*स्रियांबाबत भुमिका ; संभ्रमाची?*
*आज स्रिया जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेतांना दिसत आहेत. त्या अवकाशात जात आहेत. शिवाय त्यांचा आजच्या परिस्थितीबाबत विचार केल्यास आज स्रियांनी जमीन, पाणी व अवकाश, ही तिन्ही क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी काही स्रियांची आजची परिस्थिती पाहता स्रियांबाबत आज नेहमीच संभ्रम वाटतो व वादाची स्थिती निर्माण होते आणि आज संविधान बनलं असलं तरी त्या स्थितीवरुन वाटतं की खरंच स्री खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली काय? वाटतं की का स्रियांना जे दुय्यम स्थान होतं. ते स्थान आजही अबाधित आहे. तर कधीकधी वाटतं की ते स्थान अबाधित नाही.* स्री..... स्रियांना काल दुय्यम स्थान होतं. त्यांना दुय्यम स्थान देण्याची सुक्ते मनुस्मृती, भाला, संग्राम सारख्या इतर पुस्तकात लिहिलेली होती. मनुस्मृतीनं तर त्यांचे संपूर्ण हक्कं आणि अधिकार हिरावून घेतले होते. म्हटलं होतं की स्रियांना संपत्ती कमविण्याचा काहीच अधिकार नाही आणि कममविलेही स्रीधन, तर त्यावर अधिकार पुरुषांचाच असेल. शिवाय कामाच्या पद्धतीतही तिलाच जास्त काम करावे लागायचे. स्रियांचा विवाह करण्याचाही अधिकार पुरुष नावाच्या व्यक्तीपासून नाकारला होता. हे देखील प्रावधान त्या काळातील धार्मिक ग्रंथांनी लेखनीबद्ध केलं होतं. पुरुष मात्र अनेक विवाह करुन मोकळे होत आणि सवतपणाचे दुःख तिला नाईलाजास्तव सहन करावे लागायचे. कारण सवत आली की पुरुषांचा हमान लेखन्याचा अधिकार नष्टट व्हावा. पुरुष सवतीवरच जास्त प्रेम करीत असत. ज्यातून अतिशय वेदना स्रिजातीला सहन कराव्या लागायच्या. वैधव्यात तर स्रिजातीची दमछाकच होत असे. एखादी स्री विधवा झालीच तर तिला लोकं दुषण्यानंच बोलत असत. म्हणत असत की ही कुलथा आहे व हिच्यामुळंच वैधव्य आलं. ज्यात तिचा अजिबात दोष नसायचा. याचं कारण होतं, तिचा विवाह. ती बालवस्थेत असतांना कधीकधी एखाद्या पन्नास वर्षाच्या पुरुषांसोबत तिला विवाह करावा लागायचा. ज्यातून म्हातारपणानं तिचा पती मरण पावायचा. त्यानंतर तिला विद्रुप केलं जायचं. त्याचंही एक कारण होतं. ते म्हणजे इतर बाहेरील पुरुषांची ती शिकार होवू नये. मात्र घरचे तिला छळत असत. तिच्यावर बलात्कार देखील करत असत. हे सगळं अतिशय गुप्तपणे चालायचं. कामाच्या बाबतीत तर तिला मोकळीकच नव्हती. तिला सकाळीच उठून घरची सगळी कामं करावी लागायची. ज्यात सडा सारवण, स्वयंपाक ही कामं पाचवीला पुजलेली असायची. त्यातच मुलाबाळांची अंघोळ, तयारी हे सगळं नित्याचंच होतं. तिला कोणीही आयतं शिजवून जेवन देत नसत वा कोणताही व्यक्ती तिला तिच्या कामात मदत करीत नसत. त्यानंतर दुपार होताच तिला कामावरही जावे लागायचे. दिवसभर पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याच्याच बरोबरीनं कामंही करावे लागायचे. त्यानंतर पुन्हा घरी येवून स्वयंपाकात शिरावंच लागायचं. ही क्रिया सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत चालायची. तिला एवढीशीही उसंत मिळत नसे. मात्र पुरुष सकाळी मस्त आरदामात झोपेतून उठायचा. बसल्या ठिकाणी त्याला नाश्ता व जेवन मिळत असे. अंघोळीचं पाणीही तो स्वतः घेत नसे. ते देखील तिला टाकूनच द्यावे लागायचे. जेवन ताटात वाढून तेही त्याच्या समोर द्यावे लागायचे. पाणी वैगेरे सर्व काही. एवढंच नाही तर अंथरुणही त्याचं करुन द्यावं लागायचं. जणू त्थाचे त्या स्रीवर ढरपूर उपकार असावेत, असा तो आयत्या बिळातील नागोबासारखाच वागायचा. स्री ही कौमार्यपणातही सुखी नव्हतीच. तिला कौमार्यपणातही कधीकधी कौमार्य चाचणीला समोर जावं लागायचं. कौमार्य पणातही तिला कोणत्याच पुरुषांकडे पाहण्याचा अधिकार नव्हता. व्याभीचार तर दूरच आणि एखाद्या स्रीनं असा व्याभीचार केलाच तर ही पुरुषजात तिला यमसदनीच पाठवायची. कधीकधी एखादी सुंदर स्री राजा वा मंत्र्यांना आवडलीच. परंतु तिच्याशी विवाह करायचा नसेल तर तिला जाणूनबुजून नगरवधू बनवले जाई. ती संपुर्ण नगराची वेश्याच असे. ज्या स्रीवर राजा, त्याचे मंत्री व त्याचे संपुर्ण नातेवाईक आळीपाळीनं बलात्कार करीत असत. हीच प्रक्रिया गावात घडत असे. यात स्वतः मायबापच