लोकांनी धार्मिक भावनेबद्दल संयम बाळगावा? *धार्मिक भावना जेव्हा भडकतात, तेव्हा त्याचा वणवा हा सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचतो. त्यांच्या घरादारात लोकं शिरतात. त्यांच्यासमोर त्यांच्याच घरात त्यांच्या पत्नीच्या अब्रुच्या चिंध्या होतात. महिलांची अब्रू लुटली जाते. ज्यातून अशी अब्रू लुटली जावू नये म्हणून काही सत्यवती स्रिया जोहार सारखी कृती करतात. जी कृती गतकाळात महाराणी पद्यावती व महाराणी संयोगीतानं केली. ज्यातून कित्येक सामान्य स्रियांचे बळी गेले. ज्यातून कितीतरी सामान्य लोकं मृत्युमूखीही पडले. ज्यातून कितीतरी चल अचल संपत्तीची जाळपोळ झाली. आताही तशीच स्थिती असून त्यात सामान्य लोकंच भरडले जातील आणि जे असा वाद निर्माण करतील. ते आपल्या आलेशान बंगल्यात एसीच्या हवेत आरामात बसून मजा पाहतील. ही वास्तविकता असून आतातरी लोकांनी शांत राहावे. वाद वादाच्या ठिकाणी ठेवावा व विनाकारण एखाद्या मुद्द्याला धार्मिक रंग देवून त्याचा बाऊ करु नये म्हणजे झालं.* छावा चित्रपटाच्याच धर्तीवर एक नवीनच कथानक तयार होईल, असा नागपूरातील हा प्रकार. अलिकडील काळात नागपूर शहरात घडत असलेलं चित्र याच प्रकारचे दिसत असून त्या प्रकारातून धार्मिक भावना या संतप्त होत आहेत नव्हे तर संतप्त होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. ज्या प्रकारातून पोलीस स्टेशनला घेराव करणे, महिला पोलिसांचा विनयभंग करणे, प्रतिकात्मक पुतळे जाळणे, जमाव करणे, इत्यादी प्रकार घडलेत. धार्मिक भावना भडकणे वा भडकविणे. या प्रकारच्या घटना आजच्या नाहीत. जेव्हापासून धर्म अस्तित्वात आला. तेव्हापासूनच धार्मिक भावना भडकविण्याचं षडयंत्र केलं जात आहे. ज्यात पुर्वीच्या राजामहाराजांच्या काळातही धर्मावरुन वादंग झालेले आहेत. भारत निर्माण होण्यापुर्वी या भारताला हिंदुस्थान म्हणत. ज्यात एक वैदिक धर्म अस्तित्वात आला. ज्यातील तत्व पसंत नसल्यानं सर्वात प्रथम दोन धर्म अस्तित्वात आले. ते म्हणजे जैन व बौद्ध. त्यातच तत्वावरुन वैदिक, बौद्ध व जैनांच्या आपापसातील भावना भडकायच्या. ज्यातून सत्तेवर असलेल्या राजांची हत्या व्हायची. धार्मिक भावना या जशा हिंदुस्थानात भडकायच्या. तशाच धार्मिक भावना या विदेशातही भडकल्या जायच्या. विदेशात पुर्वी यहुदी व ज्यूचे संघर्ष आपण बरेचदा पाहिलेच आहे. तसेच नाझी पक्षाचीही वाटचाल इतिहासात आहे. हिंदू मुस्लीम धार्मिक भावनांचा विचार केल्यास आणि जास्त प्रमाणात झालेला उद्रेक लक्षात घेता पहिल्यांदा धार्मिक भावना इस सातव्या शतकात भडकल्या होत्या. ज्यावेळेस हिंदुस्थानात आलेल्या मोहम्मद बिन कासीमनं इस ७१३ मध्ये राजा दाहिरची हत्या केली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा मोठ्या स्वरुपाच्या धार्मिक भावना भडकल्या राजा पृथ्वीराज चव्हाणला बंदी बनवून मोहम्मद घोरीनं