Are you going to a wedding too? in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | विवाहातही जात का?

Featured Books
Categories
Share

विवाहातही जात का?

विवाहातही जातीचं अस्तित्व, का?         *जात विवाहात होती. कारण त्यामुळंच नवदांपत्यांच्या दांपत्य जीवनाला स्थैर्य आणि तेवढंच संरक्षण मिळत होतं. परंतु कालांतरानं जातीचा संदर्भ व स्वरुप बदललं व आंतरजातीय विवाहाला सुरुवात झाली. ते घटनेतील कलम ४९८ ब व १२५ अ यामुळं शक्य झालं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*          जात...... अलिकडील काळात जातीवरुन भांडणं होतात. जात काढली तर न्यायालयात खटले दाखल होतात. जातीच्या आधारावर आजही उच्च नीच असा भेदभाव चालत असतो. कधीकधी अपमान होतो. कधीकधी पदोन्नत्याही नाकारल्या जातात. एकंदरीत सांगायचं झाल्यास अन्याय होत असतो. अशी ही जाती आधारावरील भेदभावाची दरी. ती भेदभावाची दरी दूर करता यावी म्हणून जात कोणी काढल्यास खटल्याची तरतूद आहे. म्हणतात की आमची कोणी जात काढली तर आम्ही माफ करणार नाही. एखाद्याची कनिष्ठ असणारी जात काढली तर जात काढली म्हणून जे खटले दाखल होतात. मग निकाल लागेपर्यंत खटले न्यायालयात सुरुच असतात. ज्यात चपला झिजत असतात. तरीही जातीचं आमच्यावर एवढं बंधन असतं की जात जर आम्ही आमच्या नावासमोर लावली नाही तर आम्हाला ते कसंतरी विचित्र वागण्यासारखं वाटतं. जात ही विवाह करतांनाही पाहिली जाते. त्यातच जाती आधारीत विवाह हे मुला मुलींच्या पसंतीनं होतीलच याचा काही नेम नसतो. शिवाय असा विवाह झाला आणि काही काळानंतर पती पत्नीचं पटेनासं झाल्यास जातीची काही माणसं दबाव टाकून त्या दोघांनाही समजवतात. कुटूंबाचा दोष नसतांना वाळीत टाकायची धमकी देत असतात. त्यामुळं नाईलाजानं अशा स्रीपुरुषांवर जातीचं बंधन आल्यानं वा दबाव वाढल्यानं चूप बसावं लागतं. त्यामुळंच काही लोकांचं बोलणं की कशाला हव्यात जाती आणि जातीवरुन ही भांडणं. जातच नसेल तर भांडणंही होणार नाहीत.         जात अस्तित्वात आली कामावरुन. त्यातच त्या काळात स्वतःच्या रक्षणाचाही एक हेतू होताच. आता जात आमच्या अगदी नावाला चिकटलेली आहे. तसं पाहिल्यास जातीचं काही असं विशेष महत्व नाही. असं काही लोकांना वाटतं. असंही नाही की जात नसेल तर आम्ही मरणार अन् जात असेल तर जगणार. जात जरी नसेल तरी आम्ही जगू शकतो. तशी जात ही पुर्वीपासूनच चालत आलेली आहे. जेव्हा झाडावरील माकडाचा मानव बनला. त्या माणसाला लवकर ओळखता यावे व आपली कामं सुकर व्हावीत म्हणून जात बनविण्यात आली. जातीचे हेच सर्वात पुर्वीचे महत्व होते. जातीचे महत्व आणि स्वरुप पुर्वीच्या काळात ओळख म्हणून जरी असले तरी आज ते स्वरुप बदललं आहे व आज जाती आधारीत जातीवरच होत असलेला अन्याय पाहिल्यास जात नष्ट झालेली बरी असे वाटत आहे.         