Is there no power in the Mangalsutra? in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंगलसुत्रात ताकद नाही?

Featured Books
Categories
Share

मंगलसुत्रात ताकद नाही?

घटस्फोट? मंगळसुत्र कमजोर पडत आहे की काय?
       
         *आजचा काळ पाहिल्यास लवकरात लवकर फारकती होतात. आजकालचे विवाह टिकत नाहीत. म्हणतात की मंगळसुत्रात ताकद असते. तसंच मंगळसुत्र कमजोर पडत चालले आहे. जे प्राचीन काळापासून सशक्त स्वरुपाचं होतं. कालच्या प्राचीन काळातील स्रियांनी मंगळसुत्राच्या ताकदीच्या भरवशावर प्रसंगी पती चित्तेवर सतीपण भोगलं. परंतु मंगळसुत्राची अब्रू जावू दिली नाही. ती ताकद आहे मंगळसुत्रात. ती ताकद मंगळसुत्र वापरलेल्या महिलाच जाणू शकते. आजही ती ताकद आहे. परंतु ज्याला समजतं त्याचं महत्वपण. त्यालाच मंगलसुत्राची ताकद कळत असते. इतरांना नाही. कारण विवाहाचे उलट फेरे मारायचे झाल्यास मारताच येत नाही.*
         चित्रपटं..... काही चित्रपटं ही विरगुळा व्हावा, म्हणून निर्माण होतात. ज्यात विनोद असतं. काही चित्रपटं ही बोधात्मकच असतात. असा काही बोध देवून जातात की तो चित्रपट पाहिल्यानंतर चिरकाल स्मरणात राहतो तो चित्रपट. एक चित्रपट असाच आला होता. घटस्फोटाबाबतच होता. ज्यात मुलानं मुलीला घटस्फोट म्हणताच तिलि राग आला व ती न रागवता त्याला म्हणाली की ज्याप्रमाणे आपण विवाह केला व गाजावाजा केला की आमचा विवाह होतोय. फेरेही मारले की आम्ही विवाह करुन जन्मोजन्मीचे साथीदार बनणार. तीच विधी आता फारकत घेतांना करावी. पत्रिका छापाव्यात. सर्वांना वाटाव्यात व ज्याप्रमाणे विवाह होतो वा केल्या गातो. तसंच घडवावं. मात्र विवाहाचे फेरे उलटे मारावेत आणि घेतलेली वचनं एक ऐक करत तोडावीत. म्हणजे फारकतही माहित होईल लोकांना. तिनं तसंच केलं. ज्यातून त्या पती असलेल्या पुरुषांची नाचक्की चित्रपटाच्या माध्यमातून जगाला दिसली. परंतु तो चित्रपट होता. खक्ऱ्या जीवनात तसं घडत नाही. कारण भीती असते बदनामीची. 
         प्राचीन काळात मंगलसुत्रात ताकद होती. तशी ताकद आजच्या काळात मंगळसुत्रात राहिलेली नाही. कारण महिला या मंगळसुत्र बांधून घेतांना त्याच्याकडे गंमतीनं पाहतात. एक चित्रपट असतो तसा. शिवाय विवाह झाल्यानंतरही पतीवर प्रेम न करता व त्याला पती न मानता केवळ व्याभिचार करीत फिरत असतात. ते विवाहाला गंमतच समजतात. ज्यातून विवाह तुटतात. आजचे विवाह हे गंमत, मनोरंजन म्हणून होत असतात, असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. केवळ विवाहानंतर मनोरंजन आणि विरंगुळा यालाच जास्त प्राधान्य दिलं जात आज. संसाराला वा संसार करण्याला महत्व दिलं जात नाही.
