२
रामदास लहान होता. तेव्हा गावात पहिली शाळा निघाली. ती शाळा काढण्यामागे उद्देश होता समाज सुधारणा करणं. तसं पाहिल्यास त्या शाळेत शिकवायला एक शिक्षक होता. तो गावातच राहायला आला होता. तो शाळेत आपल्या मुलांना टाका असं नेहमी म्हणत असे. परंतु शाळेत शिकायला कोणी येत नव्हतं. ना कोणी शाळेत मुलं टाकायला तयार होतं. सगळ्यांची मुलं आपल्या आपल्या खेळण्यात गुंग असायची. तसा तो व्यक्ती त्या गावात व आजुबाजूच्या गावातही शिक्षणाबद्दलची जाहिरात करायचा. परंतु तरीही शाळेत नाव टाकायला कोणीच नव्हतं. कदाचीत तो शिक्षक म्हणजे इंग्रजांनी नियुक्त केलेला एक भारतीय व्यक्ती होता
तो चलेजावचा उठाव. त्या उठावात महात्मा गांधीनी चलेजावचा नारा दिला होता. ज्यात भारतीय अनेक क्रांतिकारक शहिद झाले. काही भुमीगतही झाले होते.
१९४२ च्या चलेजावच्या उठावात अनेक लोकं सहभागी झाले होते. कारण अनेक नेत्यांनी म्हटलं होतं की आता इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य देत नाहीत नव्हे तर स्वातंत्र्यातील एक अंशही देत नाहीत. ते आपल्याला स्वातंत्र्य देणारच नाहीत. तेव्हा हीच वेळ आहे, त्यांना सळो की पळो करुन लावण्याची. कारण इंग्रज आता घायाळ झाले आहेत दुसऱ्या महायुद्धातून. आता त्यांची आर्थिक स्थितीही बरोबर नाही की ते आपल्या देशातील क्रांतिकारकांचा प्रतिकार करु शकतील. हं, ते एवढंच करु शकतात. ते आपल्याला वेठीस धरण्यासाठी प्रसंगी येथील सर्व नेत्यांना कैदेत टाकू शकतात. तेव्हा घाबरुन जायचं नाही. प्रतिकार करायचा. सर्वांनी स्वतः आपण नेते असल्याचं समजून घ्यावं. कोणी तुम्हाला दिशा देणार नाही व कोणी मार्गही सुचविणार नाही. तेव्हा स्वतः नेते असल्याचं जाहीर करुन मनात येईल तसं कार्य करावं. आपला उद्देश फक्त इंग्रजांना कसे या देशातून हुसकावून लावता येईल, हाच ठेवावा.
तो चलेजावचा उठाव. नेत्यांनी तशी भुमिका घेताच इंग्रजांनी सर्व नेत्यांना पकडून तुरुंगात टाकलं. त्यांना वाटत होतं की हेच नेते लोकांना भडकवतात. त्यांना दिशा दाखवतात. तेव्हा यांनाच आधी पकडून तुरुंगात टाकावं. म्हणजे संपर्क येणार नाही व येथील जनता हवालदिल होईल. परंतु घडलं उलट. येथील नेत्यांच्या बोलण्यानुसार त्यांना जरी इंग्रजांनी पकडून तुरुंगात टाकलं असलं तरी तद्नंतर सामान्य जनता ही नेते बनली व मनात येईल तसं कार्य करु लागली. उद्देश एकच होता, इंग्रजांना या देशातून हुसकावून लावणे, ज्यात काहींनी टेलिफोनच्या तारा तोडल्या. काहींनी पोलीस ठाणे जाळले. काहींनी सार्वजनिक मालमत्तेची नाशधुस केली. ज्यातून इंग्रज चिडले. त्यांनी लोकांना पांगविण्यासाठी धरपकड सुरु केली. ज्यातून जी मंडळी सापडली. त्यांना इंग्रजांनी थेट अनन्वीत यातना देवून सार्वजनिक गळफास दिला. हेच पाहून काही लोकं भुमीगत झाले. कारण त्यांनाही वाटत होतं की आपण इंग्रजांना सापडलोच तर त्यांच्या अनन्वीत यातनांचे शिकार ठरु व मग सार्वजनिक गळफास. त्यापेक्षा भुमीगत झालेलं बरं आणि तसंच घडलं.
भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी इथे भारतीय नेत्यांना फार मोठा त्याग करावा लागला. कित्येक क्रातीकारक लढले. शहीद झाले. काहींची नावं इतिहासात नाहीत. काहींची आहेत. पण जे जे या देशासाठी लढले. त्यांच्या प्राणांच्या बलिदानाचा इतिहास भारत देश विसरू शकत जरी नसला तरी आजही काही लोकं त्यांना शिव्या हासडतांना दिसतात. ही या देशाची शोकांतिका आहे. निदान आपण तरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करु शकलो नाही. आताही करण्यासारखे असूनही करु शकत नाही. हे सगळं विसरुन त्यांना शिव्या देण्याचं नव्हे तर बदनाम करण्याचं काम नेहमी काही लोकं करीत असतात.
खरं तर नऊ ऑगष्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. पण असे असले तरी या दिवसासाठी आठ ऑगस्टलाही जास्त महत्व आहे. याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबई मध्ये एक प्रस्ताव पारीत केला. त्या प्रस्तावानुसार नऊ ऑगस्टपासून आपण चलेजाव भारत छोडोचं आंदोलन करु असं ठरलं. प्रत्येक नेत्यांनी रस्त्यावर उतरुन अहिंसक मार्गाने स्वातंत्र्याचा उठाव करु असं ठरलं. त्याला कारणंही तसंच होतं.
१९३९ ला द्वितीय महायुद्ध सुरु झालं. त्या महायुद्धात जर्मन फौजांनी इग्लंडवर सरशी केली. त्यावेळी येथील भारतीय नेत्यांना इंग्रजांनी म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा. बदल्यात आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देवू. पण ज्यावेळी युद्ध संपलं, तेव्हा त्या इंग्रजांनी भारतीयांना दगा देत स्वातंत्र्य देण्यापासून माघार घेतली. त्यामुळं पर्यायानं भारतीय नेत्यांची मनं नाराज झाली. म्हणून त्यांनी चलेजावचा उठाव करण्याचं ठरवलं.
या संदर्भात आठ ऑगष्टला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक होण्यापुर्वी त्याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक चार ऑगष्टला झाली. आपल्याला इंग्रजांनी धोका दिला या विषयावर ती बैठक होती. आपण अहिंसक मार्गानं उद्या रस्त्यावर उतरु हेही विषय होते. परंतू याला बैठकीतील काही लोकांची सहमती झाली नाही. त्यातच काँग्रेसचे जेष्ठ नेते सी राजगोपालाचारी यांनी याच विषयाच्या संदर्भात पार्टी सोडली. त्यामुळं चार ऑगष्टला झालेली बैठक निष्फळ झाली. त्यामुळं त्याच्याच चार दिवसानं म्हणजे आठ ऑगष्टला परत बैठक भरली. तिही याच विषयावर. या बैठकीतही हाच विषय होता. पण याही बैठकीत हिंदू महासभा, मुस्लिम लीग व भारतीय कम्युनिस्ट पक्षीने विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की अहिंसक मार्गानं जरी आपण आंदोलन करीत असलो तरी इंग्रज आपल्याला सोडणार नाहीत. ते आंदोलन दडपवून टाकण्यासाठी बळाचा वापर करतील, गोळ्या झाडतील. मग त्यात कित्येक भारतीय लोकं मरतील. म्हणून हे आंदोलन करु नये. पण आंदोलन जर केलं गेलं नाही तर या देशातून इंग्रज कधीच जाणार नाही असं तत्कालीन भारतीय नेत्यांना वाटत असल्यानं त्यांनी काही संघटनांचा विरोध होवूनही आंदोलन छेडलं. आठ ऑगष्टला प्रस्ताव पारीत झाला व नऊ ऑगष्टला आंदोलनाला सुरुवात झाली.
