शिक्षण सर्वांनाच उपयोगाचं?
शिक्षण सर्वांनाच मिळायला हवे. मग ती स्री असो, पुरुष असो वा एखादा अस्पृश्य असो, आदिवासी असो वा एखादा आंधळा असो, अपंग असो, लहान असो, वयोवृद्ध असो. शिक्षणासमोर, शिक्षण घेतांना सर्व समान असतात. त्यानुसार शिक्षण ही प्रक्रिया सर्व समावेशक आहे व त्यात लिंगभेद नाहीच.
शिक्षणाचे दोन प्रकार आहेत. औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे रितसर घेतलेले शिक्षण. जे रितसर प्रवेश घेवून शाळेत मिळत असतं आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे शिक्षण शाळेत न जाताही मिळते. जसे थॉमस अल्वा एडीसन व मायकेल फॅरेडे व लुई पाश्चरला मिळाले. ते शाळेत न जाताही शिकले.
शिक्षण का बरं घ्यायचं? त्याचं कारण आहे, शिक्षणातून साक्षर झालेली जनता. याचा अर्थ असा आहे काय, पुर्वीच्या काळात अनाडी होते? पुर्वीच्या काळातही कोणीच अनाडी नव्हते. तेही साक्षर होते. जसे एखाद्यावेळेस एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याचा आजार लवकर सुधरविणारे मांत्रीक हे हे शिकलेले असायचे. ते मंत्रविद्येत पारंगत असायचे. त्यासाठी ते शाळेत जायचे काय? याचं उत्तर नाही असंच येईल. समजा एखादा आपल्या परिसरात गुंड व्यक्ती तयार झालाच तर त्याला त्या गुंडेगिरीचे शिक्षण हे शाळेत जावून मिळेल काय? आपण आपल्या शाळेत गुंडाना गुंडगिरी शिकवतो काय? त्याचंही उत्तर नाही असंच येईल. होय ना. मायकेल फॅरेडे, लुई पाश्चर व थॉमस अल्वा एडीसनचं नाव जगभर झालं. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं, त्यांनी लावलेले निरनिराळे शोध. थॉमस एडीसननं लावलेला विद्यूत बल्बचा शोध हा एक नुतन सा शोध होता. ज्यासाठी त्याला शाळेत जावे लागले नाही. लुई पाश्चरने पाश्चात्यीकरण प्रक्रिया आणली. मायकेल फॅरेडेने डिझल इंजीन बनवले. आता विचार असा की त्यांना ते शोध का लावता आले? ते शाळेत जरी गेले नसले तरी. त्याचं उत्तर आहे, निरीक्षण. जे निरीक्षण प्रकल्प अंतर्गत, नवोपक्रम अंतर्गत व कृती संशोधन अंतर्गत करावं लागतं. शासनालाही वाटतं की देशाचा विकास करायचा आहे ना. मग देशाचा विकास केवळ लोकं शिकल्यानंच होणार नाही. एखादा व्यक्ती फार शिकला व तो करणार काहीच नाही तर त्याच्या शिक्षणाचा उपयोग नाही. तसेच आपण जर एवढे शिकलो. परंतु त्याचा उपयोगच आपण करु शकलो नाही तर आपल्यालाही आपल्या शिक्षणाचा उपयोग होवू शकणार नाही. शासनाला तेच वाटलं. म्हणूनच शासनानं जे २०२० चं नवीन शैक्षणिक धोरण बनवलं. त्यानुसार त्यांनी अशा शिक्षणाचा पुरस्कार केला. ज्या शिक्षणातून रोजगार निर्माण करता येईल. जो रोजगार करायला लाज वाटणार नाही. शासनानं अशा शिक्षणातून अशा बाबी समोर आणल्या. ज्यातून देशाचा विकास आपोआपच साध्य करता येईल.
