Love is like a flower. in Marathi Love Stories by Ankush Shingade books and stories PDF | प्रेम हे तिळगुळासारखे वाटा

Featured Books
Categories
Share

प्रेम हे तिळगुळासारखे वाटा

व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्याने प्रेम हे तिळगुळासारखे वाटा          उद्या व्हॅलेंटाइन दिवस. संबंधीत सर्व जगातील प्रेमी हा दिवस साजरा करणार आहेत व ते एकमेकांना फुलही देणार आहेत. त्यातच एखादा व्यक्ती जर हजर झाला नाही तर त्याचा रागही येणार आहे. तेव्हा तसा राग येवू न देता तो व्यक्ती वा तो प्रेमी का आला नाही हे समजून घ्यावे. कारण कधीकधी असंही घडू शकते की त्या व्यक्तीचा अपघात झालेला असतो. जो आपल्याला माहीत नसतो. कधीकधी आपला देश संस्कारीत असल्यामुळे त्या व्यक्तीला मायबापांनी येवू दिले नसेल किंवा कधीकधी त्या व्यक्तीला येण्याचे साधन मिळाले नसेल वा कधी संबंधीत व्यक्ती आजारी पडला असेल. आता आपण यावर म्हणाल की आता फोन आहे. फोनवर ती व्यक्ती का आली नाही ते तर ती व्यक्ती सांगू शकते ना. त्याचं कारण आहे की कधीकधी अशी बंधनं येतात, ज्याला वेळ म्हणता येईल. ते म्हणजे ती व्यक्ती फोनही करु शकत नाही. याबाबतीत जास्त न सांगीतलेलं बरं. ती बाब समजून घेण्यालायक बाब आहे.           एक असा प्रसंग. मला त्या प्रसंगाचा अतिशय राग आला होता. वाटत होतं की याला काय म्हणावं. कारण एक लेखक अतिशय मेहनतीनं आपलं लेखन करतो. पुस्तक लिहितो. अन् जेव्हा तो पुस्तक काढून विक्रीला ठेवतो. तेव्हा पुढील किंतू परंतु स्वरुपाचे प्रश्न नेहमी ऐकायला मिळतात की ज्याची लेखकालाही कल्पना नसते.          पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास लोकं दारु पाण्यावर लाखो खर्च करतात. परंतु पुस्तकावर तो खर्च करीत नाहीत. अशीच एक माझी पुस्तक. ती मी विक्रीला काढली. त्यावर दुसऱ्या जिल्ह्यातून फोन आला. बोलणं होतं,          "मला पुस्तक हवी आहे. तुम्ही पाठवावी."          त्यावर मी म्हटलं,         "पाठवणार. मला पुस्तकाचा खर्च पाठवावा."           मी बोललो व त्यानंतर मी त्यावर सवलत मुल्य सांगितलं व हेही सांगितलं की पोष्टाचा खर्च त्यात समाविष्ट होईल. त्यावर त्यांचा प्रश्न. पोष्टाचा खर्च किती येणार. मी म्हटलं साधारणतः चाळीस रुपये येणार.         माझं ते बोलणं. त्यावर त्याची छातीत धडधड वाढली असेल असं वाटायला लागलं. त्यावर तो म्हणाला,          "एवढा खर्च पोष्टाचा येत नाही राव."           याचाच अर्थ असा की लोकं पुस्तकाला नाकापेक्षा मोती जड समजतात. ज्यात काही अनमोल स्वरुपाचे विचार असतात.          आजच्या काळात पुस्तक वाचन करा म्हटलं तर ते महाविद्यालयीन तरुणांना आवडत नाही. मात्र त्यांना बागेत, शाळेच्या खानावळीत एकमेकांशी प्रेमाच्या गोष्टी करणं आवडतं. एकवेळ चांगला मित्रानं पाठविलेला व्हिडीओ आवडत नाही. अन् वात्रट स्वरुपाचा मैत्रीणीनं पाठवलेला व्हिडीओ आवडतो. त्याचं कारण आहे प्रेम.           अलिकडील काळात वाचन संस्कृती लयास जाते की काय, अशीच चिन्हं दिसत आहेत. लेखकांना वाचकवर्गच मिळत नाही अगदी निःशुल्क पुस्तक उपलब्ध करुन दिलं तरी. एकवेळ अशी येते की शुल्क लावलेली आणि तिही महागडी पुस्तकं प्रसंगी लोकं वाचतात. परंतु निःशुल्क स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली पुस्तक वाचत नाही. ते मश्गुल असतात व्हिडीओ पाहण्यात. अगदी लहान लहान स्वरुपात व्हिडीओ पाहण्यात व्यस्त असतात. त्यांना पुस्तक एका ठिकाणी बसून वाचणं म्हणजे कंटाळवाणे वाटते. त्यामुळंच ते पुस्तक वाचत नाहीत. व्हिडीओ पाहतात. परंतु हे जरी खरं असलं तरी पुस्तकं हे अति तीव्र स्वरुपाचं ज्ञान देत असतात. तसे ज्ञान व्हिडीओही देतच असतात. परंतु पुस्तकातून मिळालेलं ज्ञान हे चिरकाल टिकतं. तसं