नेलं व धर्मपरीवर्तन करायला लावलं होतं. ज्यात महिलांचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता. ज्यातून आपली अब्रू वाचविण्यासाठी महाराणी संयोगीतासह कितीतरी स्रियांनी जोहार केला होता. या जोहार प्रक्रियेत पुढे राणी पद्यावतीचाही समावेश आहे. हिंदुस्थानातील कितीतरी स्रियांनी प्रसंगी याच धार्मिक भावनेचे शिकार होवून आपलं जीवन संपवलं आहे. ते सोळावे शतक की ज्या काळात औरंगजेब बादशाहा झाला. त्याची एक प्रकारची महत्वाकांक्षा होती की मी आलमवीर बनेल. त्याच आलमवीर पणाच्या भानगडीत त्यानं आपलाच भाऊ दारा व शुकोहची हत्या केली आणि आपल्या वडीलाला म्हणजे शहाजहानला नजरकैदेत टाकले. त्यानंतर तो राजगादीवर आला. विचार केला की मी संपूर्ण हिंदूस्थान जिंकेलच. याचाच विचार करुन त्यानं उत्तर भाग आपल्या ताब्यात आणला आणि आता दक्षिण भागावर ताबा मिळविण्यासाठी त्यानं आपले सरदार दक्षिण भागात पाठवले. परंतु येथे असलेल्या सिसोदिया वंशाचे राजे असलेल्या शिवाजी महाराजांसमोर त्याचे काहीच चालले नाही. कारण त्यांचा धाक व शौर्य औरंगजेब जाणून होता. शेवटी विचारांती औरंगजेब बादशाहा शिवाजी महाराजांच्या मृत्यूची वाट पाहात होता. जसे शिवाजी महाराज मृत्यू पावले. तसं त्याला वाटलं की आता आपण महाराष्ट्र सहजच जिंकू शकू. कारण आता महाराष्ट्रात सक्षम असा शिवाजी महाराजांसारखा राजाच राहिलेला नाही. परंतु अकस्मात तसा विचारही न करणाऱ्या औरंगजेबाला शह दिला, तो म्हणजे महाराज संभाजीनं. संभाजी महाराजांनी बऱ्हानपूर लुटलं व औरंगजेबाला दाखवलं की आम्हीही शिवाजी आमच्या वडीलांसारखेच आहोत. ज्याचा राग येवून संभाजी महाराजांना औरंगजेबानं कुटनीतीनं पकडलं व अतिशय क्रुरपणे हत्या केली. त्यानंतर इथे असलेल्या व संभाजीनंतर राजगादीवर आलेल्या महाराज राजारामनं व त्यानंतर त्याचीच राणी असलेल्या ताराबाईनं महाराष्ट्र लढवला. परंतु महाराष्ट्रातील जनतेला औरंगजेबाचे गुलाम होवू दिले नाही. इथंपर्यंतचा इतिहास हा बरोबर आहे व तो धार्मिक भावना विचारात घेतांना हा इतिहास लक्षात घेणे गरजेचे आहे. धार्मिक भावना भडकण्याचा वाद हा कबरीतून उत्पन्न झाला. विचार पुढे आला की ज्या औरंगजेबानं महाराष्ट्राला त्रास दिला. संभाजी राजाला क्रुरपणे मारलं. त्यांची कबर महाराष्ट्रात कशाला आणि त्या कबरीचा समावेश पुराणतत्व भाग म्हणून सुचीत कशाला? ती हटवावी व त्या सुचीतील समावेश हटवावा. उगाच त्या स्थळाचं उदात्तीकरण व्हायला नको. यात एका गटाचं म्हणणं हेच की कबर हटवावी तर दुसर्याच गटाचं म्हणणं आहे की कशाला हटवावी? यावरुन वाद. त्यात नेते आणखी आगीत तेल टाकत आहेत. त्यांना वाद हा मिटवायचा नाही. तो वाद सुलगवत ठेवायचा आहे. जशी एखादी धान्याची गंजी. ती जळत नाही. परंतु कुरपते आणि संपूर्ण धानाची गंजीच नष्ट करुन टाकते तशी. विशेष सांगायचं झाल्यास नेत्यांना आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं. म्हणूनच ते जमाव करतात. धार्मिक भावना भडकवितात. ज्यात सहभागी होत असलेली सामान्य जनता हीच भरडत असते. मात्र नेते त्यातून व्यवस्थीतपणे बाहेर पडतात. त्यांचं काहीच होत नाही. होतं, ते सामान्य लोकांचंच. कारण गुन्हा हा घडलेला. त्या गुन्ह्यांचे खटले दाखल त्यांच्या नोंदी या सामान्य माणसावरच झालेल्या. ज्यातून पुढे तेच खटले न्यायालयात उभे राहणार आहेत तारीख पे तारीख ते गुन्हे चालूच राहणार. हे सत्य आहे. आता मुद्याकडे येवूया. मुद्द्यात एक गट म्हणतो की की कबर हटवावी. कारण औरंगजेब हा क्रुरकर्मा होता. त्यानं महाराष्ट्राला त्रास दिला. संभाजी महाराजांची हत्या केली. देवळं पाडली. गाई गुरं कापली. हिंदू स्रियांची अब्रू लुटली. म्हणूनच अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रात नसावी. ज्या कबरीला एक विशिष्ट समुदाय आदर्श मानतो. एवढा आदर्श मानतो की त्यातून अनेक क्रुरकर्मे तयार होवू शकतील. जे क्रुरकर्मे तयार होवू नये. चांगली आदर्श विचारांची माणसं तयार व्हावीत. मात्र तो समुदाय म्हणतो की औरंगजेब आदर्श होता. त्यानं जे काही केलं ते धर्म वाढविण्यासाठी केलं आणि धर्म वाढविण्यासाठी केलेली कोणतीही कृती ही गैर नाही. हा झाला आदर्श व आदर्श ठरवत असणाऱ्या लोकांचा भाग. दुसरा महत्वाचा भाग आहे आणि तोही अतिशय मोठ्या प्रमाणात विचार करण्याचा भाग आहे. तो म्हणजे ताराबाईचं म्हणणं. तिनं आपल्या पतीच्या म्हणजेच राजारामाच्या मृत्यूनंतर आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसवले व जाहीरपणे निर्धार केला की या औरंगजेबाची समाधी याच महाराष्ट्रातील भुमीत खोदीन. तिनं आपलं स्वप्न पुर्ण केलं व तीच बाब संपूर्ण महाराष्ट्रासारखी गौरवाची ठरली. तिसरी महत्वाची गोष्ट ही की ज्या औरंगजेबाला आलमवीर नावाचा सन्मान मिळणार होता. त्या आलमवीराची समाधी उघड्यावर असणे ही बाब संबंधीत महाराष्ट्रातील लोकांनी समजावून घेण्यासारखी बाब आहे. ती बोध घेण्यासारखीच बाब आहे. त्यानंतर ताराबाई नाही तर संबंधित महाराष्ट्राला संपवू पाहणारा व आलमवीर पदाची स्वप्न पाहणारा औरंगजेब हा याच मातीत ताराबाईच्या जबर प्रहारानं निराश झाला व शेवटी हताश होवून मरण पावला. हा इतिहास आहे. हा लोकांचा विचार. अशा प्रकारे लोकं तिन्ही बाजूनं विचार करतात. लोकांचं आणखी एक मत आहे. ते म्हणजे महाराणी ताराबाई या संबंधित महाराष्ट्रासाठी आदर्श आहेत. हे कोणी मानो अगर न मानो. त्यांनी दिलेली औरंगजेबाला शिकस्त ही वाखाणण्याजोगीच आहे. एक महिला असूनही व आपला मुलगा फक्त चारच वर्षाचा असूनही या महिलेनं हार मानली नाही व औरंगजेबाला धडा शिकवला. ती लढली व औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले. ज्यातून औरंगजेबाचा पायही मोडला होता. विशेषतः त्यातच औरंगजेबाची महाराष्ट्रात समाधी असणे हा तिचाच निर्धार आहे. ते तमाम हिंदुसाठी गौरवाची बाब आहे की आमच्या हिंदू राणीनं म्हटल्याप्रमाणे वा निर्धार केल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या भुमीवर औरंगजेबाची कबर खोदली. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ही घटना आजन्म लक्षात ठेवण्यासारखी राहील आणि कितीतरी पिढ्याही जातील. त्या पिढ्यात आमची राणी ताराबाई व औरंगजेब लक्षात राहील. तसाच तमाम पिढींना इतिहास लक्षात राहील की आमच्या राणीनं कोणाची कबर खोदली तर ती औरंगजेब नावाच्या व्यक्तीची. जसा इतिहास रावण आणि माता सीतेचा आणि प्रभू रामाचा अस्तित्वात आहे. जर ही कबर हटवली तर महाराणी ताराबाई व औरंगजेब हा इतिहासच तमाम हिंदूच्या मनपटलावरुन पुसला जाणार. तसं पाहिल्यास इतिहास हा पुसण्यासाठी नसतो तर तो इतिहास बोध वा प्रेरणा घेण्यासाठी असतो. त्यात काही लोकं आणखी भर घालत आहेत. ती म्हणजे औरंगजेबाची कबर. तो त्या काळातील एवढा मोठा बादशाहा होता की त्या बादशाहाची कबर हिंदुस्थानात कुठेही बनवता आली असती. कारण त्यावेळेस संपूर्ण हिंदुस्थानच त्याच्या ताब्यात होता. तशीच ती महाराष्ट्र भुमीत नसती तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना औरंगजेब समजला नसता आणि बोधही घेता आला नसता. विविध माणसं व विविध त्यांचे बोलणे. औरंगजेबाची कबर व त्यावरचा वाद. आता कबर ही हटविल्यानं इतिहास मिटला जाणार नाही. औरंगजेबाला आदर्श मानणारे त्यालाच आदर्श मानतीलच यात वाद नाही. मात्र आज त्याच कबरीवरुन जे क्रुरकर्मा तयार होवू नयेत, असं लोकांचं म्हणणं. ते महत्वाचं आहे. लोकांमध्ये आदर्श विचार निर्माण व्हावेत. घरांमध्ये आदर्शपणा निर्माण व्हावा. त्यासाठी घरातूनच आदर्श संस्कार पेरावे लागतील. शाळेतूनही आदर्श संस्कार पेरावे लागतील. तरंच भविष्यात क्रुरकर्मा तयार होणार नाही. अन् वाद केल्यानं प्रश्न सुटणार नाहीच. चर्चेनंतर प्रश्न सुटेल. परंतु ती चर्चा ऐकून घ्यायची तयारी हवी ना. ती तयारी असावी. उगाचंच वाद करुन धार्मिक वाद तयार करु नयेत की ज्या धार्मिक वादातून पुढं धार्मिक दंगल तयार होईल. माणसानं असा वाद तयार करण्याऐवजी सुधारणा व सुशोभीकरण करावे. करायचंच असेल तर आपल्या दुर्लक्षीत झालेल्या व ज्या महाराणी ताराबाईनं व छत्रपती राजारामानं औरंगजेबाला शिकस्त दिली, त्या ताराबाई व राजारामाच्या समाधीस्थळाचं सुशोभीकरण करावे. जेणेकरुन महाराष्ट्रालाही गर्व असेल की आमच्या याच जोडीनं आज महाराष्ट्र जपला. नाहीतर महाराष्ट्राला शौर्याचा इतिहास लाभलाच नसता. अन् जतन करायचंच असेल तर त्या मुस्लिम व्यक्तीच्या शौर्याचं जतन करावं की जे शिवाजी महाराजांच्या सैन्यात अग्रस्थानी होते. एखादं शिवा काशिदचंही मोठं स्मारक असावं. आरमाराचा प्रमुख दर्यासारंगचेही स्मारक असावे. ज्यांनी महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य