          खरंच आजचेही विवाह हे मनोरंजन व विरंगुळेच करण्यासाठी असावेत काय? खरंच आजच्या मंगळसुत्रात पुर्वीसारखी ताकद नाही काय? खरःच मंगळसुत्राचा धागा पुर्वी जसा चमत्कार करीत होता. तसा चमत्कार आज करीत नाही काय? पुर्वीची मंडळी एवढी अज्ञानी होती काय की ते मंगळसुत्राचा मान राखत होती? अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत व न्यायालयात फारकतीच्या वाढत्या प्रमाणातील खटल्यानुसार ही बाब एक चिंतेची बाब ठरत चाललेली आहे. त्यातच खरंच विवाह तुटावे काय? विवाह करतांना बांधण्यात येणारा धागा हा कुचकामी ठरावा काय? भारतात राहणाऱ्या मुलीनं मंगलसुत्राच्या धाग्याकडे गंमत म्हणूनच पाहावे काय? ती आपली परंपरा नाही काय? याचं उत्तर आजच्या काळानुसार नाही असंच येईल. विशेष म्हणजे आपण भारत देशात राहतो व आपली संस्कृती पवित्र आहे. ही संस्कृती आपल्याला कधीच वात्रट वागणं शिकवीत नाही. जरी ती रुढीवादी असली तरी. ही संस्कृती आपल्याला व्याभिचार शिकवीत नाही. जरी आपल्या देशात पाश्चिमात्य संस्कृतीनं प्रवेश केला असला तरी. 
         इंग्रज भारतात आले. तशी पाश्चिमात्य संस्कृती भारतात आली. त्या पाश्चिमात्य संस्कृतीनं आपल्याला स्वतंत्रता शिकवली. माणसाला माणूसपण दाखवलं. स्री ही पुरुषांची अर्धागिनी जरी असली तरी ती गुलाम नाही असंच शिकवलं. त्यातच पुरुषांनी व स्रियांनी अनेक पती केले तरी चालेल हेही शिकवलं. परंतु ज्या भारतात आपण राहतो. त्या भारतानं आपल्याला आनेक पत्नी बनविण्याची बाब शिकवली नाही. आता प्रश्न पडतो की अनेक पत्नी करणं भारतीय संस्कृतीनं शिकवलं नाही तर पुर्वीची मंडळी अनेक पत्नी का करायच्या? त्याचं उत्तर आहे युद्ध. युद्धात अनेक स्रियांचे पती मरण पावत. काही स्रिया स्वखुशीनं सती जात तर काही सती न जाता विधवेचं जीवन पत्करत. अशातच त्याही स्रिला विधवेचं आयुष्य जगावं लागू नये म्हणून तिच्याशी विवाह करुन तिला आधार देण्याची पद्धती अवलंबली गेली. याचा अर्थ स्री ही गुलाम होती, असा होत नाही. 
         भारताची संस्कृती ही महान आहे. तशी पाश्चिमात्य संस्कृती नाही. तेथील वातावरण उष्ण वा दमट असल्यानं त्यांना अःगावर कपडे सहन होत नाही. शिवाय काम उत्तेजक भावना जास्त असल्यानं तेथील स्री पुरुष अनेक पती वा पत्नी करीत असतात. कारण त्यांची संस्कृतीच तशी आहे. तशा स्वरुपाची आपल्या भारत देशाची संस्कृती नाही. राहिला प्रश्न मंगळसुत्र नावाच्या धाग्याचा. जो धागा गळ्यात सहन न होताही स्रिया त्याची मर्यादा पाळून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीनही ऋतू मंगळसुत्र वापरत असतात. कारण तो धागा जरी असला तरी त्याची गरिमा खुप मोठी आहे.
