If you want to save yourself in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | स्वतःचा उद्धार करायचा असेल तर

Featured Books
  • अनंत चतुर्दशी

    अनंत चतुर्दशी   अनंत चतुर्दशी जिसे अनंत चौदस भी कहा जाता है...

  • श्रवण कुमार का जीवन कथा

    श्रवण कुमार की कथाश्रवण कुमार भारतीय संस्कृति और रामायण काल...

  • कभी तो पास मेरे आओ

    कभी तो पास मेरे आओ कॉलेज की लाइब्रेरी का वो कोना… जहाँ किताब...

  • Secrets of The Night

    ब्लैक कार अपनी पूरी तेज रफ्तार में, खाली और काली सडक पर दौड...

  • रक्तरेखा - 15

    गाँव की चौपाल पर धूल बैठी ही थी कि अचानक लोहे की खड़खड़ाहट फ...

Categories
Share

स्वतःचा उद्धार करायचा असेल तर

स्वतःचा उद्धार करायचा असेल तर......?        *दि. १४ ऑक्टोबर १९५६. खरं तर हा दिवस धर्मांतराचा दिवस. मी हिंदू म्हणून जन्म घेतला. कारण जन्म घेणं माझ्या हातात नव्हते. परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण ते माझ्या हातात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण का केलं? त्याचं कारण आहे, येथील तमाम हिंदू लोकांनी बाबासाहेबच नाही तर त्यांच्या समाजातील लोकांना भारत स्वतंत्र्य झाल्यानंतरही चांगली वागणूक दिली नाही. म्हणूनच धर्मांतरण. कदाचित आम्ही धर्म जर सोडला तर आम्हाला हिंदूंचा संपर्कच येणार नाही. त्यांचे देव, त्यांच्या परंपरा आमच्यापासून कोसो दूर राहतील. मग काय, आम्हाला आमच्या मनानं जगता येईल. समाजात भेदभाव नसेल. तसंच सगळ्यांना सन्मानानं जगता येईल. म्हणूनच धर्मांतरण केलं बाबासाहेबांनी.*         बाबासाहेब....... बाबासाहेब ज्या काळात झाले. तो काळ म्हणजे हालअपेष्टेचा काळ. त्या काळात बाबासाहेबांना बऱ्याच हालअपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या. परंतु ते डगमगले नाहीत.           बाबासाहेब ज्या काळात झाले व त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं. त्यावेळेस बाबासाहेबांसमोर दोन प्रकारच्या समस्या होत्या. पहिली समस्या होती, ती म्हणजे समाजाचा विरोध. समाज त्यांना अछूत मानून त्यांच्या प्रत्येक गोष्टीला व योजनेला विरोध करीत होता. त्यातच भेदभाव असल्यानं त्यांचं कोण ऐकणार. हाही  एक प्रश्नच होता. दुसरी समस्या होती, ती म्हणजे आपला परीवार. बाबासाहेबांनी विवाह केला होता व त्यांना आता पत्नी आणि मुलंही होती.           या तीव्र असलेल्या दोन समस्या बाबासाहेबांसमोर होत्या. शिवाय त्यांचा परीवार पोषणारेही असे दुसरे कोणीच नव्हते. त्यातच ते काही सधन अशा कुटूंबातील नव्हते. त्यातल्यात्यात त्यांची परिस्थिती सधन अशी नव्हतीच.          