India will become the world leader in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | भारत विश्वगुरु बनणार

Featured Books
Categories
Share

भारत विश्वगुरु बनणार

भारत विश्वगुरु बनणार? 

        *भारत सन १९४७ ला स्वतंत्र्य झाला. हे सर्वांनाच माहित आहे. त्यावेळेस इंग्रजांनी या देशाला कंगाल बनवलं होतं. आर्थिक समृद्धी नव्हतीच देशात. अशावेळेस भारतानं कशाचीही कुरकूर न करता केवळ संयम राखून आपले पाय पसरण्यास सुरुवात केली. ज्यातून काही इमानदार नेत्यांनी स्वतःची पोळी न भाजता भारताचा विकास केला. ते स्वतः बसने प्रवास करीत. कोणत्याही प्रकारचं खाजगी वाहन न वापरता. आजचे नेते असे नाहीत की जे बसने प्रवास करतील. आजचे लहानमोठे नेतेही विमानानंच प्रवास करतात. एवढा देशातील जनतेला लुटून देशातील नेते पैसे कमवितात. परंतु त्यातही काही इमानदार नेते आहेत की त्यांच्या भरवशावर भारत विश्वगुरु बनण्याची स्वप्न पाहात आहे. जे सन २०४७ पर्यंत साकार होणार आहे. त्याचीच एक झलक होती ऑपरेशन सिंदूर.* 

         भारत जागतिक स्तरावर सध्या चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला असून जगाचे लक्ष भारताकडे लागले. कदाचीत भारतानं २०४७ ला देश महासत्ता बनेल, तसाच तो विश्वगुरुही बनणार. असं जाहीर केल्यानं भारताचा द्वेष करणारी मंडळी भारताला जगात पहिल्या क्रमांकावर जावू देतील की नाही. अशी शंका वाटते. कारण जगात असे लोक असतात की जे स्वतः काहीच करीत नाहीत आणि दुसरा करीत असेल तर त्याचं कौतुकही करीत नाहीत. शिवाय तो पुढे जावू नये म्हणून त्याचे पाय खेचत असतात. याचाच अर्थ असा की त्याच्या प्रगतीच्या आड येत असतात. असं जग आहे. 

       पहलगामचा कुंकू पुसण्याचा प्रकार वा हल्ला. हा याच मानसिकतेतून झालेला आहे. कदाचीत भारतानं त्यातच गोंधळून राहायचं हा एक भाग त्यातून अगदी स्पष्टच दिसला आहे.  

         लोकं कोणी विकास करत असल्यास काय करतात? ते आग लावतात त्यांच्या संसारात. घरातील सदस्यांपैकी कुणालातरी ते भडकवतात. ज्यातून घरात भांडणं तयार होतात. त्या भांडणाचा परिणाम घरातील सदस्यांवर होतो. घरचे सदस्य डिस्टर्ब होतात. 

       घराचा विकास होतो व भरभराटही होते घराची. जर घरातील जबाबदार सदस्य हा भरभराटीच्या योग्य असेल तर. तो जर चैनबाज असेल वा त्याला कोणती वाईट सवय असेल तर ते घर बरबाद व्हायला वेळ लागत नाही. वाईट सवयी लागतात जर आपण कुणाकडून आपल्याच घरच्या सदस्यांच्या आपल्याच बाबतीतील निंदा ऐकल्या तर. लोकं आपल्याच घरातील सदस्यांच्याबद्दलच्या आपल्याबद्दलच्या चांगल्या भावना आपल्याला सांगत नाहीत. ते वाईट गोष्टी बरोबर सांगतात आणि आवर्जून सांगतात. त्यात त्यांना आनंद वाटतो व इतरांचं वाईट जर होत असेल तर त्यात त्यांना विशेष धन्यता वाटत असते. याबाबत एक उदाहरण आहे. दोन कुटूंब की ज्यांचं अतोनात पटत होतं. ते तेव्हापर्यंत पटलं, जेव्हापर्यंत दुसऱ्या कुटूंबाचा विकास झाला नाही वा ते विकासाच्या टप्प्यात आलं नाही. दोन्हीही कुटूंब सर्वसाधारणच होते. काही वर्ष असेच गेले. एका कुटूंबातील एक मुलगी दहावी पास झाली व मेरीटला आली. ती पुढे महाविद्यालयात गेली. तेथील वातावरणात रमली व तिथेच ती तरुण झाली. त्यातच तिला महाविद्यालयातील हवा लागली व ती एका तरुणाच्या संपर्कात आली. ती एका तरुणाच्या संपर्कात आली. त्यातच त्या तरुणानं तिला फुस लावली. मग काय, होत्याचं नाही ते झालं व ती गरोदर राहिली. ते मायबापाच्या लक्षात आलं. त्यानंतर गर्भपात करण्याचे उपाय केले गेले. परंतु वेळ निघून गेली होती. गर्भपात होवू शकला नाही. त्यानंतर त्या कुटूंबानं नाईलाजास्तव आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाशी लावला व मुलगी संसार करु लागली.

