Danga - 5 in Hindi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | दंगा - भाग 5

Featured Books
Categories
Share

दंगा - भाग 5

            
         केशरचं निलंबन झालं होतं. तरीही तो समाधानीही होता. मात्र त्याला आजही त्याचा गतकाळ आठवत होता. ज्या गतकाळात तो शिक्षक होता. त्याच काळात ऑनलाइन कामं करावी लागायची. वरुन संस्थाचालकाची कटकट सांभाळावी लागायची. तसा त्याच काळात तो शिक्षकांच्याच प्रश्नावर विचार करायचा. सध्या शिक्षकांसमोर जास्तची कामं सरकारनं दिली होती. ज्यात ऑनलाइन कामं होती. त्यामुळंच केशर विचार करायचा. अशी जर ऑनलाइन कामं शिक्षकांच्या पाठीमागे असतील तर शिक्षकांनी शिकवायचे कसे व विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? 
         ऑनलाइन कामातून बरेच प्रश्न निर्माण झाले होते. शिकायचे कसे? हा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न होता, तर शिकवायचे कसे? हा शिक्षकांसमोर प्रश्न होता. केशरला ऑनलाईन कामाची वस्तुस्थिती माहीत होती. तसा तो आपल्या मनात विचार करु लागला होता. तो विचार त्याच काळातील होता. ज्या गतकाळात तो नोकरी करीत होता. 
         'सध्या शिक्षक हे व्यक्तीमत्व गुलाम असल्यागत शाळेत काम करीत आहे. असं जाणवत आहे की त्याचं मुलभूत स्वातंत्र्यच सरकारनं हिरावून घेतला की काय? एवढी कामं त्या शिक्षकाच्या मागे आज लागून आहेत. दररोज एक ना एक काम येत असतेच. ज्यानं शिक्षकांचं जगणंच हराम करुन टाकलं आहे. अशीच एक बातमी. वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी. शिक्षक नसतील तर शिकायचे कसे? अशा स्वरुपाचं जिल्हापरीषदेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहिलेले पत्र. विद्यार्थ्यांच्या मनपटलातून उमटलेला सुर. हा सुर त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनपटलावर उमटलेला नाही तर तो सुर सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांचा आहे. परंतु ते बोलणार कसे? त्यांचं वय लहानगं आहे व ते त्यांना कळत नाही. परंतु हे कळतं की कोणता शिक्षक शाळेत असतो व कोणता शिक्षक शाळेत नसतो. त्यातच कोणते शिक्षक मोबाईलवर असतात व कोणते शिक्षक मोबाईलवर नसतात हेही कळतं. 
         ती जि. प. शाळा व त्यात विद्यार्थ्यांनी म्हटलं की शाळेत शिकवायला शिक्षकच राहात नाहीत. वास्तविक ते म्हणणं बरोबर आहे. तसा त्या शाळेचा प्रश्न आहे की तेथील शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत व शिक्षकांची नियुक्ती त्या शाळेत नसल्याने त्या शाळेत शिकवायला शिक्षक नाही. परंतु ज्या शाळेत शिकवायला शिक्षक आहेत. त्या शाळेचीही अवस्था शिक्षक नसल्यासारखीच आहे. कारण आजचा शिक्षक ऑनलाइन कामामुळं वर्गात नसल्यासारखाच आढळतो. तो सतत मोबाईलवर ऑनलाइन काम करीत असतो. याचा अर्थ असा नाही की तो शाळेत वर्गात असतांना ऑनलाइन खेळ खेळतो. तो शिक्षक सरकारची कामं करीत असतो कधी मोबाईलवर तर कधी संगणकावर बसून.
         आज जि. प. शाळेतील अवस्था तशाच स्वरुपाची झालेली आहे. केवळ जि. प. शाळेतीलच अवस्था अशा स्वरुपाची झालेली नाही तर इतरही सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांची तशाच स्वरुपाची अवस्था झालेली आहे. याला खेळखंडोबा असं नाव देता येईल. कारण हा खेळखंडोबा सर्वच शाळेत ऑनलाइन कामानं झालेला आहे. त्यामुळंच आम्ही शिकायचे कसे? हा प्रश्न आज विद्यार्थ्यांसमोर आ वासून उभा आहे.