जात ही माणसाला ओळखण्याच्या दृष्टीनं महत्वाची असली तरी जातीचं आणखी एक महत्व आहे. ते म्हणजे विवाह. विवाह हा पुर्वीपासून जातीत करण्याची परंपरा अस्तित्वात होती. त्याचं कारण होतं रक्तसंबंध व आपल्या मुलाबाळांचं पटवून घेणं. कारण ज्यावेळेस मुलं मुली तरुण होत. त्यावेळेस मुली ह्या परीपक्व नसायच्या. त्यांना स्वयंपाक करण्यापासून तर संसारातील सर्व गोष्टी शिकवाव्या लागायच्या. शिवाय शिकवावं लागायचं घरच्या धंद्यातील कसब. ज्या धंद्यातील काही गोष्टी ती आपल्या आईवडीलांकडून शिकून आलेली असायची. जसे चांभाराच्या घरच्या मुलीला चांभारकाम कसे करायचे. हे वेगळे शिकविण्याची गरज नसायची. तसंच मांगाच्या मुलींना झाडू कसे बनवावे लागते. हे शिकवावे लागायचे नाही. तेच इतर कामातही होते. काही गोष्टी या कामाशीही संबंधीत असायच्या. शिवाय आपल्याच जातीशी विवाह केल्यास जातीवरुन आक्रंदन होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज नसायची. नवीन घरात येणारी मुलगी आपल्याच जातीतील मागीतली तर ती जातीवरुन आपल्या संसारात लवकर रमून जात असे आणि विवाह करतांना केवळ जातीतीलच नाही तर नात्यातीलही मुलगी मागण्याची प्रथा होती. त्याचं कारण होतं संस्कार व ओळखपारख. मुलगी वात्रट निघू नये. हा त्यापाठीमागील उद्देश होता. अन् वात्रट निघालीच तर तिला सरळ करण्याचं  बाळकडूही जातीतूनच पाजलं जायचं.         विवाह हा जातीतच व्हायचा व एखादी मुलगी वात्रट निघाली वा ती आपल्या सासू सासऱ्याचं ऐकण्याच्या पलीकडे असली तर आधी जातीत एक प्रकारची पंचायत भरायची. ज्यात जातीतील गणमान्य माणसं असायची. जी आपआपल्या अनुभवानं मार्गदर्शन करायची.  ज्यातून नवविवाहीत जोडपं आपलं वर्तन सुधारायचे. एवढ्यावरच भागलं नाही तर गावपंचायत व्हायची. त्यातही खटले नेले जात व त्यातही जातीची माणसं असायची. काही नात्यातील जवळचे नातेवाईकही असायचे. ज्यातून सुधारणा होत असे आणि त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर सरळ सरळ सोडचिठ्ठी व्हायची. ज्याला आज घटस्फोट म्हणतात. ज्यातून कोणालाच कोणत्याही स्वरुपाची क्षती पोहोचविल्या जात नसे. लवकरच आणि ताबडतोब निर्णय केला जात असे. शिवाय अशावरही भागले नाही तर त्या जातीच्या माणसाला वाळीत टाकण्याची शिक्षा होत असे. ही बातमी अख्या गावच्याच बिरादरीत नाही तर गावक्रोशीत पसरत असे. त्यानं फार मोठ्या स्वरुपाचा फरक पडत असे. त्यांच्या घरच्या इतर मुलांचे त्यानंतर विवाह होत नसत. ज्यातून कोणत्याही जातीतील कोणतीच स्री वा कोणताच पुरुष हा आपल्या संसारात भांडणं जरी झाले तरी ती भांडणं मिटवायचा. परंतु संसार टिकवीत असे. महत्वपुर्ण बाब ही की काल जात होती म्हणून संसारही टिकत होता व जातीआधारावरुन जास्त प्रमाणात घटस्फोट नव्हतेच.          काल जात होती व कालच्या जातीनं घटस्फोट जास्त प्रमाणात घडू दिले नाही. संसार टिकवले. त्यातच एकदोन अशीही प्रकरणं असायची की ज्या प्रकरणात काही तरुण तरुणी पळून जावून दुसऱ्याच जातीशी विवाह करीत. ज्यात कालांतरानं पटत नसे व एकदा का मन त्या महिलेपासून विटलं की पुरुष दुसरी पत्नी करीत असे. ज्यातून पहिल्या पत्नीवर अनंत प्रकारचे अत्याचार होत असत. कधी उपाशी ठेवणे. कधी तिला आगीचे चटके देणे. कधी तिला घरातून हाकलून देणे. असे