Dad, there's no room for you. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | बाबा, तुमच्यासाठीच जागा नाही

Featured Books
Categories
Share

बाबा, तुमच्यासाठीच जागा नाही

बाबा, तुमच्यासाठीच जागा नाही?

         *एके ठिकाणी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येत होता. ते सार्वजनिक ठिकाण होतं. ज्याला तेथीलच तमाम ओबीसी समाजानं विरोध केला. ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जातीच्या कलमेपुर्वी कलम ३४० लिहिलेली आहे.*
              संविधान निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. त्याचं कारण आहे त्यांचं संविधान निर्माण करणं. त्यांनी जे संविधान निर्माण केलं. ते संविधान देशात लागू झालं. एवढंच नाही तर त्याचा अभ्यास जगात केला जातो. कारण ते सशक्त असं संविधान आहे.
         संविधान हे केवळ विशिष्ट धर्मासाठी वा जातीसाठी लिहिण्यात आलेलं नाही. त्यात वेगवेगळ्या कलमा असून त्या कलमानुसार त्यातून लोकांना अधिकार आणि हक्कं मिळालेले आहेत. शिवाय त्यात अशा अशा कलमा आहेत वा तरतूद आहे की व्यक्तींचे जे अधिकार व हक्कं आहेत. त्या अधिकार व हक्काचं हनन झाल्यास त्यावर न्यायालयात दादही मागता येतं. या संविधानातून माणसंच नाही तर महिलांनाही विशेष असे हक्कं व अधिकार मिळालेले आहेत. एवढंच नाही तर संविधानातून किडे वा मुंगीवरही कोणी अत्याचार करु शकत नाही. त्यातच हिंस्र श्वापदांचाही कोणी बळी घेवू शकत नाही. शिवाय झाडांचीही कत्तल करु शकत नाही.
         डॉ. बाबासाहेबांनी सशक्त असं संविधान बनवलं. कोणासाठी? तर तमाम लोकांसाठी. देशातील लोकशाहीला बळकट करण्यासाठी. आज देशातील राज्यकारभार त्यांचं संविधान आहे म्हणून सुरळीत चालतं. नाही तर देशात अंधाधुंदीच माजली असती. असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांनी संविधान लिहितांना केवळ आपली जात वा आपला धर्म पाहिला नाही. सर्वप्रथम त्यांनी ओबीसी समाजाला प्राधान्य दिलं व त्यांच्यासाठी कलम लिहिली. ती म्हणजे ३४० वी कलम. त्यानंतर त्यांनी आपल्या जातीसाठी कलम लिहिली. ती कलम आहे, ३४१. म्हणजेच त्यांनी आपल्या समाजाचा कलमा लिहितांना आधी विचार केला नाही. आधी विचार केला ओबीसी समाजाचा. शिवाय आरक्षणाबाबतही त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा विचार संविधानात केला होता. परंतु ओबीसी नेते आम्हाला भीक नको असे म्हणाल्याने जे हिंदू कोड बिल होतं बाबासाहेबांच्याच कारकिर्दीतील. ते तुर्तास थांबलं. परंतु पुढे ज्यावेळेस ओबीसी वर्गाला आरक्षण देण्याची वेळ आली. तेव्हा तीच बाब समोर ठेवून ओबीसी वर्गाला आरक्षण दिलं गेलं व त्यानुसार १६ नोव्हेंबर १९९२ ला त्या संदर्भानं शिफारस करण्यात आल्या व ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळालं. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच कृपा. त्यानंतर संविधानाच्याच तरतुदीनुसार अंतर्गत मराठा समाजाचाही लढा सुरु झाला व याचवर्षी मा. मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनानंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी जातीतील आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करु असं जाहीर आश्वासन दिलं. 
          महत्वपुर्ण बाब ही की आज ओबीसी वर्गाला आरक्षण मिळालं नव्हे तर ज्यांना आरक्षण नाही. तोही समाज आज सक्षम बनलेला आहे. लोकांना संविधानानुसार बोलता येते. आपले मत व्यक्त करता येते. कोणत्याही रेस्टॉरेंटमध्ये जेवन करता येते. स्वैरपणे कोणत्याही गावाला जाता येते. उच्च शिक्षण शिकता येते. पाहिजे त्या प्रमाणात भेदभाव नाही. लिहिता येते. वाचता येते. मोठं घर बांधता येते. आपली संपत्ती वाढवता येते. स्पर्धा परीक्षेला बसता येते. नोकरी मिळवता येते व आपली उपजीविकाही चालवता येते. पोटासाठी कोणताही व कुठेही व्यवसाय लावता येतो. जातीचाच व्यवसाय लावायला हवा, असं बंधन नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास सर्वच गोष्टी करता येतात. हे शक्य झालंय केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेबांमुळं व त्यांनी अथक परीश्रमातून निर्माण केलेल्या संविधानामुळं. संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ ला लिहून पुर्ण झालं व सन २६ जानेवारी १९५० ला लागू झालं. अर्थात त्याची अंमलबजावणी त्या त्या तारखांना होवू लागली. 