          पुर्वीही शिक्षकांना कामं होती. कोणी निवडणुकीची बी एल ओ यादी बनवीत होता तर कोणी शैक्षणिक प्रशिक्षणाच्या कामात गुंतलेला होता. आजही ती कामं हद्दपार झालेली नाहीत. त्यातच त्यात आणखी एक भर पडलेली आहे. ती म्हणजे ऑनलाइन कामाची. ऑनलाइन कामं एवढी आहेत की त्यात विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकांना वेळच मिळत नाही.
         ऑनलाइन कामात केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या. एवढंच काम नाही तर त्याचे गुणही ऑनलाइन पोष्ट करा. शाळेची सर्व कामं करा. त्यातच प्राथमिक शाळेला बाबू व शिपाही मंजूर नसल्यानं ती देखील कामं शिक्षकांनाच स्वतः करावी लागतात. ऑनलाइन हजेरीपट भरा. खिचडीची माहिती भरा. कधी इतर कामं करा. त्यामुळं ऑनलाइन कामं करीत असतांना वेळ पुरत नाही. कधी कधी एकाच साईटवर एकाचवेळेस सर्वच शिक्षक आपली लवकरात लवकर कामं व्हावीत म्हणून काम करीत असल्यानं साईटही बरोबर चालत नाही. त्यातच कधीकधी रात्र रात्र जागून शिक्षक अशी कामं करीत असतात. त्याचं कारण असतं सीमीत असलेला व मर्यादित असलेला वेळ. ती कामं विशिष्ट अशा वेळेतच पुर्ण करावी लागतात. ही कामं कधीकधी वर्ग शिकवीत असतांनाही सुरु असतात. मग विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकांना कसा वेळ मिळेल? त्यानंतर शिक्षक नसतील तर आम्ही शिकायचे कसे? हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणारच. कारण याच ऑनलाइन कामासाठी शिक्षकांना बऱ्याच शाळेत पुरेशा सोयी नसल्यानं वर्ग सोडून बाहेर जावेच लागते. अशावेळेस वर्गात शिक्षक नसतोच. शाळेत ऑनलाईन कामासाठी व्यवस्था जरी असेल तरी ती कामं शिक्षकाला वर्ग सोडूनच कधीकधी करावी लागतात. त्यातच सरकार दररोज काही ना काही पत्र काढून ऑनलाइन कामं सांगत असतातच. या ऑनलाइन कामात कधी अपार आयडीचं काम असतं तर कधी स्कॉर्प, कधी आधार तर कधी संचमान्यतेचं काम असतं. त्यातच काही अशाही शाळा आहेत की ज्या खाजगी आहेत व ज्या शाळेत संस्थाचालकाची कटकट आहे. त्या कटकटी सांभाळतांनाही शिक्षकाला वर्ग सोडून जावे लागते. महत्वपूर्ण बाब ही की सरकारनं ऑनलाइन कामाची सरबत्ती लावू नये. ती कामं कमी करावीत. जेणेकरुन शिक्षकांना राहत मिळेल. मोकळा श्वास तरी घेता येईल. सध्याच्या काळात शिक्षकांना अशा स्वरुपाच्या ऑनलाइन कामामुळं मोकळा श्वास घ्यायलाही सवड मिळत नाही. तो ऑनलाइन कामे करण्यासाठी संगणकाच्या कमऱ्यात स्वतःला बंदिस्त करुन ठेवतो. त्याचं जगणं वागणंही बंदिस्त होवून जात असतं. शिवाय याच गोष्टीमुळं आज विद्यार्थी वर्गासमोर तशा स्वरुपाचे प्रश्न उद्भवणे साहजीकच आहे. विशेष सांगायचं झाल्यास सरकारनं ऑनलाइन कामं द्यावीत. परंतु ती कामं करण्यासाठी एक वेगळाच व्यक्ती शाळेत नियुक्त करावा. जो परीपुर्ण व सर्वच बाबींचे ऑनलाइन काम सांभाळू शकेल. ज्यातून सरकारचाही फायदा होईल व विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. हे तेवढंच खरं. खरं तर विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असून त्याला शिकवणं हे ऑनलाइन कामापेक्षा गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थी शाळेत यायलाच हवा. त्यातच तो दर्जेदार शिकायलाच हवा आणि तो टिकायलाच हवा हे महत्वाचं आहे. जर अशीच ऑनलाइन कामं सुरु असली आणि विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण मिळालं नाही तर कुठंतरी ती ठेच विद्यार्थ्यांच्या स्वाभिमानाला पोहोचेल. त्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होईल व तो विद्यार्थी शिकायचं सोडेल. त्यातच तो शाळाबाह्य ठरेल हे तेवढंच खरं. ज्यातून देशाचंच भविष्य खराब होईल यात शंका नाही.'
