छत्रपती शाहूमहाराज ; एक अद्वितीय व्यक्तिमत्व
छत्रपती शाहू महाराज. म्हणतात की ते असे छत्रपती होवून गेले की त्यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब घडले व त्यांना संविधानही लिहिता आलं. ते जर झाले असते तर डॉ. बाबासाहेबांना संविधानही लिहिता आलं नसतं.
तो काळ धामधुमीचा होता व त्या काळात दलित अर्थात अस्पृश्यांची मुलं शिकत नव्हती. अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकते झाले, ज्यांच्या शिक्षणाला कितीतरी रुपये खर्च येत होता.
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४. परंतु त्यांचा जन्म इतिहासकार २६ जुलै असा सांगतात. त्यात याच तारखेवर अभ्यासक व साहित्यिकांनी संशोधन केलं. ज्यातून पडताळणी केल्या गेली व पडताळणीतून असं लक्षात आलं की डॉ. बाबासाहेबांनी जी पत्रे छत्रपती शाहू महाराजांना पाठवली होती. त्यात डॉ. बाबासाहेबांनी त्यांची जन्मतारीख २६ जुन लिहिले असल्याचे आढळले. त्यावरुन त्यांची जन्मतारीख ही २६ जुन १८७४ ठरवल्या गेली.
छत्रपती शाहूमहाराज हे कोल्हापूर संस्थानाचे चौथे छत्रपती. या गादीसाठी फारच संघर्ष झाला. ज्यात दोन स्वतंत्र गाद्या अस्तित्वात आल्या. एक सातारा व दुसरी कोल्हापूर.
कोल्हापूर संस्थान निर्माण होण्याचा एक इतिहास आहे. औरंगजेबाला आलमवीर बनायचे होते नव्हे तर त्यांचं स्वप्न होतं. त्याच स्वप्नांच्या प्रतिपुर्तीसाठी बादशाहा औरंगजेब महाराज शिवाजी राजे मरण पावताच महाराष्ट्रात आले. त्यांनी संपुर्ण हिंदुस्थान जिंकला होता. ज्यात फक्त महाराष्ट्रच एक प्रांत शिल्लक होता. अर्थात महाराष्ट्राला जिंकल्यास आपण नक्कीच आलमवीर बनू शकू. ही औरंगजेबाची महत्वाकांक्षा होती. परंतु शिवाजी महाराजांच्या शौर्यापुढं आपला टिकाव लागू शकत नाही. हे औरंगजेबाला माहित होते. म्हणूनच ते शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात आले नाही. परंतु जसे शिवाजी महाराज मरण पावले. तेव्हा असं वाटलं की आता आपल्याला अख्खा महाराष्ट्र आपल्या घशात घालता येईल. हाच विचार करुन औरंगजेब महाराष्ट्रात आला.
औरंगजेब महाराष्ट्रात आला. त्यानं मराठेशाहीला नमोविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु ते मराठे होते. ते नमले नाहीत. उलट औरंगजेबाला हताश केलं. यादरम्यान राजाराम महाराजांना गादीवर बसवून महाराणी येसूबाई रायगड औरंगजेबाच्या ताब्यात देवून औरंगजेबाला शरण गेल्या होत्या. तिथंच संभाजीपुत्र शाहू यांचं बालपण गेलं. त्यातच औरंगजेबाच्याच कैदेत असतांना छत्रपती शाहू महाराजांचे विवाह झाले व त्यांना एका प्रदेशाची जहांगीरीही मिळालेली होती. हे सर्व औरंगजेब करीत असतांना त्यांनी आपल्या हयातीपर्यंत त्यांना सोडलं नाही. परंतु जेव्हा बादशाहा मरण पावला. तेव्हा त्याच्या वारसांच्या मनातही मराठेशाहीचा राग धुमसतच होता. त्यावेळेस महाराणी ताराबाई सत्तेवर होत्या. शेवटी मराठेशाहीला नामोहरम करण्यासाठी त्यांनी छत्रपती शाहूला सोडले. ज्यांनी एका वर्षातच म्हणजे सन १७०८ मध्ये खर्डा येथे लढाई केली. जी निर्णायक ठरली व त्यात महाराणी ताराबाईचा पराभव झाला व सातारा आणि करवीर अर्थात कोल्हापूर असे दोन संस्थान उदयास आले. ज्यात कोल्हापूर संस्थान ताराबाई मला व सातारा संस्थान छत्रपती शाहूमहाराज यांना मिळालं. पुढं कोल्हापूर संस्थानातही वाद झाला व सन १७१३ ला महाराणी ताराबाईची सवत राजसबाईच्या पुत्रात लढाई झाली. ज्यात ताराबाईला अपयश आलं व करवीर संस्थान राजसबाईला मिळालं.