हे आंदोलन भारतीयांसाठी नवं नव्हतं. यापुर्वीही दहा मे १८५७ ला देशात असंच आंदोलन झालं होतं. तो १८५७ चा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. यात बहादूरशहा जफर, नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई व तात्या टोपे यांचे विशेष योगदान आहे. तो इतिहास येथील भारतीयांना माहित होता. तसेच तंट्या भील उर्फ भीमा नायक, चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगूरू, सुखदेव बटुकेश्वर दत्त यांना देश विसरला नव्हता. त्यांनी केलेलं प्राणांच बलिदान येथील भारतीयांच्या रक्तात होता. याच बलिदानाचा इतिहास आळवू आळवू देश गांधीजींच्या नेतृत्वात एकत्र झाला होता. मग कित्येक नेते लढले. नेत्यांची धरपकड होताच साता-यात नाना पाटील, नागपूरमध्ये मगनलाल बागडी, सेलोकर गुरुजी यांनी मोर्चा सांभाळला. तसेच यामध्ये बरीच मंडळी शहीदही झाली. तसेच चिमूरमध्येही बरीच मंडळी शहीद झाली.
१८५७ ते १९४२ पर्यंतचा इतिहास रक्तरंजीतच होता. कित्येक भारतीय अहिंसक मार्गानं जरी इंग्रजांचा विरोध करीत असले तरी ते गोळ्या झाडत होते. सायमन कमीशनमध्ये लाला लजपतराय यांनी सायमन गो बॅक म्हणत मिळवणूक काढताच त्यांना लाठीमार करुन घायाळ केलं होतं, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेतही तेच घडलं. म्हणून आठ ऑगष्टला झालेल्या बैठकीत प्रस्ताव पारीत झाल्यानंतर करो या मरो असा आदेश देत नेत्यांनी चलेजाव भारत छोडोचं आंदोलन छेडलं. ही भारतीयांची इंग्रजांना एक चपराकच होती.
प्रस्ताव पारीत होताच व उद्या आंदोलन छेडणार आहे हे माहित होताच इंग्रजांनी येथील भारतीय नेत्यांना कैद केलं. महात्माजींना पुण्याला आगाखान पैलेसमध्ये ठेवलं. नेहरू तसेच इतर नेत्यांनाही पकडून देशातल्या वेगवेगळ्या तुरुंगात ठेवलं. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की आता प्रत्येकजण नेता आहे. इंग्रजांना घाबरु नका. प्रतिकार करा. स्वतःला स्वतःचा नेता समजा.
शेवटी नऊ ऑगष्टपासून सुरु झालेल्या अहिंसक आंदोलनाला पांगविण्यासाठी इंग्रज सैनिकांनी निरपराध भारतीयांवर जालियनवाला बागेसारखा गोळीबार केला. त्यात निरपराध माणसे मरण पावली. कित्येक आंदोलन करणारी आणि न करणारीही. त्यामुळं चिडून जावून येथील भारतीय लोकांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या. कित्येक पोलिसठाणे जाळले. सरकारी इमारती जाळल्या. ज्यातून आता इंग्रज पकडतील या भीतीनं कित्येक लोकं भुमीगत झाले. यात कित्येक विद्यार्थीही शहीद झाले.
जेव्हा ह्या घटनेची माहिती महात्मा गांधींना झाली. त्यांनी तुरुंगातच एकवीस दिवसाचं उपोषण केलं. त्यातच त्यांचं स्वास्थ बिघडलं. त्यातच ते मरण पावतील व पुन्हा देशात रोष वाढेल याचा विचार करुन इंग्रजांनी त्यांना १९४४ मध्ये तुरुंगातून सोडले.
