विवाह कशासाठी? सुखासाठी की दु:खासाठी?
*विवाह कशासाठी ? असा प्रश्न सर्वांना पडतच असेल. तसा पडल्याशिवाय राहात नाही. लोकं त्या विवाहाचा संबंध फक्त अश्लील गोष्टीशी जोडतात. अन् ती गोष्टही खरी आहे. कारण विधात्यानं ती गोष्ट विवाह रुपानं का होईना, विवाहात समाविष्ट केल्यानं विवाह टिकतो. काही लोकांचा टिकत नाही. कारण त्यांचे विवाहबाह्य विवाहापुर्वीच संबंध असतात किंवा विवाहानंतर निर्माण होत असतात. परंतु ती कारणं लपवून काही लोकं भलतीच कारणं पुढं करीत असतात व घटस्फोट घेत असतात.* विवाह हे अश्लील बाबी करण्यासाठी नसतात. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण विवाहानंतर खरं सुख व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते. तसं पाहिल्यास सर्वात महत्वाचं असतं जगणं. जगण्यासाठी आपल्या वयाच्या प्रौढावस्थेपर्यंत आपले आईबाप सोबतीला असतात. ते आपल्या विवाहाची प्रौढावस्था झाली की वयोवृद्ध झालेले असतात. काही लोकांचे आईवडील हे मृतावस्थेत आलेले असतात. काहींचे मरण पावलेले असतात. अशावेळेस आपल्या जगण्यात नवचैतन्य निर्माण व्हावं व आपल्याला जगता यावं म्हणून विवाह हे एकच माध्यम असतं. विवाह हे असं माध्यम आहे की त्या माध्यमातून बहुतेकांना आपले आईवडील प्राप्त होत असतात. कारण विवाह झाल्यानंतर जी पत्नी घरी येत असते. ती पत्नी आपल्या आईवडीलांपेक्षाही मुलांना प्रिय वाटत असते. तसेच स्रियांनाही त्यांचे पती आपल्या आईवडीलांपेक्षा प्रिय वाटत असतात. मात्र आपला समाज पुरुषसत्ताक कुटूंब पद्धतीवर आधारित असल्याने घरातील पुरुष असलेला पती हा बाहेर कामाला जात असल्याने पत्नी नावाचा घटक घरी राहात असतो. तो घटक कंटाळतो. म्हणूनच तिला जीवन व वातावरण कंटाळवाणं वाटू नये म्हणून ते दोघंही एक दोन लेकरं जन्मास घालतात. हे लेकरं खेळणिसारखेच असतात की जे मनोरंजन करीत असतात. ज्यातून त्यांच्यासोबत वावरतांना आयुष्याचे दिवसं कठीण वाटत नाहीत. त्यांच्या जीवनात सुखशांती प्राप्त होत असते. म्हणतात की विधात्यानं सृष्टीची रचना केली व त्या जीवनात, ते जीवन कंटाळवाणे वाटू नये म्हणून मनोरंजनाची साधणं निर्माण केली. तसं आयुष्य हे दुःखदायकच बनवले आहे. असे दुःखदायक असलेले जीवन कंटाळवाणे वाटू नये म्हणून हे मनोरंजनाचे साधन. साधारणतः टिव्ही, रेडिओ माणसं किती पाहणार? त्यापेक्षा लेकरं बरे. असा विचार करुन आयुष्यभर सोबत राहणारी लेकरं जन्मास घालणं व टुढं त्यांच्यासोबत वावरुन संकटात त्यांना मदत करणं हे आईवडीलांचं कर्तव्य. हे सर्व करीत असतांना आयुष्य कितीही कठीण प्रसंग आले तरी चांगलंच कटतं. त्यात चिंतेची बाब राहात नाही वा चिंता लक्षात येय नाही. विवाहानंतर जेव्हा आपल्या आईवडीलांची जागा घेवून जोडीदार आपल्या जीवनात प्रवेशला आणि तो जर समजदार असला तर काही पाहावेच लागत नाही. मग