ते शिवाजी महाराज व त्यांच्या वारसात संस्थानाअंतर्गत झालेली ही सत्तेची वाटणी. राजर्षी ही त्यांची पदवी. छत्रपती शाहू हे चौथे व खरे समाजसुधारक नव्हे यर समाजसेवकच. त्यांनी यशस्वी अशीच धोरणं राबवली. त्यांनी सत्तेवर बसल्यापासून म्हणजेच सन १८९४ पासून तर त्यांच्या मृत्युपर्यंत अर्थात १९२२ पर्यंत लोकांना विविधतापूर्ण मदत केली. त्यांनी राज्यातील मागास वर्गीयांसाठीही मदतीचं पाऊल उचललं. ज्यात जात, पंथ वा धर्म असा भेदभाव केला नाही. त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला.
तो काळ गुलामगिरीचाच होता व त्या काळात इंग्रजांचा वरदहसात होता. शिक्षण इंग्रजी होतं व ते शिक्षण निःशुल्क नव्हतंच. असं शिक्षण शिकायला पैसे लागत असत. डॉक्टर बाबासाहेबांना शिकायचे होते. त्यातच त्यांचेजवळ पुरेसे पैसे नव्हते. जे काही पैसे होते. त्यातील बरेचसे पैसे त्यांच्या आतापर्यंतच्या शिक्षण घेण्यात खर्च झाले होते.
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म घाडगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत व त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंग उर्फ अप्पासाहेब, त्यांच्या आईचे नाव राधाबाई. छत्रपती शाहूंना कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतलं. ती तारीख होती, १७ मार्च १८८४. त्याचवेळेस त्यांचं नाव शाहू ठेवलं होतं. त्यानंतर त्यांचं शिक्षण सुरु झालं व शिक्षण सुरु असतांनाच त्यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळेस त्यांचं वय सतरा वर्ष होतं. तशीच त्यांची पत्नी बारा वर्षाची होती. हा बालविवाहच होता. ती तारीख होती, १ एप्रिल १८९१. त्यानंतर त्यांचा राज्यभिषेक झाला. ते साल होतं, २ एप्रिल १८९४.
छत्रपती शाहूमहाराज हे बहुजनांचे हितकरी बनले. त्याचं कारण आहे, ब्राम्हणेत्तर लोकांवर करण्यात येणारे संस्कार. त्यांच्या राज्यातील राजघराण्यातील ब्राम्हण पुरोहितांनी इतर समाजाचे संस्कार वैदिक धर्मानुसार न करण्यास नकार दिल्याने त्यांना माणूस व माणूसकी म्हणजे काय? ते समजलं. त्यांनी त्यावर विचार केला की ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर माणसं ही एकाच रक्त, मांस, हाडांची आहेत. असे असतांना ब्राम्हण समाजात वैदिक स्रोतानुसार संस्कार चालतो आणि तोच संस्कार इतर समाजाला नाकारला जातो. असे का? याच प्रश्नातून छत्रपती शाहूमहाराजांनी आर्य समाज, सत्यशोधक समाज व मराठा समाज यांच्या समाजहक्कासाठी मदत केली. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानात पुजारी असलेली ब्राम्हण मंडळी हटवली व त्याजागी क्षत्रीय धर्मगुरु नेमला. जो जातीनं मराठा होता.