आंदोलन यशस्वी झाले नाही. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला हिंदू महासभा, वामपंथी दल व मुस्लिम लीग नावे ठेवू लागली. पण महत्वाचं सांगायचं झाल्यास १९४२ चं आंदोलन यशस्वी जरी झालं नसलं, १८५७ सारखं........तरी त्या झालेल्या आंदोलनातून इंग्रजांना एक शिकवण मिळाली. ती म्हणजे आता या देशातून गेल्याशिवाय उपाय नाही. त्यांनी त्यानंतर वेगवेगळ्या बैठका घेतल्या. ज्यांनी या आंदोलनाला मदत केली नाही. त्यांनाही विचारणा करुन शेवटी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निश्चय केला. त्यात काही अटीही टाकल्या. अटी होत्या, भुमीगत झालेल्या भारतीय लेकरांना भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांच्या सुपूर्द करावं.
हा सरळसरळ धोकाच होता भारतीयांसोबत. भारतीय लेकरांना त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचा. ज्या करारपत्रावर मोहोर लागली होती. तसं पाहिल्यास भारतीय लोकं हे इमानदार होते व त्या इमानदारीचा गैरफायदा इंग्रजांनी घेण्याचं ठरवलं होतं. म्हणूनच ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा येथीलच नेत्यांनी तमाम भुमीगत झालेल्या भारतीय लेकरांना ते नेते उजागर होवूनही त्यांना स्वातंत्र्याच्या उत्साहात सहभागी करुन घेतलं नाही. कारण तशी अट मोडण्याची हिंमत इमानदार असलेल्या भारतीयात नव्हती.
त्याच अटीनुसार आजही कोहीनूर भारताचा हिरा इंग्लंडमध्ये आहे. शंकुतला एक्सप्रेसचे पैसे आजपर्यंत इंग्लंडला जात होते. रघुजी महाराजांची तलवार इंग्लंडमध्ये होती. शिवाजी महाराजांची वाघनखं इंग्लंडमध्ये होती. आजही अशा बऱ्याच गोष्टी इंग्लंडमध्ये आहेत. कदाचित अशाच तर अटी नव्हत्या इंग्रजांच्या की त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिलं. या देशात हिंदू मुस्लिम भांडणं नसतांना इंग्रजांनी दोघांच्याही धर्म भावना भडकवून ज्या चाली चालल्यात. त्या चालीतून भारत पाकिस्तान बनला. तसेच अजूनही हा भारत पाकिस्तान वाद भारतात धुमसतच आहे. काल काश्मीर वाद होता. आज सीमावाद आहे. अन् आम्ही भारतीय कालही आपापसात लढत होतो. मी हिंदू मी मुस्लिम म्हणत, आजही लढतो. कोणत्याही देशात वाईट गोष्टी घडल्याच तर त्या ते ते धर्मीय मंडळी त्या त्या धर्मांनीच केल्या असे भांडतो नव्हे तर या देशाच्या एकात्मत्तेला तोडण्याचे काम करतो. एवढंच नाही तर या देशातील शांतता भंग करतो. नेत्यांच्या आश्नासनात फसतो. नेत्यांबरोबर आपणही आपल्या महापुरुषांना शिव्या द्यायला लागतो. पण याचा विचार करीत नाही की त्या नेत्यांनी त्या काळात जे काही कार्य केले, ते अतुलनीय होते. ते नसते तर देश स्वतंत्र्यही झाला नसता. आपण गुलाम असतो इंग्रजांचे आणि आपली पिढीही गुलाम राहिली असती. देशाला स्वातंत्र्य कधीच मिळालं नसतं आजही. कारण कालच्या नेत्यात जी लढण्याची ताकद आहे. ती आजच्या नेत्यात दिसत नाही. हे नेते फक्त आश्वासन देवू शकतात. फक्त शिव्याच हासडू शकतात.