आपल्या मुलीला वेश्यापणाच्या दलदलीत ढकलत असत. त्याचं कारण असायचं, त्यांना संतती न होणं. जर एखाद्यावेळेस एखाद्या दांपत्यांना संतती झाली नाही तर ते एखाद्या गावच्या मंदिरात नवश बोलत की जर त्यांना पहिली मुलगी झालीच तर ते तिला देवाची दासी म्हणून सोडतील. अशावेळेस मुलगी झाल्यास तिला कधीकधी तिच्या जन्मापासूनच मंदिरात दान देण्याची पद्धती होती. अशा मंदिरात दान आलेल्या मुलीवर ती वयात येताच मंदिरातील मंहत व महंतांचे नातेवाईक आळीपाळीनं बलात्कार करीत. ज्यात गावही सहभागी होत असे. स्रियांचे हक्कं व अधिकार नाकारलेला हा समाज. या समाजानं राजांनाही सोडलं नाही. एखादा राजा मरण पावल्यास त्या राजाचे पुत्र जरी लहान असतील तरी त्या राजगादीवर त्या राजाच्या राणीला बसण्याचा अधिकार नव्हता तर पुरुष म्हणून त्या राजाचं मुल जरी दोन वर्षाचं असेल तरी त्यालाच बसवावे लागत असे. काळ बदलला व स्त्रियांची स्थिती थोडीफार बदलली. कालची नगरवधू बनविण्यात आलेली आम्रपाली बदलली. आज कोणत्याही स्रिला जाणूनबुजून नगरवधू बनवले जात नाही. आज कोणत्याच स्रिला देवदासीही बनवलं जात नाही. स्रियांना आज पुनर्विवाहही करता येतो. त्यांनाही संपत्ती जमविण्याचा अधिकार आहे ववती संपत्ती आपल्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचाही अधिकार आहे. आज कोणतीच स्री का असेना, तिला वैधव्यानंतर साजशृंगारानं जीवन जगता येतं. बहुतःश ठिकाणी तिला विद्रूप केले जात नाही. तसेच वैधव्यानंतरही तिला सन्मानानं वागवलं जात. आज कोणत्याच स्रिची कौमार्य चाचणी होत नाही. स्रियांना बऱ्याच ठिकाणी दुय्यम दर्जानं वागवलं जात नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास स्रियाही पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून जीवन जगत आहेत नव्हे तर आज तिला तिनं कमविलेल्या संपतातीत मानाचं स्थान आहे. ती आपली संपत्ती स्वतः कोणाला दान देवू शकते. हे जरी खरं असलं तरी आजही स्त्रियांकडे काही समाजकंटक दुय्यम नजरेनंच पाहतो. त्यांच्या संपत्तीतील अधिकार नाकारतो. त्यांच्या कामातही भेदभाव करतो. ती आजही सकाळी झोपेतून उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कामच करीत असते आणि पुरुष नावाचा हा व्यक्ती सकाळी आरामात उठतो. त्याला अंघोळीचं पाणीही गरम करुन द्यावं लागतं. त्याला जेवनही आयतं ताट बनवून द्यावं लागतं. जसा तो त्या स्रीवर उपकारच करीत असतो. आजही काही समाजातील पुरुष अकाली मरण पावताच तिला दुसरा विवाह करण्याचा अधिकार नाही. काही ठिकाणी आजही पती निधनानंतर तिला विद्रूप केले जाते. पती निधनानंतर तिच्या भांगातील कुंकू, हातातील बांगड्या, पायातील पैंजण व बोटातील जोडवे काढले जातात. आजही तिच्या संपत्तीवर काही ठिकाणी पुरुष जात हक्कं सांगतो. अन् घरात उगाचा वाद नको म्हणून ती देखील आपल्या संपत्तीवर पुरुष जातीचा हक्कं स्विकारते. कारण त्यात तिचा नाईलाज असतो. विशेष सांगायचं झाल्यास आज देश स्वतंत्र आहे व या देशात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संविधान आहे. कायद्यानुसार तिचा हक्कं व अधिकार संविधान नाकारत नाही की ज्यामुळं ती विचारांच्या अवकाशात उड्डाण करु शकते नव्हे तर उड्डाण करते. परंतु हे सर्व काही दोनचारच कुटूंबात घडतं. ही स्थिती अपवादात्मकच असते. बऱ्याचशा कुटूंबात हे सगळं घडत नाही. स्त्रियांना दुय्यमच समजलं जातं आणि तिला दुय्यमच वागणूक दिली जाते. तिला रात्री अपरात्री बाहेर फिरता येत नाही. काही हिंस्र बलात्कारी श्वापदाची भीती असते. महत्वपुर्ण बाब ही की स्त्रियांना आजतरी असं दुय्यम स्थान कोणत्याच कुटूंबात मिळू नये. तिची कौमार्य चाचणी होवू नये. तिला रात्री अपरात्री निर्भयपणे फिरता रावं. तिची सर्वांगीण स्थिती सुधारावी. जेणेकरुन तिला स्वतंत्र्यपणे जीवन जगता यावं. ती अर्धांगीणीच बनावी. पती, पुत्र, पिता वा इतर कोणत्याच पुरुषांची गुलाम बनू नये. तरच स्री स्वतंत्र झाली असं म्हणता येईल, मानताही येईल. हे जेव्हा घडेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं देशही सुजलाम सुफलाम झाल्यासारखा वाटेल यात शंका नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०