         आपण भारत देशात राहतो व या देशात पुर्वीपासूनच वचनाला अतिशय महत्व आहे. आपल्या प्राचीन काळातील महापुरुषांनी प्रसंगी जीवं दिलीत, परंतु आपली वचनं मोडली नाहीत. म्हणूनच ही संस्कृती महान झाली आहे व ठरली आहे. आपल्या भारतात विवाह हा करार नाही. कारण विवाह करतांना आपल्या भारतात शक्यतोवर मोडले जात नाही. एक सृजाण स्री विवाह हा मोडत नाही. तिला मोडताच येत नाही. जी त्या विवाहाचं पावित्र्य जाणते. भारतातील विवाहाला एक मंगळसुत्रासारख्या काळ्या धाग्यानं बांधलेलं आहे व तसं केलं असल्यानं शरीराला व मनाला एक अलौकिक शक्ती येते. ती शक्ती कधीच उध्वस्त होत नाही. खुद्द तो धागा ज्यानं बांधला. तोही त्या धाग्याला नष्ट करु शकत नाही. तो धागा जर गळ्यात असेल तर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण करता येतं. शक्यतोवर विवाहीत स्रिच्या कोणीच सहजासहजी वाट्याला जात नाहीत. बराच विचार करतात नव्हे तर करावा लागतो. कारण एक विवाहित स्री दुर्गा व कालीचं रुप असते. मग असं असतांना आजच्या काळातील विवाह का तुटतात?
          आजच्या काळातील विवाह त्यांचेच तुटतात. ज्यांना मंगळसुत्राचं पावित्र माहित नाही. असे विवाह त्यांचेच तुटतात. ज्या स्रिया विवाहानंतर आपलं मंगळसुत्र कुठेही काढून ठेवतात. त्यातच त्या धाग्याला गंमत समजतात. परंतु हा धागा म्हणजे गंमत नाही. आज न्यायालयात घटस्फोटाचे खटले उभे राहात आहेत. विवाह करतांना वचन घेणारे व शपथा घालणारे विवाह पटकन मोडत आहेत. मात्र पुर्वी असं नव्हतं. पुर्वी मंगळसुत्र तेव्हाच तुटत होतं, जेव्हा पती मरत असे. एवढंच नाही तर एक दंतकथाही प्रचलीत आहे. सावित्रीनं आपल्या पतीनिधनानंतर आपलं मंगळसुत्र न तोडता आपल्या पतीला स्वर्गातून परत आणलं होतं. एवढी ताकद मंगलसुत्रात आहे. तरीही आजच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे? तसेच न्यायालयात घटस्फोटाचे खटले मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत? ही खरं तर चिंतेची बाबच आहे.
          खरं तर मंगळसुत्रात ताकद असावीच की त्या मंगळसुत्रानं कोणत्याही स्रिच्या मनात असुया निर्माण होवू नये. मंगळसुत्रात अशी ताकद असावी की त्या मंगळसुत्रानं कधीच पती व पत्नीच्या वादाची प्रकरणं न्यायालयात जावू देवू नयेत. शिवाय अशा प्रकारचा संशय निर्माण झाल्यास त्या वादावर विरजण घालावं. थोडं शांत राहावं. विचार करावा. मगच पावलं उचलावीत. रागारागात उचललेलं पाऊल कधीही वाकडच पडत असतं. प्रत्येकच मुलामुलीनं विवाह झाल्यानंतर कधीच न्यायालयाचा दरवाजाही ठोकू नये. अन् असं वाटलं कधी वा तशी शंका मनात उत्पन्न झालीच तर त्या प्रत्येक जोडप्यानं वह सात दिन नावाचा १९८३ ला लागलेला अनिलकपूर व पद्मिनी कोल्हापूरेचा चित्रपट नक्कीच पाहावा. केवळ पाहावा असे नाही तर त्याचा भावार्थ समजून घ्यावा. म्हणजे नक्कीच घटस्फोट होणार नाही. 