होवू नये म्हणून कालांतरानं जेव्हा संविधान बनलं. तेव्हा त्यात विशेष अशा कलमा टाकल्या. ज्यात कोणत्याही पुरुषानं विवाह केला तर त्यानं तिला सोडू नये. मग ती पत्नी म्हणून त्यानं कोणत्याही जातीतील स्रीचा स्विकार केला असेल. अन् तसं जर घडलंच तर तिला न्यायालयातर्फे तिला दाद मागता येईल. त्याच अनुषंगानं घटनेत दोन कलमं टाकली. पहिली म्हणजे ४९८ ब होती. त्यानुसार एखाद्या पुरुषानं पत्नी म्हणून एखाद्या स्रिचा स्विकार केल्यास आणि अचानक सोडल्यास त्याला विनाजमानतीनं आतमध्ये टाकणे. त्याचा अर्थ होता, त्यानं तिला सोडू नये. तशीच दुसरी कलम होती १२५ अ. समजा एखाद्या पुरुषानं एखाद्या स्रिला पत्नी म्हणून त्यागल्यास तिच्या खान्याचा खर्च म्हणून पोटगी देणे. ती पोटगी यासाठी होती की स्रियांच्या कमावण्याचा अधिकार त्यावेळच्या समेजव्यवस्थेनं नाकारला होता. जातीप्रथेनं व येथील अंधश्रद्धेनं स्रियांच्या शिक्षणावर बंदी आणली होती. शिवाय शिक्षण स्रियांसाठी जरी खुलं झालं असलं तरी येथील स्रिया शिकत नव्हत्या.          या कलमा येथील समाजव्यवस्थेला लागू होत्या. कारण जो समाज जातीवर आधारीत विवाह करायचा. त्या समाजातील एखाद्या कन्येनं असा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यास तिला तिचा माहेरचा परीवार पोसायला सक्षम नसायचा. त्याचं कारण होतं, मुलांना जन्मास घालणं. रोगराई जास्त असल्यानं व त्या रोगराईच्या निदानासाठी लागणारी औषधे जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्यानं परीवारात अनेक मुलांना बाप जन्माला घालत असे. अशावेळेस एखादी मुलगी जर घटस्फोटानं घरी येवून बसल्यास तिच्या घरच्या बाकीच्या भावंडांचा विवाह होत नसे. अशी स्री पतीनं सोडल्यावर चक्कं आत्महत्याच करीत असे वा पतीच्याच घरी एका कोपर्‍यात राहून पतीचा अत्याचार सहन करीत असे. असे होवू नये म्हणून पोटगीची रक्कम व विनाजमानतीची कलम होती.          जातीवर आधारीत विवाह अस्तित्वात होता. जर एखादी मुलगी दुसर्‍याच जातीच्या मुलांसोबत पळून गेली तर त्या घरचा जबाबदार व्यक्ती हा आत्महत्याच करीत असे. ज्यात नाक कापलं गेलं असे मानण्याची पद्धत होती. ती आत्महत्या होती, इतर कोणत्याच मुलीनं इतर समाजातील मुलांसोबत पळून न जाणं. त्याचं कारण होतं, इतर जातीतील लोकं तिला सुखी ठेवणार नसल्याची भावना. ती जर सुखी राहणार नसेल तर आपल्याला दुःख होईल. ते माहीत होण्यापुर्वीच मरण पत्करलेलं बरं होईल. असे मानण्याची भावना. म्हणूनच आत्महत्या.            आज काळ बदलला. आज मुली शिकल्या. स्वतः कमवायल्या लागल्या. त्यामुळं काल पतीच्या भरवशावर जगणाऱ्या मुली आज कमवत्या झाल्या. व्यतिरीक्त काल ज्या मुली सासूचा अत्याचार सहन करायच्या. आज त्याच मुली ज्या कमवत्या झाल्या, त्या सासूंवरच अत्याचार करायला लागल्या. शिवाय काल ज्या मुली वडीलांच्या मतानं जातीशीच विवाह करायच्या. आज त्याच मुली मायबापाला न विचारता कोणत्याही जातीशी विवाह करतात. तशीच आज जरी मुलगी इतर कोणत्याही जातीच्या मुलाशी पळून जरी गेली तरी आजच्या काळात कोणताच बाप मुलीनं नाक कापलं म्हणून आत्महत्या करीत नाही. कारण आज ना त्याला इतर तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांच्या विवाहाची चिंता असते. ना त्याला समाजाची चिंता असते. कारण आज समाजही काही अंशी तशाच स्वरुपाचे पावले उचलत असतो. तशाच आजच्या काळात कोणत्याही परिवारात जास्त मुलं नसतात की विवाहाची चिंता पडेल.         