Operation Pakistan in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | ऑपरेशन पाकिस्तान

Featured Books
Categories
Share

ऑपरेशन पाकिस्तान

ऑपरेशन पाकिस्तान?       

   ऑपरेशन सिंदूरच्या उपक्रमानं पाकिस्तान हादरुन गेलेला असून तोही आता बदल्याच्या भावनेने पेटून उठलेला आहे. वास्तविक त्यानं पेटून उठायला नको होतं. त्याचं कारण आहे आतंकवाद. भारतानं पाकिस्तानात असलेली आतंकवाद्यांची रहिवाशी स्थळं नष्ट केलीय. ज्याला पाकिस्तान नकारतोय.         आतंकवाद्यांना लपविण्याचं केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान. त्यानं गतकाळात लादेन नावाचा असाच एक आतंकवादी लपवून ठेवलेला होता. आताही ऑपरेशन सिंदूरमधील संशयीत आतंकवादी हेही पाकिस्तानातील असून त्यांनी भारतीय महिलांचं पहलगाममध्ये कुंकू पुसलंय. त्याच धर्तीवर भारतानं दि. सहाला ठोस प्रत्युत्तर देवून संशयीत आतंकवादी केंद्रे नष्ट केधी. त्यापुर्वी पाणी बंद केलं होतं.          पाणी....... भारतानं १९६० ला पाकिस्तानसोबत एक पाणी करार केला होता. ज्यात दोन राष्ट्रांनी काहीही केलं तरी हा करार मोडता येणार नव्हता. जो शिमला करार म्हणून प्रसिद्ध होता. हा करार त्यावेळचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु व पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी केला होता. मात्र दि. २३ एप्रिल २०२५ ला राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत भारतानं हा करार रद्द केला.           शिमला करार. शिमला करार नेमका काय? तर यामध्ये पाश्वभुमी आहे. ती पाश्वभुमी अशी आहे की भारतातून उगम होणाऱ्या सहा नद्या. ज्यात सिंधू ही प्रमुख नदी आहे व तिला मिळणाऱ्या तिच्या पाच उपनद्याही आहेत की ज्यात मुबलक पाणी असतं. त्यातील तीन पुर्ववाहिनी आहेत व तीन पश्चिम वाहिनी आहेत. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सिंधू चिनाब व झेलम या नद्यांचा समावेश आहे व पुर्ववाहिनी नद्यात बियास, रावी व सतलज या नद्यांचा समावेश होतो. यात ज्या पुर्ववाहिनी नद्या होत्या. त्यांचं नियंत्रण भारताकडे ठेवून ज्या पश्चिम वाहिनी नद्या होत्या. त्यांचं नियंत्रण हे पाकिस्तानकडे देण्यात आलं. याचाच अर्थ असा की या तीनही नद्यांवरील बांधकाम करणे, अर्थात त्यात धरणे बांधल्यास वा त्यातील पाण्यातून मत्सोत्पादन केल्यास तोही पैसा पाकिस्तानला मिळणार. मग त्यांनी भारताला कितीही त्रास दिला तरी तो करार मोडता येणार नाही. यावर भारतानं कितीतरी वेळा पाकिस्तानला समजावलं की त्यांनी भारतावर वाकडी नजर टाकू नये. परंतु पाकिस्तान ते ऐकत नव्हता व तात्कालिक कारण घडलं, सिंदूर. भारतीय स्रियांचं कुंकू पंसणं. कारण दिलं की तुम्ही हिंदू आहात व मुस्लीम लोकांना सोडून दिलं. खरा हिंदू कोण? याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी कलमा पठन करायला लावल्या. काय गरज होती, हिंदू म्हणून विचारण्याची? अन् काय गरज होती हिंदू सांगताच मारण्याची. असं केल्यानंतरही भारतानं चूप बसावं काय?            