           मुलगी संसार करु लागली. परंतु ते वय काही संसार करण्याचं नव्हतं की मुलगी कुटूंबात रमेल.  तिनं लवकरच त्या तरुणाला सोडलं व आपल्या मुलाला घेवून ती माहेरी आली. परंतु ते तरुण वय. तिला माहेरीही तरुण स्पर्शानं राहाणं शक्य नव्हतं. शेवटी ती या त्या मुलांच्या नादात लागली व अशाप्रकारे तिचं जीवन पुर्णच बिघडलं होतं.          त्या मुलीच्या महिलेच्या शेजारी असलेलं ते कुटूंब. त्यांचं चाःगलं पटत होतं. परंतु आपली मुलगी बिघडली ना. मग आपल्या शेजारचीही मुलगी का बिघडू नये ही तिची भावना. ती बोलत असे शेजारशी. परंतु तिच्यामनात शेजारच्याबद्दल वाईटच होतं. त्यातच शेजारचीही मुलगी दहावीत होती व संस्कारी होती. परंतु जिची मुलगी बिघडली होती. तिला वाटत  होतं की आपली मुलगी दहावीला मेरीट आली थरी बिघडली. शेजारची मुलगी दहावीच पास होवू नये. थी पुढं जावू नये. आपली मुलगी बिघडली ना. मग तिही बिघडावी. त्या स्रिची तीच ती भावना. शिवाय ज्यांची मुलगी दहावीत होती. तो संस्कारी परिवारही होता. तो वाईट संगतीत नव्हता. तरीही शेजारील महिलेनं आग लावताच त्यांच्या घरातील मुलगी दहावीत असतांना त्यांच्या परिवारात वाद होवू लागला. ज्यात दहावीला असलेली त्यांची मुलगी डिस्टर्ब झाली. शेवटी लक्षात आलं की आपल्या घरातील वाद हा शेजारील महिलेच्या आग लावण्यानं होत आहे. तेव्हा त्यांनी वेळीच निर्णय घेवून संपर्क तोडला. परंतु हे करीत असतांना ते कुटूंब एवढं डिस्टर्ब झालं होतं की त्याचा परिणाम त्या कुटुंबातील मुलीच्या दहावीच्या निकालावर झाला व तिला दहावीच्या परीक्षेत कमी टक्केवारी मिळाली होती. त्यातच दहावीचा निकाल लागताच शेजारील महिला आपल्या स्वतःच्या मुलीबद्दल सांगत होती की माझ्या मुलीएवढे दहावीच्या परिक्षेतील गुण गल्लीतील घरातील इतर कोणाच्याच मुलांना मिळालेले नाहीत.  