           चित्रपट असे बरेच निर्माण झालेत की काही चित्रपटांनी आपल्याच नादाला लावून घटस्फोट वाढवले. परंतु काही चित्रपट असेही बनलेत की त्या चित्रपटांनी लोकांना जगणं शिकवलं. त्यांनी घटस्फोटाला आवर घातला. आजच्या चित्रपट निर्मात्यांना जगाचं काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त कमवायचा असतो पैसा. मग पैशासाठी काहीही. ज्यात चित्रपट चालावा म्हणून मसाला भरला जातो अधिकचा. विवाह झाल्यानंतर कधीच फारकत न होता प्रेमीसोबत विवाह होवू नये. चित्रपटात तेही दाखवलं जातं. मग काय, लोकं वास्तविक जीवनातही तसंच करु पाहतात. 
          पुर्वी चित्रपटात कोणीच कामं करायला तयार नसायचे. चित्रपटात काम करणाऱ्या मंडळींना नावं ठेवायचे. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री, अभिनेत्यांना बाजारु महिला व बाजारु पुरुष समजायचे. ज्यातून लोकांनी चित्रपटात काम करतांना आपली खरी ओळख लपवली. आपलं नाव बदलवलं. लोकांनी नाव ठेवू नये म्हणून. आज मात्र ती फॅशन झाली व आजच्या काळात कोणीही चांगल्या सुसंस्कृत घरचा का असेना, चित्रपटात काम करायला धडपड करतो. तसं पाहिल्यास घटस्फोट न होणं ही आजची गरज आहे, ज्यांना विवाहानंतर मुलं आहेत त्यांच्यासाठी. अन् ज्यांना नाही, त्यांनी आपल्या आईवडीलांकडं पाहावं. आपण तर घटस्फोट घेवून घरी बसू. परंतु जेवढे दिवस आपण घरी राहू. तेवढे दिवस आपली चिंता आपल्या मायबापांना होईल. तसं पाहिल्यास आजच्या काळात तेवढ्या वाईट प्रकारानं कोणत्याही स्रिला घरात वागवलं जात नाही. जेवढा त्रास स्रियांना पुर्वी दिला जायचा. 
           घटस्फोट घेवू नये असं माझं म्हणणं. त्यावर लोकं म्हणतील की साहेब, मुलगा शराबी निघाला तरी. तरी घटस्फोट घेवू नये काय? म्हणतील की मुलगा निकम्मा निघाला तरी घटस्फोट घेवू नये काय? म्हणतील की मुलगा नपुंसक आहे. म्हणतील की मुलगा मारपीट करतो. हे झालं मुलीकडील लोकांचं म्हणणं. मुलांकडील लोकांचं म्हणणं याऊलट असतं. म्हणतात की मुलगी वात्रट वागते. बोलणं बरोबर नाही. आळशी आहे. कामे करीत नाही. माझ्या आईवडीलांना सांभाळत नाही. लैंगीकता बरोबर नाही. 
         घटस्फोटाची अनेक कारणे आहेत. जेवढे व्यक्ती, तेवढीच कारणे. कधी हुंडा मागणीचं कारण पुढं केलं जातं तर कधी कधी त्याचा, तिचा बाहेर चक्कर आहे हे कारण सांगीतलं जातं. असं का होतं? असं होतं आपलं प्रेम एकमेकांवर निर्माण न झाल्यानं. विवाह होण्यापुर्वीच सासरमध्ये कसं वागावं व कसं वागू नये हा कुणीतरी बोध दिल्यानं. मीच वरचढ असावी ही भावना. त्यातच मुलांनाही बोध देणारे भरपूर आहेत आजच्या काळात. त्यालाही वाटतं की मी पुरुष आहे..मी का खालची भुमिका स्विकारावी. मात्र आजच्या काळात विवाहानंतर चांगलं वागाल. असं सांगणारं कुणीच नाही. 