हा भारत देश....... भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तमाम अटीनं बंदीस्त झालेला. तमाम अटीनं बंदी घातल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. ज्या स्वातंत्र्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारतात स्वातंत्र्योत्सव साजरा झाला. तेव्हा भारतातील उजेडात असलेल्या भारतीय नेत्यांनी भुमीगत झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, बटूकेश्वर दत्त, खुदीराम बोस, साने गुरुजी यांना स्वातंत्र्योत्सवाच्या कार्यक्रमात बोलावले नाही वा तद्नंतरही ती मंडळी उजेडात येवू नये. म्हणून त्यांना कोणतीच मदत केली नाही. ही शोकांतिकाच होती. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुप्त मार्गानं का होईना, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देतांना कार्य केलं व भीतीनं भुमीगत झाले. त्यांना मदत करायला हवी होती. तसं पाहिल्यास त्या जाचक अटी व स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय नेत्यांचं वागणं पाहून बरेचसे भुमीगत असलेले भारतीय नेते उजेडात आले नाही. ते मरण पावले स्वातंत्र्यानंतरच्या वेदना सहन करीत करीत. परंतु त्यांनी कोणत्याच स्वरुपाची ओळख दाखवली नाही.
ती इंग्रजांनी काढलेली शाळा. त्या शाळेत ज्यादिवशी नियुक्त्या केल्या गेल्या. त्याच नियुक्तीत एक असाही व्यक्ती होता की जो भुमीगत होता. तो इंग्रजांना कसा ओळखू आला नाही ते कळलं नाही. परंतु तो व्यक्ती नियुक्त झाला व मोठ्या डौलानं त्या शाळेत एक शाळा उभी राहिली. जी मुलांच्या शिक्षणाची आधारस्तंभ बनली.
तो १९४२ चा काळ. त्याच काळात रामदास लहान असतांना एक व्यक्ती गावात आला होता. वाटत होतं की तो व्यक्ती इंग्रजांनीच मुलांच्या शिक्षणासाठी पाठवला असावा. कारण त्या काळात शिक्षणाची व्यवस्था ही इंग्रजच करायचे. ज्यात अनेक शिक्षक होते व एक एक व्यक्ती भुमीगत होवून आलेला होता. त्यालाही वाटत होतं की येथील भारतीय समाज शिकावा. त्यालाही इंग्रजांचे कायदे समजावे.
ती शाळा व त्या शाळेत नियुक्त असणारे शिक्षक हे इंग्रजीतून बोलायचे. जी भाषा भारतीय लोकांना समजत नव्हती. अशा लोकांचे बोललेले शब्द तो भुमीगत व्यक्ती मुलांना समजावून सांगत असे.
तो भुमीगत असलेला व्यक्ती. तो आजुबाजूला जशी शिक्षणाची जाहिरात करायचा. त्याच जाहिरातून पुढे रामदास नावाचा एक मुलगा त्याच्या शाळेत दाखल झाला. त्यानंतर बरीचशी मुलं शाळेत यायला लागली होती. त्या लोकांचा आपल्या मुलांना शाळेत टाकण्यामागे उद्देश एकच होता. तो म्हणजे आपली मुलं परीसरात फिरुन उनाडक्या करु नये. आपल्या मुलांना शाळेत सांभाळलं जावं. अगदी तसाच उद्देश ठेवून रामदासच्या वडिलांनी रामदासला शाळेत टाकलं.
रामदास हा उनाडक्या करणारा मुलगा नव्हता. तो शांत बसणारा मुलगा होता. सुरुवातीस त्याच्या वडिलांनी त्यालाच शाळेत टाकलं होतं व त्याला त्याचे शिक्षक स्वातंत्र्याच्या गोष्टी शिकवीत होते. परंतु त्याचं सुरुवातीला शाळेत मन लागत नव्हतं.
