अशाच गोष्टीसाठी संस्था स्थापन झालेल्या बऱ्या
संस्था...... अलिकडील काळात संस्था स्थापन होत आहेत. काही झाल्या आहेत. परंतु अलिकडील काळात स्थापन झालेल्या वा होत असलेल्या संस्थेतील पदाधिकारी वर्गाचा उद्देश असतो फक्त पैसा कमविणे. त्या संस्था कागदावरच सेवेचं मुल्य दाखवत असतात. प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळीच असते. तसेच वास्तव परिस्थिती आणि संस्था दाखवत असलेली परिस्थिती यात बरीच तफावत असते.
संस्था जेव्हा स्थापन होते. तेव्हा त्या संस्थेचा उद्देश असते सेवा. सेवेचं ब्रीद ठेवून अशा वंचीतांची सेवा करीत असतात. त्या शैक्षणिक संस्था असतील तर त्या शिक्षण देत असतात. शिक्षण हे निःशुल्क स्वरुपात देत असतात आणि ते द्यायला हवं. धार्मिक संस्था असतील तर त्यांनी गरीबांसाठी अन्नछत्र उभारायला हवं आणि बऱ्याच ठिकाणी अशी अन्नछत्रही दिसतातच. परंतु अशा अन्नछत्राच्या ठिकाणी आज कितीतरी लक्षाधीश लोकं आणि कितीतरी करोडपती लोकंच गर्दी करतात. गरीबांसाठी अन्नछत्र असते वा आहे. ही भाषा केवळ बोलण्याचीच भाषा ठरतांना दिसत आहे. शिवाय अशा अन्नछत्राच्या ठिकाणी वाटप करणारे कर्मचारी, एखादा गरीब व्यक्ती रांगेत दिसल्यास त्यांची हेळसांड करतात. तेव्हा ते हेही विसरुन जातात की आपण ज्या संस्थेअंतर्गत सेवा करीत आहो. ती सेवाच गरीब, अंगूपंगू व लाचार लोकांसाठी आहे की ज्यांच्याकडे खायला अन्न नाही व पैसाही नाही. अशा रांगेत विश्वकोटीचं दारिद्र्य असणारी लोकं असली की बरीच किळस करतांना दिसतात ही मंडळी. त्यात एखादा श्रीमंत व्यक्ती अशा रांगेत दिसल्यास त्याची कितीतरी प्रमाणात वाहवा होत असते. कारण आजच्या काळात संस्था या स्वार्थासाठीच निर्माण झाल्या आहेत. काही अपवाद असणाऱ्या संस्था जर सोडल्या तर. आज वृद्धाश्रमही केवळ पैसे कमविण्यासाठी उघडलेली दिसून येत असून ज्या वृद्धांची, त्यांची मुलं सेवा करीत नाही. अशा वृद्धांची अशा संस्था सेवा करतांना त्यांचेकडून सेवेचं मुल्य घेतात. जे मुल्य अशा वृद्धांना परवडणारे नसते. तशीच आजच्या काळात अशी काही काही अनाथालये आहेत की ज्या अनाथालयातील मुलांना जबरन भिक मागून पैसे आणायला लावले जाते. अशाही संस्था या देशात आहेत व त्यांचं बाइज्जत रजीस्ट्रेशन आहे. आज अशा बऱ्याच शाळाही आहेत की ज्या सरकारी असूनही व त्या शाळांना अनुदान प्राप्त होत असूनही त्या शाळेतून परीक्षेच्या रुपात विद्यार्थ्यांकडून पैसा घेतला जातो. तसंच शाळा विकासाच्या नावाखाली पालकांकडून पैसा वसूल केला जातो. त्यातच कॉन्व्हेंटचे तर,हाल विचारुच नये. कारण कॉन्व्हेंटच्या शाळाही संस्थेअंतर्गत चालत असून त्या सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या नाहीत. कारण कॉन्व्हेंटच्या शिक्षणाला मनमानी असा पैसा लागतो. याचाच अर्थ असा की संस्था रजीस्टर करतांना जे सेवा नावाचं उद्दीष्ट असते, त्याची हत्या होत असते.