           केशरचा तो विचार. तो त्यावेळचा विचार होता. विचार चांगला होता. तसा विचार करुनच तो विद्यार्थ्यांना शिकवायचा. परंतु चांगले शिक्षक हे खाजगी शाळेत चालत नव्हते. त्यामुळंच त्याचं निलंबन झालं होतं. परंतु चांगलं शिक्षण देण्याची धग व ती ज्ञानलालसा आजही त्याच्या मनात होती व तीच ज्ञानलालसा पुर्ण करण्याची स्वप्न तो पाहात होता. जरी तो निलंबित झाला असला तरी.
          शाळेच्या नोकऱ्या, शाळेचे पद व शाळेच्या पदोन्नत्या. या सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी लोकांना बराच संघर्ष करावा लागतो. शिवाय एससी, एसटी जातींना तर जास्तच समस्या येते नोकऱ्या मिळवितांना. काही काही खाजगी संस्थांमध्ये नोकऱ्या मिळवितांना सहजासहजी त्या नोकऱ्या मिळत नाही. समजा एखाद्या शाळेत एससी, एसटीचे पद असल्यास शाळेचे मालक असलेले संस्थाचालक हे आपल्या शाळेची जाहीरात वर्तमानपत्रात छापून आणतात. परंतु आपल्याला एससी, एसटीचा उमेदवार मिळाला नाही, अशी बनवाबनवी करुन ते एससी, एसटीचा उमेदवार भरतीच करीत नाहीत. आपल्याच जातीतील लोकांची पदभरती जास्त करतात. जे संस्थाचालक त्या जातीचे असतात वा एकमेकांचे पक्के नातेवाईक असतात.
          ती केशरची शाळा अशीच की त्या शाळेत केशरचा अधिकार पदावर म्हणजेच मुख्याध्यापक पदावर दावा होता. परंतु संबंधीत संस्थेला तो दावा नाकारायचा असल्यानं त्यांनी त्या शाळेत शिक्षक असलेल्या केशरला भल्लं मोठं आरोपाचं पत्र दिलं व त्याची पदोन्नती नाकारली. शिवाय धमकी दिली होती की जर त्यानं अधिकार पदावर दावा केलाच तर त्याचेवर चौकशी बसवून त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात येईल. 