         विवाह हा समजुतीचा खेळ आहे. जो समजून घेईल. त्याचाच विवाह टिकेल. तसं पाहिल्यास सृष्टीविधात्यानंच विवाहाचं माध्यम आणलं. सृष्टी टिकून राहावी व एका विशिष्ट वयात नर मादी एकत्र यावे म्हणून त्यात माध्यम आणलं विवाहाचं. विवाहाच्या माध्यमातून पुरुष आणि स्री एकत्र येवून त्यांनी सृष्टी जशी आहे, तशी ठेवावी यासाठी विवाह. हाच सृष्टीचा नियम आहे व मंगळसुत्राचा धागा हा या सृष्टी नियमात दोघांचं सुत्र जोडणारा धागा. मात्र आपली फारकत ही त्या सृष्टी नियमात अडथडा टाकणारा घटक. 
          विवाह टिकावेत. शक्यतोवर विवाह तुटू नयेत. घटस्फोट होवू नये व त्याचे प्रमाण वाढू नये. तशी प्रत्येक स्रिनं विवाह तोडण्याबद्दल शपथच खायला हवी की मी विवाह करेल. परंतु विवाह तोडणार नाही. विवाह करीत आहे तर. अन् जर विवाह तोडायचा असेल तर त्या मुलामुलींनी विवाहच जोडू नये. हं, विवाह केल्यानंतर जर आपल्याला आपल्या नशिबानं सुखकारक गोष्टी मिळाल्या नाहीत, तर तो आपल्या नशिबाचा भाग. ट्रत्येकाचं नशीब काही सारखं नसतंच. हे एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत होतं. वारंवार घडत नाही. तेव्हा प्रत्येक जोडप्यांनी विवाह हा नाशुकल्या शुल्लक कारणासाठी तोडू नये. कारण फारकतीत मजा नाहीच. जी मजा एकमेकांसोबत विवाह करुन राहण्यात आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास घटस्फोट हा मन तोडण्याचा पर्याय नाही. विवाहगाठी हा सृष्टी रक्षणकर्ताच बांधून पाठवतो. त्यामुळंच ती तोडण्याचा आपल्याला हक्कं नाही व हक्कंही नसावाच. हो घटस्फोटानं आपण सृष्टीचा नियम तोडतो. हे जरी खरं असलं तरी आपलं मन हे घटस्फोटानं तुटत नाही. आपण वरवर जगाला सांगत फिरतो की अमूक अमूक असा होता. अमूक अमूक तसा होता. पुरुषही तेच सांगतो जगाला. परंतु अंतर्मनात विवाहाचे ते क्षण आणि तो त्यांचा अंतर्गत सहवास नेहमीच आठवत असतो क्षणोक्षणी. जे दिवस एकमेकांसोबत जोडीनं काढलेले असतात. एक प्रकारचं कोणावर झालेलं कौमार्यपणातील प्रेम विसरता येतं. परंतु विवाहानंतर जुळलेली मनं व प्रेम विसरता येत नाही, आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत. हे तेवढंच खरं. म्हणूनच विवाह केल्यानंतर घटस्फोट घेवून एकमेकांची मनं तोडू नये म्हणजे झालं. ती आपली संस्कृतीही नाही आणि तो आपल्या संस्कृतीचा नियमही नाही. आपली संस्कृती यामुळंच महान आहे व आपला देशही यामुळंच महान आहे, यात शंका नाहीच. तेव्हा विवाह करावा. परंतु तो तोडण्यासाठी नाही तर एकमेकांची मनं जोडण्यासाठी करावा. तद्वतच विवाह झाल्यानंतर कितीही संकट आलं तरी त्यावर तोडगा काढावा. फारकतीनं विवाह तोडू नये म्हणजे झालं. फारकत हा विवाह तोडण्याचा पर्याय होवूच शकत नाही. शिवाय विवाहात वापरलेलं मंगळसुत्र हा त्याच क्षणाची आठवण जीवनभर देत असतो. जे काही अनमोल क्षण आपण विवाहानंतर काही दिवस अनुभवलेले असतात. कारण मंगळसुत्रात कालही ताकद होती आणि आजही तेवढीच ताकद आहे, यात दुमत नाही.

         अंकुश शिंगाडू नागपूर ९३७३३५९४५०