          विशेष सांगायचं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे केवळ आपल्याच जातीसाठी लिहिलेलं नसून ते देशासाठी लिहिलेलं आहे व देशातील आरक्षण मिळालेल्या व न मिळालेल्या सर्वच जातीसाठी लिहिलेलं आहे. ते देशातील सर्वच धर्मासाठी लिहिलेलं आहे. आज त्याच संविधानातील तरतूदीनुसार सर्वांना स्वातंत्र्याचा पूरेपूर लाभ घेता येतो. परिणामी त्यांनी आपली जात वा प्रवर्ग मागे टाकून ३४१ वी कलम ओबीसी प्रवर्गासाठी सर्वप्रथम लिहिलेली आहे. असे असतांना आज ओबीसी प्रवर्ग आज डॉ. बाबासाहेबांनी देणगी म्हणून दिलेल्या संविधानातील तरतुदींचा फायदा उचलतात. परंतु डॉ. बाबासाहेबांना सन्मान देत नाहीत. त्यांची हेळसांड करतात. एवढंच नाही तर त्यांना जागा सुद्धा देत नाही बसायला. जरी त्यांना कोणी सार्वजनिक जागेवर बसवत असले तरी.
          आज डॉक्टर बाबासाहेबांनी जे कार्य केलं. ते केवळ एकाच आपल्या जाती वा एकाच आपल्या धर्मासाठी केलेलं नाही तर ते सर्वच जाती व धर्मासाठी केलेलं असतांना सर्वच जातीच्या वा धर्माच्या लोकांनी त्यांना मानायला हवं. त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांची हेळसांड करु नये. कारण त्यांनी इतर सर्व जाती धर्माच्या तरतुदी संविधानात लिहितांना कोणत्याच जातीधर्माची हेळसांड केलेली नाही वा तशा स्वरुपाचा भेदभावही केलेला नाही. मग इतर समाज, जो वेगवेगळ्या जातीधर्माचा आहे, तो त्यांचा पदोपदी अपमान का करतो? ते कळायला मार्ग नाही. 
          आज तमाम इतर धर्मीय समाज आपआपल्या धर्माचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सार्वजनिक जागेवर आपल्या धर्माची प्रार्थना मंदीरे उभी करतात. अन् एखादा साधा पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा उभारतो म्हटलं तर त्याचा विरोध करतात. त्यांच्या जातीच्या लेकरांना शिव्या हासडतात नव्हे तर तसं कार्य करणाऱ्या लेकरांचाही अपमान करतात. एवढंच नाही तर तमाम ओबीसी व इतर समाज वा धर्म त्यांचे पुतळे उभारु तर देत नाहीतच. उलट अस्तित्वात असलेले त्यांच्या पुतळ्याची विटंबना करतात. ते पाडतात वा त्यांचे हातपाय, बोटं तोडून ते पुतळे नेस्तनाबूत करायला मागंपुढं पाहात नाही. तशीच त्यांची कृती अशी असते की ते त्यांच्या समाजाचा रागच करीत नाही तर त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेबांबद्दल कितीतरी तीव्र राग आहे असं दिसतं. जरी बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी मनात किंतू परंतु न बाळगता कार्य केले असले तरी. महत्वाचं सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं व सर्वांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, सर्वांना संविधानाअंतर्गत अधिकार आणि हक्कं प्रदान करुन. ज्यातून न्याय मिळवता येतो. रोजगार मिळवता येतो. पोट भरता येतं. असं असतांना निदान त्याची तरी आपण जाणीव ठेवायला हवी नव्हे तर आपण त्यांचे उपकारच मानायला हवेत. त्यातच आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांची आठवण म्हणून त्यांचे सार्वजनिक जागेवर पुतळे उभारायला हवेत. उभारलेल्या पुतळ्यांचं रक्षण करायला हवं. जेणेकरुन त्या पुतळ्यातून तमाम शोषीत व पिडीत नव्हे तर येणाऱ्या भावी पिढीत आदर्श निर्माण होईल व ती पिढी तसे बनण्याचा प्रयत्न करेल. यात शंका नाही.

             अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०