         नोकरी..... आयुष्याला सुखकर करणारी वस्तू. तीच जर नसेल तर व्यक्तीला आपले हातपाय गळल्यासारखे वाटतात. जे नोकरीवर असतात, त्यांच्यासाठी हा अनुभव असतो. त्यातच खाजगीकरण..... खाजगीकरण लोकांच्या आयुष्याचं वाटोळं करणारी वस्तू. खाजगीकरणात व्यक्तीला आपल्याच नातेवाईकांची किंमत असते. जात महत्वाची असते. जातीच्या लोकांना मुख्य पदे दिली जातात. जरी ते उच्चशिक्षित नसले तरीही आणि इतर जातीतील लोकांना दुय्यम कामे दिली जातात. जरी ती मंडळी उच्चशिक्षित असली तरी. बरं झालं की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं व त्या संविधानानुसार एस सी, एस टीच्या संधीच्या जागा या टक्केवारीनुसार सोडल्या. त्यामुळं आज एस सी, एस टीचा उमेदवार घेणं बंधनकारक आहे. म्हणूनच आजच्या काळात खाजगी संस्थाही एस सी, एसटीचे उमेदवार नोकरीवर घेतात. कारण ते जर नसतील तर अशा खाजगी शाळा या मान्यता पावत नाही, अर्थात त्यांना मान्यता मिळत नाही.
         एससी, एसटी अंतर्गत येणाऱ्या जातींना विशेष आरक्षण आहे. कारण या जातींना आरक्षण जर नसतं तर आजही याच जाती, काल जशा भीक मागून जगत होत्या. लोकांच्या उष्ट्या पत्रावळी चाटत होत्या. तेच कृत्य आजही करावं लागलं असतं. आरक्षण जर नसतं तर आजही या जातीतील एकही व्यक्ती नोकरीवर लागला नसता आणि त्यांना मुख्य पदाच्या जागाही मिळाल्या नसत्या हे तेवढंच खरं आहे. आरक्षण आहे म्हणूनच आजचा एससी, एसटी समाज नोकरीच्या क्षेत्रात मोठमोठ्या हुद्यावर आहे.
          आरक्षणाच्या बाबतीत लोकं म्हणतात की आरक्षण नकोच द्यायला. पुरे झालं आरक्षण. देशाला अमूक अमूक वर्ष झाली. बाबासाहेबांनी फक्त दहाच वर्ष म्हटली होती आणि तशी दहाच वर्षासाठी आरक्षणाची तरतूदही केली होती घटनेत. परंतु आजही आरक्षण आहे की जे आज समाप्त व्हायला हवं. यात महत्वपुर्ण बाब ही की लोकांचं सगळं म्हणणं बरोबर आहे. परंतु खरं सांगायचं झाल्यास आज आरक्षण आहे तरी एस सी, एसटीची गत ही एखाद्या लाचार असलेल्या उंदरासारखीच आहे. आजही उच्च जातीतील लोकं या समाजाला वा या जातीजमातीला आपल्या बरोबरीचे स्थान देत नाहीत. त्यांना नोकऱ्या न देता, त्यांच्या जागेवर उमेदवार मिळालाच नाही असे वक्तृत्व करुन त्यांच्या जागा भरतात आणि भरल्या आहेत. हे चौकशी केले असता बऱ्याच संस्थेत आढळून येते. तसेच अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीचा खाजगी संस्थेत उच्च पदावर अधिकार असेल तर त्याला फार मोठ्या स्वरुपात कारणे दाखवा नोटीस दिला जातो व त्याची पदोन्नती नाकारली जाते. तरीही त्यानं पदोन्नतीसाठी अर्ज दिलाच तर त्याची कत्तल म्हणून त्याचेवर जाचक अटी लावून त्याच्यावर वेगवेगळे आरोप केले जाते. त्याला अशा प्रकारे घाबरवले जाते