How to learn? in Marathi Children Stories by Ankush Shingade books and stories PDF | शिकायचे कसे?

Featured Books
  • I SAW A ANGEL

    I saw a angel. I call her lexi  "ഹേയ്, ഹലോ.ആരെങ്കിലും എന്നെ...

  • ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 15

    ️ കർണ്ണിഹാരയെന്ന ആ സുഗന്ധ പുഷ്പം തന്നിൽ നിന്നും മാഞ്ഞു പോയിര...

  • One Day

    ആമുഖം  "ഒരു ദിവസം നമ്മുടെ ജീവിതം മാറുമെന്ന് ഞാൻ എപ്പോഴും വിശ...

  • ONE DAY TO MORE DAY'S

    അമുഖം

    “ഒരു ദിവസം നമ്മുെട ജീവിതത്തിെ ഗതി മാറ്റുെമന്ന് ഞാൻ...

  • ഡെയ്ഞ്ചർ പോയിന്റ് - 14

    ️ കർണ്ണിഹാര ചോദിച്ച ചോദ്യത്തിന് വ്യക്തമായ ഒരു ഉത്തരം കണ്ടെത്...

Categories
Share

शिकायचे कसे?

ऑनलाइन कामातून निर्माण झालेला प्रश्न ; शिकायचे कसे?