ते दोन प्रश्न. बाबासाहेबांनी मनात ठरवलं. तसं ते बालपणापासूनच त्यांच्या मनात होतं. काहीही झालं तरी समाजासाठी लढावं. समाजातील लोकांना न्याय मिळवून द्यावा. समाजातील भेदभाव दूर करावा. म्हणूनच ते शिकले व त्यांना हिरीरीनं शिकवलं त्यांची अक्का आणि त्यांचे वडील रामजी. शिक म्हटलं. ज्यातून बाबासाहेबांना परीवारानं विरोध केलेला दिसत नाही. तर सहमतीच दर्शविलेली दिसते. कारण बाबासाहेबांच्या आईचं बालपणातच निधन झालं होतं. अक्कानंच त्यांना सांभाळलं होतं व शिकवलंही होतं. समजा त्यांचे जागेवर दुसरा मुलगा असता तर आई नसल्यानं तो शिकलाही नसता. समाज दूरच राहिला असता.         दुसरी बाबासाहेबांना मदत करणारी होती त्यांची पत्नी. तिनंही काबाडकष्ट केले. त्यातून जो पैसा यायचा. तो पैसा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी लावला. प्रसंगी आपल्या ट्रकृतीची व आपल्या मुलांच्या प्रकृतीची चिंता केली नाही. ती व तिची मुलं एकापाठोपाठ एक मरण पावले. ज्यातून बाबासाहेब घडले व ते डॉक्टर बाबासाहेब झाले. समाजाला झालेल्या रोगावर उपचार सुरु केला त्यांनी. समाजाला त्या काळात भेदभाव, अंधश्रद्धा, विषमता या सर्व रोगांनी ग्रासलं होतं. ज्या रोगांना जडासकट उपटून फेकणं अगत्याचं होतं. तसं पाहिल्यास ते संसर्गजन्य रोग होते. त्याची लागण समाजातील आपल्याही लोकांना झाली होती.           बाबासाहेब ज्या काळात झाले. त्या काळात ते लहान असतांना त्यांना एकाएकी सामाजिक विषमता कळली नाही. परंतु ती रामजींना चांगल्या प्रकारे कळली होती. ज्यातून त्यांनीच बाबासाहेबात सामाजिक विषमता दूर करण्याचं रणशिंग फुंकलं. त्यांच्या मनात बालपणापासूनच भरवलं की ही सामाजिक विषमता त्यालाच दूर करायची आहे. तसं पाहिल्यास बाबासाहेब हे चौदावे रत्न. रामजीच्या पोटी झालेले. रामजींनी इतर मुलांना बाबासाहेब म्हणून घडवलं नाही. त्यांनाच घडवलं. ते त्यांच्यातील गुणांमुळे. सामाजिक विषमता दूर करण्याची कुवत त्यांच्यात होती. म्हणूनच बाबासाहेब घडले.         रामजींनी बाबासाहेबांना प्रेरणा दिली नव्हे तर त्यांच्यात महत्वाकांक्षा निर्माण केली. ज्या जोरावर बाबासाहेब पुढे शिकले. तसंच त्यांच्या पुस्तकांचं लाडही पुरवलं त्यांच्या वडिलांनी. कारण त्यांनीही सामाजिक विषमतेच्या झळा आपल्या जीवनात शोषल्या होत्या. त्यामुळंच त्यांनाही वाटत होतं,  कुणीतरी असं घडावं की जो या सामाजिक विषमता दूर करु शकेल. मग तो घटक आपल्याच घरातील का घडू नये.          रामजींनी घडवलं बाबासाहेबांना व बाबासाहेबात सामाजिक विषमता दूर करण्याचे विचार पेरलेत. ज्यातून बाबासाहेबांनी आपल्या परीवारावर विजय मिळवला. परंतु असा विजय मिळवीत असतांना त्यांना घरच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. बाबासाहेबांनी निश्चय केला होता की ते समाजातील उच्च नीच भेदभाव दूर करणार. तोच वसा घेवून बाबासाहेब जगत होते. अशातच भारतातील समस्येवर आधारीत गोलमेज परीषद लंडन मध्ये आयोजित केली होती व बाबासाहेबांना जायचे होते परीषदेला. त्याचवेळेस त्यांचा राजरत्न नावाचा मुलगा दि. १९ जुलै १९२६ ला मरण पावला.         