Fajiti Express - 7 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 7

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 7

कथा क्र.०२ : बायकोचा वाढदिवस

"केकवर 'SORRY', पण टॅगवर STORY!"

                                                                   

**नमस्कार मंडळी,मी रमेश सखाराम पाटील – नवरा नं. ११७५४५८९.आम्हा नवऱ्यांचा एक गुप्त गट आहे.आमचं सगळ्यात मोठं आयुष्याचं संकट असतं – 'बायकोच्या अपेक्षा' आणि त्यातलं सगळ्यात खतरनाक संकट – वाढदिवस विसरणं!आणि हो...मी… त्या दिवशी… तोच गुन्हा केला.*

                                                                   

सकाळचे ७.४५ वाजले होते.मोबाईलवर ‘धिंगाणा धिंगाणा... नाच !’ अशी रिंगटोन वाजू लागली.(हो, हीच माझी बायकोने लावलेली अलार्म टोन आहे – "सकाळी उठत नाहीस? मग नाच!")

मी अर्धवट डोळ्यांनी झोपेच्या गुहेतून बाहेर आलो.पायांनी चप्पल शोधायला सुरुवात केली – एक चप्पल पलंगाखाली होती, दुसरी कधीपासून बाथरूममध्ये पाण्यात भिजत होती.तेवढ्यात माझं लक्ष मोबाईलकडे गेलं.

मी ताडकन मोबाईल उचलला…आणि पहिले काय?क्रिकेट स्कोअर!काल भारत हरला होता.बिचारे शेवटच्या बॉलपर्यंत लढले…आणि आज मी लढणार होतो. शेवटच्या शब्दापर्यंत!

पुढच्याच क्षणी, माझं लक्ष जरा खोल गेलं…

"आज काहीतरी वेगळं आहे घरात…"

पण काय?

स्वयंपाकघरातून काही तरी खमंग वास येत होता.मी डोकं आत टाकून पाहिलं. वैशाली उठून आधीच किचनमध्ये होती.(हे आधीचं उठणं म्हणजे काहीतरी शंकेचा प्रकार असतो!)

तिच्या चेहऱ्यावर एकदम "मी काही बोलणार नाही, पण तुला कळू देईन तुझं पाप" टाईप शांतता होती.

आता एक गोष्ट पक्की होती,जेव्हा बायको ‘शांत’ असते, तेव्हा नवऱ्याच्या जीवाला 'काळजी' लागत नाही. थेट घाम फुटतो!

मी आंघोळ करता करता एक नजर डावीकडे टाकली.शिरा!बाजूला बटाटेवडा पण!

माझ्या मनात विचार आला –"आज इतकी तयारी? की आज घरात कुणाचं श्राद्ध आहे?"पण नाही… वैशाली हसली.

पण तिचं ते हसू म्हणजे… ‘आय लव्ह यू… पण तुझी खैर नाही आज’ असं सौम्य विषभरलेलं गोडगोड!

मी हळूच विचारलं,"अगं, आज शिरा? म्हणजे काही स्पेशल वाटतंय का तुला?"

ती काही न बोलता एका कटाक्षाने माझा समाचार घेत राहिली.

तो कटाक्ष असा होता की,"माझ्या वाढदिवसाची आठवण झाली नाही ना? मग फक्त शिरा नाही… नंतर शिरसंच होणार तुझं!"

ऑफिसला जाताना मी सवयीने मोबाईल चेक केला.व्हॉट्सॲपवर मेव्हणीचा स्टेटस झळकला –

"Happy birthday tai!

ते वाचताच डोळे विस्फारले गेले."बापरे! वाढदिवस!!"

क्षणभर मी पांढराफटक पडलो. डोकं सुन्न झालं.माझ्या हृदयात एकदम धूम-२ ची बॅकग्राउंड म्युझिक सुरु झाली –“धूम मचाले धूम…”

बायकोचा वाढदिवस म्हणजे एक प्रकारची लक्षात ठेवण्याची परीक्षा असते.सकाळी शुभेच्छा नाही, गिफ्ट नाही, केक नाही.म्हणजे मी थेट ‘अनुत्तीर्ण नवरा’ या यादीत प्रवेश केला होता!

मी घाईघाईनं रिक्षावाल्याला ओरडलो,"भाऊ, थांबवा इथेच! मी पुढे जाणार नाही."

तो चमकून मागे वळला, "का हो? ऑफिसला नाही का जायचं?"मी खोल श्वास घेत उत्तर दिलं,"ऑफिस राहिलं तरी चालेल, पण आज जर घरी गेलो नाही…तर माझं लग्नच राहणार नाही!"

रिक्षावाला गोंधळून गेला. मी त्याच्या हातावर भाडं ठेवून उतरायला लागलो.तो अजूनही विचारात. शेवटी मी त्याच्याकडे वळून गंभीरपणे म्हणालो,"भाऊ, मी जर आज ऑफिसला गेलो तर,माझं आयुष्य धोक्यात येईल,मला माझा लग्न वाचवण्यास घरी जावंच लागेल"!

रिक्षातून उतरून मी थेट फुलांच्या दुकानात गजरा घेण्यास गेलो. श्वास फुलला होता, पण चेहरा शांत ठेवायचा प्रयत्न करत होतो."गुलाब किती?"

तो फुलवाला माझ्याकडे बघून हसला, म्हणाला,"साहेब, तिचा राग मावेल एवढे घ्यायचे असतील तर संपूर्ण दुकानच घेऊन जा!"मी ओठ चावले. "काहीतरी तरी सौम्य हवं."तो म्हणाला, "सौम्य म्हणता तर गुलाब नव्हे… काटे लागतील साहेब!"