की त्या जातीचा व्यक्ती घाबरेल व तो सहजच आपला अधिकार सोडून तो आपली अधिकाराची पावले मागे घेतो. असे बरेच संस्थेत झाले आहे. शिवाय एखादा व्यक्ती या प्रक्रियेत घाबरणारा नसेल तर त्याचेवर उठसूठ कोणतेही आरोप केले जातात व त्याचेवर चौकशी आरोप लावले जातात. त्यानंतर त्याचेवर चौकशी बसवली जाते. ज्या चौकशीत चार पाच वर्ष सहजच निघून जातात. मग त्याला त्याचा गुन्हा नसतांना निलंबित केले जाते. ज्यातून त्याला न्यायालयीन खटला लढावा लागतो. ज्यातून पैसा नसल्यानं त्याचा न्यायालयीन खटल्यातही पराभव होतो व त्याची नोकरी जाते. असं होवू नये म्हणून कोणताच एससी, एसटीतील व्यक्ती खाजगी संस्थेत अधिकार मागत नाही. आपली नोकरी बरी व आपण बरे, अशी तो भुमिका ठेवतो. महत्वपुर्ण सांगायचं म्हणजे काल शुर जात वा जमात असलेला हा एससी, एसटी वर्ग. ज्या वर्गानं काल राजे बनून शत्रूला जेरीस आणलं होतं नव्हे तर अधिकारपदाच्या जागा प्राप्त करुन काल राज्याचं रक्षण केलं होतं. शिवाय सर्वांना माहीतच असेल गणपत गायकवाडांचा पराक्रम. त्यांनी छातीला माती लावत परिणाम माहीत असतांनाही संभाजीला आपलाच धनी समजून त्याच्या देहाचे औरंगजेबानं पाडलेले तुकडे गोळा केले होते व त्यांच्या देहाचे ते तुकडे शिवून त्यांचा आपल्याच अंगणात दाहसंस्कार घडवून आणला होता. त्यानंतर त्यांना पकडून औरंगजेबानं संभाजीहुनही बढतर असे गणपतचे हालहाल केले. आज देशाला संभाजीचे बलिदान माहीत आहे. परंतु गणपत गायकवाडांना देश विसरला आहे. एवढंच नाही तर आज त्याच गणपत गायकवाडाचे वंशज असलेल्या तमाम एससी, एसटी जातीच्या लोकांचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न तमाम उच्चवर्णीय करीत असल्याचे दिसून येते. एवढंच नाही तर ज्या बख्त बुलेंदशहाचं राज्य संपूर्ण विदर्भात होतं. ज्यानं गोंडांना विशेष असा दर्जा मिळवून दिला होता. त्या गोंडांची आजची अवस्था पाहिली तर आरक्षण अति आवश्यक असल्याचं दिसतं. आजही बरेचसे आदिवासी शिक्षणाच्या कप्प्यात नाहीत. मग ते अधिकार पद सोडाच. विशेष म्हणजे ज्या बाबासाहेबांनी संविधान बनवलं व सर्वात प्रथम कलम ३४० ही ओबीसी वर्गासाठी लिहिली व त्या कलमेचा घटनेत समावेश केला. त्यानंतर आपल्या लेकरांसाठी ३४१ वी कलम लिहिली. तोच ओबीसी वर्ग आज बाबासाहेबांच्या याच लेकरांचे आपल्या संस्था उघडून त्यात नोकऱ्या देतांना हालहाल करीत आहेत. ग्रामीण भागात बऱ्याचशा शाळेत एससी, एसटी व्यक्ती जर शिक्षक असेल, तरीही त्यांच्या अधिकाराची जोपासना न करता, त्याला शाळेतील कुडा कचरा स्वच्छ करण्याच्या कामी लावले जाते आणि बिचारा एससी, एसटी वर्ग ते नाईलाजानं करतोच. कारण पर्याय नसतो. पदोन्नती तर सोडाच, त्याला त्याची नोकरी गमाविण्याची स्थिती असते. 