हे छत्रपती शाहूमहाराजांचे धाडसी पाऊलच होते. त्यांनी पुढे मराठेच नाही तर इतरही समाजाला एका झेंड्याखाली आणले व ते त्यांचे नेते बनले. त्यांनी आपल्या राजवटीच्या तब्बल अठ्ठावीस वर्षाच्या काळात बहुजन समाजाच्याच उत्थानासाठी प्रयत्न केलेले आहेत.
छत्रपती शाहू महाराजांनी पाहिलं की बऱ्याच ठिकाणी ब्राम्हण समाजांच्या शाळा वेगळ्या आहेत व अस्पृश्य लोकांच्या मुलांच्या शाळा वेगळ्या आहेत. हे त्यांना आवडलं नाही व सन १९१९ मध्ये त्यांनी अशाप्रकारच्या शाळा बंद केल्या. त्यातच त्यांनी जातीभेद बंद करण्यासाठी आंतरजातीय विवाहालाही प्राधान्य दिलं होतं. त्यासाठी त्यासंदर्भात वेगळा असा कायदाही तयार केला होता.
छत्रपती शाहूमहाराजांनी ज्याप्रमाणे समाजसुधारणेला व अस्पृश्यता निवारण करण्याला प्राधान्य दिले. त्याचबरोबर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठीही मदत केली. त्यांनी मुकनायक वृत्तपत्रालाही सढळ हातानं मदत केली. अस्पृश्य हा समाज आधीपासूनच उपेक्षित आहे व त्यांचं उपेक्षितपण संपायला बवं म्हणून त्यांना व्यवसाय शिक्षण देण्यास प्रारंभ केला. दुकाने, हॉटेल काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यात आर्थिक मदतही केली. शिवाय शिवणयंत्रे सुद्धा अस्पृश्यांना दिलीत. ज्यातून राजवाड्यातील कपडे शिवून घेतले जात. एवढंच नाही तर त्यांनी अस्पृश्यांनाही पंडीत नावाची पदवी देण्यास प्रारंभ केला. शिवाय आपण बोलके नाही तर कर्ते पुढारी आहोत हे दाखवून देत असतांना त्यांनी आपल्याच बहिणीचा विवाह धनगर समाजाच्या व्यक्तींशी लावला. त्यानंतर असे अनेक आंतरजातीय विवाह लावण्यात आले.
शाहू महाराजांनी अनेक वसतीगृह देखील काढले. ज्यात नागपूरातील संत चोखामेळा वसतीगृहाचा समावेश आहे. ते १९२० ला काढलं.
छत्रपती शाहूमहाराजांनी वैविध्यपूर्ण कार्य केले. त्यांनी केवळ अस्पृश्यच नाही तर स्रियांबाबतीतील कार्य का असेना, ज्यात देवदासी विधवा पुनर्विवाह बंदी वा इतर तत्सम स्रीविरोधक प्रथांना बंदी लावली. त्यांचे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संबंधाबाबत सांगायचं झाल्यास ते डॉक्टर बाबासाहेबांना चांगले मानत. त्यांना उच्च व परदेशी शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. शिवाय पैशाअभावी बंद पडलेल्या मुकनायकची गरज लक्षात घेता त्यांनी १९२०ला सुरु झालेले मुकनायक पुन्हा सुरु करण्यासाठी पैसा दिला व पुढे मुकनायक पुन्हा नव्याने सुरु झाले. असे हे महान नायक छत्रपती शाहूमहाराज सन ६ मे १९२२ मध्ये मुंबई इथे मरण पावले. परंतु ते जरी मरण पावले असले तरी त्यांचं कार्य तिथंच थांबलं नाही. तेच कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलं. ते कार्य सुरु होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनापर्यंत. बाबासाहेबांबाबत सांगायचं झाल्यास बाबासाहेबांनी शाहू महाराजांचेच अपुर्ण राहिलेले कार्य पुर्ण केले. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०