पुर्वीच्या काळी लोकं शिकत नव्हते असे नाही. त्यावेळेसही लोकं शिकत होते. म्हणूनच झाडावरुन माकड रुपातील माणूस नावाचा एक प्राणी खाली जमीनीवर आला. जमीनीवर येताच त्यानं स्वतःचं संरक्षण करण्याच्या तरतूदी शिकला. त्यानंतर पोट भरण्याचं साधन शिकला. ज्यात शिकार करणे, कंदमुळे खाणे व ते मिळवायचे कसे? या करतबी शिकला. त्यानंतर शिकार ही एखाद्या अवजारानं होते, याही गोष्टी तो शिकला व त्याबाबतीत विचार करतांना त्याच्या लक्षात एक गोष्ट आली, ती गोष्ट म्हणजे दगडांची अवजारे बनवणे. ती गोष्ट लक्षात येताच तो दगडापासून अवजारे बनवू लागला. त्यानंतर त्यानं लाकडाची अवजारे बनवली. त्यानंतर त्यानं प्राण्यांच्या हाडाची अवजारे बनवली. पुढं त्यानं तांबे, लोह व सोने या धातूचा शोध लावला. याचाच अर्थ असा की शोध लावण्याची प्रक्रिया ही आजची नाही. ती पुरातन काळापासून अस्तित्वात आली.
मध्यंतरीचा काळही असाच येवून गेला. या मध्यंतरीच्या काळात पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया सुरु झाली. ज्यात वेगवेगळ्या स्वरुपाची शाही बनविण्याचं तंत्रज्ञान विकसीत झालं. त्यातच युद्धाच्याही गोष्टी केल्या गेल्या. ज्या अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक होत्या. राजा असायचा व तो राजा आपलं राज्य टिकविता यावं म्हणून जागोजागी आपल्या सरदारांच्या माध्यमातून आखाडे तयार करायचा. ज्यातून तलवारबाजी, तलवारबाजीचे निकष, ज्यात स्वतःचं संरक्षणही शिकविलं जायचं. ते औपचारिकच शिक्षण असायचं.
या सर्व गोष्टी माणूस शिकला. हळूहळू शिकत गेला. काही लोकं हे औपचारिक पद्धतीनं शिकले. ते गुरुच्या आश्रमात गेले. काहींना परवानगी नव्हती शिकायची. म्हणूनच ते गुरु आश्रमात जावू शकले नाहीत. परंतु त्यांनी जे केही शिक्षण घेतलं. त्या शिक्षणाचा वापर त्यांनी पोट भरण्यासाठीच केला. म्हणजे शिक्षणाची खरी गरज आहे, पोट भरणे ही गोष्ट आपल्याला समजते. शेती व शेतीचं तंत्रज्ञान, पशुपालन व दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, युद्ध व युद्धजन्य साहित्य तयार करणे, या साऱ्या गोष्टी माणूस शिकला. त्यातच पोट भरण्यासाठी माणूस जेव्हा जंगलात गेला. त्यावेळेस त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. त्यातूनच प्राणी कसे माणसाळवायचे. याही गोष्टी तो शिकला. ज्यातून त्यानं कुत्र्यावर विजय मिळवला. ज्यातून त्यानं हत्ती, वाघ, सिंह, अस्वल यावर विजय मिळवला. एवढंच नासी तर सापावरही विजय मिळवला. आज आपण पाहतो की जी गारुडी समाजाची मंडळी असतात. ते सापाला पकडून गळ्यात टाकतात. फाप पाळतात आणि साप विषारी असूनही त्यांना काहीच करीत नाहीत. त्थाचं कारण त्यांना अवगत असलेलं ज्ञान. जे आपल्याला नाही. ज्या गोष्टीची गरज आपल्याला जेव्हा भासते. त्या गोष्टी मिळविण्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रयत्न करतो व त्या गोष्टी मिळविण्यासाठी आपण प्रयोगही करतो. त्यासाठी निरीक्षण करतो. म्हणूनच त्या काळात लोकांना शोध महत्वाचे वाटले व जे शोध लावले गेले. ते निरीक्षणातून लावले गेले. ज्यासाठी आपल्या पुर्वजांना शाळेत जायची गरज नव्हतीच. आपलं मात्र त्यातील कोणत्याच शोधाकडे लक्ष गेलं नाही.