बाबासाहेबांना पाच मुलं. त्यातील चार मुलं मरण पावलीत. एक मुलगा यशवंत जीवंत राहिला कसाबसा. त्यातच त्यांची पत्नीही मरण पावली सामाजिक कार्य करीत असतांना. कारण सामाजिक कार्य करीत असतांना पैसाही लागायचा त्यांना. त्यात पैसा खर्च होत असल्यानं जवळ पैसा नसायचा की जो पैसा ते आपल्या लेकरांना लावू शकतील व त्यांचा उपचार करुन त्यांचं जीवन वाचवू शकतील? त्यातच ते सन १९२६ उजाडलं. ज्यावेळेस बाबासाहेबांजवळ राजरत्नलाही आजारासाठी लावायला पैसा नव्हताच. त्यामुळं राजरत्नही मरण पावलाच. पुढं बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यावेळेसही पैसा खर्च झाला. शिवाय आज चवदार तळ्याचा खटला निर्माण झाल्यानं त्यातही पैसा लागतच होता. पुढं हा चवदार तळ्याचा खटला १९३६ पर्यंत चालला. ज्या खटल्यात खटला लढण्यासाठी नाशिकवरुन मुंबईला जातांना पैसा खर्च व्हायचा. ज्यातून रमाबाई आजारी असतांनाही तिच्याही उपचारासाठी पैसा उपलब्ध नव्हता व असेलही थोडासा. जो रमाबाईच्या उपचाराला लावला असता व त्यातून रमाबाईला पुढं जगायला आयुष्य मिळालं असतं. परंतु बाबासाहेबांनी तो पैसा रमाबाईला आजारात लावलाच नाही. कारण तसा पैसा लावण्यात रमाबाईनंही नाकारलं. म्हटलं की माझ्या जीवापेक्षा समाजासाठी निर्माण झालेला चवदार तळ्याचा खटला जिंकणं महत्वाचं आहे. तो आधी लढा. मला पैसा लावून मी काही वाचणार नाही. पैसा व्यर्थ वाया जाईल. शिवाय कदाचित हा खटला जिंकला तर समाजातील भेदभाव दूर होईल. पाणी व पाण्याचे स्रोत मोकळे करता येतील.          रमाबाईनं तिच्या आजारावरील औषधोपचार नाकारला. ज्यातून ती सन १९३५ ला मरण पावली व चवदार तळ्याचा खटला सन १९३७ ला जिंकल्या गेला. ज्यातून रमाबाई गेली. पण भेदभाव मिटवता आला. ही घटना शिवाजी महाराजांच्या गड आला, पण सिंह गेल्यासारखीच होती.         भारत स्वतंत्र व्हायचाच होता.  चवदार तळ्याचा खटला बाबासाहेब जिंकले होते. पाणी विटाळातून मुक्त झालं होतं. लोकं इकडून तिकडे जायलाही लागले होते. परंतु भेदभाव मिटला नव्हता. तो भारत स्वतंत्र झाल्यावर नक्कीच मिटेल असं वाटत होतं. परंतु भारत स्वतंत्र झाल्यावरही येथील भेदभाव मिटला का? याचं उत्तर नाही असंच आहे. लोकं आज भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भेदभाव मिटवायला तयार नव्हते. ज्यातून बाबासाहेबांना वाटलं की हा समाज सुधारायला तयार नाही. हा समाज कधीच सुधारणार नाही व अस्पृश्य जातींना तो कधीच सन्मान देणार नाही. जेव्हापर्यंत अस्पृश्य जात हिंदू धर्मात आहे. जर ही जात हिंदू धर्मातून दूर गेली तर नक्कीच भेदभाव मिटेल. हेच ओळखून बाबासाहेबांनी जाहीर केलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण जन्मास येणं माझ्या हातात नव्हतं. मरणं मात्र माझ्या हातात आहे.         डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केलं. कशासाठी तर आपल्या जातीतील लोकांना सन्मान मिळावा यासाठी. तसं पाहिल्यास बाबासाहेबांनी केवळ आपल्या एकट्याच जातीसाठी कार्य केलं नाही तर सर्व समाजासाठी, दिन, दुबळ्या लोकांसाठीही कार्य केले. त्यांच्यासाठीही संविधान निर्मीती केली. त्यांच्या संविधान निर्मितीतून, पशूपक्षी, प्राणीमात्रा, अपंग, म्हातारे, अनाथ, स्रिया, पुरुष या सर्वांना आधार मिळाला.           