आयुष्य अती सुंदरच होते. तसं पाहता म्हणतात की पती हा जर संसाराच्या बैलगाडीचं एक चाक असेल तर पत्नी ही दुसरं चाक असतेच. त्याशिवाय बैलगाडी बरोबर चालतच नाही. परंतु ज्याप्रमाणे बैलगाडीचं एक चाक बिघडलं की बैलगाडी एका जागेवर उभी होते. तसंच संसाराचंही आहे. चांगला संसार चाललेल्या संसारात कोणीतरी दलाल येतो ववतो दलाल त्या चांगल्या संसारात आगीचे डोंब टाकून त्यांचा चांगला संसार तोडत असतो. कारण कोणाचाही सुखाचा संसार कुणाला चांगला बघवत नाही. असा व्यक्ती चांगल्या संसारात वितुष्ट टाकत असतांना त्या कुटूंबातील बैलगाडीच्या एक् चाकाची चुगली त्या चाकाला माहित न करता दुसऱ्या चाकासोबत करीत असते. मग त्यात वास्तविक प्रकरणाची शहानिशा न करता संसाररुपी बैलगाडीची चाकं भडकतात व त्यातील एक चाक कामंच करणं बंद करतं. ज्यातून संसाराचा गाडा थांबतो. काही काही प्रकरणात चांगला संसारगाडा चाललेल्या रस्त्यावर खाचखळगे येतात. हे खाचखळगे म्हणजेच प्रेमसंबंध. बैलगाडीच्या एका चाकाचे प्रेमसंबंध त्याच बैलगाडीच्या दुसऱ्या चाकासोबत न राहता दुसऱ्याच वेगळ्या बैलगाडीच्या चाकासोबत वा इतर चाकासोबत निर्माण होतात. ज्यातून एका चाकाला तेलपाणी व वंगन मिळतं तर दुसऱ्या चाकाला ते मिळत नाही. मग त्या चाकाला संसार रस्त्यावरुन चालतांना त्रास होतो. ज्यातून ते चाक काम करणं मुळात बंद करतं. ज्यातून संसाराचा गाडा थांबतो. महत्वपूर्ण बाब ही की विधात्यानं जीवनात रंगत आणण्यासाठी व जीवन आनंददायी बनविण्यासाठी आईवडीलांनंतर जीवनात जोडीदार नावाची एक त्यांची जागा घेणारी वस्तू आणली. असे असतांना दोन जोडीदारापैकी एका जोडीदारानं आपल्यासाठी इतर जोडीदार का शोधावा की संसारात वितुष्टता वा कलुषीतता निर्माण होईल? विवाह हा कशासाठी असतो? सुखासाठीच ना? मग जोडीदारानं विवाह झाल्यानंतर इतरांसोबत प्रेम का करावं की ज्यातून संसार तुटेल. मुलाबाळांचं नुकसान होईल. कधीकधी अशा गोष्टीनंच संसारही तुटत असतो. ज्यात जीवनात विरंगुळा निर्माण व्हावा व आयुष्य सुखकारक जगता यावं म्हणून विधात्यानंच मूल नावाची वस्तू त्यांच्या जीवनात आणून सोय केलेली असते. असं सुंदर आयुष्य टाकून जो कोणी विधात्याचा नियम तोडून दुसरीकडे लक्ष टाकतो. तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही. त्याला थोड्यावेळासाठी ती गोष्ट चांगली वाटते. मग पुर्ण जीवनातच अंधार भरुन जात असतं. म्हणूनच असं करण्यापुर्वी म्हणजेच विवाह करण्यापुर्वीच जोडीदारानं विचार करावा. विचार करावा की जर त्याला विवाह झाल्यानंतर आपल्या जोडीदारावर प्रेम करणं सोडून इतरांसोबत प्रेम करायचं असेल तर त्यांनी विवाहच करु नये. कारण विवाह हा सुखासाठी असतो. असं इतरांसोबत प्रेम करुन संसारात दुःखदायक वितुष्ट आणण्यासाठी नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०