श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते?
*श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते. कारण मुळातच गरीबांच्या घरी जे हुशार जन्मास येतात. त्यांना आपल्या परिस्थितीशीच झगडावे लागते. त्यांच्या गरजा गरीबीमुळं पुर्ण करता येत नाही. मग ती शिक्षण शिकण्याची गरज का असेना, अशातच त्यांचं शिक्षणही सुटलं व ते एखाद्या कामावर वेठबिगार म्हणून काम करीत असतात. त्यांच्या हुशारीचा त्यांना काहीच उपयोग होत नसतो. आज देश सुशिक्षीत आहे असं आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. कारण देशात हुशार जर नसते तर देश आज विकसीत राष्ट्राच्या रांगेत उभा नसता. त्यामुळं देशात चाणाक्ष बुद्धीमत्तेची मंडळी नाहीत असे म्हणताच येत नाही.*
आज जगात जसं खानपान व फॅशनला महत्व आहे. तसंच महत्व हुशारी व श्रीमंतीलाही आहे. परंतु सर्वांच्याच घरी विधाता दोन्ही गोष्टी देत नसतो. तसंच सर्वांनाच विधाता सुखी ठेवत नसतो. प्रत्येकाच्या घरी काही काही दुःख असतंच यात दुमत नाही.
हुशारी व श्रीमंतीबद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येकाच्या घरी हुशारी नसते. काही ठिकाणी हुशार असतात तर काही ठिकाणी पैसा असतो. तिथे पैसा वा मालमत्ता एवढी असते की ती मोजता येत नाही. परंतु तो पैसा कसा वापरावा याचं तारतम्य त्या घरात नसतं. तर काही ठिकाणी एवढी हुशारी असते. परंतु त्या हुशारीचा काहीच उपयोग नसतो. म्हणतात ना की चने जिथं असतात, तिथं दात नसतात व दात जिथं असतात तिथं चने नसतातच.
आजचा आपला काळ असाच आहे. आजच्या काळात चने व दात असण्याला अर्थ नाही. कारण काही ठिकाणी लोकांनी भ्रष्टाचार करुन पैसा वाढवला आहे. म्हणूनच विधात्यानं त्या ठिकाणी हुशारी ठेवलेली नाही. बऱ्याचशा अशा कुटूंबात एक दोन जण वेडेच असलेले दिसतात. कारण विचारलं असता काहीजण ते व्यंग जन्मापासून असल्याचं सांगतात, तर काहीजण अकस्मात काळानंतर घडलेला प्रकार असल्याचं सांगतात. असं का होतं? त्याचं कारण आहे, पैसा कमविण्यासाठी केलेला भ्रष्टाचार.
हुशारी ही सर्वच ठिकाणी नसते. याबाबतीतील एक उदाहरण आहे. एका शाळेत एक मुलगी फारच हुशार होती. कुटूंब सर्वसाधारणही नव्हतं. गरीबच होतं आणि अशातच त्या घरचा जबाबदार व्यक्ती मरण पावला. मग आबाळ झाली. मुलीला शिकवायचे कसे? प्रश्न पडला. ज्यात त्या महिलेनं पैशाअभावी तिची मुलगी हुशार असूनही तिला शिकवले नाही. या ठिकाणी तिच्या हुशारीचा कोणता उपयोग झाला? ही विचार करायला लावणारी बाबच आहे. याबाबतीतील दुसरं उदाहरण असंच आहे. एक गरीबच कुटूंब व त्याही कुटूंबातील ती एक हुशार मुलगी. मुलीला सर्वच यायचं. परंतु वडील दारु प्यायचे. ज्यातून तिच्या आईच्या मनावर परिणाम झाला व तिनं तिला शिकवलंच नाही. दारुड्या माणसाच्या घरची हुशारीची परिस्थितीच सांगू नये. त्या माणसाच्या घरीही हुशार मुलं असतात. परंतु दारुच्या व्यसनानं पुर्णच मुलांच्या हुशारीची राखरांगोळी होत असते. एक असाच दारुडा की त्या घरची त्याची पत्नी त्याला सोडून गेली व तिनं परिस्थितीअभावी तिला शिकवलेच नाही.
दारुचं व्यसन असलेल्या घरी जरी हुशारीला किंमत नसते. तशीच किंमत नसते घटस्फोट घेणाऱ्या महिलेच्या घरच्या मुलांच्या हुशारीला. तिच्या घरची मुले हुशार असतात. परंतु तिच्या एकंदरीत वागण्यानं त्याही मुलांच्या अंगच्या हुशारीची राखरांगोळी होत असते. त्याही मुली ऐन वेळेवर मुलांची हुशारी न पाहता आपल्या पतीला सोडून जात असतात.
हुशारीला कधीकधी उधळीही लागत असते. त्याला कारणीभूत असतो मृत्यू. अतिश्रीमंत कुटूंबात एखादा मुलगा हुशार असल्यास त्याच्या हुशारीला तेव्हा किंमत उरत नाही. जेव्हा त्याच्या कुटूंबातील त्याच्या आईचा किंवा वडीलांचा मृत्यू होत असतो. अशावेळेस जर एखादा घटक मृत्यू पावल्यास तो दुसरा विवाह करतो. मग दुसरा आलेला घरातील घटक हा अशा हुशार मुलांना शिकवेलच असं नाही. तो सरळ सरळ त्या मुलांना घरी बसवून त्यांना घरच्या कामाला लावत असतो. मग तो घटक श्रीमंत का असेना. तो घटक श्रीमंत जरी असला तरी त्या घरी हुशारीला काही किंमत नसते व हुशारीचा काही उपयोग नसतोच. श्रीमंतीचंही असंच आहे. श्रीमंत कुटूंबात एखादा जरी हुशार व्यक्ती असेल तर त्याच्या कलागुणांना व हुशारीला वाव नसतोच. सगळं काही पैशानंच विकत घेवू शकतो. असा विचार त्या कुटूंबात असतो. अन् तसं घडतंही. कारण सगळं पैशानंच घडून येत असतं. नोकरी, बंगले, गाड्या घोड्या जरी वापरण्याची रीत माहीत नसली तरी पैशाच्या भरवशावर वापरणं सुरु होत असतं अनेक ठिकाणी. अन् एखाद्या घरी जरी अतिहुशार असतील तरी पैसे नसल्यानं ते परिस्थितीशीच लढत असतात. त्यातच त्यांची बुद्धीमत्ता खर्च होत असते. जी बुद्धीमत्ता एखादा प्रयोग करतांना त्या प्रयोगात खर्च व्हायला हवी. परंतु तसे होत नसल्यानं ते मागे पडतात. त्याचबरोबर त्यांची बुद्धीमत्ताही मागे पडते आणि त्यांचा तो देशही. गरीबीत हुशारीला किंमत नसते. कारण त्यांना सतत परिस्थितीशी लढावं लागतं. ज्यात हुशारी खर्च होत असते. ज्या हुशारीची शक्ती मेंदूतून प्राप्त होत असते. ही नेहमी होणारी मेंदूतील झीज त्याच्या हुशारीला नेस्तनाबूत करीत असते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०