डॉक्टर बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. मनुस्मृती जाळली. ज्यातून त्यांचेवर सनातन धर्मानं खटला भरला होता. तो खटला १९३६ पर्यंत चालला. त्या खटल्यात खालच्या न्यायालयात विजय मिळाल्यानंतर तोच खटला धर्ममार्तंडांनी उच्च न्यायालयात नेला. परंतु तिथंही बाबासाहेबांनी विजय मिळाल्यानंतर सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले होते. त्यातच तो खटला जिंकल्यावर शिक्षणाचा प्रचार झाला होता व त्यातच अस्पृश्य जातीत शिक्षणाचा प्रचार जास्तच झाला होता. तसं पाहिल्यास रामदासचे वडील हे अस्पृश्य होते. गावात जातीभेद होता व त्यांची जात अस्पृश्यात येत असल्यामुळेच ते स्वतःला अस्पृश्य समजू लागले होतेच. सदाशिव शिकलेला नव्हता. परंतु १९४७ नंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा सदाशिववर प्रभाव पडला होता की ज्या विचारातून त्यानं आपल्या लेकराला शिक्षण शिकविण्यासाठी शाळेत टाकलं. ते पाहून आजुबाजूच्याही लोकांनी आपण दिवसभर कामाला जातो. शिक्षक आपल्या लेकरांना सांभाळतो. म्हणून शाळेत टाकलं व त्या गावात एक नवी क्रांती झाली. गावातील मुलं शिकू लागली होती.
ते गाव व त्याच गावात भुमीगत म्हणून आलेला तो शिक्षक. त्याचा उदरनिर्वाह गावच्याच भाकरीच्या तुकड्यावर चालत असे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण बाकीचे शिक्षक हे तालुक्याला राहात. ते शाळेत ढुंकूनही पाहात नसत. परंतु तो भुमीगत शिक्षक लोकांना आणि इंग्रजांना ओळख न दाखवता गावातच राहात असे. तो आपली ओळख इतरांना पटू नये म्हणून गावातून तालुक्याला जात नसे.
सुरुवातीला तो काय खात असे व काय पीत असे. हे गावालाही कळलं नाही. त्या काळात तो व्यक्ती झाडाचा झाडपाला खावूनच जीवंत होता. कितीतरी दिवस झाले होते की त्यानं आपल्या पत्नीच्या हातचं जेवन बघितलं नव्हतं आणि कितीतरी दिवस झाले होते की त्यानं आपल्या घराचं तोंड बघितलं नव्हतं. लोकांना तो सांगत असे की त्याला कोणीच नाही. परंतु नंतर कळलं की त्याला लेकरं होती. परंतु तो भुमीगत होता. त्याची ती ओळख पटण्यासाठी भारताला स्वतंत्र व्हावं लागलं होतं. तशी त्याच्या मनात भीती होती की तो त्याच्या मूळ गावात गेल्यास गावातील इंग्रजांचे मुकबीर आपली माहिती इंग्रजांना देतील व इंग्रज आपल्याला पकडून नेतील. तो गावात एकाकी होता. तसं पाहिल्यास त्याला गावात करमत नव्हतं. परंतु ते सगळं सहन करीत होता तो. केवळ स्वातंत्र्याखातर. वाटत होतं की स्वातंत्र्य मिळेल व आपल्यालाही सुखाचे दिवस पाहायला मिळतील. परंतु तसं त्याच्या आयुष्यात कधीच घडलं नाही व तो तडपत तडपतच त्याच गावात मरण पावला. जेव्हा लोकांना स्वातंत्र्यानंतर तो भुमीगत व्यक्ती असल्याचं कळलं. तेव्हा गावानंच लोकवर्गणी गोळा करुन त्याचं भव्यदिव्य स्मारक बांधलं होतं.