ज्ञान व्हिडीओचं टिकत नाही. जरी ते प्रत्यक्षात दृश्य स्वरुपात दिलं जात असलं तरी. शिवाय पुस्तकं हे चिरकाल टिकतात व व्हिडीओ तसे चिरकाल टिकणारे नसतात. असं काही लोकांचं म्हणणं. विशेष सांगायचं झाल्यास व्हिडीओ बनविणे व पुस्तक लिहिणे या दोन्ही क्रिया सारख्याच. दोन्ही मध्ये कसब आहे. ज्याप्रमाणे पुस्तक लिहिणं कठीण आहे. त्याचप्रमाणे व्हिडीओ काढणेही अवघडच. फार प्रचंड ताकद लागते. सगळ्या स्वरुपाची जुळवाजुळव करावी लागते. अशातच कोणी जर आपल्याला वाईट म्हटलं किंवा आपली अवहेलना केली वा उपेक्षा केली तर कधीकधी त्या गोष्टीचा आपल्याला राग येतो. तो राग आपला आपल्यातच मावत नाही. मग उद्रेक होतो आपल्या मनातील विचारांचा. जे मनात चांगले विचार असतात. ते विचार कुविचारात बदलतात. मात्र राग कुणीही येवू देवू नये.          रागाबाबत काही गोष्टी सांगतो. कारण राग येणे ही आपली स्वाभाविक कृती आहे व प्रत्येकालाच राग येत असतो. तसेच रागातूनच भांडणंही उद्भवत असतात. मात्र यावर एक व्यक्ती मला म्हणाला होता की राग जर येत असेल तर आधी डोळे लावा व काही वेळ गप्प बसा.  काही वेळानं डोळे उघडा. राग शांत होईल. दुसरी रागाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट ही की जर पुढील व्यक्ती आपल्याला रागाच्या भरात काही बाही बोलत असेल तर त्या व्यक्तीचं संपुर्ण बोलणं आधी ऐकून घ्यायचं. मग बोलायचं. म्हणजे त्या व्यक्तीला वाटेल की संबंधीत व्यक्तीनं आपलं बोलणं ऐकून घेतलं. तो किती चांगला व्यक्ती आहे. अशानं पुढील व्यक्तीचा रागही मावळतो व सुकार्य घडतं. मात्र यात अपवाद असा आहे की काही लोकांचे राग कितीही काही केलं तरी मावळत नाही. अशांच्या गोष्टी ऐकलेल्या बऱ्या.          महत्वपुर्ण बाब ही की आपली कृतीच कोणाला राग येईल अशी असू नये. जेणेकरुन त्यांना राग येईल. तो रागावलाही असेल कधीतरी. तरी त्या व्यक्तीला आपल्याला त्याचा राग आला आहे हे दाखविण्याची गरज नाही. तसं जर दाखवलं तर राग दिसून येईल व त्याचा परिणाम हा उद्रेकातच होईल ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा राग येवू न देता आपण सहकार्याची भावना ठेवावी हे तेवढंच खरं.           ज्याप्रमाणे पुस्तक लिहिणाऱ्या लोकांना ती वाचन न  करणाऱ्यांचा राग येतो. तसाच राग हा प्रेमीचा प्रेमिकेला वा प्रेमिकेला प्रेमिला येत असतो. ती न आल्यास वा त्या दोन्हींपैकी जो हजर,राहिला नाही तर असे करीत असतांना अतिशय राग येणारच. कारण त्यासाठी भरपूर तयारी केलेली असते. महत्वाचं म्हणजे उद्या व्हॅलेंटाइन दिवस. संबंधीत सर्व जगातील प्रेमी हा दिवस साजरा करणार आहेत व ते एकमेकांना फुलही देणार आहेत. त्यातच एखादा व्यक्ती जर हजर झाला नाही तर त्याचा रागही येणार आहे. तेव्हा तसा राग येवू न देता तो व्यक्ती वा तो प्रेमी का आला नाही हे समजून घ्यावे. कारण कधीकधी असंही घडू शकते की त्या व्यक्तीचा अपघात झालेला असतो. जो आपल्याला माहीत नसतो. कधीकधी आपला देश संस्कारीत असल्यामुळे त्या व्यक्तीला मायबापांनी येवू दिले नसेल किंवा कधीकधी त्या व्यक्तीला येण्याचे साधन मिळाले नसेल वा कधी संबंधीत व्यक्ती आजारी पडला असेल. आता आपण यावर म्हणाल की आता फोन आहे. फोनवर ती व्यक्ती का आली नाही ते तर ती व्यक्ती सांगू शकते ना. त्याचं कारण आहे की कधीकधी अशी बंधनं येतात, ज्याला वेळ म्हणता येईल. ते म्हणजे ती व्यक्ती फोनही करु शकत नाही. याबाबतीत जास्त न सांगीतलेलं बरं. ती बाब समजून घेण्यालायक बाब आहे व त्याबाबतीत राग येवू देवू नये म्हणजे झालं. कारण प्रेमदिवस आहे. त्यामुळंच प्रेम हे देखील तिळगुळासारखे वाटा म्हणजेच त्याचा तिळगुळासारखा गोडवा वाटेल व प्रेमदिवसाचंही सार्थक होईल यात शंका नाही.    अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०