भारतानं आधीपासूनच मुस्लिमांचा जाच सहन केलेला आहे. ज्यात काही मुस्लीम हे नक्कीच चांगले आहेत की ते भारताला मदत करतात. जशी कुरेशी वैमानिका की जिनं एक मुस्लीम असून भारताचं प्रतिनिधित्व  केलं होतं.          भारत हा केवळ हिंदूंचाच देश नाही तर तो मुस्लिमांचाही देश आहे. या देशात हिंदूच नाही तर तमाम इतर धर्मीय लोकंही अगदी गुण्यागोविंदानं राहात आहेत. ज्यात मुस्लीम, शिख, ईसाई, पारशी, जैन, बौद्ध तसेच ख्रिश्चनसह इतरही धर्माचा समावेश आहे. तसेच ते युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास भारताला मदत करीत आहेत. उदाहरणार्थ सोफिया कुरेशी.          भारताला या एकाच सोफिया कुरेशी नावाच्या मुस्लीम महिलेनं केलं नाही तर यापुर्वीही अनेक मुस्लीम समुदायाच्या लोकांनी एक व्यक्ती म्हणून न्यायाची बाजू घेवून येथील तमाम राजेरजवाड्यांना गतकाळात  मदत केली. ज्याला इतिहास साक्ष आहे. जसे शिवाजी महाराज. त्यांच्या सैन्यातील महत्वाच्या जागा या मुस्लिमांनाच देण्यात आल्या होत्या. परंतु हे जरी खरं असलं तरी काही औरंगजेब, अफजलखान सारखी माणसं याही देशात होवून गेली की ज्यांनी या देशातील ताराबाई, सईबाईसारख्या महिलेंचं कुंकूच पुसण्याचं काम केलं.         पुर्वी या भारताला हिंदुस्थान म्हणत व या हिंदुस्थानात गतकाळात सोमनाथ लुटणाऱ्या मोहम्मद गझनीने सोमनाथ लुटतांना कितीतरी भारतीयांचे कुंकू पुसले. त्यानंतर इ. स. च्या सातव्याच शतकात आलेल्या मोहम्मद बिन कासीमनंही अलोरचा शासक असलेल्या राजा दाहिरची हत्या करुन कितीतरी स्रियांचे कुंकू पुसले. हा आवाका एवढ्यावरच थांबला नाही तर बाराव्या शतकात आलेल्या मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणला कैद करुन त्यांची हत्या केली व महाराणी संयोगीतासह कितीतरी राज्यातील महिलांचं कुंकू पुसलं. हा क्रम इथंच थांबला नाही तर महाराणी पद्यावतीचं कुंकू पुसलं गेल्यानंतरही तिला स्वतःची अब्रू वाचविण्यासाठी आपल्या राज्यातील कित्येक स्रियांसह जोहार करावा लागला. महाराणी संयोगीता, महाराणी पद्यावती यांना जोहार करणे पसंत होतं. परंतु कोणत्याही मुस्लीम समुदयाची वा शासकाची बेगम बनणं पसंत नव्हतं. काही हिंदू महिलांनी, असेच मुस्लीम शासक विनाकारण वैदिक धर्मातील पुरुषांची हत्या करतात. विनाकारण युद्ध करतात.  हा युद्धविराम व्हायलाच हवा. असा विचार करुन व हे पाहून आपला विवाह मनात इच्छा नसतांनाही मुस्लीम शासकांशी केला. हे सम्राट अकबर व जोधाबाईच्या विवाह उदाहरणावरुन दिसून येते. त्यानंतर असे विवाह बरेच घडले.           विशेष म्हणजे सन १९६० ला शिमला कराराच्या निमित्याने झालेला पाणी करार हा पाकिस्तानसाठी जमेची बाजू जरी असला तरी या करारानं पाकिस्तान संतुष्टच झाला नाही. त्याला असं कधीच वाटलं नाही की कदाचीत आम्ही जर भारताच्या वाट्याला गेलो तर उद्या हीच मंडळी आम्हाला मिळणारं पाणी बंद करतील वा धरणाचे दरवाजे उघडे करुन आमच्या देशात पुरस्थिती निर्माण करतील. ते सतत भारतीयांना त्रासच देत राहिले व त्रासच देत आहेत. कारण भारतीय हे सहिष्णू विचारांचे आहेत व हे सहजासहजी कोणाच्या वाट्याला जात नाही. याचा अर्थ हा नाही की भारतीय मंडळी ही त्यांना घाबरतात. भारतीयांच्या धमनीत एवढी ताकद आहे की त्यांनी विचार केल्यास क्षणभरही