नवीन शैक्षणिक धोरण. यात जो अभ्यासक्रम बनवला. त्यात अशा शोधावरच जास्त भर दिल्या गेला. त्याचं कारण आहे, तंत्रज्ञ तयार करणे. हेच तंत्रज्ञ तयार व्हावेत म्हणून शासनानं नवीन शैक्षणिक धोरणात त्यासाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला. ज्यात प्रकल्प, नवोपक्रम व कृतीसंशोधनावर भर दिला. ज्यात प्रकल्प ही संशोधनाची पहिली पायरी आहे.
प्रकल्प...... प्रकल्प म्हणजे कोणत्याही प्रक्रियेत विशिष्ट उद्दीष्टे साध्य करण्यासाठी असलेले व्यावहारिक कार्य किंवा उपक्रम. यामध्ये लोकांना स्वशिक्षणाची संधी मिळते. तसेच त्यांच्या सर्जनशिलतेला वाव मिळतो. विश्लेषण कौशल्य आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेत वाढ होते. जो भाग बाल्यावस्थेपासूनच विद्यार्थ्यांना शिकवला जातो. ज्यातून शोध कसे लावावे लागतात. याची अनुभूती प्रकल्प माध्यमातून विद्यार्थ्यांना होते व ते साहजिकच शोधाकडे वळत असतात. हे सगळं बरोबर असलं तरी आज प्रकल्प म्हणजे काय हे बऱ्याच शिक्षकांना कळतच नाही. शिक्षणक्षेत्रात आजही असे बरेच शिक्षक आहेत की त्यांना साधा अर्ज कसा लिहायचा, तेही कळत नाही. काही शिक्षक स्वतः अपडेट व्हायला तयार नाहीत. ते स्वतःमध्ये बदलावच करीत नाहीत. ते शिकविण्यासाठी त्याच जुन्या परंपरागत शिक्षणाच्या पद्धती वापरतात. तसेच आज तंत्रज्ञानाचं युग असतांनाही बऱ्याचशा शाळेत ओव्हरहेड प्रोजेक्टर वापरत नाहीत. बऱ्याचशा शासकीय शाळेची अशीच गत आहे. काही खाजगी शाळेचीही हीच गत आहे. शाळा व्यवस्थापन करणारा व्यक्तीच तशा प्रकारच्या सोयीसुविधा शाळेला पुरवीत नाही. शिवाय प्रकल्प बनविण्यासाठीही थोडासा खर्च येतोच. तो खर्चही काही आईवडील करायला तयार नसतात. त्यामुळं शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमावर अंकुश लागतो व त्याची परियंती विद्यार्थ्यांच्या अधोगतीत होतो.
विशेष सांगायचं झाल्यास प्रकल्पातून विद्यार्थ्यात संशोधन वृत्ती वाढीस लागते. त्यासाठी जी निरीक्षण शक्ती लागते. ती विद्यार्थ्यात निर्माण होते व विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल होते. जर त्या प्रकल्पास पालक, शिक्षक, व्यवस्थापन मंडळ सहकार्य करीत असतील तर. जर असं सहकार्यच प्रकल्पाच्या बाबतीत मिळालं नाही तर ते विद्यार्थी मागे पडतात. ज्यातून त्या विद्यार्थ्यांचंच नाही तर देशाचेही नुकसान होत असतं. असं होवू नये म्हणून प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं याचा विचार करणाऱ्या सर्वच घटकांनी निदान प्रकल्प मोहिम राबवितांना सर्वतोपरीनं मदत करावी. ज्यातून शिक्षण सर्वांनाच उपयोगाचं ठरेल. यात दुमत नाही. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०