Don't call us poor. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | आम्हाला गरीब नका म्हणू हो

Featured Books
Categories
Share

आम्हाला गरीब नका म्हणू हो

आम्हाला गरीब नका म्हणू हो

           *आम्हाला गरीब म्हणू नका. आम्हाला ते चिडवणं झालं. एका गरीब माणसाची व्यथा. आपण सतत म्हणत असतो की अमुक अमुक व्यक्ती हा गरीब आहे. हे आपलं गरीब म्हणणं म्हणजे ही एक गरीब माणसांची केलेली टिंगल असते. तसं पाहिल्यास गरीब व्रक्ती हा काही गरीब नसतोच. तो एवढा श्रीमंत असतो की त्याच्या घरी आनंद असतो. इज्जत, अब्रू, मान, पान सन्मान असतं. त्याच्या घरी कोणी गेल्यास त्याच्या घरची मंडळी ही मान करीत असतात. तो भ्रष्टाचार करीत नाही व अतिशय इमानदारीनं, चालतो वागतो. अशा गरिबांच्या घरातून संकटं कितीतरी दूर पळालेली असतात. आजार तर बिचाऱ्यांना शिवत नाहीत. त्यांच्या घरी कोणी गेल्यावर जसा मानपान होतो, तसेच साहेब घरी जर असतील तर साहेब ताबडतोब आपल्याला मिळतात. याउलट श्रीमंत घरचं आहे. काही काही श्रीमंत हे दरवाजे लावूनच असतात. त्याचा अर्थ असा की कोणी त्याच्या घरी फिरकूच नये. अन् एखाद्यावेळेस कोणी फिरकल्यास व विचारल्यावर जाणीवपूर्वक उत्तर मिळतं की साहेब घरी नाहीत. ते घली असतात तरीही हेच उत्तर. कधी फोन केल्यावर तेच उत्तर आणि साहेबांचं बोलणं मोबाईल मधून येत असतं. म्हटल्यावर शेजारील व्यक्ती आहे अशी बतावणी केली जाते.*
            आम्हाला गरीब नका म्हणू हो. ही गरीबांची केविलवाणी गोष्ट. त्यांच्याजवळ कमी पैसे असतात. ते नाहीच्या बरोबरच असतात. त्यांना कभी पैसे मिळतात. परंतु ते पैसे त्यांच्यासाठी मोठेच असतात. 
            आपले त्यांना वारंवार गरीब संबोधणे. हे त्यांच्या भावना दुखावणारे असते. हा त्यांचा अपमानच असतो. परंतु आपल्याला ते कळत नाही. आपण श्रीमंत असतो ना. मग त्याचा आपल्याला गर्व असतो. म्हणूनच आपण तसा शब्दप्रयोग करीत असतो. आपल्याला त्यांचा होत असलेला अपमान हा अपमान वाटत नाही. आपल्या पदोपदीच्या वाक्यात त्यांचा अपमानच भरले आ असतो आणि आपलं वागणंही तशाच स्वरुपाचं असतं. 
           ते गरीब नक्कीच असतात. परंतु लाचार नसतातच. ते स्वाभिमानी असतात. त्यांच्यासाठी एखादा वाईट शब्द म्हणजे त्यांच्यासाठी अपमान असतो. परंतु ते त्यावर उत्तर देत नाहीत. जरी त्यांच्या भावना दुखत असतील तरी. सहनशीलपणा त्यांच्यात कुटकूट भरलेली असते. 
         विशेष बाब ही की आपण श्रीमंत आहोत. हे जरी खरं असलं तरी असा प्रश्न निर्माण होतो की आपण श्रीमंत कसे? कारण आपण श्रीमंत जरी असलो तरी आपला व्यवहार हा श्रीमंत नसतोच. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती तहानेनं व्याकुळ असेल आणि तो आपल्याला पाणी मागत असेल तर आपण त्याला पाणी देत नाही. याला श्रीमंत म्हणता येईल काय? तर त्याला श्रीमंत म्हणताच येणार नाही. 
