९
भांडणं करावीत. परंतु ती घटस्फोटापर्यंत जायला नकोत. कधी कधी काही प्रकरणात भांडणं ही घटस्फोटापर्यंत जात असतात. ज्यातून पती पत्नीचं नातं समाप्त होत असतं.
भांडणं ही होतात. कधी विचारावरुन होत असतात तर कधी एकमेकांची आवडनिवड न जपल्यानं होत असतात तर कधी स्वतःचं अस्तित्व श्रेष्ठ दाखविण्यासाठीही भांडणं होत असतात.
पती पत्नीतील वाद. म्हणतात की जे पती पत्नी भांडणं करीत नसतील. ते पती पत्नी कसले? पती पत्नीबाबत सांगायचं झाल्यास देवाच्या राज्यातही पती पत्नींचे वाद होत असत. म्हणतात की एकदा भृगू ऋषी वैकुंठात आले असता त्यांनी भगवान विष्णूच्या छातीवर आपला पाय मारला होता. ज्यातून विष्णू व लक्ष्मी या पती पत्नीचं भांडण झालं होतं. ज्यातून निराश होवून लक्ष्मी पृथ्वीवर आली. तिनं गंगेचा जन्म घेतला होता. तसंच भांडण राम व सीता या पती पत्नीत झालं. तो लोकांच्या बोलण्यावरुन वाद. राम सीतेला समजावीत होता. जास्त लोकांचं मनावर घेवू नकोस. परंतु सीता ऐकली नाही. ज्याची परियंती तिचं आयुष्य जंगलात गेलं. आताही तसेच वाद होतात व ते वाद एवढे विकोपाला जातात की ज्यातून आजच्या काळात घटस्फोट होत असतात. आज न्यायालयात अशी घटस्फोटाची प्रकरणं बरीच आहेत व ती प्रकरणंही वाढत आहेत. वाढत चाललेली आहेत.
विवाह झाल्यानंतर सुरुवातीचा काळ असाच असतो की पती पत्नीचं पटत नाही. कारण पती पत्नींपैकी दोन घटक हे भिन्न विचारांचे असतात. त्यांचं खानपान आवडनिवड या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात. मग वाद होणारच. याचा अर्थ प्रत्येकानं घटस्फोटच घ्यावा असं नाही. रामायण काळातील एक गोष्ट अशीच घटस्फोटाला कारणीभूत असलेली दिसते. ती म्हणजे लोकांचं बोलणं. याबाबत एक कथा सांगतो. कथेत एक गाढव असते. ते गाढव पिता पुत्र घेवून चाललेले असतात. पहिल्या वेळेस तिघंही पायीच चाललेले असतात. त्यावेळेस लोकं म्हणतात की ही मंडळी किती वेडी आहेत की जी मजबूत असलेल्या गाढवाच्या पाठीवर न बसता पायी चालवत नेत आहेत. दुसर्या वेळेस गाढवाच्या पाठीवर पुत्र बसतो. तेव्हाही लोकं म्हणतात की हा मुलगा वेडा आहे काय? तो आपल्या म्हाताऱ्या बापाला गाढवाच्या पाठीवर न बसवता पायी चालवत आहे व स्वतः गाढवाच्या पाठीवर बसला आहे. तिसऱ्या वेळेस पिता गाढवाच्या पाठीवर बसतो. तेव्हाही लोकांचा प्रश्न होता की त्या पित्याला अक्कल नाही, जो आपल्या मुलाला पायी चालवत नेवून स्वतः गाढवाच्या पाठीवर बसला आहे. त्यानंतर शेवटी त्या दोघांनी गाढवालाच आपल्या खांद्यावर उचलून घेतलं. तेव्हा ते दृश्य पाहून लोकं हसायला लागलीत व ती मजा पाहू लागलीत. विशेष सांगायचं म्हणजे लोकं तुम्ही काय चांगलं करता, काय वाईट करता हे पाहात नाही. ते दोन्ही बाजूनं बोलत असतात. कोणी चांगलं बोलतात, कोणी वाईटही म्हणतात. ज्यातून आपले आपापसातच वाद होत असतात. लोकं मात्र मजा पाहात असतात.
भांडण....... आपली भांडणं झाली की लोकांना मजा येते. लोकांना काय आहे वाद करायला. त्यातच पती पत्नीची भांडणं असली की लोकांना जास्तच मजा येते आणि घटस्फोट झाला वा केस चालू असली की मजाच मजा. महत्वाचं म्हणजे पती पत्नीची भांडण होत असली तर त्याला पर्याय नाही. करावीतच भांडणं. परंतु ती भांडणं लोकांना मजा येईल. अशी असू नये. ज्यातून घटस्फोट होईल व लोकं मजा घेतील. विशेष म्हणजे आपण अशी भांडणं करु नयेत की ज्यातून ती भांडणं शिगेला जातील व घटस्फोट होईल.
औरंगजेबाचा तो विषय. त्या विषयाशी शाहीन व केशरला काही घेणंदेणं नव्हतं. परंतु त्यावरुन सतत होणारे वाद. ज्यातून शाहीन व केशरचं एक दिवस जोरात भांडण झालं व ती घर सोडून निघून गेली होती. आता केशर एकटाच राहात होता. त्याला करमत नव्हतं. त्यातच त्याच्या मनात चित्रविचित्र विचार येत होते. अशातच त्यानं दंग्यात भाग घेतला होता.