अलिकडील काळात स्थापन झालेल्या व धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल करणाऱ्या संस्था निर्माण होत असल्या व त्यांचा उद्देश केवळ पैसे कमविण्याचा जरी असला तरी त्या संस्थेबाबत सांगायचं झाल्यास तसेच अलिकडील काळात कोणत्याही स्थापन होणाऱ्या संस्थेचा उद्देश मुळात सेवा जरी असला तरी आज त्यांनी आपला पैसे कमविण्याचा स्वार्थ सोडावा. त्यांनी सेवाच धर्म धरावा व वंचीत घटकांना त्यांचेवर कुणाकडून अन्याय होत असल्यास न्याय मिळवून द्यावा. कधीतरी असं वकिलांचं सेवाभावी संघटन निर्माण व्हायला हवं की ज्यांनी अशाच लोकांना न्याय मिळवून द्यावा. ज्यांच्यावर देशातील श्रीमंत घटकांकडून अत्याचार झाला. बलात्कार झाला नव्हे तर बलात्कार होत आहेत. त्यांनी आपलं प्रशासन चांगलं ठेवावं व त्यात भ्रष्टाचारांना थारा नसावा. तसंच कोणी भ्रष्टाचार करीत असेल तर त्यांना भ्रष्टाचार करु देवू नये. तसेच या संस्थेतील पदाधिकारी वर्गांनी गरीब व झोपडपट्टीतील वस्तीत जावून खरा वंचीत घटक असल्यास त्यांना सरकारी योजनांची माहिती करुन द्यावी. जेणेकरुन कोणत्याही सरकारी योजना गरीब व वंचीत घटकांना मिळू शकतील. तसेच जेही कोणी श्रीमंत असतील व ते गरीबांसाठी असलेल्या सरकारी योजना लाटत असतील वा त्यांचा लाभ घेत असतील, तर त्यांचा पर्दाफाश करावा. अशाही संघटना आज निर्माण होण्याची गरज आहे. महत्वपूर्ण बाब ही की आज संस्था स्थापन व्हाव्यात. त्या पैसे कमविण्यासाठी नाही तर सेवेसाठी स्थापन व्हाव्यात. त्यातच आज संस्थेच्या याही उद्देशात बदल होवून त्यात वंचीतांना लाभ देण्याचा उद्देश असावा. शिवाय भ्रष्टाचार कमी करण्याचाही उद्देश असावा. परंतु लोकं अशी वंचीतांची सेवा करीत नाही. त्याचं कारण वंचीत घटकांचं दारुच्या भट्टीत दिसणं. वंचीत घटक हा अन्नछत्रात जेवन घेतो. ते जेवनापुरतं ठीक असतं. परंतु असे वंचीत घटक दारुच्या भट्टीत जेव्हा दिसतात. तेव्हा विचार येतो की कोणत्या घटकांची आपण सेवा करीत आहोत. जे दारु पितात.
विशेष म्हणजे लोकं दारु जरी पित असले तरी अशा संस्थांनी अशा वंचीतांची दारुची लतही सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, आपल्या संस्थेच्या माध्यमातून. ती त्यांची दारुची लत वा व्यसन तेव्हा सुटू शकते. जेव्हा त्यांच्या मनातील दुःख दूर होईल. कारण माणसाच्या मनातील दुःखच त्याला दारुचं व्यसन लावत असतात हे तेवढंच खरं.
महत्वाचं म्हणजे संस्थेच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी नव्हे तर लोकांची सेवा करावी. तसंच संस्थेच्या माध्यमातून वंचीतांची सेवा व्हावी अथवा करावी. जेणेकरुन त्यांना लाभाच्या योजना मिळतील. त्यातच त्यांना वर उठता येईल व आपला विकास करता येईल. जो त्यांचा झालेला विकास कुठंतरी देशाच्या कामात येईल. त्यासाठीच संस्था स्थापन झालेल्या बऱ्या हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०