            श्रीमंतांबाबत सांगतांना ज्याला माणूसकी नाही. त्यालाही श्रीमंत म्हणता येणार नाही. तसं पाहिल्यास आज दिखाव्याचं जग आहे. या जगात जो व्यक्ती दिखावा करतो. तो श्रीमंत वाटतो. तसं पाहिल्यास लोकं दिखावाच जास्त करतात. त्या भरजरी साड्या, ते नटणं, ती कार, ती इमारत. सारा काही थाटबाट. परंतु अंतर्गत भाग तपासून पाहिला तर हे सगळं दिसतं कर्जाच्या भरवशावर. जे स्वतःला उच्चकोटीचे श्रीमंत समजतात. त्यांच्यावर कितीतरी रुपयाचं कर्ज असतं व ते कर्जाचे हप्ते फेडत असतात. याउलट गरीबांवर कोणत्याही स्वरुपाचं कर्ज नसतं. त्यांचं दाखवणं हे वास्तविक असतं. त्यांची रहनसहन व त्यांचा दिखावा हा सारस्वत असतं. ते जेवढे कमवतात. तेवढाच पैसा खर्च करुन जगतात. ते जरी श्रीमंतांच्या यादीत येत नसले तरी ते श्रीमंतच असतात. कारण त्यांच्यात माणूसकी असते. महत्वपूर्ण बाब ही की आजच्या काळात कोणीही गरीब नाही व कोणीही श्रीमंत नाही. कारण आज कोणताच मनुष्यप्राणी हा उपाशी राहात नाही. उपाशीपोटी झोपत नाही. तसंच आजच्या काळात जे दिखावा करुन स्वतःला श्रीमंत असल्याचे समजतात. त्यांना व्यवस्थित झोपही येत नाही. दिवसभरात त्यांनी श्रीमंत बनण्यासाठी जे काही केलं. त्याच गोष्टीची चिंता त्यांना रात्रीला सतावत असते. जसे भ्रष्टाचार करणे. याउलट जे गरीब असतात नव्हे तर ज्याची मिळकत कमी असते. ती मंडळी रात्री सुखानं निवांत झोपत असतात. 
         महत्वाचं सांगायचं झाल्यास काय गरज आहे, दिखावा करुन मी श्रीमंत आहे हे दाखविण्याची? काय गरज आहे मी झटपट श्रीमंत व्हावे म्हणून भ्रष्टाचाराचा मार्ग स्विकारण्याची? अन् काय गरज आहे, कर्ज काढून श्रीमंत असल्याचा थाटबाट दाखविण्याची? त्यापेक्षा साध्य सामान्य लोकांसारखं जीवन जगलं तर त्यात गैर काय? ज्यात माणूसकी असेल. परंतु लोकं तसं जगणं जगत नाहीत. त्यांना श्रीमंत होण्यासाठी भ्रष्टाचार करण्याची आवड असते. त्यांना श्रीमंत समजावे म्हणून कर्ज काढण्याची आवड असते. ज्यातून समस्या उद्भवतात व ऊशा समस्या उद्भवल्या की रात्रीला झोप येत नाही. ज्यातून आजार होतात व सुख, आनंद कोसो दूर पळतो. 
            विशेष सांगायचं म्हणजे कोणी श्रीमंत होता यावं म्हणून भ्रष्टाचार खरु नये. आपणाला लोकांनी श्रीमंत समजावं म्हणून कर्ज काढू नये. तसा दिखावा करुच नये की ज्यातून आपलं सुख व आपला आनंद हिरावला जाईल. ज्यातून आपल्याला समस्या उद्भवतील. ज्यातून आपल्याला झोप येणार नाही व आपले आरोग्य बिघडेल. ते आरोग्य ज्यातून आपण श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करीत असतो.
         महत्वपूर्ण बाब ही की असा श्रीमंतपणा आपल्या कोणत्या कामाचा की ज्यातून आपल्याला चांगलं आरोग्य लाभू शकत नाहीत. ज्यातून आपल्याला सुख व आनंद मिळू शकत नाही. ज्यातून आपली माणूसकी गहाण पडेल. त्यापेक्षा आपण गरीबच राहिलेलं बरं की ज्यामध्ये आनंद व सुख आहे, ज्यामध्ये माणूसकी कुटकूट भरले ई आहे. ज्यात परमेश्वराचा वास आहे अन् तेवढाच परीवाराचा जिव्हाळा आहे की जो जिव्हाळा आपले मनोबल वाढवत असतो. यात शंका नाही.

             अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०