बनविण्यात मोलाचा वाटा उचलला. आज आपल्याकडे काय आहे. राजारामाची समाधी कोंढाणा किल्ल्यावर धुळखात पडलेली आहे. फक्त नावापुरती कशीतरी एका लहानशा मंदीरासारखी उभी आहे. ताराबाईचीही समाधी तशीच आहे. येशुबाईची समाधी आजपर्यंत माहीत नव्हती. नागपूरचा इतिहास पाहिला तर ज्यानं नागपूर वसवलं. त्या बख्त बुलंदशहाची समाधी कुठे आहे? हे नागपूरकरांना माहीत नाही. त्या समाध्यांचं संवर्धन करावं. त्यातच ज्या रघुजीराजांना आपण मानतो. त्याच्या नावाने वा त्या वंशातील झालेल्या राजांचा इतिहास नागपूरकरांना माहीत व्हावा म्हणून ते माहीत करण्यासाठी एखादं ऐतिहासिक स्थळ नागपूरात निर्माण व्हावं. परंतु आपण ते लक्षात घेत नाही. अन् आम्ही लढत बसलो आपल्याच वादात. औरंगजेबाची कबर हटविण्यात. ज्यातून धार्मिक भावना भडकल्या की त्याचा सामान्य लोकांना विनाकारण त्रास होणार. ज्यात काही संधीसाधू लोकं संधी साधू शकतात. तेव्हा विशेष सांगायचं म्हणजे लोकांनी यावर संयम ठेवावा. कोणीही कोणीही धार्मिक भावना भडकू देवू नये. मुस्लिमांचे हिंदू बांधव काही शत्रू नाहीत. अन् हिंदूंचे मुस्लिम बांधव काही शत्रू नाहीत. त्यांनीही त्या काळात आपल्याला आदर्श असलेल्या शिवाजी महाराजांना मदत केली होती. म्हणूनच महाराष्ट्र घडला व महाराष्ट्राची जपवणूक करता आली. तसेच काही हिंदूही औरंगजेबांकडे सरदार पदी होते. महत्वपूर्ण बाब ही की वाद कबरीचा नाहीच. वाद आहे व्यक्तीमत्वाचा. काही लोकं म्हणतात औरंगजेब क्रुरकर्मा, म्हणून त्यांची समाधी महाराष्ट्रात नको. ठीक आहे. त्यांना ही गोष्ट कोण समजावून सांगेल की बाबारे, तो आपल्या सामान्य लोकांचा विषय नाही. तो राजकारणाचा विषय आहे. त्यातूनच वाद उत्पन्न होतात. देशाचं एकत्रीकरण तुटतं. ते तुटू नये म्हणून लोकांनी आपल्या धार्मिक भावना भडकू देवू नयेत. त्यावर संयम ठेवावा. जेणेकरुन त्यातून आपलं नुकसान होणार नाही. त्याचबरोबर देशाचेही नुकसान होणार नाही. हे तेवढंच खरं. त्यातच हाही विचार करावा की हिंदू हेही मुस्लीमांचेच भाऊ आहेत व मुस्लिम हेही हिंदूचेच भाऊ आहेत. एकाच आईची लेकरं आहोत आपण. सर्व रुपांतरीत झालेले. त्यामुळंच आपण एकदुसऱ्यांवर वार करणं म्हणजे आपल्याच भावांवर वार करणं आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. लोकांनी काय काय घडलं ते सोडावं. उद्या काय घडवायचं आहे याचा विचार करावा व रास्त पावलं उचलावीत. ज्यातून देशाचा विकास होईल. तसंच लोकांनी धार्मिक भावनेसाठी संयम राखावं म्हणजे झालं. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतातच. लोकांच्या तोंडावर झाकण नसतंच. त्यामुळंच त्यांना बोलू द्यावं. आपण त्यांच्याकडे लक्ष देवू नये. तसंच एकमेकांच्या धर्माचा आदर करावा. जेणेकरुन शांतता व सुव्यवस्था निर्माण होईल यात शंका नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०