         बऱ्याचशा ठिकाणी अधिकार प्राप्ती ही सहज होत नाही. त्यासाठी बरीच पापडं बेलावी लागतात. हे तेवढंच खरं आहे. मग ते मुख्याध्यापक पद का असेना. साधं मुख्याध्यापक पद जर मिळवायचं असेल तर संस्था सहजासहजी ते बहाल करीत नाही. चांगले भल्ले मोठे आरोपाचे पत्र उमेदवाराला दिलं जाते. ज्यातून घाबरुन जावून संबंधीत उमेदवार आपला त्या पदावरील हक्कं सोडेल. एवढंच नाही तर त्यातूनही तो उमेदवार तरलाच तर त्याचेवर चौकशी बसवून त्याला निलंबित केले जाते. अन् त्यातूनही तो उमेदवार तरलाच तर त्याला न्यायालयामार्फत अधिकार पद मिळतं. परंतु हे खाजगी संस्थानीक त्यालाही घाबरत नाहीत व पुढे त्याच उमेदवाराच्या पेन्शनच्या वेळेस त्याच्यात व्यत्यय आणत असतात. असे घडू नये म्हणून आजही बरीचशी एससी, एसटीतील माणसं अधिकार पद प्राप्त करण्याच्या मागे लागत नाहीत व सहजासहजी आपला अधिकार सोडून देतात. कारण आजही देशातून भेदभाव गेलेला नाही. मग तो खाजगी संस्थेतून कसा जाणार! त्यामुळंच नेमकं एक उद्गार पुढे येतं, ते म्हणजे अजून अत्याचाराचे शिकार किती?
         केशर हा एस सी किंवा एस टीम नव्हताच. तो मुस्लिम होता. परंतु डॉ. बाबासाहेबांनी संविधानात एक तरतूद केली होती. ती तरतूद होती सेवाजेष्ठता. सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती मिळत होती. ज्याला त्याचे शाळेतील संस्थाचालक नाकारत होता. त्याला मुख्याध्यापक नावाच्या अधिकारपदावर बसवू पाहात नव्हता. म्हणूनच त्याचा हक्कं डावलण्यासाठी त्याला त्यानं कारणं दाखवा नोटीस दिले होते. 
            माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो. स्वतःला असे मजबूत बनवा की लोकं तुमचा आदर्श घेतील. होय, हे म्हणणं खरंच आहे. त्याची पुनरावृत्ती नेते करतातच. जुने आणि आजचेही. फरक एवढाच आहे की कालचे नेते हे सेवेच्या दृष्टीकोनातून स्वतःला मजबूत बनवायचे. आजचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करुन स्वतःला मजबूत बनवतात. 
         मजबूत बनवणे. आजचा काळ असाच आहे. आज सर्वच लोकं स्वतःला मजबूत बनविण्यासाठी रात्रदिवस मेहनत करीत असतात. ते स्वतःला मजबूत बनवीत असतांना दुसऱ्याचा विचारच करीत नाहीत. दुसरा मरत असेल तरी त्यांना त्यांच्यात काही घेणं देणं नसतंच. अशातच त्यांना आवडत असतं दुसऱ्याला त्रास देणं. आजचे लोकं दुसर्‍याचे रक्त पिवूनच स्वतः मजबूत बनत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या कारखान्याचं देता येईल. कारखान्यातील मालक हा काही काम करीत नाही. तो फक्त आदेशच द्यायचे काम करतो. त्याची सर्व कामे ही त्याचा मॅनेजर करीत असतो. तरीही तो सक्षम असतो. त्याचं कारण आहे, त्याच्याजवळ येणारा पैसा. तो पैसा त्याच्या मेहनतीनं येत नाही. तो पैसा येतो, त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगार वर्गामुळं. तो कामगार वर्ग दिवसरात्र काम करतो आणि त्या कामाचा मोबदलाही त्याला तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. जो पैसा मालकाच्या खिशात जातो. ज्यातून मालक हा अधिकाधिक सक्षम होत जातो. दुसरं उदाहरण शाळेतील संस्थाचालकाचं देता येईल. तो जास्त काम करीत नाही. फक्त संस्था रजीस्ट्रेशन करतो. त्यानंतर तो एखादी लहानशी जागा घेतो. त्या जागेवर एक लहानशी इमारत बांधतो. त्या जागेवर शाळा उभारतो. ती शाळा उभारली की त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करतो. वेळप्रसंगी कर्मचारी नियुक्त करतांना त्यांचेकडून पैसे घेतो. शिवाय विद्यार्थ्यांकडूनही शुल्क गोळा करतो. ज्यातून ती शाळा वाढते. त्याचबरोबर संस्थाचालक. तो पैशानंही वाढतो आणि त्यातल्यात्यात अहंकारानंही. याबाबतीत तिसरं आणखी एक उदाहरण आहे. ते म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यानं भ्रष्टाचार करुन कमविलेले पैसे. तोही भ्रष्टाचार करुन पैसे कमवीत असतो. कधीकधी न्यायाधीश व वकीलांनी पैसे कमवले असं वर्तमानपत्रांतून दिसतं. 