ती तारीख होती, १४ ऑक्टोबर १९५६. तो दिवस दसऱ्याचा होता. वाटलं होतं की भेदभाव मिटेल. लोकांना राजरोषपणे जगता येईल. माणसांना माणूसकी कळेल. परंतु बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतरही समाजातील विटाळ, भेदभाव मिटला काय? यावर मात्र प्रश्नचिन्हं उभं राहातं. कारण आजही भारत स्वतंत्र झाला असला, धर्मांतर झालं असलं तरी पाहिजे त्या प्रमाणात भेदभाव आणि विटाळ दूर गेलेले दिसत नाहीत. तो लोकांच्या अंतर्मनात आहे. एवढंच नाही तर आजही लोकांच्या वागण्यावरुन कळतं की लोकांना आजही बाबासाहेब समजलेच नाही. कारण ते आजही त्यांच्याशी व त्यांच्या लेकरांशी पशुगतच वागतात. आज भेदभाव व विटाळ मिटला आहे. परंतु तो वरवरच मिटलेला दिसत आहे. अंतर्मनातून मिटलेला दिसत नाही. जेव्हा हा अंतर्मनातून विटाळ मिटलेला असेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेब लोकांना समजलेला आहे असे वाटेल.          बाबासाहेब लोकांना समजावा नव्हे तर लोकांनी समजावून घ्यावा. कारण त्यांनी बराच त्रास भोगला आपल्याच लेकरांना व जातीला सुखी करण्यासाठी नाही तर इतर सर्व जातींच्या लोकांनाही सुखी करण्यासाठी. त्यांनी आपलं शिक्षण केलं. ते उच्चशिक्षीत झाले. कारण त्यांना माहीत होतं की माझ्या समाजाला माझी गरज आहे व मी शिकल्याशिवाय समाज सुधरवू शकणार नाही. ते शिकले म्हणूनच त्यांची निवड संविधान निर्माण करण्यासाठी झाली नव्हे तर त्यांनी संविधान निर्माण करतांना भेदभाव केलाच नाही. ते सर्वांसाठी बनवलं. हवं तर आजच्या काळानुसार ते शिकल्यानंतर लंडनमध्येच स्थायीक झाले असते. परंतु त्यांनी तसं केलं नाही. ते भारतात परत आले. तद्नंतर त्यांनी संविधान बनवून भारताला एकप्रकारे दिशा दिली नव्हे तर भारतीय लोकांना घडवले. दिशा दिली. आज त्यांचे आपल्यावर कितीतरी उपकार आहेत. जे कधीच विसरता येत नाहीत. परंतु आपण ते सर्व विसरुन बाबासाहेबांना समजून घेत नाहीत. समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आपण बाबासाहेबांची हेळसांड करतो. त्यांच्या लेकरांना आजही तुच्छ समजतो. त्यांचे हक्कं नाकारतो. एवढंच नाही तर त्यांचा पदोपदी अपमान करतो. कधी त्यांना मारहाण करतो तर कधी त्यांना जातीवाचक शिव्याही हासडतो. यावरुन आपल्याला निश्चीतच बाबासाहेब समजलेला दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब हे थोर होते. त्यांचे विचार थोर होते. त्यांनी केलेले कार्य थोर आहे. म्हणूनच तेही तेवढेच थोर आहेत हे विसरता येत नाही. म्हणूनच ते बाबासाहेब झाले. तुमचे आमचे आणि सर्वांचेच. त्यामुळंच त्यांना सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. स्वतःचा उद्धार करायचा असेल तर......        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०