्हणून. त्यावेळी फक्त मग आपल्याला पश्चात्तापच बघायला मिळतो आणि दुसयाच्या मनात आपल्या विषयी कितीतरी गैरसमज व्हायला लागतात.
पण जर आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा अहंकार नसेल तर आपण स्वतहून त्या व्यक्तिची माफी मागू शकतो. एकंदरीत आपण त्या व्यक्तिला समजून घेवू शकतो. आणि समजा काही वेळा आपल्यावर असा प्रसंग आला तर त्या बोलण्याचा राग न धरता त्या व्यक्तिच्या रागवण्याच कारण समजून घेतो. आणि तसं घेतलं पाहिजे उगीचच चुकिच्या गैरसमजूती करुन घेण्यापेक्षा समोरच्या माणसाला एक वेळ नक्की समजून घेवून माफ केलं तर आपलाही मनस्ताप कमी होईल श्राणि आपल्याबद्दल कुणाच मतही वाईट होणार नाही.
काही गोष्टी नाहीच झाल्या आपल्या मनासारख्या तर जास्त विचार करण्यापेक्षा त्यावर काही उपाय निघू शकतो का याचा विचार केला तर किती बरं होईल...
खुप वेळा आपण स्वतःवरही नाराज असतो. स्वतः वरून सुद्धा खुप काही अपेक्षा ठेवतो. नाही होत काही वेळा ते पूर्ण याचा अर्थ आपण कमी असा नाही.
फक्त काही सुधारणा कराव्या लागतील येवढेच पण आपण तेच डोक्यात धरून बसलो आणि विनाकारण स्वतःला त्रास देवून वेळ वाया घालवतो या साठी आपण स्वतःला समजून घेणं सुद्धा खुप गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला आपले प्रोब्लेम्स समजलील आणि सुधारता येतील आणि स्वतःला आनंदी ठेवता येईल......
To be continued.....