मी गोंधळलो. गजरा घेऊन पुढे गेलो गिफ्ट शॉपकडे."बायकोसाठी गिफ्ट हवं… पण 'चूक मान्य' असं दिसायला हवं," मी दुकानदाराला स्पष्ट सांगितलं.

तो थोडा विचारात गेला आणि एक ब्रेसलेट काढून म्हणाला,"हा घ्या… यावर ‘Sorry’ कोरलेलं आहे. मागच्या आठवड्यात सहा नवऱ्यांनी घेतलंय.आणि ते सहापैकी चार अजूनही ‘सिंगल’ आहेत!"मी ते न विचार करता घेतलं. त्याने ब्रेसलेटच्या पिशवीवर ‘Good Luck’ स्टिकर लावला.

तिथून पुढे मी साडी घेणास गेलो. तिथून एक छान साडी घेतली. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा थांबा — केक शॉप. होता.मी घसा कोरडा करत काउंटरवर पोहोचलो."साहेब, केकवर काय लिहायचं?" केकवाल्याणी विचारल.

"Sorry for forgetting… पण Happy Birthday वैशाली!"मी पुटपुटलो,

केकवाल्याच्या हातातलं स्पॅचुला थांबलं. तो माझ्याकडे डोळे विस्फारून बघू लागला."साहेब, एवढं लिहिलं तर केकवर जागा उरणार नाही… पण तुम्ही मोठे माणूस दिसता,तेव्हा घरी मोठं मनही ठेवा… केक थोडाच पुरतो!"

आता घरी जायचं होतं. गजरा, गुलाब, ‘Sorry’ ब्रेसलेट,साडी, आणि जरा सजलेला केक घेऊन…जात होतो.पण मनात भीती होती —"वैशालीचा राग हे गजरा,गुलाबं, साडी,ब्रेसलेट, केक यांच्या पलीकडे असू शकतो!"

मी घरी आलो. वैशाली सोफ्यावर पायावर पाय चढवून वर्तमानपत्र वाचत होती, चष्म्याच्या वरून मला “मृत्युदंड” देईल अशा नजरेनं बघत.News Headline: "विस्फोटात दहाशे जखमी…"आणि माझ्या डोक्यातला स्पीकर जोरात ओरडला."घराजवळला विस्फोट सुरु होतोय की काय!"

मी पटकन् गिफ्ट पँटच्या खिशात लपवलं, केक चढ्या पावलांनी फ्रीजमध्ये ठेवला.

घरातले सर्व दिवे बंद केले,मोबाईलच्या टॉर्चमध्ये धडपडू होऊ नये म्हणून आधीच ‘मार्गदर्शक’ कँडल्स पेटवल्या."वैशाली, ये बरं…" आवाजात भिजकं गोडव, अंगात कंप होता मी आवाज दिला.ती सावध पावलांनी आली; त्या मंद उजेडात तिचं ‘पोलीस चौकशी’ मोडमध्ये असलेलं तोंड मला स्पष्ट दिसत होतं.

केक समोर केला."Sorry for forgetting… पण Happy Birthday वैशाली!"ती दोन सेकंद पाहतच राहिली… आणि मग इतकं हसली की डोळ्यांत पाणी आलं, केकमधल्या साखरेइतकंच गोड होत.

"रम्या, तुझं विसरणं एवढं वाईट नाही वाटलं… पण कबूल केलंस ते सुद्धा केकवर! त्यामुळे मी तुला माफ केलं."मी अक्षरशः जीव टाकला."म्हणजे पास?""हो… पास, पण ग्रेस मार्क्सने!"मी मनातच पुटपुटलो.

ती ड्रेसिंग टेबलजवळ गेली. मी घाम पुसत उरलेला ऑक्सिजन भरत होतो.तिने गिफ्ट उघडलं. साडी देखणी होती. जिथे-जिथे ती नेसेल तिथे मला क्रेडिट मिळेल, असं वाटणारं सौभाग्य मनात झळकत होत.पण टॅगवर ठळक अक्षरात लिहिलं होतं:“प्रिया – खास तुमच्यासाठी”माझ्या मेंदूची विजेची मुख्य लाईनच फ्यूज झाली!

ती शांत, न हलता म्हणाली,"प्रिया कोण रे?"मी हकलत गडबडलो—"अगं, ती... दुकानातली सेल्सगर्ल… म्हणजे नाही… म्हणजे दुकानाचं नाव!"ती डोळे न फिरवता शत्रूच्या रडारसारखी नजर रोखून म्हणाली—"मग उद्या 'Sweetie Darling Collection' मधून घेणार असशील!" 😡

मी शेवटी तिच्यासमोर हात जोडले, "हे बघ, नाव विसरलो, पण तुझ्या नावाने केक आणलाय तो ही एकदम सजेलला!"ती थोडी सावरली, साडीच्या फॉलइतकी शांत होऊ लागली."ठीक आहे… पुढच्या वर्षी विसरलास, तर केक तोंडात नाही तर तुझ्या डोक्यात घालीन! ...आणि तोही प्रिया नावाचा असेल!" 😂

त्या रात्री आम्ही दोघांनी केक खाल्ला… तिनं थोडं हसून माफ केलं, आणि मी मनात वचन दिलं—"वाढदिवस विसरणं ठीक आहे, पण गिफ्टवर दुसऱ्या बाईचं नाव – हा गुन्हा परत नाही करायचा!"

- अक्षय वरक.