        ते तिचं बोलणं. ते बरोबर होतं की तिच्याच मुलीला दहावीच्या परिक्षेत आतापर्यंतच्या काळपर्यंत जास्त गुण मिळाले होते. परंतु त्याचा तिला कोणता फायदा झाला होता. शेवटी तिनं आपले अकलेचे कांदे तोडून आपल्या स्वतःचं जीवन उध्वस्त केलं होतं. कदाचीत चांगले संस्कार वा सवयी तिनं स्वतःत बाळगल्या असत्या तर तिचं चित्र काहीसं वेगळंच असतं. तिच्या दहावीच्या परिक्षेच्या गुणांचा उपयोग तिला भविष्यात झाला असता. कदाचीत ती कोणत्याही क्षेत्रात उच्चपदावर गेली असती.         भारत देशाचंही असंच आहे. भारत देश पुढे जावू नये म्हणून इतर देशवाशी काहीतरी अनैतिक मार्ग शोधतच असतात. कधी पहलगाम करतात यर कधी कारगील घडवून आणतात. कधी भारत पाकिस्तान युद्ध तर कधी चीनचं युद्ध. आतंकवादी कारवाया तर भरपूरच. याचाच अर्थ असा की भारतानं स्वतःचा आपला विकास करु नये. जागतिक महासत्ता बनू नये. भारतात हिंदू मुस्लीम हा वाद सतत होत राहावा. यासाठीच इतर देशवाशी सतत कार्यतत्पर असतात. कुठे परमाणूची अणूचाचणी घेतली तर ओरडतात तर कधी फ्रान्सकडून राफेल वा रशियाकडून S400( सुदर्शन ) घेतलं तर ओरडतात. त्यांच्या हो ला हो आपल्याच देशातील लोकं लावतात की ज्यांना गद्दार अशी संज्ञा देता येईल.  

         विशेष सांगायचं झाल्यास काल भारत विश्वगुरु होता. या भारतात विपूल संपत्ती होती. कधी एके काळी भारताला सोने की चिडीया म्हणत. समुद्रगुप्ताच्या काळात तर भारताला स्वर्णयुग म्हटलं आहे. एवढंच नाही तर भगवान क्रिष्णाच्या जन्माच्या वेळेस  सोन्याचा पाऊस पडला होता. असंही मानतात. काही लोकं याला दंतकथा संबोधतात. अन् हे खरंही आहे की भारत गतकाळात सोने की चिडीयाच होता. असे असतांना भारतावर सतत विदेशी लोकांचं आक्रमण होत गेलं व भारताला त्याच लोकांनी लुटून नेलं. म्हणूनच भारत गरीब झाला.          भारताला इंग्रज, मुस्लीम, ग्रीक व अरब या सर्वांनीच लुटलूट लुटलं. सन १९४७ ला भारताला इंग्रजांनी स्वातंत्र्य प्रदान केल्यानंतर भारताला कंगाल बनवलं. तरीही आजची स्थिती पाहता भारत जागतिक महासत्ता व विश्वगुरु बनण्याच्या कगारवर उभा आहे. त्याला भारतीयांचा पाठिंबा आहे. हेच दिसलं पहलगाम घटनेनंतर. पहलगाम घटना झाली व त्यातच ऑपरेशन सिंदूरही घडलं. ज्यातून भारताची आजची ताकद दिसली व वाटू लागलं आहे की भारत विश्वगुरु बनणारच. शिवाय जागतिक महासत्ताही. परंतु असेच जर आतंकवादी हल्ले सुरु असतील आणि भारत पाकिस्तान लढाया होत असतील आणि अंतर्गत सीमारेषेतील आपलीच मंडळी जर गद्दारासारखी वागत असतील तर कदाचीत भारताचं विश्वगुरु आणि जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल काय? हीच चिंता आजही दिसून येत आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी भारतानं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन जागतिक स्तरावर स्वतःला महासत्ता सिद्ध करावं. जेणेकरुन सर्वज जागतिक मंडळी भारताला विश्वगुरु समजतील व ढारताचेच सल्ले घेतील. ज्यातून भारताला पुर्वीसारखंच सुवर्णयुगाचं अस्तित्व प्राप्त होईल. यात शंका नाही.   

       अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०