विशेष सांगायचं झाल्यास काल विवाह हा जातीशीच व्हायचा. कारण विचार असायचा की आपल्या जातीतील माणसांचं वागणं पाहून त्याला समजावता येईल की बाबा रे, तू असा वागू नकोस. ही कृती जातीतील माणसांकडूनच घडायची. त्यावर तो ऐकायचा. कारण वाळीत टाकण्याची भीती असायची. ज्यातून इतर मुलांच्या विवाहाच्या चिंतेनं चिंतातूर असलेला बाप विवाहाच्या चिंतेतून मुक्त असायचा. अन् जातीचा विवाह तुटलाच, तरही त्याला समस्या नसायची. ती लवकरच जातीतील इतर माणसाच्या घरी जायची. ज्याला पाट लावणे म्हणत किंवा विवाह तुटलाच तर ती माहेरी येत नसे. ती आपल्या वडीलाची बदनामी होवू नये म्हणून कधी आत्महत्या करीत असे वा स्वतंत्र्य जगत असे. शिवाय आपल्या मुलीचा विवाह करतांना बाप सांगत असे की बेटा, मरुन जाशील, परंतु परत माहेरी येवू नकोस. ती माहेरी येणं म्हणजे बदनामीचा सूर असतो असं समजण्याची प्रथा अस्तित्वात होती. मात्र तिनं इतर जातीतील माणसांशी विवाह केल्यास चिंता असायची की तिचं कसं होणार. तिही आपल्याच पोटातील जीव आहे.            आज समाज बदलला. अंधश्रद्धा काही अंशी दूर पळाल्या. त्याचबरोबर मुली सुधारल्या. विचारानं प्रगल्भ झाल्या. हा सर्व बदल शिक्षणानं केला व शिक्षण हे वाघिणीचं दूध ठरलं. एकंदरीत सांगायचं झाल्यास परिस्थिती बदलली व त्याच मुली आज सासूवर अत्याचार करु लागल्या. पती असलेल्या पुरुषांवर अत्याचार करु लागल्या. शिवाय असे त्या स्वतः तर करुच लागल्या. व्यतिरीक्त ४९८ ब व १२५ अ या कलमांचाही गैरवापर करु लागल्या. आज जरी मुली सुधरल्या असल्या व विचारानं प्रगल्भ झाल्या असल्या तरी. कारण आज मुली सुधरल्या. मात्र कलमा अजूनही त्याच आहेत. त्या सुधरवल्या गेल्या नाहीत. शिवाय आज आणखी एक बदल झाला. जात सुधारली. जातीवर आधारीत विवाह सुधारले. आज बरीच मुलं वा परीवार आंतरजातीय विवाहही करु लागले आहेत. कारण कालच्या विवाहासारखा आज विवाह हा संस्कार राहिलेला नाही. त्यात बदल झालेला असून त्याला कराराचे स्वरुप प्राप्त झालेले आहेत. आजचे विवाह करार केल्यागत केव्हाही जुळतात आणि केव्हाही तुटतात. मात्र आज विवाहाचे खटले सुरु असतात. तारीखवर तारीख करत. ४९८ ब व १२५ अ चा वापर करीत. काही खटले याच कलमांच्या गैरवापरावरही सुरु असतात की जे संपता संपत नाहीत. महत्वाचं म्हणजे ४९८ ब व १२५ अ असल्यानं मुलींना विवाह करतांनाही घाबरण्याची गरज उरलेली नाही. जरी त्या मुलींचा विवाह झाल्यानंतर विवाह तुटला तरी. मग तो जातीच्या मुलांसोबत केलेला विवाह का असेना वा आंतरजातीय मुलांसोबत केलेला विवाह का असेना.          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०