         स्वतःला मजबूत बनविण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू आहे पैसा. पैसा जर नसेल तर त्या व्यक्तीला कोणी मोजत नाही वा त्याची इज्जतही कोणी करतांना दिसत नाही. म्हणतात की पैशानं सारं काही विकत घेता येतं. शिक्षण सुद्धा पैशानं विकत घेता येतं. अलिकडील काळात डॉक्टर, इंजीनियर हे पैशाच्या जोरावरच बनत असलेले दिसतात. नेते मंडळीही पैसा खर्च करुन नेतेगिरी प्राप्त करीत असतात. पैसा नसेल तर निवडणूकही लढता येत नाही. दुसरी महत्वाची वस्तू आहे शिक्षण. जी मंडळी जास्त शिकतात. तेही सक्षमच असतात. त्यांच्याजवळ पैसा नसला तरी समाज त्यांना विचारत असतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्याकडे पैसे नव्हते. परंतु त्यांनी शिक्षण घेतलं. ते एवढं शिक्षण घेतलं की त्या शिक्षणाच्या भरवशावर ते समोर गेलेत. आजही त्यांचं नाव आहे. 
          पुर्वीच्या काळी राजपद्धती होती. त्या पद्धतीत जो राजा राजगादीवर बसत असे. साहजीकच तो सक्षम असे व त्याचा प्रजेत दरारा निर्माण होत असे. तसा दरारा तो राजा निर्माण करीत असे. जसं शिवाजी महाराजांनी केलं. एकेक किल्ले घेत त्यांनी अफजलखानाला मारले. ज्यातून शिवाजी महाराजांची भीती पंचक्रोशीत पसरली. दुसरं उदाहरण संभाजी महाराजांचं देता येईल. त्यांनीही गादीवर बसताच स्वतःला सिद्ध करण्यासाठी बऱ्हानपूर लुटलं व औरंगजेबाच्या फौजेचा धुव्वा उडवला. तिसरं उदाहरण औरंगजेबाचं देता येईल. राजगादीवर येतांना भावाची हत्या आणि वडीलांना नजरकैदेत टाकलं. त्यामुळं त्यांचं सक्षमीकरण प्रजेला दिसलं. त्यामुळं आपोआपच त्यांचा दरारा वाढला. चवथं उदाहरण म. गांधींचं देता येईल. त्यांनीही बार्डोली व चंपारण्याचा उठाव करुन स्वतःला सक्षम केलं होतं. तसंच डॉक्टर बाबासाहेबांचंही उदाहरण देता येईल. त्यांनीही चवदार तळ्याचा सत्याग्रह व तो खटला लढून स्वतःला सिद्ध केलं होतं. 