वेळ लागणार नाही पाकिस्तानला नष्ट करायला. परंतु याबाबतीतही भारत विचार करतोय. मात्र पाकिस्तान तसा विचार करीत नाही. ज्यातून विभाजनाच्या वेळेस दंगे पेटले. १९६५ ची लढाई झाली. एवढंच नाही तर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरुंनी ऐन वेळेस सैन्य माघारी बोलावून जो काश्मीरचा भाग सोडला. त्यावर फुकटफाकट पाकिस्ताननं कब्जा मारला. जो आज पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. एवढंच नाही तर पाकिस्ताननं एवढे वेळेस हमले करुनही भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही वा त्यांच्या देशात पुरस्थिती निर्माण केली नाही वा त्यांना दोषी ठरवलं नाही. परंतु पाकिस्तान काय करतं. एवढे वेळेस भारत आपली त्यांच्याप्रती सौहार्दपूर्ण वागणूक दाखवूनही सुधारण्याची चिन्हं घेत नाही. याला काय म्हणावे. ज्यातून पहलगामचं कुंकू पुसणं प्रकरण घडलं. त्यानंतर भारतानं फक्त त्याचं प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानला काहीही म्हटलं नाही. तरीही पाकिस्तान चवताळून उठल्यासारखा भारतीय सिमेलगतच्या भागात गोलाबारी व ड्रोनहल्ले करीत आहे. युद्धाचे आव्हान देत आहे. याबाबत बोलायचं झाल्यास पाकिस्तानला असं करण्याची काय गरज आहे? तरीही पाकिस्तान असं करीत आहे. याचाच अर्थ असा की पाकिस्तान युद्ध करु पाहात आहे की जी गोष्ट गरजेची नाही. विशेष म्हणजे यातील महत्वपुर्ण भाग हा की जर भारतानं विचार केला तर पाकिस्तान हा देशच राहणार नाही. परंतु भारत जगाचा विचार करथोय. विचार करतोय की युद्ध हे यातून पर्याय काढण्याचं साधन नाही. जपानच्या हिरोशिमा व नागासाकी सारखी आपल्याही देशाची स्थिती होईल. त्या लोकांनी काय बिघडवलं की ज्यांचा यात दोष नाही. परंतु पाकिस्तान याचा विचारच करीत नाही. ते सतत युद्धाच्या मागे लागले आहे व भारताला चिथावत आहे.           भारत विचारशील देश आहे व  कलिंगच्या युद्धापासून शांततेवर जास्त भर देत आहे. परंतु याचा अर्थ असा की नाही की भारत केवळ शांतताच धरुन राहिल. एकवेळ अशीही येवू शकते की त्या वेळेस भारत पाकिस्तानची गोलाबारी सहन करणार नाही. त्यांचे ड्रोनहल्ले सहन करणार नाही. एका रात्रीत हल्ला करेल, पाकिस्तान बेसावध असतांना. दुसऱ्या दिवशी इथं पाकिस्तान नावाचा एक देश अस्तित्वात होता हेही दिसणार नाही. जसं भुस्खलनात माळीण नावाचं गावंच दुसऱ्या दिवशी दिसलं नाही तसं. ही देखील हिंमत भारत करु शकतो. याचा पाकिस्ताननं विचार करावा. जे काही घडलं, ते भारतीय स्रियांचं कुंकू पुसलं गेल्यानं घडलं. असं पाकिस्ताननं समजावं. ज्यातून आतंकवादी बहुल क्षेत्रच निशाणा बनवून नष्ट केल्या गेली. जीवीतहानी केली नाही. परंतु पाकिस्तान थातून जर धडा घेत नसेल तर तोही दिवस दूर नाही की भारत पाकिस्तानला तो साखरझोपेत असतांना एका  रात्रीतूनच नेस्तनाबूत करेल. ऑपरेशन सिंदूर दूरच. ऑपरेशन पाकिस्तान होवून जाईल. यात शंका नाही. ज्यात हिंदूच नाही तर हिंदुस्थानचं रक्त धमणीत सळसळत ठेवणारे कुरेशीसारखे मुस्लीमच व स्वतःला भारतीय समजणारे मुस्लीमच मदत करतील. हे तेवढंच खरं.         

  अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०