         सध्या शिक्षक हे व्यक्तीमत्व गुलाम असल्यागत शाळेत काम करीत आहे. असं जाणवत आहे की त्याचं मुलभूत स्वातंत्र्यच सरकारनं हिरावून घेतला की काय? एवढी कामं त्या शिक्षकाच्या मागे आज लागून आहेत. दररोज एक ना एक काम येत असतेच. ज्यानं शिक्षकांचं जगणंच हराम करुन टाकलं आहे. अशीच एक बातमी. नागपुरातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी. शिक्षक नसतील तर शिकायचे कसे? अशा स्वरुपाचं जिल्हापरीषदेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहिलेले पत्र. विद्यार्थ्यांच्या मनपटलातून उमटलेला सुर. हा सुर त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनपटलावर उमटलेला नाही तर तो सुर सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांचा आहे. परंतु ते बोलणार कसे? त्यांचं वय लहानगं आहे व ते त्यांना कळत नाही. परंतु हे कळतं की कोणता शिक्षक शाळेत असतो व कोणता शिक्षक शाळेत नसतो. त्यातच कोणते शिक्षक मोबाईलवर असतात व कोणते शिक्षक मोबाईलवर नसतात हेही कळतं. 
         ती जि. प. शाळा व त्यात विद्यार्थ्यांनी म्हटलं की शाळेत शिकवायला शिक्षकच राहात नाहीत. वास्तविक ते म्हणणं बरोबर आहे. तसा त्या शाळेचा प्रश्न आहे की तेथील शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत व शिक्षकांची नियुक्ती त्या शाळेत नसल्याने त्या शाळेत शिकवायला शिक्षक नाही. परंतु ज्या शाळेत शिकवायला शिक्षक आहेत. त्या शाळेचीही अवस्था शिक्षक नसल्यासारखीच आहे. कारण आजचा शिक्षक ऑनलाइन कामामुळं वर्गात नसल्यासारखाच आढळतो. तो सतत मोबाईलवर ऑनलाइन कामं करीत असतो. याचा अर्थ असा नाही की तो शाळेत वर्गात असतांना ऑनलाइन खेळ खेळतो. तो शिक्षक सरकारची कामं करीत असतो कधी मोबाईलवर तर कधी संगणकावर बसून.
         आज जि. प. शाळेतील अवस्था तशाच स्वरुपाची झालेली आहे. केवळ जि. प. शाळेतीलच अवस्था अशा स्वरुपाची झालेली नाही तर इतरही सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांची तशाच स्वरुपाची अवस्था झालेली आहे. याला खेळखंडोबा असं नाव देता येईल. कारण हा खेळखंडोबा सर्वच शाळेत ऑनलाइन कामानं झालेला आहे. त्यामुळंच आम्ही शिकायचे कसे? हा प्रश्न आज विद्यार्थ्यांसमोर आ वासून उभा आहे.
          पुर्वीही शिक्षकांना कामं होती. कोणी निवडणुकीची बी एल ओ यादी बनवीत होता. तर कोणी शैक्षणिक प्रशिक्षणाच्या कामात गुंतलेला होता. आजही ती कामं हद्दपार झालेली नाहीत. त्यातच त्यात आणखी एक भर पडलेली आहे. ती म्हणजे ऑनलाइन कामाची. ऑनलाइन कामं एवढी आहेत की त्यात विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकांना वेळच मिळत नाही.
         ऑनलाइन कामात केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या. एवढंच काम नाही तर त्याचे गुणही ऑनलाइन पोष्ट करा. शाळेची सर्व कामं करा. त्यातच प्राथमिक शाळेला बाबू व शिपाही मंजूर नसल्यानं ती देखील कामं शिक्षकांनाच स्वतः करावी लागतात. ऑनलाइन हजेरीपट भरा. खिचडीची माहिती भरा. कधी इतर कामं करा. त्यामुळं ऑनलाइन कामं करीत असतांना वेळ पुरत नाही. कधी कधी एकाच साईटवर एकाचवेळेस सर्वच शिक्षक आपली लवकरात लवकर कामं व्हावीत म्हणून काम करीत असल्यानं साईटही बरोबर चालत नाही. त्यातच कधीकधी रात्र रात्र जागून शिक्षक अशी कामं करीत असतात. त्याचं कारण असतं सीमीत असलेला व मर्यादित असलेला वेळ. ती कामं विशिष्ट अशा वेळेतच पुर्ण करावी लागतात. ही कामं कधीकधी वर्ग शिकवीत असतांनाही सुरु असतात. मग विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकांना कसा वेळ मिळेल? त्यानंतर शिक्षक नसतील तर आम्ही शिकायचे कसे? हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणारच. कारण याच ऑनलाइन कामासाठी शिक्षकांना बऱ्याच शाळेत पुरेशा सोयी नसल्यानं वर्ग सोडून बाहेर जावेच लागते. अशावेळेस वर्गात शिक्षक नसतोच. शाळेत ऑनलाईन कामासाठी व्यवस्था जरी असेल तरी ती कामं शिक्षकाला वर्ग सोडूनच कधीकधी करावी लागतात. त्यातच सरकार दररोज काही ना काही पत्र काढून ऑनलाइन कामं सांगत असतातच. या ऑनलाइन कामात कधी अपार आयडीचं काम असतं तर कधी स्कॉर्प, कधी आधार तर कधी संचमान्यतेचं काम असतं. त्यातच काही अशाही शाळा आहेत की ज्या खाजगी आहेत व ज्या शाळेत संस्थाचालकाची कटकट आहे. त्या कटकटी सांभाळतांनाही शिक्षकाला वर्ग सोडून जावे लागते. महत्वपूर्ण बाब ही की सरकारनं ऑनलाइन कामाची सरबत्ती लावू नये. ती कामं कमी करावीत. जेणेकरुन शिक्षकांना राहत मिळेल. मोकळा तरी श्वास घेता येईल. सध्याच्या काळात शिक्षकांना अशा स्वरुपाच्या ऑनलाइन कामामुळं मोकळा श्वास घ्यायलाही सवड मिळत नाही. तो ऑनलाइन कामे करण्यासाठी संगणकाच्या कमऱ्यात स्वतःला बंदिस्त करुन ठेवतो. त्याचं जगणं वागणंही बंदिस्त होवून जात असतं. शिवाय याच गोष्टीमुळं आज विद्यार्थीवर्गासमोर तशा स्वरुपाचे प्रश्न उद्भवणे साहजीकच आहे. 
          विशेष सांगायचं झाल्यास सरकारनं ऑनलाइन कामं द्यावीत. परंतु ती कामं करण्यासाठी एक वेगळाच व्यक्ती शाळेत नियुक्त करावा. जो परीपुर्ण व सर्वच बाबींचे ऑनलाइन काम सांभाळू शकेल. ज्यातून सरकारचाही फायदा होईल व विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. हे तेवढंच खरं. खरं तर विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असून त्याला शिकवणं हे ऑनलाइन कामापेक्षा गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थी शाळेत यायलाच हवा. त्यातच तो दर्जेदार शिकायलाच हवा आणि तो टिकायलाच हवा हे महत्वाचं आहे. जर अशीच ऑनलाइन कामं सुरु असली आणि विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण मिळालं नाही तर कुठंतरी ती ठेच विद्यार्थ्यांच्या स्वाभीमानाला पोहोचेल. त्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होईल व तो विद्यार्थी शिकायचं सोडेल. त्यातच तो शाळाबाह्य ठरेल हे तेवढंच खरं. ज्यातून देशाचंच भविष्य खराब होईल यात शंका नाही. 

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०