          कालच्या परिस्थितीत ज्यानं स्वतःला सक्षम बनवलं. तोच राजा बनला. देवादिकांच्या भाषेत सांगायचं झाल्यास देवांचेही काही चमत्कार सांगीतले आहे. ते चमत्कार म्हणजेच त्यांचे सक्षम असण्याचे पुरावे. आता ते चमत्कार कोणी पाहिले? कोणीच नाही. परंतु आजही त्यांच्या चमत्कारावर आपण विश्वास ठेवतो. त्यामुळंच आजही त्यांचीच आपण प्रतिमा पुजतो. विशेष सांगायचं झाल्यास आजही आपल्याला स्वतः सक्षम होण्याची गरज आहे. आपण जेव्हा स्वतः सक्षम होवू. तेव्हाच हा समाज आपलं ऐकेल. आपल्याला मान देईल. आपली इज्जत करेल. आजच्या काळात असं कोणीही समजू नये की पैशानंच आपण सक्षम होवू शकतो. आज अशी बरीचशी उदाहरणं आहेत की ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे. परंतु तो पैसा पाहण्यासाठी आहे. त्याची कोणी इज्जत करीत नाही. कारण आज पैशाला जरी महत्व असलं तरी पैशानं सक्षम होणाऱ्या व्यक्तीची इज्जत ही तात्पुरती असते. ती कालानुकालीक नसते. कालानुकालीक इज्जत कमविण्यासाठी स्वतःला कर्मानं सक्षम बनविण्याची गरज आहे. ज्यांची कर्म चांगली, तो अधिक प्रभावशाली असतो. शिवाय हे प्राचीनकाळापासून चालत आलेले आहे. आज अशी कितीतरी नावं घेता येतील की जे चांगल्या कर्मानं आजही जगात प्रसिद्ध आहेत. जसे भगवान राम, क्रिष्ण, तथागत भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, येशु ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, सम्राट अशोक, पृथ्वीराज चव्हान, सम्राट अकबर, शिवाजी महाराज, मं. गांधी, बाबासाहेब आंबेडकर. अशी बरीच मोठी यादी होईल की जे आपल्या डोळ्यासमोरुन जात नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्या लोकांची चांगली कर्म. महत्वपूर्ण बाब ही आज लोकांनी चांगली कर्म करावीत. जे जेवढ्या जास्त प्रमाणात चांगले कर्म करतील. त्यांचं नाव जगात इज्जतीनं घेतलं जाईल. पैशावर प्रेम करणारे भरपूर असतात. हे आपण आजपर्यंत पाहात आलो आहोत. परंतु जो कर्मावर प्रेम करतो. तोच अमर होतो व त्यांची जगात जयजयकार होते. आपल्याला गाडगेमहाराज माहीत असेलच. संत ज्ञानेश्वर माहीत असेलच आणि त्याचबरोबर माहीत असेल संत तुकाराम. काय होतं त्यांचेजवळ. तरीही त्यांना आजही जग ओळखतोय. त्याचं कारण आहे, त्यांच्यातील चांगले कर्म. त्यांनी स्वतःला चांगल्या कर्मानं सक्षम बनवलं होतं. म्हणूनच आजही त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. महत्वाचं म्हणजे चांगले कर्म करा. म्हणजे त्याचं फळ चांगलंच मिळेल. वाईट कर्माचं फळ वाईटच मिळेल. जो जसा कर्म करेल. त्याचं त्याचं तेवढ्या प्रमाणात कमी अधिक चांगलं वाईट फळ मिळेलच. कर्मानुसार फळप्राप्ती. विशेष सांगायचं झाल्यास स्वतः वाटत असेल की आपलीही इज्जत समाजानं करावी तर आपण स्वतः सक्षम बनावं. त्यासाठी चांगलं कार्य करावं. कारण वाईट व्यक्तींची इज्जत समाजात नसते. इज्जत असते चांगल्या माणसांची. चांगली इज्जत ही पैशानं मिळत नाही. पैशानं येते फक्त क्लेश, अहंकार व दुःख. ते येवू नये व जीवनात आनंद यावा, यासाठी चांगले कर्म करायला हवीत. जेणेकरुन त्यातून आपल्याला अधिकच सक्षम बनता येईल व समाज आपली इज्जत करु शकेल. यात शंका नाही. 
          केशर चांगलं शिकवीत होता. परंतु तो पैशानं पाहिजे त्या प्रमाणात सक्षम नव्हता. म्हणूनच संस्थाचालकानं त्याला कारणे दाखवा नोटीस देवून घरी बसवलं होतं. जरी त्याच्यात चांगले शिकविण्याचे गुण असले व तो शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिकवीत असला तरी. त्याच्यातील चांगल्या गुणांची त्याच्या शाळेतील संस्थाचालकानं हत्याच केली होती.